STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Romance

3.3  

अक्षय दुधाळ

Romance

ती

ती

1 min
373

आज फायनली ती भेटली. आमची शेवटची भेट साधारण ७-८ महिन्यांपूर्वी झालेली. मागच्या आठवड्यात ती दोन तीनदा येऊन गेली पण नेमका तेव्हा मी माझ्या कामात बिझी होतो. आज तशी थोडी चिडलेलीच होती. मला वाटलं नेहमीसारखा लटका राग असेल पण नाही तिच्या लटक्या रागाचं रूपांतर थोड्याच वेळात रौद्र रुपात झालं. मीही खिशातील सर्व सामान गाडीच्या डिकीत टाकून तिच्या स्वाधीन झालो. ती चिडली की फार गोड दिसते म्हणून मीही तिला चिडवतच असतो. साधारण अर्धा एक तासाने आमचे भांडण संपले. ती नेहमी मला अशीच छळते, पावसाच्या सरीच्या रुपात येते आणि चिंब प्रेमाने भिजवून निघून जाते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance