Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Pallavi Udhoji

Tragedy


3  

Pallavi Udhoji

Tragedy


मन नसलेली माणसे

मन नसलेली माणसे

3 mins 287 3 mins 287

दरवाजाचा किर्र...किर्र. आवाज आला आणि माझ्या वयाच्या तिप्पट असलेला तो आत आला. ती रात्र मधुचंद्राची होती. जसं सिनेमात दाखवतात तसा बेड सजला नव्हता, ना दुधाचा ग्लास टेबलवर होता. बेडवर प्रिया भीतीपोटी थरथर कापत होती. विचारांच्या चक्रात ती अडकून गेली होती. प्रसंग आपल्यासोबत घडतात पण त्या प्रसंगाचा आपण एक छोटासा भाग असतो. त्याचं नाव सुधाकर. लग्नाच्या दोन बायका गेल्यानंतर त्यांनी मला विकत घेऊन लग्न केलं. माझा शरीर फक्त तिथे होते मी मात्र माझ्यात नव्हते. प्रियाच्या मनात विचारांनी कल्लोळ माजतो. आपल आयुष्य एका क्षणी इतकं बदलाव की, आपली परवानगी न घेता लग्न करून टाकावं. मग ह्याच आपल्या आयुष्याला मी आपले मानावे का?


ती निपचित खाली मान घालून साडीच्या पदरचे टोक आपल्या बोटाभोवती गुंडाळत होती. आपल्याच विचारात खोल बुडालेली. नवरा पेऊन तर्र बिछान्यावर आडवातिडवा पडलेला. ती आपल्याच विचारात बुडालेली होती. तिच्या मनात विचार येत होते, गरिबाला अधिकार नको द्यायला मुलं जन्माला घालण्याचा. गरिबाच्या फक्त एकच गोष्टीसाठी उपयोग होतो तो फक्त आकडा वाढण्यासाठी. ह्या गरिबीमुळे ह्या वयस्कर माणसाशी आईने माझे लग्न लाऊन दिले. रात्र ओसरत चालली होती. का असतात अशी माणसं. त्यांना मन अस असता का. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते उशीवर पडत होते आणि उशी ओली होऊन कोरडी होत होती.

अचानक तिला राहुलची आठवण मनात वीज चमकल्यासारखी येते. का येते मला त्याची आठवण. भूतकाळ होता ना तो? ती बाहेर येते. वाऱ्याच्या मंद झुळकेने सगळे लक्ष तिला भूतकाळकडे ओढून नेते. लहानपणी शाळेतल्या मित्राची ओळख कशी प्रेमात बदलते हे त्या दोघांनाही समजत नाही. त्याचं प्रेम फुलत जातं, जेव्हा पहिल्यांदा राहुल तिच्या कानात सांगतो, तू मला खूप आवडते. ती क्षण, तू हुरहूर, ती भीती, छातीचे ठोके, वाढलेले श्वास. सगळ तिला आठवायला लागतं. राहुलच्या घरचे लग्नाला तयार नव्हते. कारण प्रिय गरीब घरातली होती. गरीब असणं हे पाप असता का? गरिबाला इज्जत नसते का?


तिरडीवर झोपलेल्या शवाच्या मागे जितकी गर्दी असते ना, तितकीच इज्जत त्या गरिबीची असते. मन नसलेल्या ह्या गरीब माणसाच्या इच्छेचा खून होतो, ह्या खूनांना शिक्षा नसते का? असे नानाविध प्रश्न तिच्या मनात पिंगा घालत होते. तिकडे राहुलची स्थिती अशीच काही होती. त्यांच्या प्रेमाचा गळा आवळला जात होता. राहुलच्या मनात विचारांच्या लाटा उसळत होत्या. पण त्यात वाहून जाता येत नव्हतं. त्यांनी घरच्या लोकांना खूप समजावले. पण सगळ व्यर्थ होत. त्याच्या मनात एकाच विचार आला, ह्या व्यवहारी आयुष्यात प्रेम, मन, भावना यांना काही किंमत नसते. एक टपोरा थेंब डोळ्यातून त्याच्या हातावर पडतो. आपण तिला आयुष्यभर साथ देईल अस वचन दिलं होतं. हे काय होऊन बसलं.


इकडे प्रिया आपल्या विचारात गढून गेली, कधी तिचा डोळा लागला तिला कळलंच नाही. जाग आली तेव्हा तो बेडवर नव्हता त्यांनी कधीच पोबारा केला होता. आयुष्य हे कधीच थांबत नाही ते वाहत राहतं, आयुष्यात आलेल्या क्षणांना थोडंसं थांबवून विसावा घेऊन पुन्हा पुढे जायचं असतं, ते पुढच्या क्षणाला भेटण्यासाठी. मन नसलेली माणसं आपल्या सहवासात आल्यावर आपलं आयुष्या हे निरर्थक ठरत. असा कित्येक कथा आजवर घडल्या असतील हे प्रियाची कथा आज संपली नव्हे ती संपवल्या गेली.


आयुष्याचे कित्येक पूर्णविराम हे आपल्या हातात नसतात. माणसाचे नशीब विसावा न घेता, न सांगता, न बोलता नकळत आयुष्याचा ह्या स्थितीत आणून सोडतात. शेवटी आपल्या आयुष्य हे आपले नसत ते आपण दुसऱ्यांच्या हवाली करून कधीच मोकळे झालेलो असतो. प्रियाचे आयुष्य हे एक दुसऱ्यावर सोपवले एक निरर्थक आयुष्य असतं. तो अधिकार तिने कधीच गमावला होता दुसऱ्यांच्या हाती देऊन.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Tragedy