डिअर डायरी ( दिवस ३ रा )
डिअर डायरी ( दिवस ३ रा )
डिअर डायरी ( दिवस ३ रा )
सरकारी घोषणा झाल्या की तत्काळ अंमलबजावणी व्हावी असे वाटते. निदान अशा महामारीच्या काळात तरी...
रेशनवर मिळणारे धान्य सर्वसामान्याला मिळावी ही माफक अपेक्षा रेशनकार्ड असो किंवा नको. मात्र आज सर्वत्र गोंधळ तर आहेच त्यात भर म्हणजे रेशन दुकाने अद्यापही बंद आहेत. हातावर ज्यांची पोटे आहेत ती एकच आस लावुन बसले आहेत. रेशन दुकाने उघडावीत नाहीतर मरण तर उपासमारीने देखील आहेच...
काही ठिकाणी पंगत जेवण तर काही ठिकाणी पॅकेज जेवण डब्बे वाटप कार्यक्रम सुरू होते. काहींनी किराणा सामान पॅक करून वाटप केले. या जरी चांगल्या गोष्टी असल्या तरी अनेक गरिबापर्यंत मदत पोहचत नाही त्याचे काय? तसेच अनेक गावांनी शहरातून येणारे लोक यांना गावबंदी केली असल्याने वेगळीच समस्या निर्माण होत आहे. सर्व लढाई आहे फक्त जगण्यासाठीच... स्वतःच्या जीवाच्या रक्षणासाठी...
बघुयात या जीवन मरणाच्या लढाईत जीवन टिकते की.....