गोकुळधाम ची दुनियादारी
गोकुळधाम ची दुनियादारी
आज ह्या जगात सर्वात जास्त आनंदी असेल तर तो पोपटलाल होता कारण आज त्याला मुलीला पाहायला जायचे होते. कालची रात्र त्याला झोप देखील लागली नाही तो इतका आतुर होता. सकाळ सकाळीच आवरून तो जेठालाल च्या घरी गेला. तो जोरजोरात दाराची घंटी वाजवू लागला. घंटी चा आवाज ऐकून जेठालाल ची झोपमोड होते.
"अरे दया.. दया.."
"हा.."
"अरे हा काय..? जा जाऊन बघ कोण आलंय इतक्या सकाळ सकाळी झोप मोड करायला."
"हो आलेच" दया जाऊन दार उघडते. पोपटलाल आलेला असतो त्याला आत हॉलमध्ये बसवते.
"दया वहिनी अहो जेठालाल कुठेय. बोलवा त्याला लवकर."
"अं.. हो.. अहो टपू चे पप्पा. बघा कोण आलंय." जेठालाल चिडत उठतो. आणि बाहेर हॉल मध्ये येऊन पाहतो तर पोपटलाल आलेला असतो.
"अरे जेठालाल. तु अजुन आवरलं नाहीस..?"
"का कुठे जायचंय..?"
"अरे विसरलास आज आपण मुलगी बघायला जातोय." पोपटलाल लाजत म्हणतो.
"मुलगी..? कोणाला..?"
"अरे मला अजून कोणता मुलगा बिनलग्नाचा आहे आपल्या सोसायटी मधे..?"
"मुलगा नाही तु पुरुष आहेस." जेठालाल तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलला..
"काय..?"
"अरे काय काय पोपटलाल इतक्या सकाळी कोणी येत का..? दया किती वाजता जायचंय..?"
"अकरा वाजता."
"आपल्याला अकरा वाजता निघायचं आहे. आताशी आठ वाजलेत आणि तु कुठे आताच गुडघ्याला बाशिंग बांधून आलास."
"नाही नाही ते काही नाही तु नेहमी उशीर करतोस. त्यामुळे मी जातीने तुला तुझी तयारी लवकर करून द्यायला आलोय."
"पण पोपटलाल भाऊ आम्ही नाही येऊ शकत." दया त्यांना मधेच बोलली.
"का..?"
"कारण मुलीच्या वडीलांना तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे हे तुम्हीच बोलला होता."
"हो ते तस मला मॅरेज ब्यूरो वाल्यांनी सांगितलं होतं. पण आपण जाऊ ना. असा काही नियम नाहीये."
"नाही नको पोपटलाल भाऊ. एक तर आधीच खूप मुश्किलीने स्थळ भेटलं आहे. उगाच त्यांना नको नाराज करूया आपण."
"हो ते ही आहेच म्हणा."
"आणि लाखात एक असं स्थळ आहे."
"काय माहित कोण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहे." जेठालाल पुन्हा तोंडातल्या तोंडात पुटपुटत बोलला.
"ह्ममम.. काय..?"
"अरे काही नाही तु अरे जा ना आता नाहीतर तुला उगाच उशीर होईल पोपटलाल."
"हो हो निघतो मी. चला दया वहिनी येतो मी." तितक्यात चाचाजी येतात.
"अरे डब्ब्या निघालास तु मुलगी पाहायला."
"नाही ते आता जरा राहिलेली काम पटकन उरकून निघतोच आहे. अरे हो एक मिनिट" पोपटलाल आपला चष्मा काढून दया वहिनी च्या हातात देतो.
"हे काय तु चष्मा का काढलास..?"
"जेठालाल.. काय आहे ना मुळी च्या घरच्यांसमोर मी कसा रुबाबदार दिसलो पाहिजे ते ह्या चष्म्या मुळे काही शक्य नाही ना म्हणून."
"बरं पोपटलाल भाऊ आता जाल तर घरी येताना आमची वहिनी सोबतच आणा. काय..?"
"हो हो दया वहिनी." पोपटलाल लाजत म्हणाला.
"अरे आता जा. काय लाजत बसलाय. तु इथे लाजत बसशील आणि तिथे कोण दुसरच लग्न करून घेईल तिच्याशी."
"अरे अरे जेठालाल काय बोलतोयस तु. चाचा जी मला आशीर्वाद द्या असं काही होणार नाही आणि माझं लग्न जमेल."
जाताना त्याने चाचाजी यांचा आशीर्वाद घेतला. आणि बाकी सगळी कामे आटोपून निघाला मुली च्या घरी.
घरात पोहचताच त्याला आईने आत घेतलं. हॉल मध्ये सगळे बसले होते. तो येताच त्याला एक वेगळी गंभीर शांतता जाणवली म्हणून त्याला अवघडल्यासारखं वाटत होत. कोपऱ्यात सुप्रिया उभी होती. तिला तो खुप घाबरलेला दिसत होता म्हणुन त्याला पाहून तिने डोळ्यांनीच सगळं ठीक होईल म्हणून खुणवल. तिथे गेल्यावर तिच्या बाबांनी त्याच्यावर एक कटाक्ष टाकला. आधीपासून च त्यांनी मॅरेज ब्यूरो मधून माहिती काढली असल्याने त्यांना नोकरी घर ह्या बद्दल तसं माहिती होत. म्हणून काय बोलावं त्यांना कदाचित सुचत नसावं म्हणून का वरवर च्या गोष्टी अस सगळ विचारून झाल्यावर पुन्हा पाच मिनिट अशीच शांततेत गेली.
किचन मधुन तिची ची आई येत त्यांनी जेवायला बसायला बोलवलं. तो इतका घाबरला होता की त्याला नाही कसं बोलावं ते देखील कळत नव्हतं. समोर सगळे जण बसून जेवण करायला सुरुवात केली. भेंडीची भाजी दिसताच त्याला त्याची नाटक आठवली. तो नेहमी तिला बघून नाक मुरडत. पण आता तो गपगुमान मान खाली घालुन हळू हळू जेवत होता. सोबत कसलाही आवाज येऊ नये याची पुरेपूर काळजी घेत होता.
खाता खाता अचानक भाजीतली मिरची तोंडात आली. पाणी पिऊन थोडावेळ थांबून पुन्हा तो जेवू लागला. मिरची इतकी तिखट होती की पाण्याने त्याची दाह कमी होत नव्हती. चष्मा घरी ठेवून आल्याने त्याला हिरव्या भेंडीतल्या हिरव्या मिरच्या सुद्धा दिसेना. त्याला स्वतःचाच राग येऊ लागला. एक नंतर दोन मग तीन चार अस करत करत सात ते आठ घासत मिरच्या आल्या. डोळ्यातलं पाणी खुप थांबवायचा प्रयत्न करत होता. पण डोळे लाल झाले होते. तोंडात तर मिरच्यांनी हाल करून ठेवले होते. कोणालाही याबद्दल कळू नये म्हणून मान खाली च ठेवून होता.
अचानक सुप्रिया च्या बाबांनी त्यांच्या प्रश्नाने बॉम्ब फोडला. त्याच्या ताटामधल्या भाजीकडे पाहून विचारलं,
"पोपटलाल, काय मग कशी झालीय..?"
त्यावर पोपटलाल घाबरत घाबरत च म्हणाला,
"छान झालीय. खुप मस्त भाजी झालीय."
"भाजी नाही. त्यातल्या मिरच्या कश्या झाल्या आहेत..?"
दोन सेकेंद त्याला ला काही कळेच ना. तिच्या बाबांच्या ह्या प्रश्नाने सगळ्यांचा एकच हशा पिकला. पोपटलाल ला वाटलं होत कोणाचं लक्ष नाहीये पण तिच्या बाबांनी च खुणावून सगळ्यांना त्याची होत असलेली गडबड दाखवली होती. सगळे जण त्याची झालेली हालत पाहून आपलं हसू दाबत होते. तिथे उभी असलेली सुप्रिया सुद्धा तिच्या तोंडावर हात ठेवून हसत होती. मग तीच्या आईने दिलेली साखर त्याने लगेच खाऊन टाकली. मनातल्या मनात हसून त्याने मिरच्यांचे आभार मानले. छोट्याश्या गमती मुळे अवघडले पण दूर झाला होता. गप्पांना उधाण आलं होतं. आणि शेवटी आपल्या पोपटलाल च लग्न त्याच्या साध्या सरळ स्वभावामुळे च जमलं होत."