"थॅनाॅस" एक प्रेमकथा
"थॅनाॅस" एक प्रेमकथा
लेडी डेथ ला इंप्रेस करण्यासाठी थॅनाॅस तिच्या म्हणण्याप्रमाणे वागत होता. ती म्हणेल ती पूर्वदिशा. सॅटर्न प्लॅनेटच्या चंद्रावरील टॅटन वर जन्मलेला थॅनाॅस, आज त्याच्या आई ला जीवे मारून टाकण्यासाठी जाणार होता. डेथ ला भेटून तो तिथून निघाला. खरंतर थॅनाॅस ची आई त्याच्या जन्मानंतर च त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होती पण त्याच्या वडिलांनी तिला थांबवलं. त्याचा भाऊ इराॅज सामान्य माणसाप्रमाणे दिसायचा पण डेवीअंट प्रजातीचे डएनए असल्याने थॅनाॅस सगळ्यांपेक्षा वेगळा दिसायचा. थॅनाॅस लहानपणा पासूनच शांत होता. शाळेत असताना तर तो लॅब मध्ये जाण्यासही घाबरायचा. पुढे जाऊन त्याची ओळख डेथ सोबत झाली. हळू हळू ती त्याची भीती घालवू लागली. थॅनाॅस देखील आता प्राण्यांवर प्रयोग करू लागला. कधी न मृत्यु झालेल्या टॅटनवर आता लोक थॅनाॅस च्या हातून मरू लागले होते.
आपण वेगळे का आहोत या प्रश्नाचे उत्तर मिळेल म्हणून थॅनाॅस आज आपल्या आईला मारण्यासाठी आला होता. त्याने त्याच्या आईला बांधून ठेवले होते. तो तिला मारून टाकणार तितक्यात तिथे एक गडद लाल रंगाचा कोट आणि काळी पँट शर्ट घातलेली मुलगी तिथे आली. तिच्या येण्यामुळे त्याच्या कामात अडथळा आल्याने थॅनाॅस चांगलाच भडकला. तो धावत तिच्या दिशेने जात असताना त्याचा पाय अडखळतो आणि तो खाली जोरात पडतो. त्याचा राग अजूनच वाढतो. रागात उठून तो तिची मान धरून भिंतीवर डोके आपटतो. तिच्या डोक्यातून रक्त येते पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून न घाबरता तो हे जे काही करत आहे ते पूर्ण चुकीचे असून त्याला त्याच्या शक्तीचा योग्य वापर करण्यास सांगते. थॅनाॅस तिचे बोलणे ऐकून निशब्द होतो. कारण यापूर्वी त्याने त्याच्या समोर येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात त्याच्याबद्दल घृणा किंवा भीती पहिली होती. पण आज त्याच्या समोर असलेल्या मुलीच्या डोळ्यात त्याला वेगळेपण जाणवले. तिच्या डोक्याला मार लागल्याने ती बेशुद्ध पडली. डेथ च्या भेटीनंतर कधी न दया दाखवणारा थॅनाॅस तिला उचलून सोफ्यावर ठेवतो. त्याचे त्यालाच कळत नव्हते की तो असे का वागत आहे. शुद्धीवर येताच थॅनाॅस तिला तिथून लगेचच निघून जाण्यासाठी सांगतो पण थॅनाॅस च्या जवळ जाऊन मगाशी तो पडल्याने त्याला कुठे दुखापत तर झाली नाही ना ह्याची विचारपूस करत त्याचे हात पाहते. पण त्याला काहीच झालं नव्हत. तो तिला तिचे नाव विचारतो. तिचे नाव असते, "सॅलिना". ती त्याला पुन्हा तो करत असलेल्या त्याच्या कृत्याचे विचार करून ते योग्य आहे की अयोग्य ह्याचा विचार करण्यास सांगून तिथून निघून जाते.
थॅनाॅस त्याच्या आईकडे एकवार पाहतो आणि तिला तो मोकळे करून डेथ कडे निघून जातो. डेथ ला थॅनाॅस च्या अश्या वागण्याची खुप चीड येते. ती त्याला तेव्हाच स्वीकारेल जेव्हा तो तिचे सगळे म्हणणे ऐकेल. आताच्या आता त्याने पूर्ण विश्व च्या अर्ध्या लोकांना मारून टाकण्यास सांगून काम झाल्यावरच येण्यास सांगितले आणि त्याला तिथून निघून जाण्यासाठी सांगते. थॅनाॅस तिचे म्हणणे ऐकतो आणि तिच्या म्हणण्यानुसार तो करायला निघतो. त्यान
े इन्फिनिटी स्टोन्स जमा करायला सुरुवात केली होती त्यामुळे त्याचे काम अधिक लवकरात होईल आणि डेथ देखील त्याच्यावर खुश होईल.
वाटेत त्याला त्यादिवशी भेटलेली सॅलिना दूरवर उभी असताना दिसते. ती काहीतरी वाकून बघत असते. त्याला ती काय करत असेल हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली. तो मागे वळतो आणि तिच्या दिशेने जाऊन तिला आवाज देतो. ती मान वर करून पाहते तर त्याला तिच्या डोळ्यांत अश्रू दिसतात. तिच्या पायाजवळ एक कुत्र्याच पिल्लू त्याच्या मेलेल्या आईकडे पाहत तिला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. सॅलिना त्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून घेते आणि थॅनाॅस चा हात त्याच्या डोक्यावर ठेवून त्याला आता कोणालाच घाबरण्याची गरज नाही कारण थॅनाॅस सारखा शक्तिशाली व्यक्ती तुझा मित्र आहे असे त्या कुत्र्याच्या पिल्लाला म्हणते. सॅलिना चा हा सोज्वळ स्वभाव थॅनाॅस च्या मनाला लागतो. एका कुत्र्याच्या पिल्लासाठी तिचा तळमळणारा जीव त्यालाही कासावीस करतो. आणि आजवर हे आपण कित्येक निष्पाप लोकांचा जीव घेतला याचे चित्र त्याच्या डोळ्या समोर येत. तो तिला डेथ बद्दल सगळ काही सांगतो आणि त्याचे तिच्यावर प्रेम असून तो तिचे म्हणणे ऐकावे लागेल असे सांगतो. यावर सॅलिना त्याला एकदा ह्या गोष्टीसाठी तिला नकार देऊन बघ तिची काय प्रतिक्रिया असेल. तिला ही तुझे म्हणणे एकदा सांग जर तिचेही तुझ्यावर प्रेम असेल तर ती तुला समजून घेईल. थॅनाॅस ला तिचे बोलणे ऐकून राग येतो. तिचेही माझ्यावर प्रेम असून ती नक्की समजून घेईल असे सांगून तो डेथ कडे निघून जातो.
डेथ त्याच्या इतक्या लवकर येण्याने खुश होते. इतक्या लवकर तु तुझे काम पूर्ण केलेस असे म्हणून तिला आनंद होतो. पण थॅनाॅस तिला हे काम पूर्ण झाले नाही आणि तो निष्पाप लोकांचा जीव घेणार नाही असे सांगून तिला नकार देतो. डेथ त्याचा नकार ऐकून खुप चिडते. ती त्याला पुन्हा एकदा विचार करण्याची संधी देते त्यावर तो नाही म्हणत त्याचा विचार पक्का असल्याचे सांगतो. डेथ ला भयंकर राग येतो आणि ती त्याला बेसावध असताना त्याच्यावर वार करते. हे पाहून थॅनाॅस थक्क होतो. तो त्याचे तिच्यावर असलेले प्रेम व्यक्त करतो पण डेथ ला काहीच फरक पडत नाही. तिला प्रेम वैगरे ह्या गोष्टी महत्वाच्या नसून लोकांना मारून टाकण्यात तिला आनंद मिळतो असे सांगते. थॅनाॅस खुप दुखावतो. डेथ त्याला पुन्हा पुन्हा विचारते पण तो त्याच्या निर्णयावर ठाम असतो. डेथ त्याला मारून टाकण्याचा निर्णय घेते आणि रागात त्याच्यावर प्रहार करणार तितक्यात सॅलिना तिथे येते. आणि तिच्याजवळ असलेल्या स्पेशल पॉवर गन ने डेथ वर निशाणा साधत तिला मारून टाकते. जवळच असलेला थॅनाॅस डेथ ला मरताना पाहून हळहळतो. पण सॅलिना तिथे येऊन त्याचा जीव वाचविण्यासाठी ची धडपड पाहून त्याला तिचेही कौतुक वाटते. सॅलिना त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात तिच्या हृदयावर ठेवत त्याला तिचे ठोक्यांची धडधड ऐकवत, ह्याला प्रेम म्हणतात असे सांगून त्याच्या मिठीत शिरते. आणि सुरुवात होते एका अनोख्या,
"थॅनाॅस" एक प्रेमकथेची...