रुग्णसेवा
रुग्णसेवा
इंटरव्यूव्हमध्ये तिला प्रश्न विचारला
'तुम्ही इथे हा जॉब का करू इच्छिता?'
तिने क्षणाचाही विलंब न करता उत्तर दिले- डॉक्टरच्या नात्याने रुग्णसेवा करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.
तिचे हे अपेक्षित उत्तर ऐकूनही तिला नोकरी मिळाली नाही. कारण मुलाखत घेणाऱ्यापैकी एकजण तिच्याच कॉलनित राहायचे ज्यांनी तिच्या आईला औषधोपचाराशिवाय मरताना पाहिले होते. ही मात्र शेजारीच राहणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह आईला साधे भेटायलादेखील गेली नाही.