Prajakta Yogiraj Nikure

Thriller

5.0  

Prajakta Yogiraj Nikure

Thriller

साहस पुन्हा एकदा

साहस पुन्हा एकदा

22 mins
1.7K


साहस या कथेला आपण दिलेल्या प्रतिसादामुळे मी साहसचा पुढील भाग लिहीत आहे . हा भाग वाचण्यापूर्वी आपण साहस हि कथा वाचावी हि विनंती . आता पुढे----------  


मागील भागात आपण पाहिले कि , प्राची बँकेतून काही दिवसांसाठी सुट्ट्या घेऊन गडचिरोलीला जाते . नयनरम्य , सुंदर अश्या गावात तिला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. त्यातही लोकांची आधुनिकता तिला दिसून येते. निसर्गावरील त्यांचं प्रेम दिसून येत पण प्राचीच्या आयुष्यात या गावात आल्याने मात्र बऱ्याच प्रमाणात बदल घडून येतात . अनपेक्षितपणे ती एका अश्या गोष्टीत अडकते कि ज्यामुळे तीच पूर्ण आयुष्य बदलून जातं . काही दहशतवाद्यांना पकडून देऊन ती आपले साहस दाखवून देते येथेच हे प्रकरण संपले होते कि सुरु झाले होते , सर्व काही चांगले सुरु असताना नवीन कोणते वादळ येणार होते . हि सुरुवात होती कि शेवट होता या कहाणीचा जाणून घेऊया या भागात . 


साहस पुन्हा एकदा “ चला सरपंचकाका , मी निघते आता माझ्या घरी खूप छान वाटलं मला येथे येऊन तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या मला त्याही अश्या गोष्टी ज्या मला आयुष्यभर पुरणार आहेत . त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे . “ प्राची 


“ असं का बोलतेस पोरी , तुझ्यामुळे आम्हाला पण काही गोष्टी शिकायला मिळाल्याचं कि आणि एक सांगू का पोरी तुझ्यामुळे आज एक खूप मोठं संकट टळलं आहे . तुझ्यामुळे आज आपला देश सुरक्षित आहे “ सरपंचकाका 


“ आता लाजवताय मला काका तुम्ही . मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे आणि त्यात तुम्ही सर्वांनी मला साथ दिलीच ना मी फक्त तुम्हाला सांगण्याचं काम केलं बाकी काम तर आपण सर्वानी मिळून केलं ना त्यामुळे कौतुक सर्वांच झालं पाहिजे “ प्राची


“ हो हो खरं आहे हे . हे घे तुला सर्व गावकर्यांनी काही भेटवस्तू दिल्या आहेत फार काही नाही त्यात पण जमेल तसं दिलं आहे सर्वानी “  सरपंचकाका 


“ काय आहे यात आणि याची काहीच गरज नव्हती काका “ प्राची 


“ हे तुला घ्यावचं लागेल सर्वांनी तुला खूप प्रेमानी दिलं आहे त्याला नाही नको बोलूस “ सरपंचकाका 


“ ठीक आहे काका पण आहे काय यात “ प्राची 


“ यात जंगलातला शुद्ध मध आहे , डिंक आहे , संत्री , बोरे, आवळे , करवंदाचे लोणचे , लाडू , चिवडा आणि थोडा भाजीपाला आहे “ सरपंचकाका 


“ ठीक आहे काका घेते मी पण तुम्हाला यावं लागेल माझ्या घरी एकदा चालेल ना . चला मी निघते मग येईल परत एकदा आई बाबांना घेऊन, नमस्कार करते सर्वांना चला बाय “ प्राची 


                  जड अंतःकरणाने प्राची सर्वं गावकऱ्यांचा निरोप घेते पण तेथून तिचा पायचं निघत नव्हता पण काय करणार निघावे तर लागणारच होते ना . तिला स्टेशनवर सोडायला स्वतः सरपंचकाका आणि प्रथमेश आले होते . तिला तिच्या कोचमध्ये बसवून दिल्यानंतर दोघेही त्यांच्या गावी परत निघाले . प्राचीची नजर त्यांच्या कडेच होती या काही दिवसात ते खूप जवळचे झाले होते तिला त्यांना जाताना बघून तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले पण ते तिने सर्वांपासून लपवून ठेवले . रेल्वेने आता स्पीड धरला होता . धडक-धडक धडक-धडक आवाज करत रेल्वे रुळावरून जोरात धावू लागली . खिडकीतून थंडगार वारा आता येत होता त्याने अंगावर शहारे येत होते. झाडे मॅरेथॉनमध्ये पळत असल्यासारखी पुढच्या बाजूने पळत होती . खिडकीतून शेती मागे पडत चालली होती . खिडकी बाहेरील सुंदर दृश्य बघून प्राची खुश झाली होती . १५ दिवसांची सुट्टी २ महिन्यांची कधी झाली होती हे पण तिला कळले नाही पण आजपर्यंतचा तिचा रेकॉर्ड आणि इतके दिवस का लागले याचे कारण मॅनेजरला कळल्यावर त्यांनी तिला पुन्हा कामावर रुजू करून घेतले . प्राची आपल्याच विचारात हरवली होती . आज ही तो प्रसंग आठवला कि अंगावर काटा उभा राहतो पण मी त्यावेळी तो निर्णय कसा काय घेतला हेच मला कळत नाही . ते काहीही असू देत पण मला पोलिसांनी थोडं सावध राहायला सांगितलं आहे अजून त्यांचा सूत्रधार आणि काही साथीदार हाती आले नाहीत ते जोपर्यंत अटकेत येत नाही तोपर्यंत मला धोका आहे असं सांगितलं आहे इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड सरांनी . पलीकडील ४-५ सीट सोडून बसलेल्या एका व्यक्तीच प्राचीवर बारीक लक्ष्य होत तिच्याही नकळत तिचा कोणीतरी पाठलाग करत होतं . शेवटी एकदाची ती घरी आली . घरी पोहचल्यावर पण तिला सर्व इतिवृत्तांत सांगावा लागला . आई बाबांनी पण तिला थोडं सावध राहायला सांगितले होते . 

              दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नव्या जोमाने ती बँकेत जाण्याची तयारी करत होती . बऱ्याच दिवसांनंतर ती आज तिच्या बँकेत जाणार होती . मनात एक वेगळीच भीती वाटत होती आणि अस्वस्थपणा पण जाणवत होता जसा काही तिचा आज नवीन जॉबच्या ठिकाणचा पहिलाच दिवस आहे . सर्वं तयारी करून ती निघाली होती . 


“ आई येते गं मी चल बाय “ 


“ हो बाळा, जरा सांभाळून जा आणि पोहचल्यावर मला फोन कर “ 


“ हो आई मी करेल तुला फोन तू काळजी नको करुस चल मी निघते “ 


हसतच प्राची घराबाहेर पडली आणि आपल्या आवडत्या धन्नोला किक मारली जी खूप दिवसांपासून तिच्यापासून लांब होती . धन्नो म्हणजे तिची जिवकीप्राण स्कुटी . 


“ चल धन्नो , निकलते है अब वरणा पहिले दिन हि हमे लेटमार्क लग जायेगा “

धन्नोला जोरात किक मारून ती बँकेत आली . तिच्या मागे अजून कोणाचीतरी बाईक वेग घेत होती . बँकेत पोहचल्यावर सर्वांनी तिचे जंगी स्वागत केले . पुष्पगुच्छ देऊन तिचे सर्वांनी अभिनंदन केले तिचा आजचा दिवस तिच्या स्टाफने स्पेशल बनवला होता . बँकेच्या एका कोपऱ्यातून एक व्यक्ती हा सर्व सोहळा निहाळत होती. 


----------------------------------------------------------------------------------------------------


“ हॅलो , सिनिअर इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड बोलतोय “


“------------------------------”


“ काय ? तुम्ही जे काही सांगितलं आता त्याची खातरजमा करून घेतली ना कि असेच बडबड करत आहात “    


“ हो सर हि बातमी १०० % खरी आहे “ 


“ ठीक आहे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा आणि सतत मला अपडेट देत राहा ओके “


“ ओके सर , जय हिंद “ 


“ जय हिंद “ 


“ साळवी, पाटील, मोरे, जाधव सर्वांनी माझ्या कॅबिन मध्ये यात या आताच्या आता “ 


“ जय हिंद सर “ साळवींनी कडक सॅल्यूट ठोकून काय झाले सर फोन कोणाचा होता हे विचारले . 


“ आपल्या गुप्तहेरांचा फोन होता एक बॅड न्युज आहे आपल्याला आपली सुरक्षा व्यवस्था आणखी टाइट करावी लागणार आहे अजून गुप्तहेरांच्या सूचनेनुसार दहशतवादी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे . यावेळेस काहीही करून त्यांची पूर्ण माहिती कळायलाच हवी “ इन. राठोड 


“ हो सर , मी सर्व खबऱ्यांना लगेच कळवतो संशयित कोणी दिसलं तर डायरेक्ट त्यांची कुंडलीचं मांडायला सांगतो “ जाधव


“ चला गो बॅक युअर वर्क आणि मला सर्व डिटेल्स लवकरात लवकर कळले पाहिजे समजलं सर्वांना “ इन. राठोड


“ येस सर “ 


सर्वजण बाहेर जाऊन आपापल्या कामाला लागले होते. इन. सूर्यकांत राठोड आपल्या कॅबिनमध्ये बसून सर्व संशयिताच्या केसची स्टडी करत होते त्यावेळेस त्यांच्या लक्षात आले कि मागच्या वेळेस गडचिरोलीत हि टोळी कार्यरत होती आणि त्यावेळेस तिथल्या गावकर्यांनी आणि मिस प्राचीने आपल्याला माहिती दिली होती त्यांच्या कॅमेऱ्यात त्या दहशतवाद्यांचे फोटो होते म्हणून आपल्याला त्यांना पकडता आले . यामुळे त्यांचा सर्व प्लॅन फेल झाला होता . पण त्यातील काही साथीदार आणि त्यांचा सूत्रधार मात्र आपल्या तावडीत आले नाही आज २ महिन्यांनी ती टोळी परत एकदा कार्यरत झाली आहे याचा अर्थ प्राचीच्या जीवाला धोका आहे ज्यांच्यामुळे हा प्लॅन फेल केला गेला त्या व्यक्तीला ते काही सोडणार नाहीत . त्यांच्या साथीदारांना थर्ड डिग्री अजून एकदा द्यावी लागेल कसं बोलत नाही तेच बघतो . कितीही फटाके द्या त्यांना कितीही टॉर्चर करा त्यांना पण साले तोंड काही उघडत नाही ते. 


              प्राचीचे काम मात्र इकडे जोरात चालू असते तिला याची तिळमात्र कल्पना नसते पुढे काय वाढून ठेवलं आहे ते . तिचा परफॉर्मन्स बघून तिचे प्रोमोशन पण झालेले असते . नवीन जबाबदाऱ्या नवीन कामाने तिच्या अंगात उत्साह संचारलेला असतो पण सतत असं वाटत राहत कि कोणीतरी आपला सतत पाठलाग करत आहे पण कोण आहे हे काही कळत नाही . तेवढ्यात तिचा फोन खणाणतो , ट्रिंग ट्रिंग........ ट्रिंग ट्रिंग.........ट्रिंग ट्रिंग.........


“ हॅलो, मिस प्राची मी सिनिअर इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड बोलतोय तुम्ही सध्या कुठे आहात मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे तुम्हाला वेळ आहे ना “ 


“ हो सर , बोला ना मी आता बँकेत आहे काही प्रॉब्लेम झाला आहे का ?


“ हो , पण ते आता फोनवर नाही सांगता येणार मला. मी संध्याकाळी तुमच्या घरी आलो तर चालेल का म्हणजे आपल्याला बोलता येईल तुम्ही जरा लवकर या घरी आपण बोलू तुमच्या घरी ठेवतो मी फोन आता “ 


“ ओके सर मी येईल लवकर घरी “ 


                     प्राची तिच्या मॅनेजरच्या केबिनमध्ये जाऊन घरी लवकर गेले तर चालेल का हे विचारायला जाते आणि इन्स्पेक्टरांचा फोन आला होता त्यांनी लवकर बोलावले आहे घरी हे देखील सांगितले. तिच्या मॅनेजरकडून तिला परवानगी मिळते . पूर्ण वेळ असं काय सांगायचं असेल त्यांना की त्यांनी मला घरी लवकर बोलावलं आहे आणि तेही त्यांनी पोलीस स्टेशनला न बोलावता घरी लवकर या असं का सांगितलं त्या टोळीतली सर्व लोक ताब्यात आली का त्यांच्या . काहीच कळत नाही जाऊदे घरी गेल्यावर कळेल नेमकं काय सांगायचं आहे त्यांना ते. 

              हाच विचार करत ती घरी पोहोचली घरी गेल्यानंतर तिने तिच्या आई-वडिलांना इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड यांचा फोन आला होता हे सांगितले आणि ते आज भेटायला येणार आहे हे पण सांगितले . बरोबर संध्याकाळी आठ वाजता इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड प्राचीच्या घरी पोहोचले . आज ते सिविल ड्रेस घालून तिच्या घरी आले होते. 

             

“ सर तुम्ही चहा घेणार की कॉफी “ प्राचीची आई त्यांना विचारते. 

“ थँक्यू पण मी आता ड्युटीवर आहे नंतर कधीतरी घेईल मला तुमच्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे होते म्हणून एवढ्या उशिरा तुमच्या घरी आलो त्याबद्दल माफ करा पण कामच तसं होतं त्यामुळे मी उशीरा तुमच्या घरी आलो “ इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड 

              

“ बोलाना सर काही प्रॉब्लेम झाला आहे का? ”

 

“ या काही दिवसात तुम्हाला वेगळं असं काही जाणवलं का? “

  

“ हो मला सतत वाटत राहत की माझा कोणीतरी पाठलाग करतोय त्याचा सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला मी पण काहीच कळलं नाही “


“ मग त्यावेळेसच तुम्ही पोलीस कंप्लेंट का नाही केली “ 


“ सॉरी सर , पण माझ्या लक्षात नाही आलं ते “ 


“ ठीक आहे आता पण पुढच्या वेळी लक्षात ठेवा या गोष्टी आणि काही संशयित आढळले तर लगेच मला फोन करा “


“ हो सर नक्की फोन करेल आणि जरा सावध राहील “


“ आमच्या गुप्तचरांच्या सूचनेनुसार दहशतवादी टोळी पुन्हा एकदा कार्यरत झाली आहे आणि ते त्यांचा आखलेला प्लॅन नक्की यशस्वी करण्याचा प्रयत्न करतील आम्हाला शंका आहे की त्यांनी तुम्हाला पण टार्गेट केलं असणार आणि त्यामुळेच तुम्हाला असं वाटतं असेल की तुमचा सतत कोणीतरी पाठलाग करत आहे “

          

“ मग आता काय करायचं सर “


“ काळजी करू नका आमची काही लोक येतील तुमच्या घरी उद्या सीसीटीव्ही कॅमेरे लावायला आणि हे लॉकेट सतत तुमच्या गळ्यात ठेवा तुमचा मोबाईल सतत ऑन राहील आणि आमच्या संपर्कात राहील याची दक्षता घ्या मोबाईलच लोकेशन आँनच राहील पाहिजे म्हणजे आम्हाला तुम्ही कुठे आहात हे कळत राहील आणि हे लॉकेट गळ्यातून कधी काढू नका या लाँकेटमध्ये मायक्रो कॅमेरा आहे त्यामुळे तुमच्या आजूबाजूची परिस्थिती , तुमच्या हालचाली आम्हाला कळतील आणि यात एक अलार्म पण आहे ज्या वेळी तुम्हाला वाटलं की तुम्ही संकटात आहात त्यावेळी हा अलार्म चालू करायचा ओके “


“ ओके सर मी काळजी घेईन या गोष्टीची “


‌” गुड , चला मी निघतो. उद्या आमची काही माणसे येतील CCTV कॅमेरे लावायला गुड नाईट “


‌” गुड नाईट सर “


‌       इन्स्पेक्टर गेल्यानंतर प्राचीच्या घरच्यांना खूप टेन्शन आले होते पण हे पाऊल उचलावे लागणार होते त्यामुळे तिच्या घरचे पण तिला सपोर्ट करायला तयार होते .येथे पोलिस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड सर्वांना सुचना देत होते. प्रत्येकाला आपापली कामे विभागून दिलेली होती आणि त्याचा रिपोर्ट सर्वजण त्यांना देत होती . 

            

“ जाधव तुमच्या एका माणसाला मिस प्राचीवर पाळत ठेवायला सांगा आणि तसं करत असताना त्यांच्या मागे कोण आहे हे देखील आपल्याला शोधावं लागणार आहे त्यातूनच आपल्याला काहीतरी क्लू मिळेल तुम्ही ज्या संशयितांना पकडले आहे त्यांच्याकडून काही माहिती मिळाली का? उघडलं का त्यांनी त्यांचं तोंड “


“ नाही सर तोंड उघडायला पण तयार नाही ते किती टॉर्चर केले त्यांना पण साधं ऊ नाही की चू नाही ” 

            

“ आपल्याला सर्व बाजूंनी तपास करावा लागणार आहे गुप्तचरांच्या सूचनेवरून जी टॉपवर शहरे आहेत त्यांना त्यांनी टार्गेट केलं आहे “

           

“ हो सर आम्ही सर्व पोलीस स्टेशनमध्ये अलर्ट जारी केला आहे त्यांच्याकडून काही सूचना नक्की येतील “


“ ओके आता सर्व तुमच्या कामगिरीवर जा आणि अपडेट देत राहा मला “


“ ओके सर जय हिंद “

          इकडे प्राची सुद्धा आपल्या आजूबाजूला काही संशयित दिसत का यावर लक्ष ठेवून असते . घरी आल्यावर तिच्यासाठी एक स्थळ आलं आहे आणि ते उद्या तिला पाहायला येणार आहे असं तिचे आई वडील तिला सांगतात. दुसऱ्या दिवशी तिला पाहायला एक मुलगा येतो. सॉफ्टवेअर इंजिनियर, दिसायला हँडसम नोकरी मध्ये पण वेलसेटल . कांदे पोह्यांचा कार्यक्रम होतो . तिच्या घरच्यांकडून त्या स्थळाला होकार असतो आणि मुलाकडून पण तिला होकार येतो लवकरच त्यांचा साखरपुडा संपन्न होतो. 

       इकडे पोलिसांना खबर लागते की मुंबईतील काही भागात बॉम्ब पेरण्याचे काम दहशतवाद्यांकडून सुरू झालं आहे पण नेमका तो परिसर कोणता हे न कळल्यामुळे ते काहीही करू शकत नाही त्याच वेळेस प्राचीच्या घरच्यांचा फोन इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड यांना येतो . 


‌” हॅलो सर, मी प्राचीची आई बोलतेय आज सकाळी प्राची आणि आमचे होणारे जावईबापू बाहेर गेले होते पण आता रात्रीचे दहा वाजले तरी ते घरी आले नाहीत की त्यांचा फोनही लागत नाही . सर प्लीज तुम्ही काहीतरी करा मला खूप भीती वाटतेय “


‌” हॅलो आई प्लीज काळजी नका करू तुम्ही. आम्ही बघतो आणि लगेच कळवतो तुम्हाला . तुम्हाला काही समजलं तर लगेच आम्हाला फोन करा “ चुहा बिलसे बाहर आनेका समय आ चुका है अब बस देखणा ये है कि वो बाहर कैसे आता है . एकटेच इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड गालातल्या गालात हसत होते . 


‌” जाधव प्राचीच्या गळ्यात असणाऱ्य लॉकेटच रेकॉर्डिंग चालू करा आणि त्यांचं मोबाईल लोकेशन ट्रेस करा हरी उप “ 

 

‌” सर मोबाईलचे लोकेशन कोथरूड मध्ये ट्रेस झाले आहे आणि गळ्यातले लॉकेटच रेकॉर्डिंग सकाळ नंतर झालच नाहीये “

 

‌” काय ? शीट म्हणजे त्यांनी मिस प्राचीना किडनॅप केलं आहे. शेवटचं रेकॉर्डिंग काय आहे ते एकदा चेक करा लवकर “


‌” सर शेवटचं रेकॉर्डिंग कोथरूडमध्ये साई कॅफे येथे ट्रेस झालं आहे आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा होणारा नवरा आहे “ 

“ ओके तुमच्या काही लोकांना तेथे चौकशीसाठी पाठवून द्या आणि त्यांचे कॉल रेकॉर्डस् , त्यांच्या एरियामध्ये मागच्या एक महिन्यांचे आणि त्या आधीचे सर्व संशयित कॉल रेकॉर्डस् मला तीस मिनिटांच्या आत येथे हजर पाहिजे आणि त्यातले संशयित नंबर शोधून त्यांची कुंडली मांडा येथे लवकरात लवकर “


              काही वेळानंतर इन्स्पेक्टर जाधव दोन नंबर शोधून घेऊन येतात . 


‌” सर हे दोन्ही नंबर सतत एकमेकांच्या संपर्कात होते आणि आज सकाळी प्राचीच्या गायब होण्याआधी सुद्धा हे दोन्ही नंबर त्यांच्या घराशेजारी ट्रेस झाले आहेत “


‌” गुड याची माहिती शोधून काढा आणि उचला त्यांना. कोथरुडमधल्या साई कॅफेतून प्राचीची काही माहिती कळाली का त्यांना “ 

‌       

“ हो सर तेथे कळलेल्या माहितीनुसार प्राची सकाळी दहा वाजता त्यांच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत तेथे गेल्या होत्या . साधारण अर्धा तासानंतर त्या तेथून निघाल्या पण कुठे गेल्या हे काही कळले नाही पण हो सर त्यांचा रुमाल आणि लॉकेट बाजूच्या झाडीत पडलेलं सापडलं आहे आपल्या माणसांना . त्या रुमालावर प्राची नाव लिहिलेलं आहे त्यामुळे तो त्यांचाच रुमाल आहे . श्वान पथकातील मोतीने त्या रुमालाचा वास घेऊन त्या कुठे गेल्या असतील याचा तो माग काढत आहे आणि आपल्याला काही लोकांना तेथे पाठवावे लागेल त्यांच्या मदतीसाठी “ 


“ ठीक आहे मी स्पेशल टीम पाठवून देतो तेथे नक्कीच काहीतरी गडबड आहे पाणी येथेच कुठेतरी मुरतंय कारण त्यांच्यासोबत शेवटी त्यांचा होणारा नवरा सोबत होता आणि त्यानंतर त्यांना कोणी बघितलेल पण सांगितलं नाही कोणी . आपला माणूस झोपला होता का त्यांना कसं कळलं नाही हे “ 


“ सर प्राची गायब झाल्यापासून ते पण गायब आहेत “ 


“ वाह , काय काम करतात. आता त्यांना काही झालं तर काय उत्तर देणार आपण सांगा ना “ इन्स्पेक्टर राठोड आता खूप चिडले होते आणि ही बातमी बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करत होते पण वरिष्ठांकडून पण खूप दबाव वाढला होता त्याच्यावर सतत वरिष्ठांकडून कानउघाडणी होत होती तेवढ्यात जाधवांचा फोन वाजला साळवींचा फोन आला होता .

“ हॅलो सर प्राचींचा पत्ता लागला आहे आपल्या मॊतीने अगदी अचूक जागी आणले आहे पण येते खूप सारा दारूगोळा साठा दिसत आहे आणि आत जायचा मार्ग काही दिसत नाहीये त्यांच्या गोडाऊनला आम्ही चारही बाजूने घेरले आहे पण आत किती लोक असतील याचा अंदाज काही येत नाहीये “


“ ठीक आहे आम्ही पण येतो तेथे आणि आपली स्पेशल टीम पण तेथे पोहचेल लवकर आजच याचा सोक्षमोक्ष लागेल पण हो काळजी घ्या यात प्राचींना काही होता कामा नये “


“ ओके सर पण एक अडचण आहे या गोडाऊनच्या बाहेर एक डोअर लाँक आहे आणि तो हॅक करण्यासाठी एका हॅकरला पाठवून द्या पुढचं आम्ही बघून घेऊ “


“ ओके मी पाठवून देतो दिनेशला तेथे तुम्ही फक्त सावध राहा “


“ सर प्राचींचा पत्ता लागला आहे आपल्याला तेथे जावे लागेल “


“ ओके मोरेंना सांगा गाडी काढायला “


         तेवढ्यात पाटील तेथे धावत धावत येतात . 


“ सर आज त्या हरामखोरांनी तोंड उघडले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार स्पोट नागपुर अधिवेशन येथे होणार आहे आणि त्यांची तयारी पण झाली असेल काही वेळातच येथे स्पोट होऊ शकतो . आतापर्यंत त्यांनी तोंड उघडले नाही आणि आता अचानक असं सांगतात . या माहितीवरून सर्वांनाच टेन्शन आलेलं असतं इकडे स्पोट पण होऊ द्यायचा नसतो तर तिकडे काही दहशतवादी हाताला येणार असतात त्याचप्रमाणे प्राचीचा पण जीव वाचवायचा असतो . हि बातमी मीडियापर्यंत जाऊ नये यासाठी वरिष्ठांचा दबाव त्यात अपुरी साधनसामुग्री यामुळे काय करावं हे त्यांना कळत नाही . 

              

“ पाटील , नागपूर पोलीस स्टेशनला ही बातमी लगेच कळवा आणि त्यांना शोध घ्यायला लावा आपलं श्वानपथक त्यांच्या कामी येणार . आज आपली परीक्षा आहे असं समजून आणि या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे काहीही करून .पाटील तुम्ही या हरामखोरांना बोलत करा आणि आम्ही त्या हरामखोरांना जातो पकडायला “


“ ओके सर “

 सर्वजण सज्ज शस्त्रांनिशी पोलीस स्टेशन मधून एका श्वान पथकाला घेऊन स्पॉटवर पोहोचतात तोपर्यंत हॅकर दिनेशने तो डोर ओपन केलेला असतो सर्वजण थोडी सावधगिरी बाळगून आतमध्ये धडाधड घुसतात पण आतमध्ये बोटावर मोजण्याइतकी माणसे असतात बेसावध असल्याने त्यांना लगेच पोलीस ताब्यात घेतात पण आतमध्ये प्राची न दिसल्याने सर्वजण आश्चर्यचकित होतात इकडे मात्र मोती जोरजोरात भुंकून एका फरशीवर पाय आपटत असतो आणि त्याला साथ म्हणून बाकीचे श्वान पण त्याला साथ देतात. 

          

“ क्यू साब हैराण हो गये ना . आप हमारा कुछ नही बिगाड पाओगे . आपको जो चाहिए वो तो कब के निकल चुके है यहा से अब बस तबाही मचेगी यहा और कुछ भी नही “ तेवढ्यात त्याच्या जोरात कानाखाली वाजते त्यामुळे तो भेलकांडत दुसरीकडे जाऊन पडतो . 

            

“ ये उठ एवढी मस्ती आली का रे तुमच्या अंगात . येथेच उभा राहून असं बोलायला लाज नाही का वाटत तुला “


“ नाही वाटत लाज मला सांगा मग काय करणार तुम्ही “ एवढं बोलून तो जोरजोरात हसू लागतो त्यांच्या बोलण्याचा , वागण्याचा त्याला काहीही फरक पडत नाही . 


“ जाधव त्याला चौकशीसाठी आत घेऊन त्याची चांगलीच धुलाई करा पोपटासारखा सरळ बोलायला लागेल “ 

                

“ आप कुछ भी करलो साब पर हम हमारा मुँह नही खोलेंगे “ हा…. हा..... हा..... हा..... त्याच्या जोरात हसण्याने सगळ्यांच्या डोक्यात तिडीक गेली होती. 


                इकडे त्याचं रूम मधून एक तळघरात जाण्यासाठी गुप्त दरवाजा होता आणि त्याच दरवाज्यातून आत नेऊन प्राचीला ठेवलं होतं आज तिला जे सत्य कळलं होतं त्यावर विश्वास कसा ठेवायचा याचाच विचार ती करत होती आपण खूप मोठी चूक केली होती याची तिला जाणीव झाली होती आज तिच्या चुकी मुळे ती येथे होती गळ्यातले लॉकेट तर तेथेच पडलं होतं हे तिच्या लक्षात येथे आल्यावर आलं आणि मोबाईल नाही हे पण कळलं किती वेल्डप्लॅन करून या माणसांनी तिला किडनॅप केलं होतं फक्त का तर त्यांच्या मते तिने जी चूक केली होती त्याची तिला शिक्षा द्यायची होती म्हणून तिच्या डोळ्यासमोर तो स्पोट होणार होता त्याची तिने कल्पना पण केली नव्हती .

               मोती सतत का त्या फरशीवर पाय आपटत आहे याचा शोध घेता घेता त्यांचा धक्का तेथे असणाऱ्या एका फ्लॉवरपाँटला लागला यामुळे ती फरशी थोडी बाजूला झाली मोती लगेच तेथून बाजूला सरकला. इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोडांनी तो फ्लॉवर पाँट थोडा आणखी सरकवल्यावर ती फरशी पूर्ण एका बाजूला झाली . तेथून तळघरात जाण्यासाठी पायऱ्या होत्या आणि आत गडद अंधार पण होता पण कशाचीही पर्वा न करता मोतिने आत उडी मारली आणि त्याच्या मागोमाग बाकीच्या श्वानांनी पण उड्या घेतल्या त्यांच्या मागून स्पेशल टीम आतमध्ये घुसली अचानक मोतीने त्या व्यक्तीच्या अंगावर उडी घेतल्यामुळे तो त्याचा तोल सावरू शकला नाही आणि एकदम मागे कोसळला बाकीचे श्वान इतर साथीदारांवर तुटून पडले पोलिसांनी त्यांना श्वानांपासुन सोडवून आपल्या ताब्यात घेतले . तिथले लाईट चालू करून पाहिले तर इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड यांचा अंदाज बरोबर ठरला होता . त्यांनी प्लॅन ठरवल्याप्रमाणे तो यशस्वी झाला होता या सर्वांना बिळातून बाहेर काढण्यासाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले होते . हे चेहरे पाहून त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मंद हसू उमटले होते त्यांचा प्लॅन यशस्वी झाला होता पण तो असा होईल हे नव्हते वाटले तेवढ्यात त्यांचा फोन वाजला नागपूर पोलीस स्टेशनमधून फोन आला होता मिशन सक्सेसचा फोन होता तो. 


“ काय मग मिस्टर रोहन काळे उर्फ अय्यर उर्फ बाबूलाल तिवारी काय मग हुशार निघालात आम्हाला फसवून तेथे येऊन पोहोचलात पण तू हे विसरलास आम्ही महाराष्ट्र पोलिस आहोत ते. आता बोलतोस का की मी माझ्या भाषेत बोलते करू तुला ”

               प्राची तर भूत बघितल्यासारखी सगळीकडे बघत होती हा रोहन काळे म्हणजे प्राचीचा होणारा नवरा होता जो शेवटच्या वेळी तिच्यासोबत होता तिला येथे घेऊन येण्यासाठी प्रेमाचं आणि लग्नाचं नाटक फक्त यासाठीच केलं होतं त्याने जेणेकरून तो बदला घेऊ शकेल. तिने त्याचा प्लॅन फेल केला होता त्याचा बदला, पण त्याला हे माहित नव्हतं की त्याच्या खेळीत तोच फसणार आहे ते . मध्येच प्राचीच्या मागे असणाऱ्या माणसाचं गायब होण त्याचं सतत तिच्या पाळतीवर असणं हे सगळं प्लॅन नुसार होत होत . पोलिसांनी आधीच मोबाईल ट्रेस केले होते तिच्या एरिया मधले त्यात मिस्टर रोहन काळेचा फोन संशयित वाटत होता त्यांना त्यामुळे एक माणूस त्याच्या पाळतीवर ठेवला होता त्यातूनच पोलिसांचा संशय बळावला होता . 


“ तू जेव्हा प्राचींना किडनॅप केलं होत तेव्हा मात्र तू शहाणपणा केलास आमच्या माणसाला बेशुद्ध करून पण आमच्या मोतीने शेवटी तुझा पत्ता शोधूनच काढलाच . तुझ्या एका चुकीमुळे आणि प्राचीच्या नशिबामुळे त्यांचा रुमाल तेथेच पडला होता त्यामुळे मोतीला येथे येता आले . प्लॅन २ नागपूर अधिवेशन स्पोट तो पण तुझा फेल झाला आहे आमच्या माणसांनी कधीच तुझ्या माणसांना ताब्यात घेतले आहे आणि तुम्ही पेरून ठेवलेले बॉम पण आमच्या श्वान पथकाने शोधून काढले आहे ते बॉम पण निकामी करण्यात आले आहे मग कसं वाटतंय प्लॅन फेल झालेल ऐकून . आता तू सांग तू हे सगळं का केल ते “ 


“ मी नाही सांगणार काहीच तुम्ही कितीही हातपाय हलवा पण मी नाही सांगणार “ 


“ जाधव, आपल्या मोतीला घेऊन या रे चांगले लचके तोडू द्या त्याला मग कळेल याला कसं नाही सांगत तेच बघतो मी “ इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड त्याचे केस जोऱ्यात मागे ओढतात आणि त्याला मोतीवर सोपवून देतात. थोड्या वेळाने मी सांगतो म्हणून तो जोर जोऱ्यात ओरडू लागतो आणि मोतिच्या तावडीतून सुटून तो सर्व काही सांगायला तयार होतो . 


“ मग काय करणार मी कोणता उपायच राहिला नव्हता माझ्याकडे हे करण्यावाचून “


“ हो का, असं काय झालं होत रे तुझ्या बरोबर जो तू देशद्रोह केलास लाज कशी नाही रे वाटत तुला हे सांगायला “ इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड


“ नाही वाटत मला लाज नाही वाटत ...... गरीब होतो यात काय माझी चूक होती तरी पण गरीब असून पण शिक्षण घेतलं माझ्या आई वडिलांनी पोटाला चिमटा काढून मला शिकवलं का तर मी त्यांचे दिवस बदलेल या एका आशेपोटी . मी पण छोटे मोठे काम करून शिक्षण पूर्ण केले इंजिनिअर झालो . सकाळी पेपर टाकायला जायचो संध्याकाळी दुकानात जायचो सुट्टीच्या दिवशी मी कुठे काम असेल तर तेथे जाऊन पोट भरलं आहे असं सर्व करून मी माझं शिक्षण पूर्ण केलं होत का तर मी माझ्या आई वडिलांचे दिवस पालटेल म्हणून . शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी शोधण्यासाठी किती ठिकाणी फिरलो पण नाही भेटली नोकरी मला कारण पण नाही सांगितलं मला त्यांनी दुसऱ्या ठिकाणी साध्या नोकरीसाठी फिरलो पण तेथे पण हाती निराशाच आलेली या नोकरीसाठी तुमचं शिक्षण जास्त आहे म्हणून या पण नोकऱ्या मला नाकारल्या गेल्या घरात खायचे वांदे होत होते व्यवसाय करायचा म्हटलं तरी कोणी लोन देत नव्हत का तर तारण ठेवायला काहीच नाही नाही म्हणून लोन पण नाकारलं गेलं मग काय करणार होतो मी उपाशीच मरायचं होत का मग आम्ही . त्यातच मला एक ऑफर आली खूप पैसे देणार होते ते या कामासाठी तयार झालो मग मी पण या कामासाठी मग काय पैसेच पैसे येणार होते माझ्याकडे पण त्यांनी काम सांगितल्यानंतर मी नकार दिला होता या कामासाठी पण माझ्या आई बाबांना जीवे मारण्याची धमकी दिली होती त्यांनी मग मी तरी काय करणार झालो तयार पण आता मला काहीच नाही वाटत या कामाचं आणि प्राचीमुळे मागच्या वेळेस आमचा प्लॅन बिघडला होता म्हणून तिला पण शिक्षा द्यायची होती ती गडचिरोलीवरून निघाल्यापासून तिचा पाठलाग करत होतो पण नंतर कळलं कि तुम्ही पण तिच्या वर नजर ठेवून आहेत म्हणून तिला मारण्याचा प्लॅन कॅन्सल करावा लागला पण तिच्या डोळ्यात मला भीती बघायची होती पण पोरगी चांगली निडर निघाली “ एवढं बोलून तो जोरजोरात हसू लागला प्राचीच्या तर तळपायाची आग मस्तकात जात होती सणकन तिने त्याच्या कानाखाली ठेवून दिली पण त्याने त्याला काहीही फरक पडणार नव्हता . 


“ तुझा बॉस कोण आहे ते सांग लवकर “ इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड


“ ते मलाच माहित नाही ते तुला कसं सांगू मी त्याने कधीच मला तोंड दाखवलं नाही फक्त फोनवर बोलणं व्ह्याच आमचं हा...... हा....... हा....... हा ..... “


“ जाधव घ्या रे याला ताब्यात आणि चांगलीच चामडी लोळवून काढा याची “


इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड आणि त्यांच्या साथीदारांनी त्या सर्वं दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर केस दाखल केली . रोहनच्या जबाबाने सर्वजण सुन्न झाले होते . आजच्या तरुण पिढीची हि गत बघून काय करावे हे सुचत नव्हते पण आज सर्वांच्या सतर्कतेने आणि हुशारीने यांचा प्लॅन फेल केला होता . प्राची सुरक्षित तिच्या घरी पोहचली होती आणि इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड यांचं मिशन सकसेस झालं होतं याचा सर्वाना खूप आनंद झाला होता . छान अशी एक शीळ वाजवत इन्स्पेक्टर सूर्यकांत राठोड आपल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहचले होते एका नवीन मिशनसाठी , एका नवीन साहसासाठी . हि कथा पूर्णतः काल्पनिक असून याचा कोणत्याही घटनेशी काहीही संबंध नाही याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी . हि कथा आपल्याला कशी वाटली हे प्रतिक्रिया देऊन जरूर कळवावे . 

 


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller