Nilesh Bamne

Romance

3.4  

Nilesh Bamne

Romance

जोडवी...

जोडवी...

384 mins
1.1K



जोडवी...

                    लेखक :- निलेश बामणे


      इमारतीतील एका प्लॅट मध्ये हॉल मध्ये एका सोफ्यावर बसून चाळीशीचा विजय वर्तमानपत्र वाचत होता इतक्यात दारावरची बेल वाचली ( टिंग - टॉंग )

विजय हातातील पेपर सोफ्यावर टाकत उठला आणि दरवाज्याच्या दिशेने चालू लागला त्याने हळूच दरवाजा उघडला तर दरवाजात एक सुंदर स्त्री उभी होती

ती दिसायला सुंदर असली तरी मोलकरणीच्या वेशात दिसत होती म्हणजे तिचे केस विसकलेले होते.. पदर खोचलेला होता, साडी थोडी मलकटलेले आणि थोडी सावरून वर घेतलेली होती, चेहऱ्यावर अजिबात मेकप नव्हता, चेहरा किंचित थकलेला दिसत होता, शरीरयष्टी खूपच नाजूक म्हणजे ( झिरो फिगर ) होती.

तिच्या गळ्यात एक छोट मंगळसूत्र होत, हातात हिरव्या बांगड्या,पायात जोडवी,कानात छोटीशी सोन्याची कर्णफुले होती. विजयला दरवाज्यात पाहताच ती थबकली होती आणि तिला पाहून विजयही थबकला होता. पण दोघेही स्वतःला सवरत गालात किचिंत हसत होते...

विजय : ( तिच्याकडे पाहत ) प्रतिभा ! तू ... इकडे काय करते आहेस ? ये ! ना !आत ये !

प्रतिभा : ( किंचित ओशाळत आत आली आणि विजयला म्हणाली ) विजय ! मला माहित नव्हते हे तुझे घर आहे . नाहीतर ! मी नसते आले, माझी घरकाम करणारी एक मैत्रीण म्हणाली की या घरात कामासाठी एक मोलकरीण पाहिजे म्हणून मी कामासाठी आले होते. बरं ! मी आता निघते आणि ती निघणार इतक्यात ...

विजय : कोठे निघालीस ? बस ! मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो.

प्रतिभा : नको ! पाणी नको ! मी निघते मला अजून काही घरातील कामे करायची आहेत..

विजय ! मी बस म्हणालो ना ! ( तो आत जाऊन तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन आला आणि सोफ्यावर किंचित सावरून बसलेल्या तिच्या हातात देत ...

प्रतिभा ! तू कोणत्याही कामासाठी का माझ्या घरात आली असशील ! पण आजही मी तुला माझी मैत्रीण मानतो आणि भविष्यातही मानत राहीन.. माझ्या दृष्टीने कोणतेही काम हलके नाही ! मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नव्हतो , हे तुलाही माहित आहे आणि तसेही हे घर माझ्या मालकीचे नाही, मॅडमच्या मालकीचे आहे , त्या एका मोठ्या कंपनीत कामाला आहेत, त्यांना घरातील कामे करायला अजिबात वेळ नसतो, मी दिवसभर घरातच असतो माझी लिखाणाची आणि इतर कामे करत... तू माझी मैत्रीण असलीस तरी तुला ह्या घरात काम करायला काहीच हरकत नाही ! तू या घराला तुझेच घर समजून काम कर... तुला कामाची गरज आहे आणि आम्हाला मोलकरणीची ! तू उद्या सकाळी आठ वाजता कामाला ये ! मी मॅडमशी तुझी ओळख करून देईन तू त्याच्याशी पगाराचंही बोलून घे ! पगाराची तू चिंता करू नकोस तुला तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच पैसे मिळतील कारण आम्ही घरातल्या माणसासारखीच तुझ्यावर घराची जबाबदारी टाकून बाहेर जाऊ शकू !

प्रतिभा : ठीक आहे ! मी उद्या सकाळी आठ वाजता येते ! ( ती सोफयावरून उठत दरवाज्यात गेली आणि तिचे हात नकळत विजयला टाटा करायला अर्धवट उंचावले...

ती निघून गेल्यावर विजयने दरवाजा बंद करून घेतला आणि तो पुन्हा सोफयावर बसून पेपर हातात घेत त्यात डोके खुपसून बसला... तास - दोन तासाने पुन्हा दारावरची बेल वाजली विजयने पुढे होत दरवाजा उघडला तर दरवाजात यामिनी उभी होती... ( यामिनी विजयची मॅडम, दिसायला अतिशय सुंदर , मध्यम बांधा , शरीरयष्टी प्रतिभासारखी नाजूक नाही पण जास्त स्थूलही नाही, अंगावर पुरुषी पोशाख ! म्हणजे सूट ! तोंडाला बऱ्यापैकी मेकप केलेला, ओठाला लिपस्टिक आणि गालाला लाली होती पण ती भडक नव्हती. बोलण्यात नाजूकपणा थोडा कमीच होता पण त्या बोलण्यात गोडवा मात्र नक्की होता, चेहरा बोलका आणि हसरा होता. ती आत येताच सरळ बेडरूममध्ये गेली आणि फ्रेश होऊनच बाहेर आली आणि सोफ्यावर बसून टी .व्ही. सुरु केला , विजय सोफ्यावरून उठून आत स्वयंपाक घरात गेला आणि दोघानसाठीही चहा आणि नाश्ता घेऊन बाहेर आला, नाश्ता समोरच्या टेबलावर ठेऊन त्याने चहाचा एक कप यामिनीच्या हातात दिला आणि तो तिच्या शेजारी थोडे अंतर ठेऊनच बसला...

यामिनी : थँक्स !

विजय : ( गालातगोड हसला ) यामिनी ! आज एक बाई कामासाठी आली होती, आपण तिला कामावर ठेऊन घेऊ या ! सर्वात महत्वाचे म्हणजे, ती माझ्या ओळखीची आहे पूर्वी आमच्या चाळीत राहणाऱ्या मित्राच्या घरी ती यायची ! आता तिचे लग्न झालेले आहे तिला कामाचीही गरज आहे , ओळखीची असल्यामुळे तिच्यावर डोळे ढाकुन विश्वासही ठेवता येईल... उद्या सकाळी आठ वाजता येणार आहे ती.. तू तिच्याशी पगाराचे बोलून घे !

यामिनी : बरं झालं ! एकदाची मोलकरीण मिळाली , तुझ्या ओळखीची आहे ना ! मग प्रश्नच मिटला, तिला पाहिजे तेवढा पगार आपण देऊ ! तुला ही घरातील छोटी - मोठी कामे करताना पाहायला मला नाही आवडत...

विजय ! त्यात काय ? ही सर्व कामे मी लहानपणापासून करत आलो आहे...

यामिनी : पण मला करायला वेळ मिळत नाही याचे वाईट वाटते.

विजय : उद्या पासून प्रतिभा ! करेल ही कामे

यामिनी : प्रतिभा कोण ?

विजय : असं काय करतेस ? उद्या आपल्याकडे जी बाई कामाला येणार आहे तिचेच नाव प्रतिभा आहे

यामिनी : प्रतिभा ! छान नाव आहे...

विजय : यामिनी तू आज लवकर घरी आली आहेस तर आपण थोड्यावेळाने आज बाहेर फिरायला जाऊ आणि बाहेरूनच जेऊन येऊया !

यामिनी : विजय ! तू अगदी माझ्या मनातलं बोललास... ( आणि यामिनी हळूच विजयच्या मिठीत विसावली ) ...

विजय : तिला आपल्या मिठीतुन हळुवार दूर करत सोफ्यावरून उठतो आणि म्हणतो... चला आवरा आता आपल्याला बाहेर जायचे आहे ना ?

यामिनी : जाऊ या रे ! काय घाई आहे ...

विजय : मला घाई नाही ! पण तुला नटायला जरा जास्तच वेळ लागतो !

यामिनी : एकदा साडी नेसून बघ ! मग कळेल तुला , जास्त वेळ का लागतो !

विजय : माझी इच्छा खूप आहे ! पण तसा योग काही अजून आला नाही !

यामिनी : म्हणजे !

विजय : एखाद्या नाटकात स्त्री भूमिका करायला मिळायला हवी होती...

यामिनी: कशाला ? लिहितोयस तेवढे पुरेसे आहे !

विजय : बरं बाई ! तू ही आवर ! मी ही आवरतो माझे...

दोघेही मस्त तयार होऊन हॉलमध्ये येतात आणि लाईट बंद करून घराच्या बाहेर पडतात...

विजय आणि यामिनी बाहेर फिरून रात्री उशिरा घरी येतात... घरातील बंद केलेले दिवे सुरु करतात आणि सोफ्यावर बसतात...


यामिनी : खूप दिवसांनी आपण असे रात्री बाहेर फिरायला गेलो नाही ?


विजय : हो ! ना ! काय करणार तुला वेळ असतो तेंव्हा मला वेळ नसतो आणि मला वेळ असतो तेंव्हा तुला वेळ नसतो..


यामिनी : यापुढे आपलयाला आपल्यासाठी असा वेळ काढावाच लागेल नाहीतर आपण आयुष्यात आनंद असतो हेच विसरून जाऊ...

मागच्या चार - पाच वर्षांपासून आपण फक्त आणि फक्त काम एके काम करतो आहोत ! तुला कामाचा कंटाळा येत नसेल कारण तू तुझ्या आवडीचे काम करतोस आणि मी पैशासाठी काम करते.


विजय : मी माझ्या आवडीचे काम करत असलो तरी तुमच्या कामाची वेळ ठरलेली असते, माझ्या कामाचे तसे नाही , मी तर स्वप्नातही माझ्या कामाचाच विचार करत असतो.


यामिनी : तुला काय गरज आहे हा इतका त्रास करून घ्यायची ? माझ्या पगारात आपले सर्व उत्तम चालू शकते


विजय : मी तू विकत घेतलेल्या घरात राहत असलो तरी मला बायकोच्या जीवावर मजा मारणारा नवरा व्हायचे नाही.


यामिनी : तू काहीही काय बोलतोस ? माझे घर ते तुझे घर नाही का ?


विजय : तसे नाही ! माझ्या लहानपणापासून माझ्या मालकीचे एक घर असावे अशी माझी खूप इच्छा होती ,का माहीत आहे ?


यामिनी : का ?


विजय : आता आपल्या घरातील एक कपाट पुस्तकांनी भरलेले आहे, भिंतीवर मला मिळालेले प्रमाणपत्र फ्रेम करून लावलेले आहेत, शोकेसमध्ये मला मिळालेल्या टॉफी आहेत... पण मला हे सर्व माझ्या मालकीच्या घरात हवे होते...


यामिनी : हे घर मी तुझ्या नावावर करू का ?


विजय : उगाच विनोद करू नकोस ! हे घर तुझ्या नावावर आहे पण तुझ्या मालकीचे व्हायला अजून वीस वर्षे लागतील...


यामिनी : विजय ! इतका पुढचा विचार नको करुस ? आता आपल्याला हात पाय पसरायला हक्काची जागा आहे ना ! बस्स...


विजय : बरं ! झोपूया आता ! तुलाही उद्या लवकर ऑफिसला जायचे आहे ना !


यामिनी आणि विजय फ्रेश व्हायला आत जातात... दोघेही फ्रेश होऊन बाहेर येतात... यामिनी विजयला '' गुड नाईट " म्हणून बेडरूममध्ये झोपायला जाते विजय तेथेच हॉलमध्ये सोफा कम बेडचा सोफा करून लाईट बंद करतो आणि त्यावर झोपी जातो...


दुसऱ्या दिवशी सकाळी विजय आणि यामिनी सोफ्यावर बसून चहा पित असतात इतक्यात दारावरची बेल वाजते... विजय जागेवरून उठून दरवाज्या जवळ जातो तर दारात प्रतिभा उभी असते तिला आत घेत तो दरवाजा बंद करतो... तो प्रतिभाची ओळख यामिनीशी करून देत...


विजय : यामिनी ! ही प्रतिभा ! काल तुला म्हणालो होतो ना ! कामासाठी एक बाई मिळाली आहे , ती हीच प्रतिभा !

त्यावर प्रतिभाने यामिनीला हात जोडून नमस्कार केला


प्रतिभा : नमस्ते मॅडम !


यामिनी : नमस्ते ! आणखी कोठे कामे करतेस ?


प्रतिभा : आपल्या इमारतीतील चार घरातील धुणी - भांडी करते मी.. . माझ्या ओळखीची एक बाई म्हणाली कि तुम्हाला कामासाठी बाई पाहिजे म्हणून मी आले होते तर साहेब म्हणाले उद्या सकाळी ये !


यामिनी : हो ! साहेब म्हणाले मला, तुला घरातील सर्व कामे करायला लागतील मी तुला १०,००० रुपये पगार देईन ! इतर वेळेत तू दुसरी कामे केलीस तरी चालेल ! तसे आमच्या घरात आम्ही दोघेच राहतो आमच्या घरात तिसरा माणूस आला तरी तो राहायला येत नाही ! रविवारी तुला सुट्टी मिळेल ! सकाळची धुणीभांडी करायची, साहेबांसाठी दुपारचे जेवण करायचे, आणि संध्याकाळी येऊन रात्रीचे जेवण करायचे... बस... मी तुला घराची एक चावी देऊन ठेवेन ! साहेबांचा काही भरोसा नाही ते कधी घरी असतात कधी नसतात..


प्रतिभा : बरं ! मॅडम मी कधी पासून कामाला सुरुवात करू ?


यामिनी : आज पासूनच कर...


प्रतिभा : बरं ! म्हणून त्यांच्या समोरील चहाचे कप उचलून ते घेऊन स्वयंपाक घराच्या दिशने गेली. 


यामिनी : विजय ! प्रतिभा मला आवडली...


विजय : ती कामसू ही आहे, बिचारी कळत्या वयापासून घरकाम करतेय !

आता लग्न झालं तरी घरकाम सुटलं नाही ! तस ते कोणत्याच बाईच्या वाट्याचं कधीच सुटत नाही ..

पण ! तू तिला रविवारी सुट्टी का दिलीस ?


यामिनी : तिला थोडा आराम नको का कामातून ? आणि आपलीही घरकाम करायची सवय मोडायला नको ! त्यात मला तुझ्या हातचा चहा - नाश्ता आणि खिचडी खायला आवडते.


विजय : मलाही ते तुला करून खायला द्यायला आवडते.


यामिनी : आपल्या या गप्पा अशाच सुरु राहतील आणि मला ऑफिसला जायला उशीर होईल ! चल मी तयारी करते आणि निघते !


विजय तेथेच सोफ्यावर पेपर वाचत बसला.. यामिनी तयार होऊन आली आणि विजयला बाय ! करून.. बाहेर पडत पडता


यामिनी : प्रतिभा ! चल मी निघते ! तुझी कामे आटपली की तू जा !


प्रतिभा : ( स्वयंपाक घरातूनच ) ठिक आहे मॅडम !


यामिनी निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाक घरातून बाहेर येत..

प्रतिभा : साहेब दुपारी जेवायला काय करू ?


विजय : जास्त काही नको ! चार चपात्या आणि बटाट्याची भाजी कर बस..


प्रतिभा : ठिक आहे साहेब !


विजय : तू मला पूर्वीसारखी नावाने हाक मारली असती तरी मला चालले असते.. पण ! त्यामुळे यामिनीचा आणि लोकांचाही गैरसमज होईल ...


प्रतिभा : कळतंय ! मला साहेब ! तशीही आता सर्वांनाच साहेब आणि मॅडम म्हणायची मला सवय झाली आहे...साहेब तुमच्यासाठी चहा आणू का ?


विजय : माझ्यासाठी तर घेऊन येच.. . पण तू ही घे... खाण्यापिण्यात काहीही संकोच करू नकोस... मी तुला म्हणालो ना ! या घराला तू आपलेच घर समज !


प्रतिभा : ठिक आहे ! मी चहा घेऊन येते , प्रतिभा स्वयंपाकघरात जाऊन विजयासाठी चहा घेऊन येते... आणि विजयला म्हणते .. . माझी सर्व कामे आटपली आहेत ती झाली की मी निघते... संध्याकाळी परत येते....रात्रीचा स्वयंपाक करायला...


विजय : ठिक आहे !

प्रतिभा आपली सर्व कामे आटपून निघून गेल्यावर विजय त्याचा लॅपटॉप हातात घेऊन तेथेच सोप्यावर बसून आपली कामे करायला सुरुवात करतो... मधे - मधे तो प्रतिभाने त्याच्यासाठी तयार करून ठेवलेला चहा गरम करून पित असतो ... जेवणाची वेळ टळून गेल्यावर विजय.. दुपारी तीनच्या दरम्यान स्वयंपाक घरातून जेवणाचे ताट भरून आणून बाहेर सोफ्यावर बसूनच काम करता करता जेवतो... आणि जेवून झाल्यावर ताट पुन्हा स्वयंपाक घरात नेऊन ठेवतो. स्वयंपाक घरातून बाहेर आल्यावर तो पुन्हा संगणकात डोकं खुपसून बसतो... घड्याळाचा काटा पुढे सरकत असतो... संध्याकाळ होताच दारावरची बेल वाजते आणि विजय त्याच्या कामाच्या गुंगीतून बाहेर येतो...सोफ्यावरून उठत अंग झडत तो दरवाज्या जवळ जातो आणि दरवाजा उघडतो तर दरवाज्यात प्रतिभा उभी असते, तो तिला आत घेतो..


विजय : प्रतिभा ! तू आलीस ते बरं झालं ! पहिल्यांदा आपल्यासाठी छान फक्कड चहा बनव !


प्रतिभा : बरं साहेब ! तुम्ही जेवला ना ? भाजी बरी झाली होती ना ? मला माहीत आहे, तुम्हाला पदार्थांची चव उत्तम कळते !


विजय : भाजी छान झाली होती , मलाही माहीत आहे तू उत्तम सुगरण आहेस ते !


त्यावर काहीही न बोलता प्रतिभा स्वयंपाक घरात गेली आणि विजयासाठी चचा तयार करून घेऊन आली !


विजय : प्रतिभा ! तू घेतलास का चहा ?


प्रतिभा : घेईन नंतर ! कामे आटपल्यावर ...


विजय : प्रतिभा तू तुझी कामे आटपली की तू लॉक करून तुझ्या घरी निघून जा ! मी बाहेर जाऊन जरा पाय मोकळे करू येतो तसाही ! माझ्या पोटाचा घेर आता वाढू लागला आहे तो थोडा कमी करावा लागेल...


विजय निघून गेल्यावर प्रतिभा तिची कामे आटपून हॉलची साफसफाई करून झाल्यावर स्वतःला जरा व्यवस्थित करून दरवाजा ओढून घेत निघून जाते...


संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच...

प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ?

यामिनी : हो ! आज जरा लवकर सुटका झाली ! प्रतिभा ! मी चहा बनविला आहे तो तू घे ! आणि कामाला सुरुवात कर !

प्रतिभा : ठीक आहे मॅडम !

यामिनी : बर ! आज रात्रीसाठी पनीरची भाजी कर ! मी पनीर आणून ठेवलाय फ्रिजमध्ये ! यापूढे काही आणायचे असेल तर तूच येताना घेऊन येत जा... मी पैसे देऊन ठेवत जाईन तुला, मी विसरले तर साहेबांकडून घेत जा..

प्रतिभा : ठीक आहे ...

म्हणत प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते... यामिनी तेथेच पुन्हां टी. व्ही. पाहण्यात गुंग होते, यामिनी इतकी शिकलेली तरी तिला सास - बहूच्या सीरिअल खूप आवडत असतात... कामाच्या व्यापामुळे तिला फार टी.व्ही. पाहायला मिळत नाही पण जेंव्हा कधी वेळ मिळतो तेंव्हा ती टी.व्ही. पाहते. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो ! तो आत येताच सोफ्यावर बसतो आणि...

विजय : प्रतिभा माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का ?

प्रतिभा : स्वयंपाकघरातूनच हो ! हो ! आले

विजय : यामिनी ! तू आज लवकर घरी आलीस ?

यामिनी : का ! मी लवकर आले याच तुला वाईट वाटते आहे का ?

विजय : मला का वाईट वाटेल ?

यामिनी :वाटणारच ना ! कारण मी लवकर आले कि तुला तुझी आवडती मालिका पाहायला मिळणार नाही ना ! मालिका कसल्या पाहतोस ! त्यातील नायिका पाहत असतोस डोळे फाडून...

विजय : विनोदाने .. हे बाकी बरोबर बोललीस, " या मालिकेतील अभिनेत्रींनसमोर मला चित्रपटातील अभिनेत्री फिक्या वाटतात.. त्यात प्रत्येक नवीन मालिकेत नवीन अभिनेत्री येतच असते एकीच्या प्रेमात पडतो न पडतो तो दुसरी हजर ! त्यात व्हिलनच काम करणाऱ्या अभिनेत्री तर नायिकेपेक्षाही दिसायला सुंदर असतात..

यामिनी : बस ! आता त्याच्या सौंदर्याची स्तुती, मला सांग तू कोठे गेला होतास ?

विजय : मी ना ! बाहेर जरा पाय मोकळे करायला गेलो होतो... ढेरी थोडी कमी करावी म्हणतो...

यामिनी : ती आता कमी करून कोठे जायचंय ?

विजय : कोठे जयला कशाला पाहिजे ! पण वजन नियंत्रात ठेवलेले उत्तम , तुला सांगतो मी लहान असताना मला सर्वजण सुकड्या म्हणायचे, तेंव्हा त्याचा मला खूप राग यायचा पण आता लोक सुकड्याना सुकड्या नाही तर झिरो फिगर म्हणतात... आता मी झिरो फिगर राहिलो नाही याचे वाईट वाटते... पूर्वी कसा मी दहा फुटावरूनही उडी मारायचो पण आता चार फुटावरूनही मारता येणार नाही...

प्रतिभा : इतक्यात चहा नाश्ता घेऊन येते दोघांसाठीही... घ्या साहेब - मॅडम चहा आणि नाश्ता, नाश्त्यात कांदे - पोहे केले आहेत.

विजय : थँक यु ! प्रतिभा ! खरंच मला खूप भूक लागली होती..

यामिनी : पोहे खाता खाता .. विजय ह्या प्रतिभाला काहीच सांगावे लागत नाही, ती सारे अगदी घरच्या माणसांसाठी करतात तसेच करते...

विजय : आपल्यालाही ती घरच्यांसारखीच आहे... पोहे छान केले आहेत हा !

यामिनी : बरं ! हा घे रिमोट आणि तू तुझ्या नायिका बघत बस ! मी आत जाऊन प्रतिभाला स्वयंपाकात थोडी मदत करते.. आज लवकर आले आहे तर..

यामिनी प्रतिभाला मदत करायला स्वयंपाक घरात निघून जाते विजय तेथेच सोफ्यावर बसून चॅनेल बदलत राहतो.... त्याला एक चॅनेल दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवत नाही ! तिकडे स्वयंपाक घरात... यामिनी प्रतिभाला स्वयंपाकात मदत असते.. स्वयंपाक करता करता जश्या कोणत्याही दोन बायकांच्या गप्पा रंगतात तश्या त्यांच्याही गप्पा रंगलया...

यामिनी : प्रतिभा ! तू मूळची कुठली ?

प्रतिभा : मी लहानाची मोठी रायगडला झाले

यामिनी : मग ! तू रायगड किल्ला पाहिलास कि नाही ?

प्रतिभा : नाही पहिला मॅडम !

यामिनी : रायगडला राहून तू रायगड किल्ला पाहिला नाहीस ! अगं ! मी रायगडावर चार पाच वेळा गेले आहे ... तुझ्या गावच्या घरापासून किती वेळ लागेल रायगडावर जायला ?

प्रतिभा : एकदा तास लागत असेल..

यामिनी : आपण काढू एकदा पिकनिक रायगडावर ! आता मी घेऊन जाईन तुला...

यामिनी : बरं तुझ्या घरी कोण कोण असतं ?

प्रतिभा : मी , माझ्या नवरा आणि दोन मुलं, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा, मोठी मुलगी आता तिसरीला आहे आणि मुलगा पहिलीला...माझं लग्न लवकर झालं ना ! 

यामिनी : तुझा नवरा काय काम करतो ?

प्रतिभा : आहे एका कंपनीत कामाला...

यामिनी : बाकीचे नातेवाईक ?

प्रतिभा : सासू सासरे असतात गावाला , दोन दीर आहेत त्याची लग्ने झालेली आहेत ते पाहतात त्याचं त्यांचं !

यामिनी : तुमचं घर स्वतःच आहे ना ?

प्रतिभा : नशीब छोटस का होईना आमचं घर स्वतःच आहे नाहीतर या वाढत्या महागाईत मुंबईत राहणं मुश्किल झालं असत.

 मॅडम तुमचं आणि साहेबांचं लग्न कधी झालं ?

यामिनी : आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली ...

प्रतिभा : मग ! अजून मुलबाळ का झालं नाही ?

यामिनी : ते आम्हालाच नको !

प्रतिभा : का ?

यामिनी : आहेत आमची आमची काही करणे , सांगेन नंतर कधी तरी तुला सविस्तर... बरं ! तू विजयला कशी काय ओळखतेस ?

प्रतिभा : साहेब पूर्वी ज्या चाळीत राहायचे त्या बाजूच्या चाळीत साहेबांचा मित्र राहतो, तो माझ्या मावशीचा मुलगा ! मी मुंबईला घर काम करू लागल्यावर सुट्टीत त्याच्या घरी जायचे ! साहेब माझ्या मावस भावाला भेटायला यायचे अधून मधून तेंव्हाच आमची ओळख झाली होती.

यामिनी : विजयच्या जवळ - जवळ सर्व मित्रांना मी ओळखते काय नाव काय त्या मित्राचे ...

प्रतिभा : अजय !

यामिनी : तू अजय भावोजींची ! मावस बहीण आहेस म्हणजे आमच्या घरातीलच आहेस कि ! अजय भावोजी खूप हुशार आहेत हा ! ते येतात वर्षातून एक दोनदा विजयला भेटायला आमच्या घरी... मी आणि विजय गेलो आहोत त्याच्या नव्या घरात...तुझी वाहिनीही माझी छान मैत्रीण आहे ... आमच्यात होत असतात गप्पा अधून मधून...

प्रतिभा : आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही ... त्याचा आज पश्चाताप होतोय ! मी ही शिकलेले असते तर आज मी स्वतःच्या पायावर उभी असते !

यामिनी : तू फार शिकली नाहीस म्हणून काय झाले ? तू आजही स्वतःच्याच पायावर उभी आहेस ! तू जे काम करतेस ते काही हलके काम नाही ! ते तर सर्वच बायकांना कधी ना कधी करावेच लागते ! पण तुमचे विशेष कौतुक करायला हवे कारण तुम्ही तुमच्या घरातील कामे करून आमच्या घरातील कामे करता . जर तुम्ही आमच्या घरातील कामे केली नाहीत तर आम्हाला बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवता येणार नाही ! विजय ! मला म्हणाला कि तू त्याच्या ओळखीची आहेस पण तो मला हे म्हणाला नाही कि तू अजय भावोजींची बहीण आहेस ! प्रतिभा ! तू यापुढे मला मॅडम नको म्हणू ! तू मला ताईच म्हणत जा !

प्रतिभा : बरं ताई ! ... ती गालात गॉड हसली ..

यामिनी : बरं ! आता तुझं आवरलं कि तू घरी जा ! आणि मला जरा चहा गरम करून दे ! साहेबांना घेऊन जाते... साहेबांना एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण सारखा चहा लागतो.


यामिनी चहाचा कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि तो चहाचा कप विजयच्या हातात देत ..


यामिनी : तू मला सांगितले नाहीस कि प्रतिभा अजय भावोजींची मावस बहीण आहे म्हणून ?


विजय : सॉरी ! सॉरी !! तुला सांगेन सांगेन म्हणालो आणि विसरून गेलो, म्हणूनच तुला मी म्हणालो होतो ,'' ती आपल्या घरातल्या सारखीच आहे..


यामिनी : मला एक मोलकरीण हवी होती पण प्रतिभाच्या रूपात बहीणच मिळाली...


प्रतिभा : बाहेर येऊन ! ताई सर्व कामे झाली आहेत , मी आता निघते ! उद्या सकाळी येते...


यामिनी : चालेल ! तू ये आता, जरा उशिरा आलीस तरी चालेल ! तसाही मी काही ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जात नाही ..


प्रतिभा : बरं !


प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी सोफयावर विजयच्या बाजूला बसते आणि ...


यामिनी : विजय ! प्रतिभा मला विचारत होती कि तुमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ का नाही ?


विजय : तू काही सांगितले नाहीस ना ?


यामिनी : नाही ! मी काहीही सांगितले नाही...


विजय : सांगूंही नकोस ! तिला ते पचणार नाही...


यामिनी : हा मुलाबाळांचा प्रश्न हल्ली मला आपल्या बाबतीत जवळ जवळ सर्वांच्याच नजरेत दिसतो...


विजय : पण या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ना ?


यामिनी : विजय तू बोलतोस ते बरोबर आहे ! पण हे असे प्रश्न पुरुषांना नाही तर फक्त स्त्रियांना विचारले जातात !


विजय : त्याची मला कल्पना आहे... या विषयावर आपण नंतर चर्चा करू !


यामिनी : बर ! मी जरा आत जाऊन पडते... जेवणाची वेळ झाली की मला हाक मार ... मग आपण जेवायला बसू ..

विजय : बरं बाई ...


विजय लॅपटॉपवरील त्याचे काम पूर्ण झाल्यावर लॅपटॉप बंद करतो आणि

विजय : यामिनी ! माझे काम आटपलं आहे चल जेऊन घेऊया !

यामिनी : ओके !

यामिनी सर्व जेवणाची भांडी घेऊन बाहेर येते आणि डायनिंग टेबलवर ठेवते आणि दोघे बसून जेवायला सुरुवात करतात...

यामिनी : काय पण बोल हा ! प्रतिभा जेवण करायला लागल्यापासून चार घास जास्त पोटात जायला लागले आहेत

विजय : हो ! ती जेवण अगदी मनापासून करते , आपण जेवण काय फक्त पोट भरायला करायचो !

यामिनी : खरं आहे ... आपण इतके पैसे कमावतो पण आपल्याला मनासारखा त्या पैशाचा उपभोगाच घेता येत नाही !

विजय : मला तर कधी कधी ते गरिबीचे दिवस बरे होते असेच वाटत असते, आता कसं यंत्रागात जीवन जगतोय असे वाटते

यामिनी : मी तर स्वतःला यंत्रच समजू लागले आहे ... भावना नसलेला... तुला निदान भावना तरी आहेत म्हणजे तू लेखक असल्यामुले निदान लोकांच्या भावनांचा तरी विचार करू शकतोस ! बरं ! मगाशी आपण जे बोललो,'' मुलांबद्दल ! प्रतिभाने तोच प्रश्न मला पुन्हा विचारला तर मी उत्तर काय देऊ ?

विजय : तू तिला सरळ सांग कि साहेबाना ! मुलं नकोयत !

यामिनी : त्यावर तिने तुम्हाला असा प्रश्न विचारला तर ?

विजय : त्यावर तू बोलू शकतेस त्यांनाच नको तर मी काय करू... त्यावरही काहीही विचारले तर बोल आता चाळीशीत मुलांना जन्म देऊन आम्ही त्यांना उत्तम भविष्य देऊ शकू असे आम्हाला नाही वाटत...

यामिनी : ठीक आहे !

विजय : आपले साधे सरळ आयुष्य आता किती गुंतागुंतीचे झाले आहे... त्यापेक्षा आपण पुर्वीसारखे एकटेच एकमेकांच्या प्रेमात मजेत होतो ... तसेच आयुष्यभर राहायला हवे होतो... पण तेव्हाही घरातले आणि समाज आपल्याला आनंदाने जगू देत नव्हता आता आपण लग्न केलय तरी परिस्थिती मात्र होती तशीच आहे. त्यात काडीचाही बदल झालेला नाही ... आणि कदाचित तो बदल कधी होणारही नाही...

यामिनी : हो ! ना ! चल जेव लवकर ! आटपुया आणि झोपूया ! म्हणजे मी जाऊन झोपते तू टी.व्ही. पाहत बस...

विजय आणि यामिनी जेऊन झाल्यवर , यामिनी सर्व आटपून बेडरूममध्ये जाऊन जोपते विजय हॉलमध्ये सोफ्याचा बेड करून टी .व्ही. पाहत असतो... झोप अनावर झल्यावर टी.व्ही. बंद करून तो झोपी जातो.... सकाळी विजय झोपलेला असतानाच प्रतिभा कामावर येते...

यामिनी : साहेब झोपलेत त्यांना उठवू नकोस... रात्री टी.व्ही. जास्त वेळ पाहिलेली दिसतेय ! झोप पूर्ण झाली कि त्याचा तो उठेल... 

प्रतिभा : म्हणजे साहेब रात्री येथेच झोपले..

यामिनी : हो ! हल्ली तो रोज येथेच झोपतो... म्हणजे त्याला रात्री उशिरापर्यत टी.व्ही . पाहायची असते ना ! मला ऑफिसला लवकर जायचे असते म्हणून मी लवकर झोपते.

प्रतिभा : ठीक आहे ! मी माझी कामे आवरायला घेते !

यामिनी : माझी तयारी झाली आहे मी निघते ... दरवाजा ओढून घे !

प्रतिभा :बरं ! ताई...

यामिनी आता जाऊन आपली कामे करायला सुरुवात करते... भांड्यांचा आवाज ऐकून विजयला जाग येते ...

विजय : यामिनी !

प्रतिभा : आतूनच ! ताई ! ऑफिसात गेल्या , तुम्हाला काही हवे आहे का ?

विजय : काही नको ! मी फ्रेश होतो तोपर्यत तू माझ्यासाठी चहा नाश्ता गरम कर ...

प्रतिभा : हो ! करते ....

विजय फ्रेश होऊन बाहेर येऊन सोफ्यावर बसतो आणि लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत असतो इतक्यात प्रतिभा चहा - नाश्ता घेऊन येते.. विजय त्याच्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि प्रतिभाकडे पाहत म्हणतो,'' तू ही घे ! चहा नाश्ता... कामे काय होत राहतील...

प्रतिभा : एक विचारू का ? राग नाही ना येणार ?

विजय : विचार की ?

प्रतिभा : तुम्ही दोघे म्हणजे ताई आणि तुम्ही रोज असेच वेगवेगळे झोपता का ? ताईंना भीती नाही का वाटत एकटं झोपायला ??

विजय : भीती आणि यामिनीला ! तिला तर वाघही घाबरेल... प्रतिभा ! तू काल यामिनीला मुलाबाळांन विषयी विचारलेस का ?

प्रतिभा : हो ! असाच बोलता बोलता विषय निघाला म्हणून विचारले

विजय : प्रतिभा ! पुन्हा यामिनीजवळ मुलाबाळांचा विषय नको काढूस ! तिला त्याचा खूप त्रास होतो...

प्रतिभा : पण का ? काय समस्या आहे ?

विजय : यामिनी ठरवूनही आई होऊ शकत नाही... पण ! हे मी तुला सांगितले हे यामिनीला कळू देऊ नकोस...

प्रतिभा : देव पण असा आहे ! ज्याला दात देतो त्याला दाना देत नाही आणि ज्याला दाना देतो त्याला दात देत नाही ! मी यापुढे ताईजवळ मुलाबाळांचा विषय पुन्हा नाही काढणार !

विजय : बरं ! ते जाऊदे ! आता दुपरी भाजी काय करणार आहेस ?

प्रतिभा : कारल्याची करू का ? आज बुधवार आहे , तुमच्या फ्रिजमध्ये अंडी वगैरे नाहीत , नाहीतर भुर्जी केली असती...

विजय : नको ! तू कारल्याची भाजीच कर ! मी मांसाहार करत नाही दहा वर्षांपूर्वीच मी मांसाहार सोडला आहे.. तशीही कारल्याची भाजी शरीराला चांगली असते

प्रतिभा : ताई !

विजय : ती खाते आवडीने ! पण घरी खात नाही म्हणजे तिला करायचा कंटाळा येतो... मी काही तिला घरी करू नकोस अथवा खाऊ नको म्हणालो नाही, तिने माझ्यासमोर बसून मांसाहार केला तरी मला काही फरक पडणार नाही...

प्रतिभा : मग ! ताईंसाठी मी संध्याकाळी येताना तळलेले मासे घेऊन येईन...

विजय : ये की घेऊन ! येथे घरात तिच्यासाठी शिजवले तरी माझी काहीही हरकत नाही... माझ्या जिभेवर आणि मनावर मी आता पूर्ण नियंत्रण मिळविले आहे. 

प्रतिभा : बरं ! मी जाते जेवण करायला ...

प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते विजय पुन्हा त्याचे डोके लॅपटॉपमध्ये घुसडतो... थोड्यावेळाने स्वयंपाक आटपून प्रतिभा बाहेर येते आणि विजयचा निरोप घेऊन निघते...ती निघून गेल्यावर थोड्या वेळाने विजय स्वयंपाक घरात जाऊन एक प्लेट मध्ये जेवण घेऊन येतो आणि प्रतिभाने बनविलेली कारल्याची भाजी पोळी सोबत चवीने खातो...आणि खाऊन झाल्यावर प्लेट स्वयंपाक घरात नेऊन ठ्वतो ... पुन्हा बाहेर आल्यावर थोडावेळ लॅपटॉप मध्ये डोके खुपसून कोणाचा तरी फोन आल्यावर तयारी करून घराच्या बाहेर पडतो...

संध्याकाळी प्रतिभा तिच्याकडील चावीने दरवाजा उघडून स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते ... प्रतिभा स्वयंपाकघरातून धावत येऊन दरवाजा उघडते तर दारात यामिनी उभी असते... आता आल्या आल्या यामिनी सोफ्यावर अंग टाकते आणि

यामिनी : प्रतिभा माझ्यासाठी थोडे पाणी घेऊन येतेस का ?

प्रतिभा : हो ! आणते ना ! ( प्रतिभा स्वयंपाक घरात जाऊन पाणी घेऊन येते ) घ्या ताई !

यामिनी : थँक्स ! आज खूप थकले आहे. ( पाणी पिऊन ग्लास टेबलावर ठेवते. ) मी जरा फ्रेश होऊन येते तोवर तू चहा गरम कर !

प्रतिभा : हो ! तसाही माझा स्वयंपाक होत आला आहे

यामिनी आत जाऊन फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसते तितक्यात प्रतिभा चहा आणि नाश्ता घेऊन येते ..

यामिनी : साहेब कोठे गेले ?

प्रतिभा : माहीत नाही ! मी आले तेव्हा ते घरी नव्हते !

यामिनी : बरं ! ( दोन चॉकलेट प्रतिभाच्या हातात देत ) तुझ्या मुलांना दे ! सांग तुमच्या मावशीने दिले आहेत .

प्रतिभा : हो ! सांगते.. थँक्स हा ! ताई...

यामिनी : बरं ! आता तू आटपून घे ! तुलाही घरी जायला उशीर होईल...

प्रतिभा : ताई ! एक सांगायचे राहूनच गेले मी तुमच्यासाठी तळलेले मासे आणले आहेत फ्रिजमध्ये ठेवले आहेत

यामिनी : काय बोलतेस ! आमचं लग्न झाल्यापासून मी घरचे मासे खाल्लेच नाहीत... विजय बोलला वाटत तुला ! त

प्रतिभा : असाच बोलता बोलता विषय निघाला , ताई तुम्ही काळजी करू नका ! तुम्हाला जेंव्हा कधी मासे खावेसे वाटतील तेंव्हा मला सांगा मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन !

यामिनी : खरच ! मला तुझ्यासारखी बहीण मिळली याचा आज खूपच आनंद होत आहे. 

प्रतिभा : ताई ! तुम्ही बसा मी स्वयंपाक आटपून येते...

यामिनी टी. व्ही. सुरु करून टी.व्ही. वर मालिका पाहत बसते.. .थोड्या वेळाने यामिनी तिची कामे आटपून बाहेर येते

यामिनी : कामे आटपली का ? तू टी.व्ही. पाहतेस की नाही ?

प्रतिभा : पाहते की ! पण रात्री उशिरा... घरातील सर्व कामे आटपली की ...

यामिनी : बर ! तू निघ आता.. चॉकलेट घेतलेस ना सोबत...

प्रतिभा : हो ! ताई मी निघते...

प्रतिभा निघून जाते आणि यामिनी तिची मालिका पाहण्यात गुंग होते... काही वेळाने दारावरची बेल वाजते... यामिनी पुढे होऊन दरवाजा उघडते दारात विजय उभा असतो त्याच्या हात फळांची पिशवी असते... त्याला आत घेत...

यामिनी : हे काय ? इतकी फळे कशाला आणलीस ?

विजय : रस्त्यात येताना दिसली म्हणून आणली...

यामिनी : रस्त्यात एखादी सुंदर बाई दिसली म्हणून तू तिलाही घेऊन येशील..

विजय : इतकं ! माझं नशीब कोठे चांगलं आहे... बरं ! ही फळे मी धुवून फ्रिजमध्ये ठेवतो... (तो आत जाऊन फळे फ्रिजमध्ये ठेवतो आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसतो. )

यामिनी : तुला माहीत आहे का ? आज प्रतिभाने माझ्यासाठी तळलेले मासे आणले आहेत...

विजय : मग ! आज तुला दोन घास जास्त जातील नाही !

यामिनी : हो ! नकीच !

विजय : मलाही मासे प्रचंड आवडायचे म्हणजे मी वर्षाचे बारा महिने मासे खायचो ! मला मासे आवडायचे म्हणून आई माझ्यासाठी दुसऱ्या दिवशीही मासे उरवून ठेवायची...मला मासे आवडतात म्हणून माझी मामीही मासे केल्यावर खास माझ्यासाठी द्यायची मग वार कोणताही असो... पण पुढे मला मांसाहाराचा त्रास होऊ लागला आणि माझे आध्यत्मिक विचारही प्रगल्भ झाले त्यामुळे मी मांसाहार सोडला... मांसाहार न करणे हा माझा माझ्यापुरता घेतलेला निर्णय होता.. इतरांनी तो करू नये असा आग्रह माझा कधीच नसतो ! मी माझ्या मित्रांसोबत आजही एका टेबलावर बसून ते नॉनव्हेज आणि मी व्हेज खातो... तुलाही मी तू घरी मांसाहार करू नकोस ! खाऊ नकोस असे कधीही सांगितले नाही पण तुला तो एकटीसाठी करायलाच त्रास वाटतो हा भाग वेगळा !

यामिनी : पण आता काही त्रास नाही ! प्रतिभा आहे ना ! ती करेल आमच्यासाठी...

विजय : मजा आहे आता तुझी ! पण आम्हाला काय आयुष्य आता घास - फूस खाण्यातच काढावे लागणार...


यामिनी : आजपण पाय मोकळे करायला गेला होतास की काही काम होते... बाहेर ...


विजय : माझा एक मित्र ! पुण्याहून मुंबईला आला होता काही कामानिमित्त त्यालाच भेटायला गेलो होतो..

यामिनी : झाली का भेट !

विजय : हो ! झाली ! तू माघारीही गेला असेल पुण्याला

यामिनी : मित्र भेटला म्हणजे तू बाहेर काहीबाई खाऊन आलाच असशील ! पण ! प्रतिभाकडून मास्यांचं नाव ऐकताच माझी भूक प्रचंड चालवली आहे .. मी जेऊन घेते तू पाहिजेतर नंतर जेव...

विजय : तू घे ! जेऊन मी नंतर जेवेन...

यामिनी जागेवरून उठते आणि स्वयंपाक घरात जाऊन तेथेच असणाऱ्या टेबल खुर्चीवर जेऊन बाहेर येते तर विजय मालिका पाहत असतो ..

यामिनी : प्रतीभाने मासे काय छान केले होते... खाताना माझा आत्मा अगदी तृप्त झाला...

विजय : हे सांगून तू माझा आत्मा अतृप्त करू नकोस !

यामिनी : बर ! मी आता आत जाऊन पडते ! एक दोन मेल चेक करायचे आहेत ते करते आणि झोपते... तू ही जेव आणि झोप...

विजय : बरं बाईसाहेब ! शुभ रात्री !

यामिनी : शुभ रात्री !

विजय : स्वतःशीच विचार करत ... प्रतिभा यायला लागल्यापासून आमच्या घराला खऱ्या अर्थाने घरपण आले... नाहीतर ! आम्ही दोघे यंत्रासारखे जीवन जगत होतो. आता आमच्या जगण्यात थोडा आनंद येऊ पाहत आहे... मला माहीत आहे .. प्रतीभाचेही एकेकाळी माझ्यावर प्रचंड प्रेम होते... तिने ते कधी व्यक्त केले नाही आणि ते मला माहीत आहे मी तिला कधी जाणवू दिले नाही ... आज ती तिच्या आयुष्यात जरी जगण्यासाठीचा संघर्ष करत असली तरी सुखी आहे याचा मला आनंदच आहे...खरं तर मी तिच्या प्रेमाचा स्वीकार केलाही असता पण कदाचित नियतीला ते मान्य नव्हते... तिच अशिक्षित असणं हे एक मोठं कारण होत मी तिच्या प्रेमाचा स्वीकार न करण्याला... माझ्याकडे स्वतःच असं घरही नव्हतं, माझी स्वप्नेही मला तेव्हा खुणावत होती... यामिनीने खऱ्या अर्थाने माझ्या स्वप्नांना पंख दिली म्हणून मी एक प्रसिद्ध व्यक्ती होऊ शकलो ! नाहीतर ! माझ्या घरच्यांनी नेहमीच माझ्या स्वप्नांचा गळा घोटाळा...त्यावेळी प्रतिभा माझ्या आयुष्याचा भाग झाली असती तर कदाचित तिच्या वाट्याला आज आले आहे त्यापेक्षा कदाचित खडतर जीवन तिच्या वाट्याला आले असते... आज तिच्याकडे हक्काचे घर आहे , हक्काचा नवरा आहे , हक्काचे नातलग आहेत, हक्काची मुले आहेत... आज माझ्याकडे सर्व काही आहे असे जगाला वाटत असले तरी... हे जे काही आहे ते यामिनीचे आहे तिच्या कष्टाचे आहे ! मी आयुष्यात फक्त नाव, पद , प्रतिष्ठा, मान - सन्मान मिळवला ! पण त्याने कधीच कोणाचे पोट भरत नाही ! त्यासाठी पैसाच लागतो. तो कालही लागत होता आणि आजही लागतो.... माझ्या कुटुंबाने माझ्यातील प्रतिभेचा नेहमीच अपमान केला त्यामुळे मी प्रतिभाला माझ्या आयुष्याचा भाग करू शकत नव्हतो... प्रतिभाच्या डोळ्यात त्यावेळी माझ्यासाठी जी प्रेमातुरता होती ती मला माझ्याबद्दल कधी यामिनीच्या डोळ्यातही दिसली नाही ! यामिनी आणि माझे प्रेम हे प्रौढ प्रेम होते... आम्ही प्रेमात पडलो ते वय प्रेमात वाहवत जाण्याचे नव्हते.. आम्ही दोघे एकमेकांना पूरक होतो... पण आम्ही नक्कीच आदर्श म्हणावे असे प्रेमी ! कधीच नव्हतो... यामिनीच्या मनात माझ्यातील प्रतिभेबद्दल आदर आहे प्रेम आहे... म्हणूनच ती माझ्या आयुष्याचा आज भाग आहे... प्रतिभाला तर माझ्यातील प्रतिभेची कल्पनाच नव्हती आणि तिला त्याच्याशी काहीही देणे घेणे नव्हते कारण कोणत्याही परिस्थितीत माझ्यासोबत आयुष्य काढण्याची तिची मानसिक तयारी होती.. कारण तिने जी परिस्थिती भोगली होती त्यापेक्षा जास्त भयंकर परिस्थिती तिच्या वाट्याला येणार नव्हती.. पण मला माझ्यामुळे कोणाच्या आयुष्याची झालेली फरफड सहन होणारी नव्हती... यामिनीने माझ्या आयुष्याला स्थेर्य दिले कारण कोणाच्याही आयुष्याला स्थेर्य दयायला लागणारा पैसा तिच्याकडे होता... आज तो माझ्याकडेही आहे पण... यामिनीच्या... उपकारामुळेच… ( विजय त्याचे पाणावलेले डोळे पुसून सोफ्याचा बेड करतो आणि लाईट बंद करून झोपी जातो... )

दुसऱ्या दिवशी प्रतिभा थोडी उशिराच कामाला येते तोपर्यत ! यामिनी तिच्या ऑफिसमध्ये निघून गेलेली असते विजय चहाचा कप हातात घेऊन सोफ्यावर बसून चहाचे झुरके घेत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते तो पुढे होत दरवाजा उघडतो आणि प्रतिभाला आत घेतो

प्रतिभा : सॉरी ! सॉरी !! मला यायला आज जरा उ

शीरच झाला , चहा तुम्हीच बनवून घेतला का ?

विजय : मी नाही बनविला यामिनी बनवून गेली होती मी फक्त तो गरम करून घेतला , आत्त्ताच अजूनही गरम असेल तू ही घे अगोदर आणि मग कामाला सुरुवात कर ...

प्रतिभा : बर ! मी अगोदर तुमच्या नाष्ट्यासाठी घावणेआणि चटणी तयार करते

विजय : आता करतेस आहेस घावणे तर जरा जास्त कर ! म्हणजे दुपारीही मी तेच खाईन ! म्हणजे तुला आणखी काही नवीन बनवायला नको !

प्रतिभा : बरं ! ( प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते )

विजय सफरचंद खाता खाता थोडावेळ टी. व्ही. पाहतो आणि मग लॅपटॉप सुरु करून त्यात डोके खुपसून बसतो. त्यातून डोके वर काढत

विजय : प्रतिभा ! झाले का घावणे ?

प्रतिभा : होत आलेत साहेब ! घेऊन येते लगेच

प्रतिभा एक प्लेटमध्ये गरम गरम घावणे आणि हिरवी खोबऱ्याची चटणी घेऊन येते ..

विजय : घावणे खात, प्रतिभा आज आईची आठवण आली , आई असेच घावणे करायची अधीन मधून नाश्त्याला ! मग ! आम्ही तच पोटभर खायचो

प्रतिभा ! तू ही खाऊन घे ! मला तीन - चार ठेऊन बाकीचे तुझ्या घरी घेऊन जा !

प्रतिभा : कशाला ? संध्याकाळी होतील की उरलेले !

विजय : तुला घेऊन जा ! म्हणालो ना ! आणि फ्रिजमध्ये काही सफरचंद आहेत ते पण घेऊन जा !

प्रतिभा : बर !

विजय : प्रतिभा ! मी तुझ्या मुलांना पहिले नाही ! शाळेला सुट्टी असेल तेव्हा घेऊन ये एकदा मला भेटायला... ते अभ्यास नीट करतात ना ?

प्रतिभा : हो ! त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत मी तडजोड करत नाही कारण मी अशिक्षित असल्यामुळे काय गमावले आहे ते मलाच माहित आहे...

विजय : त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत कोणतीही अडचण आली तर मला सांग ! ... मला आवडेल तुला मदत करायला

प्रतिभा : तुम्ही करताय तेवढी मदत पुरेशी आहे ... बरं माझी कामे आटपत आलेत ती आटपते आणि मी निघते..

विजय : बर ! ( विजय त्याच्या पाकिटातून ५०० रुपये काढून प्रतिभाच्या हातात देतो आणि म्हणतो ...) प्रतिभा ५०० रुपये ठेव ! संध्याकाळी येताना रात्रीच्या जेवणासाठी काही भाजी वगैरे आणायची असेल तर येताना घेऊन ये !

प्रतिभा ते पैसे हातात घेते आणि स्वयंपाक घरात निघून जाते... सर्व कामे आटपून ती विजयचा निरोप घेऊन निघून जाते...

विजय त्याच्या कामात गुंग होतो हा ! हा ! म्हणता संध्याकाळ होते आणि दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उघडून प्रतिभाला आत घेतो तिच्या हातात भाजीच्या पिशव्या असतात ती आत येताच विजयला भाजीचा हिशोब सांगायला सुरुवात करते ...

प्रतिभा : साहेब हे उरलले शंभर रुपये !

विजय : मला तू हा हिशोब सांगत जाऊ नकोस ! उरलेले तुझ्याकडेच ठेव जेंव्हा जेंव्हा तुला पैसे लागणार असतील तेंव्हा मागून घेत जा !

तुझ्याकडे मोबाईल आहे ना ! मी तुला पैसे गुगल पे करुन ठेवत जाईन ! तुला गुगल पे वापरता येतो ना !

प्रतिभा : मी इतकीही अशिक्षित नाही ! चौथीपर्यत शिकली आहे मी !

विजय : बरं ! बाई ! तुला मी गुगल पे करत जाईन ...

प्रतिभा : आज रात्रीच्या जेवणात काय करू ?

विजय : रोज करतेस ते कर ! फक्त भाजी उकडलेल्या बटाट्याची कर !

प्रतिभा : बरं ! आज नाही गेलात पाय मोकळे करायला ?

विजय : नाही ! कामात इतका गुंग झालो होता आज की संध्याकाळ कधी झाली ते कळलेच नाही !

प्रतिभा : बरं मी तुमच्यासाठी चहा बनवून आणते !

विजय : आण ! लवकर आण ! आता मला खरोखरच चहाची खूप गरज आहे ..

प्रतिभा गालातल्या गालात हसत स्वयंपाकघरात जाते आणि पुढच्या मिनिटाला विजयासाठी चहा आणि बिस्कीट घेऊन येते...

प्रतीभा : घ्या साहेब चहा ! चहा ! गरम आहे हा !

विजय : मला गरम गरमच चहा लागतो ! गरम गरम चहा पिण्यात माझा कोणी हात धरू शकत नाही...

प्रतिभा : ते बाकी खरं आहे ...

विजय : तू घेतलास का चहा !

प्रतिभा : मी थंड झाल्यावरच घेईन...


प्रतिभा स्वयंपाक घरात निघून गेल्यावर विजय आपल्या भूत काळात हरवतो...


विजय : स्वतः:शीच तेव्हा ! एक दिवस अजय प्रतिभाला घेऊन माझ्या घरी आला होता, तेव्हा पहिल्यांदा तिची आणि विजयाची भेट झाली होती, दोघी पहिल्याच भेटीत मैत्रिणी झाल्या होत्या ! विजयाला तर ती वाहिनी म्हणूनही पसंत होती.. तिने तसे कधी बोलून दाखविले नव्हते पण मला तिच्या मनातले कळत होते... अजयचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. तेव्हा आम्ही चौघे एका हॉटेलात गेलो होतो.. थंडा प्यायला... विजया माझ्या बाजूला बसली होती आणि प्रतिभा अजयच्या बाजूला बसली होती. थंडा पिता पिता मी माझा हात हळूच प्रतिभाच्या हातावर ठेवला होता ! मी तिच्या हातावर हात ठेवल्यावर तिने तो जराही हलविला नव्हता ! मी अजयला भेटायला त्याच्या घरी गेलो की ती आजूबाजूच्या ज्या घरात असेल तेथून धावत घरी यायची ! तिने तिचे माझ्यावर प्रेम आहे हे तिच्या वागण्यातून वेळोवेळी दाखवून दिले होते... पण मी मात्र तेव्हाही फुलपाखरूच होतो कधी ह्या फुलावर तर कधी त्या फुलावर... कदाचित ! प्रेम म्हणजे नक्की काय असते ! ते मला तेव्हा कळलेच नव्हते... आजही ती आमच्या घरात घरकाम करायला तयार झाली आहे ती तिच्या आर्थिक गरजेपोटी नाही तर माझ्यावरील प्रेमापोटी ! आता तिला माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नसेल पण आपले पहिले प्रेम आपल्या डोळ्यासमोर हसत खेळत असताना पाहून कित्येकांना मानसिक समाधान मिळत असते... प्रतिभा आमच्या घरात येण्यापूर्वी मी फक्त दिवस घालवत होतो पण आता प्रतिभामुळे त्या दिवस घालविण्यालाही अर्थ प्राप्त झालेला आहे. आज प्रतिभाबद्दल माझ्या मनात तश्या काही भावना नाहीत ! तिच्याही मनात त्या नसाव्या बहुतेक ! मधला काळ खूप मोठ आहे जवळ जवळ पंदरा वर्षाचा ! याकाळात बरेच काही बदलले आहे... प्रतिभाचे लग्न होऊन ती दोन मुलांची आई झाली आहे. माझ्या मानतील फुलपाखरू कधीच उडून गेला आहे आणि मी एक अभ्यासू व्यक्ती झालो आहे , काम करताना एखाद्या साधू सारखी आता माझी समाधी लागते. पूर्वी मी तसा अजिबातच नव्हतो ! मी उत्साहाने भरलेला झरा होतो. प्रतिभाही तेव्हा किती अवखळ होती .. आता ती ही शांत शांत झाली आहे. कदाचित आम्हा दोघांनाही परिस्थितीची जे चटके भोगावे लागले आहेत त्यामुळे ते झाले असेल.. शेवटी नियतीने इतक्या वर्षानंतर आम्हाला पुन्हा एकमेकासमोर आणून उभे केले. भूतकाळ टाळायचा म्हणून टाळता येत नाही ! तो दत्त म्हणून समोर उभा राहतोच ! मी भूतकाळात माझ्या आयुष्यातील कित्येक माणसांना मागे टाकून यामिनीसोबत माझ्या जीवनाचा प्रवास नव्याने सुरु केला होता... कशासाठी... ? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मला आजही मिळत नाही ! आज यामिनी माझ्याकडे सर्वकाही आहे पण आनंद आहे का ? मानसिक सुख आहे का ? तर नाही... आम्ही फक्त जगतोय... पण त्या जगण्याला अर्थ आहे का ? तर नाही ! आम्ही फक्त एकमेकांसाठी जगतोय ! आमच्या दोघांचीही आता काही स्वप्ने उरलेली नाहीत... आम्ही फक्त दिवस ढकलतोय... आमच्या जीवनात नवीन काही घडतच नाही ! आमच्याकडे एकमेकांशी बोलायलाही नवीन विषय नव्हता तो विषय आम्हाला प्रतिभामुळे सापडला...

प्रतिभा : ( थोड्या वेळाने चहाचा कप हातात घेऊन बाहेर येत ) साहेब ! चहा ! माझ्यासाठी गरम केला होता तर तुम्हालाही घेऊन आले

विजय : तुला तर माहीतच आहे चहाला मी कधीच नाही म्हणत नाही ! अगदी पंचपक्वान्न आणि चहा यातील कोणी मला एक निवडायला सांगितले तर मी नक्कीच चहा निवडेन...

प्रतिभा : माझी सर्व कामे आटपली आहेत .. .चहाचे कप तेवढे विसळले आणि मी निघते...

विजय : हो ! हो ! तुझी कामे आटपली कि तू लगेच निघ ! घरीही जाऊन तुला तुझी तुझी कामे करायची असतील नाही !

प्रतिभा : हो !

प्रतिभा स्वयंपाक घरात जाते तितक्यात दारावरची बेल वाजते , विजय जाऊन दरवाजा उघडतो आणि यामिनीला आत घेतो... यामिनी आत येताच सोफ्यावर बसते ! प्रतिभा आतून तिच्यासाठी पाणी आणि चहा आणते...

यामिनी : प्रतिभा ! तू अजून गेली नाहीस ?

प्रतिभा : हे काय ? चाललेच होते...

यामिनी : बरं ! विजयने तुला बाजार करण्यासाठी पैसे दिले का ?

प्रतिभा : हो ! दिले ताई !

यामिनी : ( आपल्या बागेतून - चार पाच चॉकलेट काढून प्रतिभाच्या हातात देत ) हे घे ! चॉकलेट मुलांना दे !

प्रतिभा : ताई ! अशी रोज रोज चॉकलेट दिलीत तर मुलांना त्याची सवय लागेल..

यामिनी : मग ! लागू दे की ! लहान मुलं चॉकलेट नाही खाणार तर कोण खाणार ?

प्रतिभा : बरं ! ताई... मी एवढी कप - बशी धुते आणि निघते...

यामिनी : अग ! नाही ! नको ! तू निघ... मला चहा संपवायला थोडा वेळ लागेल... तू जा ... तुला उशीर होईल...

प्रतिभा : येते ताई ...

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी आपला मोर्चा विजयकडे वळवत...

यामिनी : प्रतिभा आपल्या घरी कामाला यायला लागल्यापासून आपल्या घराला कसं घरपण आल्यासारखं वाटत आहे...

विजय : हे बाकी तू माझ्या मनातील बोललीस , नाहीतर आपले घर म्हणजे एक हॉटेलचं झालेलं होत...

यामिनी : मी काय म्हणते आज आपण शॉपिंगला जाऊ या का ? जवळच्या मॉलमध्ये कपड्यांचा सेल लागला आहे ...

विजय : शॉपिंगला ! जाऊया !! तसेही मला पाय मोकळे करायचे होतेच...

यामिनी : मी तयार होते ! तोपर्यत तू तुझे आवर !

विजय : माझं काय आवरायच !

यामिनी लगेच तयार होऊन बाहेर येते आणि

यामिनी : चला साहेब...

विजय : बरं ! बाईसाहेब !

( दोघेही हसत हातात हात घालून घराच्या बाहेर पडतात )

दोन तीन तासांनी दोघेही हातात पाच - सात पिशव्या घेऊन घरी माघारी येतात त्या सर्व पिशव्या सोफ्यावर ठेऊन त्याच्याच बाजूला जागा करून बसतात...

यामिनी : शॉपिंगला मजा आली नाही !

विजय : हो ! खूप दिवसांनी अशी मनसोक्त शॉपिंग केली... नाहीतर हल्ली आपण जवळ - जवळ सर्वच गोष्टी ऑनलाईन मागवतो. एक क्लिकवर

यामिनी : हो ! ना ! मी तर आता भाव - ताव करायचंच विसरून गेलॆ आहे...

विजय : मला तर वस्तू विकत घेण्यापेक्षा विकण्याचीच जास्त सवय होती..

यामिनी : कशाला ! आता त्या जुन्या आठवणी काढून तू द:खी होतोस ?

विजय : दुःख नाहीं ग ! पण त्या आठवणी माझ्या मनातून जात नाही ! गरिबीचे चटके काय असतात हे कोणीही मला विचारायला हवे !

यामिनी : पण तू त्या परिस्थितीशी लढ़लास आणि ताट उभा राहिलास , स्वतःला सिद्ध केलंस ! तुला हवे होते ते ते तू मिळविलेस !

विजय : पण हे सर्व मी ज्यांच्यासाठी केलं त्यांना या सगळ्याची अजिबात जाणीव नव्हती... याचे मला जास्त दुःख होते...

यामिनी : सर्वाना मागे टाकून आपण आपल्या तत्वांवर आणि विचारांवर ठाम राहून एकत्र येण्याचा निर्णय घेतला... आपला तो निर्णय योग्यच होता.. त्यामुळेच आपण आप - आपल्या क्षेत्रात यशस्वी होऊ शकलो... आज आपल्या यशस्वी होण्याचं आपल्या कुटूंबाना नसलं तरी जगाला कौतुक आहेच की ...

विजय : तू अगदी बरोबर बोलतेस... आता आपलं कार्यक्षेत्र हेच आपले कुटुंब आहे असे समजू...

यामिनी : आता कसं शहाण्यासारखे बोललास ! चला ! आता आपण फ्रेश होऊन जेवून घेऊया...

दोघेही फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर जेवायला बसतात ...

विजय : बटाट्याची भाजी छान झाली आहे नाही ?

यामिनी : प्रतिभाच्या हातालाच चव आहे , तशी चव सर्वच बायकांच्या हाताला नसते... माझ्या आईने नुसत्या बुकीतील भाजी केली तरी त्याला चव असायची !

विजय : माझ्या आईच्या हातालाही चव आहे ! पण आमच्या आईला कधीच कोणाला काहीही हातच राखून देणे जमले नाही ! अगदी शेजारणीलाही भाजी देताना ती कधी अर्धी वाटी द्यायची नाही ! घरातील तेल लवकर संपते म्हणून बाबा ओरडायचे पण त्याकडे दुर्लक्ष करत रोज सकाळ संध्याकाळ तीन तीन दिवे तेल कटोकट भरलेले लावायचे काही तिने बंद केले नाही ! मला कधी कधी या गोष्टीचा राग यायचा कारण त्यामुळे बाबा आम्हाला आमच्या मिळकतीवरून ऐकवायचे ! आम्हा बाबा तसे नको तिकडे काटकसर करायचे आणि नको त्या गोष्टीसाठी पैसे उधळायचे ! त्यांच्याकडे पैसे असले की ते शांत आणि पैसे संपले की जमदग्नी व्हायचे मग ! पहिली संक्रात माझ्यावर यायची कारण मी माझ्या लिखाणाच्या वेडापायी फार कमावत नव्हतो आणि लग्नही करत नव्हतो... यामिनी तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी नक्कीच ब्रम्हचारीच राहिलो असतो... तू मला ब्रम्हचारी राहण्यापासून वाचवले आहेस !

यामिनी : तू ही माझ्या आयुष्यात आला नसतास तर माझ्याशी तरी कोणी लग्न केलं असत ?

विजय : आपण एकमेकांना पूरक होतो म्हणूनच तर नियतीने आपल्याला एकत्र आणले... किंवा आपण असेही म्हणू शकतो की आपण एकत्र यावे हे विधिलिखितच होते...

यामिनी : ते जाऊदे ! आपण प्रतिभासाठी जी शॉपिंग केली आहे ती आवडेल ना तिला ?

विजय ! का नाही आवडणार ? तू किती मनापासून शॉपिंग केली आहेस तिच्यासाठी

यामिनी : हो ! तिच्या रूपात मला बहीणच भेटली आहे... बहिणी वरून आठवलं ! तुमच्या बहिणाबाईंचा फोन आला होता त्या येणार आहेत रविवारी आपल्याला भेटायला...

विजय : विजया ! येणार आहे !! खूप दिवस झाले तिला भेटलोच नाही...

यामिनी : रविवारच रविवारी बघू ! आता हे आवरते मग आपण झोपू या ! म्हणजे मी झोपते तुमचं चालुद्या ...

यामिनी बेडरूममध्ये जाऊन झोपते विजय बाहेर त्यांनी केलेली शॉपिंग पाहतो आणि टी .व्ही. सुरु करून बातम्या पाहत असतो... इतक्यात एका मोठ्या श्रीमंत व्यक्तीच्या अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्याच्या कानावर पडते आणि ...

विजय : स्वतःशीच... काय आयुष्य आहे ! आयुष्यभर मेहनत करून घाम गाळून नाव , संपत्ती, पद प्रतिष्ठा कमवायची आणि एका अपघाताने त्या सगळयाचा पाला पाचोळा करावा ! आयुष्याचा काहीही भरोसा उरलेला नाही ! त्यामुळे बाकीच्या भौतिक गोष्टींच्या मागे लागण्यापेक्षा मिळेल तो प्रत्येक क्षण आपल्याला आनंदाने कसा जगता येईल... याचाच आपल्याला विचार करायला हवा ! नाहीतर आयुष्यभर भौतिक सुखे मिळविण्याच्या नादात आनंद उपभोगायचाच राहून जायचा... पूर्वी गरिबीच्या परिस्थितीतही मी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो... यामिनी आणि माझ्या आयुष्यात खरंच आनंद आहे का ? आम्ही शेवटचे एकत्र कधी फिरायला गेलो होतो ते मलाही आठवत नाही... मी माझ्या अहंकार पोठी मला त्रास देणाऱ्यांना त्रास देण्याच्या नादात यामिनीला मिळू शकणारा आनंद तर तिच्याकडून हिरावून घेत नाही ना ...?


हा विचार करता करता ! विजय सोफ्याचा बेड करत लाईट बंद करून बेडवर आडवा पडतो...

दुसऱ्या दिवशी प्रतिभा जरा लवकरच कामावर येते... विजय सोफ्यावर पेपर वाचत बसलेला असतो...

प्रतिभा : गुड मॉर्निंग साहेब !

विजय : गुड मॉर्निंग ! आज लवकर आलीस !

प्रतिभा : हो ! आज माझे लवकर आटपले आणि आज दुपारी मला मुलांच्या शाळेतही जायचे आहे मीटिंगला...

प्रतिभा स्वयंपाक घरात जाऊन गॅस पेटवून त्यावर चचा ठेवते इतक्यात यामिनी तयार होऊन स्वयंपाकघरात येते..

यामिनी : गुड मॉर्निंग !प्रतिभा !

प्रतिभा : गुड मोर्निंग ताई !

यामिनी : प्रतिभा ! मी चहाच बघते तू बाकीची कामे घे कररायला !

प्रतिभा : कशाला ? नको ! मी करते चहा ! तुम्ही बाहेर जाऊन बसा ! तयार झाला की मी घेऊन येते ..

यामिनी : आमच्यासाठी चहा नाश्ता आणताना तुझ्यासाठीही घेऊन ये ! आपण एकत्रच चहा पिऊ आणि मला तुला काहीतरी द्यायचेही आहे

प्रतिभा : आता काय देणार आहात ?

यामिनी : तू चचा तर घेऊन ये बाहेर मग कळेल तुला...

प्रतीभा : बरं ! तुम्ही आता बाहेर जा ! मी येतेच...

यामिनी बाहेर येऊन विजयच्या बाजूला सोफ्यावर बसते...

यामिनी : झाला का विजय तुझा पेपर वाचून...

विजय : हो ! झाला एकूण एक शब्द वाचून झाला...

प्रतिभा : हल्ली हे पेपर वगैरे कोणी वाचत नाही ! तुझ्याकडे लॅपटॉप आहे .. . आपल्याकडे वायफाय आहे.. . हवे तेवढे पेपर वाचता येतात ऑन लाईन

विजय : चहा पिता पिता पेपर वाचण्यात जी मजा आहे ती ! ऑनलाईन पेपर वाचण्यात नाही... बरं चहा कुठाय !

यामिनी : प्रतिभा घेऊन येतेय !

विजय : यामिनी तुला सांगतो ! माझे बाबा कसे ही असुदे ! पण त्यांना पेपर वाचण्याचे प्रचंड वेड होते त्यामुळेच मला पेपर वाचण्याची सवय लागली आणि त्यातूनच कदाचित माझ्यातील साहित्यिक घडत गेला... तुला सांगतो मला माझे ऑनलाईन प्रकाशित झालेले साहित्यही पुन्हा पुन्हा वाचायला कंटाळा येतो..

तुला तर माहीतच आहे ३०० पृष्ठांचे पुस्तक मी एक दिवसात वाचून काढतो.

यामिनी : मी इतकी शिकलेली तरी याबाबतीत तुझा हात मी काही धरू शकत नाही...

विजय : मी एखाद पुस्तक वाचायला घेतलं तर ते संपूर्ण वाचून होईपर्यत ते मला खाली ठेवावे असे वाटतच नाही.

यामिनी : पण तू एकदा वाचलेले पुस्तक परत वाचायला घेत नाही .. घेतलेस तर काही संदर्भ शोधायचे असतील तरच

विजय : सोप्प आहे एखाद पुस्तक वाचल्यावर त्याच्यातून जो काही सार घ्यायचा तो घेतल्यावर ते पुस्तक पुन्हा पुन्हा वाचण्यात काही अर्थ नसतो... काही लोक म्हणतात मी हे पुस्तक दहा वेळा वाचले म्हणजे नऊ वेळा वाचूनही ते पुस्तक त्यांना कळलेले नसते म्हणून ते पुन्हा पुन्हा वाचत असतात... रोज गीतेचे पारायण करणाऱ्याला ती कोठे कळलेली असते... पण मला एकदाच वाचून कळली... गीतेच फळ काय तर मनुष्याचा मोह नष्ट करणे , तो माझा केव्हाच नष्ट झालेला आहे ... ज्याला मोह नाही त्याला चिंता नाही... नाहीतर सगळे म्हणतातच कि मला कसलीच चिंता नाही...

यामिनी : ते बाकी खरे आहे ! तुला खरंच कसलीच चिंता नाही ! तुझ्यासारखे हे असे वागणे आम्हा सामान्य माणसांना नाही बुवा जमणार ! तुला ते जमली म्हणूनच तर तू असामान्य आहेस...

विजय : तस काही नाही ! मी जे काही शिकतो त्याचा प्रयोग मी माझ्या आयुष्यात करून पाहतो... नेहमी खरे बोलावे हे लिहिणे आणि वाचणे सोप्पे असते पण प्रत्यक्षात नेहमी खरे बोलणे तितकेसे सोप्पे नसते... पण मी शक्यतो खरंच बोलतो... आणि याचा कित्येकांना अनुभवही आहे.. त्यामुळे माझ्याशी फार कोणी मनातले सांगण्याच्या भानगडीत हल्ली कोणी पडत नाही ! पूर्वी माझे मित्र त्यांच्या फसलेली प्रेमप्रकरणे मला ऐकवायचे आणि मी त्यावर कथा लिहायचो... त्यामुळे कित्येकांचा गैरसमज व्हायचा कि माझ्याच अनेक वेळा प्रेमभंग झालेला आहे...

यामिनी : विजय ! खरंच तुझा एकदाही प्रेमभंग झाला नाही...

विजय : ज्याचा प्रेमभंग झालेला नाही अशी व्यक्ती या जगात अस्तित्वातच नसते... प्रेमात पडणे हा मनुष्य स्वभाव आहे... जो प्रेमातच पडत नाही तो मनुष्यच नाही...

यामिनी : या विषयावर तुझ्यासोबत बोलत राहिले तर रात्र होईल...

इतक्यात प्रतिभा तिघांसाठी चहा नाश्ता घेऊन आली आणि डायनिंग टेबलवर ठेवला ! विजय आणि यामिनी जागेवरून उठून डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले, प्रतिभा शेजारी उभीच होती !

यामिनी : प्रतिभा ! तू का उभी ! बस !

प्रतिभा : बरं ! ( प्रतिभा बसून चहाचा कप ओठांना लावते )

विजय : उपमा छान झाला आहे !

यामिनी : खरचं खूप छान झाला आहे, प्रतिभा ! तू आमच्या जिभेला वाईट सवय लावतेयस हा !

प्रतिभा : मनापासून केलं तर सगळंच छान होत...

यामिनी : बरं आठवलं ! काल आम्ही आपल्या त्या जवळच्या मॉलमध्ये कपड्यांचा सेल लागला होता तेथे गेलो होतो ! तर बरीच खरेदी केली आहे ! तुझ्यासाठीही थोडी खरेदी केलेली आहे...

प्रतिभा : कशाला ताई !

यामिनी : तू मला ताई म्हणतेस ! आणि मला बहिणीसाठी इतकंही करू नको म्हणतेस ! यामिनी जागेवरून उठते आणि समोरच्या कपाटातील कपड्यांच्या पिशव्या बाहेर काढते आणि त्या प्रतिभाच्या हातात देते ... )

प्रतिभा : थँक्स !

यामिनी : अगं ! उघडून तर बघ ! त्यात काय काय आहे ते !

प्रतिभा : तुम्ही आणले आहे म्हणजे चांगलेच असणार ! मी माझी कामे आटपली कि पाहते कि आरामात... तुमचं आटपलं का ? तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होईल !

यामिनी: घड्याळाकडे पाहत ! ( हो ! खरंच कि मला ऑफिसात जायला उशीर होतोय ! मी निघते... बाय... बाय... यामिनी निघून जाते ..)

प्रतिभा चहा नाश्त्याची भांडी उचलते आणि स्वयंपाक घरात निघून जाते...विजय सोफ्यावर बसून लॉपटॉप हातात घेतो आणि त्यावर काम करायला सुरुवात करतो...पण त्यातून डोके वर काढत तो मनातल्या मनात स्वतःशीच काहीतरी बोलू लागतो..

विजय : मगाशी ! यामिनी आणि माझ्या बोलण्यात बाबांचा विषय निघाला ! खरंच मला वाटते तसे बाबा चुकीचे होते कि मीच माझ्या ध्येयाच्या मागे धावताना सारासार विचार करणे विसरून गेलो होतो. बाबांची तरी माझ्याकडून काय अपेक्षा होती ? सर्वसामान्य माणसे उदरनिर्वाहासाठी जितके पैसे कमावतात तितके मी ही कमवावे ! लग्न करावे एक दोन मुलांना जन्म द्यावा हे काही त्यांना अपेक्षित नव्हते... मी लग्न करावे म्हणून त्यांनी किती प्रयत्न केला होता... पण मी प्रत्येक वेळी कोणाच्या कोणाच्या प्रेमात असायचो ! मला सतत वाटत राहायचे कि कोणीतरी माझ्यावर मनापासून प्रेम करणारी मी आहे तसा मला स्वीकारणारी माझ्या साहित्यावर प्रेम करणारी मला भेटेल ... पण प्रत्येकवेळी माझ्या वाट्याला निराशाच आली. मी लग्न करावं म्हणून बाबांनी मला अनेक प्रकारे टोमणे मारले मला मानसिक त्रास दिला जेणे करून या सगळ्याला वैतागून मी लग्न करेन...शेवटी मी जेंव्हा लग्न करण्याचा घेतला तो मात्र त्यांना आवडला नाही... त्यापेक्षा तेव्हा त्यांना माझं अविवाहित राहणं मान्य होतं... त्यामुळे नाईलाजाने का होईना मला त्याचे घर सोडून बाहेर पाडावेच लागणार होते.. त्याचा विचार करूनच मी खरे त्या यापूर्वी लग्न करणे टाळत होतो कारण मला आमच्या घरातील शांती भंग करायची नव्हती.. मी जे काही छोटी मोठी कामे करून कमावत होतो त्यात माझंच कसतरी भागत होतं... फक्त पैसे कमावण्यासाठी मी धावू शकत नव्हतो कारण माझं भविष्य मला खुणावत होतं... यामिनीशी लग्न केल्यामुळे माझे आयुष्य मार्गी लागले पण मी माझ्या आई - वडिलांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण करण्यात मात्र कमी पडलो... मी ते करून बसलो जे मला कधीच करायचे नव्हते... मला साहित्याचे वेड म्हणून माझ्या आई - बाबांना पुस्तकाबद्दल राग ! माझ्या घरात त्यांनी माझ्या पुस्तकांना त्याच्या मानाची जागा कधीच दिली नाही.. माझी पुस्तके ही नेहमीच त्याच्यासाठी अडगळ होती पण त्यांच्या धार्मिक ग्रंथाना मात्र ते फुलासारखे जपत होते...म्हणूनच त्यांच्या गैरहजेरीत मी ही कधीच देवाची पूजा करत नसे...मला त्याच्या नजरते स्वतःला सिद्ध करायचे होते... मी स्वतःला सिद्ध केले पण ते यामिनीच्या मदतीने... त्यामुळे मला त्याच्यासमोर ताठ मानेने नाही जाता येत...

विजय त्याच्या विचारात असतानाच प्रतिभा त्याच्यासाठी चहा घेऊन येते ...

प्रतिभा : साहेब ! चहा घ्या !

विजय : प्रतिभा तू यायला लागल्यापासून माझा चहा खूप वाढला आहे, पूर्वी काय मला स्वतःला सारखा सारखा चहा गरम करून घ्यायला कंटाळा यायचा पण तुला अचूक माहीत आहे कि मला किती किती वेळाने चहा लागतो ! पण तू आल्यापासून माझ्या कामाचा वेगही प्रचंड वाढला आहे कारण चहा प्यायल्यावर माझं डोकं कम्प्युटरसारखं चालायला लागत , हा फक्त माझा समज आहे...

प्रतिभा : पूर्वी आपल्या आयुष्यात चहा शिवाय होतच काय दुसरं !

विजय : हे बाकी ! प्रतिभा तू बरोबर बोललीस ! सकाळी अंघोळ केल्यावर आपल्याला जर सर्वात पहिली कसली आठवण येते तर ती चहाची , तीच गोष्ट दुपार आणि संध्यकाळची ! आपल्या लहानपणी चहा हा तर जेवणालाही पर्याय व्हायचा ! आमच्या लहानपणी आम्ही कितीतरी वेळा फक्त चहा- बटर खाऊन दिवस काढले आहेत. आजही आपल्याकडे पाहुणा आला तर प्रथम आपण त्याला चहा - पाणी घ्या असं म्हणतो ... पाणी - चहा घ्या असं म्हणत नाही..

प्रतिभा : पण हल्ली लोकांना ते चहा - बबटरही परवडत नाही... इतकी महागाई झाली आहे.

विजय : महागाई ही मध्यमवर्गीयांसाठी असते...

प्रतिभा : ते तर आहेच ! आपल्याकडे चारीबाजूनी फक्त मध्यमवर्गीयच पिसला जातो... मी काय बोलत बसले ! मला कामे आटपायची आहेत ! तुम्हीं करा तुमची कामे मी आत जाते !

विजय : बरं ! तुला एक सांगायचंच राहून गेलं !

प्रतिभा : काय ?

विजय : अगं ! विजया येणार आहे रविवारी इकडे !

प्रतिभा : खरंच ! किती वर्षे झाली मी तिला भेटलेच नाही... येणार आहे ती ही नेमकी रविवारी ! मला नाही भेटता येणार !

विजय : दुःखी होऊ नकोस ! ती दोन तीन दिवस राहायलाच येणार आहे त्यामुळे भेटेल तुला...

प्रतिभा : मस्तच किती वर्षांनी भेटू आम्ही... पुन्हा ..

विजय : हो ! जा.. जा ... तू तुझी कामे आटप...

प्रतिभा स्वयंपाक घरात निघून गेल्यावर विजय स्वतःशीच हसतो आणि आपल्या नेहमीच्या कामात गुंग होतो...

थोड्यावेळाने प्रतिभा आपली कामे आटपून तिच्या घरी जायला निघते...

प्रतिभा : साहेब मी येते...

विजय : प्रतिभा ! येते काय ? काल आम्ही तुमच्यासाठी आणलेले कपडे तू घेतलेसच नाही..

प्रतीभा : सॉरी ! सॉरी ! प्रतिभा कपड्यांच्या पिशव्या हातात घेते आणि निघते...

विजय : कपडे कसे आहेत ते बघ ! लहान - मोठे झाले तर आपण बदलून आणू...

प्रतिभा : बरं... मी येते आता..

प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच विचार करतो...

विजय : पूर्वी म्हणजे यामिनीशी लग्न केल्यापासून मला हा एकांत आवडू लागला होता... त्यापूर्वी तर मला सतत आजूबाजूला माणसांची सवय होती.. एकांत असा मिळतच नव्हता... मी सतत एकांताच्या शोधात असायचो त्यामुळे माझ्या कथा दिवसभर माझ्या डोक्यात असायच्या आणि मध्यरात्री त्या कागदावर उतरायच्या त्यानंतर मोबाईलवर... आता तर मला हाताने चार शब्दही लिहता येत नाही ...अगदी मला स्वतःची सही मारायलाही कंटाळा येतो. प्रतिभा यायला लागल्यापासून आजूबाजूला माणसांचा वावर पुन्हा हवा हवासा वाटू लागला आहे... आजूबाजूला माणसे आपल्याबरोबर कोणत्या नात्याने आहेत हे महत्वाचे नसते त्यांचे असणे महत्वाचे असते... पूर्वी माझ्या आजूबाजूला खूप माणसे होती... त्यांचे माझ्यावर प्रेमही खूप होते...पण मीच कदाचित माणूसघाण्या होतो... माझ्या लहानपणी मी असा नव्हतो ! तेव्हा ! मी किती अखंड वाहणारा आणि प्रेमाचा आणि उत्साहाचा झरा होतो. पण जेव्हा मी लेखक झालो तेव्हापासून मी बदलत गेलो कारण खूप छोट्या छोट्या गोष्टींचा मी जरा जास्तच सखोल विचार करू लागलो, जैमुळे मी इतरांपेक्षा वेळा ठरू लागलो आणि आजूबाजूच्या लोकांना माझी भीती वाटू लागली कोणीही कोणतीही गोष्ट माझ्यासमोर मनमोकळेपणाने बोलणे टाळू लागला... अगदी माझ्या घरातील माणसेही माझ्यासमोर माझ्या दृष्टीने फालतू असलेल्या विषयावर बोलणे टाळायचे... 

      विजय त्याच्याच विचारात गुंग असताना... कोणीतरी दारावरची बेल वाजवली, विजयने दरवाजा उघडला तर दरवाजात ... कुरिअरवाला होता.. विजयने कुरिअर घेतले... ते कुरिअर घेऊन विजय आत येऊन सोफ्यावर बसला आणि त्याने ते कुरिअर फोडले तर त्यात त्याने मागे एका काव्यलेखन स्पर्धेसाठी पाठविलेल्या कवितेला बक्षीस मिळाले असल्याचे पत्र होते. विजयने ते पत्र टेबलावरच असलेला फाईलमध्ये ठेवले आणि तो त्याच्या कामात गुंग झाला... थोड्यावेळाने त्याला कामाचा कंटाळा आला म्हणून त्याने सोफ्याचा बेड केला आणि त्यावर आडवा पडून तो टी.व्ही. पाहू लागला. ती. व्ही. वर कोणता तरी रडवेला म्हणजे इमोशनल चित्रपट लागला होता. तो पाहताना विजयचे डोळे पाणावले त्यातून वाहणारे अश्रू अगदी त्याच्या गालावर आले... ते अश्रू पुसत विजय सोफ्यावर उठून बसतो आणि स्वतःशीच

विजय : हे असे चित्रपट पाहताना मी इतका हळवा का होतो ते माझे मलाच कळत नाही ! कधी कधी तर मी माझ्याच प्रेमकथा वाचतानाही मी हलवा होतो ! जगाच्या नजरेत तर मी जमदग्नी आहे पण प्रतिभाच्या नजरेत मी तसा नाही कारण मी जेंव्हा लव्हर बॉय होतो त्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली होती. त्यानंतरचा माझ्या आयुष्याचा खडतर प्रवास तिला माहीतच नाही.

विजय आत जाऊन ताटात जेवण घेऊन येतो आणि डायनिंग टेबलवर जेवायला बसतो..

विजय : वा ! प्रतिभाने काय मस्त ! सुरणाची भाजी केली आहे... पूर्वी मला सुरणाची भाजी फार काही आवडत नव्हती ! पण मला मूळव्याधीचा त्रास सुरु झाला आणि मी सुरणाची भाजी औषध म्हणून खाऊ लागलो... नंतर नंतर मी ती आवडीने खाऊ लागलो...

विजय जेऊन झाल्यावर जेवणाचे ताठ स्ववयंपाक घरात ठेऊन बाहेर आला तो तयार होऊनच... पण यावेळी तो कोठेतरी महत्वाच्या कमाला जाण्यासाठी तयार झाला होता. यावेळी तो बऱ्यापैकी रुबाबदार दिसत होता... हॉलमध्ये येताच त्याने कपाटातील अत्तर काढून त्याचा फवारा आपल्या कपड्यांवर मारला, तोंडाला बऱ्यापैकी पावडर थापली, केसमधून गॉगल काढून तो डोळ्यावर चढवला... आणि एखाद्या अभिनेत्याच्या थाटात तो घराच्या बाहेर पडला... रात्री उशिरा तो घरी माघारी आला... तोपर्यत प्रतिभा तिचे काम आटपून निघून गेलेली होती. यामिनी सोफ्यावर बसून टी. व्ही. पाहत होती. विजय त्याच्याकडील चावीने दरवाजा उघडून आत येताच... त्याच्याकडे पाहत...

यामिनी : विजय ! इतका नट्टापट्टा करून कोठे गेला होतास ? दुसरं लग्नबिग्न करायचा विचार नाही ना ?

विजय : तुला तर माहीत आहे मला कधी लग्नच करायचं नव्हतं.. मग ! दुसऱ्या लग्नाचा प्रश्न येतोच कोठे ?

आज माझी एका प्रकाशकासोबत मिटिंग होती ते माझा एक कथासंग्रह प्रकाशित करणार आहेत !

यामिनी : प्रकाशक महिला होती का ?

विजय : हो ! महिला म्हणजे तरुणीचं होती...

यामिनी : दिसायला कशी होती ?

विजय : अगदी ! मराठी चित्रपटातील नायिकेसारखी !

यामिनी : नाव काय तीच ?

विजय : ते तुला काय करायचं आहे...

यामिनी : ते मला काय कारायचंय ! मी सहज विचारले... म्हणजे मला समजले असते कि ती नवखी आहे की प्रसिद्ध आहे ते... तरुण सुंदर, अविवाहित म्हणजे नक्कीच नवखी असणार... तुझी ही नवख्याना संधी देण्याची सवय कधीच जाणार नाही ना !

विजय : नाही ! माझ्या वाट्याला जो संघर्ष आला तो इतरांच्या वाटायला येऊ नये असे मला वाटते...

यामिनी : पुस्तक प्रकाशनाला मला नेशील ना सोबत... तेव्हा भेटेनच मी तिला...

विजय : नक्कीच...

यामिनी : चल ! उठ ! फ्रेश हो ! आपण जेऊन घेऊ या ! जेवणार आहेस ना ?

विजय : हो ! जेवणार आहे ! मी तिच्यासोबत नाही जेऊन आलो..

यामिनी : मी कोठे तस काही बोलले ! तुझे तूच बोलतो आहेस..

विजय : मी लेखक आहे... मला लोकांच्या मनातले ते न बोललेले संवादही ऐकू येतात

यामिनी : बरं ... बरं ... आटप आता...

विजय आणि यामिनी दोघेही आत जातात.. यामिनी डायनिंग टेबलवर जेवण वाढते विजय फ्रेश होऊन बाहेर येतो दोघेही जेवायला सुरुवात करतात

विजय : प्रतिभाने तुझ्यासाठी मासे आणले वाटत !

यामिनी : तुझ्या जिभेला पाणी सुटत नाही ना ! नाहीतर माझं पोट दुखायचं !

विजय : नाही ! माझ्या जिभेला काही पाणी वगैरे सुटत नाही आता... पण मी खाल्लेल्या बिचाऱ्या हजारो माश्यांची आठवण येते मला...

यामिनी : पुरे आता जेव... उद्या विजया येणार आहे माहीत आहे ना ? की विसरलास ! मी प्रतिभाला बोलावणार होते, तिला यायचे होते पण नेमका तिने रविवार असल्यामुळे बाहेर जाण्याचा प्लॅन अगोदरच केला होता. मी काय म्हणते ! विजया आली की तिला घेऊन आपण बाहेरच जाऊया ! फिरायला आणि रात्री हॉटेलातच जेवून येऊया घरी..

विजय : मस्त आयडिया आहे .. पण त्यामुळे तुला जेवण करायचा कंटाळा आला होता हे तिच्या लगेच लक्षात येईल त्याचे काय ?

यामिनी : आले तर येऊ दे ! तशीही आल्यावर ती काही गप्प बसणार नाही ! साग्रसंगीत जेवणाचा घाट घालणार ! त्यापेक्षा आपण बाहेरच जेऊ !

विजय : तसेच करू या ! त्यानंतर काय प्रतिभा आहेच ! तश्याही त्या दोघी जुन्या मैत्रिणी आहेत त्यांचे जमेल चांगले...

यामिनी : नशीब ...

ते दोघे जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे आप आपल्या जागेवर दिवे बंद करून झोपी जातात...

रविवारच्या सकाळी विजय आणि यामिनी जरा उशिराच उठलेले असतात विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात प्रतिभा त्याच्यासाठी चहा- बिस्किटे घेऊन येते आणि डायनींग टेबलवर ठेवते.. 

यामिनी : विजय चल चहा घेऊया... नंतर घर आवरायचे आहे

विजय : पेपरमधून डोकं वर काढत ! घर काय अवरायचे आहे ?

यामिनी : घर तर प्रतिभा आवरते रोज ! पण तुझी खोली आवरायला हवी ! तू तर नेहमी हॉलमध्ये पडलेला असतोस त्यामुळे तुझ्या खोलीत तुझा पसारा आहे... मी ती खोली प्रतिभाला साफ सफाई करायला सांगत नाही कारण तुझ्या कामाच्या वस्तू इकडे तिकडे झालेल्या तुला चालत नाही. तुझी खोली तूच साफ कर ! सर्व वस्तू आता नीट जागेवर ठेव ज्या वस्तू कामाच्या नसतील त्या फेकून दे ! म्हणजे उद्यापासून तुझी खोलीही प्रतिभाला स्वच्छ करता येईल आणि विजयला ती वापरताही येईल... मी तिला माझ्याच खोलीत झोपायला सांगितले असते पण ती तुझीच बहीण रात्री उशिरापर्यत टी.व्ही. पाहण्याची सवय !

विजय : बरं बाई ! माझी खोली मी आवरतो मग तर झालं ?

यामिनी : इतकंच नाही ! आपल्याला बाजारातून काही सामानही आणावे लागेल..

विजय : जाऊ दुपारी ! तशीही विजया संध्याकाळी येणार आहे ना ?

यामिनी : बरं आता आपल्या जेवणाचं काय ?

विजय : जेवणाचं काय ? खिचडी बनावं !

यामिनी : बरं मी खिचडी बनवायला घेते ! त्यापूर्वी आपल्यासाठी मॅगी बनवते ! ती खा आणि कामाला सुरुवात कर म्हणजे तुला काम करायला ताकद येईल ..

विजय : कर पटकन...

विजय आणि यामिनी .. मॅगी खातात आणि घराची साफसफाई करायला सुरुवात करतात... साफ सफाई झाल्यावर... दोघेही खिचडी खातात आणि तयार होऊन बाजारात जातात.. संध्याकाळी पुन्हा माघारी येतात.. आणि सर्व सामान स्वयंपाक घरात नेऊन ठेवतात.. . आणि बाहेर येऊन सोफ्यावर बसतात इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी पुढे होत दार उघडते तर दारात विजया असते तिच्या हातात एक दोन पिशव्या असतात त्या यामिनी घेते आणि विजया आत येताच

विजया : काय वाहिनी कशी आहेस ?

यामिनी : मी छान आहे !

विजया : विजय ! तू कसा आहेस ?

विजय : मी ना ! मस्तच आहे...

यामिनी : मी ह्या पिशव्या आतल्या खोलीत ठेवते ! तोपर्यत तुला फ्रेश व्हायचे असेल तर हो !

विजया : तुम्ही कोठून बाहेरून आलात का ?

यामिनी : हो ! हो ! जरा बाजारात गेलो होतो.

विजया : बरं ! मी जरा फ्रेश होते आणि पडते,

यामिनी : चहा ठेऊ का ?

विजया : नको ! आता नको ! प्रवासात झालाय !

विजया फ्रेश होऊन विजयच्या खोलीत जाऊन पडते

यामिनी : विजय ! आता रात्रीच्या जेवणाचं काय ? प्रतिभा तर झोपली आता काय ती लवकर उठणार नाही !

विजय : झोपू दे तिला ! आपण एक काम करूया ! हॉटेलमधून घरीच जेवण मागवू या !

यामिनी : हे उत्तम होईल ! काय मागवू या ?

विजय : तुमच्यासाठी चिकन राईस आणि काय ते मागवा, माझ्यासाठी पनीर आणि रोटी मागवा... तुला आणखी काय मागवायचे असेल तर मागव !

यामिनी : मी लगेच मागवते...

थोड्या वेळाने यामिनीने मागविलेले जेवण येते ! विजया ही उठून बाहेर हॉलमध्ये येऊन बसते आणि तिघे डायनिंग टेबलवर जेवायला बसतात.. .

विजया : जेवण बघताच.. जेवण हॉटेलातून मागवले वाटतं ?

यामिनी : हो ! इतकं सगळं मला घरी करायला कोठे जमणार ?

विजया : ते ही बरोबर आहे म्हणा ! रविवारी एक दिवस कामातून सुट्टी त्यात जेवण करायला कंटाळा येतोच !

विजय : जेवण छान आहे ना ?

विजया : जेवण छानच आहे ! पण घरी का मागावलस ? आपण गेलो असतो कि हॉटेलात जेवायला ! छान पायही मोकळे झाले असते.. .

यामिनी : आम्हाला वाटलं तू थकली असशील म्हणून आम्ही घरीच जेवण मागवलं !

विजया : काही हरकत नाही ! जेवल्यावर आपण बाहेर जाऊया शतपावली करायला

विजय : ही कल्पना छान आहे !

विजया : विजय ! तुझं लिखाण कसं चाललंय !

विजय : उत्तम !

विजया : तू काय बाबा ! आता मोठा लेखक झालास ! तुझ्याकडे आता घरच्या माणसांनाही भेटायला वेळ नसतो...

विजय : मी नाही भेटायला आलो म्हणून काय झालं ? तुम्ही येताच की मला भेटायला अधून - मधून

यामिनी : विजया ! घे ! ना ! लॉलीपॉप घे ना !

विजया : हो ! हो ! घेते... यामिनी ! तुझा जॉब कसा चाललाय ?

यामिनी : छान ! पण आता कामाचा लोड खूप वाढलाय !

विजया : घरी कामाला कोणी नवीन बाई भेटली कि नाही ?

यामिनी : भेटली आहे पण रविवारी मी तिला सुट्टी देते..

विजया : बाई कशी आहे ?

विजय : ते कळेलच कि उद्या तुला...


सर्व जेवण आटपून सोफ्यावर बसतात ...


विजया : विजय ! गावी येऊन जा एकदा ! आई तुझी आठवण काढत होती... यामिनीलाही घेऊन ये ! तिनेही आपले गाव अजून पहिलेले नाही !

यामिनी : हो ! मलाही पाहायचे आहे आपले गावं !

विजय : जाऊया ! कधीतरी वेळ काढून !

विजया : यामिनी मी .. घरची लोणची आणि सुक्या चटण्या आणल्या आहेत त्या ठेवल्यात किचनमध्ये.. .

यामिनी : मस्तच ...

विजया : तुझ्यासाठी साडी आणली आहे आणि विजयासाठी छान सादर... आणला आहे

विजय : कशाला ? हे सगळं आणायचं उगाच !

विजया : तुम्ही काय ? कशीही खरेदी करता , मी छान शोधून आणले आहे तुमच्यावर शोभून दिसेल... मी घेऊन येते ..

विजया आत जाऊन त्या पिशव्या घेऊन येते त्या दोघांच्या हातात देते दोघानाही तिने आणलेले कपडे प्रचंड आवडतात

विजय : हा सदरा मी माझ्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनाला घालीन

यामिनी : मी ही आता ही साडी पुस्तक प्रकाशनाच्या दिवशीच घालेन..

विजया : बरं ! तुम्हाला हवे तेंव्हा घाला...

चला मग आता बाहेर फिरायला जाऊया !

ते तिघेही बाहेर पाय मोकळे करायला निघून जातात ..

रात्री उशिरा ! ते तिघे घरी येतात ... विजया विजयच्या खोलीत झोपयला जाणार इतकया विजय झोपण्यासाठी सोफ्याचा बेड तयार करतो..

विजया : हे काय ? विजय तू बाहेर हॉलमध्ये झोपणार आहेस ?

विजय : हो ! मी हल्ली येथेच झोपतो

विजया : का ? तू तुमच्या बेडरुमध्ये का झोपत नाहीस ..?

यामिनी : अगं ! काही नाही मला सकाळी ऑफिसला जायचे असते म्हणून मी लवकर झोपते आणि हा बाहेर टी.व्ही. पाहत बसतो.. कधी त्याला जर लिहिण्याचा मूड आला तर लिहीतही बसतो... आणि लिहता लिहता त्याला झोप आली तर येथेच बेडवर झोपतो...

विजया : हे रोजच आहे का ?

यामिनी : अगदीच रोज नाही ! काही काम नसेल तर झोपतो तो बेडरूमममध्ये ..

विजया : मग ! ठीक आहे... मला वाटलं तुमच्यात काही भांडण वगैरे झाले आहे का ?

यामिनी : नाही !

विजय : तू काही काय विचार केरतेस ? जा ! झोप जाऊन आता... थकली असशील..

विजया :यामिनी तू जाऊन झोप आता... मी ह्याला कंपनी देणार आहे टी .व्ही. पाहायला !

यामिनी तिच्या खोलीत निघून जाते आणि विजया विजयच्या बाजूला येऊन बसते बराच वेळ टी.व्ही . पाहता पाहता त्याच्यातील गप्पा रंगतात आणि मग झोप अनावर झाल्यावर विजया विजयच्या खोलीत जाऊन झोपते आणि विजय बेडवर आडवा पडतो.. विजय स्वतःशीच विचार करू लागतो...

विजय : विजयाला आणि प्रतिभालाही आमच्या नात्याबद्दल काही संशय तर आलं नसेल ना ? यामिनी आणि मी असे वेगवेगळे झोपतो त्यामुळे...तसेही आम्ही एकत्र झोपलो काय आणि वेगवेगळे झोपलो काय काय फरक पडणार आहे म्हणा...

असा विचार करता करताच विजय झोपी जातो ...

दुसऱ्या दिवशी यामिनी तिच्या ऑफिसात निघून गेल्यावर विजय आणि विजया सोफ्यावर चहा पित बसलेले होते... समोर टी.व्ही. सुरु होता तो ही मोठ्या आवाजात इतक्यात दारावरची बेल वाजली विजया उठून पुढे झाली आणि तिने दरवाजा उघडला तर दरवाजात प्रतिभा उभी होती. प्रतिभाला पाहताच विजयला आश्चर्याचा धक्काच बसला...पण प्रतिभाला तसा तो बसला नाही कारण तिला अगोदरच माहीत होते की विजया येणार आहे पण विजयला खूप वर्षांनी भेटल्याचा प्रचंड आनंद प्रतिभाच्या चेहऱ्यावर दिसत होता. विजयाने तर तिला आनंदाने मिठीच मारली आणि तिला आत घेत ...

विजया : तू इकडे कशी ?

विजय : तुला काल नाही का बोललो ! तुझ्यासाठी सरप्राईज आहे ! प्रतिभाच आपल्याकडे हल्ली कामाला येते...

विजया : मस्तच ! त्यानिमित्ताने का होईना इतक्या वर्षानंतर माझी आणि प्रतिभाची भेट झाली.

प्रतिभा : बरं मी कामाला सुरुवात करते..

विजया : कामाला काय करशील सुरुवात ! बरं मला सांग ! तू कशी आहेस ? तुझा नवरा - मुलं कशी आहेत ?

प्रतिभा : सर्व उत्तम आहेत... आणि तुमची !

विजया : तुमची ! हे काय ? तू मला पूर्वीसारखीच नावाने हाक मार ... मला नावाने हाक मारणारी माणसेच आवडतात.. म्हणून विजय माझा दावा ! तरी त्यालाही मी नावानेच हाक मारायची लहानपणापासून... विजयलाही नावाने हाक मारणारी माणसे आवडतात... तू नावानेच हाक मातेस ना त्याला..

प्रतीभा : नाही ! आता मी त्याला नावाने हाक नाही मारत मी त्यांला साहेबच म्हणते..

विजय : मीच तिला मला साहेब म्हणायला सांगितले आहे कारण यामिनी इतरांसमोर माझा साहेब असाच उल्लेख करते जर प्रतिभाने मला नावाने हाक मारली तर कदाचित ते यामिनीला नाही आवडणार म्हणून प्रतिभाने मला पूर्वीसारखी नावाने हाक मारलेली मला आवडली असती पण मीच तिला मला साहेब ! अशी हाक मारायला सांगितले आहे...

विजया : आणि वहिनीला काय हाक मातेस ?

प्रतिभा : त्यांना मी यामिनी ताईच म्हणते .. त्यांनीच तसे सांगितले आहे त्या मला अगदी सख्ख्या बहिणीसारख्या मानतात.. .

विजया : वहिनी तशी प्रेमळच आहे ... इतक्या मोठ्या हुद्द्यावर काम करते पण त्याचा अजिबात गर्व नाही तिच्या चेहऱ्यावर

प्रतिभा : हो ! ना ! बरं ! मी आता कामाला सुरुवात करू का ?

विजया : मी ही येते की तुझ्या मदतीला ! माझ्या हाताला काय मेहंदी लागली नाही... काम करता करता आपल्यात गप्पाही होतील... चल !

दोघीही स्वयंपाक घरात जातात... विजय तेथेच सोफ्यावर बसून लॅपटॉपवर आपली कामे करायला सुरुवात करतो...

तिकडे स्वयंपकघरात कामे करता करता प्रतिभा आणि विजयात चर्चा रंगतात...

विजया : किती दिवस झाले प्रतिभा तू इकडे कामाला येते आहेस ?

प्रतिभा : झाला एक आठवडा !

विजया : पण तू इकडे कामाला कशी काय आलीस ?

प्रतिभा : माझी एक मैत्रीण याच इमारतीत घरकाम करते तर ती मला म्हणाली या घरात मोलकरीण हवी ! मी ही चांगल्या कामाच्या शोधात होते... म्हणून आले तेव्हा मला कळले की हे विजयचे घर आहे म्हणून... खरं तर हे विजयचे घर आहे कळल्यावर मी माघारीच्या जाणार होते पण विजयनेच मला समजावले की तुला कोठेतरी काम करायचे आहेस ना ? मग ! तू इकडेच काम कर ना ! आपले घर समजून ! तू आमच्या घरी कामाला आलीस तर आम्हाला घराची आजिबात काळजी राहणार नाही ! तुलाही काम करताना काही मानसिक ताण नसेल आणि पैसेही चांगले मिळतील म्हणून मी हो ! म्हणाले...

विजया : तुझी आणि माझी मैत्री झाली तेव्हाही तू घर कामच करायचीस त्यामुळे आपल्या मैत्रीत कधी अंतर पडले नाही आणि यापुढेही पडणार नाही ! विजयने तुला त्याला साहेब म्हणायला सांगितले ते त्याने मनावर दगड ठेऊनच सांगितले असेल ...

प्रतिभा : हो ! ते मला कळतेय ! मला आता त्याला साहेब म्हणायची सवयही लागली आहे.. तसेही या घरात मी माझेच घर समजून काम करते त्यामुळे मला दुसऱ्या कोणाच्या घरात काम करते आहे असे वाटतच नाही, विजय आणि यामिनी ताई मला तसे वाटूही देत नाहीत..

विजया : तू या घरात कामाला येतेस याचा मला प्रचंड आनंद आहे कारण तुला विजयच्या खाण्यापिण्याच्या आवडी माहीत आहेत, तू उत्तम स्वयंपाकही करतेस त्यामुळे विजय आणि वाहिनीच्या खाण्या पिण्याचे आता आभाळ होणार नाही... काल आम्ही हॉटेलात जेवायला गेलो होतो.. बऱ्याच दिवसांनी आम्ही असे एकत्र हॉटेलात जेवलो...

प्रतिभा : चहा करू का ?

विजया : अगं ! विचारतेस काय ? कर गरम - गरम आपण एकत्र चहा पिऊया ! विजयला मी देऊन येते ....

विजया बाहेर विजयला चहा नेऊन देते आणि ती माघारी आल्यावर त्यांच्यातील चर्चा पुन्हा रंगते

प्रतिभा : चहा ! कशी झाली आहे ?

विजय : उत्तम ! बरं मला सांग ! विजय रोजच बाहेर हॉलमध्ये झोपतो का ?

प्रतिभा : हो ! मी यामिनीताईंना विचारले तर त्या म्हणाल्या, विजयला रात्री उशिरापर्यत काम करायचे असते असते म्हणून तो बाहेर झोपतो, मला ते कारण काही पटले नाही !

विजया : मलाही पटले नाही !

तश्याही या घरात दोन बेडरूम आहेत आता मी ज्या खोलीत जपते त्याच खोलीत विजयचे सर्व सामान आहे , यापूर्वी मी दोन चार वेळा आलेय येथे पण मी राहिले नव्हते त्यामुळे बहुतेक माझ्या लक्षात आले नसेल...

प्रतिभा : यामिनीताई विजयच्या आयुष्यात कश्या आल्या ... म्हणजे त्यांचे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज ?

विजया : त्यांचं लग्न नक्की कसं झालं ते मलाही माहीत नाही... आई म्हणते ! पाच वर्षांपूर्वी एक दिवस अचानक तो सुटाबुटात घरी आला आणि त्याचे सर्व सामान घेऊन निघून गेला.. जाताना आई म्हणाला, '' मी कोर्ट मॅरेज केले आहे ! मी माझ्या बायको सोबत नवीन घरात राहणार आहे... कोठे ते नंतर कळवतो..

मला कळले तेव्हा ! मी त्याला फोन केला आणि त्याच्या ह्या पत्यावर त्याला भेटायला आले तेव्हा मला कळले त्याने यामिनीशी लग्न केलेले आहे.. . यामिनीला मी तशी पूर्वीपासून ओळखते ती विजयच्याच वर्गात होती.. प्रचंड हुशार .. वर्गात तिचा नेहमी पहिला नंबर असायचा ... विजयची वर्ग मैत्रीण होती शाळेत असताना ती यायची अधून मधून आमच्या घरी... तिची घरची परिस्थिती तशी श्रीमंतीचीच होती.. विजयचे तिच्यावर शाळेत असताना एकतर्फी प्रेम होते पण तिचे नसावे बहुतेक ! नंतर त्यांची कधी भेट झाली काय माहीत आणि त्यांनी सरळ कोर्टात जाऊन लग्न केले.. त्याच्या लग्नला फक्त त्याचेच मित्र - मैत्रिणी होत्या... आम्ही म्हणत होतो पुन्हा विधिवत लग्न करा तर दोघांनीही लग्नाला नकार दिला... लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ नाही म्हणून मी एकदा विचारले तर विजय म्हणाला, '' यामिनी ! कधीच आई नाही होऊ शकत ... ते ऐकून मला खरं तर धक्काच बसला... तसेही विजयला कधीच बायका - पोरात रस नव्हताच त्यामुळे या गोष्टीचा त्याला काही त्रास होत असेल असे मला नाही वाटत... खरं तर आयुष्यात लग्न न करण्याच्या निर्णयापर्यत पोचला होता... आम्ही त्याच्यासाठी किती सुंदर सुंदर मुली पहिल्या होत्या त्या यामिनी इतक्या सुंदर उच्च शिक्षित आणि श्रीमंत नव्हत्या... पण यामिनीच्या तुलनेत बऱ्याच तरुण होत्या ... पुरुषांना नाही म्हटलं तरी त्याच्यापेक्षा तरुण बायको आवडते... विजयच्या बाबतीत ते तसे नक्की सांगता येणार नाही... हे वेगळे... त्याला मुळात बायकांमध्ये रसच नव्हता

प्रतिभा : हे बाकी तू बरोबर बोललीस...

विजया : आता आपण काय करणार.. ते दोघे एकमेकांसोबत सुखात आनंदात आहेत ना ... हे मला पुरेसे आहे...

प्रतिभा : त्यांच्या एकूण वागण्यावरून तरी त्याच्यात काही मतभेद आहेत असं चुकूनही वाटत नाही ! सर्वसामान्य पती - पत्नीपेक्षा त्यांच्यातील प्रेम जरा जास्तच व्यक्त होताना दिसत हे मला खटकत... कारण त्यांचं सर्वच विषयावर एकमत होतं... कोणीही एकमेकांच्या कोणत्याच गोष्टीला विरोध करत नाही... मी तर त्यांचा एकमेकांवर वाढलेला आवाजही ऐकला नाही... हे जरा मला विचित्र वाटते... 

विजया :प्रतिभा ! ते जाऊ दे ! तू सुखी आहेस ना तुझ्या आयुष्यात...

प्रतिभा : तसा या जगात कोणीच सुखी नसतो , पण मी खाऊन पिऊन सुखी आहे... आम्ही दोघेही मेहनत करून आमच्या मुलांना उत्तम भविष्य देण्याचा प्रयत्न करतोय पण आयुष्यातला संघर्ष काही आयुष्याच्या शेवटापर्यंत कमी होईल असे काही वाटत नाही. आम्ही दोघेही आयुष्यभर कष्ट करून किती कमावणार आणि किती वाचवणार ? विजया ! तू सुखी आहेस ना ?

विजया : मी सुखीच म्हणावी लागेल कारण ... प्रेम विवाह करूनही माझ्या वाटयाला सारे उत्तमच आले कारण आमच्या प्रेम विवाहाला कोणी विरोध केला नाही ! पण विजयचा आमच्या लग्नाला विरोध नव्हता पण मी माझं शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहून लग्न करावं असं त्याच म्हणणं होत... प्रेमात आंधळ्या झालेल्या मला त्यावेळी ते कळले नाही पण आज कळतंय तेव्हा मी त्याचे ऐकायला हवे होते .... आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे.. आमच्या घराची आर्थिक परिस्थितीही उत्तम आहे... पण शिक्षण अर्धवट सोडल्यामुळे मला माझी स्वतंत्र अशी वेगळी ओळख निर्माण करता आली नाही.. विजयने आमचे घर सावरण्यासाठी स्वतःचे शिक्षण अर्धवट सोडले पण तो मुळातच प्रचंड हुशार असल्यामुळे त्याने त्याला हवे होते ते साध्य केलेच स्वतःची समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली.. नाव लौकिक मिळविला... आम्ही मात्र फक्त सामान्य माणसे म्हणून जगतोय...

प्रतिभा : मलाही ! कधी वाटले नव्हते की विजय एक दिवस इतका मोठा माणूस होईल... पण तो आपला मित्र आहे याचा मला नेहमीच आनंद व्हायचा...

विजया : त्याच्यामुळे ! त्याच्या कर्तृत्वामुळे आम्हालाही समाजात मान - सन्मान मिळतोय...माझ्या मुलांना त्याच्या मामाचा खूपच अभिमान आहे.. मला दोन मुलगे आहेत मोठा सहावीला आणि लहान पहिलीला आहे..

विजया : माझी मोठी मुलगी तिसरीला आणि लहान मुलगा पहिलीला आहे...

प्रतिभा : त्यांना घेऊन नाही आलीस ?

विजया : ते माझ्या नणंदेच्या घरी गेले आहेत राहायला चार दिवस म्हणून तर मला इकडे यायला फुरसत मिळाली...

प्रतिभा : भाजी कसली बनवूया ?

विजया : सोयाबीनची बनवूया !

प्रतिभा : बरं !

विजया : वाहिनी तुला पगार किती देणार आहे ?

प्रतिभा : दहा हजार..

विजया : बरोबर आहेत ना ? की वाढवायला सांगू ?

प्रतिभा : नको ! नको ! हे पुरेसे आहेत...

विजया : तुझा नवरा काय करतो ?

प्रतिभा : करतो ! एका कारखान्यात नोकरी

विजया : दारू वगैरे पित नाही ना ?

प्रतिभा : पितो कधी कधी !

विजया : प्यायल्यावर मारझोड करत नाही ना ?

प्रतिभा : भांडण झाल तर मारतो एखादा फटका ! त्यात काय आता नवीन नाही , आता सवय झाली आहे.. .

विजया : माझा नवरा निर्व्यसनी आहे फक्त या एका कारणामुळे विजयने माझ्या लग्नाला विरोध केला नाही, दारू पिणाऱ्यांचा त्याला प्रचंड तिरस्कार आहे... आमचे बाबा आमच्या लहानपणी खूप दारू प्यायचे आणि दारूच्या नशेत आईशी भांडण उकरून काढून भांडत बसायचे रात्रभर.. पण आमची आई तशी खमकी त्यामुळे तिच्यावर दारूच्या नशेतही हात उचलायची काही त्यांची हिंमत व्हायची नाही... पण दारूच्या व्यसनापायी त्यांनी त्यांचा उत्तम चाललेला व्यवसाय बुडवला ! त्यामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत गेला तो कमी करण्यासाठी विजयला त्याचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि त्याची स्वप्ने आशा आकांक्षा त्याला गुंडाळून ठेवाव्या लागल्या.. त्याने आमचे घर एक हाती सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला त्यात त्याला यशही आपले... त्यामुळे दारु पिणाऱ्या माणसांचा त्याला प्रचंड राग येतो...त्याच्या मते दारू पिणारा माणूस कितीही मोठ्या पदावर असला तरी एक दिवस तो आपला मान गमावून बसतोच.. कारण तो त्याची सारासार विचार करण्याची क्षमता गमावून बसलेला असतो... आजूबाजूला अनेक दारुडे लोक, दारुडे मित्र असतानाही त्याने स्वतःला कधीही दारूच्या आहारी जाऊ दिले नाही... पुढे आमच्या बाबानी दारू सोडली ... ते आध्यात्माच्या मार्गाला लागले आमची आर्थिक परिस्थिती सुधारली... पण तरीही दारूमुळे विजयला शिक्षण अर्धवट सोडायला लागल्याची खंत त्याच्या मानत कोठेतरी आजही आहे... बाबानी दारू सोडली आणि त्यांनी लक्ष्मीचा हात धरला... त्याचवेळी नेमका विजयने सरस्वतीचा हात धरला ! लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाही म्हणतात... त्यामुळे बाबांच्यात आणि त्याच्यात वाद होऊ लागले... बाबाना वाटत होते त्याने सरस्वतीचा हात सोडून लक्ष्मीचा हात धरावा... पण विजय काहीही झाले तर सरस्वतीचा हात सोडायला तयारच नव्हता... सरस्वतीने लक्ष्मीला काही त्याच्या जवळ येऊ दिले नाही पण पुढे यामिनीच्या रूपात लक्ष्मी त्याच्या आयुष्यात आलीच... मग ! सरस्वतीचाही नाईलाज झाला...

प्रतिभा : पण विजय अजूनही आहे तसाच आहे साधाभोळा आणि नम्र ! आजही त्याच्या चेहऱ्यावर गर्व अजिबात दिसत नाही...

विजया : बाबांच्या आणि त्याच्यातील भांडणांमुळेच त्याने यामिनीसह वेगळं राहण्याचा निर्णय घेतला.. माझ्या मते तो योग्यच निर्णय होता... त्यामुळे त्याला त्याच्या ध्येयाकडे लक्ष द्यायला अधिक वेळ मिळाला... तो जर आमच्या घरात राहिला असता तर नात्यात गुंतून पडला असता...

प्रतिभा : विजया ! जेवण झालंय ! आता मी निघते ... मला मुलांना आणायला त्याच्या शाळेत जायचे आहे ...

विजया : तू जा ! आता मी उद्या तुझ्यासोबत तुझ्या घरी येणार आहे...

प्रतिभा : खरंच ! चालेल ... मला खूप आनंद होईल... मी निघते आता ..

विजया : बरं ! तू निघ आता .. .

प्रतिभा : संध्याकाळी मी परत येणार आहे ...

विजया : मग ! येताना बाजारातून मासे घेऊन ये ! आपण मस्त फ्राय करू..

प्रतिभा : चालेल ! मी निघते आता..

प्रतिभा निघून गेल्यावर विजया बाहेर विजयच्या बाजूला सोफ्यावर बसते आणि

विजया : हे ! बाकी उत्तम झाले हा ! प्रतिभाच या घरात कामाला यायला तयार झाली... त्यामुळे तिला आर्थिक मदतही होईल आणि आपण कोणा परक्याच्या घरी काम करतोय असे तिला वाटणारही नाही ! वाहिनीही तिला बहिणीसारखी वागवते... मी उद्या तिच्या घरी जाणारा आहे ! तिच्या मुलांना पाहून येईन म्हणते..

विजय : हो ! हो ! नक्की जाऊन ये म्हणजे तुला तिच्या घरच्या एकूण परिस्थितीचा अंदाज येईल .. मग तू मला सांग ! आपल्या काही विशेष मदतीची तिला गरज आहे का ?

विजया : हो ! बरं आता आपण जेऊन घेऊया का ?

विजय : इतक्या लवकर !

विजया : लवकर काय ? जेवून घेऊया ! म्हणजे मी झोपायला मोकळी ! चार दिवस इकडे आले आहे तर थोडा आराम नको का करायला ?

विजय : करायला हवा तर..

विजया : मी जेवण वाढते तोपर्यत तू हात धुवून घे !

दोघेही डायनिंग टेबलवर जेवायला बसले... जेवण झाल्यावर

विजय : विजया तू झोप आता... मी जरा बाहेर जाऊन येतो... बाहेर मला एक दोन कामे आहेत.. येताना तुझ्यासाठी काही घेऊन येऊ का ?

विजया : काही नको ! ... तू जा !

विजय : बरं ! मी निघतो

विजय निघून गेल्यावर विजया तेथेच सोफ्यावर आडवी पडते आणि टी. व्ही. वर चित्रपट पाहत बसते... नंतर उशिरा झोपी जाते...

संध्याकाळी दारावरची बेल वाजते तेव्हा तिला जाग येते ! तिला वाटते प्रतिभा किंव्हा विजय आला असेल म्हणून ती दार उघडते तर दारात यामिनी असते तिला आत घेत ... 

विजया : वहिनी तू आज लवकर घरी आलीस ?

यामिनी : हो ! तू आली आहेस ना ! म्हणून माझी कामे आटपल्यावर मी लगेच निघाले, झाली का प्रतिभा आणि तुझी भेट ?

विजया : हो ! झाली कि ! हे बाकी तू उत्तम केलेस ! प्रतिभाला तुझ्याकडे कामाला ठेऊन...

यामिनी : प्रतिभाला मी कामाला ठेवले आहे असे मी मानतच नाही माझी बहीण माझ्या घरातील कामे हक्काने करतेय असेच मी मानते..याबाबतीत वाहिनी मला तुझा अभिमान वाटतो.... तशीही तू आहेसच अभिमान वाटण्यासारखी

यामिनी : बर... अजून आली नाही ती आज ...

विजया : मी तिला येताना बाजारातून आपल्यासाठी मासे आणायला सांगितले आहेत ...

यामिनी : अगं ! आज सोमवार आहे ना ?

विजया : मी ! नाही पाळत, हे वार वगैरे ! विजयचा पूर्वीपासूनच हे उपवास वगैरे करायला विरोध होता, आपल्या देशातील अशिक्षित बायका देवाधर्माच्या नावाखाली जी आपलया तब्बेतीची वाट लावून घेतात ते त्याला अजिबात मान्य नाही ! महेरी असताना मी कधीच कोणताच उपास केला नाही ! सासरी वर्षातून दोन तीन उपवास करते नाईलाज म्हणून पण तेही भरपेट फराळ खाऊन... विजयने त्याच्या आयुष्यात उपवास म्हणून कधी उपवास केला नाही... तो स्पष्ट म्हणतो ,'' ज्यादिवशी मी उपाशी राहवं अशी देवाची इच्छा असेल तो माझा उपवासाचा दिवस... विजयला अन्न वाया गेलेले अजिबात आवडायचे नाही ! आमची आई कधी- कधी दुसऱ्या दिवशी रात्रीचे उरलेले खायची ते पाहिल्यावर तिने एकटीने ते खाण्याला त्याचा विरोध असायचा ! त्याला रात्रीच्या उरलेल्या भाताचा फोडणीचा भात प्रचंड आवडतो.

यामिनी : हो ! अजूनही रात्रीचा भात उरला तर तो सकाळी फोडणीचा भात करून खातो... मी ही बऱ्याचदा खाल्ला आहे तो फोडणीचा भात उत्तम करतो.

विजया : आम्ही लहान असताना तर आम्ही तो नेहमीच खायचो... पण नंतर नंतर ते कमी झाले.. .

यामिनी : मी फ्रेश होते आणि आपल्यासाठी चहा करते ...

विजया : त्याची काहीही गरज नाही तू फ्रेश हो ! मी अगोदरच चचा तयार केला आहे तो आपल्या दोघींसाठी गरम करते तोपर्यत प्रतिभाही येईलच !

इतकयात दारावरची बेल वाजली विजयाने पुढे होत दार उघडले आणि प्रतिभाला आत घेतले... नंतर तिघीही चहा प्यायला बसल्या... चहा - पिता - पिता...

विजया : प्रतिभा ! बाजारात गर्दी होती का ?

प्रतिभा : हो ! मरणाची ! पण मासे छान ताजे मिळाले

विजया : सोमवारी पण गर्दी होती..

प्रतिभा : मुंबई कोण वार पळतोय !

विजया : ते बाकी बरोबर आहे... संडे हो या मंडे ... रोज खाये अंडे... अंड्यांवरून आठवलं पूर्वी विजय जेव्हा एका कारखान्यात कामाला होता तेव्हा रोज डब्यात अंड्याचा हाफ फ्राय घेऊन जायचा...

यामिनी : काय बोलतेयस ? विजय आणि कारखान्यात कामाला होता..

विजया : हो ! तुला माहीत नाही ... आश्चर्य आहे...

यामिनी : आमच्यात तसा कधी विषयच निघाला नाही...

विजया : असं ! कोणतं काम नाही जे त्याला येत नाही ! पण लेखक झाला आणि तो थंड पडला...

यामिनी : कोणती कामे ?

विजया : त्याला घरातली सगळी म्हणजे सगळी कामे करता येतात घरातील कोणतेही काम करायला त्याला बाहेरून माणूस आणायची गरज नाही ! फक्त आत एकच ते काम करण्यासाठी लागणारी औजारे तेवढी हवीत... त्यामुळेच तो त्या कारखान्यात हेल्पर म्हणून कामाला राहून एक दिवस त्या कारखान्याचा सर्वेसर्वा झाला होता...

यामिनी : मग ! तो लेखक का झाला ?

विजया : स्वप्न ! दुसरं काय ? हेच बाबांना आवडत नव्हतं ! बाजार त्याच्यातील या गुणांना प्रचंड मागणी होती.. त्यातून तो बऱ्यापैकी पैसेही कमावू शकला असता. पण लेखक होण्याच्या नादात... त्याने आपल्यातील हे कला- गुण दाबून टाकले..

यामिनी : पण आता तो लेखक म्हणून प्रचंड यशस्वी झाला आहे ना ?

विजया : आज ना ! पण इथपर्यत पोहचण्यासाठी त्याला किती खडतर प्रवास करावा लागला आहे... किती संकटांचा सामना करावा लागला आहे, कित्येकांची बोलणी खावी लागली आहेत, कित्येक नात्यांचा त्याग करावा लागलेला आहे. त्याला चार- चौघांसारखं सामान्य - सुखी आयुष्य जगता येणं सहज शक्य होतं पण त्याने काट्या - कुट्याचा मार्ग स्वीकारला...

यामिनी : शाळा सोडल्यानंतर आमची भेट झाली ती सरळ पाच -सहा वर्षांपूर्वी ! त्यामुळे मधल्या काळात त्याच्या आयुष्यात काय - काय घडले याबद्दल मला अजिबातच कल्पना नाही...

प्रतिभा : साहेब ! आता आहेत तितके शांत - सरळ तेंव्हा नव्हते हे नक्की !

यामिनी : पण विजय ! शाळेत असतानाही शांत - सरळ होता..

विजया : वाहिनी ते तसे नाही ! त्याचे शाळेतील वागणे आणि शाळेबाहेरचे वागणे यात प्रचंड अंतर होत... शाळेत तो सर्वाना खूपच शांत, साधा - भोळा, अभ्यासू , निरुपद्रवी वाटायचं पण तसा तो अजिबात नव्हता... घरात आमच्यासाठी तो जमदग्नी होता... घरात त्याच्यासंमोर काही बोलायचे म्हणजे आजही कित्येकांना कापरं भरत..

प्रतिभा : विजयच हे रूप तर मलाच काय अजयलाही ! माहीत नाही...

विजया : त्याच्या मनात कधी काय चालले आहे कधीच कोणाला ओळखता येत नाही... तुला सांगते एकदा रमेशने नवीन महागातलं घेतलेले घड्याळ प्रवासात मारले त्यामुळे ते सांगायलाही तो विजयला घाबरत होता.. मग ! विजयनेच विचारले काय झाले ? आम्हा सर्वाना अपेक्षित होते विजय चिडेल ! पण तसे काहीच झाले नाही उलट तो बोलला ! हरवले ! तर हरवले त्याचे काय इतके ! आता रडून काय ते परत येणार आहे... म्हणजे तो कोणत्या गोष्टीवर कसा व्यक्त होईल हे कोणीही सांगू शकत नाही... माझ्या प्रेमाबद्दल त्याला कळल्यावर प्रचंड राडा होईल असा माझा समज होता... म्हणजे आमच्या घरातील सर्वांचाच समज होता पण तसे काहीच झाले नाही त्याने ते शांतपणे स्वीकारले... त्याने दुसऱ्यांच्या म्हणजे अगदी घरातल्यांच्या आयुष्यातही कधी ढवळाढवळ केली नाही...

यामिनी : याबतीत.. तो नेहमी म्हणतो ! मी कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही ! माझ्या आयुष्यात कोणी ढवळाढवळ केलेली मला सहन होत नाही...

विजया : त्यामुळेच आम्ही कोणीही त्याच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करू शकलो नाही...

प्रतिभा : तुम्ही ! बसा गप्पा मारत मी स्वयंपाकाचे बघते...

विजया : गप्पा काय होत राहतील ! चल ! मी येते तुझ्या मदतीला ...

यामिनी : मी ही ! येते...

तिघी स्वयंपाक करायला किचन मध्ये जातात... स्वयंपाक करता करता...

प्रतिभा : अर्धे मासे फ्राय करूया आणि अर्ध्याचा रस्सा करूया !

विजया : मस्तच ... तसेच करूया ! पण विजयचे काय ?

यामिनी : ते ! मी सांगायलाच विसरले ! विजय आज कोणत्यातरी कार्यक्रमाला गेला आहे तो तेथेच जेवून येणार आहे .. तसा फोन केला होता त्याने मला .. .

विजया : प्रतिभा ! तू आज येथे जेऊनच जा ...

प्रतिभा : नको ! मला घरी जाऊन जेवण करायचेच आहे !

यामिनी : कशाला ? तू घरीही येथूनच जेवणाचा डबा घेऊन जा...

प्रतिभा : ते बघू नंतर ...

विजया : बघू नंतर नाही ! तुझ्या नवऱ्याला आत्ताच फोन करून सांग !

प्रतिभा : बरं ! सांगते...

तिघीही मस्त जेवण करून जेवायला बसतात...

यामिनी : वा ! काय मस्त जेवण झाले आहे ...

विजया : खरंच ! खूपच मस्त...

प्रतिभा : हो ! ना ! तिघींच्याही हाताचा गोडवा त्यात एकत्र उतरला आहे...

गप्प्पा मारता मारता जेवण आटपल्यावर प्रतिभा तिच्या घरच्यांसाठी डबा घेऊन त्या दोघींचा निरोप घेऊन निघते... विजया आणि यामिनी तेथे सोफ्यावर बसून एकत्र सास - बहुच्या मालिका पाहत असतात ... इतकयात दारावरची बेल वाजते ... यामिनी पुढे होत दरवाजा उघडून विजयला आत घेते त्याच्या हातात .. एक बुके, एक ट्रॉफी आणि एक प्रमाणपत्र असते... आत आल्यावर ....

यामिनी : अभिनंदन विजय !

विजया : अभिनंदन विजय...

विजय : धन्यवाद ! यामिनी , धन्यवाद ! विजया... तुम्ही जेवलात का ?

यामिनी : हो ! आम्ही जेवलो ! तू जेऊन येणार होतास ना ? जेवलास ना ??

विजय : हो ! हो ! मी जेऊन आलो आहे... मी जरा फ्रेश होऊन येतो...

विजय फ्रेश होऊन आल्यावर त्यांच्यातील चर्चा पुन्हा रंगतात...

यामिनी : विजय आपण शाळेत असताना तुला एकही बक्षीस अथवा प्रमाणपत्र मिळाल्याचे मला आठवत नाही.. .

विजय : शाळेत असताना मी कधी कविता लिहिल्याचे तरी तुला आठवते का ?

यामिनी : नाही !

विजया : यामिनी विजय शाळा सोडल्यानंतर चार पाच वर्षांनी कविता लिहायला लागला असेल.. पण शाळेत असताना तो निबंध मात्र छान लिहायचा ...

यामिनी : मग ! शाळेत होणाऱ्या निबंध स्पर्धेत तू भाग का घ्यायचास नाही ?

विजय : आपण शाळेत असताना निबंध लेखन स्पर्धेसाठी पहिली अट काय असायची ? अक्षर सुंदर हवे ! म्हणजे विचारापेक्षा अक्षराच्या सुंदर असण्याला अधिक महत्व होते. पुढे मी लिहायला लागल्यावरही कित्येकांची पाठवलेले लेख सुवाच्छ अक्षरात हवे ! अशी अट असायची ! मी त्याना साहित्य कधीच पाठवायचो नाही... त्यामुळेच मी अगदी सुरुवातीच्या काळातच कॉम्पुटरवर मराठी टायपिंग करायला शिकलो.. पुढे जस जशी कॉम्पुटरवरील मराठी भाषा बदलत गेली तससा मी ही बदलत गेलो... आता कॉम्पुटरवर मराठी टायपिंग करणे खूपच सोप्पे झाले आहे. आपण शिकत असताना आपल्याला कविता शिकविणारे शिक्षक खूप भेटले पण कविता कशी लिहावी हे शिकविणारा एकही शिक्षक भेटला नाही... कल्पनाशक्ती तर माझ्यात उपजतच होती त्यामुळेच मी लेखक होऊ शकलो.

यामिनी : शाळेत असताना तू कवी - लेखक होशील असे कोणालाच वाटले नव्हते ...

विजय : ते मला व्ह्यायचेही नव्हते ! मी लेखक अपघाताने झालो, कवी... ते जाऊदे ! चला ! बाहेर फरफटका मारून येऊ या ! तुम्हाला पाणी - पुरी खायला देतो..

विजया : मस्तच ! चल वहिनी निघ !

यामिनी : निघायचं काय ? असेच जाऊया .. .

तिघेही पाणी- पुरी खाण्यासाठी घराबाहेर पडतात... पाणी - पुरी खाऊन झाल्यावर माघारी येतात तेव्हा ...

विजय : प्रतिभाने आज जेवणात काय केले होते ?

विजया : आज आपल्याकडे मेजवानी होती... छान मासे फ्राय केले होते आणि त्याचा छान सांभार केला होता. प्रतिभालाही आम्ही जेवायला थाम्बवले होते

विजय : प्रतिभाला ! तिला घरी जायला उशीर झाला असेल

यामिनी : आम्ही तिच्या घरच्यांचाही डबा पाठवून दिला..

विजय : हे उत्तम केलेत ... बरं ! झालं मी बाहेरून जेऊन आलो नाहीतर मला तुमच्या तोंडाकडे पाहत घासफूस खावे लागले असते...

विजया : चला ! आता झोपूया !

यामिनी : हो ! हो ! उद्या मला लवकर जायचे आहे म्हणजे संध्याकाळी लवकर घरी येत येईल.. .

विजया: वाहिनी तुला माझ्यासाठी घरी लवकर येण्याची , घाई करण्याची काही गरज नाही तू तुझी आरामात येत जा...

यामिनी : बरं ... शुभ रात्री ..

विजय : शुभ रात्री

विजया .. शुभ रात्री ..

तिघेही आप आपल्या जागेवर जाऊन झोपतात.....

दुसऱ्या दिवशी... प्रतिभा सकाळी लवकरच कामाला येते येताना तिच्या हातात कालचा रिकामा डबा असतो... प्रतिभा आल्या आल्या स्वयंपाक घरात जाते तर तेथे विजया चहा करत असते .. विजय अंघोळीला गेलेला असतो.. . यामिनी आपल्या खोलीत ऑफिसला जायची तयारी करत असते... यामिनी तयार होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसते इतकयात विजयही तयार होऊन बाहेर येतो...प्रतिभा त्या दोघानसाठी चहा घेऊन येते... 

यामिनी : विजया काय करतेय !

प्रतिभा : ती शिरा करते आहे

इतकयात विजया सर्वांसाठी शिरा घेऊन येते तो खाल्ल्यावर यामिनी जायला निघते तर

विजय : यामिनी ! मी ही बाहेर चाललोय ! तू मला तुझ्या स्कुटीवरून मला मध्ये रस्त्यात सोड..

यामिनी : चल ! तुला लाज नाही वाटत ! बायकोच्या मागे स्कुटीवर बसायला !

विजय : त्यात काय लाजायचं ? तुझ्याकडे वाहन आहे ते तुला उत्तम चालवता येत.. माझ्याकडे वाहन घेण्याची ऐपत आहे पण ते चालविण्याची हिंमत नाही ! महत्वाचे ! म्हणजे ... मी स्त्री - पुरुष असा भेदभाव मानत नाही...

यामिनी : हो ! त्याबाबतीत मी लकी आहे मला नवऱ्याला फिरवता येते ... नाहीतर इतर बायकांना नवराच फिरवतो .. .

त्यावर सर्वजण मनमुराद हसले ..

विजया : मी आज दुपारी जेवायला प्रतिभाकडे जाणार आहे...

विजय : मग ! तुम्ही माझ्यासाठी काही जेवण वगैरे करू नका ! मी माघारी रात्रीच येणार आहे .. बरं ! आम्ही निघतो आता ... तुमचं चालुद्या ...

विजय : चल यामिनी ... आपण तुझ्या रथावर बसून जाऊया ... आज तू माझी सारथी ... तशीही प्रत्येक स्त्री हि संसार रथाची सारथीच असते पण हे सर्वच पुरुषांना पचवता येत नाही... हे दुर्दैव आहे ..

यामिनी : काही म्हणालास ?

विजय : काही नाही !

दोघेही घरातून निघून जाताच ..

विजया : आमच्या घरात कोणीच गाडी चालवत नाही ! वाहिनी सोडून ... पण माझ्या सासरी सर्व गाडी चालवतात मी सोडून... प्रतिभा ! तुझा नवरा बाईक चालवतो की नाही ? हो ! चालवतो ... नेतो की नाही तुला फिरायला ?

प्रतिभा : फिरायला असे नाही ! पण कोणा नातेवाईकाकडे वगैरे जायचे असेल तर जातो आम्ही ...

विजया : चल ! परत चहाचा एक एक घोट मारू ...

प्रतिभा : चालेल...

प्रतिभा आणि विजयाची सर्व कामे आटपल्यावर त्या दोघी प्रतिभाच्या घरी जाण्यासाठी घराबाहेर पडतात... संध्याकाळी दोघी एकत्र पुन्हा घरी येतात..

विजया : तुझी दोन्ही मुले खूपच गोड आणि हुशार आहेत..

प्रतिभा : हो !

विजया : त्यांची विशेष काळजी घे ! त्यांच्या खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करू नकोस ! तुझा नवराही छान आहे वागायला बोलायलाही उत्तम आहे ! थोडे दुर्गुण प्रत्येक माणसात असतात .. त्याला काही अंशी सभोवतालची परिस्थितीही कारणीभूत असते.. तुझे घर लहान असले तरी छान - सुंदर आहे.. तुझी मुलं मला प्रचंड आवडली .. तुझी मुलगी तर एखाद्या बाहुलीसारखी आहे.

प्रतिभा : लहान असताना सर्वच मुलं सुंदर असतात..

विजया : हे बाकी तू खरं बोललीस...

प्रतिभा : आज जेवायला काय करूया ?

विजया : पनीरची भाजी करूया ... आणि गोड खीरही करूया ..

प्रतिभा : मी तयारीला लागते ..

विजया : तोपर्यत मी फ्रेश होऊन येते तुझ्या मदतीला, तोपर्यत तू चहा नको ! छान कॉफी कर ..

प्रतिभा : बरं !

थोड्यावेळाने प्रतिभा आणि यामिनी कॉफी पित असतात इतक्यात दारावरची बेल वाजते विजया ! बाहेर जाऊन दरवाजा उघडते तर दरवाजात यामिनी असते !

तिच्या हातात एक बॉक्स असतो... ती आत येताच..

यामिनी : प्रतिभा जरा बाहेर ये ! हा बॉक्स जरा फ्रिजमध्ये ठेव ! यामध्ये आईस्क्रीमचे डबे आहेत

प्रतिभा बाहेर येते आणि यामिनीच्या हातातील बॉक्स घेऊन किचनमध्ये जाते.. परत येताना यामिनीसाठी कॉफी घेऊन येते .. कॉफी घेता घेता ..

यामिनी : विजया ! जाऊन आलीस का प्रतिभाच्या घरी ...

विजया : हो ! जाऊन आले, तेथे आजू बाजूला माझ्या दोन - चार जुन्या मैत्रिणी राहतात त्यांनाही भेटून आले ... आज अचानक आईस्क्रीम वगैरे !

यामिनी : तुम्हाला आवडते म्हणून आणले आणि प्रतिभाच्या मुलांनाही देता येतील...

विजया : वाहिनी ! तू पहिले आहेस का ? यामिनीच्या मुलांना ?

यामिनी : नाही ! अजून आमच्या भेटण्याचा योग नाही आला , पण त्यांचे फोटो पहिले आहेत मी प्रतिभाच्या मोबाईलवर .. खूप गोड आहेत

विजया : तू त्यांच्यासाठी घेतलेले कपडे मला त्यांनी दाखविले , त्यांना ते खूपच आवडले.. ते तुला मावशीच म्हणतात ...

यामिनी : प्रतिभा ! आमच्या घरात यायला लागल्यापासून आमच्या घराला जरा घरपण आले आहे.. नाहीतर सारेच शांत शांत निरर्थक चालले आहे असेच वाटत होते..

विजया : प्रतिभाही ! तुला सख्या बहिणीपेक्षा कमी मानत नाही...

यामिनी : हो !

विजया : देव पण असा आहे ना ! ज्याला जी गोष्ट हवी ती देतोच असे नाही... प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कमतरता ठेवतोच ! जेणे करून त्याला त्यामुळे का होईना देवाची आठवण यावी...

यामिनी : हे बाकी सत्य बोललीस .. पूर्वी मला वाटायचे खूप शिकलो ... चांगली नोकरी मिळाली की आयुष्य सुखी होईल ... पण परिस्थितीप्रमाणे माणसाच्या सुखाची व्याख्या बदलत जाते आणि माणूस कधीच सुखी होत नाही ...

विजया : वहिनी ! तुला काही दुःख आहे का ?

यामिनी : दुःख असं नाही ! पण आयुष्यात कोणतीतरी अनामिक पोकळी निर्माण झालेली आहे असे सतत वाटत राहते .. एकाकीपणा खायला उठतो .. विजयला एकाकीपणाची सवय आहे पण तो घरी नसताना मात्र जर मी एकटी घरी असले तर घर मला खायला उठते.. .

विजया : म्हणून मी म्हणते ! चार दिवस सणावाराला गावी येत जा ! म्हणजे तुला उत्साह वाटेल ... तिकडे आता आपल्याकडे शहरातील सर्व सुखसोयी आहेत , गाडी - घोडे आहेत ...

यामिनी : मी विजयला तेच सांगत असते पण त्याच्या कानावरील माशी हलत नाही !

विजया : त्याला नसेल यायचे तर नको येउदे ! तू तरी येत जा .....

यामिनी : यावर मी नक्की विचार करते ..

विजया : प्रतिभाला आणि तिच्या मुलांनाही घेऊन ये ! आपण मज्जा करूया ! ..बरं ! तू आता आराम कर मी प्रतिभाला काही मदत हवी का ते पाहते ...

विजया प्रतिभाच्या मदतीला स्वयंपाकघरात जाते थोड्यावेळाने काम आटपल्यावर प्रतिभा घरी जायला निघते...तर..

यामिनी : प्रतिभा फ्रिज मध्ये जो आईस्क्रीमचा बॉक्स ठेवला आहे त्यातील चार- पाच आईस्क्रीमचे डबे तू घेऊन जा..

प्रतिभा : कशाला ?

विजया : कशाला काय ? वहिनी म्हणतेय ! तर घेऊन जा..

प्रतिभा स्वयंपाकघरात जाऊन आईस्क्रीमचे डबे घेऊन येते आणि

प्रतिभा : बरं... मी निघते..

यामिनी : तू निघ आता...

प्रतिभा : विजया ! निघते ग !

विजया : निघ बाई आता.. उद्या भेटूच...

प्रतिभा निघून गेल्यावर

विजया : वहिनी मी परवा निघेन म्हणते ... ह्यांचा फोन आला होता ...

यामिनी : टिक आहे मग मी पर्वा सुट्टी करते तुम्ही रात्रीच्या गाडीने जाणार असाल ना ?

विजया : मी ह्यांना बोलावणार होते गाडी घेऊन ... पण कशाला त्यांना उगाच दगदग त्यापेक्षा मी जाईन माझी मी रात्रीच्या गाडीने ! तू कशाला सुट्टी करतेस ?

यामिनी : अहो ! मला तुमच्यासाठी आणि मुलांसाठी खरेदी करायची आहे आणि खाऊही घ्यायचा आहे..

विजया : त्याची काय गरज ?

यामिनी : गरज काय म्हणजे ? माझ्या भाच्यांनी विचारले मामीने काय दिले तर तुम्ही काय सांगाल ?

विजया : बरं ... बाई

इतक्यात दारावरची बेल वाजते, विजया पुढे होऊन दरवाजा उघडते, दारात विजय उभा असतो त्याला आत घेते.

विजय: आज काय मजा केलीत ?

विजया : रोज कसली मजा ?

यामिनी : विजय .. विजया परवा परत गावी जायचे म्हणतेय !

विजय : इतक्या लगेच ? दोन वर्षांनी आळस तर राहा की दहा पंदरा दिवस !

विजया : मी दोन वर्षांनी चार दिवस तरी राहायला आले तुझ्याकडे पण तू पाच वर्षे झाली माझ्या घरी आला नाहीस ! माझ्या मुलांनी तर मामीच अजून प्रत्यक्ष तोंडही पहिले नाही... पाहिले ते फक्त फोनवर... तुझीही त्यांना खूप आठवण येते...

विजय : ह्या वर्षी आम्ही नक्की म्हणजे नक्की येऊ ! कशाला मी तुला सोडायला गावीच येतो ना ! माझा एक मित्र आहे त्याला कोकण पाहायचा आहे त्याच्याकडे गाडीही आहे आपण जाऊया !

विजया : खरंच ! मस्तच मग वहिनीलाही घेऊ या !

यामिनी : विजया ! मला खरंच आवडलं असतं यायला पण असं अचानक मला नाही येत येणार सॉरी... मी रीतसर दहा- पंदरा दिवसाची सुट्टी काढून येईन.. नक्की !

विजया : नक्की ना ?

यामिनी : हो ! प्रॉमिस ...

विजया : तुला अचानक आलेले पाहून सर्वानाच खूप आनंद होईल ...

विजय : बरं ! मी फ्रेश होऊन येतो...

तो फ्रेश होऊन आल्यावर

यामिनी : विजय ! हल्ली तू घराबाहेर जास्त राहायला लागला आहेस ? काय भानगड काय आहे ?

विजय : मी आणि माझा मित्र एक नवीन उद्योग सुरु करायचा विचार करतोय , त्याचीच पूर्वतयारी सुरु आहे ..

यामिनी : पण हे सगळं करायची गरज काय ? तुझं लिखाणाचं उत्तम चाललं आहे ना ? माझ्या पगारात आपलं सगळं तर भगतय.. आपल्याकडे बचतही बऱ्यापैकी आहे असे असताना तुला हे उद्योग करायची गरज काय ?

विजया : वाहिनी ! तू कशाला काळजी करतेस ! तो लेखक असला तरी हाडाचा उद्योजक आहे ... लहानपणापासून त्याने अनेक उद्योग केलेत.. त्याने उद्योग करण्याचा निर्णय घेतला म्हणजे काहीतरी विचार करूनच घेतला असेल... त्याने तोट्यातील उद्योग एकही केला नाही फक्त हा लिखाणाचा उद्योग सोडून... पण त्यातही आता तो नफ्यातच आहे...

यामिनी : बरं .. घाला काय गोंधळ घालायचा तो !

विजय : तू माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान केलेस मग मला तुझी स्वप्ने पूर्ण करायला नकोत का ?

यामिनी : माझी कसली स्वप्ने ? माझी आता कोणतीच स्वप्ने पूर्ण वह्यांची बाकी नाहीत !

विजय : काही स्वप्ने आहेत जी तू तुझ्या मनात खोलवर कोठेतरी दाबून ठेवली आहेस ती मला बाहेर काढून पूर्ण करायची आहेत ...

यामिनी : तू कधी काय विचार करशील काहीही सांगता येत नाही..

विजया : चला मग आता .. गप्पा मारून पोट भरले असेल तर जेऊन घेऊया !

यामिनी : मी वाढायला घेते...

ते तिघे डायनिंग टेबलवर जेवायला बसतात ... जेऊन झाल्यावर यामिनी फ्रिज मध्ये ठेवलेले आईस्क्रीमचे डबे बाहेर घेऊन येते तिघे मनसोक्त आईस्क्रीम खातात आणि कोणता तरी नवीन मराठी चित्रपट पाहत बसतात तो संपल्यावर आप आपल्या जागी जाऊन झोपतात... झोपताना विजय ! थोडावेळ उठून बसतो आणि मनात विचार करत असतो ...

विजय : विजया चार दिवस घरात राहायला आली तर घर कसं भरलेल होत ... आता ती पर्वा गावी जाणार ..कित्येक वर्षांनी मी ही तिच्यासोबत गावी जाणार.. सर्वाना भेटणार... त्यांच्या डोळ्यात मला माझ्याबद्दलच्या भावना दिसणार... प्रेम दिसणार ... आदर दिसणार... आणि प्रश्नही दिसणार ... यामिनी बद्दलच एक सत्य मी माझ्या जवळच्या सर्व माणसांपासून लपविले आहे आणि ते सत्य यामिनीलाही सर्वांपासून लपवायला सांगितले आहे... त्यामुळे यामिनीची होणारी घुसमट मला कळतेय ! पण मी तरी काय करू... तिच्याबद्दलचे सत्य घरातल्याना कळल्यावर त्यांना वाईट वाटेल.. . कदाचित वाटणारही नाही... त्यांना माझा अभिमानही वाटू शकतो... पण यामुळे यामिनीकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कदाचित बदलू शकतो... मला यामिनीच्या मानाला धक्का पोहचलेला अजिबात सहन होणार नाही... यामिनीने मला अशा वेळी आधार दिला आहे ज्यावेळी मी कोसळलो होतो, माझा आत्मविश्वास गमावून बसलो होतो, प्रेमभंगाच नाही म्हणता येणार पण प्रेमात आपण अपयशी ठरलो याची वेदना मनात होती. यामिनी माझ्या आयुष्यात आली आणि माझे आयुष्यच बदलले, माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली... मी यशाच्या पायऱ्या भराभरा चढू लागलो... यामिनी माझ्या आयुष्यात एखाद्या स्वप्नातील परीसारखी आली होती जिने माझी सर्व स्वप्ने पूर्ण करायला मला मदत केली होती. तिने माझी स्वप्ने पूर्ण केली पण मी तिची स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही ... मला आता तिची स्वप्ने पूर्ण करायची आहेत... तिच्या बद्दलचे सत्य मी जोपर्यत सर्वाना सांगत नाही तो पर्यत आपण नवरा बायको म्हणून तसे एकत्र यायचे नाही असे आमच्यात ठरले आहे म्हणून तर आम्ही नवरा बायको असतानाही वेगवेगळे झोपतो... त्यामुळे प्रतिभा आणि विजयाच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेले आहेत पण त्या प्रश्नांची उत्तरे देण्याची वेळ आता जवळ आलेली आहे असे वाटते... ते नंतरच नंतर बघतो...पण आता अगोदर गावाला जाऊन येतो.. तेथे सर्वांचे काय चालले आहे याचा अंदाज घेतो... मी सर्वांपासून शरीराने दूर असलो तरी मानाने मात्र सदैव जवळ असतो... आई - बाबांना वाटत असेल कि माळ त्यांची काळजी नाही पण तसे नाही ... आज मी आयुष्यात यशस्वी झालो आहे पण मी त्यांची स्वप्ने पूर्ण करू शकलो नाही आता मला ती पूर्ण करायची आहेत म्हणूनच मी पुन्हा उद्योगात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. यामिनी बद्दलचे सत्य त्यांना कळल्यानंतरही त्यांनी तिला प्रेमाने आणि आदराने स्वीकारावे ही माझी अपेक्षा आहे म्हणून मी प्रयत्त्न करावे लागतील... लग्न करूनही असं एकाच घरात वेगळं राहताना मला काही आनंद होत नाही ! प्रतिभाला मी जे सांगितले कि यामिनी आईच होऊ शकत नाही ! ते तिला पटले असेल पण ते सत्य नाही ... मुलांसाठी यामिनीचा मिती जीव तुटतो ते मला माहीत आहे पण.... तरीही ती तिच्या मनाला आवर घालते... तिच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेमुळे... हा विचार करता करता विजयला झोप अनावर होते आणि तो झोपी जातो...

त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी यामिनी तिच्या कामावर लवकर निघून जाते कारण तिला उद्या सुट्टी घ्याची असते विजय सोफ्यावर बसून चहा पित असतो इतक्यात दारावरची बेल वाजते विजय पुढे होत दरवाजा उघडतो आणि प्रतिभाला आत घेतो ती आत येताच ...

प्रतिभा : ताई गेल्या का ऑफिसला ..

विजय : हो ! काही वेळापूर्वीच गेली ..

प्रतिभा : विजया कोठे आहे ?

विजय : असेल तिच्या खोलीत नाहीतर स्वयंपाक घरात

प्रतिभा : बरं मी बघते

विजया स्वयंपाक घरात नसते म्हणून प्रतिभा तिच्या खोलीत जाते तर ती कपड्यांची आवराआवर करत बसलेली असते

विजया : प्रतिभा ! तू आलीस ये ना ! बस मला कपडे आवरायला मदत कर मी उद्या गावी जाणार आहे.

प्रतिभा : राहायचं ना अजून चार-पाच दिवस

विजया : राहिले असते पण आता माझी मुले त्याच्या आत्याकडून आले कि त्याचे शाळेचे वगैरे आवरायला लागते

प्रतिभा : कशी जाणार आहेस ?

विजया : मी बसनेच जाणार होते पण विजय म्हणाला ,' मी येतो ! तुला गावी सोडायला त्याच्या मित्राची गाडी आहे आणि त्याला कोकण पाहायचाही आहे

प्रतिभा : हे बाकी उत्तम झाले..

विजया : बरं ! उद्या मी आणि वाहिनी खरेदीला जाणार आहोत तर तुलाही यायचे आहे आमच्यासोबत !

प्रतिभा : मी कशाला ?

विजया : कशाला ते विचारू नकोस ! यायचं म्हणजे यायचं ! तू माझ्या घरी कधी येणार आहेस ते सांग !

प्रतिभा : मी रायगडला माझ्या गावी गेली की येईन कधीतरी...

विजया : मी माझ्या नवऱ्यासोबत गाडी घेऊन आले कधी इकडे तर तुला सोबतच घेऊन जाईन .. मग ! भरपूर मज्जा करू आपण ..

प्रतिभा : कपडे आवरून झालेत मी स्वयंपाक करायला घेऊ का ?

विजया : तू हो पुढे मी येतेच ! तुझ्या मदतीला

प्रतिभा : बरं !

विजय : प्रतिभा ! एकही खायला करणार आहेस का ? लगेच होणारे मला बाहेर जायचे आहे ..

प्रतिभा : आतूनच ... हो ! हो ! घावणे करतेय होतीलच लगेच

विजय : बरं कर लवकर .. .

काही मिनिटातच प्रतिभा विजयासाठी गरम गरम घावणे आणि हिरवी चटणी घेऊन येते त्यासोबत गरम गरम चहा हि आणते ते सर्व खाऊन पिऊन झल्यावर विजय घराबाहेर निघताना 

विजय : प्रतिभा मी काही आता दुपारी जेवायला येणार नाही.. . तू फक्त विजयाला काय हवं नको ते विचार

प्रतिभा : बरं .. म्हणून स्वयंपाक घरात जाते ..

विजय : विजया ! मी बाहेर जातोय रात्रीच परत येईन..

विजया : ठीक आहे ...

स्वयंपाक घरात विजया प्रतिभाच्या मदतीला येते

प्रतिभा : विजय ! बाहेर गेला आहे तो काही जेवायला येणार नाही मग तुझ्यासाठी काय करू ? हे घावणे केले आहेत

विजया : तू खाल्लेस का ?

प्रतिभा : नाही काम आटपल्यावर खाईन !

विजया : ते काही नाही आपण अगोदर दोन दोन घावणे खाऊन घेऊया ! मग बघू काय करायचे ते !

प्रतिभा : ठीक आहे ...

दोघी तेथेच स्वयंपाक घरात असणाऱ्या टेबलांवर बसून घावणे खात असतात

विजया : घावणे तर छान झालेच आहेत त्याहून चटणी अप्रतिम..

प्रतिभा : बरं ! आणखी एक घावना घे !

विजया : तू ही घे !

प्रतिभा : बरं आता दुपारच्या जेवणाला काय करू ?

विजया : काही करू नकोस ... नंतर आपण मॅगी करू

प्रतिभा : बरं !

विजया : बरं काय ? तुला घरी जायला अजून वेळ आहे ना .. तोपर्यत आपण टाईमपास म्हणून पत्ते खेळूया !

प्रतिभा : पत्तेच खेळूया !

विजया : पत्ते खेळायचे विसरली वगैरे नाही ना ?

प्रतिभा : नाही ! पण पत्ते कुठे आहेत ?

विजया : आहेत माझ्याकडे ! थांब मी घेऊन येते

प्रतिभा : आपण पूर्वी मी तुझ्याकडे यायचे तेव्हा आपण पत्ते खेळायचो !

विजया : विजयलाही पत्ते खेळायची खूप आवड होती हे कोणाला आता सांगूनही खरे वाटणार नाही वहिनीला तर माहीतच नसेल, विजय अगदी सहावी सातवीला असताना तीन पत्ती खेळायचा ! डावावर काय लावायचे तर गोट्या , बिल्ले आणि माचिसचे पत्ते.. आमच्या घरी त्यांनी जमवलेले पाच लिटरचा डबा भरून गोट्या होत्या, बॉक्स भरून माचिसचे पत्ते होते आणि पाच एक किलो एका पिशवीत सोडा बॉटलचे बिल्ले होते.

प्रतिभा : बापरे इतके !

विजया : शाळेतून आल्यावर त्यांना दुसरा उद्योगाचं काय होता ... टाईमपासला आम्ही मुलीही पत्ते खेळायचो !

प्रतिभा : मी ही आमच्या गावाला असताना खेळायचे !

विजया : आपणही बसलो होतो की कित्येकदा मेडिकोट खेळायला !

प्रतिभा : हो ! आठवते तेव्हा आपण डावावर पार्लेचे बिस्कीट पुडे लावलेले होते.... खेळून झाल्यावर आपली त्या बिस्किटासोबत चया पार्टी व्हायची !

विजया : ते दिवसच काही और होते.. आता कोणाकडे कोणासाठी वेळच नसतो , मला वाटलं होत विजय सोबत पत्त्याचा एक तरी डाव होईल म्हणून मी पत्ते घेऊन आले होते पण कसलं काय ?

प्रतिभा : बरं ! आपण खेळूया दोन चार डाव !

पत्त्यांचे चार पाच डाव खेळल्यावर प्रतिभा मस्त पैकी मॅगी तयार करते ती त्या दोघी खातात .. प्रतिभा तिच्या घरी निघून जाते.. विजया तिच्या खोलीत जाऊन आडवी पडते ते थेट पुन्हा प्रतिभा संध्याकाळी माघारी आल्यावरच उठते... प्रतिभा तिच्या कडच्या चावीने दरवाजा उघडते तर विजया तिच्या खोलीत शांत झोपलेली असते प्रतिभा तिला न उठवताच स्वयंपाक घरात कामाला सुरुवात करते ! भांड्यांचा आवाज ऐकून विजया उठते आणि स्वयंपाक घरात येते ...

विजया : हे काय ? तू कधी आलीस ?? मला उठवले का नाहीस ???

प्रतिभा : तू शांत झोपली होतीस म्हणून नाही उठवले

विजया : बरं आता आपल्यासाठी मस्त आळा घातलेला दुधाचा चहा कर .. .

प्रतिभा : बर ! तू बस बाहेर मी येते घेऊन ..

चहा झाल्यावर प्रतिभा कुकर लावते आणि दोघी बाहेर बसून चहा पित असतात...

विजया : आता मी गावी गेल्यावर मला तुझी खूप आठवण येईल पण आता पूर्वीसारखे राहिलेले नाही माणसे कितीही दूर असली तरी मोबाईलमुळे जवळ असतात मी एक दिवस आड करून तुला व्हॅट्सऍप कॉल करत जाईन मी विसरले तर तू करत जा ...

प्रतिभा : नक्कीच !

विजया : काहीही अडचण असेल तर मला फोन करत जा ... वाहिनी तुझी बहीण असली तरी मी तुझी मैत्रीण आहे...

प्रतिभा : आपले पाणावलेले डोळे पुसतच म्हणाली,'' पुन्हा कधी येशील...

विजया : वेडी आहेस का ? मी गावाला असले तरी जंगलात राहत नाही ! सगळ्या सुविधा आहेत आमच्या गावी... मी काय ? मुंबईला येत जात असते जेव्हा जेव्हा येईन तेव्हा भेटेनच कि तुला..

प्रतिभा : नक्की !

विजया : नक्की ...

इतकयात दारावरची बेल वाजते प्रतिभा दरवाजा उघडून प्रतिभाला आत घेते ती आत आल्यावर फ्रेश होते आणि बाहेर सोफ्यावर येऊन बसते.. प्रतिभा तिच्यासाठी गरम गरम चहा आणि घावणे घेऊन येते.. ते खाताना ..

यामिनी : विजया ! ही प्रतिभा आल्यापासून कामावरून लवकर घरी यावेसे वाटते कारण आल्या आल्या असा गरम चहा मिळतो नाहीतर पूर्वी आल्या आल्या विजयने केलेला थंड चहा ढोसावा लागायचा...

विजया : विजय ! चहा छान करतो !

यामिनी : तो चहा छानच करतो पण मी येईपर्यत तो दहा वेळा गरम करून झालेला असतो कारण तो सकाळीच हंडाभर करून ठेवायचा ..

त्यावर सर्वजणी अगदी मनमुराद हसतात ..

यामिनी : प्रतिभा ! तू उद्या तुझ्या घरातील कामेआटपून मुलांना शाळेतून घरी आणल्यावर इकडे ये ! उद्या मी घरीच आहे इकडचे काय ते आम्ही पाहू उद्या आपल्याला विजयासाठी खरेदीला जायचे आहे ! तू येणार आहेस आमच्या सोबत...

विजया : ते मी तिला अगोदरच सांगितले आहे..

प्रतिभा : बरं ! मी उद्या मुलांना शाळेतून घरी आणले की सरळ इकडेच येते... आता रात्रीच्या जेवणाची तयारी करू का ?

यामिनी : हो !

विजया : थांब मी पण येते !

यामिनी : मी येऊ का ?

विजया : नको ! तू आराम कर...

रात्रीचे जेवण झाल्यावर प्रतिभा तिच्या घरी निघून जाते.. . यामिनी आणि विजया सोफ्यावर बसून टी .व्ही . पाहत असतात इतक्यात दारावरची बेल वाजते

यामिनी दरवाजा उघडते विजयला आत घेते तर विजयच्या हातात बऱ्याच पिशव्या असतात..

यामिनी : हे काय ? यामिनी तू पण ना ! उद्या गावी जायचे आहे विसरलीस का ? मी नाही विसरले पण तू ही इतकी खरेदी कसली केलीस ?

विजय : किती वर्षांनी गावाला जातोय सर्वांसाठी केली आहे थोडी थोडी खरेदी आणि सोबत माझा मित्रही आहे ना ?

यामिनी : बरं ! तू काय ? महिनाभर गावाला राहणार आहेस कि काय ?

विजय : राहू का ?

यामिनी : काही नको ! जास्तीत जास्त एक आठवडा राहायचं !

विजय : बरं ! बाई ...

विजया : विजय ! तू कशाला इतकी खरेदी केलीस ? आम्ही जाणार आहोत खरेदीला ...

विजय : तू तुझी खरेदी कर मी बायकांच्या वस्तू खरेदी केलेल्या नाहीत.

यामिनी : ठीक आहे ! पण तुझ्या मित्राची कार आहे टेम्पो नाही हे विसरलास नाही ना ?

विजय : त्याची कार इतकीही छोटी नाही ! बरं ! यामिनी तू उद्या घरी आहेस ना ?

यामिनी : हो !

विजय : मी हि ! उद्या दिवसभर घरीच आहे ! आणखी काही आणायचे असेल तर सांग !

विजया : काही नको ! त्यापेक्षा तू उद्या आराम कर कारण तशीही तुला गाडीत झोप येत नाही आणि तुझा मित्र गाडी चालवणार असल्यामुळे तुला त्याच्या शेजारी बसून जागच राहावं लागणार आहे.

विजय : बरं ! आता जेऊन घेऊया... म्हणजे मला काही मेल वगैरे करायचे आहेत ते मी करून घेतो गावी गेल्यावर काही कामे कामे करायला वेळच मिळणार नाही ..

यामिनी : वेळ का मिळणार नाही ?

विजय : ते तुला आपल्या गावी गेल्यावरच कळेल ?

यामिनी : मग ! मी पण येऊ का ?

विजय : खरच ! येतेस ?

यामिनी : मी विनोद करत होते...

विजया : यामिनी तू राहशील ना घरी एकटी ?

यामिनी : मला त्याची सवय आहे.. .

विजया : चला मग ! जेऊन घेऊया ! विजय तू फ्रेश होऊन ये ! मी जेवण वाढायला घेते

ते सर्व जेवायला बसतात...

विजया : गावाला तुला पाहून सर्वाना खूप आनंद होईल ... खास करून आईला ... पाच वर्षे झाली तू गावाला आला नाहीस... यामिनीलाही कधी पाठवले नाहीस ? यामिनीला घेऊन ये एकदा म्हणजे तिचीही गावाशी ओळख होईल... आता आपल्या गावाला आणि आपल्या घरातही मुंबईसारख्याच सर्व सुख - सोयी आहेत

विजय : सुखसोयीच काय ? वेळ पडली तर मी जमिनीवरही झोपू शकतो !

यामिनी: हे बाकी शक्य आहे ...येथेही तो कधी - कधी फरशीवरच झोपतो .

विजया : माझा भाऊ आहेस तसा ! त्याचे पाय नेहमी जमिनीवरच असतात.. .

यामिनी : मी आणखी काही खास घेऊ का ? कोणासाठी ?

विजय : काही नको ! हल्ली गावी सर्वकाही विकत मिळते... काही घ्यावेसे वाटले तर घेईन मी तिकडे विकत..

यामिनी ! तुम्ही तुमची तुमची अशी खरेदी करा पण आईसाठी ! एक छानसाडी साडी मात्र आठवणीने घे !

यामिनी : बरं ! मी आईना फोन करून आणखी काही हवं का ते विचारून घेते...

विजय : बरं ! घे विचारून ...

विजया : यामिनी ! तू आईला रोज फोन करतेस ?

यामिनी : रोज नाही ! महिन्या - दोन महिन्यांनी करते अधून - मधून ... त्याही करतात मला फोन विजयची चौकशी करायला...मी त्यांना कित्येकदा म्हणाले ,'' इकडे या ! चार दिवस राहायला ! तर फक्त येऊ ! येऊ ! म्हणतात पण येत नाही... उलट त्याच मला सारखं गावी ये ! गावी ये ! म्हणत असतात.

विजय : मी जातोय ना आता गावाला बघतो ! आली तर मी घेऊनच येतो तिला मुंबईला... बाबा तर काही येणार नाही पण आई येईल आली तर ..

यामिनी : नक्की ! घेऊन ये !!

त्याचे जेवण आटपल्यावर ते सर्व घराच्या बाहेर पडतात आईस्क्रीम खायला आणि रात्री उशिरा घरी येऊन झोपी जातात.

दुसऱ्या दिवशी सकाळी ! विजय आणि विजया सामानाची आवरा आवर करत असतात... विजया विजयासाठी नाश्ता तयार करते, यामिनीही तिची तिची आवराआवर करून बसलेली असते इतकयात प्रतिभा येते.. प्रतिभा बाहेर जाण्याच्या तयारीतच आलेली असते , विजया तयार झाल्यावर त्या तिघी खरेदीला निघून जातात विजय मात्र तेथेच सोफ्यावर पडतो... संध्याकाळी त्या तिघी खरेदी करून माघारी येतात.. प्रतिभा त्याच्यासाठी स्वयंपाक करायला घेते.. रात्री सर्व सामानाची आवरा आवर करून झाल्यावर विजय त्याच्या मित्राला फोन करतो तो आल्यावर विजया आणि विजय यामिनी आणि प्रतिभाचा निरोप घेतो... याला विजयाला निरोप देताना प्रतिभा आणि यामिनीचे डोळे किंचित पाणावतात ...

विजय : प्रतिभा ! घरावर लक्ष ठेव !

विजया : यामिनी ! वरचे वर फोन करत रहा ! ... प्रतिभा ! मी तुझ्या मुलांसाठी घेतलेले कपडे त्यांनी घातले कि त्याचे फोटो काढून मला आठवणीने पाठव

प्रतिभा : विजया ! तू तुझी काळजी घे ! फोन करत रहा !

विजया आणि विजय गावी निघून गेल्यावर...

यामिनी : प्रतिभा ! उद्यापासून विजय माघारी येई पर्यत तू सकाळी नको येऊस फक्त संध्याकाळी येत जा... सकाळी तस ही काही काम नसणार आहे...

प्रतिभा : बरं ! तरीही ताई ! तुम्ही एकट्याच घरी आहात ! काहीही गरज लागली, रात्री - अपरात्री मला फोन करा मी येईन...

यामिनी : तू नको ! काळजी करू मला एकटं राहायची सवय आहे ...

प्रतिभा : मग ! काही हरकत नाही... मी निघू का आता ?

यामिनी : हो ! हो ! तू निघ आता पण जाताना जाताना विजयाने तुझ्या मुलांसाठी दिलेले कपडे तेवढे घेऊन जा..

प्रतिभा : हो ! मी निघते... शुभरात्री..

यामिनी : शुभ रात्री !

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रतिभा घरी येते , घराची आवरा - आवर , साफ सफाई करून झाल्यावर स्वयंपाक करायला घेते इतकयात दारावरची बेल वाजते .. प्रतिभा दार उघडून यामिनीला आत घेते... यामिनी सोफ्यावर बसताच प्रतिभा तिच्यासाठी पाणी घेऊन यते.. यामिनी फ्रेश होईपर्यत प्रतिभा तिच्यासाठी चहा टाकते... चहा ! पिता पिता ..

यामिनी : विजयाचा तुला फोन आला होता का ? मला आला होता...

प्रतिभा : हो ! मलाही आला होता

यामिनी : विजय ! तो काय ? आता मला फोन करणार नाही ! तो जिकडे जातो तिकडचाच होऊन जातो.

प्रतिभा : रात्रीच्या जेवणात काय करू ?

यामिनी : मस्त पैकी पाव भाजी बनव आपल्यासाठी ! मी येताना पाव आणलेत... जरा जास्तच बनव ! आपण दोघी एकत्रच खाऊ ! जाताना तू तुझ्या घरीही घेऊन जा ...

प्रतिभा : लगेच बनवते ...

पाव भाजी तयार झाल्यावर त्या दोघी डायनींग टेबलवर खायला बसतात...

यामिनी : वा ! प्रतिभा भाजी एकदम छानच जमली आहे.

प्रतिभा : खरंच !

यामिनी : खरंच ! तू सुगरण आहेस ! तू शेफ व्हायला हवं होत !

प्रतिभा : मी आहे तेथेच बरी आहे.. .

यामिनी : मुलांना विजयाने दिलेले कपडे आवडले का ? त्यांनी घालून पहिले का ?

प्रतिभा : हो ! घालून पहिले ... त्याचे मी फोटोही काढले.. हे पहा ( यामिनीला मोबाईलवर दाखवत )

यामिनी : काय गोड दिसता आहेत ? विजयाला पाठ्वलेस का ?

प्रतिभा : हो ! पाठवले !

यामिनी : तू एक काम कर संध्याकाळी येताना तू तुझ्या मुलांना येथेच घेऊन ये !

प्रतिभा : नको ! ते मस्ती करत राहतील !

यामिनी : लहान मुलं आहेत ते ! ते मस्ती नाही करणार तर कोण करणार ? ते काही नाही ! तू घेऊन ये ! मला त्यांना भेटायचेच आहे .

प्रतिभा : तुम्ही म्हणता तर मी घेऊन येईन ...

प्रतिभा त्यांचे जेवण आटपल्यावर मुलांसाठी पाव - भाजी घेऊन यामिनीचा निरोप घेऊन निघून जाते ...

यामिनी तेथच सोफ्यावर बसून स्वतःशीच विचार करत असते

यामिनी : मी आणि विजय इतकी मेहनत करून इतके पैसे कमावतो पण का ? कोणासाठी ? आमच्या गरजा त्या काय ? आम्हाला एखादं मुलबाळ झालं असत तर थोडा आयुष्यात थोडा आनंद आला असता पण कदाचित ते ही आता शक्य नाही... पण तरीही ! आयुष्यातील जगण्यातील आनंद गमावून बसण्यापेक्षा आयुष्यात आहेत त्या माणसांसोबत आनंदी राहण्यात आनंद शोधायला शोधायला हवा ! हा असा विचार करत असतानाच यामिनी झोप अनावर झाल्यावर तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपते...

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रतिभा तिच्या दोन मुलांना घेऊन विजयच्या घरी घेऊन येते प्रतिभा आत स्वयंपाक घरात काम करत असताना ती दोन लहान मुले सोफ्यावर बसून टी.व्ही. वर कार्टून बघत असतात इतकयात ! असाच एक तास गेल्यावर दारावरची बेल वाजते प्रतिभा बाहेर येऊन दरवाजा उघडते तर दरवाजात यामिनी असते.. यामिनी आत येताच मुलांना पाहून प्रचंड आनंदी होते मुलेही आनंदाने तिच्या जवळ जातात ती त्यांच्या हातात एक - एक मोठं चॉकलेट देते आणि ..

यामिनी : बाळांनो ! तुम्ही कार्टून बघत बसा मी फ्रेश होऊन येते

मुलं : बरं मावशी !

प्रतिभा : तुम्ही आता शांत चॉकलेट खात कार्टून बघत बसा मी मावशीला चहा करते...

यामिनी फ्रेश होऊन बाहेर येते आणि मुलांच्या बाजूला बसते ...

मुलांनो तुमची नावे काय ?

मुलगी : माझे नाव : श्रावणी ...

यामिनी : आणि तुझे ?

मुलगा : श्रावण

यामिनी : काय गोड नावे आहेत श्रावण आणि श्रावणी....

श्रावणी : मावशी तुझे नाव काय आहे ?

यामिनी : माझे नाव यामिनी ?

श्रावणी : मावशी यामिनी म्हणजे काय ?

यामिनी : यामिनी म्हणजे वीज !

श्रावण : मावशी वीज म्हणजे काय ?

श्रावणी :अरे वेड्या ! ती पावसाळ्यत चमकते ती

यामिनी : अगदी बरोबर

इतक्यता प्रतिभा यामिनीसाठी चहा आणि शिरा घेऊन येते ...

यामिनी : मुलांसाठी ! नाही आणलास ?

प्रतिभा : मगाशीच त्यांनी मॅगी खाल्ली आहे

यामिनी : मग ! काय झालं ? जा घेऊन ये .. खातील ते..

श्रावणी :नको ! मावशी आम्ही मगाशीच मॅगी खाल्ली आहे आता आम्हाला भूक नाही !

यामिनी : ते काही नाही मावशी सोबत तुम्हाला थोडा थोडा खावा लागेल..

श्रावणी : चालेल

प्रतिभा : घेऊन येते ...

यामिनी : तुलाही घेऊन ये तू काय ? थंड झाल्यावर खाणार ? मुलांनो तुम्ही कितवीला आहात ?

श्रावणी : मी तिसरीला

श्रावण : मी पहिलेला

यामिनी : प्रतिभाने सांगितले होते पण माझ्या डोक्यातूनच गेले ... बरं ! मी तुमच्यासाठी घेतलेले कपडे आवडले का ?

श्रावणी : हो ! मावशी खूप आवडले ! विजया मावशीने घेतलेले कपडे पण छान आहेत

श्रावण : मलाही खूप आवडले

प्रतिभा शिरा घेऊन आल्यावर सर्व तो एकत्र खातात आणी प्रतिभा प्लेट घेऊन स्वयंपाक घरात जातात ...

यामिनी : मुलांनो शाळेचा अभ्यास करून आलात ना ?

श्रावणी : हो ! मावशी

यामिनी : तुम्ही आईस्क्रीम खाता का ?

श्रवण : हो ! त्यादिवशी मावशी तू दिलेला आईस्क्रीम छान होता..

यामिनी : खायचा आहे का ?

श्रावण : हो !

यामिनी : प्रतिभा मी मुलांना बाहेर घेऊन जाते आईस्क्रीम खायला तोपर्यत तू स्वयंपाकाचं काय ते बघ !

प्रतिभा : बरं !

यामिनी : चला मुलांनो ! आपण आईस्क्रीम खायला जाऊया.. .

दोन्ही मुले आनंदाने उड्या मारायला लागतात यामिनी त्यांना घेऊन घराबाहेर पडते...

थोड्या वेळाने यामिनी मुलांना घेऊन परत येते तेव्हा मुलांच्या हातात बऱ्याच खाऊच्या पिशव्या असतात आणि एक आईस्क्रीचा डबाही असतो..

प्रतिभा : ताई ! हे काय ? इतका सगळा खाऊ कशाला घेतलात ?

यामिनी : तुझ्यासाठीही आईस्क्रीम आणला आहे ! मुलांनो आईला आईस्क्रीम द्या बरं...

मुलं आईस्क्रीम प्रतिभाच्या हातात देतात ...

श्रावणी : आम्ही मावशीच्या स्कुटीवरून गेलो आईस्क्रीम खायला खूप मजा आली

श्रावण : हो ! खूप मजा आली..

यामिनी : मुलांनो ! तुम्ही आता खाऊ खात कार्टून बघत बसा ! तोपर्यत मी माझ्या खोलीत जाऊन थोडे काम करून येते ...

श्रावणी : ओके ! मावशी...

थोड्यावेळाने यामिनी पुन्हा सोफ्यावर येऊन बसते

यामिनी : संपला का खाऊ ?

श्रावण : नाही ! अजून भरपूर बाकी आहे ... बाकीचा मी जाताना घरी घेऊन जाईन ...

यामिनी : जा कि घेऊन तो तुझाच आहे ...

श्रावणी : मावशी काका ? कोठे आहेत ??

यामिनी : अगं ! ते गावाला गेले आहेत तुमच्या विजया मावशीला सोडायला... तुम्ही जात की नाही गावाला कधी ?

श्रावणी : आम्ही जातो ना गावाला मी महिन्याच्या सुट्टीत !

श्रावण : हो ! तिकडे खूप मजा येते ...आमची आजी आमचे खूप लाड करते ! तिकडे आंबेही खायला मिळतात भरपूर ...

यामिनी : भरपूर का ?

श्रावणी : हो ! आमच्या गावच्या घराच्या समोरच दोन आंब्याची झाडे आहेत दिवसभर त्यावरचे आंबे पडत असतात...

यामिनी : आमच्या बुवा नाही नशिबात गाव !

श्रावणी : मावशी तू नाही कधी गावी गेलीस ?

यामिनी : गावी गेली आहे ! पण हक्काच्या गावी नाही गेली..

श्रावण : का ? मावशी...

यामिनी : अरे ! मला कामातून वेळच मिळत नाही, एक दिवस मी येईन हा ! तुमच्या गावी तुमच्या सोबत आंबे खायला चालेल ना ?

श्रावणी : चालेल काय मावशी धावेल ...

यामिनी : बरं ! तुम्ही बसा खेळत मी स्वयंपाकघरात जाऊन पाहते मम्मी काय करते ते ?

यामिनी स्वयंपाकघरात जाते तर प्रतिभा स्वयंपाक करण्यात गुंग असते..

यामिनी : प्रतिभा ! भाजी काय करतेस ?

प्रतिभा : मी तोच विचार करतेय !

यामिनी : मुलं अंडी खातात ना ?

प्रतिभा : हो ! खातात

यामिनी : मग ! एक काम कर, मुलांसाठी दोन चार अंडी उखड आणि एखादा आम्लेट कर आणि आपल्यासाठी अंड्याची भुर्जी बनव.. .

प्रतिभा : चालेल..

यामिनी : मी काही मदत करू का ?

प्रतिभा : नको ! मी करते लगेच ...

यामिनी : प्रतिभा ! तुझी दोन्ही मुले खूपच गोड आहेत त्याना जप लाडाने मोठं कर...

प्रतिभा : आमच्या आयुष्यात आहे तरी काय दुसरं त्यांच्या शिवाय ?

यामिनी : मुलं ! हीच माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती असते.. .

प्रतिभा : हे बाकी खरं आहे..

यामिनी : पण विजयला तसे नाही वाटत ! का ते माहीत नाही !

प्रतिभा : असतील त्यांची त्यांची काही करणे पण साहेबांना लहान मुले खूप आवडतात हे नक्की ...

यामिनी : हो ! ते मला माहीत आहे ... पण त्याला मुलांचा मोह नाही ...

प्रतिभा : ताई एक विचारू ... तुम्हाला मूल होऊ शकत नाही ! हे ठीक आहे पण तुम्ही एकत्र का नाही झोपत ?

यामिनी : हाच प्रश्न मला विजयानेही विचारला होता पण त्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही !

प्रतिभा : का ?

यामिनी : विजय आणि माझं लग्न जगाच्या नजरेत एक प्रेमविवाह असला तरी ती एक तडजोड होती आम्ही दोघांनीही आमच्या भविष्यासाठी केलेली

मला मूल होऊ शकत नाही हे माहित असतानाही विजयने माझ्याशी लग्न केले ?

प्रतिभा : तुम्हाला मुल होऊ शकत नाही ! हे साहेबाना लग्नाच्या अगोदरपासून माहीत होते तरीही त्यांनी तुमच्याशी लग्न केलं ?

यामिनी : हो ! पण त्याच्याशी लग्न करणं हि त्यावेळी जितकी त्याची गरज होती तितकीच माझीही गरज होती.

प्रतिभा : म्हणजे ! लग्न झाल्यापासून तुम्ही कधी तसे एकत्र आलातच नाही !

यामिनी : नाही ! पूर्वी आम्ही निदान एकाच रूममध्ये झोपायचो तरी आता तर ते ही नाही...

प्रतिभा : कारण काय ?

यामिनी : काही नाही ! विजय म्हणतो ,'' येथे काय आणि बाहेर काय झोपलो तरी काय फरक पडतो ?

प्रतिभा : साहेबांचं सोडा ! तुमच्या भावना कधी अनावर होत नाहीत..

यामिनी : होतात पण काय करणार ...? जर त्याच्याच मनात नसेल ...

प्रतिभा : साहेबाना... भावनाच नाहीत वाटतं ! बायकोला मुलं होणार नसेल तर नवऱ्याने काय बायकोवर प्रेमच करायचं नाही ! येथे तर आपल्या बायकोला मुलं होऊ शकत नाही हे त्यांना लग्नाच्या अगोदरच माहीत होते.. तुमच्यावर त्यांना प्रेमच करायचे नव्हते तर लग्नच का केले ?

यामिनी : तसेही ! माझ्यासोबत कोणी लग्न करणारच नव्हते... विजयने निदान माझ्यासोबत लग्न करून माझ्यावर उपकारच केले आहेत... पण नवऱ्याचा हक्क तो माझ्यावर कधीच गाजवत नाही... नाही म्हणायला आम्ही जगासाठी एकमेकांच्या जवळ असतो कधी हातात हात घालून , कधी मिठीत , कधी मांडीवर , तर कधी खांद्यावर ...

प्रतिभा : तुमच्यात तसे काही संबंध नसतील हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही ...

यामिनी : आयुष्याची पाच वर्षे एकत्र गेली. पुढचीही जातील ...

प्रतिभा : माझ्या माहिती प्रमाणे विजयला कधी लग्नच करायचे नव्हते ! का ते माहीत नाही ...

यामिनी : हो ! ते मला माहीत आहे ...

प्रतिभा : मग आता पुढे काय ?

यामिनी : पुढे काय ? असेच आयुष्य ढकलत राहायचे !

प्रतिभा : मी सांगू का विजयाला ?

यामिनी : नको ! त्यामुळे आमचे आहे ते नातेही धोक्यात येईल .. माझी शपथ आहे तुला .....

प्रतिभा : बरं ! जेवण झालं आहे आपण थोड्यावेळाने जेऊन घेऊ या !

यामिनी : हो ! चालेल...

त्या दोघी स्वयंपाकघरातून बाहेर हॉलमध्ये येतात तर श्रावणी आणि श्रावण खेळता खेळात कार्टून पाहत असतात... त्यांच्या बाजूला बसत..

प्रतिभा : कार्टून बघून अजून पोट भरलं नाही वाटतं !

श्रावणी : तुला मालिका पाहायची आहे का ? मावशी ! ही घरी आल्यावर हिच्यामुळे आम्हाला कार्टून बघता येत नाही

प्रतिभा : दिवसभर बघता ते ?

यामिनी : ते जाऊदे ! तुम्हाला भूक लागली आहे कि नाही ?

श्रावण : हो ! भूक तर लागली आहे..

यामिनी : चला मग ! जेऊन घेऊ या ! प्रतिभा घे वाढायला ..

ते चौघे डायनिंग टेबलवर जेवायला बसतात...

श्रावण : अरे वा ! उखडलेले अंडे ! मला खूप आवडते

यामिनी : ऑम्लेटही आहे ...

श्रावणी : मला ऑम्लेट चालेल , तुम्हाला काय ?

प्रतिभा : आम्हला भुर्जी आहे.. .

यामिनी : चला जेवायला सुरुवात करा.. तुम्हाला घरीही जायचे आहे ना ! उशीर होईल ... प्रतिभा ! तुझ्या नवऱ्यालाही घेऊन जा काय हवे ते !

प्रतिभा : नको ! मी येताना त्याचा स्वयंपाक करून आले आहे.

यामिनी : काय मुलांनो मजा आली ना येथे ! येत जा अधून मधून आई सोबत...

श्रावणी : हो ! नक्की मावशी !

श्रावण : मी पण येईन ...

प्रतिभा : बरं आता जेव्हा गप्पपणे

यामिनी : बोलूदे ! त्यांना ...

प्रतिभा : ताई ! जेवण झाले कि किचन आवरून निघते मी .....

यामिनी : चालेल ! आज मी तुला इकडेच राहायला सांगितले असते पण तुझा नवराही आहे ना घरी !

प्रतिभा : मलाही आवडले असते राहायला पण....

श्रावणी : मी थांबू का मावशी सोबत !

प्रतिभा : श्रावणी ! तुला ठेवले असते पण उद्या तुझी शाळा आहे आणि मावशीला सकाळी कामालाही जायचे असते...

यामिनी : श्रावणी ! आई बरोबर बोलतेय...तुम्ही असं करा एका रविवारी तुम्ही इकडे या ! तोपर्यत तुमचे काकाही येतील मग ! आपण धमाल करूया ! चालेल

श्रावण : हो ! चालेल

प्रतिभा दोन्ही मुलांना घेऊन घराबाहेर पडते... त्याना निरोप दयायला यामिनी दारात उभी असते... ते गेल्यावर यामिनी दरवाजा बंद करून घेते आणि विजयला व्हिडीओ कॉल करते गावच्या सर्वांची विचारपूस करते आणि सोफ्यावर बसून मालिका पाहत असते झोप अनावर झल्यावर तिच्या बेडरूममध्ये न जाता तेथेच सोफ्याचा बेड करून झोपी जाते... दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी आवरा आवर करून ऑफिसला निघून जाते... संध्याकाळी थोडी उशिराच यामिनी घरी येते तेव्हा प्रतिभा स्वयंपाक घरात स्वयंपाक करत असते...

यामिनी : प्रतिभा तू कधी आलीस...

प्रतिभा : अर्धा तास वगैरे झाला असेल

यामिनी : बरं ! चहा केलास का ?

प्रतिभा : नाही !

यामिनी : बरं ! कर ! तोपर्यत मी फ्रेश होऊन बाहेर बसते

प्रतिभा :चालेल

थोड्यावेळाने प्रतिभा यामिनीसाठी चहा घेऊन येते

यामिनी : मुलं गेलेली का शाळेत ?

प्रतिभा : हो ! ते रोज शाळेत जातात , त्यांना शाळेचा अजिबात कंटाळा नाही..

यामिनी : हे उत्तम .....

प्रतिभा : ताई मी तुमच्यासाठी तळलेले मासे आणि रस्सा आणला आहे , आणखी काय करू ?

यामिनी : आणखी काय ? चार पोळ्या बनव ! बस्स....

प्रतिभा : चालेल

प्रतिभा स्वयंपाक घरात जाते आणि चार पोळ्या बनवून माघारी येते... ती माघारी आल्यावर त्या दोघी मिळून मालिका पाहत असतात

यामिनी : तुला ह्या मालिका खूप आवडतात वाटत ?

प्रतिभा : आवडतात असे नाही पण टाईमपास म्हणून पाहते

यामिनी : मालिका पाहायला विजयला खूप आवडतात, त्यावरून तो सांगत होता त्याच्या आईला आणि त्याला खूप बोलणी खावी लागायची कारण हे दोघे त्यानी लावलेले किर्तन बंद करून मालिका पाहायचे... आता गावाला तेच सुरु झाले असतील .... आता विजय गेलाय ना गावी तर बाबांच्या हाताला काही रिमोट लागणार नाही पण आईंची मजा होईल...

प्रतिभा : पण ! त्यांचा मित्र गेलाय ना सोबत ?

यामिनी : त्याला फिरवायला तिकडे भरपूर माणसे आहेत, गाडी असल्यामुळे त्याला फिरवायला कोणी नाही म्हणणार नाही ...

प्रतिभा : हे ! बाकी बरोबर आहे ....

यामिनी : रात्री ! घरी जायला फार उशीर झाला नाही ना ?

प्रतिभा : नाही ! बाहेर गेल्यावर लगेच रिक्षा मिळाली, चालत गेलो असतो तरी काय ? पंदरा मिनिटे लागली असती.

यामिनी : चालत कशाला ?

प्रतिभा : मी निघू का आता ?

यामिनी : थांब जरा...

यामिनी तिच्या खोलीत जाऊन तीन हजार रुपये घेऊन येते आणि ते प्रतिभाच्या हातात देत

प्रतिभा : हे कशाला ?

यामिनी : ठेव ! तुला पैशाची गरज असेल, पगार व्हायला अजून बराच वेळ आहे... मी समजू शकते... अजून लागले तर कधीही हक्काने माग माझ्याकडे !

प्रतिभा : थँक्यू ताई !

यामिनी : तू जा ! आता घरी मासे तुझी वाट पाहत असतील...

त्यावर त्या दोघीही मनमुराद हसल्या...

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनीने विजयाला फोन लावला ..... तिची आणि तिच्या मुलांची, तिच्या घरच्यांची चौकशी केली असता तिने विजय आणि त्याचा मित्र आजच तिच्या घरी येऊन जेऊन गेल्याचे तिने तिला सांगितले. विजयाने यामिनीकडे प्रतिभाचीही चौकशी केली. फोना -फोन झाल्यावर यामिनी लॅपटॉप हातात घेऊन सोफ्यावर बसली... ती तिचे मेल चेक करत होती.. काही कामाचे मेलही तिने केले. इतकयात दारावरची बेल वाजली , यामिनीने पुढे होत दरवाजा उघडला तर दरवाजात शेजारच्या घरातील लहान मुलगी उभी होती .. तिच्याकडे पाहत..

यामिनी : काय ? बेटा ! कविता !! तू इकडे !

कविता : काकी ! काका कोठे आहेत ?

यामिनी : काका गावी गेले आहेत ! काय काम होत काकांकडे ?

कविता : मला त्यांच्याकडून चित्र काढून घ्यायच होतं , काका छान चित्र काढतात... आता माझं चित्र कोण काढणार ?

यामिनी : कोण काढणार ?

कविता : काकी तुला काढता येतात का चित्र ?

यामिनी : मी शाळेत असताना तुझ्या काकाकडूनच चित्र काढून घ्यायचे !

कविता : काकी ! खरंच !

यामिनी : हो ! गं ! बाळा ! आम्ही एकाच वर्गात होतो ना !

कविता : बरं काका कधी परत येणार आहेत ?

यामिनी : बहुतेक सोमवारी येतील...

कविता : बरं ! काकी मी निघते आता

यामिनी : आईला मी विचारलं म्हणून सांग !

कविता : हो ! सांगते ...

कविता धावत पळत निघून गेल्यावर यामिनी दरवाजा बंद करते आणि सोफ्यावर बसते आणि स्वतःशीच विचार करू लागते

यामिनी : आम्ही शाळेत असताना विजय किती छान छान चित्र काढत असे , तेव्हा तो माझ्याशी बोलत नसे म्हणून मी माझ्या मैत्रिणीला सांगून त्याची वही मागवून त्यातील चित्रे पाहत असे मी त्याच्या नाही पण त्याच्या चित्रांच्या प्रेमात पडले होते .. मला वाटले होते विजय मोठेपणी नक्कीच एक चित्रकार होईल पण तो रंगांचा नाही तर शब्दांचा जादूगर झाला... तेव्हा त्याच्यावर वर्गातील किती मुली मारायच्या पण हा ! नेहमी मुलींपासून लांब लांब पाळायचा.. आजही पळतोय .मला वाटत त्याला बायकांचीअँलर्जी आहे. मी त्याच्या लग्नाची हक्काची बायको तरी त्याला माझ्या जवळ यावेसे वाटत नाही ! काय तो मीच पुढाकार घेऊन अधून मधून त्याच्या कुशीत शिरत असते.... त्याच्यात काही तसा प्रॉब्लेम तर नाही ना ?

आज मात्र यामिनी तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी यामिनीला उठायला उशीर होतो. ती पटापट तिची तयारी करून ऑफिसला निघून जाते संध्यकाळी माघारी येते तेव्हा तिला यायला उशीर झालेला असतो प्रतिभा स्वयंपाक तयार करून सोफयावर बसलेली असते ...

यामिनी : प्रतिभा ! सॉरी ! मला यायला उशीर झाला , तू कशाला थांबलीस ? तू तुझी कामे आटपून निघून गेली असतीस तरी चालले असते ...

प्रतिभा : अजून थोडा वेळ थांबते म्हटले नाहीतर मी तुम्हाला फोन करणारच होते..

यामिनी : आज एक महत्वाची मिटिंग होती म्हणून उशीर झाला यायला ! मी फ्रेश होऊन येते

प्रतिभा : तोपर्यत मी तुमच्यासाठी चहा टाकते..

यामिनी : चालेल

प्रतिभा आणि यामिनी चहा पिता पिता....

प्रतिभा : उद्या शनिवार आहे ! तुम्हाला सुट्टी असेल ना ?

यामिनी : हो !

प्रतिभा : मग ! मी सकाळीच कामाला येते !

यामिनी : नको ! मी उद्या माझ्या आईकडे जाणार आहे , येताना रात्रीही तिकडूनच जेऊन येईन , तू एक काम कर उद्या तू आराम कर ... आणि रविवारी तू कोठे बाहेर जाणार आहेस का ?

प्रतिभा : नाही !

यामिनी : मग ! दुपारी ! मुलांना घेऊन तू इकडेच ये ! आपण कोठेतरी फिरायला जाऊ...तसेही साहेब येणार आहेत सोमवारी रात्रीपर्यत मग तुझी रोजची ड्युटी सुरु होईल ..

प्रतिभा : बरं !... तुम्ही जेऊन घ्या ... मी निघते

यामिनी : हो ! तू निघ...

प्रतिभा : गुड नाईट ! ताई

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी जेवून घेते आणि सोफ्यावर बसताच पुन्हा तिच्या डोक्यात विचार सुरु होतात

यामिनी : आमचे लग्न झाल्यापासून आई-बाबा एकदाही माझ्या घरी आले नाही. इतके दिवस ते बाहेर होते तर ठीक आहे पण आता मुंबईत आलेत तरी मला भेटायला आले नाहीत. आमच्या लग्नाला त्यांचा विरोध नव्हता पण ते गाजावाजा करत व्हावे अशी त्याची इच्छा होती ... पण विजयने त्याला नकार दिला.. विजयचेही बरोबर होते आमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले त्या परिस्थितीत विजयने गाजावाजा करून लग्न करणे त्याला योग्य नसेल वाटले. आई - बाबांचा तसा काही विजयवर राग नाही पण कदाचित त्यांना आता माझ्या संसारात ढवळाढवळ करायची नसेल. पण मला माझे कर्तव्य विसरून चालणार नाही त्यांना जाऊन भेटते, त्यांची विचारपूस करते , म्हणजे त्यांनाही बरे वाटेल. विजयचाही त्यांच्यावर काही राग नाही तसाही तो कधीच कोणावर राग धरत नाही कारण तो राग - रुसव्यांच्या पलीकडे गेलेला आहे... विजयाचा त्यांना अभिमानच आहे पण सुरुवातीच्या आयुष्यात चुका माझ्याकडूनच झालेल्या आहेत... विजयशी लग्न करून मी माझी चूक सुधारली पण नियतीने मला वांझोटेपणाचा शाप देऊन माझ्या कोणत्या पापाची शिक्षा मला दिली देवच जाणे...

हा विचार करता करता यामिनीचे डोळे पाणावले ते पाणावलेले डोळे पुसत ती तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली... दुसऱ्या दिवशी तयार होऊन यामिनी तिच्या आई - बाबांना भेटायला गेली आणि रात्री उशिरा घरी आल्यावर फ्रेश होऊन सरळ झोपी गेली.. ..

रविवारच्या सकाळी यामिनी सोफ्यावर पेपर वाचत बसली होती इतकयात प्रतिभा तिच्या मुलांना घेऊन आली त्यांना पाहून यामिनीला खूपच आनंद झाला

प्रतिभा : ताई तुम्ही चहा घेतलास का ?

यामिनी : हो ! मी घेतला ! तुला हवा तर घे गरम करून ! नाही ! नको तू इतकी छान तयार होऊन आली आहेस बस ! मी मुलांसाठी खाऊ घेऊन येते..

यामिनी मुलांसाठी खाऊ घेऊन येते मुलं सोफ्यावर बसून खाऊ खात असतात...

प्रतिभा : ताई ! तुम्ही काल तुमच्या आई - बाबांना भेटायला गेला होता ना ? कसे आहेत ते ? इकडे येत नाही का कधी ते ?

यामिनी : नाही ! म्हणजे अजून ते आमच्या घरी एकदाही आले नाहीत.. ते बाहेर असतात माझ्या भावाच्या घरी, चार - पाच दिवसापूर्वीच मुंबईला आले आहेत.

प्रतिभा :बरं ! तुमच्या जेवणाचं काय ?

यामिनी : त्याची काळजी तू नको करू मी नाश्ता केला आहे ? मुलांनो आपण कोठे फिरायला जायचं ! बीचवर जाऊ या !

श्रावणी : चालेल मावशी ... खूप मजा येईल

श्रवण : मलाही खूप मजा येईल

ते सर्व पिकनिकला घराबाहेर पडतात..... आणि संध्याकाळी उशिरा घरात येतात

श्रावणी : मावशी बीचवर खूप मजा आली...

श्रावण : हो ! ना ! आपण किती खेळणी घेतली

यामिनी : मजा आली ना !

प्रतिभा : मजा न यायला काय झाले ? ताई तुम्ही थकला असाल फ्रेश व्हा ! तोपर्यत मी चहा टाकते..

यामिनी : मुलांनो ! तुम्हीही फ्रेश व्हा !

सर्व एकत्र बसून चहा पिता-पिता येताना सोबत आणलेला खाऊ खात असतात.

प्रतिभा : ताई ! रात्रीच्या जेवणात काय करू ?

यामिनी : काही करू नको ! आपण आता थोड्यावेळाने हॉटेलात जेवायला जाऊ ! मग ! मी सरळ माझ्या घरी येईन तू तुझ्या घरी जा..

प्रतिभा : कशाला काय ?

यामिनी : आज तुझा सुट्टीचा दिवस .. सुट्टी एन्जॉय कर.. श्रावणी तुला काय आवडेल खायला ? आणि श्रावण तुला ..

श्रावणी : मला चायनीज आवडेल

श्रवण : मलापण..

यामिनी : आईस्क्रीम नको !

श्रावण : हवं ! ना !

प्रतिभा : ताई तुम्ही लाडावून ठेवलं हा ह्यांना

यामिनी : त्यांचे जाऊ दे ! तू काय खाणार ?

प्रतिभा : पाव भाजी नाहीतर ढोस.. दुसरं मी कधी काही खाल्ले नाही हॉटेलात

यामिनी :मग ! आज खा !आपण तुझ्यासाठी काहीतरी वेगळी डिश ऑर्डर करूया !

प्रतिभा : जशी तुमची इच्छा !

इतकयात दारावरची बेल वाजते.प्रतिभा पुढे होत दार उघडते तर दारात .. कविता.. चित्रकलेची वही घेऊन उभी असते ..

तिला पाहताच

यामिनी : कविता ये ना ! आत

कविता : आत येताच , काका नाही का आले अजून ?

यामिनी : ते उद्या येणार आहेत ? तुला चित्र दिले नाही का कोणी काढून ?

कवींना : हे कोण आहेत ?

यामिनी : हे प्रतिभा मावशीची मुले आहेत हि श्रावणी आणि हा श्रावण हाय ! कर त्यांना

कविता : हाय !

श्रावणी : हाय ! मी काढून देऊ का चित्र तुला

कविता : तुला चित्र काढता येतात

श्रावणी : हो !

कविता : चालेल

श्रावणी : कसलं चित्र काढायचे आहे ?

कविता : पावसाचे

श्रावणी : बरं दे काढते

श्रावणी कविताला छान चित्र काढून देते ! ते पाहून कविता तर खुश होतेच पण यामिनीही प्रचंड खुश होते

यामिनी : तू इतकी सुंदर चित्रे काढतेस ? तुझ्या काकांना माहीत झालं तर ते खूप खुश होतील ! मी तुझ्यासाठी खूप सारे रंग घेऊन येईन हा !

श्रावणी : नको ! मावशी रंग आहेत माझ्याकडे !

कविता : थँक्स श्रावणी ! मी हे चित्र आईला दाखवते .. बाय ...

श्रावणी : बाय ...

प्रतिभा : ही मुलगी एकदम गोड आहे हा ! कोण आहे ?

यामिनी : माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे.. आपल्या वरच्या मजल्यावरच राहते... चला आता निघूया ! आपल्याला हॉटेलात जायचे आहे ना ?

प्रतिभा : मुलांनो चला निघा ! मी तुमच्या तोंडाला जरा पावडर लावते..

ते सर्व तयार होऊन घराबाहेर पडतात रात्री उशिरा यामिनी प्रतिभाला तिच्या घरी सोडून माघारी येते आणि सोफ्यावर बसते.. स्वतःशीच विचार करू लागते

यामिनी : आज किती दिवसांनी हॉटेलात जेवायला मजा आली .. हॉटेल माणसांनी भरलेले असते तरी हॉटेलात एकट्याने जेवायला मजा येत नाही .. आज प्रतिभा तिची मुलं सोबत असताना जेवायला जी मजा आली ती मजा काही औरच होती. विजयला कधी हॉटेलात जेवायला चल म्हटलं तर त्याच तोड वाकड होत कारण हॉटेलचं त्याला काही पचत नाही पण घरातील फोडणीचा भातही त्याला पचतो. आम्ही हॉटेलात गेलो तर तो फार फार चहा ढोसतो आणि एकटीलाच वेड्यासारखं खावं लागत... आज लोकांना विभक्त कुटुंब पद्धती आवडते पण आम्ही विभक्त कुटुंबात राहत असल्यामुळे मला माणसांची किंमत कळतेय ! आयुष्यात फक्त पैसे जोडण्यापेक्षा माणसे जोडणे कधीही चांगलेच ! चला उद्या विजय येणार आहे म्हणजे पुन्हा घराला घरपण येईल.. विजय माझ्या आयुष्यात आला नसता तर माझ्या आयुष्यातील पोकळी कधीच भरून निघाली नसती... हा विचार करता करता झोप अनावर झल्यामुळे यामिनी तिच्या बेडरूममध्ये जाऊन बेडवर पडते आणि लगेच शांत झोपी जाते. ..

सोमवारी संध्याकाळी प्रतिभा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते प्रतिभा दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो त्याला आत घेत ...

प्रतिभा : साहेब ! लवकर आलात गावावरून ?

विजय : मग काय ? कायमचाच गावाला राहू की काय ??

प्रतिभा : ह्या कसल्या इतक्या पिशव्या भरून आणल्या आहेत ?

विजय : त्यातल्या अर्ध्या तुझ्याच आहेत

प्रतिभा : माझ्या

विजय : विजयाने तुझ्यासाठी गावच्या काय काय भेट वस्तू पाठवल्या आहेत

प्रतिभा : काय आहे ?

विजय : काही नाही ! कोकम , काजू , आंब्याचे साठ , सुकी मासोळी पाठवली आहे

प्रतिभा : मस्तच ! आपल्या मुंबईत राहणाऱ्या लोकांसाठी या वस्तू सोन्या सारख्याच आहेत

विजय: हो ! मी फ्रेश होतो तोपर्यत माझ्यासाठी चहा टाक आणि नाश्त्यासाठीही काहीतरी कर

प्रतिभा : हो ! करते

थोड्यावेळाने विजय फ्रेश होऊन सोफ्यावर बसलेला असतो प्रतिभा त्याच्यासाठी चहा आणि शिरा घेऊन येते तो खाता - खाता

विजय : मी आठवडाभर नव्हतो तर तुम्ही मजा केली असेल ...

प्रतिभा : हो ! खूप मजा केली आम्ही हॉटेलात जेवायला गेलो होतो ,बीचवर फिरायलाही गेलो होतो मुलंही होती सोबत ताईंनाही खूप मजा आली

विजय :तू आणि मुलं सोबत असल्यावर तिला मजा येणारच ! बाकी सर्व ठीक आहे ना ?

प्रतिभा : हो !

विजय : विजयाने तुला हे सामान पाहिल्यावर फोन करायला सांगितलं आहे , तू जाताना तुझ्या पिशव्या घेऊन जा ! त्या मी वेगळ्या काढून ठेवतो

प्रतिभा : चालेल ! मी स्वयंपाकाचं काय ते बघते

विजय : ते तू बघ ! मी माझ्या रूममध्ये जाऊन पडतो.

प्रतिभा : पडा........

प्रतिभा स्वयंपाकघरात काम करत असताना पुन्हा दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडते तर दारात यामिनी उभी असते ती आत येताच हॉलमधील सामान पाहते आणि ...

यामिनी : साहेब ! आले वाटतं गावावरून ?

प्रतिभा : हो ! अर्धा तास झाला !

यामिनी : आहे कोठे ?

प्रतिभा : ते त्यांच्या रूममध्ये पडले आहेत ...

यामिनी : बरं मी बघते ...

यामिनी विजयाच्या खोलीत डोकावते तो झोपलेला असतो ती फ्रेश होते आणि बाहेर सोफ्यावर येऊन बसते इतकयात प्रतिभा तिच्यासाठी चचा घेऊन येते तो पिता पिता ती

यामिनी : काय आहे काय या पिशव्यात ?

प्रतिभा : ताई ! त्यात विजयाने माझ्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठी काही गावच्या वस्तू पाठवल्या आहेत....

यामिनी : मस्तच ! तुझ्या पिशव्या तू जाताना आठवणीने घेऊन जा ! बाकी काय आहे ते मी बघेन नंतर...

प्रतिभा : ताई स्वयंपाक होत आलाय तो झाला की मी निघू का ?

यामिनी : हो ! हो ! तू निघ.. .

प्रतिभा स्वयंपाक करून निघून गेल्यावर यामिनी एकटीच सोफ्यावर बसून मालिका पाहत असताना विजय त्याच्या रूममधून बाहेर येतो आणि यामिनीच्या हळूच बाजूला बसतो.

विजय : प्रतिभा म्हणत होती आठवडाभर तुम्ही खूप मजा केली

यामिनी : हो ! तू तिकडे मजा केलीस ! आम्ही इकडे मजा केली.. आई- बाबा, बाकी सर्व ठीक आहेत ना गावी !

विजय : सर्व ठीक आहेत ! सर्व तुझीच आठवण काढत होते ... म्हणत होते यामिनीलाही घेऊन यायचं होत सोबत

यामिनी : मग ! तू काय म्हणालास ?

विजय : मी काय म्हणणार ? नेहमीचच कारण पुढे केलं काम खूप आहेत, सुट्टी मिळत नाही

यामिनी : तू आपल्या बद्दल सांगितलंस का सर्वाना !

विजय : मी सांगणारच होतो पण सर्व इतक्या आनंदात होते कि मला सांगायची हिंमतच नाही झाली निदान विजया आली तेव्हा विजयाला तरी सांगायला हवे होते.

प्रतिभा : आपण लग्न केलं तेव्हाच सर्वाना सांगितले असते तर बरं नसत का झालं ?

विजय : हो ! तेव्हाच सांगायला हवं होत. आपल्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी आपण त्यांना हे सांगू शकलो नाही.

यामिनी : आई - बाबा मुंबईत आलेत माझ्या दादाची मुंबईत ट्रान्सफर झाली आहे.

विजय : हे बाकी ! उत्तम झाले... तू गेली होतीस का त्यांना भेटायला..

यामिनी : हो ! गेले होते ते तुझी आठवण काढत होते ..

विजय : जाऊ या ! आपण एखाद्या रविवारी त्यांना भेटायला..

यामिनी : आईंना चार दिवस मुंबईला घेऊन येणार होतात त्याचे काय झाले ?

विजय : मी विचारले , तर ती म्हणाली,'' नको ! तुम्ही दोघे तुमच्या कामात मी तिकडे येऊन काय करू ? त्यापेक्षा तुम्ही दोघांनीच या जोड्याने आठ दिवस गावाला राहायला...

यामिनी : मला वाटत नाही आपल्याबद्दल सांगितल्यावर कोणाला काही वाटेल ?

विजय : मलाही तसेच वाटते ! ... म्हणूनच मी सांगत नाही ....

यामिनी : आज ना उद्या कळेलच त्यापेक्षा आपण सांगणे उत्त्तम ! तुला काही फरक पडणार नाही पण त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल कदाचित...

विजय : तू बोलतेस ते बरोबर आहे... बाहेरून कळलं तर बरच होईल म्हणजे आपल्याला फक्त हो ! बोलावे लागेल.

यामिनी : विजय ! तू ना नेहमी सोप्पा पर्यायच निवडतोस...

विजय : हो ! मला आयुष्यातील विनाकारणच, संघर्ष , धावपळ , भांडण - तंटे आवडतच नाही, मनुष्याचं जीवन आपल्याला एकदाच जगायला मिळालेले आहे असे समजून आपण ते जगायला हवे ! आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद उपभोगायला हवा !

यामिनी : पण आपल्या बद्दलच सत्य जोपर्यत आपण तुझ्या घरातील सर्वाना सांगत नाही तोपर्यत मला आनंदाने नाही जगता येणार त्याचे काय ?

विजय : तुला काय वाटतं ते मला समजत नाही ? मला सर्व समजतंय .. पण ..

यामिनी : पण काय ?

विजय : बाकीच्यांना काही वाटणार नाही ! पण आईला वाईट वाटेल... तरीही हे सत्य आपण लवकरच गावी जाऊन सर्व एकत्र असताना सांगून टाकू !

यामिनी : नक्की ! हो ! बरं ! आता जेऊन घेऊया तुला भूक लागली असेल.. जेव आणि झोप लवकर तुझ्या रूममध्ये जाऊन ..

विजय : चालतंय की ...

यामिनी आणि विजय जेऊन घेतात विजय त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो, यामिनी सोफ्यावर बसून मालिका पाहत बसते, उशिरा झोप आल्यावर ती तिच्या रूममध्ये जाऊन झोपते...

दुसऱ्या दिवशी सकाळी यामिनी ऑफिसला निघून गेल्यावर विजय सोफ्यावर बसून लॅपटॉपवर काहीतरी काम करत असतो इतक्यात प्रतिभा कामावर येते.. ती आल्या आल्या विजयला चहा बनवून देते आणि स्वयंपाकघरातील तिची कामे आटपल्यावर बाहेर येते आणि

प्रतिभा : साहेब ! तुम्हाला जर ताईंसोबत तसे संबंधच ठेवायचे नव्हते तर तिच्याशी लग्नच का केले ?

विजय : ते आम्ही लग्न करण्यापूर्वीच आमच्यात काही गोष्टी ठरल्या होत्या , मला तर लग्नच करायचे नव्हते, माझ्या काही अटी यामिनीने मान्य केल्या म्हणून मी तिच्याशी लग्न केलं ! यामिनीची आणि माझी फक्त चांगली मैत्री होती शाळेत असल्यापासून पण माझे तिच्यावर प्रेम नव्हते.

प्रतिभा : पण आता लग्न केलेच आहे तर... दुरावा का ? ती मुलांना जन्माला घालू शकत नाही म्हणून ?

विजय : तसे अजिबात नाही ! ती मुलांना जन्माला घालू शकत असती तर मी तिच्याशी लग्नच केले नसते. म्हणजे माझ्यासोबत लग्न करण्याची कदाचित तिच्यावर वेळच आली नसती.

प्रतिभा : ते काहीही असो पण पत्नी म्हणून त्यांचा जो अधिकार आहे तो त्यांना द्यायला नको का ?

विजय : द्यायलाच हवा ! मी कोठे नाही बॊललो ! पण तिने स्वतःहून तो कधी गाजवला नाही आणि मला तर तो गाजवायचा नाही...

प्रतिभा : तुमच्यात काही समस्या आहे का ?

विजय : तू हे ! काही काय बोलतेस !

प्रतिभा : हा प्रश्न कोणालाही पडू शकतो ? ताईंनाही पडला असेल ??

विजय : हा प्रश्न माझ्या घरच्यांनाही पडला होता मी लग्न करत नव्हतो म्हणून... त्यांचं तोड बंद करण्यासाठी म्हणून मी यामिनीशी लग्न केलं पण अजूनही तो प्रश्न तेथेच आहे .. मला जर लग्नच करायचं असतं आणि शारीरिक गरज जर माझ्यासाठी तितकीच महत्वाची असती तर मी तुझ्याशी लग्न नसत का केलं ? आमच्या घरात तू सर्वाना पसंत होतीस ...

प्रतिभा : पण तुमचं माझ्यावर प्रेम होत का तेव्हा ?

विजय : तू मला आवडत होतीस पण मी तुझ्याशी लग्न करण्याचा विचार तेव्हा केला नव्हता.. तुझं लग्न लवकर झालं नसत तर कदाचित मी विचार केलाही असता , तू माझ्या आयुष्यात आलेली एकमेव मुलगी नव्हतीस ! माझ्या आयुष्यात आणखी बऱ्याच जणी येऊन गेलेल्या आहेत. मी त्यांच्यापैकी कोणाशीही लग्न केले असते ! मी यामिनीशी लग्न केले त्याला तसेच काहीतरी कारण आहे जे मी तुला सांगू शकत नाही ... आज तुझ्या बद्दलही माझ्या मनात काहीच भावना नाहीत आता तू माझी फक्त एक चांगली मैत्रीण आणि माझ्या जिवलग मित्राची बहीण आहेस म्हणून मी तुझ्याशी इतकं सगळं बॊलतोय ! तरीही मी तुला एक गोष्ट सांगतो .. यामिनीला कधीही ती माझ्या जवळ आली म्हणून मी तिला दूर लोटलेले नाही. तिच्या जर काही शारीरिक गरज असतील तर तिने त्या माझ्याकडून पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा... मला तिच्यावर नवरा म्हणून माझा कोणताच हक्क गाजवायचा नाही पण ती बायको म्हणून माझ्यावर हक्क नकीच गाजवू शकते मी तो नाकारत नाही. तिला मुलं होऊ शकत नाही हे मला माहित असताना मी तिच्याशी लग्न केलं म्हणजे तिला मूलं होऊ शकत नाहीत याने मला काहीच फरक पडत नाही हे स्पष्ट होते. आम्ही लग्न झाल्यापासून तसे एकत्र आलो नाही म्हणजे पुढे येणारच नाही असे नाही ! आम्हाला अजून संपूर्ण आयुष्य एकत्र काढायचे आहे.

प्रतिभा : सॉरी ! पण मला ताईंची कळवळ पाहावली नाही म्हणून मी बोलले, विजयाच्या मनातही तुम्हाला वेगवेगळे झोपताना पाहून शंका निर्माण झाली असती.

विजय : तू मैत्रीण या नात्याने मला हक्काने काहीही विचारू शकतेस ... यामिनी तर तुला बहीणच मानते तुला तिची काळजी वाटणे योग्यच आहे... 

प्रतिभा : ताई मला बहीण मानते म्हणूनच मला तिची काळजी वाटते... तुम्ही लग्न करण्याची कारणे काहीही असो पण आता लग्न केलंच आहे तर चारचौघांसारखं नवरा - बायको म्हणून एकत्र यायला नको का ?

विजय : तू बोलतेस ते बरोबर आहे ... पण हे सगळं तुला वाटते तितके सोप्पे नाही... ते कळेल तुला पुढे कधी तरी ...

प्रतिभा : पुढे जाऊन तुम्ही प्रतिभाला अंतर तर देणार नाही ना ? कारण तुमच्या आयुष्यातून ज्या यापूर्वी निघून गेलेल्या आहेत त्यांची साधी आठवणही येत नाही तुम्हाला , तुम्ही लगेच पुढे जाता आणि मागे वळून पाहतही नाही..

विजय : मागे वळून पाहणे हा माझा स्वभाव नाही ! मी माणसांमध्ये गुंतून पडत नाही हे सत्य आहे... पण मी माझ्या कर्तव्यातही कधी कमी पडलो नाही आणि कधी कमी पडणार नाही.

प्रतिभा : बरं ! मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आणि मग मी निघते ... संध्याकाळी परत येईन...

प्रतिभा विजयासाठी चहा घेऊन येते ती विजय पायल्यावर प्रतिभा कप स्वयंपाकघरात ठेवते आणि जायला निघते ..

विजय : प्रतिभा ! मला माहीत आहे तुझेही माझ्यावर खूप प्रेम होते पण मला कधी कोणावर प्रेम करणे अथवा कोणाच्या प्रेमात गुंतून पडणे जमलेच नाही तेव्हा माझे लक्ष फक्त माझ्या ध्येयाकडे होते मी फक्त तुझ्यावरच नाही अनेक कित्येकींवर अन्याय केला आहे पण मी कधीही कोणाच्या माझ्यावरील प्रेमाचा फायदा घेतलेला नाही. यामिनी माझ्या आयुष्यात आयुष्याच्या अशा टप्प्यावर आली जेव्हा मी हरलो होतो, निराश झालो होतो, मला कोणाच्यातरी मदतीची गरज होती, यामिनी ती मदत करण्यात सक्षम होती म्हणून मी तिच्याशी लग्न केलं... तिच्याशी लग्न केल्यामुळे मी माझं ध्येय गाठू शकलो.. ती माझ्या आयुष्यात आली नसती तर मी माझ्या ध्येयाच्या रस्त्यात चाचपडत राहिलो असतो. माझ्या आयुष्यात माझ्यावर उपकार करणारी ती एकमेव व्यक्ती आहे... मी ऋणात आहे तिच्या...

प्रतिभा : पण ताईला आता तुमच्या प्रेमाची गरज आहे ...

विजय : जे माझ्याकडे नाहीच ते मी तिला कसं देऊ... पण मी तिला मला प्रेम देण्यापासून रोखले नाही... तसेही प्रेम करणे ही स्त्रीची गरज असते आणि प्रेम मिळविणे ही पुरुषाची गरज असते.

प्रतिभा : मी एक सामान्य स्त्री आहे तुम्ही हे जे काही बोलता ते मला कळत नाही पण.. ताईला तिच्या हक्काचं प्रेम मिळावं इतकंच मला वाटतं.. मी येते आता ..

विजय : बरं .. . बाई ...

प्रतिभा निघून गेल्यावर विजय स्वतःशीच बोलू लागतो...

विजय : प्रतिभा ! तू जी चुकी केली होतीस तीच चूक माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वानी केली आणि यामिनीही तीच चूक करतेय ! तू ही तुझे माझ्यावरील प्रेम कधी व्यक्त केले नाहीस, माझ्यावर प्रेम करणाऱ्या दुसऱ्या कित्येकींनीही ते केले नाही.. यामिनीही कधी स्वतःच्या तोंडाने म्हणाली नाही की विजय माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझ्या प्रेमाची गरज आहे .. ती ही त्या सर्वजणींसारखी मी तिच्या प्रेमात पडण्याची वाट पाहतेय.. मला नेहमीच माझ्या आयुष्यात अशी स्त्री हवी होती जी स्वतःच्या तोंडाने माझ्यावरील तिचे प्रेम व्यक्त करेल.. जगासमोर... प्रतिभाने जरी तिचे माझ्यावरील प्रेम व्यक्त केले असते तर मी तिच्याशीही लग्न केले असते... त्या सर्वांच्या नजरेत मी राक्षस ठरलो पण माझी त्यांच्याकडून एक छोटीशी अपेक्षा होती. तरीही एकीच्या बाबतीत मी माझा हट्ट सोडून माझे प्रेम कित्येकदा व्यक्त केले पण तिला माझे प्रेम कधी कळेलच नाही ... त्या रागाच्या भरातच मी यामिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला...

असा विचार करता करता विजय पुन्हा लॅप टॉपवर काम करण्यात गुंग झाला... इतकयात दारावरची बेल वाजली विजयने दरवाजा उघडला तर दारात कविता आणि तिची आई उभी होती. त्यांच्याकडे पाहत ...

विजय : कमळ वाहिनी ! या ! या ! आत या !

कमळ वाहिनी : काय भावोजी ? कधी आलात गावावरून ??

विजय : मी सोमवारी आलो .. काही काम होत का ?

कमळ वाहिनी : अहो ! या कविताला निबंध लिहून हवा होता म्हणून आले होतें

विजय : काय गं ! कविता कोणत्या विषयावर निबंध लिहून हवाय ?

कविता : पाऊस ..

विजय : बरं ! मी लिहतो आणि मम्मीला व्हाट्सअँप करतो..

कमळ वाहिनी : ही श्रावणी कोण आहे ? त्या दिवशी तुम्ही गावाला गेला होतात आणि कविताला चित्र काढून हवे होते तेव्हा तिने काढून दिले . ..

विजय : ती यामिनीची मानलेली बहीण आहे ... हल्ली आमच्यकडे घरातील कामे तीच येऊन करते तिचीच मुलगी आहे खूप हुशार आहे...

कमळ वाहिनी : हो का ? तिला भेटायलाच हवे एकदा !

विजय : नक्की भेटा !

कमळ वाहिनी : चला भावोजी ! मी निघते ! तुम्ही तुमची कामे आटपा

विजय :बरं या वाहिनी !

कविता : बाय काका !

विजय : बाय बेटा...

त्या दोघी निघून गेल्यावर विजय कवितांसाठी मोबाईलवर निबंध टाईप करतो तो कमळ वहिनींना पाठवतो आणि स्वयंपाक घरात जातो.. प्रतिभाने केलेले जेवण जेवतो आणि तयार होऊन घराच्या बाहेर पडतो...

संध्याकाळी प्रतिभा नेहमी सारखी येते आणि तिची कामे करायला सुरुवात करते. थोड्या वेळाने यामिनी कामावरून माघारी येते फ्रेश होते चहा नाश्ता करते आणि स्वयंपाकघरात प्रतिभाशी गप्पा मारायला जाते.

यामिनी : काय प्रतिभा ! आज भाजी काय करतेयस ?

प्रतिभा : सुरणाची भाजी करते ! तुमच्यासाठी अंडीही करते !

यामिनी : बरं ! मी काही मदत करू का ?

प्रतिभा ! नको ताई तुम्ही फक्त गप्पा मारा .. मी काम करते

यामिनी : विजयाने फोन केला होता का ?

प्रतिभा : हो ! एक दोन दिवस आड करून ती फोन करते.. ताई मी साहेबाना विचारले की तुम्ही ताईंपासून असे दूर दूर का असता ?

यामिनी : मग ! काय म्हणाला तो ?

प्रतिभा : काहीतरी गोल गोल बोलत होते मला काही समजलं नाही पण एक गोष्ट समजी

यामिनी : कोणती ?

प्रतिभा : ते तुम्हाला जवळ करत नसतील तर तुम्ही त्यांना जवळ करा...

यामिनी : तीच हिंमत होत नाही ना ! तितकी हिंमत माझ्यात असती तर बागायलाच नको होते !

प्रतिभा : मग ! अवघडच आहे .. आता..

यामिनी : आता काय ? ते बघू नंतर अजून आयुष्य पडलेले आहे !

प्रतिभा : ते ही असंच काहीस म्हणाले ..तुमचे विचार किती सारखे आहेत 

यामिनी : ते असणारच आम्ही एकच शाळेत एकाच वर्गात होतो ना !

प्रतिभा : म्हणजे तुमची मैत्री शाळेपासूनची आहे

यामिनी : शाळेत असताना आमच्यात मैत्री होती पण विजय मुलींशी फार बोलत नसे .. शाळा सुटल्यावर आम्ही पुन्हा भेटलो तेव्हा आमच्यात खऱ्या अर्थाने मैत्री झाली.. पण तेव्हा विजय पूर्वीसारखा लाजरा - बुजरा राहिलेला नव्हता.

प्रतिभा : तुमचं लव्ह मॅरेज आहे ना ?

यामिनी : आमचं लव्ह मॅरेज नाही ! आमचं लग्न ही बहुतेक आमच्या दोघांची गरज होती. आमचं लग्न म्हणजे त्या गरजेसाठी केलेली तडजोड होती..

प्रतिभा : आता तुम्ही गोल गोल बोलताय..

यामिनी : ते जाऊदे ! तू बोल ? तुझं लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज ...

प्रतिभा : माझं अरेंज मॅरेज ! आई वडिलांनी लग्न ठरवलं आणि मी केलं..

यामिनी : तुझं दुसऱ्या कोणावर प्रेम होत का ?

प्रतिभा : नाही ! हो ! ताई ! प्रेम विवाह करण्याची इच्छा खूप होती पण सर्वांच्या सर्वच इच्छा नाही ना पुऱ्या होत, आता तुमचंच बघा ! तुम्हाला लहान मुलांची इतकी आवड पण देवाने नेमकं तुमच्याकडूनच तुमचं मातृत्व हिरावून घेतलं.. देवपण असा आहे ना ज्याला दात देतो त्याला दाणे देत नाही आणि ज्याला दाणे देतो त्याला दात देत नाही.

यामिनी : खरं आहे तुझं ! पण याबतीत विजयचे म्हणणे मला पटते , तो म्हणतो या जगात तसे कोणीच कोणाचे नसते आणि पहिले तर सर्वच सर्वांचे नातेवाईक असतात कारण सर्व प्राणी एकाच तत्वातून आणि पंच महाभूतांपासून निर्माण झालेले असतात...

प्रतिभा : खरं आहे !

यामिनी : जेवण झालं का ? हो ! होतच आलंय ! जेवण झालं कि आपल्या दोघींसाठी छान मॅगी बनव आणि बाहेर घेऊन ये ! मी जरा मालिका बघते !!

प्रतिभा : चालेल...

यामिनी बाहेर सोफयावर येऊन बसते थोड्यावेळाने प्रतिभा दोघींसाठी मॅगी तयार करून आणते ती खाता खाता

यामिनी : साहेब ! तू असतानाच गेले की नंतर

प्रतिभा : जेवून गेले असतील नंतर

यामिनी : बरं ... तू निघ आता आणि जाताना मी फ्रिजमध्ये मुलांसाठी आणलेले चॉकलेट ठेवले आहेत ते तेवढे घेऊन जा...

प्रतिभा : बरं !

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी टी.व्ही . पाहत असताना दारावरची बेल वाजते , यामिनी पुढे होत दार उघडते तर दारात कमळ वाहिनी उभी असते.

यामिनी : अगं ! कमळ ये ना ! किती दिवसांनी भेटतेस मला ..

कमळ : मी रोज येईन येईन म्हणते पण वेळच मिळत नाही मी रिकामी असते तेव्हा तू कामाला असतेस आणि तू घरी येतेस तेव्हा मी कामात असते.

यामिनी : बरं आज कशी आठवण आली ?

कमळ : बरेच दिवस झाले तुला भेटले नाही ! म्हणून म्हणाले ,'' चला तुला भेटून येते .. मी आले होते दुपारी भावोजींकडून कवितांसाठी निबंध लिहून घ्यायाला ...

तुझ्याकडे कामाला म्हणे तुझी मानलेली बहीण येते !

यामिनी : हो ! आताच गेली.. थोड्या आधी आली असतीस तर मी तिची तुझ्याशी ओळख करून दिली असती.

कमळ : ठीक आहे ग ! होईलच आज उद्या आमची भेट .. नाव काय म्हणालीस तीच ?

यामिनी : प्रतिभा !

कविता : छान नाव आहे ? तिची मुलं पण खूप गोड आहेत म्हणे ! कविता सांगत होती ! तिच्या मुलीने कविताला चित्र काढून दिले ना ! छान चित्र काढते

यामिनी : हो ! तू चहा घेणार का ? तयारच आहे मी घेऊन येते

कमळ : हो ! चालेल ..

दोघी चहा पित असतात इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी दार उघडते तर दारात विजय उभा असतो तो आत येताच

विजय : काय ? कमळ वाहिनी निबंध मिळाला ना ??

कमळ : हो ! भावोजी ...

विजय : तुमच्या चालुद्या गप्पा मी फ्रेश होऊन येतो.

कमळ : काय ? भाजी काय केली आहे आज ?

यामिनी : सुरणाची केली आहे

कमळ : मला देतेस का थोडी भाजी ? आमच्याकडे आज चिकन केले आहे , कविताला ते नको !

यामिनी : थोडी का ? पाहिजे तेवढी घेऊन जा ...

कमळ : मी तुझ्यासाठी चिकन पाठवू का ?

यामिनी : नको ! माझ्याकडे अंडीही केली आहेत ..

कमळ यामिनीकडून सुरणाची भाजी घेऊन निघून जाते आणि विजय फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसतो...

विजय : त्या प्रतिभाला तू काय सांगितलं ?

यामिनी : जे सत्य आहे ते सांगितलं

विजय : पण काय गरज काय होती ? आता तिने विजयाला सांगितले तर...

यामिनी : नाही सांगणार ! माझा विश्वास आहे तिच्यावर

विजय : आपण लग्न करण्यापूर्वीच मी तुला सांगितले होते मला लग्न वगैरे या गोष्टीत अजिबात रस नाही, तुझी आणि माझी सामाजिक गरज पूर्ण करण्यासाठी आपण लग्न करूया ! समाजासाठी आपण नवराबायको असू त्यांच्यासाठी नवरा बायकोसारखे वागू पण एकांतात आपण फक्त चांगले मित्र असू.. तू विसरलीस का ते ?

यामिनी : मी काही विसरले नाही ! तेव्हा मी माझ्या भावनांवर दगड ठेऊन तुझ्या अटी मान्य केल्या पण आता मला माझ्या भावनांना आवर नाही घालता येत

विजय : त्याला मी काय करू ? ती तुझी समस्या आहे ! माझी नाही..

यामिनी : तुझ्यात खरोखरच काही भाव भावना नाहीत कि तू ...

विजय : तू काय ? ... बोल ना ?

यामिनी : जाऊ दे ! मला आता या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय ! मुलांचं सुख तर माझ्या नशिबात नाही आणि नवऱ्याचेही नाही, नवऱ्याचे सुख माझ्या नशिबात नाही हे मला अगोदरच कळायला हवे होते .. . तू माझ्याशी लग्न करून माझ्यावर उपकारच केलेस ना ! एखादी स्त्री मुलांना जन्म देण्यास असक्षम असताना आणि ती... असतानाही तू तिच्याशी लग्न करून महान ठरलास जगाच्या नजरेत.. पण जगाला काय माहीत तुझ्या महानतेची किंमत मी मोजतेय ते...

विजय : मी प्रतिभालाही सांगितले आणि तुलाही सांगतो... आपल्यातील नाते कायमच असे राहील असे नाही पण सध्यातरी ते तसेच राहील.

यामिनी : बरं ! सॉरी ! कधी कधी भावना अनावर झाल्या की माझा तोल सुटतो पण आता मी सावरले आहे... मला सतत भीती वाटत राहते एक दिवस तू मला सापडून तर जाणार नाहीस ना !

विजय : मी तुला कधीच सोडून जाणार नाही ! हे मी तुला आज वचन देतो..

यामिनी : खरंच ना !

विजय : हो ! बाई !

यामिनी हळूच विजयच्या कुशीत शिरते तो ही तिच्या डोक्यावरून हळुवार प्रेमाने हात फिरवतो.. यामिनीची त्याला मारलेली मिठी अधिक घट्ट होत जाते तो त्या मिठीला फारसा प्रतिसाद देत नाही पण विरोधही करत नाही असेच काही वेळ ते एकमेकांच्या मिठीत बसून राहतात आणि

विजय : जेवायचं नाही का आज ?

यामिनी : हो ! मी जेवण वाढायला घेते

यामिनी त्याच्या मिठीतुन मोकळी होत स्वयंपाकघरात जाते आणि जेवण घेऊन येते ते दोघे मस्त जेवतात आणि पुन्हा हातात - हात घालून टी. व्ही. वर एकत्र मालिका पाहत बसतात.

विजय : यामिनी तू मला आवडत नाहीस, अथवा माझे तुझ्यावर प्रेम नाही असे नाही... पण का कोणास जाणे मला स्त्रियांशी तशी शारीरिक लगट करण्याची इच्छा नाही होत.. माझ्यात काही तरी कमतरता आहे म्हणून तसे होते हा तुझा गैरसमज आहे. स्त्री पुरुष शारीरिक संबंध का ठेवतात त्यांना संतती प्राप्त व्हावी म्हणून... आपल्यात ती शक्यताही नाही त्यामुळे उगाच तुझ्यावर पुरुषी हक्क गाजवायला मला नाही आवडत त्यालाही एक कारण आहे ते मी तुला नाही सांगू शकत... जगात असा गैरसमज आहे की पुरुषाला स्त्री कडून फक्त एकच गोष्ट हवी असते... पण ते सत्य नाही ! पुरुषाला स्त्रीकडून फक्त निरपेक्ष प्रेमाचीही अपेक्षा असू शकते.

यामिनी : माझे तुझ्यावर प्रेम नाही का ?

विजय : ते आहे म्हणून तर तू अजूनही माझ्या आयुष्याचा भाग आहेस...

यामिनी : बरं ! मला आता खूप झोप आली आहे मी झोपायला जाते... शुभ रात्री...

यामिनी तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपी जाते आणि विजय तेथेच सोफ्यावर न झोपता त्याच्या बेड रूममध्ये जाऊन झोपतो. झोपता झोपता तो स्वतःशीच विचार करत असतो...

विजय : यामिनी खूप भोळी आहे... तिला वाटते तितके हे जग निर्मळ नाही... आज समाजात नात्यापेक्षाही शारीरिक सुखाचे महत्व वाढलेले आहे. त्यामुळेच समाजात आज अनैतिक संबंध आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारीही वाढलेली दिसते .... अनैतिक संबंध पूर्वीही होते पण त्यावर समाजाचा अंकुश होता जो आता अजिबात उरलेला नाही. अगदी आजी झालेल्या महिलांचेही अनैतिक संबंध आज समाजात पाहायला मिळतात तर पुरुषांचे तर विचार न केलेलाच बरा.. त्यामुळे आज समाजात नात्यांचा सावळा गोंधळ दिसू लागला आहे. नात्यांवरचा लोकांचा विश्वास उडू लागला आहे. नात्यात जिव्हाळा कमी आणि व्यवहार आता अधिक वाढू लागला आहे त्यामुळे हल्ली स्त्री पुरुष लग्न करतानाही व्यवहारी विचार करू लागल्यामुळे त्यांच्या नात्याचे आयुष्य कमी होऊ लागले आहे. यामिनी आणि माझ्यात जरी शारीरिक संबंध नसले तरी मी तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही याची मला खात्री आहे... पण म्हणून माझा कधी तोल जाणारच नाही याची खात्री मी माझ्या बाबतीही देऊ शकत नाही कारण पुरुष शेवटी लबाड... असतो.. हे सत्य नाकारता येणार नाही... हा असा विचार करता करता विजय झोपी जातो...


दुसऱ्या दिवशी सकाळी यामिनीला उशिरा ऑफिसला जायचे असते विजय आणि यामिनी सोफ्यावर बसून चहा पित असतात इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडून प्रतिभाला आत घेते... प्रतिभा आत येताच विजयला गुड मॉर्निंग करते ..

विजय : गुड मार्निंग

प्रतिभा : ताई तुम्ही अजून ऑफिसला गेला नाहीत

यामिनी : मी जाणार आहे ! पण थोडी उशिरा जाणारा आहे माझी एक मिटिंग आहे.

प्रतिभा : बरं ! मी स्वयंपाक करायला घेते

यामिनी : मी चहा केला आहे तो घे अगोदर... नाश्ता पण घे... कांदे पोहे केले आहेत.

प्रतिभा : तुम्ही कशाला केले ? मी केले असते की ?

यामिनी : त्यात काय इतके ! बरं तू स्वयंपाकाचं बघ ! मी माझ्या रूममध्ये आहे ? मला मिटिंगची तयारी करायची आहे.

प्रतिभा : चालेल ! काही चहा वगैरे लागली तर मला हाक मारा...

यामिनी बेडरूममध्ये आणि प्रतिभा स्वयंपाकघरात निघून गेल्यावर विजय तेथच सोफ्यावर बसून लॅप टॉपवर त्याचे काम करत असतो इतकयात त्याला कोणाचातरी फोन येतो आणि तो टकाटक तयार होऊन यामिनीच्या रूममध्ये यतो आणि

विजय : यामिनी मी जरा बाहेर जातोय ! प्रकाशकासोबत माझी मिटिंग आहे...

यामिनी : प्रकाशक म्हणजे ती मुलगी ना !

विजय : हो !

यामिनी : तेव्हाच इतका टकाटक होऊन चालला आहेस.. अत्तर वगैरे मारून , हे काय ? नवीन गॉगल पण घेतलास ! मजा आहे ... दुपारी जेवायला येणार आहेस ना ! नसशील येणार तर तसे प्रतिभाला सांगून जा.. म्हणजे ती जास्तीचा स्वयंपाक करणार नाही.

विजय : हो ! मी निघतो ... मला यायला रात्री उशीर होईल मला आणखीही एक दोन कामे आहेत.

यामिनी : बरं ! पण रात्री जेवायला येणार आहेस ना ?

विजय : हो ! बाय..

यामिनी : बाय .. .

विजय बाहेर जाताना प्रतिभाला सांगून जातो त्याच्यासाठी दुपारचे जेवण करू नको पण रात्रीचे कर मी रात्री घरीच जेवायला येणार आहे ... विजय निघून गेल्यावर यामिनीने प्रतिभाला हाक मारून तिच्या खोलीत बोलावले

यामिनी : प्रतिभा... माझ्यासाठी फक्त बटाटयाची भाजी आणि चार -पाच पोळ्या तेवढ्या बनव.. विजय नाही जेवायला ..

प्रतिभा : हो ! साहेब कोठे गेले इतके टकाटक होऊन .. .

यामिनी : त्याचीही आज मिटिंग आहे एका कोंबडी बरोबर ...

प्रतिभा : कोंबडी ?

यामिनी : म्हणजे त्याची नवीन प्रकाशक आहे ... मुलगी आहे.. म्हणजे बाई आहे पण अविवाहित आहे.. .

प्रतिभा : साहेबांना नाटयची सवय तशी पूर्वीपासूनच आहे

यामिनी : हो ! शाळेत असतानाही तोंडावर पिठासारखी पावडर थापून यायचा त्याची ती सवय अजूनही गेली नाही.

प्रतिभा : माणूस न बदललेलाच बरा असतो...

यामिनी : हो ! तो अजूनही नाही बदलला ! तो आजही इतका मोठा झाला तरी कोठेही बूड टेकवू शकतो... ते मला नाही जमत...

प्रतिभा : साहेबांचे पाय मात्र आजही जमिनीवर आहेत..

यामिनी : त्याचीच भीती वाटते ! आज त्याच्यासारखे पुरुष विरल झाले आहेत.. त्यामुळे कोणीही कधीही कोठेही त्याच्या प्रेमात पडू शकते आजही...

प्रतिभा : हे बाकी खरे आहे..

यामिनी : हल्ली अविवाहित मुलींना म्हणे विवाहित पुरुष अधिक आवडतात त्यातही विजय सारखे प्रसिद्ध आणि यशस्वी ! मग ते दिसायला कसे ही असले तरी त्यांना चालतात त्यात विजायचे आता जरा केस कमी झाले आहेत तरी तो दिसतो सुंदरच.. प्रतिभा तुला सांगते शाळेत असताना तो खांद्यापर्यत केस वाढवायचा आणि जोपर्यत पी.टी .चे शिक्षक त्याला केस कापून यायला सांगायचे नाही तोपर्यत तो केस कापायचा नाही ! पण कापले कि एकदम बारीक करून टाकायचा.. त्याला लांब केस आवडायचे पण त्याला त्याचाही मोह नव्हता.. आता त्याचे केस जाऊ लागले तरी त्याला त्याचे दुःख नाही . तो म्हणतो गेले तर सर्वच जायला हवे ! म्हणजे केस कापायचा त्रासच नाही ...

प्रतिभा : माणूस मानाने सुंदर असला कि त्याला बाह्य सौंदर्याची गरजच नसते

यामिनी : हे बाकी तू बरोबर बोललीस .. जा आता आपल्यासाठी चहा आणि बिस्कीट घेऊन ये ! आपण आज बिस्कीट पार्टी करूया !

त्यांच्यातील संवाद सुरु असतो इतक्यात दारावरची बेल वाजते प्रतिभा बाहेर जाऊन दार उघडते तर दारात कमळ उभी असते

कमळ : यामिनी ! आहे ना घरात ?

प्रतिभा : हो ! ताई आहेत आत त्यांच्या रूममध्ये , या ! ना !

कमळ : तू प्रतिभा ना ?

प्रतिभा : हो !

त्या दोघी यामिनीच्या रूममध्ये येतात

यामिनी : कमळ येना ! मी उशिरा जाणार आहे म्हणून तुला फोन केला, कमळ ! हि प्रतिभा माझी मानलेली बहीण आहे ... प्रतिभा ही माझी मैत्रीण कमळ आपल्या वरच्या घरातच राहते... हिची मुलगी कविता .. खूप गोड आहे तू भेटली आहेस ना तिला ?

प्रतिभा : हो ! तुम्ही गप्पा मारत बसा मी तुमच्यासाठी चहा बिस्किटे घेऊन येते.

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर

यामिनी : कविता ! गेली का शाळेत ?

कमळ : हो ! आताच गेली.

यामिनी : प्रतिभा ! यायला लागल्यापासून माझ्या डोक्याचा ताप जरा कमी झाला ! तू येत जा ! अधून मधून वेळ मिळाला तर प्रतिभाही गप्पा मारायला

कमळ : हो ! नक्की ! भावोजी कोठे गेले आज सकाळी सकाळी नटून..

यामिनी : त्यांची एका प्रकाशकासोबत मिटिंग आहे.

कमळ : तुमच्या लग्नाचा वाढदिवस जवळ आला आहे ! ह्यावर्षी काय प्लॅन आहे ?

यामिनी : आपण सर्व कोठेतरी बाहेर फिरायला जाऊ या !

कमळ : गोव्याला जाऊ या का ? आमच्या गावाहून जवळ आहे . अगोदर आमच्या गावी जाऊया !

यामिनी : चालेल ! मी विजयला विचारते मग ! ठरवूया ! प्रतिभाला पण घेऊन जाऊ या.. खूप मज्जा करू या ...

प्रतिभा चहा बिस्किटे घेऊन येते तिघी बिस्कीट पार्टी करत असताना

कमळ : प्रतिभा ! तू येशील ना ! आमच्याबरोबर गोव्याला ?

प्रतिभा : गोव्याला काय आहे ?

कमळ : प्रतिभा ! पुढच्या आठवड्यात यामिनीच्या आणि विजयाच्या लग्नाचा वाढदिवस आहे त्याची पार्टी करायला आपल्याला गोव्याला जायचे आहे

यामिनी : प्रतिभा ! तू गेलेस कधी गोव्याला ?

प्रतिभा : नाही ! पण मला जायला आवडेल...

कमळ : मग ! ठरलं यावेळी गोवा फिक्स ! मी आता निघते घरी कामे खूप आहेत.. प्रतिभा ! मी येत जाईन अधून मधून तुला भेटायला ! तुझीही कामे लवकर आटपली तर येत जा ! मला भेटायला.

प्रतिभा : हो ! चालेल !

कमळ निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाक घरात तिची कामे करत असते.. यामिनीची ऑफिसला जाण्याची वेळ झाल्यावर ती थोडं जेवते आणि प्रतिभाचा निरोप घेऊन निघून जाते.. यामिनी निघून गेल्यावर प्रतिभा तिची आवराआवर करते आणि तिच्या घरी निघून जाते.

संध्याकाळी यामिनी पुन्हा कमावर येते ... तर यामिनी घरी आलेली असते

प्रतिभा : ताई लवकर आलात ?

यामिनी : हो मिटिंग लवकर आटपली मग मी सरळ घरीच आले .. हे काय आत्ताच आले.

प्रतिभा : बरं मी चहा करते...

यामिनी : फक्त चहा कर ! मी येताना गरम गरम समोसे आणले आहेत ते आपण खाऊया ! थांब मी कमळला आणि कविताला बोलावते तोवर तू चहा कर .. . यामिनी कमळला फोन लावते आणि बोलावून घेते कमळ आणि कविता आल्यावर प्रतिभा सर्वांसाठी चहा आणि समोसे घेऊन येते त्या सर्वजणी मिळून त्या समोस्यावर ताव मारतात.

कमळ : समोसे छानच आहेत ! त्या नाक्यावरच्या फेमस समोसेवाल्याकडून आणलेले दिसत आहेत ?

यामिनी : हो !

कमळ : मस्तच ! खूप दिवसांनी खातेय ! पूर्वी आपण संध्याकाळी उशिरा फिरत फिरत जायचो तेव्हा खायचो ! हल्ली आपल्या दोघीनाही वेळ मिळत नाही !

यामिनी : कविता आवडला का समोसा ?

कविता : खरंच ! खूप छान आहेत .

यामिनी : प्रतिभा ! तुला आवडले का ?

प्रतिभा : हो ! खूपच छान आहेत ? आपण एकदा घरी वडापाव करूया !

यामिनी : चालेल ! हा कार्यक्रम आपण शनिवारी करूया !

कमळ : हो ! चालेल मी पण येईन तुझ्या मदतीला

कविता : मी पण येणार... प्रतिभा मावशी श्रावण आणि श्रावणीलाही घेऊन या .. .

यामिनी : म्हणजे काय त्यांना तर आपण बोलावणाराच ! प्रतिभा ! जाताना त्यांच्यासाठीही सामोसे घेऊन जा...

प्रतिभा : आणखी काही हवे का ?

कमळ : प्रतिभा ! अजून एक एक चहा व्हायला हवी !

प्रतिभा : मी लगेच करून आणते..

कमळ : यामिनी ! तू नशीबवान आहेस ! तुला अशी मानलेली बहीण मिळली !

यामिनी : ती फक्त माझी मानलेली बहीण नाही ! ह्याच्या जिवलग मित्रांचीही मावस बहीण आहे...फक्त शिक्षण नसल्यामुळे बिचारी मागे पडली आहे.

कमळ : चालत गं ! आम्ही नाही का ? इतक्या शिकून दिवसभर धुनी - भांडी करत ?

यामिनी : ते बरोबर आहे काम शेवटी काम असत ! त्यात लहान मोठं असं काही नसतं , प्रत्येक कामाचं आपल्या जागी एक महत्व असतं.

कमळ : पण मी तुझ्या प्रतिभाच्या प्रेमात पडले आहे मला तिच्याशी मैत्री करायला आवडेल...

यामिनी : हो ! ती आहेच अशी की कोणीही तिच्याशी मैत्री करावी... भावोजींचा बिझनेस काय बोलतोय ?

कमळ : उत्तम चालला आहे सध्या !

यामिनी : आमचे साहेबही आता बिझनेस करायचा विचार करता आहेत !

कमळ : करू दे कि मग !

यामिनी : मी कोठे नाही म्हणाले , मला थोडीच भांडवल द्यायचे आहे ...

कमळ : भावोजी खूपच व्यवहारी आहेत ते रिस्क घेऊन काहीच करणार नाही ...

इतक्यात प्रतिभा ! सर्वांसाठी पुन्हा चहा घेऊन येते तिच्या हातचा गरम गरम चहा पिऊन सर्व तृप्त होतात...

कमळ : प्रतिभा ! आज भाजीत काय करणार आहेस ?

प्रतिभा : मी येताना अळूची पाने आणली आहेत त्याच्या अळूवड्या करायच्या म्हणतेय !

कमळ : अळूवड्या जरा जास्तीच्या कर मी घेऊन जाईन नंतर यामिनीकडून

यामिनी : कशाला मीच आणून देईन तुला भिऊ नकोस !

कमळ : बरं ! मी निघते आता ! चल कविता ! अभ्यासही करायचा आहे ना !

कविता : बाय ! काकी ! बाय ! मावशी

यामिनी : बाय ! बेटा !!

प्रतिभा : बाय ! बेबी !!

त्या दोघी निघून गेल्यावर

यामिनी :तू अळूवड्या करायला घेतल्यास की मला हाक मार मलाही पाहच्या आहेत त्या कशा करतात ? विजयला खूप आवडतात...

प्रतिभा : हो ! हो ! मी हाक मारते.

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर यामिनी तेथच सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत असते थोड्यावेळाने प्रतिभा यामिनीला हाक मारते आणि यामिनी स्वयंपाकघरात जाते.

यामिनी : झाली का तयारी अळू वाड्यांची ?

प्रतिभा : हो झाली...

यामिनी आणि प्रतिभा मिळून अळूवड्या तयार करतात दोघीही दोन दोन वड्या खाऊन बघतात... यामिनी प्रतिभाला तिच्या घरी थोड्या वड्या घेऊन जायला सांगते .. . प्रतिभा निघून गेळ्यावर यामिनी प्रतिभाने कमलसाठी भरून ठेवलेला वड्यांचा डबा सोबत घेऊन ती कमळला देऊन येते आणि सोफ्यावर बसून तिची आवडती मालिका पाहण्यात गुंग होते. इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडून विजयला आत घेते आत आल्यावर विजय यामिनीच्या हातात सोबत आणलेले चॉकलेट देतो आणि

विजय : हे चॉकलेट फ्रिजमध्ये ठेव ! प्रतिभाच्या मुलांना देता येतील..

यामिनी : बरं ! तू विकत घेतलेस कि तुला कोणी दिले ?

विजय : काहीही काय ? मीच विकत घेतले..... आणि आपल्याला कोण कशाला चॉकलेट देईल ! आपल्याकडे कोठे लहान मुले आहेत ?

यामिनी : अरे ! मी विनोद करतेय !

विजय : मला माहीत आहे.. बरं ! मी फ्रेश होऊन येतो..

विजय फ्रेश होऊन आल्यावर

यामिनी : कशी झाली मिटिंग ?

विजय : छान झाली ! तुझी ?

यामिनी : माझीही छान झाली

विजय : जेवणात काय केले आहे ?

यामिनी : बाकी नेहमीचंच आहे पण आज तुझ्या आवडीचा एक पदार्थ बनविला आहे

विजय : माझ्या आवडीचा काय ?

यामिनी : अळूवड्या बनविल्या आहेत

विजय : वा ! अळूवड्या !! मी जाऊन एक - दोन खाऊन येतो.

यामिनी : थांब मीच घेऊन येते ! तू बस !

यामिनी त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये अळूवड्या घेऊन येते त्या खाताना

विजय : काय मस्त अळूवड्या आहेत ..

यामिनी : मी ही तिला मदत केली आहे म्हटलं !

विजय : थँक्यू !

यामिनी : अळूवड्या तुला इतक्या जास्त आवडतात हे मला माहीत नव्हतं.

विजय : मला माझ्या आईच्या हातच्या अळूवड्या प्रचंड आवडतात , आता गावी गेल्यावर मी आईच्या हातच्या वड्या खाल्ल्या होत्या.

यामिनी : मग ! तुला आज दोन घास जास्तच जातील नाही ?

विजय : दोन काय ? चार घास जास्त जातील...

थोड्यावेळाने इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर ते दोघे जेवण करुणापापल्या जागेवर झोपी जातात....

दुसऱ्या दिवशी थोडी उशिरा प्रतिभा कामाला येते.. यामिनी तिच्या ऑफिसात निघून गेलेली असते विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो

प्रतिभा : काय ! साहेब !! कालच्या अळूवड्याआवडल्या का ?

विजय : आवडल्या काय ? म्हणजे काय ?? खूपच स्वादिष्ठ झाल्या होत्या... तुझ्या हाताची चव त्यात उतरली होताना !

प्रतिभा : फक्त माझ्याच नाही तर ताईंच्या हातची चवही त्यात उतरली होती..

विजय : अजून शिल्लक आहेत थोड्या आज दुपारच्या जेवणात फक्त पाळ्या कर बाकी काही नको ! हो ! पण ! अगोदर माझ्यासाठी चहा गरम करून घेऊन ये ! तू यायला लागल्यापासून हल्ली मला चहा गरम करून घ्यायलाही कंटाळा यायला लागला आहे.

प्रतिभा : बरं ! मी घेऊन येते...

प्रतिभा विजयासाठी चहा बिस्किटे घेऊन आल्यावर

विजय : विजयाचा फोन वगैरे आला होता कि नाही ?

प्रतिभा : कालच आला होता सर्वांची चौकशी करत होती.. पुढच्या आठवड्यात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना ?

विजय : तुला कसं माहित ?

प्रतिभा : त्याच काय झालं ! ताई आणि कमळताई ! तुमच्या लग्नाचा वाढदिवस गोव्याला साजरा करण्याचा प्लॅन करत होत्या तेव्हा त्यांनी मलाही विचारले गोव्याला येणार का ?

विजय : मोठाच प्लॅन दिसतोय ! तू येणार आहेस ना ! मुलांनाही घेऊन ये ! नवरा आला तर त्यालाही घेऊन ये !

प्रतिभा : मी मुलांना घेऊन येईन पण ते नाही येऊ शकणार कारण पुढच्या आठवड्यात ते कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत..

विजय : तुझ्या नवऱ्याला भेटायला सांग मला एकदा मी नवीन उद्योग सुरु करायचा विचार करतोय ! त्याची जर मला त्याच्यात काही मदत होणार असेल तर त्यालाही घेईन मी त्यात सहभागी करून..

प्रतिभा : हो ! मी बोलते त्यांच्याशी !

इतकयात दारावरची बेल वाजते... प्रतिभा पुढे होत दार उघडते तर दारात कमळ उभी असते तिला आत घेताच

विजय : कमळ वाहिनी या ! या ! आज सकाळी सकाळी इकडे !

कमळ : अहो ! भावोजी कालच्या अळूवड्यांचा डबा द्यायला आले होते.. राहिला कि राहिला ...

प्रतिभा : ताई ! तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते ! तुम्ही बसा !

विजय : काय वहिनी ! कविता गेली का शाळेत ?

कमळ : हो ! गेली ! तुमचं काय चाललंय ? कोणतं नवीन पुस्तक प्रकाशित करताय !

विजय : एक कादंबरी प्रकाशित करतोय !

कमळ : अरे ! वा ! मस्तच मलाही बोलवा प्रकाशनाला !

विजय : बस्स काय वाहिनी ! आमच्या घरच्या कोणत्याही कार्यक्रमाला तुम्हाला बोलावले नाही असे झाले आहे का ?

कमळ: नाही ! कार्यक्रमावरून आठवले ! तुमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायला आपण गोव्याला जाऊया ! म्हणजे अगोदर आमच्या गावी जाऊया तेथून गोव्याला जाऊया ! चालेल ना !

विजय : आता तुम्ही ठरवलंच आहे तर नाही ! म्हणायची आमची काय भिशात...

प्रतिभा कमळसाठी चहा बिस्किटे घेऊन येते ..

कमळ : भावोजी तुम्हाला ?

विजय : हा ! काय ? मी आताच घेतला

कमळ : प्रतिभा ! काय पण बोल ... तुझ्या हाताला चव आहे

प्रतिभा : थँक्स ताई !

कमळ : आपण गोव्याला जाऊ ना ! तेव्हा आमच्या घरीपण आपण काहीतरी नवीन पदार्थांचा बेत करू ... तू मटण खातेस ना ?

प्रतिभा : हो !

विजय : म्हणजे मला उपाशी मारायचा तुमचा प्लॅन दिसतोय !

कमळ : तुमच्यासाठी ! आपण काजूच्या बियांची भाजी करूया .. .

विजय : मग ! चालेल ...

कमळ : अरे ! बापरे ! मी बोलत काय बसले ? अजून किती कामे करायची आहेत ... मी निघते.. प्रतिभा .. भावोजी

प्रतिभा : हो ! हो !

कमळ निघून गेल्यावर

विजय : ही कमळ आणि तिचा नवरा स्वभावाने खूप चांगले आहे आमच्यावर त्यांचा खूप जीव आहे

प्रतिभा : हो ! ना ! बरं मी माझी कामे आटपते

प्रतिभा तिची कामे आटपून तिच्या घरी निघून जाते ...विजय तेथेच सोफ्यावर बसून त्याच्या लॅप टॉपवर काम करत असतो इतकयात दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उघडतो तर दारात एक सुंदर तरुणी उभी असते, गोऱ्या रंगाची, घाऱ्या डोळ्याची, कुरळ्या केसांची, गालाला खळी असणारी आणि हनुवटीवर तीळ असणारी.. चंद्रमुखी.. जणू ... क्षणभर विजय मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे पाहत बसतो. ती त्याच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवत !

ती तरुणी ( कामिनी ) : सर ! कोठे हरवलात

विजय : तुझ्या डोळ्यात ! कामिनी !

कामिनी: सर ! तुम्ही ना ! काहीही बोलता...

विजय : खरंच तुझ्या डोळ्यात हरवलो होतो मी.. तू इकडे कशी ? ये ! ना ! आत ये !

ती आत येऊन सोफ्यावर बसते.. विजय तिच्यासाठी पाणी आणतो , ती पाण्याचा एक घोट घेते आणि ..

कामिनी : सर ! तुमचं घर खूपच छान आहे ..

विजय : थँक्स

कामिनी : तुम्ही एकटेच घरात आहात का ?

विजय : हो ! का ग ?

कामिनी : का ! नाही ! सहज ...

विजय : तू चहा घेणार का ?

कामिनी : तुम्ही करणार का ? तर मी घेणार ??

विजय : हो ! मीच करणार ! आणखी कोण करणार ?

विजय स्वयंपाक घरातून दोघांसाठी चहा आणि बिस्किटे घेऊन येतो तोपर्यत कामिनी विजयला भेटलेली प्रमाणपत्रे निरखून पाहत असते.

कामिनी : सर तुम्हाला किती प्रमाणपत्रे भेटली आहेत...

विजय :चहा घे !

चहा घेता घेता ...

कामिनी : सर ! चहा किती छान आहे ... तुमच्या हाताला चव आहे ... तुमची बायको नशीबवान आहे ...

विजय : का ?

कामिनी : हाताला चव असणारा नवरा भेटतो कोठे हल्ली !

विजय : आज तू अचानक येथे कशी काय आलीस ?

कामिनी : मला एका राजकारणी व्यक्तीची मुलाखत घ्यायची होती त्या संदर्भात मला तुमची थोडी मदत हवी होती..

विजय : असं ! होय ! तरीच मी विचार करत होतो कामिनीला माझी आठवण कशी काय आली ?

कामिनी : सर ! तुम्हाला कोणी विसरू शकतो का ?

विजय : ते आहेच !

कामिनी : मी त्या राजकारण्यांचा बऱ्यापैकी अभ्यास केला आहे पण ! तुमचा राजकारणाचा अभ्यास जरा जास्तच आहे कारण बरेच राजकारणी तुमचे मित्र आहेत..

विजय आणि कामिनी यांच्यात बराच वेळ संवाद सुरु असतो ... कामिनी तिच्याकडच्या वहीवर टिप्पण काढत असते तिचे काम झाल्यावर ती विजयाचा हसत निरोप घेऊन निघून जाते ...

कामिनी निघून गेल्यावर विजय सोफ्यावर बसून स्वतःशीच विचार करत असतो

विजय : कामिनी ... तिच्या नावात काम... दिसायलाच कामुक ... पण निर्मळ मनाची ! माझी आणि तिची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा पाहता क्षणी मी तिच्या क्षणभर प्रेमात पडलो होतो... पण ती ही माझ्यासारखीच ध्येय वेडी तिला मोठी पत्रकार व्हायचे आहे ... माझ्यातील लेखकाबद्दल तिला प्रचंड प्रेम आणि आदर आहे.. या जगात ती एकमेव आहे जिच्याशी मी कोणत्याही अगदी कोणत्याही म्हणजे खाजगी विषयावर स्पष्ट बोलू शकतो.. मला ती माझेच प्रतिबिंब वाटते जर मी यामिनीशी लग्न केले नसते तर मला हिच्या प्रेमात पडायला नव्हे पडून राहायला नक्कीच आवडले असते. बुद्धी आणि सौंदर्य हे कधी बहुदा एकत्र नांदत नाही पण कामिनी याला अपवाद आहे. तिला पाहता क्षणी लोक तिच्या प्रेमात पडतात... ती रस्त्यावरून चालत असताना लोक वळून वळून पाहत असतात ... ती तिच्या आयुष्यात प्रचंड यशस्वी होणार याबद्दल मला यकिंचितही शंका नाही... 

विजय त्याच्या विचारातून बाहेर येतो तेव्हा त्याला भूक लागलेली असते तो स्वयंपाक घरात जातो आणि जेवण करून तयार होऊन बाहेर येतो. कोणालातरी फोन करतो आणि घरातून बाहेर पडतो.

संध्याकाळी प्रतिभा स्वयंपाकघरात तिचे काम करत असते इतक्यात दारावरची बेल वाजते प्रतिभा पुढे होत दार उघडते तर दारात कमळ उभी असते. प्रतिभा तिला आत घेताच

कमळ : आज सकाळी भावोजींना भेटायला कोणी मुलगी आली होती का ?

प्रतिभा : नाही ! म्हणजे मी असेपर्यत तरी कोणी आली नव्हती ..

कमळ : म्हणजे तू गेल्यावरच आली असेल

प्रतिभा : पण का ?

कमळ : काही ! नाही ! वाचमन सांगत होता.. विजय भावोजींना भेटायला कोणीतरी हिरोईन आली होती.

प्रतिभा : हिरोईन.. ?

कमळ : वाचमन तर असच म्हणत होता..

प्रतिभा : असेल त्यांच्या ओळखीची कोणीतरी ! काही कामासाठी आली असेल ...

कमळ : वाचमन म्हणत होता बराच वेळ थांबली होती म्हणे ! तू असतीस तर नक्की कोण होती ते तरी कळले असते.

प्रतिभा : कशावरून ती हिरोईनच होती ? दुसरीही कोणी असू शकते.

कमळ : हे ! होऊ शकत.. चल मी निघते...

कमळ निघून गेल्यावर प्रतिभा दरवाजा बंद करून घेते आणि स्वयंपाकघरात तिची कामे करण्यात गुंग होते ....

तासाभराने पुन्हा दारावरची बेल वाजते, प्रतिभा दार उघडून यामिनीला आत घेताच..

यामिनी : आज आपल्या घरात कोणती हिरोईन आली होती ? येताना सर्वजण मला विचारत होते ??

प्रतिभा : ताई मला माहीत नाही मी गेल्यावर ती आली होती ... मगाशी कमळ ताईही विचारत होत्या..

यामिनी : म्हणजे अक्ख्या इमारतीत खबर पोहचली वाटतं.. ते जाऊदे तू माझ्यासाठी चहा टाक ! तोपर्यत मी फ्रेश होते.

प्रतिभा : हो !

यामिनी चहा पितच असते इतकयात दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दारात कमळ असते ..

कमळ : यामिनी तू आलीस ! मी पहिले खिडकीतून तुला स्कुटीवरून येताना म्हणून धावत आले

यामिनी : धावत यायला काय झाले.. .

कमळ : तुला माहीत आहे का ?

यामिनी : हेच ना आज सकाळी विजयला भेटायला एक हिरोईन आली होती..

कमळ : पण ती कोण होती ? हे तुला माहीत नाही ??

यामिनी : ते विजयला विचारल्यावर कळेलच की !

कमळ : विचारायची काही गरज नाही मी माहिती काढली ती .. कामिनी ! होती ती नाही का टी.व्ही .वर राजकारण्यांच्या आणि मोठं मोठ्या लोकांच्या मुलाखती घेते...

यामिनी : कामिनी ! मी ओळखते तिला , एकदोन कार्यक्रमात भेटली आहे मी तिला, विजयची चांगली मैत्रीण आहे ती.. खूप जुनी मैत्री आहे त्यांच्यात, खूपच बोल्ड विचारांची आहे ती, बोलायलाही भयंकर आहे... दिसायला तर विचारूच नको..

कमळ : हो ! मी पहिला तिचा फोटो गुगलवर..

यामिनी : तू पण ना !

कमळ : ते जाऊदे ! आपल्या गोव्याच्या ट्रिपचा काय ? विचारलेस का विजय भावोजींना..

यामिनी : नाही ! अजून !!

इतकयात प्रतिभा स्वयंपाकघरातून कमळसाठी चहा घेऊन येते..

कमळ : तुला कसे कळले मी आल्याचे !

प्रतिभा : मी आतून आवाज ऐकला.. मी साहेबाना सांगितले गोव्याच्या ट्रिप बद्दल तर ते हो ! म्हणाले आहेत...

कमळ : मस्तच ! मग आता आपण तयारी करायला घेऊया !

यामिनी : पण जायचे कसे ?

कमळ : आपण आमची गाडी घेऊन जाऊया ! सोबत एखादा ड्रॉयव्हर पण घेऊ या !

यामिनी : चालेल.. प्रतिभा तू पण तुझी तयारी करून घे !

कमळ : प्रतिभा ! साडी नेसून येऊ नकोस ! छान पंजाबी ड्रेस नाहीतर जीन्स घालून ये !

यामिनी : हो !

प्रतिभा : चालेल ! नशीब जीन्स घालून ये ! बोलला नाहीत...

त्यावर सर्वजणी मनसोक्त हसल्या...

यामिनी : प्रतिभा साडीतही छान दिसते ...

प्रतिभा : साडीत सर्वच बायका छान दिसतात ...

कमळ : ठिक आहे मग आपण एकाच रंगाच्या साड्याही घेऊ !

यामिनी : चालेल...

कमळ : मी निघते आता...

प्रतिभा : ताई मी ही निघते माझी सर्व कामे आटपली आहेत...

यामिनी : हो ! तू निघ..

प्रतिभा आणि कमळ निघून गेल्यावर यामिनी विजयची कधी नव्हे ती वाट पाहत बसलेली असते

रात्री उशिरा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडून विजयला आत घेताच ..

यामिनी : ती कामिनी कशाला आली होती आपल्या घरी ?

विजय : कशाला म्हणजे काय ? माझ्याकडे तिचे महत्वाचे काम होते म्हणून आली होती.

यामिनी : कसले महत्वाचे काम ?

विजय : एका मुलाखतीसाठी तिला माझी मदत हवी होती म्हणून आली होती ती ...

यामिनी : यापूर्वी कधी आली नाही ते !

विजय : नेहमी आम्ही तिच्या घरीच भेटतो पण आज ती आपल्या घराजवळून जात होती म्हणून आली

यामिनी : म्हणजे तू तिला तिच्या घरी भेटायला जातोस ?

विजय : हो ! काम असले तर जातो ! त्यात काय ? कामासाठी आम्हाला एकमेकांना भेटावेच लागते

यामिनी : पण यापूर्वी तू कधी मला हे सांगितले नाहीस

विजय : पण तसा कधी विषयच निघाला नाही , आज निघाला म्हणून सांगितले. तशीही मी तुझी तिच्याशी ओळख करून दिली होती.

यामिनी : पण आपल्या इमारतीत आज तिचीच चर्चा आहे ..

विजय : त्यात काय नवल ! ती सिलेब्रेटी आहे ...

यामिनी : किती वेळ होती ?

विजय : होती दोन -तीन तास !

यामिनी : जेवून गेली का ?

विजय : नाही ! ती नाही जेवत आपल्यासारखी ! तिचा डाईट असतो. म्हणूनच तर ती इतकी स्लिम आहे. माझ्या हातचा चहा तेवढा तिने घेतला..

यामिनी: म्हणजे तू तिला चहा बनवून दिलास.. . काय गरज होती ?

विजय : गरज होती म्हणजे ! ती पहिल्यांदा आपल्या घरी आली होती.. .

यामिनी : पण तू तिला घरी का बोलावलंस ?

विजय : मी बोलावलं नाही ! तिची तीच आली मला सरप्राईज द्यायला ..

यामिनी : म्हणजे ती तुला सर्प्राइजही देते ...

विजय : तू माझ्याशी भांडतेयस का ?

यामिनी : नाही ! मी फक्त बोलतेय ! ... अक्ख्या इमारतीत तिचीच चर्चा आहे.

विजय : ती आहेच ! कोणीही चर्चा करावी अशी ...

यामिनी : शक्यतो तिला पुन्हा आपल्या घरी बोलावू नकोस...

विजय : बरं .. बाई ... शक्यतो नाही बोलवणार...

यामिनी : बरं ! मी जेवण गरम करते तू फ्रेश हो ! आपण जेवून घेऊ या ...

जेवून झाल्यावर दोघे गप्पा मारत सोफ्यावर बसलेले असतात...

विजय : तू जळतेस का कामिनीवर ?

यामिनी : मी का जळू !

विजय : नाही मला आल्या आल्या धारेवर धरलेस म्हणून ...

यामिनी : तुझं उगाच काहीही ! बरं ! मी काय म्हणत होते आपल्या लग्नाचा वाढदिवस गोव्याला साजरा करायचा आहे

विजय : हो ! प्रतिभाने सांगितले मला.. आता तुमचे ठरलेच आहे तर जाऊया ! सर्वानाच तेवढा चेंज मिळेल....

यामिनी : चला झोपूया आता .. .

ते दोघेही आपापल्या रूममध्ये जाऊन झोपतात....

एक आठवड्यानंतर संध्याकाळी प्रतिभा एकदम नटून थटून म्हणजे छान पिवळा पंजाबी ड्रेस घालून बऱ्यापैकी पावडर लाली करून श्रावणी आणि श्रावणसह नटून थटून आलेली असते श्रवण आणि श्रावणीही नटून आल्यामुळे अधिकच गोंडस दिसत असतात तिला पाहताच ...

विजय : प्रतिभा ! किती सुंदर दिसते आहेस आज ... हा पिवळा पंजाबी ड्रेस तुझ्यावर खूपच खुलून दिसतोय...

प्रतिभा : खरंच साहेब !

विजय : खरंच ! मी कशाला खोटं बोलू ? जशी पूर्वी दिसायचीच अगदी तशीच सुंदर आज दिसतेस ..

प्रतिभा : थँक्यू ! थँक्यू ! ताई कोठे आहेत ?

विजय : ती तयार होतेय तिच्या खोलीत तू जा .. आत मी.. मुलांनो तुम्ही बसा ! मी तुमच्यासाठी चॉकलेट नको ! कपडे खराब होतील वेफर्स घेऊन येतो.

विजय दोन्ही मुलांच्या हातात एक एक वेफर्सचे पॉकेट देतो.

श्रावणी : थँक्यू ! काका !

श्रावण : थँक्यू ! काका !

विजय : मुलांनो तुम्ही तेथे काय काय खेळणार ?

श्रावणी : मला सर्व खेळ खेळता येतात काहीही खेळू !

श्रावण : मी पण ..

विजय : चालेल ! आपल्यासोबत कवितापण आहे आपण खूप मज्जा करू ... खूप फोटो काढू ...

श्रावणी : काका ! तिकडे मोठा समुद्र आहे का ?

विजय : तिकडे ! जिकडे जाऊ तिकडे समुद्र आहे...

श्रावण : वा ! मज्जा आहे !

श्रावणी : काका तुम्हाला पोहता येत का ?

विजय : बाळा ! नाही ! माझ्या आयुष्यात ती एकच गोष्ट आहे जी मी मनत असूनही शिकलो नाही. 

श्रावणी : आमची आई ! पोहते...

विजय : हो ! का ! छानच !

इतक्यात प्रतिभा यामिनीला तयार करून बाहेर घेऊन येते.. एरवी यामिनी इतकी कधीच नटत नाही ... पण आज ती कमाल दिसत होती.

विजय : यामिनी ! वा ! आज किती सुंदर दिसत आहेस तू .. आपल्या लग्नातही तू इतकी सुंदर दिसत नाहीस ... म्हणजे जेव्हा आपण कोर्टात लग्न करायला गेलो तेव्हाही तू इतकी सुंदर दिसत नव्हतीस ..

प्रतिभा : मग ! गोव्याला गेल्यावर आपण तुमचं पुन्हा लग्न लावू ..

विजय : हो ! आपल्याच बायकोसोबत पुन्हा पन्हा लग्न करण्याची नवीन फॅशनच आली आहे हल्ली ! पण मला तसे काहीही करायचे नाही !

यामिनी : मला चालेल..

विजय : एक तर मी तुझ्यासोबत विवाह केला असला तरी आजही माझा विवाह संस्थेवरच विश्वास नाही ! म्हणूनच तर आपण कोर्ट मॅरेज केला..

प्रतिभा : तुमच्या लग्नाला कोण कोण होते ?

विजय : अजय आणि माझे आणखी दोन मित्र होते आणि यामीनीच्या तिच्या ऑफिसातील तीन मैत्रिणी होत्या..

प्रतिभा : म्हणजे तुमच्या दोघाच्याही घरातील कोणी नव्हते ? पळून जाऊन लग्न केले की काय ?

यामिनी : नाही ! माझ्या घरचे त्यावेळी बाहेरगावी होते आणि विजयला त्याच्या घरातील कोणाला आमच्या लग्नाबद्दल सांगायचे नव्हते ..

प्रतिभा : पण का ?

यामिनी : ते जाऊदे ! मी कमळला फोन करते आणि विचारते ती तयार झाली का ?

प्रतिभा : मी आपल्यासाठी चहा बनवू का ?

यामिनी : नको ! तू इतकी तयार होऊन आलेस ! उगाच कपडे विस्कटायला नको ! आपण रस्त्यात चहा - नाश्ता करू !

विजय : चला ! मी पण तयार होतो !

थोड्यावेळाने विजयही छान तयार होऊन येतो

श्रावणी : काका ! तुम्ही आज एखाद्या हिरोसारखे दिसताय !

विजय : थँक्स ! बेटा !

यामिनी : आणि मी ?

श्रावण : मावशी ! तू पण छान दिसतेस !

प्रतिभा : खरंच ! ताई तुम्ही ! कोणाची नजर लागला नको ! इतक्या सुंदर दिसत आहात आज ..

यामिनी : प्रतिभा ! तू ही काही कमी सुंदर दिसत नाहीस !

इतक्यात कमळ कविताला घेऊन तयार होऊन विजयच्या घरी येते .. तिला पाहताच

विजय : कमळ वाहिनी ! आज भारी दिसताय !

कमळ : थॅंक यु .. भावोजी...

कविता : आणि मी ..

विजय : तू तर रोजच गोड दिसतेस ...

कविता : हाय ! श्रावणी, हाय ! श्रवण..

श्रावणी :हाय !

श्रावण : हाय !

यामिनी : कमळ ! अगं ! कमलेश भावोजी कोठे आहेत ?

कमळ : ते खाली गाडी चेक करता आहेत... आताच गॅरेजमधून घेऊन आले आहेत ...

विजय : पण त्याची तयारी झाली आहे ना ?

कमळ : हो ! फक्त डायव्हरची वाट पाहत आहेत ! तो आला की आपण निघू ...

यामिनी : बरं ! सर्व सामान घेतलंस ना सोबत..

कमळ : हो ! प्रतिभा तू जीन्स घेतलीस ना सोबत ...

प्रतिभा : हो !

यामिनी : आपल्याला तेथे भरपूर फोटो काढायचे आहेत.

कमळ : भावोजी ! तुम्ही तर एकदम टकटका तयार झाला आहात..

विजय : हो ! गोव्याला फॉरेनर येतात ना !

यामिनी : काय ?

विजय : काही नाही !

यामिनी : काही नाही काय ? तुझे ते पूर्वीचे फॉरेनर मुली सोबतचे फोटो पहिले आहेत मी बीचवरचे !

विजय : हो ! तेव्हा ! आवडायच्या मला त्या ! म्हणजे आजही आवडतात ...

यामिनी : तू म्हणतोस ते खरंच आहे ... शेवटी पुरुष लबाड असतो..

विजय : लबाड असणं हा पुरुषांचा स्वभाव आहे आणि स्वभावाला औषध नाही ...

कमळ : हे बाकी बरोबर आहे ! नशीब हे दोघेही दारू पित नाहीत नाहीतर ... आपल्याला ह्यांना खांद्याचा आधार द्यावा लागला असता

यामिनी : मला आवडलं असतं !

कमळ : काय ?

यामिनी : काही ! नाही .. . तू गॉगल घेतलास का ?

कमळ : हो !

यामिनी : थांब ! प्रतिभा ! मी तुलाही एक गॉगल देते !

प्रतिभा : कशाला ?

कमळ : प्रतिभा ! देतेय तर घे ! गॉगल लावण्याची मजा फक्त ट्रीपलाच गेळ्यावर घेता येते ..

प्रतिभा : हे बाकी खरे आहे .. इतर वेळी गॉगल लावण्याची हिंमत माझ्याच्याने काही होणार नाही ...

कमळ : इतर वेळी मी तरी कोठे लावते !

विजय : तुमच चालुद्या ! मी खाली जाऊन पाहतो ! कमलेश काय करतोय ते !

कमळ : हो ! हो ! जा ...

यामिनी : प्रतिभा ! हा घे गॉगल ! हा ! तुलाच ठेव !! माझ्याकडे आहेत आजून दोन ...

प्रतिभा : छान आहे ..

कमळ : लावून दाखव !

प्रतिभा गॉगल लावताच कमळ आणि यामिनी तिचा छान फोटो काढतात .. नंतर तिघीही गॉगल लावून सेल्फी काढतात ...

यामिनी : कमळ ! तुझ्या गावच्या घरात सगळी सोय आहे ना ?

कमळ : म्हणजे काय ! सर्व सोय आहे .. तू घाबरू नकोस ...

यामिनी : बाकी काही नसेल तरी चालेल फक्त मोबाईलला नेटवर्क असायला हवं !

कमळ : हो ! आहे...

यामिनी : मग ! मी माझा लॅप टॉपपण घेते सोबत ..

कमळ : हो ! चालेल

प्रतिभा : मी प्रवासात खायला चिवडा घेतला आहे ...

यामिनी : हे ! तू उत्तम केलेस ! प्रवासात घरचे असे काहीतरी खायला असलेले उत्तम...

कमळ : मी ही ! कचोऱ्या वगैरे घेतल्या आहेत .. हल्ली काय रस्त्यात सर्व मिळत...

यामिनी : मी मुलांसाठी चॉकलेट आणले आहेत ...

श्रावणी : चॉकलेट !

यामिनी : पण ते मी तुम्हाला आता देणार नाही ! तुम्ही कपडे खराब कराल !

श्रवण : ओके ! मावशी !!

कविता : माझ्या गावी खूप खेळणी आहेत , सायकल पण आहे आणि मोठा झोपला पण आहे आपण खूप खेळूया हा ! तिकडे ! श्रावणी ..

श्रावणी : हो ! चालेल.. .

श्रवण : बॅट बॉल आहे का ?

कविता : हो ! आहे ..

कमळ : तुम्ही काही काळजी करू नका ! तिकडे तुम्हाला खेळायला पाहिजे तेवढी मोकळी जागा आहे .. दिवसभर खेळा ..

यामिनी : खेळावरून आठवलं ! तू पत्ते घेतलेस ना ?

कमळ : हो ! ते कसं विसरेन मी.. रोज एक तरी डाव मांडूच ...

इतकयात यामिनीचा मोबाईल वाजतो !

यामिनी : चला ! ड्रॉयव्हर आला !! आपल्याला खाली बोलावले आहे .. सर्वजणी बॅग घेऊन...घराच्या बाहेर पडतात...

पाच दिवसानंतर सकाळी विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत होता इतक्यात दारावरची बेल वाजली विजयने दरवाजा उघडून प्रतिभाला आत घेतले

विजय : तू का आलीस कामाला ? आज आराम करायचा ना ! प्रवासात थकली असशील ना ?

प्रतिभा : नाही ! मी काही थकली वगैरे नाही... ताई गेल्या का ऑफिसला ?

विजय : नाही ! ती आत झोपली अजून ...

प्रतिभा : बरं ! झोपूद्या त्यांना मी तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते.

विजय : हो ! मला आता चहाची खरंच खूप गरज होती. तू आली नसतीस तर मी करणारच होतो. मुलं गेली का शाळेत ?

प्रतिभा : नाही ! मीच म्हणाले,'' आजच्या दिवस आराम करा...

विजय : मग ! त्यांच्या जवळ कोण आहे ?

प्रतिभा : माझी नणंद आहे की बाजूच्याच घरात तिला सांगून आले.

विजय : बरं ... तू चहा - नाश्ता बनव..

प्रतिभा : हो !

प्रतिभा चहा - नाश्ता तयार करून तो घेऊन बाहेर येते इतकयात यामिनीही झोपेतून जागी होत बाहेर येते...

यामिनी : प्रतिभा तू आलीस मी तुला आराम करायला सांगितलं होत ना !

प्रतिभा : ताई ! त्याची काही गरज नव्हती.. तुम्ही चहा घेणार का ?

यामिनी : हो ! त्याची मला आता खूपच गरज आहे मी अंघोळ वगैरे नंतर करेन

प्रतिभा : बरं मी लगेच घेऊन येते

प्रतिभा यामिनीसाठी चहा - नाश्ता घेऊन आल्यावर चहा पिताना

यामिनी : प्रतिभा ! तू केलास का नाश्ता ?

प्रतिभा : करते थोड्यावेळाने !

यामिनी : काय मग ? पिकनिकला मजा आली ना ?

प्रतिभा : हो ! खूपच ! तुमच्यामुळे गोवा पाहण्याचा योग आला ...

यामिनी : मुलांना आवडला ना गोवा ?

प्रतिभा : हो ! खूपच , सारखे माझ्या मोबाईलवर गोव्याचे फोटो बघत असतात

यामिनी : मी माझ्याकडचे आणि कमळ काडाचेही फोटो तुला पाठवते

प्रतिभा : चालेल ! बरं ... स्वयंपाकात काय करू ?

यामिनी : काही नको ! खिचडी कर...बस.. संध्याकाळी आम्ही हॉटेलातून मागवू काही तरी .. खिचडी कर आणि तू जा घरी जाऊन थोडा आराम कर.. उद्याच उद्या बघू ...

प्रतिभा : हो ! लगेच करते...

यामिनी : आणि जाताना तो कोकम रस घेऊन जा...गोव्यावरून आणलेला

प्रतिभा : हो !

विजय : कोकम रसावरून आठवलं मी लहानपणी एकदा गावाला गेलो होतो तेव्हा हराभर कोकम सोलले होते म्हणजे त्यातला तो पंधरा गर बाजूला काढला होता. तेंव्हा पहिल्यांदा लालबुंद कोकम मी पहिले होते. त्यानंतर काकीने त्याचे काय काय तयार केले होते .. कोकमाचे काहीच वाया जात नाही. तेव्हा पहिल्यांदा मी गोड कोकम खाल्ले होते. आंबट काहीही म्हटलं की माझ्या जिभेला पाणी सुटते... आम्ही शाळेत असताना मी रोज चिंच विकत घेऊन खायचो !

यामिनी : आंबट पदार्थांचे नुसती नावं ऐकली तरी माझे दात आंबतात..

प्रतिभा : तुम्हाला माहीत नाही ?

यामिनी : काय ?

प्रतिभा : साहेब लिंबू संत्रीसारखा सोलून खातात ते !

यामिनी : काय ? खरंच.. मी नाही कधी पहिले

प्रतिभा : बोलता बोलता अजय मला एकदा बोलला होता पण तेव्हा ते मला खरे वाटले नाही म्हणून मी विजयाला भेटायला त्यांच्या घरी गेले तेव्हा मी विजयला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला ,'' अजयने सांगितलेले तुला खोटे वाटले ना ? त्यावर मी हो ! म्हणताच त्याने माझ्यासमोर अक्का लिंबू संत्री सारखा सोलून खालला...

विजय : एकदा मी माझ्या मित्रांसोबत पुण्याला माझ्या मित्राच्या गावी पिकनिकला गेलो होतो आमच्यासोबत काही मुलीही होत्या त्याच्या ऑफिसमधल्या.. त्याच्या घराच्या समोर एक लिंबाचे झाड होते ते गप्पा मारता मारता लिंबू आणि तो आंबट असण्यावर चर्चा सुरु झाली तर मी म्हणालो,' त्यात काय ? मी अक्का लिंबू सोलून खातो.. तर ते त्या मुलींना खरे वाटले नाही ! त्यांनी मला खाऊन दाखवायला सांगितले आणि मी तो खाताच त्यांचा हात तोंडावर होता ..

यामिनी : हे ! मला अजूनही खरं वाटत नाही !

विजय : प्रतिभा जा.. फ्रिजमधून एक लिंबू घेऊन ये ...

प्रतिभा लिंबू घेऊन आल्यावर विजयने तो लिंबू संत्रीसारखा सोलला आणि त्याची एक एक पाकळी वेगळी करून खाल्ल्यावर यामिनीचा हातही तोंडावर गेला..

यामिनी :बापरे तू खरंच लिंबू ! संत्रीसारखा सोलून खातोस ... माझ्यासमोर खाल्ला नाहीस कधी !

विजय : हल्ली ती सवय मी मोडली.. आमच्या घरात आंबट खाण्यात माझा एक नंबर होता ... आमच्याघरात आलेल्या संत्री - मोसंबी जरा जरी आंबट असल्या तर कोणीच खायचा नाही त्या फक्त माझ्या वाट्याला यायच्या .. . लिंबाच्या आंबटपणा समोर त्याचा आंबटपणा म्हणजे माझ्या दृष्टीने तुच्छच...

यामिनी : भयानक ! आहेस तू.... आज प्रतिभामुळे मला तुझे हे गुपित कळले... नाहीतर माझ्यासाठी हे गुपित गुपितच राहिले असते ..

विजय : माझ्या आयुष्यात अशी अजून खूप गुपिते आहेत जी तुला माहीत नाहीत.

यामिनी : हो ! तुझे आयुष्यच गूढ आहे ... शाळेत असे पर्यत तू मला जसा वाटत होतास तसा तू प्रत्यक्षात नव्हतास... साधा-भोळा ! हे मला आपले लग्न झाल्यावर कळले..

विजय : ज्याला मी संपूर्णपणे कळलो अशी व्यक्ती या जगात नाही ! मला फक्त मीच ओळखतो... माझ्या बाबतीत कोणीही भाकीत करू शकत नाही.

प्रतिभा : हे ! बाकी खरे आहे... अजय म्हणतो ," विजय लेखक होईल असा विचार आम्ही स्वप्नातही केलेला नव्हता. तो लेखक झाला हे एक वेळ आम्ही मान्यही करतो पण तो कवी कसा झाला ? ते कळत नाही ..

यामिनी : मलाही वाटले होते .. विजय एकतर चित्रकार होईल नाहीतर वकील वगैरे..

विजय : मला हेच व्हायचे होते पण कदाचित ते नियतीला मान्य नव्हते.

यामिनी : म्हणूनच आजही तुझ्याशी वाद घालण्यात कोणी जिंकू शकत नाही .. जर तू वकील झाला असतास तर तू नकीच प्रसिद्ध वकील असतास याबद्दल वाद नाही.. पण आज जो तुला मानसन्मान मिळतोय तो कदाचित मिळाला नसता...

विजय : हे मात्र तू सत्य बोललीस. पण त्यासाठी मला खूप मोठा संघर्ष करावा लागला ...

यामिनी : संघर्ष ! तो कोणालाही चुकलेला नाही. मग ! क्षेत्र कोणते का असेना !

प्रतिभा : तुमचं चालुद्या मी स्वयंपाकाचं बघते...

यामिनी : हो ! हो !

प्रतिभा स्वयंपाकघरात निघून गेल्यावर ..

यामिनी : मग ! आज घरीच थांबणार आहेस की कोठे बाहेर जाणार आहेस ?

विजय : का ?

यामिनी : मी आज घरी आहे तर म्हणत होते.. आपण आईकडे जाऊन आलो असतो ...

विजय : चालेल जाऊया ! दुपारी जेवून... पण जेवायला थांबायचे नाही ! ते आपण हॉटेलातच जेऊ ..

यामिनी : का ?

विजय : नको ! जेवायला थांबलो की खूप उशीर होतो आणि फक्त माझ्यासाठी वेगळे जेवण करायचा त्रास कशाला द्यायचा आईंना...

यामिनी : चालेल.. आपण येताना हॉटेलातच जेवून येऊ ..

विजय : ठीक आहे .. तोपर्यत मी माझी एक दोन कामे करून घेतो.

यामिनी :मी ही माझे आवरून घेते..

इतकयात प्रतिभा विजयासाठी चहा ! घेऊन येते ...

प्रतिभा : ताई !

विजय : ती अंघोळीला गेलेय !

प्रतिभा : माझी कामे आटपली आहेत मी निघू का ?

विजय : हो ! हो ! तू निघ ... आराम कर ..

प्रतिभा तिची कामे आटपून निघून गेल्यावर यामिनी तयार होऊन बाहेर येते ...

यामिनी : प्रतिभा गेली का ?

विजय : हो ! आताच गेली ... मी जरा खाली जाऊन फेरफटका मारून येतो .. काही घेऊन यायचे आहे का ?

यामिनी : आईस्क्रीम घेऊन ये...

विजय : हो ! घेऊन येतो !

विजय घरातून बाहेर पडताना कमळ घरात शिरते ...

कमळ : मला वाटलं तुझं अजून आटपलं नसेल पण तू तर तयार होऊन बसली आहेस , कोठे बाहेर जाणार आहेस का ?

यामिनी : हो ! प्रतिभाने खिचडी केली आहे ती खातो आणि जरा आईकडे जाऊन येतो..

कमळ : प्रतिभा आली होती का ?

यामिनी : हो ! मी नको ! म्हणाले होते तरी आली , मी तिला म्हणाले,'' खिचडी कर आणि तू जा... आराम कर...

कमळ : भावोजी ! कोठे गेले ..

यामिनी : ते जरा पाय मोकळे करायला गेलेत तर मी म्हणाले ,'' येताना आईस्क्रीम घेऊन या.. तू थांब ते येईपर्यत.. आईस्क्रीम खाऊनच जा.. कविता गेली का शाळेत ?

कमळ : मी नको ! म्हणत होते तरी ती गेली शाळेत..

यामिनी : तुझ्या मोबाईमध्ये आपले पिकनिकचे फोटो आहेत ते माझ्या मोबाईलवर पाठव

कमळ : हो ! पाठवते... प्रतिभाचेही फोटो छान आले आहे हा !

यामिनी : ती दिसायला आहेच छान ..

कमळ : आमच्या कवितालाही तिचा आणि तिच्या मुलांचा खूप लळा लागला आहे.

त्यांच्या गप्पा अश्याच सुरु असताना विजय आईस्क्रीम घेऊन येतो .. ते तिघेजण मिळून हसत आईस्क्रीम खातात त्यानंतर कमळ निघून जाते , विजय आणि यामिनी जेवून घेतात.. तयार होऊन यामिनीच्या आईकडे जायला घरातून बाहेर पडतात...

त्याच्या दुसऱ्या दिवशी यामिनी तिच्या ऑफिसला निघून गेलेली असते विजय सोफ्यावर बसून लॅप टॉपवर काम करत असतो इतकयात प्रतिभा स्वयंपाकघरातून त्याच्यासाठी चहा घेऊन येते... चहा त्याच्या हातात देत..

प्रतिभा : काही दिवसांपूर्वी तुम्हाला भेटायला कोणी कामिनी आली होती ती खरोखरच दिसायला खूप सुंदर आहे का ?

विजय : म्हणजे काय ! ती दिसायला सुंदर तर आहेच पण मेकप केल्यावर जरा जास्त सुंदर दिसते म्हणजे जणू स्वर्गातील अप्सरा म्हणता येईल..तसे पहिले तर अप्सरेला पाहिलेला एकही माणूस या जगात कधी जन्माला आलेला नाही... अजुनाने पहिली असेल तो स्वर्गात गेला होता तेव्हा... एकूणच अप्सरेचे जे वर्णन केले जाते ते काल्पनिकच असावे .. पण बहुदा... सौंदर्याची परिसीमा म्हणजे अप्सरा असावी... कामिनी फक्त दिसायला सुंदर नाही तर तिच्याकडे पाहिल्यावर कोणीही तिच्याकडे आकर्षित होतो जसे लोखंड चुंबकाकडे आकर्षित होते.

प्रतिभा : तुम्ही नाही का तिच्याकडे आकर्षित झालात ..

विजय : स्वतःला सावरत .. मी ही शेवटी एक पुरुष आहे एखाद्या विवाहित पुरुषाला तिच्याबद्दल जेवढे आकर्षण वाटेल तेवढे मलाही वाटते... तू पहिले नाही का कधी तिला ? तू बातम्या पाहत नाहीस वाटतं... थांब तुला दाखवतो ..

विजय टी .व्ही . सुरु करून एक मराठी बातम्यांचे चॅनेल सुरु करतो आणि आणि त्यावर तिला तो कामिनी दाखवतो ..

प्रतिभा : ही ! कामिनी आहे खरंच अप्सरेसारखी दिसते ... मग ! बरोबर आहे .. तिची आपल्या इमारतीत चर्चा होत होती..

विजय : म्हणून मी तिला कधी आपल्या घरी बोलवत नाही ! मीच जातो तिला भेटायला तिच्या घरी.. माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला ती येणार आहे तेंव्हा तुझी आणि तिची ओळख करून देईन..

प्रतिभा : मला आवडेल

विजय : प्रतिभा ! तू ही इतका मेकअप केल्यावर अप्सरेपेक्षा काही कमी दिसणार नाहीस.. .

प्रतिभा : तुमचं उगाच काहीही ! मी काय गप्पा मारत बसले मला स्वयंपाक आटपून मुलांना शाळेत आणायला जायचय .. .

विजय : हाच फरक आहे तुमच्यात आणि तिच्यात तुम्ही संसाराचा आनंद घेताय आणि ती प्रसिद्धीचा... त्याग तुमच्या दोघीनाही चुकलेला नाही... तुम्हाला तिच्या सौंदर्याचे आकर्षण आहे आणि तिला तुमच्या संसाराचे...

प्रतिभा : मग ती लग्न का करत नाही ?

विजय : कदाचित तिला आता प्रसिद्धीचे व्यसन लागले आहे...

प्रतिभा : व्यसन मग ते कोणते का असेना.. वाईटच... तुम्हाला नाही का लागले व्यसन प्रसिद्धीचे ?

विजय : लागेल आहे म्हणूनच ... ते जाऊदे ! तू तुझे काम आटप लवकर नाहीतर तुला उशीर होईल

प्रतिभा : हो ! हो ! मी बोलण्याच्या नादात विसरून गेले.

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर विजय पुन्हा आपल्या कामात गुंग होताच दारावरची बेल वाजते विजय पुढे होत दार उघडतो तर दारात कामिनी उभी असते .. तिला पाहताच विजय अवाक ! होताच

कामिनी : विजय ! हे काय ? भूत पाहिल्यासारखे पाहतो आहेस

विजय : कामिनी ! तू इकडे काय करते आहेस ?

कामिनी : मी आलेले तुला आवडले नाही वाटतं ?

विजय : तसे नाही ! तू आल्यावर आमची अक्की इमारत जागी होते.

कामिनी : तू ना ! काहीही बोलतोस !

इतक्यात प्रतिभा स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि कामिनीला पाहताच अवाक होते... आणि तिच्याकडे एक टक पाहत बसते.

विजय : प्रतिभा ! ही कामिनी ! तुला भेटायचे होते ना ?

प्रतिभा : नमस्कार !

कामिनी : नमस्कार ! ही कोण आहे ? त्या दिवशी ही नव्हती...

विजय : ही यामिनीची मानलेली बहीण आहे... आमच्याकडे स्वयंपाक करते आणि ती जाते तिच्या घरी.. कामिनी तू काय घेणार ?

कामिनी : मला थंड काही तरी चालेल !

प्रतिभा : मी लगेच तुमच्यासाठी कोकम सरबत घेऊन येते.

कामिनी : कोकम सरबत चालेल

प्रतिभा स्वयंपाकघरात सरबत आणायला जाते.

विजय : कामिनी पण आज अचानक पुन्हा तू इकडे का आलीस ?

कामिनी : माझी मुलाखत पाहिलीस का ?

विजय : पाहिलीस म्हणजे काय ?

कामिनी : कशी वाटली ?

विजय : उत्तम !

इतकयात प्रतिभा कोकम सरबत घेऊन बाहेर येते ..एक ग्लास कामिनीच्या आणि एक ग्लास विजयच्या हातात देते ...प्रतिभा तेथच उभी असताना

विजय : कामिनी या प्रतिभाला तुझ्यासोबत फोटो काढायचा आहे ..

कामिनी : त्यात काय इतकं

कामिनी लगेच जागेवरून उठते आणि प्रतिभाच्या खांद्यावर हात ठेऊन सेल्फी काढते प्रतिभाही तिच्या मोबाईलवरून सेल्फी काढते विजय त्याच्या मोबाईलवरून त्या दोघींचे फोटो काढतो.

प्रतिभा : साहेब ! मी निघते आता .. .

विजय : हो ! हो ! तू निघ..

कामिनी : बाय ! प्रतिभा ! थँक्स फॉर धिस कोकम सरबत.. छान झाले आहे

प्रतिभा : बाय !

प्रतिभा निघून गेल्यावर

विजय : यामिनी तू अशी येत जाऊ नको अचानक माझ्या घरी लोकांचा गैरसमज होतो.

कामिनी : तू येतोस ते माझ्या घरी...

विजय : तू .. . कुमारी आहेस आणि तुला भेटायला दुनियाभराची माणसे येत असतात..मी विवाहित आहे 

कामिनी : तुला भेटायला माणसे येत नाहीत का ?

विजय : येतात पण तुझ्यासारखी .. सुंदर कामुक दिसणारी येत नाहीत ना !

कामिनी : त्यात काय ? कोणी विचारले तर सांगायचे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आली होती.

विजय : आता तू खरंच माझा इंटरव्ह्यू घेऊनच टाक !

कामिनी : घेऊ या ! तुझा आणि तुझी ती प्रकाशक निलिमा आहे ना तिचा.. तुमचे पुस्तक प्रकाशित झाले कि..

विजय : नक्की ना ?

कामिनी : कामिनीचा शब्द म्हणजे.. काळ्या दगडावरची पांढरी रेष .. .

विजय : तू सांगितले नाहीस ! इकडे कशी काय आलीस ?

कामिनी : काही नाही ! तुझी आठवण आली .. आले ..

विजय : जग तुझ्या प्रेमात पडते, तू माझ्या प्रेमात पडली नाहीस ना ?

कामिनी : तुझ्या प्रेमात पडून काय उपयोग ? तुझं लग्न झाले आहे ना ?

विजय : माझं लग्न झालेलं नसत तर ?

कामिनी : मी तुझ्याशी लग्न केलं असत ..

विजय : खरंच !

कामिनी : मी विनोद करतेय ! लग्न बिग्न करायला मला वेळ कोठे आहे ? मला आयुष्यभर सहन करू शकेल असा पुरुष मला भेटेल असे मला वाटत नाही.

विजय : मी तरी तुला आयुष्यभर सहन करू शकलो असतो असे तुला वाटते का ?

कामिनी : वाटते काय ? मला खात्री आहे...

विजय : बाई मी एकच लग्न करून पस्तावलो आहे ?

कामिनी : का ? यामिनी किती गोड आहे आणि तिचे तुझ्यावर किती प्रेम आहे ..

विजय : तू जर मला अगोदर भेटली असतीस तर मी लग्नच केले नसते आपण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलो असतो.

कामिनी : मला चालले असते.

विजय : बरं ! तू आता जेवूनच जा ! प्रतिभाने छान स्वयंपाक केलेला आहे ..

कामिनी : चालेल ! पण जेवून झाल्यावर तू माझ्या सोबत यायचे आहे आपल्याला शॉपिंगला जायचे आहे मला तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायचे आहे .

विजय : कशाला ?

कामिनी : कशाला काय ? मला घ्यायचे आहे. तू मला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला बोलावले नाहीस ?

विजय : ते आम्ही अगोदर सिंधुदुर्गला आणि नंतर गोव्याला गेलो होतो..

कामिनी : मी गोव्याला गेली आहे म्हटलं.. तू बोलावले असतेस तर मी आले असते.

विजय : पुढच्या वेळेला नक्की !

जेवून झाल्यावर विजय आणि कामिनी एकत्र घराच्या बाहेर पडतात....

संध्याकाळी प्रतिभा स्वयंपाक घरात असताना दारावरची बेल वाजली प्रतिभाने दार उघडून कमळला आत घेताच

कमळ : प्रतिभा ! आत ती भवानी कामिनी विजय भावोजींना पुन्हा भेटायला आली होती ना ?

प्रतिभा : हो ! तेंव्हा ! मी घरातच होते , साहेबांशी जरा जास्तच गुलुगुलु बोलत होती. मी तिला कोकम सरबतही बनवून दिला आणि तिच्यासोबत सेल्फीही काढला .

कमळ: नेमकी मी तेंव्हा घरी नव्हते, कविताला सोडायला शाळेत गेले आणि तेथून बाजारात गेले होते नाहीतर माझीही भेट झाली असती त्या भवानीशी

प्रतिभा : ताई ! तुम्ही तिच्याबद्दल इतक्या रागाने का बोलता आहात ?

कमळ : या टी. व्ही. वरच्या बायांचा काही भरवसा नसतो ! त्या कोणाच्याही गळ्यात पडतात... त्यांना दुसऱ्यांचे संसार मोडायची हौसच असते

प्रतिभा : पण ती मला तशी बरी वाटली..

कमळ : तश्या त्या बऱ्याच वाटतात ... ज्यांच्या संसारात घुसतात त्यांना विचारायला हवे !

प्रतिभा : सर्वच काही तश्या नसतात !

कमळ : हो ! ते मी मान्यच करते पण ही कामिनी दिसायला इतकी भारी आहे कि विश्वामित्रही तिला पाहून पिगळेल

प्रतिभा : हे बाकी तुम्ही बरोबर बोललात , तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते..

कमळ सोफ्यावर बसलेली असतेच इतक्यात दारावरची बेल वाजते कमळ पुढे होत दार उघडून यामिनीला आत घेते

यामिनी : कमळ ! तू कधी आलीस ?

कमळ : हे काय आताच आले..

यामिनी : बस ! मी फ्रेश होऊन लगेच येते

कमळ : हो ! मी बसलेय ! प्रतिभा चहा करतेय ..

यामिनी फ्रेश होऊन बाहेर येते इतकयात प्रतिभा त्यांच्यासाठी चहा आणि बिस्किटे घेऊन येते.

प्रतिभा : ताई ! आज लवकर आलात

यामिनी : हो !

कमळ : तुला माहीत आहे का यामिनी ?

यामिनी : काय ?

कमळ : आज ती महामाया कामिनी पुन्हा तुझ्या घरी आली होती विजय भावोजींना भेटायला

यामिनी : हो ! का ? प्रतिभा तू घरी होतीस का तेव्हा ?

कमळ : ती घरीच होती तिने तिला कोकम सरबत बनवून दिला आणि तिच्यासोबत सेल्फीही काढला

प्रतिभा : मी गेल्यावरही ती थांबली होती मला वाटत जेवूनच गेली असेल कारण धुवायला दोन ताटं होती.

यामिनी : म्हणजे जेवूनही गेली ! तू आता आलीस तेव्हा विजय घरी होता का ?

प्रतिभा : नाही !

यामिनी : म्हणजे तो नक्कीच तिच्या सोबत गेला असेल

कमळ : हो ! ते तिच्या सोबतच गेले मला वॉचमन सांगत होता

यामिनी : तो वॉचमन काय सर्वांवर नजर ठेवूनच असतो कि काय ?

कमळ : ते त्याचे कामच आहे

प्रतिभा: पण साहेब तसले नाहीत

कमळ : तुझे साहेब त्यातले नसतीलही पण तिची गॅरेन्टी कोण देणार ?

यामिनी : जाऊ दे ! आली असेल काही कामासाठी ?

कमळ : पण ती हल्लीच वारंवार का यायला लागली आहे ? हा प्रश्न तुला नाही का सतावत ?

यामिनी : माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे ..

कमळ : नवरा हा प्राणी डोळे बंद करून विश्वास ठेवण्या लायक नसतो ! तुला कळत कसं नाही ! भावोजी या वयातही इतके मेंटेन्ड आहेत कि कोणीही त्यांच्या प्रेमात पडू शकते आमच्यांसारखं नाही डोक्यावरच छप्पर उडालेले आहे.

यामिनी : तू बोलतेयस ते मला पटतंय ! पण मी विजयवर अविश्वास दाखविणे योग्य होणार नाही. 

कमळ : अविश्वास दाखवू नको पण एकदा खात्री तरी नक्की करून घे !

यामिनी : हो !

कमळ : मी निघते आता मला रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे ...

कमळ निघून गेल्यावर

प्रतिभा : मला नाही वाटत साहेब आणि कामिनीत तसे काही संबंध असतील

यामिनी : यामिनी मलाही नाही वाटतं पण बायको म्हणून मला काळजी वाटणे स्वाभाविक आहे. त्यांच्या ओळखीच्या इतक्या तरुणी आहेत पण कोणी कधी घरापर्यत आल्याचे मला आठवत नाही .

प्रतिभा : ती त्याची खास मैत्रीण आहे .. सिलेब्रेटी आहे ... एकाच क्षेत्रात आहेत ते दोघे .. त्यांचे एकमेकांकडे काम असेल .. तसेही साहेब जातातच कि काम असेल तर तिच्या घरी तिला भेटायला ..

यामिनी : हे कामिनी प्रकरण आता माझ्या जरा जास्तच डोक्यात जायला लागले आहे.

प्रतिभा : ताई तुम्ही आराम करा मी स्वयंपाकाचे काय ते बघते .

यामिनी : हो ! तू जा ..

यामिनी तेथेच सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत असते. पण यावेळी तिचा चेहरा उदास असतो आणि तिच्या मनात नको नको ते विचार सुरु असतात.

थोड्या वेळाने प्रतिभा तिचा स्वयंपाक आटपून बाहेर येते आणि ..

प्रतिभा : ताई इतक्या उदास का दिसत आहात ? इतकं उदास होण्यासारखं काही घडलेलं नाही !

यामिनी : माझं विजयवर स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आहे ! त्याच्यापासून दूर जाण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही ! त्याच्या आयुष्यात दुसऱ्या कोणा स्त्रीला मी सहनही करू शकत नाही. ईशवराने माझ्यात जी एक कमतरता निर्माण केली आहे त्यामुळे माझ्या आयुष्यात सर्व सुखे असतानाही मी दुःखी आहे.

प्रतिभा : असे काही नाही ! तुम्ही उगाच नको त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका ...

यामिनी : कितीही नाही म्हटलं तरी त्रास हा ! होतोच

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते .. चहा प्यायल्यावर तुमचा मुड जरा छान होईल ! गोव्याला किती आनंदात होता तुम्ही !

यामिनी : हो ! तेथे मुलं होताना ! जा .. . तू चहा घेऊन ये.. तुझ्यासाठीही घेऊन ये ..

प्रतिभा स्वयंपाकघरात जाऊन चहा घेऊन येते.. दोघी एकत्र चहा पित असताना ..

यामिनी : थांब मी तुला आपले गोव्याचे फोटो पाठवते !

प्रतिभा : पाठवा नंतर सावकाश !

यामिनी : तुला मजा आली ना गोव्याला ?

प्रतिभा : हो ! खूपच ! तुम्ही सोबत असलात तर मला कोठेही मजा येते.. जशी पूर्वी विजया सोबत असल्यावर यायची ! विजया वरून आठवलं त्यांनीही मला आपले पिकनिकचे फोटो त्यांना पाठवायला सांगितले आहेत .

यामिनी : हो ! पाठव ! मी आज दुपारीच तिच्याशी बोलले मोबाईलवर...

प्रतिभा : ताई मी निघू का आता ?

यामिनी : हो ! हो ! तू निघ आता ..

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी स्वतःशीच विचार करत बसलेली असताना विजय बाहेरून आत येतो

विजय : काय रमय्या ! कसला विचार करते आहेस इतका ?

यामिनी : माझा संसार कसा वाचवायचा त्याचाच विचार करत होते मी ..

विजय : काय ?

यामिनी : ती कामिनी आज पुन्हा आपल्या घरी आली होती तुला भेटायला ?

विजय : त्यात काय आश्चर्य ? ती माझी चांगली मैत्रीण आहे, आम्ही एकाच क्षेत्रात आहोत आम्हाला एकमेकांची गरज लागते .. तू इतकी अपसेट का होतेस ?

यामिनी : मी बायको आहे तुझी ! मी नाही तर कोण अपसेट होणार ?

विजय : मी तुला या पूर्वीही सांगितले आहे ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे त्यापलीकडे काहीही नाही.

यामिनी :बरं ! तुम्ही एकत्र जेवलातही !

विजय : हो ! ती जेवणाच्या वेळेवर आली होती. तिला घरच जेवण आवडतं ..

यामिनी : मग ! तिच्यासोबत बाहेर का गेलास ?

विजय : बाहेर का गेलो म्हणजे आम्हाला दोघांनाही एकाच कार्यक्रमाला जायचे होते तिच्याकडे गाडी आहे .. आता येतानाही तिने मला सोडले आपल्या बिल्डिंगच्या खाली.

यामिनी : मग ! आता का तिला वर घेऊन आला नाहीस ?

विजय : तिला आता चॅनेलवर जायचे होत म्हणून ...

यामिनी : मग ! आता जेवूनच आला असशील ?

विजय : नाही ! फक्त थोडा नाश्ता केला आहे.. चल मी फ्रेश होतो मग जेवायला बसू .. .

विजय फ्रेश झाल्यावर ते दोघे एकमेकांशी काहीही न बोलता जेवतात आणि जेवून झाल्यावर आप आपल्या रूममध्ये जाऊन झोपतात...

दुसऱ्या दिवशी विजय सोफ्यावर बसलेला असताना प्रतिभा त्याच्यासाठी चहा घेऊन आली असता

विजय : कामिनी अली होती ते तू सांगितले का यामिनीला ?

प्रतिभा : मी कशाला सांगायला हवे ! नक्की बिल्डींग सांगेलच की ! कमळ ताईंनी संगीतले त्यांना वॉचमनने सांगितले...

विजय : ही कामिनी माझ्या डोक्याला ताप झाली आहे.

प्रतिभा : का काय झाले ?

विजय : काही नाही ! यामिनीच्या मानत माझ्या आणि तिच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे .

प्रतिभा : पण तसे काही नाही ना ?

विजय : नाही गं ! बाई

प्रतिभा : कर नाही त्याला डर कशाला ?

विजय : कामिनी सध्या येथे जवळच एक स्टुडिओत शूटिंगसाठी येते त्यामुळे ती इकडे कधीही येऊ शकते आणि मी तिला तू इकडे येऊ नको असे सांगू शकत नाही कारण जर तसे मी केले तर तिला वाटेल की माझ्यात आणि यामिनीत सारे आलबेल नाही.

प्रतिभा : ती कामिनी म्हणजे अवघड जागेवरच दुखणं झाली आहे... तुमच्यासाठी

विजय : तू हसतेस काय ?

प्रतिभा : मी हसू नाहीतर करू काय ?

विजय : कामिनी मनाने खूप चंगली आहे पण तीच वागणं बोलणं फारच बोल्ड आहे

प्रतिभा : बोल्ड म्हणजे ?

विजय : ते तुला नाही कळणार .. जाऊ दे ! तू तुझी कामे करून घे !

प्रतिभा : काळ कामिनी ! आपल्याकडे जेऊन गेली का ?

विजय : हो ! तुला ते ताटं बघून कळलं असेलच ! आणि तू यामिनीजवळ पाचकलीस ! त्यावरूनही यामिनीने मला झापलं माहीत आहे.

प्रतिभा : तुम्ही तुमच्यात आणि यामिनी ताईत असलेल्या अघोषित निरर्थक दुराव्याबद्दल कामिनीला काही सांगितले नाही ना ?

विजय : नाही सांगितले आणि सांगितले तरी काय होणार आहे ?

प्रतिभा :काही प्रेमाला भुकेलेल्या बायका आपला खांदा दयायला पुरुषांच डोकंच शोधत असतात.

विजय : काहीही ! कामिनीवर प्रेमी करणाऱ्यांची कमी नाही ..

प्रतिभा : तुमच्यावर तरी प्रेम करणाऱ्या तरी कोठे कमी होत्या तरीही ! ज्या स्त्रीला मुलं होऊच शकत नाही हे माहीत असतानाही तुम्ही तिच्याशी लग्न केले

विजय : माझे यामिनीवर प्रेम होते

प्रतिभा : मला नाही वाटत ! तुमचे यामिनी ताईंवर प्रेम होते .. जर प्रेम असते तर आज जो दुरावा आहे तो नसता .. प्रेम करणारी माणसे एकमेकांचा फक्त सहवास मिळावा म्हणून काहीही करायला तयार असतात.. तुम्ही जाता ना कामिनीने बोलावल्यावर धावत तिच्या घरी...

विजय : लग्न केले तेव्हा नसेल कदाचित माझे यामिनीवर प्रेम पण सहवासाने आज मी तिच्या प्रेमात पडलो आहे...भले आमच्यात शारीरिक जवळीक नसेल म्हणून काय झाल ? पण आमच्यात प्रेम आहे.

प्रतिभा : प्रेम आहे असं फक्त बोलून भागात नाही ते आपल्या कृतीतून व्यक्त व्हावं लागत

विजय : तुझ्या नवऱ्याचे आहे का तुझ्यावर प्रेम ?

प्रतिभा : माझ्या नवऱ्याचे माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी त्याच्या मुलांची आई झाली ना ?

विजय : ती काय प्रेम नसतानाही होतात !

प्रतिभा : माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम आहे आम्ही दोघे तुमच्यासारखे वेगवेगळे झोपत नाही...

विजय : मुलं ही नवरा बायकोच्या नात्यात फेविकॉल सारखं काम करतात.. ते नवरा बायकोच्या नात्याला घट्ट धरून ठवतात .. पूर्वी मला माझे एकट्याचे स्वतंत्र आयुष्य जगावेसे वाटत होते म्हणून मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही माझ्या आयुष्याचा भाग केला नाही पण त्या सर्वजणी आज त्यांच्या संसारात सुखी आहेत आनंदी आहेत... मला माझ्या आयुष्यात मुलांची लुडबुड नकोच होती आणि यामिनी मुलांना जन्म देण्यास असमर्थ होती. त्यासोबत मला यशाच्या शिखरावर नेणारी ती शिडी होती कारण मला हवा असणार स्वतंत्र आणि आर्थिक आधार तेंव्हा ती देऊ शकत होती.

प्रतिभा : त्यामुळेच मला आणि यामिनी ताईंना भीती वाटते कि तुमचा तोल जाऊ शकतो.

विजय : नाही ! तसे कदापि होणार नाही माझा माझ्या भावनांवर पूर्ण ताबा आहे .

प्रतिभा : असेल पण पुरुषाचा त्याच्यावरचा ताबा कधी सुटेल हे कोणीही सांगू शकत नाही ! जेथे विश्वामित्र पागलला मेनकेचे सौंदर्य पाहून तर सामान्य पुरुषांचे काय ?

विजय : नाही ! तसे काही होणार नाही !

प्रतिभा : प्रश्न फक्त कामिनीचाच नाही ! तुमच्या संपर्कात अनेक स्रिया आजही येत असतात... यामिनी तुमच्यावर बायकोचा अधिकार गाजवत नाही याचा अर्थ तिने तुम्हाला मोकळे सोडलेले आहे असा होत नाही हे लक्षात ठेवा !

विजय : माझ्या बायकोपेक्षा तू मला जास्त लेक्चर देतेस... तो तुझा अधिकार आहे म्हणा ...

प्रतिभा : अधिकार नाही ! पण मला यामिनी ताईंची काळजी वाटते.

विजय : तिची तू काळजी करू नकोस नकोस कारण काहीही झाले तरी मी यामिनीला कधीही अंतर देणार नाही .. जा तू आता तुझ्या स्वयंपाकाचं काय ते बघ

प्रतिभा स्वयंपाकघरात निघून गेल्यावर दारावरची बेल वाजते विजय पुढे होत दरवाजा उघडतो तर दरवाज्यात अजय उभा असतो त्याला आत मिठी मारत विजय त्याला आत घेतो.

विजय : अजय ! आज तू इकडे कसा ?

अजय : मला आज सुट्टी होती मी प्रतिभाकडे जाणार होतो नंतर माझ्या लक्षात आले कि या वेळेला ती तुझ्याकडे असते कामाला !

विजय : प्रतिभा आमच्याकडे कामाला नाही ! ती आमचे घर सांभाळते , यामिनी तर तिला आपली बहीणच मानते आणि तिला तशीच वागणूक देते.

अजय : हो ! तुमचे गोव्याचे फोटो पहिले मी..गोव्याला खूप मजा केलेली दिसतेय..

विजय : हो ! खूप मजा केली .. तू ही ! यायला हवा होतास पण नेमका तेव्हा तू बाहेरगावी गेला होतास

अजय : नंतर जाऊ पुन्हा कधीतरी ...प्रतिभा तुमचे घर नीट सांभाळते ना ?

विजय : म्हणजे काय ? आमचे घर तिला तिच्या घरासारखेच वाटते

अजय : बाकी ! तुझे लिखाण कसे चालले आहे ?

विजय : छान चालले आहे लवकरच माझे एक नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे तुला यायचे आहे हा !

अजय : तू नाही बोलावलेस तरी मी येणारच ...

विजय : तुला बोलावले नाही ! असे कधी झाले आहे का आतापर्यत ..

अजय : नाही ! पण आता तू मोठा लेखक झाला आहेस ... आपल्या सर्व मित्रांची तुझ्याबद्दल तक्रार आहे.

विजय : काय ?

अजय : हेच कि तू कोणाला भेटत नाही कोणाला फोन करत नाहीस .. वगैरे वगैरे

विजय : तसे नाही रे ! एकतर मला वेळ नसतो आणि मला विनाकारण नको त्या फालतू विषयावर हल्ली चर्चा करायला आवडत नाही.. पूर्वी आपले मित्र मी लग्न करत नाही म्हणून मला चिडवायचे आता मुलं नाहीत म्हणून विचारतात ! त्यांना काय सांगू ?

अजय : मग ! तू करतोयस ते बरोबर आहे. लग्नाच्या बाबतीत तू जे केलेस ते करण्याचे धाडस त्यांच्यापैकी कोणीही करू शकला नसता

विजय : माझ्या आणि यामिनीच्या लग्नाबद्दल तू प्रतिभाला काही सांगितले नाही ना ?

अजय : नाही ! आणि कधी सांगणारही नाही.

विजय : बोलण्याच्या ओघात आपण प्रतिभा येथे आहे हे विसरूनच गेलो ...

प्रतिभा : मी येथेच आहे .. मी वाटच पाहत होते कि तुमचे माझ्याकडे लक्ष कधी जाते याची !

अजय : प्रतिभा ! तू कशी आहेस ?

प्रतिभा : मी ठीक आहे ... कालच आपण फोनवर बोललो ना ?

अजय : हो ! प्रत्यक्ष भेटल्यावर तसं विचारण्याची पद्धत असते.

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा - बिस्किटे आणली आहेत.

विजय : जेवणही कर ... आता तो जेवूनच जाईल

प्रतिभा : हो ! मी लगेच करते.

अजय : प्रतिभा तुझ्याकडे कामाला आहे याचा मला आनंद आहे म्हणजे आता तिची काळजी करायची गरज नाही ! ती जर शिकलेली असती तर आज तिचं भविष्य वेगळे असते .

विजय : तसे काही नसते ! प्रत्येक कामाचे आपले एक महत्व असते .. ती करत असलेल्या कामाचेही महत्व कमी नाही .. ती आमच्या घरी यायला लागल्यापासून आमच्या घराला घरपण आले.. .

अजय : प्रतिभा ! घरकामात वाघ आहे

विजय : त्यात काही वाद नाही ...

अजय : यामिनी वहिनी काय म्हणतेय ?

विजय : ती काय म्हणणार ?

अजय : पण यामिनी वाहिनीशी लग्न केल्यामुळे तुझ्या आयुष्याला एक दिशा मिळाली

विजय : हो ! तिच्यामुळेच मी माझ्या आयुष्यात इतका यशस्वी होऊ शकलो.

अजय : मला आज तू माझा मित्र आहेस हे सांगताना माझी छाती अभिमानाने फुलते.

विजय : तू एकमेव व्यक्ती आहेस जो माझ्या यश - अपयशाचा साक्षिदार आहेस.

त्यांच्यात गप्पा रंगलेल्या असतात इतक्यात प्रतिभा स्वयंपाकघरातून बाहेर येते

प्रतिभा : माझे स्वयंपाक करून झालेले आहे मला मुलांना आणायला शाळेत जायचे आहे.

विजय : हो ! हो ! तू जा !

अजय : हो ! तू जा ! मी थोड्यावेळाने येतो तुझ्याकडे मुलांना भेटायला.

प्रतिभा : चालेल ! चला मी निघते

प्रतिभा निघून गेल्यावर विजय आणि अजय मधील गप्पा पुन्हा रंगतात.

विजय : चला ! आता प्रतिभा गेली.. आता आपल्याला निवांत बोलता येईल

अजय : हो !

विजय : मगाशी प्रतिभाने आपलं बोलणं ऐकलं तर नसेल ना ?

अजय : ऐकलं असलं तरी तिला त्याच फार काही संदर्भ लागला नसावा म्हणून तिने काही विचारले नाही

विजय : तू बस ! मी आपल्यासाठी पुन्हा चहा गरम करून आणतो आणि सोबत काहीतरी खायलाही घेऊन येतो चिवडा वगैरे..

अजय : हो ! लगेच !

विजय स्वयंपाकघरातून चहा आणि चिवडा घेऊन आल्यावर चहा पित पित चिवडा खाताना

विजय : चिवडा कसा आहे ?

अजय : या चिवड्याला प्रतिभाच्या हाताची चव आहे ..

विजय : अरे ! तिनेच केला आहे तो !

अजय : तू थंडा पितच नाही

विजय : थंडाच काय मी फ्रिजमधील काहीच खात नाही फार फार मी फ्रिजमधील बर्फाचा उपयोग करतो ते ही औषध म्हणून यामिनी लोकांना सांगत असते आमच्या फ्रीजचा आम्हाला काडीचाही उपयोग नाही.

अजय : हे उत्तम आहे नाहीतर आमच्या घरात फ्रिजच्या पाण्याखेरीज कोणाच्या घशाखाली एक घोट उतरत नाही !

विजय : तू घाबरू नकोस ! तुला हवे तर फ्रिजमध्ये थंड पाण्याच्या बाटल्या असतात कारण प्रतिभाला आणि यामिनीला त्या लागतात

अजय : नशीब !

विजय : किती दिवसांनी भेटतोय आपण

अजय : हो ! तुमच्या लग्नाला कोर्टात भेटलो होतो त्यानंतर एकदा तू यामिनी वहिनीला घेऊन घरी आला होतास तेव्हा आणि एकदा आपण प्रवासात भेटलो होतो त्यानंतर आता .. तू तर आमच्या घराचा रस्ताच विसरलास

विजय : मुंबईच्या बाहेर जायचे म्हटले की माझ्या जीवावर येते

अजय : मग ! तू गाडी का घेत नाहीस ?

विजय : एक तर माझ्यात गाडी चालवायची हिंमत नाही आणि मला स्वतःलाही ती चालवायची नाही

अजय : यामिनी वहिनी चालवते ना ?

विजय : ती चालवते पण चारचाकी चालवायला तिलाही भीती वाटते.

अजय : सायकल येते ना तुला

विजय : हो ! अरे पण मागची कित्येक वर्षे मी तीही चालवली नाही.

अजय : म्हणजे बायकोला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जायचे भाग्य तुझ्या नशिबी नाही

विजय : तसे काही नाही ! आम्ही तिच्या स्कुटीवरून जातो कधी मुड आला तर लॉंग ड्राईव्हवर

अजय : यामिनीशी लग्न करून तू सुखी आहेस ना ?

विजय : सुख ... ते व्यक्ती सापेक्ष असते.... प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते ... वरवर पाहता मी सुखी आहे पण प्रत्येक माणसाच्या वाट्याला कोणते ना कोणते दुःख हे असतेच..

अजय : हे ! बाकी खरे आहे ..

विजय : तू सुखी आहे का ?

अजय : नाही ! मी इतका साधा भोळा सोज्वळ पण माझ्या वाट्याला भांडकुदळ बायको आली, तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे यात शंकाच नाही , पण स्वभावाला औषध नाही .. सतत मनात एक भीती असते आज कोणत्या विषयावर भांडण उकरून काढेल. त्यामुळे मी माझं घर, ऑफिस, मुलं - बायको यांच्यातच अडकून पडलो मला माझी अशी काही स्वतःची हक्काची जागाच उरली नाही.

विजय : संसार म्हंटलं कि सार ओघाने आलेच... म्हणूनच मला लग्न करायचे नव्हते, संसार करायचा नव्हता पण नियतीने शेवटी तिचा डाव मांडला

अजय : आपण ठरवलेले आयुष्यात होतेच असे नाही ! आपण ज्यांच्यावर प्रेम केले त्यांना आपले प्रेम कधी कळलेच नाही. आपण ज्यांच्याशी लग्न केले त्यांच्यावर आपले कधी प्रेमच नव्हते.. लग्न झाल्यामुळे नाईलाजाने आपण शरीराने एकत्र आलो मुलं व्हावी म्हणून पण आपले त्यांच्यावर प्रेम नव्हते आपण जे काही करत होतो ते यांत्रिक होते.

विजय : तू मुलांच्या निमित्ताने का होईना वहिनींच्या जवळ आलास पण मी माझ्या बाबतीत ते कारणही नाही ! यामिनीवर माझे तसे प्रेमही नव्हते.. आम्ही फक्त एकमेकांची सामाजिक गरज म्हणून एकत्र आलो त्यामुळे शरीराने यामिनीच्या जवळ येण्याची हिंमत माझ्याच्याने काही अजून झालेली नाही ... ती हिंमत तिनेही कधी केली नाही , तिने हिंमत केली असती तर मी विरोध केला नसता. त्यामुळे आता तर तिच्या आणि प्रतिभाच्या मनातही माझ्या पुरुषत्वाबद्दल शंका निर्माण व्हायला लागली आहे. माझी यामिनीच्या जवळ यजयची हिंमत होत नाही कारण प्रत्येक वेळी माझ्या डोळ्यासमोर त्या येतात ज्यांचं प्रेम मी नाकारलं होतं.. आज त्या माझ्यावर हसत असतील नाही ?

अजय : आता त्या जुन्या गोष्टी आठवून दुःखी होऊ नकोस ! शो मस्ट गो ऑन...

विजय : मी माझ्या स्वार्थासाठी यामिनीशी लग्न केले, यामिनीशी लग्न करून मी तिच्यावर आणि स्वतःवरही अन्याय केला असे मला वाटत आहे . आज माझ्याकडे जे काही आहे ते तेव्हा असते तर कदाचित हे झाले नसते.

अजय : पण यामिनी वाहिनीसोबतचे तुझे वागणे मला पटलेले नाही..

विजय : मलाही कळतेय ते पण .. वळत नाही ना !

अजय : तू एखादे मुलं दत्तक का घेत नाहीस ?

विजय : नको ! आपलं कुठलं राजा - महाराजांचं घराणं आहे ज्याचे नाव पुढे चालावे अशी आपण इच्छा धारावी..

अजय : यामिनीचे मन रमेल तेवढे

विजय : ते रमवायला आमच्या घरात काय कमी मुले आहेत पण यामिनीचे सत्य त्यांना सांगितल्याखेरीज मी तिला माच्या घरात कायमचा घेऊन जाऊ शकत नाही.

अजय : मग सांगून का टाकत नाहीस !

विजय : कित्येकदा मी सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्याच्याने हिंमतच होत नाही. ते यामिनीला स्वीकारतील पण माझ्यावर हसतील कि काय अशी भीती वाटते

अजय : आता सांगितले तर फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही !

विजय : यामिनी आई होऊ शकत नाही हे मला लग्नाच्या अगोदरच माहीत होते याने नक्कीच फरक पडेल अशी मला भीती वाटते.

अजय : तुझे आयुष्य आज एका विचित्र वळणावर येऊन थांबले आहे .. आज तुझ्याकडे सर्व काही आहे , हक्काची बायको आहे पण तू तिला जवळ घेऊ शकत नाहीस. तुला मुलांबद्दल प्रचंड प्रेम असताना तू बाप नाही होऊ शकत, तुझ्याकडे मोठं कुटुंब असताना तू तुझ्या बायकोला त्या कुटुंबाचा भाग नाही करू शकत हे सारे फारच विचित्र होऊन बसले आहे .. . त्यामानाने मग माझे आयुष्य फारच शांत आणि सुरळीत म्हणावे लागेल.

विजय : तेच तर फक्त यशासाठी मी माझे साधेसरल आयुष्य खूपच विस्कटवून घेतले आहे.

अजय : यामिनी कधी यावरून भांडत नाही तुझ्याशी ..

विजय : माझे नसले तरी तिचे माझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे मी तिच्या आयुष्याचा भाग आहे नवरा या नात्याने त्यातच ती खुश आहे मला वाटते तिलाही शारीरिक सुख मिळविण्यात आता फारसा रस उरलेला नसेल ..

अजय : विजय ! तुझ्या आयुष्यात दुसरी कोणी आलेली नाही ना ?

विजय : नाही .. कोणी नाही .....

अजय : मी तुला चांगलं ओळखतो !

विजय : नाही ! खरंच नाही ... नाही म्हणायला माझी एक मैत्रीण आहे कामिनी ... पण मैत्री पलीकडे आमच्यात काही नाही ...

अजय : तेच उत्तम होईल.. तू यामिनीवर अन्याय करू शकत नाहीस .

विजय : नाही ! यामिनी फक्त माझी बायको नाही तर माझ्या यशाची शिल्पकार आहे. माझ्या आयुष्यात मला सापडलेले ती परीस आहे ..

अजय : मला अभिमान आहे तुझा . ..

विजय : आता जेवून घेऊ या का ?

अजय : हो ! चालेल ! मी जेवण घेऊन येतो..

अजय आणि विजय एकत्र जेवतात आणि जेवून झाल्यावर अजय प्रतिभाच्या घरी जायला निघाल्यावर

विजय : थांब अजय ! मी पण येतो ! त्या निमित्ताने प्रतिभाचे घरही पाहता येईल आणि तिच्या मुलांनाही भेटता येईल..

अजय : चालेल ! मलाही सोबत होईल...

विजय : तेथूनच तुला स्टेशनला सोडून मी माझे एक काम आहे ते करून येईन

अजय : चालेल चल ..

ते दोघेही एकत्र घरातून बाहेर पडतात.

संध्याकाळी प्रतिभा स्वयंपाकघरात काम करत असताना दारावरची बेल वाजली प्रतिभाने पुढे होत दरवाजा उघडला आणि यामिनीला आत घेतले

प्रतिभा : ताई .. आज लवकर ?

यामिनी : हो ! एका मिटींगला गेले होते तेथून परस्पर घरी आले .. विजय कोठे आहे ?

प्रतिभा : आज अजय घरी आला होता ..

यामिनी : अजय भावोजी आले होते ?

प्रतिभा : हो !

यामिनी : कधी ?

प्रतिभा : सकाळीच आले होते

यामिनी : जेवून गेले ना ! बरेच महिने झाले मी त्यांना प्रत्यक्ष भेटले नाही.

प्रतिभा : हो ! जेवून गेला .. त्यानंतर तो आणि माझे साहेब माझ्या घरी आले होते ..

यामिनी : साहेब तुझ्या घरी आले होते ?

प्रतिभा : हो ! कदाचित अजय सोबत होता म्हणून आले असतील

यामिनी : तेथून कोठे गेले ?

प्रतिभा : ते मला माहीत नाही...

यामिनी : बरं मी फ्रेश होते तोपर्यत तू आपल्यासाठी चहा बनव...

प्रतिभा : हो ! लगेच ...

प्रतिभा आणि यामिनी चहा पित असताना कमळ आत आली कारण दरवाजा उघडाच होता

कमळ : यामिनी ! तू आज लवकर आलीस ?

यामिनी : हो !

कमळ : भावोजी कोठे दिसत नाहीत ते ?

यामिनी : ते बाहेर गेलेत

प्रतिभा : कमळ ताई मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते

कमळ : चालेल ! तशी मी आताच चहा घेऊन आले आहे पण तुझ्या हातच्या चहाला चवच काही निराळी आहे.

प्रतिभा : धन्यवाद ! ताई

प्रतिभा कमळसाठी चहा घेऊन आल्यावर

कमळ : आज माझी कामे आटपली आहेत , प्रतिभा तुझा स्वयंपाक झाला का ?

प्रतिभा : हो ! होतच आला आहे

कमळ : चालेल ! तुझा स्वयंपाक झाला की आज आपण पाणीपुरी खायला जाऊया !

यामिनी : चालेल ! मी ही बरेच दिवस झाले नाक्यावरची पाणीपुरी खाल्ली नाही.

प्रतिभा : मी लगेच आटपते मग जाऊया !

प्रतिभा स्वयंपाक घरात जाते

यामिनी : कविता ! तिचे काय ?

कमळ : कमलेश आहे घरी आज...

यामिनी : नवरा घरी आहे आणि तुला पाणीपुरी खायचे सुचते आहे ?

कमळ : मग ! काय त्याला मिठीत घेऊन बसू ?

यामिनी : ते जाऊदे ! चला ! जाऊया !

कमळ : प्रतिभा तुझे आटपले का ?

प्रतिभा : हो ! हो ! लगेच येते

प्रतिभा स्वयंपाक घरातून तिची कामे आटपून बाहेर आल्यावर त्या तिघी घरातून बाहेर पडतात.

रात्री बाहेरून पाणीपुरी खाऊन आल्यावर यामिनीवर सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत असताना दारावरची बेल वाजली आणि यामिनीने दार उघडून विजयला आत घेताच

यामिनी : कोठे गेला होतास ?

विजय : बाहेर गेलो होतो ..

यामिनी : तेच विचारते बाहेर म्हणजे कोठे ? कामिनीकडे गेला नव्हतास ना ?

विजय : हो ! तिच्याकडेच गेलो होतो.. तिचे माझ्याकडे खूप महत्वाचे काम होते .. तीच मला भेटायला येणार होती आपल्या घरी पण मीच म्हणालो ,' मीच येतो तुला भेटायला ..

यामिनी : हल्ली तुमच्या भेटीगाठी जरा जास्तच वाढल्या आहेत ना ?

विजय : कामच तसे आहे त्याला मी काय करणार ?

यामिनी : तिच्यासोबत जेवून आला नाहीस ना ?

विजय : नाही ! ती आग्रह करत होती पण मीच म्हणालो ,'' माझी लाडकी बायको माझी जेवायला वाट पाहत असेल

यामिनी : लाडकी बायको ! तू तर माझे कधी लाड केल्याचे मला आठवतही नाही.

विजय : तशी बोलायची पद्धत असते ... प्रत्येक गोष्टीचा शब्दश: अर्थ घ्यायचा नाही.

यामिनी : चल ! आता फ्रेश हो ! मला भूक लागली आहे ... पाणीपुरी खाल्ली पण त्याने भूक कमी होण्याऐवजी अधिक चालवली आहे

विजय : मग ! तू जेवून घ्यायचे ना ?

यामिनी : जेवण करतानाच ते काय आपण एकत्र असतो ..

विजय : बरं ! मी फ्रेश होऊन येतो .. मग आपण जेवायला बसू

विजय फ्रेश होऊन आल्यावर ते दोघे जेवायला बसतात

यामिनी : आज अजय आला होता ना ?

विजय : हो !

यामिनी : काही खास काम होत का ?

विजय : नाही गं ! सहज आला होता

यामिनी : तू ही त्याच्यासोबत प्रतिभाच्या घरी गेला होतास !

विजय : हो ! तुला तर माहीतच आहे मी सहसा कोणाच्या घरात जात नाही, पण विचार केला त्या निमित्ताने प्रतिभाच्या मुलांना भेटता येईल आणि तिचे घरही पाहता येईल घर पाहिल्यावर मला बऱ्याच गोष्टी न सांगताही कळतात

यामिनी : मुलांसाठी काय घेऊन गेला होतास ?

विजय : चॉकलेट आणि बिस्कीट घेऊन गेलो होतो.

यामिनी : प्रतिभाला तुला घरी आलेलं पाहून खूप आनंद झाला असेल नाही ?

विजय : हो !

यामिनी : अजय भावोजींच्या मुलांसाठी काही दिले की नाही ?

विजय : हो ! प्रतिभाच्या घरातून निघाल्यावर स्टेशनला मी त्याच्या मुलांसाठीही खाऊ घेऊन दिला.

यामिनी : त्यांना एखाद्या रविवारी बॊलवायचे ना आपल्या घरी वाहिनी आणि मुलांसोबत

विजय : हो ! मी बोललो आहे .. आता पाहू कधी येतो ते ..

यामिनी : मलाही पाहायचे होते प्रतिभाचे घर ..

विजय : आता मी पहिले आहे ना ! आपण जाऊ कधी गरज भासली तर..

यामिनी : तुला आणखी भाजी वाढू का ?

विजय : हो ! जराशी वाढ ! हे काय तू मगाशी भूक लागली म्हणून चिडचिड करत होतीस पण आता नेहमी पेक्षा कमीच खाल्लेस

यामिनी : तुझे बरे माझ्या खाण्याकडे लक्ष असते.. आम्ही ! म्हणजे मी , कमळ आणि प्रतिभा आम्ही तिघींनी नाक्यावरची पाणीपुरी खाल्ली !

विजय : मग ! बरोबर आहे ... माझे लक्ष माझ्या आईच्या खाण्याकडेही असे माझ्या भीतीने ती चोरून शिळी भाजी वगैरे खात असे, मला अन्न वाया गेलेले आवडत नाही पण मला शिळे खायलाही शक्यतो आवडत नाही .. पण तरीही आईला शिळे जाताना पहिले तर मी त्यातील थोडे मागून घेत असे. आपल्या देशातील स्त्रिया त्याच्या आरोग्याकडे खूपच दुर्लक्ष करतात म्हणजे सर्व पुरुष जेवल्यावर त्या जेवतात त्यामुळे त्याच्या वाट्याला बऱ्याचदा पोटभर जेवण येत नाही आणि आले तरी त्यातील काही पदार्थ गायब असतात. आई जेवण उरवून ठेऊ नये म्हणून मी जर शेवटी जेवायला असेन तर काही उरवून ठेवतच नसे..

यामिनी : तुझ्यामुळेच मला ताट -पुसून खाण्याची सवय लागली आहे .. तू कसे कोणत्या पार्टीला गेलास कि तुला हवे तेवढे आणि हवे तेच पदार्थ घेतोस उगाच फुकटचे आहे म्हणून काहीही जास्तीचे घेत नाहीस...

विजय : आम्ही लहान असताना एका वेळेच्या जेवणासाठी आम्हाला जो संघर्ष करावा लागला आहे तो मी अजूनही विसरलो नाही. ते विसरलो नाही म्हणून माझे पाय आजही जमिनीवर आहेत.. तुझ्या वाट्याला तो संघर्ष कधीच आला नाही .. प्रतिभाच्या वाट्याला आला ..

यामिनी : प्रतिभाचे घर पाहिल्यावर तुला काय कळले ?

विजय : प्रतिभा ! सध्यातरी खाऊन पिऊन सुखी आहे पण तिच्याकडे बचत फारशी नसावी ..

यामिनी : कशावरून ?

विजय : तिच्याकडे पैसे असते तर तिने घर डबल केले असते..

यामिनी : आपण मदत करू या का तिला घर डबल करायला ?

विजय : नको ! इतकयात नको ! तो विचार तिच्या मानत आला की मग आपण तिच्या विचारला बळ देऊ या !

यामिनी : चालेल

विजय : तू प्रतिभाचा किती विचार करतेस ?

यामिनी : हो ! मी काही फक्त नावाला तिला बहीण मानले नाही .. मी तिला मनापासून माझी बहीण मानते.

विजय : हो ! ते मला माहीत आहे तू प्रत्येक नाते मनापासून जपतेस..

यामिनी : नशीब ! हे तुला कळले आहे

विजय : माझ्या नजरेतून कधीच काहीच सुटत नाही

यामिनी : हो !

त्यांच्या गप्पा अशाच रंगत असतात.. जेवून झाल्यावर ते दोघे आप आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात .

दुसऱ्या दिवशी यामिनी ऑफिसला गेलेली असते विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतकयात दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उघडून प्रतिभाला आत घेतो..

प्रतिभा : मला यायला आज जरा उशिरच झाला .. सॉरी ..

विजय : सॉरी ! काय ?

प्रतिभा : नाही तुम्हाला चहा मिळाला नसेल ना ?

विजय : तू घाबरू नकोस माझा मी करून घेतला तुलाही ठेवला आहे तो गरम करून तू ही घे आणि मलाही आणून दे !

प्रतिभा : तुम्ही कशाला करून घेतला मी येणारच होते ना ?

विजय : मी ही चांगला चहा बनवतो म्हटलं !

प्रतिभा : ते मला माहीत आहे, तुमच्या हातचा चहा मी घरी आल्यावर कित्येकदा प्यायले आहे.

विजय : हो ना ?

प्रतिभा : आपण चौघानी तो हॉटेलात प्यायलेला चहा ही मला अजून आठवतोय ! तुम्ही , अजय , मी आणि विजया होतो तेव्हा !

विजय : तो चहा तुला अजून आठवतोय..

प्रतिभा : फक्त चहाच आठवत नाही आणखी बरच काही आठवतंय !

विजय : आणखी काय आठवतंय ?

प्रतिभा :जाऊदे ! आता कशाला काढायच्या जुन्या आठवणी... मी चहा गरम करून आणते

प्रतिभा चहा गरम करून घेऊन आल्यावर

विजय : कसा आहे चहा ?

प्रतिभा : छान आहे

विजय : आज दुपारी जेवणात काय करतेस ?

प्रतिभा : कोबीची भाजी

विजय : कोबीची भाजी अजिबात करू नकोस

प्रतिभा : का ?

विजय : मी कोबीची भाजी अजिबात खात नाही मला ती खाल्ल्यावर त्रास होतो

प्रतिभा : मग ! कसली करू ?

विजय : बटाट्याची कर ..

प्रतिभा : हो ! करते

विजय : बटाट्याच्या भजीवरून आठवलं आपण लहान असताना पिकनिकला जाताना नेहमी बटाट्याची भाजी आणि पुऱ्या घेऊन जायचो तेव्हा त्या पुऱ्या पिकनिकला खाताना किती गोड लागायच्या आता त्या तितक्या गोड लागत नाही का कोणास जाणे !

प्रतिभा : जसा जसा काळ पुढे सरकतो तस तश्या माणसाच्या आवडी निवडी बदलतात हा निसर्गाचा नियम आहे ... एक वेळ होती तेव्हा तुम्हाला मी ही आवडायचे...

विजय : मैत्रीण म्हणून तू मला आजही आवडतेस !

प्रतिभा : पण चार चौघात तुम्ही मला तुमची मैत्रीण म्हणत नाही तर माझी ओळख करून देताना यामिनीची मानलेली बहीण अशी करून देता..

विजय : प्रतिभा मलाही ते नाही आवडत पण माझा नाईलाज आहे.. आता आपल्या आयुष्याच्या दिशा बदललेल्या आहेत. मला नाही जगता येत आता पूर्वीसारखं मनाला वाटेल तसे !

प्रतिभा : मी समजू शकते..

विजय : नाही ! तू नाही समजू शकत... मला जे हवे होते ते मला माझ्या आयुष्यात कधीच वेळेवर मिळाले नाही...

प्रतिभा : यामिनी ताईंचे तुमच्यावर किती प्रेम आहे ?

विजय : पण ते का आहे ते तुला माहीत नाही.

प्रतिभा : तुमच्या मनात आता आपल्याला मुलं हवीत अशी इच्छा तर निर्माण झाली नाही ना ?

विजय : नाही ...

प्रतिभा : लग्नाबद्दल तुझ्या मनात इतका तिरस्कार का ?

विजय : त्याला माझे कारणीभूत आहेत माझ्याच आयुष्यातील काही माणसे ज्यांचे विवाहित असून मुलबाळ असताना इतकेच नव्हे तर त्याच्या बायक्या सुंदर असून त्या सुसंस्कृत आणि सभ्य असतानाही त्यांचे परक्या विवाहीत स्त्रियांसोबत अनैतिक संबंध होते.

प्रतिभा : मला त्यात काही नवल नाही वाटत हल्ली..

विजय : आता मलाही नाही वाटत पण तेव्हा वाटायचे .. मला तो पुरुषांनी स्त्रियांवर केलेला अन्याय वाटायचा कारण या पुरुषांच्या आणि स्त्रियांचाही नजरेत आपल्या कृत्याची जराही लाज दिसली नाही कधी ..

प्रतिभा : आपली समाज व्यवस्था तशी आहे त्याला काय करणार ? आजही स्त्रियांना आपल्या मर्जीचा पुरुषासोबत कोठे लग्न करता येते ... तुम्हा पुरुषांकडे अविवाहीत राहण्याचा तरी पर्याय असतो आम्हा स्त्रियांकडे तो ही नसतो. नेहमीच आम्हाला आमच्या भाव - भावनांना आवर घालावा लागतो आणि समाज्याने ठरवून दिलेल्या पुरुषासोबत आयुष्य काढावे लागते मग ! तो कसाही असला तरी..

विजय : याबाबतीत मला नेहमीच मुलं ही स्त्रियांच्या पायातील बेड्या वाटतात...

प्रतिभा : हो ! पण मुलांनाच जन्म दिला नाही तर हे जग कसे चालेल ?

विजय : हाच प्रश्न मला पडायचा आणि मी स्वतःला सावरायचो !

प्रतिभा : मला तेव्हा लग्नच करायचे नव्हते पण आई- बाबांनी मला न विचारताच माझे लग्न ठरवून करून टाकले. लग्नानंतर लगेच पोरं झाली, आयुष्यात नवीन असे काही घडलेच नाही ! आज मी माझ्या नवऱ्यात आणि मुलांमध्ये रमते पण स्वतःची ओळख बाजूला ठेवून.. कारण माझ्या आयुष्यात माझ्या मर्जीने असे काहीच घडत नाही ... माझ्या घराला आर्थिक आधार मिळावा म्हणून मी तू माझा इतका जिवलग मित्र असतानाही तुझ्या घरात घरकामाला राहिले माझे नशीब चांगले म्हणून यामिनी ताईंनी मला मानलेलं बहीण मानले.. दुसरी कोणी असती तर...

विजय : ती नसती तर दुसरी कोणी नुसतीच..

प्रतिभा : हो ! यामिनी ताईंना पर्याय असूच शकत नाही.

विजय : बोलतच बसणार का ? जेवण करायचे नाही का ??

प्रतिभा : सॉरी सॉरी .. मी लगेचच करते ..

प्रतिभा स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला जाते आणि विजय तेथेच टी.व्ही. पाहत बसलेला असतो इतकयात दारावरची बेल वाजते दारात एक मुलगी उभी असते.. गोरीपान लांबसडक काळे केस असणारी, नाजूक काळ्याभोर डोळ्याची, माध्यम उंची असणारी, सडपातळ ..

विजय : निलिमा ! ये ! ये ! आत ये ..

निलिमा : सॉरी ! सर .. मी तुम्हाला अशी न सांगता अचानक आले.

विजय : सॉरी काय ? तू तुझ्या कामासाठीच आली आहेस ना ? तू बस ...

निलिमा : सर तुमच्या पुस्तकाचे कव्हर पेज तयार होऊन आले आहे तेच दाखवायचे होते त्यात काही सुधारणा करायच्या आहेत का ते विचारायचे होते !

विजय : ते मला मेल केले असते तरी चालले असते

निलिमा : प्रत्यक्ष भेटून चर्चा केल्याने खूप फरक पडतो सर..

विजय : आज तू खूपच सुंदर दिसते आहेस ..

निलिमा : थँक यु सर ..

विजय : तू काय घेणार चहा - कॉफी की थंडा ?

निलिमा : मला काहीही चालेल !

विजय : निलिमा ! तू बस मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो ..

विजय पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात जातो आणि येताना हातात एक पाण्याचा ग्लास भरून आणतो त्याच्या पाठीमागून प्रतिभा लगेच चहा आणि त्याच्यासाठी बिस्किटे घेऊन येते .

निलिमा : ह्या कोण ?

विजय : ही माझ्या बायकोची मानलेली बहीण आहे ...

निलिमा : नमस्कार !

प्रतिभा : नमस्कार .. ह्या कोण ?

विजय : ही माझ्या नवीन पुस्तकाची प्रकाशक आहे .

प्रतिभा : प्रकाशक म्हणजे ?

विजय : प्रकाशक म्हणजे माझे पुस्तक ती तयार करणार आहे

प्रतिभा : असं ! होय ! बरं तुमचं चालुद्या मी स्वयंपाकघरात माझी कामे करते काही लागलं तर मला हाक मारा ..

विजय : हो ! चालेल

प्रतिभा स्वयंपाकघरात निघून गेल्यावर ..

निलिमा : ही प्रतिभा ! दिसायला खूपच छान आहे मला एखाद्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर हिचा फोटो छापायला आवडेल

विजय : निलिमा तुझी नजर सारखी कशाच्या तरी शोधात असते ना !

निलिमा : हो ! अगदी तुमच्यासारखी !

विजय : तू इतकी धावपळ करून इकडे का आलीस मला फोन केला असता तर मी आलो असतो .

निलिमा : सर मी इकडे आले ते तुम्हाला आवडले नाही का ?

विजय : खरंच तसे काही नाही !

निलिमा : सर हे पहा ! तुमच्या नवीन पुस्तकाचे कव्हर

विजय : खूपच सुंदर आहे.. तुला आवडले ना ?

निलिमा : सर मला आवडेल पण तुमची आवड महत्वाची कारण हे पुस्तक म्हणजे तुमचे आपत्य आहे.

विजय : हे बाकी तू बरोबर बोललीस माझे प्रत्येक पुस्तक हे माझे आपत्य असते आता त्या आपत्याची आई होण्याचे भाग्य तुला लाभणार आहे.

निलिमा : हो ! त्याबातीत मी फारच उत्सुक आहे.

विजय : माझ्या पुस्तकाच्या बाबतीत तू जी मेहनत घेत आहेस मला त्याचा अभिमान वाटतो. या पुस्तकाच्या यशात तुझा खूप मोठा वाटा असेल

निलिमा : आणि अपयशात ?

विजय : नाही ! अपयश हे माझ्या एकट्याचेच असेल पण माझे अपयश हे तुझे आर्थिक नुकसान असेल त्यामुळे ते होणार नाही याची मी काळजी घेईन

निलिमा : सर तुम्ही त्याची काळजी करू नका ! माझे तुमच्या साहित्यावर प्रेम आहे ... प्रेमासाठी मी इतकेआर्थिक नुकसानही नक्की सोसू शकते

विजय : मी विनोद करतोय !

निलिमा : मी ही सर.. मला खात्री आहे हे पुस्तक प्रचंड गाजणार ..

विजय : हे कव्हरपेज फायनल करून टाक ! कव्हर पेज सुंदर आहे की नाही याने मला काहीही फरक पडत नाही .. मी बाह्य रुपाला महत्व देत नाही तर अंतरंगाला महत्व देतो.

निलिमा : सर ते मला माहीत आहे ...

विजय : हे पुस्तक तयार व्हायला अजून किती दिवस लागतील ?

निलिमा : सर अजून एक महिना लागेल एकदा का पुस्तक छापून झाले कि लगेच आपण प्रकाशन करून टाकू .. . या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठीही माझी टीम कामाला लावली आहे कामिनीही मला त्यात मदत करणार आहे.

विजय : कामिनी .. . ती मदतीला आहे म्हणजे काय बघायलाच नको !

निलिमा : सर... कामिनी सारखी तुमच्याबद्दल बोलत असते.. तुमची मैत्री फार जुनी आहे का ?

विजय : नाही गं ! पण आमच्या मैत्रीला तीन एक वर्षे झाली असतील , मी पहिल्यादा तिला भेटलो तेंव्हा तिच्या प्रेमात पडलो म्हणजे तिच्या बोलण्याच्या आणि दिसण्याच्याही !

निलिमा : सर मला भेटल्यावर तुम्हाला काय वाटले होते ?

विजय : निलिमा ! तू मला माझ्या स्वप्नातील परीसारखी दिसलीस साधी भोळी निरागस... तुझा गोड आवाज मला ऐकायला खूपच छान वाटतो.

निलिमा : सर खरोखरच माझा आवाज इतका गोड आहे का ?

विजय : म्हणजे काय ? मी माझ्या कविता तुझ्या आवाजात वाचून घेणार आहे...

निलिमा : मला आवडेल आपण त्या कवितांचे व्हिडिओही तयार करू या .. सर मी तुमचे पुस्तकाचे कपाट आणि तुम्हाला मिळालेले प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हे पाहू का ?

विजय : बघ ! त्यात काय विचारायचे !

निलिमा विजयची जुनी प्रकाशित झालेली पुस्तके पाहत असताना

निलिमा : सर ! पूर्वी तुम्ही किती झिरो फिगर होतात .. आणि किती गोड दिसायचला होतात

विजय : म्हणजे आता मी गोड दिसत नाही का ?

निलिमा : नाही सर ! आता तुम्ही गोड दिसत नाही तर सुंदर दिसता

विजय : खरंच मी सुंदर दिसतो का ?

निलिमा : म्हणजे काय ?

विजय : माझ्या ह्या दिसण्यामुळेच पूर्वी मी साहित्यिक आहे हे लोकांना सांगूनही खरे वाटत नसे त्यामुळे मी नेहमीच माझी पुस्तके सोबत ठेवत असे.

निलिमा : सर.. किती वेगवेगळ्या विषयावर तुमची पुस्तके प्रकाशित झाली आहेत पण मला एका गोष्टीच वाईट वाटत ती मला नाही प्रकशित करता आली.

विजय : तो आता भूतकाळ झाला तू वर्तमानाचा विचार कर.. भूतकाळात मी फक्त प्रेमावर कथा लिहायचो कविता लिहायचो पण आता नाही आता माझ्यातील लेखक अधिक विचारी झालेला आहे.

निलिमा : सर मी तुमच्या सर्व प्रेम कथा वाचल्या आहेत .. त्या कथा वाचून तर मी तुमच्या म्हणजे तुमच्या साहित्याच्या प्रेमात पडले.. सर तुमचा प्रेमविवाह झाला आहे का ?

विजय : आमचा ... जगाच्या नजरेत प्रेमविवाहच आहे पण तो आम्ही ठरवून केला होता.

निलिमा : माझ्या माहितीप्रमाणे सर तुम्ही लग्नच करणार नव्हतात ?

विजय : हो ! पण मला लग्न करावे लागले कारण मला माझे स्वप्न खुणावत होते.

निलिमा : सर तुमचे लग्न झालेले नसते ना ! तर मी तुमच्याशी लग्न केले असते ...

विजय : आपल्या वयात किती अंतर आहे माहीत आहे ना ?

निलिमा : त्याने काय फरक पडतो आपल्या प्रिय व्यक्ती सोबत घालवायला मिळालेले काही क्षणही कधी कधी संपूर्ण आयुष्य सुगंधी करून जातात .. वयाने काही फरक पडत नाही प्रेम असण्याशी मतलब.. तेच नसेल तर आपल्या वयाची व्यक्तीही आपल्याला नकोशी होते. जीवन क्षणभंगुर आहे. ते कधी ना कधी तरी संपणारच मग आपले प्रेम आपल्याला मिळाल्याचा आनंद आपल्या जगण्याला एक वेगळा अर्थ देतो.

विजय : निलिमा ! तुझा काही प्रेमभंग वगैरे झाला आहे का ?

निलिमा : हो ! तुम्ही केला माझा प्रेमभंग ... पूर्वी मी तुमच्या साहित्याच्या प्रेमात होते पण प्रत्यक्षात तुमची भेट झाल्यावर मी तुमच्याच प्रेमात पडले.. सर तुमचा झाला आहे का कधी प्रेमभंग ?

विजय : नाही ! कारण माझा प्रेमभंग व्हावा इतकं प्रेम मी कधी कोणावर करूच शकलो नाही.

निलिमा : म्हणजे सर तुमचे तुमच्या बायकोवरही प्रेम नाही ..

विजय : नाही ! आम्ही फक्त एक स्त्री पुरुष म्हणून समाजाने घातलेल्या बंधनात गुरफटून एकत्र राहत आहोत. माझा व्यक्तिश: विवाह संस्थेवर कधीच विश्वास नव्हता ती फक्त एक सोय आहे मानव वंश वाढविण्यासाठी केलेली.

निलिमा : सर .. माझाही विश्वास नाही विवाह संस्थेवर पण माझा प्रेमावर विश्वास आहे ...

विजय : आपण कोठून कोठे पोहचलो ..

निलिमा : हो ! तुमच्याशी बोलायला सुरुवात केली की फक्त बोलत राहावेसे वाटते.

विजय : आणि मला ऐकत राहावेसे ..

इतक्यात प्रतिभा स्वयंपाकघरातून बाहेर येते ..

प्रतिभा : मी निघू का आता ?

विजय : हो ! हो ! तू निघ ..

निलिमा : सर मी ही निघते आता .

विजय : हो ! चालेल .. काही काम असेल तर मला फोन कर आपण भेटू तुझ्या ऑफिसात

निलिमा : प्रतिभा ! मी सोडू का रस्त्यात कोठे तुला ?

प्रतिभा : नको ! मी जाईन माझी माझी ..

निलिमा : कशाला ? माझ्याकडे गाडी आहे मी सोडते तुला रस्त्यात..

प्रतिभा : चालेल ...

निलिमा आणि प्रतिभा एकत्र घराच्या बाहेर पडतात ..

त्या घरातून बाहेर पडल्यावर विजय सोफ्यावर बसून स्वतःशीच विचार करत असतो

विजय : आता ही प्रतिभा निलिमाला काय काय विचारेल देवच जाणे , निलिमा माझ्या प्रेमात आहे हे माझ्या लक्षात आले आहे पण तिला काय माहीत प्रेमात पडून पडून आता माझे हृदय पाषाणाचे झालेले आहे. माझे यामिनीवर तसे प्रेम नसले तरी नवरा म्हणून मी तिची प्रतारणा करू शकत नाही. माझे यामिनीवर प्रेम नसले तरी तिचे माझ्यावर प्रचंड प्रेम आहे , माझ्या आयुष्यात माझ्यावर प्रेम करणाऱ्या किती आहेत ? मी ठरवूनही माझ्या आयुष्यात प्रेमाला न्याय कधीच देऊ शकत नाही हेच सत्य आहे. प्रतिभा माझ्यावरील प्रेम अबोल राहून व्यक्त करते, कामिनी ते तिच्या देहबोलीतून व्यक्त करते, निलिमा तिच्या डोळ्यातून आणि यामिनी तिच्या कृतीतून.. प्रेमाच्या बाबतीत मी कोना एकीचा होऊच शकत नाही हा मला मिळालेला कदाचित एक शापच आहे. 

स्वतःशी विचार करता करता विजय भानावर येतो आणि लॅपटॉप घेऊन त्यावर काम करायला सुरुवात करतो. संध्याकाळी प्रतिभा पुन्हा कामावर आल्यावर

विजय : निलिमाने तुला कोठे सोडलं ?

प्रतिभा : निलिमा खूपच गोड मुलगी आहे मला अगदी माझ्या घरापर्यत सोडले, इतकी शिकलेली, सुंदर आणि श्रीमंतही तरी तिच्यात अजिबात गर्व नाही. अगदी तुमच्यासारखेच तिचे पायही जमिनीवर आहेत.

विजय : हो ! ती आहेस तशीच म्हणूनच तर पहिल्याच भेटीत मी तिच्यासोबत काम करायला होकार दिला , आता हेच बघ ना ! पुस्तकाचे कव्हर फायनल करायला ती मला तिच्या ऑफिसात बोलावू शकली असती पण ती स्वतः आली आपल्या घरात

प्रतिभा : माझीही आस्थेने चौकशी करत होती, मला ती म्हणालीही एखाद्या पुस्तकाच्या कव्हर पेजवर मी तुझे छान छायाचित्र नक्कीच प्रकशित कारेन .. ते ऐकून मला इतका आनंद झाला की मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही.

विजय : हो ! तिला लोकांमधील प्रतिभा शोधण्याचा छंदच आहे आणि तुझे तर नावच प्रतिभा आहे . तिने एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर सहसा ती तिच्या डोक्यातून जात नाही.

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा करून घेऊन येते

इतक्यात यामिनी घरात येते ..

यामिनी : माझ्यासाठी पण घेऊन ये !

प्रतिभा : ताई ! तुम्ही आज लवकर आलात ?

यामिनी : हो ! काय विजय ? आज कोठे बाहेर गेला नाहीस.

विजय : मी घरातूनच काम करतो हे विसरलीस की काय ?

यामिनी : नाही ! मी विसरले नाही कारण आजकाल खूप लोक घेऊन आपल्या घरीच येतात . आज कोण आलं होत ?

विजय : आज निलिमा आली होती.

यामिनी : कोण निलिमा ?

विजय : माझ्या पुस्तकाची प्रकाशक !

यामिनी : ती कशाला आली होती ?

विजय : माझ्या पुस्तकाचे कव्हर पेज दाखवायला आली होती

यामिनी : मग जेवूनच गेली असेल नाही ?

प्रतिभा : नाही ! ताई ! ती माझ्यासोबतच घराबाहेर पडली मला गाडीने तिने घरापर्यतही सोडले खूप गोड मुलगी आहे .

यामिनी : पण मी मस्करीत विचारलेले होते ?

विजय : असं होय ! मला वाटले आजही कोणी पाचकले की काय..

यामिनी : हल्ली तुझ्या आयुष्यात फक्त बायका बायकाच दिसत आहेत .

विजय : हो ! काही कळत नाही ! जिकडे जातो तिकडे माझ्या वाट्याला हल्ली बायकाच येतात .. बायका माझ्या डोक्याला ताप झाल्या आहेत

यामिनी : आम्हीही बायकाच आहोत म्हटलं !

विजय : मी विनोद करत होतो.

प्रतिभा : मी चहा करते आणि सोबत उपमाही करते

यामिनी : चालेल ! तशीही मला भूक लागलीच होती. मी फ्रेश होऊन येते .

ते तिघे चहा पित असताना कमळ तेथे येते

कमळ : मी येथूनच जात होते तुझा दार उघड दिसला म्हणून आत आले

यामिनी : आता आलीस आहेस तर उपमाखाऊनच जा प्रतिभाच्या हातचा

कमळ : म्हणजे काय ?

यामिनी : प्रतिभा कमळसाठी उपमा आणि चहा घेऊन ये जरा..

प्रतिभा : हो ! लगेच आणते.

प्रतिभा स्वयंपाकघरातून उपमा घेऊन येते तो खाता खाता

कमळ : प्रतिभा ! तुझ्या हाताची चव आमच्या हाताला का नाही ?

विजय : तिच्या हातावर असणाऱ्या रेषाही तुमच्या हातावर कोठे आहेत ?

कमळ : हे बाकी भावोजी तुम्ही एकदम बरोबर बोललात

यामिनी : तू कोठे चालली होतीस ?

कमळ : मी ना ! भाजी आणायला चालले होते.

यामिनी : प्रतिभा चल आपण पण जाऊया ! आज आपण पावभाजी करूया !

कमळ : मी येऊ ना खायला ?

यामिनी : म्हणजे काय ?

कमळ : मग चला शुभ काम मे देरी क्यु ?

विजय : करा करा ! खूप दिवस झाले घरची पाव भाजी खाऊन ! एक काम करा तुम्ही भाजीच बघा मी पाय मोकळे करायला चललोच आहे तर येताना पाव घेऊन येतो..

यामिनी : आठवणीने घेऊन ये ! नाहीतर नुसतीच भाजी खायला लागायची आम्हाला

विजय : विजय नाही ! मी जातानाच ऑर्डर आणि पैसे देऊन जातो.

यामिनी : चालेल ..

ते सर्वजण एकत्रच घराच्या बाहेर पडतात थोड्यावेळाने भाजी घेऊन प्रतिभा आणि यामिनी घरात येतात ..

यामिनी आणि प्रतिभा मिळून स्वयंपाकघरात भाजी तयार करत असतात.

यामिनी : प्रतिभा ! ती निलिमा कशी मुलगी वाटली तुला ?

प्रतिभा : निलिमा खूपच साधी सरळ आणि प्रेमळ मुलगी आहे .. तिच्या मानत एक आणि ओठावर एक असे तिचे नाही.

यामिनी : मला भेटायला आवडेल तिला ...

प्रतिभा : ताई तुम्ही तिला नक्की भेटा ! तुम्हालाही आनंद होईल तिला भेटून ..

यामिनी : भाजी जरा जास्तच करूया ! तुझ्या घरीही ही घेऊन जा ! कमळच्या घरीही द्यावी लागेल

प्रतिभा : हो ! भरपूर करूया ! नाही कमी पडणार

यामिनी : थांब मी विजयला फोन करते , पावाची आठवण करून देते .. तो कितीही नाही म्हणाला तरी त्याचा काही भरोसा नाही तो विसरूही शकतो.

यामिनी विजयला फोन करणार इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी दार उघडते तर विजय पावासह दारात उभा असतो. विजयाच्या हातातून पाव घेऊन यामिनी स्वयंपाक घरात जाते इतकयात कमळ कवितासह घरात येते.

कमळ : कविता तू काकांकडून निबंध लिहून घे तोपर्यत मी आत जाते पावभाजीची तयारी कोठपर्यत आली आहे ते पाहून येते

कविता : चालेल आई !

विजय : ये कविता बस येथे माझ्या बाजूला तुला कोणत्या विषयावर निबंध लिहायचा आहे ?

कविता : काका ! कोरोना ! या विषयावर लिहायचा आहे..

विजय : बापरे ! कोरोनाचा नुसता उल्लेख जरी निघाला तरी हृदयात धडकी भरते.

कविता : काका ! पण निबंध तर लिहावाच लागणार !

विजय : लिहू या की मग !

कविता : तुम्ही सांगा मी लिहिते

विजय कविताला निबंध सांगत असतो आणि ती लिहीत असते. इतकयात प्रतिभा त्याच्यासाठी चहा आणि कवितांसाठी चॉकलेट दूध घेऊन येते .

विजय : थँक्यू प्रतिभा !

कविता : थँक्यू ..

प्रतिभा : ठीक आहे ... ठीक आहे..

विजय : झाली का पावभाजी ?

प्रतिभा : होतेच आहे .

प्रतिभा स्वयंपाकघरात जाते आणि कमळ बाहेर येते

कमळ : कविता ! झाला का निबंध लिहून ?

कविता : हो ! आई झाला.

कमळ : मग आता काकांसोबत टी . व्ही. पाहत बस

विजय : कविता तुला कार्टून पाहायचे आहे का ?

कविता : नाही ! नको ! आपण मालिकाच पाहूया ! काका तुम्ही बिग बॉस मराठी पाहता का ?

विजय : हो ! पाहतो जेवता जेवता ..

कविता : मी ही रोज बिग बॉस मराठी पाहिल्यावरच झोपते.

विजय : आज आपण एकत्र पाहूया हा ! पाव भाजी खाता खाता बिग बॉस मराठी !

कविता आणि विजय एकमेकांशी गप्पा मारता मारता भितीवरील घड्याळाचे काटे पुढे सरकत असतात..

थोड्यावेळाने त्या तिघेही स्वयंपाकघरातून बाहेर येतात प्रतिभाच्या हातात एक पिशवी असते ज्यात तिने घरी नेण्यासाठी पावभाजी घेतलेली असते प्रतिभा सर्वांचा निरोप घेऊन निघते .. आता ते चौघेच हॉलमध्ये बसलेले असतात.

कमळ : मी जरा घरी जाऊन येते , कविता तू येथेच बस काकांजवळ

कविता : हो ! चालेल

कमळ तिच्या घरी निघून जाते .

यामिनी : काय ? कविता मग पावभाजी सोबत किती पाव खाणार ?

कविता : चार !

यामिनी : बस ! चार ?

कविता : हो ! काका ! तुम्ही किती खाणार ?

विजय : मी जास्तीत जास्त सहा खाईन..

कविता : काकी तू ?

यामिनी : मी पण सहाच खाणार

कविता : मम्मी दहा खाईल !

यामिनी : खरचं ?

कविता : हो !

यामिनी : पप्पा ?

कविता : पाच - सहा !

आपण आज पाव - भाजी खाण्याची स्पर्धाच लावूया !

कमळ : कशाला ? त्याचा रिझल्ट मी अगोदरच सांगते ही स्पर्धा मीच जिंकणार

यामिनी : तू लगेचच आलीस ! भावोजी आले का ?

कमळ : नाही ! त्यांना यायला उशीर होणार आहे आपण पाव - भाजी खाऊन घेऊया !

यामिनी : चालेल ..

ते तिघे पाव - भाजी खायला बसतात तेव्हा त्यांच्यातील गप्पा रंगतात.

कमळ : वा ! काय भाजी झाली आहे !

यामिनी : खरंच ! खूप छान झाली आहे.

विजय : खूप दिवसांनी इतकी छान पाव - भाजी खातोय !

कविता : हो ! खूपच छान आहे.

कमळ : मला आता आठवलं ! आज तुमच्याकडे एक सुंदर मुलगी आली होती कोण होती ती ? मी प्रतिभाला तिच्या सोबत जाताना पहिले.

विजय : हो ! ती माझ्या नवीन पुस्तकाची प्रकाशक आहे.

कमळ : प्रकाशक ! इतकी तरुण !

विजय : त्यात काय ? ती खूप हुशार आहे.

यामिनी : तुला कसे माहीत ती हुशार आहे ते ?

विजय : आम्ही सतत चर्चा करत असतो वेगवेगळ्या विषयावर .. .

यामिनी : म्हणजे तू हल्ली मोबाईलवर चिपकलेला असतोस ते तिच्यासोबतच बोलत असतोस ?

विजय : बोलत नसतो ! चर्चा करत असतो.

कमळ : ती मुलगी मला खूपच साधी - सरळ वाटत होती.

विजय : विजय ती आहेच साधी सरळ !

यामिनी : इतकीच सुंदर , हुशार , विचारी आणि श्रीमंत आहे तर लग्न का केले नाही ?

विजय : नाही ! मी तिला ते कधी विचारले नाही ... तुला तर माहीतच आहे मी लग्नाबद्दल कधीच कोणाला काही विचारत नाही.

यामिनी : हो !

कमळ : भावोजी ! तुमचे पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे ?

विजय : अजून एक - दोन महिने लागतील...

यामिनी : म्हणजे ! तोपर्यत तुमची चर्चा सुरू राहणार !

विजय : तू जळतेयस का तिच्यावर ?

यामिनी : मी का जळू ?

कमळ : यामिनी ! तू कशाला भितेस ? विजय भावोजींना फक्त तूच सहन करू शकतेस !

यामिनी : हे बाकी तू बरोबर बोललीस !

कविता : आई ! मी पाच पाव खाल्ले बस झले मी उठते !

कमळ : तू उठ ! माझे अजून बाकी आहे ..

विजय : कमळ वहिनी ! तुम्ही खाआरामात, माझे झाले ..

विजय आणि कविता सोफ्यावर बसून गप्पा मारत असतात

यामिनी आणि कमळ पाव - भाजी खाऊन झाल्यावर यामिनी कमलेश भावोजींसाठी पाव - भाजी डब्यात भरून दिली. कविता आणि कमळ निघून गेल्यावर

विजय : यामिनी हल्ली तू माझ्या बाबतीत जरा जास्तच पझेसिव्ह झाली आहेस नाही !

यामिनी : हो ! हल्ली मला सतत तुला गमावण्याची भीती वाटत असते.

विजय : कशाला उगाच त्रास करून घेतेस... मी तसा कोणाचाच होत नाही ... पण कायद्याने मी तुझाच आहे. 

यामिनी : चल जरा बाहेर जाऊन फेरफटका मारून येऊया !

विजय : चालेल ! आपण आईस्क्रीमही खाऊया !

यामिनी : हो ! चालेल ! सोबत कवितालाही घेऊया ! कमळ काही येणार नाही आता ..

विजय : हो ! चालेल

विजय आणि यामिनी घरातून बाहेर पडतात आणि थोड्यावेळाने पुन्हा घरी येऊन सोफ्यावर बसतात.

यामिनी : चालल्यावर जरा फ्रेश वाटते ना ?

विजय : हो ! पूर्वी आपण रोज रात्री चालायला जायचो पण हल्ली वेळच मिळत नाही ...

यामिनी : आता पुन्हा सुरुवात करायला हवी !

विजय : हो ! मी नाही आलो तरी तू कमळाला घेऊन जात जा ..

यामिनी : चल झोपू या आता .. तुझ्या मानेवर कोणी नाही ! माझ्या मानेवर बॉस आहे.

विजय : माझ्या मानेवर तू आहेस ना ?

यामिनी : उगाच काही ही ! चल मी झोपते शुभ रात्री !

विजय : शुभ रात्री !

ते दोघेही आप - आपल्या रूममध्ये जाऊन झोपी जातात

दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा प्रतिभा कामाला येते

विजय : मुलांना आवडली का पावभाजी ?

प्रतिभा : हो ! खूप आवडली. मी लगेच तुमच्यासाठी चहा घेऊन येते ..

विजय : हो ! लगेच घेऊन ये ! मला जरा बाहेर जायचे आहे .. माझ्यासाठी आज दुपारचा स्वयंपाक नको करू... मी बाहेर जाणार आहे , तू तुझी छोटी-मोठी कामे कर आणि तू जा ...

प्रतिभा : चालेल ..

विजय प्रतिभाने आणलेली चहा पितो आणि टायर होऊन बाहेर निघून जातो.

विजय निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाकघरात काम करत असताना दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडून कमळला आत घेते

कमळ : प्रतिभा ! कालची तुझ्या हातची पाव भाजी आम्हाला खूपच आवडली ...

प्रतिभा : तुम्ही बसा ! मी तुमच्यासाठी चहा ! घेऊन येते ..

कमळ : आपल्यासाठी घेऊन ये !

चहा पिता पिता

प्रतिभा : कविताला शाळेत सोडून आलात वाटतं ?

कमळ : हो ! विजय भावोजी कोठे गेले ?

प्रतिभा : ते काही मला सांगितले नाही पण आज दुपारी जेवायला येणार नाही म्हणाले.

कमळ : मग तू लवकर घरी जाणार असशील ?

प्रतिभा : हो !

कमळ : जाताना माझ्या घरी ये मी तुझ्या मुलासाठी खाऊ देणार आहे

प्रतिभा : कशाला ?

कमळ : कशाला म्हणजे ! मी ही तुझ्या मुलांची मावशीच आहे. ह्या रविवारी आपण पिकनिकला जाऊया .. तू ,मी ,यामिनी आणि आपली मुले .. खूप मजा करू ..

प्रतिभा : चालेल .. पण कोठे जायचे

कमळ : बोटिंगला जाऊया ! चल मी निघते संध्याकाळी भेटूया .. तू ही तुझी कामे लवकर आटप आणि जा घरी लवकर...

कमळ निघून गेल्यावर थोड्यावेळाने प्रतिभाही निघून जाते.

संध्याकाळी प्रतिभा स्वयंपाक घरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत असते. इतकयात दारावरची बेल वाजते यामिनी आणि कमळ एकत्रच घरात येतात आणि सोफ्यावर बसतात प्रतिभा त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते

यामिनी : प्रतिभा ! जरा आपल्यासाठी कोकम सरबत बनवून आणतेस का ?

प्रतिभा : हो लगेच !

कोकम सरबत पिता पिता

कमळ : आपले रविवारी बोटिंगला जायचे फिक्स झाले आहे मी यामिनीला सांगितले आहे

यामिनी : हो ! प्रतिभा आपण जाऊया !

प्रतिभा : चालेल

कमळ : मी जाते आता घरी खूप कामे पडली आहेत.

यामिनी : साहेब !

प्रतिभा : ते सकाळीच बाहेर गेले आहेत,

यामिनी : बरं ! आज भाजी कसली करणार आहेस ?

प्रतिभा : मी तुमच्यासाठी मासे तळून आणले आहेत आणि साहेबांची पनीर करू

यामिनी : चालेल ..

प्रतिभा : तुम्ही बसा ! मी स्वयंपाकाचं बघते ..

स्वयंपाक आटपून प्रतिभा घरी जायला निघाल्यावर

यामिनी : प्रतिभा हे घे तुझे मानधन

प्रतिभा : मानधन ?

यामिनी : हो ! मानधन .. पगार द्यायला तू काही माझ्याकडे नोकरीला नाहीस !

प्रतिभा यामिनीने दिलेले पैसे मोजते ते पूर्ण दहा हजार असतात

प्रतिभा : तुम्ही मला ते आगाऊ तीन हजार दिलेले ते कापून घायचे ना ?

यामिनी : तू माझी बहीण आहेस ! इतका छोटा हिशोब ठेवायची काही गरज नाही !

प्रतिभा : हो ! पण ...

यामिनी : पण बिन काही नाही ! जा आता आणि ते रविवारचे लक्षात ठेव !

प्रतिभा : हो ! हो !

प्रतिभा पैसे आपल्या पर्स मध्ये कोंबून निघून जाते ...

प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी शून्यात हरवलेली असताना दारावरची बेल वाजते आणि ती भानावर येते दार उघडून विजयला आत घेते

विजय : हा ! घे ! तुझ्यासाठी गजरा आणला आहे

यामिनी : गजरा ! थँक्स ! एकदम टवटवीत आहे आहे तुझ्यासारखा..

विजय : पण तू का कोमेजलेली दिसत आहेस

यामिनी : काही नाही ! हल्ली मी एकटीच घरी असले की घर मला खायला उठते

विजय : मलाही ...

यामिनी : चल तू फ्रेश हो ! आपण जेवून घेऊया !

विजय : हो लगेच ..

विजय फ्रेश होऊन आल्यावर

यामिनी : आज सकाळीच घराच्या बाहेर गेला होतास ते थेट आता घरी येतोयस ?

विजय : ते आमच्या उद्योगासाठी एक जागा बघायला गेलो होतो.

यामिनी : म्हणजे ती बिझनेसच्या सिरिअसली विचार करतो आहेस ?

विजय : म्हणजे काय ? यामिनी ! मला काहीतरी नवीन निर्माण करण्यातून जो आनंद मिळतो तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही .

यामिनी : ते आहेच तू आयुष्यभर प्रयोग करत आलास फक्त वस्तूंवरच नाही तर माणसांवरही..

विजय : ते जाऊदे ! तुझा रविवारचा काय प्लॅन आहे ?

यामिनी : का ?

विजय : आपण पिक्चरला गेलो असतो ... माझ्याच मित्राने प्रोड्युस केलेला चित्रपट आहे

यामिनी : मला आवडले असते पण आमचा प्लॅन अगोदरच ठरला आहे आम्ही म्हणजे मी, प्रतिभा , कमळ आणि त्यांची मुले बोटिंगला जाणार आहोत

विजय : काही हरकत नाही आपण पुढच्या रविवारी जाऊ .. .

यामीनी : सॉरी !

विजय : सॉरी ! कशाला ?

यामिनी : चल मी जेवायला वाढते !

विजय : हो ! खूप भूक लागली आहे.

यामिनी आणि विजय जेवत असताना

यामिनी : तुझ्या बिझनेसमध्ये माझी काही मदत लागली तर सांग !

विजय : नक्कीच !

यामिनी : मग तुझे लिखाण ?

विजय : लिखाण हा माझा श्वास आहे ते थोडीच सोडणार आहे मी !

यामिनी : नक्की कसला उद्योग करणार आहेस तू ?

विजय : मला कोकणात पर्यटन वाढावे म्हणून काहीतरी करायचे आहे त्यासोबत कोकणात उपलब्ध साधनसामुग्रीचा कसा उपयोग करता येईल यावर काम करायचे आहे.

यामिनी : हे उत्तम ! गावाकडील आपली जमीनही कमी येईल.

विजय : हो !

यामिनी : तू प्रयत्न कर तुला नक्कीच यश येईल.

विजय : हे माझे फार पूर्वीपासूनच स्वप्न आहे

यामिनी : तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे अशीच मी देवाकडे पार्थना करते

विजय : धन्यवाद !

यामिनी : जेव आता !

विजय : हो ! तुझी मजा आहे .. आज तळलेले मासे आहेत तुझ्या ताटात

यामिनी : हो ! आज दोन घास जास्तच जातील

विजय : मलाही ! कारण पनीर भुर्जी मला खूपच आवडते .. मी शाकाहारी झाल्यावर आई माझ्यासाठी मच्ची खाण्याच्या दिवशी आवर्जून भुर्जी बनवायचीच

यामिनी : तुला घरच्यांची इतकीच आठवण येते तर आपण तुझ्या घरच्यांपासून दूर का आहोत ?

विजय : कारण ते मला माझ्या साहित्य निर्मितीपासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नात होते.

यामिनी : पण आता परिस्थिती बदली आहे , तू मोठा साहित्यिक झालेला आहेस

विजय : पण आता ते तरी कोठे मुंबईत राहतात ?

यामिनी : ते खरे असले तरी आपल्याला आपल्याघरी जाऊन येऊन राहायला काय हरकत आहे

विजय : मुंबईत आपल्याला कोणी खाजगी प्रश्न विचारत नाही पण गावी कोकणात तसे होणार नाही !

यामिनी : हो ! याची मला कल्पना आहे. पण आपल्याला आता वास्तविकतेचा स्वीकार करावाच लागणार ?

विजय : माझ्या घरचे पूर्वी मी लग्न करत नाही म्हणून दुःखी होते . आता मला मुलबाळ नाही म्हणून दुःखी आहेत.

यामिनी : याबाबतीत आपण ठरवूनही त्यांना सुखी करू शकत नाही.

विजय : हो ! ते कळतेय मला म्हणूनच मी तुला गावी घेऊन जाणे टाळतो.

यामिनी : माझ्यासोबत लग्न करून तू चूक तर केली नाहीस ना ? असे नाही ना वाटत तुला ?

विजय : अजिबात नाही ! तुझ्याशी लग्न हा मी माझ्या आयुष्यात घेतलेला सर्वात योग्य निर्णय होता, हे आता सिद्धही झालेले आहे.

यामिनी : चल ! माझे जेवून झाले तू सावकाश जेव !

विजय : माझेही झालेच !

ते दोघे जेवून झाल्यावर सोफ्यावर बसलेले असतात आणि टी.व्ही. पाहत असतात तर एका चॅनेल वर कामिनी एका सिलेब्रेटीची मुलाखत घेत असते

यामिनी : काय भारी बोलते नाही ही कामिनी ?

विजय : हो ! ती आहेच भारी ..

यामिनी : टी.व्ही. वर ती जास्तच सुंदर दिसते नाही.

विजय : हो !

यामिनी : तुझी नाही कधी मुलाखत घेतली तिने ?

विजय : माझी मुलाखत घेणार आहे ती !

यामिनी : कधी ?

विजय : लवकरच ! माझे पुस्तक प्रकाशित झाले की.

यामिनी : मलाही तुझ्या ह्या नवीन पुस्तकाबद्दल खूप उत्सुकता आहे.

विजय : मलाही !

यामिनी : माझ्या ऑफिसमध्येही मला सगळे विचारत असतात तुझ्या नवऱ्याचे नवीन पुस्तक कधी प्रकाशित होणार आहे म्हणून ?

विजय : बोलवू या ! आपण त्या सर्वाना प्रकाशनाला ..

यामिनी : हो ! नक्कीच !

विजय : चल ! तू जाऊन झोप आता तुला सकाळी लवकर उठायचे असते ना !

यामिनी : आणि तू ..?

विजय : मी काय ? दोन चार मालिका बघतो आणि येथेच सोफ्यावर झोपतो आज.

यामिनी : तू आणि तुझ्या मालिका ! काय घालायचा तो गोंधळ घाला मी जाऊन झोपते

यामिनी झोपायला निघून जाते विजयचा मोबाईल वाजतो पलीकडून

कामिनी : विजय ! मी घेतलेली मुलाखत पहिली का ?

विजय : हे काय ? तीच पाहतोय !

कामिनी: कशी वाटली ?

विजय : खूपच छान !

कामिनी : मी कधी दिसतेय ?

विजय : अप्सरेसारखी

कामिनी : खरंच

विजय : मी कशाला खोटं बोलू ?

कामिनी : तू काढून दिलेल्या माहितीचा ही मुलाखत घेताना खूप उपयोग झाला

विजय : तो तर होणारच होता. मग आता पार्टी कधी देणार ?

कामिनी : रविवारी भेटूया !

विजय : चालेल ! पण कोठे ?

कामिनी : माझ्या घरी !

विजय :नको ! त्यापेक्षा माझ्या मित्राने प्रोड्युस केलेला चित्रपट पाहायला जाऊया !

कामिनी : चालेल !

विजय : तू झोपली नाहीस अजून ?

कामिनी : नाही ! मी घेतलेली मुलाखत मीच पाहत होते टी .व्ही . वर इतक्यात मला तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केला.

विजय : ह्यावेळी तुला माझी आठवण येते ?

कामिनी : ह्यावेळी काय ? तू सदासर्वदा माझ्या आठवणीत असतोच , मीच तुझ्या आठवणीत नसते बहुतेक ! नाहीतर माझी मुलाखत पाहून तू मला फोन केला असतास

विजय : मी कोणाकोणाला आठवणीत ठेऊ ..

कामिनी : फक्त मला विसरू नकोस म्हणजे झाले.

विजय : कामिनी तू विसरण्यासारखी गोष्ट आहेस का ?

कामिनी : नाही ! पण तू काहीही विसरू शकतोस याची मला खात्री आहे.

विजय : चल ! झोप आता .. मलाही झोपू दे !

कामिनी : बायको वाट पाहतेय का ?

विजय : ती झोपली केव्हाचीच !

कामिनी : मग मर ना गप्प्पा !

विजय : तुला काय तू रात्रभर गप्पा मारशील पण ते माझ्या कानाला सहन होणार नाही.

कामिनी : बरं ! झोप आता शुभ रात्री

विजय :शुभ रात्री !

विजय मोबाईल टेबलावर ठेवतो आणि स्वतःशीच काहीतरी पुटपुटत गालातल्या गालात हसत टी.व्ही. बंद करतो आणि बेडचा सोफा करून त्यावर झोपतो. 

रविवारी सकाळी उशिरा यामिनी आणि विजय सोफ्यावर बसून चहा सोबत बिस्किटे खात असतात इतक्यात कमळ येते..

कमळ : यामिनी ! आपले बोटिंगला जायचे फिक्स आहे ना ?

यामिनी : म्हणजे काय ? मी प्रतिभाला आताच फोन केला होता.

कमळ : मग ! मी ही माझे आवरायला घेते, दुपारी जेवूनच जाऊया !

यामिनी : तू बस ! मी तुझ्यासाठी चहा बिस्किटे घेऊन येते.

कमळ : नको ! मी आताच घेऊन आले पाहिजे तर एक बिस्कीट घेते.

यामिनी : एक का ? दोन - चार घे की !

कमळ : तू पण ना ! भावोजींसारखी शब्दात पकडायला लागलीस

विजय : कमळ वाहिनी मी कधी तुम्हाला शब्दात पकडले ?

कमळ : नेहमीच पकडता.

विजय : ओके ! घ्या आता एकच बिस्कीट !

कमळ : आता एक नाही चार - पाचच घेते , चल यामिनी मी निघते

यामिनी : हो ! मी पण खिचडी टाकते

कमळ निघून गेल्यावर

विजय : खिचडी ! तू नको ! मी बनवतो

यामिनी : चालेल ! तुझ्या हातची खिचडी छान असते, तोपर्यत मी कपडे वॉशिंग मशीनला लावते.

विजय : चालेल

विजय स्वयंपाकघरात खिचडी बनवायला जातो आणि कामिनी वॊशिंगमशीनला कपडे लावायला जाते.

थोड्या वेळाने विजयची खिचडी तयार होते आणि यामिनीचे कपडेही धुवून होतात

ते एकत्र गरम गरम खिचडी खायला बसतात

यामिनी : खरंच विजय ! तुझ्या हातालाही चव आहे ! तुझ्या हातची खिचडी म्हणजे मेजवानीच वाटते , कोठे बनवायला शिकलास ?

विजय : आम्ही लहान असताना आमची आई- बाबा दोघेही कामाला जायचे, घरात मी सगळ्यात मोठा त्यामुळे जेवण बनविण्याची वेळ माझ्यावरच आले होती, आमच्या घरात आम्हा तिन्ही भावंडाना उत्तम जेवण करता येते पण विजया लहान आणि लाडाची असल्यामुळे तिने कधीच जेवण केले नाही ! जेवण करायला ती लग्न झाल्यावर शिकली पण विजयाच्या नवऱ्याला मात्र उत्तम जेवण करता येते त्यानेच शिकविले तिला जेवण करायला , त्याच्या हातचा मटणाचा रस्सा जर तू खाल्लास तर बोटे चुपत राहशील .. असं मी नाही खाणारे म्हणतात..

यामिनी : निदान त्यासाठी तरी एकदा त्यांच्याकडे जायला हवे ! 

विजय : ह्यावर्षी आपण नक्की जाऊया ! चांगली एक महिन्याची सुट्टी काढूनच जाऊया ! चालेल ना ?

यामिनी : चालेल काय धावेल !

ते दोघे जेवून झल्यावर विजय बाहेर जाण्याची तयारी करतो

यामिनी : तू इतका टकाटक होऊन कोठेचाललास ?

विजय : माझ्या मित्राचा फोन आला होता त्याने मला त्याचा चित्रपट पाहायला बोलावले आहे , मी तिकडेच जातो आहे .

यामिनी : पण आपण पुढच्या रविवारी जाणार होतो ना ?

विजय : पुढच्या रविवारी पुन्हा जाऊ त्यात काय ?

यामिनी : चालेल !

विजय : घराच्या बाहेर पडल्यावर यामिनीही तिची तयारी करून सोफ्यावर बसलेली असते.

इतक्यात दारावरची बेल वाजते यामिनी दार उघडून प्रतिभा आणि तिच्या मुलांना आत घेते, तिची मुले आत येताच मावशी म्हणत यामिनीला बिलगतात.

यामिनी : प्रतिभा ! बस ! मी मुलांसाठी खाऊ घेऊन येते..

यामिनी खाऊ घेऊन आल्यावर

प्रतिभा : ताई ! जेवणाचं काय केलं ? मी लवकर येऊ का ? म्हटलं तर तुम्ही नको म्हणालात .

यामिनी : विजयने खिचडी केली होती. त्याच्या हातची खिचडी कमाल असते.

प्रतिभा : हो !

यामिनी : तुला कसे काय माहीत

प्रतिभा : एक दिवस विजयाला भेटायला गेले असता मी त्यांच्या घरी खाल्ली होती एकदा !

यामिनी : तेव्हा ! तू विजयला काय हाक मारायचीस ?

प्रतिभा : तेव्हा मी त्यांना विजयच हाक मारायची !

यामिनी : मग ! आता साहेब का म्हणतेस ?

प्रतिभा : ती हाक मारायला आवडते मला

यामिनी : मला काय वाटेल असा विचार करून जर तू त्याला साहेब म्हणत असशील तर तशी अजिबात गरज नाही तू त्याला पूर्वीसारखी नावाने हाक मारली तरी चालेल मला.

प्रतिभा : नको ! आता मला त्यांना साहेब म्हणायची सवय झाली आहे.

यामिनी : बरं ! मुलांनो तुम्हाला आवडेल ना बोटीत बसायला ?

श्रवणी : हो ! खूप दिवस झाले मी बोटीत बसले नाही !

श्रवण : मी तर अजून बसलोच नाही !

यामिनी : तेथे त्या तलावाच्या शेजारीच एक गार्डनही आहे त्यात एक झोपालाही आहे.

श्रावण : झोपालाही आहे मग खूप मजा येईल

श्रावणी : कविताही येणार आहे ना आपल्यासोबत मग तर आणखीनच मजा येईल

प्रतिभा : श्रावणी आणि कवितांची छान मैत्री झाली आहे.

यामिनी : हो ! कविताही सारखी श्रावणी आणि श्रावणची आठवण काढत असते.

इतक्यात कमळ आणि कविता घरात येताच कविता श्रावणीला अलिगन देते

कमळ : यामिनी , प्रतिभा ! झाली का तयारी , चला आता निघूया आपण !

त्या सर्वजणी मुलांसोबत घराच्या बाहेर पडतात.

संध्याकाळी त्या सर्वजणी माघारी घरी येतात .

प्रतिभा : मी आपल्या सर्वांसाठी चहा बनविते

यामिनी : मुलांसाठी चॉकलेट दूध बनव !

प्रतिभा : हो ! लगेच ! मी आत रात्रीचा स्वयंपाकही बनवूनच जाईन ..

यामिनी : मग तू आणि मुले आता येथून जेवूनच जा ! कमळ तू आणि कविताही थांब ! तसेही भावोजी बाहेरगावी गेलेले आहेत ना ! विजयही आज रात्री उशिरा बाहेरूनच जेवून येणार आहे. म्हणजे त्याचीही लुडबुड नाही !

कमळ : प्रतिभा : आम्हीपण येणार तुझ्या मदतीला , म्हणजे पटापट होईल ! तुझ्या नवऱ्याच्या जेवणाचे काय ?

प्रतिभा : ते मी दुपारीच येताना करून आले आहे.

यामिनी : चला ! मुलांनो ! तुम्ही टी.व्ही. वर कार्टून बघा !

श्रावणी चॅनेल बदलत असताना

श्रावणी : मावशी ! हे बघ काका ! टी.व्ही. वर आले आहेत

यामिनी : विजय ! टी .व्ही. वर कोठे आहे ?

कविता : हो ! काकी हे बघ काका ?

त्या तिघीही टी.व्ही . पाहतात तर विजय कामिनी सोबत बातमीदाराना चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देत असतो कामिनीने त्याच्या हातात हात घातलेला असतो. हे सारे पाहून त्या तिघी एकमेकींच्या तोंडाकडे पाहत असतात पण काहीच प्रतिक्रिया देत नाही.

त्या तिघी तशाच स्वयंपाक घरात जातात मुलं बाहेर वेफर खात कार्टून पाहत असतात.

स्वयंपाक घरात ..

कमळ : काय करूया ?

प्रतिभा : रविवार आहे ! अंड्याचेच काय काही तरी करूया !

यामिनी : चालेल अंड्याचा रस्सा करूया ! मुलांसाठी उकडलेली अंडी आणि आपल्यासाठी अंड्याची भुर्जी करूया ! मी फोन करून पावही मागवते

छान ! भुर्जी पावची पार्टी करूया !

कमळ : लयभारी ! यामिनी , तुला राग नाही आला ?

यामिनी : कसला ?

कमळ : नाही भावोजी असे परक्या बाईच्या हातात हात घालून टी.व्ही. वर बोल्त होते.

यामिनी : विजयासाठी ती कोठे परकी आहे .. . त्यांच्यातील मैत्री जग जाहीर आहे .

कमळ : मी कोठेतरी नाही विजय भावोजींच्याच पुस्तकात एक वाक्य वाचले होते प्रेमाच्या झाडाला हमखास येणार फळ म्हणजे प्रेम असते.

यामिनी : पण त्याच्या प्रेमाच्या झाडाला मी बाहर येऊन देईन तेव्हा ना ?

कमळ : तू तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत खूपच बेफिकिर आहेस ! तुझ्या जागी मी असते तर उलटा टांगला असता .

यामिनी : हे फक्त बोलायचे असते प्रत्यक्षात असे काही आपल्याला करता येत नाही.

प्रतिभा : हे बाकी बरोबर बोललात. पण ही कामिनी मला जरा जास्तच चिपकू दिसत आहे.

यामिनी : नाही ! तसे काही नाही ! ती ज्या क्षेत्रात आहे त्यांच्यासाठी हे काहीच नाही .

कमळ : पण तू सांभाळा ह्यांना विवाहित पुरुषच अधिक आवडतात.

प्रतिभा : पण साहेब तसे नाहीत.

कमळ : ते मलाही माहीत आहे पण आगीजवळ लोणी गेल्यावर ते वितळणारच !

यामिनी : किती विटाळायचं ते वितळु दे ! मला काहीही फरक पडत नाही. पक्षी आकाशात कितीही उंच उडाले तरी एक शेवटी त्यांना जमिनीवर यावेच लागते.

प्रतिभा : या कामिनीचा काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा !

यामिनी : मी बघते काय ते ! तुम्ही आपल्या पार्टीची तयारी करा .. .

कमळ : हो ! हो !

इतक्यात दारावरची बेल वाजते ..

यामिनी : पाव घेऊन आला असेल ! तुम्ही थांबा मी घेऊन येते.

यामिनी दरवाजा उघडून पाव घेते आणि मुलांना उद्देशून ..

यामिनी: मुलांनो ! तुम्हाला आणखी काही खाऊ हवा का ?

श्रावणी : नको ! मावशी

कविता : मलाही नको !

श्रावण : मावशी मला चॉकलेट हवा आहे.

यामिनी : मी विसरलेच मी तुमच्या सगळ्यांसाठी चॉकलेट आणून ठेवलेत थांबा आणून देते.

यामिनी मुलांना चॉकलेट आणून देते.

थोड्या वेळाने जेवण तयार झाल्यावर त्या सर्वजणी मुलांसोबत जेवायला बसतात ..

मस्त थट्टा मस्करी करत त्यांचे जेवून झाल्यावर त्या स्वयंपाक घर आवरतात.

कमळ : मी आता माझ्या घरी निघते

यामिनी : हो ! प्रतिभा ! तू ही निघ आता.. जाताना रिक्षाने जा आणि घरी गेल्यावर मला फोन कर ..

प्रतिभा : हो ! चालेल

कमळ आणि प्रतिभा बाहेर पडतात , बाहेर पडताना मुलं यामिनीला बाय ! करतात , यामिनीही त्यांना बाय करते

त्या दोघी निघून गेल्यावर यामिनी तेथेच सोफ्यावर बसून स्वतःशीच विचार करत असते.

यामिनी : विजय आणि कामिनीमध्ये खरंच तसे काही नसेल ना ?

यामिनी आपल्याच विचारात गुंग असताना दारावरची बेल वाजते यामिनी विजयला आत घेताच

विजय : यामिनी ! जेवलास का तू ?

यामिनी : हो ! आम्ही आताच जेवलो .

विजय : आम्ही ?

यामिनी : म्हणजे प्रतिभा , तिची मुले, कमळ - कविता आम्ही सर्व

विजय : म्हणजे पार्टीचं केली.

यामिनी : हो ! तू ही पार्टी करूनच आलास ना ! कामिनीसोबत ?

विजय : हो ! पण तुला कोणी सांगितले

यामिनी : सांगायला कशाला हवे ! अक्ख्या जगाने पहिले तुला कामिनीच्या हातात हात घालून उभं असताना

विजय : म्हणजे तू पाहिलेस मला टी.व्ही. वर !

यामिनी : हो !

विजय : तेव्हाच तुझा पारा चढलेला दिसतोय !

यामिनी : हे असे पाहून कोणत्या बायकोचा पारा चढणार नाही ?

विजय : तुला आता ह्या सगळ्याची सवय करून घ्यायला हवी ! म्हणजे त्रास होणार नाही. चल मी फ्रेश होऊन येतो.

विजय फ्रेश होईपर्यत यामिनी तिच्या रूममध्ये जाऊन झोपतेही .. विजय ती हॉलमध्ये नाही हे पाहून तो ही त्याच्या रूममध्ये जाऊन झोपतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी विजय नेहमीसारखा सोफ्यावर पेपर वाचत बसलेला असतो इतक्यात प्रतिभा आत येते

प्रतिभा : ताई ! गेल्या का ऑफिसला ?

विजय : हो ! आताच गेली .

प्रतिभा : रात्री चिडल्या होत्या का तुमच्यावर ?

विजय : नाही ! काय काय झालं होत चिडण्यासारखं ?

प्रतिभा : नाही ! ते काल तुम्हाला टी.व्ही. वर पहिले ना हातात हात घालून त्या कामिनीसोबत..

विजय : असं होय !

प्रतिभा : आश्चर्यच आहे त्या तुमच्यावर रागावल्या नाहीत म्हणजे !

विजय : तिला सवय झाली आहे आता याची .. तुझ्यासाठी ते नवीन होते.

प्रतिभा : पण ती कामिनी जरा जास्तच चिपकली होती नाही तुम्हाला ?

विजय : ते टी.व्ही. वर बोलताना असे करावे लागते.

प्रतिभा : उद्या ती तुमचा ...

विजय : तुमचा काय ?

प्रतिभा : काही नाही ! मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते

थोड्या वेळाने प्रतिभा विजयासाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते ..

विजय : आज लवकर आलीस ?

प्रतिभा : मला ताईंना भेटायचे होते.

विजय : काही खास कारण ?

प्रतिभा : नाही ! सहज !! ती कामिनी सर्वानाच अशी चिपकते का ?

विजय : हो !

प्रतिभा : मग हरकत नाही.

विजय : शिरा छान झाला आहे अगदी प्रसादीसारखा, तू खाल्ला कि नाही

प्रतिभा : नाही ! मी खाईन नंतर !

विजय : दुपारच्या जेवणात काय करशील ?

प्रतिभा : काय करू ?

विजय : फक्त पोळ्या आणि बटाट्याची भाजी कर आणि तू जा... मी जरा बाहेर जाऊन दुपारी परत येणार आहे.

प्रतिभा : चालेल..

विजय तयार होऊन बाहेर निघून जातो.

प्रतिभा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असते इतकयात दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडून कविताला आत घेते

कविता : काय प्रतिभा काय करत होतीस ?

प्रतिभा : काही नाही साहेबांसाठी पोळी भाजी करत होती.

कमळ : साहेब आहेत कोठे ?

प्रतिभा : ते आताच बाहेर गेले

कमळ : बरं ! नाश्त्यात काय केले होतेस ?

प्रतिभा : शिरा केला आहे थांबा तुमच्यासाठी घेऊन येते.

कमळ : तुलाही घेऊन ये आपण एकत्र बसून खाऊया !

प्रतिभा : हो ! चालेल !

त्या दोघी बसून शिरा खात असतात ...

कमळ : प्रतिभा ! काय शिरा केला आहेस सत्यनारायणाचा प्रसाद खाल्ल्या सारखा वाटत आहे.

प्रतिभा : साहेबही तेच बोलत होते.

कमळ : शिरा खाल्ला आता चहा कोण देणार ?

प्रतिभा : चहा तयारच आहे लगेच घेऊन येते

कमळ : चालेल ! तुझं झालं का इथलं काम ?

प्रतिभा : हो !

कमळ : मग तू माझ्यासोबतच चल मी तुला रिक्षाने रस्त्यात सोडते.

प्रतिभा : चालेल ! मी लगेच स्वयंपाकघर आटपून येते.

थोड्यावेळाने त्या दोघी एकत्र घरातून बाहेर पडतात.

दुपारी विजय बाहेरून घरात येतो, फ्रेश होतो आणि सोफ्यावर बसून प्रतिभाने तयार केलेली पोळीभाजी खातो आणि ती खाऊन झाल्यावर लॅप टॉप हातात घेऊन त्यावर काहीतरी टाईप करायला सुरुवात करतो. इतक्यात त्याचा मोबाईल खणखणतो तो मोबाईल उचलतो आणि दरवाजा उघडतो तर दरवाजात निलिमा उभी असते. तो तिला आत घेतो.

विजय : निलिमा ये ! बस ! मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. तू काय घेणार चहा की कॉफी ?

निलिमा : कोण करणार ? प्रतिभा आहे का घरी ?

विजय : नाही ती गेली तिच्या घरी आता संध्याकाळी येईल, मी ही बाहेरच गेलो होतो आताच आलो

निलिमा : मग चहा कोण करणार ?

विजय : मी करणार !

निलिमा : मी असताना तुम्ही चहा करणार ? मी करते, तुम्ही सांगा मला कोठे काय आहे ते चला.

विजय : नको ! मी करतो !

निलिमा : ते काही नाही आपण मिळूनच करूया !

विजय : चालेल ! तू काही ऐकणार नाहीस.

निलिमा : नाही मी ऐकणारच नाही !

विजय आणि नीलिमा स्वयंपाकघरात जाऊन चहा बनवितात आणि बाहेर सोफ्यावर येऊन बसतात. चहा पिता पिता

निलिमा : चहा खूपच छान झालेला आहे.

विजय : हो ! त्यात तुझ्या हाताचा गोडवा उतरला आहे.

निलिमा : माझ्या नाही तुमच्याच हाताचा गोडवा उतरला आहे.

विजय : पहले आप ,पहले आप में गाडी छुट जायेगी ! चहा पी थंड होईल.

निलिमा : सर ! तुम्हाला घरी असे एकटे बसण्याचा त्रास होत नाही का ?

विजय : नाही ! आता सवय झाली आहे. महत्वाचे म्हणजे मला लिखाणासाठी एकांतवास लागतो.

निलिमा : हो ! आम्हाला काय तुम्ही लिहिलेले फक्त प्रकाशित करायचे असते , त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या सतत संपर्कात यावे लागते.

विजय : ते जाऊदे ! तू कशी काय आलीस इकडे ?

निलिमा : काही खास नाही ! मी इकडूनच जात होते , तुमचे पुस्तक प्रूफिंग करून झाले आहे तेच दाखवायचे होते.

विजय : असं !

निलिमा प्रूफिंग केलेले पुस्तक विजयच्या हातात देते. विजय त्यावरून नजर फिरवतो.

विजय : सर्व ओके आहे आता पुस्तक छापायला काही हरकत नाही.

निलिमा : हो !

विजय : चला ! म्हणजे ! आता आपले आपत्य जन्माला येण्याची वेळ जवळ आली आहे .

निलिमा : हो !

विजय : मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय !

निलिमा : मला तुमच्यापेक्षाही जास्त आतुरता आहे कारण हे माझे पहिलेच आपत्य आहे.

विजय : मी तुझी आतुरता समजू शकतो ...

निलिमा : सर ! तुमचे पुस्तक मी पुन्हा पुन्हा वाचले, जितक्या वेळा वाचते तितक्या वेळा मी त्या पुस्तकाच्या नव्याने प्रेमात पडते.

विजय : माझे पुस्तक तुला इतके आवडले म्हणजे ते वाचकांनाही नक्कीच आवडणार !

निलिमा : त्याबद्दल मला यकिंचितही शंका नाही. सर ! हे पुस्तक खूप गाजले तर तुम्ही मला काय देणार ?

विजय : तू मागशील ते देईन !

निलिमा : लक्षात ठेवा !

विजय : मी कधीच काही विसरत नसतो. फक्त तू असे काही मागू नकोस जे माझे नाहीच !

निलिमा : मी असे काहीच मागणार नाही जे तुमचे नाही.

विजय : मी मस्करी करतोय !

निलिमा : पण मी सिरिअस आहे.

विजय : ओके !

निलिमा : तुमच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तुमचे मित्र आणि राजकीय नेते राजेशिर्के साहेब यांना आमंत्रित करणार आहे.

विजय : राजेशिर्के ! छान ! ते आज मोठे राजकारणी असले तरी त्यांना साहित्याची फक्त जणच नाही तर ते स्वतः उत्तम साहित्यिक आहेत.

निलिमा : हो ! मी त्यांना विचारणा केली तर ते लगेच तयार झाले.

विजय : मग करा आता तयारी प्रकाशनाची ! माझी काहीही मदत लागली तर सांग मला. तू कामिनीला आमंत्रण द्यायला विसरू नकोस !

निलिमा : मी विसरले तरी ती मला विसरू देईल का ?

विजय : नाही ! विसरू देणार नाही.

निलिमा : सर ! एक विचारू का ?

विजय : विचार ना !

निलिमा : सर ! तुमच्यात आणि कामिनीत काही सुरु नाही ना !

विजय : नाही ! काही नाही , मी विवाहित आहे आणि माझे माझ्या बायकोवर खूप म्हणजे खूपच जास्त प्रेम आहे.

निलिमा : हल्ली त्याने काहीही फरक पडत नाही.

विजय : पण मला फरक पडतो. कामिनी सध्यातरी माझी फक्त आणि फक्त एक चांगली मैत्रीण आहे जशी तू आहेस.

निलिमा : म्हणजे तुम्ही मला तुमची मैत्रीण मानता तर.

विजय : म्हणजे काय ? माझे जर लग्न झालेले नसते आणि मला कोणाच्या प्रेमात पडावेसे वाटले असते तर मी नक्कीच तुझ्या प्रेमात पडलो असतो.

निलिमा : खरंच ?

विजय : हो ! पण या जर तर च्या गोष्टी आहेत

निलिमा : मलाही आवडले असते तुमची प्रेयसी व्हायला.

विजय : माझी प्रेयसी होणे म्हणजे एक शिक्षा आहे . का ते एकदा माझ्या बायकोला विचार.

निलिमा : मी निघते आता ... यावर आतापण नंतर बोलू ...

विजय : चालेल .. मी येऊ का सोडायला ....

निलिमा : मला चालेल पण तुम्ही परत कसे येणार ?

विजय : रिक्षाने ..

निलिमा : नको ! माझी मी जाईन .. . घरी पोहचले की तुम्हाला फोन करते .

विजय : चालेल ! बाय !

निलिमा : बाय !

निलिमा घरातून निघायला आणि प्रतिभा आत यायला एकच वेळ साधली जाते.

प्रतिभा : निलिमा मॅडम तुम्ही ?

निलिमा : प्रतिभा तू कशी आहेस ?

प्रतिभा : मी छान ! तुम्ही निघालात ! मी चहा केला असता तुमच्यासाठी...

निलिमा : नको ! मी निघते .. भेटू पुन्हा कधी तरी .. बाय !

प्रतिभा : बाय !

प्रतिभा आत येताच

विजय : आलीस का तू ? माझ्यासाठी जरा चहा करतेस का ?

प्रतिभा : हो ! लगेच करते...

विजय सोफ्यावर बसलेला असताना प्रतिभा चहा आणि बिस्किटे घेऊन येते

प्रतिभा : स्वयंपाक घरात चहा केलेला होता तो कोणी केला ?

विजय : तो मीच केला होता निलिमासाठी !

प्रतिभा : छान झाला होता.

विजय : तू प्यायलीस तो ?

प्रतिभा : हो !

विजय : तू का प्यायलीस ?

प्रतिभा : मग काय फेकून द्यायचा होता ?

विजय : तसे नाही ! तो करून बराच वेळ झाला होता .

प्रतिभा : म्हणजे ! निलिमा बराच वेळ इकडे होती वाटतं.

विजय : हो !

प्रतिभा : ठीक आहे ना !

विजय : प्रतिभा ! मी जरा बाहेर जाऊन येतो.

प्रतिभा : ठीक आहे.

विजय बाहेर निघून गेल्यावर प्रतिभा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडून यामिनीला आत घेताच.

यामिनी : विजय कोठे आहे ?

प्रतिभा : ते आताच बाहेर गेले.

यामिनी : मी फ्रेश होते

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा गरम करते.


यामिनी फ्रेश होऊन बाहेर येते आणि सोफ्यावर बसते, सोफ्यावर बसल्यावर ती तिच्या बागेतून नवीन सुंदर जोडवी काढते आणि त्या बाजूलाच सोफ्यावर ठेवते त्यानंतर यामिनी तिच्या पायाच्या बोटातील जुनी पण सुंदर जोडवी काढते आणि त्याजागी नवीन जोडवी घालते.


थोड्यावेळाने प्रतिभा तिच्यासाठी चहा आणि नाश्ता घेऊन आल्यावर यामिनी चहा पिऊन झाल्यावर ती जुनी जोडवी प्रतिभाच्या हातात देते

यामिनी : प्रतिभा ही जोडावी तुला ठेव ! तशी नवीनच आहेत पण आज मी दुसरी जोडावी आणली आहेत त्याची डिझाईन मला खूप आवडली

प्रतिभा : ही जोडवी ही छान आहेत पण मला नको !

यामिनी : का ? मी वापरलेली आहेत म्हणून !

प्रतिभा : तसे नाही ! आपली जोडवी अशी दुसऱ्या बाईला द्यायची नसतात त्यामुळे नवऱ्याचे आपल्यावरील प्रेम कमी होते.

यामिनी : बाकीच्या दागिण्या सारखा तो ही एक दागिनाच !

प्रतिभा : नाही ! ताई ! जोडवीचे विववाहित महिलांच्या आयुष्यात एक वेगळेच महत्व असते .. हल्ली विवाहित बायका एक वेळ मंगळसूत्र घालत नाही पण जोडवी घालतात. हल्ली महिला विवाहित आहे की नाही हे पुरुष स्रियांच्या पायातील जोडवी पाहून ओळखतात त्यामुळे त्या निमित्ताने का होईना पुरुषांची नजर स्त्रियांच्या पायाकडे झुकते.

यामिनी : ते काही नाही ! तू ह्या घेतल्याचं पाहिजेत हव्या तर ह्या बदलून तू नवीन घे !

प्रतिभा : तुमचा आग्रह आहे तर मी या घेते पण या मी वापरणार नाही तर तुमची आठवण म्हणून माझ्याकडे ठेवीन ..

यामिनी : चालेल ! जशी तुझी इच्छा !

प्रतिभा : तुम्ही आराम करा ! मी सयंपाकाचं काय ते बघते.

यामिनी : ते बघच भाजी काय करणार आहेस ?

प्रतिभा : मी येताना पापलेट आणले आहेत ..

यामिनी : वा ! मस्तच ! विजयला ?

प्रतिभा : त्यांना करू सोयाबीनची भाजी

यामिनी : चालेल

प्रतिभा स्वयंपाक घरात निघून गेल्यावर कमळ घरात प्रवेश करते

कमळ : काय ? प्रतिभा ! विजय भावोजी कोठे गेले ? त्या साठविला सोडायला गेले कि काय ?

यामिनी : तू काय बोलतेयस !

कमळ : आजही आली होती ती भावोजींची प्रकाशक त्यांना भेटायला

यामिनी : तिचे काम असते तिच्याकडे ती येणारच भेटायला..

कमळ : पण मला बाई तुझी काळजी वाटते.

यामिनी : का ?

कमळ : का काय ? ती एकतर सुंदर आहे, तरुण आहे, साधी - सरळ आणि मधुर बोलणारी आहे. ती कोणत्याही पुरुषाला आवडू शकते.

यामिनी : कमळ मी तुला पुन्हा सांगते माझा माझ्या विजयावर पूर्ण विश्वास आहे.

कमळ : विश्वासाच्या ...

यामिनी : तू ना ! तू चहा घेणार ?

कमळ : हो !

यामिनी : प्रतिभा ! कमळसाठी चहा ! घेऊन ये !

प्रतिभा चहा घेऊन आल्यावर

कमळ : प्रतिभा आज भावजी कसली करणार आहेस ?

प्रतिभा : पापलेट फ्राय करणार आहे.

कमळ : एक तुकडा माझ्याकडेही पाठव !

यामिनी : हो ! पाठवेल तू काळजी नको करुस..

कमळ :मी जे तुला सांगायला आले ते विसरूनच गेले, बाजारात साड्यांचा सेल लागला आहे आपण जाऊया का?

यामिनी : कधी ?

कमळ : तुला तर रविवारीच वेळ असतो, मग रविवारी जाऊया !

यामिनी : प्रतिभा ! तू येशील ?

प्रतिभा : नाही ! ताई ! त्या दिवशी मी जरा माझ्या एका नातेवाईकांकडे जाणार आहे.

यामिनी : ठीक आहे. आम्हीच जाऊन येऊ !

कमळ : चला मी निघते .. मला कविताला क्लासवरून आणायचे आहे.

यामिनी : चालेल ! तू निघ ! 

प्रतिभा स्वयंपाकघरात निघून जाते इतक्यात विजय घरात येतो त्याच्या हातात सफरचंद असतात

यामिनी : हे काय ?

विजय : ह्यांना सफरचंद असे म्हणतात, हे खाणे आरोग्यासाठी उत्तम असते

यामिनी : ते मलाही माहीत आहे पण हे इतके

विजय : थोडे आपल्याकडे ठेव ! थोडे प्रतिभाला दे ! थोडे कमळ वहिनींकडे पाठव !

यामिनी : ते ठीक आहे पण आज ती निलिमा परत आली होती तुला भेटायला आपल्या घरी काही खास काम होत का ?

विजय : हो ! प्रूफ रिडींग करून आलेले पुस्तक दाखवायला ती आली होती.

यामिनी :मग ! पुस्तक छपाईला कधी घेणार आहे ?

विजय : लवकरच !

यामिनी : प्रकाशन कोणाच्या हस्ते करणार आहे ?

विजय : राजेशिर्केच्या हस्ते !

यामिनी : ते तुझ्या ओळखीचे आहेत ना !

विजय : हो !

यामिनी : कामिनी पण येणारच असेल !

विजय : म्हणजे काय ? तिची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

यामिनी : प्रकाशन सोहळा कधी करायचा ठरला आहे ?

विजय : पुस्तकांची छपाई झाली कि लगेच ! म्हणजे अजून एकदा महिना जाईल.

यामिनी : मला उत्सुकता आहे तुझ्या ह्या नवीन पुस्तकाची ! तसेही तुझे पुस्तक प्रकशित होण्यापूर्वी तुझ्या बायकोलाही वाचायला मिळत नाही पण त्या निलिमाला मिळाले त्या बाबतीत ती माझ्याहून भाग्यवान आहे.

विजय : हो ! निश्चितच !

इतक्यात प्रतिभा बाहेर स्वयंपाकघरातून बाहेर येते

प्रतिभा : साहेब तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का ?

यामिनी : प्रतिभा ! हे काय विचारणे झाले ! त्याला रात्री बारा वाजता जरी तू विचारलेस चहा पिणार का ? तरी तो नाही म्हणणार नाही ! त्याला बाकी कासलेच व्यसन नाही पण चहाचे प्रचंड व्यसन आहे.

प्रतिभा : हो ! त्यांची आईही असेच म्हणायची...

विजय : माझी आई मी न मागताही मला रात्री मी कितीही उशिरा बाहेरून आलो तर मला चहा असेल तर गरम करून द्यायची ! मी एकटा असताना रात्री बारा वाजताही चहा गरम करून प्यायलो आहे.

यामिनी :प्रतिभा ! तू घेऊनच ये आता चहा ! आपल्या सर्वांसाठी !

प्रतिभा : हो ! लगेच आणते

ते तिघे मिळून चहा पितात आणि प्रतिभा तिचे काम आटपून तिच्या घरी निघताना

यामिनी : तू हे चार - पाच सफरचंद घेऊन जा ! मुलांसाठी !!

प्रतिभा : हो ! मी निघते

यामिनी : हो ! तू निघ !

प्रतिभा निघून गेल्यावर

यामिनी : विजय ! तू संध्याकाळी कोठे गेला होतास ?

विजय : माझा एक लेखक मित्र आहे त्याला भेटायला गेलो होतो.

यामिनी : त्यांना घरी का बोलावले नाहीस ?

विजय : नाही ! आमची नेहमीची भेटायची एक खास जागा आहे आम्ही तेथेच भेटतो.

यामिनी : ती जागा म्हणजे नक्कीच एखादी चहाची टपरी असणार

विजय : हो ! तिथली चहा ! म्हणजे अमृत असते.

यामिनी : चला मग आता जेवायचे आहे की नाही ? मी कमळला लगेच पापलेट देऊन येते

विजय : हो ! आरामशीर ये !

यामिनी कमळला पापलेट देऊन येते आणि ती आल्यावर ते दोघे जेवण करून आप आपल्या रूममध्ये जाऊन झोपतात.

असाच एक आठवडा निघून जातो आणि रविवारी सकाळी विजय सोफयावर पेपर वाचत बसलेला असतो. यामिनी त्याच्यासाठी चहा आणि कांदेपोहे घेऊन येते

ते दोघे एकत्र चहा पित असताना

यामिनी : विजय ! आज कोठे बाहेर जाणार आहेस का ?

विजय : नाही ! का ?

यामिनी : काही नाही ! मी आणि कमळ बाजारात साड्यांचा सेल लागला आहे तो पाहायला जाणार आहोत.

विजय : पाहायला जाणार आहात कि साड्या विकत घ्यायला जाणार आहात.

यामिनी : तेच ते !

विजय : पण तू साड्या नसतेस कोठे ? वर्षातून दोन चार वेळा फक्त सणासुदीला तू साडी नेसून ऑफिसला जातेस !

यामिनी : हो ! त्यामुळेच मला एक साडी ऑफिसमध्ये जाताना पुन्हा नेसायची नसते. तू कधी मला साडी घेतल्याचे आठवते का तुला ?

विजय : खरंच ! नाही आठवत ! म्हणजे आपण आपल्या लग्नाच्या वेळेला ज्या तुझ्यासाठी दोन साड्या घेतल्या होत्या तेवढ्याच ! मी बऱ्याचदा तुझ्यासोबत खरेदीला आलो पण मी स्वतःहून अशी तुझ्यासाठी एकही साडी घेतली नाही आणि तू कधी मागितलीही नाही ! त्यासाठी सॉरी ! बरं आज तू जितक्या सद्य खरेदी करशील त्याचे पैसे मी देईन...

यामिनी : खरंच !

विजय : हो ! बाई हो !

यामिनी : मग चार पाचच साड्या खरेदी करते.

विजय : कधी जाणार आहेस ?

यामिनी : दुपारीच जाऊ !

विजय : म्हणजे जेवल्यावर जाणार ना ?

यामिनी : हो !

विजय : मग ! जेवणाचं बघा काही ते

यामिनी : मी पराठे बनविते , चालतील ना ?

विजय : चालतील काय ? धावतील

यामिनी : लगेच करायला घेते.

विजय पेपर बाजूला ठेवून टी.व्ही . सुरु करतो आणि बातम्यांचे चॅनेल बदली करत राहतो.

एका चॅनेलवर कामिनी राजेशिर्केंची मुलाखत घेत असते. विजय ती मुलाखत पाहतो आणि कुठलासा मराठी चित्रपट पाहत बसतो

थोड्यावेळाने यामिनी त्याच्यासाठी चहा घेऊन बाहेर येते. चहा विजयच्या हातात देते आणि

यामिनी : विजय तू सर्व मोहांवर विजय मिळविला आहेस पण तुझा हा चहाचा मोह कधी सुटणार नाही ना ?

विजय : नाही ! हा मोह मी सोडू शकत नाही .. मोहावरून एक कोठेतरी वाचलेले गोष्ट मला आठवली ..

यामिनी : कोणती गोष्ट ?

विजय : तुला माहित आहे का ? स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण ?

यामिनी : कोण ?

विजय : रामकृष्ण परमहंस ! हे नाव तू कोठंतरी वाचले असतील पण तुला हे माहित नसेल त्यांना मासे खायला खूप आवडायचे. त्याच्या पत्नी शारदामनी यांनी बनविलेल्या स्वयंपाकावर त्याचे प्रचंड प्रेम होते. त्या कधी स्वयंपाक करता आहेत आणि ते जेवायला बसता आहेत असे त्यांना होत असे. एकदिवस शारदामनीनी त्यांना विचारले , " तुम्ही सर्व मोहांवर विजय मिळविला पण हा ! माझ्या हातच खाण्याचा मोह काही तुम्हाला सुटला नाही. त्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले,'' हा एकच मोह आहे ज्याच्यासाठी मी जिवंत आहे.मी तुझ्या हातच खायचं सोडलं कि समज माझा मृत्यू जवळ आला आहे. त्यानंतर काही महिन्यांनी रामकृष्ण परमहंस आजारी पडले आणि त्यांनीअन्न पाणी सोडले आणि त्यांचा मृत्यू जवळ आल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले मी मेल्यावरही रोज तुझ्या हातचे खायला येईन.. रामकृष्ण परमहंसांच्या मृत्यू नंतर उमादेवींनी आपले सौभाग्य अलंकार उतरविले नाही. त्या रोज त्याच्यासाठी स्वयंपाक करायचा आणि ते मृत्यू झाल्यानंतरही त्यांच्या हातचा स्वयंपाक खायला यायचे... आपल्या महाराष्ट्रात झालेले काही साधू चिलीम वगैरे ओढायचे.. तो ह्यातलाच प्रकार होता त्याना व्यसन नव्हते तर त्यांनी स्वतःला त्या गोष्टीच्या मोहात गुंतवून घेतले होते कारण तो मोह त्यांनी सोडला असता तर त्यांचा आत्मा लगेच शरीराला सोडून मुक्त झाला असता ... म्हणून आपले पूर्वज म्हणायचे माणसाला एक तरी व्यसन हे हवेच !

यामिनी : तू आणि तुझ्या गोष्टी !

विजय : ते काहीही असो म्हणून मी चहा सोडणार नाही.

यामिनी : कोण सोडायला सांगतंय !

विजय : यामिनी ! तुला कसला मोह आहे ?

यामिनी : मला एकच मोह आहे

विजय : कोणता

यामिनी : तुझं प्रेम मिळविण्याचा !

विजय : काहीही !

यामिनी : काहीही नाही मी खरंच सांगतेय !

विजय : बरं ! आता भूक लागली आहे , जेवून घेऊ या का ?

यामिनी : हो ! मी वाढायला घेते..

विजय आणि यामिनी डायनिंग टेबलवर बसलेली असतात

यामिनी : खरंच ! तुला कसलाच मोह नाही

विजय : अगदीच तसे नाही ! पूर्वी आमची आर्थिक परिस्थिती गरिबीची होती तेव्हा मला वाटायचे माझ्याकडे भरपूर पैसे आले कि मी चान्गले चांगले कपडे घेईन बुटे घेईन .. माझ्याकडे पैसे आल्यावर मी सुरुवातील महागातले कपडे बुटे घेतलीही पण नंतर मला तसे वाटले नाही कारण माणूस ज्या गोष्टी मिळवू शकतो त्या गोष्टींचा त्याला मोह कधीच वाटत नाही.. माणसाला नेहमी त्याच गोष्टीचा मोह असतो ज्या त्याच्या आवाक्याबाहेर असतात. म्हणजे सामान्य पुरुषाची बायको कितीही सुंदर असली तरी त्याला चित्रपटातील नायिकेबद्दल आकर्षण असते. मी लहान असताना आपण आयुष्यात एकदातरी विमानात बसावे असे मला वाटत होते पण प्रत्यक्षात विमानात बसल्यावर तो मोहही नष्ट झाला. आमच्या आईला सोन्याचे प्रचंड आकर्षण होते पण तरुणपणी तिला तिच्या मोहाला आवर घालावा लागला पण पन्नाशीत आल्यावर मात्र तिच्या इच्छा पूर्ण झालाय पण मला सोन्याचा मोह कधीच नव्हता, मी सोने अंगावर कधीच घालत नाही हे तुला माहित आहे पण तुला हे माहीत नाही कि मला अंगावर सोने घातले कि अस्वस्थ वाटायला लागते. माझी आई मला जबदस्ती सोनी घालायला लावायची सणासुदीला पण मी सकाळी घातले तर संध्याकाळी उतरवून ठेवत असे.

यामिनी : विचित्र आहे हे ! म्हणून तू तुझ्यासाठी कधीच काही सोन्याचे करत नाही आणि मी केले तर वापरत नाहीस ?

विजय : हो ! सोने हे कलीचे रूप आहे ते माणसाला नेहमी सत्कर्मापासून दूर नेते. सोन्याचा मोह असणारा माणूस कधीच सत्कर्म करू शकत नाही.

यामिनी : मलाही ! सोन्याचा फार मोह नाही ..

विजय : हो ! ते मला माहीत आहे.

यामिनी : विजय ! पुढच्या आठवड्यात तुझा वाढदिवस आहे मी तुझ्यसाठी काय घेऊ ?

विजय : घे ! तुला काय घेण्याचे ते !

यामिनी : मी तुझ्यासाठी यावेळी सूट घेणार आहे ... काळया रंगाचा.. त्यात तू खूपच गोड दिसतोस !

विजय : चालेल !

यामिनी : पण तुझ्या वाढदिवसाची पार्टी कोठे करूया ?

विजय : कोठे काय ? येथेच आपल्या घरी !

यामिनी : चालेल ! मी त्याचे प्लॅनींग करायला घेते.

विजय : हो ! चालेल .. माझ्याकडून माझ्या वाढ दिवसाला कामिनी, निलिमा आणि अजय येईल

यामिनी : माझ्याकडून प्रतिभा , कमळ आणि कमलेश भावोजी येतील.

विजय : माझे सासू - सासरे ?

यामिनी : नाही ! ते तेंव्हा बाहेर जाणार आहेत. विजयाला बोलवू या का ?

विजय : नको ! उगाच तिची धावपळ होईल.

यामिनी : चालेल..

कमळ : येऊ का आत ?

यामिनी : ये ना ! विचारतेस काय ?

कमळ : नाही ! तुम्ही दोघे राजा - राणी गुलुगुलु करत होतात म्हणून म्हंटले.

विजय : आता काय शिल्लक राहिले आहे गुलुगुलु करायला ?

कमळ : यामिनी ! झाली का तुझी तयारी ?

यामिनी : तू बस ! हे डायनिंग टेबल आवरते आणि मी लगेच तयार होते .

कमळ : काय भावोजी ! काय चाललं होत ?

विजय : काही नाही ! पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे तर तेव्हा काय कस करायचे त्यावरच आम्ही बोलत होतो.

यामिनी तयार होऊन बाहेर आल्यावर कमळ आणि यामिनी बाहेर निघून जातात .

यामिनी आणि कमळ बाहेर निघून गेल्यावर विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते विजय दार उघडतो तर दारात कामिनी उभी असते तिला आत घेत

विजय : कामिनी ! तू इकडे अचानक कशी काय आलीस ?

कामिनी : इतर दिवशी तुझी बायको घरी नसल्यावर मी आले तर तुला संकोचल्यासारखे होते ना म्हणून मी आज आले ती आहे ना घरात ?

विजय : तुला वाटते तसे काही नाही ! आणि आताही माझी बायको घरी नाही ती शॉपिंगला गेली आहे.

कामिनी : शॉपिंगला गेली आहे ना म्हणजे येईल ना तासाभरात ?

विजय : नाही ती साड्यांचा सेल लागला आहे तेथे गेले आहे !

कामिनी : मग काय ती संध्याकाळ शिवाय येणार नाही.

विजय : मला तरी तसेच वाटतेय ! तू चहा घेणार का ?

कामिनी : तू केला आहेस का ?

विजय : नाही ! माझी बायको करून गेली आहे ..

कामिनी : हो ! चालेल !

विजय तिच्यासाठी चहा आणि कांदेपोहे आणतो कामिनी ती चव घेत खाते

कामिनी : तुझ्या बायकोच्या हातालाही चव आहे.

विजय : हो ! पण ती फक्त कांदेपोहे बनविण्या पुरतीच

कामिनी : तितकी तरी आहे नाहीतर आमची याबाबतीत बोंबाबोबच आहे.

विजय : तू माझ्याकडे येतेस त्याचा मला किंवा माझ्या बायकोला काही त्रास नाही पण आमची बिल्डींग तुझ्या कडे पाहून विचलित होते ना !

कामिनी : मी खरंच इतकी सुंदर दिसते का ?

विजय : हो ! म्हणजे काय ?

कामिनी : मग तू माझ्या का प्रेमात पडला नाहीस ?

विजय : मी विवाहित नसतो तर नक्कीच पडलो असतो.

कामिनी : तू विवाहित आहेस याने मला काहीही फरक पडणार नाही.

विजय : पण मला पडतो.

कामिनी : तू काय घाबरतोस लोकांना ! मी बघ कशी बिनधास्त राहते.

विजय : तुझ्या ह्या बिनधास्त असण्याचीच भीत वाटते मला कधी कधी !

कामिनी : तुझ्या बायकोला फोन करून विचार ती कधी येणार आहे ? तिला उशीर होणार असेल तर आपण जरा बाहेर जाऊ या ! मोकळ्या हवेत गप्पा मारूया !

विजय : बरं !

विजय यामिनीला फोन करतो आणि तो यामिनीसोबत बाहेर जात असल्याचे सांगून तयार होऊन कामिनीसोबत घराच्या बाहेर पडतो.

संध्याकाळी यामिनी आणि कमळ साड्या खरेदी करून घरात येतात.

यामिनी : कमळ ! तू बस मी आपल्यासाठी कोकम सरबत बनवून आणते.

यामिनीने कोकम सरबत बनवून आणल्यावर

कमळ : किती दिवसांनी आज आपण मनसोक्त खरेदी केली नाही ?

यामिनी : हो ! मला याचे पैसे विजय देणार आहे.

कमळ : का ?

यामिनी : मी सुनावले त्याला साड्यांवरून म्हणून ...

कमळ : तश्याही तू साड्या आमावस्या - पौर्णिमेला नसतेस

यामिनी : हो ! यातील दोन साड्या मी प्रतिभाला देणार आहे.

कमळ : तुझे प्रतिभावर खूपच प्रेम आहे नाही.

यामिनी : ती आहेच प्रेम करण्यासारखी !

कमळ : हे बाकी तू खरे बोललीस ! आज ती आपल्यासोबत असायला हवी होती आणखी मजा आली असती.

यामिनी : हो ! पुढच्या वेळेला आपण तिला घेतल्याशिवाय जाऊच या नको !

कमळ : भावोजी ! कोठे गेले?

यामिनी : ते गेले त्या अप्सरेसोबत ..

कमळ : अप्सरेसोबत म्हणजे ?

यामिनी : कामिनीसोबत ... आपण गेल्यावर ती आली होती येथे ..

कमळ : भावोजींना बऱ्या त्यांच्या क्षेत्रात फक्त बायकाच मिळतात ?

यामिनी : आता काय करणार त्याला .. आलेया भोगासी असावे सादर ..

कमळ : म्हणजे आज बिल्डिंगमध्ये तिच्याच दिसण्याची चर्चा असेल.

यामिनी : ती आहेच इतकी सुंदर त्याला आपण तरी काय करणार ?

कमळ : ते तर आहेच !

यामिनी : तू साड्या घरी ठेऊन ये ! आपण जाऊया पाणी - पुरी खायला नाक्यावर आणि थोडी भाजी वगैरेपण आणूया !

कमळ : चालेल ! मी लगेच येते.

थोड्यावेळाने कमळ आल्यावर त्या दोघी घरातून बाहेर पडायला आणि विजय आत यायला एकच गाठ पडते

यामिनी : विजय ! तू घरीच थांब आता आम्ही जरा नाक्यावर जाऊन भाजी घेऊन येतो.

विजय : हो ! आरामात या !

यामिनी : मी चहा नाही केला ! तू हवा ! तर करून घे ! नाहीतर मी आल्यावर करते

विजय : नको ! माझा मी करून घेईन.

यामिनी आणि कमळ निघून गेल्यावर विजय आत येतो आणि सोफ्यावर बसतो.

विजय : स्वतःशीच ... ही कामिनी.. भयंकर आहे ... काही आजू बाजूला बघत नाही. बिनधास्त खांद्यावर डोकं ठेवून बसते कोणी पहिले तर काय अर्थ काढतील. ती माझ्या प्रेमात बिमात तर पडली नाही ना ? नाही नसेल ! ती मला फक्त तिचा चांगला मित्र मानत असेल. पण मैत्रीच्या झाडाला हमखास येणारे फळं म्हणजे प्रेम असते. नाही ! आमच्यात तसे काही होणार नाही ! मी विवाहित आहे आणि माझे माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे हे तिला माहीत आहे. पण तीच म्हणाली ना ! कि माझ्या विवाहित असण्याने तिला काही फरक पडत नाही. या जर तरच्या गोष्टी आहेत ह्यांचा विचार करण्यात काहीही अर्थ नाही.

विजय स्वयंपाकघरात चहा करण्यासाठी जातो आणि दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उघडतो तर दारात विजया उभी असते तिला पाहून विजयला आश्चर्याचा धक्काच बसतो.

विजय : विजया ! तू अशी अचानक फोन न करता कशी काय ?

विजया : मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते.

विजय : हो ! हो ! आत ये !

विजया आत येताच ती सोफ्यावर बसते विजय तिचे सामान त्याच्या रूममध्ये नेऊन ठेवतो आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येतो.

विजया : यामिनी ! कोठे गेली ?

विजय : ती बाजारात गेली आहे मी तुझ्यासाठी चहा घेऊन येतो.

विजया : हो ! लगेच घेऊन ये मला त्याची गरज आहे.

विजय चहा ! घेऊन आल्यावर विजया चहा पिते आणि

विजया : मी फ्रेश होते आणि आत जाऊन पडते...

विजय : हो !

इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजल्यावर विजय दार उघडतो आणि यामिनीला आत घेतो.

यामिनी : ह्या चपला कोणाच्या कोणी आले आहे का ?

विजय : हो ! गेस कोण आली असेल ?

यामिनी :इतक्या सुंदर चपला आहेत म्हणजे नक्कीच विजया ताई आल्या असाव्यात ! बरोबर ना !

विजय : हो !

यामिनी : कोठे आहेत त्या ?

विजय : आत पडली आहे .

यामिनी : मी जेवणाची तयारी करते , त्यांना आराम करू दे ! जेवण झाले कि त्यांना उठवूया !

विजय : चालेल !

रात्री उशिरा ते तिघे डायनींग टेबलवर जेवायला बसलेले असतात

यामिनी : ताई ! येणार होतात तर अगोदर फोन करायचा मी घरीच थांबले असते

विजया : मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे होते .

विजय : पण तू अचानक कशी काय आलीस ?

विजया : माझे मुंबईत आठवड्याभराचे काम आहे म्हणून मी आले.

यामिनी : म्हणजे तुम्ही विजयच्या वाढदिवसाला ह्यावेळी मुंबईत असणार तर ..

विजया : हो ! मी तीच वेळ साधून आले आहे.

यामिनी : हे उत्तम झाले.

विजया : प्रतिभा कशी आहे ?

यामिनी : छान आहे.

विजया : विजय ! तुझे कसे काय चालले आहे ? तुला टी.व्ही. वर पहिले कुठल्याश्या हिरोईन सोबत ! कोण होती ती ?

यामिनी :ती कामिनी होती , विजयची मैत्रीण आहे.

विजया : उत्तम ! चला माझे जेवून झाले मी झोपते आता .

यामिनी : हो ! तुम्ही झोपा !

विजया झोपायला गेल्यावर

यामिनी : विजय तू कोठे झोपणार आहेस ?

विजय : तुझ्या ! रूममध्ये !

यामिनी : काय ? खरंच ! तुला भीती नाही वाटणार ?

विजय : कसली ?

यामिनी : कसली नाही ...

यामिनीचे आटपल्यावर विजय यामिनीसह तिच्या रूममध्ये झोपायला जातो.


दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतिभा कामावर येताच सोफ्यावर विजयच्या बाजुला चहा पित बसलेल्या विजयाला पाहुन प्रतिभाला प्रचंड आनंद झाला. प्रतिभाला पहताच विजया जागेवरुन उठते आणि चहाचा कप टेबलावर ठेवून प्रतिभाला मिठी मरते. प्रतिभा तिच्या मिठितुन मोकळी झाल्यावर

प्रतिभा : विजया तू कधी आलीस ?

विजया : मी काल रात्रीच आले. तुला सरप्राईज द्यावे म्हणुन नाही कळवले. पुढच्या आठवड्यात विजयचा वाढदिवस आहे म्हणून आले. फक्त इतकेच नाही मला मुंबईत मझी एक दोन कामे ही करायची आहेत.

प्रतिभा : कारण काहीही असो ! तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. आता दहा एक दिवस मुंबईत आहेस म्हणजे खूप मजा येणार..

विजया : हो ! आपण खूप मजा करू या...

प्रतिभा : बरं आता नाश्त्याला काय बनवू ?

विजया : काय बनवू काय ? मी येणार आहे तुझ्या मदतीला.

प्रतिभा : चला बाईसाहेब !

विजया आणि प्रतिभा स्वयंपाकघरात जातात. विजय तेथेच सोफ्यावर बसून त्याचे काम करत असतो.

स्वयंपाकघरात...

विजया : काल विजय आणि यामिनी ! यामिनीच्या रूममध्ये एकत्र झोपले होते.

प्रतिभा : खरंच ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कदाचित तुला दाखवायला तसे केले असेल.

विजया : कोणाचाही कोंबडा आरवेना आपल्याला सकाळ झाल्याशी मतलब !

प्रतिभा : बरं तू नाश्त्यात काय खाल्लेस ?

विजया : कोठे काय खाल्ले ? मी तू येण्याची वाट पाहत होते. तू नश्ता करून आलीस का ?

प्रतिभा : हो ! चहात दोन पोळया बुडवून खाऊन आले.

विजया : हल्ली काही लोक म्हणतात," चहात पोळ्या बुडवून खाणे शरिरासाठी योग्य नसते. पण तरीही मी आवडीने खाते. पोळ्याच काय कधी - कधी मी भाकऱ्या पण बुडवून खाते. पुर्वी विजयला चहात पोळ्या बुडवून खायला खूप आवडत असत.

प्रतिभा : आजही खातात ते चहात पोळ्या बुडवून कधी-कधी मुड झाला तर...

विजया : नाश्त्यात आज आपण मालपोहे बनवुया...

प्रतिभा : चालेल आणि जेवनात काय ?

विजया: जेवनात ! नेहमीसारखी विजयसाठी बटाट्याची भाजी आणि आपल्यासाठी सुके बोंबिल ! ...मी गावावरून येताना सुके बोंबिल आणले आहेत.

प्रतिभा: पण मी जेवायला थांबणार नाही.

विजया : तुला कोण थांबायला सांगतोय ! एक - दोन पोळ्या तर आपण एकत्र खाऊच शकतो.

प्रतिभा : हो ! चालेल...

प्रतिभा मालपोहे तयार करते. विजया एक मालपोहा उभ्या उभ्यानेच खाते आणि दोन मालपोहे विजयला नेऊन देते.

विजया: विजय ! मालपोहे कसे झाले आहेत ?

विजय : उत्तम ! खूप दिवसानी मालपोहे खाल्ले ! तू खाल्लेस का ?

विजया : हो !

विजय : मी आता बाहेर चाल्लो आहे. तुला काही घेऊन यायचे असेल तर सांग !

विजया : दुपारी जेवायला येणार आहेस ना ?

विजय : हो !

विजया : मग ! ठिक आहे ! मला सध्यातरी काही नको ! काही हवे असेल तर मी प्रतिभाला आणायला सांगेण !

विजय ! बाहेर निघून गेल्यावर विजया स्वयंपाकघरात जाते. प्रतिभासोबत आणखी एक एक मालपोहा खाते. जेवन तयार झाल्यावर त्या दोघी हातावर एक एक पोळी घेऊन सुक्या बोंबलासोबत खाऊ लागतात.

प्रतिभा : वा ! काय ? चव आहे बोंबलांना ! यामिनी ताई हव्या होत्या.

विजया : त्यात काय ? तिच्यासाठी नाही उरले तर संध्याकाळी पुन्हा बनवुया... मला काय कोणी मला वर्षाचे बारा महिने बोंबिल दिले तरी मी खाईन...

प्रतिभा : मी पण खाईन पण माझे उपवास खूप असतात.

विजया : म्हणजे तुला काय वाटते मी उपवास करत नाही, मी हि सर्व उपवास करते फक्त काय काय खाऊन करते ते बाकी विचारू नकोस

प्रतिभा : यामिनी ताई कोणताच उपवास करत नाहीत

विजया : नाही करत तेच उत्तम आहे. मी माहेरी असताना कधीच कोणताच उपवास केलेला नव्हता आता सासरी सर्वच करतात म्हणून करते.

इतक्यात दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडून कमळला आत घेताच

कमळ : विजया ताई आल्या आहेत ना मी त्यांना भेटायला आले आहे. तू काय करत होतीस ?

प्रतिभा : आम्ही सुक्या बोंबलासोबत पोळ्या खात होतो.

कमळ : बोंबिल नुसतं नाव ऐकून मुख्य जिभेला पाणी सुटले आहे मलाही दे एखादी पोळी !

विजया : एक का ? दोन घे कि ?

कमळ : कशा हात तुम्ही विजया ताई

विजया : मी मजेत आहे ! तू कशी आहेस ?

कमळ : मी हि मजेत आहे.

प्रतिभा कमलसाठी पोळ्या आणि बोंबिल घेऊन येते ते खाताना

कमळ : काय स्वादिष्ठ आहेत बोंबिल

बोंबिल खाऊन झाल्यावर कमळ निघून जाते. प्रतिभा जायला निघाल्यावर विजया प्रतिभाच्या मुलांसाठी खोबऱ्याच्या वड्या देते.

प्रतिभा : मी पण खाईन पण माझे उपवास खूप असतात.

विजया : म्हणजे तुला काय वाटते मी उपवास करत नाही, मी हि सर्व उपवास करते फक्त काय काय खाऊन करते ते बाकी विचारू नकोस

प्रतिभा : यामिनी ताई कोणताच उपवास करत नाहीत

विजया : नाही करत तेच उत्तम आहे. मी माहेरी असताना कधीच कोणताच उपवास केलेला नव्हता आता सासरी सर्वच करतात म्हणून करते.

इतक्यात दारावरची बेल वाजते प्रतिभा दार उघडून कमळला आत घेताच

कमळ : विजया ताई आल्या आहेत ना मी त्यांना भेटायला आले आहे. तू काय करत होतीस ?

प्रतिभा : आम्ही सुक्या बोंबलासोबत पोळ्या खात होतो.

कमळ : बोंबिल नुसतं नाव ऐकून मुख्य जिभेला पाणी सुटले आहे मलाही दे एखादी पोळी !

विजया : एक का ? दोन घे कि ?

कमळ : कशा हात तुम्ही विजया ताई

विजया : मी मजेत आहे ! तू कशी आहेस ?

कमळ : मी हि मजेत आहे.

प्रतिभा कमलसाठी पोळ्या आणि बोंबिल घेऊन येते ते खाताना

कमळ : काय स्वादिष्ठ आहेत बोंबिल

बोंबिल खाऊन झाल्यावर कमळ निघून जाते. प्रतिभा जायला निघाल्यावर विजया प्रतिभाच्या मुलांसाठी खोबऱ्याच्या वड्या देते. प्रतिभा त्या बऱ्याच्या वड्या घेऊन निघून जाते. विजया तेथेच सोफ्यावर बसून टी .व्ही पाहत असते. इतक्यात दारावरची बेल वाजते. विजया दार उघडून कविताला आत घेते.

विजया : कविता ! तू ! ये ना ! अचानक तू कशी काय आलीस ?

कविता : आई म्हणाली,'' विजया आत्या आली आहे म्हणून मी आले तुला भेटायला

विजया : हो ! का ? मग बस मी तुला खाऊ देते.

कविता : काय खाऊ देतेस ?

विजया : मी तुला खोबऱ्याच्या वड्या देते.

कविता : खोबऱ्याच्या वड्या ! मला खूप आवडतात.

विजया कविताला एका प्लेटमध्ये खोबऱ्याच्या वड्या देते त्या ती तिच्याच बाजूला सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत खात असते इतकयात तेथे कमळ येते

कमळ : कविता क्लासला जायचे नाही का ?

कविता : हो ! अजून वेळ आहे हे काय खातेस घुशीसारखे ?

विजया : ती खोबऱ्याच्या वड्या खातेय ! तू हि घे !

कमळ दोन वड्या उचलून तोंडात घालते

कमळ : वा ! काय छान वड्या झालेल्या आहेत. ताई मलाही बनवायला शिकवा एकदा !

विजया : हो ! शिकवीन त्यात काय रॉकेट सायन्स नाही.

कमळ : ताई ! मी कविताला क्लासला सोडून येते. चल कविता..

कविता : बाय ! आत्या...

विजया : बाय बेटा ! 

कमळ निघून गेल्यावर थोड्या वेळाने विजय घरात येतो. त्याच्या हातात एक पिशवी असते. त्या पिशवीत शेव - बुंदी असते. जी तो विजयाच्या हातात दिल्यावर

विजया : हे काय ?

विजय : तुला आवडते ना म्हणून शेव-बुंदी आणली आहे. 

विजया : बरं ! आपण आता जेवून घेऊया !

विजया आणि विजय जेवून झाल्यावर विजया तिच्या रूममध्ये जाऊन पडते. विजय सोफ्यावर बसून लॅपटॉपवर त्याचे काम करतो. इतक्यात हा ! हा ! म्हणता पाच वाजतात. विजया झोपेतून जागी होते. चहा तयार करते आणि विजय सोबत शेव खात चहा पित असते

विजया : मी जरा कमळकडे जाऊन येते.

विजय : हो ! हो ! तू जाऊन ये !

विजय तितेच लॅपटॉपवर काम करत बसतो तासाभराने प्रतिभा आत येते

प्रतिभा : विजया कोठे आहे ?

विजय : ती कमळ वहिनींकडे गेली आहे. तुझ्या हातात काय आहे ?

प्रतिभा : मी मटण आणले आहे .

विजय: प्रतिभा तू माझ्या खाण्या लायक कधीच काही आणत नाहीस.

प्रतिभा : काय करणार तुम्ही शाकाहारी देव माणूस आणि आम्ही मांसाहारी राक्षस

विजय : हे बाकी तू बरोबर बोललीस, आता एक काम कर विजया चहा तयार करून गेलीच आहे तर तो गरम कर तुलाही घे आणि मलाही आणून दे !

इतकयात विजया आत येते

विजया : मलाही हवाय !

त्या तिघांचा चहा पिऊन झाल्यावर यामिनी घरात प्रवेश करते.

यामिनी फ्रेश झाल्यावर प्रतिभा तिला चहा आणि शेव आणून देते.

यामिनी : हि शेव कोणी आणली ?

प्रतिभा : साहेबानी !

यामिनी : छान आहे. दुपारी काय जेवण केले होतेस ?

प्रतिभा : सुके बोंबिल केले होते.

यामिनी : मलाही घेऊन ये एखादी पोळी बोंबलसोबत ! खूप भूक लागली आहे.

प्रतिभा : मी मटणही आणले आहे

यामिनी : ते रात्रीच खाऊ !आता बोंबिलच घेऊन ये.

विजया : पूर्वी विजयला बोंबिल खूप आवडायचे !

विजय : हो ! पूर्वी मी ज्या कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्यात काम करणारे माझे सहकारी त्यांच्या भाजीत सुक्या बोंबलाची पावडर टाकायचे ! त्यामुळे त्यांच्या भाजीला जी चव यायची ती मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

यामिनी : प्रतिभा ! तू मटण आणलेस आहेत तर आपण वडेही करूया ! मी ही येते तुमच्या मदतीला.

जेवण तयार झाल्यावर यामिनी प्रतिभाला वडे भरून देते ते घेऊन ती निघून गेल्यावर यामिनी कमळला वडे नेऊन देते. ते तिघे वड्यांवर ताव मारून रात्री उशिरा झोपायला जातात. अर्थात विजया विजयाच्या रूममध्ये आणि विजय यामिनीच्या रूममध्ये...

दुसऱ्या दिवशी यामिनी उशिरा ऑफीसला जाणार असते. प्रतिभा कामावर येताच...

प्रतिभा : ताई आज ऑफीसला नाही गेलात ?

यामिनी : नाही ! म्हणजे आज मी ऑफीसला उशिरा जाणार आहे. आज तू लवकर आलीस ?

प्रतिभा : आज माझ्या घरची कामे लवकर आटपली म्हणून लवकर आले. विजया कोठे आहे ?

यमिनी : विजया तिच्या रुममध्ये आहे.

प्रतिभा : बरं मी भेटते तिला.

यामिनी : भेट तिला पण अगोदर चहा घे तो गरम आहे.

प्रतिभा : हो !

प्रतिभा विजयच्या रुममध्ये जाताच

विजया : प्रतिभा तू आलीस ? मी तुझीच वाट पाहत होते.

प्रतिभा : कशाला ?

विजया : कशाला काय गप्पा मारायला.

प्रतिभा : गप्पा मारुच ! अगोदर मी कामाला सुरुवात करते.

विजया : बरं तू सुरुवात कर मी येतेच तुझ्या मदतीला. कालचे मटण छान झाले होते.

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर यामिनीही स्वयंपाकघरात येते.

प्रतिभा : काय ? ताई खुप खुश दिसताय ! साहेब तुमच्या रुममध्ये झोपायला लागले म्हणून कि काय ?

यामिनी : नाही ! तसे काही नाही, मी खुश आहे पण आमच्यात तसे काही झालेले नाही.

प्रतिभा : तुम्ही पुढाकार घ्यायचा ना !

यामिनी : नाही तसे मी करू शकत नाही.

प्रतिभा : पण का ?

यामिनी : तुझ्या का ? चे उत्तर आम्ही म्हणजे मी आणि विजय तुला आणि विजयाला लवकरच देणार आहोत.

प्रतिभा : मला उत्सुकता आहे ते उत्तर जाणून घेण्याची.

इत्क्यात विजया आत येते.

विजया : यामिनी तू आराम कर तुला ऑफीसला जायचे आहे ना ? आम्ही मैत्रिणी करु सर्व !

यामिनी : बरं !

यामिनी बाहेर गेल्यावर

प्रतिभा : मी चहा करते.

विजया : मी गोडाचा शिरा करते. तो खाऊ आणि आरामात दुपारच्या जेवनाचे काय ते पाहु.

प्रतिभा : पण यामिनी ताई जेवून जाणार असतील ना ?

विजया : नाही ! ती फक्त नाश्ता करून जाणार आहे म्हणाली.

प्रतिभा : ओके !

चहा आणि शिरा तयार झाल्यावर प्रतिभा यामिनीला तिच्या रूममध्ये नेऊन देते तर विजया नुकरताच बाहेरून फेरफटका मारुन आलेल्या विजयला नेऊन देते. त्यानंतर त्यांच्यात गप्पा रंगतात...

विजया : मगाशी काय म्हणत होती यामिनी वहिणी ?

प्रतिभा : काही नाही मिच विचारले, आज खूप खूष दिसताय ! साहेब तुमच्या रुममध्ये झोपायला लागले म्हणून का ? तर त्या म्हणाल्या," त्यांच्यात तसे काही झाले नाही.

विजया : हा नक्की काय गोलमाल आहे ते कळत नाही. एकदा स्पष्टच विचारावे म्हणतेय !

प्रतिभा : आता त्याची काही गरज नाही. ते दोघे लवकरच आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत.

विजया : मग ठिक आहे आपण वाट पाहू या त्या वेळेची !

प्रतिभा : शिरा अगदी प्रसादीसारखा झाला आहे.

विजया : मुलांना खोबऱ्याच्या वड्या आवडल्या का ?

प्रतिभा : म्हणजे काय ? त्यांना तुला भेटायचे होते.

विजया : त्यात काय आज उद्या मी येईन तुझ्यासोबत तुझ्या घरी.

प्रतिभा : चालेल ! मी तुझ्यासाठी पुरणपोळ्या करेन

विजया : पण आता दुपारच्या जेवनात काय करू या ?

प्रतिभा : भरली वांगी करूया.

विजया : चालेल ! ती विजयला खूप आवडतात.

प्रतिभा : चला मग तयारी करायला घेऊ या !

इत्क्यात यामिनी आत येते

यामिनी : मी काही मदत करू का ?

विजया : नको ! तू फक्त बघ ! आम्ही वांग्याचे भरीत करणार आहोत.

यामिनी : वांग्याचे भरीत ! आता तर मी जेवूनच जाईन.

प्रतिभा : हो ! चालेल, आम्ही करतो पटापट ...

विजय : यामिनी जरा बाहेर ये !

विजया : जा बाई ! तुझा नवरा हाक मारतोय .

यामिनी बाहेर येताच

यामिनी : काय झाले ?

विजय : काही झाले नाही. मी बाहेर जातोय दुध आणायला, आणखी काही आणायचे आहे का ?

यामिनी : मॅगी घेऊन ये ! विजयाचा कधी मुड झाला तर ती बनवेल.

विजय : हो ! मलाही ! आवडते कधी कधी खायला.

विजय बाहेर गेल्यावर यामिनी तेथेच सोफ्यावर बसून विचार करत असते इतक्यात कमळ आता येते.

यामिनी : प्रतिभा ! कमळ आली आहे. तिच्यासाठी चहा - शिरा घेऊन ये !

प्रतिभा : हो ! लगेच येते.

प्रतिभा चहा आणि शिरा घेऊन आल्यावर

कमळ : विजया ताई कोठे आहेत ?

प्रतिभा : त्या स्वंयपाकघरात आहेत. भरली वांगी करता आहेत.

कमळ : या बिचारिलाही एखादा पाठवून द्या.

यामिनी : म्हणजे काय ?

प्रतिभा : तुम्ही बसा गप्पा मारत मी आत पाहते.

कमळ : तू आज घरी...

यामिनी : मला दुपारी एक मिटिंग आहे तिकडे जायचे आहे.

कमळ : विजय भावोजींच्या वाढदिवसाचा काही कार्यक्रम ठरला की नाही ?

यामिनी : तो तर ठरल्यात जमा आहे. मी केक आणि जेवनाची ऑर्डर दिलेली आहे.

कमळ : भावोजींना वाढदिवसाला तू काय भेट देणार आहेस ?

यामिनी : अजून काही ठरवले नाही. त्याला भेट द्यायची म्हणजे खूप विचार करावा लागेल. दाग - दागिने तर त्याला आवडतच नाहीत.

कमळ : गाडी घोड्यांचाही त्यांना शौक नाही. त्यापेक्षा वाढदिवस झाल्यावर तुम्ही कोठे फिरायला का जात नाही.

यामिनी : आम्ही आमच्या गावी जाणार आहोत.

कमळ : कोठे ही जा ! फक्त चार दिवस फिरून आल्याशी मतलब...

कमळ : मी निघते मला कमळला शाळेत सोडायचे आहे.

कमळ निघून गेल्यावर विजय मॅगी आणि बरच काही घेऊन आला.

यामिनी : विजय तू बरचं काय काय घेऊन आला आहेस.

विजय : हो !

यामिनी : विजय ! आपण आपल्या नात्याबद्दल तुझा वाढदिवस झल्यावर विजया आणि प्रतिभाला सर्व जे काही आहे ते खरं खरं सांगून टाकूया !

विजय : हो !

विजय आल्याचा अवाज ऐकताच प्रतिभा विजयसाठी चहा घेऊन येते. विजय आणलेल्या सामानाच्या पिशव्या प्रतिभाच्या हातात देतो. समान घेऊन ती आत गेल्यावर

यामिनी : मी रुममध्ये जाऊन माझ्या मिटींगची तयारी करते.

विजय : मी ही माझे काम करतो.

यामिनी तिच्या रूम मध्ये जाते आणि विजय सोफ्यावर बसून काम करत असताना विजया स्वयंपाकघरातून बाहेर येते आणि

विजया : विजय तुझ्या वाढदिवसाला मी तुला काय गिफ्ट घेऊ ?

विजय : काही नको ! तू आलीस हे पुरेसे आहे माझ्यासाठी उलट तुला काही रिटर्न गिफ्ट हवे असेल तर तू मला सांग.

विजया : नक्की सांगेण ! जेऊन झाल्यावर मी ही बाहेर जाणार आहे , माझी ही एक दोन कामे आहेत मी थोडी उशिराच परत येईन.

विजय : मी येऊ का तुझ्या सोबत.

विजया : नको ! मी प्रतिभाला घेऊन जाणार आहे.

विजय : मग चालेल.

यामिनी भरल्या वांग्यासोबत दोन पोळ्या खाऊन घराच्या बाहेर पडते. ती बाहेर पडल्यावर जेवन झाल्यावर विजया आणि प्रतिभा एकत्र घराच्या बाहेर पडतात. त्यानंतर विजयला फोन आल्यावर तो ही तयार होऊन घराच्या बाहेर पडतो.


संध्याकाळी यामिनी एकटीच सोफ्यावर बसून टी.व्ही.पाहत असते इतकयात प्रतिभा आणि विजया आत येतात.

यामिनी : तुम्ही दोघी एकत्र कोठे बाहेर गेला होतात का ?

विजया : माझे थोडे काम होते म्हणून प्रतिभालाही सोबत घेऊन गेले होते.

प्रतिभा : मी लगेच चहा टाकते.

यामिनी : मी केला आहे तो गरम करू घ्या

विजया : प्रतिभा मी पण येते आपण छान मॅगी बनवूया !

प्रतिभा : हो ! चालेल.

मॅगी तयार झाल्यावर तिघी मिळून खात असतात इतक्यात कमळ आता येते

यामिनी : कमळ मॅगी खातेस का ?

कमळ : नको ! मी आताच पास्ता खाल्ला आहे. पण दुपारचे भरलेले वांगे खूपच स्वादिष्ठ होते. मी तेच सांगायला आले होते आता मी निघते.

कमळ निघून गेल्यावर

विजया : ही कमळ आता आपल्या कुटुंबाचाच एक भाग झाली आहे नाही ?

यामिनी : हो !

विजया : आपलया गावी घेऊन ये तिला एकदा !

यामिनी : हो ! नक्कीच ! पण त्या अगोदर मी तर यायला हवी ना ?

विजया : तुला काय कोणी रोखले आहे. तेथे तुझे हक्काचे घर आहे तेथे यायला तुला विजयच्याही परवानगीची ! विजय नाही म्हणाला तर तू प्रतिभाला घेऊन ये..

यामिनी : नाही ! म्हणजे आम्ही येणारच आहोत एक काम झाल्यावर .. विजय स्वतः म्हणाला या,'' माझा वाढदिवस झाल्यावर आपण एक दिवस गावाला जाऊन येऊया !

विजया : तुम्ही आलात कि आपण खूप धमाल करूया !तिकडेही पाहण्यासारख्या खूप जागा आहेत अगदी अगदी डोळ्यात भरून घेण्यासारख्या

यामिनी : मलाही आवडेल.

प्रतिभा : आता रात्रीच्या जेवणाचं काय करायचं ?

यामिनी : मी येताना बाजारून अंडी आणली आहेत आणि विजयासाठी पनीरही आणले आहे. आता तुम्ही ठरावा काय करायचे आहे ते. तुमचं जेवण तयार करून झालं की आपण बाहेर नाक्यावर जाऊन समोसा खाऊया !

विजया : चालेल ! प्रतिभा लवकर जेवण कर..

विजया : विजय कोठे गेला ?

यामिनी : नाही ! मला माहीत नाही ! मी त्याला फोन नाही केला. गेला असेल काहीतरी काम असेल त्याचे त्याचे.

विजया : ठीक आहे ! तो यायचा तेंव्हा येईल.

रात्रीचे जेवण तयार झाल्यावर त्या तिघी घराच्या बाहेर पडतात आणि दोघी माघारी येतात प्रतिभाला तिच्या घरी सोडून. त्या येईपर्यत विजय माघारी आलेला असतो. त्यांना पाहताच

विजय : कोठे गेला होतात ?

यामिनी : आम्ही नाक्यावर सामोसा खायला गेलो होतो.

विजय : बरं !

विजया : तू कधी आलास ?

विजय : हे काय आताच !

विजया : चला मग आता जेऊन घेऊया ! मला माझी लाडकी मालिका पाहायची आहे.

यामिनी : मी वाढायला घेते.

ते तिघे मनसोक्त जेवून नेहमीप्रमाणे झोपी जातात....

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे प्रतिभा कामावर येते. विजय आणि यमिनी त्यांच्या कामासाठी सकाळीच बाहेर गेलेल्या असतात. विजया एकटीच घरी असते. प्रतिभाचे काम आटपल्यावर विजया प्रतिभासोबत तिच्या घरी जाते. सँध्याकाळी विजय सोफ्यावर बसून चहा पित असतो इतक्यात यामिनी येते. यमिनी फ्रेश होऊन बाहेर आल्यावर विजयच्या शेजारी किंचित त्याला खेटून त्यच्या बाजुला पायावर पाय घेऊन बसते. विजयचे लक्ष अचानक तिच्या पायांकडे जताच

विजय : यामिनी ! नवीन जोडवी घेतली वाटतं ?

यामिनी : हो ! ती घेऊन बरेच दिवस झाले. आज अचानक कसे काय तुझे माझ्या पायांकडे लक्ष गेले.

विजय : मझे लक्ष नेहमीच स्त्रियांच्या पायाकडे असते कारण मी स्त्रियांचा नेहमीच आदर करतो. जुनी जोडवी छान होती ती काय केलीस ?

यामिनी : ती मी प्रतिभाला दिली.

विजय : कशाला वापरलेल्या वस्तू कोणाला द्यायच्या ?

यामिनी : त्यची डिझाईन तिला आवडली होती म्हणून दिल्या. ती नकोच म्हणत होती. मीच तिला जबरदस्ती दिली. पण ती ती जोडवी पायात न घालता जपून ठेवणार आहे. त्यमुळे मी आता तिला अशीच नवीन जोडवी घेऊन देणार आहे.

विजय : आपली जोडवी अशी दुसऱ्या कोणाला द्यायची नसतात. ती सौभाग्याचे प्रतिक असतात.

यामिनी : तू माझे सौभाग्य आहेस पण सौभाग्यासारखा वागतोस का ?

विजय : आपली गोष्ट वेगळी आहे.

यामिनी : काही वेगळी नाही. तुझे माझ्यावर प्रेमच नाही अथवा तुझी माझ्यावर प्रेम करण्याची इच्छा नाही कारण ...मी...

विजय : तसे काहीही नाही ! आपण नवरा - बायको आहोत. एकत्र आनंदाने, सुखा-समाधानाने जगत आहोत यातच मला आनंद आहे. मला तुझ्याच नव्हे कोणत्याच स्त्रिच्या शरिराची कामना कधीच नव्हती. नसणार आहे.

यामिनी : हे काही मला पटलेले नाही. मेनकेने विश्वामित्रांचीही तपश्चर्या भंग केली होती. मी तुझी तपश्चर्या भंग नाही करू शकले. कामिनी मेनका होऊन तर तुझ्या आयुष्यात आलेली नाही ना ?

विजय : मी कितिंदा सांगू तुला ? आमच्यात तसे काहीही सांगू नकोस !

यामिनी : आपण शाळेत असताना तुझे माझ्यावर किती प्रेम होते पण तेव्हा तू ते व्यक्त केले नाहीस. केले असतेस तर माझ्या आयुष्यात जे वादळ आले ते कदाचित आले नसते.

विजय : असे तुला वाटते पण माणसाच्या हातात काहीही नसते. माणूस हा नियतीच्या हातातील फक्त एक खेळण असतो.

यामिनी : पण मला आता माझ्या भावनांना आवर घालणे अवघड झाले आहे.

विजय : मी कोठे तुला म्हणालो," तू तुझ्या भावनांना आवर घाल ! तू हक्काने माझ्या जवळ आलीस आणि मी तुला दूर लोटले असे झाले का ?

यामिनी : नाही झाले पण मला माझ्या हक्काच प्रेम मिळवायचे आहे , ओरबाडून घ्यायचे नाही.

विजय : माझ्या मनात तश्या भावना उफाळुन वगैरे येण्याची शक्यता तशी थोडी कमीच आहे.

यामिनी : तू नक्की पुरुष आहेस ना ? सॉरी ! पण कधी - कधी मला शंका येते.

विजय : माझ्या पुरुषत्वाबद्दल शंका निर्माण होत होती म्हणून मी तुझ्याशी लग्न केले हे तुला चांगले माहीत आहे. मला मुळात लग्नच करायचे नव्हते.

यामिनी : पण तुझे पुरुषत्व कोठे सिध्द झाले आहे ?

इत्क्यात दारावरची बेल वाजते. यामिनी दार उघडून प्रतिभा आणि विजयाला आत घेते. प्रतिभाच्या हातात एक डबा असतो.

यमिनी : या डब्यात काय आहे ?

प्रतिभा : तुमच्यासाठी पुरणपोळ्या आणल्या आहेत.

यामिनी : मग दे की मला...

विजय : मलाही हवी !

विजया : हो ! भरपूर आहेत. आरामात खा दोघे बसून आम्ही रात्रीच्या जेवनाची तयारी करतो. विजय आणि यामिनी सोफ्यावर बसून पुरणपोळ्या खातात. प्रतिभा रात्रीचा स्वयंपाक करून निघून जाते.रात्री ते तिघे डायनिंग टेबलवर जेवायला बसलेले असतात.

विजय : आज प्रतिभाला घेऊन कोठे गेली होतिस ?

विजया : आज मी प्रतिभाच्या घरी जेवायला आणि तिच्या मुलांना भेटायला गेले होते.

यामिनी : मलाही भेटायचे आहे तिच्या मुलांना !

विजय : पुरणपोळ्या छान झाल्या आहेत ! आईची आठवण आली.

यामिनी : खरंच पुरणपोळ्या खूप छान झालेल्या आहेत.

विजया : आमची आई पुरणपोळ्या खूपच छान करते.

यामिनी : मला कोठे त्या खायचा योग आला आहे.

विजया : येईल...विजय तू दिवसभर कोठे होतास ?

विजय : ते माझे नवीन पुस्तक प्रकाशित होणार आहे ना ? त्या संदर्भातच मिटींग होती.

विजया : तुझी प्रकाशक म्हणे दिसायला खूप सुंदर आहे.

यामिनी : ती सुंदर असेल पण कामिनी इतकी नक्कीच नसेल.

विजया : कामिनी म्हणजे तीच ना ? जी विजयसोबत टी.व्ही. वर दिसली होती.

यामिनी : हो !

विजया : सुंदर दिसने ही तिच्या कार्यक्षेत्राची गरज आहे. यामिनी तू काय दिसायला कमी सुंदर आहेस.मेक-अप केल्यावर तुही काही कमी सुंदर दिसनार नाहीस तिच्या पेक्षा !

यामिनी : पण आमच्या सुंदर दिसण्याची दखल कोण घेतय ? घर की बिबी डाल बराबर, और की बिबी लगती है मुर्गी !

विजया : पतंग आकाशात किती ही उंच उडाले तरी त्याला जमिनीवर यावेच लगते.

विजय : मी काही पतंग वगैरे नाही. मला कोणाच्याच सुंदर दिसण्याने काहीच फरक पडत नाही.

विजया : तुझ्या वाढदिवसाला येतील ना त्या ?

यामिनी : म्हणजे काय ? नाही बोलावले तरी येतील त्या.

विजया : यामिनी तू उगाच त्रास करून घेत आहेस. मी माझ्या भावाला चांगले ओळखते तो एकच चुक दोनदा करत नाही.

यामिनी : पुरुष लबाड असतात ते एकच चुक दहा वेळाही करुच शकतात.

विजया : याचा अर्थ वहिनी ! तुझ्या नवऱ्यची लगाम तुझ्या हातात नाही. नवऱ्याला वेसण घलायला शिक !

यामिनी : तुझ्या भावाला लगाम घालणे परमेश्वरालाही जमणार नाही.

विजया : हे बाकी तू बरोबर बोललीस ! आपले जेवण झाल्यावर आपण जरा बाहेर जाऊन फेरफटका मारुन येऊ या !

यमिनी : हो ! जाऊया !!

विजय : तुम्ही जा ! मी काही येणार नाही. दिवसभर प्रवास करून मी खूप थकलेलो आहे.

यामिनी : आपण जाऊया ! सोबत कमळला घेऊन जाऊया ! तशी ही आपल्या बायकांत ह्याची लुडबुड नकोच !

जेवून झाल्यावर त्या दोघी घराच्या बाहेर पडतात. विजय टी.व्ही. वर बातम्या पाहत असतो इतक्यात टी.व्ही.वर कामिनीने घेतलेली राजकीय मुलाखत सुरू होते. विजय तिची मुलाखत कान देऊन ऐकत असतो आणि डोळे भरून पाहत असतो. तिची मुलाखत संपल्यावर तो टी.व्ही.बंद करतो आणि पेपर वाचत बसतो. थोड्या वेळाने त्या दोघी बाहेर फेरफटका मारून माघारी येतात.

विजया : तू ही यायला हवा होतास आमच्या सोबत आम्ही गाडीवरचा आईस्क्रीम खाल्ला.

विजय : मला काय आता त्या आईस्क्रीमच फार कौतुक वाटत नाही.

यामिनी : पण मी आणला आहे तुझ्यासाठी ! हा घे...

विजय : आता माझ्या बयकोनेच इतक्या प्रेमाने आणला आहे म्हणून खातो.

विजया : वहिनी ! बघ बघ ! तुझ्या नवऱ्याचे तुझ्यावर किती प्रेम आहे. तू उगाच त्याच्याबद्दल तक्रार करत असतेस. थोडा वेळ हास्य विनोद करून ते तिघे झोपायला जातात.


असाच एक आठवडा सरतो आणि विजयच्या वाढदिवसाचा दिवस उजाडतो. नेमका त्या दिवशी शनिवार असतो. त्यमुळे सर्वांना धमाळ करायला काही हरकत नसते.


विजयच्या वाढदिवसची पार्टी घरतच रात्री करायचे ठरलेले असते. यामिनीने पार्टीच्या तयारीचे काम खास माणसांना दिलेले असते.

संध्याकाळी सातच्या सुमारास प्रतिभा छान तयार होऊन तिच्या मुलांसोबत पार्टीला येते. ती येताच...

यामिनी : प्रतिभा ! तू आलीस ?

प्रतिभा : हो ! तुम्हाला काही मदत लगली तर म्हणून आले.

विजया : बरं झालं तू आलीस ! मला सांग मी कशी दिसते आहे ?

प्रतिभा : खूपच सुंदर !

विजया : तू ही खूप सुंदर दिसते आहेस आज. मुलही फरच गोड दिसता आहेत.

इत्क्यात कविता आत येते आणि प्रतिभाची मुले तिच्यासोबत खेळायला बाहेर निघून जातात.

विजया : विजय ! अजय येणार आहे ना ?

विजय : हो ! पण तो एकटाच येणार आहे. वहिनी माहेरी गेल्या आहेत.

विजयच्या वाढदिवसच्या पर्टीची तयारी जोरात सुरू असते.

थोड्या वेळाने यामिनी छान लाल रंगाची साडी नेसून तयार होऊन बाहेर येताच सर्वजण तिच्याकडे पाहत राहतात.

पार्टिला आलेले लोक स्टारटर सोबत थंडा पित असतात. केक कापण्याची वेळ रात्री नऊची ठरलेली असते.

निलिमा आठ वाजता विजयच्या घरी येते. तिच्या हातत एक मोठा पुष्प गुच्छ असतो त्यसोबत एक भेट वस्तूही असते.

विजय निलिमाची विजयासोबत ओळख करून देतो.

विजय : विजया ! ही निलिमा ! माझ्या आगामी पुस्तकाची प्रकाशक ..आणि निलिमा ही माझी लहान बहिण विजया...

विजया : हाय !

निलिमा : हाय !

विजया : निलिमा ! आज तू खूपच सुंदर दिसते आहेस.

निलिमा : तू ही खूप सुंदर दिसते आहेस. तू कोठे असतेस?

विजया : मी गावीच असते, कोकणात तेथे आमचा बिझनेस आहे. मी येत असते अधून मधून मुंबईला. विजय सांगत असतो तुझ्याबद्दल.

निलिमा : तो सरांचा मोठेपणा आहे.

विजया : कधी होणार आहे पुस्तकाचे प्रकाशन ?

निलिमा : पुढच्या महिन्यात ! तू येशील ना प्रकाशनाला ?

विजया : जमेल असे वाटत नाही तरीही मी प्रयत्न नक्की करणार आहे. मी नाही आले तरी माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्यासोबत. तू थंडा वगैरे घेतलास की नाही ?

निलिमा : मी थंडा पित नाही. मी फ्रिजचे पाणी ही पित नाही.

विजया : थंडा नाही तर नाही ...स्टारटर तर घे !

निलिमा : हो ! घेते पण सरांच्या मिसेस कोठे आहेत ?

विजया : हे काय ती येतच आहे विजयसोबत

विजय आणि यामिनी निलिमाच्या जवळ येताच

विजय : यामिनी ही निलिमा आणि निलम ही माझी बायको यामिनी...

यामिनी : हाय ! निलिमा कशी आहेस ? मी तुला भेटायला खूपच उत्सूक होते.

निलिमा : मलाही तुम्हाला भेटायचे होते मी दोनदा तुमच्या घरी आले पण आपली भेट नाही होऊ शकली.

यामिनी : तू माझ्या कल्पनेपेक्षही जास्त सुंदर आहेस.

निलिमा : धन्यवाद ! तुम्ही ही खूप सुंदर दिसता.

यामिनी : तू काही खायला घेतलेस की नाही ?

निलिमा : नाही ! पण घेते...

यामिनी : मी येतेच

विजय : मी ही येतो ! कामिनी खाली आली आहे तिला घेऊन येतो.

इतक्यात समोरून प्रतिभा येताना दिसताच निलिमा प्रतिभाला हाक मारते. प्रतिभा तिच्या जवळ येताच

निलिमा : हाय ! प्रतिभा कशी आहेस ?

प्रतिभा : मी मजेत ! तुम्ही कशा आहात ?

निलिमा : आज तू खूपच सुंदर दिसत आहेस मी तुझ्यासोअबत एक फोटो काढू का ?

प्रतिभा : त्यात काय ? एक का ? दहा काढू ! मलाही आवडेल.

त्या दोघी बरेच सेल्फी काढतात.

निलिमा : मी माझ्या एका पुस्तकाच्या कव्हर पेजसाठी तुझ्या फोटोचा विचार करते आहे. चालेले ना तुला ?

प्रतिभा : हो ! चालेल.

विजया : प्रतिभा मी जरा कमळला पाहुन येते तुमच चालुद्या !

प्रतिभा : निलिमा ! तुम्ही काही खायला घेतलं की नाही ?

निलिमा : मी फारस तेळकट खात नाही. मला साध जेवनच आवडतं. तुझा आग्रहच असेल तर माझ्यासाठी लिंबू सरबत आण !

प्रतिभा निलिमाला लिंबू सरबत आणून देते इत्क्यात समोरून विजय कामिनीसोबत येताना दिसतो. त्याच्या हातात मोठा पुष्प गुच्छ असतो. जो प्रतिभा त्याच्या हस्तातून घेऊन बाजुला ठेवते. कामिनी निलिमा जवळ येताच.

कामिनी : हाय ! निलिमा, तू कधी आलीस ?

निलिमा : मला येऊन अर्धा तास झाला.

प्रतिभा : कामिनी मॅडम तुम्ही काय घेणार ?

कामिनी : माझ्यासाठी थंडा आण.

प्रतिभा : हो ! लगेच आणतो.

विजय विजयाला हाक मारून बोलावतो आणि तिची कामिनीशी ओलख् करून देतो.

विजय : ही माझी मैत्रीण कामिनी आणि कामिनी ही माझी बहिण विजया...

विजय : तुम्ही बोला मी येतोच !

विजया : यामिनी तू खूपच सुंदर आहेस !

कामिनी : तू काही कमी सुंदर नाहीस...सुंदर दिसण ही माझी गरज आहे.

इतक्यात प्रतिभा तिच्यासाठी थंडा घेऊन येते. ती थंडा पिऊन होईपर्यंत यामिनी तेथे येथे त्या दोघी एकमेकींना अलिंगण देतात.

यामिनी : तू कधी आलीस ?

कामिनी : हे काय ? आताच आले. झाली का सर्व तयारी ?

यामिनी : हो ! झालेय ! थोड्या वेळाने केक कापुया तो कापून झाला की डिनर करूया आणि मग गप्पा झोडूया !

इतक्यात विजया तेथे येते आणि

विजया : कामिनी मला तुझ्या सोबत एक फोटो काढायचा आहे.

कामिनी : बस्स एक ? भरपूर काढुया !

तितक्यात कमळही तेथे येते. त्या पाचजणी मनसोक्त फोटो काढतात.

बरोबर रात्री नऊच्या सुमारास विजय केक कापतो आणि सर्वांना भरवतो. सर्वंजण त्याला हात मिळवून शुभेच्छा देतात पण कामिनी मात्र त्याला मिठी मरून शुभेच्छा देते. ते पाहून सर्वांचे डोळे बटाटया एवढे होतात. इतक्यात अजय दरातून आत येतो तो विजयला प्रेमाने अलिंगण देऊन शुभेच्छा देतो. विजय त्याच्या सोबत दोन चार फोटो क्लिक करतो. सगळीकडे सेल्फीचा कार्यक्रम सुरू असतो. तो झाल्यावर सर्वजण डिनरला बसतात.

अजय : आज यमिनी वहिणी खूप सुंदर दिसता आहेत ?

निलिमा : हो !

कामिनी : मी सुंदर नाही दिसत का ?

विजय : तू नेहमी सुंदर दिसतेस...रोज मरे त्याला कोण रडे ?

यमिनी : तू सुंदर आहेस याबद्दल कोणाचेही दुमत असू शकत नाही.

कमळ : तुझे जेऊन झाल्यावर जरा बाहेर मुलांकडे बघ काय गोंधळ घालता आहेत ते.

प्रतिभा मुलांना पाहायला निघून जाते.

डिनर झाल्यावर सर्वंजण एकत्र बसून आईस -स्क्रिम खात असतात.

कामिनी : निलिमा ! विजयचे पुस्तक झाले का छापून ?

निलिमा : हो ! मी आज सरांना त्या पुस्तकाची पहिली प्रत सरांना भेट म्हणून दिली आहे.

कामिनी : छान ! या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आपण दणक्यात करू.

निलिमा : नक्कीच !

कामिनी : चला मी निघते मला एक शुटींग आहे...विजय ! येतोस ना मला गाडीपर्यंत सोडायला ?

विजय : म्हणजे काय ?

ते दोघे घरातून बाहेर गेल्यावर

निलिमा : प्रतिभा ! तु माझी तुझ्या मुलांशी ओलखच करून दिली नाहीस.

प्रतिभा : श्रवणी, श्रवण इकडे या !

ते धावत येताच...

निलिमा : हाय ! मुलांनो ! मी तुमची निलिमा मावशी !

मुलं तिला प्रेमाणे बिलगतात. प्रतिभा : तू निघालीस की मला सांग मी तुम्हाला माझ्या गाडीने तुमच्या घरापर्यंत सोडेन.

हळू हळू एक - एक करून विजयचा निरोप घेतात. अजय आणि इतर मित्र मंडळी निघून गेल्यावर निलिमा आणि प्रतिभा जायला निघाल्यावर

विजया : निलिमा ! तुला भेटून खूप आनंद झाला.

निलिमा : मी पुन्हा भेटायला येईन तुला !

विजया : हो ! नक्की ये.

इतक्यात विजय आल्यावर निलिमा गालात गोड मंद स्मित करत त्याला बाय करते.

प्रतिभा तिच्या मुलांना घेऊन निलिमा सोबत तिच्या गाडीने घरी जाते.

विजयच्या वाढदिवसाची पार्टी संपल्यावर ते तिघे सोफ्यावर निवांत बसलेले असतात.

यामिनी : मी आता खूप थकले आहे. माझ्याच्याने काही उद्या ऑफीसला जायला होणार नाही.

विजया : मी ही आत जाऊन आडवी पडते.

ते तिघे शांत झोप्ल्यावर तो दिवस संपतो....


दुसऱ्या दिवशी प्रतिभा जरा उशिराच येते. विजय झोपेतून जागा होत दार उघडतो. प्रतिभा आत येताच

प्रतिभा : तुमची सकाळ झाली नाही वाटतं अजून ?

विजय : नाही ना ! तू बेल वाजवलीस म्हणून मी उठलो तरी

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा करते

विजय : हो ! लवकर कर ! तोपर्यत मी फ्रेश होतो.

स्वयंपाकघरातील भांड्यांचा आवाज ऐकून विजया आणि यामिनी जाग्या होतात. प्रतिभा विजयला चहा देईपर्यत त्या दोघी फ्रेश होऊन स्वयंपाकघरात येतात.

यामिनी : प्रतिभा तू का आलीस ? आराम करायचा ना ! तू हि थकली होतीस ना ?

प्रतिभा : मी काही थकली वगैरे नव्हते तसेही मी काळ काही काम केले नव्हते.

विजया : बरं बाई ! तू आता आराम कर.. आम्ही आघोळ वगैरे करून येतो.

प्रतिभा : चालेले तो पर्यंत मी साफसफाई करून घेते.

विजय : यामिनी मी जरा खाली जाऊन येतो .

यामिनी : सावकाश ये !

अंघोळ झाल्यावर त्या दोघी पुन्हा स्वयंपाक घरात येतात.

विजया : आज आपण पिठलं - भाकरी करूया ! प्रतिभा तू संघ्याकाळी येताना बाजारातून कोळंबी घेऊन ये.

यामिनी : विजयला ?

विजया : नवऱ्याची किती काळजी करशील ?

त्याच्यासाठी आपण सोयाबीनची भाजी करूया !

थोड्या वेळाने विजय बाहेरून येताना सर्वांसाठी वडापाव घेऊन येते.

विजया : हे उत्तम केलेस म्हणजे नाश्ता तयार करण्याचा वेळ वाचला.

विजय : मला जेवून बाहेर जायचे आहे.

विजया : बरं ! तू बाहेर गेलास की आम्ही आरामात झोपू

विजय जेवून बाहेर निघून गेल्यावर प्रतिभा एक भाकरी खाऊन निघून जाते.

संध्याकाळी प्रतिभा पुन्हा आल्यावर

प्रतिभा : झाली का तुमची झोप पूर्ण ?

यामिनी : झोप कसली पूर्ण होतेय ? तू गेल्यावर थोडे झोपलो नंतर एक मराठी चित्रपट पाहत बसलो.

विजया : चहा केला आहे गरम करून घे !

प्रतिभा : हो ! गरम करून घेते आणि कोलंबी साफ करते.

रविवारचा खास दिवस शेवटी उजाडतो. विजया रात्रीच्या गाडीने गावी जायची तयारी करत असते. विजया गावी जाणार म्हणून प्रतिभा कामावर येणार असते. यामिनी स्वयंपाकघरात चहा - नाश्त्याची तयारी करत असते. विजय सोफ्यावर बसून पेपर वाचत असते. थोड्या वेळाने यामिनी विजयसाठी चहा आणि कांदे - पोहे घेऊन येते.

यमिनी : विजय तुला लक्षात आहे ना ?

विजय : काय ?

यमिनी : काय काय ? आपल्याला आपल्या लग्नाबद्दल प्रतिभा आणि विजयला सांगायचे आहे ना ?

विजय : हो ! दुपारी गप्पा मारता- मारता सांगू !

यामिनी : काहीही झालं तरी आज सांगायचच

विजय : हो ! नक्की सांगू

यामिनी : मी विजयाला चहा नाश्ता देऊन येते रूममध्ये !

विजय : जा !

यामिनी चहा नाश्ता घेऊन विजयाच्या रुममध्ये जाते इयत्क्यात दरावरची बेल वाजते. विजय दार उघडून प्रतिभाला आत घेतो. प्रतिभाच्या हातात एक डबा असतो त्यात काय आहे हे विजय अचूक हेरतो कि त्यात तळलेले मासे आहेत.

विजया : प्रतिभा तू आलीस ?

प्रतिभा : तू गावाला जाणार आणि मी येणार नाही. मी तुला गाडीत बसवूनच गावाला जाणार आहे.

विजया : मैत्रिण असावी तर तुझ्यासारखी.

प्रतिभा : तुझ्यासरखी मैत्रिणही भाग्यानेच मिळते.

यामिनी : तू बस मी तुझ्यासाठी चहा नाश्ता घेऊन येते.

प्रतिभा : नको ! माझा मी घेईन नंतर, मी आपल्यासाठी पापलेट तळून आणले आहेत. सोबत अंड्यांचा सामंभार करूया !

यामिनी : तुला काय गोंधळ घालायचा तो घाल, मी जरा कमळकडे जाऊन येते.

विजया आणि प्रतिभाच्या गप्पा रंगल्या...विजयाची आवरा- आवर झाल्यावर त्या दोघी स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेल्या. स्वयंपाक तयार झाल्यावर ते चौघे जेवायला बसले.जेवून झाल्यावर प्रतिभा आणि विजयाने भांड्यांची आवराआवर केल्यावर ते चौघे हॉलमध्ये ऐसपैस बसले.

यामिनी : विजया आणि प्रतिभा ! मी तुम्हाला म्हणाले होते की आमच्या आयुष्यातील एक गुपित तुम्हाला सांगायचे आहे. ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जे गुपित आपल्या जवळ असणाऱ्या अशा फक्त अजय भावोजींना माहीत आहे.

यामिनी : विजय तू सांगतोस की मी सांगू ?

विजय : मी सांगतो ! यामिनी आणि मी कोर्टात लग्न केले हे सर्वांनाच माहीत आहे. यामिनी आई होऊ शकत नाही हे ही तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला हे माहीत नाही...यामिनीचे माझ्याशी लग्न होण्यापुर्वी एक लग्न झालेले होते. यामिनी विधवा होती. मी एका विधवेशी पुनर्विवाह केला होता.

विजया : म्हणजे ! यामिनी आई होऊ शकत नाही हे तुला तिच्याशी विवाह करण्यापुर्वी माहीत होते.

विजय : हो !

विजया : तरी ही ! तू तिच्याशी विवाह केलास ?

विजय : हो !

प्रतिभा : तुमचे यामिनी ताईंवर प्रेम होते म्हणून त्यांच्याशी विवाह केला ना ?

विजय : नव्हते.

प्रतिभा : मग त्यांच्याशी विवाह का केला ?

विजय : यामिनी आणि मी शालेत एकाच वर्गात होतो. मी शाळेत असताना यामिनी आवडायची मला ! पण शाळा संपल्यावर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. ती पदवीधर झाल्यावर जॉबसाठी बेंगलोरला गेली. तिथे कामाच्या ठिकाणी एका तरुणाच्या ती प्रेमात पडली. त्या तरूणासोबत तिचा प्रेमविवाह झाला. त्यानंतर दोन - एक वर्षांनी यामिनीला कळले की ती आई होऊ शकत नाही. तिच्या नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम असल्यामुळे त्याने हे वास्तव सहज स्विकाराले. दुर्दैवाने एका रस्ता अपघातात त्याचे निधन झाले. त्यानंतर यामिनी मुंबईला आली. योगायोगाने आमची भेट झाली. आमच्यात मैत्री तर होतिच. आम्ही बऱ्याच गोष्टी एकमेकांकडे शेअर केल्या. यामिनीला नावाला का होईना एका पुरुषाचा आधार हवा होता. मला लग्नच करायचे नव्हते. पण यामिनी मोठ्या हुद्द्यावर नोकरीला असल्यामुळे मला माझ्या सहित्यिक प्रवासात तिचा आर्थिक हातभार मिळणार होता. त्यामुळे आम्ही एकमेकांशी लग्न करुन एकमेकांना सामाजिक ओलख देण्याचा निर्णय घेतला.

आमचे लग्न झाल्यानंतर आम्ही जगाच्या नजरेत नवराबयको असलो तरी आमच्यात नवरा - बयकोसारखे शारिरिक संबंध कधीच आले नाहीत. ते यावेत असे मला कधी वाटलेच नाही. पण हल्ली यमिनीचा तोल सुटू लागला आहे. त्यात मला काही गैर वाटत नाही. सहवासाने माणूस प्रेमात पडतो. आज माझेही तिच्यावर प्रेम आहे पण मला ते क्रुतीतून व्यक्त करता येत नाही.

यामिनी : त्यावेळी मला फक्त एक मानसिक आधार हवा होता म्हणून मी तडजोड केली. पण आता भावनांना आवर घालणे दिवसेनदिवस अवघड होत आहे.

विजया : विजय या करणामुळेच तू यामिनीला कधी आपल्या घरी घेऊन आला नाहीस ?

विजय : हे सत्य मला तुम्हा सगळ्यांना सांगायचे होते पण माझी हिंमतच झाली नाही.

प्रतिभा : साहेब ! तुम्ही जे काही केले ते करण्याची कल्पना सामान्य माणुस स्वप्नातही करू शकत नाही. एक तर विद विदवेशी लग्न ! ते ही ती आई होणार नाही हे माहीत असताना.

विजया : हे तू अगोदर सांगितले असतेस तरी फार काही फरक पडला नसता. तू लग्न कतोयस यातच सर्व खूश होते. यामिनीला मुलं होऊ शकत नाही हा आपण प्रारब्धाचा भाग आमजूया ! पण तू यमिनीला तिचा बायको असण्याचा अधिकार दिला नाहीस याचे मला खूप वाईट वाटते आहे.

प्रतिभा : मलाही तसेच वाटते ! तुम्ही आता यामिनी ताईंना त्यांचा बायको असल्याचा अधिकार आता द्यायला हवा !

विजय : मी प्रयत्न करेन.

विजया : यामिनी तू काळजी करू नकोस. मी आपल्या घरतील सर्वाना तुमचे सत्य सांगणार.

या सगळ्यात यामिनीचे डोळे पाणावले ते पुसत...

प्रतिभा : यामिनी ताई कशाला रडतायं ? तुम्ही नशिबवान आहात तुम्हाला दुसऱ्यांदा आयुष्य सावरण्याची संधी मिळाली. त्यातही साहेबांसारखा विचारी प्रेमळ आणि शाळेत असताना का होईना तुमच्यावर प्रेम करणारा जोडिदार मिळाला. नाहीतर आजही विधवा स्त्रियांच्या वाट्याला येणारे त्रास काही कमी झालेले नाहीत.

यामिनी : म्हणूनच मी तुला सांगत होते मी विजयवर बयको असल्याचा अधिकार नाही गजवू शकत. विजय : इतर सर्व बाबातीत तुझा बयको असण्याचा अधिकार मी कधिच नकारला नाही आणि या पुढेही नाकारणार नाही. तुला माहीत आहे माझ्या काळजावर एक असा घाव आहे जो कधीच भरून निघणार नाही.

यामिनी : तो घाव मी माझ्या प्रेमाणे भरून काढण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न करणार आहे.

प्रतिभा : मी आपल्यासाठी चहा घेऊन येते.

विजया : हो ! त्याची गरजच आहे आता.

विजया : वहिनी ! तू हे सर्व मला अगोदर का नाही सांगितलेस ?

यमिनी: मझी हिंमत नाही झाली कारण मी आई होऊ शकत नाही हे मला माहीत असतानाही मी विजयशी लग्न करणे हा माझा स्वार्थीपणा होता.

विजया : विजयला लग्नच करायचे नव्हते. तू स्वार्थी विचार केलास असे मला अजिबात वाटत नाही ! तू विजयच्या अर्थहीन आयुष्याला नवीन अर्थ दिलेला आहे. तुझ्यमुळेच तो त्याची स्वप्ने पुर्ण करू शकला. त्याला त्याच्या आयुष्यात इतका मानसन्मान मिळाला. तू त्याच्या आयुष्यात एखादया परीसारखी आली होतिस.

विजय : यामिनी हे सत्य आहे तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर मी यशाच्या वाटेवर चाचपडत राहिलो असतो. तू माझ्या आयुष्यात येऊन माझ्या यशाचा मार्ग सुखकर केलास.

इत्क्यात प्रतिभा चहा घेऊन आल्यावर

प्रतिभा : पण तुमच्या परीला कधिही अंतर देऊ नका ?

विजय : नाही देणार !

विजया : वहिणी तुझी आणि विजयची गाठ त्या परमेश्वरानेच बांधली होती असे समज

यामिनी : हो !

विजया : म्हणूच तुझ्या घरचे कधीच आम्हाला भेटले नाही.

यामिनी : हो ! तसेही ते बैंगलोरला असतात.

विजया : घेऊन ये एकदा आपल्या गावी ! पण त्या अगोदर तू ये !

यामिनी : माझ्या घरचे विजला देवमाणूस म्हणतात.

विजय : मी काही देव माणूस वगैरे नाही. मी ही एक सामान्य माणूसच आहे.

यामिनी : मझ्यसाठी तू देवच आहेस.

विजया : माझ्यासाठी तुम्ही दोघे लक्ष्मी - नारायण आहात.

प्रतिभा : हे तू बरोबर बोललीस.

विजया : मी आता आपल्या सगळ्यांसाठी उपमा करते.

प्रतिभा : मी ही येते तुझ्या मदतीला.

त्या दोघी स्वयंपाकघरात गेल्यावर

विजय : आज मला माझ्या डोक्यावरचा भार हलका झाल्यासारखे वाटत आहे.

यामिनी : मलाही मोकळे मोकळे झाल्यासारखे वाटत आहे. उपमा खाऊन झाल्यावर प्रतिभा रात्रीच्या जेवनाची तयारी करते. रात्री जेवून झाल्यावर सर्वजण विजयाला गाडीवर सोडायला जातात. तेथून माघारी आल्यावर विजय त्याच्या रूममध्ये आणि यामिनी तिच्या रूममध्ये जाऊन झोपतात...

दुसऱ्या दिवशी काल झोपायला उशिर झाल्यामुळे आणि फार थकवा आल्यामुळे यामिनी ऑफीसला गेली नाही. पण विजय मात्र त्याच्या नव्याने सुरु करणाऱ्या व्यवसायाशी संबंधित काही तरी काम असल्यामुळे तो बाहेर गेला होता. यामिनी फ्रेश होऊन सोफ्यावर चहा पित बसली होती इतक्यात दारावरची बेल वाजली. यामिनीने दरवाजा उघडुन प्रतिभाला आत घेतले.

प्रतिभा : ताई ! तुम्ही गेला नाहीत आज ऑफीसला ?

यामिनी : नाही ! थोडा थकवा आला होता.

प्रतिभा : मला ही आला होता पण इतकाही आला नव्हता...साहेब...?

यामिनी : ते गेले त्यांच्या कामाला, त्याला कोठे जायचे असले की त्याला झोपच येत नाही.

प्रतिभा : चहा ! घेतला ना तुम्ही ?

यामिनी : मी चहा घेतला आहे, तू ही घे आणि काहीतरी गरमागरम कर आपल्या खाण्यासाठी.

प्रतिभा : काय करू...ढोसा आणि खोबऱ्याची चटनी करू ?

यामिनी : हो ! चालेल लगेच कर !

प्रतिभा स्वयंपाकघरात जाऊन ढोसे तयार करते, त्यानंतर त्या दोघी हॉल मध्ये बसून ढोसे खात असतात. इतक्यात कमळ आत येते.

कमळ : एकटे एकटे ढोसे खाताय ? तुम्हाला माझी आठवण आली नाही ?

यामिनी : भिऊ नकोस ! तुझ्यासाठी ठेवलेले आहेत.

प्रतिभा : मी लगेच घेऊन येते.

प्रतिभाने ढोसे आणल्यावर कमळ ते पटापट खाते आणि ..

कमळ : यामिनी ! तू घरीच आहेस ना ? मी लगेच माझ्या घरातील कामे आटपून येते तुझ्याशी गप्पा मारायला.

यामिनी : हो ! ये बाई !..

कमळ निघून गेल्यावर

प्रतिभा : यामिनी ताई ! तुमच्या पहिल्या लग्नाबद्दल कमळ ताईंना माहीत आहे का ?

यामिनी : नाही ! आमची आणि तिची ओळ्ख आम्ही या घरात राहायला आल्यावर झाली.

प्रतिभा : तुमच पहिलं लग्न म्हणजे प्रेमविवाह होता...म्हणजे तुमच्या पहिल्या नवऱ्यावर खूप प्रेम असेल नाही ?

यामिनी : हो ! माझ्या पहिल्या नवऱ्यावर माझे खूप प्रेम होते, त्याचेही माझ्यावर खूप प्रेम होते म्हणुनच मी आई होऊ शकत नाही हे कळल्यावरही त्याचे माझ्यावरील प्रेम यकिंचितही कमी झाले नाही. त्यावर तो म्हणायचा," आपण एकमेंकांसाठी आहोत इतके पुरेसे आहे आपल्याला पुढचे आयुष्य काढायला !, मला स्वप्नातही वाटले नव्हते तो एक दिवस असा अचानक मला एकटीला सोडून जाईल...तो गेला आणि मी मुंबाईला माघारी आले. योगायोगाने मला विजय भेटला, आमच्यात संवाद वाढला. तसाही मी दुसऱ्या लग्नाचा विचार केलाच नसता. दुसरा कोणी पुरुष माझ्याशी लग्न करायला तयार झाला असता का ? याबद्दल मला शंकाच आहे.

प्रतिभा : विजय साहेबांना ! तुम्ही आई होऊ शकत नाही हे सांगितले होते तरी ही ते तुमच्याशी लग्न करायला का तयार झाले ? याचे कारण तुम्ही त्यांना नाही का विचारले ?

यामिनी : त्याचे कारण मला माहीत होते.

प्रतिभा : काय कारण होते ?

यामिनी : तो मला भेटला तेंव्हा त्याचा प्रेमभंग झाला होता. एका तरुणीवर त्याचे जिवापाड प्रेम होते. सतत सहा वर्षे तो तिच्यावर प्रेम करत होता. पण त्याचे प्रेम तिला कधी कळलेच नाही. कदाचित ते तिला कळुनच घ्यायचे नव्हते. तिला एक श्रीमंत आर्थिक द्रुष्ट्या सक्षम असणारा जोडीदार हवा होता. विजयला वाटत होते की निदान ती त्याच्यातील कलागुणांच्या तरी ती प्रेमात पडुन ती त्याच्याशी लग्न करायला तयार होईल. पण तसे कहीच झाले नाही. तिने एका श्रीमंत मुलाशी विवाह केला. त्याक्षणी विजयला त्याच्या आयुष्यात तो सहित्यिक झाल्याचा त्याला पश्चाताप झाला. तिच्यामुळे त्याचा प्रेमावरचा विश्वास उडाला. तिच्यासोबतच्या सहवासाची त्याने मनोमनी गुलाबी स्वप्ने रंगवलेली होती. त्याची ती स्वप्ने धुळीला मिळाली. त्यामुळेच दुसऱ्या कोणत्याही स्त्रिशी शारिरिक जवळिक साधने त्याला शक्य होत नाही. आता मागचे दहा दिवस मी त्याच्या सोबत एकाच बेडवर झोपत होते. तरी त्याने त्याला काहीच फरक पडत नव्हता. इतका तो पुरुषांना स्त्रियांबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल उदासिन झालेला आहे. मी स्वतः हून त्याच्यासोबत शारिरिक जवळीक साधने हा कदाचित मी त्याच्यावतर केलेला बलात्कार ठरेल.

प्रतिभा: पण ती तरुणी होती कोण ?

यामिनी : त्याबद्दल विजयने कधीच कोणाला काहीही सांगितले नाही. जे काही थोडे थोडके सांगितले ते फक्त मला. ती तरुणी कोण होती हे माझ्यासाठीही एक रहस्यच आहे.

प्रतिभा : तिचे साहेबांवर प्रेमच नव्हते तर तिचा इतका विचार करायची गरजच काय होती ? इकडे त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे झुरता आहेत त्याचे त्यांना काहिही पडलेले नाही.

यामिनी : म्हणून मला विजयच्या बाबतीत कामिनी, निलिमा अथवा आणखी कोणतीही स्त्री असली तरी भिती नाही वाटत.

प्रतिभा : पुरुष लबाड असतो. त्याचा काहीही नेम देता येत नाही. कारण तो जसा टोकाचं प्रेम करू शकतो तसाच टोकाचा द्वेशही करू शकतो. साहेबांचे त्यावेळी तिच्यावर प्रेम असेलही., कदाचित आता ही असेल. पण उद्याही असेल याची खात्री देता येणार् नाही.

यामिनी : विजय माझ्या आयुष्यात नसता आला तर असेही मला एकाकी आणि आर्थहिन आयुष्य जगावे लगले असते. विजय माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळा अर्थ मिळाला आहे. आता विजय माझ्या आयुष्याचा इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

प्रतिभा : तुम्ही एखादे मुल दत्तक का घेत नाही.

यामिनी : ते विजयला मान्य नाही.

प्रतिभा : पण का ?

यामिनी : त्या बाबतीत त्याची त्याची कारणे आहेत , त्याने दिलेली कारने मला पटता ही आहेत.

प्रतिभा : पण आता तुम्हाला कुटुंबात जायला काही हरकत नाही.

यामिनी :हो ! मला मुल होऊ शकत नाही हे माहीत असतानाही माझ्या सारख्या विदवेशी विजयने लग्न करणे विजयच्या घरच्यांच्या पचनी पडणे मला जरा अवघडच वाटते.

प्रतिभा : मला खात्री आहे विजया सर्वांची समजुत काढेल. तसेही आता पुलाखालुन बरेच पाणी वाहून गेले आहे.

यामिनी : तसे झाले तर माझ्या इतका आनंद मलाच होईल.

प्रतिभा : नक्की होईल. बरं आता दुपारच्या जेवनात काय करु ? साहेब येणार आहेत का जेवायला ?

यामिनी : नाही ! तो येनार नाही. तू एक काम कर आता फक्त खिचडी कर आणि तू जा...घरी जाऊन आराम कर संध्याकाळी तू आल्यावर ठरवू रात्रीसाठी काय करायचे ते.

प्रतिभा : हो ! मी लगेच तयार करते.

प्रतिभा खिचडी तयार करून निघून जाते.

यामिनी एकटी सोफ्यावर बसून विचार करत असते इतक्यात कमळ आत येते.

कमळ : यामिनी ! तू काय पण म्हण ! पण ती कामिनी जरा भावोजींना जास्तच चिपकत असते.

यामिनी : चिपकू दे ! सरड्याची उडी कुंपनापर्यंत.

कमळ : यामिनी तू तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत खुपच बेफीकर आहेस.

यामिनी : अगदीच तसे नाही पण मला नाही आवडत ते नवऱ्याला मुठीत वगैरे ठेवणे

कमळ : तुला बाई बरं जमतं ! माझा नवरा नुसता दुसऱ्या बाईशी प्रेमाने बोलला तरी माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते.

यामिनी : कमलेश भावोजींच ठिक आहे पण माझा नवरा आहेच अश्या क्षेत्रात की तेथे सतत बायका त्याच्या संपर्कात येत असतात. मला कामिनीची नाही पण निलिमाची भिती वाटते करण तिच्यात बरेच चांगले गुण आहेत जे विजयला आवडू शकतात.विजयच्या कोणी प्रेमात पडले तर मला त्याच्यात फार काही आश्चर्य वाटणार नाही. जेथे मध असेल तेथे माश्या घोंगावणारच !

कमळ : हो ! ती निलिमा ! इतकी सुंदर आणि श्रीमंत तरी किती साधी भोळी आहे. तिच्या चेहऱ्यावर कधीच कसलाच अहंकार दिसत नाही...प्रतिभा आणि तिच्यात छान मैत्री झालेली आहे. तिच्या गाडीने ती प्रतिभाला तिच्या घरापर्यत सोडायला गेली.

यामिनी : तेच तर ! तिचा स्वभावच असा आहे की कोणीही पुरुष तिच्या प्रेमात पडू शकतो.

कमळ : यामिनी ! तू जेवलीस का ?

यामिनी : नाही ! प्रतिभा छान खिचडी तयार करुन गेलेली आहे. तू खाणार आहेस का ?

कमळ : तू आग्रह करतेस तर मी खाईन...

यामिनी आणि प्रतिभाने एकत्र खिचडी खाल्ल्यावर कमळ तिच्या घरी निघून गेली. यामिनी मात्र दार बंद करून तिच्या रुममध्ये जाऊन झोपली.

संध्याकाळी प्रतिभाने दारावरची बेल वाजविल्यावर तिला जाग आली. यामिनीने दार उघडून प्रतिभाला आत घेतले.

प्रतिभा : ताई ! झोपला होतात वाटतं .

यमिनी : हो ! खूप गाढ झोप लागली होती. हे काय आहे हातात ?

प्रतिभा : ओले बोंबिल आणले आहेत साफ वगैरे करुन जाता जाता तळून जाईन म्हणजे तुम्हाला गरम गरम खाता येतील.

यामिनी : मस्तच !

प्रतिभा : मी चहा टाकते..

यामिनी : तोपर्यत मी फ्रेश होते.

यामिनी फ्रेश होईपर्यंत प्रतिभा चहा तयार करते. त्या दोघी बाहेर हॉलमध्ये चहा पित असतात.

यामिनी : प्रतिभा : तू दुपारी झोपतेस का ?

प्रतिभा : नाही ! मला दुपारी झोपायला तसा वेळच मिळत नाही. पण तरी ही कधी झोपले तर उठायला प्रचंड कंटाळा येतो...सहेब...

यमिनी : तो रात्री उशिरा येणार आहे बाहेरून जेवून. तू आता फार काही करू नकोस ! दुपारची खिचडी आहे. तू दोन- चार पोळ्या कर आणि बोंबिल फ्राय कर...बस्स ! त्या झाल्या की तू जा घरी...नको ! आज मिच तुझ्या घरी तुला सोडायला येते स्कुटीने !

प्रतिभा : कशाला ? माझी मी जाईन...

यामिनी : ते काही नाही ! मिच येणार मलाही एक फेरफटका मारायचाच आहे. मला तुझे घरही पाहता येईल त्या निमित्ताने.

प्रतिभा : माझ्या घरात काय आहे पाहण्यासारखे ?

यामिनी : घर सुंदर विटा रेतीने होत नाही. त्या घरात राहणाऱ्या माणंसानमुळे होत असतं. तू पटापट जेवन आटप आपण जाऊया !

प्रतिभा : चालेल !

प्रतिभाचे जेवन तयार करून झाल्यावर यामिनी प्रतिभासह घराच्या बाहेर पडते आणि दोन - तीन तासांनी परत येते. ती घरी येताच कमळ तिला भेटायला येते.

कमळ : मी पहिले तुला खिडकितून गाडीवरून येताना म्हणून आले. कोठे गेली होतिस स्कुटीवरून आता ?

यामिनी : मी स्कुटीवरुन प्रतिभाला सोडायला, तिच्या घरी गेले होते. त्या निमित्ताने तिचे घरही पाहिले.

कमळ : कसे आहे तिचे घर ?

यामिनी : घर सुंदर आहे पण जरा छोटे आहे. डबल केले तर आणखी छान होईल ! मी मागे विजयला म्हणाले होते,"विजय आपण प्रतिभाला घर डबल करायला आर्थिक मदत करू या ! त्यावर तो म्हणाला," नको ! ती करायला घेईल तेव्हा आपण मदत करू.

कमळ : भावोजी ! बरोबर बोलले, तुम्ही तिच्यावर उपकार करत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण व्हायला नको !

यामिनी : पण ! मी तिला मझी बहीण मानते. त्या नात्याने मी तिला मदत करूच शकते.

कमळ : नक्कीच करू शकतेस पण मला वाटते तू थोडी वाट पाहावी.

यमिनी : बरं ! तू थांब मी तुझ्यासाठी फ्राय केलेले बोंबिल घेऊन येते.

कमळ : लवकर घेऊन ये ! प्रतिभा आल्या पासून आपल्या जीभेची चव जरा सुधारली आहे.

यामिनी बोंबिल घेऊन आल्यावर कमळ यामिनीचा निरोप घेते. कमळ निघून गेल्यावर यामिनी जेवून घेते आणि तिच्या रुममध्ये जाऊन झोपी जाते. विजय रात्री उशिरा घरी येतो आणि हॉलमधील बेडवरच झोपी जातो....

एक दिवस सकाळी म्हणजे अकराच्या सुमारास प्रतिभा स्वयंपाकघरात काम करत असते विजय त्याच्या लॅपटॉपवरा नवीन लेख टाईप करत असतो इतक्यात दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उघडून निलिमाला आत घेतो.

विजय : निलिमा तू ! आज येथे अचानक ?

निलिमा : सर ! आज मी तुम्हाला नाही. प्रतिभाला भेटायला आले आहे.

विजय : प्रतिभाला कशाला ?

निलिमा : सर ! तुम्ही विसरलात का ? मी मागे म्हणाले होते आमच्या एका मासिकासाठी कव्हरपेजसाठी मला प्रतिभाचा फोटो हवाय !

विजय : म्हणजे तू सिरिअस होतिस त्या बाबतित ?

निलिमा : म्हणजे काय ? मी कधीच कोणाची मस्करी करत नाही म्हणजे तसा माझा स्वभावच नाही.

विजय : मला माहीत आहे, मी तुझी मस्करी करत होतो. तू उभी का ? बस ना !

निलिमा : प्रतिभा आहे ना आत ?

विजय : हो ! प्रतिभा बाहेर ये ! निलिमा आलेय तुला भेटायला.

प्रतिभा बाहेर येतानाच निलिमा आणि विजयसाठी चहा घेऊन येते.

प्रतिभा : निलिमा मॅडम ! तुम्ही कशा आहात ?

निलिमा : मी मजेत आहे आणि आज मी सरांना नाही तर तुला भेटायला आले आहे.

प्रतिभा : मला कशाला ?

निलिमा : मी तुला मागे म्हणाले होते ना ! मी आमच्या मासिकाच्या कव्हरपेजसाठी तुझा विचार करते आहे म्हणून !

प्रतिभा : हो ! पण ते कधीच माझ्या डोक्यातून निघून गेल होतं.

निलिमा : तुझं आटपल का इथलं काम ?

प्रतिभा : हो ! म्हणजे होतच आलं आहे.

निलिमा : मग आटप पटापट तुला माझ्या सोबत यायचे आहे. फोटो शुट करायला ! अचानक सर्व जमून आलं म्हणून मी इतक्या तातडीने आले तुला घ्यायला.

विजय : प्रतिभा तू जा रहिलेली कामे संध्याकाळी कर...

प्रतिभा : चालेल...

निलिमा : मंडळ आपले आभारी आहे...

निलिमा विजयचा निरोप घेऊन प्रतिभाला आपल्या सोबत घेऊन जाते.

संध्याकाळी प्रतिभा पुन्हा कामावर आल्यावर

विजय : अभिनंदन ...प्रतिभा ! तू ही आता सिलेब्रेटी होणार !

प्रतिभा : साहेब ! तुम्ही काहीही बोलता.

विजय : माझे शब्द लक्षात ठेव ! निलिमाने पाटवले मला तुझे फोटो ! मेक -अप मध्ये तू तर त्या कामिनीपेक्षाही फटाका दिसत होतिस म्हणजे ! खूपच सुंदर दिसत होतिस.

प्रतिभा : त्यात माझी कसलीही कमाल नाही. सर्व कमाल तर निलिमा मॅडमची आहे.

विजय : हो ! निलिमा एक परीस आहे ज्याला स्पर्ष करते त्याच्या आयुअष्याचे सोने करते. तुझ्याही आयुष्याचे तिने सोने केले आहे.

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा करते.

विजय : सोबत गोडाचा शिरा कर आपण तुझ यश सजरं करुया !

प्रतिभा : लगेच करते.

ते दोघे बाहेर हॉलमध्ये शिरा खात असतात. इतक्यात दारावरची बेल वजते.

प्रतिभा दार उघडून कमळला आत घेते.

कमळ : आज सकाळी मी तुला निलिमा सोबत तिच्या गाडीतून जताना पाहिले. लवकर गेलीस म्हणून विचारायला आले. आता तुला येताना पाहिले म्हणून

विजय : बसा वहीणी ! प्र तिभा वहिणींसाठी गोडाचा शिरा आणि चहा घेऊन ये अगोदर !

प्रतिभा कमळसाठी चहा आणि शिरा घेऊन आल्यावर...कमळ शिरा खात असताना...

विजय : कमळ वहिणी आज निलिमा मला भेटायला नाही तर प्रतिभाला घेऊन जायला आली होती. फोटो शुटला !

कमळ : फोटो शुटला ?

विजय : हो ! निलिमा तिच्या एका मासिकाच्या कव्हरपेजवर प्रतिभाचा फोटो झळकवणार आहे.

कमळ : खरंच ! अभिनंदन प्रतिभा ...

विजय : हा शिरा त्यासाठीच केला होता.

कमळ : माझा शिरा खाऊन झाला मी आता निघते.मला कविताला आणायचे आहे.

कमळ निघून गेल्यावर लगेच यामिनी आत येते. ती आत येऊन फ्रेश होताच प्रतिभा तिला गोडाचा शिरा आणि चहा आणुन देते.

यामिनी : आज गोडाचा शिरा काही विशेष ?

विजय : विशेष आहे ! आज निलिमाने तिच्या मासिकाच्या कव्हरपेजसाठी प्रतिभाचा फोटो शूट केला. थांब मी तुला फोटो पाठवतो तुझ्या मोबाईलवर

ते फोटो पाहून यामिनी खूप खूश होते आणि प्रतिभाला प्रेमाने अलिंगण देते.

यामिनी : आता तू रात्रीचे जेवन करूच नकोस अपण हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करूया !

विजय : हो ! चालेल !!

प्रतिभा : नको !

यामिनी : नको बिको काही नाही ! तू तयार हो ! मी नविन साडी देते तुला तुझ्यासाठीच आणलेली आणि नविन जोडवी आणली आहेत तुझ्यासाठी ती ही देते.

थोडा वेळ गप्पा-टप्पा झाल्यावर ते तिघे घराच्या बाहेर पडतात. रात्री उशिरा प्रतिभाला तिच्या घरी सोडून माघारी येताच

यामिनी : खूप दिवसांनी आपण हॉटेलमध्ये जेवलो नाही असे एकत्र ?

विजय : हो ! प्रतिभालाही किती आनंद झाला होता.

पण यामिनी मला तुझा हा दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होण्याचा स्वभाव खूपच आवडतो.

यामिनी : खरंच ! पण प्रतिभा मझ्यासाठी दुसरी कोणी नाही. ती माझी बहिण आहे.

विजय: ती माझ्या जिवलग मित्राची बहिण आहे हे विसरतेस तू कधी कधी...

यमिनी : नाही मी कधीच विसरत नाही. चला आता झोपुया का ?

विजय : तू झोप मी आज बाहेरच झोपतो. मला टी.व्ही.वर एक चित्रपट पाहायचा आहे.

यामिनी : तू आणि तुझी टी.व्ही. तुझे आणि माझे तसे चारचौघांसारखे नाते असते तर मी टी.व्ही.ला माझी सवतच म्हटले असते.

विजय : ती आहेच तुझी सवत कारण माझे तुझ्यापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम आहे.

यामिनी : मला तुझे माझ्यावर प्रेम आहे हे ऐकुनच बरे वाटले. शुभरात्री...

विजय : शुभरात्री...

      त्या नंतर काही दिवसांनी शेवटी तो रविवार उजाडतो ज्या रविवारी विजयच्या पुस्तकाचे आणि प्रतिभाचा फोटो ज्या मसिकाच्या कव्हरपेजवर झळकला आहे त्या मसिकाचे प्रकाशन होणार असते. प्रतिभा तिच्या मुलांसोबत तयार होऊन दुपारी विजयकडे आलेली असते. विजयही सुटबुट घालुन तयार.होतो. यामिनीही छान भरजरी शालू घालून तयार झलेली असते ते सर्व कमळच्या नवऱ्याच्या म्हणजे कमलेशच्या गाडीने कार्यक्रमाला जाणार असतात.

विजय : यमिनी झाली का तयारी ?

यामिनी : हो ! झाली.

विजय : प्रतिभा तुझा नवरा ?

प्रतिभा : ते परस्पर बाईकने येणार आहेत. जाताना मी त्यांच्या सोबतच जाईन.

विजय : हो ! चालेल !

यामिनी : मी कमळ तयार झाली का ते पाहून येते. प्रतिभा तोपर्यत मुलांना खायला खाऊ दे !

प्रतिभा : हो !

यामिनी कमळची तयारी पहायला गेल्यावर दार उघडाच असल्यामुळे कामिनी आत येते.

विजय : कामिनी तू इकडे आलीस ?

कमिनी : हो ! आपण पुढे निघुया ! आपल्याला न्यूज चॅनेलला काही बाईट द्यायचे आहेत. बाकीचे मगून आले तरी चालतील.

विजय : प्रतिभा ! आम्ही निघतो यामिनीला सांग ! तुम्ही या आरामात कमलेशच्या गाडीने.

ते दोघे निघून गेल्यावर यामिनी येते.

यामिनी : विजय कोठे आहे ?

प्रतिभा : ते गेले कामिनी मॅडमसोबत ! त्यांना पत्रकारांना भेटायचे होते.

यामिनी : ठीक आहे...आपण पण निघूया थोड्याच वेळात.

यामिनी प्रतिभाच्या मुलांशी खेळत असते इतक्यात कमळ आल्यावर त्या सर्व मुलांना घेऊन निघतात.

रात्री उशिरा ते सर्व हातात बरेच पुष्प गुच्छ आणि हातात काही पुस्तकाच्या आणि मासिकाच्या प्रती घेऊन घरी परतलेले असतात.

ते कमळला शुभरात्री म्हणून घरात पाऊल टाकताच दोघेही सोफ्यावर अक्षरश: अंग टाकतात.

यामिनी : आज खूप थकायला झाले आहे. मी काय उद्या ऑफीसला जाणार नाही.

विजय : नको जाऊस !

यामिनी : मी प्रतिभालाही उद्या सकाळी येऊ नकोस सांगितले आहे.

विजय : हे तू उत्तम केलेस.

यामिनी : मी फ्रेश होते आणि झोपते ! तू ही झोप !

विजय : हो !

ते दोघेही त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपतात.

दुसऱ्या दिवशी प्रतिभा संध्याकाळी कामावर आली. तेंव्हा विजय आणि यामिनी चहा पित बसलेले असतात. प्रतिभा आत येताच...

यामिनी : तू आलीस !

प्रतिभा : म्हणजे काय ? तुम्ही नको म्हणालात म्हणून नहीतर मी सकाळी पण आले असते.

यामिनी : मी चहा बनवला आहे तो गरम करुन घे आणि ब्रेडही घे मस्का लवून...

प्रतिभा : हो ! हो ! आता तुम्हाला आणखी काही खायला हवे आहे का ?

यामिनी : नको ! आज तू नेहमीच हळ्क फुलक जेवन कर...

प्रतिभा : हो ! लगेच करते.

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर यमिनीही तिच्या मागुन स्वयंपाकघरात जाते.

यमिनी : काल प्रकाशित झालेला तुझा फोटो पाहून मला खूप आनंद झाला. मला तुझी अशीच उत्तरोउत्तर प्रगती झालेले पाहायचे आहे.

प्रतिभा : ही सर्व तुमचीच क्रुपा आहे.

यामिनी : पण काहीही म्हण मेक - अप केल्यावर तू कामिनीलाही टक्कर देतेस. तुझा नवरा आणि मुले खूप खुष झाले असतील नाही ?

प्रतिभा : हो ! सर्व जाम खूष झाले.

यामिनी : आता तू ही सिलेब्रेटी झाली आहेस

प्रतिभा : कसली सिलेब्रेटी ! साहेबांचे ते वीस वर्षाचे असल्यापासून वर्तमानपत्रात त्यांचे फोटो छापून येत होते पण त्यांना सिलेब्रेटी व्हायला चाळीशी पार करावी लागली.

यामिनी : नशिब ! कोणी मानो न मानो मी मानते. तुझे नशिब बदलेले ते तुझे बदलेले नशिब मला पाहायला आवडेल.

प्रतिभा : माझी आता माझ्या आयुष्याकडून फार अपेक्षा राहिलेली नाही. पण माझ्या मुलांना मला उत्तम शिक्षण द्यायचे आहे.

यामिनी : देशील ...मला खात्री आहे..आणि मी आहेच की तुझ्या सोबत..

प्रतिभा : मी गेल्या जन्मात काहीतरी पुण्य केले असेल म्हणून तुमच्यासारखी माणसे माझ्या आयुष्यात आली.

यामिनी : कोणी कोणाच्या आयुष्यात त्याच्या मर्जिने येत नसतो. हा सारा खेळ नियतिचा असतो.

प्रतिभा : निलिमा मॅडम माझ्या आयुष्यात आल्या त्या ही तुमच्याचमुळे.

यामिनी : खरंच निलिमा माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगली आहे.

प्रतिभा : साहेबांसारखेच त्यांचे पायही जमिनीवर आहेत.

यामिनी : हो ! पण कामिनीही आपल्याला जशी दिसते. जशी वाटते तशी अजिबात नाही. विजयसाठी त्याच्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी ती किती मेहनत घेते.

इत्क्यात दरावरची बेल वाजल्याचा आवाज येतो.

विजय दार उघडून कामिनीला आत घेतो.

कमिनी : अभिनंदन ! तुझे पुस्तक हीट झालेले आहे. त्यमुळे आमच्या चॅनेलसाठी मी तुझी मुलाखत घेणार आहे. मुलाखत घेताना तुझ्यासोबत निलिमा आणि यामिनीही असणार आहे. कोठे आहे यामिनी ?

विजय : यामिनी जरा बाहेर ये ! कामिनी आली आहे.

यामिनी आणि प्रतिभा बहेर येताच...

कामिनी : प्रतिभा तुझेही अभिनंदन ! तुझा चेहरा खूपच आवडला आहे लोकांना एका कुकींच्या शो मध्ये मी तुला संधी देणार आहे.

प्रतिभा : खूप खूप धन्यवाद !

यामिनी : तू उभी का ? बसना ! प्रतिभा तिच्यासाठी थंडा घेऊन ये !

प्रतिभा : हो ! लगेच ...

कामिनी : यामिनी तुझ्यासाठीही एक गुड न्युज आहे...मी विजयची मुलाखत घेणार आहे ज्यात तुला आणि निलिमाला सहभागी व्हायचे आहे.

यामिनी : ही तर खूपच आनंदाची बातमी आहे.

प्रतिभा थंडा घेऊन आल्यावर ...

कामिनी : मी निघते आता..

यामिनी : तू आता जेवूनच जा...मी तुझे काहीही ऐकणार नाही. प्रतिभा लगेच जेवन तयार करू या...

यामिनी आणि प्रतिभा पटापट जेवन तयार करतात पण जेवन तयार करून झाल्यावर प्रतिभा तिच्या घरी निघून जाते. ती निघून गेल्यावर ते तिघे जेवायला बसतात.

यामिनी : कमिनी तुला घरचं जेवण आवडत ना ? की तुझ्यासाठी काही बाहेरून मागवायला हवे होते का ?

कामिनी : हे घरचे जेवण म्हणजे मझ्यासाठी पंचपक्वान्न आहे. माझ्या घरी स्वयंपकीन जेवन करते पण तिच्या हाताला प्रतिभाच्या हाताची चव नाही. बऱ्याचदा माझे खाने होटेलात नाहीतर एखाद्या पर्टीतच होते. विजय पर्टीला जाणे टाळतो कारण त्याला बाहेरचे अन्न् अजिबात चालत नाही.

विजय : अजिबातच चालत नाही असे नाही. माझ्या आवडीचा वडापाव जरी रस्त्यावर मिळत असेल तरी मी तो आवडीने खातो. पण हे पिज्जा वगैरे मला नाही पचत.

कामिनी : म्हणूनच विजय ज्या दिवशी माझ्या घरी काही कामा निमित्त येणार असेल त्या दिवशी मी माझ्या मोलकरणीला कधीच सुट्टी देत नाही.

यामिनी : तुला कधी घरच काही खावसं वाटलं तर तू हक्काने इकडे येत जा...


कामिनी : हो ! नक्कीच मलाही आवडल असतं पण काय करणार मला स्वत:ला असा हक्काचा वेळ देताच येत नाही. यामिनी तू खरचं खूपच प्रेमळ आहेस. तुझ्या इतकी प्रेमळ माणसे या जगात खरचं खूप विरळ झालेली आहेते. विजयासाराखा माणूस तुला नवरा म्हणून भेटला आहे यात आश्चर्य वाटण्यासारखे असे खरचं काही नाही.

यामिनी : तू जितकी माझी स्तुती करते आहेस ती करण्याइतके माझ्या हातून अजून तरी काहीच घडलेले नाही.

विजय : तू काहीच नाही केलेस असे काय म्हणतेस ? प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते माझ्या आयुष्यातील ती स्त्री तू आहेस.

यामिनी : तुझ्या यशाचे श्रेय तू मला देतो आहेस हा तुझा मोठेपणा आहे.

कामिनी : नवरा त्याच्या यशाचं श्रेय तुला देतोय तर आताच घेऊन टाक ! हे पुरुष लबाड असतात कधी टोपी फिरवतील काही सांगता येत नाही.

विजय : माझे तसे नाही, मी एकदा बोललो म्हणजे बोललो.

कामिनी : मी सर्वसामान्य पुरुषांबाद्दल बोलतेय ! तू तर असामान्य आहेस. आता तुझे हे पुस्तक प्रकाशित झाल्यामुळे तुला खूप प्रसिद्धी मिळते आहे अजूनही मिळते आहे त्यामुळे कदाचित तुझ्या यशाचे श्रेय तू निलिमालाही देऊ शकतोस.

विजय : म्हणजे काय ? या पुस्तकाच्या बाबतीत मला जे यश मिळाले आहे त्यात नक्कीच निलिमाचा सिंहाचा वाटा आहे यात शंका नाही. या पुस्तकासाठी तिने माझ्यापेक्षाही जास्त कष्ट घेतलेले आहेत.

कामिनी : तुझ्या पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी कष्ट तर मी ही घेतले आहेत.

विजय : या पुस्तकासाठीचे तुझे योगदान मी कोठे नाकारतोय !

कामिनी : मी मस्करी करत होते.

यामिनी : कामिनी तुला आणखी काही वाढू का ?

कामिनी : जेवनावरून आठवले मी प्रतिभाला जे म्हणाले ते हवेत म्हणाले नाही, मी खरंच तिला एका कुकिंगच्या शो मध्ये घेणार आहे त्यात जर ती क्लीक झाली तर तिचे भाग्य बदलेल.

यामिनी : खरंच तसे झाले तर मला खूप अनंद होईल.

विजय : मलाही कारण ती माझ्या मित्राची बहिण आहे. निलिमाने तिच्या चेहऱ्याला मासिकाच्या कव्हर पेजवर स्थान देऊन तिच्या आयुष्यात एक महत्वाची भूमिका बजावली आहे.

यामिनी : त्यात शंका नाही. नाहीतर आज कोण करत कोणासाठी ?

कामिनी : प्रत्येक गोष्टीला या जगात अपवाद असतात. जसे तुम्ही आहात.

यामिनी : ते कसे ?

कामिनी : तुम्ही नाही का ? प्रतिभाला तुमच्या घरात मानाची जागा दिली आहे.

विजय : आम्ही तिला मान दिला नाही. ती त्या मनाची मानकरी होतीच.

यामिनी : हो ! मला तर तिच्या रुपात एक बहिण मिळाली.

कामिनी : मी ही तिच्या प्रेमात पडले आहे त्यामुळे तिचे आयुष्य मी बदलणारच.

यामिनी : तसे झाले तर माझ्याकडून तुला पार्टी !

विजय : यामिनी तू आता परतीची तयारी कर करण कामिनी जितक बोलते त्यापेक्षा जास्त पुढचा विचार तिने केलेला असतो.

कामिनी : तू काही माझी स्तुती करताना थकत नाहीस, बायकोची तरी इतकी स्तुती कधी करतोस का रे ?

यामिनी : बरं झालं ! तूच बोललीस...

कामिनी : माझे जेवून झाले आहे.

यामिनी : हे काय ? आमचे ही झाले.

जेवण झाल्यावर ते तिघे आणखी थोडा वेळ गप्पा मारतात आणि कामिनी त्यांचा निरोप घेते. विजय तिला बाहेर तिच्या गाडीपर्यंत सोडायला जातो. तो माघारी आल्यावर

यामिनी : ही कामिनी खरंच खूप गोड आहे. तिने अजून लग्न का केलं नाही ?

विजय : लग्नाबद्दल तसं मी कधीच कोणाला काही विचारात नाही पण कामिनीला मी एकदा विचारले होते. त्यावर ती म्हणाली,’’ तिचे बालपण खूपच गरीबीत गेले होते. तिच्या वडिलांनी मुलाच्या हव्यासापोटी चार मुलींना जन्म दिला. त्या चार मुलींमध्ये कामिनी सर्वात मोठी ! त्यामुळे मुलगी असूनही सहाजिकच तिच्या घराची जबाबदारी साहजिकच कळत्या वयात तिच्यावर आली. तिच्या वडिलांच्या अचानक मृत्यूने तर तिचे आयुष्याच बदलले. तिच्या बहिणींची जबाबदारी अचानक तिच्या अंगावर येऊन पडली. त्यांच करता करता कामिनीच्या आयुष्यातील कित्येक वर्षे जळलेल्या कापुरासार्खी उडून गेली. तिच्या तीन बहिणीनी आपल्या आयुष्याचे जोडीदार स्वत:च निवडून त्या त्यांच्या संसारात रमल्या . पण त्यापैकी एकीलाही आपल्या बहिणीचा संसार फुलावा असे वाटले नाही. कामिनीलाही माझ्यासारखेच प्रसिद्धीचे व्यसन लागले आणि तिचे आयुष्य पुढे सरकत राहिले. आता ती लग्नच न करण्याच्या निर्णयापर्यत येउन पोहोचली आहे. तिला तिच्या आयुष्यात फक्त आणि फक्त तिच्यावर प्रेम करणारा कोणी तरी हवा होता. पण तसा तो तिला कधीच मिळाला नाही. जशी तू भेटण्यापूर्वी मला कोणी भेटली नाही...

यामिनी : प्रत्येकाच्या आयुष्यात एक कथा शेवटी लपलेली असतेच नाही ?

विजय : हो ! तरी तिला मी अजून आपली कथा सांगितली नाही.

यामिनी : आपली कथा आता जगाला कळायला हवीच ! ती सांगण्याचे वेळ आणि संधी दोन्ही चालून आल्या आहेत तुझ्या मुलाखतीच्या निमित्ताने त्यामुळे आपल्याबद्दल तू सर्वकाही कामिनेला सांगून टाक...

विजय : हो ! सर्वाना वेगवेगळे सांगण्यापेक्षा एकदाच कळू दे !

यामिनी : चला ! आता आपण झोपूया ! मला उद्या ऑफिसला जायचे आहे.

तव दोघे एकमेकांना शुभरात्री करून झोपी जातात.

त्या नंतर काही दिवसांनी टी.व्ही. वर विजयची मुलाखत प्रदर्शित होते. ती मुलाखत विजयच्या घरी सर्वजण एकत्र बसून पाहत असतात. सर्वजण म्हणजे कामिनी, प्रतिभा, निलिमा आणि कमळसह विजय आणि यामिनी. मुलाखत पाहण्यासाठी सर्वजण ऐसपैस बसलेले असतात. सर्वांच्या हातात एक - एक चहाचा कप असतो. चहा पिता पिता सर्वजण मुलाखतअ पाहत असतात. या मुलाखतीत काय काय विचरले गेले हे कमळला माहित नसते. त्यामुळे या मुलाखती बद्दल तिला जरा जास्तच उत्सुकता असते. ती उत्सुकता नैसर्गिक होती. प्रतिभाला तर यामिनी आणि विजयबद्दल सर्वच माहित होते त्यामुळे तिला फक्त मुलाखत कशी झाली हे पाहण्यात रस होता. थोड्याच वेळात मुलाखतीला सुरुवात झाली. सर्वजण सावरून बसले. सुरुवातीला कामिनेने प्रेक्षकांची सर्वांशी ओळख करुन दिली.

कामिनी : ह्यांना तुम्ही ओळखत असणारच हे सुप्रसिध्द लेखक विजय मराठे ! विजय मराठे यांची बरीच पुस्तके प्रकाशित झालेली आहेत ज्यात अनेक कविता संग्रहाचा, कथासंग्रहांचा समावेश आहे. फक्त साहित्य क्षेत्रातच नाही तर त्यानी त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात पत्रकारिताही केलेली आहे. अनेक नामवंत वर्तमानपत्रात त्यांचे वेगवेगळ्या विषयावरील शेकडो लेख प्रकाशित झालेले आहेत. आज त्यांचे मुलाखत घेण्याचे खास औचीत्त्य म्हणजे नुकतीच त्यांची भाडेकरू ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. त्यांची ही कादंबरी निलिमा प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे. निलिमा प्रकाशनाच्या सर्वेसर्वा कु. निलिमा जाधव ह्या ही येथे उपस्थित आहेतच. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते तशी विजय मराठे यांच्या यशाच्या मागे असणारी स्त्री म्हणजे त्यांची सुविज्ञ पत्नी सौ. यामिनी मराठे ! यांचीही आपण ओळख करून घेतलेली आहेच. आता आपण प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करुया !

कामिनी : विजय सर ! यापूर्वी तुनचे बरेच कवितासंग्रह आणि कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत पण कादंबरी हा साहित्यप्रकार तुम्ही पहिल्यांदा हाताळला आहे. यामागे काही खास कारण ?

विजय : हो ! यामागे एक खास कारण आहे . मला माझ्या साहित्यातून लोकांना विचार द्यायला आवडते. मी लिहायचे म्हणून कधीच लिहित नाही. माझी प्रत्येक कथा वाचकांना एक विचार देते. त्यामुळे उगाचएखाद्या शुल्लक गोष्टीच्या वर्णनात शेकडो शब्द वाया घालविणे मला आवडत नाही. कोणीही मनात आणले तर माझ्या प्रत्येक कथेवर एक कादंबरी आरामात लिहू शकतो.

कामिनी : तुमच्या प्रेम कविता आणि प्रेमकथा खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे फक्त कवितेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर तुम्ही प्रेमकवी म्हणून जास्त प्रसिद्ध आहात. प्रेम कविता लिहिण्यासाठी प्रेमात पडावं लागत असं म्हणतात. तुम्ही प्रेम कविता लिहिण्यासाठी कोणाच्या प्रेमात पडला होतात का ?

विजय: म्हणजे मी प्रेमात पडलो होतो. वारंवार पडलो होतो. पण प्रेमात पडल्यामुळेच मी प्रेमकविता लिहिल्या हे वास्तव नाही. मला झोपेतून उठवून जरी प्रेमकविता लिहायला सांगितली तरी ती मी लिहू शकतो. पूर्वी माझे कविता संग्रह प्रकाशित झाल्यावर बरेच वाचक मला प्रश्न विचारायचे तुमचा प्रेमभंग वगैरे झालेला आहे का ? त्यावर मला सुरुवातीला काय उत्तर द्यावे हे कळतच नसे पण नंतर नंतर मी विनोदाने उत्तर देत असे माझा प्रेमभंग होण्यासाठी अगोदर मी कोणाच्यातरी प्रेमात तर पडायला हवे ! पुढे माझ्या कथाही प्रेमावरच बेतलेल्या असत त्यात त्यावेळी माझे लग्न झालेले नसल्यामुळे कित्येकांना तर खत्रीच वाटत असे की नक्कीच माझा प्रेमभंग झालेला असावा. नाही म्हणायला माझा एक प्रेमभंग झाला पण त्याचा माझ्या साहित्यावर काडीचाही प्रभाव नव्हता.

कामिनी : म्हणजे तुमचा आणि यामिनीजिचा प्रेमविवाह झालेला नाही .

विजय: माझे मी शाळेत असताना यामिनीवर प्रेम होते पण आमचा प्रेम विवाह आहे असे म्हणता येईल की नाही याबद्दल मी साशंक आहे.

कामिनी : का ? ते आपण यामिनी मराठे यांच्याकडूनच जाणून घेऊ तत्पूर्वी आपण निलिमा प्रकाशनाच्या सर्वेसर्वा निलिमा जाधव यांना काही प्रश्न विचारू या . निलिमा जाधव मला एक सांगा ! विजय माराठे यांचे अनेक कविता आणि कथा संग्रह गाजलेले असताना तुम्ही त्यांना कादंबरी लिहिण्याचा आग्रह का केला.

निलिमा : यापूर्वी म्हणजे आमच्या या प्रकाशनाची धुरा माझे वडील सांभाळत असताना विजय सरांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. ती उत्तम गाजलेली आहेत पण मला वाटले की त्यांनी कादंबरी हा साहित्य प्रकारही त्यांनी हाताळावा कारण हल्ली कादंबरीला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत निर्माण झाले आहेत म्हणजे तुमच्या कादंबरीवर एकादी मालिका तयार केली जाऊ शकते, एकादे नाटक ही लिहिले जाऊ शकते इतकेच काय तुमच्या कादंबरीवर एकादा चित्रपटही तयार होऊ शकतो. त्यासोबत अनेक संकेत संकेत स्थळांवर ती वेगवेगळ्या स्वरुपात प्रकाशित होऊ शकते.

कामिनी : म्हणजे तुला खात्री होती का की विजय मराठे कादंबरीही लिहू शकतात ?

निलिमा : हो ! मला खात्री होती. त्यामुळेच मी जेंव्हा त्यांच्यासमोर कादंबरी लिहिण्याचा प्रस्ताव ठेवला तेंव्हा त्यांनी मला स्पष्ट नकार दिला कारण त्यांना एकच विषय फार घोळायला नाही आवडत. पण मी त्यांना कादंबरी लिहिण्याचे फायदे आणि गरज समजावून सांगितल्यावर ते तयार झाले पण त्यांनी मला मी लिहीन असे सांगितले नाहीच ते म्हणाले ,’’ मी प्रयत्न करतो. त्यांनी प्रयत्न केला आणि जन्माला आली आमची भाडेकरू ही कादंबरी !

कामिनी : विजय सर ! तुमचा हा कादंबरी लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न होता तुमच्या या पहिल्याच प्रयत्नाला इतके यश मिळेल हे तुम्हाला अपेक्षित होते का ?

विजय : कादंबरी हा काही माझ्यासाठी अनोळखी साहित्य प्रकार नव्हता. मी अनेक दीर्घ कथाही लिहिलेल्या आहेत त्यामुळे मी कादंबरी लिहू शकतो याची मला खात्री होती पण मी कधी तसा प्रयत्न केला नव्हता. पण निलिमाने मला कादंबरी लिहिण्यासाठी प्रेरित केल्यावर मी बाकी सर्व लिखाण बाजूला सारून कादंबरी लिहायला सुरुवात केली. या कादंबरीची कथा अगोदरच माझ्या डोक्यात घोळत होती पण या कादंबरीच्या रूपाने ती बाहेर आली. माझ्या आयुष्यात मी यश – अपयश याचा कधीच विचार केला नाहे. मला माझ्या वाचकांवर विश्वास आहे. त्यांनी तो विश्वास सार्थक केला इतकेच त्यामुळे माझ्या यशात माझ्यावर प्रेम करणाऱ्या लाखो वाचकांचाही तितकाच हक्क आहे.

कामिनी : तुम्ही तुमच्या या यशाच श्रेय कोणाला द्याल निलिमाला की यामिनीजिना ?

विजय : मी या कादंबरीच्या यशाच श्रेय निलिमाला देईन .. पण माझ्यातील लेखक जिवंत ठेवण्याचे श्रेय मात्र मी नक्कीच यामिनीला देईन.

कामिनी : तुमच्यातील लेखक जिवंत ठेवला म्हणजे नक्की कसा ?

विजय : सुरुवातीला मला लिखाणातून फार काही पैसे मिळत नसत त्यामुळे माझ्या घरच्यांनी नेहमीच माझ्या साहित्य सेवेला विरोध केला. त्यांचा विरोध अगदीच काही चुकीचा नव्हता कारण रिकाम्या पोठी माणसाला कीर्तनही गोडं लागत नाही. मी साहित्य क्षेत्र सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या या साहित्याच्या वेडापायी मी लग्नही केले नाही कारण माझी आर्थिक लंगडी बाजू मला स्पष्ट दिसत होती. त्यामुळेच माझ्यावर त्याकाळात माझ्यावर प्रेम करणाऱ्या कित्येकिंनी त्यांचे माझ्यावरील प्रेम कधी व्यक्त केले नाही.

कामिनी : तुमची ही बाजू आमच्या प्रेक्षकांना आज नव्याने कळते आहे. आता आपण यामिनीजीना काही प्रश्न विचारुया ? विजयसर असे का म्हणाले की आमचा प्रेम विवाह आहे आणि नाही ही ?

यामिनी : ते बरोबरच बोलले ! आम्ही शाळेत असताना विजयचे माझ्यावर प्रेम होते पण माझे नव्हते कारण त्याचे माझ्यावर प्रेम आहे हे त्याने मला कधी कळूच दिले नाही . ते जर कळले असते तर कदाचित मी ही त्याच्या प्रेमात पडले असते. पण ते नियतीला मान्य नव्हते आमच्या बाबतीत नियतीने काहीतरी वेगळाच विचार केला होता. आमच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. मी बेंगलोरला शिकायला गेले तेथेच नोकरीला लागले आणि माझ्या सोबत काम करणाऱ्या एका तरुणाच्या प्रेमात पडले. आमचा विवाहही झाला. त्यानंतर मला कळले मीकधीही आई होऊ शकत नाही. ते कमी की काय म्हणून माझ्या पतीचा एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर मुंबईला आले योगायोगाने विजय आणि माझी भेट झाली. आम्ही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण मला त्यावेळी मानसिक आधाराची गरज होती आणि विजयला त्याच्यातील साहित्यिक जिवंत ठेवण्यासाठी माझ्या आर्थिक आधाराची गरज होती.

कामिनी : कारण काहीही असो ! पण विजय मराठे यांनी एका विदवा स्त्रीशी ती आई होऊ शकत नाही हे माहीत असतानाही विवाह केला. त्यांचा विवाह ही एक सामान्य घटना खचितच नव्हती पण आज या मुलाखतीच्या निमित्ताने ती जगासमोर आली.

यामिनी : त्यामुळे विजयवर माझे एक चांगला माणूस म्हणून नाही तर देवमाणूस म्हणून प्रेम आहे.

कामिनी : विजय सर ! आज तुमच्याकडे सर्व काही आहे. त्यामुळे तुम्हाला यामिनीजिंशी विवाह केल्याचा पश्चाताप होत नाही ना ?

विजय : अजिबात नाही ! उलट यामिनी माझी पत्नी आहे त्याचा मला अभिमान आहे.

कामिनी सह सर्व प्रेक्षक टाळ्या वाजवतात.

कामिनी : विजय सरांसारखे पुरुष आज समाजात विरळ झालेले आहेत. तरीही ! मला एक प्रश्न त्यांना विचारावासा वाटतो. तो म्हणजे त्यांच्या घरच्यांनी यामिनीजिंना स्वीकारले का ?

विजय : कदाचित ! स्वीकारले असावे ! कारण आमचे या विषयावर त्यांच्याशी कधीच काही बोलणे झालेले नाही. पण माझ्या लहान बहिणीने मात्र यामिनीला प्रेमाने स्वीकारलेले आहे.

कामिनी : निलिमा ! तुमच्या या कादंबरीला प्रचंड यश मिळाले आहे त्याचा आनंद झालाच असेल पण तुझ्या वडिलांनाही याचा खूप आनंद होत असेल की त्यंची मुलगी त्यंचा वारसा उत्तम चालवीत आहे याचा.

निलिमा : हो ! नक्कीच !

कामिनी : यामिनी ! विजय सरांची ही कादंबरी प्रकाशित होण्यापूर्वी तुम्ही वाचली होती का ?

यामिनी : अजिबातच नाही ! विजय त्याचे साहित्य प्रकाशित होण्यापूर्वी कधीच कोणाला वाचायला देत नाही प्रकाशाकाशिवाय ! त्याचे साहित्य प्रकाशित होण्यापूर्वी वाचण्याचे भाग्य फक्त प्रकाशकालाच लाभते. भाडेकरू ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर मी पहिल्यांदा वाचली आणि ती खूपच गाजणार याची मला खात्री वाटली.

कामिनी : यामिनी ! आज तुम्हाला तुमच्या नावऱ्याचा अभिमान वाटत असेल नाही.

यामिनी : मलाच काय तो आहेच असा की त्याचा कोणालाही अभिमान वाटावा !

कामिनी : विजय सर ! पुढे काय ?

विजय : सध्यातरी काही नाही ! मी आता माझ्या बायकोला घेऊन पर्यटनाला जाणार आहे .

कामिनी : आपल्या बहुसंख्य प्रेक्षकांनी तर तुमची कादंबरी वाचली असेलच पण ज्यांनी अजूनही वाचली नसेल त्यांच्यासाठी थोडे !

विजय : ही कादंबरी प्रेमावर आधरलेली आहे . या कादंबरीचा शेवट गोडच आचे जसा प्रेमपाटाचा असतो. या कदंबरीतील नायक नायिकेच्या घरा समोरील घरात भाड्याने राहायला येतो. नायिका आणि त्याच्यात बरीच तू – तू, मै-मै होते ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण का ? कसे ? हे या कादंबरीतच वाचयला हवे !

निलिमा : ही कादंबरी सुरुवातीला वाचयला हलकी फुलकी वाटली तरी या कादंबरीत नंतर अनेक अनपेक्षित वळणे येताना दिसतात.

कामिनी : हो ! मी ही कादंबरी वाचलेली आहे. तुम्ही ही नक्की वाचा आणि लेखकाला त्याच्या लिखाणाबद्दल भरभरून दादही द्या. या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात प्रेक्षकांना काही प्रश्न विचारायचे असल्यास ते विचारू शकतात

प्रेक्षक : मला विजय सरांना एक प्रश्न विचारायचा आहे तो असा की तुम्ही कधी भाड्याच्या घरात राहिला आहात का ?

विजय : नाही ! मी कधी भाड्याच्या घरात राहिलो नाही . पण भाडेकरूंची व्यथा मी जवळून पहिली आहे. भाडेकरू म्हणून विंचवाचा बिर्हाड आज ही कित्येक लोक वाहत आहेत. पण त्यामुळेच या माणसाना अनेक माणसे भेटतात त्याना अनेक माणसांच्या वागण्या बोलण्याचा अभ्यास करायला मिळतो. पण तरीही भाड्याने राहणे ही एक प्रकारची शिक्षाच असते असे माझे स्पष्ट मत आहे. भाडेकरूंची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होते हे सत्य आहे ते नाकारता येणार नाही.

प्रेक्षक : माझा प्रश्न निलिमा यांना आहे तो म्हणजे, विजय सर ! तुम्हाला एक लेखक म्हणून नावडत असणारच पण माणूस म्हणून कसे वाटतात.

निलिमा : ते उत्तम लेखक आहेत हे तर जगाला माहित आहे . त्याबद्दल मी बोलणार नाहीच ! विजय सर माणूस म्हणून मला पहिल्या भेटीतच आवडले कारण त्यांचे पाय जमिनीवर आहेत. मला पाय जमिनीवर असणारी माणसे प्रचंड आवडतात. थोड्याच दिवसात आमच्यात छान मैत्री झाली. पण मला त्यांच्या आणि यामिनीच्या लग्नाबद्दल माहित नव्हते ते आज कळल्यानंतर माझ्या मनात त्यांच्या बद्दलचा आदर आणखीन वाढला.

प्रेक्षक : माझा प्रश्न यामिनीजीना आहे तो असा की आज तुम्ही विजय सरांच्या प्रेमात पडला आहात की नाही ?

यामिनी : मी त्यांच्या प्रेमात तेंव्हाच पडले जेंव्हा त्याने माझ्याशी विवाह केला. पण मी त्याचा वंश वाढवू शकत नाही याची त्याला नाही पण मला खंत आहे. मी माझ्या जीवनाच्या शेवटापर्यत त्याच्यावर प्रेम करत राहीन.

कामिनी : या सोबतच ही मुलाखत संपली असे मी जाहीर करते.

मुलाखत संपल्यावर सर्व स्तब्ध बसलेले असतात. मुलाखत पाहताना सर्वांचेच डोळे पाणावलेले असतात त्यातल्या त्यात कमळचे जरा जास्तच पाणावलेले असतात. कामिनीने रिमोटने टी.व्ही. बंद केल्यावर सर्व भानावर येतात..

प्रतिभा : मी चहा आणू का सर्वांसाठी ?

विजय : हो ! आण ! गरज आहे त्याची

कमळ : यामिनी ! तू तुझ्या आयुष्यातील इतके मोठे सत्य मलाही सांगितले नाहीस.

यामिनी : नाही ! खरंतर ते कोणाला सांगण्याची आंम्हाला कधी गरजच भासली नाही. सत्य ते कधीच लपून राहत नाही ते आज ना उद्या बाहेर येतच त्यामुळेच आम्ही या मुलाखतीच्या निमित्ताने ते सत्य जगाला सांगण्याचा निर्णय घेतला. विजयच्या सर्व नतेवाईकांना आमच्या लग्नाचे हे सत्य आता या मुलाखातीमुळेचकळले असणार ! ही मुलाखत होण्यापूर्वी हे सत्य फक्त माझ्या घरच्यांना, प्रतिभाला , कामिनीला आणि विजयाला माहीत होते. आता ते साऱ्या जगाला कळले आहे.

कमळ : यामिनी पण तू नशीबवान आहेस तुला विजय भावोजीसारखा नवरा मिळाला.

यामिनी : त्याबद्दल मला तिळमात्रशंका नाही.

निलिमा : हे सत्य मलाही पचवायला जड गेले सर्वजनी तुझ्यासारख्या भाग्यवान नसतात.

यामिनी : सर्वच पुरुष विजयसारखे नसतात ना ? विजय जगापेक्षा नेहमीच वेगळा विचार करत आला आणि करत आहे.

कामिनी : विजय पुरुष म्हणून वेगळा आहे याबद्दल काहीही शंका नाही. पण यामिनी तुला तुझ्या नवऱ्याला जपायला हवे ! अशा पुरुषावर कोणतीही स्त्री फिदा होऊ शकते.

यामिनी : हो ! त्याला आता काय करणार ? सुवर्णाचे आकर्षण सर्वांनाच असते.

कमळ : पण ते ज्याच्याकडे असते त्यालाच जास्त काळजी करावी लागते.

इतक्यात प्रतिभा सर्वांसाठी चहा आणि कांदेपोहे करून घेऊन येते

सर्वजण ते थट्टा मस्करी करत खात असताना

कामिनी : प्रतिभा ! तुला लवकरच आमच्या चानेलवरील एका कुकिंगच्या शो मध्ये तू सहभागी होणार आहेस त्याचा सराव करायला सुरुवात कर..

निलिमा : ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. प्रतिभा तुला काहीही मदत लागली तर तू मला सांग ! तुझा फोटो पाहून तू जाहिरातीत काम करशील का म्हणून मला विचारणाही केली आहे काही लोकांनी.. प्रतिभा तुला एक नवीन विश्व खुणावत आहे. हे सर्व जर प्रत्यक्षात आलं तर तो दिवस आता दूर नाही जेंव्हा तू सिलेब्रेटी असशील!

यामिनी : तसे झाले तर मला खूप म्हणजे खूप आनंद होईल.

विजय : होईल काय होणारच ?

कमळ : प्रतिभा तेंव्हा मला विसरू नकोस ?

प्रतिभा : पाय जमिनेवर कसे ठेवायचे हे मी साहेबांकडून शिकले आहे . ते होईल तेंव्हा होईल पण तुम्ही सर्व माझ्या आयुष्याचा फक्त भाग नाही तर माझे आयुष्य आहात कारण तुम्ही सर्वांनी माझ्या जगण्याला एक नवीन अर्थ दिलेला आहे. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आलेले जादूगर आहात.

कामिनी : हा विजयच्या सहवासाचा परिणाम दिसतोय प्रतिभाही साहित्यीकांसारखी बोलायला लागली आहे.

निलिमा : विजय सर आता तुझ्या आयुष्यावरही एखादी कादंबरी नक्की लिहितील आणि मीच ती प्रकाशित करणार...

विजय : यात काहीही शंका नाही.

यामिनी : सर्वांनी आता जेवूनच जा..

प्रतिभा : हो ! मी लगेच तयारी करते

कमळ : तुमच चालुद्या मी माझ्या घरी जाते कमलेश आला असेल... भाजी पाठवून दे नंतर

यामिनी : म्हणजे काय ?

निलिमा : मी ही येते तुझ्या मदतीला,

कामिनी : माझी काही तुम्हाला मदत होणार नाही ! नाहीतर मी ही आले असते.

यामिनी : तू बस ! विजयसोबत गप्पा मारत ! तुला काही लागले तर मला हाक मार...

कामिनी : चालेल !

विजय : कामिनी ! तुझ कसं होणार ? तुला स्वयंपाकाच काहीच करता येत नाही ?

कामिनी : माझ्या घरच्यांनी मला कधी मुलगी होऊउच दिली नाही. माझ शरीर फक्त स्त्रीच आहे बाकी मी पुरुषच आहे असे सतत मला वाटत राहते. आणि आता स्वयंपाक करायला शिकून कोठे जायचे आहे.

विजय : म्हणजे ! तू लग्न करणार नाही या मतावर तू ठाम आहेस.

कामिनी : मला लग्न न करता आई व्हायला आवडेल कारण निदान मी तरी माझ्या मुलाला अथवा मुलीला त्यंचे आयुष्य त्याना हवे तसे जगण्याच स्वातंत्र्य देऊ शकेन जे स्वातंत्र्य मला मिळाले नाही.

विजय : मी तर नेहमीच मला स्वातंत्र्याने कधी जगता येईल याचा विचार करत आलो. याबाबतीत तू माझ्याहून एक पाउल पुढे आहे.

कामिनी : तू म्हणत असशील तर मी तुझ्या आणि यामिनीच्या मुलाची अथवा मुलीची सरोगेट मदर व्हायला तयार आहे.

विजय : हे तुला वाटते तितके सोप्पे नाही.

कामिनी : मी त्या सर्व गोष्टींचा विचार करून झालेले आहे. मला तुझ्या मुलाला जन्म देण्याचा मान मिळवायचा आहे.

विजय : माझ्यासाठी तुला इतका त्याग करायची काहीही गरज नाही.

कामिनी : तुला नसेल पण मला गरज आहे. त्यामित्ताने मला निदान मुलाला जन्म देण्याचे सुख तरी अनुभवता येईल.

विजय : कमीनी ! मी तुला यापूर्वीही सांगितले आहे. माझ्या प्रेमात नको गुंतून राहूस ! मी नात्यांच्या बाबतीत खूपच एकनिष्ठ आहे.

कामिनी : ते मला माहित आहे म्हणूनच मला तुझ्या मुलाला जन्माला घालून तुझ्या आयुष्याचा भाग व्हायचे आहे . त्याबदल्यात मी कोठे तुझ्याकडून काही मागते आहे. उलट माझे जे काही आहे आणि असेल त्याला वारस मिळेल.

विजय : हे सारे खूपच जोखमीचे आहे. त्याचा तुझ्या करिअरवर परिणाम होऊ शकतो हे येतेय का तुझ्या लक्षात .

कामिनी : त्याचा मी फार विचार करत नाही. आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी ! कोठे ना कोठे थांबावे लागतेच . मी ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात जरा लवकरच थांबावे लागते. त्याचा तू फार विचार करू नकोस ! पाहिजे तर या विषयावर मी यामिनीशी बोलते.

विजय : नको ! मी वेळ पाहून बोलतो.

कामिनी : बरं !

इतक्यात निलिमा त्यांच्यासाठी चहा घेऊन बाहेर येते.

निलिमा : मी तुमच्यासाठी चहा आणला आहे.

कामिनी : निलिमा ! तू विजय सरांच्या ! म्हणजे त्यांच्या घराच्या प्रेमात पडली नाहीस ना ?

निलिमा : या घरातील माणसे आहेतच प्रेमात पडाव अशी !

कामिनी : तू का नाही लग्न करत ?

निलिमा : त्याचे कारण तुला माहीत आहे तरी पुन्हा पुन्हा तोच प्रश्न का विचारतेस ?

कामिनी : तुलाही भेटेल कोणीतरी विजयसारखा विचार करणारा ! शोध म्हणजे सापडेल !

विजय : काय बोलताय तुम्ही ? मला काहीच समजत नाही.

निलिमा : काही ... नाही ...सर.. तुम्ही हिच्याकडे लक्ष देऊ नका..

कमीनी : मी तुझ्या सरांना आताच सांगत होते मी त्यांच्या आणि यामिनीच्या मुलाची सरोगेट मदर व्हायला तयार आहे.

निलिमा : खरंच ! असं खरोखरच झाल तर सरांचे कुटुंब पूर्ण होईल.

कामिनी : पण तुझे सर याला अजून तयार होत नाहीत .

निलिमा : सर यावर खरंच तुम्ही आणि यामिनेने विचार करा.

विजय : तुम्ही म्हणता म्हणून यावर मी नक्कीच विचार करतो. पण जग काय म्हणेल ?

निलिमा : जगाला काय म्हणायला वेळ आहे कोठे ?

कामिनी : फार काही कोणी बोलणार नाही फक्त आपल्या नात्यावर शंका निर्माण केली जाईल इतकेच...त्यामुळेही आपल्याला प्रसिद्धीच मिळेल.

विजय : तुला याबाबतीतही प्रसिद्धी दिसतेय ?

कामिनी : प्रसिद्धी कोणत्याही मार्गाने मिळाली तरी ती प्रसिद्धीच असते.

निलिमा : कामिनी तुझ्याकडे सरांसाठी काहितरी करण्याची संधी आहे. माझ्याकडे ती ही नाही.

इतक्यात यामिनी आणि प्रतिभा जेवण घेऊन बाहेर येतात. सर्वजण भारतीय बैठक मारून जेवायला बसतात. सर्वांची जेवणं होईपर्यत रात्रीचे दहा वाजतात. जेवून झाल्यावर निलिमा गाडीने प्रतिभाला तिच्या घरी सोडायला घेऊन जाते. कामिनीही निघते. ते सर्व निघून गेल्यावर विजय आणि यामिनी निवांत सोफ्यावर बसलेले असतात.

यामिनी : मी झोपते आता.

विजय : बरं ! शुभरात्री...

यामिनी : शुभरात्री...

कामिनी आणि निलिमा त्यांच्या घरी पोहोचल्याचा फोन आल्यावर विजय त्याच्या रुममध्ये जाऊन झोपी जातो.

दुसऱ्या दिवशी यामिनी ऑफिसला गेलेली असते आणि विजय सोफ्यावर बसून संगणकावर काम करत असतो. इतक्यात प्रतिभा आल्यावर

प्रतिभा : साहेब ! आज तुम्हाला खूप मोकळ मोकळ वाटत असेल नाही !

विजय : हो !

प्रतिभा : गावावरून कोणाचा फोन आला का ?

विजय : अजून तरी नाही ! सर्वजण विचारात असतील.

प्रतिभा : मला विजयाने फोन केला होता. तिने आणि तिच्या घरच्यांनी म्हणजे सासरच्यांनी आणि तुमच्या घरच्यांनीही ती मुलाखत पाहिली. तुमच्या लग्नाच्या विषयावर सर्व अवाक झाले पण कोणी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तुमच्या लग्नाचे सत्य ऐकून खूप लोक विचारात पडले असतील.

विजय : हो ! पण कधीतरी हे सत्य सर्वाना कळायला हवं होतचं ! आता ते जगाला कळलं इतकाच काय तो फरक

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते नाष्ट्यासाठी काय घेऊन येऊ ?

विजय : गोडाचा शिरा कर.

प्रतिभा : हो ! लगेच करते.

इतक्यात दारावरची बेल वाजते विजय दरवाजा उगडून नीलिमाला आत घेतो. निलिमा आत येताच

विजय : निलिमा ! ये बस ! प्रतिभा ! निलिमा आली आहे तिच्यासाठी चहा आणि शिरा घेऊन ये !

प्रतिभा : हो ! लगेच येते !

निलिमा : सर ... आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे... कार्यक्रम अचनक ठरला म्हणून तुम्हाला पूर्वसूचना नाही देता आली.

विजय : काही हरकत नाही ! कधी जायचे आहे ?

निलिमा : नाश्ता करून निघूया !

विजय : चालेल !

प्रतिभा त्या दोघांसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते.

विजय : प्रतिभा ! तू ही घे ! नाहीतर थंड होईल ..

निलिमा : खरचं प्रतिभा तुझ्या हाताला चव आहे ! तू कुकिंगच्या शो मध्ये भाग घेच

प्रतिभा : हो ! मी तयरी ही सुरु केली आहे. साहेब जेवणात काय करू ?

निलिमा : आता काही करू नकोस ! आम्ही जाताना तुला माझ्या गाडीने तुझ्या घरी सोडतो.

प्रतिभा : तुम्ही कोठे बाहेर चालला आहात का ?

निलिमा : हो ! आम्हाला एका कार्यक्रमाला जायचे आहे.

प्रतिभा : चालेल

विजयची तयारी झाल्यावर ते तिघे एकत्र घराच्या बाहेर पडतात .

संध्याकाळी यामिनी लवकर घरी आलेली असते कारण तिच्या ऑफिसातील सर्व सहकाऱ्यानी त्यांची मुलाखत पाहिल्यामुळे त्यांच्या मनात असंख्य प्रश्नांनी घर केलेले होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता देता यामिनीला नाकी नऊ आले होते. त्यामुळेच ती तिच्या ऑफिसातून आज लवकर घरी आली होती. ती फ्रेश होऊन सोफ्यावर स्वतशीच विचार करत बसलेली असताना प्रतिभा आता आली.

प्रतिभा : यामिनी ताई आज लवकर आलात ?

यामिनी : हो ! ऑफिसात कालची मुलाखत पाहून आलेले सार्वजन मला नको नको ते प्रश्न विचारत होते.

प्रतिभा : त्यात काय ? थोडे दिवस विचारतील आणि मग विसरतील

यामिनी : जरा चहा बनव ना ? डोकं खुप दुखतंय आज..

प्रतिभा : हो लगेच आलं घालून चहा करून आणते म्हणजे तुम्हाला बरे वाटेल.

प्रतिभा चहा आणि खायला चिवडा घेऊन आल्यावर

यामिनी : आमच्या आयुष्यातील सत्य जगाला सांगून आम्ही काही चूक तर नाही ना केली ?

इतक्यात कमळ आत येते

कमळ : अजिबात नाही ! उलट तुम्ही हे फार पूर्वीच करायला हवे होते. तुमचे आयुष्य हे काही एखाद्या चित्रपटातील कथेपेक्षा कमी नाही. काल मुलाखत पाहिल्यावर खरंतर मला तुझा खूप राग आला होता कारण तुझ्या आयुष्यातील इतक मोठ गुपित मी तुझी जिवलग मैत्रीण असतानाही तू माझ्यापासुनही लपवून ठेवलेस. पण खूप विचार केल्यावर वाटले नाही ! तू केलेस ते योग्यच होते. तुझ्याजागी मी असते तरी हेच केले असते. पण तू तुझ्या आयुष्यातील हे सत्य जगाला सांगण्याचे हिंमत दाखवलीस ती मला काही दाखवता आली नसती.

प्रतिभा : मी तुमच्यासाठी चहा – चिवडा घेऊन येते.

कमळ : हो ! लगेच घेऊन ये ! तू काही बाई आता टी.व्ही. वर दिसणार ! उद्या खूप फेमस झालीस म्हणजे व्हावीस अशी माझीही इच्छा आहे त्या नंतर कदाचित आम्हाला तुझ्या हातची चव चाखता येणार नाही.

प्रतिभा : असं कसं ! तुम्ही दोघी माझ्या बहिणी आहात ! मला हक्काने बोलवा ! नाही बोलावलत तरी मी हक्काने येईन.


प्रतिभा : चहा – चिवडा घेऊन आल्यावर तो खाता खाता

कमळ : प्रतिभा तू फराळ बनविण्याचा बिझनेस सुरू कर ! पाहिजे तर मी तुझी पार्टनर होते.

यामिनी : मी फायनान्स करते.

प्रतिभा : चालेल !

कमळ : चालेल काय ? धावेल आपला बिझनेस.

यामिनी : मी विनोद करत नाही ... मला खरचं असं वाटत की प्रतिभा तू तुझा आखादा उद्योग सुरु करावा ! आम्ही दोघी आहोत तुझ्या सोबत.

प्रतिभा : मी नक्की या विषयावर विचार करते. आता मी रात्रीच्या स्वयंपाकात काय करू ते सांगा ?

कमळ : तू काही ही कर पण भाजी मला द्यायला विसरू नकोस !

यामिनी : बनव काहीही तुला वाटेल ते ! तुझ्या हातचं काहीही गोडच लागतं !

प्रतिभा : चालेल ...

यामिनी : मला संग विजय कोठे गेला ?

प्रतिभा : ते सकाळीच निलिमा सोबत गेले आहेत ती घ्यायाला आली होती त्यांना ! त्यांना एकत्र कोणत्यातरी कार्यक्रमाला जायचे होते.

यामिनी : मी त्याला फोन करते . तू ..जा ...

प्रतिभा स्वयंपाकघरात गेल्यावर

कमळ : यामिनी ! मला तुझी काळजी वाटते ! म्हणजे पूर्वीही वाटत होती पण आता जरा जास्तच वाटते.

यामिनी : अखाद्या प्रसिद्ध व्यक्तीची पत्नी होणं हा एक प्रकारे शापच असतो. त्यात आता तुझे सत्य कळल्यानंतर विजय भावोजींच्या आयुष्यात घुसखोरी करायला एक वाट आहे हे घुसखोरी करण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्याना कळले आहे. त्यामुळे तुला यापुढे अधिक सावध राहायला हवे !

यामिनी : तू काय सांगण्याचा प्रयत्न करते आहेस ते कळतेय मला. विजय माझ्या आयुष्यात जरी अपघाताने आला असला तरी आता तो माझा श्वास झालेला आहे त्याच्याशिवाय मी आता जगूच शकत नाही.

तुमची मुलाखत पाहून कोणी फोन वगैरे केला होता का ?

यामिनी : हो ! माझ्या सासूबाईंनी फोन केला होता. तश्या त्या अधून मधून मला फोन करत असतात. पण आज त्यानी जो फोन केला तो माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास होता.

कमळ : काय म्हणाल्या त्या ?

यामिनी : त्या म्हणाल्या,” मी पाहिली तुमची मुलाखत ! तुमच्या नात्याबद्दलचे सत्यही कळले मला. हे बघ ! यामिनी तुमच्या बद्दल कळल्यावर मला काहीही आश्चर्य वगैरे वाटले नाही कारण माझा मुलगा नेहमीच जगापेक्षा वेगळा विचार करत आला. मी आई म्हणून त्याच्या स्वप्नांसाठी काहीही करू शकले नाही. पण जे मी करू शकले नाही ते तू करून दाखवले आहेस ! आज माझा मुलगा जो कोणी मोठा माणूस झाला आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे ! तू आमच्या घराण्याला वारस देऊ शकत नाही याचा तुला फार विचार करायची गरज नाही. रमेश आणि विजयाची मुले ही तुम्हाला तुमच्या मुलांसारखीच आहेत. आपण प्रत्यक्षात एकत्र राहिलो नसलो तरी तू माझी लाडाची आणि मानाची सून होतीस आहेस आणि राहशील हे विसरू नकोस... त्यांचे हे बोलणे ऐकून माझे डोळे भरून आले पण माझ्या डोळ्यात आलेले अश्रू हे आनंदाचे होते.

कमळ : म्हणजे तुला वाटणारी सर्वात मोठी भीती तुझ्या आयुष्यातून दूर झाली आहे.

यामिनी : हो ! मी इतके दिवस उगाचच भीत होते. मला वाटत होते तसे प्रत्यक्षात काहीही झाले नाही.

कमळ : आता आपण इतकेच म्हणू शकतो जे झाले ते योग्यच झाले.

प्रतिभा : यामिनी ताई ! मी स्वयंपाक झाला आहे ! मी निघू का आता ?

यामिनी : थांब ! मी सोडायला येते तुला स्कुटीने !

कमळ : मी ही निघते आता ...मलाही स्वयंपाक करायचा आहे.

कमळ निघून गेल्यावर त्या दोघीही घराच्या बाहेर पडतात. यामिनी प्रतिभाला तिच्या घरी सोडून माघारी येई पर्यत विजय घरी येऊन फ्रेश होऊन सोफ्यावर बसून टी.व्ही. पाहत असतो. यामिनी घरात येताच.

यामिनी : विजय ! तू कधी आलास ?

विजय : झाला असेल अर्धा तास ! तू कोठे गेली होतीस ?

यामिनी : मी प्रतिभाला सोडायला तिच्या घरी गेले होते. तिच्या मुलांनाही भेटून आले. त्यांच्यासाठी खाऊ ही घेऊन गेले होते.

विजय : हो ! का ? हे उत्तम केलेस !

यामिनी : तू कोठे गेला होतास ?

विजय : एक कार्यक्रम होता . आयत्या वेळी ठरल्यामुळे निलिमा मला घ्यायला आली होती.

यामिनी : कार्यक्रम कसा झाला .

विजय : कार्यक्रम उत्तम झाला ! पण सार्वजन आपल्या नात्याबद्दलच विचारत होते. मी तुझ्या सोबत लग्न करून एक आदर्श लोकांपुढे ठेवला आहे असेच सर्वांचे मत होते.

यामिनी : ते काय चुकीचे बोलत होते.

विजय : काही चुकेचे नव्हते पण मी तुझ्याशी लग्न करताना असा कोणताही विचार केला नव्हता. आपल्या दोघाना एकमेकांची गरज आहे इतकेच काय ते माझ्या डोक्यात होते.

यामिनी : आज आईंनी म्हणजे ! तुझ्या आईने मला फोन केला होता.

विजय : हो ! बोलली मला. तिने मलाही फोन केला होता. आता तिच्या मनात तुझ्या बद्दल कोणताच किंतू परंतू नाही ! हे त्यातल्या त्यात उत्तम झाले असे म्हणता येईल म्हणजे आता आपला एकत्र गावाला आपल्या हक्काच्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

यामिनी : काल कामिनी आणि तू बराच वेळ गप्पा मारत होतात ? इतकं काय बोलत होती ती ?

विजय : ती वेडी झाली आहे. ती म्हणत होती ती तुझ्या आणि माझ्या मुलाची सरोगेट मदर व्हायला तयार आहे.

यामिनी : तिला वेड लागलं आहे का ? तीच अजून लग्न झालेले नाही . तिला लग्नच करायचे नसेल म्हणून ती तुझ्यावरील प्रेमापोटी असा निर्णय घेऊ शकते पण पुढे जावून तिच्या आयुष्यात असा कोणी आला ज्याच्यासोबत तिला आयुष्य काढावेसे वाटले तर ...समस्या निर्माण होऊ शकते.

विजय : मी तिला टाळण्यासाठी म्हणालो ,’’ मी यामिनीशी बोलतो . पण यामिनी तुला माहित आहे मला आता आपल्या आयुष्यात आणखी कोणाचीही लुडबुड नकोच ! मुलांची तर नकोच नको ! आजकाल आयुष्याचा काही भरोसा राहिलेला नाही. आपण एकमेकांसाठी आहोत इतके आपल्यासाठी पुरेसे आहे . आपला वंश वगैरे वाढविण्याचा विचार माझ्या कधी मनालाही शिवला नाही. माझ्या भावा – बहिणीची मुले आहेत त्यांचे आयुष्य घडविण्यात जरी मला हातभार लावता आला तरी तो मला पुरेसा आहे. तुझ्याही भावाची मुले आहेत. प्रेम मिळविण्यापेक्षा आपण आपले आयुष्य प्रेम वाटण्यात खर्ची घालणेच उत्तम होईल असे मला वाटते. या भौतिक जगात प्रत्येक माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. पूर्वी मला माझ्या वाट्याला जे आयुष्य आले त्याचे वाईट वाटायचे पण आता तसे मला वाटत नाही. माणसाला त्याच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदात जगता आला पाहिजे कारण हे आयुष्य एकदाच मिळते. त्यामुळे यापुढे मी तिला विसरण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती तिच्या आयुष्यात सुखी असेल नसेल ते तिचे प्रारब्ध पण तिच्या अर्थहीन आठवणीत मी तुझ्यावर किती दिवस अन्याय करत राहणार आहे. तुला माझ्या पुरुषत्वाबाद्द्ल जी शंका आहे ती मी दूर करणार आहे.

यामिनी : मी ते रागाच्या भरात बोलले होते.

विजय : त्यात तुझी काहीच चूक नाही ! पत्नी म्हणून तुझ्या शारीरिक आणि मानसिक गरजेकडे लक्ष देणे हे माझे कर्तव्य आहे.

यामिनी : म्हणजे !

विजय : म्हणजे काय ? आपण हनीमुनला जाऊया !

यामिनी : खरचं !

विजय : हो ! मी मनापासून बोलतोय ! कोठे जाऊया !

यामिनी : तू म्हणशील तेथे !

विजय : तू तुझ्या ऑफिसात सुट्टी टाक ! आपण जाऊया ! फिरायला दहा दिवस ! मजा करुया !

यामिनी : हे सारे मला स्वप्नवत वाटते आहे. पण कोठे जाऊ या !

विजय : गोव्याला !

यामिनी : चालेल... आता जेवून घेऊ या ...

विजय : म्हणजे काय ?

जेवण झाल्यावर विजय आणि यामिनी हातात हात घालून यामिनेच्या रूममध्ये झोपायला जातात. 

काही दिवसांनी यामिनी आणि विजय गोव्याला हनिमून कम पिकनिकला निघून जातात. दहा दिवसाच्या मौज मजे नंतर ते शनिवारी रात्री उशिरा माघारी येतात. ते माघारी आलेत त्यामुळे प्रतिभा रविवारी कामावर येते. ती येईपर्यत विजय बाहेर पाय मोकळे करायला गेलेला असतो आणि यामिनी सोफ्यावर बसून गाणं गुणगुणत असते.

प्रतिभा : ताई पिकनिक मानवलेली दिसतेय ! तुमच्या चेहऱ्यावर खूप तेज आणि गालावर लाली आलेली आहे इतकेच नव्हे तुमच्यात नवा उत्साह संचारला आहे.

यामिनी : हो ! प्रतिभा खरचं मी खूप म्हणजे खूप आनंदी आहे. इतके दिवस मी ज्या सुखाच्या प्रतीक्षेत होते ते सुख मला शेवटी मिळाले

प्रतिभा : म्हणजे ! साहेबांनी तुम्हाला जवळ केले.

यामिनी : हो सर्वार्थाने जवळ केले म्हणूच तर मी इतकी आनंदी आहे.

प्रतिभा : उशिरा का होईना एकदाचा तुम्हाला देव पावला.

यामिनी : हो !

प्रतिभा : मी तुमच्यासाठी खूप खुश आहे या खुशीत छान बदाम घातलेला गोडाचा शिरा करते.

यामिनी : हो ! चांगला भरपूर कर ! कमळला पण देऊया ! तुझ्या मुलांनाही घेऊन जा.. मी तुमच्या सगळ्यांसाठी खूप भेटवस्तू आणल्या आहेत त्या देते नंतर.

प्रतिभा : चालेल.

इतक्यात कमळ आत येते.

कमळ : संपली का पिकनिक ? खूप मजा केलेली दिसतेय ! आमची आठवण आली नसेलच कारण दहा दिवसात मला एकही फोन केला नाहीस. रोज पाहत होते तुमचे फोटो मी फेसबुकवर. किती गोड दिसत होतात अगदी नव्या जोडप्यासारखे !

यामिनी : खरंच ?

कमळ : मी कशाला खोटं बोलू ?

यामिनी : तू बस आता ! प्रतिभा शिरा करतेय तो खाऊन जा..आणि कविताला घेऊन जा..

कमळ : शिरा वा !

प्रतिभा : चहा आणि शिरा घेऊन बाहेर येते. तो शिरा खाता खाता.

कमळ : गोव्याला कोठे थांबला होतात ?

यामिनी : विजयच्या मित्राच्या ओळखीचे एक हॉटेल होते. तेथेच थांबलो ! खूप मजा केली.

कमळ : मजा करताना आम्हाला विसरलीस ! काय प्रतिभा ?

प्रतिभा : खूप दिवसांनी नवरा बायको एकमेकाना खास वेळ देता यावा म्हणून फिरायला गेले होते त्यात आपली लुडबुड नव्हती तेच बरे झाले.

यामिनी : ते काही ही असले तरी आपण सार्वजन तिकडे पुन्हा जाणार आहोत. मी तुम्हाला घेऊन जाणार म्हणजे जाणार !

कमळ : आम्ही विनोद करतोय ! तुझ्या आनंदातच आम्ही आनंदी आहोत. तुम्हा दोघांनी एकमेकांसोबत वेळ घालविणे खूप गरजेचे होते. बरं ! गोव्यावरून काय आणलंस माझ्यासाठी ?

यामिनी : बरचं काय काय आणलं आहे देते नंतर !

कमळ : मी निघते आता ! मला आज चिकन करायचे आहे, तुला देते पाठवून ...

यामिनी : हो चालेल .

प्रतिभा : ताई मी स्वयंपाक करायला घेते .

यामिनी : दोन्ही वेळेचा एकदम कर ! तू दुपारी आमच्यासोबत जेवूनच जा.. संध्याकाळी आराम कर म्हणजे तुझा हक्काचा आरामाचा दिवस आहे.

प्रतिभा : तुमचाही हक्क आहेच की माझ्यावर ...

यामिनी : तो तर आहेच ! तू बहिण आहेस माझी ! दहा दिवस मजा केली असशील ?

प्रतिभा : कसली मजा ! निलिमा माझ्याकडून त्या कुकिंगाच्या शो साठी सराव करून घेत होती. कालच शो शूट झाला.

यामिनी : अभिनंदन !

प्रतिभा : धन्यवाद !

प्रतिभा स्वयंपाकघरात स्वयंपाक करायला गेल्यावर विजय बाहेरून आत येतो.

यामिनी : ही पिशवी कसली ?

विजय : मी गजरे आणले आहेत .

यामिनी : किती ?

विजय : तीन आणले आहेत.

यामिनी : हे उत्तम केलेस ! एक मला , एक प्रतिभाला आणि एक कमळला होईल .

विजय : प्रतिभा आलेय ना ?

इतक्यात प्रतिभा आतून विजयसाठी चहा आणि शिरा घेऊन येते.

विजय : प्रतिभा ! अभिनंदन तुझा कुकिंगचा शो छान झाला आहे. मला कामिनेने फोन केला होता तेंव्हा सांगत होती. आता तू लवकरच स्टार होशील. आम्हाला आता नवीन बाई कामासाठी शोधावी लागेल बहुतेक !

प्रतिभा : तुमच आपलं उगाच !

विजय : मी विनोद करत नाही ! तुला मोठं झालेले पहायला आवडेल मला.

यामिनी : मलाही ! कामाला काय कोणीही मिळेल. आम्हाला तुझ यशस्वी होणं अधिक म्हत्वाचं आहे.

प्रतिभाचा स्वयंपाक आटपल्यावर यामिनी प्रतिभाला तिला आणि तिच्या मुलांसाठी आणलेल्या भेटवस्तू दाखवते.

त्या दाखवून झाल्यावर ते तिघे जेवायला बसतात. जेवून झाल्यावर प्रतिभा यामिनीने गोव्या वरून तिच्या करीता आणलेल्या भेटवस्तू घेऊन तिच्या घरी निघून जाते.

त्यानंतर काही दिवसांनी प्रतिभाचा कुकिंगाचा शो फेमस झाल्यामुळे तिला आणखी शो मिळतात . एका मालिकेत तिला मोलकरनीची भूमिका साकारायला मिळते त्यामुळे ती फेमस होऊ लागलेली असते. त्यामुळे तिला विजय आणि यामिनीकडे कामाला यायला वेळच मिळत नसतो. त्यामुळे यामिनी एका नवीन मोलकरणीला कामाला ठेवते. प्रतिभा अधून मधून त्यांना भेटायला आली की त्याना काही बाई खायला करून देत असते. 

एक दिवस अचानक विजया मुंबईला येते तिच्यसोबत तिची नणंद निकिता असते. निकिता दिसायला अतिशय सुंदर असते. तिचे डोळे घारे घारे मांजरीसारखे असतात . ती हसल्यावर तिच्या गालाला छान खळी पडत असते. तिचे केस काळे कुट्ट लांब सडक असतात . बांधा चवळीच्या शेंगे सारखा असतो. रंग गोरापान, मध्यम उंची , आवाज सौम्य पण मधुर... पण दुर्दैवी लग्नानंतर अवघ्या एका वर्षात एका अपघातात तिचा नवरा वारलेला असल्यामुळे ती विधवा झालेली असते लोकार्थाने ! पण तिचे आजचे राहणीमान आखाद्या अविवाहित तरुणीसार्खेच असते. तिला पाहिल्यावर विजयच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या येतात तेव्हा यामिनी ऑफिसला गेलेली असते.

विजय : विजया ! तू अचानक आलीस ?

विजया : हो ! माझे येणे तसे अचानकच ठरले. ह्या निकिताचे मुंबईत काम होते म्हणून मी तिलाही घेऊन आले. तसेही तिचा नवरा गेल्या पासून गावाला मन रमत नाही. पदरी एखाद मुल असत तर त्यात तरी तिचं मन रमल असतं !

विजय : मग तीच दुसरं लग्न करून द्यायचं ना !

विजया : आम्ही त्याच विचारात आहोत ! पण तसा कोणी भेटायला हवा ना ! तुझ्यासारखा विचार करणारा ! तिच्या नवऱ्याने बरचं काही तिच्यासाठी मागे सोडले आहे. तशी तिला काही आर्थिक समस्या नाही.

विजय : बरं ! तुम्ही आता फ्रेश व्हा ! थोडं खाऊन घ्या आणि आराम करा...

विजया : चल ! निकिता !! तुला घर दाखवते.

संध्याकाळी निकिता विजयला चहा आणून देते चहा घेताना विजयच्या हाताचा स्पर्श निकिताच्या हाताला होताच विजयाच्या मनात थोडी हलचल होते. चहा विजयच्या हातात देताना निकिता गालातल्या गालात गोड हस्ते. तिचे हसणे पाहून विजय आणखीनच चलबिचल होतो.

विजया चहाचे दोन कप हातात घेऊन बाहेर येते. एक कप तिने निकिताच्या हातात दिल्यानंतर ते तिघे चहा पीत असताना

विजया : प्रतिभा ! ती काय आता मोठी स्टार झाली. तुमच्या घरात आल्यामुळे माझ्या मैत्रीनीचे भाग्यच उजाळले . पण अजूनही तिचे पाय जमिनीवर आहेत. एक दिवस आड करून मला फोन करते म्हणजे करते. मी तिचे शो पाहत असते. तिला पाहताना मला तिचा खूप म्हणजे खूप अभिमान वाटतो. येते की नाही इकडे ?

विजय : येत असते अधून मधून इकडे कधी - कधी तिच्या मुलानाही सोडून जाते आमच्याकडे. तिची मुलेही आता छान रमतात आमच्याकडे.

विजया : उत्तम ! म्हणजे मला आणि निकीतालाही भेटता येईल तिला !

विजय : हो !

विजया : रात्रीच्या जेवनाचं काय ?

विजय : नवीन बाई ! येईलच इतक्यात ... तुलां काय हवे नको ते तिला संग !

निकिता : हो ! आम्ही तिला स्वयंपाकात मदतही करू ...

विजय : जशी तुमची इच्छा !

विजया : निकीताही तसा उत्तम स्वयंपाक करते .

विजय : ते मला माहित नाही का ?

विजया : अरे ! हो ! तू खाल्ला आहेस ना तिच्या हातचा स्वयंपाक ! जेव्हा ती आपल्या घरी राहायला आली होती तेंव्हा !

इतक्यात दारावरची बेल वाजते. निकिता पुढे होत दार उघडते . तिला पाहताच यामिनी चक्रावून जाते. ही सुंदर मुलगी कोण आली आहे आपल्या घरात. ती विचार करताच आत शिरते. विजयाला पाहिल्यावर तिचा जीव भांड्यात पडतो.

विजया यामिनीशी निकिताची ओळख करून देते.

विजया : ही माझी नणंद निकिता ?

यामिनी : ही तुमचे नणंद निकिता का ? मागे तुम्ही जिच्याबद्दल सांगितले होते तीच ही का ?

विजया : हो !

यामिनी : अचानक मुंबईत आलात ! काही खास काम आहे का ?

विजया : हो ! आमच्या दोघींची कामे आहेत. आम्ही आठवडाभर राहणार आहोत मुंबईत ?

यामिनी : आठवडाभर का ? चागले महिनाभर रहा की ? निकिताला तितका बदलही मिळेल.

विजया : हो ! ते तर आहेच !

यामिनी : मी फ्रेश होऊन येते.

निकिता : मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते .

यामिनी : निकिता तू मला यामिनीच म्हण ! मला तेच आवडेल.

निकिता : चालेल .

यामिनी फ्रेश होऊन आल्यावर निकिता तिला चहा देते . इतक्यात काम करणारी बाई येते आणि तिने तिच्या कामाला सुरुवात केल्यावर निकिता तिच्या मदतीला जाते.

यामिनी : विजया ! हिच्या बाबतीत जे झाले ते वाईटच झाले. मी त्यातून गेले आहे म्हणून तिचे दु:ख समजू शकते. निकिता दिसायला फारच सुंदर आहे. तिलाही भेटेल कोणी तरी जसा मला विजय भेटला .

विजया : देव करो आणि तू बोलते आहेस तसे होवो !

यामिनी : तुमचे येथले काम आटपले तरी रहा आणखी काही दिवस आपण मिळून मजा करुया !

विजया : गोव्याला जी मजा केलीत ती पुरली नाही वाटत, गोव्यातले तुमचे फोटो पाहिले मोबाईलवर तुम्ही दोघेही खूप गोड दिसत होतात म्हणजे तुमचे एकमेकांवरील प्रेम ओसंडून वाहताना दिसत होते. ते पाहून खूप आनंद झाला. आता एक रूम बस होते ना दोघांना ?

यामिनी : हो ! आता रूम काय ? फक्त बेडही पुरेसा आहे आम्हाला.

विजय : काही काय बोलतेयस ?

विजया : बरोबरच बोलतेय वाहिनी ! मी जरा स्वयंपाकघरात जाऊन निकिता काय गोंधळ घालतेय ते पाहते. तोपर्यत तुम्ही नवरा बायको काय गोंधळ घालायचा तो घाला.

यामिनी : आता कसं आपलं घर माणसानी गजबजलेले वाटते आहे. लोकाना का वेगळं वेगळं स्वतंत्र राहायचं असते ते देवच जाणे .

विजय : ते तसच असतं ज्याच्याकडे जे असते त्याला त्याची किमंत नसतो. माणूस नेहमीच मृगजळाच्या मागे धावत असतो. तो ही धावता धावता आपले प्राण गमावून बसतो. मनुष्याला थांबायचे कोठे आणि कशाच्यामागे किती धावायचे हे कळायला हवे !

यामिनी : हो ! तू बरोबर बोललास. प्रतिभाचे उदाहरण घे ! पूर्वी तिच्याकडे पैसे भले कमी होते पण आनंदाने मजेत शांततेत जीवन जगत होती. पण आता तिच्याकडे बराच पैसा आला पण सुख शांती गमावून बसली आता तिच्या वाट्याला नुसती धावपळ आली आहे. ती मुलांना आता सर्व सुख साधने देऊ शकते पण वेळ देऊ शकत नाही. 

विजय : आयुष्यात प्रत्येकाला काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावे लागतेच.. हा सृष्टीचा नियमच आहे. त्याला कोणीही अपवाद नाही.

यामिनी : अगदी बरोबर बोललास.

विजय : मी नेहमीच बरोबर बोलतो ! उगाच नाही प्रसिद्ध लेखक !

यामिनी : हो ! बाबा ! तुझे सर्वच बरोबर असते. आता तरी खूष झालास ?

विजया : हो !

तो जागेवरून उठून यामिनीला प्रेमाने आलिंगन देतो इतक्यात निकिता बाहेर येताच तो यामिनीला आपल्या मिठीतून मोकळ करतो.

निकिता : विजय ! तुम्हाला चहा हवा का ? ते विचारायला आले होते. मला माहीत आहे ना तुम्हाला सारखा चहा लागतो.

विजय : हो ! घेऊन ये !

यामिनी : तुझे चहा प्रेम हिलाही माहित आहे ?

विजय : असणारच ना ! आमच्या घरात ती राहिली आहे एक – दोन महिने !

यामिनी : आपल्या घरात राहण्याचं भाग्य हिला लाभलं पण मला लाभल नाही.

विजय : ते घर आता भाड्याने दिलेले आहे म्हणून नाहीतर आपण गेलो असतो राहायला .

यामिनी : आता काय उपयोग घर भिंतींनी नाही तर माणसांनी होते.

इतक्यात ! निकिता चहा घेऊन येते चहाचा कप विजयाच्या हातात देताना तिच्या हाताचा स्पर्श पुन्हा विजयच्या हाताला होतो.

यामिनी : झाली का जेवणाची तयरी ?

निकिता : हो ! झाली !

यामिनी : मी येऊ का मदतीला ?

निकिता : नको ! काही गरज नाही.

यामिनी : बरं ! मग मी आमच्या रूममध्ये जाऊन काम करते

निकिता : हो ! चालेल

विजय चहा पिऊन कप निकिताच्या हातात देताना पुन्हा त्याच्या हाताचा स्पर्श निकिताच्या हाताला होतो. निकिता पुन्हा त्याच्याकडे पाहत गालातल्या गालात गोड हसते. विजयचा चेहरा मात्र निर्विकार असतो. निकिता चहाचा कप घेऊन स्वयंपाकघरात जाते. थोड्यावेळाने काम करणारी बाई तिचे काम आटपून बाहेर निघून जाते. निकिता आणि विजया बाहेर येऊन हॉलमध्ये विजय सोबत बसतात.

निकिता : विजय तुमची भाडेकरू ही कादंबरी मी वाचली. मला खूप आवडली. तसे मी तुमचे साहित्य नेहमीच वाचत आले आहे.

विजया : मी ही वाचली ! मलाही खूप आवडली पण मी चव घेत घेत वाचली. निकिताने ती एकाच घोटात वाचली. बरं आता नवीन काही लिहायला घेतलेस की नाही ?

विजय : नाही अजून ! माझ्या डोक्यात नवीन कादंबरी घोळतेय ! पण अजून कागदावर उतरली नाही.

निकिता : पण हल्ली तुम्ही कागदावर लिहिता कोठे ?

विजय : तू बोलतेस ते बरोबर आचे पण तशी बोलण्याची पद्धत असते. हल्ली शब्द पेनातून नाही बोटातून उतरतात स्क्रीनवर , त्यामुळे आता कागदावर चार अक्षरे जरी लिहायचे म्हटले तरी हात थरथरतात. हल्ली तर सही करतानाही हात लटपटतात. पूर्वी निदान चेक बुकावर तरी सही करावी लागायची आता ती ही लागत नाही कारण हल्ली सर्व व्यवहार इंटरनेटवर होतात.

निकिता : हो !

विजय : निकिता मला एक सांग ! तुझा नवरा अचानक कसा गेला ?

निकिता : बाईक ! बाईकवर त्याचे प्रचंड प्रेम ! त्याला बाईक सुसाट चालवायची सवय होती. कधी कधी तो हेल्मेटही घालत नसे त्यादिवशीही तो हेल्मेट न घालता बाईक चालवत होता आणि बाईक कंट्रोल न झाल्यामुळे समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला आणि जागेवरच त्याचा प्राण गेला.

विजय :आपल्या देशतील हजारो तरुणांचा बाईक चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे नाहक प्राण जातो त्यामुळे मी यामिनीला नवीन स्कूटर घ्यायला लावली ज्यात दोन हेल्मेट राहतात. याबाबतीत नशिबावर अवलंबून राहणे गाढवपणा आहे. आपली सुरक्षा आपल्याच हतात असते. आपल्या सुरक्षितते साठी असणारे नियम हे आपण पाळलेच पाहिजेत त्याला पर्याय नाही. तुझ्या नवर्याने जर हेल्मेट घालून बाईक चालवली असते तर कदाचित तो आज आपल्यात असता. चूक त्याने केली मात्र ती भोगावी तुला लागत आहे. त्याच्या चुकीमुळे तुझे आयुष्य बरबाद झाले.

निकिता : ते तर आहेच ! कदाचित माझे नशिबही फुटके असावे म्हणूनच मी श्रीमंत मुलाचा लग्नासाठी अट्टाहास केला होता.

विजया : या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत आता त्याच्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. आता तू तुझ्या भविष्याचा विचार कर.

निकिता : हो ! आता मी फक्त माझ्या भविष्याचा विचार करणार आहे. आता मी ज्या नोकरीसाठी मुलाखती देणार आहे त्यातून जर मालां एखादी नोकरी मिळाली तर मी होस्टेलवर राहून नोकरी करेन !

इतक्यात यामिनी तिच्या रूममधून बाहेर येते

यामिनी : होस्टेलवर कशाला ? तू इकडेच रहा की ! आम्हालाही तुझी सोबत होईल !

निकिता : नको ! तुम्हाला कशाला उगाच अडचण !

यामिनी : आम्हाला काही अडचण वगैरे होत नाही. आता ठरलं म्हणजे ठरल !

विजया : बरं बी ! तू म्हणशील तसं !

यामिनी : चला आता जेवण तर तयार झालेच आहे तर जरा बाजारात फेरफटका मारून येऊ या ! तुम्हाला काही हवे असेल तर घेऊनही येउया ! चालेल ना ?

विजया : चालेल काय धावेल ! चल निकिता तयार हो !

त्या तिघी तयार होऊन घराच्या बाहेर पडतात.

विजय तेथेच सोफ्यावर बसून स्वत:शीच विचार करत असतो इतक्यात कमळ आत येते.

कमळ : काय भावोजी एकटेच बाकीचे कोठे गेले म्हणजे विजया आणि तिच्यासोबत आलेली पाहुनी आणि यामिनी ?

विजय : त्या तिघी बाजारत गेल्या आहेत. वहिनी तुमचं काही काम होत का ?

कमळ : नाही मी सहज आले होते. यामिनीला भेटायला .. मी निघते मला कविताला क्लासवरून आणायचे आहे.

विजय : हो ! चालेल

कमळ निघून गेल्यावर पुन्हा विजय त्याच्या विचारात गुंग होतो.

थोड्या वेळाने त्या तिघी बाजारातून माघारी येतात येताना त्यांनी बरीच खरेदी केलेली असते.

विजय : झाली का खरेदी ?

निकिता : हो ! झाली.

यामिनी : चला आता जेवून घेऊ या का ?

ते चौघे जेवायला बसतात.

यामिनी : वा ! गावचे बोंबील ते गावचे !

विजया : तुला आवडतात म्हणून मुद्दामच आणले आहेत. थोडे कमळला ही देणार आहे.

निकिता : कोण कमळ ?

विजया : ती यामिनी वाहिनीची मैत्रीण आहे आपल्या वरच्या मजल्यावर राहते आपण येताना आपल्याला गेटवर भेटली होती ती.

निकिता : असं होय ! विजय ! भाजी घ्या ! तुम्हाला आवडते तशीच केली आहे.

विजय : ही भाजी तू केली आहेस .

निकिता : चांगली नाही झाली का ?

विजय : नाही ! म्हणजे उत्तम झाली आहे.

यामिनी : आज सर्वच जेवण उत्तम झालेले आहे . आज जेवताना प्रतिभाची आठवण आली.

विजया : त्यावरून आठवले मला तिला भेटायला तिच्या घरी जायचेच आहे. तिचे घर तिथेच आहे ना ?

यामिनी : तिचे घर तिथेच आहे पण आता तिने ते छान बांधून घेतलेले आहे.

विजया : तिच्या नशिबाने तिला साथ दिली.

यामिनी : त्यासाठी तिने कष्टही खूप घेतलेले आहेत.

निकिता : माणसाचे भाग्य कधी बदलेल आणि कधी बिगडेल हे कोणीच सांगू शकत नाही.

यामिनी : निकिता घाबरू नकोस ! तुझेही बिगडलेले भाग्य नक्कीच सुधारेल याची मला खात्री आहे.

विजय : माझे जेवून झाले मी उठतो तुम्ही जेवा आरामशीर ..

सर्व जेवून उठल्यावर निकिता विजयासोबत झोपायला जाते आणि विजय यामिनीसोबत.

दुसऱ्या दिवशी सकाळी यामिनी ऑफिसला गेलेली असते. नवीन मोलकरीण येऊन तिची कामे करत असते विजया आणि निकिता तिला मार्गदर्शन आणि मदत करत असतात. थोड्या वेळाने निकिता विजयसाठी चहा आणि नाश्ता घेऊन येते. चहा देताना पुन्हा विजयच्या हाताचा स्पर्श निकिताच्या हाताला होतो. ती चहा नाश्ता देऊन पुन्हा आत जाणार इतक्यात

विजय : तुम्ही केला का नाश्ता ?

निकिता : नाही अजून ! कामे आटपली की करू !

विजय : कशाला ? आधी पोटोबा मग विठोबा !

निकिता : बरं करते आता. आणखी काही हवे आहे का ?

विजय : नाही ! काही नको !

निकिता : एक विचारू ?

विजय : विचार ना ?

निकिता : मागच्या इतक्या वर्षात माझी आठवण तुम्हाला कधीच आली नाही का ?

विजय : असे का विचारतेस ?

निकिता : माझे लग्न झाल्यापासून तुम्ही मला काल भेटलात ! या मधल्या काळात तुम्ही माझी साधी विचारपूसही कधी केली नाही. माझ्या लग्नालाही आला नव्हतात इतकच काय माझ्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तुम्ही मला साधी हाकही मारायला आला नाहीत.

विजय : निकिता तू उगाच इतका जास्त विचार करते आहेस. तुझ्या लग्नाच्या वेळेला मी बाहेर होतो. त्यानंतर माझे गावी कधी येणेच झाले नाही. तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा मी दिल्लीला होतो. फोनच म्हणशील तर तुही माझी चौकशी करायला फोन केला नाहीस ! माझी कोणी मला फोन करून माझी चौकशी करावी अशी अपेक्षाच नसते. मला विनाकारण कोणाला फोन करून चौकशी करायला नाही आवडत. तुला कधी माझी काही गरज पडली असती आणि तू मला हाक मारली असतीस तर मी नक्की आलो असतो. जी परिस्थिती आपण बदलूच शकत नाही त्या परिस्थितीचा मी फार विचार करत नाही. आता तुला वाटतं कां की माझे तुझ्यासोबतचे वागणे बदलले आहे.

निकिता : नाही ! पण मला सतत वाटत असते आपल्या नात्यात काही तरी विचित्र आहे जे नेमके काय आहे तेच मला कळत नाही.

विजय : नाही ! तसे काहीही नाही.

निकिता : मग माझ्या स्पर्शाने तुम्ही विचलित का होता ? पूर्वी तसे होत नव्हता.

विजय : आपण बऱ्याच वर्षानी संपर्कात आलो आहोत म्हणून असेल कदाचित.

निकिता : तसेच असेल कदाचित !

इतक्यात विजया बाहेर येते.

विजया : निकिता तू विजयाला चहा द्यायला आलीस आणि त्याच्यासोबत गप्पा मारत बसलीस चल नाश्ता करून घे ! थंड होईल .

निकिता : हो !

निकिता आत निघून गेल्यावर विजय स्वत:शीच बोलतो तुला आता काय सांगू तुझ्या स्पर्शाने मला काय होते ते.

दुपारी जेवून झाल्यावर विजय तयार होऊन बाहेर जायला निघतो.

निकिता : विजय तुम्ही बाहेर जाता आहात का ?

विजय : हो ! काही आणायचे आहे का ?

निकिता : नाही ! अजूनही तुम्ही बाहेर जाताना तसेच तयर होऊन जाता जसे पूर्वी जायचात ! आता फक्त एक गोष्ट बदलली आहे

विजय : कोणती ?

निकिता : तुमचे पोट ! ते तेवढे बाहेर आले आहे.

विजय : तेव्हा मी खूप धावा धाव करायचो हल्ली फक्त खुर्ची उबवत असतो. त्यामुळे ते बाहेर येणे साहजिकच आहे. माझ्या बायकोला माझ्या वाढलेल्या पोटाचा काहीही त्रास नाही . उलट ती विनोदाने म्हणते पोट वाढल्यामुळे तुम्ही खात्या – पित्या घरातले दिसता.

निकिता : बायकोला आपल्या नवर्याचे पोट वाढलेले चालतेच !

विजय : असे का ?

निकिता : दुसऱ्या बाईने त्याच्यावर लाईन मारू नये म्हणून...

विजय : असं आहे होय ! तरीच यामिनी माझ्या वाढलेल्या पोटावरून मला कधी काहीच बोलत नाही. उद्यापासून मी रोज सकाळी चालायला जाणार तू येशील का माझ्या सोबत.

निकिता : हो ! येईन पण अगोदर बायकोची परमिशन काढा !

विजय : ती मी काढतो तू त्याची काळजी नको करू ! बरं मी येतो आता तुम्ही आराम करा... म्हणजे तू कर.. विजया काय आता बाहेर आली की सास –बहु पाहायला बसेल.

निकिता : मला आठवते पूर्वी तुम्ही ही सास – बहु बघायला बसायचात !

विजय : ते तर मी आजही बसतो पण बायको झोपल्यावर ...

निकिता : याबाबतीत तुम्ही आहात तसे आहात !

विजय : या बाबतीत म्हणजे ?

निकिता : विनोद करण्याच्या बाबतीत. तुम्हाला नेहमीच आयुष्य आनंदात जगायला जमले. आमच्या मात्र आयुष्याकडून खूपच जास्तीच्या अपेक्षा होत्या त्यामुळेच कदाचित आमच्या वाट्याला दु:ख आले.

विजय : तसे काही नसते दु:ख – सुख हे आपल्या मानण्यावर असते. तो एक गहन विषय आहे त्यावर आपण नंतर कधी तेरी बोलू ! मी येतो आता.

निकिता : या !

विजय बाहेर निघून गेल्यावर विजया बाहेर येते

विजया : विजय गेला का बाहेर ?

निकिता : हो !

विजया : बरं झालं ! तो असता तर मला माझ्या मालिका सोडाव्या लागल्या असत्या. तू उभी का बस !

निकिता : नको ! मी आत जाऊन पडते .

निकिता आत गेल्यावर कमळ आत येते.

कमळ : कशी आहेस विजया ?

विजया : मी मजेत आहे. कविता कशी आहे ? आली नाही मला भेटायला अजून ?

कमळ : मी आत्ताच तिला क्लासला सोडून आले. हल्लीच्या मुलांवर अभ्यासाचा भार खूपच वाढला आहे. आपल्या वेळेला आपल्या पालकांनी शाळेचे तोंडही कधी पाहिलेले नसायचे. पण हल्ली मुलांसोबत पलकही पुन्हा शाळेत जातात अशी परिस्थिती आहे. ते कमी की काय म्हणून क्लास ! पालक कितीही शिकलेले असले तरी हली मुलांना क्लास हा लावतातच ! हल्ली एका मुलामागे एक माणूस मोकळा लागतोच !

विजया : हो ! याबातीत मी लकी आहे कारण माझ्या मुलाचं सगळ माझ्या सासूबाई आणि जाऊबाई बघतात आम्ही फक्त नाव लावण्यापुरते पालक आहोत.

कमळ : त्या बाबतीत मी दुर्दैवी आहे कारण आमचे हे एकुलते – एक त्यात माझे सासू – सासरेही वारले.

विजया : निदान त्यासाठी तरी लोकांनी पुन्हा एकत्र कुटुंबाचा विचार करायला हवा !

कमळ : निकिता सावरली आहे ना आता तिचा नवरा जाण्याच्या दु:खातून ?

विजया : हो ! सावरली म्हणायला काही हरकत नाही. मुंबईत कामासाठी एक – दोन ठिकाणी तिच्या मुलाखती ठरलेल्या आहेत. एखादी चांगली नोकरी भेटली तर मुंबईतच आखाद्या होस्टेलमध्ये राहणार होती तर यामिनी म्हणते तिला आमच्या सोबतच राहूद्या !

कमळ : हो आता प्रतिभा नाही ! दोन बायका कामाला येतात पण हल्ली काम करणाऱ्या बायकांचा काही भरोसा नाही कधी काम सोडून जातील याचा. निकिताची यामिनीला मदतच होईल ... एक से भले दो .. दो से भले तीन...

विजया : कमळ मी तुझ्यासाठी गावचे बोंबील, कोकम आणि काजू आणले आहेत . येते मी नंतर तुझ्याकडे घेऊन

कमळ : निकीतालाही घेऊन ये !

विजया : हो ! तुझ्यासाठी चहा करू का ?

कमळ : नको आता मला कविताला क्लासवरून आणायला जायचे आहे बर ! मी निघते आता . तुझे चालुदे !

कमळ निघून गेल्यावर विजया तिच्या मालिका पाहण्यात गुंग होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास निकिता चहा आणि बिस्कीट तिच्यासमोर आणून ठेवते तेव्हा कुठे ती त्यातून बाहेर येते.

निकिता : वहिनी ! हे तुझे मालिकांचे वेड कधी कमी होणार आहे ?

विजया : कधीच नाही ! तू चहा घेतलीस का ?

निकिता : हो मी घेतला.

विजया : विजय आणि यामिनीला ठेवलास का ?

निकिता : नाही ! त्यांच्यासाठी मी नवा करेन !

विजया : छान ! निकिता ... तुझ्या नोकरीचे झाल्यास तुला विजकडे राहायला काही अडचण नाही ना ?

निकिता : मला कसली अडचण ! यापूर्वी मी राहिले आहेच की त्यांच्या घरात !

विजया : ते आहेच ! विजय काय तुझ्यासाठी कोणी पारका नाही . त्याची बायको ही खूप समजदार आणि मायाळू आचे.

निकिता : हो ! विजयना खूप चांगली बायको मिळाली आहे.

विजया : माझी तर तुझे आणि विजयचे लग्न व्हावे अशीच इच्छा होती पण त्यावेळी विजय फार काही कमवत नव्हता आणि तुलाही श्रीमंत नवरा हवा होता. आज विजयकडे त्यावेळच्या तुझ्या अपेक्षेपेक्षा सर्वकाही जास्तच आहे.

निकिता : मग ! तेव्हा बोलली का नाहीस ?

विजया : त्या वेळच्या परिस्थितीला कदाचित ते धरून झाले नसते.

निकिता : आता त्याचा विचार करण्यात काही अर्थ नाही. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले आहे. विजयच्या मनात माझ्याबद्दल आणि माझ्या मानत त्यांच्याबद्दल तसे कधीच काही नव्हते.

विजया : हो ! ते मला माहीत आहे.

निकिता : मी जरा आत जाऊन कपड्याची आवरा आवर करते.

विजया : मी फ्रेश होते. जरा पावडर वगैरे लावते ती बाई कामाला आली की आपण जरा कमळकडे जाऊन येऊया !

निकिता : चालेल.

थोड्या वेळाने बाई आल्यावर त्या दोघी गावच्या कमळसाठी आणलेल्या भेट वस्तू घेऊन तिच्या घरी जातात. त्या माघारी येईपर्यत यामिनी घरी आलेली असते ती फ्रेश होऊन चहा पिऊन सोफ्यावर बसलेली असते. त्या माघारी येताच !

यामिनी : कोठे होतात तुम्ही ?

निकिता : आम्ही कामळकडे गेलो होतो.

यामिनी : बरं ! खूप गप्पा टप्पा झाल्या असतील.

विजया : म्हणजे काय ? तू कधी आलीस ?

यामिनी : हे काय आताच आले. मी येताना तुमच्यासाठी गरमा गरम समोसे आणले होते.

निकिता : सामोसे !

यामिनी : आवडतात का तुला ?

निकिता : हो ! खूपच आवडत्तात .

विजया : कोठे आहेत ?

यामिनी : किचन मध्ये आहेत मी आणि बाईंनी एक एक घेतला . बाकीचे तुम्ही खा किती हवे ते ..

निकिता : विजयना ?

यामिनी : नाही ! तो सामोसे खात नाही !

निकिता : का ?

यामिनी : त्याला डॉक्टरने मनाई केलेली आहे. त्याचे पोट किती सुटलेय ते पाहतेस ना ?

निकिता : म्हणूनच आम्ही सकाळी चालायला जाणार आहोत.

यामिनी : जा बाई त्याला घेऊन चालायला ... मला त्याच्या वाढलेल्या पोटाची काही अडचण नाही पण मला त्याच्या तब्बेतीची काळजी आहे. मी किती ठरवले तरी मला काय ते चालणे वगैरे शक्य होणार नाहे. तेव्हा तूच जात जा त्यच्या सोबत.

निकिता : चालेल !

विजया : दोन दिवस जालं त्यानंतर येरे मागल्या माझ्या देवा !

यामिनी : विजय कधी गेला बाहेर ?

निकिता : ते दुपारी जेऊन गेले.

यामिनी : त्याने मला फोन केला होता तो आज रात्री एका पार्टीला जाणार आहे.

विजया : कोणासोबत ?

यामिनी : कामिनीसोबत !

निकिता : कोण कामिनी ?

विजया : तीच टी.व्ही. वाली. मी तिच्या सोबतचा फोटो दाखवला होता ना तुला ! कधी टी.व्ही. वर आली की दाखवते तुला.

निकिता : चालेल !

यामिनी : माझ्यासाठी हे काही नवीन नाही. बरं ! आजचा स्वयंपाक संपूर्ण मांसाहारी करायला काही हरकत नाही.

विजया : हो ! आज आपण पार्टी करुया ! घरातल्या घरात ...

यामिनी : चालेल.

थोड्यावेळाने त्या तिघी स्वयंपाक घरात जाऊन बाईला काही सूचना देतात आणि मदातही करतात . स्वयंपाक झाल्यावर बाई निघून गेल्यावर तासभर गप्पा मारून झाल्यावर त्यांची पार्टी सुरु होते. म्हणजे पापड, कोशिंबीर , लोणचं , भाजलेले बोंबील , तळलेला जवला आणि त्यासोबत नाचण्याची भाकरी, साधा भात आणि त्यावर अंड्याचा रस्सा ! मनसोक्त जेवल्यानंतर त्या तिघी भांड्यांची आवर आवर करून झोपी जातात. विजय रात्री कधी तरी उशिरा येऊन यामिनीच्या बाजूला हळूच झोपतो. झ्पेत असतानाही ते तिच्या लक्षात येते पण ती काही उठत नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी रविवार असल्यामुळे यामिनी घरीच असते. मोलकरणीला सुट्टी असल्यामुळे यामिनीने स्वयंपाकघराचा ताबा घेतलेल्या असतो तिच्या मदतीला निकिता असते विजया घरातील इतर कामे करत असते. विजय मात्र अजून झोपलेला असतो कारण काल रात्री त्याला झोपायला उशीर झालेला असतो. त्या दोघी मिळून सकाळच्या नाश्त्यात कांदेपोहे, चहा आणि उपमा तयार करत असतात.

यामिनी : निकिता जा ! जरा विजयाला उठव !

निकिता : मी !

यामिनी : हो ! त्यात काय ?

निकिता : बरं !

निकिता विजयाला उठवायला त्यांच्या खोलीत जाते विजय आरामात झोपलेला असतो. झोपेतही त्याचा चेहरा प्रसन्न असतो त्याच्या त्या प्रसन्न चेहऱ्याकडे निकिता एक टक पाहत राहते. विजय कूस बदलताच निकिता त्याच्या उगद्या दंडाला हळूच हात लावून हलवते. तिच्या अनोळखी स्पर्शाने विजय झोपेतून खाडकन जागा होतो. समोर निकिताला पाहून तो एक टक तिच्याकडे पाहत राहतो.

निकिता : असं भूत पाहिल्यासारखे काय पाहताय माझ्याकडे ?

विजय : भूत इतके सुंदर नसते. नशीब मी यामिनी समजून तुला नेहमीसारखे..

निकिता : नेहमीसारखे काय ?

विजय : काही नाही. तू का आलीस मला उठवायला ? माझा मी उठलो असतो.

निकिता : मला यामिनीने सांगितले म्हणून मी आले.

विजय : बरं ! तू जा आता ... मी अंघोळ करून येतो बाहेर.

निकिता : चालेल !

थोड्या वेळाने ते चौघे नाश्ता करायला बसतात.

विजय : उपमा छान झाला आहे .

यामिनी : निकिताने केला आहे.

विजया : कांदे पोहे ही छान झाले आहेत.

यामिनी : मला तेवढेच छान करता येतात.

विजया : मी काय म्हणते आपण बाजारात जाऊन चिकन आणूया !

यामिनी : चालेल ! आपण माझ्या स्कुटी वरून जाऊन लगेच येऊ या ! निकिता तू घरीच थांब !

निकिता : चालेल ! मी बाकीची तयरी करते .

त्या दोघी निघून गेल्यावर विजय सोफ्यावर बसून टी. व्ही. पाहत असतो. निकिता बाहेर येऊन विजयच्या समोर बसून कांदा चिरत असते. कांदा चिरताना ती अधून मधून विजयकडे पाहत असते. त्यामुळे कांदा चिरताना सुरीने तिचे बोट कापून ती ओरडताच विजय लगेच उठून तिचे बोट हातात धरतो आणि समोरच्या छोट्या कपाटातून औषधाचा डबा काढून कापसाने जखम पुसून त्यावर मलम लावून पट्टी बांधतो.

निकिता : धन्यवाद !

विजय : तुझे लक्ष कोठे होते ? जास्त कापला असता म्हणजे ?

निकिता : इतकं काही नाही. हे होतं असतं असं घरातील कामे करतना.

विजय : मी काही मदत करू का कांदा कापायला

निकिता : नको ! कांदा कापताना तुमच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहतात.

विजय : आता नाही वाहत ! आता मला कांद्याची सवय झाली आहे.

निकिता : तरी नकोच ! मी तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का ? घेऊनच येते तसेही तुम्ही चहाला कधी नाही म्हणतच नाही.

विजय : हो ! घेऊन ये ! पण तुलाही घेऊन ये ! आपण एकत्रच चहा पिऊया ! नाहीतर तू माझ्या तोंडाकडे पाहत बसशील

निकिता : चालेल !

निकिता दोघांसाठी चहा घेऊन येते. चहा पिता पिता.

निकिता : मला स्वप्नातही वाटले नव्हते तुम्हीइतक्या लवकर इतके मोठे लेखक व्हाल म्हणून !

विजय : नशीब आणि यामिनी ..

निकिता : यामिनीवर तुमचे खूप प्रेम आहे नाही ?

विजय : प्रेम एकदाच होते . ते माझे आणि तिचेही करून झालेले आहे. आता आम्ही आवडतो एकमेकांना ! आमचा जीव आहे एकमेकांवर ! निकिता ! तू कधी कोणावर प्रेम केलेस का ?

निकिता : ज्याच्यावर मी प्रेम करायला हवं होतं अशी एक व्य्क्ती होती माझ्या आयुष्यात पण तेंव्हा मला प्रेमाची किंमत माहित नव्हती. त्यामुळे माझे प्रेम करणे राहूनच गेले.

विजय : तुझे तुझ्या नवऱ्यावर प्रेम नव्हते.

निकिता : नव्हतेच कदाचित कारण मी त्याची श्रीमंती पाहून त्याच्याशी लग्न केले होते. लग्न केले होते म्हणून मी त्याला तनाने आणि मनाने समर्पित झाले होते. एकमेकांबद्दल प्रेम वाटावे असे कधी आमच्या आयुष्यात काही घडलेच नाही. तो माझ्याकडे फक्त आपली शारीरिक गरज भागविण्याचे साधन म्हणूनच कदाचित पाहत होता. त्यामुळेच मला कळले आयुष्यात आपल्यावर कोणाचे तरी प्रेम असणे किती गरजेचे असते. आता माझ्या बोटाला जखम होताच तुम्ही कशी लगेच मलम पट्टी केली. तो असता तर माझ्यावरच ओरडला असता.

विजय : लाग्नाबाबतच्या तुझ्या ज्या अपेक्षा होत्या त्या चुकीच्या आहेत असे मला तेव्हाही वाटत असे पण मला तुला दुखवायचे नव्हते म्हणून मी काही बोललो नाही.

निकिता : तुम्ही बोलायला हवे होते.

विजय : ह्या जर तरच्या गोष्टी आहेत . आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याला आपले प्रारब्ध बदलता येत नाही. कोणी कोणाच्या आयुष्यात अपघाताने येत नाही. प्रत्येक जण कोणाच्याही आयुष्यात त्याच्या ठरलेल्या वेळीच येतो.

निकिता : म्हणजे माझे तुमच्या घरी राहायला येणे हे विधीलिखित आहे.

विजय : हो !

निकिता : तुमचे हे विचार ऐकून मला पूर्वी वाटायचे तुम्ही संन्याशी अथवा आखादा साधू व्हाल म्हणून !

विजय : यामिनी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी नक्कीच तेच झालो असतो.

निकिता : म्हणजे ! यामिनी तुमच्या आयुष्यात येणे हा योगायोग नव्हता.

विजय : नाही ! तसे नाही म्हणता येणार ... तिचा नवरा वारल्यावर नियतीने तिला पुन्हा मुंबईला आणले आणि आमची भेट घडली.

निकिता : माझ्या नशिबात नियतीने काय लिहिले असेल देवच जाणे.

विजय : असे म्हणतात नियती प्रत्येक माणसाला तितकेच दु:ख देते जितके सहन करण्याची त्याची क्षमता असते.

निकिता : पण आता माझी दु:ख सहन करण्याची क्षमता संपलेली आहे.

विजय: आयुष्यात सुखासोबत दु:ख आहे म्हणून जगण्यात मजा आहे.

निकिता : बोलता बोलता माझे कांदे कापूनही झाले. मी आता जाऊन मसाला मिक्सरला लावते.

विजय : हो ! जा ! काही मदत लागली तर मला हाक मार.

निकिता : म्हणजे तुम्ही मला स्वयंपाकातही मदत करणार ?

विजय : मलाही स्वयंपाक करता येतो हे विसरलीस की काय तू ?

निकिता : नाही ! मी अजिबात विसरलेले नाही. मला वाटले तुम्ही आता प्रसिद्ध व्यक्ती झाला आहात म्हणून अशी हलकी कामे करत नसाल.

विजय : माझ्या दृष्टीने कोणतेही काम हलके वगैरे नाही. प्रत्येक कामाचे आपल्या जागी एक महत्व असते.

निकिता : तरीही नाही !

निकिता स्वयंपाकघरात गेल्यावर यामिनी आणि विजया बाजार करून येतात.

विजय : तुमची सोय झाली आता माझ्यासाठी काय करणार आहात ?

विजया : तुझ्या नावावर नेमक्याच भाज्या केलेल्या आहेत त्यापैकी एक करू ! थोडा बदल म्हणून तुझ्यासाठी फार फार भाजी करू कांदा बटाट्याचे ! वडे तर तू खाशीलच .

विजय : म्हणजे काय ? जे काही करायचे ते लवकर करा .

यामिनी : हो ! बाबा लवकर करू ...निकिता कोठे आहे ?

विजय : ती स्वयंपाकघरात आहे. कांदा चिरताना बोट कापून घेतले आहे.

विजया : ही निकिताना थोडी धांदरट आहे. फार लागलं नाही ना ?

विजय : नाही !

लगेच त्या दोघी स्वयंपाकघरात जातात.

यामिनी : निकिता ! फार लागलं नाही ना ?

निकिता : नाही ! फार काही लागलं नाही.

विजया : मसाला तयार झाला असेल तर तू .. भात लाव तोपर्यत मी मटन साफ करते,

यामिनी : मी वड्यांचे पीठ मलायला घेते.

निकिता : चालेल

त्या तिघी मिळून दोन एक तासात स्वयंपाक तयार करतात त्यानंतर ते चौघे जेवायला बसतात.

यामिनी : विजय ! तुला सोयाबीनची भाजी आवडली ना ?

विजय : हो ! निकिताने केलेली दिसतेय !

यामिनी : तुला कसे काय कळले ?

विजय : आमची आई करायची तशी केलेली आहे. म्हणजे आईच्या सांगण्यावरून एकदा निकिताने केलेली होती.

यामिनी : निकिताला तुझ्या जवळ जावळ सर्व आवडी निवडी माहीत आहेत.

निकिता : हो ! सर्वच नाहीत पण बऱ्यापैकी !

विजया : यामिनी वडे छान झाले आहेत.

यामिनी : मटन तर एकदम जबरदस्त ... अगदी हॉटेल सारखे चविष्ठ झालेले आहे.

सर्व पोट फाटेस्तोवर जेवून उठतात .

थोडावेळ गप्पा मारल्यावर झोपायला जातात. विजय मात्र हॉलमध्येच सोफ्यावर आडवा पडतो.

संध्याकाळी सर्वजण बऱ्यापैकी झोपेत असताना दारावरची बेल वाजते विजय झोपेतून जागा होत दर उघडतो तर दारात प्रतिभा तिच्या मुलांसह उभी असते. विजय तिला आत घेतो...

विजय : प्रतिभा ये ! ये ! बस... मी उठवतो सर्वाना !

प्रतिभा : कशाला ? मीच जाऊन उठवते. प्रतिभाच्या आणि मुलांच्या आवाजाने सर्व झोपेतून जागे होतात. विजया बाहेर येताच प्रतिभाला मिठीत घेते त्यानंतर यामिनीही ! निकिता ते सारे प्रेमाने पाहत असते.

यामिनी : प्रतिभा ! आज अचनक आलीस ?

प्रतिभा : हो ! आज खूप दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला नाहीतर काहीतरी सुरू असतेच त्यात आपण जो फराळाचा उद्योग सुरु केला आहे तो ही खूप वाढला आहे. अधुन – मधून आखाद्या मालिकेत काम मिळतच असते हल्ली.

विजया : प्रतिभा ! तुझे हे यश पाहून मला खूप आनंद होत आहे.

प्रतिभा : माझ्या यशात अनेकांचा वाटा आहे. ही कोण ?

विजया : ही माझी नणंद निकिता ! मागे सांगितले होते ना जिच्याबद्दल ती...

निकिता : मी पहिले आहे तुला मालिकेत. तू छान अभिनय करतेस !

विजया : मी येणारच होते तुला भेटायला ! बरे झाले तूच आलीस . आता मुलांना कोण सांभाळत ?

प्रतिभा : माझे नणंद आली आहे गावावरून ती सांभाळते.

यामिनी : काय ? मुलांनो कसे आहात ?

श्रावणी : मावशी मी मजेत आहे , तुझी खूप आठवण येत होती.

श्रावण : मलाही !

यामिनी : बरं मी तुमच्यासाठी खाऊ आणते.

प्रतिभा : विजया तू अचनक मुंबईला आलीस काही खास काम ?

विजया : निकिता नोकरीच्या शोधात आहे. माझे कामही होते थोडे ? आमच्या बिझनेस मध्ये तिला रस घ्यायला सांगितला तर ते ती नको म्हणते. तिला काहीवर्षे जरा गावापासून लांब राहायचे होते.

प्रतिभा : इतकंच ना ! मग तिला आमचा बिझनेस सामंभाळूदे ! आम्हाला गरज आहे एका चंगल्या शिकलेल्या मुलीची ! त्यात आपल्याकडे काम करणाऱ्या सर्व महिलाच आहेत.

यामिनी : हे माझ्या लक्षातच आले नाही.

प्रतिभा : चालेल ना विजया ?

विजया : निकिताला चालणार असेल तर मला काही समस्या नाही.

निकिता : मला आवडेल !

प्रतिभा : मग ठरलं ! येत्या दोन – चार दिवसात तू कधीची जॉईन हो !

निकिता : चालेल !

यामिनी मुलांसाठी खाऊ घेऊन येते. तो ते खाऊन झाल्यावर कविताला भेटायला तिच्या घरी जातात.

विजय : मी आहे म्हटलं येथे !

विजया : आम्हा बायकात तुझ काय काम ! आम्ही आत जाऊन गप्पा मारतो.

विजय : आत कशाला येथेच मारा मी जरा बाहेर जाऊन येतो. 

यामिनी : हो ! चालेल !! आरामात ये ! जेवायलाच !

विजय बाहेर निघून गेल्यावर त्या चौघी हॉलमध्येच गप्पा मारत असतात इतक्यात कमळही तेथे येते.

कमळ : मुलं खेळता आहेत माझ्याकडे ! प्रतिभा ! मी तुलाच भेटायला आले. हल्ली मला आपल्या कारखान्यात यायला मिळाले नाही बरेच दिवस सर्व ठीक आहे ना तिकडे !

प्रतिभा : हो सर्व ठीक आहे. आता निकीताही आपल्याला सामील होणार आहे.

कमळ : हे उत्तम होईल ! सगळ्यावर लक्ष ठेवायला आपलाच माणूस असणे योग्य . आता तू जेवूनच जाणार असशील ना ?

यामिनी : म्हणजे काय ?

कमळ : पण मुलं माझ्याकडेच जेवतील कविता सोबत.

प्रतिभा : हो ! चालेल.

विजया : प्रतिभा ! तुझ्यातील हा वाढलेला आत्मविश्वास पाहून मला खूप आनंद होत आहे.

प्रतिभा : माझ्या मागे एक नाही तर पांच – पाच देव्या उभ्या आहेत . एक – यामिनी ताई, दोन – कमळ ताई, तीन – कामिनीजी आणि चार निलिमा... आणि पाचवी तू !

यामिनी : चला आता रात्रीच्या जेवणाची तयारी करुया !

विजया : आता येताना कशी आलीस ?

प्रतिभा : मी स्कुटी घेतली आहे नवीन ! मला चालवायला यामिनी ताईने शिकविले.

यामिनी : निकिता ! तुला येते ना स्कुटी चालवायला ?

निकिता : हो ! पण मुंबईच्या रस्त्यांवर सध्या तरी नको !

प्रतिभा : चला जेवणाची तयारी करुया !

विजया : तू छान नटून आली आहेस ! तू बस आम्ही करतो.

प्रतिभा : माझ्या तोंडाला मेकप लागलेला आहे पण माझ्या हाताला मेहंदी लागलेली नाही.

विजया : बरं बाई ! चल आपण मिळून जेवण करुया !

त्या तिघी मिळून स्वयंपाक करतात. स्वयंपाक झाल्यावर यामिनी विजयला फोन करते. विजय बाहेरून आल्यावर ते सर्वजण जेवायला बसतात.

विजया : प्रतिभा तू इतकी यशस्वी झाली आहेस तर तुझ्या यशाची तू आम्हाला पार्टी द्यायला हवी.

प्रतिभा : चालेल तुम्ही म्हणाल तेंव्हा !

विजय : पनीरची भुर्जी छान झाली आहे प्रतिभा ! कुकिंगचे शो करून तुझ्या हाताची चव आणखी वाढली आहे.

प्रतिभा : हो ! आज खूप दिवसांनी असं एकत्र जेवताना मला खूप आनंद होत आहे इतका की मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही.

यामिनी : आपण सुरु केलेला छोटासा व्यवसायही तू किती मोठा केला आहेस.

विजया : जाताना मी तुझ्यासाठी गावच्या वस्तू आणल्या आहेत त्या घेऊन जा !

प्रतिभा : म्हणजे काय ? मी एक दिवस वेळ काढून तुझ्या गावी येणार आहे फिरायला.

विजया : एक दिवस काय ? चांगली आठवडाभर ये !

सर्वांची जेवणं झाल्यावर ते सर्व बडीशेप खात बसलेले असतात. इतक्यात कमळ कावितासह तिच्या मुलांना घेऊन येते.

प्रतिभा : मी निघते आता ! पुन्हा येईन दोन चार दिवसात वेळ काढून ! विजया मला निकीताचा फोन नंबर पाठवून ठेव ! आपण बोलू नंतर फोनवर.

प्रतिभा निघाल्यावर विजय तिला बाहेर गाडी पर्यत सोडायला जातो. तो माघारी आल्यावर

निकिता : चला मी भांडी आवरायला घेते.

यामिनी : मी ही येते !

विजया : काशाला ? वाहिनी तू बसं कमळ जवळ गप्पा मारत. मी आणि निकिता पाहतो काय ते !

यामिनी : बरं ... कमळ तू जेऊन आलीस का ?

कमळ : हो ! मी जेवूनच आले.

यामिनी : भावोजी काय करता आहेत ?

कमळ : ते काय करणार ? खाली गेले आहेत सिगारेट ओढायला !

यामिनी : निकिता आता आपला उद्योग जॉईन करणारच आहे तर आपण पण एकदा तेथे जाऊन सारे कसे काय चालले आहे ते पाहूया ! नुसती सर्व जबाबदारी प्रतिभावर सोपवून चालणार नाही. आपण हा उद्योग सुरु केला तेंव्हा फक्त प्रतिभाला आर्थिक हातभार हा आपला उद्देश होता. पण आता आपला उद्योग खूप वाढला आहे त्यावर कित्येक बायकांचा संसार उभा आहे. तरी नशीब विजय अधून मधून जाऊन तिथले आर्थिक व्यवहार पाहत असतो. या कामी आपल्याला भावोजीची खूप मदत झाली.

कमळ : तू बोलतेस ते बरोबर आहे. आपणही आता आपल्या उद्योगासाठी थोडा वेळ काढूया !

विजय : खरचं ! तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठा झाला आहे तुमचा बिझनेस !

यामिनी : तुमच्या उद्योगाचा पसाराही आता वाढतोय !

विजय : हो ! पण माझा उद्योग सांभाळायला खूप कुशल माणसे आहेत. 

कमळ : आपला उद्योग असा आहे की त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

यामिनी : हो ! कळतेय मला ! अजून काही वर्षे त्यानंतर मी माझी नोकरी सोडून आपल्या उद्योगाकडेच लक्ष द्यायचे ठरवले आहे.

विजय : हे उत्तम होईल...

कमळ : कविता आणखी थोडी मोठी झाली की मलाही वेळ देता येईल.

इतक्यात विजया आणि निकिता बाहेर येतात. झाली आवरा आवर करून भांड्यांची आता झोपू या का ? यामिनी वाहिनी तुलाही सकाळी ऑफिसला जायचे आहे ना ?

कमळ : मी ही निघते आता आपण उद्या बोलू !

कमळ निघून गेल्यावर विजया आणि निकिता त्यांच्या रुममध्ये झोपायला गेल्यावर यामिनीही लाडाने विजयचा हात धरून त्याला प्रेमाने खेचत त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते.

दोन - चार दिवसांनी विजया आणि निकिता गावाला निघून गेलेल्या असतात. निकिताचे तिच्या काही गावी राहिलेले गरजेच्या वस्तू घेऊन पुन्हा माघारी मुंबईला येणार असते. त्यामुळे मोलकरीण घरातील कामे करून निघून गेल्यावर विजय एकटाच घरात बसलेला असतो इतक्यात दारावरची बेल वाजते. विजय दर उघडून कामिनीला आत घेतो.

विजय : कामिनी ! ये ! बस ! आज अचानक कशी काय आलीस ?

कामिनी : आपल्यात झालेल्या त्या गोष्टी नंतर तू मला भेटायला माझ्या घरी एकदाही आला नाहीस.

विजय : कामिनी तू माझ्यात दबून राहिलेल्या ठिणगीला हवा दिलीस त्यामुळे तो प्रकार घडला.

कामिनी : त्या झाल्या प्रकाराबद्दल मी तुला दोष देतच नाही. जे काही झाले त्यात माझीच चूक होती हे मी मान्य करते ना !

विजय : पण त्या झाल्या प्रकारामुळे मी माझ्या नजरेत उतरलो त्याचे काय ?

कामिनी : अरे पण ! मी दारूच्या नशेत होते तू तर शुद्धीत होतास. तू आवरायचे मला.

विजय : तू असा काही माझ्या शरीराचा ताबा मिळविलास की मी ही नाही आवरू शकलो स्व:ताला.

कामिनी : ठिक आहे ना ! कित्येक दिवस आपल्या दोघांच्याही शरीरात धगधगत राहिलेली आग शांत झाली. अपघाताने का होईना !

विजय : जे मी कधीच कोणाला म्हणजे अगदी माझ्या लग्नाच्या बायकोलाही दिले नव्हते ते तुला देऊन बसलो. त्याचेच प्रायश्चित्त म्हणून मी यामिनीलाही तिला जे हवे होते ते देऊन टाकले.

कामिनी : माझा तू तुझ्या बायकोवर प्रेम करण्याला विरोध नाहीच ! तुझ्याबद्दल माझ्या ह्दयात कित्येक वर्षापासून दबून साटून राहिलेले प्रेम अचनक दारूच्या नशेत उफाळून आले आणि कदाचित जे घडायला नको ते घडले. त्यापूर्वी मी कधी तुझ्याशी तशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला होता का ?

विजय : यामिनीला वाटते मला माझी चूक कळली अथवा माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम उफाळून आल्यामुळे माझे आणि तिचे शारीरिक संबध आले तर ते तसे नाही. तुझ्यासोबत मी जी माती खाल्ली त्याचे ते प्रायश्चित्त होत.

कामिनी : आपण तो एक अपघात होता असे समजून तो झालेला प्रकार विसरून नाही का जाऊ शकत.

विजय : जिच्या आठवणीत मी माझ्या भावांना शारीरिक गरजांना आवर घातला होता. तुझ्या मुळे माझ्या त्या आठवणीना तडा गेला आहे.

कामिनी : तुला तुझ्या आठवणींचे पडले आहे मी इतके वर्षे मनापसून जपलेले माझे कौमार्य तुला अर्पण केले त्याचे तुला काहीच नाही.

विजय : तेच तर नको व्हायला हवे होते. तु मला तुझ्या मगरमिठीत घेतलेस आणि तुझ्या अप्रतिम सौंदर्यासमोर मी गळून पडलो.

कामिनी : म्हणजे तू हे मान्य करतोस जे काही झाले त्यात माझ्या एकटीची चूक नव्हती.

विजय : हो ! हे मी मान्य करतो. पण माझ्या आयुष्यात मी फक्त एकिच्याच शरीराची कामना केली होती पण तिने शरीर अशा माणसाला समर्पित केले ज्याला फक्त आणि फक्त तिच्या शरीरातच रस होता.

कामिनी : मग ! आता कशाला तुला तिच्या आठवणी जपायच्या आहेत ?

विजय : कामिनी ते तुला कधीच कळणार नाही ! तू कधी कोणावर खरे प्रेम केले नाहीस ना !

कामिनी : मी कधी खरे प्रेम केले नाही. म्हणजे माझे तुझ्यावरचे प्रेम कधी तुला दिसलेच नाही. माझे तुझ्यावर खरे प्रेम होते म्हणूनच त्या बेसावध क्षणी मी तुला समर्पित झाले.

विजय : मला माहित होते तुझे माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळेच मी तुझ्या प्रेमाला कधी विरोध केला नाही. फक्त तुझेच नाही यामिनीचे, प्रतिभाचे आणि निलीमाचेही माझ्यावर प्रेम आहे. पण त्यांनी त्यांचे प्रेम कधीही माझ्यावर लादले नव्हते. आता तू विषय काढलास म्हणून सांगतो. यामिनी माझे पहिले प्रेम होती. माझ्या मनात तिच्याबद्दल फक्त आणि फक्त निर्मल प्रेम होते. तिच्याबद्दल मला शारीरिक आकर्षण नव्हते. तिच्यानंतर माझ्या आयुष्यात प्रतिभा आली. माझे प्रतिभावर फक्त प्रेमच नव्हते तर शारीरिक आकर्षण ही होते ती माझ्या मागे इतकी वेडी होती की ती सहज मला तेव्हा समर्पित झाली असती. पण मी कधीही तिचा गैरफायदा घेतला नाही. मला आयुष्यात खूप यशस्वी व्हायचे होते त्यामुळे माझ्या मनात तिच्यासोबत लग्न करण्याचा विचार येत नव्हता. ते तिच्याही लक्षात आले. माझ्यासाठी ती थांबू शकत नव्हती. त्यामुळे ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेली. त्यनंतर हया ना त्या कारणाने माझ्या आयुष्यात अनेक मुली आल्या. माझ्यातील कवीवर त्यांचे प्रेम होते. पण माझ्याकडे त्यावेळी पैसा नव्हता त्यामुळे त्या माझ्यावर प्रेम करत राहिल्या पण त्यातील एकीने ही माझ्यासोबत लग्न करण्याचा विचार कधीच केला नाही. मला सतत वाटायचं कोणी तरी मला भेटेल जी फक्त आणि फक्त माझ्यावर प्रेम करेल. माझ्या आयुष्यात एक मुलगी आली जिचे माझ्यातील कवीवर प्रेम होते पण माझ्यावर नव्हते. तिला तिच्या आयुष्यात श्रीमंत जोडीदार हवा होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कोणासाठी तरी माझ्या आवडी – निवडीही सोडायला तयार होतो. पण तिला माझे तिच्यावरील प्रेम कधी कळलेच नाही. तिने एका श्रीमंत मुलासोबत लग्न केले. त्यानंतर माझा प्रेमावरचा विश्वासच उडाला आणि मी आयुष्यभर लग्न न करता अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्यात योगायोगाने यामिनी आली. आम्ही फक्त जगासाठी नवरा बायको झालो . खरंतर आम्हाला फक्त एक सामिजिक ओळख हवी होती. पण नंतर यामिनीही माझ्या प्रेमात पडली. तिला ही माझ्याकडून शारीरिक सुखाची इच्छा निर्माण झाली. तरीही मी तिला टाळत आलो. पण त्या दिवसही तू माझ ब्रम्हचर्य नष्ट केलेस. माझ्या आयुष्यात जिच्याशी माझे पहिल्यांदा शारीरिक संबंध आले ती तू होतीस ! यामिनी माझ्या आयुष्यात नसती तर या चुकीचे प्रायश्चित्त म्हणून मी तुझ्याशी लग्न केले असते.

कामिनी : आपल्यात जे काही घडले त्यामुळे तू माझ्याशी लग्न करावे अशी माझी अजिबात इच्छा नाही . तुझ्यासोबत घालविलेले ते काही क्षण मला आता आयुष्यभर पुरातील तुझ्यावरील प्रेमात आयुष्य काढायला. पण निलिमा ! कधी म्हणाली नाही की तिचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून !

विजय : कशी म्हणेल ? तिला माहित आहे की तुझे माझ्यावर प्रेम आहे.

कामिनी : तरीही ... ती तुझ्या प्रेमात पडली ?

विजय : कोणी कोणाच्या प्रेमात पडावे यावर कोणाचे नियंत्रण नाही. माझ्यातील पुरुष आवडला असेल तिला जसा तो इतर स्त्रियांना आवडतो. पण तिचे माझ्यावरील प्रेम निरपेक्ष आहे. तिला माझ्याकडून कोणतीच अपेक्षा नाही.

कामिनी : का ?

विजय : तिलाही प्रेमात धोका मिळाला आहे. तिचे एका तरुणावर जीवापाड प्रेम होते पण एका अपघातात तिचे गर्भाशय निकामी झाले आणि ती आता आई होऊ शकत नाही हे कळल्यावर त्याने तिला सोडून दुसरी सोबत लग्न केले.

कामिनी : निलिमा हे कधी मला बोलली नाही.

विजय : आपल्यात त्या दिवशी जे काही झाले त्याबद्दल मी निलिमाला सांगितल्यावर ती मला म्हणाले,’’ तो एक अपघात समजून विसरून जा !

विजय : मी नाही विसरू शकलो त्यामुळे मी माझा माझा वेळ घेत होतो. त्यामुळे नाही भेटायला येऊ शकलो.

कामिनी : म्हणूनच मी तुला भेटायला आले. मला तुला काहेतरी सांगायचे होते पण आता नाही सांगणार ! मी काही वर्षासाठी एका प्रोजेक्टवर काम करण्यासाठी परदेशात चालले आहे. त्यामुळे आता आपली भेट इतक्यात होईल की होणारच नाही ते मला माहित नाही.

विजय : इतक्या घाईत तू असा निर्णय नको घ्यायला हवा होतास !

कामिनी : आता माझे ठरले आहे. मला आता तुझ्या आयुष्यात ढवलाढवल करायची नाही. मी आज रात्रीच्याच विमानाने जाणार आहे. पण माझ्या आयुष्यात मी कधीही तुला विसरणार नाही.

विजय : मी ही तुला कधीच विसरणार नाही.

कामिनी विजयला प्रेमाने आलिंगन देते. आलिंगन देताना तिचे अश्रू त्याच्या खांद्यावर टपटप गळतात. ते नपुसताच त्याच्या मिठीतून मोकळे होत ती पाठीमागे वळून न पाहता सरळ निघून जाते. विजयही तिला निरोप देताना त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू न पुसता तसेच त्याच्या चेहऱ्यावर सुकू देतो.

संध्याकाळी यामिनी घरी आल्यावर विजय सोफ्यावरच विचार करत बसलेला तिने पाहिला.

यामिनी : काय झाले असा का उतरलेल्या चेहऱ्याने विचार करत बसला आहेस ?

विजय : काही नाही ! असचं ...

यामिनी : असंच काय ? तू सांगितले नाहीस म्हणून मला कळणार नाही का ? यामिनी माझीही मैत्रीण आहे म्हणे ! आज रात्रीच्या विमानाने ती परदेशात जाणार आहे काही वर्षासाठी. ते सांगायला ती येथे आपल्या घरी आली होती म्हणून तू नाराज आहेस ना ! त्यात काय ? ती नाही आली आपल्याला भेटायला तर आपण जाऊ तिला भेटायला परदेशात. त्यानिमित्ताने आपली परदेश वारी होईल. चल ! इतक्यात बाई येईल. तोपर्यत मी आपल्यासाठी चहा बनविते.

विजय : नको ! तू फ्रेश हो ! मी आपल्यासाठी चहा बनवतो.

यामिनी : चालेल. नवऱ्याच्या हातचा चहा पिण्यात काही मजाच और असते.

थोड्यावेळाने विजय आणि यामिनी चहा पीत असताना कमळ तेथे येते.

कमळ : कामिनी काही वर्षासाठी परदेशात चालली आहे. दुपारी भावोजीना भेटायला आलेली तेंव्हा मलाही भेटून गेली. जरा उदास वाटत होती.

यामिनी : उदास ! होणारच ना ! सर्व आपल्या आवडत्या माणसाना असे अचनक सोडून काही वर्षासाठी परदेशात जायचे म्हणजे.

कमळ : हो ! तू बरोबर बोलतेयस. चल मी निघते मला कविताला क्लासवरून आणायचे आहे.

यामिनी : चालेल !

विजय : मी तयार होऊन निघतो. मी जातो कामिनीला विमानतळावर सोडायला.

यामिनी : हो ! तू जा ! माझ्या तर्फे तिला तिचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून शुभेच्छा दे !

विजय : हो !

विजय तयार होऊन घरातून बाहेर पडतो. रात्री खूप उशिरा कामिनीला विमानतळावर सोडून तो घरी येतो आणि यामिनीला न उठवताच झोपी जातो.

त्यनंतर काही दिवसांनी एका दुपारी निलिमा त्याला भेटायला येते.

ते दोघी चहा पिता पिता गप्पा मारत असतात...

निलिमा : सर तुमच्या भाडेकरू कादंबरीची आपण लवकरच दुसरी आवृत्ती प्रकाशित करतोय !

विजय : उत्तम ! माझी पुढची कादंबरीही पूर्ण होण्याच्या मार्गावरच आहे.

निलिमा : सर ! कामिनीने तुम्हाला फोन वगैरे केला की नाही.

विजय : नाही ! आणि मी केला तर तिचा फोन स्वीच ऑफ येतोय ! हल्ली ती सोशल मेडियावरही नसते. काय भानगड आहे काही कळत नाही.

निलिमा : मी चौकशी करते आणि काही कळले तर सांगते. सर ! त्या दिवशी तुमच्यात आणि तिच्यात जे काही झाले कदाचित तिने आपल्या सगळ्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असेल.

विजय : नाही ! जितकं मी तिला ओळखतो ! तेवढ एकच कारण नाही आणखीही काहीतरी कारण आहे जे मला माहित नाही.

निकिता : कामिनीचे खरंच तुमच्यावर खूप प्रेम होते. तसे माझेही तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तिच्या इतके नाही.

विजय : आता तू सुरू झालीस !

निलिमा : बर ! तो विषय जाऊद्या ! प्रतिभा म्हणत होती कोणी तुमच्या बहिणीची विधवा नणंद आहे तीने त्यांचा मैत्रीण गृहउद्योग जॉईन केला आहे.

विजय : हो ! आता ती आमच्याकडेच राहते.

निकिता : दिसायला खूप सुंदर आहे म्हणे !

विजय : तुझ्या इतकी नक्कीच नाही. कामिनी इतकी तर नाहीच नाही.

निकिता : सर ! मला तुम्हाला भेट म्हणून काही तरी घ्यायचे आहे , काय घेऊ ?

विजय : मला जे आवडते ते कोणी मला भेट म्हणून देऊ शकत नाही.

निकिता : काय ?

विजय : शूज ...

निकिता मी घेऊच शकते पण त्यासाठी तुम्हाला माझ्या सोबत यावे लागेल ते ही आत्ताच !

विजय : चालेल !

विजय तयार झाल्यावर तो आणि निलिमा घरातून बाहेर पडतच असतात. निकिताने विजयचा हात हाताने धरलेला असतो इतक्यात समोरून निकिता येते. निकिता पाहून न पहिल्या सारखे करते.

विजय : निकिता आम्ही जरा बाहेर चाललो आहोत ! एक कार्यक्रम आहे. यामिनीला सांग मी निकिता सोबत गेलो आहे. रात्री जेवायला येणार नाही.

निकिता : हो ! सांगते.

त्या संध्याकाळी यामिनी घरी आल्यावर

यामिनी : विजय ! कोठे गेला काही तुला माहीत आहे का ? त्याचा फोन लागत नाही.

निकिता : मी आले तेंव्हा ते बाहेर गेले त्यांच्यासोबत कोणी सुंदर तरुणी होती. काय बर नाव तीचं हा ! आठवलं... निलिमा !

यामिनी : निलिमा होती होय ! ती विजयाच्या पुस्तकांची प्रकाशक आहे. माझी आणि प्रतीभाची ती खास मैत्रीण आहे. खूप चांगली, प्रेमळ आणि मनमिळावू मुलगी आहे.

निकिता : असं होय ! तरीच हातात हात घालून गेले.

यामिनी : ते तसेच जातात. त्यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. मुंबई सारख्या शहरात हे असे चालते. तुला कळेल हळूहळू !

निकिता : जेवायला काय करुया रात्री ! बाई आज आली नाही कामावर ! तिची तब्बेत बरोबर नाही.

यामिनी : विजय निलिमा सोबत गेला आहे म्हणजे जेवायला येणार नसेलच !

निकिता : हो !

यामिनी : काही हरकत नाही ! आज आपण स्वयंपाक करूयाच नको ! आपण एखाद्या छान हॉटेलात जाऊ ! थांब मी प्रतिभा आणि ककमळला फोन करते मजा करू !

यामिनी प्रतिभा आणि कमळला फोन करते.

निकिता : लागला का फोन ?

यामिनी : हो ! प्रतिभा तिची स्कुटी घेऊन येणार आहे . कमळ तिच्या मागे बसेल तू माझ्या स्कुटीवर माझ्या मागे बस ! आज आपण चौघी पार्टी करुया ! निकिता ! तुझे काम कसे चालले आहे ? काही त्रास नाही ना ?

निकिता : आपल्याच व्यवसायात कसला आलाय त्रास ! सर्वच बायका खूप चंगल्या आहेत. काम अगदी उत्तम चालले आहे. आपल्याला जितकी मागणी आहे तितका माल आपण तयार करू शकत नाही.

यामिनी : यां विषयावर आपण हॉटेलात जेवता जेवता चर्चा करू. तू चान तयार हो ! मी ही तयार होते. कमळ तयार होऊन आली की आपण खाली जाऊ आणि प्रतिभाला फोन करून बोलावून घेऊ !

निकीतां : पण त्यंची मुलं !

यामिनी : त्यांचे नवरे कधी कामी येणार !

निकिता : हो ! ते ही बरोबर आहे.

त्या दोघी तयार होऊन बसलेल्या असतात इतक्यात कमळ आल्यावर त्या घरातून बाहेर पडतात. रात्री उशिरा त्या माघारी येतात.

कमळ : मी जाते आता ! शुभ रात्री !

यामिनी : हो हो ! निकिता ! जेवण आवडलं का ?

निकिता : हो ! इतक्या मोठ्या हॉटेलात मी पहिल्यांदाच गेले.

यामिनी : आम्ही तरी कोठे रोज जातोय तेथे ! विजय घेऊन जातो मला कधी त्याचा मूड चांगला असेल तर ! त्या हॉटेलचे मालक विजयच्या ओळखीचे आहेत. म्हणून आम्ही तेथेच जातो.

निकिता : विजयनी ! त्यांच्या आयुष्यात किती मोठ मोठी माणसे जोडली आहेत नाही.

यामिनी : पण विजय ! त्याच्या श्रीमंत मित्रांकडूनही कधी कसली अपेक्षा ठेवत नाही. म्हणूनच त्याला इतका मान आहे. माणसाने आयुष्यात पैसा कमावला नाही तरी चालेल पण माणसे कमवायला शिकायला हवे !

निकिता : हो ! पण मला माझ्या आयुष्यात ते उशिरा कळले.

यामिनी : प्रत्येक गोष्ट कळण्यासाठी एक वेळ यावी लागते .

निकिता : हो !

यामिनी : चला फ्रेश होऊ या ! झोपायची तयारी करायची आहे.

निकिता : विजय...

यामिनी : तो येईल आणि झोपेल ! त्याच्याकडे चावी असेल.

त्या दोघी हे बोलतच असतात इतक्यात विजय हातात दोन बॉक्स घेऊन आत येतो.

यामिनी : हे काय आहे ?

विजय : शूज आहेत.निलिमाने मला भेट दिले आहेत.

यामिनी : शूज कधी कोणी कोणाला भेट देत का ?

विजय : म्हणूनच ती मला सोबत घेऊन गेली.

यामिनी : मला पाहू दे ! इतके कोणते शूज घेतले ते.

विजय : हे ! घे !

यामिनी : खूप महागातले शूज आहेत. ती बोलली म्हणून तू इतके महागातले शूज घेतले.

विजय : ती याच्याहून महागातले घेत होती.

यामिनी : बरं ! आता घेतलेच आहेत तर घाल ते ! शोकेसला लावू नकोस ! तुझी कपाटे दोनच गोष्टीनी भरतात एक म्हणजे पुस्तके आणि दुसरी गोष्ट शूज !

विजय : त्याला ही एक कारण आहे मी दहावीत असताना एकदा जुनी स्लीपर घालून शाळेत गेलो होतो तेंव्हा शाळेचा शिपाई मला म्हणाला होता. किती जुनी झाली आहे स्लीपर ! आता तरी बदल ! त्यावेळी मला खूप वाईट वाटले होते. त्यानंतर मी कामाला राहिलो. एक वेळ मी नवीन कपडे घेतले नाही पण शूज आणि चपला मात्र नव नवीन घेत राहिलो.

यामिनी : तुझा भूतकाळ ! पण मी तुझ्या सोबत एकाच वर्गात शिकत असतानाही मला तुझे दु:ख कधी दिसले नाही की जाणवले नाही.

विजय : कारण मी चेहऱ्यावर विदुषकाचा मुखवटा चढवूनच जन्माला आलो होतो. 

यामिनी : निकिता ! तू जाऊन झोप आता ! विजय फ्रेश झाला की आम्ही ही झोपतो.

निकिता : हो ! शुभ रात्री !!

निकिता झोपायला गेल्यावर विजय फ्रेश होतो आणि यामिनी सोबत त्यंच्या रुममध्ये झोपायला जातो.

रविवारचा दिवस असतो. यामिनी आणि निकीताही घरातच असतात. विजय चहा पीत सोफ्यावर बसलेला असतो. त्याच्या बाजूला यामिनी बसलेली असते आणि त्यांच्या समोरच्या खुर्चीवर निकिता बसलेली असते. इतक्यात प्रतिभा तिच्या मुलांसोबत आत येते.

विजय : प्रतिभा तू ! आज सकाळी सकाळी, मुलांनाही सोबत घेऊन आली आहेस हे काय पिशव्या ही आहेत सोबत !

प्रतिभा : हो ! आम्ही पिकनिकला चाललो आहोत.

विजय : कोठे ?

प्रतिभा : बीचवर !

विजय : यामिनी तू मला काही बोलली नाही !

यामिनी : सॉरी ! मी तुला सांगायलाच विसरले.

प्रतिभा ! तू बस ! मी तयार होते. निकिता प्रतिभाला चहा दे मुलानाही काहीतरी खाऊ दे !

निकिता प्रतिभाला चहा आणि मुलांना खाऊ आणून देते.

प्रतिभा : निकिता ! तुला चल म्हणाले तर तू नाही म्हणालीस.

निकिता : नको ! माझे जरा डोके जड आहे. मी आज सुट्टी आहे तर जरा आराम करते.

यामिनी : हो ! तिला आरामाच करू दे ! आपण निघूया ! कमळ तयार झालीच असेल.

प्रतिभा : हो ! चला येते साहेब !

विजय : आता मी तुझा साहेब नाही.

प्रतिभा : मला तुम्हाला साहेब बोलायला आवडते. चल ! निकिता ...

यामिनी : निकिता आंम्ही आता रात्री जेवूनच येऊ ! तू कर काहीतरी तुमच्या दोघांसाठी ! घराकडे लक्ष दे !

निकिता : हो !

यामिनी आणि प्रतिभा निघून गेल्यावर ...

विजय : निकिता ! जा ! तू आराम कर तुझे डोके दुखते आहे ना ?

निकिता : हो ! थोडा वेळ मी पडते.

निकिता रुममध्ये गेल्यावर दारावरची बेल वाजते. विजय दार उघडून निलिमाला आत घेतो.

विजय : निलिमा ! ये ! ये ! बस... कधी आलीस देवदर्शन करून ?

निलिमा : कालच आले ! तुम्हाला म्हणाले चला आमच्या सोबत ! तर तुम्ही नको म्हणालात.

विजय : मी देवाच्या भेटीला जात नाही ! तोच येतो कधी कधी मला भेटायला.

निलिमा : तुम्हाला येत असेल पण आम्हाला त्यालाच भेटायला जावे लागते.

विजय : खरं सांगू ! मला गर्दीचा खूप त्रास होतो. म्हणून नाही जात मी कोठे देव दर्शनाला ! पूर्वी मी खूप देवदर्शन केले आहे. माझे बाबा प्रचंड श्रद्धाळू ! पण मला तेंव्हा त्यांच्या श्रद्धाळू असण्याचा खूप त्रास व्हयचा कारण कीर्तनात संगीतलेली प्रत्येक गोष्ट ते प्रत्यक्ष आयुष्यात अनुसरण्याचा प्रयत्न करायचे. नेहमी खरे बोलावे हा सुविचार वर्षनुवर्षे फळ्यावर लिहिणारे शिक्षक तरी कोठे नेहमी खरे बोलत असतात. हे कीर्तनकार लोकाना सांगत असतात मोह सोडा ! पण त्यांचा मोह खरोखरच सुटलेला असतो का ? हा संशोधनाचा विषय आहे. एकदा एका किर्तनकाराने आपल्या कीर्तनात सांगितले जेवल्यावर ताटात हात धुवायचे नसतात तसे केल्याने ब्रम्ह हत्तेचे पतक लागते. लगेच आमच्या बाबांनी फर्मान काढले कोणीही ताटात हात धुवायचे नाही. पण त्यापूर्वी आमच्या हातून हजरो वेळा ब्राम्ह्हत्तेचे पतक झाले होते त्याचे परिमार्जन कसे करावे ! ते काही कोणी सांगितले नाही. मी त्यावर विचार केला असता ते अन्न किड्या - मुंग्यांना, भटक्या कुत्र्यांना, प्राण्यांना खाता यावे म्हणून ही तरतूद केलेली असावी. आमची आई त्यापूर्वी ताटात हात नाही धुतले तर शिव्या घालाची कारण ते धुवायला त्रास व्हायचा म्हणून ! याबाबतीत हॉटेलवाले अध्यात्मिकच म्हणावे लागतील. पूर्वी लोक केळीच्या पानावर खायचे ! केलीच्या पानात औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे कर्करोग होत नाही असे म्हणतात. मला आपल्या परंपरा आवडतात त्यात शास्त्रीय कारण आहे. मध्ये मी कोठे तरी वाचले होते की आपल्या प्रसाद देण्यापूर्वी धूप आरती का देतात तर आपल्या हातावरील जंतू नष्ट व्हावेत म्हणून !

निलिमा : सर ! आम्ही फक्त देव दर्शनाला जातो देवाच्या पाया पडतो. मनात काही इच्छा असेल तर ती व्यक्त करतो आणि माघारी येतो. पण तुमचे तसे नाही तुमचे सर्वच विषयावर बारीक लक्ष असते. अगदी अध्यात्म हा विषयही तुमच्या नजरेतून सुटलेला नाही. सर ! तुम्ही मला प्रत्येक भेटीत नव्याने कळता.

विजय : निलिमा ! मी तुझ्यासाठी चहा करून आणतो. यामिनी बाहेर गेली आहे.

निलिमा : हो ! मला माहित आहे . मला त्या जाताना भेटल्या रस्त्यात मी ही येते तुमच्या मदतीला

इतक्यात ! निकिता बाहेर येते.

निकिता : त्याची काही गरज नाही ! मी करते चहा आणि नाश्ताही !

विजय : चालेल !

निलिमा : ही कोण ?

विजय : असे काय करतेस ? ही निकिता ! मैत्रिणी गृहउद्योग आता हीच सांभाळते.

निलिमा : म्हणजे विजयाची नणंद ती हीच का ?

विजय : हो !

निलिमा : दिसायला फारच सुंदर आहे . पण दुर्भाग्य ! इतक्या लवकर वैधव्य तिच्या वाट्याला आले. ती दुसरं लग्न का करत नाही.

विजय : ती तिची खासगी बाब आहे. त्यात मी नाही पडत.

निलिमा : मग ! आता दुपारच्या जेवणाचे काय ?

विजय : निकिता करेल काही तरी !

निलिमा : मी काय म्हणते त्यापेक्षा आपण तिघे बाहेर जेवायला जाऊ या का ?

विजय : अगोदर चहा – नाश्ता करुया !

निकिता : चहा – नाश्ता घेऊन आल्यावर ते तिघे एकत्र चहा पीत असताना.

निलिमा : निकिता ! मी काय म्हणते ! आपण तिघे जेवायला हॉटेलात जाऊ या का ?

निकिता : नको ! म्हणजे तुम्ही दोघे जा ! माझे जरा डोके धरले आहे. मी आज आरामाच करते नंतर खाईन मी खिचडी वगैरे बनवून...

विजय : नक्की ना ?

निकिता : हो ! तुम्ही जा !

विजय : निलिमा ! तू बस मी लगेच तयार होऊन येतो.

निकिता चहा आणि नाश्त्याची भांडी उचलून स्वयंपाक घरात ठेऊन येते. विजय तयार होऊन बाहेर आल्यावर निकिता आणि निलिमा एक टक त्याच्याकडे पाहत बसतात.

विजय : असे ! काय पाहता आहात माझ्याकडे ?

निलिमा : सर ! आज तुम्ही खूपच सुंदर दिसता आहात.

निकिता : हो !

विजय : चला ! आता. निकिता काळजी घे ! काही लागलं तर मला फोन कर.. जेवण नाही केलेस तर फ्रीजमध्ये फळे आहेत ती खा !

निकिता : हो ! तुम्ही जा आता.

निलिमा : बाय ! निकिता ! काळजी घे !

ते दोघे निघून गेल्यावर निकिता स्वत:शीच विचार करत सोफ्यावर बसते.

निकिता : मी जायला हवे होते का त्यांच्यासोबत ? नाही ! नको ! नाही गेले तेच योग्य केले उगाच कशाला मी कबाब में हड्डी ? पण गेले असते तर त्यांच्यात नक्की काय सुरु आहे याचा अंदाज घेता आला असता. पण तो अंदाज घेऊन मला काय करायचे आहे. विजय आणि माझ्यात तसे म्हणायला काहीच नाते नाही. मी त्यांच्याकडे राहायला होते तेंव्हा का नाही मी त्याच्या प्रेमात पडले ? हया जर तर च्या गोष्टी आहेत. मला कदाचित त्याच्या आजच्या या यशाचे आणि प्रसिद्धीचे आकर्षण वाटत आहे. विजयचे यामिनीवर खूप प्रेम आहे. माझे नशिबच फुटके होते त्याला कोण काय करणार ? या निलिमाचे ही नक्कीच विजयवर प्रेम असणार ! मला ते तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसते. यामिनीच्या हे लक्षात आले नसेल का ? कदाचित आले असेलही पण तिने फार मनावर घेतले नसेल. थोडावेळ तशीच शांत सोफ्यावर बसून ती रुममध्ये जाऊन झोपते. संध्याकाळी तिला जाग येते ती दारावरच्या बेलचा आवाज ऐकून ! निकिता दरवाजा उघडून विजय आणि निलिमाला आत घेते. आत येताच !

विजय : निकिता तू झोपली होतीस का ?

निकिता : हो !

विजय : म्हणजे तू काही न खाता झोपलीस ना !

निकिता : हो ! अचनक गाढ झोप लागली.

निलिमा : आता झाली ना तुझी झोप पूर्ण ? आम्ही तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा मसाला ढोसा आणला आहे. त्यासोबत कोल्ड्रिंक आणि सामोसेही आणले आहेत. हे घे !

निकिता : काशाला ?

निलिमा : आणले म्हणून बरे झाले.

निकिता : मी आपल्यासाठी चहा करते.

निकिता चहा घेऊन आल्यावर सर्वजण चहा पिता – पिता निकिता ढोसा खाते, तिच्या आग्रहास्तव निलिमा एक सामोसा खाते. विजय फक्त चहा पीत असतो. चहा पिऊन झाल्यावर निलिमा निघून जाते.

विजय : मी आता जरा काम करतो ! तू पड आणखी थोडा वेळ !

निकिता : नाही ! नको मी आता फ्रेश झाली आहे. मी रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करते . काय करू ?

विजय : काय करायचे ते कर तू !

निकिता : बरं मी वरण-भात आणि झुणका – भाकर बनवते. चालेल ना ?

विजय : चालेल काय ? धावेल.

रात्री विजय आणि निकिता जेवायला बसलेले असतात इतक्यात यामिनी पिकनिकवरून माघारी येते.

विजय : यामिनी तू जेवून आलीस ना ?

यामिनी : हो ! मी जेवून आलेय ! पण काय केले आहे जेवणात ?

निकिता : झुणका – भाकर केली आहे.

यामिनी : मस्त ! मी फ्रेश होऊन येते. मग खाते थोडी झुणका भाकर निकिताच्या हातची

यामिनी फ्रेश होऊन येते आणि झुणका भाकर खायला बसते.

विजय : कशी झाली तुमची पिकनिक ?

यामिनी : खूप म्हणजे खूप धमाल केली. निलिमा भेटली मला रस्त्यात. आली होती ना ?

विजय : हो ! आम्ही दोघे हॉटेलात जेवायलाही गेलो. निकिताला चल म्हणालो तर ती नको म्हणाली.

यामिनी : निकिता ! झुणका – भाकर छान झाली आहे. प्रतिभा तुझ्या कामाची खूप स्तुती करत होती.

निकिता : तुम्ही इतक्या विश्वासाने माझ्यावर जबाबदारी दिली आहे . ती मी नीट पार पाडायला नको का ?

यामिनी : आता तुला ठीक वाटते आहे ना ? अंगावर काढू नकोस ! हवे तर आपण उद्या डॉक्टरकडे जाऊन येउया !

निकिता : त्याची काहीही आवश्यकता नाही ! मी आता ठीक आहे.

जेवून झाल्यावर थोडावेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून ते तिघे झोपायला जातात.

असेच काही महिने गेल्यावर सर्वजण विजयला मिळालेल्या एका पुरस्काराच्या घरगुती पार्टीला जमलेले असतात. निलिमा, निकिता, प्रतिभा आणि कमळ आणि विजयचे यामिनीचे काही मित्र मैत्रिणी असतात. पार्टीत गप्प्पा आणि काणे-पिणे सुरु असते इतक्यात विजयचा एक मित्र खूप दिवसांनी या पार्टीच्या निमित्ताने त्याला भेटायला येतो. त्या मित्राचे नाव असते विद्याधर ! विद्याधर व्यवसायाने इंजिनिअर असतो. पण त्याचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास असतो. तो येताच विजय त्याला मिठी मारतो आणि आपल्यासोबत घेऊन जाऊन त्याच्याशी एकांतात गप्पा मारत असतो इतक्यात यामिनी आणि निलिमा तेथे आल्यावर विजय त्यांची यामिनी आणि निलीमाशी ओळख करून देतो.

विजय : विद्याधर ! ही माझी पत्नी यामिनी आणि ही माझी मैत्रीण आणि प्रकाशक निलिमा !

विद्याधर : नमस्कार ! तुम्हाला भेटून खूप आनंद झाला.

विजय : हा विद्याधर व्यवसायाने इंजिनिअर आहे. पण ज्योतिषी म्हणूनही ह्याची ख्याती आहे.

यामिनी : असे असेल तर तुम्ही माझे भविष्य बघाच भावोजी !

विद्याधर : वहिनी तुमची पत्रिका असेलच तुमच्या मोबाईल मध्ये ! हल्ली सर्वांकडे त्यांची जन्म पत्रिका असते मोबिल मध्ये कारण प्रत्येकाला आपल्या भविष्यात तरी काही चांगले घडणार आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.

यामिनी : माझी पत्रिका आहे माझ्या मोबाईल मध्ये ! ही बघा !

विद्याधर : वाहिनी ! तुमच्या पत्रिकेत विधवा योग स्पष्ट आहे. तुमचा पहिला विवाह हा प्रेमविवाह असल्या कारणाने तुमचा विवाह पत्रिका जुळवून झालेला नसावा. तुमच्या पत्रिकेत संतती योग नाही. तुम्हाला एकच भाऊ आहे. तुमचे कुटुंब तुमच्या घरापासून लांब राहते. तुमचा दुसरा विवाह तुमच्यासाठी लाभदायक ठरलेला आहे. तुमच्या मुले तुमच्या पतीची खूपच भरभराट झालेली आहे. हे सर्व मला असेही माहित आहे. पण लवकरच तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे हे मला माहित नाही.

यामिनी : खरचं ! मी तर नोकरी सोडण्याचा विचार करत होते.

विद्याधर : तसे काहीही होणार नाही. ह्याच नोकरीत तुम्हाला बढती मिळत राहणार...

निलिमा : माझी पत्रिका पाहता का ?

विद्याधर : आवश्य ! तुला प्रेमात धोका मिळालेला आहे, तुझ्याही पत्रिकेत संतान योग नाही. त्यामुळे तू अविवाहित राहण्याचा निर्णय घेतलेला आहेस पण तुझ्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीशी भविष्यात तुझा विवाह होईल.

इतक्यात प्रतिभा आणि निकीताही तेथे येतात .

प्रतिभा : माझी पत्रिका पाहता का ?

विद्याधर : आवश्य !

प्रतिभा : ही माझी पत्रिका !

विद्याधर : तुझ्या यशात तुझ्या प्रिय व्यक्तीचा खूप हात आहे, तुला दोन मुले आहेत एक मुलगी आणि एक मुलगा ! तुझा विवाह तुझ्या मनाविरुद्ध झालेला आहे. लवकर तुझ्या आयुष्यात एक वाईट घटना घडण्याची शक्यता आहे पण काळजी करू नकोस त्याचा तुझ्या आयुष्यावर फार परिणाम होणार नाही. तुझी मुले अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावतील.

निकिता : आता माझीही पत्रिका पहाच !

विद्याधर : तुझ्या पत्रिकेत विधवा योग होता. तुझ्या घरच्यांनी तुझ्या पत्रिकेतील दोषाकडे दुर्लक्ष करून तुझे लग्न लावून दिले. तुझ्यावर एका व्यक्तीचे जीवापाड प्रेम होते. पण ते कधी तुझ्या लक्षात आलेच नाही. तुझ्या पत्रिकेत आता दुसऱ्या विवाहाचा योग नाही.

इतक्यात कमळ तेथे येते.

कमळ : सर्वांच्या पत्रिका पहिल्या तर आता माझीही पहाच !

विद्याधर : तुला एक मुलगी आहे. तू दुसऱ्या संततीच्या प्रतीक्षेत आहेस. तुला लवकरच गोड बातमी मिळेल आणि तू एका मुलाची ही आई होशील.

त्या चौघीही आपापले भविष्य ऐकून विचारात पडल्या त्यातूनही यामिनी म्हणाली विजयची पत्रिका पाहा !

विद्याधर : त्याची पत्रिका मी पाहू ?

विजय : ती म्हणतेय तर बघ आणि सांग जे काही आहे.

विद्याधर : तुमच्या घराच्या जवळ देऊळ आहे का ?

यामिनी : हो आहे.

विद्याधर : विजयच्या वडिलांच्या आयुष्यात आणखी एक स्त्री होती.

यामिनी : ते मला नाही माहीत.

विजय : हो ! होती.

विद्याधर : विजयच्या आयुष्यात खूप स्त्रिया आल्या आहेत आणि येत राहतील. विजयच्या पत्रिकेत बहु विवाहाचा योग आहे. विजयाच्या पत्रिकेत विवाहानंतर भाग्योदय असल्यामुळे तो विवाहानंतरच झाला. यापुढे विजय यशाचे खूप मोठे मोठे पल्ले गाठणार आहे. विजयाच्या आईचे विजयवर खूप प्रेम आहे. विजय त्याच्या आईचा शब्द खाली पडू देत नाही. विजयाच्या पत्रिकेत नातवंड मांडीवर खेळविण्याचा योग आहे.

विजय : हे कसे शक्य आहे ?

विद्याधर : हे तुझे भविष्य आहे हे तुलाही माहित आहे. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या एकीचाही तुझ्याशी विवाह झाला नाही कारण तुझा विवाह एका विधवेशी होणे हे तुझे भाग्य होते. तू दीर्घा आयुष्यी आहेस म्हणून त्यातील ज्या विधवा होणार होत्या त्यांच्याशी त्या कुमारी असताना तुझा विवाह झाला नाही. तुझ्यात आणखी काय काय आहे हे तुलाच माहित आहे.

यामिनी : पण हे सगळ त्यांना कसे माहित असेल.

विद्याधर : विजय आणि मी एकाच गुरुकडून ज्योतिष शस्त्राचे धडे घेतले आहेत. आमचे गुरु नेहमी म्हणायचे भविष्य कोणालाही बदलता येत नाही. आपण फक्त ते जाणून घेऊ शकतो. त्यावर विजय म्हणायचा जे आपण बदलू शकत नाही ते स्वीकारण्यात शहाणपण आहे जाणून घेण्यात नाही.

यामिनी : म्हणजे ! आमच्या सर्वांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना विजय जाणून घेऊ शकत होता.

विद्याधर : हो !

निलिमा : मग ही माझ्या मैत्रीची कामिनीची पत्रिका आहे ती पाहून सांगा तिच्या आयुष्यात काय घडणार आहे.

विद्याधर : कामिनी ! सध्या देश सोडून परदेशात गेलेली आहे. तिच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडून गेलेली आहे ती भारतात असताना. ती परत येईल तेव्हा खूप गोष्टींचा उलगडा होणार आहे. 

बाकी सर्व पार्टीत निघून गेल्यावर यामिनीने विद्याधरला बाजूला घेऊन

यामिनी : विजय ! मला सोडून दुसर लग्न करणार नाही ना ?

विजय : नाही ! तसे काही ही होणार नाही ! तुम्ही आई होणार नाही पण तुम्हाला मुलाचे सुख भरभरून मिळेल. पण आयुष्यालाही मर्यादा असते. तुमच्या आयुष्याची मर्यादा संपल्यावर विजयच्या आयुष्यात आणखी एक स्त्री येणार, विजयच्या आयुष्यात स्त्रिया येतच राहतील. पण विजय तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.

यामिनी : भावोजी ! तुम्ही हे सर्व सांगून माझे जगणे सोप्पे केले आहे.

विद्याधर : हे सगळे डोकयात ठेऊन आता जीवन जगू नका कारण यापुढे तुमच्या आयुष्यात खूपच आनंदाचे क्षण येणार आहेत.

यामिनी : चला ! भावोजी ! जेवणाची तयारी झाली आहे.

त्यानंतर पार्टी संपल्यावर विजय विद्याधरला सोडायला त्याच्या गाडी पर्यत जातो. तो माघारी आल्यावर

यामिनी : विजय तू मला कधीही सांगितले नाहीस की तू ज्योतिषी ही आहेस.

विजय : पण मी परमेश्वर नाही ना ! जी गोष्ट आपण बदलू शकत नाही ती जाणून घेण्यात काय अर्थ आहे. त्यावेळी मला होती उत्सुकता माझे भविष्य जाणून घेण्याची म्हणून शिकलो.

प्रतिभा : तुमचं भविष्य त्यातल्या त्यात ठीक आहे पण माझ्या आयुष्यात कोणती दुर्घटना घडणार आहे.

विजय : त्याचा फार विचार करू नकोस !

प्रतिभा : कसा विचार करू नको !

विजय : म्हणून मी ज्योतिषी आहे हे कधी कोणाला सांगत नाही. अज्ञानात सुख असते ते काही खोटे नाही. मी माझे भविष्य जाणतो म्हणून मला किती त्रास सहन करावा लागतो हे मी शब्दात सांगू शकत नाही.

निकिता : विजय ! बरोबर बोलता आहेत. अज्ञानातच सुख असते या बाबतीत.

निलिमा : मी ते विसरूनही गेले. तुम्हीही विसरून जा !

यामिनी : पण कमिनीच्या बाबतीत काय झाले ?

निलिमा : काय झाले याचा मला थोडा थोडा अंदाज आहे.

विजय : कामिनी परत भरतात येईल तेंव्हा कळेलच ना !

निलिमा : मी निघते आता , चल ! प्रतिभा मी सोडते तुला घरी !

प्रतिभा : चालेल !

कमळ : मला गोड बातमी मिळाली की कळेलच आपल्याला त्यांची भविष्यवाणी खरी होती की खोटी ?

सर्व निघून गेल्यावर आवरा - आवर करून ते तिघे विचार करतच झोपायला जातात.

त्यानंतर काही दिवसांनी कमळला खरोखरच दिवस जातात. तेव्हा विद्याधरने सांगितलेले भविष्य खरे होते याची सर्वाना खात्री पटते. यामुळे प्रतिभा जरा जास्तच बेचैन होते. निकिताला आता आपला दुसरा विवाह होणार नाही याची खात्री पटते तसाही तिला आता दुसरा विवाह करण्यात रस उरलेला नसतो. निलिमा मात्र मनात विचार करत असते जर माझे लग्न झाले तर ते विजयशीच व्हायला हवे ! त्यासाठी मी कितीही वाट पहायला तयार आहे. त्याचे माझ्यावर प्रेम नसेल पण मी मरेपर्यंत त्याच्यावर प्रेम करत राहीन ! यामिनी मात्र फार विचार करत नाही. अशातच... संध्याकाळी विजय यामिनी आणि निकिता हॉलमध्ये बसलेले असताना कमळ तेथे धावत येते आणि

कमळ : एक वाईट बातमी आहे.

यामिनी : काय ? लवकर सांग ?

कमळ : प्रतिभाच्या नवऱ्याला बाईक चालवताना मोठा अपघात झालेला आहे. त्याला सरकारी दवाखान्यात भरती केले आहे . तो वाचलाय ! पण यापुढे तो फार हालचाल करू शकेल का याबद्दल डॉक्टरला शंका आहे.

विजय : चला आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया ! तिला आपल्या मदतीची गरज असेल.

यामिनी : हो ! हो ! आपण लगेच जाऊया !

ते सर्व पटापट तयार होऊन घराच्या बाहेर पडतात. ते माघारी येतात तेंव्हा प्रतिभाच्या मुलांना यामिनी आपल्या सोबत घेऊन येते.

यामिनी : मुलानो तुम्ही बसा ! मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते.

श्रावणी : मावशी बाबा बरे ! होतील ना यातून !

यामिनी : हो बाळा ! नक्की होतील तू काळजी नको करू ..

श्रावण : मला भेटायचे आहे बाबांना !

यामिनी : बाळा आता खूप रात्र झाली आहे आपण उद्या जाऊया हा ! त्याना भेटायला.

निकिता : बाई ! जेवण करून गेल्या आहेत मी गरम करायला घेते. मुलानाही भूक लागली असेल.

यामिनी : हो !

विजय : प्रतीभासाठी दबा भरून ठेव मी जाऊन देऊन येईन आणि तिकडे काय परिस्थिती आहे ते ही पाहून येईन

निकिता : चालेल.

यामिनी मुलांना प्रेमाने भरवून त्यांना तिच्या खोलीत नेऊन झोपवते. त्यानंतर ती कसे तरी दोन घास खाते. विजय प्रतिभाला डबा घेऊन जातो. तो रात्रभर तिच्या सोबत थांबतो काही लागले तर.

दुसऱ्या दिवशी सकाळी होता माघारी येऊन जरा पडतो. तोपर्यत मुले झोपेतन जागी होऊन फ्रेश झाल्यावर यामिनी त्यांना चहा – नाश्ता देते.

निकिता : यामिनी ! मी निघते मला कारखान्यात जावेच लागेल.

यामिनी : हो ! तू जा ! ते थांबवून जमणार नाही. मी सुट्टी टाकली आहे आठवडाभर तू काळजी नको करू !

निकिता बाहेर जाते तितक्यात निलिमा आत येते .

निलिमा : यामिनी ! मला कळले प्रतिभाच्या नवऱ्याला अपघात झालेला आहे म्हणून मी सरळ इकडे आले.

यामिनी : हो ! हो ! तू बस अगोदर मी तुझ्यासाठी चहा घेऊन येते.

यामिनी चहा घेऊन आल्यावर

निलिमा : कसे आहेत ते ?

यामिनी : अपघात इतका मोठा होता की त्यातून ते थोडक्यात वाचले. पण त्यांना झालेल्या दुखापतीतून बरं व्हयला खूप वेळ लागेल असे डॉक्टर म्हणाले आहेत.

निलिमा : विजय ! तो आत झोपला आहे. रात्रभर तिकडेच होता आता सकाळी येऊन झोपला आहे. मी उठवू का त्याला ?

निलिमा : नाही ! नको ! तू हॉस्पिटलला जाणार आहेस का ?

यामिनी : हो ! मुलांना घेऊन जाणार आहे. प्रतिभासाठी चहा – नाश्ताही घेणार आहे.

निलिमा : चालेल ! तू तयार हो ! आपण माझ्या गाडीने जाऊया ! प्रतिभाला फ्रेश व्हयला घरी जायचे असेल तर मी तिला घेऊन जाईन आणि परत आणून सोडेनही !

इतक्यात कमळ आत येते.

कमळ : मी ही येते तुमच्यासोबत.

निलिमा : चालेल आपण निघूया !

त्या तिघी मुलांना घेऊन घराच्या बाहेर पडतात.

दोन –चार तासांनी त्या तिघीच परत येतात. प्रतिभाच्या मुलांना त्यांची आत्या घेऊन जाते.

निलिमा : जे झाले ते फारच वाईट झाले.

कमळ : म्हणजे प्रतिभाच्या आयुष्यात विद्याधर भावोजींनी सांगितलेली ती हीच घटना असावी.

यामिनी : हो !

निलिमा : प्रतिभाचा नवरा आता यातून लवकर बरा होणार नाही त्यामुळे आता प्रतीभालाच खंबीर व्हावे लागेल.

कमळ : आपण सगळ्या आहोत तिच्या सोबत पण तिनेही आता स्वतला सावरायला हवे !

यामिनी : तशी ती धीट आहे. मला खात्री आहे ती सावरेल स्वत:ला यातून.. मी आपल्यासाठी चहा बनविते.

इतक्यात विजय झोपेतून जागा होत बाहेर येतो.

निकिता : सर ! झाली का झोप पूर्ण ?

कमळ : त्यांना चहाचं नाव ऐकून जाग आली असेल.

यामिनी : तसेच असेल.

विजय : तुम्ही गेला होतात ना ! प्रतिभाच्या नवऱ्याला पहायला काही प्रगती आहे का त्याच्या तब्बेतीत ?

निलिमा : आता ते ! शुद्धीवर आले आहेत. माणसांना ओळखतात आणि बोलतातही पण हालचाल अजून फारशी करत नाहीत. डॉक्टर म्हणाले आहेत. थोडी सुधारणा झाल्यावर ती त्यांना घरी घेऊन जाऊ शकते.

कमळ : आता प्रतिभाची खूप धावपळ होणार ! तिला कामातून काही दिवस सुट्टी घ्यावी लागणार !

निलिमा : त्याला आता पर्याय नाही ! आपण तिला शक्य तेवढी मदत करूच !

विजय : ती आपण करूच ! पण तीच मन मात्र तिनेच आता खंबीर करायला हवे. म्हणून मी म्हणालो होतो भविष्य जाणून घेऊ नये. त्यामुळे मनस्तापाच होतो आणखी काही नाही.

निलिमा : सर ! तुम्हीही ! बघता ना भविष्य मग ! मला भविष्य बघून सांगा ! माझं लग्न कोणाशी होणार आहे ते ?

विजय : नाही ! तसे ते सांगता येणार नाही. नाहीतर विद्याधरनेच नसते का सांगितले.

कमळ : मग ! मला मुलगा होणार आहे हे कसे काय सांगितले ?

विजय : शास्त्रात जे नियम आहेत त्याप्रमाणे त्याने सांगितले पण याबाबतीत भविष्य नेहमी खरेच ठरेल असे सांगता येत नाही.

निकिता : आमच सोडा ! पण तुमचे भविष्य तर तुम्हाला माहीत होत ना ?

विजय : हो ! मी मोठा लेखक होणार हे मला माहीत होते. माझे विधवा स्त्रीशी लग्न होणार हे ही मला माहित होते. माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया येणार आणि जाणार हे ही मला माहित होते. मी निसंतान राहणार नाही हे ही मला माहीत आहे. फक्त एक गोष्ट माहीत नाही माझ्या मुलाला जन्म कोण देणार ?

कमळ : भयंकर आहे हे सर्व !

विजय : हो ! म्हणूनच मी कोणाला भविष्य सांगत नाही.

यामिनी : चला ! चहा आणि नाश्ता घ्या ! विजय तुम्हाला काहीही वेगळे सांगणार नाही. 

निलिमा : हो ! सर ! इतक्या आतल्या गाठीचे आहेत हे मला माहित नव्हते.

यामिनी : माझ्या नवऱ्याला अजून मी पुरते ओळखले नाही तर तू काय ओळखणार ?

निलिमा : सर ! एक अजब रसायन आहेत.

कमळ : तुम्ही बसा गप्पा मारत मी निघते आता जरा जाऊन पडते.

यामिनी : हो ! तू जा ! तुला आरामाची गरज आहे.

निलिमा : मी ही आता निघते ! उद्या येते आपण जाऊ परत प्रतिभाला भेटायला.

यामिनी : चालेल.

निलिमा निघून गेल्यावर...

यामिनी : विजय ! तुला फ्रेश व्हायचे नाही का ?

विजय : हो ! मी फ्रेश होतो आणि जरा बाहेर जाऊन येतो मला एक काम आहे. 

यामिनी : चालेल !

विजय बाहेर निघून गेल्यावर यामिनी थोडा वेळ पडते. संध्याकाळी निकिता परत आल्यावर तिला जाग येते. निकिता तिच्यासाठी आणि यामिनीसाठी चहा तयार करते. चहा पिता पिता

निकिता : कसा आहे प्रतिभाचे मिस्टर ?

यामिनी : ते ठीक आहेत पण पूर्ण बरे व्हायला कदाचित काही वर्षेही जातील.

निकिता : मग ! आता ?

यामिनी : त्यांना एकदा का घरी आणले की त्यांची काळजी घ्यायला त्यांची विधवा बहिण आहेच ! प्रतिभाला आपल्या कामाकडे लक्ष द्यावे लागेल. आपण सर्व आहोतच तिच्या मदतीला पण आपली आपली कामे ही काही कमी नाहीत ना ?

निकिता : ते तर आहेच ... शो मस्ट गो ऑन !

यामिनी : चला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू या ! बाई येईलच इतक्यात !

विजय माघारी आल्यावर ते तिघे जेवतात आणि झोपी जातात.


वर्षभरानंतर प्रतिभाच्या नवऱ्याच्या तब्बेतीत सुधारणा झालेली असते. पण आता त्याच्या वाट्याला कायमचे अपंगत्व आलेले असते. त्यामुळे घराची सर्व जबाबदारी आता प्रतिभावर येऊन पडते. ती जबाबदारी उचलण्यास ती सक्षम असते. प्रतिभा या सगळ्यातून सावरते आणि आपले सर्व लक्ष अभिनयाकडे आणि मैत्रिणी गृहउद्योगाकडे केंद्रित करते. प्रतिभाला आता तशी आर्थिक समस्या नसते पण खूप धावपळ करावी लागत असते. निकीताही त्या गृहउद्योगात स्वत:ला झोकून देऊन काम करत असते. कमळची प्रसूती होऊन तिला मुलगाच झालेला असतो. यामिनीला तिच्या नोकरीत प्रमोशन मिळालेले असते. विजयची नवीन कादंबरी प्रकाशित झालेली असते. निलिमाला प्रकाशक म्हणून खूप प्रसिद्धीला येत असते अशातच कामिनी भारतात परत आल्याची बातमी निलिमाला मिळते. पण ती कुमारी माता झाली असल्याचे बातमी सर्व मिडीयामध्ये पसरलेली असते. ती बातमी ऐकताच विजयालाही धक्काच बसतो. एक दिवस यामिनी रजेवर असते आणि नेमकी तेंव्हा कामिनी तिच्या मुलाला घेऊन विजयला भेटायला येते. तिला वाटते की विजय एकटाच घरात आहे. कामिनीला पाहताच विजयला धाक्काच बसतो.

विजय : कामिनी तू कधी आलीस ? गेल्या वर्षभरात तुझा काहीच पत्ता नव्हता. काही संपर्क नाही.

कामिनी : मी आल्याची बातमी तुला मिळाली असेलच तरी तू मला भेटायला आला नाहीस. इतकी मी तुला परकी झाली का ?

विजय : तसे अजिबात नाही . मी तुला भेटायला येणारच होतो. पण तू हे जे काही केले आहेस ते मला अजिबात आवडले नाही.

कामिनी : काय आवडले नाही ?

विजय : हेच जे तू कुमारी माता झाली आहेस ते.

कामिनी : इतक्या वर्षाच्या आपल्या मैत्रीत तू मला हेच ओळखलेस ! मी माझे सर्वस्व दिले होते तुला ! माझे प्रेम होते रे तुझ्यावर निरपेक्ष ! आपल्यात ते काही झाले ते अपघाताने झाले होते. तू माझ्या चारित्र्यावर शंका घेतलीस हे मला अजिबात आवडले नाही. मी परदेशात होती तेच बरे होते. तेथे मला कोणीच काही प्रश्न विचारात नव्हते. मी कुमारी माता असणे ही त्यांच्या लेखी दखल खेण्यासारखीही गोष्ट नव्हती. पण मी भारतात आले आणि माझ्या कुमारी माता असण्याची बातमी झाली. माझ्या मुलाचा बाप कोण हे जाऊन घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

विजय : असणारच ना ! मी ही आहे.

कामिनी : तू ही उत्सुक आहेस ! तू विसरलास वाटत तो दिवस ज्या दिवशी मी सर्वस्वी तुझे झाले होते तुझ्यात विरघळून गेले होते.

विजय : मी काहीही विसरलेले नाही. म्हणूनच मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती.

कामिनी : अपेक्षा नव्हती म्हणजे ? तुला अजूनही वाटतयं की मी पाप केलेले आहे. विवाह न करता आई होणे हा काही गुन्हा नाही. तसा विचार केलाला तर तू ही गुन्हेगार आहेस माझ्याशी लग्न झाले नसताना संग करणारा !

विजय : जे काही झाले तो अपघात समजून विसरून जाऊया असे तूच म्हणाली होतीस ना ?

यामिनी : हो ! मी म्हणाले होते. पण...या अशा संबंधाची शिक्षा फक्त स्त्रीलाच भोगावी लागते. पुरुषाला नाही. तो सर्व करून सावरून नामानिराळा राहतो.

विजय : तुला नक्की काय म्हणायचे आहे ?

इतक्यात यामिनी बाहेर येते.

यामिनी : तिला काय म्हणायचे आहे ते मी सांगते. कामिनीच्या मुलाचा बाप दुसरा तिसरा कोणी नसून तूच आहेस. एक बाई म्हणून मी दुसऱ्या बाईचे मन वाचू शकते. कामिनी अचानक देश सोडून परदेशात गेली तेव्हाच मला शंका आली होती की कामिनीच्या आयुष्यात काहीतरी घडले आहे जे मला माहीत नाही.

कामिनी : यामिनी ! मला माफ कर आमच्यात जे काही झाले तो फक्त आणि फक्त एक अपघात होता. तुझा संसार मोडण्याचा मी स्वप्नातही विचार केला नाही.

यामिनी : तू बस ! बाळाला माझ्यकडे दे ! किती गोंडस बाळ आहे . बघ ! विजय ! तुझे बाळ ! चेहरा अगदीच तुझ्यावर गेला आहे.

कामिनी : मी काही माझ्या मुलासाठी विजयकडे हक्क मागायला आलेले नाही. फक्त त्याचा वंश या जगात वाढतोय हे त्याला सांगावे म्हणून मी आले होते. त्याचे पालनापोषण करायला मी एकटी समर्थ आहे.

विजय : पण हे सर्व तू मला का सांगितले नाहीस ! आपण काही तरी मार्ग काढला असता.

कामिनी : तू काय मार्ग काढला असतास ते मला माहीत होते. म्हणूनच मी परदेशात गेले.

यामिनी : कामिनी तू जे काही केलेस ते योग्यच केलेस ! पण मला वाटते मुलाला आईसोबत वडिलांचे प्रेमही मिळायला हवे तो मुलाचा अधिकारच आहे. तू विजयशी दुसरे लग्न कर माझी काहीही हरकत नाही.

कामिनी : तुझी नसेल पण माझी हरकत आहे. मी तुला नेहमीच माझी मैत्रीण कमी बहिण जास्त मानत आले. माझ्या आणि विजयच्या नात्यावर जगाने संशय घेतला पण तू कधीच घेतला नाहीस. मी तुझा विश्वासघात करू शकत नाही.

यामिनी : कामिनी ! माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा तुझ्यावर अजिबात राग नाही. तू विजयचा वंश वाढवला जो मी वाढवू शकत नाही त्यामुळे मी तुझी ऋणी आहे. पण मला वाटते तुझ्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव मिळायला हवे !

कामिनी : पण ते कसे शक्य आहे.

यामिनी : तुला विजयशी लग्न करायचे नसेल तर नको करू ... तू तुझ्या मुलाला आम्हाला दत्तक दे ! मी सख्ख्या आईपेक्षा जास्त त्याच्यावर प्रेम करेन.

कामिनी : पण विजय !

यामिनी : विजयचं काय ? मी म्हणते ना ! म्हणजे तसेच होणार !

कामिनी : चालेल ! माझ्या मुलाला त्याच्या वडिलांचे नाव मिळणार असेल तर त्यासाठी मी हा त्याग करायलाही तयार आहे.

यामिनी : मी तुला तू तुझ्या मुलावरचा तुझा हक्क सोड असे अजिबात सांगत नाही. तू तुझ्या मुलासोबत तुला हवा तितका वेळ घालवू शकशील.

कामिनी : चालेल !

विजय : मालाही चालेल ! मी माझ्या मुलाची बाप म्हणून सर्व जबाबदारी घ्यायला तयार आहे.

आपण उद्याच वकिलाला बोलवून सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुया !

यामिनी : तुमचे हे सत्य आणखी कोणाला माहीत आहे ?

कामिनी : निलिमाला !

यामिनी : काही हरकत नाही ! पण आता हे सत्य आपल्या चौघांव्यतिरिक्त कधीच कोणाला कळणार नाही.


कामिनी : यामिनी ! तुझे मन खूप मोठे आहे.

यामिनी : नाही ! कामिनी ! तुझ्या इतके नाही ! तू कधीही माझी जागा घेऊ शकली असतीस पण तू तसे केले नाहीस.

यामिनी : आपल्या बाळाचा ! पायगुण चांगला आहे . आजच आपल्याला आपल्या नव्या बंगल्याची चावी हातात मिळाली आहे. आता आपले बाळ आपल्या नवीन बंगल्यातच लहानाचे मोठे होईल.

ठरल्यापप्रमाणे कामिनी तिच्या बाळाला विजय आणि यामिनीला दत्तक देते. ते सर्व त्या बाळासह नवीन बंगल्यात प्रवेश करतात.

कामिनी स्वत:ला नवीन नवीन कामात झोकून घेते. तिच्या कुमारी माता होण्याचा विसर अल्पावधीत सर्वाना पडलेला असतो. ती अधून मधून वेळ भेटेल तसा विकास सोबत वेळ घालवत असते. विकास म्हणजे तिचा मुलगा त्यच्या नावात विजयचा वि आणि कामिनीचा का आहे. सर्वजण त्याला लाडाने विकाच म्हणतात. विकासला एकाच वेळी यामिनी, कामिनी, प्रतिभा, निकिता, कमळ आणि निलिमाचेही प्रेम मिळत असते. इतक्या बायकांच्या गराड्यात तो वाढत असतो. विजयाचा उद्योगही खूप यशस्वी झालेला असतो. विजयने राजकारणात प्रवेश केलेला असतो. असेच वर्ष पुढे सरकत असतात. हा ! हा ! म्हणता विकास वीस वर्षाचा होतो.

विकासाच्या विसाव्या वाढदिवशी सार्वजन बंगल्यावर जमलेले असतात वाढदिवसाची जय्यत तयारी झालेली असते. यामिनी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करायला दारातच उभी असते. एक – एक पाहुणे यायला सुरुवात होते संध्याकाळचे सात वाजलेले असतात. इतक्यात एक अलिशान कार दरवाजासमोर थांबते त्यातून एक पन्नाशीची सुंदर मनमोहक स्त्री खाली उतरते. ती दारात येताच यामिनी तिला प्रेमाने आलिंगन देते.

यामिनी : ये ! कामिनी ! आज तुझ्या मुलाचा वाढदिवस आहे आणि तू पाहुण्यासारखी येतेस !

कामिनी : काय करू ? कामाचा व्यापाच इतका वाढला आचे की एका जागेवर पायच टिकत नाही. कधी एकदाची या सर्व जबाबदारीतून मोकळी होतेय असे झाले आहे. तुझे बरे आहे. तू सेवानिवृत्ती घेतली आहेस.

यामिनी : कसलं काय ? आमच्या मैत्रिणी गृहउद्योगाचा पसारा किती वाढला आहे ते तर तुला माहीतच आहे.

कामिनी : चालायचच ! बर्थ डे बॉय कोठे आहे ?

यामिनी : तो तयार होतोय येईलच इतक्यात. तू जा आत बस !

कामिनी : हो !

इतक्यात पुन्हा एक अलिशान कार येते . त्या कारमधून पन्नाशीतील एक महिला तिच्या दोन अतिशय सुंदर दिसणाऱ्या मुलांसोबत उतरते. यामिनी जवळ येताच ! तिची दोन मुले यामिनीच्या पाया पडतात आणि आत जातात ती स्त्री मात्र यामिनीला घट्ट मिठी मारते.

यामिनी : कशी आहेस प्रतिभा ?

प्रतिभा : मी मजेत आहे . हे ! गेलावर मी आता फक्त त्यांच्यासाठी जगतेय ! पण माझ्या मुलांनी मात्र अभिनय क्षेत्रात नाव काढल. स्वप्नातही विचार केला नव्हता इतकं ऐश्वर्य मी सध्या भोगतेय. पण हे असायला हवे होते.

यामिनी : दैव ! एका हाताने देते तेंव्हा दुसऱ्या हाताने घेतेही काही तरी.

प्रतिभा : खरं आहे.

यामिनी : प्रतिभा ! तू बस आत जाऊन कामिनीही आली आहे तिला भेट ..

प्रतिभा : कामिनी आली आहे. खूप दिवस लोटले तिला भेटून

प्रतिभा निघून गेल्यावर पुन्हा एक अलिशान गाडी येते ज्यातून आणखी एक पन्नाशीतील स्त्री उतरते ती यामिनी जवळ येताच यामिनी तिलाही प्रेमाने आलिंगन देते.

यामिनी : कशी आहेस निलिमा ? इतक्या उशिरा ?

निलिमा : मी लवकरच येणार होते पण विकाससाठी गिफ्ट निवडता निवडता मला उशीर झाला.

यामिनी : बरं ! जा आता आत कामिनी आणि प्रतिभा तुझी वाट पाहत आहेत.

निलिमा : हो ! मी लगेच जाते.

इतक्यात आणखी एक कार येऊन थांबते त्या कार मधून पुन्हा एक पन्नाशीची स्त्री तिचा सुटाबुटातील नवरा आणि एक सुंदर मुलगा मुलगी उतरतात.

यामिनीच्या जवळ येताच ती स्त्री यामिनीला आलिंगन देते मुलं तिच्या पाया पडतात तिचा नवरा यामिनीला हात जोडून नमस्ते करतो.

यामिनी : ये ! कमळ, या कमलेश भवोजी ! कसे आहात ? काय कविता आणि करण तुम्ही कसे आहात .

कमळ : आम्ही मजेत.

यामिनी : तुम्ही आत जावून बसा ! आत सर्वच आहेत.

कमलेश : विजय ! त्यांची एक मिटिंग आहे . ते येतीलच इतक्यात.

ते सर्व आत जातात इतक्यात समोरून आणखी एक स्त्री येते. तिच्यासोबत दोन मुलगे आणि आणि सुटाबुटातील एक माणूस आणि आणखी एक सुंदर स्त्री सोबत असते. ते सर्व यामिनी जवळ येताच.

यामिनी : विजया ! ये ! काय भाऊ किती दिवसांनी आलात ? मुलानो तुम्हाला मामीची आठवण येते की नाही ? निकिता ! तू ही ! पाहुनी सारखी आलीस .

निकिता : मी रस्त्यात होते म्हणून मी यांच्या सोबत आले. 

यामिनी : हो ! मी विनोद करत होते. बरं तुम्ही आता आत जाऊन बसा !

एका मागून एक अशा अनेक अलिशान गाड्या येत असतात त्यातून लोक उतरून पार्टीला येत असतात. सर्वजण यामिनीकडे विजयची चौकशी करत असतात. थोड्यावेळाने आणखी एक आलीशान गाडी बंगल्यासमोर थांबते अगोदर त्या गाडीतून बॉडीगार्ड खाली उतरतात त्यानंतर दाढी मिश्या आणि केसही पांढरे शुभ्र झालेला विजय खाली उतरतो. त्याचा पोशाख राजकीय नेत्यासारखाच असतो पंधरा शुभ्र ! त्याला समोरून येताच यामिनी त्याच्याकडे धावत जाते. हे काय साहेब ! इतका उशीर ! सर्व लोक वाट पाहता आहेत तुमची. विजयचे बॉडीगार्ड तेथेच दरवाज्यावर थांबतात आणि विजय आत जाताच सर्व त्याला गराडा घालतात. पार्टीची सर्व तयारी झालेली असते. फक्त विकास तयार झालेला नसतो. थोड्या वेळाने विजय तयार होऊन खाली येतो तेंव्हा त्याच्यासोबत ऋता असते. ऋता त्याच्या मामाची म्हणजे यामिनीच्या भावाची मुलगी असते. ती नुकतीच शिकण्यासाठी मुंबईला आलेली असते. ऋता दिसायला एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नसते. सार्वजन यामिनीकडे ही मुलगी कोण आहे म्हणून चौकशी करत असतात. विकास तयार होऊन येताच सर्वात अगोदर कामिनीच्या पाया पडतो त्यानंतर विजय आणि यामिनीच्या त्यानंतर विजया तिच्या नवऱ्याच्या पुढे क्रमाने निलिमाच्या, निकिताच्या प्रतिभाच्या कमळच्या आणि कामलेशच्या पाया पडतो. श्रावणी आणि श्रावणला तो प्रेमाने आलिंगन देतो. कविता आणि कारणही त्याला आलिंगन देतात. विजयाचे मुलगे निलेश आणि गणेश ते ही त्याला आलिंगन देतात. सर्व मोठ्यांच्या पाया पडल्यावर विकास केप कापतो आणि सर्वांबरोबरच ऋताला ही भरवतो. विकास केक कापून झाल्यावर पार्टीला सुरुवात होते. पार्टी ओल्या आणि सुक्या तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अशा सर्व प्रकारच्या लोकांची सोय केलेली असते. विजय आणि सर्वाना भेटत असतात त्यंच्यात चर्चा रंगत असतात. सर्वजण विकासला शुभेच्छा आणि पुष्पगुच्छ देत असतात. काही लोक भेट वस्तूही देत असतात. विकासच्या वतीने त्याच्या बाजूला उभी राहून ऋता त्या घेऊन बाजूला ठेवत असते. श्रावणी आणि श्रावण प्रसिद्ध सिने कलाकार असल्यामुळे सर्वजण त्यांच्यासोबत सेल्फी काढायला पुढे मागे करत असतात. कविता शिकून डॉक्टर झालेले असते. करण विकास सोबत त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत असतो. विजयाची दोन्ही मुले एम.बी. ए. झालेले असतात आणि बिझनेस करत असतात. तेथे जमलेले सर्व तरुण – तरुणी एकमेकांशी ओळख करून घेत असतात. त्यात निलेश आणि कविता एकमेकांकडे किंचित आकर्षित झालेले असतात. गणेशला श्रावणी आवडू लागलेली असते पण ती अभिनेत्री असल्यामुळे तो थोडा संभ्रमात असतो. पार्टी सुरु असताना कामिनी यामिनीला भेटते आणि

कामिनी : यामिनी तू आपल्या विकासवर छान संस्कार केले आहेस. जे आई म्हणून मी कदाचित करू शकले नसते.

यामिनी : मी काहीही जगावेगळे केले नाही. विजयला भेटलीस की नाही .

कामिनी : आता विजयचा साहेब ! झाला आहे . पूर्वी फक्त प्रतिभा त्याला साहेब बोलायची आता आपल्या सर्वाना बोलायला लागते. त्याची पी.ए .कोठे गेली ?

निलिमा : मी आहे म्हटलं येथेच !

प्रतिभा : किती वर्षानी आज आपण सर्वजणी अशा एकत्र भेटलो.

कमळ : हो !

निलिमा : निकिता ! समाजसेविका म्हणून तुला हल्लीच खूप मोठा पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन !

निकिता : धन्यवाद !

विजया : प्रतिभा तू तर मला विसरलीसच !

प्रतिभा : ते शक्य तरी आहे का ?

विजया : कामिनी तू तुझ्या मुलाला विजय आणि यामिनीला दत्तक देऊन त्यांचे आयुष्यच बदलून टाकलेस !

त्यावर सर्वजणी होकार भरतात.

कमळ सर्वांचा निरोप घेऊन निघते. त्यानंतर प्रतिभाही निघते, थोड्या वेळाने कामिनी आणि निलिमाही निघते. निकिता, विजयाचा नवरा विनीत आणि त्यंची मुले निलेश आणि गणेश तेथेच थांबतात.

सर्व आटपल्यावर ऋता विकाससह सर्वजण आपापल्या रुममध्ये झोपायला जातात.

विजय आणि यामिनी त्यांच्या रुममध्ये झोपायला गेल्यावर

यामिनी : साहेब ! विकासचा वाढदिवस छान झाला ना ?

विजय : हो ! पण ! सर्व जगाला वाटते विकास हा आपला दत्तक घेतलेला मुलगा आहे. तो माझा रक्ताचा मुलगा आहे हे सत्य आपण जगापासून लपवले आहे. आता ते मी ते उगडही करू शकत नाही. मी तसे केले तर त्याचा परिणाम माझ्या राजकीय कारकीर्दीवर होऊ शकतो.

यामिनी : जे सत्य इतक्या दिवस गुलदस्त्यात आहे ते तसेच ठेवण्यात शहाणपण आहे.

विजय : तू बोलतेस ते बरोबर आहे हे सत्य उगड होण्याची वेळ आपण नियतीवरच सोपवूया ! चला झोपा आता. थोड्याच वेळात विजयचा बंगला झोपी जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व फ्रेश होऊन ब्रेकफास्टला जमा होतात.

विजया : आम्ही सर्व आता निघणार आहोत.

विजय : रहायचं ना आल्यासारखे चार पाच दिवस

निलेश : मामा ! जावेच लागेल तिकडे खूप कामे पेंडिंग आहेत.

गणेश : हो ! मामा ! नाहीतर आम्ही नक्की थांबलो असतो.

विजया : आम्ही येऊ की परत रहायला वेळ काढून

विनीत : तुम्ही ही या एकदा फिरत फिरत आमच्याकडे ?

विजय : भावोजी ! तुमच्या नादाला लागून मी राजकारणात आलो आणि लटकलो !

विनीत : विजय ! राजकारणात आत जाण्याचा मार्ग आहे पण बाहेर पडण्याचा मार्ग नाही.

विजय : तुम्ही ! योग्य तेच बोललात.

विनीत : तरी माझा पसारा सावरायला आता निलेश आणि गणेश तरी आहेत. विकासला तुमचा पसारा सांभाळायला अजून चार पाच वर्षे तरी लागतील.

विजय : त्याने माझाच पसारा सांभाळावा ! अशी माझी काही अपेक्षा नाही पण त्याने त्याचा पसारा वाढवावा म्हणजे झाले.

यामिनी : आता जेवूनच जायचं ना !

विजया : नको ! आम्ही रस्त्यात काहीतरी खाऊ आणि असा किती तासाचा प्रवास आहे ? फार फार सहा तासाचा !

यामिनी : निकीता ! तू तरी थांबणार आहेस की ?

निकिता : मी थांबणार आहे. आपल्या उद्योगाच्या संदर्भात माझ्या दोन – चार मिटिंग आहेत. एक दोन सामाजिक संस्थाना भेटी द्यायच्या आहेत.

विनीत : तू हे समाजसेवेचे व्रत घेतले आहेस ते ठीकच आहे. पण आता तू फार दगदग करू नकोस जे काही करायचे ते आपली तब्बेत सांभाळून कर..

निकिता : हो ! दादा !

निलेश : आत्या तुला काही मदत लागली तर मला सांग ?

निकिता : हो ! नक्की ! कविता, श्रावणी आणि ऋता ही मला माझ्या कामात मदत करतात त्याना जमेल तशी

गणेश : त्या काय मदत करतात ?

निकिता : कविता मेडिकल कॅम्प घ्यायला मदत करते तर श्रावणी मदतनिधी जमा करायला मदत करते. ऋता ती माझ्या सोबत येते जर मला कोठे बाहेर कार्यक्रमाला जायचे असेल तर.

गणेश : छान ! म्हणजे श्रावणीला अभिनेत्री असली तरी समाजसेवेची आवड आहे.

निकिता : म्हणजे काय ? वेळ पडली तर ती झाडू हातात घ्यायला ही मागे पुढे बघत नाही. तिच्यावर तसे चांगले संस्कारच झालेले आहेत.

गणेश : असं !

निलेश : आत्या ! मग आपण आपल्या गावातही ठेऊया आखादा मेडिकल कॅम्प !

निकिता : हो ! चालेल ! तसाही हा विचार माझ्या डोक्यात खूप दिवस घोळत होता.

विनीत : तुम्ही ! नक्की ठेवा ! काही मदत लागली तर मी आहेच.

विजय : त्यानिमित्ताने मी आणि यामिनीही येऊ गावाला.

विजया : आता तर ते कॅम्प ठेवावेच लागेल निदान त्यानिमित्ताने तरी तुमचे पाय लागतील इतक्या वर्षानी आमच्या घराला.

यामिनी : आम्ही नक्की येऊ !

विजया : चला ! आता निघतो आंम्ही...प्रतिभाच्या घरी जायचे होते पण आता नको ! पुन्हा केंव्हा तरी. ऋता आणि विकास कोठे दिसत नाहीत ?

विजय : ते कॉलेजला गेले.

विजया : बरं

विजया तिच्या नवऱ्या आणि मुलासह निघून गेल्यावर

विजय : मी निघतो !आज माझ्या दोन मिटिंग आहेत.

यामिनी : चालेल ! मी ही कारखान्यात जाऊन येईन म्हणते आहे निकितासोबत .

दुपारपर्यंत सर्व घरातून बाहेर पडल्यावर विकास आणि ऋता कॉलेजमधून माघारी येतात.

घरी कोणीच नाही हे पाहिल्यावर घरात काम करणाऱ्या बाईंना जेवण वाढायला सांगतात. जेवून झाल्यावर ते दोघे हॉलमध्ये टी.व्ही. पाहत वेफर खात असतात.

विकास : ऋता तू मला काय गिफ्ट दिले आहेस ?

ऋता : ते तुला गिफ्ट ओपेन केल्यावर समजेलच ना ! पण तू मला रिटर्न गिफ्ट काय देणार आहेस ?

विकास : तू मागशील ते ! फक्त आकाशातील चंद्र तारे मागू नकोस !

ऋता : तू किती बोर आहेस.

विकास : मला बाबांसारखे कल्पनेच्या जगात नाही रमायला जमत. मी वास्तवाचा विचार करातो.

ऋता : ते तुला नाहीच जमणार ना ! कारण तू त्यांचा रक्ताचा मुलगा थोडा आहेस ! तुझी आई कामिनी मावशी मात्र खूपच वास्तवादी विचार करते म्हणूनच तुला वडिलांचे प्रेम मिळावे म्हणून आत्याला दत्तक दिले.

विकास : तो विषय नको काढूस ! माझे खरे बाबा कोण आहेत हे मला माहित नसल्याचा खूप त्रास होतो. याचा अर्थ बाबा माझ्यावर प्रेम करत नाही असा अजिबात होत नाही. बाबांनी लहानपणापासून माझा एक शब्दही कधी खाली पडू दिला नाही. माझी त्यांच्याबद्दल काहीच तक्रार नाही. मी त्यांचा मुलगा आहे याचा मला अभिमानच आहे.

ऋता : सॉरी ! .....मी सहज म्हणाले... पुन्हा नाही...

विकास : तू कशाला सॉरी बोलतेस ! जे सत्य आहे ते आहे... ते तू किंवा मी बदलू शकत नाही ना ?

ऋता : पण सर्वचजण म्हणतात तुझा चेहरा काकांसारखाच आहे.

विकास : तो संगतीचा परिणाम असेल.

ऋता : मी आपल्यासाठी चहा बनवून आणते.

विकास : तू काशाला ? बाई बनवून आणतील की ?

ऋता : मलाही करु दे ! काहीतरी आपल्यासाठी...

विकास : चालेल !

काही मिनिटात ऋता विकासाठी चहा घेऊन येते .

ऋता : पण हा गुण मात्र तुझ्यात तुझ्या बाबांचाच आला आहे.

विकास : कोणता ?

ऋता : चहाला कधीही नाही न बोलण्याचा !

विकास : हो !

ऋता : चला आता चहा ! पिऊन झाला आहे. आता मी अभ्यासाला बसते.

विकास : तू बस अभ्यासाला मी माझ्या मित्रांना भेटून येतो.

ऋता : हो ! चालेल.

ऋता तिच्या रुममध्ये अभ्यासाला जाते आणि विकास त्याच्या मित्रांना भेटायला बाहेर निघून जातो.

संध्याकाळी ऋता, यामिनी आणि निकिता एकत्र बसून चहा पीत असतात इतक्यात विकास माघारी येतो.

यामिनी : आलास का भटकून ?

विकास : आई ! मी भटकायला गेलो नव्हतो मित्राना भेटायला गेलो होतो.

ऋता : त्यालाच भटकणे असे म्हणतात.

निकिता : ते जाऊदे ! तू बस ! चहा घे !

विकास : मी फ्रेश होऊन येतो.

विकास फ्रेश होऊन आल्यावर तो चहा पीत असताना

यामिनी : तुझ्या वाढ दिवशी तुला भेटलेली गिफ्ट ओपन करून पाहिलेस की नाही.

विकास : नाही ! मला काही त्या गिफ्ट मध्ये फारसा रस नाही. अशी कोणतीच वस्तू नाही जी तुम्ही मला दिली नाही.

यामिनी : ते गिफ्ट तुझ्या गरजेचे आहेत की नाही ते महत्वाचे नाही त्यातून गिफ्ट देणाऱ्याचे आपल्यावरील प्रेम प्रतिबिंबित होत असते. 

विकास : बरं ! आताच आपण सर्व गिफ्ट ओपन करून पाहूया ! पहिल्यांदा आपण मोठ्या आईने काय दिले आहे ते पाहूया !

विकास गिफ्ट ओपन करतो. त्यात सुंदर सोन्याची चैन असते. त्यासोबत एक चीट असते त्यावर लिहिलेले असते माझ्या सोन्यासारख्या मुलासाठी !

ऋता : किती छान सोन्या !

विकास : आता निकिता मावशी तू काय दिले आहेस ते पाहूया ! ... वा ! घड्याळ ! किती सुंदर !

निकिता : हे घड्याळ ! तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी म्हणून...

यामिनी : निलिमा काय दिले आहे ते मी पाहते... मस्त तिने तुला मोबाईल गिफ्ट केला आहे .

विकास : तरीच निलिमा मावशी माझ्याकडे बाजारात कोणता नवीन मोबाईल आला आहे याबद्दल चौकशी करत होती.

ऋता : कमळ मावशीने काय दिले आहे ते मी पाहते... वा ! इतका महागडा अत्तर... यावर संदेश काय लिहिला आहे... या अत्तराच्या सुगंधा सारखी तुझी कीर्ती सर्वदूर पसरत राहावी.

विकास : वा !

विकास : प्रतिभा मावशीने काय दिले आहे ते मी पाहतो... वा ! नोट पॅड ! ...

यामिनी : विजया आत्याने तुझ्यासाठी वाढदिवसाची भेट म्हणून बाईक ! घेतली आहे. येईल एक दोन दिवसात.

ऋता : छान ! म्हणजे आता आम्हाला बाईक वरून कॉलेजला जाता येईल.

विकास : ऋता ! पण तुझे गिफ्ट कोठे आहे.

ऋता : मी तुला गिफ्ट दयायला कमवायला थोडीच जाते.

यामिनी : विकास ! तुझ्या वाढदिवसाचा केक तिनेच मागविला होता.

विकास : केक शिवाय वाढदिवस अपूर्ण असतो. धन्यवाद ऋता.

ऋता : तुला आणखी काही गिफ्ट हवे असेल तर सांग मला मी देईन ?

विकास : मी ते वेळ आल्यावर मागून घेईन...

ऋता : चालेल.

विकास : आई पण तू मला काय गिफ्ट दिले नाहीस ?

यामिनी : बाळा ! माझे जे काही आहे ते तुझेच आहे . पण तरीही मी माझ्या हिऱ्या सारख्या मुलासाठी हिऱ्याची अंगठी घेतलेली आहे. थांब मी घेऊन येते.

यामिनी अंगठी घेऊन आल्यावर ती पाहिल्यावर सर्वांचे डोळे दिपतात .

विकास : खूपच सुंदर आहे. 

यामिनी : ऋताने निवडलेली आहे.

ऋता : पण काकानी काय गिफ्ट दिले आहे.

यामिनी : गोव्याची ट्रिप तुझ्या मित्रांसोबत !

विकास : वा ! माझ्या मित्रांना खूप आनंद होईल .

ऋता : फक्त मित्रांना ! मैत्रिणींना नाही.

विकास : तशीही माझी एकच मैत्रीण आहे.

ऋता : कोण ?

विकास : ते सिक्रेट आहे.

त्यानंतर सर्व गिफ्ट आवरून विकास त्याच्या रुममध्ये जातो. ऋताही त्याच्या मागे मागे तिच्या रुममध्ये जाते. निकिता आणि यामिनी स्वयंपाकघरात जातात काय चालले आहे ते पाहायला.

काही महिन्यानी विजय त्याच्या राजकीय दौऱ्यावर गेलेला असतो. निकिता आणि विजया तिच्या कामासाठी बाहेर गेलेली असते. विकास आणि ऋता बाहेर हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात इतक्यात कामिनी येते.

विकास : आई ! ये ! ये ! बस !

ऋता : मावशी मी तुमाच्यासाठी ज्यूस आणायला सांगते.

कामिनी : हो ! चालेल !

ऋता आत निघून गेल्यावर

कामिनी : बाकी सगळे कोठे दिसत नाहीत ते.

विकास : बाबा दौऱ्यावर गेलेत, आई आणि निकिता मावशी कारखान्यात गेल्या आहेत. तू कशी अचानक आलीस ?

कामिनी : तुला माझी आठवण येत नसली तरी मला तुझी आठवण येते.

विकास : नाही ! आई तसे काहीही नाही मलाही तुझी आठवण येते पण तू कधीच जागेवर नसतेस ! कशाला आता इतकी धावपळ करतेस आणि कोणासाठी !

कामिनी : बाळा ! तुझ्यासाठी ....असे मी अजिबात म्हणणार नाही. मी जे काही करते ते माझा वेळ सत्कारणी लागण्यासाठी आणि मी ते माझ्या आयुष्याच्या शेवटा पर्यत करत राहणार !

विकास : आई ! तुझे बरोबर आहे माणसाने आपल्या आयुष्याच्या शेवटा पर्यत कार्यरत राहायला हवे ! जो थांबला तो संपला !

ऋता : मावशी ज्यूस !

कामिनी : विकास तुला त्रास देत नाही ना ?

ऋता : नाही मावशी !

विकास : मी काय त्रास देणार तिला बापडा तीच माझा छळ करत असते.

ऋता : बघ ! मावशी हा असा माझ्याबद्दल सर्वाना खोटं सांगत असतो.

कामिनी : मला माहीत आहे. कोण खरा आणि कोण खोटा आहे ते.

ऋता : मावशी तू जेवून आलीस ?

कामिनी : नाही.

ऋता : मग आज आपण एकत्रच जेऊ ?

कामिनी : हो ! चालेल.

ऋता : मी सांगून येते तुमाच्या आवडीची भाजी करायला .

कामिनी : हो ! चालेल

ऋता निघून गेल्यावर

कामिनी : विकास ! ऋताला त्रास नको देऊ ! खूप गोड आणि लागवी मुलगी आहे . कोणीही पाहता क्षणी तिच्या प्रेमात पडेल.

विकास : हो !

कमीनी : काय ?

विकास : काही नाही. बरं ! तुझं काम कसं चाललं आहे ?

कामिनी : उत्तम ! आता मी एका वाहिनीची मुख्य असल्यामुळे माझ्यावर कामाचा खूप भार आहे.

विकास : आई ! मला हे तुला विचारायचे नव्हते पण कधी ना कधी कोणाला ना कोणाला माझे वडील खरे वडील कोण होते या प्रश्नाचे उत्तर द्यावेच लेगेल ना ?

कामिनी : बाळा ! जे आपले पालन पोषण करतात तेच आपले खरे आईवडील असतात. तुझे वडील कोण आहेत हे सत्य मी जगाला कधीच कळू दिले नाही आणि मी जिवंत असेपर्यत ते कळूही देणार नाही.

विकास : ते मला नाही कळले तरी चालेल पण तू अशा मरणाच्या गोष्टी करू नकोस ! मला माहीत आचे तू जे कांही केले असशील ते विचार करूनच केले असशील !

इतक्यात ऋता आतून बाहेर येते.

कामिनी : ऋता ! हा तुला कॉलेजला बाईकवरून ह्याच्या सोबत घेऊन जातो की नाही ?

ऋता : जातो घेऊन कधी कधी !

विकास : कधी कधी काय ? रोज घेऊन जातो. तूच कधी कधी मला सोडून तुझ्या मैत्रिणी सोबत जातेस.

कामिनी : काय गं ! ऋता ?

ऋता : आता मैत्रिणी आल्या तर त्यांना सोडून ह्याच्या सोबत जाणे बरोबर दिसत नाही ना ! हा ! नाही का ? त्याच्या मित्रांना घेऊन गोव्याला गेला होता. मला एका शब्दानेही म्हणाला नाही,’’ येतेस का म्हणून ! मी गेले नासतेच पण विचारण्याची काही पद्धत वगैरे असते की नाही. तिकडे जाऊन फोरेनच्या मुलींसोबत फोटो काढले त्या ही अर्धनग्न !

विकास : तुला नक्की राग कसला आला ? मी त्यांच्या सोबत फोटो काढले याचा की त्या अर्धनग्न होत्या याचा ?

ऋता : दोन्हींचा !

कामिनी : तुमचे हे आता कुत्रा मांजरीचे भांडण बंद करा !

ऋता : बरं ! मावशी !

कामिनी : ऋता ! पुढे काय करायचे ठरवले आहेस ?

ऋता : मला वकील व्हायचे आहे.

कामिनी : तू वकील झालीस तर त्याचा विजयला खूप आनंद होईल.

ऋता : का ?

कामिनी : त्यालाही वकिलच व्हायचे होते पण तो नाही होऊ शकला त्याच्या त्यावेळच्या आर्थिक परिस्थितीमुळे

ऋता : विकास ! तू काय होणार ?

विकास : मी बाबासारखा मोठा लेखक अथवा राजकारणीच होणार ?

कामिनी : हो ! मला खात्री आहे तू नक्कीच विजय सारखाच होणार !

ऋता : म्हणजे हा ! राजकारणी होणार आणि मी ह्याच्या केस लढवणार !

कामिनी : बरं ! आता अगोदर जेवून घेऊ या का ? मला खूप भूक लागली आहे.

ते तिघे जेवायला बसतात.

कामिनी : पालक पनीर खूप छान झाला आहे. ऋता तुला काय आवडते खायला ?

ऋता : मला चिकन आवडते.

कामिनी : विकास ! तुला

ऋता : त्याला फक्त चहा आवडते !

कामिनी : विजयालाही फक्त चहा आवडते.

विकास : आणखी बरेच पदार्थ मला आवडतात पण चहा इतके प्रेम माझे दुसऱ्या कोणत्याच पदार्थावर नाही.

कामिनी : विजय आणि ह्याला चहाचे व्यसन आहे.

ऋता : मावशी ! तुम्ही बरोबर बोललात प्रत्येक दोन – तीन तासाने ह्याला चहा लागते. रात्री बारा वाजताही तो चहाला नाही म्हणत नाही.

कामिनी : प्रतिभा मावशी जेंव्हा तुमचे घर सांभाळायची तेंव्हा म्हणायची ! विजय ! पाणी कमी आणि चहाचं जास्त पितो.

ऋता : हो ! हे खरे आहे ! आत्याही असेच काहेतरी म्हणत होती. आता थोडे कमी झाले आहेत कारण हल्ली लिहायला बसत नाहीत ना फार ! आता त्यांचा जास्ताधिक वेळ घराबाहेरच जातो.

कामिनी : चालायचच ! राजकारण म्हटलं की या सर्व गोष्टी आल्याच ! पण विजयने एकही क्षेत्र सोडले नाही. जेथे त्याच्या पाउल खुणा नाहीत. विकास ! तू तुझ्या बाबाकडून बरच काही शिकू शकतोस !

विकास : पण त्यांच्याकडून शिकायला मला ते जागेवर तर भेटायला हवेत.

ऋता : विकास ! बरोबर बोलतोय !

कामिनी : विकास ! तुझे वाचन सुरु आहे ना ?

ऋता : तो ३०० पानाचे एक पुस्तक एका दिवसात वाचतो.

कामिनी : या बाबतीत तो विजयवर गेलीला आहे. त्यमुळे मला कशाबद्दल माहिती हवी असल्यास मी आजही विजयला फोन करते.

विकास : मी इतका सर्व बाबतीत बाबांवर कसा गेलो.

कामिनी : सहवासाचा परिणाम ! माणूस कसा घडतो हे त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांवर अवलंबून असते. चंगली संगत माणसाला घडवते ते वाईट संगत माणसाला बिघडवते.

ऋता : मावशी ! तुम्ही बरोबर बोललात ! मी ह्याच्या संगतीत राहून बिघडले !

विकास : काय म्हणालीस ? पुन्हा बोल !

ऋता : काही नाही...

कामिनी : ऋता ! तुला हा ! गोव्याला घेऊन गेला नाही ना ! आपण सर्वजणी बायका बायका गोव्याला पिकनिकला जाऊया ! मी घेऊन जाईन तुम्हा सर्वाना ! म्हणजे मी – तू, यामिनी , निलिमा, प्रतिभा , निकिता, कमळ आणि विजया... चालेल ...

विकास : पण ! तो योग जुळवून आणणे ऋता तुला वाटते तितके सोप्पे नाही.

ऋता : मला सोप्पी कामे करायला आवडतच नाही ! तुझ्यासारखी...

विकास : म्हणजे ! करतो मी फक्त सोप्पी कामे करतो. तुला झेलणे हे किती अवघड काम आहे याची कल्पना नाही तुला.

ऋता : मग ! नको ! झेलू मला .

विकास : लगेच ! नाकावर राग चढला !

कामिनी : तुमचं चालुद्या ! मी निघते मला खूप कामे आहेत... चल ऋता ... मी निघते... ह्याने तुला फार त्रास दिला तर मला फोन कर..

ऋता : हो ! हो ! मावशी..

कामिनी : बाय बेटा !

विकास : बाय ! आई ! सांभाळून जा.. मी येऊ का सोडायला ?

कामिनी : नको ! ड्रायव्हर आहे गाडीत !

ऋता : मावशी आम्ही तुम्हाला गाडी पर्यत सोडायला येतो.

कामिनी : हो ! चालेल...

कामिनीला सोडून ते दोघे माघारी आल्यावर आप आपल्याला रुममध्ये निघून जातात.

त्यानंतर दोन महिन्याने ऋता गोव्याच्या ट्रीपची जुळवा जुळव करतेच. त्या ट्रिपचा सर्वखर्च अर्थातच कामिनी करते. त्या सर्व विमानाने गोव्याला पोहचतात. त्याना गोवा एअरपोर्ट वरून पिकप करून हॉटेल मध्ये आणण्याची त्यांना गोवा फिरवून पुन्हा एअरपोर्टवर सोडण्याची सोय हॉटेलनेच केलेले असते कारण ते हॉटेल विजयच्या एका राजकीय मित्राच्या मालकीचे असते. तेथे पोहचल्यावर दोघीत एक अशा चार रूम त्यांना दिल्या जातात. एका रूममध्ये कामिनी आणि निलिमा या मैत्रिणी राहतात. दुसऱ्या रूममध्ये यामिनी आणि कमळ या मैत्रिणी राहतात. तिसऱ्या रूममध्ये विजया आणि प्रतिभा या मैत्रिणी राहतात आणि चौथ्या रुममध्ये अर्थात ऋता आणि निकिता राहतात ज्यांच्यात सतत एकत्र असल्यामुळे उत्तम संवाद असतो. हॉटेलवर येताच या सार्वजनी आपापल्या रुममध्ये जाऊन फ्रेश होतात त्यानंतर चाहा- नाश्ता करून आराम करतात. संध्याकाळी त्यांचा बोटींगला जाण्याचा कार्यक्रम असतो. बोटींगवरून आल्यावर त्या आप – आपल्या रुममध्ये झोपायला जातात आणि त्यंच्यात झोपण्यापूर्वीच्या गप्पा रंगतात.

यामिनी : कमळ तुला आठवते पहिल्यांदा मी तुझ्यासोबत गोव्याला आले होते. तेंव्हा आपण तुझ्या गावच्या घरात राहिलो होतो. ते घर आता जुने झाले असेल नाही.

कमळ : जुने झाले होतेच ते पाडून आता आम्ही तेथे छान बंगला बांधला आहे . आपण विमानाने आलो म्हणून नाहीतर आपण तेथेच थांबलो असतो. तेथे छान स्विमिंग पूलही आहे.

यामिनी : आपले आता स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचे दिवस आहेत का ?

कमळ : माणूस शरीराने नाही मनाने म्हातारा झाला की संपल सारं ! मी मारते एखादी दुबकी कधी गावाला गेले तर.

यामिनी : आपल्या आयुष्यातील वर्षे कशी भराभरा निघून गेली. आपला विकास आणि कारण हा हा म्हणता वीस वर्षाचे झाले ही ! कविता माझ्यासमोर बागडणारी कविता डॉक्टरही झाली. तिच्या लग्नाचा काही विचार करतेस की नाही ? की तिला इतक्यात लग्नाचा विचार करायचाच नाही.

कमळ : तिच्या लग्नाचा निर्णय मी तिच्यावर सोपवला आहे. ती म्हणेल त्याच्याशी मी तिचे लग्न लावून देईन !

यामिनी : मला जर आखादा तिच्या वयाचा मुलगा असता तर मी तिला माझी सून करून घेतली असती आणि तुला मुलगी असती तर मी तिला माझ्या घरची सून करून घेतली असती.

कमळ : आता तुझी तब्बेत ठीक आहे ना ?

यमिनी : तशी मी ठीकच आहे पण आता या वयात शरीर त्रास देणारच कारण त्या शरीराला मी कधी आरामाच घेऊ दिला नाही. आता बहुतेक त्याला कायमच्या आरामाची गरज आहे.

कमळ : काहीही काय बोलतेस ? सगळ्यांना अजूनही तुझी गरज आहे. लग्नावरून विषय निघाला म्हणून सांगते तुझी कविताची सासू होण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता मला दिसतेय पण फक्त शक्यता !

यामिनी : ती कशी !

कमळ : मला वाटते हा ! फक्त मला कविताला विजयाचा मुलगा निलेश आवडलेला दिसतोय !

यामिनी : तसे झाले तर मला खूप आनंद होईल ! पण इतक्यात घाई नको ! त्यांचा त्यांचा त्यांना वेळ घेऊ दे !

कमळ : यामिनी ! तू आणि भावोजी ! तुमच्या नात्यात सर्व आलबेल झाल्यावर तुम्ही गोव्यातच आला होतात ना ?

यामिनी : हो ! ते दिवस माझ्या आयुष्यातील सोन्याचे दिवस होते. ते दिवस आजही आठवले तरी माझ्या मनात गुदगुल्या होतात. ते दिवस आणि आजचा दिवस विजयने कधीही मला अंतर दिले नाही.

कमळ : हो ! भावोजी किती काळजी करतात तुझी.

यामिनी : हो ! पण मी त्याला सांगणार आहे. माझे जर कधी कमी जास्त झाले तर दुसरे लग्न कर...

कमळ : काहीही काय ?

यामिनी : निदान मी गेल्यावर तरी त्याने अशा स्त्रीशी लग्न करावे जिच्यावर त्याचे आणि तिचे विजयवर मनापासून प्रेम असेल.

कमळ : तू काय बोलशील त्याचा काहीही नेम नाही. चल झोपूया आता.

तिकडे कामिनी आणि निलिमाचा त्यांच्या रुममध्ये संवाद सुरु असतो.

कामिनी : निलिमा तू आणि मी जीवाभावाच्या मैत्रिणी होतो. आयुष्यात एकाच माणसाच्या प्रेमात पडलो आणि पडून राहिलो.

निलिमा : तुला त्याला निदान तुझ्या प्रेमाची भेट तरी त्याला देता आली पण मला ती ही देता आली नाही.

कामिनी : त्याला भेट मी दिली पण त्याचा सर्वाधिक सहवास कोणाला लाभला ? तुलाच ना ?

निलिमा : हो ! पण त्यामुळे त्याच्या प्रेमासाठीचे माझे आतुर असणे अधिक वाढत जाऊन माझ्या हृदयाची जी दशा झाली आहे ती तुला नाही कळणार ! तुला निदान त्याच्या आयुष्यात हक्काने जाण्याची परवानगी होती. पण मला नेहमी भीती होती. त्याच्यापासून दूर जाण्याची.

कामिनी : माझी तुझ्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. प्रेम करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. पण माझ्यात आणि विजयच्यात जे काही झाले ते प्रेमामुळे नाही तर अपघाताने झाले.

निलिमा : मी ही तुला दोष देत नाही ! तू जो मनाचा मोठेपणा दाखवलास तो कोणीही दाखवू शकत नाही. माझी मैत्रीण म्हणून मला तुझा अभिमान आहे.

कामिनी : आपण आता आयुष्याच्या या वळणावर आहोत की आपल्याला कधीही बोलावणे येईल. विकास माझा आणि विजयचा मुलगा आहे हे सत्य जर मी त्याला जिवंतपणी नाही सांगू शकले तर तू सांग ! मला वचन दे तसे !

निलिमा : मी वचन देते.

कामिनी : मी हे तुला आज का सांगितले ! पुन्हा आपल्याला असा एकांत मिळेल न मिळेल. निलिमा ! विजयाचा वंश वाढवा ही माझी मनोमन इच्छा होती. त्यासाठी मी काहीही करायला तयार होतेच. पण त्याला विजयचा विरोधच होता. म्हणूनच मी गर्भवती असल्याचे कळतात मी परदेशात गेले कारण तेथे कुमारी माता होण्याचा फार इशू केला जात नाही. मी माझ्या मुलाला सांभाळायला समर्थ होते. पण त्याला वडिलांचे प्रेम मिळावे आणि विजयची बदनामी होऊ नये म्हणून मी त्याच्याच मुलाला त्यालाच दत्तक दिला. पण त्यामुळे माझ्या मुलाला तो दत्तक मुलगा आहे हे डोक्यात ठेऊन विनाकारण जीवन जगावे लागत आहे. ते सत्य आता आपल्या सर्वांच्या अवघड जागेचे दुखणे होऊन बसले आहे.

निलिमा : तू झोप आता फार विचार करू नकोस यातूनही काढू आपण काहीतरी मार्ग !

तिकडे विजया आणि प्रतिभा त्यांच्या रुममध्ये गप्पा मारत असतात.

विजया : किती वर्षांनी फक्त आपल्या दोघींना अशी गप्पा मारण्याची संधी मिळाली आहे नाही.

प्रतिभा : हो !

विजया : आपल्या सर्वांच्या आयुष्यात एकच गोष्ट वाईट घडली ती म्हणजे तुझ्या नवऱ्याचा अपघात आणि त्यानंतर झालेले मृत्यू !

प्रतिभा : त्याचे फार काही नाही ! जो जन्माला आला आहे तो एक दिवस जाणारच ! तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्या आणि माझ्या मुलांच्या आयुष्याचे सोने झाले.

विजया : प्रत्येकाच्या नियतीत जे लिहिलेले असते तेच होते बाकी सारे फक्त निमित्त मात्र असतात.

प्रतिभा : मला आता फक्त काळजी आहे ती माझ्या श्रावणीची ! तिचे लग्न झाले की मी मारायला मोकळी !

विजया : मारायच्या गोष्टी कशाला करतेस ! श्रावणी खूप चांगली मुलगी आहे . तिला नक्कीच तिच्या मनासारखा जोडीदार मिळेल.

प्रतिभा : तू माझ्या श्रावणीला सून करून घेतली असतीस.

विजया : माझ्या दोन मुलांपैकी एकाला जरी ती आवडली असेल तर आजही मी तिला माझी सून करून घ्यायला तयार आहे. पण तू हे असे का विचारते आहेस ?

प्रतिभा : अभिनय क्षेत्रातील मुलींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन जरा दुषित असतो म्हणून म्हणाले.

विजया : हल्लीची मुले आपापले जोडीदार स्व:ता निवडतात. ते योग्यही आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जर माझ्या मुलाला तुझी मुलगी आवडली असती तर मी कधीही तिला सून करून घ्यायला तयार आहे. तू तिची काळजी करू नकोस मी आहे ना !

प्रतिभा : मी जे नेहमी म्हणते तुझ्यासारखी मैत्रीण भाग्याने मिळते. ते काही खोटे नाही.

यामिनी : मला माहित होते. तुझे विजयवर आणि विजयचे तुझ्यावर खूप प्रेम होते. पण विजयचा त्यावेळी विवाह संस्थेवर विश्वास नव्हता त्यामुळे मी तुमच्यासाठी काहीही करू शकले नाही त्याबद्दल मला माफ कर.

प्रतिभा : मला त्या गोष्टीचे अजिबात दुख : नाही. यामिनी तिच्या स्पर्शाने माझ्या आयुष्याचे सोने झाले. त्या माझ्या आयुष्यात एखाद्या परीसासारख्या आल्या होत्या.

यामिनी : हो ! चल झोप आता फार विचार करू नकोस !

तिकडे ऋता आणि निकिता त्यांच्या रुममध्ये गप्पा मारत असतात.

ऋता : मावशी ! तू दुसरे लग्न का केले नाहीस ?

निकिता : दुसऱ्या लग्नाचा माझ्या आयुष्यात योगच नव्हता पण विजयच्या आयुष्यात तो योग आहे असे एका मोठ्या ज्योतिष्याने आम्हाला सांगितले होते त्याने सांगितलेले जवळ - जवळ सर्व भविष्य खरे झाले.

ऋता : माझा नाही विश्वास ज्योतिष्यावर !

निकिता : माझाही नव्हता म्हणून मी फक्त संपत्ती पाहून लग्न केले आणि हे वैधव्य आले वाट्याला आयुष्यभ्रसाठी !

ऋता : मावशी तुला वाटले नाही कधी कोणाच्या प्रेमात पडावे असे.

निकिता : नाही ! मी फक्त विकासाच्या प्रेमात पडले.

ऋता : मी ही !

निकिता : काही म्हणालीस का ?

ऋता : काही नाही !

निकिता : मी इतकीही म्हातारी झाले नाही. माझे कान अजून शाबूत आहेत.

ऋता : मी तेच बोलले जे तू ऐकलेस !

निकिता : मग ! तुझे त्याच्यावर प्रेम आहे ते तू त्याला सांगितलेस की नाही.

ऋता : मला ते त्याच्या तोंडून वदवून घ्यायचे आहे.

निकिता : बाळा ! असा अट्टहास करू नकोस ! तुला आयुष्यभर वाट पाहवी लागेल पण तो क्षण तुझ्या आयुष्यात कधीही येणार नाही. प्रेम वेळ हातात असताना व्यक्त केलेले उत्तम !

ऋता : हो ! कळतेय मला पण मन वळत नाही. अजून काही वर्षे मी वाट पहायला तयार आहे . पण माझे हे सिक्रेट तू कोणालाही सांगणार नाही असे मला वचन दे !

निकिता : मी माझे सिक्रेट कोणाला कळू दिले नाही तर तुझे सिक्रेट कोणाला कसे कळू देईन ! चल झोप आता उद्या सकाळी आपल्याला गोवा फिरायला जायचे आहे. त्या चौघीही झोपेच्या अधीन होतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फ्रेश होऊन बाहेर येतात चहा नाश्ता करतात आणि गोवा फिरायला बाहेर पडतात. गोव्यात पाहण्यासारखे फक्त समुद्रे किनारे नाही तर अनेक वास्तूही आहेत ज्या आजही सुस्थितीत आहेत. उदा. गोव्यातील चर्च, किल्ले आणि देवळेही पाहण्यासारखी आहेत. एका दिवसात अर्धा गोवा पाहण्याचा त्याचा मानस होता. त्या सर्वजणी आता मध्यमवयीन असल्यामुळे त्यांचे मन चर्च आणि देवळातच जास्त रमले. मंगेशीच्या देवळातून बाहेर पडल्यावर

यामिनी : देवळात जाऊन दर्शन घेतल्यावर मन कसे प्रसन्न झाले.

प्रतिभा : हो ! आता आपल्याला देवातच जास्त मन रमवायला हवे !

कामिनी : तुम्ही रमवा ! मला काही वेळ मिळेल असे वाटत नाही.

विजया : माझे तर आयुष्यच गेलेय देव देव करण्यात आता मला मजा करण्यात जास्त रस आहे.

निलिमा : मला आता देवाकडून काहीच अपेक्षा उरलेल्या नाहीत

कमळ : मी फक्त देखल्या देवा दंडवत घालते.

निकिता : देवाने तर माझ्या आयुष्यात मला एकही सुख मिळू दिले नाही. पण त्याबाबतीत मी आता देवाला दोष देत नाही.

ऋता : माझा देवावर विश्वास आहे तो माझ्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करेल.

यामिनी : कविता आणि श्रावणीही आपल्यासोबत यायला हव्या होत्या.

प्रतिभा : श्रावणीचे शूटिंग चालू आहेत.

कमळ : कविताला एका सेमिनारला जायचे होते.

ऋता : त्या दोघी आल्या असत्या तर मला आणखी मजा आली असती.

यामिनी : चला आता आपण आखाद्या हॉटेलात जेवून घेऊ या !

कामिनी : चालेल !

यामिनी : मला चिकन हवे !

विजया : आता देवळातून आलो आणि तुला चिकन खायचे आहे. मलाही चालेल.

प्रतिभा : मलाही चालेल ! त्यात काय आपण आपल्याकडे रोज देवाच्या पाया पडतो आणि चिकन खातोच की !

निलिमा : पण मी शाकाहारी आहे .

निकिता : मी ही !

ऋता : मलाही शाकाहारीच हवे !

कमळ : मला चिकनच हवे !

कामिनीनी ऑर्डर देते त्या सर्वजणी मस्त पैकी जेवणावर ताव मारतात. एक एक थंडा पितात आणि पुन्हा गोव्यातील चर्च पहायला जातात. दिवसभर अर्धा गोवा भटकून झाल्यावर संध्याकाळी त्या हॉटेलवर माघारी येतात. रात्री नाच - गाण्याचा प्रोग्राम ठेवलेला असतो हॉटेलच्या हॉलमध्ये त्यामुळे त्या फ्रेश होऊन जेवतात आणि त्या हॉलमध्ये जातात तेथे दोन गायक गात असतात आणि संगीताच्या तालावर लोक ठेका धरून नाचत असतात. नाचत असतात पण धांगड धिंगा करत नसतात. त्या सर्वजणी तासभर नाचतात आणि आपापल्या रुममध्ये जाऊन आडव्या पडतात.

यामिनी : नाचून नाचून माझी कंबर धरली.

कमळ : तरी तुझी कमर नाजूक आहे. माझ्यासारखी भरलेली नाही.

यामिनी : तुझी कमर भरलेली आहे त्यामुळे तू जास्त उड्या मारत नाहीस.

यामिनी : ऋता छान नाचते नाही !

कमळ : हो ! तिला तुझी सून का करून घेत नाहीस ?

यामिनी : त्या दोघांचे जमेल असे वाटत नाही. साराखे कुत्रा – मांजरी सारखे भांडत असतात. पण जर तसे झाले तर मला खूप आनंद होईल.

कमळ : जे एकमेकांशी खूप भांडतात त्यांचेच एकमेकांवर खूप प्रेम असते.

यामिनी : हे खरे असावे ! विजय आणि माझ्यात कधीच टोकाचे भांडण झाले नाही.

कमळ : आमचे तर आयुष्यच भांडणात गेले. आता कमलेश नक्कीच मी घरी नाही यावरून मला शिव्या घालत असेल. पण त्याचे माझ्यावर प्रेमही तितकेच टोकाचे आहे.

यामिनी : मला माहीत नाही का ते ? मलाही विजयची आज खूप आठवण येते. मी विजयचे पहिले प्रेम होते. पण तरीही मला त्याचे प्रेम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.

कमळ : आता आपली अर्धी हाडे मसणात गेली असताना या सगळ्या गोष्टींवर विचार करण्यात काही अर्थ नाही . चल झोपुया उद्या आपल्याला बीचवर जायचे आहे.

यामिनी : हो ! झोपुया !

तिकडे ...

कामिनी : किती वर्षाने मी नाचले ? म्हणजे पूर्वी पार्टीला गेल्यावर मी खूप नाचायचे. पार्टीला जाने तर मी कधीच सोडले. अशाच एका पार्टीने माझ्या आयुष्याला एक वेगळच वळण दिलं !

निलिमा : तुला अजूनही त्या गोष्टीचा पश्चाताप होतो का ?

कामिनी : नाही ! माझ्या एका चुकीमुळे कित्येकांच्या आयुष्यात मी आनंद पेरू शकले.

निलिमा : तू विजयसाठी काहीतरी करू शकलीस पण मला त्याच्यासाठी काहीच करता आले नाही.

कामिनी : तुला एक विचारु ?

निलिमा : काय ?

कामिनी : ऋता तुला विकाससाठी कशी वाटते ?

निलिमा : खूपच छान ! खूप संस्कारी, प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांची काळजी घेणारी मुलगी आहे.

कामिनी : पण ते दोघे कुत्रा – मांजरीसारखे भांडत असतात.

निलिमा : अजून ते शिकता आहेत. त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही व्हायचे आचे ते होऊदे ! यादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले तर ठीक नाहीतर..करू आपणच काही त्तरी.

कामिनी : हो ! मला ती माझी सून म्हणून पसंत आहे. चल झोपूया आता...

तिकडे ...

विजया : प्रतिभा ! तुला ऋता कशी वाटते आमच्या विकाससाठी ?

प्रतिभा : उत्तम ! तिच्यासारखी मुलगी दिवा घेऊनही सापडणार नाही.

विजया : मी या विषयावर बोलणार आहे विजय सोबत .

प्रतिभा : नको इतक्यात नको ! अजून ते लहान आहेत त्यंचे शिक्षण वागैरे पूर्ण होऊदे मग पाहू !

विजया : प्रतिभा ! तू बरोबर बोलतेस.

तिकडे ...

निकिता : ऋता तू खूप छान नाचतेस !

ऋता : मावशी तुम्ही सर्वजणीही छान नाचता की !

निकिता : आम्ही छान नाचतो पण हल्ली नाचणे आमच्या कमरेला झेपत नाही. पूर्वी मी विजयसोबत रोज वॉकला जायचे तेंव्हा मी फिट होते आता ते राजकारणात गेले. त्यांची जास्तीची पायपीठ सुरु झाली. मी ही हल्ली समाजसेवेच्या निमित्ताने घराबाहेरच जास्त असते.

ऋता : मावशी तू कधी कोणाच्या प्रेमात पडली होतीस का ?

निकिता : मी प्रेमात पडले नाही पण माझ्या प्रेमात बरेच होते. पण मी त्यांना कधी भाव दिला नाही कारण मला श्रीमंत नवरा हवा होता. तसा तो मला मिळला. पण त्याचे माझ्यावर नाही फक्त माझ्या शरीरावर प्रेम होते. शरीरावर तर शरीरावर प्रेम करणारा भेटला होता पण तो ही अकाली गेला. त्यानंतर आयुष्यात च्याच्या प्रेमात पाडावं असं कोणी आलेच नाही. ज्याचे माझ्यावर प्रेम होते तो माझ्याशी पुन्हा लग्न करू शकत नव्हता. प्रेम ओळखायला अक्कल लागते ती कदाचित माझ्याकडे तेंव्हा नव्हती....पण मी जी चूक केली ती कधीही करू नकोस आपल्या प्रेमाला मिळविण्याच्या आड कोणीही अगदी कोणीही आले तरी त्याचा विचार करू नकोस कारण आपल्याला आपले खरे प्रेम मिळविण्याची संधी आयुष्यात फक्त एकदाच मिळते ती गमावून चालत नाही. हे लक्षात ठेव !

ऋता : मी हे नेहमी लक्षात ठेवेन.

निकिता : चल झोप आता उद्या आपल्याला समुद्राच्या लाटांसोबत खेळायचे आहे.

ऋता : मला मावळत्या सुर्यासोबत फोटो काढायचे आहेत.

निकिता : हो ! उद्या आपण खुप फोटो काढू !


त्या सर्वजणी शांत झोपी जातात.

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजणी जीन्स आणि टी – शर्ट घालून तयार होतात. सर्वांनी डोळ्यांवर महागडे रंगीत चष्मे चढवलेले असतात. सकाळचा चहा नाश्ता करून त्या बाहेर पडतात. समुद्र किनाऱ्यावर पोहचताच सार्वजनी समुद्राच्या दिशने झेपावतात. समुद्राच्या लाटांना आपल्या मनात साठवून घेतात कारण आता हा समुद्र पुन्हा अनुभवता येईल की नाही याबद्दल शंका निर्माण झालेली असते. ऋता मात्र समुद्राच्या लाटांसोबत मस्त खेळत असते. दुपार झाल्यावर त्या एका हॉटेलात जाऊन मस्त लंच करतात आणि दुसऱ्या समुद्र किनाऱ्यावर जातात. गोव्याचे समुद्र किनारे खूप स्वच्छ असल्यामुळे मनात भरतात. पुढच्या किनाऱ्यावर पोहचे पर्यत संध्याकाळ व्हायला येते. सर्वाना भरतीच्या लाटांची आणि सूर्यास्ताची प्रतीक्षा असते. समुद्र किनारी उभ राहून सूर्यास्त पाहण्यात काही वेगळाच आनंद असतो. सुर्यास्तासोबत सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. अंधुक प्रकाशातही लाटांसोबत खेळताना फोटो काढताना त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

यामिनी : कमळ ! हा अस्ताला जाणारा सूर्य आपण जसा आनंदाने स्वीकरतो तसा आयुष्याचा अस्त आपण आनंदाने का स्वीकारत नाही.

कमळ : तुझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही.

निकिता : माझ्या आयुष्याच्या अस्तापर्यत मला विजयची सोबत मिळत राहायला हवी.

निकिता : माझ्या आयुष्याचा अस्त होईल तेव्हा मी विजयाच्या कुशीत असावे अशी माझ्या आयुष्यात माझी एकच इच्छा आहे.

कामिनी : माझ्या आयुष्याचा असत विजयाच्या अगोदर व्हावा ! या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात मला त्याची हक्काची बायको होण्याचे भाग्य लाभावे.

विजया : चला आता... खूप उशीर झाला आहे. सर्वजणी पुन्हा हॉटेलात येतात आणि फ्रेश होऊन एकत्र डिनर करून आप आपल्या रुममध्ये झोपायला जातात.

झोपता झोपता ...

यामिनी : कमळ ! आज मी गोव्याचे सौंदर्य माझ्या डोळ्यात साठवून घेतले आहे. आपला कोकण काही कमी सुंदर नाही. पण काय आहे जेथे जे पिकत तेथे ते विकले जात नाही. आपल्या कोकणाच्या सौदर्याला अजून व्यावसायिकतेच्या जोडीची गरज आहे.

कमळ : तू बरोबर बोललीस ! आपल्या कोकणाला इतका मोठा समुद्र किनारा लाभला आहे पण त्या किनाऱ्यावर अजून पर्यटन उद्योग म्हणावा तसा वाढलेला नाही. तो जर वाढला असता तर आपण आपला उद्योग कोकणात नसता का स्थापन केला.

यामिनी : तू बरोबर बोलते आहेस ! मला आपल्या कोकणासाठी काही तरी करायचे आहे. आपला उद्योग आपण कोकणात नाही का वाढवू शकत ?

कमळ : या गोष्टीचा मी अजून विचार केला नाही. मुंबईला गेल्यावर आपण या विषयावर चर्चा करूया !

यामिनी : चालेल !

कमळ : यामिनी तू काहीपण म्हण ! पण लहान - मोठ्यांना सर्वाना पाण्यात खेळायला मजा येते.

यामिनी : मलाही खूप मजा आली खरी पण मुंबईला गेल्यावर सजा मिळायला नको !

कमळ : यामिनी तू हल्ली खूपच नकारात्मक बोलायला लागली आहेस पूर्वी अशी नव्हतीस तू !

यामिनी : वय वाढल्यावर होते असे.

कमळ : आता तू जरा उत्साही राहत जा... तुला अजून नातवंडे खेळवायची आहेत मांडीवर !

यामिनी : हो ! तुलाही ! चल झोप आता.

तिकडे...

विजया : प्रतिभा ! मला ते दिवस आठवले जेंव्हा आपण सर्व म्हणजे तू - मी अजय – विजय आणि आपले मित्र – मैत्रिणी केळवा बीचवर पिकनिकला गेलो होतो. तेंव्हा आपण किती मजा केली होती. तेंव्हाच मला वाटले होते की तू विजयच्या प्रेमात आहेस.

प्रतिभा : आता त्या जुन्या गुलाबी आठवणी आठवून काय उपयोग ? आता लवकरच आपल्याला आपली नातवंडे मांडीवर खेळवायची आहेत.

विजया : ती खेळवायची तेंव्हा खेळवू आता मला फक्त मजा करायची आहे. प्रतिभा ! तू ही आता त्या यामिनी वाहिनीसारखी म्हातारपणाची दुखणी गाऊ नकोस. आयुष्याने तुला खूप मजा करण्याची संधी दिली आहे तिचा आनंद घे !

प्रतिभा : विजया ! तू बरोबर बोलते आहेस ! कामाच्या व्यापात मला कोठे फिरायला मिळाले नाही पण आता जेंव्हा जेंव्हा संधी मिळणार मी फिरून घेणार !

विजया : चल झोप आता ...

तिकडे ...

कामिनी : निलिमा ! आज आपण पाण्यात अगदी लहान मुलांसारखे खेळलो नाही ?

निलिमा : हो ! सर्व लोक आपल्याकडे पाहत होते.

कामिनी : म्हणजे काय ? या वयातही आपण फटका दिसतो ना ?

निलिमा : तुझे उगाच काहीही !

कामिनी : मी विनोद करत होते पण तू अजूनही सुंदर आणि फिट आहेस.

निलिमा : असणारच ना ! या वयातही मी रोज दोन तास योगा करते.

कामिनी : आम्ही काही विजयाला शेवट पर्यत साथ देऊ असे वाटत नाही. पण आम्ही नसलो तरी तू त्याला साथ देशील याची मला खात्री आहे.

निलिमा : साहेबांचा काही भरोसा नाही ! नाहीतर एखाद्या तरुण पी.ए.च्या प्रेमात पडायचे. तो पडणार नाही पण ती नक्कीच पडू शकते.

कामिनी : नाही ! त्याच्यात तितका दम नाही.

निलिमा : कशावरून ?

कामिनी : मी ओळखते त्याला आतून बाहेरून जितकी, तितकी यामिनीही ओळखत नाही.

निलिमा : पूर्वी मला वाटायचं माणसाच्या आयुष्यात प्रेम खूप महत्वाचे असते पण आता मला वाटते माणसाच्या आयुष्यात प्रेमापेक्षाही माणसे जास्त महत्वाची असतात. जर तुम्ही सगळे माझ्या आयुष्यात नसतात तर...प्रेमाने तर माझा जीवच घेतला असता. विजयवर माझे प्रेम नाही पण मला त्याचे माझ्या सोबत राहणे आवडते.

कामिनी : माझेही कधीच त्याच्यावर प्रेम नव्हते पण त्याच्यासारखा उत्तम पुरुष आपला असावा ही इच्छा होती मनात. त्यातूनच तो प्रकार घडला आणि विकासचा जन्म झाला.

निलिमा : मी विजयला कायम साथ देईन की नाही ते मला माहीत नाही पण मी मरेपर्यंत नक्की देईन !

कामिनी : चल ! झोप आता विजय आपल्या आयुष्यात इतका व्यापून राहिला आचे की आपण त्याच्यावर किती बोललो तरी ते कमीच आहे.

निलिमा : हो ! झोपूया.

तिकडे ..

ऋता : निकिता मावशी तुला पोहता येते ते मला माहीतच नव्हते.

निकिता : म्हणजे काय ? मी लहानाची मोठी कोकणात झाली आहे. मी लहान असताना आमच्या गावच्या नदीत खूप पोहायचे ! पण मला नेहमी आकर्षण मात्र मुंबईच्या समुद्राचे असायचे. आमच्या गावापासून काही अंतरावरच समुद्र आहे पण मी कधी समुद्रात पोहले नाही.

ऋता : मला पोहायला ! विकासने शिकवले ! मला माहीत असते तुला पोहायला येते तर मी तुझ्याकडून शिकले असते. मग ! तू आपल्या बंगल्यातील स्वीमिंग पूलमध्ये का पोहत नाहीस ?

निकिता : पूर्वी पोहायचे ! पण हल्ली वेळच मिळत नाही.

ऋता : आता आपण वेळ मिळाला तर आखाडी डुबकी मारत जाऊ

निकिता : हो ! चालेल.

ऋता : आयुष्य किती भराभर निघून जाते नाही हल्ली ?

निकिता : हो ! त्यामुळेच मी ठरवले आहे आता आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण आनंदात जगायचा आणि दुसऱ्याचा प्रत्येक क्षण आनंदी करण्याचा प्रयत्न करायचा.

ऋता : बरोबर आहे मावशी तुझे !

निकिता : विकासचा तुला फोन वगैरे आलेला की नाही ?

ऋता : नाही आला ! मला वाटते त्याला माझी साधी आठवणही आली नसेल. तिकडे मित्रांसोबत मजा करत असेल घरात कोणी नाही म्हणून...

निकिता : असेल..असेल... झोप आता.

ऋता : हो ! झोपूया !

दुसऱ्या दिवशी त्या गोव्याचा मार्केट फिरतात... प्रत्येकीला काही ना काही घ्यायचे असते.

कामिनी काजू आणि बरच काही विकत घेते. यामिनी कोकम सरबत, प्रतिभा कपडे, विजया जे भेटेल ते घेते, निकिता एक छान ओढणी घेते. निलिमा विजयसाठी छान टी. शर्ट घेते. ऋता विकाससाठी छान टोपी, टी. शर्ट

आणि चिकी घेते.

कामिनी : आणखी कोणाला काही घ्यायचे आहे का ?

यामिनी : गोव्याची आठवण म्हणून मी आपल्या सर्वांसाठी एक - एक ओढणी घेते.

कामिनी : ओके !

सर्वांची भरपूर खरेदी झाल्यावर त्या हॉटेलात येतात तेथे दुपारचा लंच करतात आणि आपापल्या रुममध्ये जाऊन सामानाची आवरा आवर करून हॉटेलच्या बिलाब्द्द्ल कामिनेने विचारणा केली असता. त्या हॉटेलचे मालक तेथे येतात.

मालक : तुमचे बील पेड झालेले आहे.

कामिनी : कोणी केले ?

तितक्यात विजय समोरून येतो.

विजय : मी केले !

यामिनी : तू कधी आलास ?

विजय : हे काय ! आता काही मिनिटापूर्वी आलो.

यामिनी : मग आम्हाला भेटला का नाहीत ?

विजय : तुम्हाला सर सरप्राईज द्यायचे होते.

कामिनी : तू कशाला बील दिले. मी देणार होते.

विजय : तुम्हा सर्वाना मी कधी वेळ देऊ शकलो नाही त्याची शिक्षा समजा...

कामिनी : यायचं होत तर जरा अगोदर यायचं ना !

विजय : मी लवकरच येणार होतो पण एका कामात अडकलो.

यामिनी : पण तू आमच्या सोबत कसा येणार आमच्या विमानाच्या तिकीट बुक आहेत.

विजय : मी तुमच्या सोबत येणारच नाही ! चला मी तुम्हाला एअरपोर्टवर सोडतो आणि माघारी येतो. गोव्याला माझ्या काही मिटींग्ज आहेत. चला ...

कामिनी : चला ! विजय पण तू माझी आपल्या माणसांसाठी काही करण्याची संधी हेरावून घेतलीस !

विजय : आपण वेगळे आहोत का ?

यामिनी : कामिनी ! विजय बरोबर बोलतोय ! तू काय आणि त्यान पैसे दिले काय हिशोब एकच झाला.

विजय त्या सर्वाना एअरपोर्टवर सोडून माघारी हॉटेलवर येतो.

मालक : विजय यार ! तू नशीबवान आहेस तुझ्यावर प्रेम करणारी इतकी सर्व माणसे आहेत.

विजय : हो ! त्याबाबतीत मी नशीबवानच म्हणावे लागेल.

मालक : मी इतकी संपत्ती असूनही तुझ्या इतका नशीबवान नाही.

विजय : ही माणसे माझे नशीब म्हणूनच माझ्या आयुष्यात आली होती. आज मी जो काही आहे तो या माणसांमुळे !

मालक : मला आवडेल एक दिवस तुझ्या घरी यायला !

विजय : ये ! की ! माझे घर ते तुझेच घर आहे. तू मला गोवा फिरव मी तुला महाराष्ट्र फिरवतो.

मालक : चालेल ! ... चला आता ... ते दोघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून निघून जातात.

इकडे त्या सर्वजणी मुंबईला आल्यावर...आपापल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी दुपारी ऋता आणि विकास सोफ्यावर बसलेले असतात.

विकास : ऋता काय आणलेस माझ्यासाठी गोव्यावरून ?

ऋता : तू गोव्याला गेला होतास तेंव्हा काय आणले होतेस माझ्यासाठी ?

विकास : ओढणी आणली होती ती !

ऋता : पण ती ही माझ्या आवडत्या रंगाची नव्हती.

विकास : आणली होतीना ! रंगातले मला फार काही कळत नाही.

ऋता : मग मला फोन करून विचारायचे ना ? फोन वरून आठवले मी गोव्याला गेल्यावर तू मला एकही फोन केला नाहीस.

विकास : मी तुला फोन का करू ? माझे तुझ्यामुळे काहीच आडले नव्हते.

ऋता : बरोबर आहे तुझे कशाला काही आडेल माझ्या वाचून...

विकास : अगदीच तसे नाही ! मी विचार केला तू पिकनिकच्या मूड मध्ये असशील कशाला उगाच तुझा मूड खराब करायचा म्हणून नाही केला. तू माझ्या फोनची वाठ पाहत होतीस का ?

ऋता : अगदीच तसे नाही ! पण मला वाटले होते निदान त्रास द्यायला तरी तू मला फोन करशील.

विकास : मला काय दुसरी कामे नाहीत.

ऋता : कसली कामे असतात तुला.

विकास : मला आमच्या कॉलेजसाठी एक एकांकिका लिहायची आहे.

ऋता : तू लिहिणार आहेस ?

विकास : फक्त लिहिणार नाही मी त्यात अभिनयही करणार आहे.

ऋता : अरे ! वा ! बाबांचे गुण उतरायला लागले वाटतं मुलामध्ये.

विकास : ते जाऊदे ! तू माझ्यासाठी काय आणलेस ते सांग ! तू माझ्यासाठी काहीच आणले नाहीस असे होणार नाही.

ऋता : मी तुझ्यासाठी चिक्की , टोपी आणि टी. शर्ट आणला आहे. थांब मी घेऊन येते.

ऋता त्या घेऊन येते आणि विकासाच्या हातात देते.

विकास : छान आहेत ! धन्यवाद !

ऋता : धन्यवाद काय ?

विकास : आता मला तुझ्या हातची एक चहा पाजते का ?

ऋता : हो ! आम्हाला या घरात तेवढेच काम आहे.

ऋता चहा घेऊन येते चहा पिता पिता...

ऋता : मी आत्याच्या रुममध्ये जाऊन ती उठली का ते पाहून येते.

विकास : का ? आईला काय झाले ?

ऋता : थोड्या वेळापूर्वी तिला थोडेबरे वाटत नव्हते म्हणून ती झोपली होती.

विकास : डॉक्टरला बोलावले का ?

ऋता : हो ! ते म्हणाले थोडा बिपी लो झाला होता.

विकास : हल्ली आईला फार दगदग झेपत नाही. मी तिला कितीदा म्हणालो ,’’ आता फार दगदग करू नकोस !

ऋता : या वयात तब्बेतीच्या तक्रारी चालायच्याच !

विकास : चल आपण तिला पाहूया !

विकास आणि ऋता यामिनीला भेटायला तिच्या खोलीत येतात.

विकास : आता कसे वाटते आहे आई ?

यामिनी : मी ठीक आहे तुम्ही काळजी करू नका !

ऋता : आत्या मी थांबू का तुझ्या सोबत !

विकास : नको ! तू जा ! तुझा अभ्यास कर ..मी थांबतो आई जवळ ! बाबानाही फोन करून सागतो.

ऋता निघून गेल्यावर निकिता तेथे येते.

निकिता : काय झाले अचानक यामिनीला ! विजयला फोन केलास का ? डॉक्टरने काय सांगितले आहे.

विकास : मी बाबांना फोन केला होता ते लगेच गोव्यावरून निघणार आहेत. डॉक्टर म्हणाले,’’ तिला आरामाची खूप गरज आहे.

निकिता : विकास ! तू जा ! तुझी काही कामे असतील तर ती कर मी बसते यामिनी जवळ !

यामिनी : निकिता ! मला वाटत नाही मी आता या आजारातून बरी होईन... जर मला काही झाले तरी तू या घराला अंतर देणार नाहीस असे मला वचन दे !

निकिता : तुला काहीही होणार नाही...मी वचन देते तुला बरे वाटावे म्हणून तरी...

रात्रीपर्यत यामिनीच्या तब्बेतीत काही सुधारणा होत नाही. रात्री विजय एकटाच तिच्या उशाशी बसलेला असताना

यामिनी : विजय ! मला नाही वाटत मी यातून आता बाहेर पडेन पण तू मला वचन दे ! माझे जर काही कमी जास्त झाले तर तू निलिमाशी लग्न करशील ?

विजय : तुला काहेही होणार नाही....मी तुला कोणतेही वचन देणार नाही...

यामिनी : मी आता पर्यत तुझ्याकडे काहीही मागितले नाही ! ही माझी शेवटची इच्छा आहे असे समज ! यामीन

विजय : बरं बाई ! मी तुला वचन देतो.

रात्री उशिरा यामिनीची तब्बेत जास्त बिघडल्यामुळे तिला खाजगी दवाखान्यात भारती करतात. दुसऱ्या दिवशी तिच्या ताब्बेतिची बातमी कळतात सर्व तिला भेटायला येतात. त्या सर्वांशी यामिनी निर्वाणीचे बोलत असते.

यामिनी : निलिमा तू विजयाला कधीही अंतर देणार नाहीस. कामिनी ! तुझ्या मुलाचा सांभाळ आता तुलाच करायचा आहे. कमळ ! काळजी घे !, विजयाअ -प्रतिभा माझ्या घराकडे लक्ष असू द्या ! निकिता ! मी सांगितलेले लक्षात ठेव !, ऋता – विकास ...यामिनी प्राण सोडते...सर्व ओक्साबोक्शी रडतात.

बारा दिवसानंतर यामिनीचे सर्व उत्तर कार्य आटपल्यावर सर्वाना एकत्र बसवून

विजय : मी ... निलिमाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या विषयी मी निलीमाशी बोललो आहे तिचे ना नाही. मला या विषयावर सर्वांचे मत हवे आहे.

विकास : बाबा जर तुम्हाला दुसरेच लग्न करायचे आहे तर आईशी करा ना ! याचा अर्थ मला निलिमा मावशी आवडत नाही असा अजिबात नाही.

कामिनी : विकास बाळा ते शक्य नाही . मी तिची जागा कधीच घेणार नाही असे तिला मी वचन दिले होते. ते मी तोडू शकत नाही आणि लग्न वगैरे या गोष्टीत मला कधीच रस नव्हता आणि आता तर अजिबातच नाही. विजयने तिच्या मृत्यू पश्चात निलिमाशी ल्ग्न्कारावे अशी इच्छा होती. विजय जसा तिच्या इच्छेचा मान राखत आहे तसा तो आपल्यालाही राखायला हवा !

निकिता : मलाही हे पटतेय !

त्यानंतर सर्वांनी होकार भरल्यावर ....

ऋताचे वडील : माझी ताई गेली ! तिची शेवटची इच्छा पुरी व्हायलाच हवी पण आता मी ऋताला तिची परीक्षा झाल्यावर या घरात नाही ठेवू शकत.

निकिता : आम्ही आहोत सर्व तिची काळजी घ्यायला ?

निकिताचे वडील : नकोस ! मी तिची परीक्षा झाली की तिला माझ्या घेऊन जातो.

विजय : जशी तुझी इच्छा पण या घरावर तिचाही विकास इतकाच हक्क आहे हे विसरू नकोस .

विजय निलीमाशी कोर्टात लग्न करतो आणि तिला आपली पत्नी म्हणून घरात घेऊन येतो.

यामिनीच्या अचानक जाण्याने सर्व दु:खी असतात अशात एक दिवस प्रतिभा निलिमाला भेटायला येते.

प्रतिभा : निलिमा ! आज मी मुद्दामच आले मला तुला काहीतरी द्ययचे होते.

निलिमा : काय ?

प्रतिभा : ह्या यामिनीच्या जोडाव्या ! तिने मला भेट म्हणून दिल्या होत्या. मी तिची आठवण म्हणून जपल्या होत्या. आता तू तिची जागा घेतली आहेस म्हणून ह्या मी तुला द्यायला आले आहे.

निलिमा : प्रतिभा ! मी ह्या स्वीकारते पण मी त्या पायात कधीच घालणार नाही. त्या मी माझ्या सुनेला भेट म्हणून देईन...

प्रतिभा : शेवटी ! विद्याधरांनी सांगितलेले सर्व भविष्य खरे झाले.

निलिमा : हो ! पण माझे विजयशी लग्न व्हावे अशी इच्छा मी मनात कधीच धरली नव्हती.

प्रतिभा : पण यामिनीची तशी इच्छा होती. म्हणजे तिलाही काहीतरी कळून चुकले होते. विकास सावरला का आता.

निलिमा : हो ! तो सावरला असे म्हणता येईल पण पूर्वीसारखा अल्लड राहिला नाही ! तो विजयच्या बिझनेसमध्ये लक्ष घालायला लागला आहे. पण मला वाटते तो ऋताच्या तिच्या घरी परत जाण्याने दुखावला आहे.

प्रतिभा : आता तू ही आपल्या उद्योगात लक्ष घाल !

निलिमा : नाही नको ! तुम्ही तिघी आहात की ! तुम्हीच काय ते पाहा ! माझी काही मदत लागलीच तर मी नक्की येईन आता मला या घराला सावरायचे आहे.

इतक्यात निकिता तिकडे येते

निकिता : प्रतिभा कशी आहेस ?

प्रतिभा : मी छान आहे ! तुमच्या गावाकडच्या कॅम्पची तयारी झाली का ?

निकिता : हो ! आम्ही उद्याच निघणार आहोत. निलिमा ! मी राहीन म्हणते थोडे दिवस गावाला ! चालेल ना ?

निलिमा : मला काय विचारतेस ? तू रहा हवे तेवढे दिवस . मी ही आले असते पण मला इकडे थांबावे लागेल.

निकिता : श्रावणीची तयारी झाली का ?

प्रतिभा : ती तर अशी तयारी करतेय जशी काय ती तिच्या सासरी चालली आहे.

निलिमा : असं होय ! निकिता जाताना मी विजयासाठी काही वस्तू देणार आहे त्या घेऊन जा... आणि तू जाताना माझी गाडी घेऊन जा... तुला तिकडे उपयोगी पडेल इकडे तिकडे फिरायला...

निकिता : हो ! चालेल.

प्रतिभा : यामिनी आपल्यात नसली तरी ती आपल्यात नसल्याची अजिबात जाणीव होत नाही...

निलिमा : मी यामिनीची जागा नाही तिची जबाबदारी घेतलेली आहे.

निकिता : मला खात्री आहे ती जबाबदारी तू उत्तम पार पाडशील...

त्या दोघी बाहेर निघून गेल्यावर कामिनी तेथे येते.

कामिनी : कशी आहेस निलिमा ?

निलिमा : मी छान आहे ... तू कशी आहेस ?

कामिनी : मी तुला सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना ?

निलिमा : हो ! तू काळजी करू नकोस !

कामिनी : विकास आणि विजयला जप !

निलिमा : तू कोठे चालली आहेस का ?

कामिनी : हो ! मी पुण्याला जाते आहे एका कार्यक्रमाला तेथून आल्यावर मी लगेच दुबईला जाणार आहे काही दिवस.

निलिमा : सांभाळून जा...फोन कर... बाय ..

कामिनी : बाय ...

कामिनी निघून गेल्यावर निलिमा तिच्या कामाला लागते.

दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रेमाने निकिता श्रावणी आणि कविताला घेऊन निलिमाच्या गाडीने गावी कोकणात जातात.

प्रवासात....

कविता : निकिता मावशी गावचे तुमचे घर मोठे आहे ना ?

निकिता : का ?

श्रावणी : नाही ! आम्ही हॉटेलात थांबलो असतो.

निकिता : त्याची काळजी तुम्ही करू नका ! हल्ली कोकणात माणसांची कमी आहे . जागेची नाही.

कविता : हो ! हे बाकी तू बरोबर बोललीस.

श्रावणी : या मताशी मी ही सहमत आहे.

कविता : आमच्या गावच्या बंगल्यात जातो आम्ही अधून मधून तेथे गेलो की गोव्याला हमखास जातो. श्रावणी तुलाही मी एकदा घेऊन नाईन ! तू जेंव्हा कधी फ्री असशील तेंव्हा मला सांग आपण जाऊया !

निकिता : तुम्ही अजिबात काळजी करू नका ! तुमची तिकडे उत्तम सोय केलेली आहे. वहिनी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू देणार नाही.

कविता : पण आपल्या कॅम्प साठीची पूर्व तयारी तिकडे झालेली असेल का ?

निकिता : हो ! मी ती सर्व तयारी निलेश आणि गणेशला करायला सांगितली आहे. तुम्ही घाबरू नका ते करतील सर्व तयारी कसे झाले तरी त्यांना ही कामे करावीच लागतील कारण दादाचे राजकिय वारसदार आहेत ते.

श्रावणी : ते दोघे फक्त व्यवसाय सांभाळतात की आणखी ही काही करतात.

निकिता : निलेश ला चित्रकलेची आवड आहे. तो एक उत्तम चित्रकार आहे . मी दाखवेन तुम्हाला त्याने काढलेली चित्रे !

श्रावणी : गणेश ?

निकिता : त्याला संशोधनाची आवड आहे. सध्या तो भारतीय संस्कृतीवर या विषयावर संशोधन करत आहे.

श्रावणी : संस्कृती या विषयावर संशोधन म्हणजे जरा अवघडच आहे.

कविता : माझ्या लहानपणी मी विजय काकाकडूनच चित्रे काढून घ्यायचे. मला तशी उत्तम चित्रे काढता येत नाही. पण मला चित्रांची आवड आहे.

श्रावणी : हो ! का ?

कविता : हो !

श्रावणी : मावशी ! तू आम्हाला आपले कॅम्प संपल्यावर फिरायला घेऊन जाशील ना ?

निकिता : मी येईनच याची खात्री देत नाही पण निलेश आणि गणेशला पाठवीन तुमच्या सोबत चालेल ना ?

श्रावणी : हो ! चालेल...

कविता : आपण कधी पोहचू !

निकिता : अजून तासाभरात आपण पोहचू !

तासाभराने त्यांची गाडी विजयाच्या घरासमोर थांबते.

निकिता : उतरा ! घर आले.

कविता : वा ! काय सुंदर बंगला आहे.

श्रावणी : अगदी मालिकेतील सेट सारखा !

त्यांची गाडी थांबताच विजया बाहेर येते... ती तिच्या गाड्यांना गाडीतील सामान बाहेर काढायला सांगते !

विजया : हे काय ? निकिता तू गाडी चालवत आणलीस ?

निकिता : मध्ये मध्ये ह्या दोघीनीही चालवली.

कविता : मावशी उत्तम गाडी चालवते.

निकिता : निलिमाची ही गाडी नवीनच आहे. तीच म्हणाली घेऊन जां...

विजया : बरं ! वरच्या माजल्यावर तुमच्यासाठी रूम तयार करून ठेवलेले आहेत. तेथे सर्व सोय आहे. तुम्ही फ्रेश व्हा आणि खाली या जेवायला.

निकिता : मी दाखवते त्यांना !

चला ! त्या दोघी निकीतासोबत वर जातात. त्या रूम पाहून त्या खूपच खुश होतात. तयार होतात आणि खाली जेवायला येतात.

जेवता जेवता

कविता : विजया मावशी किती छान जेवण केले आहेस.

श्रावणी : खरचं जेवण खूप छान झाले आहे.

विजया : तुमच्या दोघींना आवडतात ना माझ्या हातच्या खोबऱ्याच्या वड्या खूप करून ठेवल्या आहेत.

हे सर्व ऐकताना श्रावणीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

विजया : हे काय ? तुझ्या डोळ्यात अश्रू ?

श्रावणी : जुने दिवस आठवले !

कविता : मलाही !

निकिता : आता जेवा पटापट आणि तुमच्या रुममध्ये जाऊन आराम करा ...

कविता : हो ! चालेल

श्रावणी : हो !

विजया : निकिता तू ही आराम कर ..नाहीतर लगेच जाशील बाहेर फिरायला.

निकिता : हो !

संध्याकाळी त्या तिघी फ्रेश होऊन खाली चहा प्यायला येतात .

त्या चौघी चहा पीत असतात इतक्यात निलेश आणि गणेश घरात येतात.

निलेश : आत्या तुम्ही कधी आलात ?

निकिता : आम्ही दुपारीच आलो.

गणेश : प्रवास छान झाला ना ?

श्रावणी : हो ! खूपच छान झाला.

निलेश : आम्ही फ्रेश होऊन येतो.

ते दोघे फ्रेश होऊन येतात आणि चहा प्यायला बसतात.

निलेश : पाहुण्यांना त्यांचे रूम आवडले ना ?

कविता : हो ! पण आम्ही पाहुण्या नाही आहोत.

विजया : कविता ! तू बरोबर बोललीस.

निलेश : सॉरी !

गणेश : श्रावणी ! सॉरी पण तुझे हे छोटे कपडे इकडे चालणार नाही . म्हणजे शक्यतो गावात फिरताना नको घालूस !

श्रावणी : काही हरकत नाही मी चेंज करते कपडे

विजया : श्रावणी ! तू कोणत्याही कपड्यात छानच दिसतेस.

गणेश : माझ्या तुझ्या छोट्या कपड्यांना आक्षेप नाही. पण आपल्याकडेच म्हण आहे ना ! जसा देश तसा वेश ...

श्रावणी : कळतेय मला तुला नक्की काय म्हणायचे आहे.

चहा पिऊन श्रावणी चेंज करायला गेल्यावर...

विजया : गणेश तुझे संस्कृतीचे भूत लगेच तुझ्या अंगात शिरायला हवे होतेच का ? तिला वाईट वाटले असेल.

कविता : नाही ! मला नाही वाटत तसे ...मी ही जाते माझ्या रुममध्ये आणि श्रावणीची समजूतही घालते जर तिला राग आला असेल तर...

निकिता : गणेश ! तिकडे मुंबईला तिच्यासोबत एक सेल्फी काढायला लोक रांगा लावतात आणि तू तिचा अपमान करतोस ते ही तिच्या कपड्यांवरून ! तू जे म्हणालास त्याची जाणीव आहे. हे घर तिला तिच्या घरासारखे आहे म्हणून तिने तसे कपडे घातले.

गणेश : मी माफी मागू का तिची ?

निलेश : नको ! आता नको ! नंतर बघू ....

विजया : शिक जरा मोठ्या भावाकडून...

गणेश : तो माझ्याहून दीड वर्षानेच मोठा आहे.

निकिता : पण मोठां आचे ना ? ऐकत जा जरा त्याचे तुझ्या आयुष्याचे कल्याणच होईल.

गणेश : बरं ! आत्या साहेब !

विजया : तुम्ही जा तुमच्या रुममध्ये ... आराम करा ... मी रात्रीच्या जेवणाची काय व्यवस्था आचे ते पाहून येते.

रात्री पुन्हा ते सर्वजण एकत्र जेवायला बसलेले असतात. श्रावणीने छान पंजाबी ड्रेस घातलेला असतो.

निकिता : दादा ! नाही आला.

विजया : ते दौऱ्यावर आहेत.

विजया : श्रावणी ! या पंजाबी ड्रेसमध्ये तू जास्तच सुंदर दिसतेस ! काय गणेश ?

गणेश : हो ! म्हणजे काय प्रश्नच नाही. पंजाबी ड्रेसमध्ये सर्वच मुली सुंदर दिसतात . पण श्रावणी जरा जास्तच सुंदर दिसतेय !

निकिता : आपल्या मेडीकल कॅम्पची तयरी कोठ पर्यत आली आहे.

निलेश : सर्व तयारी झालेली आहे. मी कविता तर आहेच पण आणखीही काही विशेष तज्ञ डॉक्टर बोलावले आहेत कॅम्पसाठी !कॅम्प आपण आपल्या गावच्या सरकारी शाळेत घेऊया ! त्या शाळेच्या मैदानात मंडप घालून लोकाना बसण्याची आणि चहा – पाण्याची सोय केलेली आहे. वर्गातील काही खोल्या डॉक्टरना चेक अप करण्यासाठी रिकाम्या करून घेतलेल्या आहेत. त्याबाबतची पत्रके घरी घरी वाटली ही आहेत. गावाचे सरपंच स्वत: तेथे जातीने उभे राहणार आहेत.

कविता : खूपच छान तयारी केलेली दिसतेय !

गणेश : म्हणजे काय ? दादासाहेब प्रत्येक गोष्ट उत्तमच करतात.

श्रावणी : तुम्ही काय फक्त संस्कृतीच्या नावाखाली लोकांच्या कपड्यांची मापे काढता.

गणेश : ते कळेल तुम्हाला हळू हळू !

कविता : तुम्ही थांबता का जरा ! तुम्ही दोघे तिकडे काय करणार ते ठरवा अगोदर !

श्रावणी : मी येणाऱ्या लोकांची नोंद ठेवेन !

गणेश : मी लोकाना घराघरातून घेऊन येईन !

निकिता : म्हणजे ! मह्त्वाचे कामच तुम्ही करणार आहात ! म्हणायला कांही हरकत नाही.

विजया : चला आता जेवा पटापट आणि झोपा उद्या लवकर उठायचे आहे.

सर्वजण जेवून झोपायला जातात. झोपायला जाता जाता..

निकिता : आज ऋता आपल्यासोबत असायला हवी होती.

कविता : हो ! खूप मजा आली असती.

श्रावणी : ती करते अधून मधून मला फोन पण तिच्या बोलण्यात तो पूर्वीचा उत्साह नसतो.

निकिता : वकील व्हायचे आचे तिला . अभ्यासाचा ताण असेल यामिनीच्या अचानक जाण्याने ती खूपच दु:खी झाली होती.

श्रावणी : दु:ख तर आपल्या सर्वांनाच आहे. पण जग कोणासाठी नाही थांबत ... शो मस्ट गो ऑन !.....

दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व लवकर उठून तयार होऊन मेडीकल कॅम्पच्या ठिकाणी पोहचतात. इतर डॉक्टर आणि परिचारिकाही पोहचलेल्या असतात. विजय आणि कविता निकीतासोबत सर्व प्राथमिक तयारी झलेली आहे का याची पाहणी करतात. कॅम्प सुरु व्हायला अजून एक तास अवकाश असतो.

गणेश : मी गावात जाऊन परत एकदा सर्वाना सांगून येतो.

निलेश : आपण फलक लावले आहेत ना सगळेकडे

निकिता : तरीही ! एकदा सांगितलेले उत्तम होईल ! कोणाच्या लक्षात आले नसेल तर..

गणेश : मी निघतो.

श्रावणी : मी ही येते तुझ्यासोबत ! चालेल ना ?

गणेश : मला का नाही चालणार ?

श्रावणी बाईकवर गणेशच्या मागे बसते.

ते दोघे गावात जातत. घरोघरी जाऊन मेडिकल कॅम्प विषयी संगत असताना. श्रावणीला अनेक बायका भेटतात आणि त्या खात्री करून घेतात त्या मालिकेत काम करणारी ती तीच आहे का याची ? सर्वजण तिला तिचे काम खूप आवडते म्हणून सांगत असतात. गावातील तरुण मुलं मुली तिच्यासोबत सेल्फी काढत असतात. ते पाहून

गणेश : खूपच प्रसिद्ध दिसतेयस तू आमच्या गावात !

श्रावणी : असणारच या गावातील सर्व बायका माझी मालिका पाहतात . तू नाही पाहत.

गणेश : नाही ! मला त्या मालिका वगैरे पहायला वेळ नसतो.

श्रावणी : काही हरकत नाही. मोबाईलवर बघ ! मी कसा अभिनय करते ते आणि मला सांग ! मला वाटते एकूणच आम्हा कलाकारांबद्दल तुझे मत बरे दिसत नाही. त्यात तुझी काही चूक नाही म्हणा !

गणेश : अगदीच तसे नाही ! पण या क्षेत्रात अभिनयासाठी अनेक स्त्री- पुरुषांशी खोटी खोटी लगट करावी लागते ते नाही मला आवडत.

श्रावणी : आम्ही तसे केले नाही तर लोकांचे मनोरंजन कसे होणार ? याचा अर्थ अजिबात असा होत नाही की आम्हाला व्यक्तीगत अशा काही भाव भवनाच नसतात. आम्हालाही वाटते खऱ्या आयुष्यात कोणी तरी आपल्या प्रेमात पडावे आपल्यावर जीवापाड प्रेम करावे. आपल्या भेटीची आतुरतेने वाट पहावी. आपल्याला पाहता क्षणी कोणाचा तरी चेहरा फुलावा. आपल्या असण्याने कोणाला तरी आनंद व्हावा !

गणेश : आता आपला कॅम्प हिट होणार याबद्दल मला शंका नाही कारण बहुतेक बायका तुलाच पुन्हा पहायला येतील. मी काल तुला जे कपड्यांवरून बोललो त्याचा तुला राग नाही ना आला ?

श्रावणी : अजिबात नाही ! आजकाल मुलींना अशा छोट्या कपड्यात पाहण्यासाठी पुरुष आसुसलेले असतात. पण तू वेगळा आहेस. मी आपल्या हक्काच्या घरात होते म्हणून तसे कपडे घातले नाहीतर एरवी असे कपडे घालून मी बाहेर पडत नाही.

गणेश : हक्काचे घर !

श्रावणी : माझी आई आणि विजया मावशी फार जुन्या मैत्रिणी आहेत. मावशी मला मी अगदी लहान असल्यापसुन मला पाहत आली आहे. माझ्यावर तिचेही संस्कार आहेत. मी आपल्या संस्कृतीच्या विरोधात नाही कधीच नव्हते. मी आपले सर्व सण पारंपारिक पद्धतीने साजरे करते. अभिनयातून जेंव्हा जेंव्हा मला मोकळा वेळ मिळतो तेंव्हा तेंव्हा मी निकिता मावशी सोबत समाजकार्य करते.

गणेश : पण हे सर्व तू मला का सांगतेस ?

श्रावणी : कारण तुझ्या डोळ्यात मला माझ्याबद्दल गैरसमज जास्त दिसले.

गणेश : फक्त गैरसमज दिसले.

श्रावणी : नाही ! प्रेमही दिसले.

गणेश : खरचं !

श्रावणी : हो ! हे मी मनापासून सांगते आहे. तुला पाहता क्षणी मी तुझ्या प्रेमात पडले होते. पण तुझ्या मनात माझ्याबद्दल मला संभ्रम दिसला.

गणेश : माझ्या मनात संभ्रम होता पण आता नाही. मला आवडेल तुझ्या प्रेमात पडायला.

श्रावणी : मलाही !

श्रावणी गालात गोड हसली.

गणेश : चला आता तिकडे सर्व आपली वाट पाहत असतील नाहीतर त्याना वाटायचे आपण पळून वगैरे गेलो की काय ?

श्रावणी : मला आवडेल तुझ्यासोबत पळून जायला.

त्या दोघाना समोरून हस्त येताना पाहून

निकिता : काही विनोद झाला का ?

गणेश : नाही ! का ?

निकिता : नाही ! तुम्ही दोघे हस्त येत होतात म्हणून ..काही घडले का हसण्यासारखे

श्रावणी : नाही ! कोठे काय ?

कविता : आता तुमचे हसून झाले असेल तर कामाला सुरुवात करा...

कॅम्पला सुरुवात होताच चेक –अपला येणाऱ्या लोकांची गर्दी वाढू लागते. निलेश कविताला सर्वोतोपरी मदत करत असतो. सतत तिच्या आजूबाजूला राहत असतो. तिला दोन तासाने चहा वगैरे आणून देत असतो. संध्याकाळी थोडी गर्दी कमी झाल्यावर तो तिच्या शेजारी बसतो.

निलेश : कविता ! थकली असशील ना ?

कविता : छे ! हे तर माझे रोजचेच काम आहे.

निलेश : आमचे गाव आवडले का तुला ?

कविता : हो ! मला हे गावही आवडले आणि या गावातील माणसेही आवडली.

निलेश : मग तू इकडेच का नाही आखादा दवाखाना सुरु करत.

कविता : केला असता पण मी राहणार कोठे ?

निलेश : आमचे घर आहे की !

कविता : पण तुमच्या घरात मी कोणत्या हक्काने राहणार ?

निलेश : तू माझी मैत्रीण या नात्याने राहूच शकतेस

कविता : फक्त मैत्रीण !

निलेश : मग आणखी कोणता हक्क ह्वाय तुला ?

कविता : मला या गावची सून व्हायला आवडेल...

निलेश : खरचं !

कविता : मला माहीत आहे तू पाहता क्षणी माझ्या प्रेमात पडला होतास आणि मी ही तुझ्या ! आईने मला विचारलेही त्याबद्दल पण मी उत्तर देणे टाळले.

निलेश :कविता ! माझेही तुझ्यावर खूप मन जडले आहे. मला आवडेल तुझ्याशी लग्न करायला .

कविता : मलाही !

निकिता : मलाही ! मी तुमचे सर्व बोलणे ऐकले आहे. मला गणेश आणि श्रावणीचे हसण्याचे कारणही कळले आहे. ते दोघेही तुमच्यासारखेच एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. तरीही तुम्ही तुमचा तुमचा असा वेळ घ्या ! मी इतक्यात कोणाला काही सांगणार नाही. पण एक लक्षात ठेवा ! प्रेम कितीही लपून ठेवले तरी लपून राहत नाही.

कॅम्प संपल्यावर ते सर्व घरी जातात.

संध्याकाळचा चहा – नाश्ता एकत्र घेत असताना .

विजया : कॅम्प छान झाला ना ?

निकिता : हो !

विजया : असेच कॅम्प होत राहायला हवेत आपल्या गावात .

निकिता : त्यापेक्षा तू डॉक्टर सूनच का नाही आणत घरात ? म्हणजे तुझी आणि गावाचीही चिंता मिटेल.

विजया : मी तोच विचार करतेय ! डॉक्टर झालेले मुलगी आपल्या या गावात कशाला येईल राहायला.

निकिता : तश्या आपल्या गावात आता सर्व सुविधा आहेत.

विजया : कविता ! तुला वावडले असते का अशा आखाद्या गावात राहून लोकांची सेवा करायला ?

कविता : मला आवडेल ?

विजया : मग ! मी बोलू का कमळशी ?

कविता : कशाबद्दल ?

विजया : तुझ्या आणि निलेशच्या लग्नाबद्दल !

त्यावर कविता काही न बोलता गप्प बसून राहिल्यावर ..

विजया : म्हणजे ! तुझ्या मानत नाही !

कविता : मी तसे कोठे म्हटले !

त्यावर सर्वजण जोरजोरात हसले.

विजया : निलेश आणि कविताच लग्न व्हाव अशी यामिनी वहिनीचीही इच्छा होती. आज ती असती तर तिला खूप आनंद झाला असता.

विजया : श्रावणी ! मला प्रतिभाचा फोन आला होता. तुझी चौकशी करत होती. तुझ्या आईला खूप काळजी आहे तुझी ! तू माझी सून व्हावीस आणि आमची मैत्री नात्यात बदलावी अशी तिची खूप इच्छा होती. पण ! ती इच्छा पूर्ण होईल असे वाटत नाही कारण तुझे आणि गणेशचे या जन्मात पटेल असे मला वाटत नाही.

गणेश : मी घेईन पटवून !

विजया : काय बोलतोयस काय तू ?

गणेश : तू ऐकलेस तेच बोलतोय ! माझा अभिनय क्षेत्रातील लोकांबद्दल गैरसमज होता. तो आता दूर झाला आहे.

विजया : श्रावणी ! तुला चालेल ना हा नवरा म्हणून ?

श्रावणी : हो ! म्हणजे मी चालवून घेईन ...

विजया : आता तुमची लग्ने झाली की मी मारायला मोकळी !

निकिता : वहिनी !

विजया : ही गोड बातमी मी प्रतिभा आणि कमळला देते त्या दोघीही खूप खुश होतील. विजयला आणि ह्यांना ही कळवायला हवे.

निकिता : मी निलिमा आणि कामिनीलाही कळवते त्यांना खूप आनंद होईल.

विजयाच्या घरात अचनक खूप उत्साहाचे वातावरण तयार होते. रात्री सरपंचानी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला असतो. त्या कार्यक्रमात विजया ह्या दोघी लवकरच आपल्या गावच्या सुना होणार आहेत हे जाहीर करून टाकते. त्यामुळे गावकऱ्यांना खूप आनंद होतो.

त्याच्या दुसऱ्या दिवशी ते सर्व गावच्या देवळात जाऊन देवाचे आशीर्वाद घेतात. त्या दोघी माघारी मुंबईला निघाल्यावर निलेश आणि गणेश त्यांना त्यंच्या गाडीने सोडायला मुंबईला येतात. कविता आणि श्रावणीला त्यांच्या घरी सोडून ते विकासला भेटायला येतात. विकास त्या दोघांचेही अभिनंदन करतो. रात्री ते चौघे एकत्र जेवायला बसले असता.

निलिमा : निलेश आणि गणेश तुमचे लग्न ठरल्याचे ऐकून खूप आनंद झाला त्यापेक्षा आता कमळ आणि प्रतिभा आपल्या नातलग होणार याचा जास्त आनंद आहे. हे सर्व पहायला यामिनी हवी होती. यामिनी जरी या जगात नसली तरी मी तुमची मामी म्हणून मामीची सर्व कर्तव्ये मनापासून पार पाडीन...

विकास : ही बातमी ऐकून आईलाही खूप आनंद झाला. ती तुमच्या लग्नाला नक्क्की येणार आहे.

निलेश : मामी ! आम्ही उद्या सकाळीच निघू तिकडे खूप कामे आहेत.

निलिमा : चालेल ! तुम्ही आता झोपा ! काही लागले तर मला सांगा !

गणेश : हो !

वर्षभरात निलेश – कविता आणि गणेश – श्रावणी यांचे लग्न होते.

कविता गावी सर्व सुविधा असणारे एक हॉस्पिटल उभारते. जेथे तालुक्यातून लोक उपचारासाठी येऊ लागतात.

श्रावणी ! कधी मुंबई तर कधी गाव असा दौरा करत असते पण ती तिचा जास्त अधिक वेळ गावीच घालवत असते.

निलेश त्याचा उद्योग सांभाळतो आणि गणेश वडीलांच्या पावलावर पावूल ठेऊन राजकारणात प्रवेश करातो.

अशीच तीन वर्षे पुढे सरकतात विकास विजयचा उद्योग सांभाळायला सुरुवात करतो. विजयची राजकारणातील घोडदौड सुरूच असते. अशात एक दिवस एका कार अपघातात कामिनीचा मृत्यू होतो. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्वांनाच प्रचंड धक्का बसतो. कामिनीने आपली सर्व संपत्ती विकासच्या नावावर केलेली असते.

एक दिवस विकास त्याच्या कार्यालयात बसलेला असतो. विजयने सांगितल्या प्रमाणे त्याला त्यांच्या उद्योगातील कादेशीर बाबी सांभाळण्यासाठी एका वकिलाची नियुक्ती करायची असते म्हणजे जवळ जवळ त्या वकिलाची नियुक्ती विजयने केलेली असते फक्त विजयला त्या वकिलाची ओळख व्हावी म्हणून त्यानी विकासला भेटायला सांगितलेली असते. विजय त्याच्या बॉसच्या खुर्चीवर आरामात बसलेला असतो त्याच्या डोळ्यांवर चष्मा चढलेला असतो. त्याच्या दाढी मिशा ठेवलेल्या असतात. मे आय कम इन सर.. या प्रश्नाने तो भानावर येतो. त्याला तो आवाज ओळखीचा वाटतो म्हणून तो समोर पाहतो. तर एक तरुण सुंदर मनमोहक वकील तरुणी त्याच्या समोर उभी असते. तिला पाहताच विकास जागेवर उठून उभा राहतो पण तो स्वतला सावरत ....

विकास : या ! या ! बसा ...मिस ऋता ...सॉरी वकील बाई ! मला बाबा म्हणाले होते की तुला वकील भेटायला येणार आहे. पण वकील मुलगी आहे हे म्हणाले नव्हते. मला वाटले होते असेल कोणीतरी वयस्कर पुरुष वकील.

ऋता : तू माझ्याशी असा अनोळखी असल्यासारखा का बोलतो आहेस. तुझ्या बोलण्यात मला प्रेम नाहीच पण तिरस्कार अधिक दिसतोय !

विकास : आपल्यात प्रेम होतच कधी ? ते जर असत तर मागच्या काही वर्षात तू मला एकदा तरी संपर्क केला असता.

ऋता : तू तरी कधी मला म्हणाला होतास का की माझे तुझ्यावर प्रेम आहे.

विकास : प्रत्येक गोष्ट बोलावी लागते का ?

ऋता : नाही ! पण तू का नाही संपर्क केलास मला मागच्या काही वर्षात !

विकास : तुझे बाबा जेंव्हा तुला घरी घेऊन जायला निघाले तेंव्हा तू एकदाही नाही म्हणालीस मला येथे थांबायचे आचे म्हणून !

ऋता : त्यावेळची परिस्थिती तशी नव्हते म्हणून मी नाही म्हणाले. पण घरी गेल्यावर मी बाबांना स्पष्ट म्हटले की माझे विकासवर प्रेम आहे तर ते अधिकच चिडले आणि मला म्हणाले,’’ आता त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही ! जो काही संबंध होता तो यामिनीमुळे ! आता तीच या जगात नाही ! तासाही तो दत्तक घेतलेला मुलगा आहे. त्याच्या आईचा पत्ता आहे पण बाबाचा आणि घराण्याचा पत्ता नाही. अशा मुलाशी मी तुझे लग्न लावून देणार नाही. पण मी एक क्षणही तुला विसरले नाही. दिवसागणिक मी तुझ्या अधिक प्रेमात पडत गेले. मी माझे वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि घर सोडून तडक मुंबईला आणि काकांना भेटले. त्यानी मला हा जॉब ऑफर केला.

विकास : मग ! तू राहतेस कोठे ?

ऋता : कमळ मावशीकडे !

विकास : का ? आपले घर असताना ...

ऋता : ते घर अजूनही माझे आहे का ? त्या घरावर माझा हक्क आहे का ?

विकास : हो ! ते तुझ्या आत्याचे घर आहे त्या नात्याने तुझा त्या घरावर आजही हक्क आहे आणि कायम राहील .

ऋता : एक विचारू ?

विकास : विचार ? मी तुझ्या आयुष्यातून निघून गेल्यावर तुझ्या आयुष्यात कोणी आली आहे का ?

विकास : हो ! माझ्या आयुष्यात एक मुलगी आली आहे . मी तिच्याशीच लग्न करणार आहे.

ऋताच्या डोळयात अश्रू दाटून येतात .

ऋता : कधी ?

विकास : हे काय आता काही क्षणापूर्वी !

ऋता : खरचं !

विकास : हो ! मी ही तुला कधीच विसरलो नाही. रोज तुझ्या आठवणीत मी तुझ्या नव्याने प्रेमात पडलो.

ऋता : मी तुला नाही फोन केला पण तरी रोज नचुकता तुझी करणशी चौकशी करायचे.

विकास : आणि तो मला तू त्यला जे जे विचारायचीस ते ते सांगायचा !

ऋता : म्हणजे माझ्याशी तू जे रागाने बोलत होतास ते नाटक होते ?

विकास : म्हणजे काय ? मी आता तो पूर्वीचा अल्लड विकास राहिलो नाही.

ऋता : पण मला तो माझ्याशी भांडणारा विकासच आवडायचा !

विकास : शेवटी ! तू वकील झालीस ! मला तुझा अभिमान आहे.

ऋता : मलाही तुझा अभिमान आहे.. तू काकांचा उद्योग समर्थपणे सांभाळत आहेस.

विकास : एका क्षणाला मला वाटले होते... तुला घरातून उचलून मुंबईला आणावे !

ऋता : उचलायची काय गरज नव्हती. तू मला घ्यायला आला असतात तर मी हसत - हसत तुझ्या सोबत आले असते.

विकास : आता तू आपल्या घरीच राहायला ये !

ऋता : आता मी त्या घराची सून म्हणूनच त्या घरात राहायला येईन !

विकास : जशी तुझी इच्छा ! मी आजच बाबांशी आणि निलिमा मावशीसोबत आपल्या लग्नाविषयी बोलतो.

ऋता : मी निघते आता माझ्या कामाला लागते.

विकास : चालेल ! दुपारी लंच आपण एकत्र करतोय हे लक्षत ठेव !

संध्याकाळी विकास घरी गेल्यावर विजय आणि निलिमा घरीच असतात . विकास फ्रेश होऊन येतो आणि चहा पिता पिता त्यांना म्हणतो.

विकास : ऋता माघारी मुंबईला आली आहे आणि तिने आपले ऑफिस जॉईन केले आहे हे तुम्हाला माहित आहेच पण मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती गोष्ट कदाचित तुम्हाला माहीतही असावी. माझे ऋतावर आणि तिचे माझ्यावर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. त्याशिवाय ती या घरात पुन्हा येणार नाही.

निलिमा : ते सर्व ठीक आहे पण ती घरच्यांवर रागावून घर सोडून आली आहे. तिच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमचे लग्न लावणे मला योग्य वाटत नाही.

विजय : त्यात काय अयोग्य आहे ? मिया बीबी राजी तो क्या करेगा भैयाजी !

निलिमा : ते यामिनीचे भाऊ आहेत मलाही ते भावासारखेच आहेत मला त्यांच्यासोबतचे संबंध बिघडावे असे नाही वाटत. मी फोन करून त्यांना मुंबईला बोलावून घेते फक्त त्यांनाच नाही सर्वांनाच म्हणजे विजयाला, प्रतिभाला, कमळला, निकिताला...मला बोलवायची गरज नाही मी आताच येताना ऋताला भेटून आले आहे.

निकिता : तुला आम्हा सर्वाना आणखी काय नवीन सांगायचे आहे जे आम्हाला माहीत नाही ?

निलिमा : एक गोष्ट आहे जी फक्त आम्हा चौघांना माहीत होती.

निकिता : कोण चौघे ?

निलिमा : मी ,विजय, यामिनी आणि कामिनी !

निकिता : कोणती गोष्ट ?

निलिमा : जरा धीर धर उद्या तुलाही कळेलच सर्वांसोबत ...

निकिता : ते काहीही असले तर विकास आणि ऋताचे लग्न होणार म्हणजे होणारच !

विजय : ते होईलच !

विकास : मला काहीच कळत नाही ! तुम्ही काय बोलता आहात ! मी पडतो माझ्या खोलीत जाऊन...

दुसऱ्या दिवशी रात्री सर्व जमा होतात. ऋता , ऋताचे आई – वडील, विजया, प्रतिभा, कमळ आणि निकिता ही असते. जेवण झाल्यावर सर्व एकत्र बसलेले असताना .

निलिमा : ऋताच्या वडिलांचा ऋता आणि विकासच्या लग्नाला विरोध आहे कारण यामिनी आणि विजयने त्याला कामिनेकडून दत्तक घेतला होता. त्याचे वडील कोण त्याचे घराणे काय हे कोणालाच माहीत नाही. सर्वाना वाटते की यामिनी परदेशात कोणाच्यातरी प्रेमात पडली आणि त्यातून विकासचा जन्म झाला. पण हे सत्य नाही. सत्य हे आहे की कामिनी परदेशात जाण्यापूर्वीच गरोदर होती. पण ती गरोदर आहे हे सत्य तिने तेंव्हा कोणालाच सांगितले नाही. एकदा कामिनी एका पार्टीत खूप दारू प्यायली. विजय तिला सावरत तिच्या घरी घेऊन गेला. कामिनीचे विजयवर खूप प्रेम होते. त्यामुळे तिचा तिच्या भावनांवरचा ताबा सुटला आणि विजय आणि तिच्यात संबंध आले आणि त्यातून ती गरोदर राहिली. तिला विजयच्या मुलाला जन्म द्यायचाच होता कारण यामिनी मुलाला जन्म देऊ शकत नव्हती. कामिनी परत भरतात आल्यावर यामिनीने तिला विजय सोबत दुसरे लग्न करायला सांगितले पण तिने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे यामिनीने हा दत्तक घेण्याचा उपाय सुचवला आणि तो कामिनीला पटला. विकास हा जगाच्या नजरेत दत्तक घेतलेला मुलगा असला तरी तो प्रत्यक्षात विजय आणि कामिनेचाच मुलगा आहे. म्हणजे विजय विकासाचा सक्का बाप आहे. ऋताचे आई – बाबा आंता तुमचा विकास आणि ऋताच्या लग्नाला विरोध नाही ना ?

ऋताचे आई – बाबा : नाही !

विकास : म्हणजे बाबा ! तुम्ही माझे खरे बाबा आहात. म्हणूनच तुमचे सर्व गुण माझ्यात उतरले आहेत.

विजय : हो ! बेटा ! मला बरेचदा वाटले हे सत्य तुला सांगावे पण प्रत्येक वेळी यामिनी आणि कामिनीने मला आडवले कारण त्यामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का बसला असता.

विजया : विजय हे तू मलातरी विश्वासात घेऊन सांगायला हवे होते.

प्रतिभा : जे झाले ते योग्यच झाले

कमळ : ठीक आहे ! आता ऋता आणि विकासाच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला हे उत्तम झाले.

निकिता : मग ! विजयने यामिनी गेल्यावर कामिनीशी लग्न का केले नाही.

निलिमा : कामिनीची तशी इच्छा नव्हती कारण तिला यामिनीची जागा घ्यायचीच नव्हती. आणि मी विजयशी लग्न कराबे ही यामिनीची इच्छा होती.

विजय : मी उद्याच पत्रकार परिषद घेऊन हे सत्य जगाला सांगतो.

विकास : नाही ! त्याची काही गरज नाही... माझ्या दोन्ही आईंच्या इच्छेचा मला मान राखायचा आहे आणि तुमच्या प्रतिष्ठेला धक्काही लागू द्यायचा नाही.

थोड्याच दिवसात ऋता आणि विकासचे लग्न होते. ऋता सून म्हणून घरी आल्यावर निलिमा यामिनीच्या जोडव्या ऋताच्या हातात देते त्या तिला जपून ठेवायला सांगते. काही वर्षानी ऋता दोन जुळ्या मुलांना जन्म देते. विजय आणि निलीमाचे त्या मुलांसोबत खेळण्यात दिवस – वर्षे जाऊ लागतात. पण एक दिवस अचनक निलिमा ही या जगाचा निरोप घेते त्यानंतर अनुक्रमे विजया , प्रतिभा आणि कमळ ही हे जग सोडून जातात. विजयच्या शेवटच्या क्षणी त्याच्या जवळ असते ती निकिता ...शेवटच्या क्षणी...

विजय : निकिता मी तुला कधीच सांगितले नाही पण आज सांगतो.. या जगात माझे प्रतिभावर, यामिनीवर अथवा कामिनीवर माझे खरे प्रेम नव्हते. माझे खरे प्रेम फक्त आणि फक्त तुझ्यावरच होते...

निकिता : ते मला कळले पण तोपर्यत खूप उशीर झाला होता म्हणूनच मी दुसरे लग्न केले नाही. आयुष्यभर तुझ्या घरात तुझी सावली बनून राहिले.

विजय : निकिता .......म्हणत त्याने प्राण सोडले...विजयच्या सोबतीला शेवटी त्याच्या अंतापर्यंत त्याचे प्रेमच होते....


समाप्त

या कथेचे सर्व अधिकार लेखकाकडे सुरक्षित आहेत ....याची नोंद घ्यावी


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance