डिअर डायरी ( दिवस ४ था )
डिअर डायरी ( दिवस ४ था )


आज कोरोना बातम्या बघण्याचा उत्साह थोडा कमी वाटतोय. त्यात RBI च्या विशेष सवलती ठिक. शासन खात्यावर पैसे टाकणार तेही ठिक. पण... ज्यांची नोंद कुठेच नाही...खाते नाही... हातावर पोट असलेले त्यांच्यापर्यंत मदत पोहचवणार कशी ? तसेच सर्व सामान्य लोक ऑनलाईन व्यवहार करणार कसे ? आणि बँकेतही पोहचार कसे ? ग्रामिण भागात बँक व्यवहार सुरू आहेत का ? सगळेच कसे संदिग्ध...
तसेच औरंगाबाद ( महाराष्ट्र ) शेंद्रा MIDC मधील शेकडो मैल पायी प्रवास करून ते गाठणार बिहार ही लोकमत मधील हॅलो औरंगाबाद मधील बातमी...परप्रांतीय लोकांना घरी जाण्याची ओढ आणि नसलेली वाहतुक व्यवस्था त्यामुळे डोक्यावर सामान घेवून चाललेले लोक पाहुन मनात धस्स झाले. परदेशी लाखो लोकांना विमानांनी खास भारतात आणले. त्यांना मोकाट सोडल्याने भारतात कोरोना पसरला आणि लॉक आऊट करतांना भारतातील गरीबांचा विचार कोणीही केला नाही.
यातुन सरकारची पूर्वतयारी कमी पडली का ? बरे हे घडत असतांना २५ तारीख गुढीपाडवा मुहुर्तावर राममंदिर बांधकाम सुरू झाले ? नेमकं माझ्या देशात काय चालू आहे ते कळत नाही.
बरं अवकाळी पावसाने दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. विद्युत पुरवठा रात्रभर खंडीत आज दु. १२ वा. विद्युत पुरवठा सुरळीत झाला. त्यात मागील काही दिवसात २ कंत्राटी कामगार यांचा विजेच्या धक्क्यांनी मृत्यू झाला आहे.
सगळीकडे कसे नकारात्मक बाबीच दिसत आहे....
तीन महिने आणखी हिच परिस्थिती राहील असे काहीजण म्हणताहेत.... म्हणजे...बाप रे...किती भयंकर...