AKSHAY KUMBHAR

Tragedy Crime Thriller

4.5  

AKSHAY KUMBHAR

Tragedy Crime Thriller

संजीवनी

संजीवनी

19 mins
435


आज पण ते दिवस मला आठवतायत

मी घरातून बाहेर पडलो. बस स्थानकावर उभा होतो तोच डोकं दुखायला लागलं आणि डोळ्यावर अंधारी आली आणि असं वाटलं मी कुठेतरी पडतोय.


ती: काय होतंय अभय ?

मी: कोण ?

ती: अरे मी संजीवनी.

मी: हा बोल ना संजीवनी.

संजीवनी: तुला बरं वाटतंय ना ?

मी: अग अशक्तपणामुळे अंधारी आल्यासारखं वाटतंय.

संजीवनी: हे घे पाणी पी. बरं वाटेल.

मी पाणी पिल.

मी: धन्यवाद.

संजीवनी: अरे धन्यवाद कसलं करतोयस. ऑफिसच काम झालं का ?

मी: कसलं ग ?

संजीवनी: अरे तुला अमोल सरांनी कमल एंटरप्राइज च काम दिल होत ना ?

मी: अरे बापरे.

संजीवनी: काय झालं.

मी: अग मी विसरलोच.

संजीवनी: दरवेळी प्रमाणे आज पण तू अमोल सरांच्या शिव्या खाणार वाटत.

मी: आता तर ते नोकरीवरुन १००% काढून टाकतील.

संजीवनी: तुझी मैत्रीण जीवंत असेपर्यंत ती वेळ येणार नाही. लॅबटॉप काढ तुझा. इथंच काम पूर्ण करुन टाकू.

मी: अग बस स्टॉप वर.

संजीवनी: काम पूर्ण करायला कुठेही लाजायचं नाही.

मी: बरं.

मी लॅबटॉप संजीवनीकडे दिला.

१ ते २ तासात माझं सगळं काम करुन संपवलं. सुद्धा.

संजीवनी: बस आली. आज दोघांना उशीर झाला म्हणून अमोल सरांच्या शिव्या बसणार.

मी: धन्यवाद यार. तुला कसं सगळं पटापट जमत ग.

संजीवनी: डोक्याची जादू आहे मित्रा. या डोक्यावर पुढच्या महिन्यात पगार वाढवून मागते बघ कशी.

मी: क्या बात

संजीवनी: आणि तू मला सारखं धन्यवाद म्हणू नकोस. पार्टी हवीय आज.

मी: देतो कि. पण आज पाकीट जरा खाली आहे ग.

संजीवनी: तुझं पाकीट नेहमी खालीच असत.


आम्ही ऑफिसला पोहचून कामाला लागलो. अमोल सरांनी आज मी वेळेवर काम केलं म्हणून माझी तारीफ केली. संजीवनी पण सरांच्या केबिनच्या बाहेरुन माझी तारीफ ऐकत होती.

संजीवनी ही माझी खूप चांगली मैत्रीण. आम्ही हे ऑफिस एकाच दिवशी जॉईन केलं. आता आम्हा दोघांना ५ वर्ष झाली. माझं लग्न झालं मला मुलगी झाली पण संजीवनीने अजून लग्न केलं नाही. तिला अजून खूप श्रीमंत बनायचं होत.

मी परत माझ्या कामाला लागलो. अचानक मला परत चक्कर आल्यासारखं झालं आणि भास होऊ लागले. नशेची तलप सुरु झाली. माझ्या डॉक्टरच्या गोळ्या सुरु तर केल्या होत्या. पण मला त्याचा काही फरकच पडत नव्हता. आता माझा घसा कोरडा पडला होता. आणि नशा केला नाही तर मी मरुन जाईन. असं वाटलं.

एका क्षणात माझं भीतीने अंग भिजलं होत.

मी हळूच सरांची नजर चुकवून मोबाईल कानाला लावून बाहेर पडलो. आणि पळत पळत सोलो ला फोन लावला. सोलो हा दुसरा तिसरा कोणी नसून नशेचे पदार्थ विकणारा व्यापारी.

मी: सोलो

सोलो: कोण ?

मी: अरे सोलो मी अभय. मला आता लगेच माल पाहिजे.

सोलो: किती ?

मी: २-३ पुड्या दे.

सोलो: २ कि ३

मी: ३

सोलो: कुठाय तू ?

मी: मी रश्मी हॉटेल च्या बाजूला आहे.

सोलो: २ मिनटात आलो.

५ मिनिटानंतर सोलो आला.

सोलो: हे घे.

मी पुड्या घेऊन निघालो. पुड्या बघूनच नशा भरली.

सोलोनी माझी शर्टाची कॉलर पकडली.

सोलो: ये भाडखाऊ पैसे कोण तुझा बाप देणार ?

मी: उद्या देतो. आता पाकीट खाली आहे.

सोलो: ये तुझ्यासारखे दररोज बघतो. कुत्र्यागत मारेन. चल दे माल.

मी: अरे सोलो भाई आज दे. उद्या खरचं देतो.

सोलो: काय गॅरंटी.

मी: असं कर. हे माझ्या बायकोच मंगलसूत्र आहे. हे घे. मी उद्या पैसे देतो. पण हे कुणाला विकू नको.

सोलो: बरं उद्या नाही पैसे दिलेस तर हे विकलं समज.

सोलो नी एका कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकतो तशा पुड्या माझ्याकडे फेकल्या.

त्यातली एक पुडी गटारात पडली.

मीपण गटारात उतरुन ती बाहेर काढली. आणि एका कोपऱ्यात जाऊन पुडीचा आस्वाद घेतला.

तेव्हा मला बरं वाटायला लागलं. मी तसाच तिथे पडलो.

काही वेळाने फोन वाजला.

मी फोन कानाला लावला.

मी: हॅलो.

संजीवनी: अरे कुठे आहेस. जेवायची वेळ झालीय. लवकर ये.

मी तसाच ऑफिसकडे गेलो.

माझ्याकडे संजीवनीने बघून नाकाला हात लावला.

संजीवनी: शी कसला घाण वास मारतोस तू. कुठे पडलास. पॅन्ट बघ तुझी.

पॅन्टकडे पाहिलं तर ती गटारात पूर्ण गुढग्या पर्यंत खराब झाली होती.

मी ते बघून तसच बाहेर गेलो. समोरच्या हॉटेल मधल्या बाथरूम मध्ये घुसून पॅन्ट धुतली.

ती खराब कशी झाली हे मलाच कळलं नाही.

मी परत ऑफिस मध्ये गेलो.

संजीवनी: कुठे धडपडत असतोस रे.

मी: अग मलाच कळलं नाही.

संजीवनी: तुझी वाट बघून माझ्या पोटात दुखायला लागलं. जेव पटकन. आपली अमोल सरांसोबत मीटिंग आहे.

मी: कसली ग ?

संजीवनी: मला माहिती नाही. तू जेव पटापट. तुझा पगार कमी करुन माझा वाढवणार असतील.

मी: काय ?

संजीवनी: अरे गाढवा मस्करी करतेय.


आमचं जेवण उरकलं . मीपण पुडीतून थोडी पावडर काढून हळूच नाकातून ओढली.

ही पावडर म्हणजे स्वर्ग आहे.


संजीवनीने अमोर सरांना फोन लावला आणि त्यांनी आम्हा दोघांना आत बोलावलं.


अमोल सर: या दोघे आत या. बसा इथे.

आम्ही दोघे बसलो.

अमोल सर: तुमच्या दोघांकडे मला खूप मोठी जवाबदारी द्याची आहे. आपल्या कंपनीला एक मोठे क्लायंट भेटले आहेत. त्याच्या कामाचं ऑडिट करायला तुम्हा दोघांना उद्या नाशिकला जायचं आहे.

मी: उद्या लगेच.

अमोल: हो. संजीवनी तुला काही प्रॉब्लेम नाही ना ?

संजीवनी: काही नाही सर.

मी: माझं जरा काम होत सर.

अमोल: ही मुलगी असून तयार झाली तुला काय धाड भरलीय. संजीवनी ही खूप मोठी जवाबदारी आहे. आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. कि तू हे काम पार पडशील. तुम्हाला दोन दिवस लागतील काम पूर्ण करायला. हे काम झालं कि दोघांना दोन दिवस सुट्टी मिळेल. तुमचं दोघांचं नाशिक ला अंबड ला रिद्धिसिद्धि हॉटेल मध्ये दोन रुम बुक केल्या आहेत. जेवणाची तिथे उत्तम सोय आहे. हे १० हजार घ्या तुम्हाला प्रवास आणि खाण्यासाठी. संजीवनी हे काम चांगलं झालं पाहिजे.

संजीवनी: हो सर.

मी: हो सर.

माझी जायची इच्छा नव्हती. पण काम झालं कि दोन दिवस सुट्टी मिळेल आणि त्या सुट्ट्यानां लागूनच रविवार येतोय मग काय सोन्याहून पिवळं. ३ दिवस आराम.

मीटिंग संपवून आम्ही बाहेर पडलो.

संजीवनी: आता मज्जा झाली. आपण काम लवकर संपून नाशिक फिरायचं.

मी: तुला फिरायचं सुचतंय मला कामाचं टेन्शन आलय.

संजीवनी हसत हसत तिच्या डेस्क वर बसून काम करायला लागली.

मी पण कामाला लागलो. तेवढ्यात मला लक्षात आलं कि उद्या सोलोला पैसे दिले नाहीत तर तो मंगळसूत्र विकून टाकेल. मी दोन तीन मित्रांना फोन फिरवला पण कुणी पैसे दिले नाही.

तेव्हा मला आठवलं कि संजीवनीला अमोल सरांनी १०,००० दिले आहेत. मी संजीवनीकडे गेलो.

मी: संजीवनी

संजीवनी: बोल ना ?

मी: अग स्वीटूची तब्येत ठीक नाही. तिला दवाखान्यात घेऊन जायचं आहे.

संजीवनी: काय झालं स्वीटूला.

मी: अग तिला ताप आलाय. विशेष नाही काही.

संजीवनी: अरे मग अमोल सरांना सांगून निघ.

मी: अग माझ्या कडे पैसे नाहीत ग तिला दवाखान्यात घेऊन जायला.

संजीवनी: अरे मूर्ख मग हे कधी बोलणार. तिने लगेच तिच्या पर्स मध्ये हात घालून ५ हजार दिले.

मी: धन्यवाद.

संजीवनी: तुझं सरांना सांगून नाशिकची प्लॅन कॅन्सल करु का ?

मी: नको मी उद्या तुला ठाणे रेल्वे स्थानकावर भेटतो.

संजीवनीशी बोलून मी अमोल सरांना भेटलो त्यांनी मला जायला सांगितलं.

मी ऑफिस मधून सरळ सोलो कडे गेलो. आणि सगळे पैसे देऊन मंगल सूत्र आणि अजून काही पुड्या घेतल्या.

घरी गेलो जेवून झोपतोय तोच संजीवनीचा फोन आला.

मी: बोल संजीवनी

संजीवनी: अरे सॉरी तुला उशिरा कॉल करतेय. स्वीटू कशी आहे ?

मी: एकदम छान.

संजीवनी: आता बरी आहे का ?

मी: तिला काय धाड भरलीय.

संजीवनी: अरे तिला सकाळी ताप आला होता ना ?

मी: हो हो अग आता ती एकदम बरी आहे. तेच मी बोलतोय.

संजीवनी: बरं तू दोन दिवसासाठी नाशिकला येतोय ना ?

मी: हो.

संजीवनी: उद्या सकाळी ठाण्यावरुन पहिली कसारा लोकल पकडायची आहे. तर घरातून लवकर निघ.

ठाण्याला आल्यावर फोन कर.

मी: हो

संजीवनी: चल बाय. शुभ रात्री.

मी: बाय शुभ रात्री.

सकाळी ५ ला परत फोन वाजला.

मी: हॅलो

संजीवनी: उठ लवकर. नाहीतर उशीर होईल.

मी उठून आटोपलं. आणि ठाणा रेल्वे स्थानकावर पोहचलो. संजीवनीला फोन करणारच होतो तेवढ्यात ती मागून आली आणि मला पाठीवर मारलं.

मी: अग हळू मारत जा. तुझा हात कडक आहे. लागतो.

संजीवनी: अरे मर्द आहेस ना. मर्द को दर्द नाही होता.

मी: ही म्हण ज्यांनी लिहली ना त्याला दर्द कसा होतो माहित नसेल.

संजीवनी हसायला लागली. तेवढ्यात कसारा लोकल आली.

आम्ही एकाच डब्यात चढलो आणि आमचा प्रवास सुरु झाला.

मी: संजीवनी तुला एक विचारु ?

संजीवनी: अरे विचार ना ?

मी: पण वचन दे खरं उत्तर द्याच.

संजीवनी: मी माझ्या आईची शपथ घेते तू जे विचारशील त्याच खरचं उत्तर देणं.

मी: तू लग्न का नाही केलंस ?

संजीवनी: हे चुकीचं आहे. माझ्या आईच्या शपथेवर असे प्रश्न नाही विचारायचे,

मी: तू उत्तर द्याला घाबरत असशील तर राहूदे.

संजीवनी: मी माझ्या आईची शपथ घेतलीय मी खोटं बोलणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करते.

मी: काय ?

संजीवनी: जाऊदे. विषय बंद.

मी: पण तू मला एकदा पण बोलली नाहीस.

संजीवनी: काही गोष्टी न बोलताच कळल्या पाहिजेत. तुला कळल्या नाही म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नव्हतं. आणि मला जबरदस्ती प्रेम मिळवायचं नव्हतं. आणि मला आता लग्नात रस नाही. कदाचित परत नवीन सुरवात करायची नाही इच्छा नाही मला.

मी: संजीवनी असं नको आयुष्याची वाट लावूस.

संजीवनी: मग माझाशी लग्न कर.

मी: ते माझ्या हातात नाही आत्ता. माझं लग्न झालाय. माझी बायको चांगली आहे. मला मुलगी आहे. तीपण चांगली आहे.

संजीवनी: किती खोटं बोलतोस.

मी: मी काय खोटं बोललो.

संजीवनी: चल आता तू तुझ्या आईची खरी शपथ घेऊन मी जे विचारेन त्याच उत्तर दे.

मी: चालेल. मी माझ्या आईची शपथ घेऊन तू जो प्रश्न विचारशील त्याच खरचं उत्तर देणं.

संजीवनी: तू पण माझ्यावर प्रेम करत होतास कि नाही ?

मी: हो.

संजीवनी: मग का त्या मुलीशी लग्न केलंस.

मी: घरात आपलं लग्न जातीमुळे कोणी मान्य केलं नसत. मग उगाच खोटी स्वप्न कशाला बघायची.

संजीवनी: तू खुश आहेस लग्न करुन ?

मी: माहित नाही.

संजीवनी: मूर्खा तू खुश नाहीस हे पण तुला कळत नाही. तुझ्यासारखा बिनडोक माणूस मी या जगात पहिला नसेल.

मी: बर झालं तू बिनडोक नवरा मिळण्यापासून वाचलीस. आत्ता हा विषय बंद. आता खूप उशीर झालाय. आपण नको बोलायला.


नाशिकला पोहचेपर्यंत आम्ही दोघे शांत आणि उदास झालो.

हॉटेलला पोहचल्यावर आम्ही आपआपल्या रुम मध्ये जाऊन फ्रेश झालो. नंतर एकत्र नाश्ता करुन ऑफिसच्या कामासाठी निघालो.

मला अधून मधून नशेची तलप होत होती. तलप झाली कि मी बाथरूम ला जाऊन पुडी मधून पावडरचा आस्वाद घेत होतो.

संजीवनी आणि मी मिळून आजच काम थोडं पूर्ण केलं.

मी: अजून राग गेला नाही का ?

संजीवनी: मी कशाला तुझ्यावर रागवू ?

मी: तुझ्यासाठी एक छोट गिफ्ट.

संजीवनी आईसक्रीम बघून गोड हसली.

संजीवनी: तुला माझी कमजोरी माहिती आहे.

मी: हो मग.

आम्ही संध्याकाळी काम उरकुन हॉटेल वर गेलो. फ्रेश झालो. जेवलो. आणि आपआपल्या रुमवर झोपायला गेलो.

मी मस्त माझ्या रुमच्या टेबलवर पावडर मांडली आणि नाकातून सुर्की मारली.

आणि मी स्वर्गात गेलो.

ही नशा किती मस्त आहे. सगळं दुःख डोक्यातून निघून जात. मी बेडवर पडलो.


रात्री अचानक दोन वाजता माझा दरवाजा वाजला. मी नशेतून स्वतःला सावरत. दरवाजा उघडला.

समोर संजीवनी

मी: काय ग ?

संजीवनी: मला भीती वाटतेय मी इथे झोपते. तू बेड वर झोप मी खाली झोपते.

मला काय बोलावं ते सुधरत नव्हतं.

मी: तू बेडवर झोप मी पण बेडवर झोपतो.

संजीवनी झोपली.

आणि मीपण नशेत झोपलो.

सकाळी जाग आली. मी नशेतून बाहेर आलो. तर

माझ्या अंगावर कपडे नव्हती.

मला काहीच कळत नव्हतं. काय झालं काहीच कळलं नाही.

मी अंघोळ करुन माझं आटपलं

तोच माझा फोन वाजला. मी उचलला.

संजीवनी: उठा साहेब. ऑफिस ला जायचं आहे. काम संपवून परत निघायचं आहे.

तिच्या बोलण्यातून मला काही समजलं नाही. मी आटोपलं.

आम्ही नाश्त्याला खाली बसलो होतो.

संजीवनी माझ्याकडे बघून हसत होती. मी खाली बघून नाश्ता करतोय.

संजीवनी: किती लाजतोस रे ? काल जे काही आपल्यात शरीर संबंध झाले त्यात तुझी काही चूक नाही. माझी इच्छा पूर्ण होती. आणि काळजी करु नको ही गोष्ट मी कुणाला सांगणार नाही. जे झालं त्यात मला काही चूक वाटलं नाही. सो तू पण स्वतःला त्रास करुन घेऊ नकोस. तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता आणि असेल.

मी: तिचा स्पष्टपणा ऐकून मी नशेत माती खाल्ली हे मला कळलं. पण मला हे योग्य वाटलं नाही. आपल्या बायकोला फसवल्याची भावना कुठे तरी मनात घर करुन गेली. पण मी नशेत होतो. मला काय झालं काही आठवत पण नाही. मी संजीवनीला काय बोलू तेच मला कळत नव्हतं.

आम्ही ऑफिसला गेलो. काम पूर्ण केलं.

संजीवनी: तुला एक बोलू.

मी: बोल

संजीवनी: आपलं काम पूर्ण झालाय. दोन दिवस सुट्टी आहे आता. आपण इथेच थांबू. दोन दिवस तुझे मला देशील. मला हे क्षण परत भेटणार नाही.

मी: नको. आपण या नात्यात गुंतलो तर बाहेर पडणार नाही. आपण आजच जाऊ.

संजीवनी: तू काल रात्री जे घडलं त्याच अजून मनाला लावून घेतलंस. माझा तुझ्यावर काहीच हक्क नाही.

मी: आता नाही.

संजीवनी काहीच न बोलता रागावून रुम वर गेली.

मी माझं आटोपलं आणि संजीवनीची वाट पाहत राहिलो.

तिला फोन केला.

संजीवनी: तू जा मी दोन दिवस इथेच थांबणार आहे.

मी: तू वेडी आहेस का ? अनोळख्या ठिकाणी मी तुला सोडू शकत नाही. बरं. आपण उद्या सकाळी जाऊ.

संजीवनी: तू माझ्या रुम मध्ये ये मला तुझ्याशी बोलायचं आहे.

मी फोन कट केला. मला आता भूतकाळात नाही जायचं. बायकोला आणि संजीवनी दोघांना फसवायचं नाही.

संजीवनी आणि बायकोचा विचार करुन परत मला स्ट्रोक आला. आणि मी माझ्या रुम वर पुडी शोधायला लागलो. पण सगळ्या पुड्या गायब.

तेवढ्यात दरवाजात संजीवनी आली.

संजीवनी: काय शोधतोयस.

मी: काय नाही. आपण उद्या सकाळी निघू. तू झोप.

मला काही सुधरत नव्हतं. माझे हातपाय कापायला लागले होते, घसा कोरडा पडला होता, डोकं सुन्न झालं होत. आणि मला काय सुचत नव्हतं.

संजीवनी: मी तुझ्यासोबत झोपणार आहे.

मी: आपण जे करतोय ते चुकीचं आहे.

संजीवनी: मी काय तुला तशी मुलगी वाटली का ?


संजीवनीला तिथेच सोडून मी रुम बाहेर पडलो.

सोलोला फोन केला.

सोलो: काय रे.

मी: भाई पुडी पाहिजे.

सोलो: पैसे आहेत का ?

मी: भाई आहेत.

सोलो: कुठे भेटशील ?

मी: भाई मी नाशिक मध्ये आहे आंबड ला

सोलो: तू कुठली नशा केलीस का रे भडव्या. आता मी काय तुझ्यासाठी नाशिकला येऊ.

मी: भाई काय तरी जुगाड करा ना इथे

सोलो: थांब माझे नाशिकला पण सप्लायर आहेत. थोडा वेळाने फोन करतो.

मी: भाई लवकर करा. नशा नाही केली तर मी मरुन जाईन.

सोलो ने फोन ठेवला. आणि थोड्यावेळाने सोलोच फोन आला.

सोलो: तुझं नशीब चांगलं आहे. सलमान हॉटेलवर जा तुझ्या जागेवरुन. तिथे जितूला भेट. तो तुला देल.

मी फोन ठेवून सलमान हॉटेल शोधलं. माझ्या जागेवरुन १० किलो मीटर वर होत.

मी ऑटो करुन हॉटेल वर पोहचलो.

मी जितूला भेटलो.

मी: जितू ?

जितू: सोलो ने फोन किया था. तुझे माल चाहिये ?

मी: हा मुझे चाहिए.

जितू: रोकडा हे ना ?

मी: हा. कितना दु ?

जितू: दो हजार.

मी जितूला पैसे दिले पण त्याने मला कसले तरी इंजेक्शन दिले.

मी: हे काय. मला पुडी दे.

जितू: अरे पुडीका जमाना गया. ये ले पुडीसे ज्यादा स्ट्रॉंग हे.

मला तो काय बोलला कळलं नाही.

मी: तू दे भाई.

मला सुधरत नव्हतं. आणि त्याने माझ्या हाताच्या नसेमध्ये ते इंजेक्शन सोडलं.

मी चमकलो. अंगात थंडावा जाणवू लागला. मला सगळीकडे प्रकाश दिसू लागला.

पाऊस सुरु झाला. मी पूर्ण भिजलो. आणि तिथेच झोपलो.


मी स्वर्गात होतो. किती शांत आणि सुंदर जागा.

तेवढ्यात मला जोरात लाथ बसली

ये उठ

स्वर्गात कोण मला ओरडतय. मी डोळे चोळत उठलो. समोर खाकी घालून पोलीस.

मला काहीच कळत नव्हतं.

मी उभा राहिलो तेव्हा मला कळलं कि मला १ आणि २ नंबर पॅण्टमध्येच झालं.

पोलीस: ही जात कधी सुधारणार नाही. सगळं स्टेशन घाण करणार.

परत मला मागून लाथ बसली आणि मी पुढे पडलो.

आता मी पूर्ण भानावर आलो.

माझं डोकं जड झालं होत. मी पोलीस स्टेशनला कसा आलो तेच कळत नाही.

पोलीस: ये जा तिकडे तुझी घाण साफ कर. वास मारतोय भाड्या.

मी बाथरूम मध्ये जाऊन आंघोळ केली. कपडे धुतले आणि तेच परत अंगावर घातले.

मी परत साहेबांसमोर आल्यावर त्यांनी माझे केस पकडले

पोलीस: अरे जागेवर आलास का ?

मी ओरडत

मी: हो साहेब.

पोलीस: तुला माहिती आहे का तू कुठे आहेस ?

मी: हो मी नाशिकला आहे ?

पोलीस: तुला माहिती आहे का काय झालाय ते ?

मी: काय झालाय साहेब ?

पोलीस: तू कधी आला आहेस नाशिकला ?

मी: काल आलोय.

पोलीस: पण तुझं हॉटेलच बुकिंग कालपरवाच आहे.

मी: अहो साहेब मी बुधवारी सकाळी नाशिक मध्ये आलोय. आमचं काल गुरुवारी काम संपलं. आम्ही आज सकाळी घरी जाणार होतो.

पोलीस: एक मुस्काड फोडू का ? मादर** काल गुरवार होता ? मग आज कोणता वर आहे.

मी: आज शुक्रवार आहे.

पोलीस: अरे कोणत्या धुंदीत असता रे गर्दुल्ल्यानौ. आज शनिवार आहे. हा बघ माझा मोबाईल टाईम.

मी मोबाईल बघून आश्चर्यचकित झालो. असं कस झालं.

पोलीस: तुझ्याबरोबरची मुलगी कुठाय ?

मी: ती हॉटेलवर असेल.

पोलिसानी मला जोरदार लाथ मारली.

मी: काय झालं साहेब मला मारु नका. मी काही केलं नाही.

पोलीस: तुझ्या मूर्ख पणामुळे ती पोरगी मेली.

माझ्या तळपायाची आग मस्तकाला लागली.

पोलीस: ये माझ्यासोबत तुझी नशा उतरवतो.

मला ते साहेब हाताला ओढत दवाखान्यात घेऊन गेले. आणि शवघरात नेल्यानंतर मला एक प्रेत दाखवलं.

ते बघून मला उलटी आल्यासारखं झालं. मी पळत बाहेर येऊन उलटी केली.

ते प्रेत मी कधीच विसरु शकत नाही.

सगळं शरीर काल पडलं होत.

चेहऱ्यावरची कातडी जळून डोळे बाहेर पडले होते. अंगावरचे सगळे कपडे जळून शरीरावरची कातडी करपली होती. फक्त तो हात जळला नव्हता

आणि त्या हातात कोरलेलं नाव होत "संजीवनी".

माझ्या डोळ्यासमोरुन तो चेहरा आणि नाकातून ती दुर्गंधी जात नव्हती.

हे काय झालं. मला काहीच कळत नव्हतं.

मी मोठ्याने रडू लागलो. तेवढ्यात साहेब आले.


मी: साहेब हे काय झालं ? मला तर काही कळत नाही मी कुठे होतो.

पोलीस: तू एका माणसाला शुक्रवारी सकाळी गटारात पडलेला दिसलास त्याने आम्हाला कळवलं. आम्ही तुला पोलीस स्टेशन मध्ये ठेवलं.

बघ तुझ्या व्यसनामुळे काय झालं.

मी: पण साहेब हे झालं कस ? हॉटेल ला आग लागली काय ?

पोलीस: नाही. आम्हाला हे प्रेत काल रात्री दिसलं. रस्त्याला जाणाऱ्यांना घाण वास येत होता. म्हणून त्यांनी पाहिलं तर तिथे प्रेत होत.

आम्ही सरळ ते प्रेत दवाखान्यात पाठवून त्याची पोस्ट मार्टम रिपोर्ट काढली.

त्या तरुणीवर काही अज्ञात गर्दुल्ल्यानी सामूहिक बलात्कार केला. नंतर ते घाबरले. म्हणून त्यांनी त्या मुलीचं डोकं ठेचलं. नंतर जवळच्या दुचाकी वाहनातून पेट्रोल काढून तिला जिवंत जाळलं.

ते चौघे आरोपी आम्ही तपासातून पकडले.

हे ऐकून मला तो प्रसंग, तिचा चेहरा, तीच किंचाळणे समोर जाणवलं. आणि मी परत मोठ्याने रडायला लागलो.

हे काय झालं. मी काय केलं.

ती रात्र मला आठवायला लागली कि तिला माझा सहवास माझा वेळ हवा होता. मी नशेसाठी निघून गेलो. आणि हे झालं.

तेवढ्यात संजीवनीची आई आली.

तिने ते सर्व बघितल्यावर तिला झटका बसला. तिला दवाखान्यात ऍडमिट केलं. तिची आई कोमात गेली.

नंतर मी माझा फोन शोधला तर सापडला नाही. कोणी तरी चोरला असणार. माझा आठवा फोन गेला.

या नशेपायी माझं काय करुन घेतलय ते आज मला जाणवलं.


मी कुठेपण गटारात पडतो.

मी कपड्यात १ आणि २ नंबर करतो.

मला काहीच भान राहत नाही. आजूबाजूला काय चालू आहे.

संजीवनीच्या मरणाला जसे ते चौघे जवाबदार आहेत. तसा मी पण आहे.

मी हॉटेल वर असतो तर हे काही झालंच नसत.

मी संजीवनीच प्रेत घेऊन त्यावर विधिवत संस्कार केले.

मी काय गमावलाय ते आज मला कळत होत.

एक चांगली मैत्रीण, एक चांगली साथ.

माझ्यावर जीवापाड प्रेम केलं तिने.

वेळ हळू हळू निघून गेली पण मी त्या विचारातून बाहेर येत नव्हतो.

नशेची परत इच्छा होत होती.

पण मनाशी ठरवलं होत नाही करायचं.

माझ्या बायकोला मी सगळं प्रामाणिक प्रमाणे सांगितलं. ती मला कायमची सोडून गेली. सोबत मुलीला पण घेऊन गेली.

माझ्या सुंदर आयुष्यात दुःखाचा पाऊस पडला.

मी काय करु तेच कळत नव्हतं.


मला नशेने खूप तडपवलं. पण मला फक्त संजीवनीचा चेहरा दिसत होता. तिच्या किंकाळ्या ऐकायला येत होत्या.

मी नशेसाठी खूप तडफडलो पण मी घर सोडलं नाही. मला खूप भास झाले. आणि मी बेशुद्ध पडलो.

मी उठलो तेव्हा मी दवाखान्यात होतो.

माझे हात बांधले होते.

मला बोलता येत नव्हतं.

हातावर पायावर कापल्याचे निशाण होते.

समोरचे काका माझ्याजवळ आहे.

काका: अरे शांत हो बाळा. तू बरा होशील.

मला काय बोलताच येत नव्हतं.

दिवस उलटू लागले. मी बरा होऊ लागलो. मला आता नशेची आठवण पण येत नव्हती.

हे सहा महिने कुठे कसे गेले कळलंच नाही.

मला डॉक्टरांनी सोडायचं ठरवलं.

मी बरा झालो होतो पण मी इथे कशा स्थितीत आलो ते मला नंतर कळलं.

पूर्ण रात्र मी माझ्या घराच्या भिंती जिभेने चाटल्या होत्या. नशा इतकी जबदस्त झाली होती कि मी माझ्या हातापायावर चाकूने वर केले होते.


त्या व्यसन मुक्ती केंद्रातून बाहेर आल्यावर मी बायको आणि मुलीला भेटलो.

बायकोने माझ्यासोबत याला नकार दिला.

तिचा राग आणि नकार योग्यच होता. मी संजीवनी सोबत संबंध ठेवून तिला दुखावलं होत. मी तिला वेळ द्याचा ठरवला आणि घरी निघून आलो.

माझ्या एका चुकीमुळे

एका मुलगी बापापासून विभक्त झाली.

एका बायकोच आयुष्य उध्वस्त झालं.

आणि एका सुंदर आणि चांगल्या मुलीचा बलात्कार होऊन खून झाला.

मला रात्र रात्र झोप लागत नव्हती. कुठे डोळा लागला तर

संजीवनी त्याच जळलेल्या अवस्थेत माझा गळा दाबतेय असा भास होयचा.

आता जगायची इच्छा संपली होती म्हणून मी जीव द्याच ठरवलं.

रेल्वेच्या रुळावर मी रडत रडत झोपलो.

तोच बाजूला मला ओरडण्याचा आवाज आला.

मी बाजूला बघतोय तर एक रक्ताने भरलेला माणूस धावत येत होता. आणि त्याच्या मागे माणसं दगड घेऊन मागे धावत होती.

मी त्याला पकडला. आणि बाजूला झाडीत लपवला.

माणसं माझ्याजवळ आली. त्यातल्या एकाने विचारलं.

: ये दादा इथे एक गर्दुला आलाय तू पाहिलास का ?

मी: नाही रे. काय केलं त्याने.

: अरे दादा त्याने माझ्या मोती कुत्र्याला फाडले. त्याला आज मी मारुन टाकणार.

सगळे दुसऱ्या दिशेने धावत गेले.

मी त्याच्या हाताला पकडलं. आणि घरी घेऊन आलो.

मी: तू खरच त्या कुत्र्याला मारलंस.

माणूस: हो तो मला चावला जोरात.

मी: तू गप्प बस. तुझं नाव काय ?

माणूस: माझं नाव जयेश. मला मारु नको. पैसे दे. भूक लागलीय.

वाढलेले केस, वाढलेली दाढी, अंगावरचे वास मारणारे फाटलेले आणि रक्ताने माखलेले कपडे.

ते पाहून मला माझे दिवस आठवले. हा माझ्यापैकीच एक होता.

मी: तुला जेवण आणतो.

जयेश: मी जेवतो. तू पैसे दे.

त्याच्या बोलण्यावरुन कळलं त्याला नशेची तलप झालीय.

मी काय बोलणार. तोच तो किचन कडे धावला आणि माझ्या अंगावर सामान फेकू लागला.

त्याला सूरी भेटली.

जयेश: मी मारेन तुला. पैसे दे.

मी: शांत हो.

मी त्याच्याजवळ जाताच त्याने माझ्या अंगावर सूरी ओढली.

मला हाताला लागलं. तो बाहेर पळाला.

मी पण त्याच्या मागून पळालो. त्याचा त्याच्या न कळत पाठलाग केला.

समोरुन एक बाई आली. त्याने तिला सूरी दाखवून पैसे मागितले. मी हळूच मागून जाऊन त्याला पकडला.

माझी पकड घट्ट होती तरी त्याची ताकद जास्त वाटली. ती बाई पळून गेली.

मी माझ्या पायाचा वापर करुन त्याला पूर्ण घट्ट पकडला. माझ्या हाताला लागलं होत. त्याच मला भान नाही.

मी त्याचे हात त्याच्या पाठीवर दुमडले. आणि सूरी लांब फेकली. त्याला परत घरी घेऊन गेलो.

घरातल्या रशीने त्याला खुर्चीला बांधला. तो ओरडत होता म्हणून त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावली.

माझ्या डॉक्टरांना फोन लावला.

ते माझ्या घरी आले.

त्याला तपासलं. आणि त्याच्यासाठी २ महिन्याचा गोळ्यांचा डोस लिहून दिला.

खरतर मी त्याला व्यसन मुक्ती केंद्रात घेऊन जाणार होतो. पण आत्ता ते व्यसन मुक्ती केंद्र पैसे नसल्यामुळे बंद होत होत.

मग मी जयेशवर उपचार मी स्वतः करायचं ठरवलं.

माझ्या बाजूच्या चाळीत. जोशी काका राहत होते. त्यांची बायको नर्स होती.

मी त्यांची मदत घेऊन नर्सच काम शिकलो.

इंजेक्शन कस द्याच. गोळ्या, खानपान कस द्याच ते शिकलो.

मी माझा स्वतःचा अभ्यास सुरु केला. व्यसन, त्याचे प्रकार, ते कस नियंत्रणात आणायचं.

खूप अभ्यास केल्यावर मी जयेशच्या काळजी घेत एका व्यसन मुक्ती केंद्रात नोकरी करायची ठरवली.

नोकरी बघत बघत मी जयेशची दिवस रात्र काळजी घेत होतो.

जयेश हळू हळू बरा होऊ लागला.

तो बरा झाल्यावर गेला.


मला पण समाधान वाटू लागलं. मी खूप काम केल्यावर मला नवीन कल्पना सुचली.

कदाचित हे केल्यावर मी केलेल्या चुका माफ होणार नाहीत. पण केलेल्या चुकांची मिळणारी शिक्षा सहन करता येत एवढी शक्ती नक्की मिळेल.


मी एक संस्था सुरु केली.


" संजीवनी मोफत व्यसन मुक्ती केंद्र "


मी स्वतःला त्यात झोकून द्याच ठेवलं. माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मी आमच्या साहेबांकडून माझ्या नोकरी सोडल्यानंतरचे ग्रॅजुटीचे, पीफचे पैसे घेतले.

माझी कल्पना ऐकल्यानंतर साहेबांनी पण त्यांचा सहभाग दिला.

मी त्यासाठी माझं राहत घर विकलं.


आणि सगळ्या मिळालेल्या पैश्यातून एक ४ गुंठे स्वतःच्या मालकीची गावाबाहेर जागा घेतली.

त्यावर एक साधं काट्यानी शेड बनवलं. आणि संजीवनीच्या वाढ दिवसादिवशी मोफत व्यसन मुक्ती केंद्र सुरु केलं. संजीवनीच्या अस्ती न कळत माझ्याकडे राहिल्या होत्या. त्या मी सर्व जमिनीवर पसरल्या. कदाचित

तिचीपण हीच इच्छा असावी.

औषध आणली आणि लोक याला सुरवात झाली.

सुरवातीला लोक कमी होती पण सर्वांच्या औषधाची राहण्याची मला सोय करायची होती.

पैसे नव्हते. कुणाला मागायचे नव्हते.

मग मी किडनी विकायचं ठरवलं. कारण मी हट्टाला पेटलो होतो. आता हे केंद्र बंद होता कामा नये. जमेल ते सगळं मी करेन.

दुसऱ्या दिवशी मी एका किडनी ट्रान्सप्लांटच्या दवाखान्याची भेट घेतली.

तिथे मला जयेश दिसला.

तो मला बघून माझ्याकडे हसत धावत आला. आणि माझ्या पायाला हाताने स्पर्श केला.

मी: कसा आहेस जयेश.

जयेश: मी छान आहे सर. तुमच्या कृपेमुळे मी परत नीट मार्गाला लागलोय. तुमचा उपक्रम मला खूप आवडला साहेब.

मी: धन्यवाद.

जयेश: मला नोकरी द्याल का ?

मी: जयेश मी तुला खोट बोलणार नाही. हे मोफत केंद्र असल्यामुळे इथे पैसे येणार नाहीत. तुला मी काय देणार. आणि मला आता तहान भूक राहिलीच नाही. हे समाज सेवेचं काम करत करत मरायचं.

जयेश: तुमचं लय मोठं मन आहे सर. हे घ्या पैसे.

मी: माफ कर मला उधारी नको. परत मी हे परत नाही करु शकणार.

जयेश: सर हे माझ्यावर केलेल्या उपचाराचे पैसे समजून घ्या.

मी: इथे मोफत इलाज होतो. पैसे घेतले जाणार नाही.

जयेश: तुमच्या हातात फॉर्म कसला ?

मी फॉर्म लपवत

मी: काय नाही असच आलोय.

जयेशने फॉर्म पहिला

जयेश: सर माझा जीव घ्या पण किडनी विकू नका. मला तुम्हाला मनापासून मदत करायची आहे.

मी: असं कर तू पैसे सोडून माझ्यासाठी काय करु नको पण संस्थेसाठी कर.

जयेश: बघा सर परत नाही बोलायचं नाही.

मी: नाही बोलणार.

जयेश: जयेश ने संस्थेच्या जागेत इमारतीचं बांधकाम सुरु केलं. तेव्हा मला कळलं कि जयेश हा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याने स्वतःच्या पैशाने हे काम केलं. शिवाय औषध स्वस्तात विकत मिळवून दिली.

काही महिन्यातच तीन माळ्याची इमारत तयार झाली.

मी जयेशच खूप आभार मानलं.

त्या इमारतीवर मी संस्थेच्या नावाचा बॅनर लावला.

इमारत बघून लोक याला लागली.

पण सगळे गोळ्या मागायला लागली.

मी सरळ बोललो गोळ्या मिळणार नाही. ज्याला व्यसन सोडवायचं आहे त्याने ३ ते ४ महिने माझ्याकडे राहायचं.

माझी कल्पना व्यसनी लोकांना कमी आणि त्यांच्या नातेवाईकांना आवडायची.

मी माझं काम सुरु केलं.

हळू हळू व्यसनी लोक येऊ लागले त्यांचे चाळे मी सहन केले.

त्याच वेडेपण मी सहन केलं. मी त्यांच्या आईसारखी त्यांची प्रामाणिक सेवा केली.

माणसं हसत हसत बरी होऊन घरी जाऊ लागली.

जेवणाची सोय व्यसनी व्यक्तीचे नातेवाईक करायचे,

जेव्हा ते त्यांच्या व्यक्तीच वेडेपण बघायचे तेव्हा माझ्या पाय पडून यांना लवकर बरे करा याची विनंती करायचे.

मी जादूगार म्हणून प्रसिद्ध झालो. माझ्याकडे जो येल त्याला खात्री असायची कि मी त्यांना बरं करेनच.

कुणाकडून पण मी एकही रुपया घेतला नाही.

पण सर्व नातेवाईकांनी संस्थेला मदत म्हणून भरपूर निधी दिला.

एकाने तर चक्क एक दानपेटी देऊ केली पण मी घेतली नाही.

दानपेटीने फक्त व्यवसाय होतो. मला सेवा करायची आहे व्यवसाय नाही.

ज्याला मदत करायची आहे तो स्वखुशीने करेल आणि जो जे पैसे देल त्याची त्याला संस्थेच्या नावाची देणगी पावती मिळेल.

खऱ्या मेहनतीत ईश्वर असतो.

खूप गरीब लोक दिल खुलास देणगी देत होते.

त्या पैशाने मी औषध, गरजेच्या वस्तू आणायला लागलो.


संजीवनी मोफत व्यसन मुक्ती केंद्र फक्त माझं नसून

या संस्थेला दान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच आहे.

माझ्या कामाने मी हजारो व्यक्तींना बरं केलं.

पण ही जादू नव्हती

ही एक अंधश्रद्धा होती. त्यांना वाटायचं माझा हात लागला कि ते व्यसन मुक्त होतील. आणि मी ही अंधश्रद्धा दूर केली नाही.

मी त्यांची काळजी घायचो त्यांच्यावर उपचार करायचो.


एक सत्य सांगतो


मी कुणाला बरं केलं नाही.

त्या व्यसनी व्यक्तीने स्वतःला बरं केलं. स्वतःवर नियंत्रण आणलं.

बाकीचं काम औषधाने केलं. मी काही केलं नाही.


आता मला संजीवनीच जळालेले प्रेत दिसत नाही.

माझ्या बायकोने मला माफ केलं नाही कदाचित मी तिचा गुन्हेगार कायम राहीन. पण माझी मुलगी माझ्यासोबत संस्थेला मदत करते.

मी माझ्या मुलीला जे काही झाल ते सर्व सांगितलं तेव्हा ती एकच गोष्ट म्हणाली


तुम्हाला तुमची चूक पटली आणि ती तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न केला.

तुमच्या एका प्रयत्नामुळे

आज अनेक संजीवनी जिवंत आहेत.

अनेक अभय नीट मार्गाला लागले.

अनेक कुटुंब त्रासातून मुक्त झाली.


तीच ते बोलणं आठवलं कि आजही माझ्या डोळ्यात पाणी येत.

मी जे कार्य केलं ती फक्त एका सेवा होती आहे आणि असेल.


मला मिळालेल्या या

समाजसेवा पुरस्कारासाठी मी सर्वांचा आभारी आहे.

एवढं बोलून मी आपली रजा घेतो.

धन्यवाद.


टाळ्यांचा कडकडाट सुरु झाला.

लाखोच्या संख्येने डोळ्याने पूर्णपणे न दिसणारा समुदाय माझं कौतुक करत होता.

खरच मी तो पिसाळलेला व्यसनी माणूस होतो का ?


नक्कीच या टाळ्यांच्या आवाज संजीवनी पर्यंत पोहचला असेल. आणि ती नक्की मला माफ करेल.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy