Shila Ambhure

Inspirational

4.3  

Shila Ambhure

Inspirational

Mother's Day Special

Mother's Day Special

1 min
1.3K       आपल्या मुलाचे 'मातृदिन विशेष' स्टेटस सुधा कौतुकाने न्याहाळत होती अन आनंदाने भरून पावत होती. 

          अचानक तिला काही आठवले आणि ती पतीला घेऊन विशेष मातृदिन साजरा करण्यासाठी वृद्धाश्रमाकडे निघाली.

-------------------------------------------------- 


 निःशब्द


          कप फुटला म्हणून प्रवीण आईवर जरा जास्तच चिडला.तोंडाला येईल ते बोलू लागला. आई मात्र मूकपणे ऐकत होती.

      तितक्यात लाडकी लेक हट्टाने म्हणाली," बाबा,आज ऑफिसातून येताना फुलांचा हार आणा हं!" 

      " आणतो गं बाबी.पण आज का हवाय तुला हार ?"

      "आज मातृदिन आहे न. आईच्या फोटोला घालायचा आहे तो हार."

      बाबीचे उत्तर ऐकताच प्रवीण निःशब्द होऊन घराबाहेर पडला.

----------------------------------------–--------

        


 अपडेट   


     रविवारची सुट्टी असल्याने सुहास निवांतपणे मोबाइलवरील स्टेटस बघत होता . त्याच्या मुलानेही स्टेटस अपडेट केले होते. मायलेकराच्या गोड फोटोखाली 'love you mom', या केप्शनसह मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

      सुहासनेही स्वतःचे स्टेटस अपडेट केले नि स्कुटीवर बसून वृद्धाश्रमाकडे जायला निघाला.

--------------------------------------------------

          


 सावत्र


     पायांजवळ असलेले शुभेच्छापत्र आणि भेटवस्तू पाहून नेहाला अपराधी वाटू लागले.

      ती वेडयासारखी धावत सुटली अन दहा वर्षाच्या यशला कुशीत घेऊन अश्रुंना मोकळी वाट करून दिली.

      या अश्रुंसोबतच तिच्या मनातील सावत्रपणाही वाहून गेला.Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational