Pavan Pawar (देशमुख)

Abstract Horror Action

2.9  

Pavan Pawar (देशमुख)

Abstract Horror Action

सावली (अंतिम भाग)

सावली (अंतिम भाग)

13 mins
213


पवन ने लिहिलेले डायरी विजयने वाचली सावली ही कोण आहे. एक चेटकिन किंवा एक आयुर्वेदाचार्य. ब्रिटिश अधिकारी जॉन केअर यांनी सावलीला एक आयुर्वेदाचार्य म्हटले होते. याची शहानिशा करावी या उद्देशाने विजयने जॉन केअर यांनी लिहिलेले The Way of Ayurveda हे पुस्तक मागून घेतले. रात्र खूप झाली होती विजय द वे ऑफ आयुर्वेद हे पुस्तक वाचत होता. तेवढ्यात त्याला एक फोन आला तो फोन होता त्याच्या वडिलांचा. अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्याला परत गावी जायचे होते. तो रात्री आपल्या बाईकने गावी जायला निघाला. जाता जाता रस्त्यामध्ये काही लोक गर्दी करून बसली होती. विचारल्यावर असे कळाले की. पुढील काही अंतरावर अपघात झालाय आणि जवळपास समोर तीन किलोमीटर ट्रॅफिक अडकून बसली. कोणीतरी त्याला सांगितले की खालच्या रस्त्याने जा. त्यामुळे विजय हा खालच्या निघाला खूप वेळ झाला होता विजय बाईक चालवत होता. अचानकच एक तरुण मुलगी त्याला रस्त्या दिसली बहुतेक कोणाची मदत मागत होती. विजयने तिला बघून मोटर सायकल थांबवली आणि तिच्या जवळ गेला. "काय झालं ताई आणि एवढ्या रात्री या भयानक जंगलात आपण एकट्या काय करत आहात" विजयने विचारलेला प्रश्न हा अत्यंत सहानुभूतीचा होता विजयच्या प्रश्नाचे उत्तर त्या तरुणीने दिले. "मी आणि माझे मित्र माथेरान साठी जात होतो तर अचानकच रस्त्यामध्ये अपघात झाला म्हणून आम्ही या कच्च्या रस्त्याने पुढे निघालो मात्र या रस्त्यावर जात असताना आम्ही मूळचा रस्ता विसरलो. काही अंतरावर आमची मोठी गाडी बंद पडलेली आहे. मदतीसाठी आम्ही कुणाला तरी शोधत होतो. तर देवाच्या कृपेने आपण भेटला. कृपया आपण आम्हाला योग्य मार्ग दाखवा जेणेकरून आम्ही हायवेवर जाऊ शकणार". माथेरानला जात आहोत हे शब्द ऐकून विजय सुन्न पडला होता अचानक त्याच्या डोळ्यात आणि डोक्यात पवन ने लिहिलेली की डायरी आली. आपण सुद्धा रस्ता विसरलो की काय असे त्याला वाटले. त्याने मागे वळून बघितले तर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. ज्या रस्त्याने तो आला होता आता तो रस्ता लुप्त झाला होता. त्याच्या मागे फक्त जंगल होते. त्याने समोर बघितले तर आणखी भीतीदाय घटना त्याच्यासोबत घडली तो जंगलात होता त्याची बाईक जंगलामध्ये अडकली होती. विजय भीतीमुळे चांगलाच थरारला होता. जी मुलगी आपल्याला भेटली. ती आता अदृश्य होती. आपण सावलीच्या जाळ्यात अडकलो. याची खात्री विजयला पटली होती. तेवढ्यात जंगलातून काही तरुणांचा आवाज विजयच्या कानी पडला. विजय त्या आवाजाच्या दिशेने धावत निघाला. काही तासाने तो त्या ठिकाणी पोहोचला तर काय बघतो कॉलेजची काही मुलं पळत होती विजय त्यांच्यासमोर उभा झाला. पण ही मुलं आहेत की त्या सावलीने रचलेली एखादी माया. तेवढ्यात एक मुलगा विजयाच्या समोर आला आणि त्यांनी विजयला विचारले."कोण आहात तुम्ही आणि आम्हाला का मारण्याचा प्रयत्न करत आहात. आम्ही काय बिघडवले तुमचे. आम्ही तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. त्या तरुणांचे ऐकलेले प्रश्न विजयला शाश्वती देत होती ते तरुण निर्दोष आहेत त्यांचा आणि सावलीचा काही एक संबंध नाही. "घाबरू नका माझं नाव विजय आहे. आणि मी लोकशाही या वर्तमानपत्रात पत्रकार आहेत. मी गावाकडे जात होतो अचानक रस्ता चुकलो आणि इकडे आलो तुम्ही कोण आणि इथं कसे आहात. विजय कडून झालेली विचारपूस त्या तरुणांच्या मनात एक भावनिक आधार निर्माण करून गेली होती.. त्या तरुणाने सांगीतले की त्याचे नाव अर्जुन आहे. आणि ते सर्व मित्र माथेरानला जात होती आणि या जंगलात रस्ता विसरले. त्यांनी एका महिलेचा मृतदेह बघीतला होता. म्हणून ती ओरडत ओरडत जंगलामधे सैरा- वेरा धावत होती. विजयने त्यांना विचारले तुम्ही कुठ मृतदेह बघीतला ती जागा मला दाखवा, या अनुशंगाने अर्जुन व त्याचे मित्र विजयला घेऊन जंगलात फिरू लागले. काही वेळात ते शालीनी गेस्ट हाउस जवळ येऊन थांबले. शालीनी गेस्ट हाउस नावाची पाटी चांगलीच चमकत होती. तेवढ्यात एक व्यक्ती लंगडत - लंगडत बाहेर आला , हा राघव होता. त्याने म्हटले " नमस्कार साहेब , मी राघव या गेस्ट हाउसच केअर टेकर आपले आमच्या आलिशान गेस्ट हाऊसमधे स्वागत आहे ". राघवची नजर तिव्र होती. त्याच्या वाणीत एक कटाक्ष दिसून येत होता, " पुजा म्हणाली बरं - बरं तु कोण आहे याच्याशी आम्हाला काय ? आमच्या बॅग घेऊन जा. तीच्या शब्दावरून ती अहंकारी दिसत होती अर्जुन विजयच्या बाजुला बसला होता. त्याने विजयला सांगीतले की त्यांनी मृतदेह याच ठीकाणी पाहीला होता. सोनम आणि तो या गेस्ट हाऊस मध्ये फीरत होता त्यावेळी त्याने एका मुलीचा मृतदेह बघीतला , पण त्याचा विश्वास कोणी करत नव्हते. विजयला हे ऐकून अर्जुनवर विश्वास करावा की नाही याचा बेत होता, तेवढ्यात एका मुलीची मधूरी वाणी त्यांच्या कानात आली. साहेब, गरमा - गरम चहा घ्या. अर्जुन तिच्याकडे बघीतले आणि विजयचा हात आपल्या हाताने घट्ट पकडला. कारण की ही तीच मुलगी होती जीचा मृतदेह अर्जुनने काही वेळापूर्वी पाहीला होता, तिला जीवंत पाहून अर्जुनची दातखीळी बसली होती. तिला बघीतल्यावर आपण काय बोलावे आणि काय बोलू नये यांच्याच भ्रमात तो फसला होता. तिने चहा दिला आणि ती तेथून निघून गेली. विजयच्या हाताचा त्याने चांगलाच खुळखुळा काढला होता. विजयला कळले की काहीतरी विपरीत आहे तेव्हा अर्जुनने सांगीतले की त्या स्त्रीचा मृतदेह त्यांनी पाहीला होता ही हीच आहे , हे ऐकून वीजय आणखीच घाबरला पण त्यांने आपली भीती लपवून ठेवली. विजयला काय करावे सुचत नव्हते तेवढ्यात त्याला दैत्यमंदीराची पळआठवण झाली. तो तडकाफडकीने उठला आणि एकटाच रस्त्याने निघाला तेवढ्यात अर्जुन त्याच्या मागे निघाला. अर्जुन आणि विजयला बाहेर जातांना पाहून सोनम त्यांच्या मागे जायला निघाली. विजय खूप घाई घाईत पाऊले उचलत होता आणि अर्जुन त्याला हाका मारण्याचा प्रयत्न करत होता. पण विजयचे पाय दैन्य मंदीरात येऊन थांबले. मंदीर वसान होते आता मंदीराची देखरेख करणारा कोणी नाही असा विश्वास विजयच्या मनात आला. विजयने मंदीरात प्रवेश केला आणि तेथील प्रत्येक घटका कडे संशयी नजरेने बघत होता. विजयला काहीतरी शोध घेतांना पाहून अर्जुन आणि सोनम एका कोपऱ्यात मौन धारन करून बसले. तेवढ्यात विजयच्या तोडांतून काही शब्द निघाले "अर्जुन इकडे ये " बघीतले तर तेथे एक तळघर होते. दोघांनी मिळून ते तळघराचा दरवाजा उघडला आणी आत शिरले. आत होता तो अंधार. जणू अंधाराचे साम्राज्य त्या तळाघरात राज्य करत होते. अर्जुनने लायटर पेटविले आणि भिंतीवर असलेली मशाल पेटवली. व ते तिघे त्या मशालीच्या सहाय्याने पुढे चालत गेले. ते तळघरात जातांना त्यांना वेगळा अनुभव होत होता. समोर चालता चालता त्यांना एक दरवाजा दिसला त्यावर मंत्र लिहीला होता. तो मंत्र संस्कृत मधे होता आणि सोनमचे संस्कृतवर चांगले वर्चस्व होते. सोनमने तो मंत्र वाचला तर आश्चर्य झाले. बंद दरवाजा उघडायला लागला. आत जाता क्षणी त्यांना स्वताला एका खोलीत बंद असल्याचा अनुभव होत होता. त्यांच्या समोर काही तरी होते जे समोरच्या दगडावर प्रकाशीत होत होते. विजय समोर आला त्याने बघीतले तर त्याला तिथ एक पुस्तक आढळले. हा प्रकाश त्याचाच होता. पुस्तकावरील शिर्षकानेच प्रश्नाचे निराकरण केले होते. "सुटका सावलीच्या श्रापातुन" विजयने ते पुस्तक हाती घेतले आणि अर्जुन व सोनम कडे पाहीले. विजयच्या चेहऱ्यावर काहीतरी साध्य करण्याचा मानंद होता. विजयकडे पाहून आणि घडत असलेल्या घटना पाहून अर्जुन व सोनम चांगलेच घाबरले घेते. तेव्हा विजयने त्या दोघांना सर्व काही सांगीतले. सावलीबद्दल असं काही ऐकल्यामुळे ते दोघेही भीतीच्या सानिध्यात होते. मात्र विजय त्यांना घेवून बाहेर आला आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली. 


"जगाला निर्माण करणारे सर्व शक्तीशाली भगवंत यांच्या चरणी नमन करतो". लंकानगरीची तार रंकानगरीला कशी प्राप्त झाली ही खूप मोठी रहस्यमयी घटना आहे. मी महर्षी भारद्वज शुरकी. भूतकाळातील काही असुरीशक्ती येणाऱ्या भविष्यात उपद्रव माजविणार आहेत. त्यांच्या पासून वाचविण्यासाठी मनुष्याला आज सूचित करून हे लिखाण त्याच्या उपयोगी पडेल. तिन्ही लोकात उपद्रव माजवनारा म्हैशासुराचा आई दुर्गाने वध केला. पण त्याच्या अगोदर रक्तबिज नावाच्या दैत्याचा संहार केला. रक्तबीज ह्या दैत्याला वरदान होते त्याचे रक्त ज्या - ज्या ठीवानी पडेल त्या ठीकाणी त्याची प्रतिमा त्याचे प्रतिरूप तयार होईल. म्हणून दुर्गा मातेने कालिंकाअवतार धरून त्यांचा सर्वनाश केला. पण त्या युध्याच्या माध्यमातून रक्ताचा काही भाग हा लंकेतील पाण्याच्या डोहात पडला. ज्या रक्ताच्या जिवाला जमीनीचा स्पर्श झाला नाही. द्वापर युगान रावण वधाने लंकानगरी दोषमुक्त झाली. तेव्हा तेथे अनेक नवीन - नवीन वस्ती निर्माण करण्यात आल्या. तेव्हाच्या प्रजातनी यांनी त्या डोहाला हींद महासागरात सोडले. ज्याने तेथील ठीकाणी राक्षस जातीला आपले राहण्याचे ठिकाण प्राप्त होणार. ते बीज हिंद महासागर मधून तरंगत तरंगत अरबी समुद्रात आले. त्यावेळी इंग्रजयांचे साम्राज्य या जगात वाढत होते. भारताच्या समुद्र किनारी इंग्रजाची एक तुकडी समुद्र काठावर पहारा करत होती. त्यांना समुद्रात काहीतरी चमकत असल्याचे दीसले म्हणून ते त्या ठीकाणी गेले तर त्यांना पाण्याविना काहीच सापडले नाही. पाण्याची एक ओंजळ जास्त प्रकाशित आली होती. म्हणून त्या ब्रिटिश अधिकारी तरुणांनी ते ओंजळी भर प्रकाशित होणारे पाणी आपल्या भांड्यात घेतले आणि आपल्या अधिकाऱ्याकडून हरभुमी मधील ब्रिटिश रसायन निकेतन येथे ते पाणी तपासण्यासाठी पाठऊन दिले आणि त्याला आदेश दिला की या पाण्यात कोणता घटक आहे ज्याने हे पाणी प्रकाशीत होत आहे. त्या अधिकाऱ्याने ते पाणी आपल्या वैज्ञानिकाला दिले त्याने सांगीतले की हे फक्त साधं पाणी आहे यातून प्रकाश परिवर्तित होत आहे. यात काचाचे अनुरूप तुकडे आहेत त्यामुळे कीरण परीवर्तीत होत असल्याने हे पाणी चमकत आहे. मात्र त्याला या घटनेचा समज झाला नव्हता. तो शास्त्रज्ञ नापास झाला होता त्या पाण्याचे संशोधनात. तो स्वतः चिंतेत आला की असे ओंजळीभर पाणी प्रकाशित कसे होत आहे. त्या इंग्रज अधिकाऱ्याने ती पाण्याची पिशवी त्या शास्त्राज्ञाच्या कार्यालयाबाहेर ठेवली आणि तो तेथून निघून गेला, ज्या गावात ते बीजरूपी पाणी आणले ते गाव म्हणजे रंकानगरी, रंका नगरीच्या एका महीलेला घरात खूप छळ झाला होता. ती आत्महत्येच्या उद्देशाने घराबाहेर पळाली. ती गावाबाहेर जात होती त्यावेळी तिला त्या वैज्ञानिकांच्या कार्यालयाबाहेर काही चमकत असलेले द्रव्य दिसले. तिला वाटले हे काही विषारी घटक असावा. आपण हे द्रव्य प्यावे आणि झोपून जावे. या उद्देदशने तिने ते पाणी पीले. ज्या महिलेने ते पाणी पीले तीचे नाव होते अहिल्या. ते पाणी पील्याने तिच्या सौंदर्यात चांगलीच वाढ झाली . आपल्यात वेगळी शक्ती प्रकापीत आहे असा अनुभव तीला कालांतराने येऊ लागला, नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून ती आपल्या वडिलांकडे राहत असे. तिला सुंदर मुलगी जन्माला तीचे नाव सावली ठेवले. सावलीच्या जन्मा नंतर अहील्याचा मृत्यू झाला. सावली अतिशय सौंदर्याची मालकीण होती. तीने संपूर्ण पंचकोशित उपद्रव माजवला होता. आपल्या सौंदर्याच्या जोरावर ती तरुणांचे अपहरण करायची आणि दैत्यासुराला त्यांची बळी देण्यास सुरुवात केली होती. गावातील तरुणांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात काढून त्यांना मोहित करायची पण काही दिवसापूर्वी विपरीत घटना या रंकानगरीत घडली. गावातील दैत्य मंदिरात सावलीचा मृतदेह सापडला. पण हे कसं होऊ शकते पण हो सावलीची हत्या झाली होती. आत्महत्या झाली की तीने स्वतःचा भोग देन्यासूराला दिला माहीत नाही. रवी आणि कीरण नावाच्या तरुणांची हत्या त्या घटनेचा पडसाद. या मंदीराचे पुरोहीत केशव गुरुजी जे सावलीचे आजोबा होते त्यांनी मला सावलीची ही सत्यता सांगितली. सावलीच्या मायाजाळेतून मुक्तता करायची असेल फिर सावलीला शांती दयायला पाहीजे, जो पर्यत या दैत्य मंदीरात कालिंका माताची मुर्ती स्थापन होत नाही. तीर्थ पर्यत सावलीचा उपद्रव थांबणार नाही. मी असेल नसेल पण ही कथा वाचल्यावर या मंदिरात कालिका मातेची मुर्ती स्थापन करावी. 


जॉर्ज केअर


जॉर्ज केअर या ब्रिटिश अधिकारी याचे लिखाण एकून अर्जुन व सोनम घाबरले होते. त्यांना हा प्रकार कळत नव्हता. तेव्हा विजयने त्यांना सर्व काही सांगीतले. त्यांना कळले की आपला दिव धोक्यात आहे. आता या मंदीरात देवीची मूर्ती स्थापन करावी लागेल. पण मुर्ती आणायची कशी. ते तिघे अगोदर त्या मंदीराच्या परीसरातून बाहेर पडले. राजेश रडत होता. सोनमने त्याला विचारले काय झालं का रडतं आहे. पण राजेशने खाली टाकलेली मान वर घेण्याच्या तयारीत नव्हता, त्याने सांगीतले की " माझी पूजा, माझी पूजा " पूजाला काय झाल तिच्या काळजीने सोनम घाबरली होती. सोनमने त्याला विचारले पूजाला काय झालं, सोनमचा उपद्रवी आवाज राजेशच्या कानावर झाला. राजेशच्या तोंडातून असूरी आवाज आला, सांगतो! सर्व सांगतो, आवाज खाली कर. "पूजाला घेऊन भी माझ्या जगात गेलो माझ्या जगात ". एवढे बोलून राजेश हसायला लागला त्याने वर बघीतले तर त्याच्या डोळ्यात आग हीं फडकत होती. सुडाची भावना त्याच्या आवाजात येत होती . अचानक अर्जुनच्या मानेचा चावा पुजाने घेतला. सोनम आणि मी मागे वळून बघीतले तर त्या नराधमाचे सैन्य आमच्यावर येत होते. हे पाहून आम्ही तेथून पळ काढला जीव मुठीत घेऊन सैरा वैरा धावत होतो. धावता धावता एक मुलगा दिसला सोनमने त्याला निमिष नावाने हाक मारली, तो देखील स्वतःचा जिव वाचवून पळत होता. आम्ही तिथे दैन्य मंदीराच्या मागे असलेल्या एका गुफेत लपून बसलो. तेव्ह त्यांच्या मध्ये संवाद झाला, विजयने तो या जंगलात कसा आला. कोणत्या हेतूने आला हे सर्व काही सांगीतले. नीमीषने त्याला सांगीतले. पुजा, अर्जुन, मी आणि सोनम माधेरानला जाण्यासाठी निघालो होतो. रस्त्यात कुणाचा तरी अपघात झाला. त्यामुळे आमची कार थोडी खराब झाली. तरी देखील आम्ही ती चालवत चालवत शालीनी गेस्ट हाउसजवळ आलो. मोहीनी नावाच्या मुलीने आम्हाला आमच्या रुममधे नेले. काही वेळात मी सोनम आणि अर्जुनने एका मुलीची किंकाळी ऐकली आणि आम्ही बाहेर आलो तर पुजा उभी होती. राजेश तिच्याच बाजुला होता त्या दोघांचे डोळे लाल झाले होते. आणि ते एका मृतदेह मुलीचे मांस आपल्या दाताने तोडून खात होते. मला वाटले की हे लोक कोणत्या तरी कमीकलच्या चपाट्यात आले असावे पण हा माझा भ्रम ठरला. जेव्हा मी याच गेस्ट हाउसच्या मागे काही लोकांना अघोरी क्रिया करतांना पाहीले. मी लपून ते ऐकत होतो. ते दैत्यांचे आवाहन करत होते. तेवढ्यात तुम्ही दिसले पूजा अर्जुन तुमच्या सोबत होते. मला वाटले तुम्ही देखील पीशाच्य आहात पण तेव्हा त्या अघोरी क्रीया करणाऱ्या नराधमांची दृष्टी माझ्यावर पडली होती. तेव्हा मला तेथून पळ काढणे योग्य वाटले. तेवढ्यात अचानक शांतता पसरली सोनम, विजय आणि निमीष लपत लपत गुफेच्या बाहेर आले आणि मंदीराच्या दिशेने पळ काढायला सुरुवात केली, थोड्या वेळात ते मंदीराजवळ आहे. पण मंदीराच्या बाहेर शेकडो पिशाच्य यांची मैफील भरली असावी. जेथे एक रेडा - बसलेला होता. सोनम, निमिष आणि विजय मंदीराच्या पायथ्याशी असलेल्या पायर्याच्या कडेला उभे राहीले ज्याने ते सर्व काही बघू शकतील पण त्यांना कोणी बघू शकणार नव्हते. काही वेळात सर्वत्र शांतता पसरली. ढोल ताशाचा मंद - मंद आवाज ऐकू येत होता. तो दर मीनीटाला वाढत होता. जणू काही एखादी पालखी येत आहे. ढोल ताशा वाजत पालखी येत होती. त्या पालखीत एक तरुण मुलगी बसलेली होती. अत्यंत मोहक आणि सौदर्यावान होती. काही वेळात ती पालखी मंदीराजवळ आली अचानक त्यामध्ये बसलेली ती स्त्री मुर्ती झाली होती. आता तेथील सर्व विशाच्य एकत्र येऊन त्या मूर्तीची पूजा करू लागले होते. तेवढ्यात एक स्वर्ण कीरण मंदीरातून बाहेर आले आणि त्या मुर्तीवर पडली. आता ती मुर्ती पुन्हा एका मुलीन परिवर्तित झाली होती. जणू काही या पीशाच्य सैन्याचे नेतृत्व तिच करत होती. ति पालखीच्या खाली उतरली आणि मंदीराच्या पायथ्याशी जाऊन सापल्या सैन्याकडे पाहत होती. दोन बलाढ्य अशा पीशाच्यानी तेथे आणलेला रेडा तीच्यासमोर उभा केला. एकाने एक धारदार तलवार ही तीच्या हातात दिली. हा प्रकार पाहीन विजय, निमिष आणि सोनमला थरकाप सूटला होता. आता सर्वांनी ढोल ताशा वाजवीने थांबवले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. खूप भयावह वातावरण निर्माण झाले होते. ती तरुणी शांत होती पण अचानक तीच्या शरीरात वेदना होऊ लागल्या. तिचा आवाजा पुरुषी आवाजात रूपांतरीत होत होता. तिने एक हात वर केला व एकाच घावात त्या रेड्याची मान धडावेगळी करून टाकली हा प्रकार बघून सर्वाना धक्का बसेल अशी त्या दैन्यासुरचे उग्र रुप होत होते. आता तीचे शरीर जळत होते. आधी तिचे एका दैत्याच्या शरीरात रूपांतर होत होते. काही क्षणाने तेथे एक दैन्य उभा होता. त्याचे शरीर भरभक्कम स्वरूपात होते. त्याने बोलायला सुवात केली. "माझ्या बांधवांनो आपण कितीतरी युगांपासून या दीवसाची वाट बघत होतो. आज मला माझे शरीर पुन्हा प्राप्त झाले. आता आपण या मानव सृष्टीला अप्ला अधीन करून. या संपूर्ण पृथ्वीवर उपद्रव माजवून सर्व मनुष्य जातीत आपली भीती निर्माण करू." त्याच्या मुखातून निघणारे शब्द आणि त्यावर त्या पिशाच्च वृत्तीचे वाढते साहस खूप काही सांगून जात होते. धीप्पाड स्वरूपाचे शरीर असलेला हा दैत्य त्याच्या आवाजात आलेला निर्भीडपणा हा त्याच्या अहंकाराचे प्रतीक स्पष्ट करत होता. तो हवेत तरंगत होता आणि आपल्या दैत्य सैन्याचे नेतृत्व करत होता, पण ते सैन्य त्याच्या शब्दाकडे लक्ष देत नव्हते ते सर्व पीशाच्य लोकांची धाव होती त्या मारलेल्या रेड्यांच्या मांसावर. जणू त्यांची भूक हीच त्या नराधम वृत्तीसाठी सर्व परी असावी. जेवढ्यात एक सूर्याची किरण मंदीराच्या कळसावर आदळली आणि ती परीवर्तत होऊन त्या दैन्यासुराच्या शरीराला भेदली. त्या सूर्य किरणाचा वार एवढा प्रखर होता की तो असुर जमीनीवर आदळला आणि पुन्हा त्या स्त्रीच्या रूपात यायला लागला. काही वेळात तो स्त्रीमधे रूपांतरीत झाला होता तिच्या आवाजात करुणा आली होती. बहुतेक या जिवनाला ती कंटाळली असावी. ती जमीनीवरून उठली आणि आपल्या पालखीत बसली. काही पीशाच्यानी ती पालखी आपल्या खांदयावर घेऊन उभे झाले. काही पिशाच्य ढोल ताशे ताशे वाजवत होते. त्या पालखीतील महीलेने ते रेडाचे मांस खाण्याचा ईशारा त्या पीशाच्यांना केला. बघता बघता जनावरां प्रमाने त्या शेकडो पिशाच्च्यानी त्या रेड्याच्या मृत शरीरावर उपद्रव केला. पिशाच्याची भूक वाढली होती. आता ती महीला आपल्या पालखित उभी झाली आणि आपले शरीर सोडायला सुरवात केली. ती पिशाच्य रूपात आपल्याला परवर्तीत करत होती. तिचा तो उपद्रवी चेहरा सांगत होता की ती आता या नरभक्षी प्रदेशाबाहेर पडून मनुष्य जातीला आपल्या आधीन करणार आहे. म्हणून हे सर्व पिशाच्च येथे उपस्थित होऊन सूर्यास्ताची वाट बघत होते. सूर्यास्त होण्याची वेळी दैत्य मंदिरातून निघणारे सप्तरंगी किरण त्या नरभक्षी पिषाच्य लोकांना बाहेर जाण्याचा मार्ग देणार होते. त्या मार्गावर जाऊन उपद्रव मजविण्याचा बेत या नराधमांचा होता हे स्पष्टपणे दिसत होते. या निमीषच्या गळ्यात कालिंका मातेचे मुर्ती सारखे लॉकेट होते. विजय ने लॉकेट आपल्या हाती घेतले आणि त्यांना म्हटले की आता या लहान मुर्तीला मंदीरात घेऊन जाव लागेल ज्याने करून या असूरांचा अंत होणार. पण मंदीराच्या पायऱ्यावर सर्व दैत्यसेना उपस्थीत होती त्यांचे लक्ष विचली करणं सोप नव्हते. तेवढ्यात सोनम तेथून पळाली आणि मैदानात जाऊन त्या पीशाच्यांना आवाज देऊ लागली. तिला पाऊन सर्व पिशाच्च तीच्या कडे वळले. निमिष देखील एका दिशेने त्या पिशाच्य असुरांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत होता. जो दैत्य नेतृत्व करत होता त्याने हवेतच धाव घेतली. सर्व पिशाच्य त्यांच्या कडे धावत सुटले तेवढ्यात विजयने आपले पाय मंदीराच्या दिशेने घेतले मंदिरात पाय पडताच अचानक वादळ सुरू झाले. विजय मंदीराच्या गाभाऱ्यात गेला आणि मुर्तीला जमीनीवर ठेऊ लागला. जसा त्या मूर्तीचा स्पर्श जमिनीला झाला. एक दिव्य प्रकाश निघाला आणि मंदीराच्या बाहेरून रडण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. सूर्याची पहीली किरण निघाली होती. मंदिराच्या कळसाला भेदून एक सप्तरंगी मार्ग मोकळा झाला होता. हा तोच रस्ता आहे ज्यावर जाऊन पवनने आपले प्राण वाचविले होते. कशी आठवण ही विजयला झाली. आता विजय, सोनम आणि निमिष त्या रस्त्याने पळत सुटले काही वेळाने ते बाहेर निघाले त्यांनी मागे उलटून पाहीले तर ती दैत्य सेना जळतांना दीसत होती. आज अनेक वर्ष झाले पण त्या रस्त्यावर कोणीही बेपत्ता झाल्याची बातमी मिळाली नाही. या बाबीचा आनंद विजयाला आजही आहे. पण मनात आजही शंका होती की ज्यावेळी त्याला रात्री झोपावे वाटे त्याच वेळी त्याच्या जवळ कोणी झोपले आहे असा भ्रम त्याला होत होता. माहीत नाही पण हो त्याच्या घरात त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणी तरी होतो पण कोण हा प्रश्न त्याला सतावत होता.


(समाप्त)


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract