Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Sarjesh Welekar

Crime Thriller


4.6  

Sarjesh Welekar

Crime Thriller


फार्म हाऊस

फार्म हाऊस

73 mins 2.0K 73 mins 2.0K

चंद्रपूर

black gold city

12 ऑगस्ट 2018

नागपूर-चंद्रपूर नॅशनल हायवे

रात्री 10.30 वाजता


पावसानं चांगलाच जोर धरला होता, रस्ते सुनासान पडले होते, अशातच एक पांढऱ्या रुंगाची मारुती डिझायर हायवेवर नागपूरकडे जाणाऱ्या दिशेनं दाखल झाली, तिच्या लखलखणाऱ्‍या दोन हेडलाईटामुळे वातावरणास आणखीच भयाण स्वरुप आलेलं होतं. पावसामुळे गाडीचे वायफर चालू होते, ड्रायव्हींग सिटवर बसलेल्या व्यक्तीनं ओव्हरकोट घातलेला होता. डोक्यावर हॅट होती, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पावसामुळे रस्ता बरोबर दिसत नव्हता त्यामुळे ती व्यक्ती हळुवार कार चालवत होती. मध्येच एखादं वाहन अंधाराचं साम्राज्य उडवत, रोडवरुन भरकन निघून जायचं, कार मेनरोडवरुन रस्त्याच्या कडेला डाव्या साईडला असलेल्या कच्च्या रस्त्यावर उतरली, त्या कच्च्या रस्त्याने पुढे गेल्यावर कार एका ठिकाणी थांबली, पाऊस अजुनही सुरुच होता.


जरावेळानं त्या कारचा पुढचा दरवाजा उघडला आणि ती ओव्हरकोट घातलेली व्यक्ती कारमधून बाहेर निघाली, त्या व्यक्तीच्या पायात कॅनव्हॉसचे बुट होते, हातात हॅण्डग्लोव्हज होते, डोक्यावरील हॅटने त्या व्यक्तीचा चेहरा अर्ध्यापेक्षा जास्त झाकलेला होता.


त्या व्यक्तीने आपल्या ओव्हरकोटच्या खिशातून सिगारेटचं पॉकिट काढलं, आणि एक सिगारेट हातात घेवून पॉकिट परत‍ खिशात ठेवले, आणि दुसऱ्या बाजुच्या खिशातून लायटर काढलं‍. सिगारेट ओठात दाबली, आणि लायटरने सिगारेट पेटवली. व ती व्यक्ती हळूहळू सिगारेटचे झुरके घ्यायला लागली.


सिगारेट संपली, त्या व्यक्तीनं कारची डीकी उघडली, आणि विजेच्या लख्ख प्रकाशात डिकीच्या आतील भाग उजेडानं न्हावुन निघाला, त्या डिकीत एक मोठं पोतं कोंबलेलं होतं, पोत्याचं तोंड बांधलेल्या अवस्थेत होतं, कदाचित त्यात डेड बॉडी होती, त्या ओव्हरकोट घातलेल्या व्यक्तीनं डिकीतलंते पोतं कसंबसं बाहेर काढलं आणि थोड्या दूरपर्यंत त्याला ओढत नेऊन समोर असलेल्या एका तळ्यात ढकलून दिलं. आणि डिकीजवळ परत येऊन त्या व्यक्तीनं डीकी चेक केली, व समाधान झाल्यानंतर परत डीकी बंद केली. आणि ती व्यक्ती लगबगीने कारच्या ड्रायव्हींग सिटवर बसली, सिटबेल्ट बांधले‍. ओव्हरकोटच्या आत हात घालून एक रिव्हॉल्वर बाहेर काढलं, त्या रिव्हॉल्वरचं चेंबर उघडून बघितलं त्यात पाच गोळ्या‍ शिल्लक होत्या, त्या व्यक्तीनं ते रिव्हॉल्वर कारच्या डॅश बोर्डमध्ये ठेवून दिलं, आणि कार वळवली,‍ आणि ती कार आली त्या रस्त्याने हायवेवर परत प्रविष्‍ठ झाली आणि चंद्रपूर शहराच्या दिशेला भरधाव निघाली.

00000

साधारणत: तीन महिन्यांनंतर

12 नोव्हेंबर 2018

रात्री 11.30 वाजता

जूनोना नावाच्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या साईडला एक कच्चा रस्ता होता, तिथून साधारण अर्धा किलोमीटर पुढे गेल्यावर एक छान मोठं फार्म हाऊस होतं, फार्महाऊसचा परिसर अगदीच निसर्गरम्य होता. त्या फार्महाऊसला चारही बाजुनी रोषणाई केलेली होती खूप मोठा मंडप घालण्यात आलेला होता, आणि त्या मंडपामध्ये छोटे छोटे दहा बारा टेन्ट उभारण्यात आले होते, त्या टेन्टमध्ये पार्टीत येणाऱ्यांची राहायची व्यवस्था करण्यात आली होती. त्याठिकाणी एका फंक्शनचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कडाक्याची थंडी पडली होती.


फार्महाऊसचा मालक गुलशन चावला यानं ते फंक्शन आयोजित केलेलं होतं, त्याला कारण म्हणजे गुलशन चावलाचा ‍50 वा वाढदिवस, हा वाढदिवसाचा कार्यक्रम रात्री बारा वाजता सुरु होऊन रात्रभर चालणार होता. या कार्यक्रमासाठी गुलशन चावलाचे काही ठराविक व खास मित्र मंडळी आणि नातेवाईक इतकेच हजर होते.


गुलशन चावला पन्नास वर्षाचा एक श्रीमंत उद्योगपती होता, शहरामध्ये त्याचे आठ-दहा मोठे गोडावून होते, या गोडावूनमध्ये केमिस्ट आणि ड्रगीस्टकडे जाणाऱ्या मालांचा साठा होता, शहरातील व आजुबाजूच्या गावातील लहान मोठ्या‍ मेडिक‍ल स्टोअर्स, हॉस्पिटलना लागणारी सर्व प्रकारची औषधे,‍ मेडिकलसंबंधी सर्वच वस्तू ठोक स्वरुपाची विक्री त्याच्याकडून होत होती. वर्षाला साधारण 15 ते 20 कोटी रुपयांचा टर्नओव्हर असलेला तो एक सफल उद्योगपती होता.


मोनिका चावला, वय वर्ष 26 दिसायला सुंदर, गोरी पान, गुलशन चावलाची दुसरी बायको, गुलशन चावलाच्या मते त्याची पहिली बायको कुणासोबत तरी पळून गेल्याने गुलशन चावलानं दोन वर्षापूर्वी दुसरं लग्न केलं होतं, पहिल्या बायकोला मुलगा प्रेम हा 23 वर्षाचा देखणा तरुण होता, प्रेमची गर्लफ्रेंड अविका पटेल अतिशय सुंदर 21 वर्षाची तरुणी होती, जी यावेळी प्रेम सोबत फार्महाऊसच्या पार्टीत हजर होती.


गुलशन चावलाचा लहान भाऊ प्रविण चावला, वय 45 वर्षाच्या जवळपास असेल, अंगानं जाडा असलेला ढेरी निघालेला खाऊन पिऊन मस्त असणारा इसम होता. त्याची बायको प्रियंका चावला, 37 वर्ष वयाच्या जवळपास असलेली सुंदर स्त्री होती, ते दोघेही यावेळी पार्टीत हजर होते.


शहराचे नामांकित डॉक्टर संदिप चक्रधर हेसुद्धा या पार्टीत उपस्थित होते, संदिप चक्रधर 32 वर्षाचे रुबाबदार व्यक्तीमत्व असलेले तरुण होते, यावेळी ते PSI देवयानी गुप्ता सोबत गप्पा मारण्यात व्यस्त होते. देवयानी गुप्ता आज छान सुंदर साडी घालून आलेली होती‍. तिच्या पर्सनालिटीला साडी खूप शोभून दिसत होती.. आज खूप सुरेख दिसत होती ती.


भरारी वृत्तपत्राचा चिफ रिपोर्टर अमित प्रधान त्याची गर्लफ्रेंड तनयासोबत तिथे उपस्थित होता, तनयानं छान पिंक डार्क शेडचा वनपिस घातला होता, जो तिच्या सोज्वळ सौंदर्याला चार चांद लावत होता, आज खूपच सुंदर दिसत होती ती.

गुलशन चावलाचा वकील ॲडव्होकेट राकेश गुप्ता हासुद्धा फंक्शनमध्ये हजर होता, तो चाळीस वर्षाचा होता, व्यक्तीमत्व रुबाबदार होतं.

कार्यक्रमाला साधारणत: 20-25 असे माेजकेच लोक हजर होते.

0000

रात्रीचे 12.00 वाजले आणि गुलशन चावलाने केक कापला, टाळ्यांचा गडगडाट झाला आणि केकचा एक तुकडा मोनिकानं गुलशनला भरवला आणि गुलशननं मोनिकाला.


पार्टी सुरु झाली, DJ ब्वॉय नं ‍DJ चा आवाज वाढवला आणि त्या तालावर सगळे नाचायला लागले. DJ Boy अगदी फिल्मी स्टाईलमध्ये होता लांब वेणी घातलेले केस.... हाफ सॅण्डो जॅकेट.. थ्री फोर्थ बरमुडा....डोळयावर गॉगल.. DJ च्या तालावर तो ही नृत्य करत होता.


पार्टीमध्ये स्नॅक्स, ड्रिन्क्स्, व्हेज, नॉनव्हेज, सगळं काही होतं, गुलशन चावला, अमितचा मित्र होता, अमितनं, गुलशन चावला ला wish केलं आणि गुलशननं त्याची ओळख आपली पत्नी मोनिकासोबत करुन दिली. मोनिकानं हात पुढे केला आणि अमितनं तिच्याशी हातमिळवणी केली.


“नाईस..." अमित बोलला.


“काय नाईस..." मोनिका हसत बोलली.


“तुमच्या हातातील ब्रेसलेट, व्हेरी इंप्रेसिव्ह..."


“थॅन्क यू..." ती हसत बोलली.


त्यानंतर मुलगा प्रेम, भाऊ‍ प्रविण व त्याची पत्नी प्रियंका सोबत ओळख करुन दिली.


अमित आणि तनया एका ठिकाणी बसून गप्पा मारण्यात व्यस्त होते. तनया बोलली, "सर चला न टेन्टमध्ये जाऊ या..."


“इतक्या लवकर, थांब अजून बघ किती मजा येतेय पार्टीत, आणि बरंच काही एन्जॉय करायचं आहे..."


“मला माहित आहे, रात्र जागायची आहे म्हणून जरा आराम करावा, थंडी पण खूप वाजतेय..."


“थंडी तर आहेच... का गं बरं नाही काय?"


“तसं नाही, इथल्या डिजेमुळं डोकं दुखायला लागलंय..."


“ओके, चल जावूयात..."


गप्पा मारत मारत ते दोघे, त्यांच्यासाठी असेलेल्या टेन्टमध्ये आले. टेन्टमध्ये छान आराम करायला बिछानेही होते, तनया त्यावर लेटली.. आणि शॉल ओढून घेतली.


अमित बोलला, "तनु आज तु खूपच सुंदर दिसतेय..."


“हो का.. मग काय रोज सुंदर नसते मी..."


“तसं नाही अगं.. आज छान तयारी केलीय ना.. म्हणून.. तनू तू इथे एकटी आहेस माझ्यासोबत, तुला भीती नाही वाटत?"


“कसली भीती, मी काय पहिल्यांदा येतेय तुमच्यासोबत, आणि मला आता घाबरवू नका सर..."


“अशी एकट्यात तरी सर नको ना म्हणू, अमित म्हण ना..."


“ओ.के., कसली भीती बोललात तुम्ही..."


“आपण या टेन्टमध्ये दोघेच असणार आहोत..."


“त्यात काय झालं... एक मिनीट तुमच्या मनात काही वाईट विचार तर नाही ना..."


“आहेत, म्हणूनच तर बोलतोय..." अमित मिश्कीलपणे तिच्याकडे बघत बोलला.


“अमित... मी नाही जा, मी बोलणारच नाही तुमच्याशी..."


“गंमत गं.. तू माझी स्वीट स्वीट आहे ना, म्हणून तुझी गंमत करायला मजा येते..."


“हो का, म्हणे गंमत करायला मजा येते, मी आता जरावेळ आराम करणार आहे मस्त, तुम्हाला पार्टीत एन्जॉय करायचा असेल तर तुम्ही जावू शकता..."


“एकटी राहशील ना नीट, भीती तर नाही वाटणार ना..."


“इतकी पण काही घाबरट नाही मी..."


“तुझ्यासाठी काही खायला आणू?"


“आत्ताच नको, जरा वेळ आराम करुन नंतर येते मी पार्टीत..."


“ओके डियर, पण तू झोपू नको..."


“नाही झोपणार."

00000

अमित टेन्टच्या बाहेर आला, मोबाईलमध्ये वेळ बघितली रात्रीचे 12.30 झाले होते, तो परत पार्टीत आला.

एका टेन्टच्या मागे गुलशन चावला कुणासोबत तरी बोलत असताना त्याला दिसला, टेन्टच्या मागे अंधार असल्याने समोरची व्यक्ती कोण होती त्याला दिसली नाही, तो पुढे गेला इतक्यात त्याला देवयानी दिसली, ती त्याच्याचकडे येत होती.

ती जवळ येत बोलली, "हाय..."


“लुकींग ग्रेट.. एक बात बोलू मॅम." अमित बोलला.


“बोलो."


“आप साडी मे बहोत क्यूट दिखती हो..."


देवयानी जरा लाजली व बोलली, "कैसे हो?"


“जैसा भी हू.. आपके सामने हू, आप कैसी है..."


“मै अच्छी हू.. आपका दोस्त नही आया पार्टी मे.. विक्रम..."


“बोल रहा था.. साक्षी की तबीयत अच्छी नही है.. इसलिए नही आ पायेगा..."


"एक बात पुछू..." ती बोलली.


“हां बोलो मॅम..."


“तुम्हारे साथ अभी एक लडकी थी, वो कौन है?"


“वो... तनया है..."


“कौन तनया?"


“मेरे ऑफिस मे काम करती है..."


“तुम्हारे साथ अकेली आयी है?"


“अब आपसे क्या छुपाना मॅडम, मेरी गर्ल फ्रेंड है, बहोत जल्द हम शादी करने वाले है..."


ऐकून देवयानीच्या काळजात धस्स झालं... पण तिनं ते चहेऱ्यावर दिसू दिलं नाही.. कदाचित ती अमितवर प्रेम करायला लागली होती. स्वत:ला सावरत ती बोलली,

“क्या बात है.. बडी खुबसूरत है, तुम्हारे साथ उसकी जोडी बहोत अच्छी दिखती है..."


“थॅन्क यु मॅम..."


अमित पुढे निघाला आणि देवयानी जरा वेळ त्याला जाताना बघत राहिली.. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले.

00000

अमित पार्टीत एन्जॉय करत होता, एका ठिकाणी त्याला प्रियंका चावला कुणासोबत तरी फोनवर बोलताना दिसली. ती फोनवर मोठ्याने बोलत होती, अमित येताना दिसताच तिचा आवाज कमी झाला.


इतक्यात गुलशन चावला त्याच्या पाठीमागून आला व त्याच्या पाठीवर हात ठेवत बोलला,

"एन्जॉय द पार्टी मॅन..."


“यस..." तो गुलशनकडे हसत बोलला.


“अमित, डॉक्टर संदिप चक्रधरला ओळखतो..."


“नाव ऐकलं आहे खूप पण कधी भेट नाही झाली..."


“चल तुला भेट घालून देतो..."


अमित, गुलशनसोबत संदिप चक्रधरजवळ आला, संदिप चक्रधर, ॲडव्होकेट राजेश गुप्तासोबत गप्पा मारत होता.


“हॅलो मिस्टर चक्रधर..." गुलशन बोलला.


“हॅलो, गुलशनजी..."


“Meet my friend, Mr. Amit chief reporter of Bharari...”


“हॅलो मिस्टर अमित..." संदिप चक्रधर त्याच्याशी हात मिळवत बोलला.


“ग्लॅड टु मिट यु सर.. आपल नाव खूप ऐकलं आहे, आज पहिल्यांदा भेटलोय..." अमित हसत बोलला.


“आणि हे माझे वकील राजेश गुप्ता..." गुलशन बोलला.


“नाईस मिटींग यु सर." अमित ॲडव्होकेट गुप्ता सोबत हात मिळवत बोलला.


“आपल्या नावाची खूप चर्चा असते शहरात, शहर के जासूस हो आप..." राजेश गुप्ता हसत बोलला.


अमित बोलत होता, आणि देवयानी सारखी त्याच्याकडेच बघत होती, अमित आज खूप डॅशिंग दिसत होता.

00000

अमित सगळीकडे फिरत होता, सोबत तनया नव्हती त्यामुळे त्याला बोअर होत होतं, जरावेळ इकडे तिकडे भटकून, तो आपल्या टेन्टच्या दिशेनं निघाला, एका टेन्टजवळ त्याला काहीतरी खुसूर पुसूर ऐकू आली तो थांबला, टेन्टमधल्या सावलीवरुन त्यानं ओळखलं, प्रेम आणि अविका एकमेकांना किस करण्यात व्यस्त होते, तो हसला व पुढे निघाला, इतक्यात त्याला तनया येताना दिसली.


तनया त्याच्याजवळ आली.

“आता तुझ्याचकडे येत होतो, तुझ्याशिवाय पार्टीत बोअर होतंय..." अमित बोलला.


“आता बरं वाटतंय, चला काहीतरी खाऊया मला भूक लागली आहे..."


“ठिक आहे चल..."


अमित आणि तनया दोघे पार्टीत आले, आणि देवयानीचं लक्ष त्या दोघांकडे गेलं, ती सारखी त्यांच्याकडेच बघायला लागली..

तनयाचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि तनया बोलली,

"अमित ती कोण आहे.. आपल्याकडे सारखी बघतेय..."


अमितनं बघितलं आणि बोलला, “अगं ती देवयानी गुप्ता आहे PSI त्यादिवशी नाही का तुला ऑफिसमध्ये तिचा फोन आला होता, मला विचारत होती ती..."


“तीच.. तुम्ही बोलले की परी है.. बहोत खुबसुरत है..."


“हो तीच..."


“सुंदर तर आहेच.. प्रश्नच नाही... “चल तुला ओळख करुन देतो..."


अमित, तनयासोबत देवयानीजवळ आला व बोलला, "हाय मॅम..."


“हाय..” ती हसत बोलली.


“मॅम ये तनया है.. मैने बताया था आपको..."


तनयानं हसत हात समोर केला... देवयानी हसली व बोलली, “इससे काम नही चलेगा" आणि देवयानीनं तनयाला मिठी मारली.


तनयाला खूप छान वाटलं... देवयानी हळूच बोलली, “बहोत लकी हो...”


तनया हसली व बोलली, "नाईस टू मीट यु मॅम..."


"तनु.. मुझे अपने काम मे बहोत help मिलती है मॅम से..." अमित बोलला.


"तारीफ मत करो अमित... मुझे अपनी तारीफ पसंद नही..." देवयानी हसत बोलली.

अमित हसला.

जरावेळ ते तिघे गप्पा मारत होते, आणि नंतर अमित आणि तनया दुसरीकडे निघून गेले, त्यांना जाताना बघून देवयानी बोलली, "बहोत चाहत थी तुम्हे गले लगाने अमित.. परत शायद किस्मत मे नही... तुम नही तो तुम्हारा प्यार ही सही."

00000

मोनिका एका व्यक्तीकडे सारखी बघत होती, ती त्याला ओळखत नव्हती, ती त्याच्याजवळ आली व बोलली, "कोण आहात आपण, मी नाही ओळखलं तुम्हाला..."


“माझं नाव राज कदम, तुमचे पती ओळखतात मला..."


“ओह..."


“एकटेच आलात..."


“होय..."


“ओके एन्जॉय द पार्टी..."


“थॅन्क यु मॅडम..."

00000

पार्टी जोरात सुरु होती, जवळपास प्रत्येकाच्याच हातात ड्रिन्क्सचा ग्लास होता, अमित, तनयाच्या जवळ बसला होता, तनया त्याच्याकडे बघत बोलली, "तुम्हाला नाही घ्यायचं ड्रिन्क्स..."


“नाही..."


“का, तुम्ही पिताय ना बियर वगैरे..."


“हो.. पण आता नको..."


“का, सांगा ना..."


“सोबत तू आहेस ना, बरं नाही दिसत..."


“ओ, हो.. असं आहे काय, प्यायची असेल तर माझी काही हरकत नाही..."


“हो.. तनु आपण एकाच टेन्टमध्ये असणार आहोत, पिल्यानंतर माझ्या मनात काही भलतेसलते विचार आले आणि..."


“मला माहित आहे. तुम्ही मला घाबरवताय,‍ आणि तुम्ही असं काही करणार नाही ते ही माहित आहे मला..."


“इतका विश्वास आहे माझ्यावर..."


“स्वत:पेक्षा जास्त आहे, उगाच प्रेम नाही केलं तुमच्यावर..."


अमित हसला, त्यानं मोबाईलमध्ये वेळ बघितली रात्रीचा दिड वाजला होता. तो बोलला, "ही पार्टी रात्रभर चालणार आहे, चल जरा वेळ आराम करुया टेन्टमध्ये..."


दोघे त्यांच्या टेन्टच्या दिशेनं जायला निघाले इतक्यात एक सुंदर तरुणी लगबगीने समोरुन येताना दिसली, तिनं एक नजर अमितकडे बघितलं आणि किंचीत हसली व पुढे निघाली.


“कोण होती ती..." तनया बोलली.


“मला काय माहित..." अमित बोलला.


“तुमच्याकडे बघून हसली म्हणून म्हटलं..."


“मला नाही माहित, मी नाही ओळखत, या शहरात माझे बरेच फॅन्स आहेत, त्यापैकी कुणी असेल..."


अमित आणि तनया परत टेन्टमध्ये आले, आमोर समोर असे दोन बिछाने होते, त्यापैकी एकावर तनया झोपली, अमित तिच्याकडे बघत होता.


“झोपा ना असे काय बघताय..."


“तू झोप ना, मी बघतोय तुला..."


“नाही, असं बघायचं नाही, झोपा तुम्ही पण..."


“अगं पण बघायला काय हरकत आहे, तू झोपेत कशी दिसतेय ते बघायचं आहे..."


“तुमचं आपलं काहीतरीच..“ ती हसली.


“बघु ना..."


“नको, झोपा तुमच्या बेडवर..."


“मला एकट्याला झोप येत नाही, तुझ्याजवळ झोपू?"


“अस्स.. एकट्याला झोप येत नाही, मग रोज कोण असते तुमच्यासोबत?"


“माझ्या घराच्या पाठीमागे चिंचेचं झाड आहे ना त्यावर चुडैल असते ती येते रोज झोपायला..."


“छी. sss. काहीतरीच, झोपा आता मला उगाच काहीतरी सांगून घाबरवू नका..."


अमित झोपला, बाहेर पार्टी सुरु होती... पण आता डिजेचा आवाज कमी झालेला होता. काही जण झोपायला टेन्टमध्ये गेले होते.. प्रत्येक टेन्टमध्ये झ्रिरो बल्बचाच प्रकाश होता.

00000

प्रविण चावलाचा अर्धा खंबा संपवून झाला होता, त्याला चढलेली होती,

दारु पितांना त्याची नजर एका सुंदर तरुणीवर गेली, आणि तो सारखा तिच्याकडे बघायला लागला, पॅग संपवून तो तिच्या तिच्याजवळ आला व बोलला "हाय"

“हाय" ती बोलली

“लुकींग ग्रेट.. काय नावं आपलं"

“सोनिया"

“सोनिया.. व्हॉट अ नाईस नेम, माय सेल्फ प्रविण चावला, गुलशनचा लहान भाऊ"

“ओह.. ग्लॅड टु मिट यु" सोनिया बोलली

“तुम्ही. एकटयाच आलात"

“होय"

“कुठल्या टेंट मध्ये आहात तुम्ही"

“तीन नंबरच्या"

“मग इथे काय करताय.. चला टेंट मध्ये जावुया.. गप्पा मारुयात" तो तिच्या खांदयावर हात ठेवत बोलला

“एस्क्युज मी...” म्हणत सोनिया त्याच्यापासून सुटका करुन घेत पुढे निघून गेली.

प्रविण तिला तिथून जातांना एकटक बघत होता.

00000

सोनिया च्या हातात कोल्डड्रिंकचा ग्लास होता, प्रविण चावलाची नजर जाणार नाही अशा ठिकाणी ती एकटीच बसली होती, इतक्यात तिच्या जवळ तिचा मित्र राज कदम आला व बोलला

“हाय"

“अरे बिनडोक इथे कां आलाय" सोनिया वैतागत बोलली

“मग काय करु... एक तर तु मला पार्टीत घेवून आलीय आणि आता सोबतही राहु देत नाही, मी बोअर झालोय"

“जा ना..एखादीला पटव तिच्याशी गप्पा मारत बस"

“इथे कुणी नाही पटवायला"

“ती बघ तिकडे.. प्रियंका.. ती प्रविण चावलाची बायको आहे.. जा तिकडे ती एकटीच बसलीय"

राज कदम तिथून उठला आणि प्रियंकाकडे निघून गेला.

इतक्यात सोनियाच्या समोर डॉक्टर संदिप चक्रधर आले

"हाय" ते बोलले

“हॅलो"

“मी, डॉक्टर संदिप चक्रधर.. आपण"?

“मी , सोनिया जगताप"

“नाईस टु मिट यु" संदिप हात पुढे करत बोलला

सोनियानं त्याच्याशी हात मिळवला, संदिप बोलला "आपण एकटयाच आहात पार्टीमध्ये"

“होय... मी एकटीच आहे"

“Do you have company mam”?

“चालेल"

संदिप चक्रधर, तिच्या शेजारी खुर्चीवर बसले

“काय करता आपण" संदिपचा प्रश्न

“मी मॉडेलींग करते"

“wow.. nice profession, I like it”

“Thank you sir”

“तुम्ही गुलशन चावलाच्या मैत्रीण आहात ना"

“तुम्हाला कसं कळलं"? ती जरा अपसेट झाली

“मी एकदा बघीतलं आहे त्यांच्यासोबत तुम्हाला, मी पण या पार्टीत एकटाच आहे, तुम्हाला जर रात्री गप्पा मारायच्या असेल किंवा वेळ जात नसेल तर तुम्ही माझ्या टेंटमध्ये येवू शकता, मी सहा नंबरच्या टेंटमध्ये आहे, किंवा तुम्ही मला तुमच्या टेंट मध्ये बोलावलं तरी चालेल.

सोनिया हसली व बोलली "त्याची गरज पडणार नाही, But I mind it"

“Thank you” संदिप हसत बोलला

00000

रात्रीचे 1.45 झाले होते

सोनिया आपल्या टेंटमध्ये आली, तिनं पर्स मधून मेकअप बॉक्स काढला आणि लिपस्टीक निट केली, इतक्यात तिच्या पाठीमागुन गुलशन चावला आला आणि तिला मिठी‍त घेत बोलला "हाय हनी"

“इथे कां आलात, कुणी बघेल ना"?

“तुला हे सांगायला आलो की अर्ध्यातासाने फॉर्म हाऊस च्या दोन नंबरच बेडरुममध्ये ये जीथे आपण नेहमी भेटतो तिथे, मी ते दार फक्त लेटलेलं असेल, कुणाला माहितही पडणार नाही"

“ते ठिक आहे, पण तुमची पत्नी मोनिका, तुम्ही तिच्याजवळ नसला तर तिला संशय येईल व ती शोधून काढेल आपल्याला"

“तसं नाही होणार, आजची रात्र ती खूप गाढ झोपणार आहे, मी तिच्या ड्रिन्क मध्ये झोपेच्या गोळया टाकून ठेवणार आहे"

“व्हेरी गुड... मला तुम्हाला काही महत्वाचं सांगायचं आहे, आय एम प्रेगनेंट..”

“काय"? गुलशन चावला गप्प झाला.. त्याच्या चेहऱ्यावर चिंता पसरली

“काय झालं" सोनिया बोलली

“काही नाही... मी तुझ्याशी लग्न करेल सोनिया"

“आणि मोनिका"

“तिचं करु काहीतरी, मी निघतो आता, तु अर्ध्या तासाने बेडरुममध्ये ये"

“ओ के"

00000

रात्री 2.40 वाजता

अचानक एका जोराच्या किंकाळीने त्या वातावरणाची शांतता भंग झाली. अमित खडबडून उठला, तनयाही उठली, कोणाची होती ती किंकाळी?

अमित आणि तनया दोघेही टेन्टच्या बाहेर आले, बाकीचेही आपापल्या टेन्टमधून बाहेर येत लगबगीने आवाजाच्या दिशेनं जायला निघाले, एका टेन्टभोवती गर्दी जमली होती, अमित गर्दीच्या जवळ गेला.. मघा त्याच्या समोरुन गेलेली, त्याच्याकडे स्मित करुन बघणारी सुंदर तरुणी रक्ताच्या थारोळयात पडली होती, तिचा खून झाला होता, तिच्या डाव्या छातीवर कुणीतरी गोळी झाडली होती.

प्रियंका चावला त्या टेन्टच्या बाहेर थरथर कापत उभी होती.

00000

देवयानी गुप्ता प्रेताजवळ गेली,

आणि डॉक्टर चक्रधरला बोलली "डॉक्टर साहाब जरा देखीए जिंदा है या....."

डॉक्टर चक्रधरनं चेक केलं व देवयानी ला बोलला "सी इज नो मोर"

"कौन है ये"? देवयानी बोलली

सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले, जणू तिला कुणी ओळखतच नव्हते, अमित,गुलशन चावला कडे वळला व बोलला

"कोण आहे ही"?

“माझी मैत्रीण आहे सोनिया" गुलशन बोलला

“तुझी मैत्रीण?, तुमच्या मैत्रीणीचा खून कां करेल कुणी"? अमित बोलला

इतक्यात मोटारसायकलचा आवाज आला, फार्म हाऊसच्या बाहेर कुणीतरी मोटरसायकलने सुसाट पळत सुटलं होतं, देवयानी लगेच फॉर्म हाऊसच्या बाहेर आली, तिनं मोबाईलवर कंट्रोल रुमला फोन केला, आणि स्वत:च्या मोटारसायकलने ती त्या पळणाऱ्याच्या मागे निघाली. ‍

अमित टेटच्या बाहेर उभ्या असलेल्या प्रियंका चावला जवळ आला व बोलला

"आता जरावेळापुर्वी तुम्ही किंचाळला होता"

“हो..” प्रियंकाच्या तोंडून शब्द फुटत नव्हते

“तुम्ही कशाला आला होता इकडे"?

“मी माझ्या टेंट मध्ये होते, प्रविण माझ्यासोबत टेंट मध्ये नव्हते, एकटी असल्याने मला झोप येत नव्हती... म्हणून मी टेंट बाहेर पडले"

“मग या सोनियाच्या टेंटमध्ये येण्याचं कारण"

प्रियंका गप्प

“मी विचारतोय काही, तुम्ही या टेंटमध्ये कां आलात"?

“मला संशय होता"

“कसला संशय"?

प्रियंकानं एक नजर प्रविण कडे बघीतलं जो तिथे बाजुलाच उभा होता, प्रविणनं खाली मान घातली प्रियंका बोलली

"मला संशय होता की माझे पती कदाचीत हया टेंटमध्ये हिच्यासेाबत असतील, म्हणून मी या टेंटमध्ये आले"

“कां तुम्हाला असं कां वाटलं की तुमचे पती इथे असतील"

“मघा माझे पती हिच्यासोबत बोलत होते ते मी एैकलं होतं, ते हिच्याची फर्ल्ट करण्याच्या प्रयत्नात होते"

“मग काय बघीतलं तुम्ही या टेंटमध्ये"

“टेंटमध्ये शिरताच मला हिचा मृतदेह दिसला, तशीच किंचाळत की बाहेर निघाले"

“म्हणजे हिला कुणी मारलं ते तुम्ही बघीतलं नाही"

“नाही, इथे कुणीच नव्हतं, ही मरुन पडली होती"

“मग तुम्हीच हा खून केला नाही कशावरुन,? तुम्ही हिचा खून केला आणि कुणाला संशय येवू नये म्हणून ओरडत सुटल्या"

ती अमितकडे खाऊ की ठेवू या नजरेनं बघायला लागली व बोलली "मी कां खून करेल हिचा उगाच मला काय फायदा त्याचा"

“ते ही बरोबर आहे म्हणा, तुम्हाला काय फायदा"?

अमित गुलशनकडे वळला व बोलला

“पूर्ण नावं काय हिचं" अमितनं गुलशनला विचारलं

“सोनिया जगताप" गुलशन बोलला

“कुणासोबत आली होती ही, एकटीच होती"?

“मलातरी तिनं सांगितलं की इकटीच येतेय"

अमित तिथे उपस्थीत लोकांना उद्देशून बोलला "आणखी कुणी ओळखतं हिला, कुणासोबत आली होती ही पार्टीमध्ये"

सगळयांनी नकाराने मान हलवली.

अमित परत गुलशन जवळ आला व बोलला "हिला तुमच्याशिवाय कुणी ओळखत होतं इथे"?

“माझ्या मते नाही "

“मला वाटते बाईकने जो पळाला, तोच असेल हिच्यासेाबत आलेला"‍ अमित बोलला "देवयानी पकडेलच त्याला यात शंका नाही, हिचा खून झाला आणि तो पळाला"

“मग तोच खून करुन पळाला असेल" गुलशन बोलला

“शक्य आहे"

अमित प्रेताजवळ गेला व प्रेताचं निरीक्षण करु लागला, व गर्दीला उद्देशुन बोलला

"कुणी बंदुकीच्या फायर चा आवाज एैकला होता"

कुणी काहीच बोललं नाही.

अमित प्रेताच्या आजुबाजुला निरीक्षण करु लागला, टेन्ट च्या भोवती मोठया मोठया झाडांच्या कुंडया होत्या, अमित एक एक कुंडी बघत पुढे सरकत होता, तो एका कुंडीजवळ थांबला, त्या कुंडीत एक रिव्हॉल्वर होती, अमित नं मोबाईलवर विक्रमला फोन केला

रिंग जात होती, जरावेळानं विक्रमनं फोन उचचला

"कुठे आहेस" अमित बोलला

“आलोय पाच मिनीटात, देवयानीचा फोन आला होता मला"

“ओके"

अमितनं आपल्या मोबाईल मध्ये घटनास्थळाचे व सोनिया जगतापचे फोटो काढले, रिव्हॉल्वर असलेल्या कुंडीचाही फोटो काढला, व पेपरसाठी न्यूज तयार करुन लगेच भरारीच्या ऑफिसला SMS केली.

अमित परत गुलशनजवळ आला व बोलला "तुमची पत्नी कुठाय मोनिका"?

“झोपलीय"

“एवढया जोरात हया किंचाळल्या इथलं प्रत्येक जनं उठलं, मग तुमची पत्नी कां झोपलीय"

“तिला रात्रीची झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळया घ्यायची सवय आहे"

“म्हणजे ती झोपेच्या गोळया घेवून झोपली होती"

“होय"

“इथे इतकं छान फंक्शन असतांना, तुमचा वाढदिवस असतांना तिला झोपावसं वाटलं आणि ते ही झोपेच्या गोळया घेवून आश्चर्य आहे, तुम्हाला काय वाटतं, कुणी मारलं असेल हिला"?

“मला काय माहित... उगाच माझ्या बर्थडे पार्टीचा रंग मे भंग झालाय" तो नाराजीच्या सुरात बोलला

इतक्यात बाईकचा आवाज येतांना दिसला,अमितनं फॉर्म हाऊस ऐन्ट्रीकडे बघीतलं, सिनीयर इन्सपेक्टर विक्रम तिथे पोहोचला होता.

अमितनं त्याला साईडला घेतलं आणि आत्तापर्यंत घडलेलं सगळं सांगितलं, तो त्याला त्या कुंडीजवळ घेवून गेला जिथे रिव्हॉल्वर पडलेली होती, विक्रमनं रिव्हॉल्वर वर रुमाल टाकला आणि रिव्हॉल्वर उचचली व ‍ निरीक्षण करत बोलला "38 कॅलिबर, मेड इन कोरीया"

00000

“ही रिल्वॉव्हर कुणी बघीतली आहे याआधी" विक्रम ती रिव्हॉल्वर प्रत्येकाला दाखवत बोलला

“ही रिल्वॉव्हर तर गुलशन दादाची आहे ना" प्रियंका चावला पुढे येत बोलली

गुलशननं तिच्याकडे रागाने बघीतलं व तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडला

विक्रम, गुलशन जवळ आला आणि बोलला "ही रिव्हॉल्वर तुमची आहे"

“हो पण, ती इथे कशी आली माहित नाही"

“इथे कशी आली म्हणजे, कुठे असते तुमची रिव्हॉल्वर"?

“रिव्हॉल्वर नेहमी माझ्या कारच्या डॅशबोर्ड मध्ये असते, बरेच दिवस झाले मी डॅश बोर्ड चेक केला नाही"

विक्रमनं रिव्हॉल्वरचं चेंबर उघडलं, त्यात चार गोळया शिल्लक होत्या

“किती गोळया होत्या बंदूकीत" विक्रमनं गुलशन चावला ला विचारलं

“सहा" गुलशन बोलला

“यात फक्त चारच आहे"

“काय?” गुलशन ला घाम फुटला

“याचा अर्थ यातून दोन गोळया झाडण्यांत आलेल्या आहेत, एक गोळी सोनियावर चालवली, तर मग दुसरी गोळी कुणावर"? विक्रम अमितकडे बघत बोलला

“तुमची गाडी कोण चालवतं? तुमच्या व्यतिरिक्त" अमितचा प्रश्न

“माझा ड्रायव्हर पवनकुमार आणि मी"

“ड्रायव्हर कुठाय तुमचा"

“तो त्याच्या गावाला गेलाय"

“कधी गेलाय" ?

"एक आठवडा झालाय"

“आणि परत कधी येणार आहे"?

“माहित नाही आठ दहा दिव‌सात येईल असं बोलून गेला"

“सोनिया जगताप बद्दल सांगा काही" अमित बोलला

“काय सांगू"

“तुमची मैत्रीण होती ना ती, मग सांगा ना, कोण होती, काय करत होती, कुठे राहते, पत्ता काय तिचा"

“नाही माहित, आता एक महिनाच झालाच तिची ओळख होऊन, मला तर तिच्या घरचा पत्ता ही माहित नाही, फक्त नाव माहित आहे, अमित असं वाटतयं कुणीतरी मला फसवतय" गुलशन चावला घाबरत बोलला

“घाबरु नका, तुम्ही जर काही केलं नसेल तर आय प्रामिस यु, मी तुम्हाला काहीही होवू देणार नाही"

विक्रम, अमित आणि गुलशन एका ठिकाणी बसले

विक्रम त्याला बोलला "आता मला सांगा, नक्की काय प्रकरण आहे"

“काही नाही, सोनिया आणि माझी ओळख होऊन फक्त एक महिनाच झालाय, ती माझी चांगली मैत्रीण होती"

“तिच्यात आणि तुमच्यात तसलं काही"

“नाही तसं काही नव्हतं"

“तुमची पहीली पत्नी नांव काय तिचं"

“मेरी फनार्डिंस‍"

"ख्रिश्चन होती"?

“होय"

“लव मॅरेज"?

“होय"

“कुठे गेली ती"

“तिचा एक प्रियकर होता, एक दिवस तिचं आणि माझं कडाक्याचं भांडण झालं आणि ती मला सोडून गेली"

“जातांना तिनं सांगितलं होतं, ती प्रियकराकडे जातेय"

“नाही"

“मग तुम्हाला कसं माहित ती पळून गेली"

“मग कुठे गेली, नवऱ्याला सोडून जाणारी स्त्री... कुठेतरी काहीतरी तिचा कुणीतरी असल्याशिवाय उगाच नवऱ्याला सोडून जाईल,? आणि ते ही माझ्यासारख्या श्रीमंत नवऱ्याला"?

“युवर राईट"

“पण तुमच्या मैत्रीणीचा खून कुणी कां करेल, आणि ते ही इथे"? विक्रम बोलला

गुलशन गप्प

“हा पवनकुमार कुठं राहतो" अमितचा प्रश्न

“इथे तो माझ्याच कडे सर्व्हेंट क्वार्टर मध्ये राहतो"

“गांव कुठलं त्याचं"

“ताडाली.. इथून 15 किलोमिटर अंतरावर आहे"

“गावी जाण्याचं काही खास कारण होतं"

“नातेवाईकाचं लग्न आहे असं बोलला होता"

अमित परत काही विचारणार इतक्यात पोलीस सायरन वाजला, अमित, विक्रम आणि इतर सगळे फार्म हाऊस समोरील मोकळया रस्त्यावर बघायला लागले देवयानी गुप्ता मोटरसायकलने फार्म हाऊस जवळ आली, त्यामागे एक पोलीसांची जीप व एक ॲब्मुलन्स होती. जीप मध्ये एक तरुण हतकडी लावलेल्या अवस्थेत बसला होता, त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते.

विक्रमनं रुमालमध्ये गुंडाळलेलं रिल्वॉव्हर देवयानीच्या ताब्यात दिलं.

“ये कौन है" विक्रमनं हतकडी लावलेल्या तरुणाबद्दल देवयानीला विचारलं

“ये यहॉ से मोटरसायकलपर भाग रहा था, नाम क्या है तुम्हारा" देवयानीन‍ त्याला विचारलं

“राज कदम"

“यहॉ किसके साथ आये थे"

“सोनिया के साथ"

“सोनिया से तुम्हारा रिश्ता"?

“मेरी दोस्त थी"

“दोस्त या गर्लफ्रेंड"

राज गप्प

“मैने पुछा दोस्त या गर्लफ्रेंड" देवयानी आवाज चढवत बोलली

“जी गर्लफ्रेंड थी"

“तुम उसके साथ यहॉ कैसे आये"

“उसने कहा की एक दोस्त की बर्थडे पार्टीमे जाना है, और मुझे साथ चलने को बोल रही थी"

“क्यो? तुम्हे साथ चलने को क्यो बोला"

“मुझे क्या पता, वो बोली इसलीए मै उसके साथ आया"

“उसका खून हुआ और तुम यहाँ से भागे, उसका खून करके भागे?

“तौबा.. मै उसका खून क्यू करु.. वो भी यहॉ इतने लोगोके बीच.. मुझे क्या पागल कुत्ते ने काटा है"

“तो फिर यहॉ से भागे क्यू"?

“मै डर गया था. मै उसके साथ यहॉ आया था, पता तो चल ही जाता"

“आम्ही तुझ्यावर विश्वास कां ठेवायचा, एक तुच होताच या पार्टीमध्ये जो तिच्यासोबत होता" अमित बोलला

“तुम्हे क्या लगता है अमित, खून इसने किया होगा" देवयानी बोलली

“अभी कुछ कह नही सकते, सोनिया का मर्डर क्यू हुआ इसका कारण जानना होगा, ये केस इतना सरल नही है मॅम.... एैसा लगता है, इस केस के तहतक जाने के लिए बहोत पापड बेलने पडेंगे" अमित बोलला

“यहॉ पर उपस्थित सभी लोगोसे मेरा निवेदन है की, जबतक सोनिया का कातील मिल नही जाता आप सब यही रहेंगे, मिस्टर गुलशन चावला के मेहमान बनकर, कोई भी इस फार्म हाऊस के बाहर जानेकी कोशीश नही करेगा is that clear” देवयानी मोठया आवाजात बोलली

00000

देवयानी आणि विक्रम डेडबॉडी PM ला पाठवून सोबत राज कदम ला घेवून पोलीस स्टेशनला निघून गेले, जातांना फॉर्म हाऊस वर दोन हवालदार तैनात करुन गेले.

रात्रीचे पाऊने चार वाजले होते

अमित, तनयाजवळ आला व बोलला

"तुला उगाच आणलं यार, मला काय माहित इथे असं होईल ते"

“नेव्हर माईंड, आता काय करायचं" तनया बोलली

“झोप तर येणार नाही, चला गप्पाच मारुयात, विचारु एकाएकाला, मला वाटते प्रेम आणि अविकाला ही काही विचारायला पाहिजे"

“चला"

प्रेम आणि अविका एका ठिकाणी बसले होते, ते दोघेही या घटनेमुळे हादरलेले दिसत होते. अमित आणि तनया त्यांच्या जवळ गेले, त्यांच्या शेजारी खुर्चीवर बसले "हाय.. लव बर्डस्"

“हाय.” प्रेम किंचीत हसला

“रिलॅक्स व्हा..” अमित बोलला

“यस सर" प्रेम बोलला

“तुम्ही दोघे टेंट मध्ये होते की बाहेर " अमितचा प्रश्न

“आम्ही दोघेही टेंटमध्येच होतो" प्रेम बोलला

“तुम्ही जागत होते दोघे"

“होय"

“काही बघीतलं तुम्ही"

दोघेही गप्प

“तुम्ही रिव्हॉल्वरच्या गोळीचा आवाज एैकला"

“नाही डी.जे. चा आवाज होता, त्यामुळे बंदूकीचा आवाज दबल्या गेला असु शकते"

“युवर राईट"

“पण डी.जे. तर काही वेळासाठी बंद झाला होता ना, त्यामुळेच तर प्रियांकाची किंचाळी एैकू आली"

“हो पण जेव्हा खून झाला त्यावेळी डीजे चालु असावा"

“युवर राईट प्रेम.. तु काही संशयास्पद बघीतल"

प्रेम न अविकाकडे बघीतल , तो गप्प होती

अमित बोलला "हे बघ इथे खून झालाय, जर खरा खूनी सापडाला नाही तर तुझ्या वडीलांवर खूनाचा आरोप येवू शकतो, कारण ज्या पिस्तोल नं खून झालाय ती तुझ्या वडीलांची आहे, त्यामुळे तुला काही माहित असेल ते सांग"

“सांगतो... मी आणि अविका एका टेंटच्या मागे एकमेकांसोबत मस्ती करत होतो, जरावेळानं त्या टेंट मधून बोलण्याचा आवाज एैकू येवू लागला, तो टेंट सोनियाचा होता, व‍ त्या टेंटमध्ये डॉक्टर चक्रधर होते"

“काय एैकलं तू" अमित बोलला

“डॉक्टर चक्रधर प्यालेले होते व ते सोनीयाशी फर्ल्ट करण्याच्या प्रयत्नात होते, डॉक्टर तिच्या टेंटमध्ये आले हे सोनियाला आवडलं नव्हतं, सोनीयानं त्यांना चांगल सुनावलही, पण ते एैकायला तयार नव्हते, शेवटी सोनीयानं त्यांचा अपमान करुन त्यांना टेंटबाहेर घालवलं, जातांना डॉक्टर चक्रधर सोनीयाला बोलले की "माझा अपमान करतेस, बघून घेईल तुला"

“डॉक्टरांनी तिच्यावर बळजबरी केली "?

“नाही, पण ते फर्ल्ट करत होते तिच्याशी"

“ओके, आणखी काही बघीतलं संशयास्पद"

“होय"

“काय.. अमित कान टवकारत बोलला

“ त्यानंतर मी जेव्हा टॉयलेटला जायला टेन्टच्या बाहेर आलो तेव्हा सोनिया दिसली होती" प्रेम बोलला

“कुठे"‍ अमित आश्चर्याने बोलला

“ती प्रियंका काकू सोबत काहीतरी बोलत होती" प्रेम बोलला

“प्रियंका सोबत बोलत होती? काय बोलत होती, तु एैकलस"

“नाही त्या दोघीही काहीतरी हळुहळु बोलत होत्या, पण सोनिया चिडलेली दिसत होती"

“पण प्रियंका तर तिला ओळखत नव्हती मग तिच्याशी....."?

“काय माहित"

“तु तुझ्या आईच्या संपर्कात असतोस"?

प्रेम गप्प

अमितनं त्याच्याकडे बघीतलं, तो बोलला "आई आहे माझी ती, तिच्याशी बोलत असतो फोनवर कधी कधी"

“आणि भेटतही असशील ना"

“हो कधी कधी"

“काय बोलणं होतं normaly”

“असचं कॉमन गप्पा असतात, काही विशेष नाही"

“तुझी आई कधी बोलली तुला, ती कां सोडून गेली ते"

“नाही, आणि मी विचारलही नाही तिला"

“आणि मोनिका बद्दल काय मत आहे तुझं"

“खूप सांभाळून घेते ती मला, she is a nice mom, मी तर तिला मॉम समजतच नाही, ती माझ्याशी मित्राप्रमाणेच वागते"

“नाईस, मी अविकाला काही विचारु शकतो" अमित बोलला

“यस सर विचारा"

“अविका... तुझं पुर्ण नांव सांग"

“अविका राध्येश्याम पटेल"

“तुझे वडील काय करतात"

“बिजनेसमॅन आहेत... आमची ट्रॅव्हल कंपनी आहे"

"तु किती दिवसांपासून ओळखते प्रेम ला"

“तिन वर्ष झाले, आम्ही क्लासफेलो आहोत"

“व्हेरी गुड"

“तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसता, You know.. that means, like lovebirdsअसेच एकत्र रहा नेहमी"

दोघेही हसले व अविका बोलली "थॅन्क् यू सर"

अमित आणि तनया तिथून निघाले

0000‍0 ‍

गुलशन, प्रियंकाजवळ आला व बोलला "डोकं आहे कां तुला, पोलीसांना कां सांगितलं की ती बंदूक माझी आहे"

“सॉरी दादा चुकले" प्रियंका खाली मान घालत बोलली

“सगळे ना बिनडोक भरलेय या घरात, काय करावं काही सूचत नाही"

तो रागातच तिथून निघून गेला

प्रियंकानं रागानच प्रविण कडे बघितलं व बोलली "बघीतलं.. मला बिनडोक बोलले आणि तुम्ही मात्र असेच गप्प.. तुम्हाला काय फरक पडतो तुमच्या बायकोला कुणीही काहीही बोललं तरी"

प्रविण गप्पच होता

“अहो बोला काहीतरी"

“काय बोलू, तु पोलीसांना पिस्तोल दादाची आहे हे सांगून माती खाल्ली ना, आता ते निस्तारतांना नाकी नऊ येतील"

“येवू देत मला नाही फरक पडत" प्रियांका रागात बोलली

“तुला नाही फरक पडत.. पण मला पडतो, दादाला काही झालं ना तर बसा बोंबलत.. एक दमडीही हाती लागायची नाही आपल्या" प्रविण चावला वैतागत बोलला

00000

जरावेळानं, अमित, प्रियंका चावला जवळ आला व बोलला "हाय, माझं नावं अमित प्रधान" मी भरारी या वृत्तपत्राचा चिफ रिपोर्टर आहे

“हाय" ती बोलली

“मला तुम्हाला काही विचारयचं आहे"

"बोला"

"इथे नको, आपण तिथे बसुया" एका कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकल्या आहेत ना तिथे

दोघेही एका कोपऱ्यात समोरासमोर खुर्चीवर बसले

"मघा, तुम्ही बोलल्या ‍की रिव्हॉल्वर गुलशनची आहे" अमित बोलला

“मला वाटलं तसं"

“कां वाटलं... हे बघा खरं सांगा नाही तर गुलशन सोबत तुम्ही पण गोत्यात येवू शकता मला माहित आहे, तुम्ही चुकून नाही बोलल्या ते "तुम्हाला कसं‍ माहित ही रिव्हॉल्वर गुलशनचीआहे"

प्रियंका गप्प

“मी विचारतोय काहीतरी"

“एकदा मी त्यांच्याकडे बघीतली होती" प्रियंका बोलली

“कधी"?

“आम्ही एकदा त्यांच्या गाडीने फिरायला गेलो होतो, ताडोबा येथे, तेव्हा त्यांनीच आम्हाला डॅशबोर्ड मधून काढून ती रिव्हॉल्वर दाखवली होती"

“तुम्हाला कसं माहित ही तीच रिव्हॉल्वर आहे"

“तीच आहे, त्यावर ईगलचा सिम्बॉल आहे"

“कधीची गोष्ट आहे ही" अमित बोलला

“दोन वर्ष झाले असतील"

“दोन वर्षापूर्वीची गोष्ट बरी लक्षात राहली तुमच्या, कोण कोण होतं तेव्हा तुमच्यासोबत"

“मी, माझे मिस्टर, प्रेम, गुलशन भाऊजी आणि ड्रायव्हर पवनकुमार"

“आणि मोनिका मॅडम"

“तेव्हा लग्न व्हायचं होतं मोनिका सोबत"

“मग मेरी फर्नार्डिस कुठे होती"

“ती दोन महिन्या आधीच घर सोडून गेली होती"

“मघा मी इथून गेलो तेव्हा तुम्ही कुणासोबत तरी फोनवर मोठयाने बोलत होत्या, मला बघीतलं आणि मग हळू बोलायल्या लागल्या, कुणासोबत बोलत होत्या"

“ते माझं पसर्नल आहे"

“मॅडम आता इथे पसर्नल काही नाही, खून झालाय इथे"

प्रियंका गप्प

“बोला नाहीतर मला तुमचा फोन पोलीसांच्या ताब्यात दयावा लागेल मग ते शोधून काढतीलच"

“काय जबरदस्ती आहे" ती वैतागत बोलली "इथे मी एकटीच आहे काय चौकशी करायला, इतके लोक आहेत इथे त्यांना कां नाही विचारत तुम्ही"

“सगळयांना विचारणार आहे, सबकी बारी आयेगी, बोला कुणाशी बोलत होता आपण" अमित बोलला

“मेरी " ती हळु आवाजात बोलली

“ओ हो... तुमच्या जाऊबाई अद्याप कॉन्टॅक्टमध्ये आहे तर, काय बोलणं झालं"?

“काही नाही नार्मल गप्पा होत्या, मी त्यांना पार्टीविषयी सांगत होते"

“मोठयाने ओरडून"

“ओरडत नव्हते... DJ चा आवाज जास्त होता त्यामुळे मोठयाने बोलावं लागत होतं"

“ठिक आहे सद्या मी तुमच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो"

“राज कदम ला ओळखता? कधी बघीतलं आहे त्याला याआधी"

“नाही, पण तो पार्टीमध्ये असतांना माझ्याशी बोलायला माझ्याजवळ येवून बसला होता"

“काही ओळख नसतांना"

“त्यानं ओळख करुन घेतली.. तो बोलला की तो या पार्टीत एकटा आलाय बोअर होतोय, आणि मग माझ्याशी गप्पा मारत बसला होता"

“काही विशेष बोलणं झालं त्याच्यासोबत"

“नाही"

“तुम्ही सोनियासोबत काय बोलत होत्या, तुम्ही तर तिला ओळखतही नव्हत्या"

“मी कधी सोनीयासोबत बोलले"?

“माझ्याकडे पुरावा आहे, तुम्ही सोनियासोबत बोलत होते हे कुणीतरी बघीतलं आणि मला सांगितलं"

“कुणी"?

“ते महत्वाचं नाही, तुम्ही काय बोलत होता तिच्याशी"

“असंच.. ती मला क्रॉस झाली आणि माझ्याकडे बघून हसली त्यामुळे मी थांबून तिची चौकशी केली इतकचं"

“काय चौकशी केली"

“तिला विचारलं की कोण आहे, तिनं तिचं नावं सोनिया असं सांगितलं, मग मी पण माझा‍ परिचय दिला.. बाकी काही विशेष बोलणं झालं नाही"

“मला तर कळलंय की सोनिया चिडलेली होती"

“नाही असं काही नव्हतं"

"नक्की"

"हो"

“तुम्हाला काय वाटतं, खून कुणी केला असेल"

“मला काय माहित"

00000

अमित परत गुलशनजवळ आला व त्याला एकांतात नेवून बोलला "मी मघा टेन्टमागे तुम्हाला कुणासोबत तरी बोलतांना बघीतलं, कोण होतं तुमच्यासोबत"

गुलशन गप्प

“आता तरी खरं सांगा इथे खून झालाय,‍ आणि तो ही तुमच्या रिव्हॉल्वर ने त्यामुळे तुम्ही किती गोत्यात येवू शकता याची कल्पना नाही तुम्हाला"

“सोनिया सोबत बोलत होतो" गुलशन बोलला

“वाटलच मला, असं लपून बोलण्यामागे काही खास कारण"

“मी तिला ओळखतो व मी तिला इथे बोलावलं आहे, हे कुणालाही कळायला नको म्हणून"

“कां"

गुलशन परत गप्प

“सांगताय ना"

“आम्ही दोघे फार्महाऊस च्या बेडरुममध्ये एकत्र असणार होतो रात्रभर"

“व्हेरी इंटरस्टिंग, ती राज कदम सोबत आली आहे हे माहित होतं तुम्हाला"

“नाही, मला वाटलं ती एकटीच आलीय"

“आता एक महत्वाचा प्रश्न,, तुमच्या गाडीच्या डॅशबोर्ड मध्ये रिव्हॉल्वर आहे हे कुणा कुणाला माहित होतं"

“माझ्या भावाला, प्रियंकाला, पवनकुमारला, प्रेम ला"

“आणि तुमची पत्नी मोनिका हिला"

“नाही तिला नव्हतं‍ माहित.. मी कधी तिला रिव्हॉल्वर दाखवली नाही"

“आणि मेरी फर्नार्डिस ला"

“तिला माहित होतं"

“मला वाटते हा तुम्हाला फसविण्याचा प्लॅन आहे, पण कुणाचा, तुम्हाला फसवून कुणाला फायदा होणार आहे"

“मेरी असू शकते.. माझ्याशी बदला घेण्यासाठी"

“ती या पार्टीत नव्हती"

“घरातल्या कुणी तिला मदत केली असेल"

“कुणी"?

“मला काय‍ माहित"

“पण का, तुम्हाला फसवून मेरी ला काय फायदा आहे त्याचा"

“फायदा आहे, मी माझं मृत्यूपत्र अद्याप बदललेलं नाही, ते मी येत्या दोन चार दिवसात बदलवणार होतो"

“म्हणजे"

“माझ्या मृत्यूपत्रात संपत्तीच्या वाटयात मेरी चा हिस्सा आहे, पण मृत्यूपत्र बदलल्यानंतर तीचं नांव नसणार होतं"

“पण मग तसं असतं तर तुम्हालाच शूट केलं असतं ना, मृत्यूपत्र तर तुम्ही जेलमध्ये गेल्यानंतरही बदलवू शकता"

“प्वॉईंट आहे, मग मला फसविण्याचा काय हेतू... काही कळत नाही"

“सोनिया जगतापचा खून झाला तेव्हा तुम्ही कुठे होता आय मीन प्रियंका ओरडली तेव्हा तुम्ही कुठे होता"

“मी फार्म हाऊसच्या बेडरुममध्ये सोनियाची वाट बघत होतो, बराच वेळ उलटूनही ती आली नाही, मग मी तिच्याकडे जाण्याचा विचार केला, पण तेवढयातच मला प्रियांकाची किंकाळी एैकू आली आणि मी लगबगीनं बाहेर आलो"

“तुम्ही रात्री सोनियासोबत असणार होता, आणि मोनिकाला मध्येच जाग आली असती आणि तिनं तुम्हाला सोनियासोबत शोधून काढलं असतं तर"

“मी आधीच सांगितलं आहे मोनिका झोपेच्या गोळया घेवून झोपते"

“म्हणजे मोनिका झोपेच्या गोळया घेवून झोपली होती, तुमची बर्थ डे पार्टी असतांना"?

गुलशन गप्प

“सकाळी जेव्हा मोनिका ला जाग येईल तेव्हा विचारलेच मी तिला, तेव्हा कळेल मला की ती खरचं झोपेच्या गोळया घेवून झोपली होती की नाही"

“त्याची गरज नाही, मीच तिला तिच्या ड्रिन्क्समध्ये झोपेच्या गोळया विरघळवून दिल्या होत्या, आणि ती ते ड्रिन्क्स प्याली व लवकरच झोपी गेली"

“क्या बात है फुल प्रुफ प्लॅन, कुठे होता तुम्ही मोनिकासोबत टेन्टमध्ये?"

“नाही फार्म हाऊस मध्ये तीन बेडरुम आहे, त्यापैकी एका बेडरुममध्ये होतो, जीथे आता मोनिका झोपलीय"

“मोनिका झोपल्यानंतर काय झालं"

“मोनिका झोपली आहे याची खात्री करुन मी फार्म हाऊसच्या दुसऱ्या बेडरुममध्ये गेलो, जिथे सोनिया येणार होती"

“तिला कुठल्या बेडरुममध्ये यायचं हे माहित होतं"

“होय, बराच वेळ झाला ती आली नाही मग मी तिच्याकडे जायचा विचार केला तितक्यात मला प्रियंकाची किंकाळी एैकू आली"

“म्हणजे.. याचा अर्थ तुम्ही जेव्हा बेडरुमध्ये तिची वाटत बघत होता, त्याच दरम्यान तिला कुणीतरी मारलं"

“होवू शकते"

“त्यावेळी नेमके तुम्ही तिथेच बेडरुममध्येच होते याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे"

“त्याचा काय पुरावा असणार, मी बेडरुममध्येच होतो, आणि हे सत्य आहे"

“मेरी फर्नांडिस कुठे राहते मला पत्ता हवाय"

“मेन रोड ला, जयंत टॉकिजच्या बाजुला चर्च आहे, त्या चर्चमागे मेरी हाऊस आहे तिथे राहते"

“ओके, पुन्हा काही महत्वाचं जे तुम्हाला सांगायचं आहे"

“नाही"

00000

अमित … अॅडव्होकेट राकेश गुप्ताजवळ आला व बोलला

“हाय सर"

“हॅल्लो मिस्टर अमित"

“तुम्ही गुलशन चावला चे वकील आहात"

“हो... आहे"

“मला असं कळलयं की गुलशन चावला त्याचं मृत्यूपत्र बदलवणार होते"

“हो खरं आहे.. इनफॅक्ट मीच त्यांच्या मागे लागलो होतो..त्यांना आठवण करुन देत होतो"

“म्हणजे नविन मृत्यूपत्र तयार केलं होतं त्यानी"

“केलं नव्हतं.. पण करणार होते, आमचं बोलणं झालं होतं त्याबाबत"

“एक प्रश्न जरा खाजगी आहे.. पण उत्तर दिलत तर बरं होईल"

“विचारा"

“त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये मेरी फनार्डिंस‍चं नांव असणार होतं"

ते जरावेळ गप्प राहले व बोलले "माझ्या मते नाही"

“थॅन्कस् मिस्टर गुप्ता"

“माय प्लेझर" राकेश गुप्ता हसत बोलले

“तुम्ही काही संशयास्पद बघीतलं‍ इथे"

“नाही.. खरं तर मी माझ्या टेंटमध्ये जावून झोपलो होतो.. DJ चा आवाज मला अजिबात सहन होत नाही, मी कधीच असल्या पाटर्यांमध्ये जात नाही.. पण गुलशन खूपच आग्रह करत होता त्यामुळे मी आलो"

“ओ के सर"

अमित तिथून निघाला

00000

पहाटेचे 5 वाजायला आले होते, अमित आणि तनया त्यांच्या टेंटमध्ये आले, अमित बोलला "चल जरा आराम करुया"

“मला नाही येणार झोप" तनया बोलली

“येईल.. माझ्या कुशीत झोप छान मी थोपटून देतो तुला"

“खरचं"

“अगं हो...”

“ठिक आहे"

आणि मग तनया एखादया लहान बाळासारखी अमितच्या कुशीत झोपली, अमितनं तिला छान पांघरुन दिलं व तिला थोपटवू लागला, जणू एखादया लहान बाळाला झोपवतात तसं

00000

13 नोव्हेंबर

सकाळी 8.00 वाजता

अमितची झोप उघडली तेव्हा सकाळचे आठ वाजले होते, त्यानं तनयाला उठवलं.. दोघेही फ्रेश झाले आणि फार्म हाऊस च्या हॉलमध्ये आले, सगळयांचे चेहरे उदास दिसत होते, बहुतेक रात्रीच्या घटनेनंतर कुणीच झोपले नव्हत. तणावपूर्व वातावरण होतं, गुलशन चावला सुतकी चेहरा करुन बसला होता, त्याच्या बाजुच्या खुर्चीवर मोनिका बसली होती.

अमितचा मोबाईल वाजला, त्यानं बघीतलं, फोन विक्रमचा होता.

“काही विशेष खबर" विक्रम बोलला

“आहे बऱ्याच, तु येतोय इकडे"?

“हो म्हणूनच तुला फोन केलाय, उठलेत का सगळे"?

“हो"

“ठिक आहे अर्ध्या तासात पोहोचतोय मी तिथे"

“ओके"

अमितनं भरारीच्या ऑफिसमध्ये फोन लावला

फोन राजानं उचलला

“राजा" अमित बोलला

“यस सर"

“जुनोना रोडवर, मेन रस्त्याच्या साईडला शेताकडे जाणारा एक कच्चा रस्ता आहे, त्याठिकाणी असलेल्या फार्म हाऊसवर ताबडतोब निघून ये"

“यस सर"

“येताना भररीचा आजचा अंक घेवून ये"

“यस सर, लगेच येतो"

00000

अमित आणि तनया दोघेही हॉलमध्ये बसले, चहा आणि नाश्त्याची‍ व्यवस्था होती... नाश्ता करुन अमित, गुलशन जवळ गेला व बोलला "मला मोनिका मॅडमला काही प्रश्न विचारायचे आहेत"

“ओके..विचारा"

“मॅम मला तुम्हाला काही विचारायचं आहे"

“विचारा" मोनिका बोलली

“इथे नाही.. जरा एकटयात"

दोघेही एका कोपऱ्यात आले, आणि चेअरवर आमोरासामोर बसले

अमित बोलला "रात्री काय झालं ते तुम्हाला समजलं असेलच"

“होय.. गुलशन बोलले मला"

“तुम्हाला काय वाटते, कुणी केलं असेल हे सगळं"

ती जरा वेळ गप्प झाली व बोलली "एक गोष्ट आहे जी मला माहित आहे, पण प्रॉमिस करा तुम्ही ती कुणाला सांगणार नाही, आणि सांगतिली तरी मी सांगितली आहे हे इतरांना नको कळायला"

“ठिक आहे आय प्रॉमिस .. तुमचं नाव मध्ये नाही येणार"

“साधारणत: रात्री दोनच्या सुमाराची घटना असेल गुलशन बेडरुमध्ये नव्हते.. मी बेडरुमच्या बाहेर आले डिजे सुरु होता, काही जन ऍन्जॉय करत होते, अचानक मला सोनियाच्या टेंटमध्ये झटापट होत असल्याचा संशय आला, मी टेंटजवळ गेले, बघते तर माझे दिर प्रविण भाऊजी सोनियावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत होते, मी लगेच आत गेले आणि त्यांना तिथून खेचून बाहेर काढलं. प्रविण भाऊजी खूप प्यालेले होते, ते मला आणि सोनियाला शिव्या देतच तिथून बाहेर पडले.. आणि सोनियाला बोलले की ते तिला सोडणार नाही"

“ही गोष्ट तुमच्या‍ व्यतिरिक्त कुणाला माहित आहे"?

“नाही"

“म्हणजे त्यानंतर चिडलेला प्रविण, गुलशनच्या कारजवळ गेला, कारमधून पिस्तोल काढलं, व परत सोनियाच्या टेंटमध्ये आला, आणि मग तिला गोळी झाडून मारुन टाकलं" अमित बोलला

“may be... असं झालं असेल कदाचीत" मोनिका बोलली

“हे खरं आहे तर मग तुम्ही कां तुमच्या दिराला वाचविण्याचा प्रयत्न करताय"?

“मी कुठे त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतेय, जर त्यांनी खून केला असेल तर त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे, फक्त माझं नाव नको मध्ये यायला"

“नाव तर तुमचं मध्ये येईलच.. एवढया मोठया घटनेच्या तुम्ही एकमेव साक्षिदार आहात, जर तुम्ही हे पोलीसांना नाही सांगितलं तर, तुमचे पती गोत्यात घेवू शकतात, सद्यातरी संशय त्यांच्यावरच आहे, कारण खून त्यांच्या पिस्तोलने झाला आहे"

मेानिकाच्या चेह-यावर चिंता दिसली

“पुढे काय झालं" अमित बोलला

"त्यानंतर सोनियाला रिलॅक्स करुन, मी माझ्या बेडरुममध्ये आले, माझ्या पाठोपाठ जरावेळानं गुलशन ही आले, त्यांनी मला एक ड्रिंक दिलं, ते मी प्याले, आणि मग मला माहित नाही, मी झोपले ते सकाळी उठले"

“तुमच्या नवऱ्याचा वाढदिवस असुनही तुम्ही झोपलात"?

“खरं तर मला झोपायचं नव्हतं, पार्टी एन्जॉय करायची होती, पण माहित नाही कशी झोप लागली ते, दिवसभराचा थकवा होता, त्यामुळे असेल कदाचीत"

“जेव्हा प्रियंकानं, सोनियाचं प्रेत बघीतलं त्यावेळी ती जोरात किंचाळली, तुम्हाला नाही एैकू आली किंकाळी"?

“नाही ना, ऐरव्ही मी जरा काही चाहुल लागली की लगेच उठते, पण काल माहित नाही कशी झोप लागली ते"

“तुमची बेडरुम कुठे आहे मला बघायची आहे"

“चला"

अमित‍ आणि मोनिका दोघेही फार्महाऊसच्या बेडरुममध्ये आले.

तिथे टेबलवर एक ग्लास ठेवलेला होता, कदाचीत तो मोनिकाच्या ड्रिंक्सचा ग्लास होता, अमितनं मोनिकाच्या नकळत रुमालानं तो ग्लास उचचला आणि त्याचा वास घेतला. ग्लास परत तसाच ठेवून दिला.

जरावेळ त्यानं बेडरुमचं निरीक्षण केलं आणि मग ते दोघेही बाहेर आले.

0000

अमितनं बघीतलं प्रियंका चावला एका कोपऱ्यात चेअरवर एकटीच बसली होती, अमित तिच्याजवळ गेला व बोलला "हाय"

तिनं त्याच्याकडे बघीतल व बोलली "अजून काही विचारायचं बाकी आहे"

“होय.. मला कळलयं की तुम्ही काल सोनियासोबत काय बोलत होते.. आणि सोनिया कां चिडलेली होती"

“काय कळलयं" ती जरा घाबरलीच

“हेच.. की तुमच्या मिस्टरांनी सोनियाच्या अब्रुवर हात टाकला .. मोनिका मध्ये आली आणि तुमच्या मिस्टरांनी‍ सोनियाला सोडणार नाही अशी धमकीही दिली"

प्रियंका गप्प

“खरं आहे ना हे"

“हो खरं आहे... पण प्लीज कुणाला सांगू नका.. उगाच माझ्या मिस्टरांची बदनामी नको"

“सोनिया काय बोलली होती तुमच्याजवळ"

“ती चिडलेली होती माझ्या मिस्टरांवर त्यांना शिव्या घालत होती.. मीच मग माझ्या नवऱ्याच्या वतीने तिला सॉरी बोलली व या गोष्टीचा इश्यू करु नको ही विनंती केली"

“आणि ती एैकली"

“खूप विनवणी केली तेव्हा एैकली "

“मग याचा अर्थ असाच निघतो की चिडलेल्या प्रविण चावलानं कारच्या डॅशबोर्ड मधून रिव्हॉल्वर काढलं आणि सोनियाला शूट केलं"

“नाही माझे पती असे नाही करु शकत"

“तर मग तुम्ही केलं असेल.. सोनिया तुमच्या नवऱ्याची बदनामी करेल .. आणि नंतर इथले गेस्ट काय म्हणतील या भितीने तुम्हीच सोनियाला मारलं असेल तर"

प्रियंकानं घाबरुन अमितकडे बघीतलं... तिच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसत होती.

00000

विक्रम फार्महाऊसवर पोहोचला, आणि अमित जवळ आला. अमितनं त्याला आतापर्यंतच सगळं सांगितलं, अमित परत विक्रमसोबत मोनिकाच्या बेडरुममध्ये आला व बोलला "मला वाटते हाच ग्लास आहे तो ज्यामध्ये मोनिका ड्रिन्क्स प्याली, यात खरचं झोपेच्या गोळया मिसळवल्या होत्या की नाही ते बघावं लागेल आपल्याला.

विक्रमनं तो ग्लास रुमालानं उचलला आणि एका पाऊचमध्ये ठेवला व बाहेर येवून हवालदाराला देत बोलला "याला लेबारटीत टेस्ट करायला पाठवायची व्यवस्था कर"

“ओ के सर" म्हणत हवालदार तिथून निघून गेला

अमित बोलला “विक्रम.. प्रेमनं आपल्या बयानमध्ये सांगितलय की डॉक्टर चक्रधर रात्री सोनियाच्या टेंटमध्ये गेले होते व त्यांनी तिच्याशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सोनियानं त्यांना तिथून बाहेर हाकलून लावलं आणि जातांना ते सोनियाला धमकी देत बोलले की तुला बघून घेईल"

“तु याबाबतीत विचारलं डॉक्टर चक्रधरांना"

“नाही... त्यांना तु विचारलं तर बरं पडेल"

“ठिक आहे.. मी विचारतो त्यांना"

“पोस्ट मार्टम रिपोर्ट आली"?

“नाही अजून 10.00 वाजेपर्यत येईल, देवयानी इथे येणार आहे तेव्हा ती रिपोर्टबद्दल सांगेलच, अमित मला वाटते आपल्याला गुलशन चावलाच्या गाडीची तलाशी व फिंगरप्रिंट घ्यावे लागतील"

“यस विक्रम युवर राईट, आणि प्रविण चावला चं बयानं, मोनिकाच्या सांगण्याप्रमाणे जर त्यानं सोनियावर बळजबरी केली असेल तर, प्रविण चावला सर्वात मोठा सस्पेक्ट आहे"

“युवर राईट अमित"

दोघे फार्महाऊसच्या पार्कीगमध्ये उभी असलेल्या पांढऱ्यां रंगाची मारुती डिझायर जवळ आले, त्यांनी गुलशन चावलाला बोलावून घेतलं व गाडीचं गेट उघडायला सांगितलं, हातात हॅण्डग्लोज घालून विक्रमनं कार मधला डॅश बोर्ड उघडला, डॅश बोर्डमध्ये रिव्हॉल्वर नव्हती. विक्रमनं फिंगरप्रिंट एक्सपर्टला फोन करुन घटनास्थळी बोलावून घेतलं.

00000

अमित आणि विक्रम दोघेही प्रविण चावला जवळ आले, दोघेही त्याला घेवून एकांतात बसले विक्रम बोलला "काल पार्टीत किती दारु प्यालात तुम्ही"

“त्याचा इथे काय संबध"

“संबंध आहे.. म्हणूनच विचारतोय"

प्रविण गप्प

“सांगताय ना" विक्रम बोलला

“माहित नाही किती प्यालो पण दिड खंब्याच्या वर झाली असेल"

विक्रम त्याच्याकडे आश्चर्याने बघत बोलला "दिड खंबा... होश मध्ये होते कां तुम्ही"

“हो.. “

“मग काल रात्री तुम्ही काय काय केलं ते ही आठवत असेल"

“हो नक्की विचारा"

“तुम्ही सोनियाच्या टेंटमध्ये कशाला गेला होता" विक्रमचा प्रश्न

“मी कुठे तिच्या टेंट मध्ये गेलो होतो"

“मिस्टर प्रविण चावला, रात्री दोनच्या सुमारास तुम्ही सोनियाच्या टेंटमध्ये गेलेला होता, सोनीयावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला"

“खोटं आहे हे" त्याला आता घाम फुटला होता

“आमच्याकडे पुरावा आहे, त्यानंतर तुम्ही गुलशनच्या कारमधून पिस्तोल काढली व परत सोनियाच्या टेंटमध्ये गेलात आणि मग तिचा खून केला" विक्रम बोलला

“नाही खोटं आहे .. मी असं काहीही केलेलं नाही"

“रात्री तुम्ही दिड खंबा दारु ढोसली होती, मग तुम्ही हे सगळं केल नाही कशावरुन" अमित बोलला

प्रविण चावला गप्प

“मिस्टर प्रविण... तुमची वहिनी मोनिका हिनं तुम्हाला.. सोनियाच्या टेंटमध्ये रंगेहात पकडलं, आणि त्यानंतर तुम्ही तिथून त्यांना शिव्या देत बाहेर पडलात आणि सोनियाला धमकी पण दिली की "तुला सेाडणार नाही" विक्रम बोलला

प्रविण चावला घाबरला, त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते....

विक्रम पुढे बोलला "सॉरी.. आम्हाला सोनियाच्या खुनासाठी तुम्हाला अटक करावी लागेल मिस्टर प्रविण" विक्रम बोलला

प्रविणच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.

00000

जरावेळानं फिंगरप्रिंट एक्सपर्ट आले आणि त्यांनी कारच्या डॅशबोर्डवरील, व स्टेअरिंगवरील बोटाचे ठसे घेतले

अमित आणि विक्रम, सोनियाच्या टेंटमध्ये आले व काही पुरावा मिळतो कां ते पहायला लागले, इतक्यात अमितचं लक्ष टेंटच्या मागच्या साईडच्या कापडावर गेलं, तो फाडलेल्या अवस्थेत होता अमित बोलला

"विक्रम.. टेंटचा मागचा भाग फाडण्यांत आलेला आहे, याचा अर्थ कुणीतरी टैंटच्या पाठीमागून टेंटमध्ये शिरलं असावं खून करण्यासाठी"

“शक्य आहे, किंवा असही झालं असेलं, खून करणारा टेंटच्या एंटरन्स मधून आत शिरला आणि खून केल्यानंतर कुणीतरी टेंटच्या दिशेनं येत असल्याची त्याला चाहूल लागली आणि त्यानं लगेच टेंटचा मागचा भाग फाडला आणि तिथून पसार झाला" विक्रम बोलला

“दम है इस स्टोरी मे" अमित बोलला

अमित टेंटच्या फाटलेल्या भागाचं निरीक्षण करु लागला. निरीक्षण करतांना तो विक्रमला बोलला

“विक्रम... कपडा हा घाईमध्ये कापण्यांत आलेला नाही, तो खून्यानं आधीत कापून ठेवलेला‍ दिसतोय, अगदी पध्दतशीर धारदार चाकूने किंवा कैचीने कापण्यांत आलेला आहे"

“आय सी"

दोघांनी टेंटची तलाशी घेतली पण तिथे कैची किंवा चाकू सापडला नाही.

विक्रमनं तिथे असलेली सोनियाची पर्स ताब्यात घेतली, पर्स मध्ये मेकअपचं सामान, एक चाबी होती, ती कदाचीत तिच्या फ्लॅटची चाबी असावी.. बाकी काही सामान मिळालं नाही

अमित बोलला "विक्रम.. सोनिया जगतापचा मोबाईल कुठे आहे"

“तो तर नाही इथे...”

“डेड बॉडी सोबत होता" ?

“नाही डेडबॉडी सोबत मोबाईल नव्हता"

दोघांनी तिथे मोबाईल शोधला एका ठिकाणी मोबाईल तुटलेल्या अवस्थेत सापडला

दोघेही टेटच्या बाहेर आले..

00000

विक्रमनं तो मोबाईल एका हवालदाराकडे दिला व बोलला "याला रिपेअर करुन घे"

“यस सर" हवालदार बोलला

अमित आणि विक्रम, डॉक्टर चक्रधर जवळ आले

“हॅलो डॉक्टर" विक्रम बोलला

“हाय"

“मला आपणाला काही विचारायचं आहे"

“”बर झालं तुम्ही आलात मलाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे"

“काय?

“रात्री मी गुलशन चावला ला सोनियाच्या टेंटमधून लगबगीनं घाबरत घाबरत बाहेर येतांना बघीतलं" डॉक्टर चक्रधर बोलले

अमित आणि विक्रमनं एकमेकांकडे बघीतलं

“किती वाजता" विक्रम बोलला

“साधारणत अडीच वाजले असतील ,म्हणजे प्रियंका चावला ओरडल्या त्याच्या दहा मिनीटे आधी"

“क्या बात है, बडे पते की बात बतायी डॉक्टर साब" अमित बोलला

“माय प्लेझर" डॉक्टर हसत बोलेले

“आता हे पण सांगून टाका की तुम्ही रात्री सोनीयाच्या टेंटमध्ये कशाला गेला होता" विक्रम बोलला

“मी... मी कधी गेलो त्यांच्या टेंटमध्ये"

“चक्रधर.... जसं तुम्ही गुलशन चावला ला सोनीयाच्या टेंटमधून बाहेर निघतांना बघीतलं तसंच तुम्हालाही सोनियाच्या टेंटमध्ये सोनियासोबत फ्लर्ट करतांना कुणीतरी बघीतलं" विक्रम बोलला

“कुणी बघीतलं" डॉक्टरांचा प्रश्न

“ते महत्वाचं नाही.. तुम्ही सोनियाला, तुला बघून घेईल अशी धमकी ही दिली होती" अमित बोलला

डॉक्टर गप्प ते विक्रमकडे व अमितकडे बघायला लागले व नंतर खाली बघत बोलले

"खरं आहे हे, काल रात्री जरा जास्त पिण्यांत आली त्यामुळे हे सगळं घडलं असेल, पण नंतर मला माझी चूक कळली व मी तिला माफी मागायचं ठरवलं होतं, इनफॅक्ट आज सकाळी मी तिला झाल्या प्रकाराबद्दल माफीही मागणार होतो, पण तशी वेळच आली नाही"

“तुम्ही शहराचे प्रसिध्द व्यक्ती आहात, सोनियानं ही गोष्‍ट इतर कुणाला सांगितली तर तुमची बदनामी होईल या हेतूने तुम्हीच तिला मारलं असेल तर" अमित बोलला

“तुमची शंका बरोबर आहे, पण असं काही झालं नाही, मी कधी इतकी पीत नाही, काल जरा जास्त प्यालो .. आणि शेवटी मी पण मानूस आहे सोनिया सारख्या सुंदर तरुणीला बघून माझ्या मनात तसले विचार येणं सहाजीक आहे.. पण Believe me.. मी असलं काही केलं नाही" चक्रधर एकाच श्वासात बोलून गेले.

“ओके मिस्टर चक्रधर मी तुमच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो, तरीही एक जबाबदार शहरी या नात्याने तुम्हाला जर या खूनाबद्दल आणखी काही माहित असेल किंवा काहीही माहित होईल तर तुम्ही ते पोलींसांपासून लपवणार नाही" विक्रम बोलला

“माय प्लेझर ऑफिसर, अस काहीही असलं तर मी तुम्हाला नक्की सांगणार"

00000

इतक्यात त्या ठिकाणी राजा आणि राणी आले, पोलीसांनी त्यांना अडवलं, विक्रमनं त्यांना आत घेतलं, त्याच्याकडील भरारीच्या अंकाची कॉपी अमितनं घेतली त्यात सोनिया जगतापची खूनाची बातमी छापलेली होती, रात्री ती बातमी अमितनं मोबाईलवर भरारीच्या ऑफिसमध्ये सेंड केली होती. आतापर्यंत घडलेली सर्व बातमी अमितनं राजाला सांगितली.

इतक्यात देवयानी गुप्तानं तिथं प्रवेश केला.. विक्रमनं‍ आतापर्यंत घडलेलं सगळं देवयानीला सांगितलं.

“पोस्टमार्टम की रिपोर्ट आ गयी मॅम" अमित बोलला

“हॉ.. सोनिया का कत्ल रात को सव्वा दो से ढाई बजेके बिच मे हुआ, कत्ल रिव्हॉल्वर की गोली लगनेसे हुआ है, लेकीन रिव्हॉल्वर पर किसीके उंगलीयोके निशान नही थे, निशान मिटाये गये है"

“उसके साथ‍ बलात्कार हुआ है? विक्रम बोलला

“नही.. लेकीन एक चौकानेबाली बात सामने आयी है, सोनिया शादीशुदा नही थी फिर भी उसमे पेट मे गर्भ था, वो प्रेगनेंट थी" देवयानी बोलली

“यानी की सोनीया शादीसे पहलेही अपनी पवित्रता खो चूकी थी" विक्रम बोलला

“यस" देवयानी बोलली

“राज कदम ने कुछ बताया" विक्रम बोलला

“वो बोल रहा है की कत्ल उसने नही किया"

“मुझे लगता है मॅडम. हमारे पास गुलशन और प्रविण चावला को गिरफ्तार करने के लिए काफी सबूत है" विक्रम बोलला

“जैसे"?

“पहले गुलशन को लेते है... खून गुलशन की रिवॉल्वर से हुआ है, अभी आपने बताया की सोनिया प्रेगनेंट थी, और सोनिया गुलशनकी दोस्त थी, इस पार्टीमे गुलशनेही उसे बुलाया था, हो सकता है सोनिया ने उसे बताया हो की वो उसमे बच्चे की माँ बनने वाली है, गुलशन घबरा गया, और उसने ही सोनिया का मर्डर किया, अभी थोडी देर पहले डॉक्टर चक्रधर ने बताया की प्रियंका चावला के चिल्लानेसे दस मिनट पहले उन्होने गुलशन चावला को सोनिया के टेंटसे जल्दबाजीमे घबराते हुए बाहर निकलते देखा था"

“स्टोरी तो स्ट्रांग है" देवयानी बोलली "दुसरी स्टोरी बताओ"

“अब आते है प्रविण चावला पर, प्रविण ने सोनिया की अस्मत पर हात डाला था, एैसा मोनिकाने अपने बयान मे बताया, जबकी मोनिका बिच मे आयी और प्रविण के इरादे पर पानी फिर गया, उसने सोनिया को धमकी भी दी थी की वो उसे नही छोडेगा, वो नशेमे था... उसने डॅश बोर्ड मे से रिव्हॉल्वर निकाली और सोनिया मो शूट किया.. घुस्से मे उसका मोबाईल तोड दिया"

“ये भी स्टोरी स्ट्रांग है" तो क्या दोनो को हिरासत मे लिया जाय" देवयानी बोली

“फिलहाल तो सबूत दोनो के खिलाफ है" विक्रम बोलला

“आप क्या कहते हो अमित जासूस" देवयानी हसत बोलली

“मै विक्रम की बात से सहमत हू मॅम" अमित हसत बोलला

“उससे पहले जरा मै गुलशनसे थोडी पुछताछ कर लेता हू" विक्रम बोलला

“ठिक है..” देवयानी बोलली

विक्रम आणि‍ अमित परत गुलशन चावला जवळ आले

तो सूतकी चेहरा करुन बसला होता

“आता मला सांगा, तुम्ही सोनिया चा खून कां केलात" विक्रम बोलला

“मी कुठे खून केलाय तिचा" गुलशन चावला चक्रावला

“पोस्ट मार्टमची रिपोर्ट आली आहे, त्यात सोनियाच्या खुनाची वेळ रात्री 2.15ते 2.30 च्या दरम्यान आहे"

“मग त्याच्याशी माझा काय संबंध" गुलशन गडबडला

“रात्री साधारणत: 2.30 ला तुम्ही सोनीयाच्या टेंटमधून घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पडला, आणि त्यानंतर दहा मिनीटांनी प्रियंका मॅडम ओरडल्या" विक्रम बोलला

गुलशन गप्प, त्याला घाम सुटला होता

“तुम्हाला कसं कळलं हे.... आणि मी तिचा खून नाही केला, मी कशाला खून करेल तिचा" तो घाबरल्या अवस्थेत बोलला

“तुम्ही केलेलं पाप लपविण्यासाठी" अमित बोलला

“क...सलं पाप" ती अडखडत बोलत होता

“ती प्रेगनेंट होती" अमित बोलला

“काय? मला नाही माहित"

“खोटं बोलू नका... मला तर वाटते कालच तीनं तुम्हाला ही गोष्ट सांगितली.. आणि स्वत:चं पाप लवविण्यासाठी तुम्ही तिला संपवलं" अमित बोलला

“खोटं आहे हे.. मी असं काही केलं नाही"

“डी.एन.ए. रिपोर्ट वरुन कळेलच तिच्या पोटातल्या बाळाचा बाप कोण होता ते" विक्रम बोलला

गुलशन घाबरला व बोलला "प्लीज इश्यू करु नका... हो हे खरं आहे .. तिनं मला सांगितलं होतं की ती प्रेगनेंट आहे... पण मी तिला नाही मारलं"

“मग रात्री तिच्या टेंटमध्ये काय करत होता" विक्रमचा प्रश्न

“बराच वेळ मी फार्म हाऊसच्या बेडरुममध्ये तिची वाट बघत होतो, पण ती नाही आली म्हणून मग मी तिच्या टेंटमध्ये गेलो, बघतो तर ती मरुन पडली होती, त्यामुळे मी घाबरतच लगेच मागे फिरलो"

“कशावरुन हे खरं आहे" अमित बोलला

“मी खरं सांगतोय मी तिचा खून नाही केलाय" गुलशन रडकुंडीला येत बोलला

“सॉरी मिस्टर गुलशन सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहे, त्यामुळे तुम्हाला अरेस्‍ट करावच लागेल" विक्रम बोलला

गुलशनच्या चेह-यावर बारा वाजले होते.

अमितनं त्याला एका कोपऱ्यात घेतलं व बोलला "गुलशन भाई मला खरं खर सांगा तुम्ही खून केलाय?

“अमित.. विश्वास ठेव माझ्यावर मी प्रेमची शपथ घेवून सांगतो, मी खून नाही केला"

“ओके गुलशन भाई.. मला विश्वास झालाय की तुम्ही खून नाही केला.. आय प्रॉमिस यू.. मी तुम्हाला यातून बाहेर काढेल"

गुलशननं त्याच्याकडे मोठया आशेनं बघीतलं.

00000

गुलशन घाबरलेल्या अवस्थेत मोनिका जवळ आला व बोलला "मोनिका.. मी खून नाही केलाय तिचा"

“माहित आहे मला, तुम्ही कुणाचा खून नाही करु शकत..”

“सगळे पुरावे माझ्या विरोधात आहेत"

“तुम्ही काळजी करु नका, होईल सगळं ठिक, आपण चांगल्यात चांगला वकील करु, मला एक कळत नाही की प्रविण भाऊजीच्या विरोधातही पुरावे आहेत मग त्याला का नाही अरेस्ट केलं आतापर्यंत"

“मला काय माहित"

“मी विचारतेच पोलीसांना"

मोनिका लगबगीने इन्सपेक्टर विक्रमजवळ आली, पाठोपाठ गुलशनही आला

मोनिका वोलली

"प्रविण भाऊजीच्या विरोधात सगळे पुरावे असतांना तुम्ही माझ्या मिस्टरांना कां अटक करताय"

“पुरावे दोघांच्याही विरोधात आहेत" विक्रम बोलला

“माझ्या मिस्टरांविरुध्द काय पुरावे आहेत"

“हे बघा सगळयाच गोष्टी आताच सांगायच्या नाहीत, काही गोष्टी ऐकून तुम्हाला धक्का बसेल,‍ आणि सगळया गोष्टी सांगितल्यातर तुमच्या मिस्टरांनाही नाही आवडणार ते" विक्रम, गुलशन चावला कडे बघत बोलला

गुलशननं खाली मान घातली

“काय चाललय ना मला काहीच कळतं नाही" मोनिका वैतागत बोलली

देवयानीनं, सोनियाच्या खुनासाठी प्रविण चावला आणि गुलशन चावलाला अटक केली, व बोलली "यहॉ मौजूद सभी लोगोसे मै ये बताना अपना फर्ज समजती हू, इन दोनोको गिरफ्तार करने की वजह है शक, असली कातील जबतक नही मिल जाता, तब तक आप सभी लोग इस शहर से बाहर नही जा सकते, यहॉ से आप लोक अपने अपने घर जा सकते है, लेकीन उससे पहले मुझे आप सब लोग अपने घर का पत्ता ओर फोन नंबर्स देंगे... यादव " देवयानीनं हवालदाराला आवाज दिला

“यस मॅडम"

“यहा मौजूद सभी लागोके पते और फोन नंबर्स ले लो, याद रखो कोई छुटने ना पाए.. पत्ता और फोन नंबर लेकरही सबको छोडना है यहाँ से"

“यस मॅडम"

अमितनं फार्म हाऊसच्या आवारातले फोटो काढले, टेंटच्या आजुबाजुचे फोटो काढले.आणि फार्म हाऊसवर पार्टीत असलेल्या प्रत्येकाचे एक एक फोटो काढले.

फार्म हाऊसमधून सगळे गेस्ट आपआपल्या घरी निघाले, मोनिका, प्रियंका, प्रेम, अविका यांनीही आवरायला घेतलं, सगळे गेल्यानंतर फॉर्म हाऊस सील करण्यात येणार होतं व दोन पोलीसांचा पहारा त्याठिकाणी ठेवण्यांत येणार होता.

00000

अमितनं तनयाला घरी सोडलं आणि भरारीच्या ऑफिसमध्ये आला, कॅबिनमध्ये बसून त्यानं रिपोर्ट तयार केला व विनाला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं

विना आत येत बोलली "यस सर"

“विना.. तुला ताडालीला जायचंय, गुलशन चावलाचा ड्रायव्हर पवनकुमार ताडालीला गेलाय, तो तिथं राहतो असं कळलयं, त्याचं बयान आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे"

“ओके सर.. मी लगेच निघते"

“आता जरावेळात लंच टाईम आहे, लंच करुन निघ"

“यस सर"

विना निघून गेली व अमितनं विक्रमला फोन लावला

“हॅलो अमित बोल" विक्रमचा स्वर

“विक्रम.. त्या राज कदमला सोडलं की तो अद्यापही कस्टडीत आहे"

“नाही सोडलं अद्याप त्याला.. पण मॅडम सोडेल त्याला, तो घाबरुन तिथून पळाला असेल असचं वाटतं"

“मला भेटायचं आहे त्याला, मी येतो जरावेळात"

“ठिक आहे .. ये"

00000

अमित कॅबिनमधून बाहेर आला, त्याला तनया ऑफिसमध्ये येतांना दिसली. खूप सुंदर दिसत होती,

तनया आपल्या टेबलजवळ आली पर्स टेबलवर ठेवली व व्हिलचेअरवर बसली.

अमित तिच्याजवळ आला व बोलला "ही काय वेळ आहे ऑफिसला यायची, किती वाजले बघ, एक वाजायला आला आहे"

“हो.. तुम्ही किती वाजता आलात सर"? तनया बोलली

“तुला घरी सोडलं आणि लगेच आलो, जेवलोही नाही खूप भूक लागली आहे"

“मी माझ्या सरांसोबत फिरत होते, म्हणून वेळ झाला सर" तनया हसत बोलली

“हो.. का.. सरांसोबत फिरता, काम करा ऑफिसची"

“आता यापुढे नाही फिरणार सर"

“एैसा जुल्म मत करो यार.. मै मर जाऊंगा" अमित हसत बोलला

तनया हसली व बोलली "काय झालं.. घाबरले इतक्यात.. डबा आणलाय मी तुमचा, चला जेवूयात मलाही भुक लागली आहे"

“अगं घरुनच जेवून कां नाही आली" अमित बोलला

“कसं जेवणार, आपण दोघं रोज एकत्र जेवतो ना सर"

“गुणाची माझी राणी... किती करतेय माझ्यासाठी"

“करना पडता है सर.. दिल जो दे दिया है" तनया हसत बोलली

00000

दुपारी 2.30 वाजता

अमित यावेळी पोलीस स्टेशनमध्ये राज कदम समोर बसला होता. विक्रमही त्याच्या सोबत होता.

राज कदम एक बावीस ते चोविस वर्ष वयाचा युवक होता, गोरा आणि दिसायला स्मार्ट.

अमित बोलला "राज कदम हेच नांव आहे तुझं"

“हो साहेब नाव हेच आहे"

“किती दिवसांपासून ओळखतो सोनियाला"

"एक वर्ष झाले"

“तुमचं प्रेम होतं एकमेकांवर"

“नाही.. ती मला मित्र समजायची"

“आणि तू"?

“मी करायचो प्रेम तिच्यावर पण तीची स्वप्न मोठी होती"

“तुला माहित होतं तिचं गुलशन चावला सोबत चक्कर सुरु आहे ते"

“नाही"

“एवढयात तिच्या बोलण्यातून तुला काही वेगळं जाणवलं कधी"

“हो साहेब,इतक्यात ती खूप खुष होती ती बोलली होती की आता मस्त ऐष आरामात जगायचं, मी बोललो पण तिला की लॉटरी लागणार आहे का? तर ती बोलली की लॉटरीच समज, एक मोठं घबाड हाती लागणार आहे"

अमितनं विक्रमकडे बघीतलं

विक्रम बोलला "तु विचारलं नाही तिला कुठलं घबाड ते"

“विचारलं होतं पण तिनं नाही सांगितलं"

“कुठे रहात होती ती, तिचा पत्ता सांग" अमित बोलला

“नगिनाबाग, दत्त मंदिराच्या पाठीमागे, किरायाच्या रुममध्ये रहात होती"

“तिच्यासेाबत कोण रहात होतं आणखी" अमितचा प्रश्न

“एकटीच रहात होती.. तिचे आई वडील गडचिरोलीला राहतात"

“परत काही महत्वाचं तुला महित असेल तर सांग"

“नाही साहेब.. पण मला कां पकडलं आहे, मी काही नाही केलं"

“माहित आहे तु काही नाही केलं, पण खरा खूनी सापडल्याशिवाय तुझी सुटका नाही" विक्रम बोलला

“सोनियाचा मोबाईल तुटलेल्या अवस्थेत सापडला, तो रिपेअरला दिला आहे, तुझ्याकडे सोनियाचा नंबर आहे"? अमित बोलला

“आहे" राज बोलला

“सांग"

“नंबर माझ्या मोबाईलमध्ये आहे आणि मोबाईल पोलींसांकडे आहे"

“मोबाईल मिळेल तुला.. पण सोनीयाचा नंबर तुला पाठ नसेल अस तर होणारच नाही" विक्रम बोलला

राज गप्प

“सांगतोय ना" विक्रम बोलला

राज कदम नं सोनियाचा नंबर सांगितला, विकमनं तो कागदावर लिहून घेतला.

00000

विक्रम आणि अमित दोघेही बोलत बोलत तिथून बाहेर निघाले.

अमित बोलला "कुठलं घबाड लागणार होतं तिच्या हाती"

“तेच.. ती गुलशनच्या मुलाची आई होणार आहे हे सांगुन गुलशनला ब्लॅकमेल केलं असतं. त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला असता"

“बहुतेक.. तु म्हणतो ते बरोबर असेल"

“अमित .. सोनियाच्या रुमची तलाशी घ्यावी लागेल.. तिच्या पर्स मध्ये जी चाबी होती ती तिच्या रुमची असु शकते. तिच्या रुममध्ये काहीतरी पुरावा नक्कीच मिळेल"

“युवर राईट.. मी पण येतो तुझ्यासोबत"

“ठिक आहे.. मी देवयानीला विचारतो आ1णि चाबी ताब्यात घेतो, मग निघुया,... सावंत" विक्रमनं आवाज दिला

हवालदार सावंत त्याच्या पुढयात हजर झाला विक्रमनं सोनियाचा मोबाईल नंबर असेलला कागद त्याच्या हातात दिला व बोलला "या नंबरवरुन गेल्या तीन महिन्याची कॉल हिस्ट्री काढून घ्या ताबडतोब व मला दया"

“यस सर" कागद घेवून हवालदार तिथून निघाला.

00000

दुपारी 3.30 वाजता

यावेळी विक्रम आणि अमित नगीनाबाग मध्ये होते, सोनिया जगताप ची रुम त्यांनी शोधून काढली, पोलीसांना बघून तिच्या रुमबाहेर लोकांची गर्दी जमायला लागली. एका हवालदाराला रुमच्या बाहेर ठेवून ते रुममध्य‍े शिरले, रुम छोटी होती पण पॉश होती, एक LED ‍TV, फ्रिज, एक लॅपटॉप, छोटसं किचन

“नाईस रुम" अमित बोलला

अमितन लॅपटॉप सुरु केला.... पण तो पासवर्ड मागत होता, त्यामुळं त्यांन तो बंद केला. विक्रम आणि अमितनं रुम सर्च करण्यांस सुरुवात केली, सोनियाच्या ट्रंकमध्ये एक अलबम सापडला, त्यातील एका फोटोनं अमितचं लक्ष वेधून घेतलं, त्या फोटोचे दोन स्नॅप त्यानं आपल्या मोबाईलमध्ये काढले.

परत काही रुममध्ये महत्वाचं सापडलं नाही.

रुमला सील करुन दोघे‍ही तिथून निघाले.

विक्रम पोलीस स्टेशनला निघून गेला.

00000

दुपारी 4.15वाजता

अमित बाईकनं जयंत टॉकिजच्या पाठीमागे आला, तिथे चर्च च्या पाठीमागे असलेल्या "मेरी हाऊस" च्या दारात तो उभा होता, त्यानं डोअर बेल वाजवली दारात एक सुंदर 40-42 वर्षाची स्त्री उभी होती, अमितला बघताच ती बोलली "यस मिस्टर"

“माझं नावं अमित प्रधान, मी भरारी वृत्तपत्राचा चिफ रिपोर्टर आहे..”

“बोला"

“काल रात्री गुलशन चावलाच्या फार्म हाऊस वर सोनिया जगताप नावाच्या तरुणीचा खून झालाय, मला त्यासबंधात काही प्रश्न विचारायचे आहेत"

ती जरावेळ गप्प राहली.. व बोलली "गुलशन सोबत आता माझा काही संबंध नाही, आणि तसही मी त्या पार्टीमध्ये नव्हती"

“मान्य आहे... पण काल रात्री तुमच्या जाऊबाई प्रियंका सोबत तुमचं फोनवर बोलणं झालय हे कळलयं आम्हाला"

“फोनवर बोलणं झालं म्हणून काय झालं"

“मला गुलशनबद्दल काही माहिती हवी आहे, यात फायदा तुमचाच आहे... गुलशन चावलानं अद्याप मृत्यूपत्र बदललं नाही ..”

ती जरावेळ गप्प राहली व बोलली "कम इन"

अमितनं घरात प्रवेश केला.. समोरच मोठा मदर मेरीचा फोटो होता, टेबलवर कॅन्डल जळत होती,

मदर मेरी च्या फोटोकडे बघून अमितनं कपाळाला आणि छातीला हात लावून नमन केलं, मेरी नं त्याला बसायला सांगितलं व ती त्याच्या समोर बसली.

“आता सांगा माझा काय फायदा आहे"

“सोनियाच्या खुनाबद्दल गुलशन चावला पोलीसांच्या ताब्यात आहे, पण मला माहित आहे खून गुलशन चावलानं नाही केला, जर तुम्ही खरा खूनी पकडण्यांत माझी मदत केली तर मी गुलशनला सांगेल की तुम्ही मला मदत केली.. आणि मग..”

“कळलं, बोला" मेरी बोलली

“तुम्ही मराठी खूप छान बोलता, वाटत नाही ख्रिश्चन आहात"

“लहानपनापासून इथे राहते... त्यामुळे आता ही भाषा अंगवळणी पडलीय"

“नाईस.. तुमचं लग्न लव्ह मॅरेज होतं.. आणि त्यानंतर तुम्ही गुलशनला सोडण्याचं काही खास कारण"

“कारण सरळ आहे, गुलशन दुसऱ्या स्त्री च्या म्हणजे मोनिकाच्या मागे लागला होता"

“पण गुलशनं बोलतो तो की तुमचं दुसरीकडे कुठेतरी अफेअर होतं"

“खोटं बोलतोय तो, माझ्या चारीत्र्यावर असले आरोप करतांना लाज नाही वाटत त्याला? माझं कुठे दुसरीकडे अफेअर असतं तर मी इथे एकटी कां राहली असती" ती चिडत बोलली

“रिलॅक्स, तुमच्या बोलण्यात प्वाईंट आहे... तुमचा डिव्होर्स झालाय"?

“होय.. त्याशिवाय कां त्यानं दुसरं लग्न केलय"

“तुम्ही त्याला कां डिव्होर्स दिला मग"

“माझ्या खूप हातापाया पडत होता, मला बोलला की तुला जेवढे पैसे पाहिजे तेवढे देतो पण डिव्होर्स दे"

“मग"

“मग काय दिला मी डिव्होर्स त्याला बदल्यात त्यानं मला 5 कोटी रुपये दिले.. मला आता काही टेंशन नाही मी आरामात एकटी जगू शकते.. तसंही माझा मुलगा आहे माझ्या फेवर मध्ये"

“प्रेम.. खूप छान मुलगा आहे मी भेटलोय त्याला"

“माझा मुलगा आहेच छान, माझा खूप रिस्पेक्ट करतो तो"

“तुम्हाला काय वाटते, सोनियाचा खून केला असेल तुमच्या X नवऱ्यानं"

“मला नाही वाटतं.. तो आहे बाईलवेडा.. सुंदर मुलगी दिसली की लागला मागे.. पण तो खून करायला नाही धजणार कुणाचा, इतकं डेअरिंग नाही त्याच्याच"

“तुम्हाला माहित आहे.. सोनिया सोबत त्याचं अफेअर चालु होतं ते"

“काय? आता हे काय नवीनच.. मोनिका सारखी अतीसुंदर बायको असतांना तो सोनियाच्या मागे लागला होता..”?

“होय"

“ओह गॉड.. काय म्हणावं या मानसाला" मेरी कपाळावर हात मारत बोलली

“काल रात्री पार्टीमध्ये तुम्ही प्रियंकाला फोन केला होता"

“होय...”

“काय बोलणं झालं"

“काही विशेष नाही, मी प्रेम बद्दल चौकशी करण्यासाठी फोन केला होता"

“प्रियंका जेव्हा तुमच्याशी बोलत होती तेव्हा मोठयानं बोलत होती"

“तिचा आवाज मला येत नव्हता.. पार्टीतील DJ मुळे असेल कदाचीत, मीच तीला मोठयाने बोलण्यास सांगितल होतं"

“तुमचा दिर.. प्रविण चावला..त्याच्या बद्दल काय मत आहे तुमचं"

“ते चांगले आहेत, माझं त्यांच्याशी खूप चांगल जमायचं, फक्त एकच वाईट सवय आहे, दारु जास्त पितात"

“हो बरोबर आहे.. काल पार्टीत जरा जास्तच प्याले होते"

“मग काही गडबड तर नाही केली त्यांनी"?

“केलीय.. बरीच गडबड केली.. ते सुध्दा पोलीसांच्या ताब्यात आहेत"

“ओ गॉड... “

“तुम्हाला कार ड्रायव्हींग येते"

“होय.. माझी कार आहे स्वत:ची"

“खाली पार्कीगला पांढऱ्या रंगाची Swift desire आहे ती तुमची आहे"

"हो माझीच आहे"

आता एक महत्वाचा प्रश्न.. गुलशन चावलाच्या कारच्या डॅशबोर्ड मध्ये रिव्हॉल्वर आहे हे माहित होतं तुम्हाला"

“होय.. माहित होतं, त्यांनी मला बरेचदा ते रिव्हॉल्वर दाखवलं होतं, का बरं"

“खून त्याच रिव्हॉल्वर ने झालाय"

“अच्छा म्हणून गुलशन पोलीसांच्या ताब्यात आहे"

“तसचं काहीतरी, तुम्ही बघीतलं आहे सोनियाला"

“नाही.. तुमच्या तोंडून पहिल्यांदा नाव एैकतेय तिच.. खून सुंदर होती काय?

“होय तर .. सुंदर होती"

“तेव्हाच गुलशन तिच्या मागे लागला असेल"

“गुलशन आणि मोनिकाची भेट कशी झाली"?

“ते मला नाही माहित"

“तुम्हाला कसं‍ आणि कधी कळलं की त्याचं मोनिका सोबत अफेअर आहे"

“तासन तास मोबाईलवर तिच्याशी बोलत राहायचा, एक दिवस तो झोपल्यानंतर व्हॉटस्ॲप वर मॅसेज बघीतले दोघांचे आणि मला कळलं, मी त्याला त्याबाबत जाब विचारला.. पण तेव्हा तो ते टाळून गेला"

“मग.. तुम्ही भेटल्या होत्या मोनिकाला.. या प्रकरणाबद्दल"

“नाही... “

“मोनिकाला बघीतलं आहे तुम्ही"

“होय बघीतलं आहे.. खूप सुंदर आहे ती"

“ओके मॅडम.. तुम्ही खूप सहकार्य केलं.. परत काही महत्वाचं सागायचं असेल तर तुम्ही सांगू शकता"

“असं तर काही महत्वाचं नाही"

बोलता बोलता अमितच लक्ष शोकेसवर ठेवलेल्या फोटो फ्रेमवर गेलं, तिथे एका फ्रेममध्ये गुलशन चावलाचा फोटो होता, आणि दुसऱ्या फ्रेममध्ये प्रेमचा.

अमित बोलला" फोटो ठेवलाय अजूनही तुम्ही गुलशनचा"

“काय करु.. मी एकदाच प्रेम केलंय जीवनात" बोलतांना तिचा स्वर भारावला

“ओके गुड डे मॅडम.. थॅन्क यु"

अमित तिथून निघाला

00000

सायं 4.45 वाजता

अमित परत रामनगर पोलीस स्टेशनला आला.

PSI देवयानी गुप्ता आपल्या कॅबिनमध्ये बसली होती.. अमित तिच्या कॅबिन मध्ये डोकावत बोलला "मे आय कम इन मॅम"

“ओह.. मिस्टर अमित कम इन"

“कैसी है आप मॅम...”

“अच्छी हू... बैठीये"

“थॅन्क यू मॅम" अमित खुर्चीवर बसत बोलला

“सुनाओ...”

“प्रविण और गुलशन ने कुछ बताया मॅम"

“वो दोनो कहते है की खून उन्होने नही किया"

“मोनिका के बेडरुममध्ये जो ग्लास मिला था क्या उसमे निंद गोलीयों के अंश मिले है"

“हॉ.. और ग्लास पर मोनिका और गुलशन दोनोके उंगलीयोके निशान है"

“इसका मतलब गुलशनने मोनिका के ड्रिंक्समे निंद की गोलीया मिलायी थी, और वो ड्रिंक्स पीनेके बाद मोनिका सो गयी"

“हॉ... “

“और कार के स्टेअरिंगपर और डॅशबोर्ड पर किसके फिंगरप्रिंट है"

“गुलशन चावला और प्रविण चावला के फिंगरप्रिंट के अलावा और एक शख्स के फिंगरप्रिंट है...”

“वो शायद पवनकुमार के होंगे"

“हॉ हमने सबके फिंगरप्रिंट ले लिए है... सिर्फ पवनकुमार के बाकी है, पवनकुमारको ढुंडने पुलीस भेजी गयी है"

“इसका मतलब प्रविण चावला भी कार का इस्तमाल करता था"

“हॉ. ..मैने पुछा था प्रविण चावला से.. वो कार चलाता था गुलशनकी" देवयानी बोलली

“मॅम मुझे राज कदम से मिलना है"

“हॉ.. क्यू नही.. मै अरेंज करती हू"

देवयानींनं बेल वाजवली एक हवालदार आत आला, देवयानी बोलली "इनको राज कदम से मिला दो"

“यस मॅडम"

अमित उठला आणि जायला निघाला तोच देवयानी बोलली.

“और.... हा वापसी मे कॉफी पिकर जाना" देवयानी हसत बोलली

“जी मॅम" अमित हसत बोलला

देवयानी जरावेळ त्याच्या हसण्यात हरवली होती.

हवालदार त्याला राज कदम च्या लॉकअप रुम मध्ये सोडून गेला.

अमित त्याच्या समोर बसला व बोलला "सोनियाच्या लॅपटॉप चा पासवर्ड माहित आहे? आणि खरं सांग"

“नाही साहेब मला नाही माहित"

“नक्की"

“होय साहेब आईशप्पथ.. नाही माहित"

अमितनं मोबाईल मधला फोटो ओपन केला जो त्यानं सोनियाच्या ट्रन्कमधील अलबम मधून काढला होता, तो तिघांचा ग्रुप फोटो होता, त्यात दोन तरुणी आणि एक तरुण होता, त्यातली एक सोनिया होती, तो फोटो राज कदमला दाखवत‍ अमित बोलला "हा फोटो कधी बघीतला आहे तु"

“नाही... जुना फोटो दिसतोय, माझी तिची ओळख फक्त एक वर्षांपासूनच आहे, यात एक फोटो सोनियाचा आहे"

“बाकीचे दोघे कोण आहेत?” अमित बोलला

“नाही माहित... “

“कुणाला माहित असेल"?

“तिचे कुणी जुने मित्र मैत्रीणी असतील कॉलेजचे त्यांना माहित असू शकते"

“तुला माहित आहे असं कुणी तिच्या कालेजमधलं किंवा तिच्या जवळचं"

तो जरा वेळ विचार करायला लागला व नंतर बोलला

“एक मैत्रीण आहे तिच्या कॉलेजची तिला माहित असू शकते"

“कोण.. नावं काय तिचं..कुठे राहते"

“जनता कॉलेजच्या पाठीमागे प्रितम नावाचा बंगला आहे तिथं राहते, नाव संध्या देशमूख"

“तु भेटला आहे कधी तिला"

“हो एकदा मी आणि सोनिया सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा, संध्या तिथे भेटली, सोनियानं माझी ओळख करुन दिली होती तिच्याशी"

“व्हेरी गुड.. तुझी फेव्हरेट हिरोईन कोण आहे"

तो गडबडला व अमित कडे बघायला लागला

“सांग ना..फेव्हरेट हिरोईन"

“त्याचा इथे काय संबंध" राज गडबडत बोलला

“काही संबंध नाही, हे मी आपल्या पर्सनल माहितीसाठी विचारतोय"

राज जरा संशयाच्या नजरेनं अमितकडे बघायला लागला व बोलला "तमन्ना भाटीया"

"भगवान करे तु जल्दी से यहॉसे छुटे और तेरी शादी तमन्ना भाटीया से हो जाए"

त्याला आश्चर्यचकीत ठेवून अमित तिथून बाहेर आला.

परततांना तो गुलशन चावलाला भेटला व त्याचं सांत्वन केलं आणि परत देवयानीकडे आला.

देवयानी कडे कॉफी घेतली‍ आणि तिथून निघाला.

00000

सायं.5.20 वाजता

अमित जटपुरागेट वर असलेल्या त्याच्या भरारीच्या ऑफिसमध्ये आला. तनया कामात व्यस्त होती,

तो तनया जवळ आला व बोलला "हाय हनी... कामात आहेस काय?

“हो आहे कामात, बोला सर"

“जरा कॅबिनमध्ये ये ना माझ्या"

“आले"

अमित त्याच्या कबिनमध्ये शिरला, त्याच्या पाठोपाठ तनयाही आली.

ती समोर खुर्चीवर बसली अमित बोलला "किती काम करतेय.. जरा निवांत रहात जा कधीतरी, काय घेणार सांग चहा कॉफी"

“तुम्ही मागवणार ते पिणार सर"

“अरे यार कितीदा सांगितलं एकटयात सर नको ना म्हणू"

तनया हसली

“किती गोड हसतेस तनू... ये चल ना आज मस्‍त डिनर घेवूया मस्त कुठेतरी रात्री"

“काही खास"

“काही नाही असचं, बरेच दिवस झाले आपण रात्रीचं डिनर नाही घेतलं एकत्र"

“चालेल मला.. मी मम्माला सांगते फोन करुन"

“हायवे ला जावू या मस्त धाब्यावर"

“चालेल" तनया हसत बोलली

“विना आली परत?

“नाही अजून.. तुम्ही तिला ताडाली गावाला पाठवलयं ना"

“होय पवनकुमारचं बयाण घेण्यासाठी "

अमितनं रामसिंग ला कॉफी आणायला सांगितली व बोलला "काल यार सगळा रंग मे भंग झाला"

“हो ना.. झोपही झाली नाही... मला तर आज काम करता करताच डुलक्या येत होत्या" तनया बोलली

“तुझा लहान भाऊ चिंटू काय म्हणतो, बरेच दिवस झाले भेटलो नाही त्याला, 7th ला आहे ना ग आता "

“हो, मजेत आहे मस्त.. तुमची आठवण काढत असतो नेहमी, परवा म‍ला व्हिडीओ गेम घेवून मागीतला.. आता बसतो दिवसभर खेळतं"

“बरं आहे.. तु लहान भावाचे लाड पुरवते"

“खरं सांगू अमित.. मला खूप छान वाटतं त्याचे लाड पुरवायला...”

“आणि माझे...” अमित तिच्याकडे बघत बोलला

“तुमचे काय?

“माझे पण लाड पुरव ना कधीतरी..”

“तुम्ही काय लहान आहात काय लाड पुरवायला" ती हसत बोलली

“असं काही नसतं... लाड पुरवून घ्यायला का लहानच असलं पाहिजे"

“ठिक आहे करा हट्ट माझ्याजवळ .... मग पुरवते तुमचे पण लाड"

“अहं... लाड पुरवू नको, लाड कर"

“काहीतरीच काय" ती लाजत बोलली

“हाय.. मार डाला रे.. तेरी इस अदा ने.. क्या शरमाती हो यार"

“तुमचं आपलं काहीतरीच असतं" ती हसत बोलली

अमित काही बोलणार इतक्यात रामसिंग कॉफी घेवून आला व बोलला "सर विना आलीय"

“ठिक आहे तिच्यासाठी इथे कॉफी ठेव आणि आत पाठव तिला"

जरावेळात विना आली... आणि तनयाच्या बाजुला बसत बोलली "गुड इव्हीनिंग सर"

“गुड इव्हीनिंग विना" अमित बोलला

"हाय" ती तनया कडे smile देत बोलली

"हाय" तनया न smile दिल

“सर ताडाली ला जावून आले. पवनकुमार तिथे नाही,. तो दोन दिवसांपूर्वीच इथे आल्याचं कळलयं" विना बोलली

“काय?

“हो त्याच्या घरच्यांनीच सांगितलं.. साहेबांना बर्थ डे आहे असं सांगून तो परवाच घरुन इकडे निघून आल्याचं कळलं"

“मग तो तर कालच्या पार्टीत .....?? ओके, परत काही माहिती त्याच्याबद्दल"

“ताडालीला त्याचं स्वत:चं घर आहे.... त्याचे आई वडील, बायको, आणि दोन मुलं राहतात, गावाला शेती आहे त्याची"

"त्याचा फोटो मिळवलास"

“यस सर, मी पाठवते" विनानं पवनकुमार चा फोटो मोबाईलने सेंड केला

“ओके विना, वेलडन"

“थॅन्क यु सर"

00000

सायंकाळी 6.30 वाजता

अमितनं आपली बाईक जनता कॉलेजच्या पाठीमागे थांबवली, समोरच प्रितम बंगला होता, तनया बाईकहून खाली उतरली व बोलली "इकडे कुठे"?

“संध्या देशमूख ला भेटायचं आहे"

“सस्पेट आहे खूनाची"?

“नाही.. सोनीयाला ओळखत होती असं कळलयं"

“ओके.. चला"

“तनू... तु जा पुढे बंगल्यात, कदाचीत मला बघून ती बोलायला घाबरेल, मी येतो तुझ्या मागेच"

“ठिक आहे"

तनयानं प्रेसचं आयकार्ड गळयात घातलं आणि बंगल्यात प्रवेश केला.

बंगल्याच्या आवारात लॉनवर खुर्ची टाकून 23-24 वर्षाची सुंदर तरुणी बसली होती, तनया तिला बोलली "मे आय कम इन मॅम"

“यस" ती तरुणी बोलली

तनया आत गेली व तिला प्रेस कार्ड दाखवत बोलली "मी भरारी वृत्तपत्राच्या ऑफिसमध्ये कामाला आहे, मला संध्या देशमूखला भेटायचं आहे"

“मीच संध्या देशमूख आहे" ती तरुणी बोलली

“हाय...” तनया तिच्याशी हात मिळवत बोलली

“बैस ना" संध्या बोलली

“माझ्यासोबत माझा आणखी एक कलीग आहे.. आपली संमती असेल तर..."

“ठिक आहे.. बोलाव त्यांना"

तनयानं अमितला आवाज दिला आणि अमितनं बंगल्यात प्रवेश केला, अमित ला बघताच संध्या उभी झाली व बोलली "मिस्टर अमित प्रधान"

अमित जवळ येत बोलला "तुम्ही ओळखता मला"?

“हा काय प्रश्न आहे... या शहरात तुम्हाला कोण ओळखत नाही ते सांगा.. आता काही दिवसांपूर्वी तुम्ही अनुराधा मर्डर केस वर काम करीत होता.. आमच्या घरी भरारीच पेपर येतो.. नाईस टू मिट यू" ती हात पुढे करत बोलली

“आय आलसो...ग्लॅड टू मीट यू" अमित हात मिळवत बोलला

“बसा ना सर"

अमित आणि तनया चेअरवर बसले

“काय काम काढलंत" संध्या बोलली

“भरारी वाचलाय ना आजचा" अमित बोलला

“हो... खूप दुख: झालं मला.. सोनिया माझी क्लासमेट होती"

“ज्या फार्महाऊसवर तिचा खून झाला तिथेच आम्ही पण होतो" अमित बोलला

“अच्छा.. म्हणजे... सोनियाच्या खूनाचा तपास करताय तुम्ही.. होय ना"

“यस..”

“काय घेणार चहा ..कॉफी" संध्या बोलली

“कॉफी चालेल" अमित बोलला

संध्यानं मोबाईलवर फोन लावला व बोलली "सदा.. तीन कॉफी घेवून ये बाहेर"

फोन ठेवून ती बोलली “ओके... काय मदत हवीय माझी"

“सोनिया आणि तु एका कॉलेजमध्ये होत्या" अमितचा प्रश्न

“होय"

“सोनिया तुझी मैत्रीण होती"

“तशी काही आमची घनिष्ठ मैत्री नव्हती.. पण एकमेकांशी बोलणं असायचं"

“ओके.. सेानियाची कुणी खास मैत्रीण किंवा‍ मित्र"

“कॉलेजमध्ये त्यांचा तिघांचा ग्रुप होता"

“आणखी दोन कोण?

“पायल सोनी आणि अजय गोयल"

“हे तिघेही एकाच क्लॉसमध्ये होते"

“हो... मी पण त्याच क्लासमध्ये होती"

“कुठल्या कॉलेजला"

“SP, सरदार पटेल कॉलेज"

अमितनं आपल्या मोबाईलमधला सोनियाच्या अलबममधून काढलेला फोटो संध्याला दाखवला व बोलला "तो तिघांचा ग्रुप हाच तर नाही"

“एक्झेटली.. हेच आहेत ते तिघे... सोनिया, पायल आणि अजय"

“हे दोघे कुठे राहतात ते माहित आहे"

“अजय गोयल.. इथेच तुकूम एरीयामध्ये रुम करुन राहत होता, बरेच दिवस तो जॉबच्या शोधात होता, आता माहित नाही कुठे आहे.”

“आणि पायल" अमित बोलला

“पायल ब्युटीशियन होती... ती भांदक ला रहात होती"

“भांदक ला कुठे"

“पत्ता मला माहित नाही, पण हिना अन्सारी नावाची फेमस ब्युटीशियन आहे तिच्याकडे होती"

“ओके"

“हॉ.. पण ती आता कुठे आहे हे अजयला माहित असेल, कारण पायल ही अजयची प्रेयसी होती"

“आणि सोनीया चा कुणी ब्वॉय फ्रेंड नव्हता"?

“नाही .. पण कॉलेजमध्ये चर्चा होती की सोनिया पण अजयवरच प्रेम करायची"

“इंटरेस्टीग" अमित बोलला

इतक्यात संध्याचा घरचा नोकर ट्रेमध्ये पाणी आणि कॉफी घेवून आला

00000

कॉफी पिऊन तनया आणि अमित संध्या देशमूखच्या घरुन बंगल्याच्या बाहेर निघाले.

अमितनं विक्रमला फोन लावला

“हॅलो विक्रम"

“हॉ बोल"

“मी विना ला ताडाली ला पाठवलं होतं, पवनकुमार ला चेक करायला, तो तिथे नाही... इनफॅक्ट दोन दिवसांपूर्वीच गुलशनच्या वाढदिवसाचं निमित्त सागून घरुन निघाला होता"

“हो कळलं …. पोलीसांनाही पाठवलं होतं.. ते ही परत आले" विक्रम बोलला

“याचा अर्थ तो पार्टीत होता"

“मलाही तसचं वाटतं.. अमित, फॉर्म हाऊसवर पार्टीत असलेल्या प्रत्येकाचा घरचा पत्ता आणि मोबाईल नंबर्स घेतलेले आहेत देवयानी मॅमनं.. त्यात चेक केल्यानंतर कळेल की खरचं पवनकुमार पार्टीत होता की नाही ते" विक्रम बोलला

“तो जर पार्टीत होता तर मग.. दिसला कां नाही.. कदाचीत तो लपून असेल"

“किंवा मग वेष बदलवून"

“विक्रम... मला वाटते त्या लिस्टमध्ये कुणीतरी बोगस नांव, पत्ता व मोबाईलनंबर दिलेला असेल"

“कुणीतरी म्हणजे, नक्की कोण"

“पवनकुमार जर काल पार्टीत होता आणि तो लपून असेल किंवा मग वेष बदलवून असेल, तर त्यांना पोलीसांना आपलं नांव आणि पत्ता खोटा दिला असेल"

“प्वाईंट आहे.. मी चेक करतो"

“ओके"

अमितनं फोन ठेवला व तनया कडे बघता बोलला "चला जाऊया जेवयाला"

ती हसली व बाईकवर पाठीमागे बसली, आणि अमितनं बाईक सुसाट नागपूर रोड ला पिटाळली

00000‍

14 नोव्हेंबर

सकाळी 9.00 वाजता

अमित यावेळी तुकूम एरीया मध्ये होता, संध्या देशमूखनं अजय गोयल चा जो पत्ता सांगितला होता, तिथे तो त्याला शोधत होता.

एका ठिकाणी पान टपरीवर मोबाईलमधील अजय चा फोटो दाखवला असता, पानटपरीवाल्याने त्याचा रुमचा पत्ता सांगितला. अमित त्या पत्त्यावर आला.

त्यानं घराचं दार वाजवलं दार एका व्यक्तीनं उघडलं, अमित बोलला "अजय गोयल इथेच राहतो काय"

“नाही आता नाही रहात, गेले तीन महिन्यांपासून तो आलाच नाही, कुठे गेलाय काय माहित, तो बेपत्ता आहे, त्याच्या गावाहून त्याचे आईवडील इथे त्याला भेटायला आले तेव्हा कळलं की तो बेपत्ता आहे, त्याच्या आईवडीलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, व त्याचं सामान घेवून गेले"

“किती दिवसांपासून रहात होता तो इथे"

“दोन तीन वर्षांपासून इथे राहत होता, कॉलेजला शिकत होता... त्यानंतर नोकरीच्या शोधात होता, पण मग अचानक तो गायबच झाला"

“त्याच्या रुमवर इथे कुणी यायचं भेटायला"

“होय.. एक मुलगी यायची"

अमितनं मोबाईल मधला ग्रुप फोटो त्याला दाखवला व बोलला "यातील कुठली तरुणी होती"

त्या व्यक्तीनं सोनिया च्या फोटोवर बोट ठेवलं

"आणि ही दुसरी" अमित पायल सोनी च्या फोटोवर बोट ठेवत बोलला

"हिला नाही बघितलं कधी"

“थॅन्क यु...”‍ म्हणत अमित तिथून निघाला

00000

अमित मघाच्या पान टपरी वाल्याजवळ आला व बोलला "नाव काय तुझं"

“बिल्ला"

“अजय गोयलला ओळखतो"

“होय साहेब तो इथेच माझ्या टपरीवर असायचा टाईमपास करत"

“तो कुठे गेला माहित आहे"

“नाही साहेब "

“कधी कुण्या मुलीचा विषय काढला तुझ्याजवळ त्यानं"

“हॉ साब... तो नेहमी पायल नावाचा उल्लेख करायचा"

“कधी पायलचा फोटो वैगरे दाखवला होता त्यानं तुला"

“नाही साहेब"

अमितनं परत मघा त्याला दाखविलेला फोटो दाखवला यावेळी त्यानं सोनियाचा फोटो झुम करुन दाखवला, व बोलला "हिला बघितल आहे कधी"

"हो बघितलं ... अजय सोबत दिसायची कधी कधी"

“हा अजय कुठे कामाला जायचा"

“नाही दिवसभर इथेच बसायचा"

“मग त्याचा खर्च कसा चालायचा, पैसे असायचे त्याच्याजवळ"

“हो साहेब .. पैसे तर खूप खर्च करायचा"

“ओके... बिल्ला.. थॅन्क यू"

इतक्यात अमितचा मोबाईल वाजला

फोन विक्रमचा होता

“हॅलो" अमित बोलला

“कुठे आहेस"

“आहे इथेच तुकूम ला आलोय"

“तिथे काय करतोय"

“काही नाही तु सांग, काही खबर"

“तुझा संशय खरा ठरला... त्या लिस्ट मध्ये एक मोबाईल नंबर आणि पत्ता खोटा आहे"

“कोणतं नावं"

“डी.जे.ब्वॉय मायकल असं लिहलंय, त्यानं जो पत्ता टाकलाय तो चुकीचा आहे, मोबाईल नंबरही चुकीचा आहे"

“कुछ समझे.... हा पवनकुमारच असेल जो पार्टीमध्ये डी.जे.ब्वॉय च्या रुपात होता"

“होय.. मलाही तसचं वाटतं"

“विक्रम.. आपल्याला कसही करुन या पवनकुमारला शोधलच पाहिजे... गाडीची चाबी त्याच्याच ताब्यात होती, त्यानंच डॅश बोर्ड मधून रिव्हॉल्वर काढलं..... फायर चा आवाज कुणाला एैकू येवू नये म्हणून DJ चा आवाज वाढवला..‍‍ आणि टेंटमध्ये सोनियाला शूट केलं"

“शंभर टक्के बरोबर वाटते, पण पवनकुमारनं सोनियाला कां मारलं"

“तो सापडल्यावर सांगेलच.. तु त्या डीजे वाल्याकडे गेला होता..”

“हो.. DJ वाला बोलतो की मी जो DJ ब्वॉय पाठवला होता त्याचं नाव मायकल नव्हतं, तो सॅमी डिसुझा नावाचा DJ Boy होता"

“मग तु सॅमी डिसुझाला भेटला"

“हो .. सॅमी बोलला की एक व्यक्ती त्याच्याकडे आली व बोलली की त्याचं नाव मायकल आहे, व तो चावला साहेबांचा खास आहे, त्यामुळे DJ त्याला हॅण्डल करायचा आहे, यासाठी त्यानं सॅमी ला 2000 रुपये दिले व बोलला की DJ घेवून जायला सकाळीच ये.. आणि मग सॅमी फार्म हाऊसवर DJ फीट करुन.. घरी निघून गेला"

"त्या व्यक्तीचा हुलीया सांगितला सॅमी नं" अमित बोलला

"लांब वेणी घातलेले केस, हाफ शॅन्डो जॅकेट, थ्री फोर्थ बरमुडा, डोळयावर गॉगल"

“हा तर DJ Boy चा हुलीया आहे जो DJ जवळ डान्स करत होता"

“हो पण तो असली DJ ब्वॉय नव्हता..”

“मग तोच पवनकुमार असेल.. जो DJ ब्वॉयच्या वेषात आला असेल"

“Your right" विक्रम बोलला

“आणि म्हणूनच त्यांन आपला नाव व पत्ता खोटा दिला"

“यस अमित"

“याचा अर्थ पवनकुमार याच शहरात आहे, कुठेतरी लपून बसलाय"

“युवर राईट" विक्रम बोलला

“विक्रम, काल राज कदम कडून सोनियाचा मोबाईल नंबर घेतला होता, त्या मोबाईल नंबरची कॉल हिस्ट्री मिळाली"?

“होय.. त्यानंबर वरुन जास्त फोन गुलशन चावलाच्या फोनवर केलेले आहे. आणि गेल्या चार पाच दिवसात जास्त कॉल केलेला आणखी एक नंबर आहे, ट्रू कॉलरवरुन मी बघीतलाय तो नंबर"

“कोणाच्या नावाचा आहे"

“पायल सोनी"

“इंटरेस्टींग"

“कोण आहे ही पायल सोनी"

“मी येतो आणि सांगतो सगळं तुला... तु त्या पायल सोनी च्या नंबरवर फोन केला होता"?

“हो.. दुपारपासून करतोय... फोन बंद आहे"

“ठिक आहे, मी पोहोचतोय तिथे.. मग बोलूयात‍

अमितनं फोन ठेवला आणि बाईक सुरु केली

00000

सकाळचे 10.05 झाले होते, अमित रामनगरच्या पोलीस हेडक्वॉर्टरमध्ये नुकताच पाहोचला होता.

तो यावेळी विक्रमच्या कॅबिनमध्ये बसला होता.

अमितनं मोबाईल मध्ये काढलेला सोनियाच्या अल्बममधील फोटो, विक्रमला दाखवला व आतापर्यंत घडलेलं त्याला सांगितलं.

“मग ही पायल सोनी कुठे आहे" विक्रम बोलला

“तिलाच शोधून काढायचं आहे, अजय गोयलही बेपत्ता आहे"

"तुझी स्टोरी काय म्हणते"

“विक्रम.. मला वाटते पवनकुमारला कुणीतरी सांगितलं सोनियाचा खून करायला, म्हणून तो पार्टीत डीजे ब्वाय च्या वेषात होता, गाडीची चाबी त्याच्याकडेच असते, त्यानं डॅश बोर्डमधून रिव्हॉल्वर काढून आधीच जवळ ठेवलं असेल... आणि डीजेचा आवाज वाढवला आणि सोनियाच्या टेटमध्ये जावून तिला शूट केलं"

“पण मग.. कुणाच्या सांगण्यावरुन केलं त्यानं हे"

“ती स्टोरी आहे माझ्या डोक्यात" अमित बोलला

“बोल"

“प्रेम चावला.. गुलशन चावलाचा मुलगा"

“कसं कायं..तो कुठे‍ फिट बसतोय या स्टोरी मध्ये"

“मेरी फनार्डिसं म्हणजे प्रेमची आई.. ही कुणासोबत तरी पळून गेलीय.. असं गुलशन सर्वांना सांगत सुटलाय.. पण तसं नाहीए, मेरी बोलली की गुलशनला मोनिका सोबत लग्न करायचं होतं, त्यामुळे गुलशनंनं तिच्या हाता पाया पडून मोनिकाशी लग्न करण्यासाठी डिव्होर्स मिळवला, बदल्यात मेरी ला 5 कोटी रुपये दिले... प्रेमला ही गोष्ट माहित झाली असेल...‍ आणि कदाचीत सोनिया आणि गुलशनचं प्रेम प्रकरणही कळलं असेल, म्हणून मग त्यानं पवनकुमारला हाताशी धरुन पवनकुमार कडून हे सगळ करवून घेतलं"

“पण पवनकुमार त्याची मदत कां करेल"

"पवनकुमार ला पैशाचं आमिष दाखवून आपल्या सोबत मिळवून घेतलं असेल. प्रेमचं त्याच्या आईसोबत अधूनमधून बोलणं व्हायचं हे त्यांन मला सांगितलय..‍

दोन दिवसांनी गुलशन आपलं मृत्यूपत्र बदलणार होता... ही गोष्ट मेरीला माहित होती, गुलशननं आधीच मेरीला 5 कोटी रुपये दिले होते.. त्यामुळे आता तिचं नाव मृत्यूपत्रात नसणार होतं, आणि म्हणूनच तिनं हे सगळं करायला प्रेमला सांगितलं"

“तसं असेल तर मग त्याला खूनात कां फसवलं.., मारताही आलं असतं"

“मुलाच्या हाताने वडीलांचा खून कसा काय करवू शकली असती ती.. मेरी ला फक्त हेच हवं होतं की गुलशन मृत्यूपत्र बदलवू शकणार नाही.. या घटनेनं तो डिस्टर्ब झाला असता आणि काही दिवसांसाठी तरी त्यानं हा विचार नसता केला"

“बात मे दम है.. बस एक बार पवनकुमार मिल जाये तो सारी सच्चाई सामने आ जाए" विक्रम बोलला

“मिल जायेगा, मला वाटते कदाचीत पवनकुमार गुलशन चावलाच्या बंगल्यावर servent quarter मध्ये लपून बसला असेल तो आपल्याला बंगल्यावर सापडेल त्याच्या सर्वेंन्ट क्वार्टरमध्ये"

“चल निघूया मग" विक्रम बोलला

00000

गुलशन चावलाचा बंगला मुल रोडला होता.

अमित, विक्रम आणि दोन हवालदार पंधरा मिनीटात गुलशन चावलाच्या बंगल्यावर दाखल झाले.

बंगला चांगला मोठा होता, दोन मजली होता, पोलीसांची जीप बंगल्याच्या आवारात येताच, बंगल्यातून प्रेम चावला, मोनिका चावला, प्रियंका चावला, घरातले दोन नौकर इतके सगळे बंगल्याच्या बाहेर आले.

पोलीसांनी बंगला सर्च करायला घेतला, विक्रम आणि अमित सर्व्हेंट क्वार्टरजवळ आले, क्वॉर्टरला लॉक होतं...

“याची चाबी कुणाकडे आहे" विक्रम बोलला

“चाबी तर.. पवनकुमारकडेच असते" मोनिका बोलली "काय चाललय हे.. मला सांगाल कां तुम्ही"

विक्रमन हवालदाराला लॉक तोडायला सांगितलं.

पवनकुमाच्या रुमचं लॉक तोडून आत प्रवेश केला.. आत पवनकुमार नव्हतां, फक्त त्याचं काही सामान होतं

संपूर्ण बंगला शोधून झाला, पवनकुमार सापडला नाही.

विक्रम, मोनिका जवळ आला व बोलला "पवनकुमार कुठाय"?

“पवनकुमार?, तो इथं कसा येणार तो तर त्याच्या गावाला आहे" मोनिका बोलली

“तो परवाच इथे आलाय.. तुमच्या नवऱ्याच्या वाढदिवसासाठी" विक्रम बोलला

“काय? कसं शक्य आहे, असं असतं तर तो परवा पार्टीत नसता काय? मोनिका बोलली

“तो पार्टीत होता मॅडम.. डी.जे.ब्वॉयच्या वेषात"

“काय?.. DJ ब्वॉय आणि पवनकुमार... बापरे" मोनिकानं कपाळाला हात लावला, काय चाललयं काहीच कळतं नाही"

अचानक अमितचं लक्ष swift desire कडे गेलं. तो बोलला "पवनकुमार नाही, प्रविण आणि गुलशन जेलमध्ये आहे.. मग ही गाडी कुणी आणली इथे फार्म हाऊस वरुन"

“मी आणली" प्रेम बोलला "मला ड्रायव्हींग येते"

“ओ.के..” अमित त्याच्याकडे संशयाच्या दृष्टीने बघत बोलला

“फार्म हाऊसवर कोण आहे आता"

“तिथे कोण असणार.. पोलीसांनी सील केलयं तिथे" मोनिका वैतागत बोलली

“यस.... ठिक आहे" विक्रम बोलला

अमित आणि विक्रम बंगल्याच्या बाहेर आले.

00000

दुपारचे 12.30 वाजले होते.

यावेळी अमित भांदक मध्ये होता, तो चंद्रपूर हून 24 किलेमिटर बाईकने भांदकला आला होता, भांदक, चंदपूर जिल्हयातील मोठी बाजारपेठ असलेलं तालुक्याचं ठिकाणं, इथे आयुध फॅक्‍टरी आहे, इथलं प्रेक्षणीय ठिकाण म्हणजे पार्श्वनाथाचं मंदिर.

अमितनं हिना ब्युटी पार्लर शोधून काढलं, ब्युटी पार्लरची मालकीन हिना अन्सारी एक 40-42 च्या वयोगटातील सुंदर स्त्री होती. अमितनं आपला परिचय तिला दिला.

अमितनं मोबाईलमधून सोनियाच्या अलबममधून काढलेला ग्रुप फोटो मधून पायल सोनीचा फोटो झूम करुन तिला दाखवला व बोलला "इसे पहचानती है आप"

“हॉ.. ये पायल है... मेरी सबसे अच्छी स्टुडंट, बहोत मेहनती लडकी थी"

“मुझे इसके बारे पुरी जानकारी चाहीए.. अब वो कहॉ रहती है, क्या करती है"

“अभी तो मुझे पता नही वो कहॉ रहती है.... पहले वो यही भांदक मे रहती थी"

“कहॉ"

“यही पास मे... शिंदे कॉलनी मे"

“आप उसके बारेमे जो भी जानती है, प्लीज मुझे बताइये.. मुझे लगता है इसकी जान खतरे मे है"

“क्या बात करते हो.. पायल को कौन मारना चाहेगा"?

“वही तो ढुंड निकालना है, इसके साथ मे.. फोटो और दो लोग है.. जिसेमेसे लडका गायब है, और लडकीका कत्ल हो गया है... आपको जो पता है वो बतायीए प्लीज शायद मै पायल को बचा सकू" अमित बोलला

“पुछो"

अमितन विचारायला सुरवात केली आणि हीना सांगू लागली

00000

अमित, ब्युटी पार्लर मधून बाहेर पडला.. तो गाणं गुणगुणत.. इक हसीना थी .. इक दिवाना था....

त्यानं बाईक काढली व तिथून निघाला

00000

दुपारी 2.30 वाजता

अमित नुकताच भांदक हून आला होता.. तो आपल्या ऑफिसमध्ये आला.

शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर बसला.. त्याचं डोकं काम करत नव्हतं... त्यांन मोबाईल हातात घेतला व पार्टीतले एक एक फोटो बघायला लागला .. काल सकाळी काढलेले फार्महाऊसच्या आवारातले .. प्रत्येक टेन्टचे तो एक एक फोटो तो बघत होता. आणि त्याची नजर फार्महाऊसच्या आवारातल्या मोकळया जागेवरील एका फोटोवर खिळून राहली..‍ आणि त्याच्या चेहऱ्यावर कमालीचं हास्य पसरलं.

त्यानं विक्रमला फोन लावला व बोलला "विक्रम... पार्टीत जेवढे लोक होते सगळयांना चार वाजेपर्यंत फार्म हाऊस मध्ये गोळा व्हायला सांग, प्रविण, गुलशन आणि राज कदम यांनाही"

“क्या बात है.. कुछ मिला क्या"?

“बहोत कुछ.. वही कातील भी मिल जायेगा.. आणि हो.. मेरी फनार्डिसला बोलवायला विसरु नको तिचं हजर राहण महत्वाचं आहे.. आय थिंक पवनकुमार ही तिथेच भेटेल..

“ओके.. मी देवयानीला सांगून व्यवस्था करतो"

“आणि हो... त्याआधी आपल्याला फार्महाऊसवर पोहोचायचं आहे, आता अडीच वाजलेय, तु तीन वाजता माझ्या ऑफिसजवळ ये मग आपण दोघे मिळूनच जाऊया फार्महाऊसवर"

“ठिक आहे, येतो मी"

00000

दुपारी 3.30 वाजता

अमित आणि विक्रम फार्महाऊसवर पोहोचले... फार्महाऊसवर दोन हवालदार पहारा देत होते, विक्रम त्यांना बोलला "कुणी आलं होतं इकडे"

“नाही साहेब"

अमित बोलला " विक्रम.. पवनकुमार त्यादिवशी पार्टीमध्ये होता, तो जर फॉर्म हाऊसमधून बाहेर गेला असता तर एक तर त्याच्या क्वार्टरमध्ये असता किंवा मग त्याच्या गावाला ताडालीला"

“पण तो या दोन्ही ठिकाणी नाही"

“आणि जर तो फार्म हाऊसमधून बाहेरच गेला नसेल..आणि इथेच लपून बसला असेल तर"

“याचा अर्थ तो आताही इथेच फार्म हाऊसवरच आहे"

“युवर राईट.. चल शोधूया.. तो इथेच सापडेल" अमित बोलला

अमित आणि विक्रम दोघेही फार्महाऊस सर्च करायला लागले, एक एक करुन सगळे टेंट शोधून काढले पण काहीच मिळालं नाही..

शेवटी दोघेही.. फार्महाऊसच्या रुम चेक करायला लागले, हॉल, किचन, बेडरुम... दोन बेडरुम शोधून झाल्या..

आणि ते तिसऱ्या बेडरुमकडे वळले जी बेडरुम फार्महाऊसच्या मागच्या साईडला होती. बेडरुमचं दार लोटलेलं होतं, आत अंधार होता, विक्रमनं लाईटचं बटन शोधून ते दाबलं.. आणि लाईट च्या प्रकाशात बेडरुम न्हावून निघाली... बेड रिकामा होता, बेडच्या साईडला एक टेबल होता, तिथे एक‍ काचेचा रिकामा ग्लास आणि एक दारुची बाटली ठेवलेली होती.

अमित आणि विक्रम दोघेही आत शिरले, बेडरुममध्ये एक कपाट होतं... विक्रमनं हॅण्डग्लोज घातले आणि कपाट उघडलं.. आत लांब केसाचा विग, थ्री फोर्थ बर्मुडा.. जॅकेट. होतं

“DJ Boy चे कपडे" अमित बोलला

अमितनं आपल्या मोबाईलमध्ये एक स्नॅप मारला

बाथरुमचा दरवाजा बाहेरुन कडी लावलेला होता, अमितनं विकमकडे बघीतलं.. विक्रमनं दरवाजा उघडला...

समोर बाथरुम मध्ये एक डेड बॉडी होती.. शरीर निळं पडलं होतं...

दोघांनीही नाकाला रुमाल लावला...

अमितनं आपल्या मोबाईल मधला पवनकुमारचा फोटो बघीतला जो त्यानं विना कडून घेतला होता.

ती डेडबॉडी पवनकुमारची होती.

00000

चार वाजायला आले होते.. हळू हळू फार्म हाऊसवर पार्टीत असलेल्यांची गर्दी जमायला लागली होती.

अमित फॉर्महाऊसच्या आवारात काहीतरी शोधत होता...

शोधता शोधता तो फॉर्म हाऊसच्या पाठीमागे गेला आणि एका ठिकाणी त्याला जे हवं होतं ते मिळाल‍... त्यानं खिश्यातून एक पाऊच काढल व त्यात ती वस्तू भरली व पाऊच व्यवस्थीत बंद करुन घेतलं.

00000

दुपारी 4.00 वाजता

फार्महाऊसच्या आवारात गोलाकार खुर्च्या टाकण्यांत आल्या होत्या,सगळे तिथे बसले होते. अमित तिथे येवून विक्रमजवळ बसला

फार्म हाऊस वर देवयानी गुप्ता, विक्रम, अमित, तनया, डॉक्टर चक्रधर, डी.जे.ब्वॉय सॅमी, प्रविण चावला, गुलशन चावला, मोनिका चावला, प्रेम चावला, अविका पटेल, ॲडव्होकेट राकेश गुप्ता, मेरी फनार्डिस, राज कदम आणि इतरही होते जे पार्टीत त्यादिवशी हजर होते.

“जासूस साहाब मिल गया सोनिया का कातील? डॉक्टर चक्रधर अमितकडे बघत बोलले

अमित हसला व बोलला ”हॉ... कातील यही है.. हमारे बिच... तो शुरु करते है.. इक हसिना थी.. इक दिवाना था...

या स्टोरी मधली हसीना आहे "पायल सोनी" आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पायल सोनी कोण आहे.

एस.पी .कॉलेजमध्ये तिघांचा ग्रुप होता.. पायल सोनी, सोनिया जगताप आणि अजय गोयल

अजय गोयल आणि पायल सोनी यांच एकमेकांवर प्रेम होतं. आणि सोनीया सुध्दा अजयवर प्रेम करायची. सगळं व्यवस्थीत सुरु असतांना अचानक तिन महिन्यांपूवी एक दिवस अजय गोयल गायब होतो... तो त्याच्या गावीही नसतो..आणि त्याचे आईवडील तो बेपत्ता झाल्याची रिपोर्ट पेालीस स्टेशनला करतात.

… आणि एक दिवस सोनियाला माहित होतं की अजय गोयल ला गायब करण्यामागे पायल सोनी चा हात आहे, आणि सोनिया या संधीचा फायदा घेत, पायल सोनीला ब्लॅकमेल करायला सुरवात करते... पायल सोनीला हे असह्य होतं, आणि मग 12 नोव्हेंबरला गुलशन चावला च्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सोनिया येणार आहे हे पायल सोनीला कळतं. आणि मग पायल सोनी,... सोनियाला मारण्याचा कट आखते"

“म्हणजे 12 नोव्हेंबरच्या पार्टीत पायल सोनी इथे फार्म हाऊसवर होती हे म्हणायचं आहे तुला" विक्रम बोलला

“होय.. पायल सोनी पार्टीत होती, आणि आय थिंक आताही ती इथेच आहे" अमित बोलला

सगळे अमितकडे बघायला लागले आणि अमित बघत होता.. मोनिका चावला कडे

“मी खरं बोलतोय ना मोनिका" अमित बोलला

“कुठे... आ .. हे पायल सोनी" मोनिकाचा अडखडता आवाज

“ते तर तुम्हालाच माहित.. "?अमित बोलला

“मी कुण्या पायल सोनीला नाही ओळखत" मोनिका बोलली

“मग तुम्हीच गायब केलं असणार पायल सोनीला आणि अजय गोयलला ही, आणि मग 12 नोव्हेंबरच्या रात्री सोनियालाही संपवलं होय ना" अमित बोलला

"कोण अजय गोयल...कोण पायल सोनी, आणि मी का मारेल सोनियाला, माझा काय संबंध, तुम्ही काय बोलताय मला नाही कळत आहे" मोनिका बोलली

“कसं शक्य आहे.. मी स्वत: तिच्या ड्रिंक्समध्ये झोपेच्या गोळया टाकल्या होत्या.. सोनियाचा खून झाला तेव्हा मोनिका झोपलेली होती" गुलशन चावला बोलला

“मान्य आहे.. तुम्ही मोनिकाला ड्रिंक्समध्ये झोपेच्या गोळया दिल्या होता.. पण ते ड्रिंक्स मोनिका प्यालीच नाही" अमित बोलला

“कसं शक्य आहे.. तिनं रिकामा ग्लास माझ्यासमोर टेबलवर ठेवला" गुलशन बोलला

“तुम्ही तिला पितांना बघीतलं..? कचादित ती ड्रिंक्सचा ग्लास ओठांना लावून पिण्याचं नाटक करीत असेल त्यावेळी" अमित बोलला

“मग ते ड्रिंक्स गेलं कुठे" गुलशन बोलला

“ते‍ ड्रिंक्स मोनिकानं बेडरुमच्या खिडकीतून खूप हळू आणि तुमच्या नकळत खाली टाकलं, आणि परत ग्लास तोंडाला लावला.. आणि मग रिकामा ग्लास तुमच्यासमोर ठेवला"

“याचा काय पुरावा आहे" गुलशन बोलला

अमितनं आपल्या मोबाईलमधून फार्महाऊसच्या आवारातील एक फोटो गुलशनला दाखवला व बोलला "तुमच्या बेडरुमच्या‍ खिडकीच्या अगदी खाली एक फुलझाडाची कुंडी होती आणि त्यात हे ड्रिंक पडलं... बघा ते झाड कोमेजलं आहे.. आता जेव्हा मी इथं आलो त्यावेळी ती कुंडी इथे नव्हती.. मी फार्महाऊसच्या पाठीमागे गेलो ती कुंडी एके ‍ठिकाणी पडली होती..”

अमितनं खिश्यातून कुडींतल्या मातीचं घेतलेलं सॅम्पल विक्रमकडे दिलं व बोलला "हे त्या कुंडीच्या मातीचं सॅम्पल आहे.. यात नक्कीच झोपेच्या गोळयाचे अंश मिळतील"

मोनिकाचा चेहरा पांढरा पडला.. ती खाऊ का ठेवू या नजरेनं अमित कडे बघायला लागली

अमित पुढे बोलला "मोनिकानं ड्रिंक्स न पिताच.. झोपेचं नाटकं केलं.. मोनिका गाढ झोपलीय हे समजून गुलशन चावला फार्महाऊसच्या दुसऱ्या बेडरुममध्ये निघून गेले जिथे सोनिया येणार होती.

हिच संधी साधून कानोसा घेत रात्री 2.25 च्या सुमारास मोनिका फार्महाऊसच्या बेडरुममधून बाहेर पडली... त्यापूर्वी तिनं कदाचीत पवनकुमारला, जो DJ ब्वॉयच्या वेषात इथे फार्म हाऊसवर हजर होता.. त्याला DJ चा आवाज वाढवायला सांगितलं असेल.. मोनिकानं आधीच संधी साधून सोनियाच्या टेंटचा मागचा भाग कैचीने कापून ठेवला होता.. कारच्या डॅश बोर्ड मधील रिव्हॉल्वर पवनकुमारनं आधीच तिच्या जवळ दिलं असेल...

रिव्हॉल्वर घेवून ती लपत छपत टेंटच्या मागच्या रस्त्यानं सोनियाच्या टेंटमध्ये शिरली डी.जे.आवाज एकदम वाढला आणि मोनिका, सोनियाच्या समोर जावून उभी राहली.. आणि तिला काही कळायच्या आतच मोनिकानं तिच्यावर गोळी झाडली, DJ च्या मोठया आवाजात गोळीचा आणि सोनियाचा आवाज दबल्या गेला. मोनिका टेंटमध्ये आली होती त्याच रस्त्याने परत निघाली बाहेर येवून रिव्हाल्वर वरुन बोटाचे ठसे मिटवले आणि रिव्हाल्वर एका कुंडीत टाकून दिली व बेडरुममध्ये जावून झोपली" अमित नं खुलासा केला

“पण कां.. मोनिकानं सोनियाला कां मारलं.. काही कारण तर असेल ना" डॉक्टर चक्रधर बोलले

“आहे ना.. खूप मोठं कारण आहे तीन महिन्यांपूर्वी अजय गोयल गायब झाला.. कारण अजय गोयल चा खून मोनिकांन केला.. रिव्हॉल्वरची पहली गोळी. कुछ समजे" अमित विक्रमकडे बघत बोलला

सगळे मोनिकाकडे बघायला लागले, दोन लेडीज कॉन्स्टेबल मोनिकाच्या बाजुला जावून उभ्या राहल्या अमित पुढे बोलला "गुलशनच्या सांगण्यानुसार डॅश बोर्ड मधल्या रिव्हाल्वरमध्ये सहा गोळया होत्या त्यातली एक गोळी मोनिकानं अजय गोयल वर चालवली.. त्याला मारलं आणि त्याच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावली.. तो आजपर्यंत पोलीसांना सापडला नाही.. त्याची विल्हेवाट कुठे लावली हे मोनिका आपल्याला सांगेलच.. पण इथे एक गडबड अशी झाली की, अजय गोयलला मोनिकानं गायब केलं हे सोनियाला कळलं.. आणि मग सोनिया तिला ब्लॅकमेल करु लागली … आता सोनियाच्या हातात घबाड लागलं होतं.. आणि मोनिकाला हे सुध्दा कळलं होतं की गुलशनला सोनिया आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढतेय.. ती अस्वस्थ झाली..आणि मग मोनिकाच्या डोक्यात सोनियाला मारायचा प्लॅन साकार झाला.. गुलशनच्या वाढदिवसाला सोनिया येणार होती हे सोनियानंच मोनिकाला सांगीतलं असावं आणि सोनिया कदाचीत मोनिकाकडून खूप मोठी रक्कम वसूल करायला पार्टीत आली असेल.. आणि मग मोनिकानं तिचा खून केला.. या कामात पवनकुमारनं तिला मदत केली, कां मदत केली ते सांगेल आपल्याला"

सगळे अमितकडे बघायला लागले विक्रम बोलला "पण मग मोनिका नं अजय गोयल कां मारलं.. मोनिकाचा आणि अजय गोयलचा काय संबंध"

“विक्रम... आता पण नाही कळलं? हीच आहे पायल सोनी ऊर्फ मोनिका चावला.. दोन वर्षापूर्वी हिनं आपला गेटअप चेंज करुन आणि नांव बदललं, अजय गोयल आणि हिनं मिळून प्लॅन केला आणि गुलशन चावला सारख्या धनाढय मानसाला आपल्या प्रेमाच्या जाळयात फसवलं.. इतकं की तो मेरी ला डिव्होर्स दयायलाही तयार झाला. आणि मग मोनिका आणि गुलशनचं लग्न झालं... सगळं व्यवस्थीत सुरु होत, गु्लशनच्या पैशावर अजय गोयल आणि पायल सोनी दोघेही एैश करत होते... आणि पैशाची चटक लागलेल्या अजयनं पायल सोनी ऊर्फ मोनिकाकडे परत परत पैसे मागायला सुरवात केली.. आणि इथेच त्यांचे खटके उडू लागले... कदाचीत अजयनं हिला धमकीही दिली असेल की तो सगळं गुलशन चावलाला खरं सांगून टाकेल, पायल सोनी आता एैश आरामात जीवन जगत होती.. गाडी बंगला, पैसा, नोकर चाकर सगळ होतं, आता तिला अजय गोयल ची भिती वाटायला लागली.. आणि मग तिनं विचार केला अजयला संपवायच"‍

बोलता बोलता अमितनं मोनिकाकडे बघीतलं तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता.

“पण हिच पायल सोनी आहे याचा काय पुरावा" विक्रम बोलला

“आहे ना.... पुरावा आहे.. आज दुपारी मी भांदकला गेलो होतो. तिथे हिना अन्सारी ला भेटलो.. हिना अंसारी कडे पायल सोनी ब्युटीशियन होती... जेव्हा मी मोनिकाचा फोटो हिना अन्सारीला दाखवला, तिनं लगेच सांगितलं की हीच पायल सोनी आहे.. ती ब्युटीशियन होती. तिनं आपला गेटअप हवा तसा चेंज करुन घेतला, नाव ही बदललं, मी मोनिकाचा फोटो हिना अन्सारीला दाखवताच तिनं लगेच ओळखलं कारण तो गेटअप तिनं त्याच ब्युटीपार्लर‍ मध्ये हिना कडून चेंज करुन घेतला होता" अमित बोलला

“तुझा संशय मोनिकावर कसा काय गेला" विक्रम बोलला

अजय हसला व मोनिकाकडे बघत बोलला "पायल सोनी हे नांव बदललं...तिचा गेटअप ही बदलला पण तिच्या वस्तू आताही वापरते... जेव्हा मला गुलशननं पार्टीत तुमच्याशी ओळख करुन दिली होती तेव्हाच मी बोललो होतो.. नाईस ब्रेसलेट...”

मोनिकानं खाली मान घातली.

अमितनं आपल्या मोबाईल मधला तिघांचा ग्रुप फोटो‍ विक्रम आणि देवयानीला दाखवला, त्या फोटोत पायल सोनीचा एक हात अजयच्या खांदयावर होतां आणि दुसरा हात सोनियाच्या हातात आणि त्याच हातात ते ब्रेसलेट होतं.

“वेलडन मिस्टर अमित" देवयानी बोलली

अमित बोलला "मोनिका वर संशय तर मला तेव्हाच आला होता... जेव्हा मी हिना अन्सारी ला भेटलो, पण शंका हीच होती की मोनिका जर झोपेच्या गोळया घेवून झोपली तर मग ती खून कशी काय करेल.. आणि मग मी फार्महाऊस मध्ये काढलेले एक एक फोटो चेक करत बसलो.. आणि मला मग तो फोटो दिसला ज्या फोटोमध्ये मोनिकाच्या बेडरुमच्या खिडकीखालील फुलझाडाच्या कुंडीतील झाड कोमेजलेल्या अवस्थेत दिसलं.. आणि त्याचवेळी ग्रुप फोटोमधील पायल सोनीच्या हातातील ब्रेसलेटही दिसलं इथे येवून मी ती कुंडी बघीतली पण ती तिथे नव्हती.. कदाचीत मोनिकानंच ती कुंडी तिथून हटवली व मागे कचऱ्यात नेवून टाकली होती, मी ती शोधून काढली व त्यातील माती पाऊच मध्ये काढून घेतली.”

गुलशनन रागानं मोनिका कडे बघितलं... मोनिका त्याच्या नजरेला नजर नाही देऊ शकली.. ती खाली बघायला लागली.

देवयानी गुप्ता नं मोनिका चावला ला अरेस्ट केलं.

मोनिका चावला न आपला गुन्हा कबुल केला आणि मग ती सगळं सागंत सुटली

“माझं आणि अजय गोयलं चे एकमेकांवर प्रेम होतं.. हे जरी खरं असलं तरी, ते काही खरं प्रेम नव्हतं... त्याला माझी गरज आणि मला त्याची गरज होती म्हणून आम्ही एकमेकांसोबत वेळ घालयवायचो, हां पण सोनियाचं अजयवर खरं प्रेम होतं कदाचीत. दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक दिवस एका कार्यक्रमात मला गुलशन चावला दिसले..,‍ ते खूप श्रीमंत असल्याचं मला कळलं, आणि मी अजयच्या मदतीनं एक प्लॅन बनवला. मी भांदक ला गेले आणि ब्युटीशियन हिना अन्सारीकडून माझा गेटअप हवा तसा चेंज करुन घेतला, इतका की फक्त अजयच मला ओळखू शकत होता. आणि मी मोनिका बनून गुलशनला भेटले, अगदी पहिल्याच भेटीत गुलशन माझ्यावर लट्टू झाले. आणि मग मी लग्नाचा प्रस्ताव गुलशनकडे मांडला... ते जरा अस्वस्थ झाले.. आणि मग ते त्यांच्या बायकोसोबत डिव्होर्स साठी झटपटू लागले.. शेवटी त्यांना डिव्होर्स मिळाला आणि आमचं लग्न झालं, अजय बेरोजगार होता, त्याला आता माझ्याकडून हवा तसा पैसा मिळू लागला, सगळ‍ं व्यवस्थीत सुरु होतं आणि अजयची नियत फिरली एवढा पैसा बघून त्याला लालच सुटला आणि तो नेहमी माझ्याकडे पैशाची मागणी करु लागला.. यावरुन आमचं एक दोनदा भांडणही झालं.. आणि मी ठरवलं अजयला रस्त्यातून कायमचं दूर करायचं, पवनकुमार मला बाहेर शॉपिंगसाठी आणि फिरायला नेहमी कारमध्ये न्यायचा याकामात मी पवनकुमारची मदत घ्यायचं ठरवलं आणि हळुहळु पवनकुमार ला प्रेमाच्या जाळयात ओढलं, इतकं की तो माझ्यासाठी काहीही करायला तयार होता. 12 ऑगष्टला गुलशन काही कामासाठी नागपूरला गेले होते . ते दोन दिवस येणार नव्हते .. मी पवनकुमारला सांगितलं अजय गोयल नावाचा मानूस मला ब्लॅकमेल करतो आणि त्याचा काटा काढायचा आहे, आधीतर तो तयार नव्हता, पण मग मी त्याला शारीरिक सुखाचं आमिष दाखवून तयार केलं. 12 ऑगष्टला मी अजय गोयल ला एका निर्जन स्थळी बोलावलं, मला पवनकुमार त्याठिकाणी कारने घेवून गेला होता.. डॅशबोर्ड मधील रिव्हॉल्वर मी माझ्या ताब्यात घेवून अजयला गोळी घातली व त्याला संपवलं. त्यानंतर पवनकुमारच्या मदतीनं ते प्रेत पोत्यात बांधून डिकीत ठेवलं...

त्यानंतर पवनकुमारनं मला घरी सोडलं... पवनकुमारन ओव्हरकोट घातला... हॅट घातली, पायात कॅनवॉसच शूज घातले आणि रात्री डिकीतल अजयचं प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी बंगल्यातून निघाला. त्यापूर्वी मी माझ्याकडे अससेली रिव्हॉल्वर परत डॅशबोर्डमध्ये ठेवण्यासाठी त्याच्याकडे दिली होती. पवनकुमारनं ते प्रेत नागपूर रोडला कुठेतरी तलावात टाकून दिल्याचं मला सांगितलं"

“मग सोनियाला कां मारलं, तिला तर हे सगळं माहित नव्हतं ना" विक्रम बोलला

मोनिका पुढे बोलली "अजयला मारुन दोन महिने उलटून गेले होते आणि एक दिवस मला अचानक सोनियाचा फोन आला, आणि ती मला बोलली की तिला हे माहित आहे की अजय ला गायब करण्यामागे माझा हात आहे"

“तिला कसं कळलं" विक्रमचा प्रश्न

“मी मोनिका बनले तेव्हापासून अजय ला जास्त भेटत नव्हते, आम्ही भेटलो तरी बाहेरच भेटायचो, अजयच्या रूम वर नाही, पण एक दिवस मी अजयला भेटायला त्याच्या रूमवर गेले, आणि तिथे आमचं भांडण झालं, जेव्हा आमचं भांडण सुरु होतं तेव्हा अचानक सोनिया तिथे आली तिनं रुमच्या बाहेरुनचं सगळं एैकलं होतं, तीला हे सुध्दा कळलं होतं की, मी मोनिका बनून गुलशन चावला सोबत पैशासाठी लग्न केलय, माझा आणि अजयचा प्लॅन तिला कळला होता. ती रुमच्या बाहेर उभी राहून सगळं ऐकत होती. ती सगळं एैकून परत खाली निघून गेली. आणि मी अजय च्या रुममधून बाहेर येण्याची लपून वाट बघत होती.. माझा बदललेला लुक तिनं बघीतला होता, मी निघून गेल्यावर ती अजयकडे गेली व त्याच्याकडून खरं काय ते वदवून घेतलं, आणि अजयनं तिला सगळ सांगून टाकलं होतं..त्यामुळे अजय गायब झाल्यावर तिचा माझ्यावर संशय येणं सहाजीकच होतं, तिनं मला फोन केला आणि पैशाची मागणी करु लागली.. त्याआधी तिनं गुलशन ला प्रेमाच्या जाळयात फसवून आपल्या नादी लावलं होतं, आणि मला आता सोनियाला संपवावचं लागणार होतं, आणि याकामी मी परत एकदा पवनकुमारची मदत घेतली.... पार्टीत सोनियाला मारायचा प्लॅन तयार केला.

पवनकुमार गावाला गेला होता, मी त्याला दोन दिवसांपूर्वीच बोलावून घेतलं आणि फार्महाऊसच्या शेवटच्या तीन नंबरच्या बेडरुममध्ये त्याची रहायची व्यवस्था केली. पार्टीच्या दिवशी तो डीजे ब्वॉय च्या वेषात होता. कारच्या डॅशबोर्डमधील रिव्हॉल्वर त्यादिवशी सायंकाळी पवनकुमारनं मला दिलं.. सोनिया पार्टीत आल्यानंतर‍ ज्या टेंटमध्ये तिनं सामान ठेवलं त्या टेंटची मागची साईड मी कैचीने कापून काढली होती. पार्टीत मी गुलशन आणि सोनियावर वॉच ठेवून होते.

रात्री पार्टीमध्ये मला गुलशन सोनियाच्या टेंटमध्ये जातांना दिसले आणि मी दोघांचं बोलणं एैकण्यासाठी टेंटच्या मागे लपून बसले... तेव्हा मला कळलं की सोनिया प्रेगनेंट होती.. गुलशन मला ड्रिंक्समधून झोपेच्या गोळया देणार होता. आणि दोघे रात्री फार्महाऊसच्या बेडरुममध्ये मजा करणार होते. मी सावध झाले रात्री जेव्हा गुलशननं मला झोपेच्या गोळया मिसळवलेलं ड्रिक्सं दिलं तेव्हा ते मी पिण्याचं नाटक करुन खिडकीच्या बाहेर टाकलं, आणि झोपण्याचं नाटक केलं.. गुलशननं मला झोपलेलं बघून ते सोनिया येणार होती त्या दोन नंबरच्या बेडरुममध्ये निघून गेले . मी लगेच उठले... पवनकुमारला मोबाईल मॅसेज केला आणि DJ चा आवाज वाढवायला सांगितला.. मी रिव्हॉल्वर सोबत घेतलं..‍ कोणी ओळखू नये म्हणून अंगावरुन शाल ओढून घेतली व टेंटच्या कापून ठेवलेल्या भागाने आत शिरले, सोनियाची पाठ माझ्याकडे होती, ती गुलशनला बेडरुममध्ये भेटायला जायची तयारी करत होती, मी हळूच आवाज दिला "सोनिया" ..आणि सोनियाचं दचकून फिरुन बघीतलं DJ चा आवाज अचानक वाढला गाणं सुरू होत "प्यार मे दिल के मार दे गोली ले ले मेरी जान" आणि मी लगेच गोळी झाडली.... तिला ओरडायला पण वेळ मिळाला नाही.. बंदुकीचा आवाज गाण्याच्या आवाजात दबला गेला. तिचा मोबाईल पायाने तुडवून मी लगेच आले होते त्याच मार्गाने टेंटच्या बाहेर पडले..रिव्हॉल्वरहुन बोटांचे ठसे मिटवले ,कुंडीत रिव्हॉल्वर टाकून दिलं आणि बेडरुममध्ये येवून झोपले"

"आणि ती बेडरूम च्या खिडकीखालील कुंडी कुणी हटवली" अमित बोलला

"मीच हटवली... काल जेव्हा इथून निघताना मी आवरायला घेतलं आणि माझं लक्ष अचानक त्या कुंडीकडे गेलं, मी घाबरले आणि घाईमध्येच ती कुंडी पाठीमागे नेऊन फेकली" मोनिका बोलली

“पण तु पवनकुमारला कां मारलं" अमित बोलला

सगळे आश्चर्याने मोनिका कडे बघायला लागले,

मोनिका गप्प

“आम्हाला इथल्या बेडरुममध्ये पवनकुमारचं प्रेत सापडलयं" विक्रम बोलला

मोनिकानं हताशपणे विक्रमकडे बघीतलं व बोलू लागली

“दोन्ही खूनांमध्ये मी पवनकुमारची मदत घेतली होती... पोलीस जर पवनकुमार पर्यंत पोहोचले असते तर माझी काही खैर नव्हती.. हा धोका ओळखून मी पवनकुमारला मारायचं ठरवलं.. काल पोलीस गुलशन आणि प्रविणला पोलीस स्टेशनमध्ये घेवून गेल्यानंतर पवनकुमार 3 नंबरच्या बेडरुममध्ये निघून गेला व तिथे लपून बसला. आम्ही सगळे इथलं आवरुन बंगल्यावर निघणार होतो.. मी लपूनच 3 नंबरच्या बेडरुममध्ये गेले, पवनकुमार दारु पीत बसला होता.... माझ्याकडे पर्समध्ये विषाची बाटली होती.. ते विष मी सोनियाला मारण्यासाठी घेतलं होतं.. पण नंतर डॅशबोर्ड मधल्या रिव्हॉल्वरने मारायचं ठरवलं. ते विष मी नकळत पवनकुमारच्या ड्रिंक्स मध्ये टाकलं, तो पिलेला होता.. माझ्याकडे शरीरसुखाची मागणी करायला लागला... मी त्याला आधी पॅग संपवायला सांगितला, तो ड्रिक प्याला आणि अर्ध्या मिनीटातच गतप्राण झाला. मी त्याचं प्रेत बाथरुममध्ये टाकलं आणि कडी लावून घेतली"

सगळे श्वास रोखून एैकत मोनिकाकडे बघत होते.

विक्रमनं मोनिका उर्फ पायल सोनीला हतकडी लावली.

00000

जरावेळानं ॲम्बुलस आली आणि पवनकुमारची डेडबॉडी PM साठी पाठविण्यांत आली.

विक्रम..अमित जवळ आला व बोलला "अमित.. तु मला फोनवर बोलला की मेरी फनार्डिंस ला अवश्य बोलावं, ती आली आहे.. तिला कशाला बोलावलय इथे.. तिचा तर काही रोल नाही या प्रकरणात"

“मेरी फनार्डिसला बोलवायचं कारण जरा वेगळं आहे"

अमित.. गुलशन चावला जवळ आला व बोलला

"गुलशन भाई, क्या है ये सब... पन्नासी आली आता.. छोडो यार ये सब... आता तरी जवळची मायेची मानसं ओळखा... जीवनात पैसा आणि ऐश सगळं काही नाही, पैसा बहोत बुरी चीज है पायल सोनी को मोनिका चावला बना देती है. उससे तीन तीन खून करवाती है.

आपसात जेव्हा मतभेद होतात तेव्हा मोनिका आणि सोनिया सारखे तिऱ्हाईत लोक संधीचा फायदा घेतात.., तुमच्या या चक्कर मुळे आज खूप मोठया संकटात सापडणार होता तुम्ही, सोन्यासारखी पत्नी आहे, सोन्यासारखा मुलगा आहे तुमचा, कहॉ इन चक्करोमे पडे हो यार.. तुमच्या वाईट काळात तुमची पत्नी‍ आणि मुलगाच तुम्हाला कामी येणार आहे बाकी कोणी नाही..हीच तुमची मायेची मानसं आहेत, मी त्यादिवशी मेरी कडे गेलो होतो.. तिचं आत्ताही प्रेम आहे तुमच्यावर... डिव्होर्स झाला असला तरी हॉलमध्ये तुमचा फोटो ठेवला आहे अजून...,खरं तर तुमच्या सुखासाठी .. तुमच्यावर असलेल्या प्रेमापायी तिनं तुम्हाला डिव्होर्स दिला.. प्रेम ओळखा‍ तिचं, झालं गेलं विसरुन मेरीचा स्विकार करा.., त्या पोराकडे बघा जरा, कां त्याला त्याच्या आईच्या प्रेमापासून पारखं करताय"

गुलशननं मेरी कडे बघीतलं.. तीचे डोळे पानावले ती खाली बघायला लागली..

अमित मेरी जवळ आला व बोलला "मेरी ताई.. झालं गेलं विसरा.. मानूस आहे.... चुकतोच... निदान प्रेमसाठी तरी एक व्हा.. आता जर तुम्ही एकत्र नाही आले तर गुलशन परत वाईट मार्गाला लागेल... सुबह का भुला है.. शाम को तो घर आना ही है... लेकीन शाम को घर मे आने के बाद कोई अपना चाहिए ना.. नही तो वो फिर भटक जायेगा"

गुलशन.. मेरीजवळ आला आणि हात जोडत बोलला "मेरी चुकलो मी.. मला माफ कर... मी नाही असलं काही करणार पुन्हा... परत ये मेरी, आपल्या प्रेम साठी..”

मेरी नं प्रेमकडे बघीतलं.. तो धावतच मेरीजवळ आला आणि तिच्या कुशीत शिरला

मेरीनं पानावलेल्या डोळयांनी गुलशनकडे बघीतलं आणि त्याला खूणेनं जवळ बोलावलं आणि मग तिघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली ..”

तिघांच्याही डोळयात अश्रृ होते..

अमितनं देवयानी कडे बघीतलं व बोलला "देखा मॅम.. हमारे महाराष्ट्र मे एैसा होता है... MP मे होता है ऐसा?

देवयानी भावूक होत बोलली "ग्रेट मिस्टर अमित"

अमितनं एक नजर तनयाकडे बघीतलं, ती पण भावूक झाली होती.

मेरी.. अमित जवळ आली व बोलली "थॅन्क यू मिस्टर अमित .. खरं तर आज इथे यायची माझी अजीबात इच्छा नव्हती.. पण आज इथे येणं माझ्यासाठी सरप्राईज ठरलं.. ते ही तुझ्यामुळे"

“आता सांभाळा यांना.. भटकू देवू नका...” अमित बोलला

“आता बांधून ठेवते चांगलं" ती हसत बोलली

गुलशनं नं अमितला मिठी मारली व बोलला "थॅन्क यू अमित"

"और हा गुलशनभाई रिव्हॉल्वर जैसी चीज डॅशबोर्ड मे रखने के लिये नही होती, उसे सेफ मे या लॉकर रखना चाहीये" अमित बोलला

"मेरे बाप की तौबा... अबसे नही रखुंगा"

गुलशन कांन पकडत बोलला.

00000

15 नोव्हेंबर

सकाळी 10.00 वाजता

भरारीच्या ऑफिसमध्ये अमित आपल्या कॅबिनमध्ये बसला होता.

भरारीच्या आजच्या अंकात सोनिया मर्डर मिस्ट्री संपूर्ण छापून आली होती.. आणि पेपरचा खप रेकॉर्ड ब्रेक होता.. एडीटर अमितवर खूष होते.

अमित भरारी वाचत बसला होता इतक्यात कॅबिनच्या दारातून चेहरा आत घेत तनया बोलली "मे आय कम इन सर"

“यस... ये. तुला कशाला परवानगी घ्यावी लागते"

“असं कसं. तुम्ही सर आहात माझे.” तनया आत कॅबिन मध्ये आली

आणि अमित.. सारखा तिच्याकडेच बघत होता. त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते.. तनयानं आज छान साडी घातली होती. खूपच सुरेख दिसत होती ती..

“काय झालं सर" तनया त्याला हरवलेला बघून बोलली

“तनु... काय अगं.. किती छान दिसतेय" तो बोलला आणि त्याच्या मनात आलं की छान तनयाला मिठी मारावी

तनया लाजली व गोड हसली आणि सोबत आणलेले दोन डबे टेबलवर ठेवले ब बोलली "मस्त छान इडली फ्राय आणि पुरण पोळी आणली आहे तुमच्यासाठी"

“wow... क्या बात है. किती दिवस झाले यार पुरण पोळी खावून. . तुला सांगतो तनु तुझ्या हातची पुरण पोळी इतकी बढीया असते ना.. जायफळ काय, वेलची काय.. देशी तूप काय. आहाहा..एक पुरण पोळी खाल्ली तरी झिंगायला होतंय... तोंडाला पाणी सुटलं माझ्या"

तनया हसली व बोलली "सर जरा उभे रहा ना"

“कां " अमित बोलला

“व्हा तर, सांगते"

अमित चेअरहून उठून उभा झाला आणि तनयाकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघायला लागला तनया बोलली "सर मिठीत यायचं आहे तुमच्या.... मे आय.”

आणि अमित काही बोलायच्या आतच ती पानावलेल्या नेत्रांनी अमितच्या मिठीत शिरली

“काय झालं अगं" अमित तिच्या पाठीहून हात फिरवत बोलला

“असचं, मनापासून वाटलं तुम्हाला मिठी मारावसं.. कालच्या success साठी.. खर तर मी काल खूप भावूक झाले होते. कालच मला मिठी मारायची होती तुम्हाला, पण..सगळे होते ना तिथे... काल मेरी आणि गुलशन ला एकत्र आणून जे तुम्ही केलं … त्यासाठी मिठीत यायचं होतं, आय लव यु अमित"

अमितनं तिला घट्ट मिठी मारली व बोलला "माझी राणी किती गोड आहेस अगं.. तनु, आता जेव्हा तु कॅबिनमध्ये आली ना तेव्हा.. तुला बघताच वाटलं की तुला छान मिठीत घ्यावं... प्रेमानं कुरवाळावं.. पण काय नसीब आहे बघ माझं... तु स्वत:च मिठीत आली माझ्या.. खूप सुंदर दिसतेय साडीत... फक्त एक कमी आहे"

“काय" तनया बोलली

“तुझ्या गळयात मंगळसूत्र.... तुला माहित आहे मग तु किती सुंदर दिसशील ते"?

तनया लाजली व तिनं आपला चेहरा अमितच्या कुशीत लपवला

अमितनं मिठी आणखी घट्ट केली व बोलला "आय लव यु टू डियर..."

जरावेळान दोघे एकमेकांच्या मिठीतून वेगळे झाले इतक्यात केबिनच्या दारावर टकटक झाली, तनया खुर्चीत बसली आणि अमित बोलला "यस.. कम इन"

 रामसिंग आत डोकावत बोलला "सर.. गुलशन चावला आणि मेरी चावला आपल्याला भेटायला आले आहे"

“ओके.. पाठव त्यांना"

“मी जावू बाहेर.. नंतर येते" तनया बोलली

“बैस अगं" अमित तिला थांबवत बोलला

गुलशन चावला आणि मेरी दोघेही आत आले, अमित जागेहून उठला .. गुलशनं त्याला मिठी मारली.. अमितनं त्यांना बसायला सांगून रामसिंग ला कॉफी आणायला सांगितलं

“और सुनाओ गुलशन भाई कैसे हो"

“दुआ है आपकी यार.. अमित काल जे तु केलसं ते.. कुणीही करु शकलं नसतं.. एक विनंती आहे.. , आम्हा दोघांनाही तुला काहीतरी दयायचं आहे गिप्ट म्हणून.. नाही म्हणू नको.. नाही तर आम्हाला खूप वाईट वाटेल" गुलशन मेरी कडे बघत बोलला

“तु मला काल मेरी ताई बोलला ना.. असं समजं माझ्या लहान भावासाठी गिप्ट आहे माझ्याकडून.. माझा मोडलेला संसार तु वाचवलास.. त्यासमोर हे काहीच नाही" मेरी बोलली

गुलशनंनं एक पॉकेट अमितच्या हातात दिलं

अमितनं ते पॉकेट हातात घेतलं.. व बोलला "शर्मिंदा कर रहे हो गुलशन भाई"

“नाही यार.. प्लीज नाही म्हणू नको"

अमित ते पॉकिट उघडायला गेला तर गुलशन बोलला "आता नको..आम्ही गेल्यावर उघड"

अमित हसला व त्यानं ते पॉकिट ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं"

आणि तनयाकडे बघत गुलशनला बोलला "गुलशनभाई ही माझी मैत्रीण आहे, तनया"

तनया त्यांच्याकडे बघून हसली ..

“जोडी सलामत रहे" गुलशन हसत बोलला "खुष रहो हमेशा"

मेरी बोलली "फक्त मैत्रीणचं आहे कां आणखी कुणी"

तनया लाजली …

मेरी बोलली "लग्नाला बोलवा आम्हाला"

रामसिंग कॉफी घेवून आला.

कॉफी पिऊन गुलशन आणि मेरी निघून गेले.

ते जाताच तनया बोलली "सर बघा ना काय गिप्ट आहे ते"

अमितनं ड्रॉवर मधून पॉकीट काढलं आणि आतील वस्तू बघून आर्श्चयानं उडालाच.. गुलशन चावला नं त्याला एक टूबिएचके फ्लॅट आणि एक मारुती कार गिप्ट केली होती, त्या पॉकेटमध्ये त्याच्या नवीन फ्लॅटची आणि गाडीची चाबी होती.

त्यानं ते गिप्ट तनयाला दाखवलं आणि तनयाला बोलला "आय कान्ट बिलीव्ह.. तनू त्यांनी मला नविन फ्लॅट आणि एक मारुती कार गिप्ट केली आहे..बडे लागो की बडी बाते"

“क्या बात है सर..” तनया जागेवरुन उठली व तिनं अमितला मिठीच मारली

“याला म्हणतात निष्काम केलेल्या कर्माचं फळं.. फळाची अपेक्षा न ठेवता कधीकधी आपल्या हातून एखादं चांगलं घडून जातं.... काल मेरी आणि गुलशनला एकत्र आणून मला खूप आनंद झाला होता"

“क्या बात है, मजा आहे सर तुमची आता.. नविन घर.. नविन कार"

“आणि आता बायको सुध्दा.. नविन" तो तनया ला जवळ घेत बोलला

तनया लाजली व बोलली "आता काय?

“चलो शादी वादी करते है.. चुन्नू और मुन्नी के मम्मी पापा बन जाते है "

“तुमचं आपलं काहीतरीच” तनया लाजत बोलली

00000

समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Sarjesh Welekar

Similar marathi story from Crime