असे असावे नाते अपुले
असे असावे नाते अपुले


कालपासून मन खूप उदास होते. खूप बैचेन वाटतं होत. खूप दिवसापासून माझ्या मैत्रिणीला भेटायची इच्छा झाली. म्हणून काल तिला फोन केला व तिला भेटायला गेले. नुकतेच २ महिने झाले होते तिच्या लग्नाला. घरात सासू, सासरे, नणंद, दिर असे तिचे एकत्र कुटुंब होते. तिच्याकडे तिच्या नणंदेला बघायला मुलगा येणार हे जर मला माहित असते तर मी तिच्याकडे गेलेच नसते. तिच्याकडून आल्यानंतर माझं खूप डोकं दुखायला लागला. किती विचित्र माणसं असतात ना. एक प्रकारे हे बरच झाला मी तिच्याकडे गेली तिला माझी खुप मदत झाली.
दुपारी ५ वाजता मुलाकडची मंडळी आली. मुलगा, आई वडील, मावशी, आत्या असे सगळे होते. मानिषाने सगळ्यांना पाणी दिले. मग मनिषाची नणंद अलका पोहे घेऊन आली. सगळ्यांना अलका पसंद आली. मुलाकडच्या लोकांनी होकार दिला.
मग मुलाची आई बोलायला लागली. मुलगी गृहकृत्यदक्ष आहे का? तिला काय काय येत? सगळं स्वयंपाक येतो का? सगळ विचारून झाल्यावर मेन मुद्द्यावर त्या आल्या. मुलाच्या शिक्षणात आमचा पैसा खूप खर्च झाला. त्याला उच्च शिक्षण दिले त्याला परदेशात पाठवले. आम्हाला हुंडा हवा. मनिषाकडचे लोक येवढे श्रीमंत नव्हते. त्यामुळे अल्कानीच लग्नाला नकार दिला. ती बोलली की तुम्ही विकत घ्यायला आल्या का? माझा नकार आहे. हे सगळ बघून माझं मन एकदम सुन्न झालं.
साधारणतः मुलाच्या अपेक्षा असतात बायको नोकरी करणारी असावी, स्मार्ट असावी, तसेच ती चारचौघात उठून दिसावी. अशी साधारण सगळ्यांची अपेक्षा असते. पण समोरचा हा का नाही विचार करत की तिही आपल्यासारखीच एक माणूस आहे. तीच्यापण मुलाबद्दल काही अपेक्षा असू शकतात.
हा विचार करत होती तेवढ्यात शेजारच्या साठे काकू विरजण मागायला आल्या. त्यांना माझ्या चेहऱ्यावर काळजी दिसली. काय झालं ग. तुझी तब्येत ठीक आहे ना. तुला काही मदत हवी का? सांग काय झालं. मी घडलेला पूर्ण किस्सा त्यांना सांगितला.
त्या बोलल्या माझ्या मुलाचं लग्न होऊन आज जवळपास १० वर्ष झाली. पण आमच्या घरात आतापर्यंत कोणताच वाद झाला नाही. मी व माझी सून आम्ही दोघी मैत्रिणी सारखा राहतो. कधीच आमच्यात भांडण झालं नाही. आम्ही सगळे खूप एकमेकांशी एकरूप आहोत.
मला हे एकून खूप आश्चर्य वाटलें बोलली तरीच मला कधी त
ुमच्या घरात कधी वाद झाले हे आठवत नाही.
साठे काकू बोलली की मी तुला एक कानमंत्र देते तो मंत्र तू अमलात आणल्यास तुला त्याचा नक्की फायदा होईल
जेव्हा माझ्या मुलाचं लग्न करायचे ठरवले तेव्हा मी माझ्या मुलाला सांगितले बघ,
तू ज्या मुलीशी लग्न करशील तीच वास्तव तू लक्षात घ्यायला हवं.
कदाचित ती पण तुझ्या इतकी शिकलेली असेल आणि तुझ्या इतका तिचा पण पगार असेल.
तिचे पण काही स्वप्न असतील. तिच्याही काही आवडी असतील. तिच्या घरी ती शिकत असल्या मुळे तिने कधी किचन मध्ये पाय ठेवला नसेल, कदाचित तुझ्यासारख किंवा तुझ्या वहिनी सारखं तिनेही तुझ्या प्रमाणे वयाची २० -२५ वर्ष आई, बाबा, बहीण, भाऊ ह्यांच्या सानिध्यात घालवली असेल. हे सगळं मागे सोडून तिला नवीन घरात एडजस्ट व्ह्यायला वेळ हा लागणारच ना. तुला वाटतं असेल की तिने पहिल्याच दिवशी मास्टर शेफप्रमाणे स्वयंपाक करावा, सकाळी उठून चहाचा कप हातात द्यावा आणि रात्रीचं जेवणही तिनेच करावं. तुझ्यासारख्या तिलाही ऑफिसचे काम असतील, तिलाही उशीर होईल. तिलाही कंटाळा येईल, तिने कधी तक्रार करू नये असे तुम्ही म्हणाल.
मी त्याला सांगितलं की मी तुला जी वागणूक दिली तशीच तिला पण देईल. तू जेवढा माझा जवळचा तशी ती पण जवळची असेल म्हणून आपली मदत सगळ्यात महत्त्वाचं अण्डरस्टॅण्डिंग आणि प्रेम मिळावं अशीच आपली माफक अपेक्षा असावी.
एवढ काकूंचा बोलणं ऐकून मी एकदम स्तब्ध झाले. वा काकू तुमच्यासारखा सगळ्यांनी आपल्या घरात हे नातं निर्माण केलं तर प्रत्येक घर किती सुखी होईल कुणाच्या घरात सुनेचा अवाजवी छळ होणार नाही.
काकू शेवटी बोलल्या घरात येणारी प्रत्येक मुलगी स्वतःकडून पूर्ण प्रयत्न करून ती हे नातं सुंदर करेल तर घरातल्या प्रत्येक व्यक्तीने मदत केली आणि विश्वास ठेवला तर हे नातं आयुष्यात सर्वाधिक उच्चतम अस शिखर गाठेल.
काकू गेल्या पण तेवढ्या वेळात त्या बरेच काही सांगुन गेल्या तेव्हापासून आमच्या घरात एकही वाद आतापर्यंत झाला नाही.
आज मला ही कथा म्हणा लेख म्हणा लिहिण्याचा एकच कटाक्ष होता की प्रत्येक घरात प्रत्येकाने समजूतदारपणे नाते जोपासायला हवे असे मला वाटत. एकमेकाशी संवाद साधून अपापसतले वाद मिटवायला हवे.