STORYMIRROR

Sandhya Ganesh Bhagat

Crime

3  

Sandhya Ganesh Bhagat

Crime

ड्रिंक फ्रेंड भाग 4

ड्रिंक फ्रेंड भाग 4

7 mins
199

रात्री सव्वा आठ पर्यंत तो त्याच्या लोकेशन वर पोहोचला... 

तो फ्रेश होऊन आकाश इनामदार च्या घरी गेला.. बराच मोठा बंगला होता...

त्याच्या घरी फक्त एक वयस्कर बाई आणि दोन नोकर होती... त्याने थोडी जुजबी चौकशी केली... त्या वयस्कर बाई आकाश ची आई होती... खूप दुखी असल्याने त्याने जास्त त्रास नाही दिला...

नाशिक हून चौकशीला आलाय सांगितल्यावर नोकरांनी थोडा पाहुणचार केला... त्यामुळे समीर ला ही त्याशी संवाद साधता आला...

त्यातून त्याला बरीच माहिती मिळाली... आणि हा आकाश इनामदार मैरिड आहे... 

त्याने दुसऱ्यादिवशी आकाशच्या ऑफिस ला मोर्चा वळवयचा होता... त्यामुळे तो हॉटेल वर येऊन सगळे डिटेल्स चा व्यवस्थित विचार करून योग्य दिशेने आहोत की नाही ह्याचा विचार करत होता...


समीर तसा खूप झोपाळू... पण जबाबदारीच काम असेल तर झोप कुठल्या कुठे पळून जाते...

सकाळीच तो सगळ आटोपून इनामदार यांच्या बंगल्यावर चोरून आत शिरला...

सगळ्यात आधी काल बजरंग ... म्हणजे इनामदार यांचा नोकर... त्याने बोलताना बोट दाखवत बेडरूम दाखवलेली... आकाश इनामदार ची...

तो लपून छपून बेडरूम मध्ये गेला... तिथे काही मिळतंय का शोधू लागला... एक कपाटात फक्त त्याच लग्नाचे फोटो आणि काही पेपर्स होते... त्यात पॉलिसी पेपर्स सुद्धा होते...त्याने सगळ्याचे मोबाईल मध्ये फोटो काढले... बायकोच्या नावे पन्नास करोड चा विमा काढला होता... आणि बायको गेल्यानंतर त्याला बिनशर्त विमा क्लेम करता आला होता...

पण समीर ने अंदाज लावला... बायको बाळंतपणात दगावली म्हणजे मुलगा किवा मुलगी असणार... आणि घरात तर तसे कुणी लहान दिसल नाही... 

घरात खुडबुड सुरू झाली... आणि हा खिडकीतून पाइप वर उडी मारून पसार झाला...


आणि काही वेळातच मेन डोअर ने आत आला... 

बजरंग ने पाणी वगेरे दिलं... त्याच्या बायकोने नाश्ता बनवला होता... आकाशच्या आईच्या सांगण्यावरून रखमा ने नाश्ता पण दिला...

समीर ने आई वर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली होती...

" मग मॅडम तुम्ही ह्या सगळ्या प्रॉपर्टी च्या एकट्या वारस आहात... तुम्ही तर नाही ना..."

" काही काय बोलता साहेब...माझ्या मुलाने खूप मेहनतीने मिळवलं... मला अभिमान आहे त्याचा... माझ्या कधीही शब्दाबाहेर नव्हता माझा मुलगा... इथ माझी सत्ता असताना मी ... माझ्यावर संशय घेऊच कसं शकता तुम्ही..." सरलाबाई भडकल्या.

" संशय घेणं आमच्या ड्युटीचा भाग आहे मॅडम..." समीर शिताफीने म्हणाला.

" तुमच्या व्यतिरिक्त अन्य कुणी वारस आहे ह्यांचा...?"

" नाही..." सरला बाई चेहरा चोरत म्हणल्या... समीर ने त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बरोबर ओळखले...

तितक्यात दरवाजावर एक वयस्कर बाई आणि एक नऊ दहा वर्षांची मुलगी होती सोबत... 

" सरला बाई... अस कस म्हणता... मग ही मुलगी कोण..." त्या वयस्कर बाई दरवाजातून बोलल्या.

" शांता... तिथूनच मागे वळ पोरीला घेऊन... माझ्या मुलानं आठ वर्षांपूर्वी च जे नात तोडल... ते पुन्हा जोडायला येऊ नको..." सरला.

" सरला बाई... माझी नात आता मो ठि झालीय... त्याला सगळ कळत... ती काही मला जड नाही... पण तीला 

तिचा हक्क मिळवून देण्यासाठी मी माझे प्रयत्न सुरू ठेवण..." शांता.

" माझा मुलगा तिला कधी स्वीकारणार नव्हता... आणि तो गेल्यावर ही मी हे होऊ देणार नाही..." सरला.

" चूप...एकदम चूप.. दोघीही तुमची भांडण थांबवा..." समीर जोरात ओरडून बोलला.

" मॅडम ही जर खरंच आकाश इनामदार यांची मुलगी असेल तर तुम्हाला न्याय नक्की मिळेल... मी मिळवून देईन... पण जर हे खोटं निघाल तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा सुनावली जाईल कोर्टातून... आणि त्याची मी चांगलीच तजवीज करेन..." समीर.

" सरला मॅडम हे पेपर्स... नीट वाचा... आणि मला तुमच्या घराची संपूर्ण झडती घेण्याचा अधिकार आहे कायद्याने... त्याची तजवीज करा..." समीर.

" ठीके..." सरला बाई

" शांता मॅडम ... मुलीला घेऊन आत येऊन बसा... आणि मला माझ काम करताना कुणीही डिस्टर्ब नाही करायचं... समजल सगळ्यांना..." समीर चढ्या आवाजात म्हणाला...

"बजरंग जा साहेबांना सगळ्या रूम उघडून दे..." सरला बाई.

बजरंग निमूट पण मान डोलवत एक एक रूंम खोलून दिली...

समीर ने प्रत्येक रूमची नीट कसून तपासणी केली.

आणि स्टोअर रूम मध्ये त्याला एक अल्बम सापडला... आणि त्यातले फोटो पाहून समीर शॉक झाला... 

बाहेर येऊन सगळ्यांना त्याने खूप प्रश्न विचारले... आणि जोपर्यंत उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो गप्प बसला नाही... ना त्याने पाणी घेतल... 

त्याने ते ब्रेसले ट जे टॅक्सी वाल्याने दिलेलं... ते शांता बाईंनी ते बरोबर ओळखलं... आणि समीर चा हिरमोड झाला होता... 

पण ते विष.. ज्या निड ल ने खून झाला होता... ते विष कुठून आल... त्याची माहिती फक्त ती एकच व्यक्ती देऊ शकत होती... 

पण तरीही ते कुठून आल याचा पत्ता लावलाच पाहिजे... तो बाकी कुठलीही चौकशी न करता तो शांता बाई... आणि मुलीला घेऊन नाशिकला रवाना झाला.

" येस सर... हो येतोच आहे... पोहचेल दोन तासात..." 

त्याने एका ठिकाणी थांबून त्या दोघींना जेवू घातले... आणि पुन्हा भिन्ना ट निघाला... वे टू नाशिक.

त्या दोघींना पोलीस स्टेशन मध्ये सोडवलं... आणि इन्स्पेक्टर शिंदे आणि समीर फॉरेन्सिक लॅबमध्ये गेले... डॉक्टर देसाई त्यांची वाट बघत होते...

" अलभ्य लाभ शिंदे साहेब... तुमचीच वाट बघत होतो मी.."

" हॅलो सर..." समीर.

" येस यंग मॅन... कसा आहेस..."

" मी ठीक सर... काय म्हणताय आपल्या निडलस..."

" त्या एकदम जहाल आहेत... अगदी सायनाई ड पेक्षा ही... " 

" आपल्या नाशिक मध्ये फक्त सिव्हिल च्या लॅब मध्ये मिळेल हे... आणि एखाद्या सर्पमित्र कडे... "

" काय.. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे...?"

" हे घोणस नावाच्या जातीच्या सापाच्या मिशा तेलात उकळून केलं जातं... तसा गावठी प्रकार आहे हा... मेडिकलच्या भाषेत ह्याला स्नेलिस्मेग स्करिप्ट म्हणतात... हे शरीरातील रक्ता सोबत मिक्स झालं की अवघ्या मिनी सेकंदात मनुष्य मरतो... " 

त्याला अचानक आठवल... एकदा रेखाच्या गार्डन मध्ये साप निघाला तेव्हा त्या व्यक्तीने किती ईजिली पकडला होता... 

" ओ माय गॉड... चला सर.... आपल्याला वॉरंट घेऊन लगेच रेखाच्या घरी जायचंय... मी रस्त्यात सांगतो तुम्हाला... " समीर.

" डॉक्टर... मी लगेच येतो पंधरा मिनिटात... आपल्याला ह्या व्यक्ती सोबत डी एन ए टेस्ट करायचीय एक मुलीच्या सँपल सोबत..." समीर.


उत्तरार्ध:



समीर रेखा ला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आला... 

पोलिस स्टेशन मध्ये शांता बाई... त्यांची नात... आणि कस्टडी त शालू होती... 

" बोला मॅडम पटापट... रेखा मॅडम ला तुमच्यावर अती विश्वास आहे... तुम्ही बोलल्याशिवाय त्यांना खर वाटायचं नाही..." इन्स्पेक्टर शिंदे.

तरीही शालू शांतच होती... 

शिंदेंनी खुणेने कॉन्स्टेबल पवार कडे पाहिलं...

तशा कॉन्स्टेबल पवार जोशात आल्या... आणि मागे उभ राहून तिचा उजवा हात ट्विस्ट केला...

" आय्य भवाने... बोल पटापटा... आमाला अजून लेई काम आहेत..." कॉन्स्टेबल पवार.

ती कळवळली... समीर ला तिची दया आली...

" मॅडम ... मॅडम... सांगेल ती... हात सोडा..." समीर त्यांना रिक्वेस्ट करत म्हणाला.

त्यांनी तिचा हात सोडला...

शालू ने भरल्या डोळ्यांनी समीर कडे बघितल...

" सांग शालू.. का केलं... अजून ही माझा विश्वास आहे की तू नाही केलं हे सगळ... " रेखा.

" ती गळून रेखाच्या पायाशी पडली... 

" नाही मैडम... मीच केलं ... मला माहित नव्हत तुम्हाला तो नराधम आवडतो... नाहीतर मी कधीच हे पाऊल उचलल नसत... पण मी तुम्हाला त्याच्या प्रेमात ही पडू दिलं नसतं..." शालू.

रेखा च तर अवसान गळून पडल... समीर ने तिला सावरलं...

ती एक खुर्चीवर बसली... तिला कॉन्स्टेबल ने पाणी दिल... 

मी त्यादिवशी बाजारात गेली तेव्हा आकाश मला टॅक्सीतून जाताना दिसला... मी त्याचा पाठलाग केला... त्याला मुलीची जबाबदारी पुन्हा पुन्हा विनवणी केली... पण त्याने मला नाही नाही ते बोलला... मला बोलला... सहन ही केलं असतं... पण तो माझ्या बहिणीविषयी,आई विषयी घाणेरडी गरळ ओकू लागला... ते मला सहन नाही झालं...त्यावेळी माझ्या मनात फक्त आणि फक्त रागच होता... त्याविषयी फक्त सूडाची भावना होती...मी अगदी त्याला संपवण्याचा प्रणच केला होता... मी त्याच्या टॅक्सीचा लपून पाठलाग केला.. त्याची रूम ची आसपास ची जागा बघून ठेवली.... मी घरी आले... संपूर्ण रात्र पूर्ण तयारी केली... घोणस च्या मिशांच विश बनवलं... लहान मुलांची बंदूक घेऊन आले... त्यात टाचण्या रोवल्या... त्याची प्रक्तीस केली... की किती लांब जाऊ शकते... 

आणि दुसऱ्या दिवशी रात्री झाडामागे लपून बसले... तो त्याच्या रूम मध्ये आला त्यावर निडल फायर केलं...

" अग पण का... एवढी काय दुष्मनी... नुसतं वाईट बोलल्याने कुणी खून करत का लगेच..." रेखा

" नाही... आकाश इनामदार शालू च्या बहिणीचा नवरा... अतिशय बेताल माणूस... गोड बोलून बायकांना फसवयच... त्यांची प्रॉपर्टी गटकवयची हेच त्याचे मेन उद्योग..."समीर.

रेखा त्याच्याकडे डोळे विस्फारून बघत होती...

" हो मॅडम... त्याने माझ्या बहिणीशी लग्न केलं... बक्कळ हुंडा घेतला... आम्ही दोनच बहिणी... अर्थात वडील गेले तेव्हा माझी आई आठ महिन्याची गर्भार होती... पण वडिलांनी सगळीकडे नोमीनी म्हणून ताई च नाव नोंदवलं होतं... त्यामुळे सगळी प्रॉपर्टी तिच्या नावे झाली... अर्थात लग्ना नंतर आकाश त्यात भागीदार झाला... आणि ती गेल्यानंतर ती सगळी त्याला मिळणार... तिला फुस लाऊन तिच्याकडून पैसे उकळत गेला .... त्यात त्याने बिझनेस सुरू केला... फक्त नावाला... त्याचे उद्योग वेगळेच होते... तिच्या नावे पन्नास करोड चा विमा काढला.. 

मग ताईची डिलिवरी झाली... आणि तिला दगाफटका केला... मुलगी झाली म्हणून तिच्यापासून पण हात वर केले... आम्ही तक्रार पण केली पोलीस स्टेशन ला... पण त्यांनी ती घेण्यास नकार दिला.. ह्या हैवणाने पैसे चारले होते...

ताई नंतर अजून दोन मुलींसोबत हेच केलं त्याने.. ह्यात त्याची आई सरला बाई बरोबरची हकदार आहे ... इन्फॅक ती त्याला प्रवृत्त केल असेल त्याला अस वागायला... नाहीतर स्वतःच्या मुलाचं अस वटोल होताना कुणाला आवडेल... उलट्या काळजाची.... " 

" आणि मला नाही वाटत माझ्या भाचीला तिच्या आईच्या आशीर्वादाने सगळे सुख मिळतील..." 

" अस नव्हतं करायचं शालू... आपण का उपाशी होतो का... आता मी कुणाच्या तोंडक ड पाहू..." आणि आई धाय मोकलून रडू लागली... 

समीर ने तिला सावरलं... 

राजेश चार्जशीट तयार कर... सरला बाई ला पण घेऊन या... 

" सर एक रिक्वेस्ट आहे..." रेखा.

" बोला मॅडम.." इन्स्पेक्टर शिंदे.

" शिक्षा कमीत कमी होईल ते बघा... मी चांगला वकील करते... प्लीज सर..." 

" काळजी नका करू मॅडम... मी बघतो नक्की..." इन्स्पेक्टर शिंदे.

" मॅडम.. कुठल्या तोंडाने तुमची माफी मागावी कळत नाही... पण खूप खूप धन्यवाद... " 

" इट्स ओके शालू... तुझ्या जागी मी असते तर कदाचित हेच केलं असतं... आजपासून तू बाहेर येई पर्यंत तुझी आई आणि भाची माझी आई आणि भाची आहे..." 

" थँक यू सो मच मॅडम... " तिचे डोळे प्रेमाने भरून आले.

सगळे बाहेर गेले... 

आता केबिन मध्ये कॉन्स्टेबल पवार... इन्स्पेक्टर शिंदे आणि शालू होती...

"सर समीर सोबत थोड बोलायचय... एकट्या त "

" ओके... " " समीर..."

समीर आत हजर झाला... हे दोघे बाहेर गेले...

"मी खून केला... जाणून बुजून... त्यावेळी मी काय करतेय याचं भान नव्हत... पण मी वाईट नाहीये समीर... आय एम सॉरी समीर... मला माहितीये तुला मी आवडते... पण मी कधी तुझ्या लायक नव्हते... आणि नसेन... तुला तुझ्यासारखी च शांर्प आणि प्रेमळ मुलगी भेटेल... आणि गिल्टी वाटून घेऊ नकोस... मी शिक्षेची हाकदार आहे... पण तू एक खूप प्रामाणिक ऑफिसर आहे... तू माझ्यावर प्रेम करत असून ही कर्तव्याला प्राधान्य दिलं... आय रिअली प्रौड ऑफ यू.... मला जर कमी शिक्षा झाली आणि लवकर बाहेर आली तर मला मॅडम च्या ड्रिंक फ्रेंड सोबत ड्रिंक घ्यायला आवडेल."

दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली.





समाप्त.....




Rate this content
Log in

Similar marathi story from Crime