Jyoti gosavi

Abstract

2  

Jyoti gosavi

Abstract

मऊ लागले म्हणून...

मऊ लागले म्हणून...

1 min
31


मऊ लागले म्हणून कोपराने खांदू नये,  ही एक पारंपरिक ग्रामीण म्हण आहे. म्हणजे कधी कधी एखादी गोष्ट आपल्याला हलक्यात मिळाली तर आपण पार ती ओरबाडूनच घेतो.

उदाहरणार्थ ,बाजारात एखादा फेरीवाला मेथीचा ढीग लावून बसला आहे. त्याला संपवून लवकर जायचे आहे, म्हणून तो पाच रुपयाला एक मेथी लावतो.

 तेव्हा समोरचा माणूस त्याला पाच रुपयाला दोन मागतो, ही माणसाची मानसिकता आहे.

पण समोरच्याची काही मजबुरी असेल कदाचित तो तोट्यात विकत असेल हा विचार मागणारा करत नाही.

 एखादा स्वभावाने नरम असेल तर, अनेक नातेवाईक त्याचा गैरफायदा घेतात. निमुटपणे सहन करणारा यजमान असेल तर ,अनेक जण पूर्वी कायमचे त्याच्या घरी बस्तान ठोकून असायचे.

म्हणजे जेथे खांदण्यासाठी कुदळ लागते ,परंतु येथील माती एवढी भुसभुशीत आहे की हाताने पण निघते किंवा कोपराने पण खांदली जाते .

आपल्या म्हणी पण अशा गमतीशीर बनवल्या आहेत, बघा एखादी कडक गोष्ट खोदण्यासाठी कुदळ लागते ,पण या उलट कोपर हा अतिशय सेन्सिटिव्ह भाग आहे त्याला थोडा देखील धक्का किंवा मार सोसत नाही.

 पण जी गोष्ट अशा कोपराने देखील खांदता येते, ती किती भुसभुशीत असेल विचार करा !

म्हणूनच म्हटले आहे मऊ लागले म्हणून कोपराने खांदू नये ,म्हणजेच उगाच कोणाचा गैरफायदा घेऊ नये.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract