रंग
रंग
1 min
302
"आई, बघ नं, माझा रंगखडू तुटला." रडता रडता पिंकी नयनाच्या कुशीत शिरली.
"रडू नकोस गं माझ्या बाळा.अगं,या तुटलेल्या खडूचाही तोच रंग आहे."
नयनाने पिंकीला त्याच खडूने चित्र रंगवून दाखवले.
ते पाहून सासूबाई म्हणाल्या," नयना, सुरेशच्या जाण्यानं तुझ्या आयुष्याचा बेरंग करू नकोस."
खडू तुटला तरी त्याच्या रंगात काहीच फरक पडत नाही हे नयनाने लाडक्या लेकीला खुप छान रीतीने समजाऊन सांगितले.
ते पाहून सासूबाई म्हणाल्या," नयना, सुरेश गेला म्हणून तुझ्या आयुष्यात फरक पडू देऊ नकोस. रंगीबेरंगी आयुष्य बेरंग करू नकोस."
