खटला
खटला
*खटला*
जरासा वाद तो दोघांतला होता
युगांपासून खटला चालला होता
कुणालाही पटेना बोलणे माझे
फुलाने प्राण माझा घेतला होता
तुला स्वातंत्र्य जन्माचे मिळाले पण
सुखी संसार माझा मोडला होता
कुणाची साक्ष प्रेमाला नको आता
पुरावा काळजाचा हारला होता
उशीराने मिळाला न्याय मजला पण
सुखाचा काळ मागे थांबला होता
*पंकज कुमार उत्तम ठोंबरे*
कोंडोली वाशिम
9503717255

