Pallavi Udhoji

Inspirational

3  

Pallavi Udhoji

Inspirational

परोपकार

परोपकार

7 mins
665


मनुष्याने नेहमी संवेदनशील रहावे. परोपकारी असले पाहिजे. इतरांना मदत करण्याची प्रवृत्ती जोपासली पाहिजे. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, इतरांसाठी जे जगतात ते खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद घेतात. ज्यांच्याकडे धीरोदात्तपना आहे, संयम आहे, आत्मविश्वास आहे, परिश्रम करण्याची तयारी आहे त्याला कुठलीही अडचण रोखू शकत नाही.


राहुल असच एक अनाथ म्हणून वाढलेला मुलगा. फुटपाथवर राहून तो दिवस काढत होता. लहानपणापासूनच त्याच्या अंगी समंजसपणा , दुसऱ्यांना मदत करणे, परोपकार करणे हे सर्व गुण ओतप्रोत भरले होते. लहानपणापासून खूप हलाखीचे जीवन त्यांनी व्यतीत केले होते. पण अभ्यासात खूप हुशार होता. सकाळी पेपर वाटणे, घरोघरी पाणी भरणे, लोकांच्या गाड्या पुसणे जे पैसे त्याला मिळत होते त्यात तो आपले शिक्षण आणि पोट भारत असे. हे काम करता करता मिलिंद साठे नावाच्या माणसाशी त्याची ओळख झाली. राहुल त्यांच्या घरी पेपर देत असे व त्यांची गाडी पण पुसत असे. राहुलची मेहनत बघून मिलिंद साठेनी त्याला आपल्याजवळ ठेवले. सुरवातीला तो नाही म्हणाला त्याचा स्वाभिमान आडवा आला. ती एका अटीवर कबुल झाला. मी मोठा झाल्यावर तुम्ही जो काही खर्च कराल तो मी पूर्ण स्वतःच्या कमाईतून फेडेल.


साठे तयार झाले. तेव्हापासून राहुल त्यांच्याकडे राहू लागला. त्याची हुशारी बघून साठे नी त्याला चांगल्या शाळेत घातले.त्याची हुशारी, मेहनत ह्याच्या जोरावर तो प्रत्येक वर्गात पहिला येवू लागला. पण त्याला त्याच्या हुशारीचा कधी गर्व नाही आला. त्याच्या डोक्यात एकाच गोष्ट साठेच ऋण त्याला फेडायच होता. कॉलेज मध्ये पण प्रत्येक परीक्षेत ती अव्वल आला. त्याला इंजिनिअर ची पदवी मिळाला. पदवी समारंभ होता. त्यादिवशी पदग्रहण समारंभ होता. साठे आणि राहुल हॉल मध्ये पोचले. खूप लोक जमा झाले होते. उच्चशिक्षित विद्यार्थी, प्रोफेसर जमले होते. राहुलचं नाव घेतलं साठेचा कंठ दाटून आला. पोरांनी आपल्या मेहनितीने कमावलं. राहुल स्टेजवर गेला आणि पदवी व मेडल घेतल. तिथे त्या साहेबाची मुलगी इशा तिथे बसली होती. राहुलची हुशार, त्याचा देखणेपणा तिच्या मनात भरला ती एकटक त्याच्याकडे बघत बसली. समारंभ झाला. राहुल आणि साठे घरी आले. इकडे ईशाची स्थिती बिकट होती. ती फक्त राहुलचा विचार करत होती. तिने त्याचा नंबर मिळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण तिला नंबर नाही मिळाला. तिने तिच्या बाबांना विचारले तर ते म्हणाला माझ्याजवळ त्याचा नंबर नाही पण मी पत्ता शोधून तुला सांगतो. असे बोलून ते कॉलेजला निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्ता शोधून काढला. ईशा त्या पत्त्यावर गेली पण राहुल घरी नव्हता. ती रोज चकरा मारत होती. पण एक दिवस तिला राहुल भेटतो.राहुल तिला ओळखतो. राहुलला पण ती खूप आवडते. हळू हळू त्यांच्या भेटी वाढतात मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाल आणि दोघांनी लाग करायचं ठरवलं. साठेंचा लग्नाला होकार होता पण इशाचे बाबा तयार नव्हते कारण राहुल अनाथ होता. पण मुलीपुढे बापाचे काय चालते म्हणून ते लग्नाला तयार झाले. पण राहुलने अट घातली. जोपर्यंत ६ महिन्यात माझा घर होत नाही तोपर्यंत तुला आपल्या बाबांकडे रहावे लागेल. ईशा तयार झाली. राहुल खूप स्वाभिमानी होता. दोघांचे लग्न झाले. ईशा आपल्या बाबाकडे राहते. राहुल खूप मेहनत करू लागला. तो ओव्हरटाईम करून जास्त पैसे कमावू लागला. त्याचे काम बघून मनागरने त्याला पगारात वाढ करून दिली. आणि त्यांनी एक २ रूमचा फ्लॅट विकत घेतला. रीतसर वास्तू करून अं ईशाला घेऊन तिथे राहायला गेला. त्याने शपथ घेतली की मी माझ्या कमाईतून साठेनी माझ्यासाठी जो काही खर्च केला तो पैसा मी लवकरात लवकर फेडेन. तेव्हाच मी त्यांच्या ऋणातून मुक्त होईल.


नवीन घरात आल्यावर सुरवातीच्या दिवस त्यांचे खूप मजेत गेले. ईशाला कामाची सवय नसल्यामुळे तिला खूप त्रास होत होता. पण राहुलच्या प्रेमासाठी ती हे सगळ सहन करायला तयार झाली. वडिलांकडून तिला कधीही काम नव्हतं करावं लागत. हाताखाली नोकर चाकर होते. पण इकडे तिने कोणत्याच कामाला बाई नाही लावली तेवढाच आपला पैसा वाचेल.


पुढचं आयुष्य चांगलं घालवण्यासाठी व साठेचे पैसे परत करण्यासाठी राहुलने खूप मेहनत करायला सर्वात केली. ओव्हरटाईम केल्यामुळे त्याला घरी यायला खूप उशीर होत होता. ईशा रोज त्याची वत पाहायची. आधी तिला काहीच वाटत नव्हते ॉ. अशीच एक दिवस वाट बघत होती तिला खूप भूक लागली तेवढ्यात गाडीचा आवाज आला तिने खिडकीतून बघतीले राहुल आला होतं. तिने त्याला पाणी दिले व मी जेवायला वाढते. राहुलने विचारले की तू जेवली नाही का? नाही असं उत्तर दिलं तिने. राहुल बोलला की तू माझी वाट नको बघत जाऊ. तू जेऊन घेत जा. दोघांनी जेवण केलं. रूम मध्ये आले बेडवर पडल्या पडल्या राहुल झोपून गेला. असं रोजच व्हायला लागलं. ईशाला ह्या गोष्टीचा खूप कंटाळा येऊ लागला. ती खूप त्रासून गेली. तिला वाटले, काय आयुष्य आहे आपला, ना प्रेम ना सुख सकाळी उठून सगळे काम करा. फक्त काम अने काम. त्या रात्री राहुल घरी आला ईशा वाट बघत होती तिने आज ठरवलं इस पार या उस पार. रहुळशी खूप वाद घातला त्याला नाही नाही ते बोलली. राहुलने सगळ चुपचाप एकूण घेतला. तो शांतपणे तिला बोलला, ईशा मिलाहांपणापासून खूप गरिबीत दिवस काढले, त्यामुळे मला आज पैसा कमवायचा आहे साठे काकांनी जर मला आधार दिला नसता तर आज जो काही मी आहे ती नसतो.. मी जे काही मिळवले ती मिळाले नसते. मला त्यांचे ऋण फेडायचे आहे. मी तुला आधीच सांगितले होते. तुला जर तुझे स्वातंत्र्य हवे असेल तर तू तुझा आयुष्य जगू शकते. माझ्याकडून तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. ईशाला खूप वाईट वाटले. तिला त्या रात्री झोप नाही लागली.


दुसऱ्या दिवशी राहुल नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला. जेव्हा ऑफिस मधून आला तेव्हा दाराला कुलूप होते. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या चाबिने कुलूप उघडले. आतमध्ये सगळं व्यवस्थित होता. ईशा आपली सुटकेस घेऊन गेली. पलंगावर एक चिठ्ठी लिहून ठेवली. राहुल, मला आता हे जगणं मुश्किल झालं आहे. मी डिव्होर्स पेपर्स पाठवून देईल त्यावर सह्या करून पाठवशिल. राहुलला खूप वाईट वाटले. त्यादिवशी तो रात्रभर रडला. त्याने डिव्होर्स पेपर्स वापस केले आणि एक चिठ्ठी पाठवली. ईशा, हे डिव्होर्स पेपरचे चार कागदपत्रे आपले संबंध तोडू नाही शकत. माझे तुला कुठलेही बंधन नाही. तू दुसरे लग्न करू शकते. पण जेव्हा अशी वेळ येईल तुला माझ्याकडे यावेसे वाटले तर माझे दार तुझ्यासाठी कायम उघडे आहे. मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.


ती चिठ्ठी वाचतच ईशाला खूप रडू येतं. हळूहळू ती राहुलला विसरायला लागते. वडिलांकडे ती खूप आनंदात राहते. रोज शॉपिंग, पार्ट्या, क्लब मध्ये जाणे. असच एक दिवस ती क्लवला जाते तिथे तिची ओळख प्रतीक नावाच्या मुळाशी होते दिसायला खूप रुबाबदार, गोरा गोरा पान, उंच पिळदार मिशा त्याचाकडे बघून इशवमोहित होते. ईशा पण काही कमी सुंदर नसते. प्रतिक पण इशाकडे बघून आकर्षित होतो. दोघंही बोलतात. हळू हळू भेटी वाढू लागतात, मैत्री होते मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात होता. तो पण घरचा खूप श्रीमंत असतो. दोघंही लग्न करायचं निर्णय घेतात. ईशा आपल्या बाबांना सांगते. ते पण तयार होतात. पण आपला आधी लग्न झालं ते इशा त्याला नाही सांगत. हेच गुढ एक दिवस त्यांचा घात करणार ही विदितच होता.


दोघंही लग्न करतात. सुरुवातीचे दिवस एकदम स्वर्गासारखे जातात. पण हळू हळू काही महिन्यांनी तिला त्याचे ढंग दिसू लागतात. रोज दारू पिऊन घरी यायचा. नशेत तो तिला खूप मारायचा. तिला ते सहन नव्हत होत. पण ती काही करू शकत नव्हती. इकडे तिच्या बाबांची तब्येत खराब होत होती. त्यांच्या तबेयतीमुळे ती त्यांना काहीच सांगत नव्हती. लपून लपून ती बाबाला भेटायला जायचो.


दिवसेंदिवस त्याचा खूप त्रास वाढू लागला तो तिला चाबकाने मारू लागला. अशातच तिला दिवस गेले. एक दिवस तो घरी आला ही आपल्या खोलीत दार बंद करून बसली रडून रडून तिचे डोके लाल झाले. प्रतिक आला आणि नशेत खूप भांडू लागला. ईशा बोलली मी काय केला की तू मला असा मार देतोस. जणू काही प्रतिकला माहीत झाले होते की तिचे आधी लग्न झाले म्हणून. तू मला सांगितलं का नाहीस आधी तुझे लग्न झाले म्हणून. त्याला तर संधीच मिळाली. त्या दिवशी खूप मार मार मारले ती बोलली की मी प्रेग्नंट आहे मला मारू नको. पण त्याने काही एकले नाही बोलला को हे पाप कोणाचे आहे. मारत असताना त्याचा अचानक तोल जातो आणि तो खाली पडतो. आणि पडल्यावर लगेच त्याला झोप लागते. ईशा ही संधी बघून लगेच आपली बॅग पॅक करते आणि तिथून निघते. रात्रीची वेळ असते रस्त्यावर कोणीही नसत. कसातरी तीलावेक ऑटो दिसतो. ती त्याला थांबवते. औटोत ती बसते. खूप रडायला येत तिला. रात्र असल्यामुळे रस्त्यावर कोणीच नसता. तेवढ्यात त्या ऑटोवल्याची वासना जागृत होते. तो ऑटो थांबावतो. ती बोलते मध्येच कशाला थांबवलं. त्याने मागे वळून तिच्याकडे वासनेच्या नजरेने तिला बघतो. ईशा खूप घाबरते. ती तिच्यावर जबरदस्ती करायला लागतो. तेवढ्या राहुलला ईशा ओरडताना दिसते. तो गाडी थांबवतो व त्याला खूप चोप देऊन पोलिसांच्या हवाली करतो. ईशा बेशुद्ध होते तो ईशाला घेऊन घरी येतो. डॉक्टरला बोलवतो. डॉक्टर चेक करतात. घबरल्यामुळे ईशा बेशुद्ध झाली असं सांगतात. औषध देऊन डॉक्टर निघून जातात. ईशाला जग येते तर राहुल तिला समोर दिसतो. ती त्याच्या मिठीत खूप रडते. आणि झालेला सगळं प्रकार त्याला सांगते.


राहुल बोलतो की मी तुला बोलले होते की डिव्होर्स चे चार पेपर्स आपला प्रेम तोडू शकत नाही. आणि आपल्याला वेगळं करू शकत नाही. त्या दिवशी राहुलचे इंक्रीमेंट होता तो खूप मोठी पोस्ट मिळते. तो खूप खुश होतो. आज पोस्ट सोबतच त्याला त्याचे प्रेम पण मिळते. दुसऱ्या दिवशी तो व ईशा साथेचा चेक द्यायला साठेकडे जातात. साठे त्या दिवशी खूप आजारी पडतात. बहुतेक राहुलला पाहण्यासाठी त्यांनी आपला श्वास रोखला असावा. राहुलला बघताच त्यांच्या डोळ्यातून पाणी येत. राहुल त्यांच्याजवळ जातो आणि बोलतो मी तुम्हाला कबुल केल्याप्रमाणे तुमचा मोठ्या अमाऊंटचा चेक मी घेऊन आलो. तो चेक त्यांच्या हातात ठेवला व म्हणाला मी आता तुमच्या ऋणातून मुक्त झालो. येवढं बोलताच साठेनी आपले डोळे मिटले.


ह्या कथेवरून एक सांगायचे, परिस्थिती गरिबीची असली म्हणून खचून जायचे नाही आणि चांगले दिवस येताच जमिनीवरचे पाय उचलायचे नाही. हेच आज राहुलने जगाला दाखवून दिले होते. साठे काकाचे ऋण आपल्या मेहानितीने, चिकाटीने त्याने फेडले होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational