Jyoti gosavi

Others

3.5  

Jyoti gosavi

Others

पाठीवर मारावे पण

पाठीवर मारावे पण

1 min
50


पाठीवर मारा पण पोटावर मारू नका


हा एक ग्रामीण पारंपारिक वाक्यप्रचार आहे. त्यामध्ये म्हटले जाते एखाद्याच्या पाठीवर मारावे, पण पोटावर मारू नये .

म्हणजे काय ?का पाठीवर मारावे? का पोटावर मारू नये ?

अगदी याचा शब्दशः अर्थ घेतला तरी आपल्या पाठीचा मसल हा सर्वात मोठा जाड आणि जास्त क्षमता असणारा असतो, त्यामुळे पूर्वी चाबकाचे फटकारे किंवा काही असेल ते पाठीवर मारण्याची शिक्षा असायची, मोठी मोठी देखील माणूस पाठीवर वाहून येतो पण पोट मात्र नाजूक असते आपल्या पोटात अनेक अवयव हृदयापासून आतड्यापर्यंत असतात त्यामुळे पोटात एक गुद्धा जरी मारला तरी माणूस कळवळतो हा झाला शब्दशः अर्थ

आता दुसरा अर्थ असा आहे एखादा तुमचा गरीब मजूर आहे नोकर आहे त्याच्या हातून काही चूक झाली तर एखादा रट्टा त्याच्या पाठीवर द्या पण त्याचा पगार कमी करू नका ,कापू नका, किंवा त्याला नोकरीवरून काढू नका

त्या पगारावरच त्याचं घरदार ,संसार, पोरेबाळे ,त्यांच्या पोटात जाणारे दोन घास अवलंबून आहेत. जर तो सालगडी असेल म्हणजे तुमच्याकडे जेवण खाऊन वर्षाचा एकदा पगार घेणार आहे त्याला सालगडी म्हणतात म्हणजे घरातून स्वयंपाक करून जेव्हा पाठवाल, तेव्हा त्याला जेवण मिळेल. मग त्याला दोन फटके मारा पण त्याला उपाशी ठेवू नका.

यालाच म्हणतात पाठीवर मारा पण पोटावर मारू नका


Rate this content
Log in