अक्षय .

Romance Thriller

4.5  

अक्षय .

Romance Thriller

सुडाचा प्रवास

सुडाचा प्रवास

14 mins
834


आज बहुतेक वर्तमान पत्रात, बातम्यांच्या चॅनेल्स वरती एकाच गोष्टीवर चर्चा चालू होती. आज पर्यंत कोणत्याच बातमीला एवढं फुटेज मिळालं नसेल इतकं ह्या बातमीला मिळालेलं. संपूर्ण महाराष्ट्र ह्या ऐतिहासिक निकालाची वाट पाहत होता. आज की ताजा खबर, आजची ब्रेकिंग न्यूज, न्याय मिळणार का ह्या केसला अशी काहीशी चर्चा सगळ्याच चॅनेल्स वरती चालू होती.


३ वर्षांपूर्वी

आज मैं ऊपर, आसमाँ नीचे आज मैं आगे, जमाना है पीछेsss! प्रीती बेड वरती नाचत होती. ये नौटंकी आज काय नविन नौटंकी करत अलियेस आणि आधी जाऊन चेंज कर नाचत काय बसलीयस. काय नविन, नविन फॅड तुझ्या डोक्यात येईल हे तू आणि देवच जाने, चित्रा बडबडत म्हणाली. पण मॅडम ऐकेल तर शपथ,

मनवा लागे, ओ मनवा लागे लागे रे सांवरे, लागे रे सांवरे ले तेरा हुआ जिया का, जिया का जिया का ये गाँव रेsss प्रीतीचं गाणं म्हणणं चालूच होतं. नाचतच फ्रेश व्हायला निघालेल्या प्रीतीला थांबवत चित्रा ने विचारलं,

"डार्लिंग तेरे इस एक्सट्रा खुशी का राज क्या है ? रोज आलीस की चीडचीड चालू असते. हे फेक ते फेक, आज हा गुलाब एवढा खूष का आहे ? समथिंग समथिंग??, प्रितीने पापण्यांची उघडझाप करतच हो असं सांगितलं.

"ओहह माssय गॉssड, हू इस दॅट लकी गाय ?"

"डार्लिंग २ कॉफी बना मैं फ्रेश होके आती हू फिर सून पुरी स्टोरी"

"जैसा हुकूम मेरे आका"

प्रीती इंजिनिअरिंग सेकंड इयरला होती. उंच, गोरी, काळेभोर टपोरे डोळे, लांबसडक हायलाईट केलेले केस, गोड आवाज. तिच्या ह्या सौदर्यामुळे कॉलेज असो की ती राहते तो एरिया सगळे तिच्या एका झलक साठी वेडेपिसे व्हायचे. प्रिती तशी सगळ्यात मिळून मिसळून असायची. आज तिला आदित्यने प्रपोज केलेलं. आदित्य शेवटच्या वर्षाला होता. मिडल क्लास फॅमिली एकुलता एक. हुशार स्पोर्टस आणि अभ्यास दोन्ही ठिकाणी वरचढ होता. आदित्य आणि प्रीती ची ओळख ही एका इव्हेंट दरम्यान झाली. सुरवातीला कामाशी काम पासून गोष्ट मैत्रीपर्यंत पोचली. आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे त्यांना कळलंच नाही. फायनली आज आदित्यने तिला प्रपोज केलं.

समीर, रोहित, नेहा, प्रभास, इशा, रती आणि आदित्य असा आदित्यचा ग्रुप होता. ह्या ग्रुप मध्ये आदित्य एकटाच सिंगल होता आता प्रीती आल्यापासून तोही सिंगल राहिला न्हवता. असेच एका सकाळी आदि आणि प्रीती कँटीन मध्ये बसले असताना फोन आला आणि आदित्य धावत सुटला आणि पाठोपाठ प्रीतीही. रिक्षातून उतरतानाच रडण्याच्या आवाजाने त्याचे काळीज धस्स झाले. स्वतःला सावरत तो फटकातून आत गेला, समीर तिथेच उभा होता. त्याने त्याला हलवत विचारलं सॅम काय झालंय? मला काही सांगशील का? हा रो पण फोनवर निट काही बोलला नाही इशू, नेहा काय झालंय? शिबु, रती कुठेयेत ? कोणी बोलणार आहात का ? की म एकट्यानेच बडबडायचं आहे?


'रती गेली रे आपल्याला दगा देऊन कायमची सोडून गेली', रोहित

'मूर्खासारखं काहीही बडबडू नको, काय झालंय रतीला', आदित्य

हो रे हे खरं आहे. आज सकाळी तिची बॉडी मरीन ड्राईव्हला समुद्रकिनारी सापडली, रोहित

कसं झालं हे सगळं आणि ती कशाला गेली होती तिकडे? आणि प्रभास कुठे आहे तो होता का सोबत, आदित्य

सकाळी morning walk ला जाणाऱ्यानी बघितला त्यांनीच पोलिसांना कळवलं. पोलिस सुसाईड केलीय असं म्हणतायत , नेहा

वेडी आहेस का ? रती सुसाईड नाही करू शकत, आदित्य

झाल्या गोष्टीने पूर्ण कॉलेज चर्चेत होतं. नको ते तर्क मांडू लागले होते. रतीचं सर्व कार्य उरकून झाल्यावर सगळे मुंबईला परत आलेले. आल्या दिवशीच आदि, रो, इशा, प्रभास, प्रीती पोलिसांना भेटून सांगतात की रती सुसाईड करण इम्पोसीबील आहे, आम्ही तुम्हाला वाटेल ती मदत करू पण प्लिज खरं कारण शोधा साहेब.

संपूर्ण ग्रुप अजूनही शॉक मध्येच होता. प्रभासची हालत तर पूर्ण खराब झालेली तो कॉलेजला येणंही टाळू लागलेला.

'हॅलो आदित्य तू आणि तुझा ग्रुप केम हॉस्पिटलमध्ये या लवकर'

कोण बोलतंय आणि काय झालंय हॉस्पिटल मध्ये, आदित्य

'मी इन्स्पेक्टर जाधव बोलतोय तुम्ही या तुम्हाला आल्यावर कळेलच', इ जाधव

आम्ही पोचतो लवकरच, म्हणत आदित्य आणि प्रीती हॉस्पिटलला जायला निघाले.

दोघेजण हॉस्पिटलला पोचतात. इन्स्पेक्टर जाधव समोरच उभे असतात.

बोला साहेब काय झालं, आदी

या माझ्या मागे अस म्हणून इन्स्पेक्टर जाधव त्यांना शयनगृहात घेऊन जातात. तिथे असलेल्या प्रेतांपैकी दोघांच्या चेहऱ्यावरील पांढरे कपडे काढून ओळख विचारतो. प्रभास आणि नेहाला समोर बघून आदित्य बेशुद्ध होतो.


आज दोन आठवडे झाले ह्या गोष्टीला आदित्यची लाईफ चेंज झालेली. फर्स्ट इयरला आलेला तेव्हा त्याची ओळख ह्या सगळ्यांशी झाली. आणि त्यांचा ग्रुप बनला. जिथे जातील तिथे एकत्र जायचे. सगळे आपापले गाव सोडून करियर ची पुढली वाट धरायला मुंबईला आलेले. कोणाची तरी नजर लागावी अशी बॉंडिंग होती त्यांची. आणि खरंच त्यांच्या ग्रुप ला नजर लागलेली. आधी रती मग प्रभास आणि नेहा एकेक करत देवाघरी गेले.


स्थळ - पोलीस स्टेशन

पवार त्या पोरांचे पोस्टमार्टमचे रिपोर्ट आले का?, इन्स्पेक्टर जाधव आल्या आल्या कोणतीही फालतू बडबड न करता थेट कामाला हात लावला होता.

हो सर आताच घेऊन आलो, पवार रिपोर्ट देत म्हणाले

काय म्हणतायत रिपोर्टस, रिपोर्ट चाळत जाधवांचा प्रतिप्रश्न

सर मला ही केस थोडी गुंतागुंतीची वाटतीय, पवार

का ओ पवार असं का वाटतंय? , इ जाधव

सर तुम्ही जर रिपोर्टस नीट बघितले तर ह्या तिघांचा आधी गळा दाबलाय आणि पाण्यात पडताना कोणी गळा बांधून उडी नाही मारत. आणखी एक सगळ्यांच्या सोबत असंच झालंय, रतीचं रिपोर्ट दाखवत पवार बोलत होते.

'तो पोरगा त्यांचा मित्र काय नाव बरं त्याचं', इ जाधव

'आदित्य', पवार

'हा त्याला बोलवून घ्या एकदा चौकशीसाठी', इ. जाधव

'ठीक आहे साहेब', पवार

आदित्य पवारांचा निरोप मिळताच पोलीस स्टेशनला आला.

'ये ये आदित्य बस', इ. जाधव

'बोला साहेब पवार म्हणाले काही विचारायचं आहे', आदित्य

आदित्य घाबरला होता पण तसं न दाखवता बोलत होता

"हम्म, बोल आदित्य साहेब तुमची ओळख कधीपासूनची? ती कशी झाली? कोणाशी भांडण वगैरे होते का? सुरुवातीपासून काही न विसरता सगळं सविस्तर सांगा पटपट", इन्स्पेक्टर जाधव आपल्या टेबलवर ठोकळा फिरवत बोलत होते.


सगळं सांगतो साहेब, मी आदित्य साताऱ्याचा तसंच रती, मोहित, नेहा आणि प्रभास हे पण त्यांच्या त्यांच्या गावावरून शिक्षणासाठी इथे आलेले. बहुतेक हेच कारण असावं आम्ही एकत्र असण्याचा. यातच रती आणि प्रभास आणि इकडे नेहा आणि मोहित यांचं एकमेकांवर प्रेम बसलं या सगळ्यात मी एकटाच सिंगल होतो पण प्रितीच्या येण्यामुळे ती कसर पण भरून निघाली. आम्ही खूप धमाल करायचो कॅन्टीन, सबमिशन, मंथएंड फंडींग प्रोब्लेम काहीही असो, असं म्हणतात दुःख कोणी कोणाला देऊ शकत नाही पण आम्ही वाटून ते हलकं करायचो. सगळं व्यवस्थित चालला असतांना मध्येच माशी शिंकली आणि आज तिघेजण आमच्यात नाहीत," आदित्य रडत रडत सांगत होता".

इन्स्पेक्टर जाधव त्याला पाणी देत शांत व्हायला सांगतात

आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर आदित्य पण हा आमच्या चौकशीचा एक भाग आहे. आता मला सांगा तुमची कधी कोणाशी भांडण वगैरे झालेले होती का?, "इन्स्पेक्टर जाधव"

ओके सर, पण नव्हती आम्ही बाहेरून आलो असल्यामुळे कधी कोणाच्यत मिक्स झालोच नाही त्यामुळे भांडणं व्हायचा प्रश्नच येत नाही, "आदित्य"

त्यांच्या घरी काही प्रॉब्लेम होते का? जे हाईड करण्यासाठी त्यांनी सुसाईड केले असे काही, "इन्स्पेक्टर जाधव"

नाही साहेब आम्ही बऱ्यापैकी चांगले मार्क्स काढायचो आणि सगळ्यांची घरची परिस्थिती बर्‍यापैकी चांगली होती, "आदित्य"

ठीक आहे तुम्ही येऊ शकता, इन्स्पेक्टर जाधव

थॅंक्यु साहेब, आदित्य

आदित्य गेल्यावर पवार परत केबिनमध्ये आले. साहेब पोस्टमार्टममध्ये अटेम्प्ट दिसतय आणि मला ही केस सिरीयल किलिंगची वाटतीय. मीडिया प्रेशराइज करतीये, सुरक्षा व्यवस्थेची वाट लागलेय सुसाईड कि मर्डर अटेम्प्ट आपल्याला लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे साहेब,

पवार त्यांच्यासोबत सापडलेल्या सगळ्या गोष्टी घेऊन या आणि त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा, इन्स्पेक्टर जाधव

हो सर लगेच कामाला लागतो, पवार


सुसाईड मर्डर और समथिंग एल्स, पोलीस तपास करत आहेत नेहमीप्रमाणे. याचा रिपोर्ट कधी मिळणार सरकारने यावर लवकरात लवकर ॲक्शन घेतले पाहिजे. या घटनेला तीन आठवड्याहून अधिक दिवस होऊनही पोलिसंचे उत्तर हे तपास चालू आहे हेच आहे. अशा प्रकारच्या बातम्या सगळ्या बातम्यांच्या चॅनेल वरती चालू होते. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेची हळहळ व्यक्त करीत होते. रोहित आणि नेहाच्या घरच्यांच्या दुःखात सगळे सामील झाले होते.


आदित्य ऐक ना अजुन किती दिवस गप्प गप्प राहणार आहेस? मला मान्य आहे तुला दुःख झाले बट लेट्स मूव्ह ऑन यार एक्झाम आल्यात, सबमिशन पेंडिंग आहे, प्रीती

हा कट्टा दिसतोय येथेच बसायचो आम्ही. हे बघ तिने सगळ्यांची नाव लिहिलेली म्हणायचे, आपण म्हातारे होऊ ना तेव्हा आपल्या पोरांना घेऊन येऊ आणि त्यांना दाखवून ही जागा. ती आधीच निघून गेली गं, असं कोणी गद्दारी कसं करू शकते का म्हणत आदित्य हुमसत रडू लागला.

प्रीतीने त्याला मिठीत घेत सावरलं.


इन्स्पेक्टर जाधव आणि पवार इन्वेस्टीगेशन साठी बसले होते एकेक गोष्ट ते बारकाईने बघत होते.

सर या तिघांनीही लास्ट कॉल आदित्यला केलेले आणि तेही त्याच दिवशी ज्या दिवशी यांचं हे असं झालं त्याच्या ४-५ तास आधीच त्याने कॉल केलेला, पवार रिपोर्ट इन्स्पेक्टर जाधवना दाखवत म्हणाला.

त्याच्यासोबत काय काय सापडलं, इन्स्पेक्टर जाधव.

हे ब्रेसलेट, ही कॅप आणि अंगठी हे आपल्याला यांच्याजवळ सापडलय आणि हे सगळ्या फोटोमध्ये आदित्य कडे दिसतं आहे, कॉल डिटेल्स मधील लास्ट कॉल आदित्यचा आहे, काही लक्षात येतय का?, इन्स्पेक्टर जाधव.

म्हणजे तुम्हाला असं म्हणायचय की, त्याने त्यांना कॉल केला तिथे बोलवलं आणि मग त्यांना तिथेच गळा दाबून मारल्याने डाउट येऊ नये म्हणून पाण्यात फेकून दिलं, पवार.

एक्झॅक्टली पवार, इन्स्पेक्टर जाधव.

पण कसं शक्य असेल ते त्याचे मित्र होते तो असं का करेल?, पवार.

ते तो स्वतः सांगेल ताब्यात घ्या त्याला आणि पोलिसांचा हिसका दाखवा बघा कसा पोपटासारखा बोलतोय ते, इन्स्पेक्टर जाधव.

ठीक आहे सर लगेच कामाला लागतो, पवार

बोला आदित्य साहेब काय केलं? कसं केलं? का मारलं तुमच्या मित्रांना? बोला पटपट बोलायचं आणि हो खोटं नाही, मला खोट आवडत नाहीय, इन्स्पेक्टर जाधव.


सर काय बडबडताय तुम्ही कळतंय का तुम्हाला? पूर्ण बोलत असताना इन्स्पेक्टर जाधव यांनी एक कानाखाली वाजवत म्हणाले मी आधीच सांगितलं मला खोट आवडत नाही, पवार यांच्याकडून सगळं वदवून घ्या प्रेमाने तर प्रेमाने किंवा आपल्या पद्धतीने, इन्स्पेक्टर जाधव


सर का मारलं त्याने त्या तिघांना? कि तुम्ही त्याला असंच अडकवताय? हा तर त्यांचा मित्र होता ना? पत्रकारांनी पोलीस स्टेशनला गराडा घातला होता. आणि जाधव दिसल्यावर त्यांच्या प्रश्नांचा भडिमार चालू झाला आपल्या डोक्यावरची टोपी टेबलावर ठेवत ते सगळ्या प्रश्नांचे उत्तर देऊ लागले.

हे बघा सध्या आम्ही काहीच सांगू शकत नाही. आम्हाला मिळालेल्या पुराव्यांवरून आम्ही त्याला अटक केले आहे. त्यांनी कोणतेही कारण सांगितले नाही. तरी तो लवकरच सगळं सांगेल आणि तुम्हा पर्यंत सगळं पोचवू आता थोडं कामाचं बघू द्या. नमस्कार करत इन्स्पेक्टर जाधव चालत निघाले त्यांच्या एवढ्या वर्षाच्या सर्विस मध्ये पहिल्यांदाच एवढं क्रेडिट मिळालं होतं.

केस सोपी असल्यामुळे पहिल्या एक-दोन तारखे मध्ये निकाल लागला आणि मिळालेल्या पुराव्यांवरून आरोपी दोषी ठरविण्यात आलेला आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. ज्या केसची एक्साइटमेंट संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती ती केस आता संपली होती.

जाधव यांना या केस नंतर लगेच प्रमोशन मिळाले. पवार पण आता चांगल्या पदावर आले होते. न्यूज चॅनल्स नेहमीचीच बडबड करत होते. देखिये इस मासूम चेहरे के पीछे वाला दरिंदा, दोस्त केहने वाला ये दरिंदा दोस्त नेही किया अपने दोस्त का खात्मा. फायनली हे प्रकरण निवळलं होतं.

 

फोन वाजला आणि इन्स्पेक्टर जाधव जागेवरून उठून तडक निघाले पवार गाडी काढा लवकर आपल्याला निघायचंय.

मला इंटरेस्ट रस्ता गाडीचा सायरन वाजवत येऊन थांबली पत्रकार आधी जेवण झाल्यावर गेला होता पोलिस त्यांना मोठ्या मुश्कीलीने बाजूला सरकवत घटनास्थळी पोहोचले एका मुलाचं प्रेत तिथे होते इन्स्पेक्टर जाधव आणि पवारांनी हातात हात मोजे घालत तपास सुरू केला.

फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगलने तेथील फोटो घेत होता तर फॉरेन्सिक ची लोक काही बोटांचे ठसे वगैरे मिळत आहेत का बघत होते

पवार बॉडी पोस्टमार्टम मला पाठवून द्या आणि त्याचा आयडेंटिफिकेशन करून घ्या म्हणजे तपास करायला बरे पडेल, इन्स्पेक्टर जाधव

हो सर लगेच कामाला लागतो, पवार

आज सकाळी इन्स्पेक्टर 2 लवकरच ऑफिसमध्ये येऊन बसलेले पाठोपाठ पवारही आले

या पवार या, ओळख पटली का? आणि काय म्हणतायत रिपोर्ट? आणि तुमचा चेहरा असा का झालाय, इन्स्पेक्टर जाधव

सर ते रिपोर्ट वाचल्यावर तुम्हाला कळेलच, पवार

शुभस्य शीघ्रम! शुभ काम के लिये दी क्यू? द्या इकडे ते रिपोर्ट इन्स्पेक्टर जाधव

हे घ्या सर, पवार

रिपोर्ट वाचताच इन्स्पेक्टर जाधव उठून उभे राहत, कसं शक्य आहे हे ?

सर हेच सत्य आहे त्याला काय करायचं, पवार

पवार गाडी काढा आपल्याला लगेच निघायचंय, इन्स्पेक्टर जाधव.

रात्रीचे दहा वाजलेले. आदित्यचं हे प्रकरण झाल्यानंतर प्रीतीचं कोणत्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हते तरीही ती कुठलेसे पुस्तक वाचायचा प्रयत्न करत होती लक्ष लागत नाही कळल्यावर पुस्तक बाजूला ठेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली. काही केल्या आदित्यची आठवण डोक्यातून जात न्हवती. आदित्य असा कसा करू शकतो? ज्या माणसावर एवढा विश्वास ठेवला त्याने का फसवलं असेल मला? मध्यरात्री कधीतरी तिचा डोळा लागला.

खिडकीतुन आता येत त्याने खोलीत प्रवेश केला. खोलीत अंधार असल्याने त्या व्यक्तीचा चेहरा अस्पष्ट दिसत होता. खिशातून एक रुमाल काढत त्यावर कसलंसं औषध लावलं आणि हळूहळू तो प्रीतीच्या दिशेने चालू लागला. तो तिच्या नाकावर रुमाल लावणार तोच प्रीतीला जाग आली. समोर अनोळखी व्यक्ती पाहून तिने ओरडणार अशी चाहूल लागताच बाजूची उशी घेऊन तिच्या तोंडावर ठेवून तिला मारायचा प्रयत्न तो करू लागला. प्रीतीला तो चेहरा ओळखीचा वाटला. त्याचा चेहऱ्यावर एक विचित्र हास्य तिला दिसत होतं. हा प्रकार चालू असतानाच दरवाजावर थाप पडली आणि इन्स्पेक्टर जाधव, पवार आणि एक व्यक्ती खोलीत शिरली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ती अनोळखी व्यक्ती घाबरली आणि तिथून त्याने पळून जायचा प्रयत्न करू लागली. पण पवारांच्या चपळाईने त्याचा प्रयत्न फसला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रीतीही घाबरली होती. बाजूच्या टेबलावरील पाणी पीत तिने पवारांचे आणि इन्स्पेक्टर जाधवांचे आभार मानले.

थँक यू सो मच सर पण तुम्ही न बोलवता इथे कस काय?, प्रीती

थँक यू म्हणायचंच असेल तर ह्याला म्हण, आज ह्याच्यामुळेच तू जिवंत आहेस, इन्स्पेक्टर जाधव.

तू?, प्रीती जवळजवळ किंचाळतच बोलली.

हो मीच तुझा आदी, आदित्य

पण कसं शक्य आहे हे तू तर ...., प्रीती

प्रीतीचं बोलणं थांबवत इन्स्पेक्टर जाधव म्हणाले,


सांगतो सगळं ऐका, आम्हाला जेव्हा मरिनला बॉडी मिळालेली. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये कळलं की, याचा पण खून तसाच झालाय जसा रती, मोहित आणि नेहाचा झाला होता. आम्ही आयडेंटीफिकेशन साठी त्याचं पॉकेट चेक केलं तेव्हा शॉक बसला. ती बॉडी प्रभासची होती. म्हणजे तुमच्याच गॅंगमधला एक जण. आमचा सगळ्यात आधी संशय आदित्यवर गेला आणि म्हणूनच आम्ही तो ज्या जेलमध्ये होता तिथल्या जेलर भेटून विचारलं. तर तो म्हणाला चांगलं पोरगं आहे हा काय कोणाचा खून करणार आहे इथेच काही पळून वगैरे गेला नाहीये. मग आम्ही आदित्यला जाऊन भेटलो. आम्ही पुन्हा पहिल्यापासून त्याची चौकशी केली त्या चौघांना का मारलं तिथून. पण तो नाहीच म्हणत होता. हळूहळू एकएक गोष्ट तो सांगत होता की तो कसा ह्यात अडकला असेल. त्याने सांगितलेल्या गोष्टी क्रॉस व्हेरीफाय केल्यावर आम्हाला थोडी थोडी खात्री पटू लागली. त्यात त्याचा फोन डायव्हर्ट झाल्याचंही लक्षात आलं. आणि प्रभासचा खून झाला तेव्हा तो जेलमध्येच होता. आम्हाला नेमकं काय ते कळत नव्हते. पुरावे आदित्यच्या विरोधात होते पण आदित्य जे सांगत होता ते ही खरं वाटत होतं. तेवढ्यात आदित्य म्हणाला आता मी खरा की खोटं हे नंतर बघू पण तुम्ही जर घाई केली नाही तर आणखी एक खून होऊ शकतो. आम्ही आश्चर्याने आदित्यकडे पाहू लागलो त्याच्या ते लक्षात आल्याने तो म्हणाला, रती, प्रभास, मोहित आणि नेहा झाले मी इथे म्हणजे पुढचा नंबर प्रीतीचा असू शकतो. त्याचप्रमाणे आम्ही कामाला लागलो आणि शिकार आयतीच सापडली.

पण साहेब हा का मारत होता सगळ्यांना, पवार

ते आता तो स्वतःच सांगेल, बोल रे ये रताळ्या, इन्स्पेक्टर जाधव.


"सांगतो साहेब सगळा, खूप वेळा ह्या लोकांनी माझा अपमान केलेला. सतत येता जाता टोमणे मारायचे. म्हणून ठरवलं संपवून टाकायचं या सगळ्यांना रोजचा ताप नको. एकदा माझ्या ग्रुप मध्ये आणि ह्यांच्यात भांडण झालेलं तेव्हाच डोक्यात गेलेले. सगळं व्यवस्तीत चाललेलं. चार जण वरती गेलेले, हा आतमध्ये, हिला चोरीच्या उद्देशाने मारलं असं दाखवायचं आणि पळून जायचं गावी सगळयापासून दूर पण वाचली ही साली.... पुढे काय बोलणार एवढ्यात पवार यांनी त्याच्या कानाखाली मारली आणि त्याला ताब्यात घेतलं.


आज बहुतेक वर्तमान पत्रात, बातम्यांच्या चॅनेल्स वरती एकाच गोष्टीवर चर्चा चालू होती. आज पर्यंत कोणत्याच बातमीला एवढं फुटेज मिळालं नसेल इतकं ह्या बातमीला मिळालेलं. संपूर्ण महाराष्ट्र ह्या ऐतिहासिक निकालाची वाट पाहत होता. आज की ताजा खबर, आजची ब्रेकिंग न्यूज, न्याय मिळाणार का ह्या केसला अशी काहीशी चर्चा सगळ्याच चॅनेल्स वरती चालू होती.

आदित्यने त्याची वाया गेलेल्या एका वर्षाची नुकसान भरपाई मागीतली होती. त्याची मागणी सरळ होती की, समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय माझं लास्ट इयर वाया गेलंय माझ्या घरच्यांनी माझ्याशी असलेले सगळे संबंध तोडलेत त्याची भरपाई मिळाली पाहिजे.

आज कोर्टात सूनवाई होण्याचा दिवस होता. सरन्यायाधीश कदम हे ह्या केस नंतर रिटायर्ड होणार होते. त्यांच्या करकीर्दीतली ही सगळ्यात ऐतिहासिक सूनवाई असल्याची चर्चा बाहेर चालू होते. Adv. इनामदार सरकारी वकील म्हणून काम बघणार होते.

हातातील पेपर वाचत न्यायाधीश कदम म्हणाले सदर केसमध्ये सरकारी वकील म्हणून advocate इनामदार हे आहेत तर मि. आदित्य त्यांची केस ते स्वतः लढत आहेत. मि. आदित्य मी तुम्हाला कळवू इच्छितो की, जर हा निकाल तुमच्या विरुद्ध लागला तर तुम्हाला वरच्या कोर्टात जात येणार नाही.

ओके, आदित्य

Adv. इनामदार प्लिज प्रोसिड


"थँक् यू जज साहेब, तर मि. आदित्य यांनी केलेला हा दावा म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. याला कोणताही संदर्भ नाही. फक्त आणि फक्त पब्लिक स्टंट साठी त्यांनी हे केस टाकलेली आहे तर न्यायमूर्ती माझी अशी विनंती आहे की हे केस स्ट्रेट अवे डिसमिस करावी, thats ऑल थँक यू"

ओके मि. आदित्य युअर प्रोसिड

''थँक यू माय लॉर्ड, वकील साहेबांनी म्हणलं तसं कोणताच पब्लिक स्टंट वगैरे मला करायचा नाहीये कारण मला ऑलरेडी लोकांचं भरपूर फुटेज मिळलंय, खूनी दरिंदा, मौत का तुफान, दोस्त के नाम पर काला टिक्का इ. इ. मला फक्त हा डाग पुसायचाय आणि माझ्या मागण्या पण सरळ आहेत. मला न्याय मिळाला पाहिजे एवढीच विनंती आहे"

तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट ने आत टाकलेलं तुम्ही त्यांच्यावर केस करा. तुम्ही जे मागताय याची कायद्यात कोणतीच तरतूद नाहीये त्यामुळे तुम्ही जरी पर्टीक्यूलर डिपार्टमेंट वर केस टाकली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही केस मागे घ्या आणि तुमचं उरलेलं आयुष्य सुखाने जगा"adv. इनामदार

"मला पोलिसांनी पकडलेलं तेव्हा त्याची सूनवाई ह्याच न्यायालयात झालेली. विविध न्यूज चॅनेल्स, सरकारी नेते यांनी वाटेल त्या भाषेत माझ्या करिअर वर चिखल उडवला, माझ्या कॉलेजने मला रस्टीकेट केलंय. म्हणजे एका सामान्य माणसाच्या आयुष्यात होतं तसं काहीच होत नाहीये. मला न्याय मिळालाच पाहिजे" आदित्य

"सरळ वाटणारी ही केस आता गुंतागुंतीची होत चाललीय आणि आपलं सरकार हे लोकशाही सरकार आहे. इथे प्रत्येकाला न्याय मागायचा अधिकार आहे आणि ह्यामुळेच मी हे केस रजिस्टर करतोय आणि आरोप प्रत्यारोपा वरून ह्याचा निर्णय दिला जाईल. पुढल्या तारखेला ह्याची सूनवाई होईल", न्यायधीश

निर्णयाचा दिवस


मि आदित्य मी तुमच्या मागण्या वाचल्यात आजचा हा निकाल पूर्ण देशासाठी ऐतिहासिक क्षण असेल.यात कोणतीही चूक होऊ नये म्हणून आम्ही एक कमिटी बसवली होती आणि त्यात सगळ्या गोष्टींचा विचार करून चर्चा करून एकमताने आम्ही निर्णय घेतलाय.

तर तुमची पहिली मागणी अशी होती की आईबाबांनी तुमच्याशी संबंध तोडलाय तर इन्स्पेक्टर जाधव स्वतः तुमच्या गावी आई वडिलांना भेटून आलेत त्यांना सत्य समजलंय आणि ते तुमच्या पाठीशी आहेत. तुमच्या दुसरी मागणी समाजाचा दृष्टिकोन तर लोक चार दिवस बोलतात आणि कालांतराने विसरून जातात त्यावर पर्याय नाही. तुम्हाला जे काही थर्ड डिग्री भेटली ते काय परत येऊ शकत नाही पण एका संस्थेमार्फत तुमच्या फॅमिलीचा आम्ही मेडिक्लेम करतोय. राहता राहिला कॉलेजचं वाया गेलेला वेळ तर तो परत आणणं शक्य नाही पण कॉलेज ने तुमचं रस्टीकेशन कॅन्सल केलंय आणि तुम्ही तुमचं राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकता. आणि जॉब चं म्हणाल तर ते तुमच्या वयक्तिक अभ्यासावर मिळेलच ह्या केसमुळे त्यात व्यत्यय येणार नाही. मी आशा करतो की तुम्हाला हा निर्णय मान्य असेल", न्यायाधीश

"मला मान्य आहे हे. जे झालं ती वेळ चुकीची होती आपण कोणी नाही. तरीही सन्मानीय कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे तो मला मान्य आहे. माझ्यासारख्या एका छोट्या मुलाचं ऐकून निर्णय दिला त्यासाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे. खूप खूप धन्यवाद."आदित्य

जमलेल्या सगळ्याच लोकांनी टाळ्या वाजवत कोर्टाच्या निकालाला संमती दर्शवली. पुढे त्या गुन्हा केलेल्याला शिक्षा दिली आणि आदित्य ला सोडण्यात आलं.

----------------------------------------------------------------------

प्रीतीचं लक्ष तिच्या घड्याळात होतं. ११ वाजताच टाइम देऊन ११:३० वाजले तरी आदीत्य अजून आला नव्हता. फायनली आदित्य आला

"सॉरी डार्लिंग", आदी

"किती उशीर असतानाच आदित्य ने त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो. तिचे थरथरणारे ओठ सुरवातीला विरोध करतात पण नंतर ती पण साथ देते.

"लव्ह यू सो मच डिअर, मिस यू अ लॉट", आदित्य.

"लव्ह यू सो मच वेडू", प्रीती.

समाप्त.....                                  


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance