ड्रिंक फ्रेंड भाग 1
ड्रिंक फ्रेंड भाग 1
" खररररर...खररररर" दरवाजाची बेल वाजली.
रेखा ने शालू ला आवाज दिला... ती कणीक भिजवत होती तर रेखानेच दरवाजा उघडला...
" नमस्ते मॅडम..." इन्स्पेक्टर शिंदे.
" या.. सर... मिळाला का खुनी...?" रेखा ने अती उत्साहाने विचारल...
" हो मॅडम... शालू मॅडम ना बोलवता का..." इन्स्पेक्टर शिंदे.
" हो...पण शालू का... " रेखा.
" तुम्ही बोलवा... सविस्तर सांगतो..." इन्स्पेक्टर शिंदे.
" शालू... शालू... हात धुवून ये बाहेर..." रेखा.
" आले मॅडम..." शालू टॉवेल ला हात पुसत बाहेर आली...
" यू आर अंडर अरेस्ट शालू...." इन्स्पेक्टर शिंदे कड्या दाखवत म्हणाला...
" काही काय बोलता सर... शालुचा काय संबंध ह्या केस शी..." रेखा जरा चढ्या आवाजात बोलली.
" पुराव्याशिवाय काहीच बोलत नाही मी मॅडम...." इन्स्पेक्टर शिंदे.
" दाखवा वॉरंट आणि पुरावा ... तशी मी शालू ला तुमच्या कचाट्यात येऊ देणार नाही... स्वतःच्या अपयशाचं खापर गरिबावर फोडायच हे कामच असतं तुमचं...." रेखा आवेगात म्हणाली.
" हे वॉरंट... आणि ही त्यांची ओळख... ह्यात सगळे डिटेल्स आहेत... ह्या दिवंगत मिसेस आकाश इनामदार यांच्या सख्खी बहिण आहे... "
रेखा ते सगळे पेपर्स बघून शॉक झाली... आणि तिला मायनर अटॅक आला... कॉन्स्टेबल पवार ने तिला पकडुन सोफ्यावर बसवल... आणि टेबल वर ठेवलेल्या जग मधून ग्लास मध्ये पाणी काढून तिला पाजल... तिला अजून ही विश्वास बसत नव्हता की शालू अस काही करू शकेल...
" पवार मॅडम... तुम्ही ह्यांना हातकड्या घाला... आणि ताब्यात घ्या..."
इन्स्पेक्टर शिंदे नी कॉल केला आणि काही जुजबी बोलून फोन ठेऊन दिला...
दहा मिनिटातच समीर तिथे हजर झाला...
शालू डोळे भरून समीर कडे बघत होती... पण त्याने तिच्या नजरे ला काहीच प्रतिक्रिया न देता रेखा च्या दिशेने गेला...
" थॅन्क्स समीर...ह्यांना बर वाटलं की पोलीस स्टेशन मध्ये घेऊन ये... " इन्स्पेक्टर शिंदे.
" इट्स माय प्लेजर सर... प्लीज डोन्ट से थॅन्क्स... मी येतो थोडावे ला नी.." समीर.
रेखा समीर ला बघून त्याला बिलगुन रडु लागली... तिचा खूप जीव होता शालू वर... शालू मनापासून रेखाची सर्वतोपरी काळजी घेत होती... आणि रेखा आकाशवर प्रेम करू लागली होती... तिला कळतच नव्हत शालू ने अस का केलं....
तिच्या नजरेसमोरून आठवडाभरापूर्वी चे सगळे दृश्य तरळून जात होते...
" गुड मार्निग मॅडम .." शालू
" गुड मॉर्निग..." रेखा
" अगदी खुशीत दिसताय आज..." शालू
रेखा काहीच बोलली नाही...
" म्ह.... काय विशेष...?" शालू
" काही नाही...." रेखा नाजूक स ओठांत मोहक हास्य आले...
" खरच..?" शालू
" हो... नेहमीसारखच..." रेखा.
" छे.... हा काही नेहमीचा मूड नव्हे.... मॅडम... एवढ्या वर्षांनी बघतेय मी तुम्हाला.... सांगा ना.... काय खास...?" शालू.
" अगं काही नाही.... तसंच काही असतं... तर तुला सांगितलं नसतं...?" रेखा.
" तेच म्हणतेय मी... तसं काही आहे... पण तुम्ही टाळता आहात...." शालू
" चेहर्यावर तुमच्या स्वच्छ चांदणं पसरलयं.... चांदण्यामागचं आकाशही शोधेलच हं मी.... आखीर बारा साल से आपके साथ हू...!'' शालू फिल्मी स्टाईल मध्ये म्हणाली...
" आकाश..." आणि रेखा खळखळून हसू लागली...
" ह्म्म... आकाश...?" शालू तिला चिडवत म्हणाली.
"आता मला पेपर्स वाचू देतेस की..." तिच्या वर पेपर उगरत रेखा लाजतच हसत होती...
" ठीक आहे.... ठीक आहे.... आय विल बी वेट..." शालू.
रेखा हातात चहाचा कप घेऊन.... ती बगिच्यातल्या झुल्यात येऊन बसली.... शालू ला तिनं शिताफीनं टाळलं होतं....
तिच्यासमोर चेहर्यावरची रेषाही हलू न देण्याचा... प्रयत्न तिनं केला होता... पण स्वत:पासून मात्र तिला आपला आनंद लपविता आला नाही.... भुरभूर उडणारे केस मागे सावरत... सकाळचा पहिल्या चहाचा आस्वाद घेत... ती रात्रीच्या जेवणाचा आनंद आताही उपभोगत होती.... जेवणाचा नव्हे... त्याच्या सहवासाचा.... त्याच्या गप्पांचा...! ताच्या चेहर्यावरच्या निरपेक्ष हालचालींचा...!! त्याच्या निरागस हसण्याचा...!!! त्याच्या प्रेमळ बोलण्याचा.... त्याच्या अधीरतेचा.... त्याच्याजाणून घेण्याच्या स्वभावाचा.... काय गंमत आहे नं...!
पहिल्याच भेटीत खरं तर असं कुणाच्या... एवढ्या जवळ जाण्याचा आपला स्वभाव नाही... पण त्यानं काय जादू केली असावी...?त्यादिवशी कामानिमित्त अकोल्याला जाणं झालं.... माझं काम ज्या कार्यालयात होतं.... तिथे गेल्यावर माझ्या पद्धतीप्रमाणे त्या कार्यालयातल्या प्रमुखाशी मी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.... संबंधित इसमानं माझी ओळखं त्याच्या बॉसशी करून दिला.... औपचारिक बोलता बोलता .. त्याच्याशी कधी मनापासून गप्पा सुरू झाल्यात कळलंही नाही.... त्यानं सहज रात्रीच्या जेवणाचं निमंत्रण दिलं.... कदाचित व्यवसायाचा भाग म्हणून ... रात्रीचं जेवण म्हणजे... उशीर... उशीर झाला म्हणून तो पाहुणा मला पोहचवायला येणार... आणि आपला एकांत बोंबलणार... नको... नकोच ते सारे शिष्टाचार... आणि व्यावसायिक जेवण तर अजिबात नको.... पण अकोल्यात नेमकं उलटंच घडलं.... जेवण्यापूर्वी त्याचं ड्रींक.... तेही माझ्यामुळेच.... मला वाटलं तो घेत असावा....
मी त्याला म्हणाले... तुम्हाला घ्यायचं असल्यास माजी हरकत नाही...
" तुम्ही घेता...?" तो
" नो... नो... नॉट अॅट ऑल..." ती
" कित्त्येकदा एवढा परदेश प्रवास करता तरी ड्रींक घेत नाही...." तो.
" घेते... पण फक्त माझ्या ड्रिंकफ्रेंडसोबत..."ती
" अरे वा! छान शब्द आहे.... आवडला मला... 'ड्रींकफ्रेंड'....
कुठे असतो तो...?'परदेशात...?" तो
" नाही माझ्याच शहरात..." ती.
" त्याच्यासोबत नेहमी घेता... मग एखादवेळी आमच्यासोबत घ्यायला काय हरकत आहे...?" तो
" हरकत आहे ना.... त्याच्यासोबतही नेहमी कुठे घेते...? माझा मूड असेल तेव्हा... तरच... मला ड्रींक आवडत नाही.... फक्त त्याच्यासोबत ते घ्यायला आवडतं.... गाडीत बसायचं.... छान तलत लावायचा... आणि आपआपल्या हातात वझीरची छोटी बाटली... सोबतीला मसाला काजू..
भाजलेला पापड.... सारा जामनिमा करण्याची जबाबदारी त्याची आणि या अस्मादिकासाठी तो सारं हौसेनं करणार.... बाटली संपेपर्यंत गाडी चालत राहील.... परतीच्या प्रवासात दोन पानं खायची.... खरं म्हणजे त्यालाही खूप दारू प्यायला आवडत नाही... तसा तो घ्यायची असली... तर घरात एकटाच बसून पितो.... पण माझा 'मूड' असला म्हणजे माझ्या सोबत गाडीत फिरायला... बिअरबारमध्ये जाऊन बाटली आणायला कंपनी देतो.... मी घेते तेव्हा तो घेतोच असही नाही...." ती
" व्वा क्या बात है.... नशीबवान आहे बुवा तुमचा ड्रींकफ्रेंड.... गावाच्या बाहेर गाडी चालवत चालवत बिअर घ्यायची..... सोबत मनपसंद कंपनी.... चांगलीच रंगत असेल तुमची कंपनी आणि तुमच्या गप्पाही...." तो
'नॉट नेसेसरी.... मैलोमैलं नि:शब्द जातो.... दोघंही आपआपल्या पद्धतीनं 'तलत' अनुभवतो.... त्याच्या आनंद घेतो.... खरं म्हणजे मला कधी कधी अशी कंपनी हवी असते.... एरवी मी एकटीही गाडीत खूप भटकून येते.... गाडीत माझ्या आवडत्या कॅसेट आणि मी.... भरपूर वेळ असला तर माझं 'तलत'... त्याची कंपनी मला हवीशी असली तरच मी त्याला विचारते.... कारण तो मला कधीच नकार देणार नाही... याचा विश्वास असतो....
" व्वा.... बराच खास मित्र दिसतो...." तो
" खास नाही.... खास कुछ और...ही होता है यार.... हा फक्त जवळचा मित्र आहे.... विश्वासातला..." ती
तो ड्रिंक बोलवतो.... मी सूप.... जेवण करताना दोघंही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... विशेषत: साहित्यातली रुची... आपआपल्या व्यवसायाचा स्तर.... कारण कुठेतरी तो दोघांनाही समांतर जाणारा आहे.... गप्पात जेवणसंपंत.... तो मला माझ्या घरी आणून सोडतो.... हस्तांदोलन करून परततो.... जेवण दुय्यम.... पण कंपनी आवडली.... चांगल्या गप्पा झाल्यात.... त्यांनी त्याला आवडलेल्या आणि मलाही आवडेल असा... त्यांनी कयास केलेल्या ... काही कविता वाचून दाखविल्या... त्यांन राबविलेले चांगले उपक्रम सांगितले.... त्याच्या तौफेर व्यक्तिमत्त्वाचा आपोआप परिचय घडत गेला....आणि ओळख झाल्यानंतर अकरा महिन्यांनी काल तो माझ्या शहरात आला....
" मी तुमच्या शहरात आलेलो आहे.... " त्याचा एसएमएस.
एवढ्यात येणार... याची पुसटशी कल्पना असूनही चेहर्यावर मोरपंखी हसू पसरलं.... त्याला जेवणाचं निमंत्रण दिलं.... आज तो माझा पाहुणा.... खूप दिवसांनी मला आवडणार्या पाहुण्याचं आदरातिथ्य करायचा आनंद मला मिळणार होता.... खूप दिवसांनी मला माझ्या मनासारखे काही क्षण जगायला मिळणार होते.... कणाकणांनी असे क्षण ओंजळीत पकडायचे आणि हसत हसत जगायचं... एरवी सारं व्यावसायकिच.....
रात्री दहापर्यंत त्याची मिटींग चालली... परत एसएमएस "'आता मी मोकळा झालोय...." तो मोबाईलचा उपयोग बोलण्यासाठी फार कमी करतो... असं मला वाटतं.... कंपनीचं भलतंच हीत जपणारा प्राणी असावा.... छा.... हाही शिस्तीचाच एक भाग असू शकतो.... मी त्याला हॉटेलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.... वेळेचा अपव्यय होऊ नये म्हणून हॉटेल चॉइसला दुय्यम स्थान.... दोघांनाही जवळ पडेल असं हॉटेल मीच निवडलं.... तो तर शहरात अनोळखी... पण चॉइसमध्ये बसल्यावर जाणवलं.... छे.... भलत्याच भिकार हॉटेलात बसलोय आपण.... पण घड्याळाचा काटा हॉटेलसंदर्भात फारसा चोखंदळापणा करायला वाव देत नव्हता....
तरीही म्हटलं...." दुसरीकडे जायचं..."
" हे काही फारसं बरं नाही दिसत.''बघा' तुम्ही ठरवा.... मला इथलं काहीच माहीत नाही..... पण हे ही काही वाईट नाही... उलट जरा कौंटुबिक वाटतयं.... इथली कलाकुसर आवडली मला...."
तीन तास गप्पा करता करता जेवणात कसे गेले.... ते कळलचं नाही.... त्याच्या गोष्टी ऐकताना मला एवढा मनस्वी आनंद का होत होता...? माझ्या अनुभवांचा खजिना त्याच्या पुढ्यात का ओतावासा वाटत होता..?बील पेड करून आम्ही बाहेर आलो.... त्यानं माझा आनंद मात्र हिरावून घेतला.... माझ्या शहरात माझा पाहुणा असताना स्वत: बील देऊन....
''मी सोबत असताना तुम्ही बील कसं देणार?''
"आता आपण छान पान खाऊया...". माझ्या नकळत मी बोलले.
" मी म्हणणारच होतो... पण मला वाटलं ...तुम्हाला आवडतं की नाही..."
"व्वा... खूप! पान मला खूपच आवडतं..."
तो पानपट्टीवर पान घ्यायला गेला... मी बाजूला उभी राहिले...
इतमाम, प्रतिष्ठा, लोक सारं बाजूला ठेवून आपल्याच आपल्याच चौकात. चक्क रात्री एक वाजता पानपटीच्या बाजूला. या दहा वर्षात पहिल्यांदाच घडलेली घटना...।
किती नियम मोडणार आहेत असे...? ... का?.... कुणासाठी...? माझ्याच स्वत:च्या आनंदासाठी...!तो पान घेऊन आला.... मी अगदी सहज घेतलं... आणि तोंडात टाकलं.... थॅक्स सुद्दा म्हणावसं वाटलं नाही.... का...? एवढ्या लवकर एवढी सहजता का यावी.? त्याला त्याच्या हॉटेलवर जाण्याचा मार्ग सांगितला.... बोलता बोलता दोघंही बाहेर आलो. त्यांनी कॅब बुक केली होती... आणि परत एक पान माझ्या हातावर ठेवलं...
" का...? आत्ताच तर खाल्ल...."
"तुम्हाला पान फार आवडतं ना... म्हणून दोन आणलेत...."
" मी सोडते तुम्हाला... "
" नाही... कॅब येईलच... तुम्ही निघा आता... खूप रात्र झाली आहे...
मी निघून आले भर्रकन... त्याने पदरात ओतलेल्या सुखाची ओंजळ भरुन.... त्या सुखाचा मात्र मी मनापासून स्वीकार केला... स्वीकार ही खरच मनस्वीच गोष्ट आहे....
या दहा वर्षांत माझ्या आवडीचा विचार एवढ्या क्षणात कुणी केला...? कोण करू शकतं...? आणि त्या आधीची पंधरा वर्षे...? ते तर नेमके माझ्या मनाविरूद्ध वागण्याचेच दिवस होते.... मात्र केवळ दोन भेटी.... आणि त्या भेटीतच त्याला मला आवडतात म्हणनू दोन पानं द्यावीशी का वाटावी...? माझ्यासाठी कुणी काही करावं.... अशी सवयच नाही राहिली रे...! परतीच्या प्रवासात माझ्या डोळ्यांच्या ओल्या कडांवर "'तुम्हाला आवडत म्हणून..." हे शब्द थुईथुई नाचत होते.... पानाची चव अधिकच गडद झाली.... त्या चवीला एक असोशी स्पर्शून जात होती.... का सुचावं त्याला? कसं सुचावं...? असं सहज काही सुचतं...?मला आठवलं... त्याचं ड्रींक घेऊन झाल्यावर माझ्या बाउलमधून माझ्या चमच्यानं सूप घेणं... माझ्या प्लेटमधून चटणी खाणं... त्याचं माझ्याकडे डोळे भरून बघणं... त्याचं.... त्याचा पोतच काही वेगळा आहे... दुसर्याला आनंद देण्याचा आणि माझा पोत त्याहून भिन्न.... सार्या कोलाहलात आपण शेवटी एकटेच.... हे कधीही न विसरण्याचा.... एकटी... एकाकी.... सारे घडीभरचे सोबती.....
शालू विचारते..."'काय खास...".
" कसं सांगू तीला काय खास ते... माझ्यसाठी घेतलेल्या पानाचं महत्व... त्यामुळे माझ्या मनात निर्माण झालेली आर्तता शालूला कळू शकेल...?
त्या पानाची गढलेली लाली... डोळ्यात आलेली झींग आणि अजूनही जिभेवर रेंगाळणारी चव... कुणीतरी आपल्यासाठी आपल्याला आवडतं म्हणून काही करन... यात काय सुख असतं हे शालू जाणूच शकणार नाही.... ते किती सुंदर असतं हे मला चांगलं कळतयं... ती जगायला लाव णारी भावना असते.... प्रेम हे काय केवळ व्यक्तीवर असतं...? अहं.... ते भावनेवर असतं... पानावर असतं... भुर्रकन जाण्यात असतं.... आणि परत वाट बघायला लावण्यातही असतं....
रेखा तिच्या तंद्रीतून बाहेर आली... थंड झालेला चहा टेबल वर ठेवला... पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेली... एका कोपऱ्यात ती न्यूज बघून शॉक झाली... आणि खाडकन उठून उभी राहिली.... तिला कालचे क्षण आठवले... ती खूप हळवी झाली...आणि तिच्या हातून नकळत पेपर निसटला... आणि बदकन झोपाळ्यावर बसली... तेवढ्यात शालू आवाज ऐकून बाहेर आली... आणि रेखाला झोपाळ्यावर बेशुद्ध बघून घाबरली...
क्रमशः
