Jyoti gosavi

Comedy Fantasy Others

3  

Jyoti gosavi

Comedy Fantasy Others

स्वयंपाक घरातील तत्त्वज्ञान

स्वयंपाक घरातील तत्त्वज्ञान

3 mins
15


स्वयंपाक घरातील तत्त्वज्ञान


 स्वयंपाक घरात मी जास्त जात नाही किंवा मला तो प्रांत फारसा आवडतही नाही. पण कधीतरी करण्याची वेळ येते आणि त्यातून बरंच काही तत्त्वज्ञान समजत.


आता परवाचीच गोष्ट घ्या, मला हिरव्या मिरच्या पाहिजे होत्या. प्लास्टिकच्या थैलीतून काढल्या तर, सगळ्या खराब झालेल्या होत्या. म्हणून मी न उघडता अख्खी पिशवी तशीच टाकून देणार होते. पण मनाला काय वाटलं म्हणून पिशवी कट्ट्यावर उपडी केली. बघते तर एवढ्या सगळ्या सडलेल्या मिरच्यांमध्ये, एक मिरची मात्र अजूनही चांगली होती .

म्हणजे आत्ता ती माझ्या कामाला आली. 

मग मनात उगाचच विचार आला की त्या सगळ्यांमुळे ,हिला देखील आपण कचऱ्यात टाकून देणार होतो. मग ते म्हणतात ना "भांगेमध्ये तुळस" तसं इथं काहीसं झालं .सगळ्या बिघडल्या, वाया गेल्या, पण ही मात्र वाया गेली नाही.

 कधी कधी आपण म्हणतो खरं "शितावरून भाताची परीक्षा" पण इथे प्रत्येकाची वेगवेगळी परीक्षा बघायला लागते. जगात अजूनही चांगली माणसं आहेत ,आशेचा किरण आहे ,सगळेच काही अजून वाया गेलेले नाही .

" एक पणती मिणमिणती" कुठेतरी अजून चालू आहे. 

बघा हं त्या एका चांगल्या मिरचीने मला केव्हढे चांगले विचार आणि चांगलं तत्वज्ञान सुचवल


फोडणी देणे

आता फोडणी देण्यामध्ये कसल आलय तत्वज्ञान? हो त्यात पण तत्वज्ञान शिकायला मिळतं .

आता सगळ्यात जास्त तडतडते म्हणून मोहरीचा बळी आधी घेतला जातो. बाहेर सामाजिक ठिकाणी, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी ,जर एखादा अन्याय होत असेल तर! सगळे मुग गिळून गप्प बसतात .

पण एखादी व्यक्ती मात्र बोलते, अन्यायाला विरोध करते, आणि मग अशा बोलणाऱ्या व्यक्तीवरच पहिला कायद्याचा बडगा उगारला जातो.


कढीपत्ता

कढीपत्त्याचे उदाहरण तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तो फक्त कामापुरता वापरला जातो, आणि नंतर जेवणातून बाजूला काढला जातो. असं कित्येक माणसं आपल्याला कामापुरता वापरतात, आणि त्यानंतर बाजूला करतात किंवा स्वतःच्या घराच्या दरवाजे बंद करतात.

आता हळद जी आपल्या रंगात सर्वांना रंगवते.

तसा आपल्याला देखील आपल्या रंगात सर्वांना भिजवता आलं पाहिजे, किंवा सर्वांना आपल्यासारखं करता आलं पाहिजे.


चपात्या

  चपात्या करताना माझ्या मनात नेहमी एक विचार येतो फोडा आणि राज्य करा ही नीती आपण त्यात वापरतो.

 नाहीतर एवढा मोठा कणकेचा गोळा तव्यावर ठेवून शेकता येईल का?

जेव्हा आपण त्याचे छोटे छोटे गोळे करतो आणि मग आपल्या मनासारखे आकार देऊन त्यांना तव्यावर शेकतो आपल्या पोटात घालण्यासाठी.


पराठे

पराठे करताना वेगळं तत्वज्ञान शिकायला मिळतं, जेव्हा आपण बाहेरची भाजी कोथिंबीर म्हणा मेथी म्हणा पालक म्हणा त्या पिठामध्ये मळतो तेव्हा ते पीठ ढिलं होतं ,म्हणजे बाहेरची व्यक्ती जेव्हा तुमच्यामध्ये शिरते. तेव्हा तुमच्यातली युनिटी कमी होते.


भात

भाताचं मात्र वेगळेच तत्वज्ञान असतं भारतामध्ये सुरुवातीला ते दाणे एकटे एकटे सुट्टे सुट्टे असतात पण एकदा का ते एकत्र आले की त्याचा चांगला उत्तम मऊसूत भात बनतो किंवा त्याच भातापासून बिर्याणी पुलाव वरण-भात गोडा भात साखर भात नारळी भात असे अनेक प्रकार करता येतात

म्हणजे समाजातली चांगली माणसे एकत्र आले तर अशा नानाविध प्रकारच्या चांगल्या चांगल्या गोष्टी करता येतील

भाजांच्या बाबतीत देखील तेच असते ,आपण त्यांना कापतो, आणि मग मनासारखे आकार देऊन मनासारखे तळून, मसाले घालून भाज्या करतो.

 येथे पण फोडा आणि राज्य करा हीच नीती आहे.


आमटी

आमटीने मात्र सर्वसमावेशक असावं हे शिकवलं, मग त्यामध्ये काहीपण घाला, कढीपत्ता घाला, कोथिंबीर घाला , झाला शेवगाच्या शेंगा घाला, नाहीतर सर्व डाळी मिक्स करून आमटी करा. काही असेल ते आपल्या पोटात घेते ती आमची सध्या बीजेपी सरकार कोणालाही सामावून घेत आहे



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy