Jyoti gosavi

Others

4  

Jyoti gosavi

Others

फसवणूक

फसवणूक

5 mins
47


हा पाच अक्षरी शब्द आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वेळा आला असेल.

त्यातील अगदी पहिलाच मुद्दा म्हणजे आपले लग्न, जगातील प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला लग्न झाल्यानंतर आपली स्वतःची फसवणूक झाली असे वाटते, किंवा यापेक्षा बेटर ऑप्शन आपल्याला मिळाले असते पण आमच्या नशिबाला हेच ध्यान होते.

 काय करणार !"पदरी पडल आणि पवित्र झालं"पण हा माल काही एक्सचेंज करता येत नाही आणि बदलून मिळत नाही असो


आता बघूया खऱ्याखुऱ्या फसवणूकीकडे, ऑनलाइन फसवणूक बऱ्याच वेळा झाल्याचं आपण ऐकतो बराच वेळा कपड्यांच्या बाबतीत ते होते प्रत्यक्षात दाखवतात ,त्यापेक्षा आलेला कपडा वेगळा असतो.


अशी एक दोन वेळा कपड्यांची ऑनलाईन झाली म्हणजे फिटिंगला वगैरे बरोबर नाही अगदी घट्ट पण त्यापेक्षा माझी एक मोठी फसवणूक सांगते

मी लग्नाआधी पाच वर्षे नोकरी केली ,तेव्हा स्वतःला अंगठी, रिंगा, केल्या होत्या ,आणि डोंबिवलीतील एका सोनारा कडून एक तोळ्याची डिस्को चेन घेतली. तेव्हा पिळया पिळ्याच्या डिस्को चेनची फॅशन होती. चेन घेतली आणि महिनाभरात थोडीशी तांबूस वाटू लागली.

 त्या आधी कामावर पण सगळ्यांना दाखवली तर कोणाला ती सोन्याची वाटेना, मग त्या सोनाराकडे जाऊन बदलून मागितली, पण तो मला दाद देत नव्हता. तेवढ्यात दोन-तीन महिन्यात माझे लग्न झाले आणि सासरी ही गोष्ट सांगितली. 

आता मला थोडासा सपोर्ट आला होता, लग्न झाल्यावर आम्ही दोन-तीन चकरा भांडुप ते डोंबिवली त्या सोनाराकडे केल्या, पण तो टोलवा टोलवी करू लागला.

मग एक दिवस आयडिया केली तिन्ही सांजेच्या वेळी  त्याच्याकडे गेले, दुकानात दोन-तीन गिऱ्हाईक होती, त्यातील एक जण लग्नाचे दागिने करायला आला होता तेव्हा आम्ही आमची चेन सगळ्यांसमोर याच्या समोर ठेवली आणि कधी बदलून देता असे विचारले ,

तो आता तिन्ही सांज आहे ,वगैरे सांगितल्यावर मी त्या लोकांना म्हणाले यांच्याकडची चैन खोटी लागलेली आहे .

बदलून मागितली तर देत नाहीत, कोणी यांच्याकडे खरेदी करू नका, त्याबरोबर लग्नाचे दागिने खरेदी करणारा माणूस म्हणाला "आधी यांचा व्यवहार क्लिअर करा" तर आम्ही पुढे दागिन्याचे बघतो. आणि त्याने एकदा झटक्यात मला चेन बदलून दिली.

दुसरी फसवणूक आहे घराबाबत, आम्ही लग्न झाल्यानंतर ओळखी मधून एक फ्लॅट बुक केला. पण तो डेव्हलपर आणि बिल्डर असा असल्याने, त्याने आमचा एक फ्लॅट तीन लोकांच्या नावाने दिला. प्रत्यक्षात आम्ही जेव्हा कमिटीच्या मिटींगला गेलो तेव्हा तेथील लोक सांगू लागले, की तुमचे या लिस्टमध्ये नावच नाही.

 त्या काळात 83000 भरलेले होते. त्यामुळे डोक्याला मोठे टेन्शन आले .

तो माणूस मुलुंडला राहायचा, अनेक वेळा त्याच्या कडे जाऊन, पैसे मागितले,त्याने दोन वेळा चेक दिले ते बाउन्स झाले,

 इतके दिवस त्याच्या घरात जाऊन बोलत होतो, मग मात्र मी दरवाजात उभे राहून आरडाओरडा करू लागले, शिवाय तेव्हा आनंद दिघे साहेब होते त्यांच्या दरबारात याला नेला मग मात्र ही युक्ती लागू पडली आणि त्याने 80 हजाराचा चेक दिला तो वठला.


टूर मधली खरेदी ही तर फसवणुकीसाठीच असते,कारण त्या दुकानदारांना माहीत असते हे गिऱ्हाईक काय पुन्हा रिप्लेसमेंटला येणार नाही. त्यामुळे आपल्याला दाखवतात एक आणि पार्सल मध्ये बांधतात दुसरेच !

माझ्या बहिणीने साउथ कडे एक साडी घेतली ,ती घासली की म्हणे चंदनाचा वास येत होता. म्हणून तेव्हा ती अशीच काहीतरी सात आठ हजाराला साडी आणली, आणि घरी आल्यावर कशाचं काय! तो त्यांनी सेंट मारून ठेवलेला होता, किंवा त्यांची काहीतरी ट्रिक होती. नंतर घरी आल्यावर ती साडी एका धुण्यात खराब झाली. आणि चंदनाचा सुवास तर केव्हाच गायब झाला होता.

प्रवासातल्या तर बऱ्याच गोष्टी खराब निघतात, इतकेच काय प्रवासातल्या फूड पार्सल देखील वाईट असतात.

 ट्रेनमध्ये दोन-चार स्टेशन आधी, पोम्प्लेट वगैरे वाटतात ती जाहिरात आणि चित्र बघून आपण ऑर्डर करतो, त्याचे पैसे पण ॲडव्हान्स मध्ये देऊन ठेवतो, पण प्रत्यक्षामध्ये त्या क्वालिटीचे जेवण कधीच नसते.

 दोन वेळा तर असं झाले आहे की, आता फ्लाईट पकडायची किंवा आता ट्रेन पकडायची तर त्या ड्रायव्हरला सांगितले की, 

"भाई जरा खाना पॅक करके लेने का है ,त्याने अशा हॉटेलमध्ये नेलं की जिथे अतिशय वाईट अन्नाचं पार्सल आम्हाला बांधून दिलं. प्रत्यक्षात हॉटेल अगदी हाय फाय,

 पैसे देखील हाय फाय 

,पण जेवण मात्र हाय हाय

 (खराब )

त्यानंतर कानाला खडा ,

पार्सल बांधून घ्यायचे नाही, एक तर जेवूनच निघायचे किंवा ट्रेनमध्ये येईल ते खायचे असे अनेक किस्से आहेत .

टूर ट्रॅव्हल्स वाले देखील ट्रॅव्हल्स फसवणुकीच्या बाबतीत आघाडीवर असतात.

 कैलास मानस यात्रा करून आलो तेव्हाचा अनुभव माझ्या लेखात लिहिलेलाच आहे .

आपल्याकडून घोड्यांचे चाळीस हजार आणि पोर्टल चे दहा हजार घेतात ,आणि पहिल्या टप्प्यात गेल्यानंतरच त्यांची सुरुवात होते. "एवढं बर्फ पडलंय ,तेवढा असं झालंय, याक सुद्धा माघारी आलेत म्हणजे थोडक्यात घोडे पुढे जाणार नाहीत. आता घोडे नाहीत म्हणल्यावर पोर्टरपण नाही. क्वचित त्यांना आमच्यासारखे खमके गिऱ्हाईक भेटते, की आम्ही भांडलो म्हणून आमच्यामुळे उरलेल्या चार लोकांना देखील दुसऱ्या टप्प्यापर्यंत घोडे मिळाले आणि पोर्टर देखील मिळाला.

 तिथून पुढे खरंतर तिसऱ्या टप्प्यात देखील त्यांनी काहीतरी व्यवस्था करायची असते ,पण ती त्यांनी केली नाही. सगळ्यांना उतरुन जावे लागले, असो!

 फोर सिस्टर च्या टूरमध्ये पण हाच अनुभव आला, आमच्याबरोबर ती जी टूर मॅनेजर पाठवली होती तिला काहीही अनुभव नव्हता. त्यामुळे तिच्याबरोबर आम्हालाही हॉटेल बुकिंग शोध, जेवण शोध ,हे सगळे उद्योग करावे लागले. शिवाय लहान पोरासारखी ती रुसून बसायची, जेवायला यायची नाही, जशी काय आम्हीच तिला ट्रीपला आणली होती ,आणि आम्ही तिच्या नाक दुऱ्या काढायचं ,

बर !तिथून ओनरला कितीही फोन केले तरी ,तरी तो एवढ्या वेळ सांभाळून घ्या ,पुढच्यावेळी तिला ट्रीप मधून काढूनच टाकतो वगैरे वगैरे सांगत राहिला .

शेवटी फसवणूक आमचीच झाली होती ,नंतर तिला त्याने काढले नाही काढले कोण बघायला गेले !असो अशा फसवणुकीच्या अनेक गोष्टी आहेत .


ऑनलाइन फसवणुकीबद्दल तर आपल्याला माहीतच आहे. शिवाय कधी ओटीपी पाठवायचे मेसेज येतात, कधी एखादा फोन करून बँकेतून बोलतोय असं सांगत तुमचे बँक डिटेल्स आणि तुमचा पासवर्ड विचारतो ,माझंच घोडबंदर च घर भाड्याने द्यायचं होतं तेव्हा एका फौजीने मला स्वतःचे फोटो, आयडेंटी कार्ड ,आणि असे बरेच पंधरा-वीस फोटो पाठवले. माझ्या घराची ऍडव्हर्टाईस नो ब्रोकरवर केलेली होती त्यातून माझे डिटेल्स शोधून मला स्वतःचे फोटो पाठवले, आणि तिकडे फॅमिली शिफ्ट करणार आहे आणि तुमची जागा पक्का 100% भाड्याने घेणार आहे असे न बघताच सांगितले.

 बर हा कुठे तर एमपी मध्ये किंवा युपी मध्ये पोस्टिंग वर, आणि आता माझा ऑफिसर तुमच्याशी बोलेल, आम्हाला ऑफिस कडून भाड्याचे पैसे सॅक्शन होतात, वगैरे! वगैरे!, फौजी आहे म्हटल्यावर माणूस विश्वास ठेवतो.

 त्या ट्रिकला तर मी देखील फसले असते ,पण मी हुशारी केली आणि लेकाच्या हातात फोन दिला.

 मग त्यांनी काहीतरी ॲप पाठवले आणि त्याच्यावरून माझ्याच मुलाला पैसे पाठवा सांगत होता. मग तू एक रुपया पाठवला की आमच्याकडून दोन रुपये येतात तसं तू 15000 टाक मग तुला तीस हजार येतील असे सांगत होता. माझ्या लेकाने जेव्हा त्याला फोन वरून शिव्या द्यायला सुरुवात केली तेव्हा त्याने फोन कट केला .

एकदा लाईटच्या बाबतीत देखील असेच घडले ,ते आधी हेरून ठेवतात की, हे फ्लॅट बंद आहेत म्हणजे यांचे लाईट बिल पेंडिंग असेल, घोडबंदरचा माझा फ्लॅट करोना मुळे बंद होता. मग तुमचं बिल भरलं नाही. तर संध्याकाळी सहा पर्यंत तुमच लाईट कनेक्शन कट करण्यात येईल असा मेसेज आला. असा मेसेज आला की माणूस सहसा घाबरतो ,आणि समोरचा सांगेल तसे वागतो.

 त्यांनी दिलेला नंबर वर फोन केला, मग ते एम एस ई बी चे सोडून दुसरे ॲप डाऊनलोड करून त्याच्यावरती बिल पाठवा सांगत होते.

 अर्थात ते केले नाही तेव्हा पण मुलाच्या हातामध्येच फोन दिला होता त्यामुळे फसवणूक होता होता वाचले.

 अशा पद्धतीने अनेक प्रकार आहेत प्रत्येकाने सावध राहून , कोणाला तरी विचारून कन्फर्म केल्याशिवाय कोणते ॲप डाऊनलोड करायचे नाही कोणाला पैसे पाठवायचे नाही कोणाला ओटीपी द्यायचा नाही


Rate this content
Log in