AKSHAY KUMBHAR

Drama Romance Others

3  

AKSHAY KUMBHAR

Drama Romance Others

नात्यांची दुरुस्ती - भाग २

नात्यांची दुरुस्ती - भाग २

8 mins
229


ऑफिसवरुन घरी पोहचलो.

मीः जया..........जया......... कुठे गायब झाली ही?


मनस्वीः बाबा आई बाहेर गेलीय. तुला काय हवय का ?


मीः बेटा तुला मी कितीदा सांगितलय मोठ्या

माणसांना आहो जाओ करायच.


मनस्वीः पण बाबा तु पण आज्जीला अरे तुरेच करतोस ना ? आज्जी पण तुझ्यापेक्षा मोठी आहे ना ?


मीः माझ पिल्लू इकडे ये. लक्षात ठेव. जगात आई ही प्रत्येक पाल्यांच्या खूप जवळची असते. तिला अग तुगच केल पाहिजे.


मनस्वीः बर. म्हणजे बाबा तु माझ्या जवळचा नाहीस का ? आईपेक्षा तुच मला जास्त आवडतोस.


मीः बर बाबा तु जिंकलीस मी हरलो. पण बाळा हे संस्कार आहेत. आपल्यापेक्षा मोठ्यांना आदर दिला तर ते नात अजून घट्ट होत.


मनस्वीः ठीक आहे रे बाबा. सॉरी ठीक आहे बाबा.


मीः तुच माझी परी ग ती. बर आज शाळेत काय झाल.


मनस्वीः शाळेच राहू द्या.


मीः का ?


मनस्वीः आई रागारागात रडत बॅग भरुन गेलीय. मी विचारल तर बाबांची काळजी घे. मी परत येणार नाही.


मीः काय ?


थांब मी फोन लावतो.


रिंग वाजतेय


ट्रिंग ट्रिंग ......ट्रिंग ट्रिंग


जयाने फोन उचलला


मीः हँलो जया. आहेस कुठे ?


जयाः मला घटस्फोट हवाय.


मीः अग काय बोलतेस तु. तुला कळतय का ?


जयाः हो चांगलच. मला काही तुमच्याशी बोलण्यात रस नाही. मला तुमच्याशी कोणतही नात ठेवायच नाही.


आणि फोन कट केला तिने. तिला नक्की झाल काय ? काहीच समजत नव्हत.


आज जेवायला मिळणार नाही हे कळाल्यानंतर मी सरळ हॉटेल मध्ये जाऊन मनस्वी साठी जेवण घेऊन आलो. आमच्या भांडणात पोरीची ओढाताण नको.

मनस्वीला भरवून मी झोपवल.

आणि जयाला १०-१२ मोबाईल संदेश पाठवले पण एकाच पण तिने प्रतिउत्तर दिल नाही.


रात्र पूर्ण विचारात गेली. सकाळी लवकर उठून मनस्वीची शाळेची तयारी केली तिला शाळेत सोडून आलो आणि घरी येऊन माझ आटपून मी पण अॉफिसला गेलो. माझ कशात लक्षच लागत नव्हत.

संध्याकाळी मनस्वीला शाळेत आणायला गेलो तर कळल जया तिला हाफ डे मध्येच घरी घेऊन गेलीय.


मी लगेच जयाला फोन केला.


जयाः काय आहे.


मीः तुझ डोक ठिकाणावर नाही. आपल्या भांडणात मनस्वीला आणू नकोस.


जयाः मनस्वी माझ्याकडे राहील.


हे बोलून तिने फोन कट केला.


मी ठरवल. जया आत्ता काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आपण तिला थोडा वेळ देऊ.


खरच बायको आणि पोरीशिवाय घर ओसाड वाडाच वाटत होत. जयाला अचानक काय झाल तेच कळत नाही.


माझा फोन वाजला

फोन जयाचा होता.

झाला बाई हिचा राग शांत


मीः बोल जया.


समोरुन रडत


मनस्वीः बाबा मन्या बोलतेय.


मीः बोल मन्या. का रडतय माझ पिल्लू.


मनस्वीः बाबा आई तुला सोडणार आहे का ? मला आईसोबत नाही राहायच. मी तुझ्यासोबत राहणार आहे.


मीः अग बाळ अस काही नाही. आई थोडी रागवलीय. तु आईची काळजी घे. गडबड करु नको. आई मला सोडणार नाही.


मनस्वीः बर. तु लवकर ये.


मीः मी उद्या येतो तुला भेटायला.


मनस्वीः भेटायला नको. मला घ्यायला ये.


मीः बर. आईला त्रास देऊ नको.


मनस्वीः आईला तुझी चिठ्ठी सापडलीय. ती वाचून ती रडत होती. तुझ्यावर खूप रागवलीय. कुणाशी बोलत नाही.


मीः बर मी बघतो. बाय


मनस्वीचा फोन ठेवल्यावर मी विचार करत होतो कि जयाला नक्की सापडल काय. कसली चिठ्ठी. काहीच समजत नव्हत.


दुसऱ्या दिवशी मी आॉफिसवरुन थेट जयाच्या घरी गेलो. मनस्वी पळत पळत माझ्याकडे आली.


जयाः मनस्वी इकडे ये. नाहीतर फटके खाशील.


मीः जया काय झालय तुला.


जयाः माझ्या मुलीवर तुमची वाईट सावली नको. तिला तुमचे संस्कार नको. तुम्ही इथून निघा. नाहीतर मी पोलीसांना फोन लावून तुम्ही त्रास देताय सांगेन.


मीः लाव फोन. मी आईंना भेटायला आलोय.


जयाः इथ तुमच कोण नाही. तुम्ही निघा.


मनस्वीः मी बाबाबरोबर जाणार. बाबा बाबा बाबा.


मनस्वी जोर जोरात रडत होती. आणि जयाने माझ्या तोंडावर दरवाजा आपटला. जया माझ काही ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. तिला झालय काय हे समजत नव्हत. चारचौघात तमाशा नको म्हणून मी निघालो.


चार दिवासातच मला घरी घटस्फोटाची नोटीस आली.


मी जयाला फोन लावला

दहा फोन कट केल्यावर अकराव्वा फोन उचलला.


मीः तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय काय. ही कसली नोटीस पाठवलीय. तु काय करतेस तुला कळतय का ?


जयाः मला घटस्फोट हवाय. तुमच काही ऐकायच नाही. 


मीः बर. तु घे घटस्फोट. पण मनस्वी माझ्याकडे राहील.


जयाः तिला मी जन्म दिलाय. आणि तुमच्या सारख्या माणसासोबत ती कधीच राहणार नाही.


अस बोलून तिने फोन ठेवला.


परत भरपूर फोन केले पण तिने उचलला नाही. वाटल नव्हत की माझ्या बाबतीत अस कधी होईल.


संध्याकाळी बाबांचा (सासरे) फोन आला.


बाबाः जावाईबापू मनस्वी ला एम जी एम हॉस्पिटलमध्ये नेलय. अचानक बेशुद्ध पडलीय.


मी काही न विचारता अर्ध्या तासात एम जी एम ला पोहचलो.


मीः बाबा काय झाल.


बाबाः डॉक्टरांनी सांगितल नीट जेवत नाही त्यामुळे अशक्तपणा येऊन बेशुध्द पडलीय. बेशुध्द अवस्थेत तुमचच नाव घेतेय.


मीः बर मी तीला भेटतो.


जयाः तुम्ही तिला भेटायच नाही.


माझा रागाचा पारा चढला होता. मी सन् सनीत जयाच्या कानाखाली मारली.


सगळा हॉस्पिटलचा आवाज क्षणात शांत झाला.


मीः आत्ता मेंदू सरळ होईल तुझा. पोरीच्या जीवावर उठलीस. जन्म दिलास ना तु. आत्ता गप्प बसायच. काय बोललीस ना तर बघच. तुला घटस्फोट पाहिजे ना. देतो. पण पोरगी माझ्याजवळच राहील. मग कुठेही जा.


जयाला मारुन मला काय आनंद होत नव्हता. मी आपातकालीन विभागात गेलो.

माझ पिल्लू गादीवर झोपल होत. तिच्या नाजूक हाताला सलाईनची सुई टोचली होती.

ह्रदयाला केबल लावून स्पदंन मोजायची मशीन लावली होती.

पोरीचे डोळे रडून लाल झाले होते.

मी तिच्याजवळ जाऊन बसलो.

काही वेळाने ती शुध्दीत आली.

मी जवळच होतो.


मनस्वीः बाबा


मी लगेच तिला जवळ घेतल. ती एवढी अशक्त झाली होती कि तिला मिठी पण मारता येत नव्हती.


मनस्वीः तु तुझ्या सोबत राहणार. आईने मारल मला.


मीः मी पण आईला मारल तुला मारल म्हणून. तु आराम कर. मी तुझासाठी तुझा आवडत नारळच पाणी, क्रिम बिस्कीट, केक, कँटबरी आणि नवीन डॉल आणलीय.


ती हसत


मनस्वीः थँक्यू बाबा. आपण घरी कधी जायाच.


मीः तु आधी हे खा. लवकर बरी हो मग आपण जायाच.


मनस्वीः मला इथ नाही राहायच.


मीः बर तु आधी खा. मी डॉक्टरांशी बोलून येतो.


डॉक्टरांना विनंती करुन मी मनस्वीला घरी घेऊन जायच ठरवल.

बाहेर आई बाबा होते पण जया कुठेच दिसत नव्हती.


मीः आई बाबा काळजी करायच काही कारण नाहीय. तुम्ही निघा. मी मनस्वीला घरी घेऊन जातो.


बाबांनी मला बाजूला घेऊन विचारपूस केली.


बाबाः जयाला काय झालाय ?


मीः बाबा मला पण काय कळत नाही. काय बोलली तर कळेल ना ?


आईबाबांकडे बघून मला पण वाईट वाटल. एक माणूस गप्प बसल्याने किती जणांना त्रास होत होता.

हे मला जाणवल होत.


मनस्वीला घेऊन मी घरी आलो. मन्या दोन दिवसात बरी झाली.

या दोन दिवसात ना मी जयाला फोन केला ना जयाने मला फोन केला.


आयुष्यात वादळ अस अचानक येत आणि भरपूर घाव करुन जात.


रात्री मन्याला झोपवल.

मी खूर्चीवर बसून विचार करत होतो.

जयाची खूप आठवण येतेय. पण मी मारल म्हणून ती आत्ता फोन पण उचलेल कि माहित नाही.


अचानक

बाबांचा फोन आला. बाबा रडत रडत बोलले


बाबाः जावाईबापू


मीः काय झाल बाबा ?


बाबाः जयाने गळफास लावलाय.


मी मन्याला कडेत घेऊन घरातून जयाच्या घरी पोहचलो

पोलीस आले होते.

जयाच्या घराबाहेर गर्दी जमली होती.

आतून मोठमोठ्याने रडायचे आवाज येत होते.

आत जायची हिंमत होत नव्हती.

आत नजर गेली


तोच


धाड.....धाड...... धाड.......


मला झोपेतून जाग आली.

ते स्वप्न होत.

खूर्चीवर बसूनच डोळा लागला होता.

खतरनाक स्वप्न होत.

कोणीतरी जोरजोरात दरवाजा वाजवत होत.

मी उठून दरवाजा उघडला तर समोर.


जया


मी काहीच न बोलता. घटस्फोटाचे सही केलेले पेपर देत


मीः सही केलीय मी.


जयाः का अस माझाशी वागलात. काय कमी पडली माझ्या प्रेमात.


मीः मला आत्ता काही बोलायच नाही. तुला घटस्फोट हवा होता मी दिला. अजून काय हव आत्ताच सांग उगाच कोर्टात तमाशा नको. मनस्वी माझ्यासोबत खूश आहे.


जया बाजूला बसून रडायला लागली. मलाच परत वाईट वाटल.


मीः आत्ता काय झाल. केल ना तुझ्या मनासारख.


तीने माझ्याकडे कागद फेकत विचारल


जयाः हे काय आहे ?


मी ते पाहिल तर ते एक मी लिहलेल प्रेमपत्र हे होत.


जयाः आत्ता काय झाल. बोला. आत्ता अस बोलू नका हे पत्र माझ नाहीय. मला तुमच लिखाण कळत. ही प्रिया कोण आहे ? तुमच हीचाशी काय नात आहे ? आत्ता कळाल घटस्फोटाच्या पेपरवर लगेच सह्या कशा केल्या.


मीः बोलून झाल.


जयाः मला मनस्वीला फसवून काय मिळाल तुम्हाला ? कोण आहे प्रिया जीने तुमच्यावर एवढी जादू केली मी असताना.


मीः गाढव आहेस तू.


जयाः हो गाढवच होते म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष केल.


तुमच्या पाकिटात एकदा दोन सिनेमाची टिकीट सापडली,

दुसऱ्यांदा एक लेडीज रुमाल सापडला

आणि

आत्ता हे पत्र.

तुमचा मी किती आदर करत होते. पण तुम्ही अशा निर्लज्जपणा कराल अस वाटल नव्हत.


मी परत एक सन् सनीत जयाच्या कानाखाली मारली.


आणि

तिने भोंगा पसरला.


मीः शांत बस. बेअक्कल. जरा विचार करुन बोलायचस तरी. आत्ता तोंड बंद करुन गप्प ऐकायच.

नाहीतर अजून एक कानाखाली देण.


तुझ्या अशा मुर्ख वागण्यामुळे घरात सगळ्यांना त्रास झाला.


नीट ऐक

पहिली गोष्ट


ते प्रेमपत्र माझच आहे.

मीच लिहल होत

माझ्या अॉफिसमध्ये काम करणारी एक मुलगी होती ती म्हणजे प्रिया.

ती मला आवडत होती.

हे पत्र तिच्यासाठी लिहल होत

पण

मी हे पत्र तिला कधी दिलच नाही.

देईन देईन यामध्ये माझ्याकडेच राहिल.

परत अॉफिस बदलल आणि विषय संपला.

या पत्रावर लिहलेली दिनांक बघायची तरी होती.

हा विषय मी पूर्णपणे विसरुन गेलोय.


संशयात एवढी बुडालीस कि वेड्यासारख वागायला लागलीस.


दुसरी गोष्ट

ती सिनेमाची तिकीट आपल्या दोघांसाठी आणली होती. पण नशीब खराब मीच अॉफिसच्या कामात विसरलो होतो सिनेमाच.


तिसरी गोष्ट तो लेडीज रुमाल माझ्या आईचा आहे तो जुना झाला म्हणून मी माझा लँबटॉप पुसायला वापरतो. माझ्या खिशातच राहिला होता.


मूर्ख अग तुला संशयच आला होता तर बिनदास्त विचारायच मला.

नवरा आहे तुझा, तुला प्रश्न विचारायचा हक्क आहे. आणि उत्तर देण माझ कर्तव्य आहे.


जयाः मग मारलत का ? प्रश्न विचारले तर


मीः अजून मारणार होतो. पण थांबवल स्वतःला. तुझ्या गैरसमजामुळे घरात पंधरा दिवस एक भकास वातावरण झाल त्यासाठी मारल. प्रश्न विचारलेस म्हणून मारल नाही.


इथ बघ.

माझ फक्त तुझ्यावरच प्रेम आहे.

मी तुझ्यासोबत भरपूर खूश आहे.

अप्सरा भेटली तरी तिला सोडेन पण तुला सोडणार नाही.


जया मिठी मारुन रडायला लागली.


मीः तु मालिका बघण सोड. मालिका बघून मालिका वाल्यांना पैसे भेटतील. तुला त्याचा काही फायदा नाही.

त्यापेक्षा बातम्या बघ, पुस्तक वाच, आपल्यात पेपर येतो तो बघत जा.


जयाः मला माफ करा. पण मग प्रियाबद्दल मला आधी का नाही सांगितलं.


मीः म्हणजे अजून डोक्यात विचार चालूच आहे. प्रियाबद्दल सांगण्यासारख काही नाहीच. कारण आमची कधी प्रेमकथा सुरु झालीच नाही. तिला माहितीपण नव्हत कि मी तिच्यावर प्रेम करत होतो. आणि मला सांगायची हिंम्मत झाली नाही.


आणि हिंम्मत झाली असती तर तुझ्या सारखी अप्सरा भेटली असती का ?


मनस्वी आली आणि जया लाजून बाजूला सरकली.


मनस्वीः आई मी पाहिल तु बाबाला पप्पी दिली ती. मला पण पप्पी पाहिजे.


नंतर आम्ही सगळे हसायला लागलो. घरातल वातावरण परत छान झाल.


(या कथेतून मला सर्व जोडप्यांना एवढच सांगायच आहे कि वाद सगळ्याच जोडप्यात विचारांच्या वेगळेपणामुळे होत असतात. पण वादांच रुपांतर तमाशात करायच कि नाही हे आपणच ठरवतो. आणि लोक टपलेलीच असतात तमाशाचा आनंद घ्याल. तेव्हा कोणत्याही कारणावरुन काही वाद होत असतील तर दोघांनी वाद संपवाण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. आपल्या लहान मुलांसमोर, घरातल्या मोठ्यांसमोर वाद घालण पूर्णपणे टाळा. वादाच्या रागात आपण आपली मर्यादा विसरुन खूप काही वायफळ बोलून जातो. एक घट्ट नात जपायला पूर्ण जन्म जातो आणि तुटायला एक क्षणच पुरेसा असतो. नात कोणीही कधीही तोडू शकतो पण जो जपू शकतो तोच खरा सिंकदर. आपल्या नवऱ्याची किंवा बायकोची तुलना कुणासोबतही करु नका कारण तुम्हाला जे भेटलय तेच तुमच्यासाठी चांगल आहे.)


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama