अक्षय दुधाळ

Abstract Inspirational

2  

अक्षय दुधाळ

Abstract Inspirational

मुंबई डायरी - भाग१

मुंबई डायरी - भाग१

3 mins
165


माझा पहिला मुंबई लोकल प्रवास (मुंबई डायरी)


मुंबईकर आणि लोकल चं नातं हे वडा आणि पाव यांच्या नात्या सारखंच घट्ट आहे. मुंबईत राहून लोकल ने नाही फिरला म्हणजे.. जाऊ दे उगाच पाल्हाळ नको. तर हा मी होता होईल तेवढा सुरवातीला ह्या लोकलचा नाद टाळलाच होता. पण शेवटी योग आलाच. दहावीच्या परिक्षेनंतर सुट्टीला आजोळी आलेलो. पनवेल ला लोकल ने जावं लागतं म्हणून मावशीकडे जायचं टाळत होतो. पण 'तुला काय बाबा तिच मावशी आवडते तू माझ्याकडे का येशील' वगैरे इमोशनल पंच टाकल्यानंतर माझ्यातला हळवा अक्षय जागा झाला. आणि मावशीला येतो म्हणून प्रॉमिस केलं. आता कसं जायचं ह्यावर चर्चा सुरू असताना मावशी म्हणाली त्यात काय एवढं ट्रेन नी जायचं. गोवंडीला मी बसवून देईन तिकडून ती घ्यायला येईल. चार गाड्या बदलून चुकण्यापेक्षा हे सोप्प आहे. आणि ठरलं मी ट्रेननी सॉरी लोकलने मावशीकडे जाणार. गोवंडी स्टेशन ला ट्रेन आली स्टेशन वर फार गर्दी न्हवती पण ट्रेन मध्ये आत कुठे जागा दिसत न्हवती. म्हणून ती ट्रेन सोडून दिली.


मावशीने विचारलं ट्रेन का सोडली तर पटकन म्हणालो, अगं भरलेली होती रिकामी येईल मग चढतो. तर, अरे वेड्या आपली जागा आपण बनवायची रिकामी जागा तूला कोणी देणार नाही इथे. आता आली ट्रेन की पटकन चढ तुला आत जायची गरज नाही मागचा घेऊन जाईल अगदी अलगद. कसा बसा मी ट्रेनमध्ये चढलो तर फोनवर फोन आता एवढ्या गर्दीत हात हलवायची सोय नाही आणि खिशातून फोन काढून कानाला लावायचा म्हणजे पराक्रमच, आणि तो काय मला जमणार न्हवता. गोवंडी नंतर मानखुर्द लगेच आलं पण वाशी काय येईना. जवळपास १० मिनिटांनी वाशी आलं मग सानपाडा, नेरुळ, सी वूड, बेलापूर सीबीडी, खारघर, मानसरोवर, करत अंदाजे ४० मिनिटांनी खांदेश्वर आलं. मानसरोवर वरून ट्रेन निघाली तसंच पाठीवर हात पडला. म्हणलं चला कोणीतरी ओळखीचं भेटलं म्हणून मागे बघितलं तर मागचा इसम खंडेश्वर एवढंच म्हणाला. मी ही हो एवढंच उत्तर दिलं.


ट्रेन स्टेशनवर आली मला ज्या साईडला चढला त्या साईडलाच उतरायचं अशी वार्निंग मिळाल्याने मी तोच गेट पकडून गोवंडीपासून जत्रेत हरवलेल्या पोरासारखा शांत उभा होतो. असो तर ट्रेन ट्रॅक ला लागल्या लागल्या उतरना भाई म्हणल्यावर अहो ट्रेन थांबू तरी द्या असं म्हणाल्याबरोबर, अतिशय तुच्छ नजरेने त्या मनुष्याने बघितलं, कुठून कुठून येतायत टाईप त्याचे डोळे बोलत होते मला मागे खेचलं आणि तो चालू ट्रेनमध्येच उतरला. तो उतरला तसं पाठचे पटपट उतरले मला वाटलं ट्रेन त्या स्टेशनवर थांबतच नाही म्हणून हे चालू ट्रेनमधून उतरतायत. पण मावशी तर म्हणलेली थांबते, मरु दे म्हणून मीही उडी मारली आणि धाडकन प्लॅटफॉर्मवर आपटलो. गुडघा फुटला, फुटला म्हणजे थोडंस खरचटलं. माझ्याकडे बघायला तिथे कोणाला वेळ न्हवता. सगळे नया है क्या? म्हणत निघून गेले.


त्या दिवशी भरपूर काही शिकलो. पहिली गोष्ट म्हणजे, म्हणजे लोकल कितीही भरली असली तरी अंदर चल पुरा ट्रेन खाली पडा है म्हणजेच अंदर जगा है रिमेन्स कॉन्स्टंट. लिमिट टेंड्स टू झिरो नॉट एक्सक्टली इकवल टू झिरो. ट्रेन थांबतीय असं वाटत असताना त्या दिशेने हळूहळू चालत उतरा म्हणजे पडणार नाही. लिमिट चं ह्यापेक्षा भारी उदाहरण असूच शकत नाही. तुम्ही एकदा मुंबईला आपलं म्हणलं की तीही तुम्हाला आपलंसं करते. कुठलंही नातं नसताना जिन्यावरून पळत येऊन चालू ट्रेन मध्ये चढणाऱ्याला गेटवर लटकलेला इसम अगदी बाळाला कुशीत घ्यावं तसं त्याला आत घ्यायचा. तेच एकमेकांना स्माईल देऊन पुढे जायचे. एवढ्या गर्दित आपल्या प्रियेसीला आपल्या दोन हातांच्या मध्ये प्रोटेक्टली उभा करणारा तो तिचा बॉयफ्रेंड असो की एकमेकांना टाळ्या देणारे मित्र. पुढे जाऊन मुंबईत शिक्षणानिमित्त भरपूर फिरलो. अगदी त्या भजनीमंडळाच्या लोकांबरोबर भजन म्हणायचो. गेटला लटकलो पण ही एक गोड कडू आठवण कायमची लक्षात राहिली.

ए दिल है मुश्किल जीना यहा

ज़रा हट के ज़रा बच के, ये है मुंबई मेरी जान!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract