Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!
Unveiling the Enchanting Journey of a 14-Year-Old & Discover Life's Secrets Through 'My Slice of Life'. Grab it NOW!!

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

तुझी आठवण

तुझी आठवण

1 min
332


(लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या नेहाची कथा)


आज ऑफिसमध्ये खूप काम होतं. संध्याकाळचे ५ वाजले तरी काही काम पेंडींग होतं. कसतरी काम आटोपला आता घरी जाऊ ह्या हेतूने आवरायला घेतलं. तेवढ्यात बॉसने बोलावले. बॉसच्या केबिनमध्ये गेले.


बॉस : नेहा उद्या तुला ऑफिसची काही काम आहे तर तुला उद्या चंद्रपूरला जावे लागेल. सगळी व्यवस्था मी करतो. तू फक्त सकाळी तयार राहा.


काय करणार बॉसची ऑर्डर सकाळी लवकर उठली आईने नाश्ता दिला. सगळं आटोपून १० क्या बसने निघाली. चंद्रपूरला पोहचल्यावर जेवण केला आणि लगेच बॉसने सांगितलेल्या ठिकाणी काही कागदपत्रे नेऊन द्यायची होती आणि चर्चा करून लगेच वापस निघायचं होतं.


पण म्हणतात ना जे आपण ठरवतो ते कधीच होत नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे उतरली होती. काम आटोपता आटोपता ५ वाजले. काही काळच नाही. आणि जस काम आटोपला तशी मोदींची घोषणा झाली लॉकडाऊन. झाला काय करावं काही कळायला मार्गच नव्हता. तशीच मैत्रिणीकडे आली. ती पण काय करणार. बॉस ल फोन केला तो बोलला काहीच हरकत नाही मला रिपोर्ट तू मेल कर. बॉसला लगेच रिपोर्ट मेल केले.


पण कोणाकडे एक दोन दिवस ठीक आहे पण चौदा दिवस. चार पाच दिवस असेच गेले. माझा जीव खूप रडकुंडीला आला मला आईची खुप आठवण यायला लागली. सकाळी झोपेत आईचे स्वप्न पडले मी किंचाळून उठले. सगळे माझ्या खोलीत आले. मी खूप रडायला लागले आई तुझी खूप आठवण येते ग. सगळ्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी आईच्या आठवणीत पार बुडून गेले.


Rate this content
Log in

More marathi story from Pallavi Udhoji

Similar marathi story from Tragedy