स्वच्छता, आरोग्य, सवय
स्वच्छता, आरोग्य, सवय


वरवर पाहता हे तीन शब्द वेगवेगळे भासत असले तरी तीनही शब्द हे व्यक्तीच्या उत्तम व निरोगी आरोग्याशी निगडीत असे आहेत.
स्वच्छता हा सर्व मानव जातीसाठी महत्त्वाचा शब्द आहे. अगदी सवयीचा भाग हा शब्द व्हायला हवा. स्वच्छता वैयक्तीक परिसर व मनाचीही हवी तरच उत्तम व आरोग्यदायी जीवन लाभेल. राष्ट्रसंत गाडगेबाबा ते अलीकडचे स्वच्छता अभियान हेच आपणास शिकवते.
आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार व्हायला हवा. आरोग्यदायी सेवा पुरवणे हे शासनाचे कर्तव्य असावे. आजही ग्रामीण भागात आरोग्य सुविधा या सहज उपलब्ध होत नाहीत.
सवय चांगली व वाईट अशी म्हणता येईल मात्र चांगल्या व वाईट सवयी या वैयक्तीक आरोग्याशी व सामाजिक जीवनाशी निगडीत अशा आहेत. वाईट सवयी यांना व्यसन म्हणुया... यातून व्यक्ती व्याधींनी ग्रस्त होते व आरोग्य गमावून बसते. तसेच काही सवयीमुळे व्यक्ती सामाजिक स्वास्थ्यदेखील बिघडवते.
अशा पद्धतीने थोडक्यात जर या तीनही शब्दांचा गहन आशय समजावून घेतला तर नक्कीच आपण वैयक्तीक आनंदी निरोगी जीवन व्यतीत करू शकतो व सामाजिक स्वास्थ्यही राखू शकतो.