वाऱ्याची मंजुळ गाणी (गीत लेखन)
वाऱ्याची मंजुळ गाणी (गीत लेखन)
पानांतुनी रेशमी चांदणे
गाती सूर हे अमृताचे,
लाजरी गंधवेडी गाते
वाऱ्याची मंजुळ गाणी!!
धुंदीत चांदणे शिंपिले
चैत्रवेलीवरी धुके दाटले!
आभाळी चांदण झुले
पारिजात फुले अंगणी!!
लाजरी गंधवेडी गाते
वाऱ्याची मंजुळ गाणी!!
रान सारे दंवाने भिजले
पानांवरी मोती थिजले!
मायेच्या कुशीत निजले
गुलाबी थंडीत न्हाऊनी!!
लाजरी गंधवेडी गाते
वाऱ्याची मंजुळ गाणी!!
रुपेरी उन्हात साजिरे
कोवळे धुके दाटले!
दुधी चांदणे गोठले
भिजली फुलांची रानी!!
लाजरी गंधवेडी गाते
वाऱ्याची मंजुळ गाणी!!
गुणगुणत वाहती वारे
तकधूम तारा झंकारे!
लागती आभास सारे
आळवी संगीत साजनी!!
लाजरी गंधवेडी गाते
वाऱ्याची मंजुळ गाणी!!

