The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Prajakta Yogiraj Nikure

Others

5.0  

Prajakta Yogiraj Nikure

Others

नवी पहाट

नवी पहाट

5 mins
966


आजचा दिवस खूप महत्त्वाचा होता त्याच्यासाठी, कारण आज इंजिनिअरिंगाच्या फायनल एयरचा रिझल्ट लागणार होता. आज सकाळपासून उदय अस्वस्थ होता आणि आपल्या रिझल्टविषयी तो उत्सुकही होता . पाहता पाहता रिझल्टची वेळ आली आणि रिझल्ट लागला . उदय खूप चांगल्या मार्कांनी म्हणजेच फस्ट क्लासमध्ये उत्तीर्ण झाला होता . त्याचे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले होते आज तो खूप आनंदी होता. 

उदयचे आपल्या आईवर खूप प्रेम होते तो सतत आपल्या आईचे ऐकत असे आज तो इंजिनियर झालेला पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तिला आपल्या कष्टाचे फळ मिळाले यासाठी ती खूप आनंदी होती. उदयला चांगल्या कंपनीमध्ये जॉबची ऑफर आली पगारही चांगला होता कंपनीकडूनच त्याला फ्लॅटही मिळणार होता जाण्या येण्यासाठी गाडी मिळणार होती. त्याच्या आईलाही खूप आनंद झाला होता. ती त्याचे दोनाचे चार हात करण्याविषयी विचार करत होती तसेच उदयला काही स्थळेही सांगून आली होती या स्थळामध्ये सुप्रियाचे स्थळ उदयला व त्याच्या आईला खूप आवडले . सुप्रिया ही खूप चांगली मुलगी होती उदय तर तिला पाहताच तिच्यात हरवून गेला होता. उदयला सुप्रिया आवडली होती तसेच त्याच्या आईलाही ती सून म्हणून पसंत होती. लवकरच लग्नाची बोलणी होऊन उदय व सुप्रियाचे थाटामाटात लग्न झाले. नवदाम्पत्याचा संसार सुरु झाला होता. सुप्रिया घरात सर्वांची मनापासून सेवा करत होती. तिच्या येण्याने ते दोघे खूप खुश होते.

उदय व सुप्रियाचा संसार खूप चांगला चालू होता. एके दिवशी सुप्रियाला एका सुखाची चाहूल लागली होती. त्या दोघांच्या आयुष्यात कुणीतरी तिसरा पाहूणा येणार होता. ते दोघेही या बातमीने खूप खुश होते . पहिले दोन-तीन महिने खुप सुरळीत गेले पण त्यानंतर उदयच्या आईचा स्वभाव अचानक बदलला. हे पाहून उदय आणि सुप्रिया आश्चर्यचकित झाले त्याला कारणही तसे होते. उदयच्या आईला नातू हवा होता फक्त आणि फक्त नातू. ती सतत सुप्रियासमोर नाद लावत होती की, तू फक्त मुलालाच जन्म दिला पाहिजेस. हे ऐकून सुप्रियासह उदयलाही धक्का बसला. त्या दोघांनाही कळत नव्हते आई अशी का वागत आहे. त्यांना आईचे हे वागणे कोडेच वाटत होते. उदयला कळत नव्हते आईला कसे समजावू, आई इतकी सुशिक्षित असून देखील अशा प्रकारचे भाष्य करत आहे यावर उदयचा विश्वासच बसत नव्हता पण एकदा उदयच्या आईने कहरच केला. ती सतत काही ना काही कारण काढून सुप्रियाशी सतत भांडत असे. प्रत्येक वेळी सुप्रिया समजून घेत असे. तिच्यावर आईप्रमाणे प्रेम करणारी आपली सासू अशी का वागत आहे याचे तिला कोडे पडले होते पण ती काहीच करू शकत नव्हती. त्या दिवशी मात्र उदयची आई जास्तच भडकली होती. सुप्रियाच्या हातून पोह्यांमध्ये मीठ थोडे जास्त पडले होते, पण पोहे जास्त खारट देखील झाले नव्हते, पण तरी आईचा राग अनावर झाला आणि त्यांनी सुप्रियाला घराबाहेर काढले. आईच्या मनात हे पक्के बसले होते कि, सुप्रियाला मुलगा नाही तर मुलगी होणार आहे, पण त्यांना हे का वाटत आहे हे कळत नव्हते व त्यांना मुलगी का नको आहे हेही कळत नव्हते.

संध्याकाळी उदय घरी आल्यावर त्याला कळले की, आईने सुप्रियाला घराबाहेर काढले आहे. उदय लगेच सुप्रियाला शोधायला बाहेर पडला व सुप्रियाला घरी घेऊन आला. त्याने आईला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने आईला एक प्रश्न विचारला, "आई तू एक स्त्रीच आहेस ना! मला बाबांशिवाय एकटीने वाढवणारी , माझे स्वप्न पूर्ण करण्यात माझी मदत करणारी, सतत माझ्या पाठीमागे उभी राहणारी, बाबांची कधीही उणीव भासू न देणारी हि माझीच आई आहे का ? 

आई, आज तू समाजात पाहतेस ना, मुलांपेक्षा प्रत्येक क्षेत्रात मुली या पुढे आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात मुलींनी जी कामगिरी करून दाखवली आहे ती कोणीही आजपर्यंत केलेली नाहीये. आज मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे, आपली प्रगती करत आहे. इतकेच नाही तर आम्हा पुरुषाना जर सांगितले की, तू आज एक दिवस फक्त एक दिवस घर सांभाळून आपली नोकरीही सांभाळून दाखव, तर आम्ही हे सर्व नाही करू शकत, पण स्त्री मात्र हे सर्व करू शकते. आजची स्त्री घर सांभाळत बाहेरची नोकरीही सांभाळते.

आई, आपण भारत देशात राहतो. येथे आपण देवीला मानतो, देवीची आराधना करतो पण आई, तू हे विसरत आहेस की, देवी ही देखील एक स्त्रीच आहे. येथे प्रत्येकाला आई हवी असते, बहीण हवी असते, मैत्रीण हवी असते, बायको हवी असते पण मुलगी नको असते..असं का ? असे का आई ?

आज आपल्याला अनेक घटना पहायला मिळतात की, मुलाने आपल्या आई-वडिलांना घराबाहेर हाकलले, त्यांना बेघर केले पण त्याचवेळी त्या आईवडिलांना त्यांच्या मुलीने त्यांना आधार दिला. मुलगा लग्न झाल्यानंतर आई-वडिलांना विसरतो, पण मुलगी लग्न झाल्यानंतरही आपल्या आई-वडिलांना विसरत नाही. उलट मुलापेक्षा मुलगी आई-वडिलांची चांगल्या पध्दतीने काळजी घेते पण आपल्या समाजाने पुरुषप्रधान संस्कृती निर्माण करून ठेवली आहे. या पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगी ही परक्याचे धन मानले जाते, पण मुलगी कधीच आपल्या आई-वडिलांना परके मानत नाही.

आई, तुला इतिहास तर तोंडपाठ आहे. मी तुला इतिहास सांगण्याची काहीच गरज नाहीये पण आता तो इतिहास तू संपूर्णपणे विसरली आहेस, हे मला तुझ्या वागण्या बोलण्यातून जाणवत आहे. राजमाता जिजाऊ या एक स्त्री होत्या पण त्यांनी स्त्री आहे म्हणून कधीच माघार घेतली नाही. त्या आपल्या जनतेसाठी लढत राहिल्या. आपल्या कृतीतून त्यांनी शिवबाला घडविले व एक जाणता राजा या देशाला दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई, ताराबाई, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, राणी पद्मावती, कृष्णास घडवणारी यशोदा, देवकी, अंतराळवीर कल्पना चावला, सुनीता विल्यम्स, प्रतिभाताई पाटील, सोनिया गांधी, मेरी कोम, सानिया मिर्झा यासारख्या अनेक महिलांनी आज आपले वर्चस्व स्थापन केले आहे.

आज मुलांच्या हजारांच्या मागे मुलींचे प्रमाण आठशे व त्याच्या खाली आहे. उर्वरित मुलांना ब्रम्हचारी म्हणून जीवन व्यतीत करावे लागेल, याचा कुणी विचार केला आहे का? सृष्टीची निर्माती ही एक स्त्री आहे आणि जर स्त्रीच नसेल तर ही जीवनसृष्टी नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. आई, देवाने मानव जातीला बनवताना प्रथम त्याने पुरुषाला बनविले पण नंतर त्याला हे कळून चुकले की, पुरुषांमध्ये जीवन निर्माण करण्याची शक्ती नाहीये. त्याला पुरुषामध्ये अनेक चुका आढळून आल्या म्हणून तर त्याने स्त्रीची निर्मिती केली. मग आपण हा ठेवा जतन करायला नको का? आई, तू एक स्त्री आहेस म्हणून तुझ्या आईवडिलांनी तुला सोडून दिले असते तर? आई, मुलगी ही लक्ष्मी असते, मुलगी ही आपलं सर्वस्व असते, तिचे स्वागत आपण करायला हवे, मुलगी आहे म्हणून तिला लाथाडू नये तर तिचे प्रेमाने, मनापासून स्वागत करावे आणि काय फरक पडतो, आपले अपत्य मुलगा आहे की मुलगी. आपल्याला ते दोघेही समानच असायला हवे, त्यांच्यात भेदभाव करता कामा नये. मुलीला खूप शिकवून तिला तिच्या पायावर भक्कम उभे करावे, तिला धाडसाने, धैर्याने या जगात जगायला शिकवावे. आपण सर्वांनी मुलीचे स्वागत करायला हवे आई . आई तुला समजत आहे ना मी काय बोलतोय ते . उदय आता रडकुंडीला आला होता तो त्याच्या आईला समजावत होता . 

हे सर्व ऐकून उदयच्या आईचे डोळे उघडले. ती घळा घळा रडू लागली. तिने सुप्रियाची माफी मागितली. काही दिवसानंतर त्यांच्या घरात पाळणा हलला. सुप्रियाला एक गोंडस अशी मुलगी झाली होती, पण तिचे सर्वात जास्त स्वागत त्या मुलीच्या आजीने केले होते व तिला आपल्या मुलाचा व आपल्या सुनेचा अभिमान वाटत होता. आज त्यांच्या मुळेच तिचे डोळे उघडले होते. आज त्या घरात नवीन पहाट झाली होती. 


Rate this content
Log in