तुझी आठवण
तुझी आठवण


तुझी आठवण
(लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या नेहाची कथा)
आज ऑफिस मध्ये खूप काम होतं. संध्याकाळचे ५ वाजले तरी काही काम पेंडींग होतं. कसतरी काम आटोपला आता घरी जाऊ ह्या हेतूने आवरायला घेतलं. तेवढ्यात बॉसने बोलावले. बॉसच्या केबिनमध्ये गेले.
बॉस : नेहा उद्या तुला ऑफिसची काही काम आहे तर तुला उद्या चंद्रपूरला जावे लागेल. सगळी व्यवस्था मी करतो. तू फक्त सकाळी तयार राहा.
काय करणार बॉसची ऑर्डर सकाळी लवकर उठली आईने नाश्ता दिला. सगळं आटोपून १० च्या बसने निघाली. चंद्रपूरला पोहचल्यावर जेवण केल आणि लगेच बॉसने सांगितलेल्या ठिकाणी काही कागदपत्रे नेऊन द्याची होती आणि चर्चा करून लगेच वापस निघायचं होतं.
पण म्हणतात ना जे आपण ठरवतो ते कधीच होत नाही. मी माझ्या मैत्रिणीकडे उतरली होती. काम आटोपता आटोपता ५ वाजले. काही कळलंच नाही. आणि जस काम आटोपल तशी मोदींची घोषणा झाली लॉक डाऊन. झाला काय करावं काही कळायला मार्गच नव्हता. तशीच मैत्रिणीकडे आली. ती पण काय करणार. बॉस ल फोन केला तो बोलला काहीच हरकत नाही मला रिपोर्ट तू मैलकर. बॉसला लगेच रिपोर्ट मैल केले.
पण कोणाकडे एक दोन दिवस ठीक आहे पण चौदा दिवस. चार पाच दिवस असेच गेले. माझा जीव खूप रडकुंडीला आला. मला आईची खुप आठवण यायला लागली. सकाळी झोपेत आईचे स्वप्न पडले मी किंचाळून उठले. सगळे माझ्या खोलीत आले. मी खूप रडायला लागले आई तुझी खूप आठवण येते ग. सगळ्यांनी मला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण मी आईच्या आठवणीत पार बुडून गेले.