kishor zote

Others

4.0  

kishor zote

Others

डिअर डायरी ( दिवस ६ वा )

डिअर डायरी ( दिवस ६ वा )

1 min
553


डिअर डायरी (दिवस ६ वा)

   कालच्या मन की बात मधे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी गरिब व मजदूर असलेल्या लोकांची कोरोनामुळे होत असलेल्या असुविधेबाबत माफी मागितली. खरंच सर्वसामान्य जनता त्रासली आहेच. त्यात मुस्लीम बांधवांनी आपली शुक्रवारची नमाज मौलविंच्या आदेशाने घरातच अदा केली. मात्र सध्या व्हाट्सअपवर ज्या पोस्ट वायरल होतात त्यात कोरोनामुळे महाराष्ट्रात मृत्यू पावलेले व लागण झालेले रुग्ण हे मुस्लीम आहेत व हज यात्रेवरून आले आहेत, असे म्हटले गेले आहे.


तसं पाहिले तर सरकारी धोरण हे असे नावे उघड करण्याचे नाही. असो माझ्या या देशात अशा धार्मिक तेढ माजवणाऱ्या घटना घडल्या आहेतच. मात्र आज देश वेगळ्या परिस्थितीत आहेत. सर्व लोक एक देश होवून या महामारीला सामोरे जात आहे. सर्वांनी एक होवून लढले पाहिजे. सरकार संभाव्य धोके पाहता रेल्वेचे डबे आयसोलेशन वार्डमधे बदलत आहेत. टाटासारखे व काही सिलेब्रेटी सुध्दा मदत करण्यास सरसावत आहेत. ही एक चांगली घटना घडत आहे. येणाऱ्या काळातही असेच चांगले व सकारात्मक बदल माझ्या देशात घडो हीच आशा...


Rate this content
Log in