Jyoti gosavi

Inspirational Thriller

2  

Jyoti gosavi

Inspirational Thriller

शिवरायांचे आरमार

शिवरायांचे आरमार

5 mins
34


नुकतेच माझ्या वाचनात सावळ्या तांडेल नावाचे पुस्तक आले. जे खूप लहानपणी तिसरी चौथीत असताना वाचले होते पुन्हा एकदा त्याची उजळणी चालू असताना हा विषय मिळाला म्हटले तर थोडा अवघड आहे पण लिहून पाहूया


शिवरायांचे आरमार म्हटले की आपल्याला प्रथम आठवतो तो सिंधुदुर्ग 

मालवण पाण्यावरी किल्ला

 शिवाजी आत कसा शिरला


गेल्या तीनशे वर्षांपासून त्या बेगुमान सागराच्या लाटा झेलत तो देखील तितक्याच बेगुमान पणे इतिहासाची साक्ष देत आपल्या अभेद्य छाताडावर ऊन पाऊस वारा झेलत उभा आहे.

कुलाबा ,पद्मदुर्ग, अंजनवेल, विजयदुर्ग सुवर्णदुर्ग, जयगड खांदेरी उंदेरी नळदुर्ग, असे समुद्रकिनारी अनेक छोटे मोठे किल्ले महाराजांनी बांधले.

जेव्हा स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत भिडली, तेव्हा आरमार वसवण्याची गरज वाटू लागली .

चोवीस ऑक्टोबर १६५७ हा राजांच्या आरमाराचा स्थापना दिवस आहे. कान्होजी आंग्रे हे पहिले आरमार प्रमुख. आत्ताच गेल्या दोन वर्षांपूर्वी माननीय पंतप्रधान मोदी यांनी ,या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून आपल्या आरमाराला शिवाजी महाराजांची राजमुद्रा ड्रेस कोड वर दिलेली आहे. शिवाय मालवणला भेट देऊन गेल्या वर्षी तेथे प्रचंड मोठा कार्यक्रम देखील केला.


 त्या काळामध्ये डच, फ्रेंच ,पोर्तुगीज, सिद्धी ,मुस्लिम, हे सगळे जण किनाऱ्यालगतच्या गावांवर धाडी टाकत असत.

 तेथे जाळपोळ करणे, लुटालुट करणे, तेथील स्त्रियांना पळवणे, लोकांना बाटवणे ,स्त्री पुरुष यांना गुलाम म्हणून दुसऱ्या देशात येऊन विकणे .अशा गोष्टी चालू होत्या या सगळ्या गोष्टीला विरोध करायचा तर! आपले स्वतःचे आरमार पाहिजे.

 मग पेण येथे युद्ध नौका बांधण्याचे काम सुरू झाले ,जी पण नोकर माणसे मिळतील त्यांना प्रशिक्षण देऊन कामाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यासाठी इंग्रजातीलच काही लोकांना जास्त पैसे देऊन कामावर ठेवले .

त्यांच्या हाताखाली मात्र सगळे मराठी कामगार ठेवले, जेणेकरून ते कामगार आपोआप शिकतील.


 त्याची पण एक कथा आहे. तो इंग्रज अधिकारी मुद्दाम अर्धवट बांधकाम टाकून महाराजांची नोकरी सोडून गेला होता, पण उरलेले बांधकाम जहाज बांधणीचे काम, आपल्या मराठी बांधवांनी केले. त्यासाठी जे धन पाहिजे ते सुरत लुटून ,आदिलशाही मुलुख लुटून जमा केले.

*ज्याची समुद्रावर सत्ता त्याची जगावर सत्ता* असे ब्रिटिशांचे ब्रीदवाक्य होते .

पश्चिम किनारपट्टीची भौगोलिक परिस्थिती पाहता ,येथील किनारपट्टी उथळ होती. भरतीला पाणी आतपर्यंत जाई, पण ओहोटीला मात्र उघडे पडत असे. येथे निमुळता तळ असणाऱ्या बोटी काही कामाच्या नव्हत्या ,त्यामुळे छोट्या छोट्या आणि सपाट पृष्ठभागाच्या बोटी मराठ्यांच्या आरमाराने तयार केल्या .

त्याला इंग्रज हसत होते, पण इंग्रजांवर वचक राहावा म्हणून जेव्हा प्रत्यक्षात खांदेरीच्या बेटावरती बांधकाम चालू असताना, इंग्रजांनी ही जागा आमची आहे म्हणून तेथे बांधकामास मज्जाव केला. इतकेच काय बांधकामाच्या ठिकाणी बेटावर येऊन हल्ला देखील केला, पण आमच्या छोट्या छोट्या बोटीने त्यांना सळो की पळो करून सोडले , त्यांच्याशी झुंजत खांदेरीचा किल्ला उभा केला.

तेव्हा त्यांना मराठ्याच्या या छोट्या आरमाराचे महत्त्व पटले.


 ईस्ट इंडिया कंपनीने समुद्रातील बहुतेक शत्रूंना नामो हरम केले होते परंतु, पुढील शंभर वर्षे पश्चिमेत काही त्यांना घुसखोरी करता आलेली नाही, कारण शिवाजी महाराजांनी तसे मजबूत आरमार उभे केले होते.


सिंधुदुर्ग ची कथा तर बहुदा सर्वांना माहीतच आहे .महाराज मालवण ला गेले असता तेथील समुद्रात त्यांना एक "कुरटे "नावाचे बेट दिसले .त्या बेटावरती अभेध्य किल्ला उभा करण्याचा मनसुबा महाराजांनी बोलून दाखवला, आणि "हिरोजी इंदुलकर "यांना सदर किल्ला बांधकामाचा आदेशही दिला.

काळा कातळ, त्याची रचना, काळ्या कातळावर बांधकाम करण्याचे असल्याने रुंद पाया घालावा, दोन्ही बाजूला दोन दोन हात जागा सोडावी, त्या जागेत तट उभे करता येतील ,एवढी रुंद जागा सोडलेली असावी.

 पायात ओतण्यासाठी शिशाची व्यवस्था केली आहे, सर्व माल तपासून मोजून घ्यावा. गोड्या पाण्याची साठवणूक वाळू धुऊन घ्या म्हणजे त्यातला खारटपणा निघून जाईल ,चुनखडी घाटावरून पाठवत आहोत ती सुद्धा तपासून घ्या, तिच्यामध्ये भेसळ नाही याची खात्री करून घ्या.

 कामगारांना रोजची मजुरी देत जा. इत्यादी सूचना महाराजांनी दिल्या होत्या.

  आणि महत्वाची एक गोष्ट म्हणजे ,त्यानंतर महाराजांचा मिर्झाराजे जयसिंग बरोबर तह झाला ,दिल्लीला औरंगजेबाच्या भेटीला गेले, आग्राच्या कैदेत राहिले. पण इकडे स्वराज्याची घडी विस्कटलेली नव्हती कशाही परिस्थितीत हिरोजी इंदुलकर यांनी स्वतःचे वैयक्तिक दाग दागिने गहाण टाकून आणि स्वतःकडील धनदौलत वापरून किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले.


 महाराज कैदेत आहेत म्हणून कोणीही हवालदिल झाले नाही.


 बाबा !आपला म्होरक्या आता जागेवर नाही, कैदेत आहे, आपण काय करायचे? असे काही कोणाच्या मनात आले नाही.

 याला म्हणतात महाराजांवरील विश्वास, आपल्या पश्चात पुढे पाचशे वर्षाची स्वराज्याची बांधणी महाराजांनी केली होती.


आरमाराच्या बांधणीला लागणारे लाकूड घेताना ,लोकांकडून विकत घ्यावे. लोकांनी आपल्या मुलाप्रमाणे झाडे वाढविलेली आहेत त्यांचे नासधूस करू नये. इत्यादी आदेश त्यांनी पत्रात दिलेले होते.


 कान्होजी आंग्रे, त्यानंतर मायनाक भंडारी, लाय पाटील ,दर्यासारंग इब्राहीम खान ,इत्यादी लोकांनी महाराजांचे आरमार सांभाळलेले आहे.

अकराव्या शतकात चोल राजा रामराज याचे आरमार होते. त्याचे आरमारावर लक्ष होते तो अखेरचा हिंदू राजा झाला त्याच्यानंतर सहाशे वर्षांनी महाराजांनी आरमाराची स्थापना केली.

गुराबा/ तरांडी/ महागिऱ्या (ठाणे शहरात आजही महागिरी कोळीवाडा नावाचा भाग आहे)

 /( खोड्या/ मचवा/ पगार/ तिरकटी/ पाल अशी एकंदरीत वेगवेगळ्या बांधणीची धाटणीची कुठे पळण्यासाठी चपळ, कुठे तोफा ठेवता येतील अशा ,एकंदरीत 700 बोटींचा स्वराज्यात समावेश होता.


*किल्ला बांधकामाची काही वैशिष्ट्ये*


कुलाबा किल्ल्याचं बांधकाम इसवीसन १६७८ मध्ये सुरू झालं. या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधल्या आहेत. या बांधकामात चुन्याचा मसाला वापरला गेला नाही- म्हणजेच दरजा भरलेल्या नाहीत. याचं कारण, समुद्राच्या लाटा भिंतीवरती आदळल्या, की त्याचं पाणी दोन दगडाच्या फटीतून आतमध्ये जावं, पाण्याच्या प्रवाहाला विरोध कमी प्रमाणात व्हावा आणि बांधकाम दीर्घायुषी व्हावं.


पद्मदुर्गच्या बांधकामातसुद्धा वेगळ्याच प्रकारचं तंत्र वापरलं गेलं आहे. या किल्ल्याच्या भिंतीवर जिथं लाटा आदळतात, तिथं ७-८ सेंटिमीटर दगड झिजलेले आहेत; पण यामध्ये वापरलेला चुन्याचा मसाला मात्र झिजला नाही. दगडापेक्षा भक्कम ताकद या चुन्यामध्ये प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली दिसते. खांदेरी किल्ला भक्कम व्हावा आणि शत्रूला सहजासहजी किल्ल्याजवळ जाता येऊ नये, या उद्देशानं महाराजांनी या किल्ल्याच्याभोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड टाकले. या टाकलेल्या दगडावर कालवे वाढावेत म्हणजे कडा धारदार होतील आणि पाण्यातून चालत जाणं अवघड होऊन जाईल, हा उद्देश. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळत तर पाण्यात प्रचंड मोठी भिंत महाराजांनी बांधली. तिची लांबी सुमारे पाऊण किलोमीटर आहे, तर रुंदी तीन मीटर आहे. किनाऱ्यापासून खोल समुद्रात तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. शत्रूच्या बोटी जर विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आल्या, तर या भिंतीवर आपटून त्या फुटाव्यात, असा उद्देश. मराठी बोटींचा तळ खोल नसल्यानं या भिंतीचा धोका त्यांना नव्हता. पुढं विजयदुर्गवर इंग्रजांचा हल्ला झाला, त्यावेळी इंग्रजांच्या बोटी या भिंतीवरती आदळून फुटल्या, असं दिसून येतं. 


शिवरायांनी स्वतंत्र्य आरमार उभारून स्वराज्याला बळकटी आणली. समुद्रमोहिमा काढल्या. जेधे शकावलीत उल्लेख आहे : ‘शके १५८६ मध्ये माघ मासी राजश्री जाहाजात बैसोन बसनूरास गेले, ते शहर मारून आले.’ गोव्यातल्या कदंबांच्या राज्यानंतर सुमारे तीनशे वर्षं कोणत्याही एतद्देशीय सत्तेकडं आरमार नव्हते. शिवरायांनी ते उभं केलं, दर्या प्रसन्न केला. जनहिताचं शिवराज्य निर्माण करायला समुद्रानं साथ दिली. शिवरायांचं आरमार पाहिल्यावर त्यांची विज्ञाननिष्ठा, आधुनिकता आणि भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी आपल्यासमोर उभी राहते


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational