kishor zote

Tragedy

3.0  

kishor zote

Tragedy

डिअर डायरी ( दिवस ५ वा )

डिअर डायरी ( दिवस ५ वा )

1 min
337


डिअर डायरी ( दिवस ५ वा )

    कालची जी स्थलांतर समस्या बाबत चिंता व्यक्त केली तसीच समस्या दिल्ली बस स्टँडवर दिसली. हजारो लोक बस स्टँडवर जाण्यासाठी जमले होते. विदारक चित्र होते. मात्र आज सकाळी महाराष्ट्रातील राज्यपाल यांनी स्थलांतरीत न करता परप्रांतीय लोकांना आहे तेथेचे थांबवावे व त्यांची व्यवस्था करावी असे जिल्हाधिकारी यांना आयुक्त मार्फत आदेश दिले. विशेष निधीची देखील तरतुद केली आहे. वेगवेगळे मदतीचे हात पुढे येत आहे ही आनंददायी बाब आहे. हे सगळं घडत असताना एक बातमी लक्ष वेधत होती. १८ जानेवारी ते २३ मार्च या दरम्यान २५ लाख विदेशी भारतीयांना भारतात आणले. त्यांना सेफ आणले आणि देशातील नागरिकांना स्थानबद्ध केले. ३० जानेवारी २०२० ला पहिला कोरोना बाधीत रुग्ण देशात सापडला. २२ मार्च जनता कर्फ्यू लावला व २४ मार्च ला लॉक डाउन केले. मग या ५२ दिवसात कोणती खबरदारी घेतली गेली ? भारतात जे आणले त्यांची तपासणी व देखरेख झाली असती तर... आज देशातील गरीबांमाधी असे परागंदा व्हावे लागले नसते आणि देशाला स्थानबद्ध व्हावे लागले नसते....

   आता हलकेच चर्चा सुरू झाली आहे... प्रत्येक जबाबदार व्यक्तीला यावर नक्कीच विचार करावा लागेल. परदेशातून आलेल्या या कोरोनाला देशाच्या सीमेवर थांबवता आले नसते का ?...



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy