पाऊस दाटलेला
पाऊस दाटलेला


पाऊस दाटलेला...
आला पाऊस गेला पाऊस
मन ही झाले ओले
तुझ्या विरली डोळयातले अश्रृ नाही सुकले
डोळयात आसवांचे ढग साचले
आभाळ पावसाने भरले
मन आसवांनी ओथंबले
झाले माळरान चिंब ओले
आभाळ मोकळे मोकळे
झाली माती माय ओली
रानवन चिंब भिजले
पावसाचे पाणी जणू मनात साचले
पुन्हा ढग पावसाने भरले
आसवांचे पाट मनाच्या कप्प्यात दाटले
पाऊस त्याच्याही मनात भरला होता
तिच्याही मनात भरला होता
त्या पावसाला मोकळं होण्यासाठी
फक्त वाट हवी होती..
शहराच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात विनितचा टुमदार बंगला होता, बंगल्याच्या मागाचा हिरवागार विस्तीर्ण परिसर मन माहून टाकणारा होता, बंगल्याच्या टेरेसवर तो एकटाच उभा होता, शुन्यात बघत, त्याचे डोळे भरुन आले.
अबोलीच्या मृत्यूनंतर विनित एकाकी पडला होता.
एका सुंदर बाळाला जन्म देवून ती त्याला कायमची एकटं सोडून देवाघरी निघून गेली होती. त्यानंतर मुलीच्या विरहात दोन वर्षानी अबोलीचे बाबा ही गेले.
निसर्ग पार्कमध्ये त्याचा बंगला होता आणि तिथेच त्यानं आपलं ॲड एजन्सीचं ऑफिस उघडलं होतं.
अबोलीला जावून चार वर्ष झाली होती. तो जरी अबोली शिवाय जगु शकणार नव्हता, तरी त्याला जगावं लागणार होतं, अबोली ज्या बाळाला जन्म देवून गेली होती, तिच्यासाठी "आश्वी" आता चार वर्षाची झाली होती.
00000
आश्वी साठी एक केअरटेकर होती, जी त्याच्या ऑफिसमध्ये रिशेप्शनिस्टचं कामही बघायची, तेवीस वर्षाची देखणी तरुणी "कोमल" नांव तिचं.
कोमल कोकणातून, जॉब शोधायला शहरात आली होती, विनितच्या एका मित्राच्या नात्यातील असल्याने विनितनं तिला जॉब दिला. विनित आपल्या ॲड एजन्सी साठी मदतनिसच्या शोधात होता आणि अशातच एक दिवस त्याचा मित्र तिला घेवून त्याच्याकडे आला होता.
तिला रहायला जागा नव्हती त्यामुळे विनितनं तिची व्यवस्था बंगल्याच्या आऊट हाऊस मध्ये केली, आणि ती तिथे रहायला तयार झाल्याने विनितनं आश्वी ची जबाबदारी तिच्यावर सोपवली होती. ती आश्वीवर खूप जीव लावायची, आश्वी दोन वर्षाची होती तेव्हापासून ती आश्वीचं सगळं करायची. त्यामुळे आता विनित, आश्वीबद्दल निश्चिंत होता. बंगल्यात घरकामासाठी "शांता" होती. ती एक पन्नासच्या घरात असलेली स्त्री होती, ती सकाळी बंगल्यात यायची, सकाळच्या नाश्ता, जेवन त्यानंतर भांडी कुंडी, बंगल्याची साफसफाई करायची आणि मग रात्रीचे जेवन ही बनवायची.
00000
अबोली गेल्यापासून विनित मनमोकळेपणानं रडलाही नव्हता, त्याची आसवं डोळयातच घर करायची, तिचा निरागस चेहरा, निरागस बोलणं, सगळं त्याच्या हृदयाच्या कप्प्यात साठवलेल होतं, अबोली गेली तेव्हा त्यानं आश्वीला सांभाळायला त्याच्या मानलेल्या बहिणीकडे म्हणजेच, वर्षाकडे दिलं होतं. वर्षानं स्वत:च्या मुलीप्रमाणे तिला सांभाळलं होतं, आश्वी एक वर्षाची असतांना वर्षालाही एक मुलगी झाली, तिच नावं जान्हवी ठेवलं होतं, विनित तिला प्रेमानं जानु म्हणायचा.
आश्वी जेव्हा दोन वर्षाची झाली तेव्हा विनित तिला वर्षाकडून घरी घेवून आला, वर्षा ऐकत नव्हती खूप नाराज झाली होती, पण विनितनं तिला समजवालं, आश्वीमुळे वर्षाच्या स्वत:च्या मुलीकडे दुलर्क्ष झालेलं त्याला चालणार नव्हतं. तेव्हापासून कोमलच, आश्वीला सांभाळत होती.
00000
23 एप्रिल
आज सुटी असल्याने ॲड एजन्सीचं ऑफिस बंद होतं, विनितला जाग आली तेव्हा सकाळचे सव्वा सहा वाजले होते, तो उठला, शेजारी आश्वी गाढ झोपलेली होती. अबोली सारखीच निरागस, लोभस ….. म्हणतात की मुली वडीलांच्या चेहऱ्यावर असतात पण आश्वी ही अबोलीचं रुप घेवून जन्माला आली होती.
विनित बेडरुमध्ये बाल्कनीत आला, त्याची नजर समोर हिरवळीवर एक्सरसाईज करणाऱ्या कोमल वर गेली, तो जरावेळ कोमलकडे बघतच राहला, कोमलची नजर बाल्कनीत उभ्या असलेल्या विनित कडे गेली व ती त्याला बघताच थोडी लाजली व बोलली "गुड मॉर्निंग सर"
“व्हेरी गुड मॉर्निंग.... कॅरी ऑन" तो हसत बोलला
तो बाल्कनीतून खाली उतरला, लॉनवर जावून बसला, जरावेळानं कोमल त्याच्या शेजारी येवून बसली.
ती विनितकडे बघत हसत बोलली "सर बरेच दिवस झाले आश्वीला कुठे फिरायला नेलं नाही, काल मला ती बोलत होती"
“चल मग आज जावुया, पण कुठे जायचं"
“बिच वर जावुया मस्त, गरम फार होतय" कोमल बोलली
“नाईस, ठिक आहे लाग तयारीला, शांता आक्का ला सांग आज जेवन बनवू नको म्हणा, आपण नाश्ता, जेवन बाहेरचं करुया, आश्वीला उठवं तिची तयारी कर"
“ओके सर"
00000
बीच समोरच्या गर्द झाडांच्या सावलीत विनित एकटाच बसला होता, समुद्र किनाऱ्यावर आश्वी आणि कोमल पाण्यांत एकमेकांसोबत खेळण्यांत मग्न होत्या, विनित सारखा कोमलकडे बघत होता, जीन्स आणि टॉपवर ती अधीकच सुंदर दिसत होती. त्याला कोमल आवडायला लागली होती, ज्याप्रमाणे ती आश्वीची काळजी घ्यायची, तिचं सगळं करायची, आश्वीसाठी तिच चांगली आई होवू शकेल असं त्याला वाटायला लागलं होतं, ती आश्वीवर खूप जीव लावायची, त्यामुळे तो कोमलच्या प्रेमात पडला होता. त्यानं मनाशी ठरवलं होतं की तो कोमलला लग्नासाठी विचारेल.
“पापा तुम्ही पण या ना" आश्वी त्याच्याकडे बघत जोरात ओरडली
तो काही बोलणार इतक्यात कोमल बोलली "कम ऑन सर"
विनितची पाण्यात जायची इच्छा नव्हती पण कोमलचं बोलणं तो टाळू शकला नाही, आणि तो किनाऱ्याच्या दिशेनं निघाला.
तो पाण्यात शिरला, कोमल आणि आश्वी एकमेकांवर पाणी उडवण्यांत मग्न होत्या, कोमळ खळखळून हसत होती, तिला हसतांना बघून, विनित तिच्यात हरवला.
कोमल आणि आश्वी त्याच्या अंगावर पाणी उडवायला लागल्या तेव्हा तो भानावर आला, तो ही त्यांच्यासोबत लहान मुलांप्रमाणे पाण्यात मजा करु लागला, आज कितीतरी दिवसांनी तो स्वत:चं दुख: विसरुन मनमोकळेपणानं हसत खेळत होता, त्याला हसतांना बघून कोमलला सुध्दा बर वाटलं होतं.
दिवसभर तिघांनी खूप धमाल केली, हिरव्यागार झाडांच्या सावलीत छान जेवन केलं, आणि सायंकाळी ते परत फिरले, विनित ड्रायव्हींग करत होता तर, कारच्या मागच्या सिटवर कोमल बसली होती, आश्वी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपी गेली होती.
00000
ते घरी परतले तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजले होते, आश्वीला बेडरुममध्ये झोपवून कोमल तिच्या आऊट हाऊसकडे निघाली. विनितनं चेंज केलं आणि बाल्कनीत झोपाळयावर डोळे मिटून पहुडला. त्याला आज खूप शांत वाटत होतं.
कोमल आऊट हाऊस मधून बाहेर आली, तिची नजर झोपाळयावर बसलेल्या विनितकडे गेली. ती जरावेळानं बाल्कनीत आली . तिच्या येण्याच्या चाहुलीने विनितनं डोळे उघडले. कोमल झोपळया समोरच्या आरामखुर्चीवर बसली. विनित बोलला "आजचा दिवस खूप छान गेला ना"
“होय सर, आज खूप छान वाटतयं, आज कितीतरी दिवसांनी मी तुम्हाला आनंदी, मनमोकळे पणानं हसतांना बघीतलं"
“हसण तर कधीच विसरलोय मी"
“खूप प्रेम होतं ना तुमचं अबोलीवर"
“आजही आहे, मी तिला, तिच्या प्रेमाला कधीही विसरु शकत नाही"
ती जरावेळ त्याच्याकडे बघतच रहाली व नंतर न रहावून बोलली "सर एक सांगु, राग तर येणार नाही ना"
“नाही गं, सांग"
“सर मला वाटते, आता तुम्हाला दुसरं लग्न करायला हवं, आश्वीला पण आईच्या प्रेमाची गरज आहे"
“तुझं बरोबर आहे, अबोलीची पण हीच इच्छा होत, पण मला भिती वाटते, आईसारखी प्रेम देणारी दुसरी आई आश्वीला भेटेल?”
“कां नाही भेटणार"
तो क्षणभर थांबला त्याच्या मनात आलं की, कोमलला सांगावं "तुच कां होत नाही तिची आई, तुझ्याशिवाय दुसरं कोण घेवू शकेल तिच्या आईची जागा"
पण तो प्रत्यक्षात तिला बोलू शकला नाही
“काय झालं सर"
कोमलच्या बोलण्याने तो भानावर आला व बोलला "तु आहेस ना इथे, मग मला काळजी नाही "
“सर मी केअरटेकर आहे तिची, तिला आईच्या प्रेमाची गरज आहे"
तो गप्प झाला, मनात विचार चालुच होते त्याला वाटलही की कोमल ला सांगून टाकाव की, माझं प्रेम जडलयं तुझ्यावर, मला लग्न करायचं आहे तुझ्याशी, पण तो बोलू शकला नाही.
हा विषय तेवढयावरच संपला
00000
24 एप्रिल
दुपारचा एक वाजायला आला होता, कोमल रिशेप्शनवर बसली होती, ती कामात व्यस्त होती, इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले "हाय क्युटी"
तीनं समोर बघीतलं, राहुल उभा होता, राहुल तिथेच कामाला होता, तो ॲड फिल्म सुध्दा करायचा, दिसायला हॅण्डसम होता,
“हाय" ती हसत बोलली
“कशी आहेस"
“फाईन"
“काल कुठे बाहेर गेलेली काय, तुझा फोनही लागत नव्हता दिवसभर"
“बाहेर होते, फोन स्वीच ऑफ होता"
“आय सी"
“कुठे गेलेली" तो हसत बोलला
“आश्वीला बाहेर घेवून गेले होते फिरायला, सोबत सर पण होते"
“नाईस, ओके सी यु"
“बाय"
राहुल तिथून निघाला आणि आपल्या जागेवर येवून बसला, इतक्यात त्याचा मित्र सुरज तिथे आला व बोलला "कुठे आहेस यार तु"
“अरे मी गावी गेलेा होतो, तु बोल कसा आहेस"
“मी ठिक आहे, कोमल ला भेटला की नाही"
“हो आत्ताच"
“मग काही बोलला तिच्याशी, प्रपोज केलं तिला"
“नाही यार, हिम्मतच होत नाही"
“प्रेम करतोय ना तिच्यावर .. मग सांगुन टाक ना तिला, आणि लवकर सांग, उशीर झाला तर पश्चाताप करण्याची वेळ येईल, ती सुंदर आहे, कुणीही तिच्या प्रेमात पडेल व तिला प्रपोज करेल"
“तु बोलतो ते बरोबर आहे, पण कसं सांगु तिला"
“कसही सांग, पण लवकर सांग, नाहीतर तुझा मजनू व्हायला वेळ लागणार नाही"
सुरज च्या बोलण्याने त्याचा चेहरा पडला होता
00000
मकरंद डोंगरे, वय वर्ष 32 च्या आसपास असेल, पिल्लई कॉलेजला केमेस्ट्रीचा प्राध्यापक होता, जाड मिशा, दिसायला जरा सावळा, राकट चेहरा, साऊथ पिक्चरच्या हिरोसारखा दिसायचा.
मकरंद अनाथआश्रमात वाढला होता. जो जन्मत: अनाथ नव्हता, त्याचे वडील रघुनाथ डोंगरे यांच्याकडे शेतीवाडी, वडीलोपार्जीत संपत्ती, सगळंकाही होतं, पण रघुनाथरावांनी दारु आणि जुगारापाई सगळं गमावलं, आणि कुटूंबाला रस्त्यावर आणलं, ते त्यांच्या पत्नीचा खूप छळ करायचे, त्याच्या जाचाला कंटाळून त्यांची पत्नी लक्ष्मी एके दिवशी कुठेतरी निघून गेली, त्यावेळी मकरंद फक्त आठ वर्षाचा होता. आई निघून गेल्याने तो एकाकी पडला होता, त्यानंतर त्याचे वडील त्याचा खूप छळ करायचे, जेवायला मागीतलं तर चटके दयायचे, त्याचे वडील त्याला खूप मारायचे, मकरंद ला हे सगळं नकोसं झालं होतं, आणि वडीलांच्या जाचाला कंटाळून तो एक दिवस घरुन पळून गेला. त्यावेळी तो अवघ्या दहा वर्षाचा होता.
भुकेने व्याकुल, एका ठिकाणी चक्कर येवून पडला, भानावर आला तेव्हा तो अनाथ आश्रमात होता. कुणीतरी त्याला तिथे सोडून गेलं होतं.
आणि मग तिथेच राहून त्यानं जिद्दीनं आपलं शिक्षण पूर्ण केलं, आणि लेक्चरर झाला होता, पण लहानपणीचे घाव तो विसरला नव्हता.. कधी त्याला ते सगळं स्वप्नात दिसायचं जे त्यानं सोसलं होतं, तो घाबरुन दचकून उठायचा, नेहमी गंभीर असायचा, हसणं काय असतं ते कदाचीत त्याला माहितही नव्हतं.
अनाथ आश्रमातील एक मुलगी त्याला खुप आवडायची, अपर्णा नांव तिचं, दिसयला खूप सुरेख, उंच सडपातळ, गोरीपान, आणि नेहमी हसरा चेहरा, अपर्णालाही मकरंद आवडायचा. ते भेटायचे एकत्र बसायचे गप्पा मारायचे, पण मकरंद काही तिच्याकडे लग्नाविषयी कधी बोलत नव्हता, एक दिवस अपर्णानं त्याला लग्नाविषयी विचारलं, तो खूप गंभिर झाला होता, खूप वेळ विचार करुन तो त्यावेळी बोलला होता की "आपण लग्न करायचं पण कधीही आईबाबा व्हायचं नाही, अपर्णा त्याच्या प्रेमात होती, त्यामुळे कधीही मुल होवू दयायचं नाही, ही अट तिनं सहर्ष मान्य केली, आणि देाघांचं लग्न झालं, त्यानं स्वत:चा एक फ्लॅट घेतला, आणि दोघांचाही राजाराणीचा संसार सुरु झाला
त्यांच्या लग्नाला आता पाच वर्ष पुर्ण झाली होती.
00000
27 मे
अपर्णा आणि मकरंद यांचा संसार जरी व्यवस्थीत सुरु होता तरी, मकरंद जेव्हा कामावर निघून जायचा, तेव्हा अपर्णाला घरी एकाकी वाटायचं, फ्लॅटच्या खिडकीतून एखादी बाई मुलाला कडेवर घेवून जातांना दिसली तर तिच्यातलं मातृत्व जागं व्हायचं, आतापर्यंत तिनं स्वत:ला मकरंदच्या प्रेमात झोकून दिलं होतं, पण तिला आता आई व्हावसं वाटत होतं, लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढलेली ती, आईबाबांची माया काय असते तिला माहित नव्हतं, आणि अचानक तिच्या मनात विचार आला, आपण जर मकरंदला याबाबतीत बोलून बघीतलं तर, लग्नाला पाच वर्ष होवून गेलीय, कदाचीत तो हो म्हणेल.
तिनं मनाशी ठरवलं याबाबतीत त्याच्याशी बोलायला हरकत नाही.
1 जून
राहुलनं आज मनोमन ठरवलं की कोमल ला प्रपोज करायचचं
कोमल रिशेप्शनवर कामात व्यस्त होती, राहुलनं आपल्या जागेवरच बसून तिला मोबाईल ने फोन केला
"हाय" तो बोलला
“हाय, मी खूप कामात आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते"
“एैक ना... सायंकाळी तुला वेळ आहे काय"
“हो, का बरं"
“मग माझ्यासोबत डिनरला येशील सायंकाळी "
“कशाबद्दल डिनर"
“असं समज आज माझा बर्थ डे आहे"
“खरचं बर्थ डे आज तुझा"
“हो"
“हॅपी बर्थडे टू यु राहुल"
“थॅन्क यु, पण यु येणार ना"
“ठिक आहे, किती वाजता, जास्त उशीर नको व्हायला"
“मी सायंकाळी सातला तुला पिक अप करेल, आपण बाईकने जावुया"
“ठिक आहे"
“तु सरांना काय सांगशील"
“सांगेल काहीतरी, तसही ते माझ्या पसर्नल लाईफ मध्ये कधीच इंटरफेअर करत नाही"
“ओके, मग सायंकाळी भेटुया"
00000
रिशेप्शनवर बसलेल्या कोमल कडे, विनित आपल्या कॅबिन मधून सारखा बघत होता, ती आश्वीसाठी आई म्हणून परफेक्ट होती.
त्यानं मनोमन ठरवलं की, कोमलला लग्नासाठी प्रपोज करायचं
पण ती नाही म्हणाली तर, तो उदास झाला
काय करावं त्याला काही सुचत नव्हतं, पण तिला लग्नासाठी तर विचारावं लागणारच होतं, त्यानं ठरवलं, लवकरच तो तिच्याशी याबाबत बोलेल.
00000
सायंकाळ झाली, सहा वाजले होते, ऑफिस बंद झालं, कोमल आऊट हाऊसला आली. राहुल घरी गेला होता, तो तिला सात वाजता घ्यायला येणार होता. ती विचार करायला लागली राहुल नं कां डिनरला बोलावलं असेल, आज कुणीतरी पहिल्यांदा तिला बाहेर डिनरसाठी घेवून जाणार होते, त्यामुळे ती राहुलला नाही म्हणू शकली नव्हती.
ती तयारीला लागली
गोल्डन परपल कलरचा अनारकली ड्रेस घालुन ती तयार झाली, खूप सुंदर दिसत होती, एखादया परीसारखी, सात वाजता तिचा मोबाईल वाजला, फोन राहुलचाच होता, तो बंगल्याच्या बाहेर बाईक घेवून उभा असल्याचं त्यानं सांगितलं.
ती आऊट हाऊसच्या बाहेर आली, लॉक केलं, तिला वाटलं पहिल्यांदा यावेळेस बाहेर जाते, सरांना सांगावं, तिनं लगेच विनितला मोबाईलवर फोन लावला व बाहेर जावुन येते असं सांगितलं, आणि ती गेटच्या बाहेर पडली.
00000
कोमल पाठीमागे बाईकवर बसली होती, आणि बाईक सुसाट वेगाने रोडवर धावत होती, राहुल खुप आनंदात होता, ती बाईक चालवत असलेल्या राहुलला बोलली "कुठे चाललोय आपण"
“या रोडला एक छान गार्डन रेस्ट्रारंट आहे तिथे"
“खूप उशीर तर होणार नाही ना"
“अगं घाबरतेस कशाला, मी आहे ना सेाबत"
“तसं नाही, उशीर झाला तर सर उगाच काळजी करतील...”
“नाही होणार उशीर … लवकर परत येवू"
00000
रात्रीचे नऊ वाजले होते
अपर्णा घरातील सर्व कामे आटोपून बेडरुममध्ये आली, मकरंद लॅपटॉपवर काहीतरी काम करीत होता, ती त्याच्या जवळ आली व बोलली "काम झालं असेल तर, लॅपटॉप बाजुला ठेवाल जरा.. जेव्हा पहावं तेव्हा लॅपटॉपमध्ये घुसलेले असता, वेळ आहे का माझ्यासाठी"
“तुझ्यासाठी नाही तर कुणासाठी वेळ आहे, दोन मिनीट थांब झालच"
जरावेळानं त्यानं लॅपटॉप बाजुला ठेवला व बोलला "बोल काय म्हणतेस"
“मकरंद मला तुमच्याशी जरा बोलायचं आहे"
“बोल ना" तो तिच्या केसात हात फिरवत बोलला
बघता बघता आपल्या लग्नाला पाच वर्ष झाली, तुम्हाला असं वाटतं नाही आता, की आपल्या दोघात तिसरं यायला हवं"
“म्हणजे" तो भुवया उंचावत बोलला
“मकरंद मला मान्य आहे की, आपलं लग्न याच अटीवर झालयं की आपण कधीही आईबाबा व्हायचं नाही, पण असे आपण एकटे किती दिवस काढणार"
“what do you mean एकटं, तु माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठी असतांना एकटं वाटतं तुला, मला तर नाही वाटतं"
“मला वाटते आपण आता बाळाचा विचार करायला हवा"
“अपर्णा प्लीज नको तो विषय... मला आपल्या दोघात मुल नकोय"
“पण आपण असं दोघांनी किती दिवस रहायचं"
“जन्मभर असच राहयचं" तो बेडहुन उठला
“पण माझं जरा एैकून तरी घ्या"
“काय सांगायचं आहे आणखी" तो रुक्षपणे बोलला "तुला माहित आहे लहानपणी मी किती यातना भोगल्या.. बाप असा असतो, राक्षसासारखा, तर मला आयुष्यात बापच व्हायचं नाही, उद्या कदाचीत मी सुध्दा तेच करेल जे माझ्या बापानं माझ्यासोबत केलं, बापानं दिलेल्या जखमा अजुनही भरल्या नाहीत अपर्णा.. त्या कायमच्या माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत, तुझ्या प्रेमात त्या मी विसरण्याचा प्रयत्न करतोय, पण तु पुन्हा त्या जखमा ओल्या करतेय, मला बाप नाही व्हायचंय अपर्णा... कधीच नाही" तो आवेशात बोलत गेला
तिच्या डोळयात आसवं जमा झाली, तिनं मकरंदला घट्ट मिठी मारली व बोलली "प्लीज मकरंद गैरसमज करुन घेवू नका, पण तुम्हाला असं कां वाटतं की जे तुमच्या वडीलांनी तुमच्यासोबत केलं, तेच तुम्ही तुमच्या मुलासोबत कराल, ते अशिक्षीत होते, आपण तसे नाहीत, आपण एक चांगले पती पत्नी आहोत, मग चांगले आईबाबा होणंही आपल्याच हातात नाही का?”
“अपर्णा सोड ना तो विषय"
हा विषय तिथेच संपला, पण अपर्णा मात्र अस्वस्थ होती, कदाचीत तिच्यातलं मातृत्व जागं व्हायला लागलं होतं, मकरंदला कसं समजवावं हे तिला कळत नव्हतं.
00000
रात्रीचे सव्वानऊ वाजले होते, डिनर संपल होतं, कोमल आणि राहुल एकमेकांवर मौन बसले होते.
“छान होतं डिनर, निघायचं आता" कोमल बोलली
“कोमल मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे"
“बोल ना"
“मी प्रेम करतोय तुझ्यावर, माझ्याशी लग्न करशील"
त्याच्या या बोलण्याने ती गोंधळली, गप्प झाली, काय बोलावं काही सुचत नव्हतं
“काय झालं" तो परत बोलला
“काही नाही, अचानक लग्नाचं बोललास... काय बोलावं काही सुचत नाही"
“सॉरी, मी तुला असं अचानक नको होतं ना विचारायला"
“मला विचार करायला वेळ हवाय" ती बोलली
“ठिक आहे, हवा तेवढा वेळ घे, घाई नाही"
“निघायचं आता" ती बोलली
“ओके निघुयात"
रात्रीचे साडे नऊ वाजले होते, विनित बाल्कनीतुन इकडून तिकडे येरझारा घालत होता, कोमलनं त्याला फोनवर बाहेर जाते एवढच सांगितलं होतं, त्यांन तिला बाहेर जातांना बघीतलं होतं, छान नविन ड्रेस घालुन ती बाहेर गेली होत, खूप सुंदर दिसत होती ती. आश्वी टी.व्ही.वर छोटा भिम बघण्यांत व्यस्त होती. विनित तिच्याजवळ गेला व बोलला "बाळा झोपायंच नाही आता"
“जरा वेळ ना पापा, मला हे कार्टुन खूप आपडतं"
“आशु, तुला मम्मीची आठवण येते काय गं"
“माझी मम्मा कधी येणार पापा"
“येईल बेटा लवकरच, मला सांग तुला कोमलला मम्मा म्हणायला आवडेल"
“म्हणजे कोमल माझी मम्मा होणार?” ती टाळया वाजवत उडया मारायला लागली "कोमल माझी मम्मा, कोमल माझी मम्मा होणार"
“ये गप, अशी ओरडतेस काय, आणि कुणाला सांगायचं नाही, कोमलला पण सांगायचं नाही"
“पापा मला मम्मा हवीय"
“हो बाळा, लवकरच तुला मम्मा मिळेल, खुष आता"
“माझे गोड पापा" म्हणत ती विनितच्या कुशीत शिरली.
विनित परत बाल्कनीत आला, पाऊने दहा वाजता कोमल त्याला बंगल्याच्या आवारात प्रवेश करतांना दिसली, विनितला वाटलं की चेंज करुन ती आश्वीला भेटायला येईल.
00000
कोमल घरी आली, चेंज करुन बेडवर अंग टाकलं, जरा वेळानं ती आऊट हाऊस च्या बाहेर आली, विनितच्या बेडरुमचा लाईट सुरु होता, तिच्या मनात आलं सरांसोबत व आश्वीसोबत थोडया गप्पा माराव्यात पण आज तिचा मुड नव्हता, ती राहुल बद्दल विचार करत होती, काय करावं काही सुचेना, तिनं याबाबतीत विनितला विचारायचं ठरवलं.
ती आऊट हाऊस मध्ये गेली व दार बंद करुन बेडवर अंग टाकलं.
00000
2 जून
कोमल जेव्हा विनितच्या कॅबिनमध्ये आली तेव्हा ती नर्व्हस होती, तीला राहुलबद्दल विनितशी बोलायचं होतं, आणि विनितनं आज ठरवलं होतं की, कोमलला लग्नाबद्दल विचारयचं. विनित बेचैन होता. ती कॅबिनमध्ये विनितच्या समोर खुर्चीवर बसली. विनित काही बोलणार इतक्यात ती बोलली "सर मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे, जरा पसर्नल आहे"
“बोल ना"
“सर तुम्हाला माहित आहे, मी काल सायंकाळी बाहेर गेली होती, खरं तर मला राहुलनं डिनरसाठी इन्वाईट केल होतं, आणि....”
“आणि काय?” विनित जरा नर्व्हस झाला
“तो बोलला की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, आणि लग्न करायचं आहे माझ्यासोबत"
ती बोलून गेली पण विनितवर जणू वीज कोसळली, काय बोलावं त्याला काही कळेना, तो जरावेळ स्थब्धच रहाला, तिच्याकडे बघत, ती पुढे बोलली "मी त्याला अद्याप उत्तर दिलं नाही, म्हटलं की मला विचार करायला वेळ हवाय"
“मग आता" विनित हळूच बोलला
“सर राहुल माझ्याआधीपासून इथे जॉबला आहे, आणि तुम्ही त्याला चांगले ओळखता, म्हणून मला वाटलं आधी तुमच्याशी बोलावं"
“तुझा काय विचार आहे"
“मी आजपर्यंत लग्नाचा विचारच केला नाही, इतक्या दिवसांपासून इथेआहे, पण मी त्याला त्या नजरेतून कधीच बघीतलं नाही, सर तो माझ्यासाठी लाईफ पार्टनर म्हणून योग्य राहील?”
“आणि माझं कायं, मी आजपर्यंत तुझ्यावर जे प्रेम केलं ते" तो मनाशीच बोलला
त्याला गप्प बघून कोमल परत बोलली "काय झालं तर, तो माझ्यासाठी योग्य राहील ना"
“राहुल एक चांगला मुलगा आहे यात शंकाच नाही, तरीही मला वाटते, तु याबाबतीत तुझ्या आईबाबांना विचारावंस"
“आईबाबाही तुम्ही सांगाल तेच करतील, सर तुम्हाला माहित आहे, ते तुम्हाला खुप मानतात, या अनोळखी शहरात तुम्ही मला राहायला जागा दिली, जॉब दिला, आता हेच बोलतील की लग्न पण सरांना विचारुनच कर"
ती पटापट बोलत होती मात्र विनितच्या डोळयात आसवं दाटतं चालली होती. अबोलीनंतर पहिल्यांदाच त्याला कुणीतरी आवडलं होतं, आणि आता ती सुध्दा दुसऱ्याची होणार होती, त्यानं आसवांना बाहेर नाही येवू दिलं, तो बोलला " तु तुझ्या आईबाबांना इथे बोलावून घे, आणि राहुलाही सांग त्याच्या आईबाबाला बोलवायला"
“ठिक आहे सर" ती हसत बोलली
आणि ती कॅबिनच्या बाहेर आली, विनित मात्र कितीतरी वेळ तसाच स्तब्ध बसला होता, कां कुणास ठाऊक पण त्याला आज खुप रडावसं वाटतं होतं. पण तो रडू शकला नाही.
00000
6जून
अपर्णाला आज सकाळपासूनच बरं वाटतं नव्हतं, मकरंद काल रात्रीच कॉलेजच्या कामसाठी औरंगाबादला गेला होता, तो दोन दिवसांनी येणार होता. तीला सारखं गरगरायला होत होतं, जीवही घाबरत होता, तीनं डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.
ती रिक्षाने सकाळी 11.00 वाजता हॉस्पीटलला आली, त्याआधी तिनं डॉक्टर सुष्मिता ईराणीची अप्वाईटमेंट घेतलेली होती.
डॉक्टरांनी तिला तपासलं व बोलली "तुची पाळी चुकली या महिन्यात"
“होय"
“गुड न्युज आहे, तु प्रेगनेंट आहेस" डॉ.ईराणी हसत बोलल्या
एैकून अपर्णाला धक्का बसला, कदाचीत या महिन्यात प्रिकॉशन्स घेण्याकडे तिचं दुर्लक्ष झालं होतं.
“किती वर्ष झाली लग्नाला" डॉक्टर बोलल्या
“पाच वर्ष"
“पहिल्या प्रसुतीला किती वर्ष झाले"
“ही पहिलीच वेळ आहे, मला अपत्य नाही"
“अच्छा म्हणजे प्लॅनिंग होतं काय"
“तसंच काहीतरी" तिला काय बोलावं सुचेना
ती आई होणार आहे हे ऐकून तिला आनंद झाला होता, पण मकरंदचा विचार मनात येताच तिचा चेहरा पडला होता.
“मी काही औषधं लिहून देते, ती नियमित घ्यायची, आता जास्त धावपळ करायची नाही, नेहमी आनंदी रहायचं"
डॉक्टर सांगत होती पण अपर्णाचं लक्ष नव्हतं, जड पावलांनी तिनं क्लिनीक सोडलं.
00000
8 जून
कोमल आज तिच्या आईबाबांना सावंतवाडी हून घेवून आली होती, राहुलही त्याच्या आईबाबांना घेवून आला होता, सगळे हॉलमध्ये विनितच्या घरी बसलेले होते, विनित नर्व्हस होता, पण आनंदात असल्याचं दाखवत होता, आश्वी घरी नव्हती तो मुद्दाम तिला वर्षाकडे सोडून आला होता.
दोन्ही कडची बोलणी झाली आणि राहुल व कोमल यांच्या लग्नाला संमती मिळाली.
विनित मध्येच कोमलकडे बघायचा, ती आनंदी दिसत होती, राहुल तर लॉटरी लागल्यासारखा आनंदात होता. राहुलनं विनितला एकांतात गाठलं व बोलला "थॅन्कस् सर, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं"
“थॅन्कस् कसले त्यात, तु कोमलवर प्रेम करतो, तीला सांगून टाकलं हे फार छान केलं, मनातल्या भावना मनातच ठेवल्या तर त्या कुढतात, खरं कौतूक तरं तुझं करायला हवं, तु कसं पटकण कोमलला प्रपोज केलं, प्रत्येकालाच ते जमत नाही" विनित बोलला
“हे खरं असलं तरी, सगळं तुम्हीच जुळवून आणलं तर, त्यासाठी एक थॅन्कस् तर बनतोच ना, कोमल तुमची तारीफ उगाच नाही करत"
विनित हसला व बोलला "मग आता लग्न कधी"
“तुम्ही ठरवाल तेव्हा" तो लाजत बोलला
00000
विनितच्या डोळयात आज झोप नव्हती, तो इकडून तिकडे कुस बदलत होता, तो उठून बाल्कनीत आला, आकाशाकडे बघायला लागला, छान चांदणं पडलं होतं, तो त्या चांदण्यांकडे एकटक बघत होता, कदाचीत तो त्यात अबोलीला शोधण्याचा प्रयत्न करत होत, बघता बघता त्याच्या डोळयात आसवं उभी राहली, तो चांदण्यांकडे बघत बोलला "कां सोडून गेलीस अबोली मला.... आणखी किती दुख: माझ्या वाटयाला येणार आहे कुणास ठाऊक"??
बाहेर गार वारा सुटला होता, हळु हळु चांदण्या नाहीश्या व्हायला लागल्या होत्या, आणि आकाशात ढग जमायला लागले होते.
आणि त्या भरलेल्या ढगांप्रमाणेच त्याच्या डोळयातले अश्रृ दाटत चालले होते, आकाशातील ढगात दाटलेल्या पावसासारखे.
अपर्णाच्या डोळयात झोप नव्हती.
मकरंद आज सकाळीच औरंगाबादहून परत आला होता, मकरंद ला प्रेगनेन्सी बद्दल कसं सांगावं, या विवंचनेत ती होती, तिला भिती वाटत होती, मकरंद जर तयार झाला नाही तर?, मग काय करायचं.. ती मकरंदला काही सांगु शकली नाही, तिनं विचार केला वेळ काळ बघून ती त्याला तिच्या प्रेगनेन्सी बद्दल सांगेल. बाळाला जन्माला घालण्यासाठी त्याला कनव्हेंस करेल, तो नाही म्हणणार नाही, स्वत:च्या मनाला समजावत ती झोपी गेली.
00000
12 जून
विनित आज वर्षाकडे आला होता, आश्वी तिथेच होती त्यामुळे तिला भेटायला आला होता, आश्वीची शाळा सुरु होणार होती.
मोहित घरीच होता, दोघांचीही गळा भेट झाली "कैसा है यार" मोहित बोलला
“कसा दिसतोय, एकदम फिट, पण तु जरा बारीक झालास, वर्षा खायला देत नाही का व्यवस्थीत" तो मस्करीत बोलला
आश्वी आतून बाहेर आली पापा पापा म्हणत विनितच्या अंगावर चढली, विनितनं दोन तिन पप्पी तिच्या गालावर चिकटवल्या, ती तिथेच त्याच्या कडेवर बसली, इतक्यात वर्षा तिथे आली व बोलली "कसा आहेस"
“मस्त"
“विनित आला तुला लग्न करायला हवं दुसरं, अबोली जावुन चार वर्ष झाली"
विनितनं आश्वीला कडेहून खाली उतरवलं ती जानु सोबत खेळायला बेडरुमध्ये पळाली. विनित बोलला "ते ठिक आहे गं, आश्वी लहान आहे अजुन, तिला व्यवस्थीत सांभाळणारी नको कां भेटायला"
“तु बोलतो ते ठिक आहे, पण असा एकटा किती दिवस राहणर?”
“नाही राहणार एकटा जास्त दिवस, लवकरच शोधेल आई आश्वीसाठी"
“ते फार बरं होईल"
00000
दिवस त्यांच्याकडे कसा गेला काही कळलच नाही, सायंकाळ झाली आणि विनित घरी परतला, आश्वीची शाळा सुरु होईपर्यंत तो तिला तिथेच वर्षाकडे ठेवणार होता. जान्हवी आणि आश्वीची चांगली गट्टी जमली होती, तो बंगल्यात आला तेव्हा आऊट हाऊस लॉक होतं, कोमल बाहेर गेली असावी, तो मनाशीच बोलला, त्यानं कार पार्क केली व लॉनवर बसला, सायंकाळ झाल्याने पक्षांचा किलबिलाट वाढतच होता, त्याच्या बंगल्याचा परिसर झाडांनी आणि हिरवळीनं बहरलेला होता.
छान गार वारा सुटला होता, पक्षांचा किलबिलाट आणखीच वाढला, ढग दाटून आले होते, काळोख पसरायला लागला होता, कदाचीत आज पाऊस पडणार होता, पहिला पाऊस... त्याला पावसात भिजायला खुप आवडायचं, अबोली सोबत महाबळेश्वरला गेला होता तेव्हा तो तिच्यासोबत मनसोक्त पावसात भिजला होता. सोसाटयाचा वारा सुटला आणि पावसाला सुरवात झाली.... पण तो तिथेच हिरवळीवर बसून होता, आजही तो पावसात मनसोक्त भिजणार होता, पण त्याच्या मनात जो पाऊस साचलेला होता... त्याचं काय?, तो कधी बाहेर पडणार होता कुणास ठाऊक?
00000
15 जून
आज सकाळपासून मकरंदचा मुड अगदी चांगला होता, अपर्णानं त्याला प्रेगनेन्सी विषयी सांगायचं मनोमन ठरवलं होतं.
डायनिंग टेबलवर सकाळचा गरमागरम नाश्ता झाल्यानंतर अपर्णा त्याला बोलली "मकरंद मला काही सांगायच आहे तुम्हाला"
“सांग ना" तो पेपर चाळत बसला होता
“तुम्ही रागावणार नाही ना"
“नाही रागावणार सांग" तो पेपर बाजुला ठेवत बोलला
“मी प्रेगनेन्ट आहे" ती खाली मान घालुन बोलली
“काय ?, तु प्रिकॉशन्स घेतलं नाही काय?
“नाही घेतलं, विसरले घ्यायला"
“ठिक आहे, त्यात काय एवढं, जा आणि ॲबोर्ट करुन घे" तो सहजपणे बोलला
“मला वाटते आपल्याला देवानचं हे गिफ्ट दिलय, आपल्याला हया बाळाला जन्माला घालायला हवं"
“गिफ्ट आणि देवानं?, तो व्यंगात्मक हसत बोलला "तुला माहित आहे मी देवाला मानत नाही"
“मकरंद प्लीज, मला या बाळाला जन्माला घालायचं आहे..... मला आई व्हायचयं, मी सगळं करेल त्याचं, तुम्हाला काही त्रास होणार नाही, आय प्रॉमिस"
“अपर्णा, तुला एकदा सांगीतलं ना, की मला बाळ नकोय म्हणजे नकोय.. आणि जर तुला बाळाला जन्माला घालायचं असेल तर मला सोडावं लागेल, विसरावं लागेल मला... is that clear” तो जरा ओरडलाच
अपर्णाच्या डोळयात आसवं उभी राहली, मकरंद न तिच्याकडे बघीतलं व बोलला "लग्नाआधी तु ही अट मान्य केली हेाती, तरीही मला परत परत कां तेच विचारते, जा ॲबोर्ट करुन घे, आणि परत यापुढे अशी चुक होणार नाही याची काळजी घे"
ती जरावेळ तशीच उभी राहली, तिचा नाईलाज होता, तिनं डॉक्टर सुष्मीता ईराणीच्या क्लीनीक ला फोन लावला व अप्वाईंटमेंट घेतली.
मकरंद न एक क्षण तिच्याकडे बघीतलं आणि तो रागातच तिथून निघाला.
00000
सकाळचे सव्वा अकरा वाजले होते,अपर्णा क्लीनिक मध्ये डॉक्टर सुष्मीता समोर बसली होती, डॉक्टर बोलली "सगंळं ठिक आहे ना, काही त्रास"
“डॉक्टर मला हे बाळ नकोय, ॲबोर्ट करायचं आहे"
“काय?, काय बोलतेस हे तु, अगं पाच वर्षानंतर तुला आता बाळ होतय, आणि तु ॲबोर्ट करायच्या गोष्टी करतेय"
“माझा फॅमिली प्रॉब्लेम आहे मॅडम"
“कोण आहे तुझ्या फॅमिलीमध्ये सासू, सासरा, ननद?, माझ्याकडे आण सगळयांना समजावते मी"
“त्याचा काही उपयोग नाही, माझा निर्णय झालेला आहे"
“हा निर्णय तुझा नाही, हे तुझ्या चेहऱ्याहून साफ दिसतयं, तुला माहित आहे मुल होण्यासाठी लोक काय काय करतात, ज्यांना मुल होत नाही त्यांना जावून विचार त्यांची व्यथा, मुल होण्यासाठी ते काय काय करतात, नवस, उपासतापास.... आणि तु या निष्पाप जीवाला या जगात येण्याआधीच संपवायला निघाली आहेस, तुला वाटतं नाही कां गं आई व्हावसं"
“वाटतं, खूप वाटतं" ती भारावलेल्या स्वरात बोलली
“मातृत्च हे देवाचं देणं आहे स्त्रीसाठी, मातृत्वाशिवाय स्त्री अपूर्ण आहे, त्या लहानग्याचा काय दोष गं ज्याला तु या जगात येण्याआधीच संपवायला निघाली आहेस"
अपर्णाच्या डोळयात आसवं उभी राहली, तीला भावुक झालेली बघून डॉक्टर सुष्मीता पुढे बोलल्या "आणि स्वत:च्या बाळाला संपल्यावर तु आयुष्य सुखाने समाधानाने जगशिल?, नाही, तुझं मन तुला रात्रंदिवस खात राहणार, हे पाप आहे, जी संधी तुला देवानं दिली आहे तिचं सोनं कर, या बाळाला जन्म दे, बघ तुझं आयुष्य किती सुंदर होईल, जा बेटा हा विचार मनातून काढून टाक, ॲबार्शन साठी तुझ्यावर कुणी दबाव आणत असेल तर मला सांग, आपण त्याच्या विरुध्द पोलीसात जावू"
डॉक्टरांच्या बोलण्याने अपर्णाच्या मनावर व्हायचा तोच परिणाम झाला, काहीही झालं तरी आपण बाळाला जन्म द्यायचाच, मकरंदच्या विणवण्या करेल, पण त्या निष्पाप जीवाला संपवणार नाही, असा निर्धार करुन ती क्लिनीक च्या बाहेर पडली.
सायंकाळी मकरंद विचारेल तर त्याला काय सांगावं या विवंचनेत ती होती, तिनं मनाशी निर्धार केला, बाळ ॲबोर्ट केल हे मकरंदला खोटं सांगायचं"
19 जून
आजपासून आश्वीची शाळा सुरु होणार होती, आश्वीला कालच विनित, वर्षाकडून परत घरी घेवून आला होता, कोमल तिच्याशी गप्पा मारत शाळेकरीता तयार करण्यांत मग्न होती, ती खूप आनंदात होती, लग्न जमल्यापासून ती एक दोनदा राहुल सोबत बाहेर फिरायलाही गेली होती, तिला राहूल आवडायला लागला होता, ती आपल्याच धुन मध्ये होती, कधी मध्येच हसायची, आश्वीचा लाड करायची, तिला हसतांना बघून आश्वी बोलली "कोमल दिदी तु माझी मम्मा होणार आहे ना, मला माहित आहे"
“काय?, तुला कुणी सांगीतलं" ती दचकलीच
“पापा नी" ती हसत उडया मारायला लागली
आश्वीच्या बोलण्याने ती स्तब्ध झाली.. पण लगेच भानावर येत बोलली "कधी सांगीतलं तुला पप्पानी"
“खूप खूप दिवस झाले, तु होणार ना माझी मम्मा"
“आणखी काय बोलले पप्पा"
“कुणाला सांगायचं नाही" आश्वी हळुच बोलली
ऐकूण कोमल अस्वस्थ झाली, तीनं याबाबत विनितला विचारायचा निर्णय घेतला, याबाबत ती राहुलशी काहीच बोलली नाही, कामात दिवस निघून गेला.
रात्रीच्या जेवनानंतर विनित लॉनवर एकटाच फिरत होता. जरावेळानं कोमल तिथं आली व बोलली "सर मला बोलायचं आहे थोडं"
“बोल"
“सर, मी सकाळी आश्वीला शाळेसाठी तयार करत होतो, त्यावेळी ती मला बोलली की, मी तिची मम्मा होणार आहे" ती पटकण बोलून गेली.
ऐकून विनितला धक्काच बसला, आश्वी, कोमलजवळ असं काही बोलेल असा विचारही त्याच्या मनात आला नव्हता, त्याला काय बोलावं काही कळत नव्हतं, तो तसाच गप्प होता.
“सर मी काहीतरी विचारतेय तुम्हाला" कोमल परत बोलली
“ती काहीतरी बडबडते उगाच"
“नाही, ती बडबडत नव्हती, मी तिला याबाबत विचारलं तेव्हा ती बोलली की तिला तुम्ही सांगीतलं, सर प्लीज खरं सांगा, तुम्हाला शपथ आहे माझी"
“तुम्ही बायका नं यार... कां शपथा घालतात ते कळतच नाही, बैस सांगतो"
दोघेही तिथेच हिरवळीवर बसले.
“आश्वी जे बोलली ते खरं आहे, मीच तिला बोललो होतो... कोमल तु वाईट वाटून घेऊ नकोस... ज्याप्रमाणे तु आश्वीचा सांभाळ करत आहेस, हे बघून मला वाटायचं की आश्वीच्या मम्मा जी जागा तु घेतली तर फार बरं होईल, तु मला राहुलबद्दल सांगितलं त्याच्या एक दिवस आधीच मी तिला सांगीतलं, ऐकूण ती आनंदाने उडया मारायला लागली, तिला हे ही सांगीतलं होतं की याबाबतीत कुणाला काही सांगायचं नाही, मी तुला लग्नाबद्दल विचारणार होतो, पण त्याआधीच तु मला राहुलबद्दल सांगीतलं आणि माझ्या मनातल्या भावना मनातच राहल्या"
ऐकून कोमल स्तब्ध झाली, तिच्या डोळयात आसवं उभी राहली, ती स्वत:ला सावरत बोलली "सर तुमचं जर माझ्यावर प्रेम होतं, तर मला कां नाही सांगितलं, आश्वीची मम्मा व्हायला मलाही आवडलं असतं, मी नाही म्हणाली असती काय, सर तुम्ही मला आधी कां नाही सांगितलं" तिचा स्वर भारावला
“कोमल प्लीज सावर स्वत:ला, … मी सांगणार होतो तुला पण मला खूप उशीर झाला, माझ्याआधी राहुल तुला बोलला"
ती जरावेळ त्याच्याकडे बघतच राहली व बोलली "आता पण कुठे काय बिघडलय, मी आता जावुन राहुलला सांगते की मला तुमच्याशी लग्न करायचं आहे"
“तु असं काहीही करणार नाही कोमल, तो प्रेम करतोय तुझ्यावर, ज्या दिवशी तुम्हा दोघांच लग्न ठरलं, त्या दिवशी तो मला थॅन्क्स् बोलायला आला होता, आणि बोलला की हे सगळं माझ्यामुळे जुळून आलंय, आणि तु जर आता माझ्याशी लग्न करायला तयार झाली तर... त्याच्या नजरेचा सामना करु शकेल मी? नाही.. आणि तु ही नाही करु शकणार, तु त्याचं प्रेम आहेस... असं काही झालं तर उध्वस्थ होईल तो"
“मी समजावेल राहुल ला" ती रडवेल्या स्वरात बोलली
“नाही, कोमल आता खूप उशीर झाला... तुम्ही दोघे लग्न करा, आनंदात रहा, मला एवढचं हवयं"
“आणि.. तुमचं काय? काय केलत सर हे तुम्ही... मला मेलीला कां नाही कळल्या तुमच्या भावना" तिच्या डोळयात आसवं आली.
“कोमल.. सावर स्वत:ला, आणि हो याबाबतीत तु कुणालाही काहीही सांगणार नाही.... राहुलला तर नाहीच नाही"
“तुम्ही ग्रेट आहात सर... आय लाईक यु सर... आय लाईक यु....” तीला हुंदका आवरला नाही व तशीच आऊट हाऊस कडे निघाली.
विनित हताश होवून तिथे बसला होता... कितीतरी वेळ....
00000
दिवसामागुन दिवस जात हाते, अपर्णानं ॲबार्शन केलं नाही, हे ती मकरंद ला सांगु शकली नव्हती, अपर्णा गप्प गप्प होती, आतल्या आत कुढत... ॲबोर्ट केलं नाही हे जर मकरंदला माहित झालं तर काय होईल?, याची भिती तिला वाटत होती.
00000
29 जुलै
आज कोमल आणि राहुलचं लग्न होतं, विनितच्या बंगल्यावर लॉमनध्ये मोठा मंडप घालुन तिथेच लग्नाचं आयोजन करण्यांत आलं होतं, आश्वीला समजवायला विनितला नाकी नऊ आले होते, ती लग्नात नव्हती, तिला मुद्दाम वर्षाकडे नेऊन ठेवलं होतं, तिच्यासाठी कोमल पेक्षा छान मम्मा आणणार या अटीवर ती शांत झाली होती.
कोमल नवरीच्या वेषात खूप सुंदर दिसत होती, तिन घातलेली मरहुम रंगाची घागरा चोली तिच्या सौंदर्यांत चार चाँद लावत होती. विनित अधुनमधून एक नजर तिच्याकडे बघायचा, अशातच दोघांची नजरानजर झाली तो किंचीत हसला, तिच्या काळजात मात्र कालवा कालव झाली.
लग्नसोहळा निर्विघ्नपणे पार पडला, सांयकाळ झाली, आणि वरातीसह कोमल... राहुलच्या घरी निघून गेली.
पाहुणे मंडळी, कोमलचे आईबाबा तिथेच बंगल्यावर मुक्कामाला होते, दोन दिवस तिथेच राहून ते नंतर आपल्या गावी जाणार होते.
00000
दोन दिवसांनी सगळे पाहुणे निघून गेले, बंगला ओस पडला होता, कोमल सासरी गेल्याने आश्वीला वर्षाकडेच ठेवावं लागणार होतं, कोमल आऊट हाऊस मधुन तिचं सगळं सामान घेवून गेली होती.
आठ दहा दिवसांनी परत ती ऑफिसमध्ये आली, लग्नानंतर पहिल्यांदाच विनित तिला बघत होता, ती आधीपेक्षा खूप सुंदर दिसत होती, ती येताच विनितच्या कॅबिनमध्ये आली व बोलला "कसे आहात सर"
“मी मस्त.. आणि तु?
“मी सुध्दा मजेत आहे, आश्वी कशी आहे?
“ती पण छान आहे, तिला वर्षाकडे ठेवलं आहे"
“मग तिला आता घेवून या इकडे, मी आलीय परत"
“नाही कोमल, आधीही गोष्ट वेगळी होती, आता तुझं लग्न झालयं, तु राहुलकडे लक्ष दे, वर्षाची मुलगी जान्हवी आहे त्या दोघींची छान गट्टी जमली आहे, ती आता तिकडूनच शाळेत जायला लागली आहे, आता राहील ती तिथेच"
कोमल नाराज झाली, पण विनितनं तिची समजूत काढली.
00000
17ऑगष्ट
अपर्णा नं जरी मकरंदपासून ॲबार्शन केलं नाही हे लपवलं होतं, तरी ते त्याला आज नाही उद्या कळणारचं होतं, याचं भान अपर्णाला होतं, तिचं पोट हळुहळु वर यायला लागलं होतं, जास्त उशीर होण्याआधी मकरंदला सांगुन टाकावं जे होईल ते होईल असा विचार करुन अपर्णानं आज त्याला सांगायचा विचार केला होता.
मकरंद कॉलेजला जायला निघाला आणि अपर्णा त्याला बोलली "मकरंद एक सांगायचं आहे तुम्हाला"
“काय" तो टाय निट करत बोलला
“मी अॅबार्शन केलेलं नाही"
“काय?, आणि तु मला हे आता तोंड वर करुन सांगतेस... मग मागे खोटं बोललीस माझ्याशी?”
“माझा नाईलाज होता, मला आई व्हायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत, मला हे बाळ ॲबोर्ट करायचं नाही"
“इतक्यांदा तुला सांगितल, तुला कळतं नाही कां, बाळ नकोय मला" तो तिच्यावर जोरात ओरडला
ती घाबरली आज पहिल्यांदा तो तिच्यावर इतका हायपर होवून ओरडला होता.
“हे बघ अपर्णा आताही वेळ गेलेली नाही, वेडेपणा करु नको, हे बघ तुला एकटीला जायला जमत नसेल तर मी येतो सायंकाळी तुझ्या सोबत, मग तर झालं"
“मी बाळाला ॲबोर्ट करणार नाही, माझा निर्णय झालाय मकरंद, त्या लहान जीवाला मारण्याचं पाप मी घेणार नाही"
“अपर्णा तुला ॲबार्शन करावचं लागेल, लग्नाआधी आपल जसं ठरलंय त्याप्रमाणेच व्हायला हवं, मला आपल्या दोघांमध्ये तिसरं कुणीही नकोय, मला आता तुझ्याशी वाद घालायला वेळ नाही, तुझ्याकडे सायंकाळ पर्यंतचा वेळ आहे, तुला बाळ हवंय की मी हवाय..”
आणि तो निघून गेला
00000
सायंकाळ झाली होती, ऑफिस बंद झालं होतं, विनित आज आश्वीला भेटायला वर्षाच्या घरी आला होता, हल्ली ऑफिस बंद झालं की त्याला बंगल्यात भकास वाटायचं, कोमल गेल्यापासून तो बंगल्यात एकटाच होता, आश्वीला भेटून त्याला खूप बरं वाटायचं, आश्वी आणि जान्हवी दोघीही खेळत होत्या, तर विनित आणि मोहित गप्पा मारत बसले होते.
00000
अपर्णा आपल्या निर्णयावर ठाम होती, तरीही तिचं चित्त ठिकाणावर नव्हतं, सायंकाळ झाली होती, मकरंद कुठल्याही क्षणी घरी येणार होता. ती बराच वेळ घडयाळाकडे बघत होती, जसाजसा वेळ जात होता तिला अस्वस्थ वाटतं होतं, ती इकडून तिकडे येरझाऱ्या घालत होती, कधी सोफ्यावर बसायची, तर कधी किचनमध्ये जायची, सायंकाळचा स्वयंपाक बनवायची पण ती विरसली होती.
सायंकाळचे सात वाजले, मकरंद अद्याप आला नव्हता.
क्षणाक्षणाला तिची नजर दाराकडे जात होती. छातीची धडधड वाढत चालली होती.
आणि जरावेळात मकरंद आला, आल्या बरोबर त्याचा अपर्णाला प्रश्न "आली ना ॲबार्शन करुन"
“मकरंद माझा निर्णय झालाय, मला हे बाळ हवयं, मी ॲबार्शन करणार नाही"
“अपर्णा वेड लागलय कां तुला, चल माझ्यासोबत हॉस्पीटलला"
“बाळ तुम्हाला नकोय, पण मला हवं आहे"
“काय बोलतेय कळतं का तुला? याचा अर्थ तुझं प्रेम नाही माझ्यावर.... मी नकोय तुला, ते बाळ हवंय जे अद्याप या जगात आलंही नाही, होय ना?”
“मकरंद आजपर्यंत मी तुमच्याकडे काहीही मागीतलं नाही हो, कां माझी ही एक इच्छा तुम्ही पुर्ण करु शकत नाही"
“नाही, मी नाही पुर्ण करु शकतं, तुला जर माझ्यासोबत या घरात राहायचं असेल तर तुला ॲबार्ट करावच लागेल"
“नाही, मी माझ्या बाळाला नाही मारु शकतं" ती रडवेल्या स्वरात बोलली
“मग मी मारु काय?, ये इकडे" तो जोरात ओरडला व तिच्या पोटावर बुक्की मारायला सरसावला
अपर्णा ओरडली व दोन्ही हात पोटावर ठेवून मागे सरली व रोषात बोलली "मकरंद माझ्या बाळाला हात लावायचा नाही सांगून ठेवते"
बाहेर वीज चमकली व पावसाला सुरवात झाली, मकरंद जागीच थबकला अपर्णाचं हे रौद्र रुप तो पहिल्यांदाच बघत होता.
“माझ्या पोटातल्या बाळाला मारायला निघालात तुम्ही, राक्षस आहात तुम्ही" ती परत आवेशात ओरडली
“हो आहे मी राक्षस, जा तु इथून, नाही तर मी काय करेल याचा नेम नाही, निघून जा माझ्या घरातून माझ्या आयुष्यातून"
“कुठे जावु मी ...मला कोण आहे, तुमच्याशिवाय" ती रडकुंडीला आली
“हा विचार तु आधी करायला हवा होता, आणि हो परत या घरात यायचं असेल तर एकटीनं यायचं, बाळाला घेवून नाही, जा चालती हो इथून आत्ताच्या आत्ता"
“हा शेवटचा निर्णय आहे तुमचा"
“निर्णय तुला घ्यायचा आहे, मी हवाय की बाळ हवयं"
अपर्णांनं डोळे पुसले, बेडरुममध्ये जावून तिनं बॅग भरली, बाहेर आली व एक नजर मकरंद कडे बघीतलं, तो तिच्याकडे पाठ करुन उभा होता, तिला वाटल, तो तिला थांबवेल, आणि त्याला वाटलं की थांबेल व म्हणेल की मला बाळ नकोय तु हवाय फक्त....
पण असं काही घडलं नाही
ती बॅग घेवून घराबाहेर पडली.. ती कुठे जाणार होती तिलाच माहित नव्हतं. बाहेर पावसाला सुरवात झाली होती, तिच्या डोक्यात असंख्य विचारांच वादळ होतं... ज्याप्रमाणे मकरंद राक्षसासारखा तिच्या पोटावर बुक्की मारायला सरसावला होता, ते आठवून तिच्या अंगावर शहारे आले, तिच्या डोळयात आसवं होती, मकरंद या थराला जाईल याची तिनं कधी कल्पनाही केली नव्हती, त्याचं हे भयानक रुप तिन पहिल्यांदा बघीतलं होतं. विचार करुन तिचं डोंक गरगरायला लागलं आणि ती तिथेच रस्त्याच्या कडेला चक्कर येवून पडली.
00000
सायंकाळचे सातेसात वाजले होते, वर्षाच्या घरुन विनित कारने घरी येण्यासाठी निघाला होता, पाऊस जरा जरा सुरुच होता,वादळ सुरु झालं होतं, रस्ते ओस पडले होते, लोक लगबगीने घराकडे निघाले होते, विनित हळुवार कार चालवत होता, कारचा पुढचा काच पुसण्यासाठी त्यानं वायफर सुरु केले, रस्त्याच्या एका वळणावर त्याला कारचे ब्रेक करकचून मारावे लागले, कारण एक स्त्री रस्त्याच्या कडेला चक्कर येवून पडतांना त्यांन बघीतलं होतं, तो गाडी थांबवून तसाच कार मधून उतरला आणि रस्त्याच्या कडेला पडलेल्या त्या स्त्रीला हात धरुन उभं केलं, तिची शुध्द हरपली होती, आजुबाजुला कुणीही नव्हतं, तिला त्या अवस्थेत तिथं सोडणं धोक्याचं होतं, त्यानं लगेच कारचा दरवाजा उघडला तिला कारच्या मागच्या सीटवर टाकून तिची बॅग आत टाकली, व तडक निघाला.
त्याचा बंगला तिथून जवळच होता, त्यामुळे त्यांन तिथेच जाणं योग्य समजलं, त्यानं आपल्या डॉक्टर मित्राला फोन करुन बंगल्यावर त्वरीत यायला सांगितलं होतं.
00000
आऊट हाऊस रिकामच होतं, त्यामुळे तो तिला आऊट हाऊसमध्ये घेवून आला, तिथं त्यांन तिला बेडवर टाकलं, आणि आऊट हाऊस च्या बाहेर आला, जरावेळानं त्याचा मित्र डॉक्टर रोहित पाटील छत्री घेवून बंगल्याच्या गेट मधुन आत आला. त्याचं क्लिनीक बंगल्याच्या मागेच होतं, तो विनितच्या जवळ आला व बोलला "असं अचानक कां बोलावलं"
विनितनं घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला, रोहीत बोलला "कुठे आहे ती"
विनित त्याला आऊट हाऊस मध्ये घेवून आला, रोहीतनं तिला तपासलं आणि एक इंक्जेक्शन दिलं व बोलला "घाबरायचं कारण नाही, कसलं तरी टेंशन घेतललं दिसते, त्यामुळे शुध्द हरपली आहे, जरा वेळात येईल शुध्दीवर"
“कोण असेल ही, चांगल्या घरची दिसते" विनित बोलला
“शुध्दीवर आल्यावर विचार तिला सगळं, या अवस्थेत भर पावसात कुठे जात होती ते"
“या अवस्थेत म्हणजे"? विनितचा प्रश्न
“ती प्रेगनेंट आहे"
00000
विनित तिथेच बेडशेजारी खुर्चीवर बसला... रोहीत जरावेळापूर्वी निघून गेला होता.
विनित तिच्याकडेच बघत होता, ती बेडवर शांत झोपली होती... निरागस आणि सुरेख, नेव्ही ब्ल्यू कलरची साडी तिच्या गोऱ्या अंगावर फारच शोभून दिसत होती... कोण असावी.... तो विचार करायला लागला.
तो आऊट हाऊसच्या बाहेर आला, बंगल्याच्या किचनचा लाईट बंद होता, शांताक्का स्वयंपाक करुन निघून गेली असणार, तो विचार करतच परत आऊट हाऊस मध्ये आला.
आणि तिथेच खुर्चीवर बसला.
00000
ती शुध्दीवर आली तेव्हा अनोळखी ठिकाणी बघून पटकन बेडहून उठून बसली... तिच्या समोर खुर्चीवर बसलेल्या विनितकडे बघत बोलली "कोण आहात तुम्ही, मी कुठे आहे"
तिला शुध्दीवर आलेलं बघून त्याला हायसं वाटलं, तो बोलला " हे बघा घाबरु नका, तुम्ही रस्त्याच्या कडेला बेशुध्द अवस्थेत पडलेल्या होत्या, मी माझ्या कारमधुन इथे आणलं तुम्हाला, डॉक्टर आताच येवून गेले"
“मी ठीक तर आहे ना" तिचा हात तिच्या पोटाकडे गेला
“ठिक आहात तुम्ही, तुम्हाला कुठं जायचं आहे, मी सोडून देवू काय तुम्हाला"
ती गप्प राहली, तिला कुठे जायचं होतं ते तिलाच माहित नव्हतं
विनित परत बोलला "हे आऊट हाऊस रिकामच आहे, तुम्ही इथे राहु शकता"
ती संभ्रमात पडली, तो परत बोलला "घाबरायचं कारण नाही, तुम्ही इथे बिनधास्त राहु शकता, तुम्ही ओल्या झाल्या आहात चेंज करुन घ्या, माझ्या कारमध्ये तुमची बॅग आहे मी आलोच घेवून"
तो बाहेर गेला, व ती काही न बोलता तिथेच बसुन राहली.
00000
बॅग आऊट हाऊस मध्ये देवून, विनित बंगल्यात किचनमध्ये आला, शांताक्कान बनवलेलं जेवन त्यानं गरम करायला घेतलं आणि कॉफी बनवायला लागला.
00000
अपर्णाला अश्रृ आवरत नव्हते, पण ती रडली नाही, तिन चेंज केलं आणि बॅगमधून मोबाईल काढला, त्यावर मकरंद चा एकही कॉल नव्हता.
आऊट हॉऊस म्हणजे ती एक निटनेटकी रुम होती, एक सोफा कम बेड, टि.व्ही. फ्रिज, आणि तिथेच छोटसं किचन, सगळं कसं निटनेटकं होतं, ती आऊट हाऊसच्या बाहरे आली, पाऊस चालुच होता, समोर छान हिरवगार लॉन आणि एक टुमदार बंगला, आणि बंगल्याच्या बाजुला एक ऑफिस आणि त्यावर एक बोर्ड होता "आश्वी ॲड एजन्सी" ती विचार करायला लागली कोण असतील हे, अगदी देवासारखे धावून आले, नाहीतर माझं काय झालं असतं, विचाराने तिच्या अंगावर शहारे आले, तिच्या मनात मकरंद विषयी चिड निर्माण झाली होती, ती आता जरा रिलॅक्स झाली होती.
00000
विनितनं जेवन एका डब्यात भरलं, आणि गरम कॉफी थर्मास मध्ये भरुन तो बंगल्यातून आऊट हाऊस कडे निघाला, पाऊस येत होता म्हणून त्यांन छत्री घेतली. त्याला येताना बघून अपर्णा आऊट हाऊस मध्ये शिरली.
विनित आत आला, तिनं चेंज केलेलं बघुन त्याला समाधान वाटलं "आता बरं वाटतय" तो बोलला
तिनं होकारार्थी मान हलवली
“माझं नावं विनित... माझं इथे ॲड एजन्सीचं ऑफिस आहे, आपलं नाव काय"
“अपर्णा"
“नाईस नेम"
त्यानं थर्मास मधील कॉफी दोन कपात ओतली आणि एक कप तिच्याकडे देत बोलला "कॉफी पिऊन घ्या, बरं वाटेल"
तिनं कॉफीचा कप हातात घेतला, विनितही कॉफी प्यायला लागला, कॉफी पिऊन तिला रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं.
विनित बोलला "जेवन आणलं आहे, जरा वेळानं खाऊन घ्या"
“मला भुख नाही, काही खावसं वाटतं नाही" ती बोलली
“मान्य आहे, पण तुमच्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी"
ती त्याच्याकडे बघतच राहली
तो पुढे बोलला "जरावेळापूर्वी डॉक्टर आले होते, त्यांनीच सांगितलं की तुम्ही आई होणार आहात"
विनित बरोबर बोलत होता, तिच्या बाळासाठी तिला खावच लागणार होतं.
“ठिक आहे, जेवेल मी...” ती बोलली, तिच्या डोळयात विनितबद्दल कृतज्ञता होती.
विनित बोलला "जेवन करुन आराम करा, आपण सकाळी बोलूया, इथं सगळं आहे, माझ्या ऑफिसची रिशेप्शनिस्ट इथे रहात होती, नुकतच तिचं लग्न झालं, तेव्हापासून हे आऊट हाऊस रिकामचं आहे, तुम्ही इथे राहु शकता, इथे इंटरकॉमही आहे, माझ्या रुमचा नंबर 222 आहे, काही अडचण आल्यास फोन करा"
तिनं होकारार्थी मान हलवली.
“आणि हो इथं काही भिती नाही, बंगल्यात वॉचमन आहे तो रात्री दहा वाजता येतो, बिनधास्त रहा, ओके,”
तिथं होकारार्थी मान हलवली .. तो आऊट हाऊस मधून बाहेर पडला.
विनित गेल्यावर जेवनाचा डबा उघडुन ती जरा जेवली, जेवनाचे भांडे तिथेच बेसीन मध्ये धुऊन, तिनं आऊट हाऊसचं दार बंद केलं व बेडवर झोपली, परत एकदा मोबाईल बघीतला, त्यावर मकरंदचा एकही कॉल नव्हता, ती उशीला कवटळून रडु लागली.
00000
18 ऑगष्ट
अपर्णा सकाळीच उठली, नविन ठिकाण असल्यान तिला रात्री व्यवस्थीत झोप आली नव्हती, तिनं आंघोळ आटोपली आणि आऊट हाऊस मधून बाहेर आली, बाहेरचं रम्य वातावरण बघून ती सुखावली , बाहेर छान रिमझीम पाऊस पडत होता, हिरवंगार लॉन, हिरवीगार झाडं,... वातावरण मोहून टाकणारं होत.
ऑऊट हाऊस मधला फोन खणखणला आणि ती आत आली तिनं फोन उचलला "हाय गुडमॉर्निंग, विनित बोलतोय"
“गुडमॉर्निंग" अपर्णा हसत बोलली
“तुम्ही चहा नाश्ता साठी बंगल्यात येवू शकता?
“हो.. कां नाही"
“काल रात्री छत्री तिथेच रहाली त्यामुळे...”
“नेव्हर माईंड .. मी येतेय"
अपर्णान आऊट हाऊसच्या दाराची कडी लावली व छत्री घेवून बंगल्याकडे निघाली.
बंगला बघून तिचं मन प्रसन्न झालं, आतलं इंटेरियर कमालीचं होतं, सगळं कसं निटनेटकं
विनितनं तिला डायनिंग चेअरवर बसायला सांगितल, तो ही बसला
जरा वेळानं शांताक्का नाश्ता घेवून आली, तिची ओळख अपर्णाशी करुन देत तो बोलला "हया शांताक्का,घरातील सगळी कामं हयाच करतात, आणि शांताक्का हया आपल्या बंगल्यात पाहुण्या आहेत, हयांना काही लागलं सवरलं तर बघायचं"
“होय साहेब" शांताक्का हसत बोलली
00000
चहा आणि नाश्ता करुन अपर्णा आऊट हाऊस मध्ये परत आली, विचार करत, बंगल्यात एकटेच राहतात काय, दुसरं कुणी दिसलं नाही, त्यांची पत्नी वैगरे... कदाचीत त्यांची फॅमिली बाहेरगावी गेली असेल
तिच्या मनात विचार चालुच होते.
00000
कोमल आणि राहुल एकत्रच मोटर सायकलने बंगल्यात आले, बंगल्यात शिरताच कोमलला आऊट हाऊसच्या पॅसेजमध्ये दोरीवर साडी वाळत घातलेली दिसली, तिला आश्चर्य वाटतं, राहुलनं बाईक पार्क केली, कोमल त्याला बोलली "तु जा ऑफिसमध्ये मी जरा बंगल्यात जावुन येते"
“ठिक आहे"
राहुल ऑफिसकडे निघाला, विनित ऑफिसमध्ये आपल्या कॅबिनमध्ये बसला होता.
कोमल विचार करायला लागली, कोण आलं असेल आऊट हाऊस मध्ये, कालपर्यंत तर कुणी नव्हतं, तसही विनितचं जवळचं असं कुणीच नव्हतं, त्याच्याकडे कुणी पाहुणेही येत नसतं.. कोण असेल?
विचारातच ती बंगल्यात शिरली , शांताक्का स्वयंपाक बनवत होती ती शांताक्काला बोली "आक्का, आऊट हाऊसमध्ये कुणी रहायला आलं आहे काय"
“होय, एक सुंदर बाई आहे कुणीतरी, साहेब बोलले पाहुण्या आहेत"
“एकटीच आहे?" कोमलचा प्रश्न
“होय, नाश्ता करणार,? सकाळी छान पोहे बनवले आणते गरम करुन"
“ठिक आहे दे, तुझ्या हातचे कांदे पोहे खुप दिवसात खाल्ले नाही"
पोहे खावुन ती बंगल्याच्या बाहेर आली, आऊट हाऊसचा दरवाजा बंद होता, ती ऑफिसमध्ये रिशेप्शनवर जाऊन बसली, ती येईपर्यंत राहुल तिथे बसला होता.
00000
अपर्णा आऊट हाऊस मध्ये इकडे तिकडे चकरा मारत होती, तिचं लक्ष सारख फोनकडे जात होतं, कालपासून मकरंदचा एकही फोन तिला आलेला नव्हता, ती कुठे आहे, कुठल्या अवस्थेत आहे? याची त्याला काहीच काळजी नव्हती.
तिनं आपल्या मनाला धिर दिला मनाशीच बोलायला लागली "त्यांना तुझी काळजी असती तर, त्यांनी तुला घराबाहेर काढल नसतं, बाळाला माराला सरसावले नसते, कां... त्यांचा विचार करते, कां त्यांच्या फोनची वाट बघते. विचार करुन तिच्या डोळयाच्या कडा ओल्या झाल्या.
तिला आत अस्वस्थ वाटु लागलं, ती आऊट हाऊसच्या बाहेर आली, बाहेर ऑफिसमध्ये वर्दळ होती, ती परत गेली, आणि स्वत:ला पलंगावर झोकून दिलं.
00000
कोमल जरावेळ रिशेप्शनवर बसुन मग विनितच्या कॅबिनमध्ये शिरली, तिला बघताच विनित बोलला "ये... कशी आहेस"
“फाईन सर.... सर आऊट हाऊस मध्ये कोण आलय?
“बैस सांगतो"
कोमल समोर चेअरवर बसली आणि विनितन काल रात्रीचा सगळा प्रसंग कोमलला सांगितला, ऐकून कोमल बोलली "कोण असेल ती?”
“मलाही माहित नाही काही सांगितलं नाही तिनं अद्याप, ती बोलायला संकोचतो कदाचीत, लंच टाईममध्ये तु जा आणि जरा तिला विश्वासात घेवून गप्पा मार तिच्याशी, ओळख करुन घे, ती बोलेल तुझ्याशी मनमोकळेपणनं"
“ठिक आहे सर, मी भेटते तिला"
00000
लंच टाईममध्ये कोमल आऊट हाऊसला आली, अपर्णाचही नुकतच जेवन आटोपलं होतं, विनितनं शांताक्काला तिला वेळेत जेवन देण्यांस सांगितलं होतं, त्यामुळे स्वयंपाक झाल्यानंतर शांताक्कानं स्वत: आऊट हाऊस मध्ये तिच्यासाठी दुपारचं जेवन नेवून दिलं होतं.
आऊट हाऊस चं दार बंद होतं, कोमल नं दार वाजवलं, जरा वेळात अपर्णानं दार उघडलं, अपर्णाला बघताच कोमल बोलली "हाय"
दारात एका सुंदर विवाहित स्त्री ला बघुन तिच्या डोक्यात विचाराचं चक्र सुरु झालं, कोण असेल ही? कदाचीत विनितची बायको?
“हाय"अपर्णा बोलली, "या ना आत"
कोमल आत आली व बोलली " माझं नाव कोमल, मी इथेच ऑफिसमध्ये कामाला आहे"
“माझं नांव अपर्णा"
“नाईस टु मिट यु... मला सरांनी तुमच्याबद्दल सांगितलं म्हणून मुद्दाम भेटायला आले"
“सर म्हणजे, विनित .. या बंगल्याचे मालक?”
“होय, आधी मी इथेच रहात होते, आता माझं लग्न झाल्याने मी हे आऊट हाऊस सोडलं"
“ओह.... मग सरांची फॅमिली कुठे आहे, मला कालपासुन कुणी दिसलं नाही बंगल्यात"
“ते एकटेच असतात"
“का? लग्न नाही केलं त्यांनी"
“केलं होतं, पण ती त्यांना सोडून गेली"
“म्हणजे कुठे गेली? अपर्णाचे प्रश्न सुरुच होते
“ती या जगात नाही, पण सरांना एक छान मुलगी आहे अगदी गोंडस"
“कुठे आहे ती, मला नाही दिसली"
“ती त्यांच्या मानलेल्या बहीणीकडे रहाते"
“मग परत लग्न नाही केलं त्यांनी "
“नाही... तुझ्याबद्दल सांग ना काही" कोमल बोलली
“माझ्याबद्दल काय सांगु माझं आयुष्य म्हणजे एक ट्रॅजेडी झालीय,.. लहानपनापासून अनाथ आश्रमात वाढले, तिथेच एका मुलावर प्रेम जडलं, आम्ही लग्न केलं, सुखाचा संसार होता आमचा"
“मग.. “ कोमल उत्सुकतेंन विचारु लागली
“ज्यावर मी जीवापाड केलं, त्यानच मला घराबाहेर निघून जायला सांगितलं, एका क्षणात परकं करुन टाकलं मला, या अवस्थेत, जेव्हा मी आई होणार आहे, माझ्या भावनांचा विचार न करता" तिच्या डोळयात आसवं दाटली
कोमलनं तिच्या खांदयावर हात ठवेला व बोलली "रिलॅक्स... काळजी करु नका, होईल सगळं ठिक, सर खूप चांगले आहेत, तुम्हाला हवे तितके दिवसं तुम्ही इथे राहु शकता, आजपासुन आपण मैत्रीणी, काहीही अडचण आली तर मला सांगायचं" कोमल तिला धिर देत बोलली
कोमलच्या बोलण्याने तिला खूप धिर आला ती बोलली "पण असं इथे किती दिवस राहु मी, मला कुणावर ओझं बनून नाही रहायचंय... मला वाटते मी अनाथ आश्रमात परत जावं"
“तिथेही जावुन तु काय करणार" कोमल बोलली
“माहित नाही" ती शुन्यात बघत बोलली
“एक आयडीया आहे"कोमलच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं
“काय?
“तुझं शिक्षण किती झालयं"
“बी.एसस्सी"
“काय? व्हेरी गुड, कॉम्प्युटर येते"
“हो येते"
“मग तर कामच झालं, तु इथे आमच्या एजन्सी मध्ये जॉब करु शकते, सॅलरीपण मिळेल आणि रहायला जागा पण, तसं सर इथे कुणाला ठेवणार नव्हते, पण आता तुला गरज आहे तर सर नक्की मदत करतील तुला"
“तसं झालं तर खुपच छान होईल, पण सर देतील मला जॉब"
“ मी आहे ना, तु आता काळजीच सोड, मी बोलते सरांशी"
“खरचं तु माझ्यासाठी करशील हे"
“सांगितलं ना आजपासून आपण मैत्रीणी आहोत, आणि कोमल ज्याला जीव लावते त्याला कधीच अंतर देत नाही"
अपर्णाच्या डोळयात आसवं आली, तिनं लगेच कोमलला मिठीच मारली, कोमल तिचं सात्वंन करत बोलली "टेक इट ईजी होईल संगळं ठिक"
00000
अपर्णाला भेटून कोमल, विनितच्या कॅबिनमध्ये आली, तिला बघताच विनित बोलला "भेटून आली तिला"
“होय, सर तिचं या जगात कुणीही नाही, अनाथ आश्रमात वाढली आहे, तिनं इतकं सांगितल की तिच्या नवऱ्यानं तिला घराबाहेर काढलं"
“कशामुळे, कायं झांल होतं, काही सांगितलं"
“त्याबाबत ती काही बोलली नाही, पण ती सांगेल हळुहळु"
“तुला विश्वास वाटतो तिच्या सांगण्यावर"
“होय सर तिचे डोळेच सांगतात, तिच्यावर वाईट वेळ आणि आपल्याला तिची मदत करायची आहे"
“आता काय करायचं आपण"
“मी तिला विश्वासात घेवून सांगितल की ती इथे राहु शकते, आणि जॉबही करु शकते"
“जॉब.. ती करेल इथे काम"
“सर ती वेल एज्युकेटेड आहे, बीएस्सी आहे, तिला कॉम्प्युटरही येते, आणि तसही सर तुम्ही बघताय ना इथं किती कामं आहेत , माझ्या लग्नाच्या काळात बरीच कामे पेंडीग राहलेली आहेत, मलाही जरा मदत होईल"
“ठिक आहे, आपल्याला तिला मदत करायला हवी.. गो अहेड, तिला ज्वाईंड करुन घे"
“थॅन्कस् सर" कोमल हसत बोलली "
“थॅन्कस् कशाबद्दल"
“म्हणजे काय? ती मैत्रीण आहे आता माझी, तिच्यावतीने एक थॅन्कस् तर बनायलाच पाहिजे"
“एका भेटीत मैत्री पण झाली, क्या बात है" तो हसला
कोमल त्याच्याकडे बघतच राहली व बोलली "सर असेच हसत रहा, खूप छान दिसता हसतांना"
00000
अपर्णानं ऑफिस ज्वाईंड केलं, कोमल सेाबत तिची छान गट्टी जमली होती, ती कोमलला ऑफिसच्या कामात मदत करु लागली, हळुहळु ती कामात परफेक्ट झाली
अपर्णाला बंगल्यात येवून 10 दिवस झाले होते तरी अद्यापपर्यंत मकरंदचा एकही फोन आला नव्हता, दोनदा तिनं मकरंद ला फोन केला होता, पण त्यांन तिचा फोन उचचला नव्हता, कधी कधी ती खूप उदास व्हायची तिच्याआयुष्याचं काय होणारआहे हे तिलाही कळत नव्हतं, आता सगळं विसरुन ती आपल्या येणाऱ्या बाळाचा विचार करु लागली होती, एकदा ती कोमलला घेवून डॉक्टर सुष्मिताकडे चेकअपसाठी जावुन आली होती. आपल्या नविन विश्वात ती आता रमत चालली होती.
00000
6 सप्टेबर
अपर्णाला चौथा महिना लागला होता. डाक्टरांनी प्रसुतीची तारीख 9 फेब्रुवारी दिलेली होती, अपर्णा आपल्या येणाऱ्या बाळाच्या कल्पनेनं खुष होती.
ऑफिस सुटलं, ती आऊट हाऊस मध्ये आली आणि त्यादिवशी अचानक मकरंदचा फोन आला, जरा वेळ ती मोबाईलकडे बघतच राहली, त्याच्या फोनमुळं ती अपसेट झाली होती, तिनं कॉल रिसीव्ह केला
“अपर्णा" पलीकडून आवाज आला
“बोलतेय"
“कुठे आहेस तु, मला वाटलं तु अनाथ आश्रमात आहेस म्हणून मी तिथ जावुन आलो"
“कां? खूप उशीरा आठवण झाली माझी, मी मेली की जीवंत आहे? काय फरक पडतो तुम्हाला"
“अपर्णा प्लीज परत ये, मला समजून घे, मी तुला बाळासहित नाही स्विकारु शकत, मला तुझी खुप आठवण येते, परत ये अपर्णा"
“कां परत येवू मी, माझ्या बाळाचा जीव घ्यायला निघाला होता तुम्ही, म्हणे माझी आठवण येते, मग त्या पावसाळया रात्री मला एकटीला अशा अवस्थेत घराबाहेर काढलं तेव्हा कुठं होतं तुमचं प्रेम, माझी काय अवस्था झाली होती, मी कुठे होती, कुठल्या परिस्थितीत होती याचं भानं होतं तुम्हाला,? वेडयासारखी मी सारखी फोनकडे बघत होते, निदान एक फोन तरी केला तुम्ही,? की अपर्णा तु कुठे आहेस कशी आहेस" बोलता बोलता तिच्या डोळयात आसवं तरळली.
“मला वाटलं तु नाही जाणार, मी जरावेळानं फ्लॅटच्या बाहेर आलो होतो, तुला शोधलंही पण तु नाही दिसली, अपर्णा आताही वेळ गेलेली नाही, ते बाळ ॲबोर्ट कर आणि परत ये माझ्याकडे"
“खोटं बोलताय तुम्ही, गेल्या पंधरा दिवसात तुमचा एकही फोन आला नाही, मी फोन करतेय तर माझा फोन उचलत नाही, मला स्विकारयचं असेल तर बाळासकट स्विकारावं लागेल तुम्हाला आणि तसंही आता ॲबोर्ट करण्याची वेळ निघून गेली आहे"
“मुद्दाम केलं ना हे तु सगळं, ठिक आहे जगेल मी एकटा, पण तुला बाळासहीत नाही स्विकारणार"
आणि त्यांन फोन ठेवून दिला.
अपर्णाच्या डोळयात परत आसवं दाटली होती.
00000
शांताक्का बंगल्यात अपर्णा आणि विनित दोघांचाही स्वयंपाक बनवायची, आणि मग अपर्णाचा चहा, नाश्ता, आऊट हाऊसमध्ये नेवून दयायची, कधी अपर्णाच बंगल्यात जेवायला यायची.
विनित बंगल्यात जेवण्यासाठी अपर्णाची वाट बघत होता. ती आली नाही म्हणून तो शांताक्काला बोलला "तुम्ही दोघांचही जेवन आऊट हाऊसमध्येच लावा, कदाचित तिला बरं नसेल"
“होय साहेब" म्हणत ती कामाला लागली.
विनित आऊट हाऊसकडे निघाला.
00000
मकरंदचा फोन येवून गेल्याने अपर्णा अस्वस्थ होती, डोळयांच्या कडा ओल्या झाल्या होत्या, कितीतरी वेळ ती तशीच बेडवर बसली होती, दार वाजविण्याचा आवाज आला आणि ती भानावर आली, तिनं डोळयांच्या कडा पुसल्या व दार उघडलं, दारात विनित उभा होता.
“सर आपण? या ना आत"
“बरं आहे ना तुम्हाला, जेवनाची वेळ झाली तुम्ही आला नाहीत म्हणून , मी शांताक्काला इथेच जेवन लावायला सांगीतलं आहे"
“मी ठीक आहे, .. तुम्ही फोन केला असता तरी मी आले असते" ती हसत बोलली
“आज भूक नाही लागली कां? काही प्रॉब्लेम आहे काय, तुम्ही आनंदात रहायला हवं, तुम्ही अशा उदास कां आहात"
ती गप्प झाली मग विचार करुन बोलली "खरं तर सगळं आधीच तुम्हाला सांगायला हवं होतं, तुम्ही मला इथे रहायला जागा दिली, जॉब दिला... तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, एैकायचं आहे माझ्याबद्दल?”
“तुम्हाला सांगावसं वाटत असेल तर"
“तुम्ही माझ्यासाठी इतकं सगळं करताय, मनात काही असेल तर बोलून टाकावं, त्यामुळे मन हलकं होते म्हणतात, लहानपणापासून मी अनाथआश्रमात वाढले, तिथेच मकरंदच्या प्रेमात पडले, आम्ही लग्न केलं. याअटीवर की कधी मुल होवू दयायचं नाही, बघताबघता पाच वर्ष उलटले, आणि माझ्यातलं मातृत्व जाग व्हायला लागलं, मी एक दोनदा मकरंदला बाळाविषयी बोललेही, पण प्रत्येक वेळेस त्यांनी नकारच दिला, याच विवंचनेत एक दोनदा प्रिकॉशन्स घ्यायला विसरले आणि मला कळलं की मी आई होणार आहे, मकरंदला जेव्हा हे कळलं त्यांनी मला बाळ अॅबोर्ट करायला सांगितलं, मी ॲबोर्ट करायला डॉक्टरांकडे गेले, पण डॉक्टरांनी मला पटवून दिलं की मातृत्व किती मोलाचं आहे, त्यामुळे मी बाळाला जन्म दयायचं ठरवलं, यावरुन आमच्यात वाद झाला आणि त्यांनी मला निघून जायला सांगितल" तिचे डोळे पाणावले
“सॉरी.... मी रडवलं तुम्हाला"
“नाही... मन हलकं झालं, तुम्ही त्या दिवशी देवासारखे धावून आलात... नाही तर माझं.. माझ्या बाळाचं काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही" ती रडवेल्या स्वरात बोलली
“सावरा स्वत-ला, सगळं ठिक होईल"
“आता नाही रडणार.. काही पुण्य केल असेल कधीतरी म्हणून मला तुमचा आधार मिळाला, कोमल सारखी मैत्रीण मिळाली"
“एकटेपणाचं दुख: काय असतं ते माझ्याशिवाय दुसरं कोण सांगु शकेल"
“आश्वीला आणा ना इकडे एकदा, तिला भेटायचं आहे,खुप क्युट आहे,, कोमलनं तिच्या मोबाईलमध्ये फोटो दाखवलेत तिचे"
“ठिक आहे, आणेल तिला"
“एक विचारु"
“विचार ना"
“तुमची पत्नी कशाने गेली"
“धोका दिलाय तिनं मला"
“म्हणजे"
“तसा धोका नाही, खूप प्रेम करायची माझ्यावर... आणि त्या प्रेमापायीच तिनं स्वत:चा जीव गमावला"
“असं काय केलं तिन?
“लग्नाआधीची एक गोष्ट तिनं माझ्यापासून लपवून ठेवली... कॉलेजच्या पिकनिक बसला अपघात झाला आणि त्या अपघातात तिला जबर मार लागला होता, तेव्हा तिच्या गर्भाशयाला इजा झाली होती, बाळाला जन्म दिला तर तिच्या जीवाला धोका होता, हे माहितअसुनही तिन बाळाला जन्म दिला, जेव्हा मला हे सगळं कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता... मी मला सोडून गेली होती"
ऐकूण अपर्णा स्तब्ध झाली.
“खरचं खूप ग्रेट होती ती" अपर्णा बोलली
“तुम्हाला आश्वीला भेटायचं आहे ना, मी उद्याच तिला घेवून येर्इल"
“खरंच" तिच्या चेहरा आनंदाने खुलला होता
00000
दुसऱ्या दिवशी विनित, आश्वीला घेवून बंगल्यावर आला, अपर्णाने तर चक्क तिला मिठीच मारली, दोघीही एकमेकांसोबत लवकरच मिळसल्या आणि गप्पा मारायला लागल्या होत्या.
दिवस भराभर निघून जात होते, या काळात विनित, अपर्णाची खूप काळजी घेत होता, तिची औषधं, चेक अप, तिचं वेळेवर खाणं पिणं..
सगळं बघून अपर्णाला हेवा वाटायचा, ती मनात म्हणायची "देवा माझा नवरा कां रे नाही असा, हे माझे कुणी नाहीत तरी एवढी काळजी घेतात, आणि माझा नवरा... त्यांचा तर फोन देखील येत नाही"
कोमलच्या एक गोष्ट लक्षात येत चालली होती की, विनित अपर्णाची खुपच काळजी घेतात, तिच्या मनात आलं, कदाचीत सरांना अपर्णा आवडायला लागली आहे. विनित कधीकधी अपर्णा ऑफिसच्या कामात असतांना तिच्याकडे सारखा बघत असायचा.
15 आक्टोबर
विनित कॅबिन मध्ये होता
एवढयात कोमल कॅबिनमध्ये आली, व बोलली "हाय सर"
“हाय, बोल काय म्हणतेस, बऱ्याच दिवसांनंतर अशी सवडीनं कॅबिन मध्ये आली, हल्ली येत नाही पुर्वीसारखी"
“कामात असते ना सर.. तुम्ही बघताच ना किती काम असतं ते"
“होय तर, पण आता तुझी मैत्रीण आहे ना तुझ्या मदतीला"
“अपर्णा?”
“होय"
“खरचं खूप छान झालं तिला जॉब दिला ते, मला खूप मदत होते तिची, कामात तर अगदी हुशार आहे, सर तुम्हाला राग येणार नसेल तर एक विचारु ?”
“मी कधी रागावलोय तुझ्यावर"
“सर, तुम्हाला अपर्णा आवडते ना"
तो जरा गप्प झाला, काय बोलावं त्याला काही कळतं नव्हतं, कोमल परत बोलली "सर मला वाटते, तुम्ही प्रेमात आहात तिच्या"
“कां बरं, कां तुला असं वाटतं"
“सर मी नोट केलय बरेचदा... सर खरचं तुम्ही तिच्यावर प्रेम करत असाल तर प्लीज तिला सांगुन टाका, जी चुक माझ्या बाबतीत केली ती परत करु नका"
“मला आवडते ती कोमल... पण काय करु , कसं सांगु तिला.. ती विवाहित आहे, तिचा नवरा आहे,आज दोघांमध्ये मतभेद आहे, पण उद्या असेलच कशावरुन, ते दोघे एकत्र येवू शकतात, कदाचीत तो तिला मुल झाल्यावर स्विकारेल"
“म्हणजे तुम्ही तिला बाळासहित स्विकारणार?
“होय कोमल, पण तिची इच्छा असेल तर"
“ओके, मलाही तुमच्याकडून हीच अपेक्षा होती, पण सर मला वाटते आता त्या दोघांनी एकत्र येण्याचे चान्सेस खुप कमी आहेत, मला नाही वाटतं अपर्णा परत त्याच्याकडे जाईल"
“कशावरुन असं वाटतं तुला"
“मकरंद ला बाळ नकोय, आणि तिला हवयं, मकरंद बाळासहित तिला स्विकारणार नाही, आणि बाळाशिवाय अपर्णा त्याच्याकडे जाणार नाही, फक्त मला आता बघावं लागेल की तिच्या मनात काय आहे"
“तिच्या मनात असेल तर, मी तिला पत्नी म्हणून स्विकारयला तयार आहे"
“ग्रेट सर, इथे मी तुमची मदत करु शकते"
“म्हणजे"
“बघते मैत्रीणीच्या मनात काय आहे ते, उसका मन टटोलना पडेगा"
“खरचं कोमल तु हे करशील"
“सर तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर, आणि अपर्णा सोबत जर तुमचं लग्न झालं तर, मला खूप आनंद होईल, आश्वीसाठी तीच योग्य आई होईल याची खात्री आहे मला"
आणि ती हसतच कॅबिनच्या बाहेर पडली.
00000
25 आक्टोबर
सायंकाळी अपर्णा ऑफिस सुटल्यावर आऊट हाऊसमध्ये आली, तिच्या पाठोपाठ कोमलही आली, तिला येतांता बघुन अपर्णा बोलली "काय गं... राहुल सोबत गेली नाही"
“नाही, त्याला पाठवलं एकटयाला.. म्हटलं जरा मैत्रीणीशी गप्पा मारायच्या आहेत, कामाच्या व्यापात तुझ्याशी गप्पा मारायलाच मिळत नाही"
“ओ.के. तु बैस, मी जरा फ्रेश होते, .. आणि हो फोनवर शांताक्काला काहीतरी गरमगरम बनवायला सांग"
“अरे व्वा माझ्या मनातलं बोलली अगदी, आत्ता सांगते"
अपर्णा फ्रेश व्हायला गेली आणि कोमलनं बगंल्यात शांताक्काला फोन करुन गरम भजी आणि कॉफी बनवायला सांगितली
जरावेळात अपर्णा तिच्यासमोर बसली, ती बसताच कोमल बोलली "हल्ली कामामुळे आपल्याला निवांत गप्पा मारताच येत नाही"
“हो, ना , तुझं कसं चाललय, नविन मॅरेज लाईफ"
“माझं ठिक आहे, तु सांग.. तुझ्या नवऱ्याचा काही फोन वैगरे आला इतक्यात"
“नाही" तिचा चेहरा पडला
“अपर्णा तुला आनंदी रहायला हवं"
“मला माहित आहे, ते बाळासहीत मला कधीच स्विकारणार नाहीत"
“आणि जर त्यांनी तुला बाळासहीत स्विकारलं तर?
“खरचं ते मला बाळासहित स्विकारतील कांय गं?, तिच्या डोळयात आशेचा किरण दिसला
“म्हणजे त्यांन तुला बाळासहित स्विकारल तर तु जाणार त्याच्याकडे"
“मला माहित आहे ते आपला हट्ट सोडणार नाही, पण असं झालं ना कोमल तर देवच पावला म्हणायचा, आणि तसही माझ्याकडे पर्याय काय आहे दुसरा"
कोमल तिच्या उत्तरावर निरुत्तर झाली, ती पुढे बोलली "आणि जर त्यानी तुला नाही स्विकारलं तर, मग काय विचार आहे तुझा"
अपर्णा गप्प झाली, आणि विचार करुन जरा वेळानं बोलली "माहित नाही पुढे काय होणार आहे, मला तर काहीच सुचत नाही"
“संपूर्ण आयुष्य एकटीनं काढशील"
“बाळ असेल ना माझ्यासोबत"
“तुलाही कुणाच्या तरी आधाराची गरज असणारच ना"
“आता नको वाटतं कुणाचा आधार, मकरंदवर जीवापाड प्रेम केलं आणि त्या प्रेमाचं काय फळ मिळालं बघतेस ना, ते माझी एक साधी इच्छाही पुर्ण करु शकले नाही, याला काय प्रेम म्हणायचं, मी त्यांना बोललेही होते, की बाळाचं सगळं मी करेल, पण शेवटी ते नाही एैकले, जावू दे नको तो विषय"
इतक्यात शांताक्का गरमगरम भजी आणि कॉफी घेवून आली. कोमल बोलली "साहेबांना दिलं काय?
“होय, आधी त्यांनाच दिलेत आणि मग तुम्हाला आणलेत" शांताक्का हसत बोलली
शांताक्का निघून गेली आणि मग दोघी भजी खाता खाता परत गप्पा मारायल्या लागल्या.
00000
आऊट हाऊस मधून कोमल सरळ बंगल्यात आली, विनित बाल्कनीत झोपाळयावर बसुन झोके घेत डोळे मिटून किशोरकुमारचं गाणं म्हणत होता "मेरे नयना सावन भादो, फिर भी मेरा मन प्यासा"
कोमल आली आणि त्यानं डोळे उघडले व गाणं बंद केलं
“छान गाताय" कोमल त्याच्या बाजुला चेअरवर बसत बोलली
“असचं काहीतरी, तु गेली नाही अद्याप घरी"
“नाही, जरावेळानं राहुल येणार आहे मला घ्यायला, मी अपर्णाला भेटून आले आत्ताच"
“मग" विनित उत्सुकतेंन बोलला
“तिच्या बोलण्यावरुन असं काहीच वाटलं नाही की, तिच्या मनात तुमच्याविषयी तसं काही आहे"
“कां?
“ती बोलली की, तिचा नवरा तिला बाळासहित स्विकारणार असेल तर ती त्याच्याकडे जायला तयार आहे, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही तिच्याकडे असं ती बोलली"
“मग आता काय"
“सर मला वाटते, काही दिवस जावू दयावेत, एकदा तिला बाळाला जन्म घेवू दे, नंतर मग वेळ काळ बघून तुम्ही तिला प्रपोज करावं"
“ओके, मलाही तसचं वाटतं"
00000
दिवस भराभर निघून जात होते, तिन महिेने भरर्कन निघून गेले या दिवसांत उल्लेखनीय असं काही घडलं नाही.
00000
7 फेब्रुवारी
आज अपर्णाला हॉस्पीटलमध्ये ॲडमिट करण्यांत आलं होत, विनित आणि कोमल तिला कारने हॉस्पीटलं ला घेवून आले होते.
आणि परत एकदा डॉक्टर सुष्मीता आणि विनित समोरासमोर आले विनित ला बघताच डॉक्टर बोलल्या "मिस्टर विनित, what a surprise, after long time, अपर्णा तुमची मिसेस तर नाही ना?
“नाही मॅडम, मी दुसरं लग्न केलेलं नाही"
“मग अपर्णा सोबत तुम्ही, तिचे मिस्टर कुठाय"
“त्या माझ्या ऑफिसमध्ये कामाला आहेत, ती तिच्या नवऱ्यासोबत नसते, दोघाचं बिनसलं आहे काही तरी"
“ओह, बाय द वे तुमची मुलगी कशी आहे"
“छान आहे अगदी"
“ओके, come with me for some paper works”
“यस मॅडम"
डॉक्टर सुष्मीता ऑपरेशन थिएटर मध्ये गेल्या आणि विनितच्या मनात कालवाकालव सुरु झाली, त्यानं वर आकाशाकडे बघीतलं आणि दोन्ही हात जोडत बोलला "सगळं ठिक होवू दे रे देवा"
00000
जवळपास अर्ध्यातासाने डॉक्टर सुष्मीता ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आल्या, व विनितला बोलल्या "मिस्टर विनित मुलगी झालीय अपर्णाला.... आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत"
“थॅन्कस् डॉक्टर, थॅक्स गॉड"
00000
अपर्णा शुध्दीवर आली तेव्हा बाळाला बघून तिला खूप आनंद झाला
विनित, कोमल, राहुल तिथेच हॉस्पीटल मध्ये होते.
अपर्णानं मोबाईल मागवला आणि मकरंद ला मॅसेज केला "कॉगरॅटस्, मकरंद, तुम्ही बाप झालात, मी एका सुंदर मुलीला जन्म दिलाय"
पलीकडून काहीच उत्तर आलं नाही, तिच्या डोळयात आसवं तरळली.
000000..
दोन दिवसात अपर्णाला डिसचार्ज मिळाला.. व ती बाळासहीत आऊट हाऊस मध्ये आली, तिच्या देखरेखीसाठी विनितनं शांताक्काला तिथेच थांबायला सांगितलं होतं.
बाळाच्या मालीशसाठी एका वेगळया बाईची व्यवस्था केली होती. त्यानंतर बाळाची आंघोळ, त्याची तयारी सगळं विनितच करायचा, याआधी आश्वीच सगळं केलं होतं त्यानं, त्यामुळे त्याला सगळं जमायचं, हे सगळं विनितला करतांना बघून अपर्णासमोर त्याच एक वेगळच रुप समोर आलं होतं, तिला खूप कुतूहल वाटायचं, हेवा वाटायचा, छान वाटायचं......
मकरंदचा एकही मॅसेज किवा फोन आलेला नव्हता, तिला आता मकरंद विषयी तिरस्कार वाटायला लागला होता.
17 फेब्रुवारी
विनित बाळाला खेळवत होता, त्याच्याशी लाडे लाडे बोलत होता, अपर्णा सगळं कौतूकानं बघत होती, तिला खूप छान वाटत होतं.
विनित तिला बोलला "उद्या बाळाचं बारस आहे, नांव काय ठेवायचं, काही विचार केलाय"
“बाळाचं सगळं तुम्हीच करताय, तरीही मला विचारताय, बाळाचं नावं पण तुम्हीच ठेवायचं" अपर्णा हसत बोलली
“मी ठेवलेलं आवडेल तुम्हाला"
“नक्कीच आवडेल, तुम्ही काही नाव शोधलंय बाळासाठी?”
“एक नावं तर आहे माझ्या मनात"
“मग सांगा ना"
“नाही, उद्या ठेवल्यावर कळेलच की, its surprise “
“ओ.के.” ती हसत बोलली
00000
18 फ्रेब्रुवारी
आज बाळाचं बारसं होतं, अपर्णानं मकरंदलाही मॅसेज केला होता, पण तो आला नव्हता
विनित, कोमल, राहुल, आश्वी,सगळे आनंदात होते, विनितनं बाळाच्या नावाच स्टीकर तयार करुन घेतलं होतं, आणि भिंतीवर लावून त्याभोवती फुलाचं आवरण तयार केलं होतं, ज्यामुळे बाळाचं नाव फुलांनी झाकल्या गेलं होतं,
जरावेळानं बाळाच्या नावाचं अनावरण झालं.
बाळाचं नावं "जास्वी" असं ठेवण्यात आलं
नावं बघून कोमलच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं ती विनितकडे बघत मनोमन हसत होती, त्याच्या मुलीचं नावं आश्वी होतं, म्हणूनच कदाचीत बाळाचं नावं त्यानं "जाश्वी" ठवेलं असावं.
00000
28 मे
जाश्वी तीन महिन्याची झाली होती, या कालावधीत अपर्णाला मकरंदचे एक दोन फोन आले होते, पण तो तिच्या विषयीच चौकशी करायचा बाळाविषयी नाही.
आज सकाळीच त्याचा फोन आला होता, त्याला तिला भेटायचं होतं, त्यासाठी तिच्याकडे त्यानं पत्ता मागीतला होता, अपर्णान बंगल्याचा पत्ता त्याला दिला, व दुपारी बोलावलं.
00000
लंचटाईम झाला आणि अपर्णा आऊट हाऊस मध्ये आली, बाळाला शांताक्का बघत होती, अपर्णा आल्यानंतर शांताक्का निघून गेली अपर्णानं जेवन केलं.
जरावेळातच मकरंद तिथे आला.
“कशी आहेस" तो तिला बघत बोलला
“जिवंत आहे अजून"
“अशी कां बोलतेस"
“मग काय बोलू, माझा नवरा असून मला आश्रीतासारखं दुसऱ्याकडे रहावं लागतं, माझ्यासारखी र्दुदैवी स्त्री कोण असु शकेल"
“हे र्दुदैव तु स्वत: ओढवून घेतलं आहेस"
“मान्य आहे, पण पत्नी आहे मी तुमची , माझी एक साधी इच्छा पुर्ण करु शकले नाही तुम्ही"
“अपर्णा मला समजून घे"
“काय समजून घेवू"
“अपर्णा मी तुझ्याशिवाय नाही राहु शकत, मला तुझी खूप आठवण येते, तु परत चल ना घरी"
“आणि बाळ? ती त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पहात बोलली
“माझ्याकडे एक उपाय आहे, आपण बाळाला अनाथ आश्रमात ठेवुया, म्हणजे आपल्याला एकत्रही राहता येईल आणि तु त्याला भेटायला कधीही जावु शकतेस"
“मकरंद" ती जोरात ओरडली "शुध्दीवर आहात काय तुम्ही, आई वडील जिवंत असतांना माझं बाळं अनाथआश्रमात राहील, हे असं सगळं कसं बोलू शकता तुम्ही... तुम्हाला मन नाही, भावना नाहीत?”
“नाहीत मला भावना, नाही मला मन" तो आवेशात बोलला
“मला स्विकारायचं असेल तर बाळासहीत, त्या लहानग्या जीवानं काय केलंय तुमचं?”
“ठिक आहे... हाच जर तुझा निर्णय असेल तर निघतो मी"
“बाळाला बघा तरी, बघा किती गोंडस आहे ती"
“मी इथे तिला बघायला आलो नव्हतो, आणि ज्या बाळामुळे आपल्यात दुरावा निर्माण झालाय , त्या बाळाचं मला तोंडही बघायचं नाही, मी इथे आलो फक्त तुझ्या प्रेमापोटी... माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे अपर्णा"
“खोटं बोलताय तुम्ही, नाहीये तुमचं माझ्यावर प्रेम, स्वार्थी आहात तुम्ही"
मकरंद न एक नजर तिच्याकडे रागानं बघीतलं आणि तो तिथून निघून गेला, तिच्या डोळयात आसवं ठेवून.
ती तिथेच बसली हतबल होवून.
ती वर आकाशाकडे बघत बोलली "देवा आणखी किती दु:ख येणार आहे माझ्या वाटयाला"
ऑफिसचया खिडकीत कोमल उभी होती, आऊट हाऊस मधून एक मनुष्य तिला बाहेर निघतांना दिसला, कोण होता तो, अपर्णाचा नवरा तर नाही ना, तिच्या डोक्यात प्रश्नांनी घर केलं, ती लगबगीनं ऑफिसच्या बाहेर आली आणि आऊट हाऊस मध्ये शिरली, अपर्णा सोफ्यावर डोळे मिटून बसली होती. चाहुल लागतात तिनं डोळे उघडले, तिच्या डोळयांच्या कडा ओल्या झाल्या होत्या.
“काय झालं" कोमलचा प्रश्न
“काही नाही गं, ....बैस"
“अपर्णा काहीतरी प्रॉब्लेम नक्कीच आहे, काय झालं... कोण होता तो, जो आत्ता जरावेळापूर्वी इथून बाहेर गेला"
“तु बघीतलं त्यांना"
“होय"
“माझे मिस्टर होते ते, मला घरी न्यायला आले होते"
“काय?, मग.....”
“फक्त मला घ्यायला आले होते, जाश्वीला नाही, तिला अनाथ आश्रमात ठेवायचं बोलत होते" तिचा स्वर भारावला
“काय? काय माणूस आहे गं तुझा नवरा, स्वत:च्या बाळाचीही दया येत नाही त्याला" कोमल चिडलेल्या स्वरात बोलली
“जाश्वीला साधं बघीतलही नाही गं त्यांनी, ते बोलले ज्या बाळामुळे आपल्यात दुरावा निर्माण झाला, त्या बाळाचं मला तोंडही बघायचं नाही" ती रडतच बोलली
“मॉय गॉड, इतके बुरसटलेले विचार... लेक्चरर आहे ना गं तुझा नवरा?”
“जावू दे ना कोमल, माझचं नसीब फुटकं त्याला कोण काय करणार"
“नसीब तुझं नाही, त्याचं फुटकं आहे, सोन्यासारख्या बायकोला आणि मुलीला वा-यावर सोडून तो कधीच सुखी राहणार नाही"
“नसिबाचे भोग दुसरं काय"
“तु काळजी करु नकोस सगळं ठिक होईल"
“काय माहित" ती शुन्यात बघत बोलली
“मला माहित आहे सगळं ठिक होणार आहे" कोमल मनात खुष होत बोलली
00000
29 मे
विनित कॅबिनमध्ये एकटाच बसला होता, ते बघून कोमल लगेच त्याला भेटायला गेली, त्याच्यासमोर खुर्चीवर बसत बोलली "सर मला महत्चाचं बोलायचं आहे"
“काय"
“काल अपर्णाचा नवरा आला होता तिला भेटायला"
“बापरे... कशासाठी"
“खरं तर तो तिला घरी न्यायलाच आला होता"
“काय?”
“हो, पण तो तिला एकटीलाच न्यायला आला होता"
“आणि जाश्वीला"
“तो जाश्वीला अनाथ आश्रमात ठेवायला बोलत होता"
“बापरे.. माणूस आहे की कोण"
“मग अपर्णा बोलली की ती जाश्वीशिवाय येणार नाही, जाश्वीला जवळ घ्यायचं तर सोडा, त्यानं तिचं तोंडही बघीतलं नाही"
“खरचं खूपच विचित्र माणूस आहे हा मकरंद डोंगरे"
“सर... तिचा नवरा तिला बाळासहीत स्विकारणार नाही... आणि ती जाश्वीला सोडून त्याच्याकडे जाणार नाही, म्हणजे आता तुम्ही अपर्णाला लग्नासाठी प्रपोज करु शकता"
“म्हणजे.. लगेच?
“लगेच नको, सद्या तिचा मुड नाही चांगला, ती खूप अपसेट आहे, तिचा मुड जरा चांगला होवू दया"
“ठिक आहे"
“सर मला खात्री आहे... तुम्ही तिला लग्नाची मागणी घातली तर ती नाही म्हणणार नाही"
“खरचं तुला असं वाटतं कोमल"
“होय सर... आणि माझी देवाला प्रार्थना आहे की असचं व्हावं"
“थॅन्कस् कोमल"
00000
आठ दहा दिवस भराभर निघून गेले, या दिवसात उल्लेखनिय असं काही घडलं नाही.
जाश्वीला बघण्यासाठी अपर्णानं एक आया ठेवली होती, ती आता ऑफिसला जावू लागली होती. जाश्वी आता चार महिन्याची झाली होती, विनित तिचे खूप लाड करायचा. तर सगळं विसरुन आपण आता मुलीसाठी जगायचं, असं अपर्णानं ठरवलं होतं.
00000
11 जून
विनित सकाळपासूनच आज टेंशनमध्ये होता, आज अपर्णाला लग्नाबद्दल विचारायचं त्यानं मनोमन ठरवलं होतं, कोमल त्याला शुभेच्छा देत बोलली होती "गो अहेड सर.. सगळं ठिक होईल"
कोमल ऑफिसमध्ये आली...अपर्णा ऑफिसमध्ये आलेली नव्हती.
तिनं रिशेप्शनवर बॅग ठेवली, आणि आऊट हाऊसकडे अपर्णाला भेटायला निघाली.
ती आऊट हाऊसमध्ये येताच, अपर्णानं तिला आनंदानं मिठीच मारली व बोलली "बरं झालं तु आली, मी आता तुला इकडेच बोलावणार होते"
“काय झालं? खूप आनंदात दिसतेस"
“कोमल, दुख:चे दिवस संपले अग, काल रात्री मकरंदचा फोन आला होता, ते बाळासहित मला स्विकारायला तयार झाले आहेत, आज सायंकाळी ते आम्हा दोघांनाही घ्यायला येणार आहेत"
“काय?, मग काय ठरवलंय तु"
“काय ठरवलं म्हणजे?, कोमल मला कधीच वाटलं नव्हतं की, असं कधीतरी होईल, पण उशीरा का होईना त्यांना आपली चूक कळली आहे, मला आणखी काय हवयं"
“आणि त्यानं तुझ्यासोबत केलं ते, विसरली सगळं?, तु जेव्हा आई होणार होती, तेव्हा तुला घराबाहेर काढलं, तु कुठे आहे कशी आहे याची साधी विचारपूसही केली नव्हती"
“त्याचा विचार केलाय मी, खूप विचार केला, रात्रभर झोपलीही नाही, पण अपर्णा माझ्याकडे दुसरा पर्याय तरी काय आहे, आणि तसही नवरा बायको मध्ये छोटे मोठे वाद तर होतच असतात, मी ठरवलं आहे, त्यांच्यासोबत जायचं"
“आणि तो जाश्वीसोबत निट वागेल याची खात्री आहे तुला"
“आता तिच्यासोबत स्विकारणार आहे म्हटल्यावर ते जाश्वी सोबत निटच वागणारच ना"
“जो माणूस इथे येवून बाळचं तोंडही बघत नाही, तसाच निघून जातो, तो तुझ्या बाळाशी निट वागेल?, मला नाही वाटत"
“शेवटी ती त्यांचीही मुलगी आहे, आज ना उद्या लळा लागेलच तिचा"
“कदाचीत तु घेतलेला निर्णय तुझ्यापरीने योग्यच आहे, पण अपर्णा मला तुला काही सांगायचं आहे, आणि मला वाटते हिच ती वेळ आहे तुला सांगण्याची"
“काय कोमल"
“एक अनोळखी व्यक्ती, ज्याचं तुझ्याशी काही नांत नाही, ते तुला ओळखतही नाही, तुला अवघडलेल्या अवस्थेत घरी आणतात, त्यांच्या परीने जे जे शक्य आहे ते ते तुझ्यासाठी, तुझ्या बाळसाठी करतात, कां त्यांचा विचार करु शकते तु जरावेळासाठी"
“तु सरांबद्दल बोलतेय ना"
“हो मी सरांबद्दलच बोलतेय, त्यांच्याविषयी कधी काही वाटलं नाही तुला"?
“त्यांच्या बद्दल माझ्या मनात खूप आदर आहे कोमल, खरचं त्यांनी खूप केलयं माझ्यासाठी, जाश्वीसाठी"
“तुझा आणि जाश्वीचा लळा लागला आहे त्यांना, ते प्रेमात पडलेय तुझ्या आणि तुला लग्नासाठी विचारणार होते"
“काय?” आता मात्र अपर्णा चक्रावली व मटकन तिथेच बसली
कोमल पुढे बोलली "त्या माणसाचा तरी काय दोष गं, त्यांची पत्नी गेली तेव्हापासून प्रेमाला पारखे झालेत, तु आश्वीचा सांभाळ जाश्वीसारखाच करशील ही खात्री आहे त्यांना आणि मलाही... कां एका क्षणासाठी त्यांचा विचार करु शकते तु?"
“कोमल काय बोलतेस तु हे.... मी असा विचार कसा करु शकते?, मी विवाहित आहे, पत्नी आहे कुणाचीतरी, असा विचार माझ्या मनात येणंही पाप आहे"
“माहित आहे मला तु कुणाचीतरी पत्नी आहे, त्यानं तुझ्यासाठी कायं केलं, ज्यावेळी त्याच्या आधाराची तुला सगळयात जास्त गरज होती, तेव्हा तुला परकं केलं, प्रेम विश्वास, पती पत्नी यांच नातं काय असतं, याचा दुरपर्यंत तरी संबंध आहे का तुझ्या नवऱ्याचा, एक नंबरचा स्वार्थी आणि लबाड माणूस आहे तुझा नवरा"
“इनफ कोमल... मला नाही एैकायचं काही.. तु जा इथून, प्लीज मला एकटीला सोड"
“जातेय मी, तसंही मी कोण गं तुला हे सगळं सांगणारी"
आणि कोमल सरळ तिथून निघून गेली... तिच्या डोळयात आसवं ठेवून
ती जरा वेळ तशीच बसून राहली, कदाचीत कोमल जे बोलली ते एैकून तिला धक्का बसला होता.
00000
इतक्यात दारावर टकटक झाली, तिनंअश्रृ आवरले आणि डोळयांच्या ओल्या झालेल्या कडा पुसल्या .. दाराकडे बघीतलं, दारावर विनित उभा होता, त्याला बघताच अपर्णा बोलली "सर आपण"?
विनित आत आला आणि खुर्चीवर बसला.
अपर्णाही खुर्चीवर बसली, विनित बोलला "मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे..., आताच दोघा तुम्हा मैत्रीणींच बोलणं ऐकलंय मी"
अपर्णा आश्चर्यानं त्यांच्याकडे बघायला लागली, विनित पुढे बोलला "पण तुम्ही वाईट वाटून घेवू नका, कोमल माझी खूप काळजी करते त्यामुळे तिला माझ्याबद्दल असं वाटणं सहाजीक आहे. तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य आहे, नवरा बायको मध्ये असे छोटे मोठे वाद होतच राहतात. पण यापुढेही तुमच्यावर असा काही प्रसंग ओढवला, किंवा तुम्हाला .. जाश्वीला स्वत:पासून दूर करावं लागलं.. तर प्लीज त्या जीवाला अनाथआश्रमात ठेवू नका, जाश्वीला मी माझी मुलगी समजून कधीही सांभाळ करायला तयार आहे, आणि यापुढेही तुम्हाला कधीही काहीही मदत लागली तरी संकोचू नका, मी आणि कोमल कधीही तुमच्या मदतीला तयार असू... आणि हो... कोमलनं दुखावलं तुम्हाला.. खूप बोलून गेली, शक्य झालं तर तिला क्षमा करा, तिच्या वतीनं मी माफी मागतो .. आणि माझही काही चुकलं असेल तर मलाही क्षमा करा, येतो मी.
आणि ती काही बोलायच्या आतच विनित तिथून निघून गेला.... तिला तशीच स्तब्ध ठेवून...
कितीतरी वेळ ती तशीच बसली होती, तिला खूप रडावसं वाटतं होतं, पण ती रडली नाही.. तिचे अश्रृ डोळयातच साचले होते.
00000
बघता बघता सायंकाळ झाली,
आणि मकरंद आला तो आज खूप आनंदात होता, अपर्णाला अशीच बसलेली बघून तो बोलला "काय हे अद्याप तयारी नाही झाली तुझी"
“नाही... करते आता"
“ठिक आहे तु कर तयारी, मी आहे कार मध्ये, वाट बघतोय तुझी"
“ठिक आहे, जरा वेळ लागेल, जाण्यापूर्वी एकदा या बंगल्याच्या मालकाला भेटून येते, आऊट हाऊसची चाबी पण देवून येते"
“ठिक आहे, पण लवकर आटप सगळं"
मकरंद निघून गेला, अपर्णा नं बॅग भरायला घेतली
तिनं बॅग भरली...कडेवर जाश्वीला घेतलं, आणि आऊट हाऊसला लॉक केलं व बॅग घेवून बंगल्याच्या दिशेनं निघाली.
बाहेर वारा सुटला होता, मध्येच विजा चमकत होता, आभाळ चांगलंच भरुन आलं होतं.
00000
विनित बाल्कनीत उभा होता, भरुन आलेल्या आभाळाकडे बघत, भरलेल्या ढगाकडे... त्यात दाटलेल्या पावसाकडे ...तो ढगांकडे बघत बोलला "तुझं बर आहे यार... जरावेळानं तु सगळा पाऊस पाडुन मोकळा होशील, निवांत होशील, पण मला तसं नाही ना करता येत तुझ्यासारखं, वर्षानुवर्ष हा मनातला पाऊस नुसता साचतच चाललाय, मनाच्या कप्प्यात दाटत चाललाय"
त्याला चाहुल लागली आणि त्यानं मागे वळून बघीतलं, बंगल्याच्या दारात अपर्णा उभी होती, एका हातात बॅग होती कडेवर जाश्वीला घेवून ती त्याच्या दिशेनं येत होती.
त्यानं डोळयाच्या कडा पुसल्या आणि, तो बाल्कनीतून खाली आला. व तिच्यासमोर येवून उभा झाला
00000
अपर्णा आऊट हाऊस च्या चाब्या विनितकडे देत बोलली "या आऊट हाऊसच्या चाव्या, तुमचं आऊट हाऊस सोडतेय मी आज, बाहेर मकरंद मला घ्यायला आलेत"
विनितनं चाव्या हातात घेतल्या, ती पुढे बोलली "आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी, माझ्या बाळासाठी खूप केलतं, काही ओळख नसतांना, मी कुठली कोण माहित नसतांना, मला आसरा दिला, मला जॉब दिला, माझ्या बाळंतपणापासून ते माझ्या बाळाचं सगळं केलं, आपलं काही नातं नसतांना.. मला नेहमी वाटायचं .. माझा नवरा कां नाही असा?, तुम्ही जे माझ्यासाठी केलयं त्याची परतफेड कधीच होवू शकणार नाही" ती भारावलेल्या स्वरात बोलली विनित शांतपणे एैकत उभा होता, ती पुढे बोलली
“आजपर्यंत खूप दुख: सोसली मी, लहानपणीच आईबाबांच छत्र हरवलं, अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झाले, मकरंदला सर्वस्व मानून त्यांच्यावर प्रेम केलं, पण ते मला, माझ्या भावनांना कधीच समजू शकले नाही, मला माहित आहे की माझ्या जाश्वीला बाबांच जे प्रेम तुमच्याकडून मिळालं, ते मकरंद कधीही देवू शकणार नाही, तुम्ही माझ्या बाळासाठी जे केलय ते मकरंद कधीही करु शकले नसते, म्हणून मी ठरवलयं, माझ्या जाश्वीला पापा म्हणून तुम्ही हवेत, मकरंद नकोय"
“म्हणजे.. “ विनित तिच्याकडे आश्चर्याने बघत बोलला
“नाही जावू शकले मी, तुम्हाला, या घराला सोडून, तुम्ही तुमच कर्तव्य पार पाडलं, आता मला माझं कर्तव्य पार पाडायचं आहे, कां तुम्ही माझा पत्नी म्हणून स्विकार कराल, माझ्या बाळासहित"
“म्हणजे तु... “ त्याच्याने पुढे बोलवेना
“होय.. मी आऊट हाऊस सोडून इथे आली आहे, कायमची रहायला, माझ्या बाळासाठी, माझ्या जाश्वीच्या पप्पांसाठी" तिचे डोळे पाणावले
विनितला काय बोलावं काही सुचत नव्हतं
“बोला ना... कां तुम्ही माझा पत्नी म्हणून स्विकार कराल?, ती परत बोलली
“होय, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, अबोली नंतर मी आज पहिल्यांदा तुम्हाला बोलतोय "आय लव यु" त्याचे डोळे भरुन आले
“आय लव यु टू" म्हणत ती त्याच्या कुशीत शिरली
आणि दोघांच्याही मनात दाटलेल्या आजपर्यंतच्या पावसाला वाट मोकळी झाली...
बाहेर ढगांचा कडकडाट झाला, आणि पावसाला सुरवात झाली... यावर्षीचा पहिला पाऊस मनसोक्त बरसायला लागला होता.
दोघांनीही एकमेकांना घट्ट मिठी मारली, दोघांच्याही डोळयांना आसवांच्या धारा लागल्या होत्या.
बंगल्याच्या दारात कोमल उभी होती, आश्वीला घेवून, तिचेही डोळे पाणावले. ती डोळे पुसत आश्वीला बोलली "जा बाळा ती तुझी ममा आहे" आणि आश्वी धावत त्या दोघांकडे आली, अपर्णानं आश्वीला मिठी मारली.. व बोलली "आज पासून मी तुझी ममा आहे"
अपर्णांनं बंगल्याच्या दाराकडे बघीतलं.. कोमल डोळे पुसत उभी होती, अपर्णानं खुणेनं तिला जवळ बोलावलं... कोमल धावतच तिच्या जवळ आली, व अपर्णानं तिला मिठी मारली व बोलली "सॉरी यार...”
“सॉरी तर मला बोलायला हवं, मी तुला काय काय बोलले.. मला माहित होतं की, माझी मैत्रीण इतकी स्वार्थी असूच शकत नाही, तु काय निर्णय घेणार हे मला माहित होतं, मैत्रीण आहे तुझी... म्हणून तर आश्वीला घेवून इथे आले"
“थॅन्क्स् कोमल" विनित जवळ येत बोलला
विनितनं जाश्वीला कडेवर घेतलं.. आणि अपर्णाला बोलला "तुम्ही...”
अपर्णानं त्याच्या तोंडावर हात ठेवला व बोलली "आता तुम्ही नाही .. तु म्हणायचं, अपर्णा म्हणायचं"
तो हसला आणि बोलला "बाहेर तुझा नवरा वाट बघतोय तुझी.. हॉर्न वाजवतोय सारखा"
“अरे हो, त्यांना तर मी विसरलेच होते, आले मी भेटून"
अपर्णा बंगल्याच्या बाहेर आली, पाऊस थांबला होताजरा वेळ
00000
बंगल्याच्या गेटमधून अपर्णा बाहेर मकरंद च्या कारजवळ आली तो बोलला" “काय हे किती वेळ"
“मकरंद ... खूप आनंदात आहात ना तुम्ही आज"
“हो.. कारण आज माझी अपर्णा माझ्यासोबत माझ्या घरी येतेय रहायला, ये चल निघूया"
“तुम्ही हे नाही विचारलं की बाळ कुठायं?, तुम्हाला माहित आहे या बंगल्याचे मालक खूप चांगले आहेत, आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी माझ्या बाळासाठी खूप काही केलंय"
“हे तु मला का सांगतेस"
“एकदाही भेटावसं नाही वाटलं ना त्यांना, तुम्हाला, ज्यांनी तुमच्या पत्नीसाठी, तुमच्या बाळासाठी इतकं केलय, जावु दे तुम्हाला माझ्याच प्रेमाची किंमत नाही तर दुसऱ्यांची काय असणार म्हणा"
तो गप्प झाला
अपर्णा पुढे बोलली "त्यांना बाळाचा इतका लळा लागलाय की ते बोलले की बाळाला इथेच ठेव, मी बघेल त्याला, बाळाला ते आपलं नावही दयायला तयार आहेत"
“अरे व्वा... हे तर खूपच छान झालं, जगात इतके महान लोक ही आहेत... चला म्हणजे शेवटी आपल्या मनासारखं झालं"
“आपल्या मनासारखं नाही, तुमच्या मनासारख, आजही ते बाळ तुम्हाला नकोय ना"?, ती त्याच्या डोळयात बघत बोलली
“अपर्णा मी तुला बाळासहीत स्विकारायला तयार झालोय ना"
“हो?, खरचं?, मग कधी बघीतलं नाही आजपर्यंत माझ्या जाश्वीला, कधी प्रेमानं कुरवाळलं नाही तिला, हो ना... तुमचीच मुलगी आहे ना ती... तिचं नांव काय ठेवलं, हे तरी विचारलय कां कधी"?
तो निरुत्तर झाला
ती पुढे बोलली "नाही ना...खरं हेच आहे की आजही ते बाळ तुम्हाला नकोय, फक्त मी हवी आहे, खरंच तुम्ही माझ्या जाश्वीसाठी चांगले बाप होवू शकता?, उत्तर आहे, नाही, आज तुमचा नाईलाज आहे म्हणून तुम्ही आलात, मला घ्यायला, हे प्रेम आहे तुमचं?”
“अपर्णा माझं खरचं खुप प्रेम तुझ्यावर"
“हो.. मग तेव्हा कुठं गेलं होतं हे प्रेम, जेव्हा मला तुमच्या आधाराची सर्वात जास्त गरज होती, पावसाळया रात्री मला घराबाहेर काढलं, तेव्हा कुठं होतं तुमचं प्रेम" तिचा स्वर भारावला
“अपर्णा प्लीज नको त्या आठवणी काढू त्रास होतोय मला" मकरंद बोलला
“तुम्हाला त्रास होतोय? आश्चर्य आहे, मी भोगलय सगळं, आणि तुम्हाला त्रास होतोय, एवढं काय मागीतलं होतं हो मी तुमच्याकडे, फक्त आई व्हायचं होतं मला... आणि तुम्ही... काय बोलले मघा आज माझी अपर्णा माझ्यासोबत घरी येतेय, हो ना, तुमची अपर्णा? काय केलतं हो तुम्ही आजपर्यंत तुमच्या अपर्णासाठी , तुमचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं, स्वार्थ होता सगळा"
तो निरुत्तर झाला व जरावेळानं बोलला "मग काय ठरवल तु?
“मला माझ्या जाश्वीसाठी एक चांगले पप्पा हवेत जे तुम्ही कधीही होवू शकणार नाही"
“याचा अर्थ तु माझ्यासोबत येणार नाही"
“नाही, आणि मी माझा निर्णय बदलणार नाही"
“माझ्याशिवाय राहशील"
“मकरंद, एक वर्ष झालंय मला तुमच्याशी दुरावून आजपर्यंत राहले मी तुमच्याशिवाय.. आधी एकटी होते, पण आता माझी जाश्वी आहे माझ्यासोबत, पण आज एक मनापासून सांगते, मी खूप प्रेम कलं होतं तुमच्यावर, मला नाही यायचं तुमच्यासोबत, घटस्फोटाचे पेपर्स मी पाठवून देईल तुम्हाला.. जा तुम्ही इथून.. प्लीज गो.....”
मकरंद स्तब्घ झाला, काय बोलावं त्याला काही कळतं नव्हतं, आणि तो हताश होवून तिथून निघून गेला. जरा वेळ ती तशीच उभी राहली... मकरंद च्या जाणाऱ्या कारकडे बघत.
परत पावसाला सुरवात झाली.. ती तशीच उभी राहली पावसात भिजत
विनित छत्री घेवून आला.. तिच्या डोळयात आसवं होती.. त्यानं बोटानं तिची आसवं पुसली व बोलला "आज जेवढं रडायचं आहे, तेवढं रडून घे.... पण यानंतर तुझ्या डोळयात आसवं आली तर मग बघ..”
ती हसली आणि विनितच्या हातातील छत्री बाजुला करत बोलली "छत्री नकोय आता.. मला आज पावसात भिजयायचं तुमच्यासोबत, आजपर्यंत मनात साचलेलं सगळं दुख: वाहून जावू दयायचय"
“विनितनं तिच्या टपोऱ्या डोळयात बघीतलं, आणि अपर्णाला घट्ट मिठी मारली.
पाऊस आता जोरात बरसायला लागला होता
कोमल बंगल्याच्या दारात जास्वीला कडेवर घेवून उभी होती... तर आश्वी तिचं बोट धरुन बाजुला उभी होती, तिच्या डोळयात आनंदाश्रृ होते, तिनं वर बघीतलं व बोलली "तेरे घर मे देर है, पर अंधेर नही"
00000
जब दर्द नही था सिने मे,
तो खाक मजा था जिने मे
अबके शायद हम भी रोंये,
सावन के महिने मे...
00000
समाप्त
ही कथा आपल्याला कशी वाटली याबाबत कृपया आपल्या समिक्षा द्या.