गुंता
गुंता
अतिशय हळूवारपणे तिने केसांतील गुंता मोकळा केला. तोही त्यांना इजा न पोहचवता. काही केस काले, काही सोनेरी तर काही पांढऱ्या रंगाची .जणू अलिप्त होती ती. परंतु तिने केसांचं भांडण सोडवलं आणि त्यांचा मोठा अंबाडा बांधला.
आता तिला कुणाचेही मन न दुखावता नात्यांचा गुंता सोडवायचा होता.