STORYMIRROR

Ashwini Chaugule

Romance

2  

Ashwini Chaugule

Romance

साहित्य प्रीत

साहित्य प्रीत

1 min
62

प्रीत माझी जगावेगळी साहित्यावर जडते

लेखणीच्या टोकावर साजशृंगारीक नटते॥१॥


काव्यात्मक भाषाशैलीत यमक कळ्या खुलते

पानांच्या हिंदोळ्यावरती कविता संगे झुलते ॥२॥


शब्दवृक्ष आडोशाला आसवांची मोती गुंफते

काळजातील घावांवर दिव्य लेखणी हर्षते॥३॥


लेखकांच्या प्रीतीचा गंध शाहित दरवळते

कादंबरीरुपी कधी हा मनावर गंधाळते॥४॥


आनंदीआनंद साहित्यनगरी प्रीत डोलते

हृदय कुंजात भावनात्मक अर्थकाव्य फुलते॥५॥


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance