Manda Khandare

Tragedy Classics Inspirational

3  

Manda Khandare

Tragedy Classics Inspirational

ती फिनिक्स

ती फिनिक्स

7 mins
191


मला कळत नाही,नावारूपाला आलेल्या लेखिका आपल्या लिखाणाची सुरुवात कश्या प्रकारे करता असतील? त्यांच्या त्या वेगवेगळ्या भावनिक कथा, हृदय पिळवटून टाकणारे ते दुःख, त्या वेदना वाचतांना ही वाचकांच्या डोळ्यात अश्रु येतील,असे लेखन त्या कसे करतं असतील बरे?हा प्रश्न मला नेहमीच पडायचा.पण या साऱ्या प्रश्नांची उत्तरे मला तेव्हां मिळाली जेव्हां काल अचानक ती बडोद्याच्या त्या छोट्याश्या मार्केट मधे दिसली. आम्हाला बघून, म्हणजे मला आणि माझी मैत्रिणी वीरा जी वकिल तर आहेच पण त्याच बरोबर ती एक चांगली समोपचारतज्ञ सुद्धा आहे.तर काल ती धावतच आली. आणि लगेच भर रस्त्यात आमच्या पायाच पडली. प्रसन्न चेहऱ्याने. आतुन बाहेरून आनंदी असल्याचा पुरावा तिच्या चेहऱ्यावरचे ते निखळ हसू देत होते. तिच्या डोळ्यातील ती आत्मविश्वासाची चमक बघून मी आवकच झाले. ही तिच होती जी चार वर्षा आधी वीरा कडे काउन्सिलिंग साठी आली होती.आली होती म्हंटल्यापेक्षा तिला आणलीं होती. ती आली तेव्हां मी वीरा च्या ऑफिस मधेच होते.तिला मी पहिल्यांदा बघितले तेव्हां तिचा तो निस्तेज चेहरा, डोळ्यांखाली काळी वर्तुळे, ओठ सुकूनं गेलेले. जणू कित्तेक दिवसां पासुन अन्न पाण्याविनां आहे. आणि जेमतेम तिचे वय तेविस चोविस असेल पण तिच्या कडे बघतां,ती वयाच्या मानाने बरीच मोठी दिसत होती. हसणे तर तिच्या दुर दुर च्या गावी नव्हतेच जणु.ती आली तशी माझ्या मागच्या खिडकीतून बाहेर बघत होती. अगदी एकटक, निर्विकार चेहऱ्याने. वीरा ने तिला नाव विचारले. पण ती काहीच बोलली नाही. तिच्या आई ने तिला हाताने हलवले तेव्हां ती भानावर आली. गोड आवाजात म्हणाली, "स्वप्नांली"आणि परत तीने आपली नजर खिड़कीकडे वळवली. तिची आई सांगू लागली तिची कहाणी, ऐकसाव्या वर्षीच आम्ही तिचे लग्न लावून दिले. स्थळ चांगले श्रीमंत होते. सोन्याची चांगली २/३ दुकाने होती त्यांची म्हणून बाकी काहीही चौकशी न करता आम्ही लग्न लावून दिले. घरी एकत्र कुटुंब पद्धत होती.चांगले २०/२५ लोक घरात होते. आणि ही घरात धाकटी सुन होती. मोठ्या ३ जावा आणि नणंद मिळून हिला खूप त्रास द्यायच्या. त्याचे शिक्षण हिच्या पेक्षा कमी होते. जावई पण केवळ बारावी होते. म्हणजे एकंदर त्या घरात कुणी जास्त शिकलेले नव्हतेच. आणि हिच्या मोठ्या जावे ला तिची लहान बहीण आणायची होती धाकटी सुन म्हणून. त्यामुळेच ती नुस्ते कान भरायची सासू सासऱ्यांचे आणि जावई सुद्धा तीचेच ऐकायचे. पाण्यात सावली बघायचे हो माझ्या लेकीची! किती वेळ तर् माझ्या मुलीला त्यांनी उपाशी ठेवले. काहीही चुक नसतांना नको नको त्या शिक्षा दिल्या.गरोदर पणात देखिल कितीतरी वेळा मारहाण केली त्या निष्ठुर काळजाच्या लोकांनी. आणि मुलगी जन्माला आली म्हणून तर सरळ घरा बाहेर काढ़ले हो!. वरून घटस्फोटाची नोटिसही पाठवून दिलेली. आम्हीही मग मुलीचे हाल बघून देवून टाकला घटस्फोट. तेव्हां पासुन ही अशी शुन्यात गेल्यागत असते. काय करावे कळत नाही हो आंम्हाला. असे म्हणून ती माऊली रडायला लागली.पोटच्या मुलींच्या आयुष्याचे असे मातेरे होतांना उघड्या डोळ्यांनी बघावे लागत होते. मनात दाटलेला भावनांचा कल्लोळ अश्रु वाटे बाहेर पडत होता. त्यांना शांत करून मी बाहेर नेऊन बसवले. 

वीरा,स्वप्ननाली जवळ येऊन बसली. मी ही थोड्या दुर अंतरावर बसले. वीरा ने तिचा हात हातात घेतला. आणि म्हणाली, किती सुंदर नाव आहे तुझे स्वप्नाली..... आणि हे तुझ्या सुंदरश्या डोळ्यांना खूप सुट करते आहे. *स्वप्निल डोळ्यांची स्वप्नाली* ती नुस्तेच वीरा कडे निर्जिव बाहुली सारखी बघत होती.

वीरा:- तुझी मुलगी कशी आहे? 

तिने मान हलवली

वीरा :- काय नाव ठेवले तिचे? 

ती :- ..........स्वरा

वीरा :- वाह! किती सुंदर आणि गोड नाव आहे.तुला संगीताची आवड आहे का ग! म्हणजे तु मुलीचे नाव स्वरा ठेवलेस ना म्हणून सहजच विचारले. 

ती:- तिने मानेने नकार दिला. 

वीरा:- आणि गाणे ऐकायची तर आवड आहे ना तुला. 

तिच्या चेहऱ्यावरचे किंचित भाव बदलले, सकाळच्या पहिल्या प्रहरी दवबिंदू च्या स्पर्शाने एखाद्या कळीची अलगद, एक पाकळी उमालवी तसेच काहीसे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. ते वीरा ने अचुक टिपले 

वीरा:- तू कॉलेज मधे स्टेज वर गायची ना!? 

वीरा ने अंधारात एक बाण सोडला, ज्याने बरोबर स्वप्नाली च्या मनाचा ठाव घेतला. ती बोलू लागली. 

ती:- नाही मी....... गाणे नाही गायची,....... मी....... स्टेज वर माझ्याच.......कविता.......सादर करायची. 

आंम्हाला आनंद झाला ती काही तर बोलली स्वतः बद्दल. वीरा ने सरळ मुद्द्याला सुरुवात केली. म्हणजे तुझे मन हे एक कवि मन आहे. असे म्हणतात ना, जो न देखे रवी वो देखे कवि. तुम्हां कवि लोकांना ना एक दुर् दुष्टी मिळालेली असते.मनाचे भाव तुम्ही कवि फार अलगद उलगडून सांगता. आणि म्हणूनच तू इतकी हळवी आहेस. तुझ्या अायुष्यात जे काही झाले आहे त्याचा तुला प्रचंड ताण आला आहे मान्य आहे. पण ज्यांना तुझी पर्वा नाही, तुझा मान सन्मान जपता आला नाही, त्यांच्या साठी तू तुझ्या जवळच्या माणसांना दुःखावते आहे हे कळते आहे का तुला.? तुला असे शांत बसलेले बघून त्यांना किती यातना होत आहेत हे लक्षात येते आहे का तुझ्या? . तुझ्या बरोबर् जे झाले त्याचा दोष ते स्वतःला देत आहेत. हे तुला ही माहिती आहे की त्यांचा यात काहीही दोष नाहीये. त्यांनी केवळ पालक म्हणून विचार केला होता. कुठल्या ही आई वडिलांची ईच्छा असते की आपली मुलगी श्रीमंत घरची सुन व्हावी. सारी सुख तिच्या पायाशी लोळण घ्यावीत. आपली मुलगी सासरी सुखात नांदावी येवढीच भाबडी ईच्छा असते प्रत्येक आई वडिलांची. यात काही चूक आहे का? 

तिने मानेने नाही म्हंटले. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहायला लागले. मी पाणी द्ययला उठले.पण वीरा ने मला बसण्याचा इशारा केला. तिच्या मनात इतक्या दिवसांपासून साठवलेले मळभ असे अश्रुंवाटे बाहेर पडत होते. म्हणून् वीरा ने असे प्रश्न केले कदाचित. 

वीरा:- जे झाले ते विसर असे मी नाही म्हणणार. पण तू त्याला असे कुरवाळत बसू नको. इतकेच म्हणणे आहे. तुझ्या पादरत सुंदरशी मुलगी आहे. लहान आहे ती. तिला आईच्या माये ची गरज आहे. तिच्या कडे लक्ष दे. त्या लोकांचा विचार करू नको. तू जर अजूनही तिथे आसती तर् तुला किती त्रास सहन करावा लागला असता,जे झाले ते योग्य झाले असाच विचार कर. आपल्या स्त्रियांचे कसे असते ना स्वप्नाली,आपले लग्न झाले की आपल्याला सांगितले जाते *माहेरचा उंबरठा उभ्याने ओलांडायचा आणि सासरचा उंबरठा चार खांद्यावर आडवा ओलांडायचा*. आणि आपणही याच गोष्टींची गाठ आपल्या मनाशी बांधून सासरी जातो. आणि याच कारणांनी सासरी होणारा त्रास, छळ माहेरी सांगत नाहीत. तुही तेच केले. याला कारण ही आपले रिती रिवाज, आपल्या परंपरा असतात. पण तुझे नशीब खूप चांगले आहे कारण तुला जपणारे,तुझे दुःख समजून घेणारे तुझे आई वडील तुझ्या सोबत आहेत. तुझी मुलगी तुझ्या सोबत आहे.वीरा चे बोलणें ऐकून तिच्या मनात उठणारी अनेक प्रश्नांची वादळे डोळ्यांच्या किनाऱ्यावर येवून आदळत होती.तर काही समाधानाने किनारा ओलांडत होती. त्या हळव्या जीवाची होणारी घुसमट बघून,माझ्याच काळजाचे पाणी पाणी होत होते. छोट्याशा आयुष्यात किती दुःख नशिबी आले होते स्वप्नाली च्या. आयुष्याची वाट नीट चालू ही शकली नाही आणि वाटा अश्या दुभाङ्गल्या होत्या. 

रडून थोडे तिचे मन हलके झाले होते. वीरा ने तिच्या पाठीवरून मायेने हात फिरविला आणि म्हणाली, तुला एक गोष्ट सांगते स्वप्नाली, पूर्वीचे लोक काय करायचे,जर एखाद्याच्या कुंडली मधे काही दोष असेल तर खऱ्या लग्नाच्या आधी त्याचे लग्न झाडाशी किंवा कुत्र्याशी लावून दिले जायचे.लग्नाचे सारे विधी, सोपस्कार या लग्नात सुद्धा केले जायचे म्हणजे कुंडली मधे जो काही दोष असेल तो या खोट्या लग्ना मधे यायचा. आणि दुसर्या दिवशी खरे लग्न मग मुला मुलींचे व्हायचे. हे सर्व यासाठी करायचे की त्या दोघांचा पुढे संसार सुखी व्हावा. त्यांच्या आयुष्यात कुठल्याच अडचणी येऊ नयेत ही एकच भावना त्या मागे असायची. ही एक अंधश्रद्धा आहे. जी अजूनही यू.पी, बिहार मधे बघायला मिळते. स्वप्नालीला या गोष्टीचा अर्थच कळला नाही. ती नुसतीच वीरा ला बघत होती. वीरा ला अंदाज आलाच. 

वीरा म्हणाली, बघ, तुझ्या 

कुंडलीतही असाच काहीसा दोष होता.आणि हा दोष या लग्नाने निघून गेला असे समज.वीरा हसत म्हणाली, ही गोष्ट जरी आपल्याला पटण्या सारखी नसली तरी या नंतरच्या आयुष्यात तुला आता कधीही काहीही दोष, दुःख नसणार आहे. तुझे आयुष्य खूप सुंदर असणार आहे विश्वास ठेव माझ्या वर. आता तु रडत बसू नकोस. कळते आहे का तुला. निघ यातून बाहेर एक सुंदर आयुष्य तुझी वाट बघते आहे. स्वप्नाली जर कुणाशी बोलावेसे नाही वाटत ना! हरकत नाही तु पूर्वी सारखी कविता लिही, तु तुझी रोजनिशी म्हणजे डायरी लिही. जे बोलायचे नाही ते लिहायचे. तुझ्या आयुष्यातील ते सारे प्रसंग सारे दुःख लिहीत रहा. जे तु सहन केले, भोगले. ते लिहून काढ. स्वप्नाली आश्चर्याने म्हणाली, मी....मी.....नाही लिहू शकणार. वीरा च्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास दिसत होता. हो तु लिहू शकते! मला विश्वास आहे. तु जे भोगलेस ते तूच लिहू शकते. आपल्याला ते कुणाला दाखवायचे नाही की कुणाला खरे खोटे करायला, तपासायला द्यायचे नाही. ते केवळ तु तुझ्या साठी तुझे पुरते लिहायचे आहे. तु पूर्वी कविता लिहायची ते तु पुन्हा लिहायला सुरुवात कर. कवितेतुन व्यक्त हो. बघ तुला तुझ्याच आयुष्याची नवी दिशा मिळेल. लिखाणातून आपण व्यक्त व्हायला शिकतो, आपल्या मनात चाललेला कोलाहल, विचारांची वादळे, भावनांच्या गर्दीत हरवलेले आणि निर्णय न घेऊ शकणारे मन या साऱ्यांना लिखनाणे स्थिर करता येऊ शकत. जे तुझ्या मनात असेल ते लेखनी द्वारे कागदावर उतरु दे. याने तुझे मन हलके होईल.

वीरा जे सांगत होती ते तिला कितपत समजले,कळत नव्हते. 

पण ती वीरा चे बोलणे खूप मन लावून ऐकत होती. ती आली तेव्हाचा चेहरा आणि आत्ता चा चेहरा या मधे फरक जणवला होता मला.मनावर रात्रीच्या गर्द अंधाराची चादर अच्छादुन आलेली ती,हळूहळू पहाटेच्या केशरी तांबड्या रंगाने न्हाऊन निघालेली वाटत होती. तिच्या आयुष्याची नवी सोनेरी पहाट होण्यातच आहे याचे स्पष्ट संकेत दिसत होते.

आमची आणि स्वप्नालीची या चार वर्षातली ती पहिली आणि शेवटची भेट होती. आज चार वर्षा नंतर इथे बडोद्याला अचनाक ती समोर आली. प्रसन्न मुखाने. गोड हसू चेहऱ्यावर खेळवत. बदोद्याच्या अ.भा.साहित्य संमेलनामधे आज ती निमंत्रित कवियित्री म्हणून आली होती त्याच बरोबर आज इथे तिची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित होणार होती.

माझ्या डोळ्यां देखत दुःखाला कवटाळून बसलेली एक अबोल सर्व साधारण मुलगी आज एक उत्तम कवयित्री आणि लेखिका म्हणून तिने नावलौकिक मिळवले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy