डिअर डायरी (दिवस दुसरा)
डिअर डायरी (दिवस दुसरा)
कालचा पहिला दिवस... कोरोनामुळे देश लॉकडाउन झाला होता. अनेक ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही कामानिमित्त, काही उगाचच कुतुहल, तर काही विनाकारण रोडवर फिरताना दिसत आहेत.
प्रत्येकाच्या मनात एकच विचार आहे. आम्ही काय गुन्हा केला आहे? कोरोना विषाणू तर विमान मार्गे देशात आला आहे. मग देशातील सर्वसामान्य लोकांची काय चूक?
नेमका कोणाचा हलगर्जीपणा नडला आणि विनाकारण बळी पडतोय तो सामान्य आणि हातावर ज्यांचे पोट आहेत त्यांचा. घरात राहण्यासाठी अनेक घरात तेवढी जागासुद्धा नाही. त्यांनी दैनंदिन कामे एकाच खोलीत राहून कशी करावीत?
सध्यातरी प्रश्न खूप आहेत. मात्र येणारी वेळ काय उत्तरे देतेय ते पाहुयात. सध्या तरी घरीच थांबा...