Jyoti gosavi

Comedy

3  

Jyoti gosavi

Comedy

मुलगी कशी दिसते

मुलगी कशी दिसते

1 min
181


 एक मुलगा मुलगी पाहायला जातो. घरी आल्यानंतर आई-वडील म्हणतात मुलगी कशी दिसते त्याचे वर्णन कर.

 आता तो मुलगा आई-वडिलांच्या आग्रहाने मुलगी पाहायला गेलेला असतो, मुलगी त्यांच्या ओळखीतून किंवा नात्यातून आलेली असते. त्यामुळे तिला वाईट म्हणणे त्याला शक्य नसते.

 मग तो म्हणतो मुलगी खूप सुंदर आहे.

 आई विचारते तिचं नाक कसं आहे?


 तो म्हणतो मुलगी खूप सुंदर आहे.


 आई विचारते तिचे डोळे कसे आहेत?


तो म्हणतो सुंदर आहेत


 आई म्हणते पण मला वर्णन करून सांग, तिचा रंग कसा आहे?


मग तो मुलीचे वर्णन करू लागतो..


 कपाळाचा कडा

 नाकाचा वडा

 डोळ्याचा कोनाडा 

बांधा जाडा 

वर्ण काळ्या माठाचा घडा


 अशी मुलगी आहे तुला पसंत असेल तर सांग लग्न करतो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy