सहल
सहल


सहल नुसता शब्द उच्चारला तरी मन प्रसन्न होते. प्रशिक्षण व इतर सामाजिक संघटन कामामुळे बऱ्याच भागाचा दौरा करता आला. सहल म्हणून त्याचा आनंद घेतल्याने त्रास जाणवला नाही.
सहल म्हटली की आठवते शाळा, सहलीला सुरवातच मुळी शाळेत होते. शाळेत तशी सूचना आली की आनंदाला उधान येत असे. ठाण्यासारख्या शहरी भागात शालेय जीवन गेल्याने १ दिवसची सहल आयोजीत होत असे.
आर्थीक स्थीती बेताची त्यामुळे घरी रडरड करावी लागली. तर कधी वर्गशिक्षकांनी फी भरली. मात्र सहलीचा आनंद दरवर्षी घेतला. सहलीचा दिवस म्हणजे रात्रीची झोपच नाही. सकाळीच तयारी करून आईच्या हातची पुरी व बटाटा भाजी म्हणजे जणू अमृतच. मजा मस्ती करून रात्रौ उशीर झाला तरी आई शाळेजवळ वाट बघत असायची. घरी येईपर्यंत वाटेने सर्व गमती जमती सांगीतल्या जायच्या.
कोणी उलट्या केल्या, कोणी खोडी काढल्या ,कोणी गाणी म्हटली, कोणी मदत केली इ.इ. रात्री झोपत ही पुन्हा एकदा ती सहल घडत असे, स्वप्नातही तोच आनंद पुन्हा एकदा घेता येत असे.
कॉलेजला औरंगाबादला आलो येथे ज्युनिअर ची कोणी सहलच काढत नसे, मन मानेना १२ वी ला असताना सरांशी बऱ्याच वेळा संवाद साधुन सहल काढली आणि ती प्रथा आजही सुरू आहे. डि.एड. ला ही आमच्या ग्रुपची जबाबदारी घेवून त्यांची ही सहल घडवली. नोकरी मधे शाळेत सहली जबाबदारीने पाड पाडल्या.
लोकचेतना अभियान,7 हॅबीट, राज्य विज्ञान संस्था नागपूर इ. ठिकाणी ही सहल घेतल्या. सहलीमुळे बराच अनुभव व पर्यटन ही झाले आहे.
मात्र आता वैयक्तिक फिरणे कमी झाले आहे. प्रशिक्षणही कमी झाल्याने इतर जिल्हे पाहणे कमी झाले आहे. खरंच सहल ही असावी, तुमच्या आमच्या सर्वांच्या आनंदासाठी.
लहान मोठ्यांना हा एकमेव आवडणारा व आनंदी करणारा प्रकार आहे, त्यामुळे फॅमिली सहल काढण्यास ही काही हरकत नसावी, होय ना...!