after marriage
after marriage




शैलेश तलावाच्या संथ पाण्याकडे एकटक बघत होता, बघता बघता त्याचे डोळे भरुन आले,
आणि त्याच्या डोळयातून आसवाचा एक थेंब अलगद तलावाच्या पाण्यात टपकण पडला, इतक्यात शरयुनं त्याला आवाज दिला. “दादा हे घे आईसक्रिम"
त्यानं मागे वळून बघीतलं, शरयुच्या हातात दोन आईसक्रिम कोन होते, शैलेशचे पाणावलेले डोळे बघून तिच्या मनात कालवाकालव झाली ती लगेच बोलली "हे काय दादा, तुझे डोळे भरुन कां आलेत"
“काही नाही अगं, आईबाबांची आठवण झाली, आज ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता.
जरावेळ तीही गप्प झाली, तिचेही डोळे पाणावले ती बोलली "नको ना त्या आठवणी काढू, मलाही रडायला येते"
“शरयू येत्या काही दिवसातच तुझं लग्न होईल, सासरी जाणार तु, मग मी एकटा पडेल ना अगं, तुझी खूप आठवण येईल"
ती भारावल्या स्वरात बोलली "दादा आजपर्यंत तु मला खूप प्रेम दिलय ते अविस्मरणीय आहे माझ्यासाठी, आई बाबांची कधीच कमतरताच भासू दिली नाही, एकटा कसा राहणार तु, हीच काळजी मला ही आहे"
तो जरा वेळ गप्प राहला व नंतर बोलला "नको काळजी करु तुझं लग्न आटोपलं की पण करेल लग्न"
“रियली, कुणाच्या प्रेमात वैगरे आहेस काय" ती मिश्कीलपणे हसत बोलली
“नाही गं, असं काही असतं तर तुला नसतं काय सांगितलं"
00000
शैलेश आणि शरयू दोघे जुळे होते, त्यांच्यात फक्त सात मिनीटांचा फरक होता, त्यांना जन्म देताच ती माऊली देवाघरी निघून गेली होती. त्याचे बाबा रघुनाथ याचं पत्नी सरितावर खूप प्रेम होतं, सरिता गेल्याने ते खचले होते, आणि तिच्या विरहात त्यानी दारु प्यायला सुरवात केली होती, त्यातचं एकदिवस त्यांच अपघाती निधन झालं, त्यावेळी शरयु आणि शैलेश अवघ्या 13 वर्षाचे होते, त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला, आणि एक दिवस त्यांची आजीही त्यांना सोडून गेली, आणि ते दोघे एकाकी पडले होते, वडिलोपार्जीत संपत्ती असल्याने त्यांना पैशांची काही कमतरता नव्हती, दोघांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं, शैलेश हिंदूस्थान पेट्रोलियम मध्ये इंजिनिअर होता, तर शरयु रिझर्व्ह बँकेत जॉबला होती. शरयूचं तिच्याच बँकेतल्या निलेशवर प्रेम होतं, ही गोष्ट शरयुनं शैलेशला सांगितली होती, आणि शरयु आणि निलेशचं लग्न ठरलं होतं.
29 मार्च
आज शरयुचं लग्न होतं, शैलेशसाठी आनंदाचा दिवस होता, पण तितकाच दुख:चाही , त्याची प्रिय बहिण आज लग्न होवून सासरी जाणार होती, लग्नातील सर्व व्यवस्था त्याचे मित्रच बघत होते त्यामुळे त्याला काळजी नव्हती.
लग्नसोहळा अगदी व्यवस्थीत पार पडला, सासरी जातांना शैलेश आणि शरयू एकमेकांच्या कवेत शिरुन खूप रडले होते.. ते दृष्य बघणाऱ्यांचेही डोळे पाणावले होते.
00000
शरयुच्या लग्नाला एक महिना होत आला होता, तो एकाकी पडला होता, शरयुची आठवण झाली की तो उदास व्हायचा, शरयू वेळ मिळेल तशी ती निलेश सोबत त्याला भेटायला यायची, तेव्हा कुठे त्याचा चेहरा खुलायचा, शरयूला आनंदी बघून त्याला खूप बरं वाटायचं. कधी तो सुध्दा तीला भेटायला जायचा. शरयू होती तेव्हा त्याला घरकामाची काळजी नव्हती, पण आता त्याचं शेडयुल पुर्णपणे बदललं होतं, तो सकाळी लवकर उठून आंघोळ वैगरे आटोपून स्वत:करीता जेवन बनवायचा, वेळ असला तर एक दोन चपात्या खायचा, नाहीतर तसाच जेवनाचा डबा घेवून ऑफिसला निघायचा.. निसर्गपार्कच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये एका बिल्डींगमध्ये दुसऱ्या माळयावर त्याचा टूबीएचके चा लक्झरी फ्लॅट होता, त्याच्याकडे ऑफिसला जायला बाईक होती
25 एप्रिल
नेहमीप्रमाणे तो सकाळी 6.00 ला उठला, पण आज रविवार असल्याने त्याला रोजच्यासारखी घाई नव्हती. तो फ्रेश होऊन बाहेर निघणार इतक्यात डोअरबेल वाजली, त्यांन दार उघडलं, दारात त्याचा मित्र राज उभा होता, राज त्याच इमारतीत पहिल्या माळयावर रहात होता, त्याची तयारी बघून राज बोलला "कुठे बाहेर निघालास कां"
“दुध संपलय तेच आणायला निघालो होतो"
“नंतर आण, आधी बॅटमिंटन खेळूया चल"
“ठिक आहे"
रुम ला लॉक करुन दोघे, इमारतीच्या खाली हिरवळीवर बॅटमिंटन खेळायला लागले, जवळपास अर्धातास खेळल्यानंतर ते दोघेही तिथेच लॉनवर बसले.
“आज काय प्रोग्राम आहे" राज बोलला
“विशेष काही नाही, दोन चार ड्रेस, बेडसीट, पिलो कव्हर्स धुवायचे आहेत, मस्त जेवन बनवायचं, जेवायचं आणि टी.व्ही. बघत बसायचं" शैलेश हसत बोलला
“म्हणजे पुर्ण दिवसाची वाट लागली म्हणायची"
“तसं काही नाही, धुवायचे कपडे मी उठलो तेव्हाच भिजत घातले आहे, ते मशीनमध्ये लावणार, जेवन बनवायला मला जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास लागतो, आय थींक अकरा वाजेपर्यंत मी फ्री होईल"
“तेरे हाल मुझसे देखे नही जाते, तु जल्दी से शादी करले यार"
“कर लेंगे, जल्दी क्या है, यार शरयू होती तर घरात रौनक होती, आता भकास वाटतं"
“वाटणारचं तुम्हा बहिण भावंडाच प्रेम कसं झकास होतं"
“तुझी जानू काय म्हणते"
“हल्ली खूप काळजी घेते माझी"
“मजा आहे लेका, लग्नाच्या आधीच होणाऱ्या बायकोच्या घरी रहातो"
“माझ्या मामाचं घर आहे, आता मामाच्या पोरीसोबतच लग्न होणार आहे त्याला काय करणार"
दोघेही दुध घेवून शैलेशच्या रुमवर आले, राजला बसायला सांगुन त्यानं गॅसवर चहा ठेवला, व हॉलमध्ये राज जवळ येवून बसला व बोलला "तुझा काय प्लॅन आहे आज"
“अरे.. विसरलोच आपल्याला लग्नाला जायचं आहे सायंकाळी"
“कुणाचं लग्न आहे" शैलेशचा प्रश्न
“जानव्हीच्या मैत्रीणीच"
“अरे तुला माहित आहे, मी लग्नात वैगरे जात नाही कुणाच्या"
“अरे तु एकटा आहे ना, शरयू पण नाही म्हणून मला जानु बोलली की तुला पण घे सोबत"
“अच्छा, म्हणजे जान्हवी बोलली काय, ठिक आहे, मग तर यावेच लागेल"
यावेळी दुपारचे साडेबारा वाजले होते, शैलेश, पिटर इंग्लडच्या शोरुम मध्ये स्वत:करीता शर्ट बघत होता, अचानक त्याची नजर शोरुमध्ये एका ठिकाणी उभ्या असलेल्या पुजा कडे गेली, पुजा दिक्षीत दिसायला ब्युटीफुल, वय बावीस तेवीस च्या घरात असेल, त्याच्याच ऑफिसमध्ये कामाला होती,
पुजाची नजर शैलेशवर गेली व ती त्याला बघून गोड हसली, ती त्याच्या जवळ येत बोलली "हॅल्लो"
“हाय" तो हसत बोलला
“बरं झालं तुम्ही भेटलात ते" पुजा स्माईल देत बोलली
“का?
“मला माझ्या भावासाठी शर्ट घ्यायचा आहे, तुम्ही मदत करणार मला"
“मलाही तुमची मदत हवी होती शर्ट घ्यायला, मुलांपेक्षा मुलींची पसंत चांगली असते ना म्हणून"
“असं काही नसतं, तुमची शर्टच्या बाबतीत पसंत छान आहे"
“कशावरुन"
“तुम्ही ऑफिसला जे शर्ट घालुन येता ते बघते मी रोज" ती हसत बोलली
शैलेश हसला व बोलला "ओके आपण एकमेकांना मदत करुया"
“ठिक आहे चला
शैलेश आणि पुजाची खरेदी झाली व ते शोरुममधून बाहेर पडले
“चला आपण काहीतरी आईसक्रिम वैगरे घेवूया"
“ठिक आहे, चला"
दोघेही शोरुम च्या बाजुला असलेल्या आईसक्रिम पार्लर मध्ये जावून बसले, शैलेश बोलला
“आणखी, कोण कोण असतं तुमच्या घरी"
“एक लहान भाऊ आहे, आई बाबा, आज्जी आणि मी"
“अरे वा... ऑल इन द फॅमिली, लकी आहात"
ती हसली व बोलली "तुमच्याकडे कोण कोण आहेत"
“एकटाच असतो"
“कां, एकटाच कां"
“एक बहिण होती तिचं आत्ताच मागच्या महिन्यात लग्न झालं, आता एकटाच असतो"
“अच्छा म्हणजे, म्हणूनच तुम्ही मागच्या महिन्यात काही दिवस ऑफिसला नव्हता तर"
“होय"
“आणि आई बाबा"
“नाहीत, ते गेले, मी लहान असतांनाच"
“सॉरी" ती हळू आवाजात बोलली, जरा वेळ थांबून नंतर बोलली "मग खूप एकटं वाटतं असेल ना"
“वाटतं कधी कधी, शरयु होती तेव्हा छान वाटायचं"
“कोण शरयू"
“माझी बहिण, मागच्या महिन्यात लग्न झालं ती"
“ओह... आता कुठे असते ती.. म्हणजे तिचं सासर कुठे आहे"
“इथेच आहे रेशीमबागला"
दोघे आईसक्रिम खाऊन गप्पा मारत मारत आईसक्रिम पार्लरच्या बाहेर आले,
“रहायला कुठे असता" शैलेशचा प्रश्न
“नंदनवन ला"
“मी सोडू तुम्हाला बाईकवर "
ती हसली व बोलली "थॅन्कस्, मी प्लेझर सेाबत आणली आहे"
“ओ.के सी यु देन, हॅव अ गुड डे" शैलेश हसत बोलला
“ओ.के.”
ती हसली व दोघेही आपापल्या दिशेनं निघाले
जान्हवी किचनमध्ये जेवन बनवत होती, राज पाठीमागुन आला आणि तिला अलगद मिठी मारत बोलला "हाय जानु"
जान्हवी किंचीत किंचाळली व त्याच्या मिठीतून सुटत बोलली "बापरे, किती घाबरले मी, कितीदा सांगितलं आहे तुला, असं चोर पावलांनी यायचं नाही म्हणून" ती ओरडत बोलली
“मग काय ओरडत येवू,तु सावध होशील, मग मिठीत तरी येशील कां"
“अस्सं, मिठीत घ्यायचंय काय मला"
“सॉरी, बाबु बंशीलाल कुठाय"
“परत माझ्या बाबांना बाबु बंशीलाल बोललास"
“तो कोडवर्ड आहे माझ्या मामांचा"
“आई बाबा बाहेर गेलेत आताच, सकाळपासून कुठे गायब आहेस तु"
“सकाळी शैलेशकडे होतो, आणि नंतर मित्राकडे गेलो होतो"
“शैलेशला सांगितलं लग्नाला जायचं ते"
“सांगितलं आणि तो येणार आहे, आधी नाही बोलला, मग सांगितल की तु यायला सांगितल आहे, तेव्हा कुठे तयार झाला, हे बर आहे मित्र माझा आहे पण ऐकतो तुझं"
“शरयुचं लग्न झालं तेव्हापासून खूप एकाकी पडलाय रे, म्हणून बोलले तितकाच त्याचा विरंगुळा होईल"
ती बोलत होती आणि राज सारखा तिच्याकडेच बघत होता, राज तिच्याकडेच सारखा बघत आहे, हे तिच्या लक्षात आलं आणि ती बोलली "असा काय बघतोय"
“जरा इकडे ये ना"
“कशाला"
“ये तर, असा एकांत कधीतरी मिळतो ना" त्यानं तिला मिठीत घेतलं आणि तिच्या गालाचा किस घेणार इतक्यात शैलेश तिथे आला, दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले, राज त्याला आलेला बघून तोंडातच काहीतरी बडबडला, शैलेश बोलला "सॉरी, सॉरी मी काही बघीतलं नाही"
“दार वाजवून येता येत नाही काय रे" राज वैतागत बोलला
“दार कसं वाजवणार इथे कुठे दार आहे, किचनला पडदा आहे आता काय पडदा वाजवून येऊ" शैलेश बोलला
“बाहेरचं दार वाजवून येता येत नाही"
“ते उघडच आहे, बघ हवं तर, आणि मी कधी इथे दार वाजवून येत नाही, हवं तर विचार जान्हवीला"
राज हसला, व बोलला "ओ ..हो, बडा हॅण्डसम दिख रहा है, छावीला भेटायला गेला होतास की काय"
“माझी कुणी छावी नाही, बघ ना गं जानू, कसा बोलतोय ते" शैलेश मुद्दाम लाडीकपणे बोलला
“राज काय हे" जान्हवी हसत बोलली
“गंमत गं, मला माहित आहे याची कुणी छावी नाही ते"
“आणि असेल तर" शैलेश बोलला
“शक्यच नाही"
“कां"? शैलेश बोलला
“कारण एखादयाच्या आयुष्यात प्रेयसी येते तेव्हा त्याच्या बोलण्यांत, वागण्यात बराच फरक पडतो, आय थींक असा फरक तुझ्यात पडला नाही"
“कशावरुन"
“तु मुलींशी बोलतांना नेहमी लाजत बोलतो"
“त्यात काय झालं, तु आणि तुझी फिलॉसाफी.. मी हेच विचारायला आलो की सायंकाळी कधी निघायचं आहे लग्नाला, मी आता घरी जावून जेवन करुन मस्त झोपणार आहे"
“सहा वाजता निघूया" जान्हवी बोलली
“ओके कॅरी ऑन, तुम्हाला जे करायचं आहे ते करा आता, मी निघतो" तो हसतच निघाला
“तेरी तो " राज त्याच्या मागे धावला तसाच शैलेश पळत सुटला
सायंकाळी 6.40वाजता
शैलेश, यावेळी राज आणि जान्हवी सोबत रिंग रोडला, मॅरेज लॉनमध्ये होता. लग्न समारंभ आटोपला होता, राज आणि जान्हवी एकमेकांशी गप्पा मारण्यांत व्यस्त होते. शैलेशला जरा एकाकी वाटतं होतं, त्यामुळे तो लॉन मध्ये इकडे तिकडे फिरत होता, जेवन सुरु होते, राज आणि जान्हवीला सोडून त्याची जेवूही शकत नव्हता, म्हणून तो जेवनाचे एक एक मेनू बघत टाईमपास करत होता, यावेळी तो गुलाबजामुनच्या काऊंटरजवळ होता, तिथे गर्दी नव्हती त्याला गुलाबजामुन खायची इच्छा झाली. इतक्यात त्याला एक गोड आवाज एैकू आला "एस्क्युज मी"
त्यानं मागे वळून बघीतलं एक अतिशय सुंदर मुलगी एका हाताने ओढणी सावरत त्याच्याकडे बघत बोलत होती, तिच्या एका हातात जेवणाची प्लेट होती, तिच्या शेजारी सहा -सात वर्षाची छोटी मुलगी उभी होती, ती छोटी मुलगी एक वाटी घेवून उभी होती.
“यस" तो त्या सुंदर मुलीकडे बघत बोलला
“जरा या वाटीमध्ये दोन गुलाबजामुन टाका ना प्लीज" ती हसत बोलली
शैलशनं दोन गुलाबजामुन त्या छोटया मुलीच्या वाटीत टाकले, आणि ती सुंदर तरुणी "थॅन्कस्" म्हणत त्या छोटया मुलीसोबत निघून गेली, शैलेश तिला जातांना एकटक बघतच रहाला होता.
लॉनमध्ये एका ठिकाणी चेअरवर बसुन पुजा आणि सोनाली गप्पा मारत होत्या, गप्पा मारता मारता अचानक तिचं लक्ष शैलेशकडे गेलं जो लॉनमध्ये फिरत होता, शैलेश इथेही तिला भेटेल असा विचारही तिच्या मनात आला नव्हता, ती त्याच्याकडे बघायला लागली, सोनालीची नजर तिच्या नजरेचं अनुकरण करत शैलेशवर येवून थांबली "कोण आहे गं तो" सोनाली बोलली
“कोण" पुजा बोलली
“ज्याच्याकडे तु बघत आहेस"
“ते, माझ्याच ऑफिसला आहेत"
“छान स्मार्ट आहे, माझी ओळख करुन दे ना त्याच्याशी"
“कशाला" पुजा तिच्यावर डोळे काढत बोलली
आणि शैलेशचं लक्ष त्याच्याकडे बघण्याऱ्या पुजाकडे गेलं, आणि तो हसत हसतच पुजाजवळ आला व स्माईल देत बोलला "हॅल्लो, सरप्राईझ, we meet again”
“यस, लग्न होतय ती मिनाक्षी माझी मैत्रीण आहे" पुजा बोलली
“मी माझ्या मित्रासोबत आलोय"
“मग कुठाय तुमचा मित्र" पुजा हसत बोलली
“तो त्याच्या गर्लफ्रेंड सोबत आहे"
“मग तुमची गर्लफ्रेंड कुठाय" सोनाली मध्येच बोलली
“मला गर्लफ्रेंड नाही" तो हसत बोलला "हया कोण आहेत" त्याचा पुजाला प्रतिप्रश्न
“माझी मैत्रीण आहे सोनाली, आणि सोनाली हे मिस्टर शैलेश आम्ही एकाच ऑफिसला आहोत"
“नाईस मिटींग यु" सोनालीनं हात पुढे केला
शैलेशनं तिच्याशी हात मिळवला व बोलला "एन्जॉय देन, सी यु" आणि तो दुसरीकडे निघून गेला
तो जाताच पुजानं सोनालीला चिमटा काढला व बोलली "काय चाललय तुझं, त्याला गर्लफ्रेंड बद्दल विचारयची काही गरज होती"
“सहज गं गंमत म्हणून, पुजा तुझा चेहरा बघ कसा खुललाय ते"
“काहीतरीच काय" ती लाजत बोलली
“लुक ॲट मी.......” सोनाली हाताने तिचा चेहरा वर करत बोलली "काहीतरी गडबड नक्कीच आहे"
“काही गडबड बैगरे नाही"
“तुझा चेहराच सांगतोय, ये सांग ना "
“सोना, तु समजतेस तसं काही नाही"
“मी काय समजते? तीचा मिश्कील प्रश्न
“मला नाही माहित चावटपणा बंद कर"
“पुजा, गर्लफ्रेंडचं नांव काढल्याबरोबर तो कसा मस्त लाजला बघ, मस्त आहे, जमवून टाक"
“तुझं आपलं काहीतरीच" ती जरा लाजली
“ठिक आहे, तुला नको असेल तर माझं तरी जमवून दे" सोनाली हसत बोलली
“काय"
“मला तर पसंत आहे"
“सोना, काय हे, शर्म नही आती तुझे"
“हाय.. आती है लेकीन एैसे हॅन्डसम लडके देखके पता नही कहॉ चली जाती है, ये पुजा खरं सांग ना तो तुला आवडतो ना"
पुजा लाजली व तिनं हलकेच होकारार्थी मान हलवली, त्यावर सोनाली अगदी खळखळुन हसली व बोलली " ये मग लवकर जमवून टाक ना, हल्ली चांगली मुलं मिळतात कुठे"
“माहित आहे"
“मग आजुबाजु मत देख आय लव यु बोल डाल"
“सोना... काय हे, मी कसं बोलणार त्यांना माझ्याने नाही होणार"
“मग मी सांगु काय"
“चावटपणा बंद कर"
00000
शैलेशची नजर लॉन मध्ये त्या गुलाबजामुन काऊंटर जवळ आलेल्या सुंदर मुलीला शोधत होती, ती त्याला कुठं दिसत नव्हती, तो राज आणि जान्हवी जवळ आला, तिथे येताच त्याला सुखद धक्का बसला ती गुलाबजामुन काऊंटर जवळ त्याला भेटलेली तरुणी, जान्हवी सोबत गप्पा मारत होती, शैलेशला बघताच राज बोलला "काय रे कुठे भटकतोय केव्हापासून शोधतोय तुला"
“इथेच तर आहे, तुम्हा दोघांना डिस्टर्ब नको म्हणून जरा इकडे तिकडे फिरतोय, काय रे जानू सोबत गप्पा मारतेय ती कोण आहे"
“मैत्रीण आहे माझी आणि जानूची, थांब तुझी ओळख घालून देतो"
राज आणि शैलेश तिथून जवळच गप्पा मारत असलेल्या त्या दोघींजवळ आले "एस्क्युज मी गर्लस" राज बोलला
“यस" जान्हवी वळून बोलली
“मुलींनो जेवायचं नाही काय, मला भुख लागली आहे" राज बोलला
“ऑफ कोर्स जेवायचं आहे" जान्हवी हसत बोलली
शैलेश मात्र जान्हवी सोबत उभ्या असलेल्या त्या सुंदर मुलीकडेच बघत होता, ही गोष्ट राजच्या लक्षात आली व तो बोलला "वैदेही हा माझा मित्र शैलेश, आणि शैलेश ही माझी आणि जानूची खास मैत्रीण वैदेही"
“हाय" शैलेश तिच्याकडे बघत हसत बोलला
“हॅलो, आता मला जेवणाच्या काऊंटरला भेटले ते तुम्हीच ना" वैदेही बोलली
“होय" शैलेश हसत बोलला
“म्हणजे तु जेवली सुध्दा" जान्हवी वैदेही ला बोलली
“हो, आणि आता घरी निघाले सुध्दा" वैदेही बोलली
“इतक्या लवकर, जरा थांब ना मग मिळूनच निघुया" राज बोलला
“सॉरी, थांबले असते, आईला बरं नाही, मला निघायला हवं"
“कायं झालं, काही सिरीयस मॅटर तर नाही ना" जान्हवी बोलली
“नाही, इतकं काही नाही, ओके सी यु देन, मी निघते"
आणि वैदेही तिथून निघाली
ती निघून गेली पण शैलेश तिच्यातच हरवला होता
वैदेही तिथून जाताच शैलेश बोलला "राज तुझी ही मैत्रीण आज मला पहिल्यांदाच दिसली, मला माहित नव्हतं, इतकी छान तुझी मैत्रीण आहे ते"
“इतकी छान.... म्हणजे तुला आवडली वाटते"
“असं वाटतं"
“कसं वाटतं"
“मी प्रेमात पडलोय हिच्या, मला आवडली, तुझी ही मैत्रीण काय करते रे"
“एम.बी.ए. करतेय"
“नाईस, राज माझं जमवून दे ना हिच्याशी"
“काय" आतापर्यंत ऐकत असलेली जान्हवी बोलली "हे बघ शैलेश ती तशी मुलगी नाही, सालस आहे अगदी"
“तशी म्हणजे" राज बोलला "माझा हा मित्र तसा आहे का? लाखात एक आहे"
“मला अशीच मुलगी पाहिजे" शैलेश बोलला
“तिच्यामागे टाईम वेस्ट करण्यापेक्षा तु दुसरी बघ, ती प्रेम बिम करण्याच्या भानगडीत पडणार नाही"
“प्रेम तर झालय, मला लग्न करायचं आहे हिच्याशी"
“काय? हा तर गेला कामातनं" जान्हवी बोलली
“तुला लग्न करायचं आहे वैदेही सोबत, समजले हो गया" राज बोलला
“क्या हो गया, इतकं सोपं आहे कां" जान्हवी बोलली
“प्लीज जान्हवी, मला लग्न करायचं आहे वैदेही सोबत" शैलेश बोलला
जान्हवी जरावेळ विचार करुन बोलली "तुझ्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे, राज लाग कामाला" जान्हवी बोलली
“ये हुयी ना बात, शैलेश तु आता काळजीच सोड, तुझं लग्न वैदेही सोबत लावून देणारच"
“खरच" शैलेशचा चेहरा खुलला होता
00000
रात्रीचे साडेअकरा वाजायला आले होते, पुजाला झोप येत नव्हती, ती सारखी शैलेशचा विचार करत होती, तिच्या कानात सोनालीचे शब्द घुमत होते "आजुबाजु मत देख आय लव यु बोल डाल"
तिनं डोळे मिटून घेताच शैलेशचा हसरा चेहरा तिच्या डोळयासमोर आला, तीच्या चेहऱ्यावर स्माईल आलं होतं.
26 एप्रिल
जान्हवीच्या घरी एका छोटयाश्या पार्टीचं आयोजन करण्यांत आलं होतं, अर्थात ही पार्टी राज ने आयोजित केलेली होती. या पार्टीला त्यांन वैदेहीला बोलावलं होतं, घरी पार्टी असल्याने जान्हवीचे आईबाबा नाटकाला गेले होते.
सायंकाळचे साडेसात वाजले होते, वैदेही अद्याप आलेली नव्हती, शैलेश कधीचा तिची वाट बघत बसला होता.
जरावेळानं वैदेही आली अन शैलशचा चेहरा खुलला, लाईट ऑरेंज कलरच्या अनारकली ड्रेसवर ती अतिशय सुंदर दिसत होती, शैलेश तिच्या क्युट चेहऱ्याकडे सारखा बघत होता, तिचं साध सोज्वळ रुप त्याला वेड लावून गेलं होतं. वैदेहीनं एक नजर शैलेशकडे बघीतलं आणि स्माईल दिली, तो ही हसला.
वैदेही येताच जान्हवीला बोलली "कशाबद्दल ट्रिट ठेवली आहे"
“तु बैस तर आधी, सांगते"
वैदेही बसली, त्याठिकाणी राज, जान्हवी, शैलेश आणि वैदेही हे चौघेच होते.
“अग, बरेच दिवस झाले आपण गेट टुगेदर केलं नव्हतं, म्हटलं चला आज करावं, त्याला कारणही तसचं आहे" जान्हवी बोलली
“काय कारण आहे" वैदेही हसत बोलली
जान्हवीनं आतून एक केक आणला व टीपॉय ठेवला आणि बोलली "जस्ट सिलेब्रेट, सिलेब्रट करायला काही कारण लागंत काय" ती हसत बोलली
जान्हवीनं केक वैदेहीला कापायला सांगितला, वैदेहीनं केक कापला, आणि मग चौघांनी मिळून केक आणि गरम गरम समोसे संपवले.
“वैदेही, तुला काही विचारायचं आहे" राज बोलला
“विचार ना"
“हा माझा मित्र आहे, शैलेश, परवाच तुझी त्याच्याशी ओळख घालून दिली आहे, हा हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये इंजिनियर आहे, इथेच दुसऱ्या माळयाला स्वत:चा फ्लॅट ही आहे"
“नाईस, so what? ती हसत बोलली
“तु, हयाला पहिल्याच नजरेत आवडली आणि याला तुझ्याशी लग्न करायचं आहे"
“काय" वैदेही आश्चर्याने ओरडलीच
“काय झालं" राजचा प्रश्न
“सॉरी, माझ्यासाठी हे सगळं अनपेक्षीत आहे" वैदेही बोलली
“घाई नाही वैदेही, you take your own time, मला माहित आहे, तु योग्य तोच विचार करतील"
“सॉरी, पण मला विचार करायला वेळ हवा आहे" वैदेही बोलली
आत्तापर्यंत गप्प असेलली जान्हवी बोलली "वैदेही हयानं तुला त्यादिवशी लग्नात बघीतलं आणि तो तुझ्या प्रेमात पडलाय, त्याचदिवशी हा आम्हाला बोलला की, तुझ्याशी लग्न करायचं आहे, खरं तर त्यासाठीच आजची ट्रिट ठेवलीय, सॉरी"
वैदेही काही बोलणार होती तेवढयात शैलेश तिच्यासमोर आला व बोलला "वैदेही, खरचं मी तुझ्या प्रेमात पडलोय, तु हवा तितका वेळ घे, पण हे विसरु नको की हा माझ्या जीवनाचा प्रश्न आहे"
वैदेहीला काय बांलावं काही कळत नव्हतं, ती गप्पच होती.
राज थोडयावेळापूर्वीच वैदेहीला तिच्या घरी सोडून आला होता, शैलेशच्या मनात चलबिचल सुरु होती, वैदेहीनं नकार दिला तर, त्याचं मन खिन्न झालं. शैलेशला नर्व्हस बघून राज बोलला "काळजी करु नको, सगळं होईल ठिक, तुझं लग्न वैदेहीसोबत लावून देण्याची जबाबदारी माझी, हा माझा शब्द आहे तुला, मी तिच्या घरच्यांशी बोलेल तुझ्यासाठी"
शैलेशला त्याच्या बोलण्याने धिर आला होता तो बोलला “खरचं तु करशील माझ्यासाठी इतकं"
“डोन्ट वरी, तु राज का दोस्त है ये हमेशा याद रखना, और राज के लिए नामुमकीन कुछ भी नही"
वैदेही घरी आली पण तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं, ती शैलेशबद्दल विचार करत होती, काय कराव तिला काही सूचत नव्हतं, शैलेश दिसायलाही सुंदर होता, जॉब ही छान होता, पण अचानक लग्न, घरचे काय म्हणतील, रुपालीचं लग्न व्हायचं आहे अजून, तिच्या डोक्यात नानाप्रकारचे प्रश्न होते, ती कमालीची अस्वस्थ झाली, काय करावं काय नाही या विवंचनेत असतांना तिची मोठी बहिण रुपाली तिथे आली व बोलली "काय गं, अशी काय चेहरा पाडून बसली आहेस, तब्बेत तर ठिक आहे ना"
“काही नाही गं, जरा डोकं दुखतय"
“ये इथे माझ्या मांडीवर डोकं ठेव, छान चोळून देते"
आणि वैदेहीनं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं, आणि डोळे मिटून घेतले, रुपाली हळुवारपणे तिच कपाळ चोळायला लागली.
27 एप्रिल
रात्रीचं जेवण आटोपलं आणि शैलेश आवराआवर करुन जान्हवीकडे पहिल्या माळयावर आला, वैदेहीनं काय उत्तर दिलं, याची उत्सुकता त्याला होती, आज दिवसभर त्याचं लक्ष ऑफिसमध्ये कामातही लागलं नव्हतं. जान्हवी त्याला घेवून ओपन टेरेसवर आली "काय झालं" शैलेश बोलला
“शैलेश एक बॅड न्युज आहे, वैदेही लग्नाला नाही बोलली"
“काय?, पण कां"
“ते तिनं सांगितलं नाही, मी तिला कन्व्हेन्स करायचा खूप प्रयत्न केला पण ती एैकायला तयार नाही"
“जान्हवी, मला बोलायचं आहे तिच्याशी, माझी एकदा भेट घालून दे तिच्याशी"
“ती कदाचीत भेटायला तयार होणार नाही, मी एक करु शकते, तिचा फोन नंबर देवू शकते"
जान्हवीनं त्याला वैदेहीचा फोन नंबर दिला व बोलली "सॉरी शैलेश"
“तु कशाला सॉरी बोलतेस यार, तु तुझे प्रयत्न केले, थॅन्क्स जान्हवी"
“कधी फोन करशील तिला"
“तु सांग कधी करु"
“सायंकाळी सहाच्या नंतर, ती पाचला काम्प्युटर क्लासला जाते, सहाला क्लास सुटल्यानंतर ती फोनवर बोलु शकेल तुझ्याशी"
“ओके थॅन्क्स, जान्हवी"
जान्हवीच्या घरुन शैलेश आपल्या फ्लॅटवर आला, जरावेळानं राज तिथे आला. त्याचा उतरलेला चेहरा बघून बोलला "काय झालं"
“वैदेहीनं नकार दिलाय"
“माहित आहे, जानू बोलली मला आत्ताच"
“आता काय करायचं"
“तिचा मोबाईल नंबर घेतलाय ना, जानूनं सांगितल्याप्रमाणे तिला सायंकाळी सहाच्या नंतर फोन कर व शुक्रवारी तलावाशेजारी बोलाव भेटायला"
“ती येईल तिथे भेटायला ?"
“येईल, तिचा कॉम्प्युटर क्लास शुक्रवारी तलावापासून जवळच आहे, तु जरा इमोशनल होऊन बोल तिच्याशी"
“ओके"
“आणि भेटायचं नक्की झालं की मला लगेच कळवं"
“ठिक आहे"
00000
28 एप्रिल
सायंकाळी 6.05 वाजता
शैलेशनं मोबाईलवरुन वैदेहीला फोन लावला, यावेळी तो शुक्रवारी तलावाजवळ होता
जरावेळ रिंग वाजल्यानंतर "हॅलो कोण?” पलीकडून वैदेहीचा आवाज
“वैदेही.... मी शैलेश, मला भेटायचं आहे एकदा"
“मी माझा निर्णय सांगितला आहे, जान्हवीजवळ, ती तुम्हाला बोलली असेलच"
“प्लीज, वैदेही मला तुझ्याशी बोलायचं आहे थोडं"
“ठिक आहे बोला"
“मला जे बोलायचं आहे ते कदाचीत मी फोनवर नाही बोलू शकणार"
“मग"
“आपण भेटून बोलूया कां"
“तुम्ही फोनवर पण बोलू शकता, त्यासाठी भेटायची काय गरज"
“प्लीज वैदेही, फक्त एकदा भेट, असं समजं माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे"
ती जरावेळ गप्प राहली व नंतर बोलली "ठिक आहे, कुठं भेटायचं आहे"
“शुक्रवारी तलावाजवळ मी तुझी वाट बघतोय"
“ठिक आहे, येते मी दहा मिनीटात"
“thanks vaidehi thank you so much”
शैलेशनं लगेच राजला मोबाईल वर कॉन्टॅक्ट केला व बोलला "राज....”
“बोल"
“वैदेही भेटायला तयार झाली, ती येतेच दहा मिनीटात, शुक्रवारी तलावाजवळ"
“ओके बेस्ट ऑफ लक"
“काय सांगु तिला, मला तर जाम टेंशन आलय"
“तु टेंशन घेवू नको, जरा मन मोकळं कर तिच्याजवळ, सगळ ठिक होईल, तुझं लग्न तिच्यासोबतच होईल, आय प्रॉमिस"
“थॅन्कस् राज, तु खूप धिर देतोय मला"
सव्वा सहा वाजता वैदेही आली, त्याला खूप बरं वाटलं
तिथे पारावर दोघे बसले, ती बोलली "सॉरी मला यायला उशीर झाला काय"
“नाही, मी पण आत्ताच आलो"
“बोला"
“तु लग्नाला नकार का दिला"
“होकार पण कसा देणार, मला शिकायचं आहे, मला एमबीए पुर्ण करायचं आहे, जॉब करायचा आहे"
“बस एवढसं कारण, हे तु लग्नानंतरही करु शकते, कां मी तुला हे करु देणार नाही असं वाटतं तुला"
“नाही तसं नाही, माझी काही स्वप्न आहेत, एकदा कां संसाराला लागलं की मला नाही वाटतं मी हे सगळं करु शकेल"
“असा निगेटिव्ह विचार कां करतेस, आपण मनात आणलं की कुठलीही गोष्ट कधीही करु शकतो, फक्त मनाची तयारी पाहिजे, आपली स्वप्न साकार करणं हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं"
“कदाचीत तुम्ही बोलतायं ते खरंही असेल, पण मी आत्ताच लग्न नाही करु शकतं, आणि तसंही माझी मोठी बहीणही आहे लग्नाची, मी कसा माझ्या लग्नाचा विचार करु, सॉरी"
“तुला घरी सांगायची आवश्यकता नाही, तु फक्त लग्नाला होकार दे, बाकी सगळं आम्ही बघतो"
“नाही, माझा निर्णय झाला आहे, आणि माझ्या घरापर्यंत ही गोष्ट जायलाच नको मुळात"
“वैदेही प्लीज, खूप प्रेम करतो की मी तुझ्यावर, आता मी तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही करु शकत नाही" त्यानं तिचा हात हातात घेतला व विनवणीच्या स्वरात बोलला, जरावेळासाठी ती सुध्दा भावूक झाली, पण लगेच स्वत:ला सावरत तिनं हात सोडवून घेतला व बोलली "सॉरी"
आणि ती निघून गेली त्याच्या भावनांचा विचार न करता.
तो तिथेच बसुन होता, त्याचं डोकच काम करत नव्हतं, काय करावं ते त्याला सूचत नव्हतं, आणि मग त्याचे पाय आपोआपच बियर बार कडे वळले.
रात्री 10.30 वाजता
शैलेश बियर बार मधून बाहेर पडला तेव्हा तो unbalance होता. बाहेर पडताच पाठीमागून राज नं त्याच्या खांदयावर हात ठेवला, शैलेश त्याला बघून काही बोलायच्या आतच तो बोलला
“झालं पिऊन, की आणखी प्यायची आहे"
तसाच तो राजच्या कुशीत शिरुन ढसाढसा रडायला लागला व बोलला "ती नाही बोलली यार"
“रिलॅक्स बेटा, सब ठिक हो जायेगा"
“क्या खराबी है मुझमे, वो क्यू …. नही बोली यार" तो लडखडत बोलला
“खराबी ये है की तु बहोत जल्दी इमोशनल हो जाता है,शैलेश काय हे, तुझ्यासारख्यानी असं करावं, कधी दारुचा ग्लास हातात घेतला नाही, आणि आज चक्क टाईट झालास" राज त्याच्या पाठीहून हात फिरवत बोलला
“ती नाही बोलली यार, माझ्या भावनांची काही पर्वा नाही... ती नाही कां बोलली यार"
“आता बस झालं यार, तुझी कॅसेट बंद कर आता"
“ती नाही बोलली यार, आय स्वेअर राज, वो मुझे नही मिली तो मै अपनी जान दे दूंगा"
“ये गप रे, जीव काय एवढा स्वस्त वाटला का तुला, साला छटाकभर पिऊन एक किलो अंगात आणतो, तु खूप इमोशनल आहे यार, मर्द बनके जिना सीख अपने जैसा, दो चार दिल पॉकेट मे लेके घुम ना मेरे जैसा, साला एक टुट भी गया तो गम नही"
“आय लव हर... आय कान्ट फरगेट...”
“चल अब घर भाई, बहोत हो गया, मी पण बघतो ती लग्नाला कशी तयार होत नाही ते"
राज त्याला घेवून घरी आला तेव्हा रात्रीचे अकरा वाजले होते, त्याला बेडरुम मध्ये झोपवून राजही तिथेच त्याच्या घरी झोपला"
29 एप्रिल
शैलेश झोपून उठला तेव्हा सकाळचे नऊ वाजायला आले होते, त्याचं डोकं जाम दुखत होते, तो डोक पकडून बेडवर तसाच बसला, त्याच्या डोळयावर अद्यापही झापड होती, तो बाथरुम मध्ये शिरला आणि एक बादली थंड पाणी डोक्यावर ओतलं आणि तसाच शॉवर खाली बसला. जरा वेळानं तो फ्रेश होवून बाथरुम मधून बाहेर आला, राज सोफ्यावर मिड डे वाचत बसला होता, शैलेश बाथरुम च्या बाहेर आलेला बघून तो बोलला "झालास थंड"
“सॉरी यार, काल जरा....”
“हे बरं आहे तुझं, मी इतक्या वेळा तुला माझ्यासोबत पिण्यासाठी फोर्स करतो, तेव्हा ग्लासही हातात घेत नाही, बोलतो मला वासही सहन होत नाही, आणि काल बरा गटागटा पीत होता"
“तुला कसं माहित मी गटागटा पीत होतो ते"
“तुझ्या मागच्या टेबलवर बसलो होतो मी"
“काय?, मग मला कंपनी कां नाही दिली"
“नव्हती दयायची कंपनी, मला बघायचं होतं माझा मित्र एकटा दारु कसा पितो ते"
“कमाल आहे तुझी यार, तेव्हाच, मी बारच्या बाहेर पडल्याबरोबर तु माझ्या मागे आलास"
“करेक्ट"
“ये मी काल रात्री काही चुकीचं बोललो असल्यास सॉरी यार"
“नाही तसं काही नाही,... काय बोलणं झालं तिच्यासोबत मला सविस्तर सांग"
शैलेशनं तिच्यासोबत झालेलं सगळं बोलणं, राजला जसच्या तसं सांगितलं"
“असं आहे तर" राज बोलला
“जीवनात पहिल्यांदा कुणीतरी इतकं आवडलंय मला, आता तिच्याविना जगण्याची कल्पनाही करु शकत नाही"
“ओके, आय प्रॉमिस तुझं लग्न वैदेहीसोबतच होईल, त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल"
“मला नाही वाटतं ती लग्नाला तयार होईल" शैलेश हताशपणे बोलला
“ते माझ्यावर सोड मी कन्वेन्स करतो तिला"
“खरचं ती लग्नाला तयार होईल काय रे"
“यु डोन्ट वरी, तु माझ्यावर सोड, माझ्या डिक्शनरी मध्ये अशक्य असा शब्दच नाही"
शैलेश त्याच्याकडे बघतच रहाला.
राज, फोटो स्टुडीओ मधून बाहेर पडला, त्याच्या हातात एक फाटोचा अल्बम होता, त्यानं पुर्ण फोटो बघीतले, त्याच्या मोबाईल मधील काही आवडत्या फोटोंचा त्यानं अल्बम बनवला होता, त्यात बरेच फोटो त्याचे आणि जान्हवीचे होते, त्यात फक्त शेवटचे तीन/चार फोटो वेगळे होते, त्यानं ते फोटो अल्बम मधून वेगळे काढले व एका वेगळया पॉकिटात ठेवले, पॉकीट खिश्यात ठेवून तो बाईकने तिथून निघाला
जरावेळात त्याची बाईक वैदेहीच्या घरासमोर थांबली
बाईक पार्क करुन त्यानं डोअरबेल वाजवली, दार वैदेहीनं उघडलं, तिला बघताच तो बोलला "हाय"
“हाय कसा आहेस" ती बोलली
“मी ठिक आहे, आणि तु...”
“मी पण मजेत आहे, तु बैस मी जरा चक्कीवर दळण ठेवून आले लगेच"
“हाय राज" रुपाली हॉलमध्ये येत बोलली "“अगं तो आलाय ना, तु बस त्याच्याशी गप्पा मारत, दळण मी ठेवून येते"
“हाय, मी ठेवून येवू कां दळणाचा डबा चक्कीवर" राज बोलला
“गप्प बैस" ती हसली आणि डबा तिनं रुपालीच्या हातात दिला.
डबा घेवून रुपाली बाहेर निघाली तोच राज बोलला "आई कुठाय"
“ती शेजारच्या काकूकडे गेली आहे, गप्पा मारायला"
वैदेहीनं त्याच्यासाठी पाणी आणलं आणि बोलली "काय घेणार.. त्यापेक्षा तु जेवनच करुन जा ना"
“नाही, नको तु बैस मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे"
“मला माहित आहे तु शैलेशबद्दल बोलशील"
“तु बैस तर आधी"
ती त्याच्या समोर सोफा चेअरवर बसली
“आता सांग कां नाही बोलतेस लग्न करायला"
“आहेत माझे काही वैयक्तीक प्रॉब्लेम, जे मी शैलेशला सांगितले आहे"
“मला सांगितले आहेत शैलेशनं, पण हे काही प्रॉब्लेम्स नाहीत, हे बघ कधीतरी तुला लग्न करायचंच आहे, मग आता कां नाही, शैलेशसोबत कां नाही, आणि तसंही तुझं बाहेर कुणाशी अफेअर वैगरे नाही हे मला चांगल माहित आहे"
“राज, तुला माहित आहे, पप्पांचा जॉब प्रायवेट आहे, दिदी सुध्दा जॉब करतेय, तिचं लग्न व्हायचं आहे अद्याप. मला पण माझ्या कुटूंबासाठी हातभार लावायचा आहे, मलाही जॉब करायचा आहे"
“मान्य आहे, लग्न झाल्यावर जॉब करायला शैलेश तुला नाही बोलणार आहे काय"
“नाही, राज प्लीज मला कन्वेन्स करायचा प्रयत्न करु नको, माझा निर्णय झालाय"
“घरच्यांशी मी बोलू काय"
“नाही नको हा विषय घरच्यांपर्यंत नको जायला"
“वैदेही परत एकदा विचार कर, शैलेश खूप चांगला आहे, तो तुझ्यावर कसल्याही प्रकारची बंधन लादणार नाही, तु जॉब करुन आई वडीलांची मदतही करु शकतेस, हवं तर मी शब्द देतो त्याच्या वतीनं"
“राज, मी निर्णय घेतलेला आहे, आणि मला नाही वाटतं तो मी बदलणार"
“ओके, मग माझा नाईलाज आहे" राजनं पॉकिटमधून दोन फोटोग्रफ्स काढले, वैदेही समोर ठेवले, फोटो बघून वैदेही चक्रावली, ते शुक्रवारी तलावाजवळचे फोटो होते, एका फोटोमध्ये शैलेश आणि वैदेही एकमेकांसोबत बोलत होते, दुसऱ्या फोटोमध्ये शैलेशनं वैदेहीचा हात हातात घेतला होता.
फोटो बघून ती ओरडली "हे काय आहे राज"
“मला वाटते हे दोन फोटो बस झाले तुझ्या घरच्यांना दाखवायला"
“काय? काय बोलतोस तु हे"
“लग्न तर तुमचं नंतरही होईलच हे प्रेमप्रकरण घरी माहित झाल्यावर"
“अच्छा म्हणजे असा डाव होता तर, मला मुद्दाम बोलावलं ना तिथे शुक्रवारी तलावाजवळ, हे फोटो काढायचे होते म्हणून"
“हवं तर तसच समज"
“मॉय गॉड राज, तु माझा मित्र आहेस तु असं कसं करु शकतो माझ्यासोबत"
“शैलेश माझा मित्र आहे, आणि मी त्याच्यासाठी काहीही करु शकतो, माझ्या नजरेसमोर त्यानं त्याचं आयुष्य बरबाद केलेलं मला चालणार नाही, तो कधी दारुला स्पर्शही करत नाही, तु लग्नाला नाही बोलली तर, तो काल दारु पिऊन आला"
“काय"? तु मला ब्लॅकमेल करतोय"
“काल शैलेशची जी अवस्था होती, ती माझ्याने नव्हती बघवत, तुझ्याशी लग्न नाही झांल तर माझा मित्र आयुष्यातून उठेल"
“आणि तरीही मी लग्नाला नकार दिला तर...”
“तर मग बदनामीला तयार रहा, तुझ्या घरच्यांना, शेजारी, हे फोटो दाखवेल, व्हायरल करेल, नंतर जे होईल त्याला जबाबदार फक्त तु असशील हे लक्षात ठेव"
“कां करतोय असं, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती राज" ती रडकुंडीला येत बोलली
“वैदेही ट्राय टु अंडरस्टॅण्ड, सगळा विचार करुनच मी हे पाऊल उचललं आहे, शैलेश खुप हळवा आहे गं, तुझ्याशी लग्न नाही तर तो काहीही जीवाच बरं वाईट करेल, जे मी होवू देणार नाही, माझी जान आहे तो, त्याच्यासाठी मी काहीही करु शकतो, प्लीज वैदेही त्याला वाचवं I beg you for my friend“ त्याचे डोळे पाणावले
त्याचे पाणावलेले डोळे बघून तिचही मन हेलावलं, ती बोलली“"तुझं मित्र प्रेम बघुन आश्चर्य वाटतं, मला माझ्या घरच्यांच्या अब्रुची काळजी आहे, ठिक आहे माझा नाईलाज आहे, मी लग्नाला तयार आहे, पण माझ्या घरच्यांना मी सांगणार नाही, त्यांना कन्वेन्स करायची जबाबदारी तुझी"
“ते सगळं माझ्यावर सोड, थॅन्कस् वैदेही , आणि सॉरी माझ्या वागण्याने तुला त्रास झाला असेल तर मी कान पकडतो" राज कान पकडत बोलला.
वैदेही च्या घरुन राज सरळ शैलेशकडे आला, व येताच बोलला "चल खुशीयॉ मना, लड्डू बाट"
“काय झालं"
“वैदेही लग्नाला तयार झाली"
“काय? कसं केलं तु हे"
“राज द ग्रेट एैसे नही बोलते मुझे"
“माझा तर विश्वासच बसत नाही"
“आपल्याला लग्नाची मागणी घालायला तिच्याघरी जायचं आहे"
“आत्ता"
“ते म्हणतात ना उतावळा नवरा... आणि गुडघ्याला बाशींग, आता नाही रे, उद्या जावू, तु शरयू आणि निलेशला बोलावून घे, आपण सोबत जान्हवीच्या मम्मी पप्पांनाही घेवूया"
30 एप्रिल
आज शैलेश खूप आनंदात होता, जरावेळापूर्वी तो वैदेही च्या घरुन लग्नाची बोलणी करुन परत आला होता, शैलेशसारख्या चांगल्या इंजिनियर मुलाचं स्थळ वैदेही साठी आल्याने वैदेहीच्या आई वडीलांना, रुपालीला खूप आनंद झाला होता, त्यांनी लगेच लग्नाला होकार दिला. लग्नाची तारीख 18मे निघाली होती. त्याच दिवशी लग्नाच्या आधी सायंकाळी त्यांचा साखरपुडा होता, आणि नंतर लगेच लग्न होतं.
घरी येताच शैलेशनं सोबत आलेल्या शरयुला विचारलं "कशी वाटली तुला वैदेही "
“खूप सुंदर, मला खूप आवडली, चला माझी चिंता मिटली, तुझा एकटेपणा दूर होईल आता"
“तुझं काहीतरीच" तो लाजत बोलला
रात्रीची जेवणं आटोपली होती, वैदेही आणि रुपाली कॅरम खेळत बसल्या होत्या, वैदेही विचारात कुठेतरी हरवली होती, रुपाली तिच्याकडे बघत बोलली "कसला विचार करते"
“काही नाही गं" ती भानावर येत बोलली
“खेळण्याकडे लक्ष नाही तुझं, तु खुष तर आहेस ना"
“हो, कां बर"
“खरचं खूप छान झालं, तुला माहित आहे, तुझं लग्न जमल्याने आईबाबांना किती आनंद झालाय ते, आणि छान इंजिनियर मुलगा, खरं सांगु मला शैलेश खूप आवडले तुझी आणि त्यांची जोडी किती मस्त शोभून दिसेल नाही"
“पण ताई मला आत्ताच लग्न नव्हतं करायचं"
“असं म्हणता म्हणता, चांगली स्थळं हातची निघून जातात आणि मग वय निघून गेल्यावर जो मिळेत त्याच्याशी लग्न करावं लागतं"
“तु बोलतेय ते ही खरचं आहे म्हणा, पण ताई तुझं लग्न आधी नको का व्हायला"
“होईल गं, माझंही लग्न होईल, तु नको काळजी करु, बरं शैलेशचा फोन वैगरे आला की नाही"
“नाही, ताई मला पुण्याला जायचं आहे मावशी कडे, लग्न झाल्यावर परत कधी जायला मिळते काय माहित, मावशी कितीदा बोलावते, पण मी एकदाही नाही गेली तिच्याकडे, तु मात्र दोनदा जावुन आली आहेस"
“त्यात काय एवढं, ये जावून, मी सांगते लगेच बाबाला, कधी जाणार"
“एक दोन दिवसात"
“ठिक आहे मी सांगते बाबाला ते सोडून येतील तुला"
“तु पण ये ना सोबत"
“नाही, मला सुटया मिळणार नाही इतक्यात, तु जावुन ये"
2 मे
सायंकाळी 7.00 वाजता
शैलेशनं डोअर बेल वाजवली, दार रुपालीनं उघडलं, शैलेशला दारात बघताच ती बोलली "सरप्राईझ, या ना आत"
शैलेश आत आला, रुपाली त्याला बसायला सांगून, आत किचनमध्ये गेली व आईला शैलेश आल्याची वार्ता दिली.
आई पाण्याचा ग्लास त्याच्या हातात देत बोलली "कसे आहात"
“मस्त, आणि तुम्ही सगळे कसे आहात"
“आम्ही पण मजेत आहोत" ती समोर सोफाचेअर व बसत बोलली, तिच्या बाजुला रुपालीही बसली
“वैदेही कुठे आहे"
“म्हणजे माहित नाही तुम्हाला" आई बोलली
“काय?
“ती कालच तिच्या बाबांसोबत मावशीकडे पुण्याला गेली, मला वाटलं तिनं तुम्हाला फोन करुन सांगितलं असेल"
“नाही, मी काल कितीदा तिला फोन केला पण तिचा फोन स्वीच ऑफ येत होता"
“अशी कशी गं ही वेंधळी मुलगी" फोन करायला कायं झालं होतं, आई रुपालीकडे बघून बोलली
शैलेशनं सोबत आणलेल्या बॅगमधून एक ज्चेलरी बॉक्स काढला आणि रुपाली कडे देत बोलला "हे बघा जरा, कालच मी आणि शरयु शॉपिंगला गेलो होतो, तेव्हाच हे दागीने घेतले, त्यासाठीच तर मी वैदेही ला फोन करत होती, पण तिचा फोनच लागत नव्हता, ती दागिने सिलेक्ट करायला आली असती तर बरं झालं असतं ना, मग शरयु नं तिच्या पसंतीनं घेतले"
“शरयू म्हणजे तुमची ताई ना" रुपाली बोलली
“हो"
रुपाली नं ज्वेलरी बॉक्स उघडला, त्यात एक सुंदर सोन्याचं मंगळसुत्र, एक नेकलेस, कानातले, चार कंगण होते, एवढं सगळं बघून त्या दोघी मायलेकी आनंदी झाल्या.
“खूप छान" रुपाली बोलली
“आणखी काही घ्यायचं असेल तर सांगा मला"
“हेच पुष्कळ झालं, एवढं सगळं घ्यायची काय गरज होती" आई बोलली
“आणखी आहे" तो हसत बोलला, त्यानं एक छोटीसी डबी काढली व त्यातुन एक सुंदर अंगठी काढली "ही बघा ऐंगेजमेंट रिंग"
“नाईस" रुपाली अंगठी हातात घेत बोलली
“बसा तुम्ही मी स्वयंपाकाचं बघते जेवण करुन जायच हं" आई बोलली
“नाही नको, परत कधीतरी येईल, खरं तर मला वैदेही शी गप्पा मारायच्या होत्या, पण आता ती नाही ना, हॉ पण ती परत आली की मी नक्की येईल, तेव्हा नक्की जेवण करुन जाणार"
“ते काही नाही तुम्हाला जेवण करुनच जावं लागेल, रुपालीच्या बाबांना कळलं की तुम्हाला न जेवता पाठवलं तर ते ओरडतील मला" आई बोलली
“आणि वैदेही नाही ना, मी आहे ना गप्पा मारायला मी तुम्हाला बोअर होवू देणार नाही" रुपाली हसत बोलली
शैलेश हसला व बोलला "ठिक आहे"
00000
सोनाली आणि पुजा यावेळी बर्डीच्या एरीयात होत्या, त्या एका ठिकाणी पाणीपुरी खात बसल्या होत्या "भैया जरा तिखा बनाओ मस्त" सोनाली बोलली
नंतर ती पुजाकडे वळली व बोलली "काय म्हणते तुझी लव स्टोरी कुठपर्यंत आलीय"
“काही नाही गं अजून, गेले काही दिवस शैलेश ऑफिसलाही येत नाही"
“मला वाटते तु तुझं प्रेम व्यक्त केलं पाहिजे त्यांच्याजवळ"
“माझ्याने नाही होणार, आणि त्यांच्या मनात काही असेल तर ते प्रपोज करतीलच मला"
“ते ही बरोबर आहे, पण जरा मैत्री वाढव त्यांच्याशी डेटला वैगरे जा त्यांच्यासोबत"
“डेट ला बापरे, मी नाही" पुजा हसत बोलली
आणि दोघीही हसत हसत पाणीपुरी खायला लागल्या
बघता बघता एक आठवडा निघून गेला, एक दोनदा शैलेशचं वैदेहीसोबत बोलणं झालं होतं फोनवर पण ती जास्त काही बोलली नव्हती, खरं तर शैलेशला लग्नाच्या आधी तिच्यासोबत काही क्षण घालवायचे होते, फिरायचं होतं, हाटेलींग, सिनेमा, शॉपींग सगळं करायचं होतं, पण वैदेही पुण्याला गेली होती आणि ती 11 तारखेला येणार होती, त्यामुळे शैलेश बोअर झाला होता, वैदेही कधी एकदा येते आणि तिला भेटतो असं त्याला झालं होतं.
00000
11 मे
आज वैदेही पुण्याहून आली होती, मावशीकडे 10 दिवस राहून तिला खूप बरं वाटलं होतं, आल्याबरोबर तिनं रुपाली सोबत गळाभेट घेतली
“कशी आहेस माझी राणी" रुपाली बोलली
“मस्त, पण तुझी खूप आठवण येत होती"
“आता माझी नाही शैलेशची आठवण आली पाहीजे"
वैदेही हसली
“आणि काय गं, मावशीकडे जातांना फोन कां नाही केला त्यांना, तुला भेटायला घरी आले होते, त्यांची खूप निराशा झाली"
“लक्षातच रहालं नाही, पण पुण्याला त्यांचे फोन येत होते, तेव्हा बोललीय त्यांच्यासोबत"
“अरे व्वा, मग मलाही सांग काय बोलणं झालं ते" रुपाली मिश्कीलपणे हसत बोलली
“एवढं काही खास नाही" ती हसत बोलली
दुपारचे चार वाजले होते, वैदेही झोपली होती, इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली, फोन शैलेशचा होता
“हाय" तो बोलला "कशी आहेस"
“छान, आजच आले पुण्याहून"
“वैदेही मला भेटायचं आहे अग तुला, लग्न ठरलं तेव्हापासून आपण एकदाही भेटलो नाही, मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्यासोबत"
“मलाची खूप बोलायचं आहे तुमच्यासोबत, पण आता नको, लग्न आठ दिवसांवर आलय, आता भेटणं बर दिसणार नाही ना, मला खूप काम आहेत, मित्र मैत्रीणींना लग्नाच्या पत्रीका वाटायच्या आहे, आणि लग्नानंतर गप्पाच मारायच्या आहेत, जरा धिर धरा"
“कळलं"
“तसही मला बरं नाही, प्रवासाहून आले ना, सकाळपासून डोकं खूप दुखतंय"
“ओके, काळजी घे, मी येतोय घरी सायंकाळी तुला भेटायला, घरी तरी चालेल ना भेटलं तर"
“घरी येण्यासाठी काय परवानगीची गरज आहे तुम्हाला"
“ओके, सायंकाळी भेटूया"
“ओके"
फोन ठेवून वैदेही परत झोपली
सायंकाळी ऑफिस सुटल्यावर शैलेश, वैदेहीकडे गेला होता तिला भेटायला, पण तिला बरं नसल्याने तिच्याशी फारसं बोलणं झालं नव्हतं, शिवाय घरी सगळे असल्याने त्याला पर्सनल काही बोलता आलं नव्हतं.
12 मे
वैदेही नं मोबाईल मधून सोनालीचा फोन लावला, सोनाली तिची मैत्रीण होती "हॅलो सोनाली" वैदेही बोलली
"अरे व्वा, खूप दिवसांनी आठवण झाली माझी, काय गं आहेस कुठे भेटलीही नाही इतक्यात"
“अंग मावशीकडे गेले होते पुण्याला, सोनाली , माझं लग्न ठरलयं"
“काय? कधी"
“मागच्याच महिन्यात ठरलं, आणि 18 मे ला लग्न आहे"
“काय, फक्त सहा दिवसांनी आणि तु हे मला आत्ता सांगतेस"
“सगळं कसं अचानक ठरलं, अगं लग्न ठरलं आणि मावशीकडे गेले, तुला सांगायला जमलचं नाही"
“छान आहे"
"मला आता कार्ड वाटायलाही वेळ नाही, सगळयांना पत्रिका व्हाट्सअप करते"
“ओके, कोण आहे, मुलगा काय करतो"
“एच पी ला आहे, इंजिनियर"
“काय? कोण, नावं काय त्याचं"
“शैलेश केळकर"
ऐकूण सोनालीला धक्काच बसला ती गप्पच झाली
“हॅलो कुठे हरवली" वैदेही बोलली
“मला वाटते मी ओळखते त्यांना, मिनाक्षीच्या लग्नात आले होते ते तर नाही ना"
“हो तेच, तिथेच मी त्यांना पहिल्यांदा बघीतलं, पण तु कशी काय ओळखते"
“माझी मैत्रीण पुजा आहे ना त्यांच्याच ऑफिसला आहे, त्यादिवशी लग्नात तीनंच ओळख करुन दिली त्यांच्याशी"
“आय सी"
“क्या बात है वैदेही , लक्की यार, खूप मस्त, जोडी एकदम झकास दिसेल तुमची"
सोनालीनं लगेच पुजाला फोन लावला
“बोल सोना" पलीकडून पुजाचा आवाज
“पुजा, तुझे ते शैलेश काय बोलतात"
“कां गं, तुला बरी आठवण झाली त्यांची"
“साग ना, अगं दोन तिन दिवसांपासून ते ऑफिसलाच नव्हते, आज आलेत, बॉसच्या कॅबिन मध्ये बसलेत, कधीची बाहेर येण्याची वाट बघते"
“पुजा तुला खरचं काही माहित नाही"
“काय माहित नाही, सांग ना"
“हेच की शैलेशचं लग्न ठरलंय"
“काय? हे बघ मस्करी करु नको"
“खरं तेच सांगते, मला आताच वैदेही चा फोन आला होता"
“कोण वैदेही "
“माझी मैत्रीण आहे, तिच्याशीच त्यांच लग्न ठरलयं"
“सोनाली तुझा काही तरी गैरसमज झाला असेल, असं असतं तर मला नाही कां माहित झालं असतं, ऑफिसमध्ये कुणालातरी माहित असतं ना"
“कदाचीत ते आज ऑफिसमध्ये त्यासाठीच आले असणार"
“म्हणजे"
“लग्नाचे कार्ड देण्याकरीता, 18 मे ला त्यांच लग्न आहे, फक्त सहा दिवसांनी"
“मला नाही खरं वाटतं, तु मस्करी करतेय ना माझी"
“नाही पुजा मी सिरीयसली बोलतेय"
“आय कान्ट बिलीव्ह, बरं मी फोन ठेवतेय, ते बॉसच्या कॅबिन मधून बाहेर येत आहेत"
00000
बॉस च्या कॅबिन मधून शैलेश सरळ पुजाजवळ आला व बोलला "हाय पुजा कशी आहेस"
“फाईन, तुम्ही कसे आहात" ती स्वत:ला सावरत बोलली
“मी मजेत आहे, तुला एक आनंदाची बातमी सांगायची आहे, माझं लग्न ठरलयं आणि येत्या 18 तारखेला माझं लग्न आहे, आणि तु लग्नाला यायचं आहेस" तो कार्ड तिच्या हातात देत बोलला
एैकताच तिला धक्का बसला, पण ती सावरली व बोलली "अभिनंदन"
“फक्त अभिनंदन करुन काम होणार नाही, ऑफिसमध्ये तु एकुलती एक मैत्रीण आहे माझी, तुला लग्नाला आलचं पाहिजे"
“येणार , नक्की येणार"
“ओके, येवू मी आता"
तिनं होकारार्थी मान हलवली व शैलेश तिथून निघाला
सायंकाळी ऑफिस सुटल्यावर सोनाली आणि पुजा एकमेकींना भेटल्या, दोघीही स्तब्ध होत्या पुजाचे नेत्र पाणावले होते.
“तरी मी तुला सांगत होते....” सोनाली बोलली
“नाही सोना, या सर्व नसिबाच्या गोष्टी असतात, कशी आहे ही वैदेही "
“छान आहे, पण तिचं लग्न असं अचानक"
“अचानक म्हणजे?
“अगं तिच्या मोठया बहिणीचं लग्न व्हायचं आहे अद्याप"
“प्रेम विवाह तर नाही ना"
“नाही, मी वैदेहीला चांगली ओळखते, ती प्रेम वैगरेच्या भानगडीत पडणारी मुलगी नाही, ती मला बोलली की मिनाक्षीच्या लग्नात त्यांची भेट झाली, मला वाटते शैलेशंन तिला तिथे लग्नात बघीतलं असणार आणि मग कदाचीत तिला प्रपोज केलं असेल"
“शक्य आहे" ती हताशपण बोलली
18 मे
वैदेही आणि शैलेशच्या लग्नाचा दिवस
उन्हाळयाचे दिवस असल्याने लग्न सायंकाळी होतं, लग्नाचा लॉन छान रोशनाईने भरलेला होता, जरावेळापूर्वी रिंग सेरेमनी आटोपला होता, आणि वैदेही नवरीच्या वेषात त्याच्यासमोर उभी होती, आज तिचं रुप मोहून टाकणारं होतं.
मंगलाष्टके संपली आणि टाळयांच्या गजरात दोघांनी एकमेकांच्या गळयात वरमाला घातल्या, आणि शरयूनं शैलेशच्या हातात मंगळसुत्र दिलं, त्यानं ते वैदेहीच्या गळयात बांधलं.
शैलेश नजर चोरुन वैदेहीलाच बघत होता,आज वैदेही खूपच सुंदर दिसत होती, त्याच्या स्वप्नातल्या राणीपेक्षाही सुंदर.. तिच्या गोऱ्यापान हातावर कोपरापर्यंत मेहंदी काढलेली होती, क्युट चेहरा त्यावर बाशिंग, केसात फुलांचा गजरा, आणि राणी कलरच्या शालूमध्ये तिचं रुप आणखीच मोहक दिसत होतं. शैलेश आनंदी होता, वैदेही शांत होती, नर्व्हस होती.
जरावेळानं सप्तपदी आटोपली आणि वैदेही आणि शैलेश लग्नखुर्चीवर निवांत बसले. रुपाली खूप सुंदर दिसत होती, राज, जान्हवी, तिचे आईबाबा, निलेश, शरयू, पुजा, सोनाली सगळे लग्नात हजर होते.
सोनाली आणि पुजा एका ठिकाणी खुर्चीवर बसल्या होत्या, पुजा सारखी वैदेही आणि शैलेशकडेच बघत होती
“नार्ईस कपल" पुजा बोलली "जोडी अगदी मस्त शोभून दिसते नाही"
“तुझ्यासोबत पण इतकीच छान दिसली असती" सोनाली बोलली
“सोना... वैदेही किती सुंदर आहे, मग ती शैलेशला आवडली तर त्यात नवल काय”
“कदाचीत तु खरं बोलतेस, शेवटी ती सुध्दा माझी मैत्रीणच आहे ना, तुझ्याबद्दल जरा फील होतय"
“डोन्ट वरी, माझ्यासाठीपण असाच एखादा राजकुमार असेल"
“युवर राईट"
निरोपाच्या वेळी रुपाली आणि आईच्या कुशीत शिरुन वैदेही खूप रडली होती,वैदेहीला रडातांना बघून शैलेशही भावुक झाला होता. वरातीसोबत वैदेहीची मावशी आणि रुपाली सासरी येण्यासाठी वैदेहीच्या सोबत होते.
20मे
कालच रिशेप्शन आटोपलं होतं, आज सकाळी पुजाही आटोपली होती, पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते, रुपाली आणि वैदेहीची मावशीही सायंकाळीच घरी निघून गेल्या होत्या. निलेशही गेला होता, फक्त शरयू होती, ती आणखी दोन दिवस थांबणार होती.
आज त्यांच्या मधुचंद्राची रात्र होती.
शैलेशनं बेडरुममध्ये प्रवेश केला तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते, वैदेही बेडवर डोळे मिटून शांतपणे पहुडली होती.
तो आज तिला पहिल्यांदाच इतक्या जवळून निवांत बघत होता, तिचं सोज्वळ रुप डोळयात साठवत होता, ती त्याच्या स्वप्नातल्या राणीसारखीच होती. वैदेहीला चाहुल लागली आणि तिनं नेत्र उघडले, तिचे डोळे जरा पाणावले होते, तिचे पाणावलेले डोळे बघून त्याच्या काळजात धस्स झालं,
त्याला रहावलं नाही आणि तो बोलला "काय झालं अगं"
“कां केलतं तुम्ही असं" तिचा रडवेला स्वर
“काय झालं, काय केलय मी"
“माझी इच्छा नसतांना मी या लग्नाला तयार झाले, हे लग्न माझ्या मर्जीविरुध्द झालयं, स्वत:च्या स्वार्थासाठी माझ्या भावनांशी खेळलात तुम्ही"
“हे काय बोलतेस तु"
“खरं तेच बोलतेय, शेवटी झालं ना तुमच्या मनासारखं"
“वैदेही, लग्नाला होकार तुच दिला होता, मग आता"
“होकार दिला होता, पण कां ते तुम्हाला चांगलं माहित आहे"
शैलेशला कळून चुकलं की राजनं काहीतरी गडबड केली आहे, “वैदेही काय बोलतेस तु... मला काही कळत नाही" तो तिच्या खांदयावर हात ठेवत बोलला
“डोन्ट टच मी.... “ ती रागात बोलली "अग्नीच्या साक्षीनं जरी आपलं लग्न झालं असलं तरी मी तुम्हाला मनानं पती मानलेलं नाही, त्यामुळे यापुढे माझ्या अंगाला हात लावाल तर मी सहन करणार नाही"
“ठिक आहे, तुझा जर माझ्यावर एवढा राग असेल तर, यापुढे मी तुझ्या अंगाला स्पर्शही करणार नाही, आय प्रामिस यु"
त्यान एक चटई व उशी घेतली आणि बेडच्या शेजारी खाली टाकून झोपला
ती जरा वेळ तशीच उभी होती, ती त्याला बोलली ते चुक केल की बरोबर तिला कळतं नव्हतं, पण तिचं मन मात्र हलकं झालं होतं, तिच्या मनात आलं की शैलेशला तिथून उठवावं आणि बेडवर झोपायला सांगाव आणि स्वत: चटईवर झोपाव, पण ती तसं करु शकली नाही, बेडवर पडल्या पडल्याच ती झोपी गेली
21 मे
तिला जाग आली तेव्हा शैलेश बेडरुममध्ये नव्हता, तिनं मोबाईलमध्ये वेळ बघीतली सकाळचे साडेसहा वाजत होते, ती अंथरुण आवरुन बेडरुमच्या बाहेर आली, किचन मध्ये शरयु होती, वैदेहीला बघताच ती बोलली "गुड मॉर्निंग वहिणी"
“गुड मॉर्निंग" ती हसत बोलली
“अगदी फ्रेश वाटतेस, रात्री झोप तर चांगली आली ना" शरयू हसत बोलली
“होय तर" ती पण हसली
“तु आंधोळ आटपून घे, शैलेशची आंघोळ झाली आताच, तो पुजा करतोय, तुम्हाला मंदिरात जायचं आहे लगेच"
“कुठल्या मंदिरात"
“अगं आमच्या कुलदेवतेचं मंदिर आहे, इथून पंधरा किलोमिटर अंतरावर आहे"
“तुम्ही पण येणार"
“मी कशाला, तुम्हाला दोघांनाच जायचं आहे, आणि मला तुम्ही वैगरे म्हणायचं नाही, सात मिनीटांनी का होईना पण मी शैलेशपेक्षा लहान आहे"
वैदेही हसली व बाथरुमकडे वळली.
शैलेशनं बाईक काढली, जरावेळात वैदेही आणि शरयू बाईकजवळ आल्या, शैलेश तर वैदेहीकडे बघतच राहला, ती आज अबोली साडीवर खूप सुरेख दिसत होती. शैलेशनं बाईक सुरु केली, वैदेही पाठीमागे अगदीच अंग चोरुन बसली
शरयू त्यांना बाय करत बोलली "निट जा आणि लवकर या"
शैलेश तिला बाय करत निघाला, जरावेळानं बाईक हायवेला लागली व शैलेश बाईक सुसाट पळवत सुटला, बाहेरचं वातावरण आल्हादकारक होतं, हवेमुळे वैदेहीच्या गालावर येणारे केस ती हाताने सावरत होती, दोघेही मौन होते, रात्रीच्या प्रकारानंतर तिच्याशी काय बोलावं हे शैलेशला कळत नव्हतं, तर शैलेशबद्दल तिचं मन अद्यापही कटू होतं,
जवळपास पंचेविस मिनीटानंतर ते एका हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणात येवून पाहोचले, तिथलं वातावरण मोहित करणारं होतं, आजुबाजुचा परिसर झाडा झुडपांनी बहरलेला होता, एक छोटसं छान टुमदार मंदिर, त्याच्या बाजुला एक तलाव, एक दाट मोठं वडाचं झाड, आणि मंदिराच्या आवारात, पेरु, आंबा, चिकू, काजू, आवळा अशी कितीतरी फळांनी बहरलेली झाडे होती, चंपा, कन्हेर, जास्वंद, जाई, मोगरा, गुलाब, गोकर्ण,शेवंती अशी कितीतरी फुलांची झाडेही होती खारुताई इकडून तिकडे सरसर फिरत होती, तर तलावात मस्त बदके पोहत होती, ते मनोरम दृष्य बघून वैदेही मनोमन मोहित झाली, तिचं मन प्रसन्न झालं होतं.
शैलेशनं विहीरीतून पाणी काढलं, आणि हातपाय धुतले, वैदेही पण त्याचच अनुकरण करत होती. शैलेश तिथेच वडाच्या झाडाखाली बसला, सोबत आणणेलं पुजेच साहित्य काढलं, फुलझाडाची फुले तोडली आणि पुजेचं ताट तयार केलं, त्यानं वैदेहीच्या हातात पुजेचं ताट दिलं, आणि दोघेही मंदिराच्या पायऱ्या चढायला लागले, दोन तिन पायऱ्या चढल्यानंतर शैलेश थांबला व वैदेहीला बोलला "जरा डोक्याहून पदर घेशील please”
तिनं डोक्याहून पदर घेतला, दोघांनीही जोडीनं मंदिरात प्रवेश केला, आत पुजारीबाबा बसलेले होते, शैलेशच्या बघताच पुजारीबाबाच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं, त्यांनी दोघांना देवीच्या गाभाऱ्यात बसून त्यांच्याकडून विधीवत पुजा करुन घेतली, पुजा झाल्यावर दोघांनीही पुजारी बाबांना नमस्कार केला, पुजारी बाबा आर्शिवाद देत बोललो "आयुष्यमान व्हा पोरांनो, पोरा, पत्नी अगदी तुला सालस मिळाली आहे, तिच्या आगमनाने तुझी खूप प्रगती होईल, एक लक्षात ठेव तिला कधीही दुखवू नको, सुखी आणि आनंदी रहा"
तिथेच झाडाखाली हिरवळीवर बसून दोघांनी शरयुनं दिलेल्या डब्यातील जेवण केलं, दोघे तिथेच थोडावेळ निर्सगाच्या सानिध्यात रमले, दोघे एकमेकांशी बोलत नव्हते पण एन्जॉय मात्र करीत होते, वैदेहीनं तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचे बरेच फोटो मोबाईलमध्ये काढले होते. जरावेळांन ते घराच्या रस्त्याने निघाले, वैदेही अगदीच मौन मागे बसली होती, शैलेश शांत होता, तो हळुवार बाईक चालवत होता.
24 मे
आज सकाळीच शैलेश, शरयुला तिच्या सासरी पोहोचवून आला होता, त्यानं सुटया कॅन्सल केल्या, हनीमुन पॅकेज कॅन्सल केलं.
दुपारी 4.00 वाजता तो जान्हवीकडे आला जान्हवी घरीच होती "राज कुठे आहे" त्याचा प्रश्न
“तो तर गावाला गेला, काल रात्रीच"
“काय?, कशाला आणि परत कधी येणार आहे"
“काही सांगुन गेला नाही"
“ओके, मी फोन करेल त्याला"
“काही उपयोग नाही, कालपासून फोन करते, त्याच्या गावाला मोबाईलची रेंजच नाही, वैदेही कुठाय"
“झोपलीय ती, बरं नाही तिला" तो खोटं बोलून गेला
“काय झालं"
“लग्नाच्या काळात जरा exertion झाल्यामुळे असेल"
“ओ.के, मग काय मजेत ना, हनीमूनला कधी जाणार आहे"
“वैदेहीला बरं वाटलं की जाणार"
“ओके"
“राजला फोन लागला तर मला फोन करायला सांग त्याला"
“ठिक आहे"
रात्रीचे अकरा वाजले होते
शरयु घरी होती तेव्हा शैलेश बेडरुमध्ये बेडच्या बाजुला चटई टाकुन झोपायचा, आता घरी दोघेच होते, शैलेशनं बाहेर हॉलमध्ये झोपायचं ठरवलं, आणि तो तिथेच बाहेर सोफ्यावर झोपी गेला, वैदेही जरावेळानं हॉल मध्ये आली, तिला शैलेश हॉलमध्ये झोपलेला दिसला, ती बेडरुममध्ये झोपायला गेली.
25 मे
नेहमीप्रमाणे शैलेश सहा वाजता उठला, बाहेर जावून त्यानं दुधाचं पॉकिट आणलं, पटापट भाजी चिरुन फोडणीला घातली, आणि कणीक मळायला घेतली, विस मिनीटात पटापट चपात्या बनवल्या, दूध गॅसवर गरम करायला ठेवलं, आणि कुकरमध्ये दाळ भात लावला, स्वयंपाकाचे भांडेही धुऊन काढले, सात वाजता तो बाथरुमध्ये शिरला, पंधरा मिनीटात गार पाण्याने आंघोळ करुन बाहेर आला, बेडरुमचा दरवाजा बंद होता, कदाचीत वैदेही झोपलेलीच होती. तो पुजेला बसला, सात मिनीटात पुजा आटोपुन त्यांन गॅसवर चहा ठेवला, आणि हॉलच्या ओपन टेरेस मध्ये आला, तिथे खूप प्रकारची फुलझाडे होती, त्यांन झाडांना पाणी घातलं, आणि मोबाईल घेवून तिथल्या झोपाळयावर बसला, पाच मिनीट मोबाईल चाळून, किचन मध्ये आला व चहा गाळायला घेतला, इतक्यात वैदेही बेडरुमधून येतांना दिसली, त्यांन आणखी एक कप घेतला आणि दोन कपात चहा गाळला, एका कपावर प्लेट झाकून ठेवली, आणि दुसरा कप घेवून तो वैदेहीला हळूच बोलला "चहा झालाय... तुझ्यासाठी ठेवलाय"
वैदेही ब्रश करायला लागली, तर शैलेश परत येवून झोपाळयावर बसला व आरामात एक एक चहाचा घोट घेवू लागला.
वैदेहीनं चहाचा कप हातात घेतला, जेवन तयार बघून तिला आश्चर्य वाटलं, चहाचा पहिला घोट घेताच तिला प्रसन्न वाटलं, चहा खूप छान झाला होता, तिला लाजल्यासारखं झालं, तिनं मनाशी ठरवल की ती उद्यापासून लवकर उठेल.
00000
सकाळचे पाऊणे नऊ वाजले, शैलेशनं एका ताटात दोन चपात्या, भाजी आणि थोडा दाळ भात घेतला, आणि 1 ग्लास पाणी घेवून डायनिंगवर जेवायला बसला, दहा मिनीटात त्यानं जेवन आटोपलं, जेवनाचे ताट व वाटी धुऊन काढले, तीन चपात्या व भाजी डब्यात भरली, व डबा बॅग मध्ये भरला, सव्वा नऊ वाजता तो ऑफिसला जायला तयार झाला, वैदेही हॉलमध्ये बसून टी.व्ही. बघत होती, शैलेशनं बॅग हातात घेतली व दारात आला, आणि "मी येतोय" हे दोन शब्द बोलून तो घराबाहेर पडला, त्यानं वैदेहीकडे बघीतलंही नाही. तिच्या डोळयात आसवं तरळली.
जरावेळानं ती जागेहून उठली, आज पहिल्यांदा ती घर मोकळेपणानं बघत होती, शैलेशचा फ्लॅट अतिशय सुंदर होता, इंटेरियर खूपच छान, प्रत्येक वस्तू अगदी निटनेटकी ठेवलेली, किचन तर अगदी सुंदर मॉडलर डेकोरेट केलेलं, मास्टर बेडरुम आणि हॉलला ओपन टेरेस होते, हॉलच्या टेरेसमध्ये छान फुलांचं गार्डन आणि झोपाळा होता, तर मास्टर बेडरुमच्या ओपन टेरेस मध्ये स्टडी रुम होती, तिथे एक छान छोटासा सोफा होता, आणि एक टी पॉय, काम्प्युटर टेबल व एक काम्प्युटर होता, दोन्ही बेडरुम वेल इंटेरीयर केलेल्या होत्या, हॉलमध्ये छताचं पीओपी खूप सुंदर डिझाईन केलेलं होतं, तिच्या स्वप्नातल्या घरासारखं घर बघून ती प्रसन्न झाली.
00000
शैलेश ऑफिसला आला होता पण त्याचं मन कामात लागत नव्हतं, जरावेळ पुजासोबत गप्पा मारव्या असं त्याला वाटलं, बघतो तर पुजा आज ऑफिसलाच नव्हती आलेली , जरावेळातच ऑफिसमधील मित्रांनी त्याच्या भोवती गर्दी केली व त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार सुरु झाला
“इतक्या लवकर कामावर, हनीमुन संपला सुध्दा वैगरे प्रश्नांची काय उत्तरे दयावीत त्याला काही कळतं नव्हतं, वैतागून तो ऑफिसमधून बाहेर पडला, जरावेळा बाहेर फिरत रहाला, नंतर एका ठिकाणी पार्कमध्ये जाऊन बसला,आज दुपारी त्याला भुखही लागली नाही, बॅगेतला डबा तसाच राहला, तो परत ऑफिसमध्ये आला व आपल्या जागेवर जाऊन बसला, अचानक त्याच्या मनात विचार डोकावुन गेला, वैदेही जेवली असेल ना.
00000
सायंकाळचे पाच वाजायला आले होते, ऊन बरचं होतं, तरीही वैदेही घराबाहेर पडली, काही आवश्यक वस्तू खरेदी करुन ती रिक्षाने आईकडे निघाली. आई आणि रुपालीला भेटून तिला खूप बरं वाटलं, आईच्या कुशीत शिरली तेव्हा तीचे डोळे पाणावले होते, लग्नाच्या पहिल्या रात्री शैलेशला सुनावल्यान तिचं मन जरी हलकं झालं होतं पण तीला जरा फील होत होतचं, झाल्या प्रकाराबद्दल तिलाही खेद वाटत होता. तिला वाटलं होतं, की ब्लॅकमेल करुन लग्नाला होकार मिळविल्याप्रकरणी शैलेश तिची माफी मागेल, पण प्रत्यक्षात तसं काही घडलं नव्हतं.
वैदेही पाऊने सात वाजता घरी आली, आणि स्वयंपाकाला लागली, तिनं जेवण तयार केलं, सांजवात लावली, अंधार पडायला आला होता, ती हॉलमधल्या ओपन टेरेसच्या झोपाळयावर बसली, मस्त गार वारा सुटला होता, तिला खूप प्रसन्न वाटतं होतं, झोपाळयावर बसून तिनं डोळे मिटून घेतले.
डोअरबेल वाजली आणि तिनं डोळे उघडले, तिनं दार उडघलं, दारात शैलेश उभा होता, तो आत आला आणि तिनं दार लावून घेतलं
शैलेशनं गार पाण्यानं आंघोळ केली, जेवन तयार बघुन त्याला समाधान वाटलं, वैदेहीनं जेवनाचे दोन ताट डायनिंगवर लावले, दोघेही एकमेकांशी न बोलता मुकाटयाने जेवले. जेवनानंतर शैलेश बाहेर निघुन गेला, व खाली लॉनवर फिरु लागला, राज नसल्याने त्याला करमत नव्हतं, जरावेळ बाहेर फिरुन तो घरी परतला.
तो हॉल मध्ये झोपला, आणि वैदेही बेडरुममध्ये.
वैदेही नं विचार केला सकाळी ती लवकर उठेल.
26 मे
सकाळी वैदेही उठली व केसांचा अंबाडा बांधत बेडरुमच्या बाहेर आली, शैलेश हॉलमध्ये नव्हता, तो किचनमध्ये चपात्या बनवत होता, तिच्या मनात काय आलं काय माहित ती बोलली "द्या मी करते"
“नाही, नको येतय मला बनवायला, आणि तसंही माझ्यासाठी कुणी त्रास घेतलेला मला नाही आवडत"
“मी आहे ना आता घरी, आणि ही कामं तुमची नाहीत"
“असं काही नसतं, शरयु सासरी गेल्यावर करतच होतो, आता सवय झालीय मला कामाची"
“मी घरात असतांना ही कामं तुम्ही केलेली मला नाही चालणार"
“कां? तुच बोलली की हे लग्न तुझ्या मर्जीविरुध्द झालंय, मंग कां हे सगळं तु माझ्यासाठी करशील"
ती गप्प झाली तिला काय बोलावं काही सुचेना, तिच्या डोळयात आसवं जमा झाली, आणि ती परत बेडरुममध्ये गेली व स्वत:ला बेडवर झोकून दिलं
ऑफिसमध्ये आल्यावर त्याला पुजा दिसली, जरावेळ तिच्याशी गप्पा माराव्यात म्हणून तो तिच्याजवळ आला व बोलला "हाय, कामात आहेस काय"
शैलशला बघून तिला आर्श्चय वाटलं, ती बोलली "इतक्या लवकर कामावर, तुम्ही सुटीवर होता ना"
“कालपासूनच कामावर आलो ,तु नव्हती काल"
“हॉ... जरा बरं नव्हतं"
“तु लग्नाला कां आली नव्हती माझ्या"
“आले होते"
“मला दिसली नाही तु"
“लवकर गेले"
“मला न भेटताच"
“भेटले होते, कदाचीत तुमच्या लक्षात नसेल"
“नक्की... मला तर नाही आठवत"
ती हसली व बोलली "सॉरी... खरं तर मला तुम्हाला भेटायचं होतं, पण तुमच्या अवती भवती खुप गर्दी होता त्यामुळे"
“सॉरी से काम नही बनेगा, मला ट्रिट पाहिजे तुझ्याकडून"
“ओके, काय ट्रिट पाहिजे"
“आज रात्रीचं डिनर"
“काय, आज रात्रीचं डिनर?
“होय, मी काही चुकीचं बोललो काय"
“विथ वाईफ ?"
“नाही, फक्त मी"
“ओ.के.माझ्या घरी जेवायला येणार की बाहेर कुठे"
“घरी नको, बाहेरच जावुया"
“ओके"
“ठिक आहे मग, सायंकाळी सोबतच निघुया"
ती हसली पण जरा भांबावलेली होती, शैलेश आपल्या जागेवर जावून बसला, पुजा संभ्रमात होती, तिनं विचार केला वैदेही कदाचीत माहेरी गेली असेल व ते एकटे असतील
सायंकाळचे साडेसात वाजले, शैलेश आणि पुजा एकत्रच बाहेर निघाले
“कुठं जायचं" तो बोलला
“तुम्ही म्हणाल तिथे"
“तुम्ही म्हटलचं पाहिजे का, आजपासुन तु मला शैलेश बोलायच"
ती हसली व बोलली "ओके आय वील ट्राय"
“यु मस्ट"
“आज माझ्या आवडीच्या रेस्ट्रारंटमध्ये जावुया"
“ठिक आहे"
पुजानं आपली प्लेझर काढली आणि शैलेशनं आपली बाईक आणि दोघेही निघाले
दोघेही एका गार्डन रेस्ट्रारंटमध्ये आले.
पुजानं मेनुकार्ड मागवलं व शैलेशच्या हातात देत बोलली "हवं ते मागवा"
“परत फॉर्मालीटीज, असं म्हण हवं ते मागव"
“ओके, मला जरा वेळ लागेल सवय व्हायला"
“आज मी तुझ्याच आवडीचं खाणार आहे, त्यामुळे तुला हवं ते मागव"
“ओके,... एक विचारु" ती बोलली
“विचार"
“वैदेही माहेरी गेली आहे काय"
“नाही"
“मग तुमच्या लग्नाला जेमतेम दहा दिवस झाले आणि तुम्ही... सॉरी तु असा बाहेर जेवायला, काही बिनसलं आहे का, वैदेही सोबत"
तो जरावेळ गप्प राहला
“सॉरी... मी नको होतं ना असं विचारायला" ती बोलली
“नाही पुजा, तु विचारलं ते खुप चांगलं केलं, असं कुणी हक्कानं विचारलं तर छान वाटतं, तु मैत्रीण आहे, तुझ्यापासून काय लपवणार, वैदेही बोलते माझ्याशी लग्न तिच्या मनाविरुध्द झालयं, मी तिला फसवलं, माझा तिरस्कार करते"
“काय" ऐकूण ती अवाक झाली "लग्नाला होकार नव्हता तिचा"
“तिचा लग्नाला होकार होता हे राज नं मला सांगितलं होतं, आमचं लग्न ठरलं तेव्हाही ती तिथेच होती, पण तेव्हा एका शब्दानही काही बोलली नाही"
“मॉय गॉड, मग आता"
“आता काय, आम्ही एकाच घरात रहातो आणि एकमेकांशी बोलतही नाही ती बेडरुम मध्ये झोपते आणि मी हॉलमध्ये"
“बापरे.. हे विचित्रच आहे, तु राज ला का नाही विचारत याबाबत"
“त्याचीच तर वाट बघतोय, गावाला जाऊन बसला आहे, आणि तिथे मोबाईलची रेंजही नाही"
“काय झालं ते तिला निट विचार"
“काय विचारणार, मला तर आता तिच्याशी बोलायलाही भिती वाटते, आज सकाळीच थोडं वाजलं आमचं"
“काय झालं"
“सकाळी मी जेवन बनवत होतो, एवढयात ती किचनमध्ये आली व बोलली की मी करते, मग मी बोललो मला माझी कामं करता येतात, मला नाही आवडत कुणी माझ्यासाठी त्रास घेतलेला"
“मॉय गॉड, असा बोललास तु"
“हो, ना आणि मग ती भरल्या डोळयांनी तिथून निघून गेली"
“जरा प्रेमानं बोलत जा तिच्याशी"
“मलाही वाटतं, तिच्याशी प्रेमानं बोलावं, तिला बोलून तर गेलो, नंतर मला माझाच राग आला"”
“रिलॅक्स, होईल सगळं ठिक, ती स्वत:चं घर सोडून तुझ्याघरी आली आहे,ॲडजेस्ट करायला वेळ दे जरा तिला"
“कदाचीत तु खरं बोलतेस"
वैदेहीनं सायंकाळचा स्वयंपाक बनवला, आणि बाहेर बाल्कनीत झोपाळयावर येवून बसली, तिनं घडयाळाकडे बघीतलं, रात्रीचे आठ चाळीस झाले होते, रोज शैलेश आठच्या आधीच घरी यायचा.. पण अद्याप त्याचा पत्ता नव्हता, झोपाळयावर बसल्या बसल्या गार वाऱ्यानं तिला डुलकी लागली.
तिला जाग आली तेव्हा रात्रीचे साडेनऊ वाजले होते, ती जरा अस्वस्थ झाली, त्याला फोन करावा कां असा विचार तिच्या मनात आला, हळुहळु त्याच्याविषयी तिच्या मनात आपुलकी निर्माण होत होती, पण तिचं मन त्याच्याशी समेट करायला तयार नव्हतं, पण एक अनामिक ओढ तिला शैलेशकडे ओढत होती, ती आज अगदीच निटनेटकी प्रसन्न चेहऱ्यानं त्याची वाट बघत होती, जसा जसा वेळ जात होता तशी तिची अस्वस्थता वाढत होती.
पुजा आणि शैलेशचं जेवन आटोपलं, आणि दोघेही रेस्ट्ररंटच्या बाहेर आले, दोघांनी खूप दिलखुलास गप्पा मारल्या, पुजाला खुप छान वाटतं होतं, शैलेश बाईकने तिच्या घरापर्यंत आला, ती घरी गेली, त्यांन तिला बाय केलं, आणि घरी जाण्यासाठी निघाला त्यावेळी रात्रीचे नऊ पस्तीस झाले होते"
नऊ पन्नास झालेतरी शैलेशचा अद्याप पत्ता नव्हता, तिचा धिर सुटायला लागला होता, तिनं मोबाईल घेतला आणि शैलेशला फोन करणार इतक्यात तिला बाल्कनीतून शैलेशची बाईक इमारतीच्या आवारात प्रवेश करतांना दिसली, तिच्या जीवात जीव आला"
डोअरबेल वाजली आणि तिनं दार उघडलं, तिला फ्रेश आणि निटनेटकं बघून त्याला जरा आश्चर्यच वाटलं, तो फ्रेश व्हायला गेला आणि ती डायनिंगवर जेवन लावायला लागली, तिला जेवन घेतांना बघून तो बोलला "माझ्याकरीता नको घेऊ, मी जेवन करुन आलोय, आणि हो माझ्याकरीता जेवायला थांबत जावु नकोस, कशाला त्रास घेते माझ्यासाठी"
त्याच्या बोलण्यावर ती स्तब्ध झाली. तिनं आज आवडीनं छानं जेवन बनवलं होतं, आणि तो बाहेर जेवून आला होता, तिला स्वत:चाच राग आला, तिला जेवन जात नव्हतं,कशीतरी ती थोडं जेवली.
बघता बघता आठवडा निघुन गेला या दिवसांत उल्लेखनिय असं काही घडलं नाही, दोघांमधला दुरावा वाढतच चालला होता, शैलेश स्वत:ची कामं स्वत:च करायचा, ती सुध्दा आता त्याच्या कामात ढवळढवळ करत नव्हती. सकाळचं जेवन तो बनवायचा आणि रात्रीचं जेवन ती बनवायची कधी तो घरी जेवायचा, कधी बाहेरुन जेवून यायचा, घरात दोघांचाही अबोलाच होता.
2 जून
आज शैलेश ऑफिसला आल्याबरोबरच त्याच्या ऑफिसमधील मित्रांनी त्याच्या सभोवार गर्दी केली
अमित बोलला "यार शैलेश तुझं लग्न झालं, हनीमूनही झाला पण तु पार्टी काही दिली नाही, ते काही नाही पार्टी पाहिजे तुझ्याकडून"
“यस पार्टी, मस्त धाब्यावर" महेश बोलला
“ओके, ठिक आहे, कधी जायचं" शैलेश बोलला
“आज पण चालेल" अमित बोलला
“ठिक आहे डन, आज जावुया ऑफिस सुटल्यावर" शैलेश बोलला
“हो पण तुला आमच्या सोबत ड्रिंक करावं लागेल" सुनिल बोलला
“मरवाओगे यार, तुम्हाला माहित आहे मी पीत नाही, कोल्डड्रिंक पिणार ना मी"
“अरे थोडीसी आम्हाला कंपनी म्हणून"
त्यानं जरा वेळ विचार केला व नंतर बोलला "ठिक आहे डन"
“व्हेरी गुड आज चांगलीच धमाल होणार" महेश बोलला
साडेसात वाजता महेश, अमित, सुनिल आणि शैलेश चौघेही भंडारा रोड ला अमितच्या कार मधून तंदुरी धाबा येथे पोहोचले. कार अमितचा ड्रायव्हर चालवत होता. शैलशनं बाईक ऑफिसलाच ठेवली होती.
ड्रिंक साठी त्यांनी आधीच पार्सल घेतलं होतं, रॉयल स्टॅग चा दिड खंबा घेतला होता.
ज्यांना जे जे हवं होतं, ते सगळं खाण्यासाठी मागविण्यांत आलं आणि महफिल रंगली, शैलेश फक्त एकच पॅग पिणार होता, पण आज तो थांबला नाही, बघता बघता त्याने व्हिस्कीचे चार पॅग पोटात रिचवले होते.
रात्रीचे साडेदहा वाजले तरी अद्याप शैलेश घरी आला नव्हता, वैदेहीला काय करावं सुचेना, तिनं शैलेशला मोबाईलवर फोन लावला, पण त्याचा फोन स्विचऑफ येत होता, ती आणखीनच घाबरली, ती खूप अपसेट झाली होती.
चौघे धाब्याहुन अगदीच टाईट होऊन बाहेर पडले, एकमेकांची थट्टा मस्करी करत, लडखडत ते चौघे कार मध्ये बसले आणि ड्रायव्हरनं गाडी सुरु केली, कुणीही बाईक चालविण्याच्या लायक नव्हतं त्यामुळे प्रत्येकानं त्यांच्या गाडया ऑफिसलाच ठेवण्याचा निर्णय घेतला, आता ती कार प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या घरी सोडणार होती, रात्रीचे अकरा वाजायला आले होते.
वैदेहीला काय कराव काही सुचत नव्हतं, साडे अकरा होत आले होते, ती सारखा शैलशचा फोन ट्राय करत होती, पण त्याचा फोन बंद होता. अचानक तिच्या लक्षात आलं, खालच्या माळयावर जान्हवीकडे जावं, ती कदाचीत त्याच्या मित्राचा नंबर वैगरे देईल, आतापर्यंत हे तिला सुचलचं नव्हतं, तिनं जरा निट कपडे घातले आणि फ्लॅटची चाबी घेवून निघणार तितक्यात डोअर बेल वाजली "कोण असेल" ती विचार करायला लागली.
तिनं डोअरच्या की होल मधून बघीतल, दारात शैलेश उभा होता, तिच्या जीवात जीव आला. तिन लगबगीन दार उघडल, आणि दारुचा वास तिच्या नाकात शिरला, ती आश्चर्यान शैलेशकडे बघायला लागली, तो आपल्याच धुन मध्ये घरात शिरला, तो गाणं गुणगुणत होता "आग लगी हो इस दिल मे तो हर्ज है क्या फिर पीने मे.... ये काश कही एैसा होता....
तो तिथेच सोफ्यावर बसला, पायातले बुट आणि सॉक्स काढत तो परत सुरु झाला "के दो दिल होते सिने मे, एक तुट भी जाता इश्क मे तो तकलिफ न होती जीने मे.... जीने मे.. आणि तिथेच. सोफ्यावर पसरला.
वैदेहीच्या डोळयात आसवं गोळा झाली, ती तिथेच स्वत:चं डोकं पकडून बसली. जरावेळानं ती बेडरुममध्ये गेली व झोपायचा प्रयत्न करु लागली पण तिला झोपच येत नव्हती. ती अद्याप जेवलीही नव्हती, आता तर तिची जेवायची इच्छाही नव्हती, ती झोपी जायचा प्रयत्न करु लागली, रात्री बऱ्याच वेळ पर्यंत तिला झोप आली नाही, ती विचार करत होती , हे जर असच चालत राहलं तर, आणि शैलेश दारुच्या आहारी गेला तर, तीला अस्वस्थ वाटु लागलं, खरं तर शैलेश तिला आवडू लागला होता, त्याच्या प्रामाणिकपणावर ती प्रेम करायला लागली होती, ती इतकी सुंदर असुनही त्यानं अद्याप तिच्या अंगाला स्पर्शही केला नव्हता, तिला लग्नाआधी शुकवारी तलावाजवळ त्यानं तिचा हात हातात घेवून बोललेलं वाक्य आठवलं "वैदेही, प्लीज, खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, आणि आता तुझ्याशिवाय जगण्याची कल्पनाही मी करु शकत नाही" त्याचं ते वाक्य आठवताच तिच्या अंगावर रोमांच उभे राहले.
ती बेडरुमच्या बाहेर आली, एसी चालु होता, त्यामुळे हॅाल थंडगार झाला होता, तिनं एक चादर शैलेशच्या अंगावर ओढली, आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघीतलं, तो निरागस बाळासारखा झोपला होता, आज पहिल्यांदा त्याला ती डोळे भरुन बघत होती, तिच्या मनात चलबिचल झाली, तिनं घडयाळाकडे बघीतलं, रात्रीचा पाऊण वाजला होता, ती परत बेडरुम मध्ये आली व झोपी गेली.
3 जून
तिला जाग आली तेव्हा सकाळचे साडे आठ वाजले होते, ती लगबगीनं उठली, बेडरुमच्या बाहेर आली, शैलेश अद्यापही झोपलेलाच होता, तिनं लवकर आंघोळ आटोपली, व घरातली कामे करु लागली, साडेनऊ वाजले तरी शैलेश झोपलेलाच होता, तिनं त्याला उठविण्यासाठी त्याच्या अंगावरची चादर बाजुला केली, शैलेश थरथर कापत असलेला तिला दिसला, तिनं त्याच्या हाताला स्पर्श केला, त्याचं अंग तापानं फणफणत होतं, तिला काही सुचेनासं झालं, तिन शैलेशच्या खिश्यातून मोबाईल काढला पण तो स्वीच ऑफ होता, समोर लॅण्डलाईन फोन शेजारी एक डायरी हाती, तिनं लगेच डायरीचे पान उलटायला सुरवात गेली आणि एका ठिकाणी तिला डॉक्टर अजय मोडक असं नांव दिसलं आणि तिनं नावासमोरचा नंबर डायल केला व डॉक्टरांना बोलावून घेतलं.
जरावेळान डॉक्टर आले, त्यांनी शैलेशला तपासलं आणि इंजेक्शन दिलं, गोळया दिल्या. आणि वैदेहीला काळजी घ्यायला सांगून निघून गेले.
इंजेक्शन घेतल्याने त्याला जरा बर वाटायला लागलं होतं, शैलेश उठला आणि फ्रेश झाला, रात्रीचे व्हिस्कीचे चार पॅग त्याला खूप महागात पडले होते, त्याला मळमळत होतं, त्यांन मिठाचं कोमट पाणी घेतलं व ओकाऱ्या करुन घेतल्या, त्याला ओकाऱ्या करताना बघून वैदेही घाबरली, व लगबगीन बाथरुम जवळ आली व बोलली "काय झालं"
“काही नाही, ठिक आहे" तो बोलला
ओकारी झाल्याने त्याला आता जरा वरं वाटतं होते,
तो परत येवून सोफ्यावर बसला, वैदेहीनं त्याच्यासाठी कॉफी आणली तो कॉफी पिऊन सोफ्याला लेटला, त्याचं डोकं दुखायला लागलं होतं, वैदेहीनं छान मुंगाची खिचडी बनवायला घेतली, त्याला काहीतरी हलकं खायला दयायचं असं डॉक्टर सांगुन गेले होते,
खिचडी आणि टमाटरची चटणी बनवून ती हॉलमध्ये आली
शैलेश झोपलेला होता, तिनं त्याच्या अंगाला स्पर्श केला आता त्याचं अंग जास्त गरम नव्हतं, तिच्या हाताचा त्याच्या अंगाला स्पर्श होताच तो दचकून उठला,”सॉरी" ती लगेच बोलली "मी खिचडी बनवली आहे, ती खाऊन घ्या, नंतर गोळया घायच्या आहेत, मग आराम करा"
इतक बोलून ती आत किचन मध्ये गेली, व त्याच्यासाठी खिचडी घेवून आली, त्यानं ती कशीतरी थोडीशी खाल्ली, वैदेहीनं त्याला गोळया दिल्या त्या त्यानं घेतल्या व परत झोपला.
वैदेहीनं जेवण आटोपलं, आणि नंतर कामे आटोपून हॉलमध्ये आली, शैलेश झोपलेला होता, ती सोफाचेअरवर बसली आणि टी.व्ही.ऑन केला.
शैलेशला जाग आली तेव्हा दुपारचे दोन वाजले होते, त्याच्या अंगात ताप अद्यापही होताच, त्याच्या बाजुच्या सोफाचेअवर वैदेही डोळे मिटून पहुडली होती. टीपॉयवर ठेवलेल्या जगमधून तो पाणी प्याला, व डोळे मिटून सोफ्याला टेकून बसला. जरावेळानं त्यानं डोळे उघडले, आणि वैदेहीकडे बघायला लागला, आज पहिल्यांदा तो तिला इतकं जवळून डोळे भरुन बघत होता, किती सुरेख होती ती, तिला बघताना त्याचे डोळे पाणावले.
त्याचं पण काय नसिब होतं, इतकी सुरेख पत्नी असुनही त्याला तिचं प्रेम मिळत नव्हतं, त्याचं मन तिच्याविषयी प्रेमांन ओथंबलेलं असतांनाही तो तिला प्रेम देवू शकत नव्हता. जरावेळासाठी त्याला वाटलं की तिच्या कुशीत डोक ठेवून छान डोळे मिटून घ्यावे व शांत झोपावं, पण तो तसं करु शकत नव्हता. आज त्याला शरयुची खूप आठवणं येत होती, त्याला बर नसलं की ती त्याच्याजवळ बसलेली असायची, त्याच्याशी गप्पा मारायची, तिची आठवण झाली आणि त्याचे डोळे पाणावले, त्यानं डोळे घट्ट मिटून घेतले, त्याच्या डोळयातील अश्रृ त्याच्या गालावर ओघळले होते.
सोफाचेअर वर पहुडलेल्या वैदेहीला जाग आली, तिनं घडयाळाकडे बघीतलं दुपारचे सव्वा दोन वाजले होते, तिनं शैलेशकडे बघीतल, तो सोफ्याला टेकून डोळे मिळून बसला होता, त्याच्या डोळयातून ओघळणारे गालावरील अश्रृ बघून तिच्या काळजात कालवाकालव झाली, शैलेश कां रडतोय हे तिला कळत नव्हतं, पण जरावेळासाठी तिला वाटतं की त्याचं डोकं कुशीत घेवून त्याला प्रेमानं कुरवाळावं, पण ती तसं करु शकली नाही.
शैलेशला डोळे उघडतांना बघून वैदेहीनं नेत्र मिटले आणि परत सोफाचेअरला टेकून पहुडली, शैलेशनं नेत्र उघडले, त्यानं परत वैदेहीकडे बघीतलं, ती तशीच पहुडली होती, त्यानं मोबाईल हातात घेतला व शरयु ला फोन लावला.
“दादा कसा आहेस" शरयुचा पलीकडून आवाज आला
“छान, तु कशी आहेस गं" त्याचा भारावलेला स्वर
“मी मस्त आहे, काय झालं दादा, तुला आवाज कां असा रडवेला येतो"
“काही नाही गं, जरा घसा बसलेला आहे"
“आणि वहिणी कशी आहे"
“ती पण ठिक आहे, निलेश काय म्हणतो, इतक्यात फोन नाही आला त्याचा"
“त्याला कुठे वेळ असतो, सकाळी ऑफिसला गेला की रात्री येतो"
“तुझी खूप आठवण येत होती म्हणून फोन केला"
“तुला बरं तर आहे ना"
“कां"
“तुझा आवाज एैकून मला वाटलं की तुला बरं नाही"
“तसं काही नाही, तुझा दादा अगदी ठणठणीत आहे"
आणि हो हनीमून हून कधी आलास, तुला डिस्टर्ब नको म्हणून मी तुला फोन नाही केला"
“आजच आलो" तो खोटं बोलून गेला
“ठिक आहे, काळजी घे स्वत:ची"
मोबाईल बाजुला ठेवून, त्यानं परत डोळे मिटून घेतले.
वैदेहीनं नेत्र उघडले, शरयु सेाबत शैलेशचं फोनवर बोलणं तिनं ऐकलं होतं, शरयुशी बोलतांना त्याचा स्वर भारावला होता, तेव्हा तिचंही मन भरुन आलं होतं, जरावेळात ती उठली, शैलेशला दुपारच्या गोळया दयायच्या होत्या, ती किचनमध्ये गेली दोन कप चहा बनवला .
शैलशही उठून बसला, तिला दिसू नये म्हणून त्यानं लगेच बाथरुममध्ये जावून आसवांनी भरलेला चेहरा धुतला, व सोफ्यावर येवून बसला, वैदेहीनं त्याला चहा आणि दुपारच्या गोळया दिल्या. गोळया घेवून तो परत पहुडला, त्याच्या अंगात ताप अजुनही होताच.
बघता बघता सायंकाळ झाली, आज दिवसभर शैलेश घरी असुनही वैदेहीला एकटं वाटत होतं, आज दिवसभर ती शैलेशचाच विचार करत होती, कदाचीत तिला प्रेमाची किंमत कळत चालली होती, तिला शेलेश आवडु लागला होता, तिनं विचार केला ती शैलेशला भटकु देणार नाही, सगळं विसरुन ती त्याचा पती म्हणून स्विकार करेल, त्याला प्रेम देईल.
शैलेशचा ताप थोडा उतरला होता.
वैदेही नं सायंकाळचा स्वयंपाक करायला घेतला, शैलेश जागेवर उठून बसला होता, त्याचे डाळे रडून सुजले होते, असं वाटतं होतं की तो आज दिवसभर रडलाय, वैदेही किचनमधून बाहेर आली, आणि तिनं एक नजर शैलेशकडे बघीतलं, त्याची अवस्था बघून तिच्या डोळयात आसवं तरळली, तिचं मन गहिवरल ती बोलली "बरं वाटत नाहीये का"
तिच्या बोलण्याने त्याचे डोळे भरुन आले तो बोलला "कां दया दाखवतेस माझ्यावर, मला नकोय कुणाची सहानुभूती, एकटं जगायची सवय झालीय आता, कुणी नाही मला, एकटा आहे मी, एकटं जगायचं एकटयानं मरायचं"
ती जरावेळ तशीच स्तब्ध उभी राहली, कदाचीत त्याचं बोलणं तिच्या काळजात घाव घालुन गेलं होतं, ती तिथेच सोफ्यावर त्याच्या शेजारी बसली, तिचे डोळे भरुन आले, तिला हुंदका आवरला नाही, तिला रडतांना बघून त्याचंही मन द्रवलं, त्याला वाटलं की तिला कुशीत घ्यावं व तिचं अश्रृ पुसावे, पण त्यानं शब्द दिला होता तिला की तिच्या अंगाला स्पर्श करणार नाही, तो काही करु शकला नाही.
इतक्यात डोअरबेली वाजली, वैदेहीनं डोळे पुसले आणि दार उघडायला गेली
दारात पुजा उभी होती, वैदेही तिला ओळखत नव्हती त्यामुळे ती बोलली "कोण हवयं आपणाला"
“शैलेश केळकर इथेच राहतात ना"
शैलशनं पुजाचा आवाज ओळखला आणि तो उठून दारापर्यंत गेला व बोलला "ओह पुजा, कम इन"
पुजा आत आली, वैदेहीनं दार लावून घेतलं
ती आत आली व शैलेशकडे बघून बोलली "काय तब्बेत बरी नाही वाटते"
“बस ना, आज इकडे कशी काय"
ती सोफाचेअर वर बसली व बोलली "आज आफिसला आला नाही, म्हटलं, चला भेटून यावं"
शैलेश काही बोलणार इतक्यात वैदेही पाणी घेवून आली, व पाण्याचा ग्लास पुजाच्या हातात दिला, ग्लास हातात घेत पुजा बोलली "थॅन्कस्"
शैलेशनं वैदेहीकडे बघीतलं व बोलला "जरा कॉफी बनव हिला कॉफी खूप आवडते"
“कॉफी वैगरे काही नको मी गप्पा मारायला आली आहे" पुजा बोलली
“गप्पा मारु गं, आणि तुला जेवनही करुन जायचं आहे" शैलेश बोलला
“नाही जेवन वैगरे काही नको, प्लीज"
“ते काही नाही जेवन करुन जावच लागेल" शैलेशचा आग्रह
वैदेही आत किचन मध्ये गेली त्याची सुजलेले डोळे बघून ती बोलली "आर यु ऑल राईट, रडला बिडलास की काय"
“नाही, जरा शरयुशी फोनवर बोलत होते त्यामुळे जरा ...”
“खरचं तुम्हा बहीण भावंडाचं प्रेम अगदी मस्त आहे, तुझी ही काय बोलते" ती हळुच बोलली
“ठिक आहे, तब्बेत बरी नाही म्हणून केअर करतेय"
“रियली, म्हणजे गाडी रुळावर आली म्हणायची" ती हळुच बोलली
“तसं माझी नसीब कुठे, तु बोल कशी आहेस"
“मी मस्त मजेत आहे"
“तुझी ती मैत्रीण, सोनाली तिला कां नाही आणलं, छान बडबडी आहे"
“तिलाच घेवून येणार होते, उशीर झाला असता, म्हणून ऑफिसमधून परस्पर इकडेच आले, वाईट वाटणार नसेल तर एक विचारु"
“विचार"
“मला असं कळलं की काल रात्री तु, अमित, सुनिल, महेश पार्टीला गेले आणि मस्त दारु प्याले"
“तुला कुणी सांगितलं"
“अमित बोलला"
“आयला हा अमित ना अगदी बायकांसारखा आहे, कुठलीही गोष्ट त्याच्या पोटात रहातच नाही"
“मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, मला माहित आहे तु कधीच पीत नाही, तुझ्यासारख्यांनी असं करावं म्हणजे"
“सॉरी पुजा, खरं तर मी पीणारच नव्हतो, अमितनं एक पॅग दिला, नंतर काय मनात आलं काय माहित, हल्ली मी काय करतो ते मलाही कळतं नाही"
“यानंतर असं नाही करणार ना"
“नाही"
“प्रॉमिस"
“यस, प्रॉमिस, पण एका अटीवर"
“काय"
“तुला जेवन करावं लागेल"
“बसं इतकचं, ठिक आहे, मी मम्मा ला फोन करुन सांगते" ती हसत बोलली
इतक्यात वैदेही कॉफीचे दोन कप घेवून आली, एक कप तिनं पुजाला दिला व एक शैलेशला, ती आत जायला निघाली तोच पुजा बोलली "काय गं तुझा कप कुठाय"
“मी नाही बनवली माझ्यासाठी"
“तुला कॉफी आवडत नाही" पुजा तिला बोलली
“तसं काही नाही, आवडते"
“जा एक रिकामा कप घेवून ये" पुजा बोलली
वैदेही नाही म्हणू शकली नाही, ती किचन मध्ये गेली व रिकामा कप घेवून आली, त्यात शैलेश आणि पुजानं थोडी थोडी कॉफी टाकली , कप वैदेहीच्या हातात दिला, व तिचा हात पकडून बोलली "बैस इथे"
वैदेही तिच्या जवळ सोफ्यावर बसली व बोलली "बायकोची ओळख करुन दयायची पध्दत आहे ना तुझ्याकडे?” ती शैलेशकडे बघत बोलली
शैलेश हसला व बोलला "वैदेही, ही माझी मैत्रीण आहे पुजा, माझ्याच ऑफिसला असते, आणि पुजा ही वैदेही माझी पत्नी"
वैदेही आणि पुजानं एकमेकांशी हात मिळवणी केली.
पुजानं कॉफीचा एक घोट घेतला व बोलली "नाईस,छान झालीय, तुला माहित आहे वैदेही हा नेहमी ऑफिसमध्ये माझ्याशी बोलायला लाजायचा" पुजा हसत बोलली
शैलेश हसला, वैदेहीही हसली, तिला हसतांना बघून त्याला खूप छान वाटतं, आज पहिल्यांदा तो तिला हसतांना बघत होता
“तुझी मैत्रीण आहे ना सोनाली, तिची मी खास मैत्रीण आहे" पुजा वैदेहीला बोलली
“काय? तुम्ही सोनालीच्या मैत्रीण आहात" वैदेही हसत बोलली
“हो, आणि मला तुम्ही वैगरे म्हणायचं नाही, फक्त पुजा म्हणायचं"
वैदेहीनं तिनं हसत होकारार्थी मान हलवली
पुजा जेवन करुन घरी निघून गेली होती, वैदेहीला खूप बरं वाटलं होतं, किचनमधून तिनं मघाशी दोघांच संभाषण एैकल होतं, त्यांच्या बोलण्यातून तिला कळलं होतं की, काल शैलेश मित्रांसोबत पार्टीला गेला होता, पुजा तिला खूप आवडली होती, पुजासारखी मनमिळावू आणि सुंदर शैलेशही मैत्रीण आहे हे तिला पहिल्यांदा कळलं होतं, कां कुणास ठाऊक पण ती आज लग्नानंतर पहिल्यांदाच इतकी आनंदात होती.
पुजा येवून गेल्याने शैलशलाही बंर वाटतं होत, त्याचा ताप कुठल्या कुठे पळाला होता, त्याला बरं वाटतं होतं, लग्नानंतर आज पहिल्यांदा तो वैदेहीशी इतक्या मोकळेपणान बोलला होता, जेवतांना पुजा छान गप्पा मारत होती, ती दोघांनाही हसवत होती, तिच्या येण्याने घरातील तणाव बराचसा दूर झाला होता, त्यानं विचार केला की तो आजपासून वैदेही दुखावेल असं काहीही करणार नाही.
आठ दहा दिवस असेच निघून गेले, वैदेही सकाळीच उठायची जेवन बनवायची, त्याचा डबा भरुन दयायची, तो तिच्या कामात ढवळाढवळ करायचा नाही, सायंकाळी दोघे एकत्रच जेवायचे, तिला त्रास होवू नये म्हणून तो ऑफिसमधून वेळेत घरी यायचा, दोघे एकमेकांशी खूप कमी बोलायचे अगदी कामापुरतं, तो तिच्याशी आदरानं वागत होता, आदरानं बोलायचा, रात्री तो बाहेर सोफ्यावर झोपायचा तर ती बेडरुममध्ये झोपायची, ती शैलेशवर प्रेम करायला लागली होती, तिनं शैलेशचा स्विकार करायचं मनोमन ठरवलं होतं, तो तिच्याशी अंतर ठेवूनच वागत होता, वैदेहीचं मन तिलाच खात होतं, ती शैलेशसोबत मनमोकळेपणानं वागत होती, स्वत:हुन त्याच्याशी बोलायला लागली होती. शैलेश तिच्या अंगाला तिच्या परवानगी शिवाय स्पर्श करणार नव्हता हे तिला कळून चुकलं होतं, काय करावं तिला काही कळतं नव्हतं.
14 जून
रात्रीचं जेवन आटोपलं होतं, रात्रीचे साडेदहा वाजले होते, वैदेही आत बेडरुममध्ये झोपायला गेली, शैलेश स्टार मुव्हीज वर Mr.Bean हा कॉमेडी चित्रपट बघत होता, सिनेमा इतका कॉमेडी होता की बघता बघता एकटाच हसत होता. एवढयात डोअरबेल वाजली त्यांन दार उघडलं, दारात राज उभा होता.
त्याला बघताच शैलेशला हर्ष झाला, दोघांची गळा भेट झाली राज बोलला "कैसा है मेरा यार"
“ठिक आहे, इतके दिवस काय केलं गावी, तुझा फोनही लागत नव्हता"
“गावी नव्हतो गेलो"
“मग कुठे गेला होता"
“एक शिबीर होतं, आध्यात्मीक एकविस दिवसांच, तिथेच होतो, एकविस दिवस मौन, कुणाला भेटायचं नाही, कुणाशी बोलायच नाही, मोबाईल नाही, फक्त ध्यान आणि मौन, खूप हलकं वाटतं, पुर्ण शरीराचं शुध्दीकरण झालय"
“क्या बात है, मला का नाही बोलला मी पण आलो असतो"
“तुला नेण्याचा विचार होता पण तुझं नुकतच लग्न झालं होतं त्यामुळे... वैदेही कुठाय"
“झोपलीय, बेडरुममध्ये"
“सगळं ठिक आहे ना"
“एक विचारु"
“विचार"
“राज खरं सांग मला, वैदेहीनं खरचं लग्नाला होकार दिला होता"
“काही problem आहे काय"
“होय"
“अरे पण...”
“राज मला खरं काय ते सांग"
“खरं तर वैदेहीचा लग्नाला नकारच होता, मला तुझी अवस्था बघवत नव्हती, तु जेव्हा शुक्रवारी तलावाजवळ तिला भेटला, त्यावेळी मोबाईल मध्ये मी तुम्हा दोघांचे एकत्र फोटो काढले व वैदेहीला दाखवले आणि बोललो की तु जर लग्नाला तयार नाही झालीतर हे फोटो घरी, बाहेर दाखवेल, व्हायरल करेल"
“काय? मॉय गॉड असं केलंस तु, राज मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती"
“काय करायला हवं होतं मी, तुच सांग ना, त्यादिवशी तिनं नकार दिल्यावर कधी दारुलाही न शिवणारा तु चक्क बार मध्ये जावुन दारु प्यालास, शैलेश त्या दिवशी तुझी अवस्था बघीतली तेव्हाच ठरवलं काहीही झालं तरी तुझं आयुष्य बरबाद होवु देणार नाही"
“तुझ्यावर रागवावं की शाबाशी दयावी हेच कळतं नाही, पण निदान मला तर सांगायचं होत रे"
“तुला सांगीतलं असतं तर तु मला हे सगळं नाही करु दिलं नसतं, प्लीज शैलेश तु रागावु नको यार, मी बोलतो वैदेहीशी सगळं सांगतो तिला"
"त्याची गरज नाही, सगळं ठिक आहे आता, तुझ्यावर रागावुन काय करु यार, तु जे केलं तर माझ्यासाठीच केलं, तुझ्यासारखा मित्र मिळायलाही भाग्य लागतं"
दोघांच्या गप्पा झाल्यावर जरावेळानं राज घरी निघून गेला
वैदेही बेडवर झोपलेली होती इतक्यात डोअरबेल वाजली, ती दार उघडण्यासाठी उठली, पण तेवढयात शैलेशनं दार उघडलं होतं, तिला राज आल्याचं समजलं, ती बाहेर येणार होती, पण ती बेडरुमच्या लोटलेल्या दारात उभी राहून दोघा मित्रांच बोलणं एैकत होती, सगळं एैकून तिच्या डोळयांत आसवं जमा झाली. आजपर्यंत ती समजत होती की तिच्या मर्जीविरुध्द लग्न करण्यांत शैलेशचा हात आहे, पण आज तिला कळलं होतं की हे सगळं शैलेशला माहितच नव्हतं, आणि ती शैलेश सोबत अशी वागली होती, तीनं स्वत:ला बेडवर झोकून दिलं आणि उशीला कवटाळून रडू लागली.
तिनं डोळे पुसले व वॉर्डरोब मधुन लग्नाचा अलबम काढला, आजपर्यंत तिनं तिच्या लग्नाचा अलबम बघीतलाही नव्हता, पण आज ती लग्नाचे सगळे फोटो डोळे भरुन बघत होती, किती सुरेख दिसत होते दोघेही, शैलेशच्या एका फुलस्केप फोटोवर तिनं प्रेमानं हात फिरवला, आणि आपल्या ओठांनी चुंबन घेत ती बोलली "सॉरी शैलेश, मी खुप अन्याय केलाय तुमच्यावर, सॉरी" आणि तिनं तो फोटो छातीशी कवटाळला व बोलली "आय लव यु शैलेश"
15 जुन
वैदेही सकाळी सहा वाजताच उठली होती, आज तिला छान फ्रेश वाटतं होतं, तिनं मनोमन विचार केला होता, झाल्याप्रकाराबद्दल ती शैलेशची माफी मागेल.
शैलशही उठला होता, ब्रश करुन बाल्कनीत झोपाळयावर बसला होता, छान गार वारा सुटला होता, ढग भरुन आले होते. कदाचीत पहिला पाऊस पडणार होता.
वैदेही चहाचे दोन कप घेवून बाल्कनीत आली, एक कप तिनं शैलेशला दिला आणि तिथेच बाल्कनीत उभी राहून चहाचे घोट घेत होती.
आणि पावसाला सुरवात झाली, पाऊस बघून वैदेहीला पावसात भिजायची तिव्र इच्छा झाली, तिला पावसात भिजायला खुप आवडायचं, पण आज ती असं करु शकत नव्हती, ती विवाहित होती, शैलेशनं जरी तिच्या शरीराला स्पर्श केला नव्हता तरी ती एका जबाबदार विवाहितेसारखी वागत होती, तिच्यात हा बदल केव्हा व कसा झाला हे तिलाही कळलं नव्हतं.
पाऊस पडतांना बघून शैलेश झोपाळयाहून उठला व बाल्कनीतून हात लांबवून त्यांन पावसाचे तुषार हातावर घेतले, आणि वैदेहीकडे बघीतल, ती बाहेर पावसाकडे बघत होती.
तो बोलला "वैदेही"
ती त्याच्याकडे बघायला लागली
“तुझ्याशी थोडं बोलायचं आहे"
“बोला" ती जरा जवळ येत बोलली
“खरं तर चुक माझीच होती, मी तुला असं फोटोग्राप्स दाखवून लग्नाला होकार मिळवायला नको होता, हे सगळं राज नं माझ्या सांगण्यावरुन केलं, त्याचा काही दोष नाही, मी असं करायला नको होतं, हे मला आता कळलयं, मी तुझ्या भावनांशी खेळ केलाय, मला तुझं आयुष्य बरबाद करण्याचा काही अधिकार नव्हता, आणि अधिकारही नाही, या पापाबद्दल देव मला क्षमा करेल की नाही माहित नाही, पण आज माझी चुक मला कळली आहे, मला माहित आहे, मी तुला आवडत नाही, तुझं माझ्यावर प्रेम नाही, तु मला पती मानलेलं नाही, आज मी तुला हे सांगतोय की तु तुला हव्या असलेल्या जीवनसाथी सोबत लग्न करायला मोकळी आहेस, तु माझ्याशी कधीही घटस्फोट घेवू शकतेस, आज पर्यंत मी तुझ्याशी बरचं वाईट वागलोय आणि तु क्षणोक्षणी माझी काळजी घेत आली आहेस...” बोलता बोलता त्याचे डोळे पाणावले , तो पुढे बोलला "म्हणतात की स्त्री चं हृदय विशाल असतं, मायेनं भरलेलं असतं, कां एकदा तु मला क्षमा करु शकशील, आजपर्यत माझ्या वागण्याने माझ्या बोलण्याने तुझ्या भावना दुखावल्या असतील तर मला क्षमा करशील एवढीच अपेक्षा आहे.. सॉरी... “ त्याच्यानं पुढं बोलवेना आणि तो डोळे पुसतच आत निघून गेला.
आणि वैदेही, सगळं ऐकूण तिच्या डोळयांना आसवांच्या धारा लागल्या होत्या, आज तिला कळलं होतं की शैलेश किती मोठया मनाचा आहे, मित्रानं केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त तो स्वत: करायला निघाला होता, पण शैलेशच्या बोलण्याने तिला खुप धक्का बसला होता, ती कितीतरी वेळ तिथेच उभी होती.
शैलेश ऑफिसला निघुन गेला, आणि जरा वेळानं राज घरी आला तो वैदेहीला बघताच बोलला "हाय कशी आहेस"
“ठिक, तु कसा आहेस"
“मी पण ठिक, वैदेही तु लग्नाला कशी तयार झाली याबाबत शैलेशला काहीच माहित नव्हतं, त्यामुळे त्याच्याविषयी तुझ्या मनात काही गैरसमज असेल तर तो काढुन टाक"
“नाही तसं काही नाही, तुम्हा मित्राचं प्रेम बघुन हेवा वाटतो"
“काही गैरसमज तर नाही ना"
“आधी होता, पण आता नाही, आता सगळं ठिक आहे"
“थॅन्क गॉड, चल मी निघतो"
“अरे चहा तर घेवून जा"
“नाही नको ऑफिसला उशीर होतोय"
आणि राज निघुन गेला
वैदेही घरीच होती आज तिचं लक्ष कशातच लागत नव्हतं, शैलेशचं घटस्फोटाबद्दल बोलणं तिच्या काळजाला लागलं होतं, काय करावं काही सुचत नव्हतं, ती जेवलीही नाही, फ्लॅटला लॉक करुन ती घराबाहेर पडली.
जरावेळात ती आपल्या आईकडे आली, तिला बघताच आईला आनंद झाला, ती आईच्या कुशीत शिरली, तिचे डोळे पाणावले, रुपाली घरी नव्हती, ती कामाला गेली होती. जरावेळ आईशी गप्पा मारल्यानं तिचं मन हलकं झालं, ती बेडवर पहुडली आणि विचार करायला लागली, तिच्या मनात व्दंद सुरु होतं, मन अस्वस्थ होतं, शेवटी तिन निर्णय घेतला अगदी ठाम, काहीही झालं तरी घटस्फोट घ्यायचा नाही आणि शैलेशलाही घेवू दयायचा नाही. तिनं विचार केला ती त्याच्या आयुष्यातलं एकाकीपण दुर करेल, त्याला भटकू देणार नाही.
ती सायंकाळपर्यंत घरीच थांबली सांयकाळी रुपाली आली, ती रुपालीच्या कुशीत शिरली आणि तिला घट्ट मिठी मारली तिच्या पाठीवरुन हात फिरवत रुपाली बोलली "काय गं, आज अशी कां भेटतेय कधी न भेटल्यासारखी"
“काही नाही गं, तुझी खुप आठवण येत होती"
“सगळं ठिक तर आहे ना"
“हो, सगळं ठिक आहे, अगदी मजेत आहे"
जरावेळानं तिचे बाबा कामाहून आले, तिनं त्यांची भेट घेतली आणि घरी येण्यासाठी निघाली, रुपाली आणि आई तिला थांबण्याचा खूप आग्रह करीत होत्या, शैलेशला इकडेच बोलावून दोघेही इकडूनच जेवन करुन जा असं बोलत होत्या, पण वैदेही थांबली नाही.
रिक्षानं ती चौकापर्यंत आली, आभाळ चांगलच भरुन आलं होतं, सायंकाळचे सात वाजायला आले होते, चौकापासून तिचं घर दोन तिन मिनीटावर होतं, रिक्षाचे पैसे देवून ती घराकडे चालत निघाली, आणि लगेचच पाऊस सुरु झाला, आज तिला तिला पावसात भिजावसं होतं, त्यामुळे ती कुठेही आडोश्याला थांबली नाही, घरी येतपर्यंत ती पुरती भिजली होती.
ती घरात आली कपडे चेंज केले, पावसात भिजल्याने तिला थंडी वाजायला लागली होती, शैलेश येण्याच्या आतच तिनं स्वयंपाक तयार केला.
शैलेश वेळेतच घरी आला होता, रात्रीचं जेवन दोघांनी मिळून केलं, आणि दोघेही आपापल्या ठिकाणी झोपायला गेले.
16 जून
शैलेश सकाळी सात वाजता झोपून उठला, बेडरुमचं दार लेटलेल होतं, वैदेही अद्याप उठलेली नव्हती, आंघोळ आटपून तो आठ वाजता बेडरुमध्यमे आला, वैदेही झोपलेलीच होती, त्यानं झोपलेल्या वैदेहीकडे बघीतलं, तिचं अंग थरथरत होतं, तो तिच्या जवळ गेला व तिला आवाज दिला "वैदेही, कायं झालं"
“खूप थंडी वाजतेय, डोकं पण दुखतय"
शैलेश तिच्या अंगाला स्पर्श करायला पुढे सरसावला, पण लगेच थांबला त्यानं लगेच डॉक्टरांना फोन केला
जरावेळात त्याचा मित्र डॉक्टर अजय मोडक घरी आला, त्यांन वैदेहीला तपासलं आणि औषधं दिली व बोलला "काय रे, कॉम्पीटीशन सुरु आहे काय आजारी पडायची तुम्हा दोघांची, तुझ झालं आता तिचं"
शैलेश हसला व बोलला "ठिक तर आहे ना, काय झालयं"
“मला वाटते वहिणी पावसात भिजल्या असणार" अजय बोलला
शैलेशनं वैदेही कडे बघीतलं, ती खाली बघायला लागली,
“मी काही औषधं लिहून देतो ती घेवून ये, आणि हो काळजी घे वहिणींची"
डॉक्टर निघुन गेले, शैलशही त्यांच्या पाठोपाठ जावून मेडीकल मधून औषधं घेवून आला.
त्यानं पुजा ला फोन केला
“हॅलो, पुजा"
“बोल"
“आज मी ऑफिसला येणार नाही"
“काय झालं तब्बेत तर ठिक आहे ना"
“माझी ठिक आहे, वैदेहीला बरं नाही"
“मग एक दिवस काय चांगलं दोन तिन घरी राहून काळजी घे तिची, मी येईल तिला भेटायला"
“ओके, सी यु"
“बाय"
शैलेश किचनमध्ये शिरला आणि मस्त दाल खिचडी बनवायला घेतली, अर्ध्यातासात त्यानं मस्त गरमागरम दाल खिचडी बनवली, पापड रोस्ट केले, आणि डायनिंगवर दोन ताट लावले व बेडरुमध्ये जावून तो वैदेहीला बोलला "चल जरा जेवून घे, औषधं घ्यायची आहेत"
ती उठली, तिच्या अंगात ताप होता, ती फ्रेश झाली, आणि डायनिंगवर जेवायला बसली, दाल खिचडी तीला आवडायची, खूप छान झाली होती, ती जेवली आणि परत बेडरुममध्ये आली, जरावेळानं शैलेश एक पाण्याचा ग्लास आणि औषधं घेवून आला, तिला गोळया दिल्या, तिच्या शेजारी बसला, व बोलला "आता बरं वाटतयं?
तिच्या डोळयात आसवं गोळा झाली ती बोलली "का इतकी काळजी घेताय माझी, आजपर्यंत काय केलंय मी तुमच्यासाठी, मी तुमच्या सहानुभूतीच्या लायक नाही हो"
“कां अशी बोलतेय, लायक तर मी तुझ्या नाही"
“खूप छळलयं मी तुम्हाला, तुमचा काही दोष नसतांना, पण कां मी इतकी वाईट आहे की तुम्ही माझ्यापासून घटस्फोट घेवू इच्छीता"
“काय बोलतेस हे"
“काल रात्री तुम्हा दोघां मित्रांचं बोलणं एैकलं मी, राज नं केलेल्या चुकीबद्दल तुम्हाला माहित नव्हतं तरीही मी तुम्हाला दोषी धरलं, आणि तुम्ही राज ने केलेल्या चुकींच प्रायश्चित्त स्वत: करायला निघालात, काल तुम्ही तुमच्या मनातलं बोलून गेलात, पण माझ्या मनाचा विचार नाही केला,“ तिला हुंदका आवरला नाही
“वैदेही प्लीज रडू नको अग, तुला रडतांना नाही बघवत मला"
“मला माहित आहे, तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर, त्यादिवशी तलावाजवळ बोललेले शब्द आठवतात मला आजही"
“नाही आहे माझं प्रेम कुणावर" तो रडवेल्या स्वरात बोलला
ती भावनेनं व्याकुळ झाली व तिनं शैलशचं हात धरला व बोलली "कां एकदा क्षमा करणार नाही तुम्ही मला"
शैलेशनं तिच्या डोळयात बघीतलं आणि बोलला "हे काय तु मला स्पर्श करतेस"
“हो, कारण मी प्रेम करतेय तुमच्यावर , I love you”
आणि तीनं रडतच शैलेशला मिठी मारली, शैलशनं थरथरत्या हातानं तिच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवला आणि तिला कडकडून मिठी मारली व बोलला "प्लीज रडू नको अग, नाही तर मी पण रडेल आता"
“आय लव यु शैलेश"
“आय लव यु टू" त्यानं तिला मिठीतून वेगळं केलं आणि बोटाने तिचे अश्रृ पुसले व बोलला "चल आराम कर, मी इथेच आहे तुझ्याजवळ"
तीनं त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि डोळे मिटून घेतले, आज तिला खूप शांत वाटत होतं.
18 जून
वैदेही तापातून बरी झाली होती, या दोन दिवसात शैलेशन तिची खूप काळजी घेतली होती, वैदेही खूप आनंदात होती. या दोन दिवसात दोघे एकमेकांच्या खूप जवळ आले होते, तो जेवन बनवत असतांना ती त्याच्याजवळ किचनमध्ये चेअर टाकुन बसायची व त्याच्याकडे एकटक बघत असायची, त्याला अवघडल्यासारखं व्हायचं,
आज त्यांचा सायंकाळी फिरायला जायचा प्लॅन होता, लग्नानंतर आज पहिल्यांदाच ते एकत्र बाहेर फिरायला जाणार होते.
दोघे मोटरसायकल वर निघाले, वैदेही बाईकवर छान त्याला पकडून बसली होती. दोघांनी रेस्ट्रारंट मध्ये जेवन केलं, जरा वेळ गार वातावरणात फिरले, रात्रीचे साडेदहा वाजल होते, दोघे बाईकवर घराकडे परतत होते, आणि अचानक पावसाला सुरवात झाली.
घरी येत पर्यंत दोघेही पुरते भिजले होते. दोघे हसत हसतच घरी आले.
केस ओले झाल्याने वैदेहीनं, केस मोकळे सोडले आणि टॉवेलनं पुसायला लागली, आणि शैलेशचं लक्ष तिच्याकडे गेलं, ती लाजली आणि बेडरुमध्ये जायला निघाली, तोच शैलेशनं तिचा हात धरला व तिला जवळ घेतलं, ती बोलली "काय, हे, मला थंडी वाजतेय"
“तु पावसात भिजली आहेस अशीच मिठीत रहा नाही तर परत तब्बेत बिघडेल"
“हो.. चालेल मला, मग तुम्ही परत माझ्याजवळच रहाल, आणि तेवढेच मला माझे लाड पुरवता येतील" ती हसत बोलली
“ओ हो... लाड पुरवायचे आहेत काय"
“हो"
आणि मग त्यांन तिला घट्ट मिठी मारली.