Sangita Tathod

Romance

3  

Sangita Tathod

Romance

लग्न गाठ

लग्न गाठ

2 mins
187


 एका मैत्रिणीच्या लग्नात छान सजून केतकी एकुलत्या स्वतःला मिरवत होती . काही तरी कामनिघाले म्हणून ती ,लग्न मंडपाच्या गेट जवळघाईत निघाली होती . गडबडीत चुकून तिचा धक्का एका हँडसम मुलाला लागला .त्याच्या राजबिंड्या रुपाकडे ती बघतच राहिली .तेव्हड्यात तो स्वारी म्हणून निघून गेला . केतकी च्या नजरे समोरून तो काही हटतनव्हता .तिची नजर त्यालाच शोधत होती .


बराच शोध घेतल्यावर ऐन लग्नाच्या वेळी तो तिला दिसला स्टेजवर - - ! पण तिथे खूपच गर्दी होती .तरीही तिने त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलाच .ती त्याच्या अगदी जवळ गेली .दोघांची नजरा नजर झाली - - -


 याच नाशिल्या डोळ्याच्या

शोधात होती आजवर

आलास समीप नकळत

आता जाऊ नकोस दूरवर


 एक नजर त्याला पाहत नाही तोच ,तो पुन्हा गायब झाला .केतकी नाराज झाली .पुन्हा जेवताना तो ,तिला दिसला .ती त्याच्या टेबलजवळ जात नाही तोच ,तो पुन्हा गायब - - -


नको खेळूस सख्या

असा तू लपंडाव

एका नजरेत जाणले

तूच आहेस माझा राव - -  


केतकी आता वैतागली होती . अशाच दोन तीन वेळा तो दिसला की गायब होऊन जातं असे . मग तिच्या लक्षात आले की ,तो असे मुद्दाम करीत आहे .मग तिनेही त्याची फिरकी घ्यायचे ठरविले . ती मुद्दाम त्याला दिसणार नाही ,अशा ठिकाणी उभी राहू लागली . दोघांची ती लपाछपी त्या दोघांना च कळत होती .


  लग्नाचा दिवस संपला .केतकी त्याचे डोळे, त्याचे हँडसम रूप सोबत घेऊन घरी गेली .

"अरे ,यार दिवसभरात त्याचे नाव काय आहे हे सुद्धा मला कळले नाही -"ती स्वतःशीच म्हणाली .


 दुसऱ्या दिवशी ऑफिस ला गेली .कामाला लागली .सारखा त्याचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता .अर्धा तास होत नाही तोच . ती पाणी पिण्यास गेली .आणि काय आश्चर्य ,तिथे तो - - - -,तिला तर ते स्वप्नच वाटले .


"काल माझ्याशी लपाछपी खेळून पोट भरले नाही का ? आज पुन्हा इथे आले - -- -!"


"अहो ,मी कुठे खेळत होतो लपाछपी उलट, दुपार नंतर तुम्हीच तर गायब झाल्या होत्या . किती शोधले मी तुम्हाला - - - "


यावर केतकी लाजली .पण तसे न दाखविता म्हणाली , "मला माहिती आहे ,तुझ्या सारखे मवाली मुलं ,मुलींचा पाठलाग करतात ."


"मी कशाला करू तुमचा पाठलाग .तुमचे डोळे माझा पाठलाग करीत होते ."


केतकीचा बोलता बोलता आवाज वाढला . ते पाहून काजल तिथे आली .केतकीला थांबवत ती म्हणाली , "केतकी ,हे आपले नवीन बॉस आहेत .कृष्णा

बोरकर - - ! "


केतकी आता मात्र पूर्ण शांत झाली होती .

"सॉरी ,सर " असे म्हणून ती जाण्यास निघाली .


कृष्णाने गोड हसून तिला थांबविले - - -


"आता आपण हा ,लपाछपी चा खेळ थांबवून लग्न गाठ बांधायची का ? तू मला कालच खूप आवडली होती ."


"जशी तुमची इच्छा " केतकी लाजत निघून गेली .


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance