Jyoti gosavi

Others

1.7  

Jyoti gosavi

Others

ती आई होती म्हणूनी

ती आई होती म्हणूनी

3 mins
52


 माझ्या हॉस्पिटलमध्ये एक मनीमाऊ आली ,कुठून? कोणी आणून सोडली? माहित नाही पण नंतर ती आमची झाली .

हॉस्पिटल मधील बरेच लोक तिला खाऊ घालू लागले, बरेच लोक हाकलून देऊ लागले .

जगात दोन्ही प्रकारची माणसं असतात, तसेच इतर काही लोक प्राण्यावर प्रेम करणारे आहेत ,तर काही लोक त्यांना हाकलणारी मारणारी आहेत .

त्यातच मनी माऊ एकदा बाळंतीण झाली ,आता शेवटी आमच हॉस्पिटल आहे एवढा मोठा गोतावळा आम्ही सांभाळू शकत नाही .कारण लहान मुले असतात, बाळंतीणीअसतात. 

त्यातली पण दोन पिल्ले वाचली. एक मस्त काळीभोर पिवळ्या डोळ्याची मनी माऊ ,आणि दुसरी तिच्या सारखी करडी आणि काळपट पट्टे वाली, आता तिघेही खाऊ खायला येऊ लागले. माझ्यामागे तर जास्तच फिरत असतात ,कारण हक्काचं खायला मिळण्याचे ठिकाण माहीत होतं.


 काळी माऊ तर नुस्ती माझ्या पाया पायात घोटाळते, मी चालेल तशी माझ्याबरोबर चालते, तर आता तिघांचा परिवार चांगला मस्त चुस्त होता. पण आमची मनीमाऊ पुन्हा एकदा बाळंत झाली .

पहिली दोन पिल्ले आता कुठे थोडीशी युवा अवस्थेत येत होती, तोच ही पुन्हा बाळंत झाली .

हिला मालवणीचा गुण लागला! आता काय करायचे?

 तिने कुठेतरी कोपरा शोधून तीन पिल्ले घातली. मग म्हणतात ना मांजर आपली पिल्लं सात घर फिरवते, तशी त्यांना तोंडात धरून ती सुरक्षित जागा शोधू लागली.

 कोणी तिला आपल्या विभागात येऊ देईना. ती बराच वेळ तोंडात पिल्लू घेऊन असेच इकडून तिकडे फिरत राहिली.

 त्यानंतर माझी सुट्टी झाली मी घरी निघून आले. पुढे काय झालं माहित नाही. त्यानंतर सलग आठ दिवस मांजर मला दिसलीच नाही, आणि तिची पिल्ले रात्री ऑफिसरने हॉस्पिटलच्या बाहेर काढायला सांगितली. सर्व्हटने एका कागदी खोक्यात ठेवून हॉस्पिटलच्या बाहेर काढली.मी नंतर जाऊन पाहिले तर, एकाला एक चिटकून बसलेली, डोळे सुद्धा न उघडलेली ती पिल्ले होती. मी आणि सिक्युरिटीने त्यांना बोळ्याने दूध पाजण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यांना तेही पिता येत नव्हते मग रात्रीच्या सर्व्हटने सांगितले की

 " वो जो बिल्ली के बच्चे बाहर रखे है ,उसके मा को कुत्ते खा गये" असा जीव कळवला ना! आता ती बिचारी डोळे सुद्धा न उघडलेली पिल्लं कशी जगतील? एक दोन दिवस आम्ही दूध पाजलं, पण तेही त्यांना पिता येत नव्हतं.

 ती मरणारच होती आणि शेवटी चार-पाच दिवसानंतर ती पिल्ले मेली. त्याच्या एक दोन दिवस आधी मांजर मला पाठीमागे गवतात आवाज देताना दिसली, म्हणून मी तिच्यासाठी नेलेली पेडिग्री घेऊन पाठीमागे गेले.

 एरव्ही कोणाला जवळ सुद्धा न येऊ देणारी ती मनीमाऊ, एका जागीच बसून होती.

 समोर खायला टाकले पण खात नव्हती, जवळून बघितले तर सतत तोंडातून लाळ बाहेर येत होती, काय झालं मला समजेना.

 मी माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसले तर ती तशीच माझ्या मागे आली ,आणि माझ्या पायाशी बसली .

मी डोक्यावरून ,अंगावरून हात वगैरे फिरवला तेव्हा मला हाताला कडक झालेली जखम लागली, आणि वास देखील आला. 

आता काय करायचे? तिला डॉक्टर कडे न्यावे का ?इथे व्हेटर्नरी डॉक्टर कुठून आणायचा? असं सारं माझ्याबरोबर एक सर्व्हट आणि मी, चर्चा करत होतो.

 तो पण ॲनिमल लव्हर आहे.


 (मी तर अगदी लहानपणापासून सर्व प्राणीमात्रांवर जीव लावते .

मागे एकदा आमच्याच कशिश पार्कमध्ये एका घुबड बाळाला रेस्क्यू केले होते.

 ते कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले मी घरी आणले, आणि नंतर दोन चार तासांनी पक्षी मित्र बोलावून त्याला हॅन्ड ओव्हर केले. त्याने बोरवली च्या जंगलात सोडले, तसा त्याचा व्हिडिओ पण पाठवला. तेव्हा सगळे म्हणाले पांढरे घुबड म्हणजे लक्ष्मीचं वाहन, ते तुमच्या घरी आलं आता तुमची पुष्कळ बरकत होणार .

ते काय होईल माहित नाही पण एका दुर्मिळ प्राण्याचा जीव वाचवण्याचे समाधान मिळाले.)


 इतक्यात माझ्या डोक्यात आले आपणच तिला ट्रीटमेंट करूया, नाहीतर प्राण्यांना माणसाची ट्रीटमेंट डॉक्टर देतात .मी माझ्या कुत्र्याला वॅक्सिन आणि टीक झाल्या तर त्यावरील इंजेक्शन घरच्या घरी देते. एका ब्रदर ला सांगितले मला जरा इंजेक्शन ऑगमेंटीन भरून दे! त्याने लगेच भरून आणून माझ्या हातात दिले. एका सर्व्हटने मला मांजरीला धरण्यास मदत केली, आणि मी तिला इंजेक्शन टोचले. दुसऱ्या दिवशी बघितले तर मांजरी चांगली तरतरली होती.

 आणि जखमेला वास पण येत नव्हता .

पुन्हा खायला वगैरे घेतले घातले, त्यानंतर मला चार दिवस फिरायला जायचे होते. शुक्रवारी जायचे तर गुरुवारी तिला अजून एक डोस टोचला. त्या चार दिवसात इतरांनी देखील तिची काळजी घेतली.

 तर गोष्ट अशी घडली होती, तिची पिल्ले बाहेर काढल्यावर, त्या पिल्लांवरती आमच्याच आवारातील दोन-तीन कुत्री गेली आणि आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी या एवढ्याशा मनीमाऊने तीन चार कुत्र्यांशी फाईट दिली.

 एवढासा जीव पण आपल्या पिल्लांसाठी लढला, जखमी झाला, आणि पार मरणाच्या दारात पोचला होता .पण त्या दोन इंजेक्शनने ,आणि इतरांनी घेतलेल्या काळजीने, आमची मनी माऊ ठीक झाली.

म्हणूनच मी ते शीर्षक दिलं आहे 

"ती आई होती म्हणूनी "


Rate this content
Log in