प्रेम हे
प्रेम हे
“They say you, Only fall in love once
But that can't be true,
Every time I look at you
I fall in love all over again”
प्रेम हे... EP-1
19 जून
मकरधोकडा (नागपूर)
नागपूरपासून साधारणत: 35-40 किलोमिटर अंतरावर असलेलं एक निसर्गरम्य खेडेगावं, इथंलं आकर्षण म्हणजे "मकरधोकडा धरण", हिरवागार निसर्गरम्य परिसर, टेकडी... टेकडीवरचं जंगल सगळच विलोभनिय.
गार वारा सुटला होता, आभाळ चांगलच भरुन आलं होतं.
हिरव्यागार टेकडीच्या माळरानावर दिप्ती एकटीच उभी होती, भरुन आलेल्या आभाळाकडे बघत.
तिनं वेळ बघीतली व ती मनाशीच पुटपुटली. थेंब थेंब पावसाला सुरवात झाली, तशी ती झाडाखाली आली व तिथल्या ओटयावर बसली. तिनं डोकं ओढणीनं झाकून घेतलं.
दिप्ती वय वर्ष 21, दिसायला सुंदर, रेखीव चेहरा, टपोरे डोळे, अगदीच लोभस चेहरा.
छान वारा सुटला होता, आणि वा-याने तिचे केस तिच्या चेह-यावर उडत होते.
ती अमन ची वाट बघत होती, अमन तिचा ब्वॉयफ्रेंड होता.
रस्त्याकडे डोळे लावून ती त्याची वाट बघत होती, इतक्यात लगबगीनं अमन तिला येतांना दिसला. तो धावतच तिच्याजवळ आला.
“काय हे किती वेळ अमू" तिचा तक्रारी सूर
“सॉरी यार... काय करु, नागपूरहून यायला इथे वेळ लागतो की नाही, बसला उशीर झाला"
“अरे माझा विचार कर ना जरा .. सगळयांपासून लपत छपत मला तुला भेटायला यावं लागतं, अमू मला वाटते आता जास्त दिवस आपण एकमेकांना नाही भेटू शकणार"
“काय झालं... काही संशय तर नाही ना आलाय घरच्यांना"
“संशय तर नाही आला, पण आता कॉलेजला सुटया आहे, घराच्या बाहेर निघायला नेहमी नेहमी कुठून आणणार बहाने"
“तसही आपण नेहमी कुठे भेटतोय अगं, तू नागपूरला होती त्यावेळी आपण रोज भेटायचो, आता तर कधीतरी भेटतो, मला तुझी खूप आठवण येते, नाही राहु शकत तुझ्याशिवाय"
“मी तरी कुठे राहु शकते... तुझ्या शिवाय"
“माझं कॉलेजचं वर्ष संपल की मी जाणार मुंबईला मित्राकडे, तिथे जॉब शोधणार, मग आपण लग्न करु"
“खरचं, कधी येईल तो दिवस"
“येईल लवकरच"
“आणि त्या आधी माझं लग्न ठरवल तर घरच्यांनी"
“तर मग पळून जायचं मुंबईला... येशील ना माझ्यासोबत"
ती जरावेळ गप्प राहली व बोलली "खरचं जायचं पळून"
“मग काय करणार... माझ्याशिवाय राहशील?”
“तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचारही मनात आणू शकत नाही" दिप्ती भावूक होत बोलली
“जेव्हा तशी वेळ येईल तेव्हा बघू... आता भेटलोय ना... मग भेटीची मजा कां घालवायची" तो तिचा हात हातात घेत तिच्या डोळयात बघत बोलला
ती जरा लाजली
“किती छान दिसतेय" तो बोलला
“तुझं काहीतरीच" ती लाजत बोलली
अचानक पावसाला सुरवात झाली आणि ते दोघेही झाडाखाली थांबले, दिप्ती त्याच्या बाजुला अगदीच अंग चोरुन उभी होती, अमन आणखी तिच्या जवळ आला, आता तिच्या शरीराचा स्पर्श त्याला होत होता, तो गोड स्पर्श त्याला हवाहवासा वाटत होता.
“जवळ ये ना" तो बोलला
“जवळच तर आहे"
“आणखी जवळ" म्हणत तो तिच्या अंगाला चिटकून उभा राहला
दिप्तीच्या अंगावर रोमांच उठले, गार वारा तिच्या अंगाला झोंबत होता, त्यानं तिच्या गुलाबी ओठांकडे बघीतलं आणि तिला जवळ घेत घट्ट मिठी मारली.
................
same day
मुंबई
दुपारी 4.00 वाजता
तनिष कामात होता, निता त्याच्याकडे सारखी बघत होती.
तनिष तिला खूप आवडायचा, तो कलीग होता तिचा,दोघे एकाच कंपनीत कामाला होते.
तनिष वय वर्ष 24, उंच, गोरा, दिसायला हॅण्डसम होता, तो बघत नाही हे बघून वैतागून निता त्याच्याजवळ आली व बोलली "हाय"
“हाय" तो मान वर करत तिच्याकडे बघत बोलला
“काय हे किती काम करतोय, तुला काही चहा कॉफी घ्यावीशी वाटत नाही"
“वाटते ना...”
अचानक त्याचं लक्ष घडयाळयाकडे गेलं व तो उडालाच "बापरे चार वाजले"
“काय झालं"
“काही नाही.. नंतर बोलू"
आणि तनिष सरळ लिफ्ट ने खाली आला, त्याच्या ऑफिसच्या बाजुच्या गल्लीत एक छोटाचा कॅफे होता, तो तिथे रोज कॉफी प्यायला यायचा.. पण आता काही दिवसापांसून त्याच्या तिथं येण्याचं कारण काहीतरी वेगळचं होतं"
कॅफेच्या वरच्या माळयावर असलेल्या देशपांडे क्लासला एक छान सुंदर मुलगी यायची, बरोबर चार वाजुन दहा मिनीटांनी, ती त्याला खूप आवडायची, एकदा त्याची आणि तिची नजरानजर झाली, त्यानं किंचीत स्माईल केलं, ती मात्र गडबडली.. बावरली..
आता हा नजरेचा खेळ रोजचाच झाला होता, गेल्या पंधरा विस दिवसांपासून तो तिच्याकडे बघायचा, त्याचं लक्ष नसलं तर ती त्याच्याकडे बघायची, नजरेचा हा लंपडाव सुरुच होता, आज तनिषनं मनोमन ठरवल होतं की, तिच्याशी बोलायचं. त्याची कॉफी पिऊन झाली आणि तो तिची वाट बघत थांबला.
जरावेळानं ती त्याला येतांना दिसली, अगदीच लोभस, निरागस चेहरा, छान ऑरेज कलरचा सल्वार ड्रेस घातलेली, सेम कलर ची ओढणी.. चेहरा जरा गंभिर …,
आजही त्याची आणि तिची नजरानजर झाली, आणि आज इतक्या दिवसानंतर तिनं त्याला छान स्माईल दिली. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो चालतच तिच्याजवळ आला व बोलला "हाय"
ती गोंधळली, तो असा अचानक बोलेलं असं वाटल नव्हतं तिला, तिला गोंधळलेलं बघून तो पुन्हा बोलला "मला बोलायचं आहे जरा तुझ्याशी.. का सायंकाळी तु मला समोरच्या पार्क मध्ये भेटू शकते... तुझा क्लास सुटल्यानंतर"
तिनं जरा वेळ त्याच्याकडे बघीतलं व नंतर खाली मान घालून निघून गेली.
तनिषनं स्वत:च्या डोक्याला एक चापट मारली व बोलला "याचा काय अर्थ काढायचा"
.............
सायंकाळ झाली तनिष ऑफिस सुटायच्या आधीच कुणालाही न सांगता बँग घेवून निघाला, खाली पार्कींगला आला त्यांन आपली बॅग कारमध्ये ठेवली.. आणि कारला लॉक करुन चालतच समोरच्या पार्क मध्ये आला.
तिचा क्लास सुटायला अजून 10 मिनीटे शिल्लक होती. तो असाच पार्कमध्ये चक्कर मारुन आला आणि एका ठिकाणी निवांत बसला. त्याच्या डोक्यात नाना विचारांचं वादळ, येईल की नाही...
जरावेळानं ती पार्कमध्ये प्रवेश करतांना त्याला दिसली.. त्याला आनंद झाला, तो जागेहून उठला, तिची नजर त्याला शोधत होती, शेवटी दोघांची नजरानजर झाली, आणि ती त्याच्याकडे आली आणि त्याच्या बाजुच्या बाकावर येवून बसली...
तो पण जरा अंतर ठेवून त्याच बाकावर बसला... “थॅन्क्स" तो बोलला
“कशाबद्दल" ती बोलली
“तु आल्याबद्दल"
ती हसली व बोलली "कशाला बोलावलं इथे"
“माझं नावं तनिष.. मी इथेच समोरच्या ITकंपनीमध्ये कामाला आहे"
“माहित आहे मला" ती बोलली
“तुला कसं माहित"
“बघते ना तुम्हाला रोज" ती बोलली
“तुझं नाव काय गं" तो बोलला
“अन्वी" ती बोलली
“Wow what a nice name”
“थॅन्कस् .. मला सांगितलं नाही मला इथे कां बोलावलं ते"
“खरं सागांयचं तर तु आवडतेस मला...”
“हो कळलयं मला.. की मी तुम्हाला आवडते"
“कसं काय"
“गेले पंधरा दिवसांपासून बघते ना, सारखे बघत असता माझ्याकडे"
“सॉरी" तो खाली मान घालत बोलला
ती किंचीत हसली व बोलली "ओके.. ठिक आहे.. मी निघू आता"
त्यानं तिच्याकडे बघीतलं व बोलला "अभी अभी तो आयी हो.. अभी अभी जाना है...?
त्याच्या या बोलण्यावर ती दिलखुलास हसली, तो तिच्याकडे बघतच राहला व बोलला "मी प्रेमात पडलोय तुझ्या.. आय लव यु"
“कां प्रेम करताय माझ्यावर"
“सांगितलं ना तु आवडतेस मला"
तिचा चेहरा जरा गंभीर झाला ती बोलली "कां आवडते मी तुम्हाला"
“असे अवघड प्रश्न नको ना विचारु" तो बोलला
ती गप्प झाली
“मला न कॉफी प्यावीसी वाटते... तु ये ना सोबत.. कॉफी पिऊया" तो बोलला
“ठिक आहे चला"
तनिष खूष झाला दोघे चालतच एका कॅफे हाऊस मध्ये पोहोचले
(क्रमश:)

