Manda Khandare

Classics

4  

Manda Khandare

Classics

माझं आईपण

माझं आईपण

4 mins
333


*स्वामी तिन्ही जगाचा आई विणा भिकारी* ही कवि यशवंत यांची कविता ऐकतच मोठे होत गेलो आणि तशी त्याची प्रचीती ही येत गेली. आई च्या पंखा खाली असतांना दुःख,गरिबी याची झळ कधी लागलीच नाही. सत्तरीच्या दशकात बाबा दोन कंपन्यांचे मालक होते. त्यामुळे शाळा, कॉलेजात ने आण करायला सुद्धा चार चाकी होती. पण बाबांचे एक ठरलेले होते, मुलींचे लग्न सरकारी नोकरी करीत असलेल्या मुलाशीच करायचे. म्हणून जेव्हा *यांचे* स्थळ आले. आणि मुलगा क्लास वन ऑफिसर आहे म्हंटल्यावर बाबांनी लगेच होकर कळवला. सासर विदर्भात होते यांची नोकरी मात्र कलकत्त्याला होती. जशी आपल्या कडे पद्धत आहे की लग्न झाले की लगेच सासरी गोड बातमीची वाट बघातात. .....तसेच आमच्या घरी सुद्धा गोड बातमी लवकर मिळावी म्हणून डोहाळे लागले होते. पण सर्व सुखासुखी चालेल तर ते अायुष्य काय ना!? सर्वच ऋतू हे श्रावणाचे, वसंताचे,हर्षउल्हासाचे नसतात, ग्रिष्माचे दाहक चटके हे सोसावेच लागतात. लग्नाला दोन वर्ष झालीत तरी काही गोड बातमी नाही म्हंटल्यावर सासरी आणि नातेवाईकांमधे कुजबुज सुरू झाली होती. त्याच वेळी तिन वर्षा साठी ऑफिस कडून आम्ही अकोल्याला आलो होतो. दुर होतो तर शब्द कानी पडत नसत. पण अकोल्याला आल्यावर सारखे शब्दांचे बाण इकडू तिकडून टोचायचे. ज्याचे आपल्याशी काही देणे घेणे ही नसते ते ही त्यावेळी बोलून जातात......डाॅक्टर कडे गेलो....सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. ते म्हणाले होतो कुणा कुणाला उशीर...... पण किती?.....याचे उत्तर त्यांच्या कडे ही नव्हते. कुणाला काय सांगावे मोठा प्रश्न होता आमच्या साठी. प्रत्येकाच्या नजरेत मला एकच प्रश्न दिसायचा.....मोठ्या भावाचे लग्न झाले. लहान दिरा चे लग्न झाले. त्यांच्या घरात ही पाळणे हलायला लागले होते. माझ्याच नशिबी हे सुख का नाही, मी खूप रडायचे. कुणी नवीन डाॅक्टर सांगितले, महिना भर (ovulation study) सोनोग्राफी साठी जावे लागायचे. भयंकर मानसीक त्रास सहन करावा लागला. त्यात पैसे ख़र्च होत आहे म्हणून सासूबाई चे टोंबणे ते वेगळेच.....अशातही मी माझे graduation पूर्ण करत होते...... कुणी आयुर्वेदिक ऊपाय सांगीतला होता कसल्या पुड्या होत्या ज्या केवळ गाई च्या दुधात घ्याव्या लागायच्या. आणि आठ दिवस फक्त साबूदाण्याची खीर खायची होती. बाकी काहीच चालायाचे नाही, जेवण नाही कुठलेच फळ पण नाही. दोन तिन दिवस काही नाही वाटले ते खायला पण नंतर तेच तेच खावून शेवटी भूक ही मरून जायची. लोकांचे टोचुन बोलणे ऐकल्या पेक्षा ते बरे...... म्हणून ते ही आठ दिवस खाणे सहन केले. सासूबाईंच्या वहिणी यांच्या मामी कुणा कडे बोलून गेल्या. कि तळ हातावर केस उगवू शकतो पण तिला मुल होऊ शकणार नाही. श्रिमांताची मुलगी केली ना तुम्ही भोगा आता.....हे वाक्य ऐकले आणि जगण्याची उमेदच संपली वाटले. ती रात्र म्हणजे मनात जगण्या मरण्याच्या  विचारांचे एक युद्ध सुरू होते. त्या नंतर कुणा कडे जाणे येणे मी बंद केले. माहेरात असून आई कडे सुद्धा जाणे टाळायला लागले मी. आमच्या लग्नाच्या तिसऱ्या वाढदिवसानिमित्त सासूबाई आल्या आणि दबक्या आवाजात यांना दूसरे लग्न कर म्हणून गळ घालू लागल्या. ते ऐकून पाया खालची जमीन सरकने म्हणजे खरे काय असते हे त्या दिवशी कळले मला. मी पूर्णपणे खचून गेले होते. पण *हे* होते सोबतीला. यांनी सावरले मला. या बाबतीत मात्र माझे नशिब चांगले आहे.

        सगळी कडून निराशाच पदरी पडत होती. आशेची किरण कुठेच दिसत नव्हती. पण असे म्हणतात ना, की जेव्हा जास्त अंधार होतो तेव्हा समजायचे पहाट होण्यातच आहे. सगळी कडून हरले होते मी. आणि आत्मविश्वासाने हरलेली व्यक्ति श्रद्धा -अंधश्रद्धा यात फ़रक नाही करू शकत. एक दिवस लहान दिराचा फोन आला (तेव्हा लैंडलाइन फोन होते. मोबाइल् केवळ काही श्रीमंत लोकांकडेच असायचे) आणि त्यांनी व जाऊ बाईने मला श्री वैभवलक्ष्मी चे व्रत, उपवास करायला सांगितले. त्या दोघांची खूप श्रद्धा होती. माझा विश्वास तर तसा नव्हता. पण त्यांच्या विश्वासावर विश्वास ठेवून,त्यांनी सांगितले तसे केले. हळूहळू माझ्या मनातही श्रद्धा जागी होत गेली. या वेळी गोळ्या,औषध दवाखान्याच्या वाऱ्या सर्वच बंद केलेले होते. हताशा झालेले मन केवळ श्रद्धेवर जगत होते. यांनी तर मान्य केले होते की आपल्या घराचे गोकुल कधी होणारच नाही. आणि मला ही म्हणायचे आता अाशा करू नको, उगाच अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नको..... कदाचित त्या भगवंताला माझ्या श्रद्धेची, माझ्या सहनशीलतेची परीक्षाच बघायची असेल. आणि त्या परीक्षेत मी पास झाल्याची पावती म्हणून की काय दहाव्या शुक्रवारी मी पूजा मांडत असतांनाच यांनी माझा प्रेग्नेंसी चा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे म्हणून आनंदाने उड्या मारतच *तू आई होणार आहेस* सांगितले. मी धावत जाऊन देवी पुढे हात जोडले. इतक्या दिवासांची मनात दाटलेली घुसमात घळाघळा अश्रुंवाटे बाहेर पडली. मागे वळून बघितले तर यांच्या ही डोळ्यात पाणी होते आणि हात जोडलेले होते.........काय म्हणावे याला? *देवाची कृपा, *दैवी चमत्कार, की डाॅक्टर म्हणाले होते तसे कि *कुणा कुणाला होतो उशीर*.......


Rate this content
Log in

Similar marathi story from Classics