लिलीपुट
लिलीपुट
1699 ला घरून सगळ्यांचा निरोप घेऊन निघालेला सेमिऊल गुलीवर, दक्षिण सागराच्या जहाजात असलेला गुलीवर वादळ आल्याने वाहून तो एका बेटावर आला. शुद्धीवर आल्यानंतर त्याला लीलीपुटियन लोकांकडून कळले की ते लीलीपुट बेट होते. त्यांनी त्याला बांधून ठेवले होते. बोटांइतक्या लोकांना पाहून गुलिवर आश्चर्यचकित झाला होता. लीलीपुटियन लोकांना गुलीवर दानव वाटत होता पण नंतर त्यांना त्याच्याकडून त्याची माहिती कळली व त्यांना कळाले की तो दानव नाही तर वादळामुळे तो इथे या बेटावर आला. शेवटी राजाचा निर्णय अंतिम असेल म्हणून सैनिक त्याला राजाकडे घेऊन गेले.
उदार मन आणि सोज्वळ स्वभाव पाहून राजाला त्याच्यापासून काही धोका नाही हे कळले होते. काही काळाने गुलीवरने लीलिपुटवरील साऱ्यांचे मन जिंकून घेतले. एके दिवशी राजाची आज्ञा न मानल्याने राजा त्याच्यावर खूप क्रोधित होता. आता ते बेट गुलीवरसाठी फार धोक्याचे होते. त्याला तेथील काही जणांनी तिथून निघून जाण्याचा सल्ला दिला परंतु गुलीवर तसे न करता राजापुढे नतमस्तक झाला आणि राजाची माफी मागितली. तसेच युद्धासाठी धावून आलेल्या दुसऱ्या शहरातील सैनिकांचा हल्ला त्याने स्वतःवर ओढून लीलिपुटवासींना वाचवले. सोबत विरोधात आलेल्या सैनिकांवर विरूद्ध प्रहार न करता त्यांनाही तिथून सुखरूपपणे जाऊ दिले. ब्लेफुस्कोच्या राजाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा त्याला फार आनंद झाला. त्याला गुलीवरला भेटण्याची इच्छा झाली. म्हणून त्याने लीलिपुटच्या राजाला शांततेचा संदेश पाठवून हातमिळवणी केली.
बेट आता कायम सुरक्षित राहील म्हणून राजालाही फार आनंद झाला. त्यानेही पत्राचे उत्तर देत मनापासून दुसऱ्या राजासोबत हातमिळवणी केली. दोन्ही राजांनी आपापल्या सैनिक आणि इतर लोकांची मदत घेऊन गुलीवरला त्याच्या घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. साऱ्यांचे आभार मानून गुलीवर आपल्या घरी आला.