Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

बंदिस्त देऊळ

बंदिस्त देऊळ

3 mins
330


नेहाची घरची परिस्थिती बेताची. लहानपणी सुख असं काहीच नव्हत. मिलिंद तिचा नवरा चांगल्या कंपनीत होता. घरदार लोक चांगली होती, पण जे दिसतं तसं नसतं. लग्नानंतर काही दिवस खूप आनंदात गेले. तिनेपण सगळ्यांवर प्रेम केले. नणंदा दोघी, लग्न झालेल्या त्याचं गावात होत्या. हळूहळू तिचा संसार फुलत होता. तिच्या सुखी संसारात आनंदाची गोष्ट घडली. तिला दिवस गेले. घरात आनंदाचे वातावरण होते. सासूला वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा होता. आणि तिच्या नवऱ्यालापण मुलगाच हवा होता.    नेहाच्या मनात भीतीचे काहूर माजले. जर मला मुलगी झाली तर काय होईल? तिच्या मनात आले, "अरे, हे काय आपल्या हातात असतं का. वंशाला दिवा हवा अर्थात पणती ही सुद्धा आपलाच वंश असते ना. हे समजायला ह्या माणसांना किती शतके लागती कुणास ठाऊक".

   

नेहाचे दिवस भरत आले. जसजशी ती वेळ येत होती तसतसा तिचा जीव टांगणीला लागतं होता. दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या पोटात दुखु लागले, तिने आईना सांगितले, आईनी पटापट काम उरकली पूजा केली भाजी पोळी करून तिला दवाखान्यात घेऊन गेली. नेहाला खूप कळा सुरू झाल्या. तिला आतमध्ये नेले. आणि थोड्या वेळातच जे व्ह्यायचे नव्हते तेच झाले तिला एक गोंडस मुलगी झाली. झालं, आई व तिचा नवरा खूप वैतागला. आणि तिला त्या स्थितीत सोडून दोघंही तरातरा तिथून निघून गेले. नेहाला खूप वाईट वाटलं. नेहाला काय करावे काही सुचेना. तिने नर्सला आवाज दिला. नेहा बोलली, "मला तुमचा फोन देता का मला एक फोन करायचा आहे. " तिने फोन दिला. नेहानी आपल्या आईला फोन लावला,

 "हॅलो आई, मी नेहा बोलते", 

आई, "बोल, बाळा"

नेहा तिला घडलेला प्रकार सांगते

"आई, तू येते का माझ्याजवळ कोणीच नाही. "

आई, "बाळा, मी मजबूर आहे ग, तुझे बाबा गेल्यापासून माझे खूप हाल होत आहे. तुझ्याकडे यायला माझ्याजवळ पैसे नाही ग, मला समजून घे. स्वामीवर श्रद्धा ठेव तेच मार्ग दाखवतील" येवढं बोलून आई फोन ठेवते.

नेहा खूप रडते. तिला कदाचित ह्या गोष्टीची कल्पना होती. म्हणून तिने साठवलेले पैसे आणि स्वामींचा फोटो ती सोबत घेऊन येते.


   आता प्रश्न हा होता की ह्या स्थिती आता कुठे जायचे. पदरी छोट बाळ. रात्री स्वामींचा धावा करते. "मला ह्यातून तुम्हीच वाचवू शकता". आणि रडता रडता तिला झोप लागते. रात्री तिला जाग येते पाहते तर काय एक बाई तिच्या जवळ बसली असते. हिरव लुगड, कपाळी मोठे कुंकू. ती बोलते, " बाळा, तुझी झोप झाली का? कदाचित तू मला ओळखलं नाही. काल तुझ्या आईचा फोन आला. मी तुझ्या आईची मानलेली बहीण रखमा. तिने मला सगळं सांगितलं. तशीच तडक निघून आली. आता तू काळजी नको करू. इथे माझं एक दोन रुमच घर आहे. आपण तिथे राहू". 


   दुसऱ्या दिवशी नेहा दवाखान्याचे बिल भरून दोघीही तिथून निघतात व रखामाकडे येतात. रखमा तिचे पालनपोषण करते महिन्या दोन महिन्यांनी रखा आपल्या गावी जायला निघते. प्रिय तीची ओठी भरते. जातांना रखमा तिला भरभरून आशीर्वाद देते. आपल्या मुलीचे रिया नाव ठेवते. हळूहळू रिया मोठी होऊ लागते. नेहाला चांगल्या कंपनीत नोकरी लागते. रियाला शिकवून एक नामी वकील बनवते. 

  

एकदा नेहाला तिच्या आईचा फोन येतो."नेहा, कशी आहेस मला माफ कर. मी येऊ नाही शकली ". 

नेहा म्हणते, "आई, असे काय करते तूच पाठवलं ना रखमामावशीला माझं करायला. तिने माझा व्यवस्थित सांभाळ केला". आईला खूप आश्चर्य वाटत ती म्हणत "मी कोणालाच पाठवले नाही. मी तर ह्या रखमाला ओळखत नाही.". 

  रात्रभर नेहा विचार करते, मग तिला आठवत आपण त्या रात्री स्वामींना याचना केली. कदाचित तेच रखमा बनून आले असतील.

  त्या रात्री स्वामी तिच्या स्वप्नात येतात, "नेहा, कशी आहेस बाळा. तू माझी प्रिय भक्त आहेस. तुझ्यावर खूप अन्याय झाला. आता देऊळ बंद असल्यामुळे मी तुझ्याकडे येऊ शकलो. काळजी घे तुझी व तुझ्या बाळाची." 

  सकाळ झाली, नेहाला खूप प्रसन्न वाटत होत. रिया आता एक नामी वकील म्हणून ओळखल्या जाते. नेहाचे स्वप्न पूर्ण होतं.


Rate this content
Log in