वटवृक्ष एक भयकथा
वटवृक्ष एक भयकथा
वटवृक्ष वाड्याकडून दिवसा देखील कोणी फटकत नाही रात्री त्या वाटने जाणे म्हणजे किती हिंमतीचे काम तरी देखीलं लोभ म्हटला तर व्यक्ती काहीही करतो. जवळपास दीड ते दोन एकराच्या जमीनीवर स्थापीत असलेली वटवृक्षवाडी अमावस्थेच्या रात्री देखील सोन्यात सारखी चमकत होती. नक्कीच गुप्त धन या वाड्यात लपवीले असले म्हणून लोकांनी भूत पिशाचची अफवा उडवून दिली असेल अशा उद्देशाने संग्रामपूरातील काही चोर चोरी करण्याच्या उद्देशाने दाखल होतात, पण ते वाड्याच्या आत गेले मात्र परत आले नाही, नंतर काही दिवसांनी बंजारा समाजातील लोकांनी वाड्याच्या भोवती गस्त मांडली तर त्यांनी रात्री वाड्यावर एक स्त्री भटकतांना दिसली, त्या वाड्यावर घुबडांचा झुंड फीरतांना आढळला तर त्यांनी तिथून पळ काढून हा सर्व प्रकार गावच्या सरपंचाला सांगीतला म्हणून गावकऱ्यांनी त्या वाडीकडे येणारे रस्ते बंद केले. गावकऱ्यांनी तेवढा भू-भाग भूताटकी असल्याचे सांगीतले आणि तिथे जाणे सर्वाचे बंद झाले.
नमस्कार, माझं नाव पवन सरनाईक. गेल्या 27 वर्षापासून जाधव निवासात कार्यरत आहे. रघुराम सरनाईक माझे आजोबा हे रावसाहेबांचे मुनिम होते. आई-वडील विदेशातच राहायचे. सुरुवातीला रावसाहेबांना मूलबाळ नव्हते म्हणून रत्नामाईने मला त्यांच्याकडे ठेऊन घेतले. प्रतापराव आणि रावसाहेब यांच्यामध्ये दुवा असलेला एक मात्र व्यक्ती तो म्हणजे मीच. जाधव घराण्यावर पडलेली अमावस्येची रात्र ही चार वर्षानंतर समोर आणत आहे त्याचे कारण की गेल्या साडेतीन वर्षापासून मी गाढ निद्रेत अर्थातच कोमात होतो.
महेश, रावसाहेबांचा मुलगा जाधव घरांचा एक मात्र वारस. कोट्यावधी रुपयांची संपत्ती याला सांभाळावी लागणार होती. १५ वर्षानंतर महेश शहरातून गावाकडे येणार होता. पण कोणते आई वडील स्वतःच्या लेकाला पंधरा वर्षे स्वतः पासून दूर ठेवतील. माहित नाही पण आज तो शहरातून गावात येणार होता म्हणून मी त्याला घेण्यास गावाच्या फाट्यावर गेलो. दुपारचे बारा वाजले होते एक लालपरी फाट्यावर येऊन उभी राहिली. शरीर आणि भक्कम गोऱ्या रंगाचा मजबूत बांध्याचा तरुण बसमधून खाली उतरला. बहुतेक हा महेश असावा म्हणून त्याला हाक मारली.
' महेश , महेश '
अरे तुम्ही पवन दादा आहात ना.
हो मी पवनच आहे. चलायचं घरी सर्व वाट बघत आहे तुझी.
हो दादा चला.
महेशला घेऊन गावाच्या मागील रस्त्याने गावात प्रवेश केला. घरी आलो महेशला बघून सर्व परिवारातील सदस्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. 15 वर्षाने सर्व त्याला बघत होते. महेशला घरात नेऊन त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. मी आपला वाड्यावर असणाऱ्या मजुरांचा पगार त्यांना देत होतो. एवढ्यात रावसाहेब माझ्याजवळ आले आणि काळजी असलेल्या आवाजात विचारले,
" पवन महेशला कोणत्या रस्त्याने रे,
रावसाहेब गावाबाहेरूनच! तुम्हीच म्हणालात ना महेशला गावातील आणि नको म्हणून.
हो! चल जेवणाची वेळ झाली जेवण करून घे बरं, आणि त्या प्रताप याला सुद्धा घऊन जा."
जेवणाचे बैठक चांगलीच रंगली होती तेवढ्यात रत्ना महिने आता विचारले की अचानक महेशला इकडे बोलावण्याचे कारण काय? रत्नामाईचे शब्द ऐकून रावसाहेब हसले आणि म्हणाले की, " आपले चिरंजीव आता वयात आलेत, त्यांच्या तक्रारी आमच्या कानापर्यंत येतात बरं, संग्रामपुरच्या काकासाहेबांची लेक आहे नव्ह, काय नाव आहे तीच तर, ह्मममम निशा. तिच्याशी लग्न करण्याचा बेत होता चिरंजीवांचा. मुद्दामून टेलीग्राम केली याने, आनंद झाला मला, की कोणतेही मोठे पाऊल न उचलता दोन्ही पोरांनी आम्हाला विश्वासात घेतले. तुला सांगणारच होतो पण म्हटलं तुला आनंदाचा धक्का द्यावा. रत्नामाई तुमचे संस्कार थोर हो. चला एकदाच लग्न उरकलं दोघे नवरा बायको शहरातच राहतील. आणि काही वर्षाने ईथली सर्व संपत्ती विकून आपणही तिथेच जाऊ.
अग बाई! चोराने चोरी केली म्हणायची आणि आम्हाला पत्ता सुद्धा लागला नाही. पवन उद्या सकाळीच आपण संग्रामपुरला जायचं बरं.
हो माई नक्की जाऊ.
काय महेश तू येणार ना सोबत?
दादा कशाला थट्टा करतोस. आणि बाबा मी कुठेच जाणार नाही आहे. आता इथेच राहायचं आणि आपला जुना दालमिल आहे तो पुन्हा सुरू करणार.
दालमिल कोणता रे दालमिल आपलेतर तीन ते चार मीटर बंद पडली आहेत. रावसाहेब पुटपूटले.
अहो बाबा! ह्या मालेगाव जवळचा, तिथं आपला जुना वाडा सुद्धा आहे ना, काय नाव त्या वाड्याच्या तर हो वटवृक्ष!
वटवृक्ष, या वाड्याचे नाव ऐकताच संपूर्ण बैठक शांत झाली, रावसाहेबांचा हात मध्येच थांबला, रत्नामाई अचानक स्तब्ध झाली. सर्व नोकर वर्ग एकमेकांकडे भीतीच्या दृष्टीने बघत होते. मी सुद्धा विचारात पडलो हे काय आहे याच्या वाड्यात ज्याचे नाव ऐकताच सर्व अचानक शांत झालेत. त्या शांतमय वातावरणात रावसाहेबांनी दिलेला धीर अत्यंत महत्वाचा होता "अरे महेश, मालेगावचा जो मिल आहे तो चांगलाच आहे. मात्र तो वटवृक्ष वाडा आता पडक्या अवस्थेत आहे रे. तिथे राहण्याची व्यवस्था होणार नाही त्यामुळे तू दुसरं काही बघ. पण बाबा, मी त्या वाड्यात जाऊन आलो आणि त्या वाड्याच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी शहरातील सर्वोत्तम इंजिनीयर आणि त्यांचे माणसं गेल्या दोन हत्या पासून वाड्यातच आहेत. आणि मीलात सुद्धा मजून पाठवून तो सुद्धा चांगल्या अवस्थेत करत आहे. आपली जुन्या डीलर सोबत माझे बोलणे झाले त्यांनीसुद्धा सकारात्मक भूमिका घेतली त्यामुळे मी तिथेच राहणार.
बरं! ठीक आहे तुझी इच्छा राह बाबा तिथं.
( रावसाहेबांनी दिलेली संत्वाना त्यांच्या चेहऱ्यावर असलेली भीती लपवत नव्हती आणि त्यांना विचारण्याची ही वेळ ही नव्हती मी प्रतापरावांची जेवण घेतले आणि वाड्याच्या बाहेर पडलो. प्रतापरावांना वाड्यात प्रवेश नव्हता लग्न न केल्यामुळे त्यांच्या मागे पुढे कोणी नव्हते. पण रत्नामाई नित्यनेमाने प्रतापरावांच्या जेवणाची व्यवस्था करीत असे. मालेगावात नेमकं काय घडलं होतं त्या वटवृक्ष वाड्यात काय घडले आहे या प्रश्नांचे उत्तर फक्त प्रतापराव देऊ शकत होते म्हणून मी त्यांच्याकडे गेलो.)
"काका काही काम होते तुमच्या सोबत वेळ अस तर विचारू का?
हो, विचार ना.
काका, वटवृक्ष वाड्याची काय भानगड आहे."
वटवृक्ष वाडा नाव ऐकताच प्रतापराव यांच्या नरड्यातील घास तिथच थांबला त्यांनी पाणी पिले आणि गंभीर पणे विचारले.
" वटवृक्षवाडा कुठं ऐकले हे नाव" प्रतापराव हळू आवाजात बडबडले. त्यांची ही भीती वाचक शब्द ऐकून माझे मन देखील व्याकुळ झाले होते. मी खूप हिम्मत लावून प्रतापरावांना विचारले "तात्यासाहेब या वटवृक्ष वाड्याची कहाणी काय आहे. का सर्वजण वटवृक्ष वाडा नाव ऐकताच स्तब्ध होऊन जातात."
प्रतापराव थोडं शांत झाले आणि म्हणाले सांगतो, सर्वकाही निवांतपणे सांगतो अगोदर तू सांग तू हे नाव कुठे ऐकले. तात्यासाहेब महेश शहरातून परत आला आज जेवण्याच्या बैठकीत तो सांगत होता ती सुलतानपूरला असलेल्या दाल मिल पुन्हा सुरू करायचा आणि राहण्यासाठी तेथे असलेली वटवृक्षवाडी उपयोगात अनायाची.
त्याने कुणालाही न सांगता काही दिवसापूर्वी वटवृक्ष वाड्याचे बांधकाम आणि साफसफाई सुरू करून दिली आणि त्या दाल मीना ची सुद्धा मरंमद केली तो सांगत होता पुढच्या महिन्यात तो दालमिल चालू करायला. एवढ ऐकताच प्रतापरावांच्या तळपायामधील आग डोक्यात शिरली. आणि अत्यंत रागाने बोलले.
" अरे या रावसाहेबांले अक्कल आहे की नाही, वटवृक्ष वाड्याचा इतिहास त्याला माहिती नाही का? कशाला पुन्हा रक्ताने आंघोळ करायची. तो राहत असलेली या महेशला ठार मारणार, त्या निरागस जीवाला वाचण्यासाठी पंधरा वर्षापासून मी अग्यातवास सहन करतोय आणि हा त्याला सुलतानपूरला जाण्यात संमती देत आहे. जो पर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तो दालमिल सुरू होणार नाही आणि हा वटवृक्ष वाडा बंदच राहणार. प्रतापरावांचे हे उग्र रूप कधी बघितले नव्हते गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांना जेवणाचा डबा घेऊन येत आहे नेहमी हसणारे कुठल्याही विषयावर गांभीर्याने बोलणारे प्रतापराव आज अत्यंत क्रोधात दिसत होते. मी पुन्हा हिम्मत केली आणि विचारले तात्यासाहेब तुम्ही काही सांगणार सुद्धा आहात का? त्या वाड्याची काय रहस्य आहे ते. हो सांगतो बस इथे. आणि व्यवस्थित ऐक. महेश पाच वर्षाचा होता तेव्हा संपूर्ण जाधव कुटुंब हे वटवृक्ष वाड्यातच राहायचं. रेखा आमच्या वडिलांची दूरचीच का असेना कोण हो त्यांनी मानलेली मुलगी. रेखा ची आणि आम्हा भावंडांचे कधी जुळलेच नाही तिच्या मनात नेहमी कटकारस्थान चालायचे मात्र बाबांनी त्याकडे कधी लक्ष दिले नाही. 'लहान आहे ती, काही बाबी तुम्ही समजून घेत चला,' नेहमी म्हणायच. जेव्हा आमचे वडील जीवनाच्या शेवटच्या क्षणात होते त्यावेळी त्यांनी सर्व संपत्ती जमीन-जुमला हा आमच्या नावावर केला. रेखाला मिळाली फक्त वटवृक्ष वाडी. पण त्या करोडो रुपयांच्या वाढीचा हिस्सा आपल्या पदरात आला याचे कौतुक रेखाला कधीच वाटले नाही मात्र ती महेश ला मिळालेले संपत्तीवर जळत राहायची. आता आहे पाच वर्षाचा पोरग याला काय कळते संपत्ती म्हणजे काय ते. तात्यांनी मरतना लिहिलं होतं. जर का महेशला काही झाले तर संपूर्ण संपत्ती ही रेखाच्या मुलाच्या नावावर चालवली जाईल. याच शब्दामुळे रेखासोबत आमचे वैर वाढत गेले. परिणाम असा झाला की महेशचा वाढदिवस होता संपूर्ण वटवृक्ष वाडी आनंदाने नाचू लागले होती. सर्व सदस्य आनंदातच होते पण एक चेहरा होता जो द्वेषाने आणि मनातील कपटाने लाल झाला होता.
रेखाच्या मनात काय होते हे कळलेच नाही पण हो घराच्या मागच्या बाजूने एक चित्र दिसले ते म्हणजे पिंपळाच्या झाडावर रेखा लटकली होती. रेखा चा मुलगा जो तिचा कधी झालाच नाही तो पण दिसत नव्हता. काय घडले कुणाला काहीच कळले नाही पण हो ती हत्या होती की आत्महत्या हे मात्र रहस्य होते. काही दिवस अंगावरून गेले होते एके दिवशी रत्नामाई विहिरीजवळ पाणी भरत होत्या. आणि रावसाहेब महेशला घेऊन तेथेच बसले होते. विहिरीच्या काठापासून पाच ते सहा फूट अंतरावर मंदा मावशी भांडे घासत होती ती अचानक उठली आणि रत्नामाईला विहिरीत ढकलून दिले. हा प्रकार बघताच रावसाहेबांनी लगेच विहिरीत उडी घेतली आणि रत्नामाईला वर काढले. तेवढ्यात सर्व घरातील सदस्य वाड्याच्या मागे आली होती. मंदा पिंपळाच्या झाडाजवळ उभी होती आणि जोरात हसत होती. तिचे ते शब्द आजही माझ्या कानात घुमत आहेत. " माझ्या लेकराला तुम्ही अनाथ केले मी सुद्धा तुमच्या घराचा दिवा विजून टाकिन आणि नंतरच मला मुक्ती मिळेल. रावसाहेब जाधव घराण्याचा शेवट माझ्याच हातून होणार. कशी मी असहाय्य होती तसेच तुम्ही देखील काहीच करू शकणार नाही बघा तुमचा अंत कसा होतोय." एवढे बोलून मंदा ने आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवले आणि मी बघतो तर काय तिने आपले डोके आहे शरीराच्या बाहेर उपटून फेकले. ते दृश्य बघितल्यावर सर्वत्र एकच आवाज घुमत होता तो आवाज होता रेखाचा. रेखा सोबत काय घडले होते त्याची साक्षीदार फक्त रेखा होती. रेखाने शरीर सोडले मात्र तिची आत्मा वटवृक्ष वाड्यात आजही तांडव करीत आहे. ती म्हणायची दादांच्या घराचा वंशावळी नष्ट करून टाकेलं. म्हणजे वाड्यात महेशच्या जीवाला धोका आहे. नाही काही आपणच करायला पाहिजे. वटवृक्ष वाडी ही बंद असायला हवी... असे प्रतापरावांनी मला सांगितले. मी तेथून निघून गेले दुसऱ्या दिवशी लग्न होते माहेर च्या लग्नाचा खूप मोठा कार्यक्रम वटवृक्षवाडीमध्ये पार पडणार होतं. मी प्रतापरावांच्या घराच्या बाहेर पडलो आणि महेशकडे आलो , महेश हा निशासोबत बोलत होता . तेवढ्याम रावसाहेब आले आणि माझ्या हातावर लाख रुपये देउन म्हणाले "हे बघ , आता तालुक्याला जा आणि लग्नाचा किराणा आण.सोबत वटवृक्ष वाडी सजवण्याचे काम कुणाला देऊन टाक आणि सर्वाना फोन लाऊन सांग येत्या सोमवारी म्हणजे 4 दिवसांनीच महेशचे लग्न उरकायचे आहे . हे घे यादी आन किराणा लिहिला आहे चल निघ लवकर" एवढे बोलून रावसाहेब तेथून निघून गेले. आणि लग्नाच्या कामात चार दिवस कसे निघून गेले कळले सुद्धा नाही, मी सर्वकाम आटोपली होती. लग्न लागले होते . मी नेहमी प्रमाणे प्रतापरांवाचा डबा धेऊन त्यांच्या घरी गेलो. "घरात पाहुण्यांची किलबिल लागली होती. सनई चौघडे जाधव निवास बंगल्यात वाजत होते. महेशच लग्न खूप थाटात पार पडत आहे पण हे पोरगं आनंदी असेल का. निशा खूप सुंदर आणि गुणी मुलगी आहे रेखा! रेखा यांना सुखाने संसार करू देणार? नाही, याची कल्पना करणे देखील शरीराला काटा आणण्यासारखे आहे. महेश माझा पुतण्या आहे म्हणून मी त्याला आशीर्वाद देऊ शकतो. पण जाधव निवास मध्ये प्रवेश करणे एखाद्या संकटाला निमंत्रण देण्यासारखे तर नसेल. नाही, मला जायला हवे."
असे म्हणून धाकटे मालक जाधव निवासाकडे जाण्यासाठी घराचा उंबरठा ओलांडतात आणि दरवाज्याची ठोकर लागून त्यांचा मृत्यू होतो यांना खाली पडून होणारी वेदना बघून न जाने का मला असे वाटे एखादी अदृष्य शक्ती धाकट्या मालकाच्या छाताडावर बसून त्यांना संपवीत आहे. मी त्यांच्या पर्यंत बहुत पोहाचाण्याखेरीज त्यांचे प्राण पाखरू उडाले होते. धाकट्या मालकाचा झालेला मृत्यू खूप काही रहस्य सोडून गेले. माझी अंतरआत्मा पूर्ण विश्वासाने सांगायची धाकट्या मालकाचा मृत्यू हा अपघाती नव्हता तो एक खूनच होता, हो! हा खून रेखानेच केलेला असावा.
महेशचे लग्न थाटात पार पडले . पूर्ण जाधव सदन आनंदात होते तेवढ्यात एक माहीती रावसाहेबांच्या कानावर आदळली ती म्हणजे प्रतापराव संपले . प्रतापरावांची ही बातमी ऐकून सर्व आनंदाचे वातावरण दुःखात प्रवर्तीत झाले. रत्नाबाईचा जिव कोसळला रावसाहेबांचे अश्रू देखील अनावर झाले महेशचा जास्त संपर्क नव्हता पण दुःख त्याच्या चेहन्यावर झडकत होते, रावसाहेबांनी गहीवरच्या आवाजात विचारले प्रताप कुठ आहे ? "मालक प्रतापराव या वाड्याच्या बाहेर आहेत . त्यांचे डोके शरीराच्या वेगळे पडलेले दिसले". पण प्रतापरावयांनी तर घरातच प्राण सोडले होते हेच सांगायला मी ईथ आलो . मग ते इथ कसे आले ? माझी , विचारक्षक्ती क्षिण झाली . माझ्या डोक्यात एकच नाव गाजत होने ते म्हणजे लीला मावशी.
मी घरा बाहेर पडलो पण माझ्या मनात विचार फीरत होता तो म्हणजे रेखाचा हो रेखाचा हे तेच पात्र जिच्यावर अन्याय झाला असं, तिला वाटत होते. रेखा बाबत विचारपूस करायची असे वाटत आहे. रेखा बद्दल रत्नामाईला विचारायचे का ? हो ! पण त्या सांगतील नाही, नाही . मलाच संग्रामपूरना जाव लागेल हो आताच निघतो . असे म्हणून मि संग्रामपुर येथे गेलो तेथे रेखाबददल विचारपूस केली तर असे ऐकण्यात आले की लिला नावाची एक मैत्रीण होती तीची . ती गावाबाहेर रहायची . म्हणून मी त्यांच्याकडे गेलो तर तिथे लिला मावशी अर्धमृत्य अशा अवस्थेत पडली होती आपल्या दिनाच्या शेवटच्या घटका मोजत होत्या. तेवढ्यात मी त्यांच्या जवळ गेलो . 10/10 चे लहान झोपडे हवा सुटली तर उडून जाणार अशा अवस्थेत. मी तिच्या जवळ गेलो आणि विचारलेआपण लिला मावशी आहात ना,
हो | बाळ मीच लिला.
कोण ?
मावशी. मी पवन , रावसाहेब जाधव यांचा नोकर समजा.
रावसाहेब त्या नराधमाने मल देखील ल मारायला पाठवलो का ?
नाही नाही मी अग कशाला आला कुणालाच मारायला नाही.
मावशी आपण शांत रहा मी सांगतो सर्व काही.
( महेशच्या येण्यापासून तर प्रतापरावांनी सांगतलेल्या रेखाच्या बाबत सर्व काही मी लिला मावशीकडे सांगीतले)
खोटं आहे हे साफ खोटं आहे. रेखा प्रतापरावांची सावत्र बहीण.
मावशी काय बोलत आहोत मला काही एक कळत नाही तुम्ही सविस्तरर सांगा मला ,
पवन तुझ्या डोळ्यात सत्याचे तेज झळकते म्हणून सांगते मला माहीत आहे हा इतीहाम मांडल्यावर मी जिवंत राहणार नाही पण तुला रेखाचे सत्य माहीत असायलाच हवे. " रेखा जाधव कुंटूबात काम करणाऱ्या बाळू मामाची सून , रेखा, जाधव घराला स्वताचेच घर संभजून राबत असे. काकासाहेबांच्या औषधा पासून ते महेशला शाळेत नेणें, स्वयंपाक, धुणी भांडी सर्व काही करायची. पण नियतीला वेगळेच मान्य होते, रत्ना एक अंत्यंत कारस्थानी बाई. याच प्रतापरावची वहीणी पण यांचे नाते फक्त दाखवण्याचेच. रावसाहेब तालुक्याला गेले असता ही भयानक घटना घडली. रेखा महेशला घेऊन घरी आली आणि रत्नाच्या घरात गेली तर बघते तर काय ? प्रतापराव आणि रत्ना हे दोघे नग्न अवस्थेत रासलिला करण्यात मग्न होते. रेखाला बघीतल्यावर त्यांना फार भिती वाटू लागली. रेखा बाहेर पडत सुटली तीने मौन बाळगुन ठेवले. मात्र प्रतापरावांची भिती वाढत होती. आणि रेखाचा मौन वृत्तीमुळे रत्नाची जास्त वाढली होती. आता ती रेखा समोर असतांना देखील प्रतापरावाच्या खोलीत जायची कधी - कधी रेखा समोर असतांना देखील हे दोघे अश्लील कृत्य करत होते. एक दिवस रेखा उदास होऊन बसली होती मी तिला विचारले उदास का आहेत तर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि आमच्या मधील झालेला संवाद प्रतापराव आणि रावसाहेब यांचे वडील यांनी सर्व ऐकला. त्या रात्री रत्ना आणि प्रतापराव यांना त्यांनी त्यांच्या खोलीत बोलाविले मी त्या खोलीच्या मागे झाडाला पाणी देत होती. तेवढ्यात आबाचा आवाज मी ऐकला आबाचा आवाज कणखर होता तो काणावर आदळला.
"काय प्रताप काय थेरं चालवली घरात तुम्ही. नाते संबंध बद्दल असलेल्या मर्यादा या माहीती आहेत की नाही. आमची अब्रु वेशीवर टांगली तुम्ही. या केलेल्या कृत्याला माफी नाही. जा निघून माझ्या वाड्यातून.
रत्ना - मामंजी मानसाने उतरत्या वयात पडून राहायचे जोर नाही दाखवायचा.
(रत्नाचे ते विकृत हास्य तिची मंशा व्यक्त करत होती )
आबा व: है अवकादीत रहा, विसरू नको मी कोण आहे . आणि काय करू शकतो. ही सर्व संपत्ती माझी आहे. आणि तुम्हाला आता यातील तीळ देखील मिळणार नाही.
प्रताप - बाबा झाली चूक मग काय आता स्वताच्या लेकाला दुर करणार का? अहो, हो! चुकलं म्हणायचं, सावत्र लेकाला दुर करणार का? रत्ना जा आणि माझ्या अलमारीतील संपत्तीचे कागदोपत्र घेऊन ये या म्हाताऱ्याच्या अंगठा आजच घ्यावा लागेल.
( आबाच्या गळ्यावर खंजीर लावून प्रतापराव हसत होते.)
प्रतापरावाने खंजीर काढून आबाच्या मानीवर धरला. मी गपचूप बघत होती तर अचानक कोणी तरी माझे तोंड मागून धरले आणि पकडले मला आवाज देखील काढता येत नहता, आता रत्ना कागदपत्री घेऊन आबाच्या खोलीत आली. आबा प्रतापला स्वःताला सोडण्याची विणवणी करत होते. तेवढ्यात रेखा त्या खोलीत जाताना मला दिसली पण माझा आवाज मागे कोणी उभा असणाऱ्या व्यक्तीने दाबला होता आबाने अंगठा देण्यास नकार देत होते. म्हणून त्या दोघांनी जबरदस्तीने आबांचा अंगठा घेण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढ्या हे व्हायचे नहने ते झाले . प्रतापने खंजीराने आबाचा गळा कापला आणि दुर्दैवानं हे दृष्य रेखाने बघीतले इंथ मात्र वेगळे वळण रेखाचा मिळाले प्रतापराव तीच्याकडे एका राक्षसा प्रमाणे बघत होने तेढ्यात कोणी तरी माझ्या डोक्यात धाव केला आणि मी बेशुद्ध झाली. जेव्हा डोळे उघडले तेहा रेखाचे शरीर पिंपळाच्या झागवर टांगलेले होते. आणि आबांनी घर - दार सोडून संन्यास घेतला असे कानावर आदळले. पवन रेखा ही निर्दोष आहे त्या वटवृक्ष वाडीचे रहस्य तुला वाडीतच गेल्यावर कळेल.
लिला मावशीच्या आयुष्यातील तो शेवटचा क्षण होता. तिने माझ्याच माझ्याच मांडीवर स्वताचे प्राण सोडले. आता या परिस्थतीला वेगळे वळण मिळणार होते. रत्नामाई अत्यंत साध्या, भोळ्या होत्या. पण लिला मावशीने जे काही सांगितले त्यात सत्यता दिसून येते मात्र माझा विश्वास बसत नाही. म्हणून मी रेखाबद्दल अधिक माहीती मिळावी म्हणून वटवृक्ष वाड्यात जायचे ठरवले.
मी वटवृक्ष वाडीच्या रस्त्याने निघालो. वाडीच्या रस्त्याने चालतांना मला एक मंदीर दिसले कळतं न कळतं माझे पाय त्या मंदीराकडे वळले आणि माझा मंदीरात प्रवेश करताच मला एका प्रकारे विजेचा झटका पडला व मी मंदीराच्या दरवाज्याच्या दूर फेकल्या गेलो. तेवढ्यात त्या मंदीराचे महाराज बाहेर आले. त्यांनी हा प्रकार बघीतल्यावर त्यांनी आपल्या चेहऱ्यावर स्मिथ हास्य आणले आणि माझ्या अंगावर मंदीराची राख फेकली आणि म्हटले "जा निघून इथंन ज्या मोहीमेवर तू निघाला देव करो तुला यश मिळो तुझा मार्ग न्यायाचा आणि सत्याचा आहे. हम तुझे विचार..... !! महाराजांचे शब्द माझ्यासाठी विचार करण्यासारखे होते. मी मंदीरातून बाहेर पडालो आणि वाड्यात गेलो , वाड्यात गेल्यावर एक रहस्यमयी घटना माझ्या सोबत घडली........ माझ्या डोळ्यासमोर उभे होते ते म्हणजे पिंपळ आणि त्याला लटकलेले प्रेत. मी माझे पाय मागे घेतले आणि तिथून धाव घेतली.
मी धावत धावत लग्न मंडपान आलो होतो इंथे सा , प्रतावरावांच्या मृत्यूच्या बातमीने धुमाकूळ घातला होता , वटवृक्ष वाडीचे रहस्य मला जाणून घ्यायचे होते. रावसाहेब आणि वाड्यातील काही लोक प्रतापरांवाच्या देहाला घेऊन झाली होती. एकीकडे लग्नाचा होम धगधगत होता तर दुसरीकडे चिंता जळणार होती रत्नामाईच्या रडण्याचा आवाज सातव्या आकाशात ठेपला होता. मी वाड्याच्या आत जाण्याचे ठरवले. मी वाडीत शिरलो, संपूर्ण वाडी ही भयावह वातावरणात होती , किती तरी वर्षांपासून ही वाडी बंद होती पण साध्या उंदराची देखील इथं वावरण्याची मजाल दिसून येत नव्हती, मी चारही बाजूनी नजर फीरवत होतो तर मला एक फोटो दिसला. जो जाधव कुटुंबाचा व यांच्या सोबत सर्व नोकरांचा होता , त्यात मला एक लीला मावशीचा फोटो दिसला तीच्या सोबत एक को चेहरा होता जो मला माहीती होता तो म्हणजे सुधाकर सरपोतदार यांचा मी मागील काही वर्षापूर्वी यांना भेटलो होतो, आता त्यांची शारीरीक ती फार हालाकची असेल पण या वाडी बद्दल पूर्णता सांगणारे हेच एक व्यक्ती असावे असे मला वाटत होते.
सुधाकर सरपोतदार यांचे नाव अनेकदा प्रतापराव घेत असत. प्रतापराव सांगायचे सुधारकर हा हल्ली नागपूरला रहायला असतात. नागपुरात कामठी विभागान राहतात. म्हणजे त्यांच्या फोनवर संवाद होत असणारच मला प्रतापरावांचा मोबाईल चेक करायला हवा. प्रतापरावांची अंतीम विधी होऊ देऊ नंतर आपण कामाला लागू. असा विचार मनाशी बाळगून मी रावसाहेबांच्या मदतीला गेलो. गावातील प्रतापरावांच्या मृत शरीराला घेऊन स्मशानात घेऊन नेले होते. माझ्या डोळ्या समोर प्रतापरावांची चिता ही जळत होती. ती रात्र उलटली जाधव सदन पुर्णता भयावह झाले प्रतापरावांनी जाधव निवासावर खूप मोठे लोण घेतले होते आणि त्या परीस्थीत रावसाहेबांकडे इतकी रक्कम जवळ नव्हती की ते लोन फेडू शकतील या कारणाने त्या घरावर बँकेची जप्ती येणार होती म्हणून सर्व सदस्यांनी वटवृक्ष वढीच रहायला जायचे ठरवले.
राहण्याचा प्रश्न हा त्यांचा व्यक्तगित होता. त्यांच्या मध्ये हस्तक्षेप करणे मला योग्य वाटले नाही. महेश - निशा, रावसाहेब - रत्नामाई घरातील तिन नौकर आणि रावसाहेबांच्या दोन मुली मनिषा आणि राधा त्यादेखील शहरातून महेशच्या लग्नासाठी आल्या होल्या असे सर्व वाडीत रहायला गेले. रावसाहेबांनी मला म्हटले पण मला दुसरे काम होते म्हणून मी त्यांना नकार नाही दिला पण काही दिवसांनी सहाय्यता करायला येणार असा शब्द दिला, मी त्यांना वाड्यावर सोडून दिले पण आता जाण्याची हिम्मत होत नव्हती. तेथे उपस्थीन पिंपळाकडे बघीतले तर मी पाहीलेला भ्रम असेल की वास्तव असा विचार मनात आणला आणि थेट प्रतापरावांचे घर गाठले. प्रतापरावांच्या घरांची झडती घेतली त्यांचा मोबाईल तपासला मात्र हातात पडली ती नीराशा. मी हताश होऊन बसलो होतो तेवढ्यात माझी नजर तेथील बाकावर असलेल्या फोटो अल्बम कडे गेली तर त्यातील फोटो पाहत बसलो अल्बमचे पान पलटत असताना त्यातील एका पानावर सुधारकरावांचा फोटो दिसला मो फोटो अल्बमच्या बाहेर काढला तर त्या फोटो मागे एक नंबर होता. हा नंबर सुधाकर रावांचा असेल का ? असा विचार करून त्या नंबर वर कॉल केला.
पवन - हॅलो सुधाकर सरपोतदार आहेत का?
कुणाल - नाही ! बाबा आराम करत आहेत. मी त्यांचा मुलगा कुणाल.
पवन - दादा माझं नाव पवन सरनाईक भी संग्रामपूरवरून बोलत आहे.
कुणाल - बोला ना. काही संदेश द्यायचा का?
पवन - हो ! एक दुःखाची बातमी आहे.
कुणाल - कोणती?
पवन - तुझ्या वडीलाचे मित्र प्रतापराव जाधव यांचे निधन झाले.
कुणाल - अरेरे ! मी बाबांना सांगेल.
पवन - हो सांग ! पण तुम्ही आता कुठ असता.
कुणाल - आता आम्ही नाशीकला राहतो क्रांती नगर मध्ये वॉर्ड क्र.07. २८ क्रमाकांचे घर आहे.
पवन - मी येणार भेटायला लवकरच.
कुणाल - अच्छा ! नक्की या आपले दादा स्वागतच आहे.
मि फोन ठेवला आणि लगेच नाशिकला जाण्याची तयारी केली. रावसाहेबांनी माझ्याकडे एक निरोप पाढावला होता. प्रतापरांवाच्या वैयक्तिक वस्तू मांगुन घेतल्या होत्या, मी लगेच त्यांनी पाठवलेल्या व्यक्तीजवळ प्रतापरावांच्या सर्व वस्तू पाठवून दिल्या आणि नाशिकची ट्रेन पकडली. पुढील काही तासान मी नाशीकला पोहचलो आणि शरीराने जास्त मेहनत घेऊन सांगीतलेल्या पत्यावर जाऊन ठेपलो. मी दरवाजा ठोठावला.
पवन - नमस्कार मी पवन संग्रामपूरवरून आलो सुधाकर साहेबाना भेटायला ते आहेत का घरात?
कुणाल - या आत या मी कुणाल त्यांचा मुलगा बाबांना घेऊन येतो. बसा.
थोड्याच वेळात एका व्हील चेअर वरुन एक गृहस्थ आले हे सुधाकर राव असावे असे दिसते. मी माझा परिचय करून दिला. आणि प्रतापरावांच्या निधनाची बातमी सांगीतली. मला सुधाकर रावांच्या सोबत एकांतात बोलायचे होते मी त्यांची सहमती घेतली आणि घराच्या गच्चीवर कुणालने दोन खुर्च्या लावल्या आणि आम्ही निवांत बसलो बसलो म्हणून
पवन - साहेब प्रतापरावांचा मृत्यू हा नैसर्गीक नव्हता. खरे सांगायचे तर त्यांनी माझ्याजवळ प्राण सोडले होते. त्यांना तड़फत असतांना पाहून असे वाटत होते की कोणती अदृष्यशक्ती त्यांचा गळा दाबत आहे.
सुधाकर - असेल काही दिवसापासून मला देखील वाईट स्वप्न पडत आहेत. जे कृत्य आम्ही भूतकाळात केले त्याच फळ भेटत असेल. पण माझ्या कानावर तर वेगळी बातमी आली होती , प्रतापनेवाडी समोर उभे राहून स्वःता स्वःताचे डोके धळावेगळे केले म्हणून.
पवन - हो माझ्या ऐकण्यात आले. मी सुद्धा विचारात आहे की माझ्या डोळ्यासमोर प्राण सोडणारा व्यक्ती हा जिंवत होऊन आत्महत्या कशी करू शकतो. याचेच गृहीत माहीती करणासाठी मी तुमच्या कडे आलो.
(सुधाकर रावांना भी प्रतापरावांनी सांगीतलेले व लिला मावशीने सांगीतले सर्व काही प्रगट केले.)
सुधाकर - पवन प्रतापने जे काही सांगीतले ने साफ खोट आहे, पण लिलाचे शब्द सत्य जरी असले तरी त्यात तफावत आहेच. रेखांच्या हत्येचे कारण फक्त मीच सांगू शकतो. कारण की त्यावेळी वाडीत झालेल्या नरसंहारचा मीच साक्षीदार आहे.
त्या दिवशी काय घडले सांगतो ऐक आबाच्या खोलीत रत्ना आणि प्रताप आबाच्या संपत्तीला खिंडार फोडण्यासाठी होते. प्रतापने त्यांचा खून केला आणि तो खून रेखाने बघीतला. लिलाने आवाज काढला असता तर ति देखील दिवंत नसती दिसली. म्हणून मीच तिच्या डोक्यावर वार केला आणि तिला बेशुद्ध करून टाकले. आबा साहेबच्याखोलीत आबासाहेब धाराशाही पडले होते. रेखा त्यांना सावरायला गेली मात्र काही उपयोग नव्हता आबांनी प्राण सोडले होते. रत्नाने आपल्या खांदयांचा पदर सोडला आणि त्याच पदराने रेखाचा गळा आवळला. रेखा तडफत होती. मला रत्नाच्या डोळ्यात एक असुरी आग दिसत होती. रेखाचा जीव घेतांना रेखाच्या 12 महिण्याच्या पोराचा देखील विचार केला नाही रेखाच्या सरते शेवटचे शब्द आजही कानावर आदळतात "माझ्या मुलाचा चेहरा भी मरतांना नाही पाहू शकतं. मला ठार मारणार्यांनो तुमच्या वंशाचा दिवा देखील जिवंत राहणार नाही. मी याचा सुड घेतल्याखेरीज या वाडीतून जाणार नाही. तीचे शब्द अर्धवट राहीले आणि तिचे प्राण पाखरू उडून गेले. आबाचा अंगठा कागदावर आला होता. आता सर्व संपत्ती रत्नाच्या मालकीची होती. संपूर्ण संपत्ती आपल्या नावावर झाली याने रत्नाचा आसूरी आनंद संपुर्ण वाड्यात धूमू लागला. तीचा आसूरी आनंद आणि तिने दीलेला आदेश .
"प्रताप आज पासुन या सर्व संपत्तीची मी एकटीच मालकीन आहे. तुम्ही सर्व माझे गुलाम आहान . सुध्या जा आणि या रेखाच्या मुलाचे प्राण हरवून आन. जा निधून इंचून ."
संपत्ती मिळण्याच्या ओघात रत्नाच्या अहंकार सातव्या आकाशाम होता, रत्नाने त्या संपतीसाठी कितीतरी बळी दिल्या होता अशा अनेक परीवारातील सदस्यांचा अजूनही पता नाही ते आहेत की रत्नाच्या महत्त्वकांक्षेच्या बळी चढले.
पवन - सुधाकरराव पण रेखाला तर मुलगी होती ना मिना नावाची. आणि तुम्ही सांगत आहात की तिला मुलगा होता.
सुधाकर - नाही , मिना रेखाची नाही लीलाची मुलगी लिलाच्या डोक्यावर जेव्हा मी वार केला होता त्यावेळी मीना रडत होती तेव्हा रत्नाच्या भावाने मिनाला ठार केले.
ते दोघे बहीण फार मोठे कारस्थानी आहेत.
पवन - बरं ! ते सोडा पुढे काय झालं . रेखाच्या हत्येनंतर.
सुधाकर - हो ! रेखाची हत्या झाली होती, मीच या हातानी रेखाचे शरीर पिंपळाला लटकविले होते याच हाताने मिनाला वाड्याच्या मागे गाढले होते, मीच आबाचे शरीर वाडीत रोवले होते.
पवन - पण असे काय झालं की जाधवांना वाडी सोडावी लागली?
सुधाकर - सांगतो सर्व काही सांगतो.
आज रेखाच्या मृत्यूला 6 महीने झाले होते. वाडीत रावसाहेबांच्या बहीणीचा अर्थात शिलाचाताईचा साखरपुडा होता, घरात सनई चौघडे वाजत होते. कार्यक्रम रंगला होता तेवढ्यात शिला घाबरत घाबरत वाड्याच्या बैठकीत आली तिचे शरीर रक्ताने बांभाळ झाले होते तीचे दोन्ही हात शरीराच्या वेगळे फेकले होने तीने मरता - मरता सांगीतले की तिला रेखाच्या आत्म्याने मारले ही बातमी ऐकताच संपूर्ण वाडा भयाच्या छायेत गेला. तेवढ्यात शिलासाठी पसंत केलेला मुलगा याने वाड्याच्या छतावर जाऊन आत्महत्या केली. घरातील नोकरांनी पळ काढायला सुरुवात केली. सोयरे , नोकरवर्ग सर्वानी वाडा खाली केला, पण मेलेली व्यक्ती परत येणार कशी हा प्रश्न होता. म्हणून रावसाहेबांनी पोलिस स्टेशनला ही बातमी दिली काही क्षणातच पोलीस अधिकारी वाडीत आले त्यावेळी रावसाहेब , रत्ना , प्रताप , मी , प्रतापरावाच्या बहीणी , रत्नाचा भाऊ विराज त्यांची पत्नी नैना, रत्नाच्या जावाई विलासराव त्याचे पत्नी रंजना , रंजनाचा भाऊ अशोक आणि विलासच्या मुली स्वाती , रती आणि मुलगा सीध्दार्थ हे सदस्य हजर होते .
वंदना आणि तीच्या न झालेल्या पतीची इत्या झाली की आत्महत्या हे कळतं नव्हते. रात्र संपली होती. सुर्याचा प्रकाश वाडीत आला होता. झालेला प्रकार हा भीतीदायक होता. म्हणून विलासरावांनी आपल्या मुलांना परत सांगीतले. ते चार चाकी गाडीने जातांना त्यांचा अपघात झाला अशी बातमी आली पोलिस तपासात या अपघाताचे कारण कळले नाही . पण या अपघातात अशोक , स्वाती रती व सिद्धार्थ मृत्युमुखी पडले असे कळले होते. दु : खाचे दिवस जात होते. एक दिवस वाडीत विलासराव बगीच्यात मौन बसले होते रत्ना त्यांच्यासाठी चहा घेऊन येत होती अशोक चाकूने सेफ कापत होता मी आणि महेश गच्चीवर बसून होतो. तेवढ्यात रंजनाचा आवाज ऐकला तिची कींकाळी खूप भितीदायक होती. आम्ही पाहीले तर विलासने तिची मान पकडून हवेत टांगले होते. अशोक हात सोडविण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्याला यश मिळत नव्हते. माही रखाली जायला निघालो जेव्हा आम्ही गार्डन मध्ये पोहचलो तर रंजना व अशोक गेले होते. विलासरावांनी आमच्या डोळ्यासमोर स्वःताचा गळा कापला हा प्रकार पाहून सर्वांना भितीचा धक्का बसला . हा प्रकास अदृष्यशक्तीचा आहे असे यांना वाटले म्हणून त्यांनी कोणत्या तरी गावान तांत्रीक बोलाविला. त्या तांत्रीकाने मला एकमात बोलाविले आणि सांगीतले की रेखा नावाच्या महिलेच्या आत्म्याला शांती देण्यापर्यन हा मृत्यूचा खेळ थांबणार नाही. तिच्यासोबत काय घडले हे सविस्तर सांग , मांत्रीकाचे शब्द कानावर पडताच मी स्तब्ध झालो. मी विचारात पडलो की यांना कसं माहीत. तेवढ्यात त्यांचा पारा चढला आणि रागाने त्यांनी पुन्हा कल्ला केला मी घाबरलो व त्यांना सांगायचे ठरवले.
महाराज या वटवृक्ष वाडीत खूप मोठे गुप्त धन आहे. हे धन प्राप्त करण्यासाठी आम्ही सर्वांनी हे कारस्थान केले होते त्या रात्री रावसाहेबांना बाहेर नेण्याचे काम स्वाती, रती आणि सिद्धार्थ यांनी केले होते. महेशला गुंगीची औषध मंदाने दिली. विलासराव, अशोक यांनी आबाला आणि रेखाला मारण्याच्या शडयंत्रात आम्हाला साथ दिली होती रंजना व रत्नाच्या बुद्धीच्या जोरावर आम्ही हे पाप केले. महाराज आम्हाला यातून सोडवा.
मांत्रीक : ज्या दिवशी तुम्ही घणरत्या केली तिरात्र अमावस्थेची होती एका बाळाला आई पासून तोडले हे पाप क्षमादायी नाही रेखा कुणालाच सोडणार नाही. तुम्हा सर्वांचा अंत निश्चीत आहे.
सुधाकर : महाराज असे नका म्हणू? काहीतरी उपाय सुचवा आम्ही जो काही खर्च येणार मोजायला तयार आहे पण आमचा जीव वाचवा.
तांत्रीक : खर्च, तो तर खूप आहे. पण तुम्ही पूर्ण करणार?
सुधाकर : हो महाराज आम्ही पूर्ण करू.
तांत्रीक : तुम्ही म्हटले की या वाडीत गुप्त धन आहे.
सुधाकर : हो
तांत्रीक : तर त्या धनाचा अर्घावाटा माझा.
सुधाकर : काय ? अर्धा हिस्सा, मी. विचारून सांगतो.
असे म्हणून मी सर्वांना भेटलो आणि एका मताने त्या मांत्रीकाला धनाचा अर्भावाटा द्यायचा असे ठरले. मांत्रिकाने वाडीत पूजा करायला सुरुवात केली सर्वत्र मंत्राचा उच्चार होत होता संपूर्ण वाड्यात गर्जना सुरु झाली. अचानक एक प्रकाश मांत्रीकाच्या हातात आला त्याने तो प्रकाश एका डब्यात टाकला आणि तो डबा वाड्याच्या दरवाजाजवळ रोवले आणि प्रताप मी, रत्ना, विराज, नैना, सुनंदा आणि मांत्रीकाने गुप्त धन बाहेर काढले. वाड्यात दडलेले हे धन बाहेर काढल्यावर आम्ही सर्व त्या धनाच्या बाजूने होतो. तेवढ्यात दोन आवाज आले ते म्हणजे मांत्रीक व सुनंदाचा त्या दोघांच्या पाठीत रत्नाने तलवारी घातल्या होत्या. धनासाठी आम्ही मानसातून राक्षस कसे झालो कळलेच नाही.
पवन : सुधाकरराव जे कृत्य तुम्ही केले त्यांचे प्रायश्चित करायला हवे तुम्ही आधी वंदना व सुनंदा यांचा हात कसा होता रेखाला मारण्यामागे.
सुधाकर : आबाची संपत्ती रत्नाच्या नावावर करायची आणि नंतर रत्नाला ठार मारायचे असा बेत होता त्यांचा पण याची चाहूल अगोदर लागली होती. रत्नाने सुनंदाला मारले तिधून धनाच्या कढ़या घेवून निघून गेली. सुनंदा हीचा त्रास मला पाहविण्यासारखा नव्हता. मी सर्वांच्या लपून तिला हॉस्पीटल मध्ये नेण्याचे ठरवले. रस्त्याने जानांना माझ्या गाडीचा अपघात झाला आणि माझे पाय त्या अपघातात निष्क्रीय झाले. माझ्या कर्माचे फळ मला मिळाले. तुझ्या सांगण्याप्रमाणे रेखाला कोणीतरी मुक्त केले असेल. पवन काहीपण कर रेखाला मरून 20 वर्ष होतात. 20 वर्ष तिचा आत्मा कैदेत होता ती आता राग सातव्या आकाशात असेल. तिच्यासमोर कुणाचेही टिकणे कठीण आहे. तुच आता जाधवांना वाचवू शकतो.
पवन : सुधाकर भाऊ मी पूर्ण प्रयत्न करेल. मला आता जायला पाहीजे आणि जाधव घरातील सदस्यांना वाडीच्या बाहेर काढले पाहीजे.
एवढे बोलून सुधाकररावांचा निरोप घेतला आणि संग्रामपुर गाठले. मि वाडीत शिरलो त्यावेळी सर्व शोक दर्शवत होते. रावसाहेब एका कोपऱ्यात बसले होते. मी त्यांच्या खांदयावर सान्तवणेचा हात दिला
पवन : रावसाहेब चिंता कशाची करत आहात. सर्व काही ठीक होणार. आज नाही उद्या ही संकटाची काळे ढळ जाणारच.
रावसाहेब : माझी चिंता आहे रेखा, ती पुन्हा मुक्त झाली तिला शांती भेटेस्तोर रक्तपात होणारच.
पवन : रावसाहेब , आपल्याकडे कोणता उपाय असेल तर सुचवा मी नक्की त्यावर काम करणार.
रावसाहेब : पवन तुला काशीला जावं लागेल आणि तिथं केशव गुरुजी राहतात. त्यांना इथेसा घेऊन याव लागेल.
पवन : ठिक आहे रावसाहेब , मी आताच निघतो.
एवढे बोलून मी काशीला जायला निघालो.
वटवृक्षवाडीत सर्व सदस्य आपल्या कामात होते. काही दिवस शांततेत गेले आज अमावस्या होती वाडीच्या बाहेर कुंत्री भुंकत होती. निशा अंघोळ करून आलि आणि आरसासमोर केस कुरवाळत होती तेवढ्यात तिचा गळा कोणीतरी पकडल्यासारखे भासले. भितीच्या पोटी निशा घामाघूम झाली होती. ती मागे वळून बघते तर महेश होता. महेशची थट्टा खूप महागात गेली होती निशा रागारागात घराबाहेर पडते आणि महेश निशाची क्षमा मागत होता. तेवढ्यात एक किंकाळी सर्वाच्या कानात घुमली को आवाज होता नैनाचा. महेश आणि निशाची नजर नैनावर पडताच यांच्या पायाखालची जमीन निसडून गेली होती कारण की यानी बघीतले की नैनाने आपल्या हाताने गळा कापत होती व एक नीशाचराचा आवाज काढत होती.
घरातील सर्व सदस्यांच्या मनात आता भिती दाटली होती विराजने नैनाला वाचविण्याचा खूप प्रयत्न केला मात्र नैनाने उलट विराजच्या छातावर बसून त्याचे रक्त पिण्यास सुरवात केली इतर सदस्यांनी वाडी सोडण्याचा प्रयत्न केला पण वाड्याचे दरवाजे बंद झाले. कोणीही बाहेर जाण्यास सक्षम नव्हते. नैना आणि विराज तडफडत तडफडत मृत्युमुखी पडले. हा प्रकार पाहून रावसाहेब, रत्ना, महेश, निशा, मनिशा आणि राधा खूप घाबरले होते. संपूर्ण वाड्यात एका स्त्रीचा भावाज धूमत होता. तेवढ्यात तो आवाज बंद झाला. अचानक वाडीत प्रकाश पडला होता. वाडीचा दरवाजा आपोआप उघडला होता. दरवाजावर केशव गुरुजी सोबत त्यांचे शिष्य आणि मी उभा होतो. आम्हाला पाहून रावसाहेब यांच्या जिवात जिव आला. केशव गुरुजी मंत्रीत पाणी वाड्यात शिपडत होते आणि जोरजोरान मंत्र जप करत होते. त्यांच्या शिष्यांनी वाडीतच होम बनवायला सुरुवात केली. ज्या पद्धतीने गुरुजीचा मंत्राचा उच्चार वाढत होत त्याच पद्धतीने एक अदृष्य आकार समोर येत होता. काही क्षणातच गुरुजीनी भस्म त्या आकाराकडे फेकले आणि एक अदृष्यशक्ती समोर आलि ति रेखा होती . गुरुजीनी आपल्या शक्तीच्या जोरावर तीला विचारले.
गुरुजी : कोण आहेस तू? आणि का या निष्पाप जीवावर उठली. काय घोड मारलं तुझं यांनी.
रेखा : कोण निष्पाप हे ज्यांनी स्वःताच्या स्वार्थासाठी या वाड्यात कितीतरी हत्या केल्या.
रावसाहेब : रेखा , तू तर आत्महत्या केली होती. तु का सर्वाना मारत आहेस.
रेखा : मालक भी आत्महत्या नाही केली तर माझी हत्या झाली.(रेखाने रत्ना आणि तिच्या साथीदाराचे सर्व कटकारस्थान सांगते जे ऐकून सर्व हैराण होतात.) रत्नाचे पीतळ उघडे पडतात रत्ना वाड्यातून पळ काढते रेखाला गुरुजीनी आपल्या मंत्र शक्तीने बंदिस्त केल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती म्हणून मी आणि निशा रत्नाचा पाठलाग करायला लागलो. रत्नाने वाड्याच्या बाहेर पाऊल टाकले निशाने वाड्याचा दरवाजा बंद केला. ज्याने वाड्यातील सदस्य बाहेर पडता कामा नये. ज्या झाडावर रेखाला लटकाविले होते तेथेच रत्ना येऊन थांबली.
रत्ना : निशा - पवन माझा मार्ग अडवू नका माझे हात अनेक लोकांच्या हत्येने भरले आहेत मग तुमची हत्या करायला मी मागे नाही सरणार.
निशा : कुणाचा जिव इतका स्वस्त नाही. तुला केलेल्या कृत्यावर प्रायश्चित करावं लागेल.
रत्ना : निशा विसरू नको मी तुझी सासू आहे. मला मारले तर महेश तुला माफ नाही करणार.
निशा : महेशला कळेल तेव्हाच. त्याला माफ करणार की नाही हा प्रश्न निर्माण होतो. पण तुला आता कोण वाचविणार.
निशाचे आणि रत्नामधे धरपकड सुरु झाली वाडीत गुरुजीनां साधना करून रेखाला शांती देण्यास यश मिळाले होते. हा प्रकार अत्यंत विकृत होता . निशाआणि मी रत्नाला घेरून घेतले होते. तेवढ्यात जाधव घरातील सर्व सदस्य अंगणात आले.
रावसाहेब : रत्ना तु कितीतरी गुन्हे केले पण का ? आणि कशासाठी?
रत्ना : गुन्हा नाही , मी तीन मुलांच्या बापासोबत लग्न काय फक्त संसारासाठी नाही केले. माझ्या डोळ्यासमोर होती तुझी संपत्ती. माझी नजर होती तुझ्या संपत्तीवर पण या रेखाने सर्व चौपट करून टाकले आणि आज या निशाने.
तेवढ्यात पोलिस अधीकाराची गाडी वटवृक्ष वाड्यात येऊन ठेपते आणि सर्वांच्या साक्षीने रत्नाला न्यायालय मृज्यूदंड सांगतो. न्यायालयाच्या बाहेर निशा व मी पायरीवर उभा होतो. रत्नासोबन संवाद साधायला.
पोलिस अधिकारी रत्नाला घेऊन न्यायालयाच्या बाहेर आलेत. निशा आणि मी रत्ना जवळ गेलो होतो. आमच्या पासून खूप दूर रावसाहेब आणि महेश गाडी घेऊन उभा होता.
रत्ना : पवन तु माझ्या विरोधात जाऊन योग्य नाही केले. जर का तुम्ही माझा मार्ग अडविला नसता तर मी आज कायद्याच्या हातात सापडली नसती.
निशा : रत्नामाई लाज बाळगा जो गुन्हा तुम्ही केला त्यासाठी फाशी ही खूप लहान शिक्षा आहे माझ्या हाती असते अशा अवस्थेत आणले असते कि जेथून कोणीच पैशासाठी आईपासून मुलीला दूर करण्याची प्रयत्न केला नसता.
रत्ना : काय ? काही कळलं नाही. तुला काय म्हणायचे आहे.
निशा : मी निशा नाही , काकासाहेबांची लेक निशा तर दहा वर्षापूर्वी अपघातात मृत्यूला समर्पीत झाली होती.
रत्ना : तर मग तू कोण आहेस?
निशा : मिना लिलाची मुलगी.
रत्ना : मिना ? पण विराजने तर ..
निशा : हो ! विराजने माझ्या डोक्यावर वार केला होता पण मी फक्त शुद्ध हरवून गेली होती. सुधाकरची मला मारायची हिं मत झाली नाही. त्यांनी मला संग्रामपूरच्या महादेवाच्या मंदीराजवळ सोडले. तेथून काकासाहेब मला घेऊन गेले. महेशला माझ्या प्रेमात पाडण्याचा हेतू हाच होता. मी तुझ्या घरात प्रवेश करू शकणार. जेा मी तुझ्या घरात आली त्या वेळी पदोपदी तुझ्या याच कर्माची फळ देण्यासाठी कार्यरत राहीली. आबाचे मृतशरीर वाड्यातच आहे. हे सुद्धा मीच पोलिसांना सांगीतले. तुझ्याविरोधी सर्व पुरावे पवनच्या मदतीने जमा करून आज तुला तुझ्या कर्माची फळ देण्यास मला यश मिळाले.
एवढे बोलून निशाने ती जागा सोडली आणि महेशजवळ जाऊन उभी राहीली नंतर काही क्षणातच रावसाहेब आणि त्यांचे कुटुंब रत्नाला पोलिसांच्या आधीन करून तिथून निघून गेले. मि उभा होतो शांतपणे तेवढ्यात रत्नामाई ने मला विचारले.
रत्ना : पवन, मी तुला पोटच्या पोरासारखे जपले, तुला कधीच हीनवले नाही. पण तु देखील मला दगा दिला. का ?, सांग पवन तु मला दगा का दीला.
पवन : मी तुला दगा का दिला. तुला फासावर चढविण्यात मी योगदान का केले. का मी तुझ्या दुष्कर्भातील साथीदारांना वाचविण्याचा प्रयत्न नाही केला. याचे फक्त एकच उत्तर आहे . तुमच्या सारख्या मानवरूपी राक्षसांचा अंत होत होता तेव्हा मी शांत का होतो. विराज, नैना, विलास, रंजना सारख्या पापी मानवांना मि वाचवू शकत होतो. जेव्हा वाडीत रेखाचा आवाज आला त्याच दिवशी केशव गुरुजीना आणल्या गेले असते. पण मला इतक्या सहजी तुम्ही केलेल्या पापातून सुटका होऊ दयायची नव्हती. तुमच्यासारख्या विकृतीला संपायला पाहीजे.
रत्ना : पण का ? का माझ्या सुडावर होता.
पवन : कारण की ज्या रेखाची घृणहत्या तुम्ही केली मी तिचाच मुलगा आहे.

