Jyoti gosavi

Fantasy

3  

Jyoti gosavi

Fantasy

राखणदार

राखणदार

11 mins
26


गेले महिनाभर आषाढाने चांगलेच बरसून घेतले होते, व आता श्रावणाची रिमझिम सुरू होती. ऊन पावसाचा जसा काही खेळत चालू होता.

ज्येष्ठ आषारात पाऊस पडून गेल्यावर ,श्रावण मोठा नयन रम्य असतो .सृष्टीने आपल्या अंगावर हिरवा शालू परिधान केलेला असतो, पशु ,पक्षी, पिके, झाडे, अशी सारी आनंदात डोलत असतात ‌

पुढील वर्षभराच्या अन्नपाण्याची सोय झालेली असते, आणि मग सणांची मालिका सुरू होते.

वटसावित्री ,आषाढी एकादशी, त्यानंतर लागणारा श्रावण श्रावणातील व्रतवैकल्य, उपासतापास, मंगळागौरी, नागपंचमी, गोकुळाष्टमी, पुढे गणपती नवरात्र दसरा आणि दिवाळी अशी सगळी सणांची मालिका श्रावणापासून सुरू होते.

म्हणून बालकवींनी म्हटलेच आहे

श्रावणमासी हर्ष मानसी

हिरवळ दाटे चोहिकडे

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे

तर श्रावणातल्या अशा एका सोमवारची ती प्रसन्न सकाळ, त्यातून त्या दिवशी नागपंचमी होती. गावोगावी उत्साह नुसता भरून ओसंडलेला, माहेरपणाला आलेल्या मुली नव्या साड्या ,नवे कपडे घालून, दागदागिने लेऊन नागोबाच्या पूजेला चाललेल्या होत्या.

अजूनही गावाकडे वारुळावरती जाऊन नागोबाची पूजा करण्याची पद्धत आहे.

काही ठिकाणी देवळात जाऊन मातीच्या किंवा पितळेच्या नागाची प्रतिमा पुजतात, काही ठिकाणी दगडात कोरलेले नाग वगैरे पुजले जातात.

असाच एक दगडात कोरलेला नाग होता, त्या जागेला खंडोबाचा माळ असे म्हणत असत, आणि तेथून मोठा हमरस्ता देखील जात होता. त्या माळराना वरून एसटी महामंडळाचा लाल डब्बा मोठ्या वेगाने धावत येत होता.

गाडीवरती शेख नावाचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. शेख त्याच गावचा रहिवासी होता, आणि त्याच गाडीवर त्याची रोजची ड्युटी होती. पायाखालचाच रस्ता असल्याने, शेख बेफिकीरपणे गाणे गुणगुणत गाडी चालवत होता, आणि त्याने अचानक करकचून ब्रेक दाबला आणि गाडी थांबवली.

मागचे प्रवासी पार एकमेकांच्या अंगावर पडले ,बसलेले समोरच्या बाकड्यावर आदळले, कोणाची तोंडे फुटली, कोणाच्या डोक्याला टेंगुळ आले, तर कोणाचा दात पडला.

अरे ड्रायव्हर हाईस का कोण हाईस?

पाठीमागून एक खेडूत ओरडला गाडी चालवतुयास का इमान चालवतोय माझा दात पडला त्याचं नुकसान काय तुझा बाप भरून देणार?

काय रे उस्मान्या आज काय पावशेर मारून आला आहेस का? एका गाववाल्याने विचारले.

पण शेख ड्रायव्हरच्या तोंडातून एक शब्द देखील फुटत नव्हता त्याची नजर समोरच्या काचेतून रस्त्यावर लागली होती आणि नक्की समोर काहीतरी घडले याची जाणीव सर्वांना झाली आणि प्रवासी मंडळी दार उघडून पटापट रस्त्यावरती उतरले खाली उतरल्यावर समोरचे दृश्य बघून सर्वांचे डोळे पांढरे झाले रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत एक दूरच्या दूर जनावर रस्त्यावर आडवा पसरलेलं होतं आणि कितीही करकतून ब्रेक लावला तरी गाडीची दोन्ही चाके त्या नागराजाच्या अंगावरून गेली होती तपकिरी रंगाचे अंगावरती गोल गोल डिझाईन असलेले ते जनावर अजूनही तडफडत होते त्याचे दोन्ही तुकडे अजूनही वळवळत होते आणि रस्त्यावर रक्ताचे थारोळे झालेले होते.

आरा रा उस्मान या काय केलं रे तू हे ?

अरे आज श्रावणातला सोमवार त्यातून नागपंचमी ,आणि हा आपल्या गावचा राखणदार मारलास की तू? अरे गावातील एक बुजुर्ग राणोजी तात्या बोलले, तेव्हा कुठे उस्मान शेख भानावर आला.

अरे तात्या !मी काय मुद्दाम गाडी चढवली का?

 तू बघितलं ना मी किती जोरात ब्रेक लावला होता तो, आता झालं ते झालं जनावराची तडफड थांबली. ते निपिचित पडलं .

तसं सर्वांमध्ये ठरलं की ते तुकडे गावात न्यावेत ,आणि त्याचे दहन करावे,

हो नाही करता करता शेवटी एका बारदानात ते तुकडे बांधून घेतले,

उस्मान्या आता तूच याला अग्नी दे कोणीतरी बोललं .

ये तात्या आमच्यात काय सापाला देव भिऊ मानत नाहीत ,आणि जाळत पण नाहीत, मी असलं काही करणार नाही. तेव्हा तुम्हाला काय करायचं ते करा! मी काय या फंदामध्ये पडणार नाही, आणि मला गाडी डेपोला रिटर्न द्यायची आहे शेख म्हणाला .

अरे हा शेख ड्रायव्हर काय पाकिस्तानातून आला आहे का?

अरे तुझे पूर्वज ह्याच मातीतले ,तू आमच्यातच लहानाचा मोठा झालास ,आणि आता अशी भाषा करतोस? किती झालं तरी तुझे पूर्वज पूर्वी हिंदुच होते ना रे!

जाऊ दे बाबांनो तो काय ऐकणार नाही.

त्याचा बाप गणपतीत ताशा वाजवायला पुढे असायचा, आणि आम्ही पण त्यांच्या मोहरमच्या ताबूतासमोर दुला/दुष्या करत नाचत असायचो, आणि खारीक खोबरं उधळत असायचो.

जाऊ द्या गेले ते दिवस आता यांना धर्माची गोळी लागलेली आहे.

असो! गावकऱ्यांनी ते तुकडे शंकराच्या देवळाच्या बाहेरच्या बाजूस आणून विधीवत दहन केले. पण गावभर हा चर्चेचा विषय झाला की श्रावणी सोमवार आणि तो पण नागपंचमीचा दिवस असताना गावचा राखणदार शेख ड्रायव्हरच्या गाडीखाली येऊन मेला.

लोकांच्या जीवाला मोठी हळहळ वाटली, त्यातून लोक अख्यायिके नुसार सदर साप हा पार त्यांच्या आजोबा पणजोबापासून त्या माळरानावरती वावरत होता. पण त्याने कधी कोणाला डसले नव्हते, त्यामुळे तो जरी रस्त्याने चालला असेल, तर लोक एका जागी शांत उभे राहून त्याला आधी रस्ता द्यायचे. पण कधी काट्या कुराडी घेऊन त्याच्या मागे लागले नाहीत. शिवारातल्या शेळ्या मेंढ्यांना, जनावरांना ,त्याने कधी त्रास दिला नाही , की कधी कोणाचा जीव घेतला नाही.

त्यामुळे त्या नागोबाची त्या राखणदाराची सारेच भक्तिभावाने पूजा करत असत, मनोमन त्याला आपल्या माळाचा आणि गावाचा राखणदार समजत होते .

वरून कितीही बेदरकारपणा दाखवला तरी मनातून मात्र उस्मान शेख घाबरला होता .त्या सापाचे वळवळणारे तुकडे आणि त्याची ती थंड नजर शेखचा पाठलाग करत होती.

त्या दिवशी त्याला जेवण ही धडपणे गेले नाही ,आणि रात्री झोपेत तो सापाचीच स्वप्ने बघत होता.

त्याचा चेहरा बघून काय झाले म्हणून बायकोने विचारले असता घडलेली घटना त्याने आपल्या पत्नीला देखील सांगितली.

जाने दो, छोड दो ये बाते/ अल्ला तो सब जानता है उसको सब पता है ,आपने कोई जान बुझके तो नही किया ना! जान बुझ के तो गाडी नही चढाई ना अपने?

तो इतना छोटा मन मत करना और इतना मन पे मत लेना. असे तिने आपल्या नवऱ्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला सांगितले आणि जवळ ओढले .

त्या घटनेनंतर बरोबर नऊ महिन्यांनी शेख ची बायको बाळंत झाली, आणि झालेल्या मुलाला बघून गावकऱ्यांची नागपंचमीला घडलेल्या घटनेची आठवण ताजी झाली.

खरं तर काळाच्या ओघात सर्वजण ती घटना विसरले होते, पण शेख पोराला बघायला गेला आणि पोराची आणि त्याची नजरा नजर होताच त्याचा थरकापच उडाला. मांडीवरच ते पोर तसच टाकून तो झटकन उठला, बायकोने पडता पडता आपल्या पोराला सावरलं.

अरे काय पागल झाला काय? माझ्या पोराला आता पाडला असता ना! ती नवऱ्यावर डाफरली.

त्या पोराच्या नजरेत एकदम त्याला त्या दिवशीची त्या जनावराची थंडगार नजर आठवली.

त्या गडबडीत बाळाच्या अंगावरचा कपडा बाजूला झाला, आणि ते दृश्य बघून तर तो अधिकच अवाक् झाला, त्याचा सापासारखाच तांबूस रंग आणि अंगावर खवल्या खवल्या होत्या.

शेखने पोराला पुरते उलटे पालटे करून बघितले, पण त्याची त्वचा सापासारखीच होती आणि डोळे पण हुबेहूब तसेच वाटत होते.

अरे बाबा ये तो सपोले का पिला है/ तेरे पेट मे कैसे आया?

तो बायकोला सवाल करू लागला.

अरे मै उसमे क्या करू? मुझे तो घर से बाहर भी निकलने नही देते, तो बच्चा और किसी का कैसे होगा? तो आपका ही बच्चा है.

शेख ड्रायव्हरला स्वतःच्या पोराचीच धडकी भरली होती.तो पोरा जवळ जायला देखील बघत नव्हता. त्याच्या नजरे समोर त्या दिवशीचा प्रसंग सारखा सारखा तरळत होता.

साला वो साप ने मेरा बदला लिया शेखच डोकंच चालत नव्हतं, त्याला काही सुचत नव्हतं . त्यातच त्याला सारखी सापाची थंडगार नजर आठवायची आणि त्या नजरेतच आपल्या मुलाची नजर दिसायची. बघता बघता ही बातमी गावभर झाली, जो तो उस्मान शेख च्या पोराला बघायला येऊ लागला.

अरे !उस्मान शेख च्या पोटी खरोखर तो साप आलेला आहे. पोरगा जाऊन बघितलं का कसं दिसतंय ते !आणि काय राव त्याची ती नजर, आता झ्याप घालील का मग झ्याप घालील असं वाटतंय.

त्या राखणदारानं शेख चा बदला घेतला राव

ही बातमी बघता बघता सगळ्या पंचक्रोशीत झाली

एक दिवस तो कामावरून घरी आला बघतो तर काय दारात हे पब्लिक उभं !

त्याला समजेना काय झालं घरात? जाऊन बघतो तर शेखच्या मेव्हण्याने काहीतरी शक्कल लढवलेली होती.

त्याचा मेव्हणा सलमान असा पण हिकमती आणि करामती होता. कोणत्या गोष्टीतून काय बाहेर काढेल त्याचा भरोसा नव्हता .

त्याने उस्मान शेख च्या घरी नागदेवतेने अवतार घेतला आहे अशी जाहिरात आजूबाजूच्या चार गावांमध्ये केली. पोम्प्लेट देखील वाटले, तोपर्यंत शेखला काहीच पत्ता नव्हता .

आता शेख पाहतो तर त्याच्या दरवाजासमोर गावची /परगावची लोक, लाईन लावून दूध फुले हार घेऊन शेखच्या घरासमोर उभी होती जो तो आत जाऊन दर्शन घेत होता. मुलाच्या दुपट्याखाली पैसे टाकत होता.

मेव्हण्याने दुधाचा धंदा सुरू केला, दारातच तो दुधाच्या पिशव्या, हार फुले, दुधाची मोठी किटली घेऊन उभा होता आणि लोक त्याच्याकडून दूध विकत घेत होते, आणि आत जाऊन आत ठेवलेल्या मोठ्या कळशीत ओतत होते.

तेच दूध पुन्हा बाहेर येऊन पुन्हा विकले जात होते.

त्या पोराच्या तोंडात ड्रॉपरने एक थेंब त्याची बायको सोडायची बाकीचे दूध कळशीत. ज्या घरात कधी काफराची सावली देखील पडली नाही. त्या घरी बुत पूजा? या अल्ला मुझे माफ कर मनातल्या मनात शेख अल्लाची करुणा भाकू लागला.

हे काय चाललंय? असं म्हणून तो आपल्या मेव्हण्यावरती डाफरला तुझा रिकामटेकडा भाऊ इथे कधी आला? कशाला आला?

त्यावर मेव्हण्याने आणि बायकोनेच त्याला गप्प बसवले .

जितनी आपली महिने की पगार नही ना , उतनी पगार दो दिन मे जमा हो रही है .आप चुप ही बैठो /

बायकोने नवऱ्याला गप्प बसवले अरे लेकिन बुत पूजा? वो भी काफरो के हात से?

त्याचा मेव्हणा एकदम उपहासाने बोलला ,

अरे ये हिंदू लोक मूर्ख रहते ही है, जरा किधर कुछ देखा तो लगे मन्नत मांगने ,और पैसा फेकने ,अपने को तो पैसे से मतलब है ,अपने को क्या करना है इनके धरम से !पैसाही तो धरर्म है/

त्यानंतर ही बातमी हळूहळू मीडियाच्या कानापर्यंत पोहोचली, मग काय बघता बघता त्या छोट्याशा गावाचा एकदम कायापालट झाला.

एकदा एखादी गोष्ट टीव्ही वरती दिसली, की अर्ध्या तासात सगळ्यात जिल्ह्यात तालुक्यात पंचक्रोशीत पसरते, आणि मग जो तो त्या गावाकडे नागदेवतेचे दर्शन करण्यासाठी धावू लागला.

आज कालच्या धकाधकीच्या जिंदगीमध्ये सगळीच माणसं काही ना काही त्रासाने, समस्येने, गांजलेली असतात. मग त्यांना कुठेतरी असा काही चमत्कार दिसला की यातून आपल्याला काहीतरी चांगला मार्ग दिसेल असे वाटते आणि लोक आपले धावत सुटतात .

बरं !चॅनल वाल्यांना तर काहीतरी मसाला पाहिजेच असतो, काही चॅनल वाले धार्मिक समस्या सांभाळून बातम्या देत होते, तर काही चॅनल वाले त्यावरून डिबेट आणि चर्चा रंगवत होते, आणि अनिसवाल्यांनी तर मुलाची मेडिकल करायला सांगितले.

 तर हिंदू संघटना ती नागदेवता असल्याची ग्वाही ठामपणे ही देत होते ,आणि दोन्ही बाजू आपलेच म्हणणे खरे करण्यासाठी कंठ शोष करत होत्या.

एक प्रकारचे धमाल वातावरण सध्या टीव्हीवर देखील चालू होते. आणि कोणती ना कोणती वाहिनी या गोष्टीला हायलाईट करत होती.

 यांच्या गावांमध्ये देखील अनेक वाहिन्यांच्या गाड्या लागलेल्या होत्या. त्यातून हार /तुरे ,हॉटेल्स, चहापाणीच्या टपऱ्या, इत्यादी गोष्टींना भरभराट आली.

शिवाय कित्येक लोकांनी रातोरात रस्त्यावर छोट्या छोट्या टपऱ्या उभ्या केल्या व चहा, पाणी, भजी वडापाव इत्यादी गोष्टी तेथे मिळू लागल्या .

शेखच्या घरामध्ये आता छन् छन् लक्ष्मी येत होती. पण शेखच्या मनाला ह्या गोष्टी पटत नव्हत्या. बायको आणि मेव्हण्यासारखा तो फक्त पैशाच्या नादी लागलेला नव्हता. तो त्याच्या धर्माचा पक्का बंदा होता , पण त्याची फॅमिली खुश होती, त्यांच्यापुढे भरपूर पुंजी जमा झालेली होती. पण याच्या मनातून मात्र या गोष्टीचा बंदोबस्त करायचा होता तो अल्लाचा पक्का बंदा होता.

आता स्वतःच्या मुलासाठी मात्र तो गुपचूप पणे हिंदू देवदेवतांचे उंबरठे देखील झिजवत होता, डॉक्टर कडे जात होता, उपचाराची चौकशी करत होता, बाबा स्वामी यांच्या आश्रमात जात होता. मशीद मजार यांच्यावर जाऊन ताईत बनवून आणत होता., चादर चढवत होता, कोणी अंगारे दिले ते लावत होता पण काही केल्या पोराच्या गोष्टींमध्ये फरक पडलेला नव्हता. त्याची त्वचा होती तशीच होती .

एकदा त्याने अंगारा आणून त्याच्या अंगावर फासला आणि ते पोरगं जोरात जोरात केकटायला लागलं, मग बायकोने इथून पुढे तू माझ्या पोराच्या जवळ यायचंच नाही अशी त्याला ताकीत दिली .

त्याला डॉक्टरकडे पण न्यायचे होते, पण बायको काही पोराला हात लावू देत नव्हती, कारण सोन्याचा अंड देणारी कोंबडी तिला अशी तशी सोडायची नव्हती.

पण एक दिवस मात्र सगळ्यांचा डोळा चुकवून त्याने एका स्किन स्पेशलिस्ट डॉक्टरला आपल्या घरी आणले ,त्या डॉक्टरने पोराच्या त्वचेची बाहेरची बायोप्सी करायला लागेल असे सांगितले. बायोप्सी म्हणजे त्याच्या चामडीचा एक तुकडा काढून त्या तुकड्याची तपासणी करायची , बायकोने या गोष्टीला विरोध केला आणि डॉक्टरला पळवून लावला.

त्या गावापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर एक साधू शंकर मंदिरात राहत होता. त्याला भेटण्याचे कोणीतरी सुचविले, त्याप्रमाणे उस्मान तिकडे गेला. साधूने त्याच्याकडे बघितले देखील नाही पण डोळे मिटूनच सांगितले वो बच्चा मुझे देदो ,तेरे घर मे रहेगा तो बरबाद हो जाओगे ,और उसके जरिये पैसा ऐठना बंद करो .

उस्मानच्या मनात पण तेच होते पण त्याची बायको आणि मेहुणा डोळ्यात तेल घालून मुलाची राखण करत होते .हा मुलाला काहीतरी करेल ,कुठेतरी सोडून येईल, या भीतीने त्याला जवळ देखील येऊन देत नव्हते.

एकदा मात्र मेहुण्याचा डोळा लागलेला असताना उस्मान गुपचूप डॉक्टरला घरी घेऊन आला, आणि बायोप्सी करण्यासाठी त्याच्या चामडी चा एक छोटासा तुकडा काढून घेतला. त्याबरोबर पोराने मोठ्याने भोकाड पसरले. आता तो सहा महिन्याचा झाला होता, जमिनीवर सोडला की एखाद्या सापाप्रमाणे वळवळ करताना दिसे, तसाच आता तो दिसला त्याने डॉक्टर देखील घाबरला.

त्याच्या ओरडण्याने घरातली माणसे जागे होण्याआधी दोघांनी तेथून पोवारा केला.

पण ते पोरगं मात्र विचित्र आवाजात ओरडत होतं, आणि मध्यरात्री उस्मानची बायको अंगावर काहीतरी वळवळल्यामुळे जागी झाली, आणि बघते काय तर घरात सापच साप! शेकडोच्या संख्येने साप त्या घरात फिरत होते.

एकंदरीत घरातील ते दृश्य बघून सगळ्यांची बोबडी वळली, तिने आरडाओरडा करत घरदार जागे केले ,आजूबाजूची चार घर देखील जागी केली. पोराला उचलायला गेले तर त्याच्या अंगावर देखील दोन-चार साप फिरत होते आणि पोरगं मस्त हात पाय झाडत खिदळत होतं .

पोराला उचलण्यासाठी देखील कोणी पुढे जाईना, शेजारीपाजारी पण जाईना, घरातला पण जाईना, न जाणो हे पोरग आपल्याला डसलं तर काय घ्या!

तिकडे बायोप्सी करणाऱ्या डॉक्टरच्या घरात पण सगळीकडे साप शिरले होते.

तो आणि बायको भेदरून पलंगाच्या एका टोकाला उभे होते, डॉक्टरने ती घटना आपल्या बायकोला सांगितली. तेव्हा ती पण नवऱ्यावर डाफरली .

"तुम्हाला असले उद्योग करायला कोण सांगतं" म्हणून ती ओरडत होती, आणि सापांची प्रार्थना करत होते.

तिने नवनागाचे स्तोत्र म्हणले आणि नवऱ्याच्या वतीने माफी मागितली, त्याबरोबर त्यांच्या घरातले साप अदृश्य झाले. तो चामडीचा आणलेला तुकडा तिने नवऱ्याला बाहेर फेकून द्यायला लावला.

इकडे उस्मानला पण त्या साधू बाबा चे शब्द आठवले ,त्याने हातातल्या काठीने ते साप लांब भिरकावले आणि पोरगं उचलून तो साधूच्या देवळाकडे पळत सुटला.

त्या पाठोपाठ घरातले साप देखील अदृश्य झाले, इकडे देवळातला साधू वाटच बघत होता

" आओ ! मै तुम्हालाही इंतजार कर रहा था .

बाबाच्या चेहऱ्यावरती एक गुढ हास्य पसरले,

आओ बालयोगी! आप सही जगह पहुंचे हो, साधू म्हणाला.

उस्मानने घाई घाईने आपल्या हातातलं पोरग या साधूच्या हातामध्ये दिलं ,आणि मागे देखील न बघता उलट्या पावली माघारी फिरला .

साधूने रातोरात ते गाव सोडले त्यानंतर तो साधू कुठे गेला ते कोणालाच कळलं नाही .

सकाळी जेव्हा दर्शनाला लोक आले तर नागदेवता गायब असल्याने त्यांच्या ध्यानात आले.

मग रात्री अनेक हजारोंच्या संख्येने साप आमच्या घरात आले, आणि आपल्या राजाला परत घेऊन गेले. आमच्या मुलाने देखील सापाचे रूप घेतले आणि त्यांच्याबरोबर तर निघून गेला असे ऊस्मानने सर्वांना सांगितले.

पण आमचे लोक इतके उत्साही की त्यांनी पुन्हा तेथे मंदिर बांधायचा संकल्प केला, इकडे टीव्हीवर पुन्हा डिबेट सुरू झाले.

देव आहे की नाही इथे पासून ते ती नागदेवता खरी होती की नाही इथपर्यंत .

पुन्हा एकदा सगळ्यांना सगळ्यांना एक विषय मिळाला

इकडे सहा महिन्यात वर्गणी जमा करून नागदेवतेचे मंदिर देखील बांधले. आता तेथे हिंदू लोक रोज आरत्या करतात, घंटा नाद करतात, त्या घंटानादाने उस्मानाचे डोके उठते पण करणार काय

त्याच गावात राहायचे होते ना!

शिवाय त्याच्याच घरात हा चमत्कार जन्माला झाला होता .

उस्मांनच्या बायकोला अजून पण पैशाची हाव आहे. पण त्या दिवशीच्या त्या अनेक प्रचंड सापांच्या दर्शनामुळे तिची अजून हिम्मत होत नाही.

तरीपण "मेरे ही बच्चे का मंदिर है इसमे मेरा भी हक है असे ती अधून मधून जाऊन पूजा कराणाऱ्याला ठणकावते. तो देखील तिला थोडाफार वाटा देत असतो .

असे काही गुण्यागोविंदाने चालू आहे.

त्याच रस्त्याने एसटी नेताना उस्मान तेथे थबकतो, मनातल्या मनात हात जोडतो, "मी मुद्दाम केलं नाही नागदेवता माझ्या हातून चुकून घडलं, आता पुन्हा माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये तुम्ही काही घरात येऊ नका "अशी प्रार्थना करून उस्मान आपली गाडी पुढे काढतो.



Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy